Home Blog Page 2926

‘मै नरेंद्र दामोदरदास मोदी…’ सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान पदी मोदी शपथबद्ध(व्हिडिओ)

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यानंतर अन्य मंत्र्यांच्या शपथविधीला सुरुवात झाली. यात सर्वप्रथम राजनाथ सिंह आणि त्यानंतर अमित शहा यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी सरकार 2.0 म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या कॅबिनेटमध्ये केंद्रातील प्रमुख नेते राहिलेल्या सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा समावेश नाही. या दोन्ही नेत्यांनी मंत्रिपद नको असल्याचे यापूर्वीच पत्र लिहून कळवले आहे. जेटली उपचारासाठी परदेशात असून सुषमा स्वराज यांनी शपथविधी समारंभाला उपस्थिती लावली. परंतु, त्यांनी व्यासपीठावर बसणे टाळले. मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात राजकारण, उद्योग, बॉलिवूड आणि विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींसह परदेशातील नेत्यांनीही उपस्थिती लावली .नितीन गडकरी यांनी  कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली .रामदास आठवले यांनी हि मंत्रीपदाची शपथ घेतली आहे .गोव्याचे श्रीपाद नाईक यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. या सोहळ्याला दिग्गजांची हजेरी आहे. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सात वाजल्यापासून हा सोहळा रंगला आहे. या सोहळ्यासाठी थोड्या थोडक्या नाही तब्बल सहा हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं. यामध्ये बॉलिवूडच्या तारे-तारकांचाही समावेश आहे. सुपरस्टार रजनीकांत, अभिनेते कमल हासन यांच्यासह कंगना रणौत, शाहरूख खान, करण जौहर, संजय लीला भन्साळी यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

शपथविधीसाठी बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान यांचा समावेश असलेल्या ‘बिमस्टेक’ देशांचे प्रमुख उपस्थित आहेत. २०१४ च्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रण होते. मात्र या वेळी पाकिस्तानला वगळण्यात आलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग शपथविधासाठी उपस्थित राहिले आहेत.

-रेणुका सिंह सरूता यांनी घेतली गोपतीयतेची शपथ सोमप्रकाश मंत्रीमंडळात सामील

– रतनलाल कटारिया आणि व्ही. मुर्लीधरन यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

– सुरेश अंगडी आणि नित्यानंद राय मंत्रीमंडळात सामील

– संजीव कुमार बालियान, संजय धोत्रे आणि अनुराग सिंह ठाकुर यांनी घेतली गोपनीयतेची शपथ

– निरंजण ज्योती आणि बाबुल सुप्रियो यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

– गंगापुरम किशन रेड्डी, पुरूषोत्तम रुपाला यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

– प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी घेतली मंत्रीपदाची शपथ

– कृष्णपाल गुर्जर यांनी घेतली शपथ

– अर्जुन राम मेघवाल आणि व्ही. के. सिंह मंत्रीमंडळात सामील

– मुनसुख मांडवीय, फग्गनसिंह कुलस्ते आणि अश्विनी कुमार चौबे यांनी घेतली शपथ

– किरण रिजीजू, प्रल्हाद सिंह पटेल, राजकुमार सिंह, हरिदीप सिंग पुरी मंत्रीमंडळात सामील

– राव इंद्रजीत सिंह,आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी घेतली गोपनीयतेची शपथ

– संतोष कुमार गंगवाल यांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ

– गिरीराज सिंह, गजेंद्र सिंह शेखावत

– डॉ. महेंद्रनाथ पांडे आणि डॉ. अरविंद सांवतांनी घेतली शपथ

-मुख्तार अब्बास नख्वी आणि प्रल्हाद जोशी शपथ घेऊन मंत्रीमंडळात सामील

– पीयूष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली गोपनीयतेची शपथ

– डॉ. हर्षवर्धन आणि प्रकाश जावडेकर शपथ घेऊन मोदींच्या मंत्रीमंडळात सामील

– स्मृती इराणी यांनी घेतली गोपनीयतेची शपथ

– झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा आता मोदी सरकारमध्ये मंत्री

– थावरचंद गहलोत, सुब्रह्मण्यम जयशंकर, डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांना मंत्रिपदाची शपथ

– हरसिमरत कौर बादल यांचा मोदी कॅबिनेटमध्ये समावेश, मंत्रिपदाची शपथ

-रवीशंकर प्रसाद यांनाही पुन्हा केंद्रीय मंत्रिपदाची संधी

– नरेंद्र सिंह तोमर यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ

– रामविलास पासवान यांचा मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये समावेश

– एनडीए-1 मध्ये संरक्षण मंत्री राहिलेल्या निर्मला सीतारमण यांनाही मंत्रिपद, इंग्रजीतून घेतली शपथ

– शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये जदयू नेत्यांचा समावेश नाही

– डीव्ही सदानंद गौडा यांनी इंग्रजीत घेतली मंत्रिपदाची शपथ

 

व्यावसायिक नाट्यस्पर्धेत ‘सोयरे सकळ’ प्रथम

मुंबई : एकतिसाव्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत येथील भद्रकाली प्रॉडक्शन संस्थेच्या ‘सोयरे सकळ’ या नाटकासाठी रु. ७ लाख ५० हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही घोषणा केली आहे.सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे -जिगिषा आणि अष्टविनायक, मुंबई या संस्थेच्या हॅम्लेट या नाटकास रु. ४ लाख ५० हजाराचे द्वितीय पारितोषिक आणि अद्वैत थिएटर्स, मुंबई या संस्थेच्या आरण्यक या नाटकास रु. ३ लाखाचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

दिग्दर्शन :-   प्रथम पारितोषिक (रु.१ लाख ५० हजार/-) चंद्रकांत कुळकर्णी (नाटक-हॅम्लेट)

द्वितीय पारितोषिक (रु.१ लाख /- आदित्य इंगळे (नाटक-सोयरे सकळ)

तृतीय पारितोषिक (रु.५० हजार /-) अद्वैत दादरकर (नाटक-एका लग्नाची पुढची गोष्ट)

नाट्यलेखन : प्रथम पारितोषिक (रु.१ लाख /-) डॉ.समीर कुलकर्णी (नाटक-सोयरे सकळ)

द्वितीय पारितोषिक (रु.६० हजार /-) रत्नाकर मतकरी (नाटक-आरण्यक)

तृतीय पारितोषिक (रु.४० हजार /-) दिग्पाल लांजेकर (नाटक-ऑपरेशन जटायू)

प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक (रु.४० हजार /-) प्रदिप मुळ्ये (नाटक-हॅम्लेट)

द्वितीय पारितोषिक (रु.३० हजार /-) प्रदिप मुळ्ये (नाटक-सोयरे सकळ)

तृतीय पारितोषिक (रु.२० हजार /-) शितल तळपदे (नाटक-आरण्यक)

नेपथ्य :       प्रथम पारितोषिक (रु.४० हजार /-) प्रदिप मुळ्ये (नाटक-हॅम्लेट)

द्वितीय पारितोषिक (रु.३० हजार /-) प्रदिप मुळ्ये (नाटक-सोयरे सकळ)

तृतीय पारितोषिक (रु.२० हजार /-) संदेश बेंद्रे (नाटक-ऑपरेशन जटायू)

