Home Blog Page 2923

नियोजनामुळे राज्यात भारनियमन नाही

0

मुंबई :दीर्घकालीन वीज करार तसेच नवीन व नवीनकरणीय स्त्रोतांमधून महावितरणला आवश्यक असलेली वीज उपलब्ध होत असून त्यामुळे कोयना वीज निर्मितीचा चौथा टप्पा बंद झाला तरीही विजेच्या उपलब्धतेवर कुठलाही परिणाम होणार नाही. तसेच महावितरणकडे पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असल्यामुळे राज्यात कोठेही भारनियमन होणार नाही.

सद्यस्थितीत महावितरणची उच्चतम विजेची मागणी ही 19,000 ते 19,500 मे.वॅ. इतकी असून ती दीर्घकालीन करारांतर्गत औष्णिक वीज प्रकल्पातून व नवीन व नवीकरणीय स्त्रोतामधून पूर्ण करण्यात येत आहे. महावितरणकडे झीरो शेडयुलमध्ये असलेले परळी औष्णिक प्रकल्पामधील संच क्र. 6, 7 व एनटीपीसी सोलापूर या औष्णिक प्रकल्पामध्ये असलेला वाटा मिळून एकूण 1,144 मे.वॅ. इतकी अतिरिक्त वीज उपलब्ध आहे. तसेच पॉवर एक्सचेंजवर वीज उपलब्ध असल्यामुळे आणि विजेची मागणी एवढी विजेची उपलब्धता असल्याकारणाने जरी कोयना वीजनिर्मिती केंद्रामधील टप्पा क्र. 4 मधून वीज निर्मिती पुर्णपणे बंद झाली तरीही राज्यात कोठेही भारनियमना सारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही.

अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडल, सातारा यांनी दिनांक 29/05/2019 रोजी कोयना धरणात पाणी साठा अत्यल्प असल्याने व किमान 15 जुलैपर्यंत हा पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवणे आवश्यक असल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पामधून वीज निर्मिती पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीने (महानिर्मिती) दिनांक 29/05/2019 रोजी सांयकाळपासून कोयना जलविद्युत प्रकल्पातील टप्पा क्रमांक 4 मधून वीज निर्मिती बंद करण्यात आलेली आहे. चिपळूण तालुक्यास पाणी पुरवठा नियमित चालू ठेवण्यासाठी टप्पा क्र. 1 व 2 मधून कमी दाबाने (40 मे.वॅटची) वीज निर्मिती करण्यात येत आहे.

महावितरण कंपनीने महाजनको, एनटीपीसी, एनपीसीआयएल, स्वतंत्र वीज प्रकल्प व नवीन व नवीकरणीय स्त्रोत यांचे सोबत विविध दीर्घकालीन वीज खरेदी करार केलेले आहेत. या वीज निर्मिती स्त्रोंताकडून उपलब्ध होणारी वीज व विजेची मागणी लक्षात घेऊन, महावितरण कंपनी विजेची मागणी व उपलब्धता यामध्ये ताळमेळ घालत असते. राज्यात विजेची मागणी वाढल्यास किंवा काही कारणास्तव चालू असलेल्या प्रकल्पांमधून वीज निर्मिती कमी झाल्यास महावितरण कंपनीतर्फे झीरो शेडयुलमध्ये असलेले संच किंवा पॉवर एक्सचेंजवर वीज खरेदी करुन विजेच्या उपलब्धतेत वाढ करण्यात येईल व याप्रमाणे मागणी पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे राज्यात कुठेही वीजेच्या उपलब्धतेमुळे भारनियमन होण्याची शक्यता नाही.

अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या बैठकीत अचानक सुरू झाली पॉर्न क्लिप

0

जयपूर(राजस्थान)- येथील सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या बैठकीत अचंबीत करणारा प्रकार घडला आहे. जयपूरमध्ये झालेल्या एका बैठकीत अचानक पॉर्न व्हिडीओ सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला. विभागाच्या सचिव मुगधा सिंग यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरु असताना हा प्रकार घडलाय. या प्रकारानंतर त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत 10 लोकप्रतिनिधी आणि 33 जिल्ह्यातील पुरवठा अधिकारी उपस्थित होते. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठक सुरू होताच पॉर्न क्लिप सुरू झाली. यानंतर मुगधा सिंग यांनी या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या विविध योजनेंची अंमलबजावणी याचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही बैठक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत राहिली. हा व्हिडीओ कुणी सुरू केला याबाबत अजून कोणतीच माहिती समोर आली नाहीये. पण सविस्तर अहवाल सादर झाल्यानंतर संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असे मुगधा सिंग यांनी सांगितले आहे.

परदेशी विद्यार्थ्यांनी पुण्यात अनुभवला ‘रमजान ईद ‘ चा गोडवा !

