Home Blog Page 2908

तस्करी साठी चालकाचा खून करून पळविली कॅब १२ तासात आरोपीच्या बांधल्या मुसक्या ……(व्हिडिओ)

0
पुणे-अमली पदार्थाच्या तस्करी साठी कार हवी म्हणून पुण्यात येवून एका ५२ वर्षीय ओला कॅब चालकाचा मध्यरात्री नंतर खून करून कार घेवून पसार झालेल्या २५ वर्षीय राजस्थानी तरुणाला अवघ्या 12 तासात पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे .
आज या संदर्भात पुण्याचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड ,सुहास बावचे आणि कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेतून हि माहिती दिली .
तपेशकुमार पुखराम चौधरी (रा. ३२ नई पाली रोड ,जोधपुर राजस्थान )असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.
या घटनेची हकीकत अशी कि ,२२ जून रोजी सकाळी साडेसहा वाजता कात्रज कोंढवा रस्त्यावरील इस्कोन मंदिराच्या जवळ एक मृतदेह पोलिसांना आढळून आला होता .तेथील स्थितीवरून कोणीतरी अज्ञात इसमाने खून करून येथे मृतदेह टाकला आणि पसार झाला असे निदर्शनास आले .
दुपारी या मृत देहाची ओळख पटविण्यात यश आले आणि पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरली .सुनील रघुनाथ शास्त्री (वय ५२ रा. लोहगाव -ओला कॅब चालक )असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे .आणि त्याच्या मुलाने २२ जून रोजी दुपारी साडेचार वाजता आपले पिता कॅब सह बेपत्ता झाल्याची तक्रार विमानतळ पोलीस ठाण्यात नोंदविली होती .त्यानंतर अवघ्या २ तासात सूत्रे वेगाने हलली आणि आरोपी अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला .
पोलिसांनी सांगितले कि , आरोपी तपेश कुमार याने शास्त्री यांची हि ओला कॅब २१ जून  रोजी मध्यरात्रीच्या सुमारास  भाड्याने हायर करून या बाजूला कॅबचालकाला आणले आणि बरोबर त्याच्या मागे बसून गळा आवळून त्याचा खून केला आणि याठिकाणी प्रेत टाकून त्याची कॅब घेवून तो पसार झाला .सीसी टीव्ही फुटेज तपासून आणि संपर्क यंत्रणा वापरून या गुन्ह्याचा तपास करण्यात आला . तेव्हा हि कॅब ओलाच्या मदतीने कुठे आहे त्याबाबतचे लोकेशन शोधण्यात आले. आणि त्यानुसार राजस्थान पोलिसांशी संपर्क साधून २२ जून रोजीच सायंकाळी साडेसहा वाजता आरोपीस पकडण्यात आले. आणि नंतर त्यास पुण्यात आणण्यात आले. अमली पदार्थांच्या तस्करी साठी त्याने कार हवी म्हणून हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.
 

फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे वारकऱ्यांसाठी कायमस्वरूपी शेड्सची उभारणी

0

पुणे : ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरात पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या असून, लाखो वारकऱ्यांचा मेळा आळंदी आणि देहूतून पंढरीच्या वाटेवर चालत आहे. या वारकऱ्यांना पायी वारी दरम्यान उन्हापावसात निवारा मिळावा म्हणून फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाऊंडेशनच्या वतीने वारी मार्गावर तीन कायमस्वरूपी शेड्स उभारले आहेत. यासोबतच इतर सामाजिक उपक्रमांचे लोकार्पण मुकुल माधव फाउंडेशनतर्फे करण्यात आले.

पिराची कुरोळी, लोणी काळभोर आणि वाखरी (पंढरपूर) येथे वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी उभारण्यात आलेल्या या शेड्सचे उद्घाटन निवासी जिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, गटविकास अधिकारी श्री घोडके, तहसीलदार, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, यांच्यासह फिनोलेक्सचे उपाध्यक्ष बी. आर. मेहता, नितीन कुलकर्णी व मुकुल माधव फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. लोणी काळभोर येथील शेडचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपमुख्याधिकारी संदीप कोहिनकार यांच्या हस्ते झाले. या शेड्समुळे वारकऱ्यांना रात्रीच्या वेळी झोपण्याची सोय होणार आहे. वारीनंतर या शेड्सचा उपयोग गावकऱ्यांना वर्षभर त्यांच्या कार्यक्रमासाठी करता येणार आहे. संबंधित ग्रामपंचायतीकडून त्याची देखभाल केली जाणार आहे.

त्याचबरोबर मुकुल माधव फाउंडेशनने सोलापूर येथील माधव वेल्फेअर फाउंडेशनच्या सहकार्याने २०१८ मध्ये जलसंधारण प्रकल्प सुरु केला होता. त्या प्रकल्पाचा लाभ माढा तालुक्यातील ३२ गावांना होणार आहे. सोलापूरमधील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या ९वी आणि १० वीतील शंभर विद्यार्थिनीना सायकलीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे पालकांकडून आपल्या मुलींना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. पुण्यातल्या वडगाव आनंद येथील विद्यार्थ्यांना जेवण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी पक्के शेड उभारले आहे. रुग्णांसाठी केईएम रुग्णालयात मासिक मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन केले. त्यात २६ रुग्णांवर उपचार करण्यात आले.

…अन भरली आजीबाईंची शाळा 

पुण्यापासून २०० किमी अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील वडाची वाडी गावात आजीबाईची अनोखी शाळा भरली. ५० ज्येष्ठ नागरिक महिलांना साक्षर करण्यासाठी मुकुल माधव फाउंडेशनने हा पुढाकार घेतला असून, त्यात त्यांना अक्षर ओळख व मूलभूत शिक्षण दिले जाणार आहे. सगळ्या आजींना गणवेश दिल्यामुळे ही आजीबाईचा शाळा सर्वांचे लक्ष वेधत आहे. यासह खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भधारणेच्या काळात आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळावी, याचे १२२ आशा व एएनएम नर्सेसना प्रशिक्षण देण्यात आले, असे मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी सांगितले.

करण जोहर बनला 2019चा सर्वाधिक लोकप्रिय भारतीय फिल्ममेकर !