संगीत दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक (रु.४० हजार /-) राहूल रानडे (नाटक-हॅम्लेट)

द्वितीय पारितोषिक (रु.३० हजार /-) अजित परब (नाटक-सोयरे सकळ)

तृतीय पारितोषिक (रु.२० हजार /-) कौशल इनामदार (नाटक-आरण्यक)

वेशभूषा :       प्रथम पारितोषिक (रु.४० हजार /-) गीता गोडबोले (नाटक-सोयरे सकळ)

द्वितीय पारितोषिक (रु.३० हजार /-) प्रदिप मुळ्ये (नाटक-हॅम्लेट)

तृतीय पारितोषिक (रु.२० हजार /-) मेघा जकाते (नाटक-आरण्यक)

रंगभूषा :       प्रथम पारितोषिक (रु.४० हजार /-) सचिन वारीक (नाटक-सोयरे सकळ)

द्वितीय पारितोषिक (रु.३० हजार /-) उल्लेश खंदारे (नाटक-हॅम्लेट)

तृतीय पारितोषिक (रु.२० हजार /-) उल्लेश खंदारे (नाटक-आरण्यक)

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक व रु.५० हजार /-

पुरुष कलाकार : भरत जाधव (नाटक-वन्स मोअर), प्रशांत दामले (नाटक-एका लग्नाची पुढची गोष्ट), सुमीत राघवन (नाटक-हॅम्लेट), उमेश कामत (नाटक-दादा एक गुड न्यूज आहे), सतीश राजवाडे (नाटक-अ परफेक्ट मर्डर)

स्त्री कलाकार : ऐश्वर्या नारकर (नाटक-सोयरे सकळ), तेजश्री प्रधान (नाटक-तिला काही सांगायचंय), ऋता दुर्गुळे (नाटक-दादा एक गुड न्यूज आहे), प्रतिभा मतकरी (नाटक-आरण्यक), माधूरी गवळी (नाटक-एपिक गडबड)

६ मे ते २० मे या कालावधीत दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले आणि प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरीवली या ठिकाणी अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १० व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले.

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अरविंद औंधे, विलास उजवणे, देवेंद्र पेम, अमिता खोपकर आणि शीतल क्षीरसागर यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.

एसटी झाली ७१ वर्षांची…

0

मुंबई : राज्यातील खेड्यापाड्यांतून, गावागावांतून विहार करणारी लालपरी आता ७१ वर्षांची झाली आहे. या लालपरीचा म्हणजेच एसटीचा ७१ वा वर्धापनदिन येत्या शनिवारी १ जून २०१९ रोजी राज्यात सर्व विभागीय आणि जिल्हापातळीवरील एसटीच्या सर्व ५६८  बसस्थानकांवर साजरा केला जाणार असल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.

राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची लोकवाहिनी ठरलेल्या लालपरी म्हणजे एसटीने काळानुसार कात टाकली असून अनेक स्वागतार्ह बदलही केले आहेत. एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक करणारी यंत्रणा एवढेच मर्यादित नसून एसटीने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत एसटीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे यासाठी एसटीने पुढाकार घेत प्रवासात सवलती दिल्या आहेत, असेही मंत्री श्री. रावते यांनी सांगितले. एसटीने लालपरीपासून सुरू केलेला प्रवास हिरकणी, शिवनेरी, शिवशाही ते विठाई असा सुखद टप्प्यावर आणला आहे. एसटीचा हा ७१ वा वर्धापनदिन राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवर उत्साहात साजरा करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यातील नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन आणि सत्कार संबंधित ठिकाणी करण्यात येणार असल्याचेही श्री. रावते यांनी सांगितले.

एसटीच्या मुंबईतील प्रमुख कार्यालयातही सोहळा करण्यात येणार असून यानिमित्ताने गोकुळदास तेजपाल सभागृहात एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. परिवहन आणि खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्याला परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख तसेच एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, एसटीचे महाव्यवस्थापक, सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, संघटनांचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तत्पूर्वी दुपारी दोन वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुरूवातीला ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर आणि रामदास फुटाणे आपल्या सदाबहार काव्यसुमनांची मेजवानी उपस्थित मान्यवर आणि कर्मचारी वर्गाला देणार आहेत. त्यानंतर नवनिर्वाचित खासदार अरविंद सावंत यांचे अभिनंदन आणि सत्कार तसेच सेवाज्येष्ठ एसटी कर्मचारी आणि उल्लेखनीय कामगिरी करीत सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. यावेळी प्रसिद्ध सिनेतारका मेधा दाढे  उपस्थित राहणार आहेत. तसेच एसटीच्या चित्ररथाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.

एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. रावते यांनी राज्यातील सर्व कर्मचारी आणि एसटी प्रवाशांना ७१ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शासकीय नोकरीत दिव्यांगांसाठी ४ टक्के आरक्षण

0

मुंबई: केंद्र शासनाच्या दिव्यांग अधिनियमानुसार दिव्यांगांना सरकारी नोकरभरतीतील 4 टक्के आरक्षणाचा लाभ देण्याच्या निर्णयास राज्य सरकारने मंजुरी दिली असून कालच (बुधवार दि.29 मे 2019) त्या संबंधीचा शासन निर्णय काढण्यात आला आहे अशी माहिती राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली.

या निर्णयामुळे अंध/अल्पदृष्टी, कर्णबधिरता, अस्थ‍िव्यंग, मेंदूचा पक्षाघात, कुष्ठरोग मुक्त, शारीरिक वाढ खुंटणे, आम्ल हल्लाग्रस्त, स्नायू विकृती, स्वमग्नता, मंदबुध्दी, मानसिक आजार अशा विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या व्यक्तींना सरकारी नोकरीत एक टक्का वाढीव जागा मिळणार आहेत.

श्री. कांबळे पुढे म्हणाले, दिव्यांगाचा लाभ घेऊ इच्छ‍िणाऱ्या व्यक्तीने सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. दिव्यांग व्यक्तींसाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 45 वर्षे निश्च‍ित करण्यात आली आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयाने त्यांच्या आस्थापनेवरील प्रत्येक संवर्गासाठी दिव्यांग व्यक्ती सरळ सेवा भरतीच्या पदासाठी 100 बिंदू नामावलीची स्वतंत्र नोंदवही ठेवावी असा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या वर्षी दिव्यांग उमेदवार न मिळाल्यास त्या जागेचा अनुशेष पुढील वर्षीच्या नोकर भरतीत ठेवावा असाही निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती श्री. कांबळे यांनी दिली.

पालखी सोहळयामध्ये वारक-यांना सोई-सुविधा प्राधान्याने देण्यात याव्यात – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे, दि.  30 :- आषाढी वारीच्या निमित्ताने पुणे जिल्हयामध्ये पालखी सोहळयाच्या कालावधीमध्ये वारक-यांना सर्व सोई-सुविधा प्राधान्याने देण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केल्या. पालखी सोहळा – 2019 च्या पार्श्वभूमीवर पूर्व तयारीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये  आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख,जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, अमर माने,कार्यकारी अभियंता.ग्रामीण पाणी पुरवठा विभाग एस.एम.कदम.प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, बारामतीचे उप विभागीय अधिकारी हेमंत निकम, दौंड-पुरंदरचे उप विभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड  , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजित कारंजकर, जिल्हा रुग्णालय,पुणेचे जिल्हा चिकीत्सक डॉ. अशोक नांदापूरकर,तहसिलदार हवेली,बारामती,इंदापूर, पुरंदर तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे प्रमुख विश्वस्त तसेच श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू चे पालखी सोहळा प्रमुख              तसेच दोन्ही संस्थानचे प्रमुख विश्वस्त, शासकीय अधिकारी उपस्थ‍ित होते.