‘आझम कॅम्पस ‘ चा पुढाकार ,१२०० विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पे  ,अत्तर आणि मिठाईचे वाटप  
पुणे :दूरदेशातून   शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या  विविध महाविद्यालयातील परदेशी विद्यार्थ्यांनी आज (मंगळवारी ) सकाळी एकत्रितपणे रमझान ईद चा गोडवा अनुभवला ! डॉ पी ए इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली आझम कॅम्पस परिवाराने पुढाकार घेऊन १२०० विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पे ,अत्तर आणि मिठाई देऊन ईद साजरी केली . यात विद्यार्थीनींचाही समावेश होता .
आखाती आणि अरबी देशात चंद्रदर्शन झाल्याने तेथील रीतीप्रमाणे पुण्यातील परदेशी विद्यार्थी ईद साजरी करतात . तिकडे हे चंद्रदर्शन आज झाल्याने पुण्यातही परदेशी विद्यार्थ्यांनी  आजच ईद साजरी केली .
आझम कॅम्पस मध्ये या विद्यार्थ्यांना खास निमंत्रित करण्यात आले आणि प्रेमाने मिठाई देण्यात आली . रमजान चे महिनाभराचे उपवास सोडण्याचा सोहळा म्हणजे रमझान ईद (ईद -उल -फित्र )! त्यानिमित्त आज सकाळी आझम कॅम्पस (पुणे कॅम्प ) मधील मशिदीत या पुणेस्थित  परदेशी विद्यार्थ्यांनी एकत्रित नमाजपठण केले . एकमेकांची प्रेमभरी गळाभेट घेतली  रमझान ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली  आणि   एकमेकांची वास्तपुस्त केली .  पुण्यात एकत्रित ईद साजरी करायला मिळाल्याची आनंदवार्ता आपल्या कुटुंबियांना परदेशात सोशल मीडियावरून लगेच कळवली !
आझम कॅम्पस परिवाराच्या वतीने या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पे ,अत्तर आणि मिठाई देण्यात आली . महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार  ,आझम कॅम्पस चे विश्वस्त ,पदाधिकारी यावेळी उपस्थित होते . या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष होते .
‘रमझान ईद हा आनंदसोहळा असल्याने त्यात पुण्यात राहणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनाही आम्ही सामावून घेतले . घरापासून दूर असल्याची भावना प्रत्येक परदेशी विद्यार्थ्यांच्या मनात असते . एकत्रित ईद साजरी केल्याने त्यांच्या आनंदात भर पडते . पुण्याची सर्वसमावेशक आणि प्रेमळ संस्कृती दूरदेशापर्यंत जाऊन पोहोचते ,हाच या उपक्रमामागचा उद्देश आहे ‘,असे डॉ पी ए इनामदार यांनी यावेळी सांगितले .

राष्ट्रवादीचे 10 आमदार वंचित आघाडीच्या संपर्कात, 7 जूनला गौप्यस्फोट -प्रकाश आंबेडकर यांचा दावा

अकोला – राज्यात सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले असताना भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीला दणका दिला. राष्ट्रवादीचे 10 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा आंबेडकरांनी केला आहे. यासोबतच, पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत उतरून मोठ-मोठ्या राजकीय पक्षांना हादरवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला मुस्लिम मते मिळाली नाहीत. औरंगाबाद वगळता वंचित आघाडीला मुस्लिमांचे समर्थन मिळाले नाही अशी खंत देखील दलित नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

पत्रकार परिषदेला मंगळवारी संबोधित करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे किमान 10 आमदार वंचित आघाडीच्या संपर्खात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आमदार वंचित आघाडीत प्रवेश करू शकतात असे अप्रत्यक्षरित्या आंबेडकर म्हणाले. वंचित बहुजन आघाडीने राज्यात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न केला. परंतु, हा प्रयत्न केवळ औरंगाबादेतच यशस्वी ठरला. या ठिकाणी गेल्या 4 टर्मपासून खासदार राहिलेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे पराभूत झाले. त्यांच्या जागी एमआयएम आणि वंचित आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा विजय झाला.

काँग्रेसला पर्याय म्हणून मुस्लिमांचा वंचितकडे कल…
मुस्लिमांनी काँग्रेसला पर्याय म्हणून वंचित आघाडीकडे पाहण्यास सुरुवात केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत वंचितला त्याचा मोठा फायदा होऊ शकेल असेही ते पुढे म्हणाले. सोबतच, राष्ट्रवादीचे किती आमदार आणि इतर कोण-कोण संपर्कात आहेत याची सविस्तर माहिती आपण 7 जूनला देऊ असे आंबेडकर म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे, लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने महाराष्ट्रातून सर्व 48 जागांवर उमेदवार उतरवले होते. विधानसभा निवडणुकीत सुद्धा राज्यातील सर्वच 288 जागा लढवणार असा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे.