0

फिल्ममेकर करण जोहर बॉलीवूडच्या लोकप्रिय फिल्ममेकर्सच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाने  गेल्या सहामाहीत बॉलीवूडमधले सर्वाधिक लोकप्रिय फिल्ममेकर्सची नुकतीच एक लिस्ट काढली आहे. ह्या लिस्टनूसार, करण जोहर लोकप्रियतेत अग्रेसर असल्याचे दिसून आले आहे

ह्या लिस्टनूसार, करण जोहर पहिल्या क्रमांकावर तर फिल्म 2.0चा दिग्दर्शक शंकर दूस-या स्थानी, फरहान अख्तर तिस-या क्रमांकावर, रोहित शेट्टी चौथ्या स्थानी आणि अनुराग कश्यप पाचव्या क्रमांकावर असल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

सिंबा, केसरी, कलंक आणि स्टुडंट ऑफ दि इयर-2 ह्या फिल्म्सच्यामूळे करण जोहर बॉलीवूडच्या फिल्ममेकर्समध्ये सर्वाधिक चर्चेत राहिले. तसेच, त्यांचा कॉफ़ी विथ करण सीजन 6 ही लोकप्रिय शो होता. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्यानूसार, व्हायरल न्यूज, न्यूजप्रिंट, डिजिटल, सोशल प्लेटफॉर्म आणि वेबसाइट्स अशा लोकप्रियतेच्या सर्व श्रेणींमध्ये करण 100 गुणांसह पहिल्या पदावर आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतले लोकप्रिय फिल्ममेकर शंकर 89.15 गुणांसह लोकप्रियतेत दुस-या स्थानावर आहेत. रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर 2.0 चे दिग्दर्शक शंकर ह्यांना डिजीटल श्रेणीमध्ये 93.07 गुण, व्हायरल न्यूज श्रेणीमध्ये 17 गुण आणि न्यूजप्रिंट श्रेणीमध्ये 100 गुणांसह लोकप्रियतेत दुसरे पद मिळाले आहे.

लोकप्रियतेत फिल्ममेकर फरहान अख्तर तिस-या क्रमांकावर आहे. आपली फिल्म गली बॉय आणि वेबसीरिज मेड इन हेवनची लोकप्रियता तसेच, मॉडेल शिवानी दांडेकरसोबतच्या डेटिंगच्या न्यूजमूळे फरहान अख्तरला लोकप्रियतेत तिसरे स्थान मिळाले आहे.

फिल्ममेकर आणि टेलीव्हिजनचा लोकप्रिय होस्ट रोहित शेट्टी 30.24 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. आपली ब्लॉकबस्टर फिल्म सिंबा आणि खतरों के खिलाडी ह्या रिएलिटी शोच्या सर्वाधिक टीआरपीमूळे रोहित शेट्टी चौथ्या पदावर आहे. तसेच गेल्या महिन्यापासून सुर्यवंशी सिनेमाविषयी मीडियामध्ये छापून येत असलेल्या न्यूजमूळेही रोहित शेट्टी सतत चर्चेत राहिला आहे.

नेटफ्लिक्सची सर्वाधिक लोकप्रिय वेबमालिका सॅक्रेड गेम्सचा निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप आपल्या ह्या वेबसीरिजच्या दूस-या पर्वाविषयी सध्या प्रेक्षकांच्या वाढलेल्या उत्कंठेमूळे सतत चर्चेत राहिला आहे. तसेच हृतिक रोशन स्टारर सुपर 30’चा ही तो निर्माता आहे. ह्या सिनेमाच्या सातत्याने होत असलेल्या कॉन्ट्रोवर्सीमूळे आणि सोशल मीडियावर आपल्या बेधडक विधानांमूळे अनुराग मीडियाच्या मथळ्यांमध्ये यंदा सातत्याने राहिला आहे. तसेच अनुराग कश्यपची नुकतीच रिलीज झालेली फिल्म गेम ओवर सुध्दा अनुरागला प्रकाशझोतात ठेवायला कारणीभूत ठरली.  

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल ह्याविषयी सांगतात, “करण जोहर आता एक ब्रँड झाला आहे. फक्त आपल्या सिनेमांमूळेच नाही तर आपल्या सामाजिक जीवनामधल्या वावरामूळेही करण जोहरची चांगलीच फॅनफॉलोविंग आहे. मग ते करणचे डुडल्स असोत की एअरपोर्ट लुक्स..  करण जवळजवळ रोजच कोणत्या ना कोणत्या वर्तमानपत्र किंवा फॅशनकॉलम्सचा हिस्सा असतो. करणचा चाहतावर्ग मासेस आणि क्लासेस दोन्हीमध्ये आहे. म्हणूनच की काय, तो असा एकुलता एक फिल्ममेकर आहे, ज्याची फॅन फॉलोविंग एखाद्या बॉलीवूड एक्टरला लाजवेल एवढी आहे.

अश्वनी कौल पूढे सांगतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत फ्लाईंग हॉक्स संघाचा दुसरा विजय

0
पुणेपुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत फ्लाईंग हॉक्स संघाने पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स संघाचा  44-43 असा संघर्षपूर्ण पराभव करून दुसरा विजय मिळवला 
 
डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीच्या अतितटीच्या झालेल्या लढतीत फ्लाईंग हॉक्स संघाने कडवी झुंज देत पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स संघाचा  44-43 असा पराभव केला. विजयी संघाकडून अंशुल पुजारी, सक्षम भन्साळी, सुधांशु सावंत, कौशिकी समंता, एंजल भाटिया, चिराग चौधरी यांनी अफलातून कामगिरी केली. पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स संघाकडून आस्मि टिळेकर, अभिराम निलाखे, वैष्णवी सिंग, अर्णव बनसोडे, सार्थ बनसोडे, मोक्ष सुगंधी, आदित्य भटेवरा, दक्ष पाटील, मनन अगरवाल यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
फ्लाईंग हॉक्स वि.वि.पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स 44-43(एकेरी: 8 वर्षाखालील मिश्र गट: अंशुल पुजारी वि.वि.अचिंत्य कुमार 4-2; 10 वर्षाखालील मुले: सक्षम भन्साळी वि.वि.राम मगदूम 4-0; 10वर्षाखालील मुली: जसलीन कटारिया पराभूत वि.आस्मि टिळेकर 1-4;12 वर्षाखालील मुले: तेज ओक पराभूत वि.अभिराम निलाखे 4-6; 12वर्षाखालील मुली: श्रावणी देशमुख पराभूत वि.वैष्णवी सिंग (4)5-6; 14 वर्षाखालील मुली: सुधांशु सावंत वि.वि.अमोद सबनीस 6-0; 14वर्षाखालील मुली: कौशिकी समंता वि.वि.सिमरन छेत्री 6-4; कुमार दुहेरी गट: श्लोक गांधी/अर्जुन किर्तने पराभूत वि.अर्णव बनसोडे/सार्थ बनसोडे 3-6; 14वर्षाखालील दुहेरी गट: पार्थ देवरुखकर/तनिश बेळगळकर पराभूत वि.मोक्ष सुगंधी/आदित्य भटेवरा (4)5-6; 10वर्षाखालील दुहेरी गट: नीव जॉजिया/देव घुवालेवाला पराभूत वि.दक्ष पाटील/मनन अगरवाल 0-4; मिश्र दुहेरी गट: एंजल भाटिया/चिराग चौधरी वि.वि.अभिनीत शर्मा/ईशान्य हटनकर 6-5(5));

‘टीव्हीएस मोटर्स’कडून टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्स ऑटोरिक्षा सादर

पुणे : “ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रणी कंपनी असलेल्या टीव्हीएस मोटार्स लिमिटेड कंपनीच्या वतीने नवीन वैशिष्ट्यपुर्ण २२५ सीसी क्षमतेचे लिक्वीह कुल्ड इंजिन असलेली ‘टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्स ऑटोरिक्षा’ ग्राहकांसाठी बाजारात आणली आहे. नव्या भारताची नवी रिक्षा अशी या ऑटोची ओळख निर्माण झाली आहे. अधिक शक्तिशाली, वेगवान आणि आरामदायी अशी ही रिक्षा आहे,” अशी माहिती टीव्हीएस मोटर्सचे सहायक सरव्यवस्थापक (महाराष्ट्र) शिवानंद लामदाढे यांनी दिली.