या बैठकीमध्ये दिनांक 25 जून 2019 रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे तर दिनांक 24 जून 2019 रोजी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या काळात पुणे जिल्हयातील पालख्यांचा मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पालखी मार्गावर  मांसाहारी हॉटेल, मच्छी मार्केट, कत्तलखाने व दारुची दुकाने बंद ठेवावीत, या सोहळयामध्ये सामील असणा-या वाहनांची तपासणी करणे व त्यांना फिटनेस प्रमाणपत्र देणे, वाहतुकीचे नियोजन, सुरळीत विद्युत व्यवस्था, सपाटीकरण, निर्माल्य  व्यवस्था इ. बाबींवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर वारक-यांना मुक्कामाच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा, शासकीय दरामध्ये रॉकेल, धान्य, अखंडीत वीज पुरवठा करण्याबाबत संबंधित यंत्रणांना आदेश देण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी पुरवठा विभागाकडून देण्यात येणा-या सुविधा तसेच अग्नीशमन यंत्रणा इ.बाबतचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या कालावधीमध्ये पोलीस बंदोबस्त, वाहतुक नियोजन इ.बाबत संस्थानप्रमुखांशी चर्चा केली.

यावेळी  दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वारीच्या काळात पाणीपुरवठयाचे नियोजन करण्यासाठी, पालखीतळांवरील खड्डे मुरुम भराई करुन व्यवस्थ‍ित करणे, आवश्यक त्याठिकाणी रोलींग करणे, पालखीतळांकडे जाणा-या रस्तयांवर दुकानदारांकडून होणा-या अतिक्रमणाबाबत तसेच पालखीमध्ये सामील वाहनांच्या पार्किंगबाबत चर्चा करण्यात आली तसेच याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या.

यावेळी संस्थानच्या प्रमुख पदाधिका-यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली.      

पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना व व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी यांच्यात विजेतेपदासाठी लढत

पुणे, दि.30 मे 2019:  पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पीवायसी हिंदू जिमखाना संघाने केडन्स संघाचा 81 धावांनी तर, दुसऱ्या सामन्यात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 114 धावांनी धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर चुरशीच्या झालेल्या या उपांत्य फेरीच्या लढतीत काल पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 37.3षटकात 184धावा केल्या. केडन्स संघाचा आज 23षटकांपासून खेळ सुरु झाला. यात हर्षद खडीवाले 64, गणेश गायकवाड 51, अथर्व काळे 26, अक्षय वाईकर 22, जय पांडे 18, अथर्व धर्माधिकारी 20 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर केडन्सने 40 षटकात 9 बाद 261 धावा केल्या. पण त्यांचे 9 गडी बाद झाल्याने केडन्सची अंतिम धावसंख्या 216(वजा 45धावा)झाली व केडन्सने पहिल्या डावात 32 धावांची आघाडी घेतली. पीवायसीकडून यश मानेने अफलातून गोलंदाजी करत 70 धावात 5 गडी बाद केले. दुसऱ्या डावात पीवायसी संघाने 20 षटकात 8 बाद 186धावा केल्या. पीवायसीचे 8 गडी बाद झाल्याने त्यांची अंतिम धावसंख्या 146धावा(वजा 40धावा)झाली. यात दिव्यांग हिंगणेकरने 49 चेंडूत 42 धावा व मंदार भंडारीने 18 चेंडूत 32 धावा केल्या. दिव्यांग व मंदार यांनी दुसऱ्या गडयासाठी 76 चेंडूत 92 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर प्रीतम पाटील 39, योगेश चव्हाण 17, आदित्य लोंढे 17 यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. केडन्सकडून इझान सय्यद(28-4), सिद्देश वरघंटी(43-2), अक्षय वाईकर(37-1)यांनी सुरेख गोलंदाजी केली. केडन्सला विजयासाठी निर्धारित षटकात 115 धावांचे आव्हान होते. 115 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या केडन्सला पीवायसी संघाच्या भेदक माऱ्यापुढे त्यांची खेळी निष्प्रभ ठरली. त्यांचा डाव 17.2षटकात 83 धावांवर संपुष्टात आला. केडन्सचे 10 गडी बाद झाल्याने त्यांची धावसंख्या 33(वजा 50धावा) झाली. यात अथर्व काळे 19, हर्षद खडीवाले 18, जय पांडे 13 यांनी थोडासा प्रतिकार केला. पीवायसीकडून योगेश चव्हाण(15-3), अमेय भावे(6-2), रोहन दामले(12-2), दिव्यांग हिंगणेकर(13-1), साहिल छुरी(28-1)यांनी भेदक गोलंदाजी करत संघाला 81 धावांनी एकहाती विजय मिळवून दिला.

डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात पहिल्या डावात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 40षटकात 9बाद 213धावा केल्या. तत्पूर्वी काल डेक्कन जिमखाना संघ 22.5 षटकात 5 बाद 124 अशा स्थितीत होता. यात अभिषेक ताटे 41, स्वप्निल फुलपगारे 34 यांनी धावा करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण हे दोघेही बाद झाल्यानंतर शुभम नागवडेच्या 36धावा, शुभांकर हार्डीकरच्या 34 धावा वगळता एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. व्हेरॉककडून विशाल गीते(34-3), शुभम तैस्वाल(42-3), राहुल वारे(28-1), अॅलन रॉड्रिगेस(44-2)यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत डेक्कन संघाला 222 धावांवर रोखले. पण त्यांचे 9 गडी बाद झाल्याने अंतिम धावसंख्या 177(वजा 45)झाली. त्यामुळे व्हेरॉक संघाने पहिल्या डावात 36 धावांची आघाडी घेतली.

दुसऱ्या डावात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीने 20षटकात 3बाद 187 धावा केल्या. व्हेरॉकचे 3 गडी बाद झाल्याने अंतिम धावसंख्या 172धावा(वजा15)झाली. यामध्ये ऋतुराज गायकवाडने तुफानी खेळी करत 46 चेंडूत 8 चौकार व 2षटकारांसह नाबाद 74 धावांची खेळी केली. ऋतुराजला ओम भोसलेने 71 चेंडूत 68धावा, तर विनय पाटीलने  29 धावा काढून सुरेख साथ दिली. डेक्कन जिमखाना संघाला 20 षटकात विजयासाठी 209 धावांचे आव्हान होते. याच्या उत्तरात डेक्कन जिमखाना संघाला 20षटकात 9बाद 129 धावांच करता आल्या. 9 गडी बाद झाल्याने डेक्कनची धावसंख्या  94धावा(वजा 35धावा)झाली. यात स्वप्निल फुलपगारे 30, शुभम नागवडे 28 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. व्हेरॉककडून राहुल वारे(27-2), शुभम तैस्वाल(18-2), अॅलन रॉड्रिगेस(23-2) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.