टेनिस स्पर्धेत नील केळकर, काव्या देशमुख यांना विजेतेपद

पुणे:  नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या द क्रिएशन करंडक एमएसएलटीए राज्य मानांकन 10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात काव्या देशमुख हिने, तर मुलांच्या गटात नील केळकर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
 
मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 10 वर्षाखालील मुलींच्या गटात दुसऱ्या मानांकित काव्या देशमुखने अव्वल मानांकित नम्रता पवारचा 4-2, 5-3 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. काव्या ही पाचवी इय्यतेत डीवाय पाटील शाळेत शिकत असून पीसीएमसी टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक मनोज कुसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित नम्रता पवारने तिसऱ्या मानांकित व्रणदिका राजपूतचा 6-4 असा तर, दुसऱ्या मानांकित काव्या देशमुखने चौथ्या मानांकित ह्रितिका कापलेचा 6-3 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
 
मुलांच्या गटात  अंतिम फेरीच्या सामन्यात बिगरमानांकित नील केळकरने सातव्या मानांकित मनन अगरवालचा 4-1, 4-0असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. नील हा सिम्बायोसिस शाळेत चौथी इय्यतेत शिकत असून त्याचे हे या वर्षातील या गटातील चौथे विजेतेपद आहे.
 
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण द क्रिएशनचे शिवाजी चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक नवनाथ शेटे, प्रवीण धनवे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 10वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:
नील केळकर वि.वि.शिवतेज श्रीफुले 6-4;
मनन अगरवाल(7)वि.वि.शार्दुल खवळे(8) 6-5(4);
अंतिम फेरी: नील केळकर वि.वि.मनन अगरवाल(7) 4-1, 4-0;
 
10वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी: 
नम्रता पवार(1)वि.वि.व्रणदिका राजपूत(3)6-4;
काव्या देशमुख(2)वि.वि.ह्रितिका कापले(4) 6-3;
अंतिम फेरी: काव्या देशमुख(2)वि.वि.नम्रता पवार(1) 4-2, 5-3.

कल्याण ज्वेलर्सतर्फे पूजा सावंत यांची महाराष्ट्रासाठी प्रादेशिक अम्बेसिडर आणि इन्फ्लुएन्सर म्हणून निवड

पुणे – कल्याण ज्वेलर्सने चित्रपट अभिनेत्री पूजा सावंत यांची महाराष्ट्र राज्याची प्रादेशिक अम्बेसिडर आणि इन्फ्लुएन्सर म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. ही अभिनेत्री कल्याण ज्वेलर्सची स्थानिक अभियान तसेच प्रमोशन्समध्ये झळकणार आहे.

 कल्याण ज्वेलर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय रघुरामन म्हणाले, महाराष्ट्रासाठी प्रादेशिक अम्बेसिडर आणि इन्फ्लुएन्सर म्हणून पूजा सावंत यांची नियुक्ती झाल्यासा आम्हाला आनंद आहे. पूजा यांनी कल्याण ज्वेलर्सप्रमाणे आपल्या कठोर मेहनतीतून स्वतःचा मार्ग आखला आहे. महाराष्ट्रासाठी आम्ही महत्त्वाकांक्षी विस्तार योजना आखल्या असून ते महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी एक आहे. आम्ही लवकरच मुहूर्त ब्रँडअंतर्गत स्थानिक दागिने उपलब्ध करत आमची श्रेणी विस्तारणार आहोत. पूजा या स्टाइल आयकॉन म्हणून उदयास आल्या असून तरुण ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि ब्रँडची प्रतिष्ठा विस्तारण्यासाठी त्यांची लक्षणीय मदत होईल.

पूजा सावंत कल्याण ज्वेलर्सच्या महाराष्ट्रभरातील दालनांमध्ये ग्राहक संवाद उपक्रमांचा भाग असतील. त्याशिवाय त्या टेकसॅव्ही, डिजिटल पातळीवर सक्रिय असलेल्या तरुण ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनीतर्फे तयार करण्यात येणाऱ्या स्थानिक कम्युनिकेशन अभियानांमध्ये लक्षणीयरीत्या सहभागी होतील.

 पूजा सावंत म्हणाल्या, ‘कल्याण ज्वेलर्स हा प्रसिद्ध ब्रँड आहे आणि कल्याण कुटुंबाचा भाग होताना मला आनंद होत आहे. मी स्वतः कल्याण ज्वेलरीच्या मोहक दागिन्यांची चाहती आहे आणि खरंतर त्यांच्या सर्जनशील अभियांनामुळेच मी या ब्रँडकडे आकर्षित झाले. कंपनीबरोबर काम करण्यासाठी आणि त्यांच्या स्थानिक अभियानांचा भाग होण्यासाठी मी उत्सुक आहे.’

पूजा सावंत नव्या हंगामातील कल्याण ज्वेलर्सच्या अभियानामध्ये झळकणार आहेत. अमिताभ बच्चन, जया बच्चन, कतरिना कैफ, श्वेता बच्चन नंदा यांसारखे बॉलिवूड सेलिब्रेटीज आमच्या ब्रँडचा जागतिक चेहरा असून ते ब्रँडच्या व्यापक कम्युनिकेशन्सचा भाग असतील, तर दक्षिणेकडे प्रभू (तमिळ नाडू), नागार्जुन (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा), शिवराज कुमार (कर्नाटक), मंजू वारियर (केरळ) हे राज्याशी संबंधित अभियानांमध्ये दिसतील.