विमाननगर येथील हॉटेल हिंदुस्थान इंटरनॅशनल येथे टीव्हीएस मोटर्सच्या वतीने या टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्स रिक्षाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानांतर पत्रकारांशी संवाद साधताना लामधाडे बोलत होते. याप्रसंगी टीव्हीएस मोटर्स विभागीय व्यवस्थापक सौरव घोराई, श्रीगणेश ऑटोचे राजूभाई दीक्षित, शाह आटोचे हरून शाह, सार्थक ऑटोचे सुनील बर्गे, टीव्हीएस मोटर्सचे अरुण तिवारी, मणिंदर सिंग आदी उपस्थित होते.

शिवानंद लामदाढे म्हणाले, “दुचाकी आणि तीनचाकी गाड्यांच्या निर्मितीमध्ये टीव्हीएस एक अग्रणी आणि नामांकित कंपनी आहे. आजवर दर्जेदार वाहनांचे वितरण कंपनी करत आली आहे. टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्सच्या रूपाने आधुनिक आणि तंत्रज्ञानयुक्त रिक्षा बाजारात आणली आहे. यामध्ये वाहनचालक आणि ग्राहकांसाठी अति उत्तम गती आणि शक्तीक्षमता आहे. आरामदायक बैठक क्षमता, उत्तम सस्पेन्शन आणि अधिक मायलेज देण्यात आले आहे. टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्स २२५ सीसीचे इंजिन आहे. तसेच भरपूर कालावधीसाठी वापर आणि उच्च मायलेज (इंधनक्षमता जास्त आहे.) ही ऑटोरिक्षा सीएनजी, एलपीजी आणि पेट्रोल या तीनही प्रकारांत उपलब्ध आहे. पुण्यात मात्र केवळ सीएनजी रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे.”

“टीव्हीएस मोटार कंपनी वाहन निर्मिती व्यवसायात अतिशय उत्कृष्ठ दर्जाची दुचाकी वाहनांची निर्मिती करणारी व वाहनांच्या क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर कार्यरत असलेली कंपनी आहे. १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल कंपनी दरवर्षी करत आहे. जगातील ३० पेक्षा जास्त देशांना या वाहनांची निर्यात केली जाते. टीव्हीएस किंग आज भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या पसंतीला खरी उतरलेली असून, त्याचा स्विकार संपूर्ण जगात झालेला आहे. मागील १० वर्षापासून कंपनीने १० लाखापेक्षा जास्त ३ चाकी वाहनांची विक्री केली आहे. सध्या कंपनी भारतामधील १०० विविध शहरांमध्ये आणि जगभरातील ३० देशांमध्ये वाहनांचे सुटे भाग आणि आवश्यक सेवा पुरवित आहे,” असेही लामधाडे यांनी नमूद केले.

टीव्हीएस किंग इयुरेमॅक्सची किंमत रु. २,००,१३०/- (सर्व खर्चासह) आहे. श्रीगणेश ऑटो, स्वारगेट/दापोड़ी, शाह ऑटो, मंगळवार पेठ आणि सार्थक ऑटो, चिंचवड या अधिकृत डिलर्सकडे या आधुनिक रिक्षाची खरेदी आपल्याला करता येणार आहे. सोबतच ग्राहकांसाठी वाहन खरेदीकरिता आकर्षक कर्ज सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

“अधिक शक्ती असणारे २२५ सीसी लिक्विड कुल्ड ड्युरेलाईफ इंजिन, सर्वोत्तम तंत्रज्ञान, उत्तम श्रेणी आणि क्षमता अधिक आहेत. घाटरस्त्यावर, शहरातील उंच पुलांवर ही रिक्षा सहज चालते. देखभालीचा कमी खर्च असून, वाहनाच्या प्रत्येक पार्टची क्षमता व आयुष्यमान जास्त आहे. तसेच वाहनांचे सुटे भाग योग्य किंमतीत बदलण्याची व्यवस्था आहे. वाहनाची १०,००० कि.मी. रनिंग झाल्यानंतर सर्व्हिस करण्याची गरज पडेल. त्यामुळे इंधन आणि सेवा खर्चाची बचत होईल. मोठे व पाणी प्रतिबंधक व सुरक्षित असणारे दोन उपयुक्त युटीलिटी बॉक्स, ५.८ लिटर स्टोरेज क्षमता, दैनंदिन वापराच्या वस्तू ठेवण्यासाठी उपयुक्त जागा, मोबाईल चार्जिगच्या स्वतंत्र सॉकेटची सोय यामध्ये करण्यात आली आहे,” अशी या नवीन रिक्षाची वैशिष्ट्य आहेत.

चित्रपट महामंडळाची भूमिका मल्टिफ्लेक्स धार्जिणी नको-अमोल बालवडकर (व्हिडिओ)