स्पर्धेचा अंतिम सामना पीवायसी हिंदु जिमखाना व व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी यांच्यात शनिवार 1 जून व रविवार 2 जून रोजी पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर होणार आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:

पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदान:

पहिला डाव: पीवायसी हिंदू जिमखाना: 37.3षटकात सर्वबाद 184धावा(234-50धावा)(रोहन दामले 65(81,5×4,3×6), मंदार भंडारी 54(52,9×4,1×6), प्रीतम पाटील 22(13), योगेश चव्हाण 18(16), दिव्यांग हिंगणेकर 16(26), अमेय भावे 13, अक्षय वाईकर 7.3-47-4, प्रसन्ना हजारे 6-34-3, गणेश गायकवाड 7-51-2, हर्षद खडीवाले  3-27-1) वि.केडन्स: 40षटकात 9बाद 216धावा(261-45धावा)(हर्षद खडीवाले 64(78), गणेश गायकवाड 51(69), अथर्व काळे 26(26), अक्षय वाईकर 22(11), जय पांडे 18(31), अथर्व धर्माधिकारी 20(24), यश माने 8-70-5, प्रीतम पाटील 6-54-2, योगेश चव्हाण 2-22-1); पहिल्या डावात केडन्स संघाकडे 32 धावांची आघाडी;

दुसरा डाव: पीवायसी हिंदू जिमखाना: 20षटकात 8बाद 146धावा(186-40धावा) (दिव्यांग हिंगणेकर 42(49,1×4,1×6), मंदार भंडारी 32(18,5×4,1×6), प्रीतम पाटील 39(35), योगेश चव्हाण 17, आदित्य लोंढे 17, इझान सय्यद 4-28-4, सिद्देश वरघंटी 4-43-2, अक्षय वाईकर  4-37-1, हर्षद खडीवाले 4-33-1) वि.वि.केडन्स:  17.2षटकात सर्वबाद 33धावा(83-50धावा)(अथर्व काळे 19, हर्षद खडीवाले 18, जय पांडे 13, योगेश चव्हाण 4-15-3, अमेय भावे 1-6-2, रोहन दामले 3.2-12-2, दिव्यांग हिंगणेकर 3-13-1, साहिल छुरी 4-28-1); सामनावीर-रोहन दामले;पीवायसी 81 धावांनी विजयी;

डेक्कन जिमखाना मैदान:
पहिला डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 40षटकात 9बाद 213धावा (258-45धावा) (ऋतुराज गायकवाड 100(95, 9×4), ओम भोसले 77(76,10×4), उत्कर्ष अगरवाल 29(45), आशय पालकर 8-49-4, श्लोक धर्माधिकारी 4-44-1, मुकेश चौधरी 8-39-1, यश बांबोळी 5-27-1) वि.डेक्कन जिमखाना: 40षटकात 9गडी बाद 177धावा(222-45धावा)(अभिषेक ताटे 41(67,3×4), स्वप्निल फुलपगारे 34(43,3×4), शुभम नागवडे 36(35), शुभांकर हार्डीकर 34(60), विशाल गीते 7-34-3, राहुल वारे 7-28-1, अॅलन रॉड्रिगेस 8-44-2, शुभम तैस्वाल 8-42-3); व्हेरॉक संघाकडे 36धावांची आघाडी;

दुसरा डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 20षटकात 3बाद 172धावा(187-15धावा)(ऋतुराज गायकवाड नाबाद 74(46,8×4,2×6), ओम भोसले 68(71,5×4), विनय पाटील 29(39), यश बंबोली 4-39-2) वि.वि.डेक्कन जिमखाना: 20षटकात 9बाद 94धावा(129-35धावा)(स्वप्निल फुलपगारे 30(20), शुभम नागवडे 28(17), राहुल वारे 4-27-2, शुभम तैस्वाल 4-18-2, अॅलन रॉड्रिगेस 4-23-2, विशाल गीते 2-17-1); सामनावीर-ऋतुराज गायकवाड; व्हेरॉक संघ 114 धावांनी विजयी. 

शरद पवारांचा मोठा निर्णय; राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार…? राहुल गांधींच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

नवी दिल्ली :काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. या भेटीनंतर पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडून मात्र याबाबत मौन बाळगण्यात आलं आहे.

लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदी न राहण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल यांनी सादर केलेला राजीनामा काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने फेटाळला असला तरी राहुल राजीनाम्यावर ठाम आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी आग्रह केल्यानंतरही राहुल मानायला तयार नाहीत. त्यात नेत्यांची भेट टाळणाऱ्या राहुल यांनी आज अचानक पवारांचे निवासस्थान गाठल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये साधारण ५० मिनिटं चर्चा झाली. या भेटीचे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जाऊ लागले आहेत.
विलीनीकरण का होणार?
राहुल-पवार भेटीत राष्ट्रवादी पक्ष विसर्जीत करून काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत खल झाल्याचे कळते. त्यातच दोन्ही पक्षांचं हित असल्याचंही अनेक नेत्यांचं म्हणणं आहे. काँग्रेसकडे लोकसभेत ५२ खासदारांचं बळ असणार आहे. हे संख्याबळ विरोधी पक्षनेतेपदासाठी पुरेसं नाही. राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळेल. पर्यायाने राहुल गांधींचा विरोधी पक्षनेते होण्याचा मार्ग मोकळा होईल. तसे झाल्यास राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद शरद पवार यांच्याकडे सोपवण्यात यावं, असे काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचं मत आहे.
काँग्रेसमध्ये नेतृत्वाची कमतरता भासत असावी!
राहुल गांधी यांच्यासोबत महाराष्ट्रातील निवडणुकीवर चर्चा झाली. पक्ष विलीनीकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही, असे शरद पवार यांनी बैठकीनंतर सांगितले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची आपणास ऑफर आहे का, असे विचारले असता काँग्रेसमध्ये नेतृत्वाची कमतरता भासत असावी, असे सूचक वक्तव्य पवारांनी केले. राहुल यांच्या राजीनाम्यावर बोलताना, पर्याय नसताना मैदान सोडणे योग्य नाही, असे नमूद करत राहुल यांनीच अध्यक्षपदी राहावे, असा सल्ला पवार यांनी दिला.
मनमोहन होणार काँग्रेस अध्यक्ष?
शरद पवार यांच्या भेटीनंतर राहुल हे तडक माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत. ही भेटही महत्त्वाची असून काँग्रेसचे भावी अध्यक्ष मनमोहन असणार का, या चर्चेला या निमित्ताने तोंड फुटले आहे.

माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा राष्‍ट्रीय पुरस्‍कार जाहीर

0

पुणे-देशाच्‍या माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्‍ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अॅग्‍यूइला ऍझटेका’ हा राष्‍ट्रीय पुरस्‍कार जाहीर झाला असून येत्‍या शनिवारी 1 जून रोजी पुण्‍यामध्‍ये सन्‍मानपूर्वक प्रदान करण्‍यात येणार आहे. सेनापती बापट रस्‍त्‍यावरील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्‍ट्रीजच्‍या पाचव्‍या मजल्‍यावरील सभागृहात हा कार्यक्रम सकाळी 11.30 वाजता होणार आहे. मेक्सिकोच्‍या राजदूत या वेळी प्रमुख पाहुण्‍या म्‍हणून उपस्थित राहणार आहेत. मेक्सिको देशाशी मानवतावादी परस्‍पर संबंध दृढ करणा-या परदेशी नागरिकाला हा सन्मान प्रदान करण्‍यात येतो. यापूर्वी डॉ. नेल्‍सन मंडेला,राणी एलिझाबेथ (द्वितीय), डॉ. सर्वपल्‍ली राधाकृष्‍णन, बिल गेट्स या मान्‍यवरांना या पुरस्‍काराने गौरवण्‍यात आले आहे. देशाच्‍या राष्‍ट्रपती असतांना सन 2007मध्‍ये मेक्सिकोचे राष्‍ट्राध्‍यक्ष फेलिपी डी जेझस कॉल्‍डेरॉन हिनोजोसा यांनी भारताला भेट दिली होती.त्‍यांच्‍या निमंत्रणावरुन श्रीमती पाटील यांनी  2008 मध्‍ये मेक्सिकोला भेट दिली होती. या काळात दोन्‍ही देशांदरम्‍यान असलेले संबंध अधिक बळकट झाले होते.

पंजाब नॅशनल बँकेच्या कर्मचार्‍यांचा देशव्यापी संप

पुणे : पंजाब नॅशनल बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या कर्मचार्‍यांना होणार्‍या त्रासदायक योजनेच्या विरोधात देशभरातील अधिकारी व कर्मचारी 24 व 25 जून रोजी दोन दिवसीय संप करणार आहेत. अशी माहिती ऑल इंडिया पंजाब नॅशनल बँक ऑफिसर असोसिएशन चे कोषाध्यक्ष कॉ विलियम तुस्कानो यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. यावेळीमहाराष्ट्र व गोवा राज्याचे एजीएस कॉ सूर्यकांत लोंढे व ऑल इंडिया पीएनबी एम्प्लॉई असोसिएशन चे जी एस प्रभू व पंजाब नॅशनल बँक एम्प्लॉई फेडरेशन चे सचिव श्री प्रभाकर शेट्टी उपस्थित होते.
या प्रसंगी अखिल भारतीय पीएनबी कर्मचारी संघटनेचे संयुक्त सचिव. विद्याधर वाघरे, अखिल भारतीय पीएनबी अधिकारी संघटनेचे सरचिटणीस कॉमरेड प्रमोदकुमार, अखिल भारतीय पीएनबी कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष अखिल भारतीय पीएनबी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष मीनानाथ नेहरू विठ्ठल माने, अखिल भारतीय पीएनबी कर्मचारी फेडरेशनचे संयुक्त सचिव. महेश शिलेगे, अखिल भारतीय पीएनबी कर्मचारी फेडरेशनचे संयुक्त सचिव. सुजीत उदय उपस्थित होते.
या प्रसंगी त्यांनी असे म्हटले की आम्ही ज्या विषयांचा विरोध करतो त्या विषयावर द्विपक्षीय समस्यांवर व्यवस्थापनाने एकपक्षीय निर्णय घेतल्यास भारतीय बँक संघटनेला वेतन पगारासाठी पूर्ण प्रमाणीकरण पत्र देऊ नये- आयबीएसए, उच्च व्यवस्थापन स्व-स्विच एकीकरण आणि संबंधित भारतीय धोरण लागू न करण्यासाठी रिझर्व्ह बँक न्यायालयात आहे, परंतु कनिष्ठ अधिकार्यांना शिक्षा न देता त्यांना बळीचा बकरा बनवल्या जात आहे. त्याचप्रमाणे, स्केल -1 ऑफिसर्सच्या इंटर सर्कल बदली जाणून बुजून अंमलबजावणी न करणे, महिला कर्मचार्यांना गर्भधारणेच्या काळात कोणत्याही सोयीस्कर ठिकाणी तात्पुरती बदली करण्यास परवानगी दिली जात नाही. त्यानुसार अनुकंपा आधारावर हस्तांतरण सुविधेमध्ये बदल झाला आहे. न्यूबी जवळजवळ समान आहे. शाखांमध्ये ग्राहक सेवांवर प्रतिकूल परिणाम समाविष्ट करून वर्तमान श्रेणीपासून निम्न श्रेणीतील शाखा आणि मंजूर केलेल्या कर्मचार्यांची संख्या कमी करणे.
ते म्हणाले की अनुकंपा आधारावर रोजगाराच्या बदल्यात एक बाजूचे बदल आणि स्टेशन थांबविण्याच्या धोरणास, देशभरातील पूर्व-अधिकार्यांकडून पश्चिम आणि उत्तर ते दक्षिण अशा सर्व ठिकाणी नोकरी भरून रोजगार भरती धोरण थांबविले गेले आहे. त्याचप्रमाणे मुख्यधाराकडून मंजूर केलेल्या कार्पेट गृहेचे बँक खात्यात आणि बँकेच्या नुकसानास धनादेश देऊन बँकेचे नुकसान झाले आहे.
ते म्हणाले की सोमवार 10 जून 2019 पासून आम्ही सर्वजण एक असहकार चळवळ सुरू करणार आहोत ज्यामध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचारी केवळ कामाच्या वेळेत आणि कामाच्या वेळी आलेल्या संदेशांवरच कार्य करतील.त्यानंतर आलेल्या संदेशांना आम्ही उत्तर देणार नाही. 1 जून रोजी आम्ही बँकेकडून अतिरिक्त सहाय्य मागे घेणार आहोत, ज्या अंतर्गत आम्ही सर्वजण आमच्या जागांवर जास्त वेळ घालविताना बँकेचे काम करणार आहोत. या व्यतिरिक्त, बँक अधिकारी आणि कर्मचारी गरज पडल्यास सुट्टीच्या दिवशी देखील सेवा देतात, 11 जून पासून हे आम्ही बंद करणार आहोत.
या संदर्भात अधिक माहिती देऊन त्यांनी पत्रकारांना सांगितले की सोमवारी 17 जून रोजी धरणे आंदोलन देशभरातील विभागीय कार्यालयाबाहेर सुरू होईल. हे धरणे चळवळ बँकेच्या वेळे नंतर असेल.
शेवटी, त्यांनी सांगितले की पीएनबीसारख्या प्रतिष्ठित बँकेच्या शीर्ष व्यवस्थापनाचे मनपसंत पूर्ण मनोवृत्ती बदलण्यासाठी बँकेच्या हितसंबंधाने, 24 आणि 25 जून 2019 रोजी पीएनबीच्या सर्व शाखा आणि सर्व प्रकारच्या कार्यालयांमध्ये संपूर्ण स्ट्राइक होईल. या दोन दिवसात अधिकारी आणि बँक कर्मचारी पूर्णपणे काम बंद करतील. ते म्हणाले की, सध्या बँक ऑफिसर्स आणि कर्मचारी काळ्या फिती लावून का करत आहेत आणि जवळजवळ प्रत्येक दिवशी त्यांचे व्यवस्थापनास नाराजीचा संदेश पाठवत आहेत.