कंपनीने कायम भारतभरात नवी दालने सुरू करून विस्तार करण्यावर भर दिला आहे. २०१८- १९ या आर्थिक वर्षात कंपनीने बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम आणि छत्तीसगढ या राज्यांत नवी दालने सुरू केली. कंपनीने यूएई, कुवेत, कतार आणि ओमान यांद्वारे पश्चिम आशियात मजबत अस्तित्व प्रस्थापित केले आहे. आज कंपनीच्या वितरण नेटवर्कमध्ये १३७ मोठ्या दालनांचा तसेच ६५० माय कल्याण ग्राहक सेवा दालनांचा समावेश आहे.

कल्याण ज्वेलर्सबद्दल

केरळ राज्यातील थिसूर येथे मुख्यालय असलेले कल्याण ज्वेलर्स हे भारतातील सर्वात मोठ्या दागिने उत्पादक आणि वितरकांपैकी एक आहेत. कंपनी गेल्या शतकभरापासून देशातील वस्त्रोद्योग ट्रेडिंग, वितरण आणि हाउक व्यापार क्षेत्रात कार्यरत आहे. १९९३ मध्ये दागिन्यांचे पहिले दालन सुरू केल्यापासून कल्याण ज्वेलर्स भारतीय बाजारपेठेत गेल्या दोन दशकांपासून कार्यरत आहे. कंपनीने दर्जा, पारदर्शकता, किंमती आणि नाविन्य यांमध्ये नवे मापदंड तयार केले आहेत. कल्याण ज्वेलर्सद्वारे ग्राहकांच्या अनोख्या गरजा पूर्ण करणारे सोने, हिरे आणि प्रेशियस स्टोन्समधील पारंपरिक व अत्याधुनिक दागिने तयार करण्यात येतात. कल्याण ज्वेलर्सची भारत आणि पश्चिम आशियात मिळून १३७ दालने कार्यरत आहेत.

जायका प्रकल्प – नदी सुधार योजना , चार वर्ष गेली , आता तरी कार्यवाही करा;मोहन जोशींचे आवाहन

पुणे- शहराची जीवनवाहिनी असणार्‍या मुळा-मुठा नदीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणार्‍या जायका प्रकल्पासंदर्भात सुमारे 990 कोटी रूपयांचे कर्ज मिळूनही गेल्या चार वर्षात कोणतीच कार्यवाही झाली नाही. केंद्रात, राज्यात व पुणे महानगरपालिकेत भाजपचे सरकार असूनही गेल्या चार वर्षात या सुमारे 990 कोटी रूपयांच्या प्रकल्पापैकी अवघी 35 कोटी 14 लाख रूपये खर्च झाले असून केवळ सल्लागार नेमणे या पलिकडे काम पुढे सरकले नाही. चार वर्षात पर्यावरण विषय परवानगी मिळू शकली नाही. ही पुणेकरांच्या दृष्टीने खेदाची बाब आहे. पुण्याचे श्री प्रकाश जावडेकर हे केंद्रात मंत्री असून श्री गिरीष बापट हे देखील आता खासदार बनले आहेत. तसेच पुण्यात सर्व आमदार भाजपचे आहेत. पुण्याला वरदान ठरणार्‍या या महत्वाकांक्षी प्रकल्पास पर्यावरणाची परवानगी मिळून या प्रकल्पाची सुरूवात कधी होईल व हा प्रकल्प कधी पूर्ण होईल हे त्यांनी 5 जून पर्यावरण दिनानिमित्त पुणेकरांना सांगावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी केले आहे. आता केंद्रिय पर्यावरण खाते पुन्हा श्री. प्रकाश जावडेकरांकडे आले असल्याने पुण्याच्या हिताच्या दृष्टीने महत्वाच्या असणार्‍या या प्रकल्पाला ते व्यक्तिगत लक्ष घालून गती देतील अशी अपेक्षा पुणेकरांची आहे असे मोहन जोशी म्हणाले.

मोहन जोशी म्हणाले की, केंद्र सरकार व जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी यांच्यामध्ये चार वर्षांपूर्वी म्हणजे 13 जानेवारी 2016 रोजी करार झाला. त्यानुसार जायकातर्फे सुमारे 990 कोटी रूपयांचे कर्ज अवघ्या 0.30 टक्के व्याजदराने देण्यात आले. मात्र चार वर्ष झाली तरी पुणेकरांच्या दृष्टीने महत्वाच्या असणार्‍या या नदी सुधार योजनेचे काम ठप्प झाले आहे. पर्यावरण विषयक परवानग्या देण्यासंदर्भात केंद्राने राज्य सरकारला सूचना केल्या. या संदर्भात सादरीकरण फक्त झाले. या प्रकल्पाला पर्यावरणविषयक परवानग्या देण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही असे सांगितले गेेले. त्यामुळे केंद्र व राज्यातील सुसंवादाच्या अभावी या प्रकल्पास पर्यावरण विषयक हिरवा कंदिल दाखवला जात नाही ही निश्चितच खेदाची बाब आहे असे ते म्हणाले.