0
पुणे-मल्टिफ्लेक्स आणि मॉल च्या इमारतीतील पार्किंग च्या जागेचा व्यवसायिक वापर करणे म्हणजे पार्किंग शुल्क घेणे कायद्याचा भंग करणारेच असून जर मल्टिफ्लेक्स ला विनामुल्य पार्किंग तर महापालिकेच्या नाट्यगृहांना देखील पार्किंग विनाशुल्क ठेवा अशी भूमिका जर मराठी चित्रपट महामंडळ घेत असेल तर ती चुकीचीच आहे ,आणि मल्टिफ्लेक्स चालक मालकांना सहाय्य करण्यासाठी विषयाला वळण देण्याचा प्रयत्न करणारीच ठरेल असा आरोप महापालिकेतील शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी केला आहे.
या उलट आपण मुख्यमंत्री यांना हि राज्यभर अशा कायद्याचा आधार घेवून मॉल ,मल्टिफ्लेक्स येथील पार्किंग विनाशुल्क करावे यासाठी विनंती केली असून मुंबई महापालिकेने देखील या बाबीकडे लक्ष द्यावे अशी आदित्य ठाकरे यांना विनंती ट्वीट द्वारे केली आहे .असेही त्यांनी स्पष्ट केले .
पुण्यात वाढती वाहने, आणि पार्किंग ची समस्या आता उग्र बनली आहे. वाहने पार्क करायची कुठे ? असा प्रश्न आ वासून उभा आहे .असे असताना जिथे कायद्याने पार्किंग विनाशुल्क आहे तेथील मॉल आणि मल्टिफ्लेक्स मध्ये पार्किंगच्या नावाने नागरिकांची लुटमार होते आहे . मल्टीफ्लेक्स आणि मॉल अशा  दोन्ही प्रकारच्या इमारती व्यावसायिक स्वरुपात मोडतात. आणि कायद्यानेचं अशा इमारतीत तिथे येणाऱ्या ग्राहकांना मग तो खरेदी करणारा असो वा खरेदी परवडणारी नाही म्हणून परत जाणारा असो ,अशा ग्राहकांना येथे पार्किंग विनाशुल्क करण्याची सुविधा दिलेली आहे. या बाबीकडे आजवर कोणी लक्ष का दिले नाही हा प्रश्न आहेच .पण आता तरी ही बेकायदा होणारी लुटमार थांबविली पाहिजे या हेतूनेच आपण निर्णय घेवून प्रशासनाकडे अशा संबधितांवर कारवाई करा असे निर्देश दिले आहेत .आणि प्रशासनानेही तातडीने याबाबत दाखल घेत संबधितांना नोटीसा बजावल्या आहेत .यामुळे नागरिकांत देखील समाधान दिसून येते आहे . लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. असे असताना एका वृत्तपत्रात आपण चित्रपट महामंडळाने घेतलेल्या भूमिकेबद्दल बातमी वाचली . महामंडळ अध्यक्षांनी असे म्हटले आहेकी जर मल्टिफ्लेक्स चे पार्किंग विनाशुल्क करणार असाल  तर महापालिकेने आपल्या नाट्यगृहांचे पार्किंग हि विनाशुल्क करावे . मला वाटते हि भूमिका मल्टिफ्लेक्स धार्जिणी अशी चुकीची भूमिका आहे.मल्टिफ्लेक्स हे व्यावसायिक आहेत .तिथे काय  किमती कशाच्या आकारल्या जातात यावर हि अनेक प्रवाद आहेत .आणि कायद्यानेच तेथील पार्किंग साठी शुल्क आकरणी ची परवानगी नाही . राहिला महापालिकेच्या नाट्य गृहांचा प्रश्न तर ..महापालिकेची नाट्य गृहे म्हणजे पैसा कमाविण्यासाठी उभारलेली व्यापारी संकुले नाहीत हे संबधितांना समजत का नाही ? नाट्यकलेची जोपासना आणि सेवा करण्यासाठी अशी नाट्यगृहे नाटकांसाठी नाममात्र दरात वर्षानुवर्षे महापालिकेने उपलब्ध करवून दिलेली आहेत आणि अजूनही देत आहेत. त्यातून कोणताही नफा मिळविण्यासाठी ,धंदा करण्यासाठी महापालिकेने हि नाट्य गृहे उभारलेली नाहीत .नाटक जगले पाहिजे ,नाट्य कला जगली पाहिजे म्हणून असंख्य मान्यवर कलावंत देखील नाममात्र मानधनात नाटकात कामे करतात आणि जे यावर बोलतात त्यांनी हि नाममात्र दरातच नाट्यगृहे वापरली असतील .त्यामुळे नाट्यगृहे हे रंगदेवतेची रसिकांची सेवा म्हणून उभारलेली आहेत .तिथे महापालिकेने पार्किंग शुल्क घेणे अजिबात चुकीचे नाही व कायद्याच्या विरोधात नाही . हे माहिती असूनही कोणाची तरी मर्जी राखण्यासाठी , विषय भलतीकडेच वळविण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तर करू नये अशी आपली विनंती असेल.
व्यावसायिक इमारतीचे पार्किंग  ग्राहकाना विनाशुल्क उपलब्ध करून देणे हाच कायद्याचा हेतू असून तो पाळलाच पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि राहू असेही बालवडकर यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान  पालिकेच्या नाट्यगृहावर आधीच कोणताही नफा न मिळविता अधिक खर्च करावा लागतो आहे,  जर नाट्यगृह पार्किंग निशुल्क केले तर थिएटर भाड़े वाढवावे लागेल असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

पुणे महापालिकेच्या पोटनिवडणुकीमध्ये पोकळे, जाधव, ढोरे विजयी

0

पुणे : पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १ अ च्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या ऐश्वर्या जाधव विजयी झाल्या आहेत. त्यांनी आघाडीच्या रेणुका चलवादी यांचा पराभव केला आहे. तर समाविष्ट गावांचा नवीन निर्माण केलेल्या पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 42 मधून अ जागेतून राष्ट्रवादीचे गणेश ढोरे तर ब या महिलांसाठी राखीव असलेल्या जागेतून भाजपाच्या अश्विनी पोकळे विजयी झाल्या आहेत.

महापालिकेच्या नव्या फुरसुंगी-लोहगाव (प्रभाग क्र.42) मधील निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली. या प्रभागातून राष्ट्रवादीचे गणेश ढोरे आणि भाजपच्या आश्‍विनी पोकळे निवडून आल्या. तर, धानोरी-कळस-विश्रांतवाडी (प्रभाग क्र.1) मधील पोटनिवडणुकीत भाजपच्या ऐश्वर्या जाधव विजयी झाल्या.

या निवडणुकीत ढोरे यांना 26 हजार 304 मते मिळाली असून, शिवसेनेचे अमोल हरपळे यांना 20 हजार 224 मते मिळाले. त्यात ढोरे यांनी 6 हजार 8 मतांची आघाडी घेतली. पोकळे यांनी 24 हजार 851 मते घेत कामठे यांचा 932 मतांनी पराभव केला. कामठे यांना 23 हजार 919 मते मिळाली. धानोरी-कळस-विश्रांतवाडीतून जाधव यांना 7 हजार 100 मते मिळाली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रेणुका चलवादी यांना 4 हजार मतांवर समाधान मानावे लागले.या प्रभागातील भाजपच्या किरण जठार यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने त्यातील एका गटासाठी पोटनिवडणूक झाली. येथील वंचित बहुजन आघाडीच्या रेहिणी टेकाळे यांना 2 हजार 900 मते मिळाली.