ममता बॅनर्जींचा मोदींच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्यास नकार

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला जाण्यास नकार दिला आहे. आधी या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते पण माध्यमांचे रिपोर्ट्स पाहिल्यानंतर त्यांनी आपले मन वळवले. ममताने सांगितले की, माध्यम रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे की, बंगालमधील हिंसाचारात 54 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. भाजपाने केलेला हा दावा साफ खोटा आहे. सोहळ्यात उपस्थित राहणार नसल्याबद्दल ममतांनी मोदींची माफी मागितली आहे. तर दूसरीकडे केरळचे मुख्यमंत्री पी विजयन हे सुद्धा शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार नाहीत.

बंगालमधील हत्याकांडाचा राजकीय संबंध नाही – ममता

ममतांनी एक पत्राद्वारे शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार नसल्याची माहिती दिली आहे. त्यांनी लिहीले की, नवीन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हार्दिक शुभेच्छा. तुमचे आमत्रंण स्वीकारून शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार होते. पण गेल्या एक तासापासून भाजप माध्यमांद्वारे दावा करत आहे की, राजकीय हिंसाचारात बंगालमधील 54 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पण हे साफ खोटे आहे. बंगालमध्ये कोणतीही राजकीय कारणामुळे हत्या करण्यात आली नाही. हे हत्याकांड कौटुंबिक कलह, एकमेकांमधील वाद आणि वैमनस्यातून झाली आहे. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. आमच्याकडे तसे पुरावेही नाहीत. यामुळे मी शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहू शकत नाही.

ममतांनी लिहिले की, शपथ ग्रहण लोकशाही साजरी करण्याचा एक अभिमानास्पद क्षण असतो. राजकीय फायद्यासाठी एखाद्या पक्षाची प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी या सोहळ्याचा उपयोग करू नये.
मला क्षमा करा.

राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा, 6 हजार पाहुणे घेणार व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाचा आस्वाद

0

नवी दिल्ली – राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. गुरुवारी सांयकाळी राष्ट्रपती भवनातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा शपथविधी समारंभ असेल, ज्यामध्ये सुमारे 6 हजार पाहुण्यांचा समावेश आहे.

नरेंद्र मोदींना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाले. पण पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती कोविंद यांच्या इच्छेनुसार, हा समारंभ अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. हा शपथविधी समारंभ राष्ट्रपती भवनातील फोरकोर्टमध्ये होणार आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी फक्त राष्ट्राध्यक्षाच्या गार्ड ऑफ ऑनरचा सोहळा पार पडतो. तसेच, हा शपथविधी ‘दरबार हॉलमध्ये’ नाही, तर फॉरकोर्टमध्ये पार पडणार आहे कारण, दरबार हॉलमध्ये फक्त 500 लोकांची बसण्याची व्यवस्था असते.

चौथ्यांदा फॉरकोर्टमध्ये होणार शपथविधी
भारताचे 8 वे पंतप्रधान चंद्रशेखर असे पहिले पंतप्रधान होते, ज्यांचा 1990 साली फोरकोर्टमध्ये शपथविधी झाला होता. त्यानंतर 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचा या ठिकाणी शपथविधी पार पडला होता आणि तिसऱ्या वेळेस 2014 मध्ये नरेंद्र मोदींचाही शपथविधी फॉरकोर्टमध्येच पार पडला होता. 2014 मध्ये मोदींच्या शपथविधीसाठी सार्क देशातील नेत्यांना आमंत्रण देण्यात आले होते. यादरम्यान जवळपास 4 हजार पाहुणे या समारंभात सहभागी झाले होते.

व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था
या सोहळ्यात आलेल्या लोकांना शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच राष्ट्रपती भवनातील खास वरणाचाही यात समावेश आहे. या वरणाचे वैशिष्ट म्हणजे याला शिजण्यासाठी तब्बल 48 तास लागतात. मंगळवारपासूनच याची तयारी करण्यात येत आहे.

सायंकाळी 7 वाजता सुरू होणार शपथविधी
2014 मध्ये सायंकाळी 6 वाजता शपथविधी समारंभ सुरू झाला होता. त्यासाठी 4 वाजेपासून पाहुण्यांचे राष्ट्रपती भवनाकडे आगमन सुरू झाले होते. पण त्यावेळी गरम उन्हाच्या झळ्यामुळे पाहुण्यांना खूप त्रास झाला होता. यादरम्यान सुरक्षेच्या कारणामुळे पाण्याची बाटली सुद्धा आत नेण्यास परवानगी नव्हती. म्हणून या गोष्टी लक्षात घेऊन यावेळेस हा कार्यक्रम सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे.

अरूण जेटली यांनी घेतली राजकारणातून निवृत्ती

दिल्ली- अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नवीन सरकारमध्ये सामील होण्यास असमर्थ असल्याचे सांगितले आहे. जेटली यांनी पत्रात आपल्या आरोग्याचे कारण दिले आहे. मोदींनी 2014 मध्ये सरकार चालवण्यासाठी जेटली यांना तीन मंत्रालये दिली होती. त्यात, अर्थ, रक्षा आणि सूचना आणि प्रसारण हे विभाग होते. मागील 7 मे रोजी किडनी ट्रांसप्लांटनंतर जेटली यांचे तब्येत पूर्णपणे ठीक झालेली नाहीये. फेब्रुवारीमध्ये झालेले शेवटचे बजेटदेखील ते सादर करू शकले नव्हते. त्यावेळी जेटली अमेरीकेत उपचार घेत होते आणि त्यांच्या जागेवर पीयूष गोयल यांनी बजेट सादर केले होते.

जेटली यांनी पत्रात लिहीले
”मागील 5 वर्षे सरकारचा एक भाग होणे माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आणि नवीन अनुभव शिकण्यास मिळाला. मागील 18 महिन्यांपासून गंभीर आजाराने त्रस्त झालो आहे. पण, डॉक्टरांनी योग्य उपचार करून मला बऱ्यापैकी ठीक केले आहे. तुमचा निवडणूक प्रचार संपल्यावर आणि केदारनाथला जाण्यापूर्वी मी स्वतःहून तुम्हाला भेटून सांगितले होते की, नवीन सरकारमध्ये सामील होऊ शकणार नाही. यानंतरही पक्षाची अनौपचारीक पद्धतीने मदत करत राहील.”

जेटली 3 आठवडे ऑफीसला जाऊ शकले नव्हते- सुत्र
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेटली यांची तब्येत मागील काही आठवड्यांपासून खराब आहे. त्यांना काही तपासण्यांसाठी एम्समध्ये भर्ती केले होते. डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी यूके आणि यूएसला जाण्याचा सल्ला दिला आहे. ते मागील तीन आठवड्यांपासून आपल्या ऑफीसला गेले नाहीयेत. लोकसभेत मिळालेल्या विजयानंतरही ते भाजपच्या कार्यक्रमात दिसले नव्हते. मागील शुक्रवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीतही ते सामील झाले नव्हते.

जेटली यांना दोन वेळा सुरक्षा खाते मिळाले आहे
मे 2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर जेटली यांना अर्थ आणि सुरक्षा मंत्रालय हे दोन व विभाग देण्यात आले होते. 2014 मध्ये ते 6 महिने रक्षा मंत्री होते. त्यानंतर मनोहर पर्रिकर यांना ते खाते देण्यात आले. पण काही कारणास्तव पर्रिकर यांना परत गोव्याचा मुख्यमंत्री बनवण्यात आले. त्यानंतर 2017 मध्ये जेटली यांना परत रक्षा खात्याची जबाबदारी मिळाली. 6 महिन्यानंतर निर्मला सीतारमण यांना रक्षा मंत्री बनवण्यात आले. जेटली यांच्या आजारपणामुळे पीयूष गोयल यांनी दोनवेला अर्थ मंत्रालयाची जबाबदारी पार पाडली आहे.

अमित शाह यांच्यानंतर जे.पी. नड्डा होऊ शकतात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, शाह यांना मिळू शकते मंत्री पद

नवी दिल्ली- भाजप अध्यक्ष अमित शाह यांना मोदी सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे खात्रीशीर सुत्रांकडून कळाले आहे. न्यूज एजंसी आयएएनएसनुसार, आता पक्ष अध्यक्षाचे पद आरोग्य मंत्री मंत्री जे.पी. नड्डा यांना दिले जाऊ शकते. लोकसभा निवडणुकीत नड्डा यांना उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आले होती. ही जबाबदारी योग्य रितीने पार पाडत त्यांनी यूपीत 80 पैकी 62 जागा मिळून दिल्या. अमित शाह यांनी 2014 मध्ये यूपीत 71 जागा मिळून दिल्या होत्या.

2014 मध्ये अमित शाह यांना मिळाली होती यूपीची जबाबदारी
2014 लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांना भाजपने उत्तरप्रदेशचा प्रभारी बनवले होते. त्यावेळी राजनाथ सिंह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण, सरकार आल्यानंतर त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले त्यामुळे त्यांना भाजप अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यानंतर अमित शाह यांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले.

पक्षात उत्कृष्ट रणनितीकार अशी अहे नड्डा यांची ओळख
न्यूज एजंसीने सांगितल्यानुसार, मोदी सरकार 10 जुलैला केंद्रीय बजेट सादर करणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. अशातच नड्डा पुठील राजकीय रणनिती आखू शकतात. अशी शंका आहे की, जम्मू-कश्मीर आणि कर्नाटकमध्ये गठबंधन सरकार धोक्यात दिसत आहे, त्यामुळे तिथे परत निवडणूका होण्याचे चिन्ह आहेत. त्यासोबतच पुढील वर्षाच्या सुरुवातील दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणूका आहेत.

दक्षिण भारतावर फोकस करतील नड्डा
पटनामधून बी.ए.चे शिक्षण घेतल्यानंतर नड्डा यांनी हिमाचलमधून एल.एल.बी. केले. त्यानंतर ते हिमाचलमधून 3 वेळेस आमदार म्हणून निवडणूक आले. 2014 मध्ये त्यांना केंद्रीय मंत्रीपद देण्यात आले. नड्डा यांचा मुख्य फोकस दक्षिणच्या राज्यांवर असेल. ते या राज्यात भाजपला मोठा पांठिंबा मिळवण्याकडे लक्ष देतील. सध्या तेलंगानामध्ये भाजपने 4 आणि कर्नाटकमध्ये 23 जागेवर विजय मिळवला आहे.

महिला ‘गाईड’ सांगताहेत वाघोबाच्या साम्राज्याची गोष्ट!

0

ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात महिला गाईड

मुंबई, दि. 29 : आपण वन पर्यटनाला जातो, गड किल्ल्यांना भेटी देतो, सागराच्या लाटांवर स्वार होतो, या सगळ्या स्थळांची माहिती जाणून घेणं, त्याचा इतिहास समजून घेणंही आपल्याला आवडतं. अशा वेळी आपल्या मदतीला येतात ते पर्यटक मार्गदर्शक म्हणजे “गाईड”! पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात महिलांनी कधीच शिरकाव केला असला तरी घनदाट जंगलात पर्यटकांना घेऊन जाणं, त्यांची सुरक्षितता जपतांना त्यांना त्या वनाची, तिथल्या जैव विविधतेची संपूर्ण आणि अचूक माहिती देणं हे जरा हटके काम स्वीकारलं आहे, राज्यातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील स्थानिक युवतींनी..! या वेगळ्या वाटेवरून जाताना त्यांनी स्वावलंबनाचा मार्ग तर चोखाळला आहेच परंतु निसर्ग रक्षणाच्या कामात योगदानही दिले आहे.

राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा, सह्याद्री आणि ताडोबा- अंधारी  असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. यापैकी ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसोबत जंगल भ्रमंती करताना या महिला गाईड सांगत आहेत तिथे अधिवास करणाऱ्या वाघोबाच्या साम्राज्याची गोष्ट, घडवताहेत तिथल्या जैव विविधतेचे दर्शन. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ३०, पेंच व्याघ्र प्रकल्पात १२ आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ५ महिला गाईड कार्यरत आहेत. त्यामुळे तुम्ही जर कधी मेळघाट, पेंच किंवा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आणि महिला “गाईड” तुम्हाला या जंगलाची ओळख करून देतांना दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको…

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात तसेच वनालगतच्या गावांमध्ये स्थानिक महिलांना विविध व्यवसाय- उद्योगाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण केले जात आहे. त्याचाच हा एक भाग आहे. अचूक आणि परिपूर्ण माहितीने समृद्ध गाईड आलेल्या पर्यटकाला जंगलभ्रमंतीचा उत्तम आनंद देऊ शकतो हे विचारात घेऊन या वन पर्यटक मार्गदर्शकांना प्रशिक्षण दिले गेले आहे.

पर्यटनाला आलेल्या पर्यटकांशी सौजन्याने बोलणे, त्यांना जंगल भ्रमंतीचे नियम समजून सांगणे, जंगलात गेल्यानंतर कसे वागायचे हे शिकवणे, व्याघ्र प्रकल्पाची माहिती देताना वाघांबरोबरच इतर वन्यजीव आणि वृक्षसंपदेने संपन्न असलेल्या वनाची ओळख करून देणे, वन्यजीवांची माहिती देणे, त्या जंगलातील पशू पक्षी आणि प्राण्यांचा असलेला वावर सांगणे यासारख्या गोष्टींमधून पर्यटकाला पर्यटनाचा पुरेपूर आणि भरपूर आनंद मिळेल अशी वर्तणूक करणे यादृष्टीने या महिला पर्यटन मार्गदर्शकांना तयार करण्यात आले आहे. दिल्या जाणाऱ्या माहितीमध्ये एकवाक्यता आणि एकसूत्रता राहील याची काळजी घेतली गेली आहे.

प्रशिक्षण, रोजगार संधी आणि उत्पन्न वृद्धी ही 

स्थानिकांच्या विकासाची त्रिसूत्री-सुधीर मुनगंटीवार

पक्ष्यांचे संगीत आणि वाघाच्या डरकाळ्यांनी व्याघ्र प्रकल्पातील डोंगर रांगा जिवंत होतात असं म्हटलं जातं. याच डोंगर रांगात वसलेल्या, व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात, वनालगतच्या गावात राहणाऱ्या स्थानिक लोकांनी ही वने जिवंत ठेवण्यासाठी आणि वाढण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. अशा वेळी या लोकांना रोजगाराच्या पर्यायी संधी उपलब्ध करून देणे, त्या दृष्टीने आवश्यक असलेले प्रशिक्षण देणे, अत्यावश्यक पायाभूत सुविधा या गावांमध्ये उपलब्ध करून देणे आणि त्यांचे वनांवरचे अवलंबित्व कमी करणे यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतून या कामाला गती देण्यात आली आहे. पर्यटक मार्गदर्शक, महिलांसाठी शिलाई मशिन युनिट, दुभत्या पशुधनाचे वाटप, होम स्टे, वाहनचालक, ऑटोमोबाईल प्रशिक्षण अशा विविध माध्यमातून स्थानिकांचे सक्षमीकरणाचे काम सुरु आहे. यासाठी आपण आय.टी.सी सारख्या अनेक संस्थांची मदत घेतली आहे. महिला वन पर्यटक मार्गदर्शक हा त्यातीलच एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

एक सेल्फी तर हवाच

पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात घेऊन जातांना  सुरुवातीला आम्ही एकमेकांशी नवखे असलो तरी एका प्रवासात आमची त्या कुटुंबासोबत मैत्री होते आम्ही त्यांच्या कुटुंबापैकीच एक होऊन जातो. वाघ पाहिल्यानंतर पर्यटकांचा आनंद किती विलक्षण असतो याची आम्हाला अनुभूती होते.  वाघाशिवाय दिसणाऱ्या इतर वन्यजीवांना पाहून ही पर्यटक हरखून जातात. पर्यटकांचा रानवाटांवरचा हा प्रवास अधिकाधिक सुखद आणि सुरक्षित होईल याची आम्ही काळजी घेतो, पर्यटक जेव्हा परतीच्या प्रवासाला निघतात तेव्हा ज्या गाईडमुळे त्यांची व्याघ्र प्रकल्पातील सहल अविस्मरणीय झाली त्यांच्याबरोबर एक सेल्फी तर हवाच ही त्यांची मागणी आम्हालाही आनंद देऊन जात असल्याची प्रतिक्रिया पी.ए बोरजे या महिला पर्यटक मार्गदर्शकाने दिली.

पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवशी व्हेरॉक संघाचे डेक्कन जिमखाना संघावर वर्चस्व:

ऋतुराज गायकवाडची शतकी खेळी

पीवायसी संघाचे केडन्स संघापुढे 234 धावांचे आव्हान

पुणे-पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित  पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात  ऋतुराज गायकवाड(100धावा)याने केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने डेक्कन जिमखाना संघासमोर 258 धावांचे आव्हान उभे केले आहे. तर, दुसऱ्या सामन्यात  अक्षय वाईकर(47-4), प्रसन्ना हजारे(34-3), गणेश गायकवाड(51-2)यांनी भेदक गोलंदाजीच्या जोरावर केडन्स संघाने पीवायसी हिंदू जिमखाना संघाला 234 धावांवर रोखले.

डेक्कन जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 40षटकात 9बाद 258धावा केल्या. पण व्हेरॉकचे 9 गडी बाद झाल्याने त्यांची अंतिम धावसंख्या 213धावा(वजा 45धावा)झाली. यात ऋतुराज गायकवाडने 95 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 100धावांची शतकी खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. ऋतुराजला ओम भोसलेने 76 चेंडूत 77धावा करून सुरेख साथ दिली. ऋतुराज व ओम यांनी तिसऱ्या गडयासाठी 96 चेंडूत 91धावांची भागीदारी करून संघाला 258 धावांचे आव्हान उभे करून दिले. डेक्कन जिमखानाकडून आशय पालकरने 49 धावात 4 गडी बाद करून व्हेरॉकला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना डेक्कन जिमखाना संघाने आज दिवसअखेर 22.5षटकात 5बाद 124धावा केल्या. यात अभिषेक ताटेने 67 चेंडूत 41 धावा व स्वप्निल फुलपगारेने 43 चेंडूत 34 धावा करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. व्हेरॉकच्या विशाल गीतेने 21 धावात 3 गडी बाद केले. डेक्कन जिमखाना संघाचा पहिल्या डावातील अजून 18.1षटकांचा खेळ बाकी आहे.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात पीवायसी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केडन्स संघाच्या अचूक गोलंदाजी व क्षेत्ररक्षणापुढे पहिल्या डावात पीवायसी हिंदू जिमखाना संघ 37.3षटकात 234 धावांवर संपुष्टात आला. पण त्यांचे 10 गडी बाद झाल्याने संघाची अंतिम धावसंख्या 184धावा(वजा50धावा) झाली. सलामीचे फलंदाज दिव्यांग हिंगणेकर 16धावा, अमेय भावे 13धावा हे झटपट बाद झाल्यानंतर रोहन दामलेने 81 चेंडूत 65 धावा, तर मंदार भंडारीने 52 चेंडूत 54 धावा केल्या. रोहन व मंदार यांनी चौथ्या गडयासाठी 96 चेंडूत 84 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण हे दोघेही बाद झाल्यानंतर एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. केडन्सकडून अक्षय वाईकरने 47 धावात 4 महत्वपूर्ण गडी बाद केले. अक्षयला प्रसन्ना हजारे(34-3), गणेश गायकवाड(51-2), हर्षद खडीवाले(27-1)यांनी सुरेख गोलंदाजी करत पीवायसीला 234 धावांवर रोखले. याच्या उत्तरात केडन्स संघाने आजदिवस अखेर 22षटकात 5बाद 160धावा केल्या. यात हर्षद खडीवाले 64, अथर्व काळे 26, जय पांडे 18, अथर्व धर्माधिकारी 20 यांनी धावा केल्या. पीवायसीकडून यश माने(26-2), प्रीतम पाटील(38-2) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. केडन्स संघाचा अजून 18षटकांचा खेळ बाकी आहे. केडन्सचा गणेश गायकवाड नाबाद 9 धावा, तर अजित गव्हाणे नाबाद 0 वर खेळत आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:

डेक्कन जिमखाना मैदान:
पहिला डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 40षटकात 9बाद 213धावा (258-45धावा) (ऋतुराज गायकवाड 100(95, 9×4), ओम भोसले 77(76,10×4), उत्कर्ष अगरवाल 29(45), आशय पालकर 8-49-4, श्लोक धर्माधिकारी 4-44-1, मुकेश चौधरी 8-39-1, यश बांबोळी 5-27-1) वि.डेक्कन जिमखाना: 22.5षटकात सर्वबाद 124धावा(अभिषेक ताटे 41(67,3×4), स्वप्निल फुलपगारे 34(43,3×4), विशाल गीते 4.5-21-3, राहुल वारे 5-21-1, शुभम तैस्वाल 3-18-1);

पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदान:
पहिला डाव: पीवायसी हिंदू जिमखाना: 37.3षटकात सर्वबाद 184धावा(234-50धावा)(रोहन दामले 65(81,5×4,3×6), मंदार भंडारी 54(52,9×4,1×6), प्रीतम पाटील 22(13), योगेश चव्हाण 18(16), दिव्यांग हिंगणेकर 16(26), अमेय भावे 13, अक्षय वाईकर 7.3-47-4, प्रसन्ना हजारे 6-34-3, गणेश गायकवाड 7-51-2, हर्षद खडीवाले  3-27-1) वि.केडन्स: 22षटकात 5बाद 160धावा(हर्षद खडीवाले 64(78), अथर्व काळे 26(26), जय पांडे 18(31), अथर्व धर्माधिकारी 20(24), यश माने 4-26-2, प्रीतम पाटील 4-38-2, योगेश चव्हाण 2-22-1);