मोहन जोशी पुढे म्हणाले की, 35 कोटी 14 लाख रुपये फक्त प्रशासकीय कामांसाठी खर्च झाले आहेत. प्रत्यक्ष काम काहीच नाही. पुण्यातील मुळा-मुठा नद्यांना मोकळा श्वास घेऊ देण्याची जबाबदारी आता भाजपने पार पाडली पाहिजे. आधीच पुण्याच्या पर्यावरणाचा प्रश्न बिकट झाला आहे. नद्यांमध्ये प्रदुषित पाणी जात असल्याने पुण्याची जैवविविधता धोक्यात आली आहे. हा प्रकल्प पुर्ण होणे ही पुण्याची गरज आहे.

यासंदर्भात मोहन जोशी पुढे म्हणाले की,  या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणार्‍या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसाठी 11 पैकी सहाच जागा पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. त्याबाबतही अधिक विलंब न लावता उर्वरीत जागा ताब्यात घेऊन भूसंपादन प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासंदर्भातही प्रयत्न व्हायला हवेत. पुण्याच्या नदीच्या विकासासाठी योजना झाली, निधीही आला. मात्र चार वर्ष कार्यवाही नाही ही बाब कोणत्याच पुणेकराला रूचणार नाही त्यामुळे आतातरी पर्यावरण दिनाच्यानिमित्ताने केंद्रिय पर्यावरण मंत्री श्री प्रकाश जावडेकर व नवनिर्वाचित खासदार श्री गिरीष बापट तसेच पुण्यात निवडून आलेल्या भाजपच्या सर्वच्या सर्व आमदारांनी याबाबत ठोस कृती कार्यक्रम जाहीर करावा. अशी अपेक्षा पुणेकरांची आहे असे मोहन जोशी यांनी शेवटी म्हटले.

प्रीती बामणेला आयआयटी (मुंबई )ची फेलोशिप

पुणे :
 
भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रीती बामणे हिला आयआयटी मुंबई ची ‘फॉसी समर २०१९’फेलोशिप मिळाली आहे.’फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर इन एज्युकेशन (फॉसी) असे या फेलोशिप चे नाव आहे.प्रीती बामणे ही  भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स विभागात दुसऱ्या सत्राची विद्यार्थिनी आहे.प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी तिचे अभिनंदन केले. अभियांत्रिकीच्या भारतातील ३० लाख विद्यार्थ्यांमधून साधारणपणे २० हजार विद्यार्थी प्रकल्प सादर करतात ,त्यातून निवड करण्यात येते.निवड झालेल्या विद्यार्थ्यांना  मुंबई आयआयटी येथे ६ आठवडे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र दिले जाते. 

सनदी लेखापालांनी ‘मेक इन इंडिया’साठी पुढे यावे-भावेश ठक्कर

पुणे : “भारतीय उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम महत्वाचा आहे. केंद्र व राज्य सरकारकडून यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजना क्लायंटपर्यंत पोहोचविण्यात सनदी लेखापाल महत्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे आपल्या क्लायंटला त्याबद्दलचे मार्गदर्शन देऊन ‘मेक इन इंडिया’ साकारण्यासाठी ‘सीए’नी पुढाकार घ्यावा,” असे मत सीए भावेश ठक्कर यांनी व्यक्त केले.

दि इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) ‘मेक इन इंडियामध्ये सीएची भूमिका’ या विषयावर एमएसएमई परिषदेत भावेश ठक्कर बोलत होते. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवन येथे झालेल्या चर्चासत्रावेळी सीए जुल्फेश शाह, सीए माहेश्वर मराठे आणि सीए कुसाई गोवावाला यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी आयसीएआयच्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समितीचे सदस्य सीए आनंद जाखोटिया, पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए ऋता चितळे, सचिव समीर लड्ढा, उपाध्यक्ष सीए अभिषेक धामणे, खजिनदार सीए काशिनाथ पाठारे आदी उपस्थित होते.

सीए भावेश ठक्कर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योजकता वाढीसाठी मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया असे अनेक उपक्रम आणले आहेत. अर्थव्यवस्थेला उद्योग क्षेत्राच्या विकासामुळे गती मिळत असते. त्यामुळे उद्योगांना सक्षम करण्यासाठी मेक इन इंडिया उपयुक्त आहे. त्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी सीएनी महत्वाची भूमिका बजावावी.”