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १ अ च्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या ऐश्वर्या जाधव विजयी झाल्या आहेत. त्यांनी आघाडीच्या रेणुका चलवादी यांचा पराभव केला आहे. तर समाविष्ट गावांचा नवीन निर्माण केलेल्या पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 42 मधून अ जागेतून राष्ट्रवादीचे गणेश ढोरे तर ब या महिलांसाठी राखीव असलेल्या जागेतून भाजपाच्या अश्विनी पोकळे विजयी झाल्या आहेत. या प्रभागातून महायुतीतर्फे प्रथम शिवसेनेने जाहीर केलेली उमेदवारी ऐनवेळी माघारी घेऊन संभ्रम निर्माण केला. उमेदवारी देण्याच्या घोळामध्ये अधिकृत पक्षाचे चिन्हाला शिवसेनेच्या उमेदवाराला मुकावे लागले यामुळे शिवसेनेला पराभवाला सामोरे जावे लागले. पुणे महापालिकेच्या पोटनिवडणुकीत ३ जागांवर २ भाजप व 1 जागा राष्ट्रवादीला मिळाली आहे. प्रभाग 42 ( अ) गणेश ढोरे (राष्ट्रवादी) 4 हजाराहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या दोन जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत भाजपकडून अश्विनी पोकळे, शिवसेना पुरस्कृत अमोल हरपळे, राष्ट्रवादीचे गणेश ढोरे तर काँग्रेसकडून भाग्यश्री कामठे हे उमेदवार रिंगणात होते. या दोन जागांसाठी रविवारी मतदान पार पडले. यामध्ये एकुण १ लाख ९६ हजार मतदार होते. त्यापैकी ५१ हजार ४२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यानुसार २२ टक्के मतदान झाले. यानंतर आज झालेल्या मत मोजणीत प्रभाग ४२ (अ) मधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गणेश ढोरे यांना २६ हजार ३०४ तर शिवसेना पुरस्कृत अमोल हरपळे यांना २० हजार २२४ एवढी मतं मिळाली. यानुसार सहा हजारांपेक्षा अधिक मतांनी राष्ट्रवादीचे गणेश ढोरे विजयी झाले. तर (ब) मधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भाग्यश्री कामठे यांना २३ हजार ९१९ तर भाजपाच्या अश्विनी पोकळे यांना २४ हजार ८५१ या मतं मिळाली. या आकडेवारीवरून भाजपच्या अश्विनी पोकळे ९३२ मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

भाजपाच्या ऐश्वर्या जाधव विजयी

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १ अच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या ऐश्वर्या जाधव विजयी झाल्या आहेत. त्यांनी आघाडीच्या रेणुका चलवादी यांचा पराभव केला आहे. पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून भाजपच्या ऐश्वर्या आशुतोष जाधव ह्या ३०९५ मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांना ७१८० मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या रेणुका चलवादी यांना ४०८५ मत मिळाली आहेत. पुणे महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये निवडणुकी प्रभाग क्रमांक १ मधून भाजपाच्या किरण जठार विजयी झाल्या होत्या. मात्र निवडणूक आयोगाकडे त्यांनी जे जात प्रमाणपत्र दाखल केले होते ते अवैध असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे आली होती. या तक्रारीची दखल घेऊन प्रमाणपत्राची तपासणी केली असता ते अवैध असल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर प्रभाग क्रमांक १ अची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत आघाडीकडून रेणुका चलवादी, भाजपाकडून ऐश्वर्या जाधव, वंचित आघाडीच्या रोहिणी टेकाळे या उमेदवार होत्या. २२. ५ टक्के इतके मतदान झाले. आज सकाळी मतमोजणी झाली. सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये रेणुका चलवादी आणि ऐश्वर्या जाधव यांच्यात स्पर्धा पाहण्यास मिळाली. मात्र महत्त्वाची बाब ही की पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत ऐश्वर्या जाधवच आघाडीवर होता. ऐश्वर्या जाधव या ३ हजारहून जास्त मतांनी विजयी झाल्या.
या निवडणुकीतील प्रमुख उमेदवार व त्‍यांना मिळालेली मते :
१) ऐश्वर्या जाधव (भाजप) –  ७१८०
२) रेणुका चलवादी (राष्ट्रवादी)- ४०८५
३) रोहिणी टेकाळे (वंचित) – २३४४

विजय वडेट्टीवारांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

0

मुंबई- माजी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभा सदस्याचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसने गटनेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती केली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेत ही घोषणा केली. विजय वड्डेटीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड जाहीर करताच माजी विरोधी पक्षनेते आणि आताचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वड्डेटीवार यांच्या जागेवर जाऊन त्यांच्याशी हस्तांदोलन करून अभिनंदन केले.
लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला, काँग्रेसने 48 पैकी फक्त 1 जागा जिंकली असून ती जागा चंद्रपूरची आहे. चंद्रपूरचे असलेले वड्डेटीवार यांनी या जागेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. आक्रमक स्वभावाचे वड्डेटीवार हे विधानसभेतही विविध मुद्यांवर आक्रमक असतात. त्यामुळे काँग्रेसने विखे यांच्यानंतर वड्डेटीवर यांची विरोधी पक्षनेतेपदावर नियुक्ती करावी असे पत्र हे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विधानसभा अध्यक्षांना दिले होते.

अधिवेशन सुरू होऊन एक आठवडा उलटल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेतेपदावर निवड जाहीर करण्यात आली आहे. आता अधिवेशनाच्या कामकाजाचे केवळ 7 दिवस शिल्लक असून हे या सरकारमधील शेवटचे अधिवेशन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वड्डेटीवर यांचे अभिनंतद केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री विदर्भातील आहेत आणि विरोधी पक्षनेताही विदर्भातील झाला आहे. विदर्भाच्या विकासासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. मी चंद्रपूर जिल्ह्य़ातील आहे. विरोधी पक्षनेतेही चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाने वड्डेटीवारांना संधी दिली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेतेपद पुन्हा तुमच्याकडेच राहणार आहे, त्यामुळे पुढेही त्यांना संधी द्या अशी मनापासून विनंती आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोमणा मारला.

कंत्राटी कर्मचारी यांच्या शासन पाठीशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस

0
9 फेब्रुवारी रोजीचे परिपत्रक कायमस्वरूपी रद्द करा, पाणी पुरवठा विभागाची पदभरती रद्द करा  – शाहरूख मुलाणी

मुंबई ( प्रतिनिधी ) –  महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दि. 09 फेब्रुवारी 2018 रोजी काढलेल्या परिपत्रकात स्थगिती दिली असूनही पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. सदरचे परिपत्रक कायमस्वरूपी रद्द करण्याची  मागणी  महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना भेटून केली आहे. विधानभवनात महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली. या भेटीत कंत्राटी कर्मचारी यांच्या अडचणी बाबत भेटून निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली.
कंत्राटी कर्मचारी यांच्या शासन पाठीशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस
कर्मचारी कंत्राटी असले तरी सर्व शासकीय सुविधा देणेत येतील. कुणावरही अन्याय होणारं नाही. शासन कर्मचारी यांचे पाठीशी खंबीर पणे उभा आहे. केंद्र आणि राज्य शासनाचे योजना राबविण्यात कंत्राटी कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे हे मी विसरणार नाही. परिपत्रकाचा कोणी चुकीचा अर्थ काढत असेल तर सामान्य प्रशासन विभागास या बाबत सुचना देण्यात येतील. असेही त्यांनी निवेदन दिलेनंतर सांगितले.

यावेळी शाहरूख मुलाणी म्हणाले की, परिपत्रकामुळे राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मनात सध्या धास्ती व भीतीचे वातावरण आहे. या परिपत्रकात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दि. 07 मार्च 2018 रोजी स्थगिती दिली आहे. तरीही पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने रिक्त पदा एवजी कार्यरत पदांची जाहिरात प्रकाशीत करून पदभरती सुरू केली आहे. यामुळे शासनाने काढलेल्या आदेशाची पायमल्ली झाली असल्याचे निदर्शनास आणून दिले. या परिपत्रकास स्थगिती असूनही पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने दि. 29 मे 2019  रोजी कार्यरत पदांचे भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या जाहिरातीने या परिपत्रकाचा विपर्यास करण्यात आला आहे. सदर भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाने  हे परिपत्रक कायमस्वरूपी रद्द करण्याची आवश्यकता आहे. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनांमध्ये कंत्राटी कर्मचारी गेल्या 20 वर्षापासून कार्यरत आहेत. वास्तविक पाहता राज्य शासनाने दि. 09 फेब्रुवारी च्या परिपत्रक स्थगिती दिली असतानाही राज्य शासनातील विभाग या परिपत्रकाचा अवमान करून कार्यरत पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत राज्य शासनाच्या सर्व विभागाला सामान्य प्रशासन विभागाकडून परिपत्रकाचा स्थगिती असल्याने दि. 09 फेब्रुवारी च्या परिपत्रकानुसार कुठलीही भरती प्रक्रिया राबविण्यात येऊ नये अशा स्पष्ट सूचना देण्यात याव्यात. याव्यतिरीक्त रिक्त पदांची भरती करण्यास आमची हरकत नाही. कुठल्याही परिस्थितीत दि. 09 फेब्रुवारी 2018 चे परिपत्रक रद्द करण्यात यावे जेणेकरून कोणताही विभाग या परिपत्रकाची अंमलबजावणी करणार नाही. या बाबत संबधित विभागास सूचना देण्यात याव्यात. कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक करणार नाही.याची दक्षता घेणेचे सुचना सर्व विभागांना देणेत यावेत. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने दि. 29 मे 2019 रोजी कार्यरत पदांचे भरतीसाठी प्रसिद्ध केलेल्या भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करणेत आली असल्याचे शाहरूख मुलाणी यांनी सांगितले. मा. राज्यपाल यांचे मान्यतेने 09 फेब्रुवारी च्या परिपत्रकास दि. 07 मार्च 2018 रोजी स्थगिती दिली असूनही राज्यपाल यांच्या आदेशाचा अवमान करणेत आला आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष तथा याचिकाकर्ते मुकूंद जाधवर, मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी, कोषाध्यक्ष विकास डेकाटे, कार्याध्यक्ष सचिन जाधव, राज्य सचिव बाबासाहेब कोकाटे, सरचिटणीस शहाजी नलवडे, सह कार्याध्यक्ष सचिन पाटील आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

आव्हानांना सामोरे जाणारेच यशस्वी उद्योजक बनतात -रणजित मोरे

0

पुणे : “कोणत्याही क्षेत्रात काम करताना आव्हाने येतात. उद्योग उभारताना तर अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. अपयशाला सामोरे जावे लागते. पण या परिस्थितीतून सकारात्मक मार्ग काढीत जिद्दीने उभे राहणारच यशस्वी उद्योजक बनतात. त्यामुळे मराठी माणसाने हिम्मतीने उद्योग उभारावेत,” असे मत युनिव्हर्सल कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापकीय संचालक रणजित मोरे यांनी व्यक्त केले.

मराठी आंत्रप्रेन्युर्स नेटवर्क फोरमच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आदर्श उद्योजक-उद्योजिका पुरस्कार वितरण सोहळ्यात मोरे बोलत होते. घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी शारंगधर फार्माचे डॉ. जयंत अभ्यंकर, फोरमचे राजेश जोशी, सुरेंद्र कुलकर्णी, नंदकुमार तळेकर, वृषभनाथ कोंडेकर आदी उपस्थित होते. यावेळी सेवा क्षेत्रातील जीवन हेंद्रे, उत्पादन क्षेत्रातील प्रकाश दीक्षित, कृषी उद्योगातील उत्तम हुकरे यांना आदर्श उद्योजक, तर उत्पादन क्षेत्रातील उज्ज्वला गोसावी व खाद्य क्षेत्रातील प्राजक्ता पाठक यांना आदर्श उद्योजिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रणजित मोरे म्हणाले, “मराठी माणूस प्रामाणिक असतो. तो ग्राहकाला कधी फसवण्याचा विचार करत नाहीत. जोखीम घेण्याची तयारी आपल्याकडे असली पाहिजे. प्रत्येकवेळी यश मिळेल, असे नाही. अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा जोमाने उभा राहिले पाहिजे. महाराष्ट्रात उद्योगासाठी मोठा वाव आहे. आपण मार्केटचा अभ्यास करून त्यानुसार उद्योग विस्तार करायला हवा.”

डॉ. जयंत अभ्यंकर म्हणाले, “आपल्यातील क्षमता ओळखून त्यानुसार क्षेत्रनिवड केली पाहिजे. त्यात नाविन्यपूर्ण काम उभारता आले पाहिजे. उद्योगाच्या यशासाठी पैसे, विश्वास आणि कामावरची श्रद्धा या तीन गोष्टी महत्वाच्या असतात. अपयशातून मार्ग काढत पुढे गेले पाहिजे.”

प्राजक्ता पाठक म्हणाल्या, आमच्यासारख्या उद्योगांना दाद दिली तर आमचाही काम करण्यासाठी उत्साह वाढतो. हे यश केवळ माझे नाही तर माझ्या कर्मचाऱ्यांचे आहे. उत्तम डुकरे म्हणाले, माझ्या उद्योगाची आईची साथ मोलाची आहे. उज्ज्वला गोसावी म्हणाल्या, हा पुरस्कार मी माझे वडील, आई आणि माझ्या जीवनसाथीला अर्पण करते. माझ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या साथ साठी धन्यवाद देते. प्रकाश दीक्षित म्हणाले, विविध उद्योजकांना एका छताखाली जमल्यामुळे एकमेकांना फायदा होईल. जीवन हेंद्रे म्हणाले, कुटुंबाची साथ मिळाली आणि सकारात्मक दृष्टीने काम करता आले, तर यश मिळते.

सुत्रसंचालन ज्ञानेश्वर जाधवर, प्रास्ताविक वृषभनाथ कोंडेकर, मानपत्र वाचन जाई देशपांडे यांनी केले. आभार ऍड. राजश्री माने यांनी मानले.

विधानपरिषदेच्या उपसभापतिपदी निलम गोऱ्हे बिनविरोध

0

मुंबई-शिवसेनेच्या आमदार  नीलमताई गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे. जोगेंद्र कवाडे यांनी माघार घेतल्याने गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे.२००२ पासून विधान परिषदेच्या त्या सदस्या आहेत. याशिवाय विविध विषय समित्यांवर देखील त्यांनी काम केल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. विधान परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे १७, काँग्रेसचे १६, भाजपचे २३ , शिवसेनेचे १२, लोकभारती ,शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षचा प्रत्येकी १ आमदार आहे तर, ६ अपक्ष आमदार आहेत.  माणिकराव ठाकरे यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यानंतर २० जुलै २०१८ पासून उपसभापतिपद रिक्त होते. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधानपरिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेना नेत्या डॉ. निलमताई गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज (सोमवाऱ) संध्याकाळी चार वाजता ही अधिकृत घोषणा झाली. आज सभागृहाचं कामकाज सुरू होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. विधानपरिषद उपसभापतिसाठी निलमताई गोऱ्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विरोधकांना विश्वासात घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. विधिमंडळाच्या नियम सहा आणि सातनुसार उपसभापतीपदासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम एक दिवस आधी जाहीर करणं अपेक्षित होते. मात्र ही तरदूत स्थगित करण्यासंबंधी विधानकार्य मंत्री विनोद तावडे यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव सभागृहानं मंजूर केला. त्यानंतर सभापतींनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.काँग्रेस गटनेते शरद रणपिसे आणि काँग्रेस सदस्य जनार्दन चांदूरकर यांनी आदल्या दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर न करता आज निवडणूक घ्यायला हरकत घेतली, मात्र सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यापूर्वी २४ जुलै १९९८ आणि १३ सप्टेंबर २००४ असे दोनदा एका दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याचा दाखला दिला आणि काँग्रेसची हरकत फेटाळून लावत स्वतःचे अधिकार वापरून निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याचे घोषित केले होते

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश समन्वयकपदी सुहास उभे यांची नियुक्ती

0

पुणे :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश समन्वयक पदावर कोथरुड ( पुणे ) येथील युवा कार्यकर्ते सुहास उभे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुहास उभे यांना नियुक्तीचे पत्र दिले. सुहास उभे यांच्याकडे पक्षाच्या विविध आघाड्या आणि सेल ( विभाग ) यांच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सुहास उभे यांना यापूर्वी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम करण्याचा अनुभव आहे.

‘ पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी युवकांना संधी देण्याची भूमिका घेतली असून त्यामुळे संधी मिळाली . राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस
संघटनेत संपूर्ण महाराष्ट्रातील असलेला जनसंपर्क पाहून अजितदादा पवार व खा . सुप्रियाताई सुळे यांनी माझी निवड केली. पक्षातील आघाड्या आणी विभाग सक्षम करणे, संवाद -उपक्रम वाढवणे आणि त्यातून पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी कार्यरत राहणार आहे, ‘ असे सुहास उभे यांनी सांगीतले.

 

वारी ही संस्कारांची शिदोरी- ह.भ.प.श्री. विठ्ठल महाराज कोळोखे

0

पुणे, २४ जून: “वारी ही सदैव माणसाला चैतन्य प्रदान करीत असते. पालखीच्या माध्यमातून धर्म व संस्कृती शिकविली जातेे. समाजात पुढील पिढी टिकवायची असेल तर त्यांना वारीचे संस्कार देणे गरजेचे आहे. वारी ही आम्हाला आई-वडिलांची सेवा करण्याचे संस्कार शिकविते. म्हणून वारी ही संस्कारांची शिदोरी आहे.” असे अनमोल विचार देहू येथील संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह.भ.प.श्री. विठ्ठल महाराज कोळोखे यांनी मांडले.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्‍वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्‍वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी सोहळा प्रस्थान असते. त्या निमित्ताने युनेस्को अध्यासन अंतर्गत लोकशाही, मानवाधिकार, शांती व सहिष्णुतेसाठीचा लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व पहिले पुष्ण गुंफताना ते बोलत होते.
याप्रसंगी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, सौ. उर्मिला विश्‍वनाथ कराड, सौ. उषा विश्‍वनाथ कराड, श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक प्रा. स्वाती कराड-चाटे, बाळासाहेब रावडे, ह.भ.प. डॉ.सुदाम महाराज पानेगावकर, बाळासाहेब काळोखे, तुकाराम काळोखे, रमेश काळोखे, ह.भ.प. शालीग्राम खंदारे, ह.भ.प. नलावडे महाराज हे उपस्थित होते.
ह.भ.प.श्री. विठ्ठल महाराज कोळोखे म्हणाले “मानवाने जीवन का जगावे हे कळण्यासाठी अध्यात्म असते. या अध्यात्मातील ओंकाराच्या माध्यमातून सदैव ऊर्जा प्राप्त होत असते. तसेच यातील शब्द संपत्ती ही भाव निर्माण करते आणि त्यातूनच परमार्थाकडे जाता येते. मानवाला जशी संगत असेल त्यावर जीवनाच्या बर्‍याच गोष्टी आधारित असतात. त्यामुळे संगत ही साधू संतांची ठेवल्यास जीवनात सदैव सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.”
“संत तुकाराम महाराजांनी या समाजाला शहाणे करण्यासाठी स्वतःचा अनुभव सांगितला. परंतू त्याचा हवा तेवढा परिणाम झाला नाही. तसेच १७ व्या शतकात मराठी भाषा लोप पावत चालली होती त्यावेळेस संत तुकाराम महाराजांनी ‘गाथा’ मराठी भाषेत लिहून ही भाषा टिकविली. शिक्षणापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे हे त्यांनी सांगितले. संत तुकाराम यांनी अध्यात्म क्षेत्रात केलेल्या कार्याला पाहुन संपूर्ण जगातील महान व्यक्ती प्रभावित झाले होते.
तसेच, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सुध्दा तुकाराम महाराजांच्या अभंगाचे निरूपण केले आहे. त्याच प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सारखे जगभरातील लाखो लोक त्याच्यापासून प्रभावित झाले होते. १८५७ साली मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू अलेक्झांडर यांनी गाथा समजून घेऊन पहिली गाथा प्रकाशित केली. १८७९ मध्ये नेल्सन यांनी संत तुकाराम यांच्यावर ग्रंथ लिहिला.”
प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले. “वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आळंदी व देहूचे नाव संपूर्ण जगात कोरले गेले आहे. संत ज्ञानेश्‍वर माऊली व जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी संपूर्ण मानव जातीला सुख, समाधान आणि शांतीचा संदेश दिला आहे. कसे जगावे आणि जगू नये याबाबतचे मार्गदर्शन ज्ञानेश्‍वरी सारख्या ग्रंथातून मानवजातीला दिले आहे.
यानंतर जालना येथील ह.भ.प. डॉ. सुदाममहाराज पानेगांवकर यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले. तसेच, संगीत अलंकार ह.भ. प. श्रीकृष्ण गरड गुरुजी व संगीत विशारद श्री. अनिरूध्दजी कारकर यांचा भक्तीस्वरगंध हा अभंगवाणीचा कार्यक्रम संपन्न झाला.
वरील कार्यक्रमाचा इंद्रायणीच्या दोन्हीही तीरावरील लाखो वारकर्‍यांनी अध्यात्मिक अनुभूतीचा लाभ घेतला.

