बंधुतेचा विचार माणसांना जोडणारा धागा-प्रा. तेज निवळीकर
राज्यात ३३ कोटी झाडे लावणार -नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार – भांबुर्डा वन उद्यानाचे लोकार्पण
पुणे-या वर्षी राज्यात ३३ कोटी वृक्षांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभागांबरोबर वनेतर जमिनीवर वृक्ष लावण्याची आखणी करीत आहोत. नव्वद दिवसांत ३३ कोटी वृक्षारोपण करण्यात येणार असून, या मोहिमेमुळे महाराष्ट्राला वनीकरण क्षेत्रात देशात आघाडी घेण्याची संधी मिळाली असल्याचे मत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
भांबुर्डा वन उद्यानाचे लोकार्पण राज्याचे वित्त आणि नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आमदार विजय काळे, सिम्बॉयसिसचे डॉ. शां.ब. मुजूमदार, नगरसेवक आदित्य माळवे, मुख्य वन संरक्षक विवेक खांडेकर, उपवन संरक्षक ए. श्रीलक्ष्मीनगरसेवक आदीत्य माळवे, प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, धीरज घाटे, नीलीमा खाडे, माधुरी सहस्रबुद्धे, ज्योत्स्ना एकबोटे, सुरेश कांबळे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘निसर्ग उत्तम ठेवला तर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. सर्व प्रश्नांचे मूळ वृक्ष लागवडीत आहे. त्यासाठी आम्ही विविध प्रयोग करीत आहोत आपण कोणत्या पदावर काम करतो हे महत्त्वाचे नाही. काम पूर्ण करण्यासाठी किती पाठपुरावा केला हे महत्त्वाचे असते.
आमदार काळे म्हणाले, ‘भांबुर्डा वनउद्यानासाठी आणखी दोन कोटी रुपयांचा निधी आणि शिवाजीनगर मतदारसंघातील तीन ठिकाणी पाण्याच्या टाक्यांसाठी वन विभागाची जागा उपलब्ध करून देणार आहोत.’
आमदार विजय काळे म्हणाले, ‘गोखलेनगर, शिवाजीनगर, कोथरुड आदी परिसरातील नागरिकांना व्यायाम व फीरण्यासाठी हे उद्यान उपयुक्त ठरेल. या ठिकाणी निसर्गातील प्राणी, पक्षी, वृक्षसंपदा, विविध वृक्षांचे महत्त्व, पर्यावरण या विषयीची माहिती नागरिक व विद्यार्थ्यांना मिळू शकेल. उद्यानाचा दुसरा टप्प पूर्ण करण्यासाठी दोन कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी पाठपुरावा करणार आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘समान पाणीपुरवठा योजनेतील तीन टाक्यांसाठी वन विभागाची परवानगी आवश्यक आहे. तसेच मुस्लिम बांधवांच्या मागणीनुसार या भागात दफभूमीसाठी जमीन देण्याचा प्रस्ताव वन विभागाकडे पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याला वन विभागाने मान्यता द्यावी. महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक आदीत्य माळवे, विवेक खांडेकर यांची भाषणे झाली.
मॅङ्गको कंपनीच्या चौदा एकर जागेवर विकसित केलेले हे शहरातील सर्वाधिक क्षेत्रङ्गळ असणारे उद्यान आहे. आयुष वन, लुप्त होणार्या प्रजातींचे वन, गणेश वन, सुगंधी वन, नवग‘ह वन, पंचवटी वन, औषधी वन, नक्षत्र वन, ङ्गळ उद्यान, वड जातींच्या वृक्षांचे उद्यान, पाम उद्यान, उपयुक्त प्रजातींचे उद्यान, स्मृती वन, बांबू वन, किचन बाग अशी विविध प्रकारची १४ वने एकाच ठिकाणी विकसित करण्यात आली आहेत. चौदा हजार वृक्ष व वेलींंची लागवड करण्यात आली आहे.
निसर्ग परिचय केंद्र, पर्यावरण उपक‘मांसाठी खुले सभागृह, साहसी खेळ, मैदानी खेळ, खेळांचे साहित्य, प्राण्यांच्या प्रतिकृती, मतिमंद विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विभाग, खुली व्यायामशाळा, योग केंद्र, फिरण्यासाठी निसर्ग पाऊलवाटा, बसण्यासाठी कठडे व मनोरे, वनतलाव, ओढे, नाले यांना दगडी पिचिंग करून नागरिकांना पाणी अडविण्याचे महत्त्व नागरिकांना कळावे यासाठी गॅबियन वॉल, लाकडी आभासाचे पूल, भव्य प्रवेशद्वार, आकर्षक भित्तीचित्रे, रंगीबेरंगी ङ्गुले, विविध प्रकारचे गुलाब, मनमोहक धबधबा, सुंदर प्रकाश व्यवस्था, नैसर्गिकपणे केलेली सजावट ही उद्यानाची वैशिष्ट्ये आहेत.
भांबुर्डा वन विभागातील ही जागा पूर्वी मॅङ्गको कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. कंपनीचा करार संपल्यानंतर हे क्षेत्र ओसाड झाले होते. मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला होता. विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, अनिरुद्ध उपासना केंद्राचे स्वयंसेवक यांनी स्वच्छता, वृक्षलागवड, रोपांना पाणी देणे अशी मदत सातत्याने केली. आमदार विजय काळे यांच्या संकल्पनेतून उभारलेले हे उद्यान निर्माण करण्यासाठी एक कोटी ७२ लाख रुपये खर्च झाला आहे.
मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी प्रास्ताविक केले. सुधीर मुनगंटीवार हे हरित क्रांतीचे नवे नायक असून त्यांनी ग्लोबल वार्मिंग आणि वाढत्या प्रदूषणाची समस्या ओळखून वृक्षलागवडीची मोहीम होती घेतली असल्याचे सांगितले. यावेळी महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक आदित्य माळवे आदींची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमात वृक्षलागवडीमध्ये योगदान देणा-या स्वयंसेवी संस्था, अधिका-यांचा गौरव करण्यात आला.
जेधे कुटुंबियांचे शरद पवारांकडून सांत्वन
पुणे-पुण्याचे माजी उपमहापौर जयसिंगराव जेधे यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले . या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेधे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले . यावेळी जयसिंगराव जेधे यांचे चिरंजीव जयराज जेधे , संताजी जेधे , बाळासाहेब जेधे , जगदीश जेधे , राजश्री जेधे , करण जेधे , शुभम जेधे इत्यादी उपस्थित होते . शरद पवारांचा व जयसिंगराव जेधे यांचा निकटचा संबंध होता . दोघांनी दीर्घकाळ एकत्र काम केले आहे . यावेळी शरद पवारांनी केशवराव जेधे व शंकरराव मोरे यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला . यावेळी विठ्ठलशेठ मणियार , अंकुश काकडे व अन्य जेधे कुटुंबीयही उपस्थित होते .
सामाजिक सलोख्याची इफ्तार पार्टी
पुणे-रमजान महिना मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना असून सर्व समाजातील जाती जमातीमध्ये सलोखा वाढावा यासाठी मैनुद्दीन शेख मित्र परिवाराच्यावतीने पुणे लष्कर भागातील ताबूत स्ट्रीट येथे सर्व धर्मीय रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . सर्व धर्मातील लोक एकत्रित राहावेत यासाठी सर्व धर्मीय रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मैनुद्दीन शेख यांनी दिली .
या रोजा इफ्तार कार्यक्रमामध्ये किरण त्रिभुवन , राजू घोलप , सलीम मोमीन , खालिद शेख , इलियास शेख , अहमद शेख , राहील घोलप , अक्रम तकायली, मोबीन इनामदार , नाजीम शेख , अमन शेख , आवेज शेख , अस्लम मेमन व सोहेल शेख व मोठया संख्येने सर्व धर्मीय बांधव उपस्थित होते .
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाला विजेतेपद -ओम भोसलेची धडाकेबाज शतकी खेळी;
पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत अॅलन रॉड्रिगेस(47-4 व 37-2) याने केलेल्या भेदक गोलंदाजीसह ओम भोसले(नाबाद 100धावा) आणि ऋतुराज गायकवाड(116धावा) यांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा 121 धावांनी पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या दोन दिवसीय अंतिम सामन्यात पहिल्या डावात व्हेरॉक संघाने पहिल्यांदा खेळताना 40षटकात 8बाद 276धावा केल्या.तत्पूर्वी काल पीवायसी 20षटकात 1बाद 160धावा अशा सुस्थितीत होता. पीवायसी संघाचा आज 20व्या षटकांपासून खेळ सुरु झाला. यात प्रीतम पाटीलने 90 चेंडूत 109धावा, दिव्यांग हिंगणेकरने 75 चेंडूत 59 धावा करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. हे दोघेही बाद बाद झाल्यानंतर रोहन दामलेच्या 18, यश मानेच्या 18 धावा वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही. अॅलन रॉड्रिगेसने 47 धावात 4 गडी, तर राहुल वारेने 47 धावात 2 गडी बाद करून पीवायसीला 242 धावांवर रोखले. पण त्यांचे 10 गडी बाद झाल्याने संघाची अंतिम धावसंख्या 192(वजा 50धावा)झाली व व्हेरॉक संघाने पहिल्या डावात 44 धावांची आघाडी घेतली.
दुसऱ्या डावात व्हेरॉक संघाने 20षटकात 3बाद 216 धावा केल्या. व्हेरॉकचे 3गडी बाद झाल्याने त्यांची अंतिम धावसंख्या 201धावा(वजा15धावा) झाली. यात ओम भोसलेने धडाकेबाज खेळी करत 80 चेंडूत 12 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 100 धावा केल्या. ओमला सुधांशू गुंडेतीने 38 चेंडूत 40 धावा करून सुरेख साथ दिली. ओम आणि सुधांशू यांनी दुसऱ्या गडयासाठी 70 चेंडूत 80 धावांची भागीदारी केली. त्यानंतर ओम भोसले व ऋतुराज गायकवाड(43धावा) यांनी तिसऱ्या गडयासाठी 48 चेंडूत 90 धावांची भागीदारी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. पीवायसी संघाला विजयासाठी 20 षटकात 246 धावांची गरज होती. यात करण जाधव नाबाद 56, योगेश चव्हाण 31, प्रीतम पाटील 11, मंदार भंडारी 20 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.व्हेरॉककडून मनोज यादव(33-2), अॅलन रॉड्रिगेस(37-2), राहुल वारे(22-1), विनय पाटील(24-1), ऋतुराज गायकवाड(0-1)यांनी सुरेख गोलंदाजी करून संघाचा विजय सुकर केला.
स्पर्धेतील विजेत्या व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाला गोल्डफिल्ड मांडके शिल्ड व 15हजार रुपये, तर उपविजेत्या पीवायसी संघाला 10हजार रुपये व शिल्ड अशी पारितोषिके देण्यात आली.स्पर्धेचे पारितोषिक वितरण गोल्फफिल्ड प्रॉपर्टीजचे अनिल छाजेड आणि पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीवायसी हिंदू जिमखानाचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, सारंग लागू, रणजित पांडे आणि कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 40षटकात 8बाद 236धावा(276-40धावा)(ऋतुराज गायकवाड 116(106,10×4,2×6), ओम भोसले 42(27), उत्कर्ष अगरवाल 36(73), विनय पाटील 25(19), विशाल गीते 21(16), शुभम तैस्वाल 11, प्रदीप दाढे 6-70-4, योगेश चव्हाण 8-47-2, अभिषेक परमार 5-35-1, दिव्यांग हिंगणेकर 7-47-1)वि.पीवायसी हिंदू जिमखाना: 38षटकात सर्वबाद 192धावा(242-50धावा)(प्रीतम पाटील 109(90,11×4,6×6), दिव्यांग हिंगणेकर 59(75,3×4,4×6), रोहन दामले 18, यश माने 18, अॅलन रॉड्रिगेस 8-47-4, राहुल वारे 8-47-2, शुभम तैस्वाल 6-55-1); पहिल्या डावात व्हेरॉक संघाकडे 44 धावांची आघाडी;
दुसरा डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 20षटकात 3बाद 201धावा(216-15धावा)(ओम भोसले नाबाद 100(80,12×4,2×6), ऋतुराज गायकवाड 43(25), सुधांशू गुंडेती 40(38), विनय पाटील 23(16), दिव्यांग हिंगणेकर 4-51-1, योगेश चव्हाण 4-18-1) वि.वि.पीवायसी हिंदू जिमखाना: 18.1षटकात 9बाद 124धावा(169-45धावा)(करण जाधव नाबाद 56(53), योगेश चव्हाण 31(20), प्रीतम पाटील 11, मंदार भंडारी 20(13), मनोज यादव 2-33-2, अॅलन रॉड्रिगेस 4-37-2, राहुल वारे 4-22-1, विनय पाटील 2-24-1, ऋतुराज गायकवाड 0.1-0-1); सामनावीर-ओम भोसले; व्हेरॉक संघ 121 धावांनी विजयी.
इतर पारितोषिके:
सर्वोकृष्ट फलंदाज: ऋतुराज गायकवाड(447धावा)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: शुभम तैस्वाल(17विकेट)
मालिकावीर: दिव्यांग हिंगणेकर(358धावा व 9 विकेट)
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक: साहिल छुरी(7 झेल);
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक: मंदार भंडारी(8 झेल व 1 स्टॅम्पिंग);
आंतरराष्ट्रीय बाल दिनानिमित्त बाल मेळावा उत्साहात संपन्न
पुणे-आंतरराष्ट्रीय बाल दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी नरपतगीर चौक शाखेच्यावतीने भव्य बाल मेळावा उत्साहात संपन्न झाला . आणि बाल चमूनला थोर व्यक्तीची पुस्तके आणि खाऊ वाटप करण्यात आला .
सोमवार पेठ मधील नरपतगिरी चौक येथे झालेल्या या बाल मेळाव्याचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याहस्ते केक कापून केले .या बाल मेळाव्याचे आयोजन विशाल कोंडे आणि मित्र परिवार यांनी केले . यावेळी प्रमुख उपस्थिती माउली आबा तुपे, संजय पारीख ,संदीप लडकत, दिलीप काळोखे, गणेश यादव ,बाळासाहेब घोडके, उमेश अण्णा चव्हाण,दीपक नायकू , सतीश गायकवाड, राजेश मोरेव अन्य मान्यवर उपस्थित होते .
10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मेहा पाटील, रिशिता पाटील यांचा मानांकित खेळाडूंवर विजय
पुणे: नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या द क्रिएशन करंडक एमएसएलटीए राज्य मानांकन 10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात मेहा पाटील, रिशिता पाटील, इमान विरजी या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली.
मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत 10 वर्षाखालील मुलींच्या गटात मेहा पाटीलने पाचव्या मानांकित अद्विता गुप्तावर 6-1 असा सनसनाटी विजय मिळवला. इमान विरजी हिने सातव्या मानांकित स्वनिका रॉयचा 6-2 असा एकतर्फी पराभव करून तिसरी फेरी गाठली. बिगरमानांकित
रिशिता पाटीलने आठव्या मानांकित ध्रुवी आदयंताला 6-0 असे नमविले. आदिती सागवेकरने श्रावणी देवरेचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 10वर्षाखालील मुली:
आदिती सागवेकर वि.वि.श्रावणी देवरे 6-4;
रित्सा कोंडकर वि.वि.किया तेलंग 6-0;
मेहा पाटील वि.वि.अद्विता गुप्ता(5) 6-1;
सिद्धी मिश्रा वि.वि.वीरा हरपुडे 6-0;
अनन्या भुतडा वि.वि.वैष्णवी नागोजी 6-1;
इमान विरजी वि.वि.स्वनिका रॉय(7) 6-2;
रिशिता पाटील वि.वि.ध्रुवी आदयंता(8) 6-0;
काव्या पांडे वि.वि.आरोही देशमुख 6-3;
ह्रितिका कापले(4) वि.वि. वसुंधरा भोसले 6-2
आमच्याच राजवटीत प्रत्यक्ष विकास कामे साकार झालीत …भिमाले
पुणे- आज रविवार दि.२ जुन रोजी पालकमंत्री असलेले पुण्याचे नवनिर्वाचित खासदार,भाजपचे ज्येष्ठनेते गिरीश बापट यांच्या हस्ते लुल्लानगर येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यात आले यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे,आमदार योगेश टिळेकर,महापौर मुक्ता टिळक,सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे तसेच शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे आदी मान्यवर उपस्थित होते . कोणी काहीही म्हणू द्यात ,कितीही आरोप करू द्यात ,पण प्रत्यक्षात विकास कामांचे स्वप्न साकार करण्याचे काम आमच्या भाजपच्याच राजवटीत झाले हे लक्षात घ्या असे यावेळी भिमाले यांनी म्हटले आहे .
बूट पॉलिश….. (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)
टक…टक…टक…प्लॅस्टिक बाटली ३-३ वेळा खोक्याला मारत आवाज करून स्टेशनवर येणाऱ्याजाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणारा तो बूट पॉलिशवाला. बूट पॉलिशचे स्टॅन्ड, ४-५ पॉलिशचे ब्रश, वेगवेगळ्या क्रीम्सच्या डब्या, लेस, बूटमधील *सोल*, लेस, फडका अशा लव्याजम्यासह प्लॅटफॉर्मवरच संसार थाटून बसलेला हा बूट पॉलिशवाला आपण नेहमीच पाहतो.
‘एका प्लॅटफॉर्म वर ४-५ जण तरी असतो. सकाळी ६ वाजता आम्ही आमचं काम चालू करतो, ते थेट संध्याकाळी ७ वाजेपर्यंत…’ बोरिवली स्टेशनवरील बॅच नंबर २ असलेला सतीश माहिती देत होता. ‘बोरिवली स्टेशनमध्ये जवळपास ४०च्या आसपास तरी बूट पॉलिशवाले असतील. पण त्यातील लायसन्सवाले कमीच, बाकी सगळे असेच बसलेले. त्यामुळे आमचा धंदा कमी होतो ना. आमची पण सोसायटी आहे. त्यात इलेक्शन होतं आणि तेच आमची जागा ठरवतात. गेली २८ वर्षं मी बोरिवलीला बसतो. त्या काळी समोर काही नव्हतं. छोट्या छोट्या झोपड्या होत्या. डायमंड टॉकीजच्या पुढे तर फारशी वस्तीही नव्हती, जंगल वाटायचं नुस्तं! आता बघा किती गर्दी झाली. मोठे मोठे मॉल आले पण आम्ही आहोत तिथेच आहोत. सोसायटीला रोजचं भाडं द्यावं लागतं…’ अधूनमधून बाटलीचा टक टक आवाज करत, एक डोळा संभाव्य गिऱ्हाईकावर ठेवत सतीश भराभरा बोलत होता. ‘रोजचे किमान ३००-४०० रुपये सुटतात. पण रेल्वेनं आम्हाला तश्या फार काही सुविधा दिलेल्या नाहीत. वर्षातून २ वेळा गावी जाण्यासाठी पास तरी द्यायला हवा ना. आता माझं वय झालंय, मग म्हातारपणी काय? हा प्रश्नच आहे.’
मूळचा हरियाणाच्या सोनिपत गावचा असलेला सतीश बोरिवलीला स्थायिक झालेला. ‘आजोबांपासून चालत आलेला पिढीजात बूट पॉलिश हा व्यवसाय. चाचाजी अंधेरी स्टेशनवर बूट पॉलिश करायचे. त्यांच्याकडूनच मी शिकलो. पूर्वी आम्ही बांद्र्याला राहायचो आता राहतो बोरिवलीला आणि कामही बोरिवली स्टेशनवर. चार भाऊ, चार बहिणी आणि घरात फक्त कमावणारे वडील, मग मीही हेच काम करू लागलो. माझ्या भावाने हा बूट पोलिशचा खोका मला खास गावावरून करून पाठवला. पूर्वी लाकडी काठीने आम्ही टकटक असा आवाज करायचो. पण त्यामुळे पायदानचे लाकूड (ज्या स्टँडवर बूटाला पॉलिश केले जाते) खराब व्हायला लागले, म्हणून मग आता प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटलीने आवाज करून लोकांचे लक्ष वेधून घेतो. आमचे नाव आणि लायसन्स नंबर या खोक्यावर आहे आणि तसा बिल्लाही दिला गेला आहे पण इतर काही सुविधांच्या नावाने बोंबच.
पॉलिशचे ३५ पैसे आणि क्रीमचे ५० पैसे या दरापासून आता बूट पॉलिश ७ रुपये आणि १० रुपये झाले. महागाई पण तेवढीच वाढली. तब्येत बरी नसली तरी काम करावंच लागतं. माझ्या मुलांना मात्र मी शिकवतोय, त्यांना या धंद्यात मला नाही आणायचं…’ सतीश बोलत असताना एक आठवण निघाली. साधारण १०-१२ वर्षांपूर्वी दादरला संध्याकाळच्या ६.५२ चर्चगेट-भाईंदर लोकलमध्ये दोन मुलं असायची. ही दोन्ही मुले रोज सकाळी चर्चगेटला जायची. मोठा भाऊ बूट पॉलिश करायचा तर लहान भाऊ तिकडच्याच एका पालिकेच्या शाळेत जायचा. दुपारनंतर तोही भावाच्या बरोबर बसायचा. तिकडेच अभ्यास करायचा आणि भावाला लागली तर काही मदत करायचा. संध्याकाळी दोन्ही एकत्र घरी जायचे. डब्यातल्या पहिल्या डोअरजवळ ही मुले बसलेली असायची. डोअरला उभ्या असणाऱ्या बायकाही त्यांची काळजी घ्यायच्या. कधी कधी त्यांची विचारपूस करायच्या, तर बऱ्याचदा खाऊही आणायच्या. (बूट पॉलिश – १९५४ साठी प्रदर्शित झालेला सिनेमा. भोला आणि बेलू या बहीणभावांवर असलेला सिनेमा. त्यातील ‘नन्हें मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठी में क्या हे…मुठ्ठी में है तकदीर हमारी…’ असं आत्मविश्वासाने सांगणारे भोला आणि बेलू. तसेच हे दोघे भाऊही भीक न मागता बूट पॉलिशचं काम करून आपलं भविष्य घडवू पाहत होते.)
सतीशची कहाणी तशीच थोड्याफार फरकाने सतपालची, दीपकचीही हीच कहाणी. कथा वेगळी असली तरी सगळ्यांची व्यथा मात्र एकच होती. आपल्या मुलाचं भविष्य मात्र या पॉलिशसारखं चकचकीत करायचंय. सांगता सांगता सतीशच्या डोळ्यांतील पाणीही चमकून गेले.
सकाळची घाईगर्दीची वेळ, अशा वेळीच काय तो चांगला धंदा होतो आणि त्यात एसी ट्रेन येण्याची वेळ झाली होती. त्या चारपाच बूट पॉलिशवाल्यांच्या बाटलीचा टकटक आवाज त्या गर्दीत सर्वत्र निनादत होता.
पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068
राज्यमंत्री कांबळेंवर कारवाई होणार ? कि क्लीनचीट दिली जाणार ? (व्हिडिओ)
पुणे- येथील आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह चौघांवर, दारू विक्रीच्या व्यवसायाचा परवाना मिळवून देतो असे सांगून एकाची 1 कोटी ९२ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबाद पोलिसात, न्यायालयाच्या आदेशाने सुमारे २ महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतर, कारवाई होत नाही असा आरोप करत फिर्यादी विलास चव्हाण यांनी ,आपल्यावर आता आत्महत्या करण्याची वेळ आल्याचा इशारा दिला आहे तर औरंगाबाद पोलिसांनी मात्र या प्रकरणी पोलीस तपास सुरु आहेच ..आणि लवकरच आरोपींवर कारवाई होईल असे स्पष्ट केले आहे .यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री कांबळे यांच्यावर कारवाई होणार कि त्यांना क्लीनचीट मिळणार या प्रश्नाकडे राजकीय वर्तुळात उत्सुकतेने पाहिले जाणार आहे . याप्रकरणाची हकीकत अशी कि ,यापूर्वीच औरंगाबाद येथे दाखल झालेल्या या गुन्ह्यासंदर्भात काही आरोपींचा जामीन न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता पोलिसांनी कारवाई होईल असे सांगितले आहे .तर ‘मी कर्ज काढून या व्यवसायाच्या परवान्यासाठी पैसे दिल्याने आता माझ्यावर बँका जप्तीच्या कारवाई साठी प्रयत्नशील झाल्या आहेत यामुळे मला आत्महत्येशिवाय मार्ग उरलेला नाही असे फिर्यादी चव्हाण यांनी म्हटले आहे . यातील आरोपी सत्ताधारी पक्षाशी संबधित आहेत तर फिर्यादी राष्ट्रवादी पक्षाशी संबधित आहेत यामुळे याप्रकरणी भक्कम तपास करून सबळ पुरावे गोळा करून कारवाई करणे गरजेचे आहे .पण आता आम्ही लवकरात लवकर आरोपींवर कारवाई करणार असल्याचे औरंगाबाद पोलिसांनी म्हटले आहे . फिर्यादी विलास चव्हाण यांनी म्हटले आहे की, कांबळे आणि दिलीप काळभोर ,दयानंद वनंजे,सुनील मोदी अशा चोघांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार आपण केली आहे.त्यावरील कारवाई टाळण्यासाठी काही आरोपींनी आपल्याला काही रकमेचे चेक दिले होते पण ते न वटता परत आलेत .न्यायालयाने या संदर्भात आपण न्यायालयात सादर केलेल्या प्राथमिक पुराव्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिल्यानंतर, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . त्यानंतर आरोपींना अटक होणे गरजेचे होते . यातील काही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केले तेहि न्यायालयाने फेटाळले आहेत . मी वैजापूर बँकेतून कर्ज काढून यांना पैसे दिले आहेत काही रक्कम आर् टीजे एस द्वारे दिली तर काही रोखीने दिली आहे . त्याचा सर्व तपशील न्यायालय आणि पोलिसांना हि दिला आहे.पोलिसांवर आरोपी मंत्री असल्याने दबाव आहे,त्यामुळे कारवाई होत नाही . दरम्यान या प्रकरणाच्या बातम्या माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्यावरही ,अदयाप संबधित ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्या मंत्र्यांनी अद्याप या प्रकरणी कोणताही जाहीर खुलासा स्वतःहून केलेला नाही
‘ ईडी ’ चा मोर्चा ..राष्ट्रवादी च्या प्रफुल पटेलांवर …? समन्स तर बजावले ….
नवी दिल्ली -हवाई वाहतूक उद्योगातील करारातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. ईडीने प्रफुल्ल पटेल यांना ६ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.
आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून हवाई वाहतूक उद्योगातील ‘लॉबिस्ट’ दीपक तलवार याला काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. दीपक तलवार हा सध्या तुरुंगात आहे. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग तलवारने तीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले होते. या मोबदल्यात तलवारला २००८- ०९ या कालावधीत २७२ कोटी रुपये मिळाले, असा दावा ‘ईडी’ने न्यायालयात केला होता. दीपक तलवार हा माजी नागरी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांचा चांगला मित्र होता, असे देखील ‘ईडी’ने न्यायालयात म्हटले होते.
दीपक तलवारच्या अटकेनंतर प्रफुल्ल पटेल यांची देखील चौकशी होणार, अशी शक्यता होती. अखेर शनिवारी ईडीच्या वकिलांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना ईडीने प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावल्याची माहिती दिली. ईडीने पटेल यांना ६ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.
आर्थिक स्थिती नसताना ७०,००० कोटी रुपये किमतीच्या १११ विमानांची खरेदी, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरण, परकीय गुंतवणूकीतून प्रशिक्षण संस्था सुरु करणे तसेच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग खासगी कंपन्यांना देणे अशा चार प्रकरणांचा ईडीकडून तपास सुरु आहे. या चारही प्रकरणांमध्ये गैरव्यवहार हे सर्व प्रकरण यूपीए- १ च्या काळातील असून त्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे विमान वाहतूकमंत्रीपदाचा कार्यभार होता.
21 वर्षे वयाच्या राष्ट्रीय जलतरणपटू साहिल जोशीची आत्महत्या
पुणे-कोथरूड येथील राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू साहिल जोशी (वय 21) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.31 मे) दुपारी अडीच वाजता घडली.
साहिल याने आतापर्यंत 8 ते 9 राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. बँक स्ट्रोक प्रकारात त्याला 7 सुवर्णपदक मिळाले होते. त्यामुळे साहिलच्या आत्महत्येमुळे त्याच्या निकटवर्तीयांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, त्याने त्याच्या काही वैयक्तिक कारणामुळे आत्हत्या केली, अशी माहिती समोर येत असून कोथरूड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नागपूरला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले
नागपूर: गेल्या काही दिवसांपासून घामटा काढणाऱ्या उष्णतेतून आज नागपूरकरांना थोडासा दिलासा मिळाला. आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नागपूरला झोडपले. वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर इतका होता. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे काही मिनिटातचं नागपुरातील जनजीवन विस्कळीत झाले.
हवामान खात्यानेही विदर्भात केव्हाही अवकाळी पाऊस येऊ शकतो असा अंदाज वर्तवला होता. दुपारनंतर नागपुरातील वातावरण अचानक बदललं. हवेत गारवा निर्माण झाला. संध्याकाळी प्रचंड वेगाने वारे वाहू लागले आणि पावसाला जोरदार सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. विशेषत: ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू लागल्याने छोटे दुकानदार आणि पादचाऱ्यांची एकच धांदल उडाली. सुमारे दीड तास वादळी पावसाचे थैमान कायम होते. त्यानंतर मात्र वादळी पावसाचा वेग कमी झाला. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वागत सोहोळ्यासाठी रेशीमबाग मैदान सज्ज होत असतानाच यासाठी तयार करण्यात आलेला मंडप वादळामुळे उडून गेला. तर ध्वनीयंत्रणा देखील पडली. वाऱ्याचा वेग इतका होता की एलएडी वॉलदेखील पडली. तर प्रभाग क्रमांक १७ येथे विजेचा खांब कोसळला असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अनेक ठिकाणी वृक्षही उन्मळून पडली आहेत.
नागपूरमध्ये अवघ्या २४ तासात तापमानात दीड अंश सेल्सिअसने वाढ होऊन पारा शुक्रवारी ४६.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. शनिवारी त्याच वाढलेल्या तापमानावर वादळी पावसाने फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. तापमान तब्बल २.७ अंश सेल्सिअसने कमी होत पारा ४३.८ अंश सेल्सिअसवर पोहोचला. अवकाळी पावसामुळे निर्माण झालेला हा गारवा कायमस्वरुपी नाही तर उकाडा वाढवणारा आहे, अशीच प्रतिक्रिया यावेळी वादळी पावसाचे थैमान अनुभवणाऱ्यांची होती. सुमारे दीड तास वादळी पावसाचे थैमान कायम होते. त्यानंतर मात्र वादळी पावसाचा वेग कमी झाला. गडकरी यांच्या स्वागत सोहोळ्यासाठी रेशीमबाग मैदान सज्ज होत असतानाच यासाठी तयार करण्यात आलेला मंडप वादळामुळे उडून गेले. तर ध्वनीयंत्रणा देखील पडली. वाऱ्याचा वेग इतका होता की एलएडी वॉलदेखील पडली. तर प्रभाग क्रमांक १७ येथे विजेचा खांब कोसळला असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
विरोधी पक्ष नेतेपदावर दावा करणार नाही: काँग्रेस
नवी दिल्ली-लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपदासाठी काँग्रेस पक्ष दावा करणार नसल्याचं पक्षाचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसभेतील एकूण खासदार संख्येच्या १० टक्के खासदार असणाऱ्या विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेतेपदावर दावा करता येऊ शकतो. म्हणजेच विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी पक्षाकडे ५४ खासदार असणं गरजेचं आहे. मात्र काँग्रेसच्या खासदारांची संख्या ५२ इतकी आहे.
काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक खासदार संख्या नसल्याने आम्ही विरोधी पक्ष नेतेपदाची मागणी करणार नाही, असं सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. संख्याबळ कमी असतानाही प्रमुख विरोधी पक्षाला विरोधी नेतेपदाचा दर्जा द्यावा की नाही, हे सरकारच्याही हातात असतं, असंही सुरजेवाला यावेळी म्हणाले.
२०१४ लोकसभा निवडणुकीवेळीही काँग्रेसकडे विरोधी पक्ष नेतेपदी दावा करण्यासाठी अपेक्षित खासदार संख्या नव्हती. त्यावेळी काँग्रेसचे केवळ ४४ खासदार निवडून आले होते. त्यामुळे गेली पाच वर्ष संसदेत विरोधी पक्ष नेतेपद नव्हतं. याही वेळेस खासदारांचा अपेक्षित आकडा नसल्याने संसदेत विरोधीपक्ष नेतेपद रिक्त राहण्याची शक्यता आहे.
पीवायसीच्या प्रीतम पाटीलची दमदार खेळी
पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीचे पीवायसीपुढे 276 धावांचे आव्हान; ऋतुराज गायकवाडची शतकी खेळी
पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत ऋतुराज गायकवाड(116 धावा)याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने पीवायसी संघासमोर 276 धावांचे आव्हान उभे केले., तर प्रीतम पाटील(नाबाद 102धावा) व दिव्यांग हिंगणेकर(नाबाद 42)यांनी केलेल्या भागीदारीच्या जोरावर पीवायसी संघाने आज दिवसअखेर 160 धावा केल्या.
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर या स्पर्धेचा दोन दिवसीय अंतिम सामना आजपासून सुरु झाला. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व तो अचूक ठरला. व्हेरॉक संघाने पहिल्यांदा खेळताना 40षटकात 8बाद 276धावा केल्या. पण त्यांचे 8 गडी बाद झाल्यामुळे संघाची अंतिम धावसंख्या 236(वजा 40धावा)झाली. यात ऋतुराज गायकवाडने अफलातून फलंदाजी करत 10चौकार व 2षटकारांच्या मदतीने 106 चेंडूत 116 धावांची शतकी खेळी केली. ऋतुराज आणि उत्कर्ष अगरवाल(36धावा)यांनी चौथ्या गडयासाठी 84 चेंडूत 90 धावांची भागीदारी करून संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. पीवायसीकडून प्रदीप दाढेने 70 धावात 4 गडी बाद केले.
या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या डावात पीवायसी संघाने आज दिवस अखेर 20षटकात 1बाद 160धावा करून अधिक भक्कम सुरुवात केली. यामध्ये प्रीतम पाटीलने तुफानी फलंदाजी करत 82 चेंडूत 11 चौकार व 6 षटकारांसह नाबाद 102 धावांची खेळी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. प्रीतम पाटील व दिव्यांग हिंगणेकर(नाबाद 42धावा) यांनी दुसऱ्या गडयासाठी 112 चेंडूत 160 धावांची भागीदारी केली. पीवायसी संघाचा पहिल्या डावातील अजून 20 षटकांचा खेळ बाकी आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
पहिला डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 40षटकात 8बाद 236धावा(276-40धावा)(ऋतुराज गायकवाड 116(106,10×4,2×6), ओम भोसले 42(27), उत्कर्ष अगरवाल 36(73), विनय पाटील 25(19), विशाल गीते 21(16), शुभम तैस्वाल 11, प्रदीप दाढे 6-70-4, योगेश चव्हाण 8-47-2, अभिषेक परमार 5-35-1, दिव्यांग हिंगणेकर 7-47-1)वि.पीवायसी हिंदू जिमखाना: 20षटकात 1बाद 160धावा(प्रीतम पाटील नाबाद 102(82,11×4,6×6), दिव्यांग हिंगणेकर नाबाद 42(57,2×4,1×6), शुभम तैस्वाल 5-46-1);