सीए जुल्फेश शहा यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक व महिला उद्योग धोरणाविषयी विवेचन केले. सीए माहेश्वर मराठे यांनी एमएसएमई नोंदणीचे फायदे, तर सीए कुसाई गोवावाला यांनी अकाउंटिंग टॅक्स ट्रीटमेंटवर मार्गदर्शन केले. चंद्रशेखर चितळे, आनंद जाखोटिया, ऋता चितळे यांनीही आपले मत मांडले. समीर लड्ढा यांनी प्रास्ताविक केले. अभिषेक धामणे यांनी आभार मानले.

दिल्लीत महिलांना मोफत प्रवास; मेट्रो, डीटीसी बसमध्ये तिकीट घेण्याची नाही गरज-केजरीवाल यांची घोषणा

0

दिल्ली – दिल्लीत महिलांना सार्वजनिक वाहनांमध्ये मोफत प्रवासाची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बहुचर्चित निर्णयाची सोमवारी अधिकृत घोषणा केली. त्यानुसार, दिल्लीतील महिलांना आता मेट्रो किंवा डीटीसीच्या बसमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट काढावे लागणार नाही. दिल्ली सरकारने ही सुविधा सर्वच महिलांसाठी लागू केली आहे. यात कुठल्याही अटी-शर्तींचा समावेश करण्यात आलेला नाही. एवढेच नव्हे, तर राज्यात नवीन बस आणल्या जाणार असून त्या सर्वांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी खास सुविधा देण्यात येणार आहेत असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

केंद्राच्या मंजुरीची गरज नाही -केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, याच महिन्यात 25 ते 30 नवीन बस येणार आहेत. पुढील 12 महिन्यांत दिल्लीत डीटीसी बसची संख्या वाढून 3 हजार केली जाणार आहे. सर्वच बसमध्ये अत्याधुनिक कॅमेरे लावले जातील. महिलांना मोफत प्रवासाची ही योजना येत्या 2-3 महिन्यांत पूर्णपणे लागू केली जाईल. मेट्रो विभागाला याबाबत एका आठवड्याच्या आत रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या सुविधेची सुरुवात करण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगीची गरज नाही. कारण, आम्ही उर्वरीत लोकांसाठी भाडेवाढ करत नाही. आम्ही सबसिडी देत आहोत. या संपूर्ण योजनेसाठी जवळपास 700 ते 800 कोटी रुपये खर्च येणार आहे. हा संपूर्ण खर्च दिल्ली सरकार उचलणार असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

सक्षम महिलांना तिकीट खरेदी करण्याचे आवाहन
आम आदमी पक्षाचे नेते केजरीवाल यांनी महिलांना मोफत प्रवासाची घोषणा करताना आणखी एक आवाहन केले. त्यानुसार, मोफत प्रवास योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव किंवा अटी-शर्ती नाहीत. सर्वच महिलांना ही योजना मोफत केली जात आहे. तरीही ज्या महिला तिकीट खरेदी करू शकतात, ज्या महिला सक्षम आहेत त्यांनी तिकीट खरेदी करावे. त्यांनी मोफत सुविधेचा त्याग करावा. असे केल्यास तिकीट खरेदी करू शकत नसणाऱ्या महिलांनी जास्तीत-जास्त लाभ होईल आणि सरकारला देखील मदत मिळेल असे केजरीवाल यांनी सांगितले आहे.

हिंदू -मुस्लीम वाद पेटता ठेवूनच ‘त्यांनी’ केले राज्य …बापटांचे पहिले हिंदी भाषण (व्हिडिओ)

पुणे-हिंदू -मुस्लीम वाद पेटता ठेवूनच सुमारे दीडशे वर्षे इंग्रजांनी इथे राज्य केले ,पण दुदैवाने स्वातंत्र्य मिळाल्यावर हि हा वाद शमला नाही ,पण आता भाजपच्या राज्यात मुस्लीम पूर्णतः सुरक्षित राहील . आणि हिंदू मुस्लीम भाईचारा राहील असे वक्तव्य येथे आज पुण्याचे पालकमंत्री आणि नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी केले .
गिरीश बापट यांची प्रचंड बहुमताने खासदार पदी निवड झाल्याबद्दल नागरिकांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला व त्यांच्या हस्ते
प्रभाग क्र. 10 कोथरूड – बावधन आणि बावधन ग्रामपंचायत मधील 250-300 कुटुंबाना ईद सरंजाम भेट वाटप करण्यात आले नगरसेवक किरण दगडे पाटील , सरपंच सौ. पियुषा किरण दगडे पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.याप्रसंगी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका श्रद्धा प्रभुणे ,बबनराव दगडे पाटील, बबनराव लक्ष्मण दगडे पाटील, श्आबा सुतार, आझाद दगडे (ग्रा.प.सदस्य) प्रभाग क्र. 10 मधील सर्व भा.ज.पा. पदाधीकारी बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते..