दिव्यांग खेळाडूंना दत्तक घेणे हा एक ह्दयस्‍पर्शी उपक्रम- मुख्‍यमंत्री फडणवीस

0

पुणे, दिनांक 23-क्रीडा क्षेत्रातील दिव्‍यांग खेळाडूंना ग्रॅव्‍हीटी फीटनेस क्लबने दत्तक घेऊन एक चांगला पायंडा पाडला आहे. या खेळाडूंच्‍या करियरला त्‍यामुळे एक नवी दिशा मिळेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त करुन हा एक हृदयस्पर्शी उपक्रम असल्‍याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

बिबवेवाडी परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रॅव्हिटी फीटनेस क्लबच्यावतीने क्रीडा क्षेत्रातील 21 दिव्यांग व्यक्‍ती दत्तक घेण्यात आल्या असून त्यांचा सत्कार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला.

यावेळी ज्‍येष्‍ठ विधीज्ञ उज्‍ज्‍वल निकम, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, सुधीर कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, मिहीर कुलकर्णी, संजय मोरे आदींची उपस्थिती होती.

मुख्‍यमंत्री म्‍हणाले, व्यक्ती शरीराने दिव्यांग नसतो, तो मनाने असतो. तो मनाने दिव्यांग होतो तेव्हाच खरा दिव्यांग असतो. मनात उमेद, उभारी, हिंमत, ताकद असली तर दिव्यांग व्यक्ती कुठल्याही उंचीपर्यंत जाऊ शकतात. स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना मंदिरात जाण्याऐवजी फुटबॉलच्या मैदानात जाण्याचा सल्ला होता. स्‍वामी विवेकानंद म्‍हणाले होते, कालीमातेची पूजा करतांना ताजी व टवटवीत फुले वापरली जातात, कोमेजलेली फुले आपण वापरत नाही, तसेच मातृभूमीच्‍या स्‍वातंत्र्यासाठी सुदृढ शरीर असलेली तरुणाईच उपयोगी आहे. चांगले शरीर व चांगले मन ईश्वराला आवडते, तसेच मातृभूमीलाही चांगले मन व चांगले शरीर असलेली तरुणाई आवडते. ग्रॅव्हिटी क्लबने दिव्यांगाना आवश्यक सुविधांनी परिपूर्ण असलेला क्लब खुला केला असून त्याचा फायदा होईल आणि नवीन खेळाडूंची टीम तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

जेष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी ग्रॅव्हिटी क्लब आणि त्यांचे प्रमुख मिहीर कुलकर्णी यांचे कौतुक केले. समाजासाठी काहीतरी करावे ही भावना कुलकर्णी यांनी जपली आहे. शारिरीक स्वास्थ्य उत्तम असेल तर मानसिक स्वास्थ्य उत्तम असते. सुदृढ शरीर असलेल्‍या मनात सकारात्मक विचार येतात. आजही मी कोठेही असलो तरी एक तास व्‍यायाम करतो, हे त्‍यांनी आवर्जून सांगितले. शारीरिक संपत्तीचा फायदा होतो, असेही ते म्हणाले

मिहिर कुलकर्णी यांनी प्रास्‍ताविक केले. माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, इंडियन बॉडी बिल्‍डींग अॅण्‍ड फीटनेस असोसिएशनचे संजय मोरे यांची यावेळी शुभेच्‍छापर भाषणे झाली. कार्यक्रमात योगेश मेहेर, प्रतीक मोहिते, सुनील मुलाह, अक्षय शेजवळ, सूर्यकांत दुगावले, जय भवर, अमोल कचरे, नवनाथ भोगडे, प्रियंका कुदळे, रवी वाघ या दिव्‍यांग खेळाडूंचा सत्‍कार करण्‍यात आला.

0000

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना लवकरच सन्मान योजनेचा लाभ-मुख्यमंत्री

0

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या स्मृतिचित्रे स्मरणिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
पुणे दि. 23: पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य सरकार नेहमीच सकारात्मक असून ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेसाठी 25 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून पुढच्या महिन्यापर्यंत पहिल्या टप्प्यात अर्ज केलेल्या पत्रकारांना याचा लाभ मिळेल ,अशी ग्वाही देतानाच म्हाडाच्या विशेष योजनेच्या माध्यमातून पुण्यातील पत्रकारांसाठी घरे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. तसेच पुणे प्रेस क्लबसाठीही जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येथील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात पुणे पत्रकार संघाच्या सन 1940 ते 2019 या आठ दशकांचा चित्रमय प्रवास असणाऱ्या “स्मृतिचित्रे” या स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, आमदार जगदीश मुळीक, मेधा कुलकर्णी, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या देशात अनेक संस्था निर्माण झाल्या, त्या मोठ्या झाल्या .मात्र त्याच्या इतिहासाचे जतन करण्याचे काम आपल्याकडे फारसे झाले नाही. परदेशात मात्र संस्थांच्या इतिहासाचे योग्य प्रकारे जतन करण्यात येते. संघर्षाच्या काळात तसेच पुढील पिढीसाठी हा ऐतिहासिक दस्ताऐवज उपयुक्त ठरतो. पुणे श्रमिक पत्रकार संघाला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असा ऐतिहासिक वारसा आहे. हा सर्व इतिहास संग्रहीत करून तो चित्ररूपाने प्रदर्शीत करण्याचा पत्रकार संघाचा हा उपक्रम अभिनव आहे.
पत्रकारिता व्यवसायासमोर आज अनेक अडचणी आहेत, त्यातच नवमाध्यमांच्या उदयाने हे क्षेत्र अधिकच आव्हानात्मक बनले आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांच्या कल्याणासाठी त्यांचा समावेश शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये करण्यात आला आहे. याचा लाभ राज्यातील पत्रकारांना होणार असल्याचे सांगत पत्रकारितेला अधिक प्रगल्भ करण्यासाठी पत्रकार संघाने पुढाकार घेवून विशेष अभ्यासदौरे आणि अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी केले.
खासदार गिरीश बापट म्हणाले, पुणे श्रमिक पत्रकार संघाचा पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात मोठा वाटा आहे. पत्रकार हा लोकशाहीचा आधार आहे. समाजाच्या दुख:ला न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकार करत असतात. पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इतिहास आदर्शवत असून पुणे प्रेस क्लबच्या उभारणीत शहरातील सर्व लोकप्रतिनिधी सक्रीय सहभाग नोंदवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

*आषाढी वारी 2019 मार्गदर्शिकेचे प्रकाशन*
पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना आणि नागरिकांना वारीच्या संदर्भात अद्ययावत माहिती मिळावी, महत्वाचे फोन नंबर उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या “आषाढी वारी 2019” या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत पांडुरंग सांडभोर यांनी केले. प्रस्तावना राजेंद्र पाटील यांनी केली. सुत्रसंचालन प्रशांत आहेर यांनी केले. तर आभार चंद्रकांत हंचाटे यांनी मानले. या कार्यक्रमाला पुणे शहर आणि परिसरातील ज्येष्ठ पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.