खडकवासला विधानसभा मतदार संघामध्ये वायसीएम प्रमाणे मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाची गरज-खा.सुप्रिया सुळे

पुणे-खडकवासला विधानसभा मतदार संघामध्ये वायसीएम प्रमाणे मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाची गरज असून ते उभारण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा अशी मागणी आज येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी केली .
पुणे महानगरपालिकेत आज खडकवासला विभागातील नगरसेवकांसह विविध प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी सर्व्हिस रोड, डीपी रस्त्यांची व इतर दुरुस्ती कामे, सुरळीत पाणीपुरवठा, शाळा, रुग्णालय इमारत, उद्याने यासाठी निधींची तरतूद, येत्या पावसाळ्यापूर्वी आवश्यक कामे, स्वच्छता आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
वाढती लोकसंख्या आणि आरोग्याचे प्रश्न विचारात घेता खडकवासला विधानसभा मतदार संघामध्ये वायसीएम प्रमाणे मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाची गरज आहे. त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होण्यासाठी पुणे महापालिकेने सहकार्य करावे, अशी मागणी पुणे महापालिकेकडे केली.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना याबाबत निवेदन दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यावेळी उपस्थित होते.
धनकवडी ते खडकवासला आणि पुढे उत्तमनगर, वारजे तसेच नऱ्हे आंबेगाव, धायरी परिसर, पानशेत या भागात गेल्या काही वर्षात प्रचंड मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. एकेकाळची उपनगरे मोठमोठ्या सोसायट्यांनी गजबाजून गेली आहेत. याशिवाय ठिकठिकाणाहून स्थलांतरित झालेला कामगार वर्गही या भागात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे.
इतक्या मोठ्या संख्येने राहणाऱ्या या भागातील गोरगरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकंसाठी अल्पदरात अत्याधुनिक आरोग्यसेवा देणारे शासनाचे मोठे रुग्णालय असणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड भागातील यशवंतराव चव्हाण स्मृति (वायसीएम) रुग्णालयाप्रमाणे मोठे आणि मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभे रहावे. यासाठी महापालिकेने सहकार्य करावे, असे सुचविले.
कात्रज डेअरीच्या मागे असलेल्या सीएनजी पंपामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. वास्तविक येथे डीपी रस्ता नसताना या पंपाला तांत्रिक मान्यता कशी दिली, असा प्रश्न स्थानिक नगरसेविका अमृता बाबर यांनी उपस्थित केला. त्यावर परवानगी नसेल तर तातडीने तो पंप बंद करावा, अशी सूचना निंबाळकर यांना केली. याबरोबरच प्रभाग क्रमांक ४० मधील डीपी रस्ता, संतोषनगर भाजी मंडई मधील अतिक्रमण, धायरी भागातील पाणी प्रश्न, शिवणे ते खराडी रस्त्याचे काम आदी विषयांवर यावेळी चर्चा करून लवकरात लवकर हे प्रश्न सोडवावेत, अशी सूचना त्यांना केली.

श्री शिव छत्रपती महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा

जुन्नर/आनंद कांबळे
 जुन्नर येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम राखत २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातही विद्यार्थ्यानी १२ वी बोर्ड परीक्षेत उज्वल यश मिळविले.
महाविद्यालयाच्या शास्त्र शाखेचा निकाल ९५.९८%लागला.शास्त्र शाखेत सौरभ विजय जेजुरकर याने ८९.०८%गुण मिळवून व संस्कृत विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.कुमारी दीक्षा किशोर वाघचौरे हिने ८५.८५% गुण मिळवून द्वितीय तर धीरज धनंजय कुलकर्णी याने ८५.३८% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केले. शास्त्र शाखेतून १६ विद्यार्थ्यानी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी संपादन करून उज्वल यश मिळविले.तर ११५ विद्यार्थ्यानी प्रथम श्रेणी संपादन करून उज्वल यश मिळविले.
वाणिज्य शाखेचा निकाल ९७.७५% असून वाणिज्य शाखेतून कुमारी प्रतीक्षा गोरक्ष शिंदे हिने ९२.३० % गुण मिळवून जुन्नर तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला तसेच वाणिज्य विभागात कुमारी तलांडे प्रियंका हिने अकौंट विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून बोर्डात प्रथम क्रमांक मिळवला.
कला शाखेचा निकाल ७९.५८% लागला.कुमारी मानसी कृष्णा गवळी हिने ९१.८४% गुण मिळवून कला शाखेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.एम.सी.व्ही.सी.विभागाचा निकाल ९०.९६% एवढा लागला. उज्वल यश संपादन करणा-या सर्व विद्यार्थ्याचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणा-या सर्व प्राध्यापकांचे संस्थेचे.अध्यक्ष मा.अॅड.संजय शिवाजीराव काळे संस्था पदाधिकारी अध्यक्ष प्रतिनिधी.प्रा.व्ही.बी.कुलकर्णी मा.प्रभारी प्राचार्य डॉ.सी.आर.मंडलिक व उपप्राचार्य यांनी अभिनंदन केले

आषाढी वारी सुरळीत पार पडण्यासाठी सर्व यंत्रणेने समन्वयाने काम करावे -पालकमंत्री गिरीश बापट

पुणे दि.3 – पंढरपूरची आषाढी वारी महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा श्रध्देचा विषय आहे. हा आनंदी सोहळा सुरळीतपणे पार पडावा, यासाठी सर्व यंत्रणेने समन्वय ठेवून काम करावे, असे आवाहन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयातील कौन्सिल हॉलमध्ये आषाढी वारी पूर्व तयारीची बैठक श्री. बापट यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री विजकुमार देशमुख, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, खासदार अमर साबळे, आमदार दत्तात्रय भरणे, प्रशांत परिचारक, राहुल कुल, आमदार मेधा कुलकर्णी, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पुण्याचे अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक व विविध विभागाचे अधिकारी , आळंदी संस्थान प्रमुख ॲड विकास ढगे, संत तुकाराम महाराज संस्थानाचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे व विविध पालखी सोहळ्याचे प्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सर्वांचे स्वागत करुन आषाढी वारी बाबत केलेल्या तयारीची माहिती दिली. त्यानंतर तिन्ही जिल्ह्‌यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिकारी, यांनी केलेल्या पूर्वतयारीची माहिती सादर केली.

यावेळी प्रधान सचिव विकास खारगे यांनी यावर्षी 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट असून तीन वर्षात 50 कोटी वृक्ष लावायचे असल्याचे सांगितले. या आषाढी वारीत वृक्ष लागवडीबाबत सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन केले.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट बोलताना म्हणाले, पालकमंत्री म्हणून ही माझी शेवटची बैठक आहे. मला आपण खासदार म्हणून निवडून दिले , याबद्दल आभार व्यक्त करुन प्रातिनिधीक स्वरुपात उल्हासदादा पवार यांचे त्यांनी स्वागत केले.तसेच सर्वांना पेढे वाटून कृतज्ञता व्यक्त केली.

पुढे बोलताना ते म्हणाले, दरवर्षी प्रमाणे हा सोहळा यावर्षीही उत्साहात साजरा व्हावा. संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रमाणेच अन्य पालख्यांची सोय चांगल्याप्रमाणे करावी. कुठल्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये.

पिण्याच्या पाण्याची सोय आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था, चोख ठेवावी. मोबाईल टॉयलेट, पाण्याचे टँकर आवश्यक त्या ठिकाणी पुरविण्यात यावे. पोलीसांनी चांगला बंदोबस्त ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.

आळंदी देहू मार्गावरील दुरुस्तीचे काम तातडीने करुन घ्यावे. पालखी महामार्गावरील रस्त्याच्या दुरुस्तीची कामे पावसाळयापूर्वी पूर्ण करुन घ्यावीत. तसेच पालखी तळांच्या ठिकाणी सपाटीकरण करुन तात्पुरत्या स्वरुपात पुरेशा प्रमाणात शौचालये बांधण्यात यावीत. पालखी तळाच्या ठिकाणी पुरेशा पाण्याची व विजेची सोय करण्यात यावी. पर्यावरणाच्या रक्षणासाठी वरीच्या मार्गावर प्लॅस्टिक पत्रावळ्या, प्लॅस्टिक ग्लास, प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर निर्बंध आणावेत, यासाठी लोकांच्यात जनजागृती करावी.

वारीच्या कालावधीत वारकरी व भाविकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने सर्व पाण्याचे उदभव तपासण्यात यावेत. तसेच आरोग्य विभागाने सर्व ठिकाणी सज्ज राहण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.या कालावधीत कोणताही अनुचित प्राकर घडू नये, अपघात, दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस विभागाने सतर्क राहण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या. पंढरपूर आषाढी वारी यशस्वी पार पाडण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या आषाढी वारीत विद्यापीठांचा सक्रीय सभाग असणार असल्याचे त्यांनी सांगितले .

भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांना पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते धनादेश वाटप.

पुणे:- पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड धरणाकरीता ज्या शेतक-यांच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनीचा मोबदला म्हणून प्रत्येकी हेक्टरी 15 लाख रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी पुणे महापालिकेने जिल्हाधिका-यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. या प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्याच्या रकमेच्या धनादेशाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आज वाटप करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन ) भारत वाघमारे व तहसिलदार (पुनर्वसन) स्मिता पवार, तसेच प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
पुनर्वसनाचा खर्च पुणे महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. राज्यातील हे एकमेव उदाहरण आहे. खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणासाठी ज्या शेतक-यांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या आहेत त्यांच्या जमिनीचा शासनाने निर्धारीत केलेल्या दराप्रमाणे मोबदल्याच्या रकमेच्या धनादेशाचे वाटप आज पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. शासनाने राज्यात पहिल्यांदाच हा निर्णय घेवनू एकाच वेळी 914 प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला आहे. याबद्दल यावेळी उपस्थित शेतक-यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले.