Home Blog Page 2900

दिशाहीन व महागाई वाढवणारा अर्थसंकल्प – मोहन जोशी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या पाचवर्षातील केंद्रातील सरकारच्या आर्थिक अपयशाचे प्रतिबिंबच अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात दिसून येते. अत्यंत दिशाहीन व महागाई वाढवणाऱ्या या अर्थसंकल्पातून देशापुढील भविष्यातील प्रश्न अधिक बिकट होतील असे दिसत आहे . आगामी पाचवर्षात ‘पाच ट्रेलियन डोल्लर्स इकॉनॉमी’ या हेडलाईन व्यवस्थापना पलीकडे या अर्थसंकल्पात काहीही नाही. गेल्या पाच वर्षात ‘ सूट बूट कि सरकार ‘ राहिलेल्या मोदी सरकारमुळे देशापुढे आर्थिक मंदीचे संकट उभे ठाकले आहे. कोट्यावधी नव्या रोजगाराची निर्मिती ,शेतीमालाला योग्य हमी भाव , देशी आणि परदेशी गुंतवणुकीत वाढ , छोट्या व मध्यम उद्योगांना अर्थसाह्य , मध्यमवर्गीयांना दिलासा , लष्कराचे अधुनिकीकरण , सार्वजनिक बँकांनकढील बुडीत कर्जांची वसुली. अशा कोणत्याच बाबतीत कोणताही ठोस कार्यक्रम व त्यासाठी तरतूद या अर्थसंकल्पात नाही उलट इंधनावरील सेस व अबकारी कर वाढवून पेट्रोल – डीझेल दर वाढून जनतेवर आर्थिक बोझा टाकला आहे . आगामी काळ जनतेच्या दृष्टीने मोठा अडचणीचा ठरणार आहे. हेच या अर्थसंकल्पातून दिसून येते. केवळ घोषणा आणि केवळ प्रचार हेच धोरण असणाऱ्या मोदी सरकारची अकार्यशमता या अर्थसंकल्पातून  जनतेसमोर येत आहे.

– मोहन जोशी

सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी

मोहिनीअट्टम ,भरतनाट्यम ,कत्थक च्या नृत्याविष्काराने जिंकली मने !

भारतीय विद्या भवन – इन्फोसिस फौंडेशन तर्फे आयोजन
पुणे :‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ मोहिनीअट्टम ,भरतनाट्यम ,कत्थक चा नृत्याविष्काराचे आयोजन शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या सहकार्याने ,  ‘लक्ष्य ‘ या नावाने करण्यात आले होते.’ या कार्यक्रमाला  पुणेकर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला .
हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ५ जुलै  २०१९ रोजी ‘भारतीय विद्या भवन’चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह’, सेनापती बापट रोड येथे सायंकाळी ६ वाजता झाला.
संगीत नाटक अकादमी पारितोषिक प्राप्त ज्येष्ठ नृत्य गुरु मंदाकिनी त्रिवेदी  यांनी मोहिनीअट्टम सादर केले ,श्रुती टेकवडे यांनी भरतनाट्यम तर अमृता गोगटे यांनी कत्थक सादर  केले.
‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत झालेला हा  ७८ वा कार्यक्रम  सर्वांसाठी खुला होता.
 ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.
 नीलिमा आद्ये यांनी शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या उपक्रमाची माहिती दिली. नृत्य गुरू सुचेता चाफेकर यांच्याहस्ते मंदाकिनी त्रिवेदी यांचा सत्कार करण्यात आला.

केजे शिक्षण संस्थेतील विद्यार्थांना राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय कंपन्यांत नोकरी

पुणे : केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या कॅम्पस प्लेसमेंटमधून जवळसपास ४५० विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्टीय नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे. संस्थेच्या ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालय, केजे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि ट्रिनिटी अकॅडमी या तीन महाविद्यालयातून हे विद्यार्थी निवडण्यात आले आहेत, असे संस्थेचे संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर यांनी सांगितले.

केजे शिक्षण संस्थेत २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात झालेल्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये अमेझॉन, टीसीएस, इन्फोसिस, कॅपजेमिनी, पर्सिस्टंट, टाटा मोटर्स, बॉश इंडिया, विप्रो, फोक्सवॅगन, बिटवाईज, झेन्सार, कंटार, ट्रेओ इंजनियरिंग यासह अनेक राष्ट्रीय व बहूराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग घेतला. सरासरी चार लाखाचे पॅकेज विद्यार्थ्यांना मिळाले. ग्रामीण भागातील होतकरू विदयार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी अंतिम वर्षात विशेष संभाषण कौशल्य आणि बुद्धिमत्ता विकास याचे १५० तासांचे मोफत प्रशिक्षण दिल्याने फायदा झाल्याचे डॉ. अभ्यंकर म्हणाले. डॉ. व्यासराज काखंडकी, प्राचार्य डॉ. हरिभाऊ फाकटकर, प्राचार्य डॉ. सुहास खोत, प्राचार्य डॉ. निलेश उके, टीपिओ प्रा. प्रमोद दस्तूरकर, प्रा. किरण पवार यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, विभावरी जाधव यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मेहनत घेणाऱ्या प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही त्यांनी कौतुक केले.

शेतकरी आणि सामान्यांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

0

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे पैसे गोळा करून कार्पोरेट जगतासाठी रेड कार्पेट टाकणारा आणि देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा हा अर्थसंपकल्प आहे, अशी तिखट प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

सामान्य जनतेकडून आतापर्यंत 06 लाख कोटी रूपयांचा टॅक्स गोळा केला जात होता. मात्र या अर्थसंकल्पाने आता तब्बल 11 लाख कोटी रूपये टॅक्सच्या  रूपाने सामान्य जनतेकडून वसूल केले जाणार आहेत. म्हणजे सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटणारा, देशात सर्वाधिक आत्महत्या होत असताना शेतकऱ्यांना दुर्लक्षित करणारा, बेरोजगारांना वाऱ्यावर सोडणारा हा मोदी सरकारचा अर्थसंकल्प आहे असेही वडेट्टीवार यांनी नमूद केले. टॅक्स वाढवून सामान्यांची लूट, महागाई वाढवून गरिबांचे कमरडे मोडणारा, शेतकऱ्यांसाठी कुठेही भरीव तरतूद नसलेला, बेरोजगारी दूर करण्यासाठी कोणतीही तरतूद नसणारा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे भारतातील जनतेच्या तोंडाला पाने पुसणारा हा अर्थसंकल्प आहे असेच म्हणावे लागेल असेही वडेट्टीवार म्हणाले. देशात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहे. मागच्या पाच वर्षांत देशातील शेतकरी संकटात आहे. त्यांचा विचार करून तरी मोदी सरकारने या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद असेल असे वाटले होते मात्र शेतकऱ्यांची घोर निराशा या अर्थसंकल्पाने केली आहे. मागच्या पाच वर्षांत तरूणांच्या हातात निराशाच पडली, देशात बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढली  अशावेळी तरी तरूणांना न्याय मिळेल असे वाटले होते. मात्र तरूणांच्या हाताला काम देण्याची कोणतीही तरतूद या अर्थसंकल्पात नाही, त्यामुळे भारतीय जनतेच्या पदरी निराशा पडली आहे, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

त्या खेकड्यांवर कलम 302 चा गुन्हा दाखल करा – राष्ट्रवादीची मागणी

0

मुंबई / कोल्हापूर. ( शाहरुख मुलाणी ) – राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलिस ठाण्यात आज रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटण्याच्या निषेधार्थ जबाबदार सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान जबाबदार अधिकाऱ्यांवर व संबंधित खात्याच्या मंत्र्यांवर कारवाई व्हावी याकरिता निवेदन देण्यात आले.

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाला काही वर्षापासून तडे गेले होते स्थानिकांनी त्यासंबंधी विभागाला अनेक वेळा निवेदने देऊन ही बाब निदर्शनास आणून दिली होती.परंतु या सरकारच्या दुर्लक्षपणामुळे धरण फुटून आज निष्पाप 23 जणांचा बळी गेला.शासनाला या गोष्टीचे गांभीर्य तर नाहीच तर उलट जलसंधारण खात्याचे राज्यमंत्री तानाजी सावंत बेताल वक्तव्य करत आहे. खेकड्यांमुळे धरण फुटले हे सांगून अंगकाढूपणा सरकार करत आहे. खेकड्यांवर आरोप करून हे प्रश्न सुटणार नाही. खेकड्यांनी हे धरण फोडले असा आरोप संबंधित मंत्री व अधिकारी करत असतील तर त्या खेकड्यांवर कलम 302 चा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. हे आंदोलन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी रविकांत वर्पे, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी डॉ. शैलेश मोहिते, अदिल फरास, बाळासाहेब महामूनकर, रोहित पाटील, महेंद्र चव्हाण, राकेशजी कामठे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 पोलीस स्टेशनमध्ये आरोपी म्हणून आणले ‘खेकडे’ राष्ट्रवादीचे ठाण्यात आंदोलन

राज्याचे जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी तिवरे धरणाच्या संदर्भात केलेल्या विधानाचे वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले आहेत. या विधानाच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांच्या नेतृत्वात नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये चक्क खेकडे आरोपी म्हणून आणले. या खेकड्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटले, या वक्तव्यावर असा जावई शोध करणारे हे सरकार बेशरम आणि असंवेदनशील असल्याची खोचक टीका आमदार आव्हाड यांनी केली. शिवाय खेकड्यांनी पोखरल्यामुळे धरण धोकादायक झाले, या विधानाचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन खेकडे म्हणून आरोपी हजर केले. असे वक्तव्य मंत्री कसे काय करू शकतात, असा प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला. अनेक नागरिकांचा जीव गेल्यानंतरही असे वक्तव्य करून या सरकारने असंवेदनशीलता दाखवली असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

नव्या अर्थसंकल्पात काय मिळाले…?

0
दिल्ली –

काय महाग?

-पेट्रोल – डिझेल

– सोने

> डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर
> मार्बल स्लॅब
> ऑटो पार्ट्स
> सीसीटीवी कॅमरा
> मेटल फिटिंग
> टाइल्स
> आयात केलेली पुस्तके

 

काय स्वस्त?

> डिफेंस इक्विपमेंट
> इलेक्ट्रिक वाहन पार्ट्स

> पॅन कार्ड नसल्यास आधारकार्डद्वारे आयकर भरता येणार
> बँकेतून एका वर्षात एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढल्यास 2 टक्के टीडीस कापण्यात येणार

> पेट्रोल-डिझेलवरील एक्साइज ड्यूटी, रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस प्रत्येकी एक रुपयांनी वाढवण्यात येणार

> 45 लाख रुपयांपर्यंत गृहकर्जाच्या व्याजावरील आयकरवरील सूट 2 लाखांवरून 3.5 लाख करण्यात आली.

> इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले असेल तर त्याचे व्याज भरल्यानंतर आयकरमध्ये 1.5 लाख रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार.

> ज्यांनी स्टार्टअप टॅक्स घोषणापत्र दाखल केले असेल तर त्यांच्याकडून जमा केलेल्या निधीची आयकर विभाग कोणत्याही प्रकारची तपासणी करणार नाही.

> 400 कोटी रुपये वार्षिक टर्नओव्हर असणाऱ्या कंपन्यांना 25% कॉरपोरेट टॅक्स द्यावा लागेल. सध्या 250 कोटी रुपये टर्नओव्हर असणाऱ्या कंपन्यांसाठी 25% कॉरपोरेट टॅक्स आहे. यामुळे आता 99.3% कंपन्या 25% कॉरपोरेट टॅक्सच्या अंतर्गत असतील. फक्त 0.7% कंपन्या यातून बाहेर असतील.

> व्हेरिफाइड एसएचजी सदस्यता असलेल्या महिला, ज्यांच्याकडे जन-धन खाते आहे, त्यांना 5 हजारांची ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळेल.

> 2022 पर्यंत प्रत्येक घरापर्यंत वीज आणि एलपीजी पोहोचवणार.

> 2024 पर्यंत प्रत्येक घराला नळ मिळेल. जल संधारण मंत्रायल याची खात्री करून घेणार

> 2022 पर्यंत सर्वांना घरे मिळतील, 2019-20 ते 2022 पर्यंत 1.95 कोटी घरांची निर्मिती करण्यात येणार.

> मीडिया, एव्हीएशन, वीमा विभागात एफडीआयची गुंतवणूकीच्या प्रस्तावावर विचार, सिंगल ब्रँड रिटेलमध्ये स्थानिक सोर्सिंग नियम सुलभ केले जातील

> झीरो बजेट शेतीवर भर दिला जाणार, शेतीच्या मूलभूत पद्धतींवर परत येण्याचा हेतू आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची दुप्पट वाढ होईल.

> लघु आणि मध्यम उद्योगांसाठी अनुदान

> फ्रेश किंवा इन्क्रिमेंटल कर्जावर सर्व जीएसटी रजिस्टर्ड एमएसएमईला 2% अनुदानासाठी 350 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली.

अर्थव्यवस्थेत 5 वर्षांत 1 ट्रिलियन डॉलरची भर
सध्या आपली अर्थव्यवस्था 3 ट्रिलियन डॉलर आहे. आम्ही गेल्या पाच वर्षांत अर्थव्यवस्थेत एक ट्रिलियन डॉलरची भर घातली आहे. चीन आणि अमेरिकानंतर जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असल्याचे सीतारमण यांनी सांगितले.

गरिब वर्ग-
>2022 पर्यंत घरकुल योजना मिळणार. 1.95 कोटी घरांचे निर्माण केले जाईल, यात टॉयलेट, वीज आणि गॅस सिलेंडरची सुविधा असेल.
> जल शक्ती मंत्रालय 2024 पर्यंत प्रत्येक घरात पाणी पोहचवण्याचा प्रयत्न करणार. 97% नागरिकांना प्रत्येक ऋतुमध्ये रस्ता मिळेल.
> पुढील पाच वर्षात पंतप्रधान ग्रामीण रस्ता योजनेअंतर्गत 1.25 लाख किमी रस्ता तयार केला जाईल. यावर 80250 कोटी रूपये खर्च केले जातील.
> गावांना मोठ्या बाजाराला जोडणाऱ्या रस्त्यांना अपग्रेड केले जाईल. स्वच्छता अभियाना अंतर्गत प्रत्येक गाव स्वच्छ ठेवले जातील.

शेतकरी-
> येत्या 5 वर्षात 10 हजार नवीन शेतकरी संघटना उभारल्या जातील.
> झीरो बजेट शेतीवर जोर दिला जाईल. पारंपारिक शेतीवर भेर देण्यासाठी हे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, याकडे लक्ष दिले जाईल.
> खाद्यान्न, फळ आणि भाज्यांवर विशेष जोर दिला जाईल.

व्यापार उद्योग-
>हवाई क्षेत्र, मीडिया, अॅनिमेशन, वीमा क्षेत्रामध्ये एफडीआय वाढवण्याचे पर्याय शोधले जातील.
>मध्यवर्ती वीमा संस्थांमध्ये 100% एफडीआयची परवानगी.
> रिटेल सेक्टरला चालना दिली जाईल, सिंगल ब्रँड रिटेलमध्ये गुंतवणूक सोपी केली जाईल.
> स्टँड अप इंडिया स्कीम अंतर्गत महिलांना, एससी-एसटी उद्योजकांना लाभ.
> एमएसएमईसाठी 350 कोटी रूपये वाटप, यासाटी ऑनलाईन पोर्टलदेखील सुरू केले जाईल.
> प्रधानमंत्री कर्मयोगी मानधन योजनेतून 1.5 कोटी रूपयांपेक्षा कमी असलेल्या व्यापाऱ्यांना पेंशन लाभ.
> सगळ्या दुकानदारांना 59 मिनीटात कर्ज, 3 कोटी लहान दुकानदारांना फायदा.
> शेअर बाजारात लिस्टेड कंपन्यांमध्ये कमीत-कमी सरकारी शेअरधारक 25% वरून वाढून 35% करण्याचा प्रस्ताव.
> पीपीपीमधून जमवलेल्या पैशातून रेल्वेचा विकास आणि पॅसेंजर फ्रेट सर्विस सुरू होईल.
> भारतातील सृजनात्मक उद्योगांना अर्थव्यवस्थेत जोडले जाईल.

>400 कोटी रूपये टर्नओव्हर असलेल्या कंपन्यादेखील 25% कॉर्पोरेट टॅक्सच्या अंतर्गत येतील. यामुळे 99.3% कंपन्या 25% कॉर्पोरेट टॅक्स च्या अंतर्गत येतील.
> स्टार्ट अप आणि त्यांच्याद्वारे जमा केलेल्या निधीसंबंधी आयकर विभागाकडून कोणत्याच प्रकारची चौकशी होणार नाही.

महिला आणि तरुण
>”नारी तू नारायणी” योजना लॉन्च होईल. एक कमेटी बनवली जाईल, जी देशाचा विकास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी वाढवण्यावर लक्ष देईल.
> जनधन बँक खाते असणाऱ्या महिलांना 5000 रुपयांच्या ओव्हर ड्राफ्टची सुविधा.
> सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये काम करणाऱ्या कोणा एका महिलेला मुद्रा स्कीम अंदर्गत 1 लाखांचे कर्ज मिळेल.
> शिक्षा व्यवस्थेला बदलन्यासाठी राष्ट्रीय शिक्षा निती बनवली जाईल. 400 कोटींची संस्था बनवली जाईल.
> नॅशनल रिसर्च फाउंडेशनचा प्रस्ताव. याच्या अंतर्गत विभांगाचे वाद सोडवले जातील. राष्ट्रीय हिताच्या रिसर्ससाठी प्राथमिकता.

49 वर्षांनंतर महिला अर्थमंत्र्यांनी सादर केले बजेट
फेब्रुवारीमध्ये सादर केले अंतरिम बजेटबाबत मोदी म्हणाले होते की, हे फक्त ट्रेलर आहे. यामुळे पूर्ण बजेटपासून जनतेला अपेक्षा आहेत. विविध रिपोर्ट्सनुसार आयकरमध्ये दिलासा देण्यासह सामान्य नागरिकांशी निगडीत अनेक महत्वाच्या घोषणा होऊ शकतात. 49 वर्षांनी एखाद्या महिला अर्थमंत्रीने बजेट सादर केले आहे. निर्मला यांच्यापूर्वी 1970 मध्ये इंदिरा गांधी यांनी बजेट सादर केले होते. पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सीतारमण या पहिल्या महिला आहेत.

नव्या भारताच्या निर्मितीला बळ देणारा अर्थसंकल्प – भाजपा प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील

0
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समृद्ध नवा भारत घडविण्यासाठी बळ देणारा केंद्रीय अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू सामान्य माणूस आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केली. त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले.
 
यावेळी दानवे पाटील म्हणाले की,  भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सची बनवून प्रमुख जागतिक आर्थिक शक्ती बनविण्यासाठी अनेक धोरणात्मक उपाय या अर्थसंकल्पात आहेत. देश समृद्धीकडे वाटचाल करत असताना त्यामध्ये गाव, गरीब, महिला, युवा, शेतकरी, मध्यमवर्गीय, छोटे व्यापारी, लघु उद्योजक या सर्वांना महत्त्वाचे स्थान असेल, याचीही काळजी घेण्यात आली आहे. या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू सामान्य माणूस आहे. आगामी पाच वर्षांत कोणीही नागरिक घर, पिण्याचे पाणी, वीज, गॅस कनेक्शन, शौचालय अशा सुविधांपासून वंचित राहणार नाही यासाठी अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागासाठी चांगले रस्ते, वीज पुरवठा, शेतमालासाठी बाजारपेठेची उपलब्धता व्हावी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी अर्थसंकल्पात तरतूद आहे. महिला बचत गटांना सवलतीच्या दरात कर्ज आणि सदस्यांना ओव्हरड्राफ्टची सुविधा अशी विशेष तरतूद आहे. युवकांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि उद्योगधंद्यांचा विकास होऊन रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी मेक इन इंडियाला चालना देण्यात आली आहे. व्यापाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन या अर्थसंकल्पात पूर्ण करण्यात आले आहे.

नवभारतासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरजः डॉ.मिश्रा

पुणे:“ देशाच्या प्रगतीचे सर्वात मोठे माध्यम शिक्षण आहे. नव भारताचे स्वप्न पाहावयाचे असेल तर आम्हाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे बीज पेरावे लागतील. त्यासाठी नव्या पिढीसमोर आम्हाला फक्त चित्रातील रोल मॉडलची गरज नाही तर संघर्षातून शिक्षण घेऊन नवनिर्माण करणार्‍यांची गरज आहे.” असे विचार कराड येथील कृष्णा मेडिकल अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी मांडले.
ग्लोबल हेल्थ केअर आणि एज्युकेशन फाउडेशन, किवळे आणि महा फेडरेशन ऑफ मायनॉरिटीज एज्युकेशन इन्स्टिट्युशन फॉर डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड वेल्फेअर, पुणे यांच्यातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण यांच्या वयाच्या सत्तरीपूर्ती निमित्त अल्पबचत भवन सभागृह येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्याला राज्यभरातील शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी.ए. इनामदार हे होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड आणि सिंबायोसिस इंटरनॅशनल विद्यापीठाचे कुलपती प्रा.डॉ. एस.बी.मुजुमदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, एन.सी.जोशी, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ, स्पायसर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय अडसूळ, मौलाना मुफ्ती शाकीर खान आणि लतीफ मगदूम हे शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले,“ सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणण्याची क्षमता फक्त शिक्षणातच आहेे. शिक्षण हे जीवनाला उंच स्तरापर्यंत नेते. त्यामुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण होते. या देशात एकता व समरसता केवळ शिक्षणामुळेच येऊ शकते. शिक्षण हे सर्वापर्यंत पोहोचविण्याचे काम डॉ. एस.एन. पठाण यांनी केले. ते समाजाला प्रेरणा देणारे दीपस्तंभ आहेत. समता, समवेदना आणि समानुभूती या महान व्यक्तीनी दाखवलेल्या मार्गावर चालले पाहिजे.”
डॉ.पी.ए. इनामदार म्हणाले,“स्वातंत्र्योत्तर काळात जी प्रगती झाली ती पाच हजार वर्षात झालेली नव्हती. आपला भूतकाळ चांगला असल्याने वर्तमानात कष्ट करीत असल्याने भविष्यकाळ उत्तम आहे. कष्टातून पुढे आलेल्या व्यक्तीमुळे जग घडत असते, डिजीटल दरीमुळे होणार्‍या दुष्परिणामातून हे जग बाहेर काढण्याचे प्रयत्न आता जुन्या जाणत्यांनी केले पाहिजेत.”
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले “ जगात धर्माच्या नावावर हिंसाचार फोफावत असताना शुध्द माणुसकीची जपणूक करणारे डॉ. पठाण यांच्यासारख्या माणसांची गरज या देशाला  आहे. ते पवित्र कुराणाचा संदेश असून त्यांचे अंतःकरण शुध्द आहे. डॉ. पठाण यांनी सर्व समाजाला नमाज म्हणजे योग आहे याची प्रचिती करून दिली आहे. त्यांना कुराणाचा खरा अर्थ समजला त्यामुळे ते सामाजिक सद्भावनेचे कार्य करीत आहेत.”
डॉ. एस.बी. मुजुमदार म्हणाले “शिक्षण हा प्रगतीचा प्राणवायू आहे. हा देश तीन स्तरांमध्ये आहे. त्यात अती श्रीमंत, मध्यम आणि गरीब. परंतू देशाच्या सहा लाख खेड्यांमध्ये विखूलेल्या गरीबांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचली पाहिजे. जीवनात वर यावयाचे असेल तर त्यासाठी फक्त शिक्षण आणि शिक्षणच आहे. त्यामुळे या देशात संरक्षणानंतर सर्वात जास्त खर्च शिक्षणावर केला गेला पाहिजे.
डॉ.पठाण यांनी आपल्या कर्तृत्वातून ही किमया करून दाखविली की शिक्षण हे व्यक्ती, समाज आणि देशाचा विकास करते. यांचा सत्कार हा शिक्षण मार्गाचा सत्कार आहे. शिक्षणाची गुणवत्ता विकसित झाली तर देशाचा विकास होईल.”
डॉ. एस.पठाण म्हणाले,“ माझ्या कष्टाची फुले झालेली आहेत. नियत साफ असल्याने जीवनाच्या प्रवासात ईश्‍वराची सतत मदत मिळाली. भारतीय संस्कृतीने मला मोठे केले. त्या संस्कृतीचा विश्‍वात्मक संदेश पुढे नेण्याचे काम करीत राहीन.”
यावेळी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील यशस्वी प्रेरणादायक व्यक्तिमत्वांचा सत्कार ही येथे करण्यात आला. त्यात जिल्हाधिकारी अय्याझ तांबोळी, सहायक पोलिस आयुक्त समीर शेख, डॉ. तौसिफ मलिक, गीतांजली शेळके, डॉ. संजीव खुर्द, मारूती भांडकोळी, आकांक्षा चव्हाण यांचा समावेश होता.
डॉ. एस.एन.पठाण यांचा वाढदिवस असल्याचे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी समृध्द मातृभूमी या मासिकाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ.सर्फराज पठाण यांनी प्रास्ताविक केले. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. के.जी. पठाण यांनी आभार मानले.

मान्यवरांच्या नजरेत अर्थसंकल्प

विकासाच्या दिशेला घेऊन जाणारा अर्थसंकल्प
अर्थसंकल्पात कॉर्पोरेट जगत तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे बदल केले आहेत. नोकरदार वर्गासाठी दिलासा देणारे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. वस्तू आणि सेवा कर (पाच कोटीपर्यंत) परतावा भरण्याचा कालावधी एका महिन्यावरून तिमाही करण्यात आला आहे. तसेच जीएसटी भरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना स्वस्त दरात उद्योग कर्ज मिळणार आहे. इतर जीवनावश्यक सोयीसुविधांवर आणि पायाभूत सुविधांवरही भर देण्यात आला आहे. विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या कर्जाच्या व्याजात विशेष सवलती देण्यात येणार असल्याने इलेक्ट्रीक कार स्वस्त होणार आहेत. स्टार्टअप सुरु करणाऱ्यांना मोठी कर सवलत देण्याची घोषणा केली आहे. ४०० कोटीपर्यंत उलाढाल असणाऱ्या उद्योगांना २५ टक्के प्राप्तिकराची तरतूद आहे. त्यामुळे नव्या उद्योगांना चालना मिळेल. एकूणच निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प विकासाच्या दिशेला घेऊन जाणारा आहे.
– सीए आनंद जाखोटिया, विभागीय मंडळ सदस्य, आयसीएआय
——————————
‘दूर’दृष्टीने मांडलेला अर्थसंकल्प
लोकांना तात्कालिक लाभ देण्याएवजी त्यांच्या दीर्घकालीन हिताचा विचार मांडणारा हा अर्थसंकल्प आहे. जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती, अपारंपारिक उर्जास्त्रोताना प्रोत्साहन, इलेक्ट्रिकल वाहनांच्या वापराला प्राधान्य यातून सरकारची दुरदृष्टी दिसून येते. नविन उद्योगासाठीच्या विविध योजना रोजगाराला चालना देतील. कर विवरणपत्रांची संरचना बदलल्यामुळे करदात्यांना व कर संकलनात सुलभता येईल. सर्वसामान्यांना सवलती देताना पेट्रोल, डीझेल दरात वाढ व उच्च उत्पन्न धारकाना जास्त कर लावणे यातुन नेहरूंच्या समाजवादी दृष्टीची आठवण येते. भविष्यातील गरज ओळखून स्टार्टअप इंडियासारख्या योजनेवर भर दिला आहे. तसेच त्यांना करांमध्ये मोठी सवलत दिली आहे. त्यामुळे अनेक तरुण स्टार्टअप सुरु करण्यासाठी पुढे येतील.
– सीए ऋता चितळे, अध्यक्षा, आयसीएआय, पुणे.
———————————–
देशाच्या सर्वांगीण विकासासाठीचा अर्थसंकल्प 
सर्वप्रथम देशाच्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे हार्दिक अभिनंदन. मोदी २.० सरकारच्या या अर्थसंकल्पाचे स्वागत करतो. या अर्थसंकल्पात लघुउद्योग, शिक्षण, बांधकाम, वाहन उद्योग, पायाभूत सुविधा, बँकिंग इत्यादी क्षेत्रांमध्ये समतोल साधला आहे. लघुउद्योगांना व्याजदरात २% सवलत तसेच दीड कोटीपर्यंत उलाढाल असलेल्या लघुउद्योजकांना पेन्शन आणि ऑनलाईन कर्ज सुविधा निश्चितच उल्लेखनीय आहे. गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी साडेतीन लाखापर्यंत व्याजाद्वारे वाजवट निश्चितच बांधकाम उद्योगाला फायद्याची ठरेल. ट्रस्ट व सामाजिक संस्थांना सोशल स्टोक एक्सचेंजद्वारे अधिक वर्गणी उपलबध्द करून देईल. बँकेतून एक कोटीपेक्षा जास्त पैसे काढल्यास २% टीडीएस च्या तरतुदीमुळे कॅशलेस अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकारण्यास मदत होईल. स्टार्ट अप्सच्या  जाचक अटींमधील शिथिलता व भरघोस मदत यामुळे स्टार्टअप्सला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळेल. इलेक्ट्रॉनिक स्क्रुटिनीच्या साहाय्याने भ्रष्टाचाराला आळा बसेल.

– सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष, आयसीएआय, पुणे
——————————
‘रिटर्न गिफ़्ट’ देणारा अर्थसंकल्प
मोदी सरकार-२ चा हा पहिला अर्थ संकल्प रिटर्न गिफ्ट देणारा आहे. महिला, युवक, शेतकरी वर्ग आणि गरीब यांच्यासाठी हा अर्थसंकल्प अच्छे दिन घेऊन आला आहे. इलेक्ट्रिक गाड्यावरील जीएसटी कमी केला असून, पेट्रोल, डिझेल, सोने, चांदी महाग केले आहेत. छोट्या दुकानदारांना पेन्शन योजना लागू केली. देशात २०२२ पर्यंत १.९५ कोटी घर बांधण्याची योजना बांधकाम व्यवसायाला चालना देईल. गृहकर्जावरील व्याजावर मिळणारी सुट दोन लाखांवरून साडेतीन लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पण त्याचा फायदा मध्यमवर्गाला मिळेल का? याबाबत शंका आहे. सर्वसामान्य नागरिक, गरीब, शेतकरी, महिला आणि युवकवर्गाला केंद्र बिंदूवर ठेऊन सादर केलेल्या या अर्थसंकल्पाचे स्वागत केले पाहिजे. पुढील पाच वर्षांत तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.
in

आषाढी एकादशी निमित्त ‘तुका म्हणे’ आणि ‘वैकुंठ नायका ‘ रंगनृत्य आविष्कार

पुणे :आषाढी एकादशी निमित्त संत तुकारामांच्या अभंगावर आधारित ‘तुका म्हणे’ हा  रंगनृत्य आविष्कार ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट’ तर्फे  ७ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे . रविवार दि ७ जुलै सकाळी ९ ४५ वाजता
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड, पुणे) येथे हा कार्यक्रम होणार आहे .संकल्पना दिग्दर्शन अरुंधती पटवर्धन, कल्याणी काणे यांची आहे . याचबरोबर  संत ज्ञानेश्वर, चोखामेळा, नरहरी सोनार, नामदेव,तुकाराम या संतांच्या  अभंग रचनांचा नृत्याविष्कार  ‘संत सेवा संघ’ आणि नीलिमा नृत्यालय  तर्फे ‘वैकुंठ नायका ‘ या नावाने याच कार्यक्रमात सादर केला जाणार आहे. ‘वैकुंठ नायका ‘ला संगीत जीवन धर्माधिकारी यांचे आहे .

सर्व धर्मीय,सर्व जातीय विधवा,विधुर, घटस्फोटित, विकलांगाचा मोफत वधु वर परिचय मेळावा

राष्ट्रीय सामाजिक एकात्मता अभियान

पुणे- राष्ट्रीय ओबीसी महासंघ, डॉ प्रल्हाद वडगांवकर समाज सेवा ट्रस्ट, फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन व सप्तपदी वधु वर केंद्रातर्फे राष्ट्रीय सामाजिक एकात्मता अभियानातर्गत
सर्व धर्मीय,सर्वजातीय मधील विधवा,विधुर घटस्फोटित , विकलांगाचा मोफत वधु वर
परिचय मेळावा आयोजित केला आहे. समाजातील जातीचे निर्मुलन व्हावे ,सर्व जातीत एकता बंधुता, एकात्मता निर्माण व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय ओबीसी महासंघ व डॉ.वडगांवकर समाज सेवा ट्रस्ट च्या वतीने राष्ट्रीय सामाजिक एकात्मता अभियान सुरू केले .या अभियानातर्गत संविधान अंतरंग व्याख्याने, विविध जाती धर्मातील गुणवंतांचा व गुणवंत विध्यार्थी सत्कार,वधु वर परिचय मेळावे,आंतर धर्मीय, जातीय विवाह समारंभ ,सर्व धर्मीय सणात सहभाग,सत्यशोधक पद्धतीने विवाह लावणे ,अपंगांना मदत , सर्व धर्म जातींना सामाजिक न्याय , सामाजिक प्रश्नात सहकार्य आदी विविध प्रकारे उपक्रम राबविणेचे ठरवून त्याप्रमाणे वाटचाल चालु आहे.सदर वधु-वर मेळाव्याचा उपक्रम दि.7 जुलै 2019 रोजी दुपारी 3 ते 6 या वेळात उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, खजिना विहीर चौक,सदाशिव पेठ , पुणे येथे संपन्न होणार आहे.त्या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी ख्रिश्चन धर्म गुरू मा.रेव्हरंड पिल्लेसाहेब ,शीख धर्म गुरू मा.गयानजी चिनंदरपाल सिंगजी ,मुस्लीम धर्म गुरू मा.बशीर पठाण साहेब, बौद्ध धर्माचे भन्ते सुदर्शनजी , हिंदू धर्माचे वेदाचार्य डॉ.अजय भागवत गुरुजी तसेच सहधर्मदाय आयुक्त श्रीमती आर.पी. मुक्कावर (अडगुलवार) ,अधीक्षक अनाप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.कार्यक्रमाचे उदघाटन उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडें , उपधर्मदाय आयुक्त मा.नवनाथजी जगताप , यांचे हस्ते होणार आहे.
ज्या वधु वरांचे विवाह त्याच वेळी ठरतील त्यांचे त्याच ठिकाणी मेळावा झालेनंतर सत्यशोधक विवाह पद्धतीने मोफत आणि योग्य सन्मानाने विवाह लावून दिले जाणार असल्याचे आयोजक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे व डॉ.प्रल्हाद वडगांवकर समाज सेवा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.प्रल्हाद वडगांवकर,सरचिटणीस व फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन चे अध्यक्ष रघुनाथ ढोक ,विश्वस्त व सप्तपदी वधु वर केंद्राचे अध्यक्ष सुदाम धाडगे यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने तीव्र निदर्शन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने कलेक्टर आॅफीस समोर तीव्र निदर्शन करण्यात आली . “कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी झालीच पाहीजे “ ,
दोषींना त्वरित अटक झालीच पाहीजे “
पुणे;- न्याय द्या, न्याय द्या गोर गरीबांना न्याय द्या “ अशा धोषना देण्यात आल्या गेल्या काही दिवसांत शहरात भिंत कोसळून अनेकजण मृत्युमुखी पडले यामध्ये नियमांची पायमल्ली करण्यात आलेली आहे , गरीब मजुर , असंधटीत कामगार यांना त्यामुळे विनाकारण स्वत:च्या प्राणाची आहूती द्यावी लागली , यांत काहींचे तर नुकतेच उभे राहीलेले संसार होते , तर काही ठिकानी संपूर्ण कुटुंबच उध्वस्त झालेले पहावयास मिळाले दरवेळी दिखाव्यापुर्ती कार्यवाही करून मुळ प्रश्न मात्र कायमच अनुत्तरीत राहत असतो , या गोर गरीब जनतेला कोणीच वाली राहलेला नाही असे भाजप सरकारने समज़ुन नये याकरीता पुण्याच्या जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले व या दूर्दैवी धटनेत बळी पडलेल्या कामगारांना श्रद्धांजली वाहण्यात आली .
सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करून कामगार कायदा हा फक्त कागदावर च राहणार का त्याची कधी अंमलबजावणी पन होणारं ? असे जिल्हाधिका-यांना विचारण्यात आले
मुख्यमंत्र्यांकडेच गूह खाते असूनही फिर्याद दाखल होवूनही गुन्हेगार सापडत नाहीत हे त्यांचे अपयशच आहे , यापुढील काळात तरी असे प्रकार होवून निरपराध व्यक्तींचा बळी जावू नये , समोरची व्यक्ती जरी गरीब असली तरी तीही मानुसच आहे ही भावना वाढीस लागण्याकरीता कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची व दोशींवर कठोर कार्यवाही करणाच्या मागण्या यावेळेस करण्यात आल्या
याप्रसंगी कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती सदर प्रसंगी
शहराध्यक्ष चेतन तुपे, राष्द्रवादी रिपब्लिकन चे प्रमुख महेश शिंदे ,प्रदीप देशमुख ,रविंन्द्र माळवदकर ,प्रदीप गायकवाड ,साधना हरपळे , नितीन कदम, अरूण अल्हाट, कलेश्वर धुले , संतोष नांगरे, विजय ढाकले , गणेश नलावडे, फईम शेख, भोलासिंग अरोरा , विशाल नाटेकर , नितीन कळमकर इ प्रमुख उपस्थित होते

चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजिक न्यायमंत्र्यांचे अभिवादन

0

मुंबई, दि. 4 : चैत्यभूमी येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी अभिवादन केले.

यावेळी डॉ. खाडे यांनी चैत्यभूमी परिसराची पाहणी करुन प्रस्तावित अखंड भीमज्योतीच्या जागेचीही पाहणी केली. अखंड भीमज्योतीचे काम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार भाई गिरकर, कालिदास कोळंबकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, भदंत डॉ.राहुलबोधी महाथेरो आदी उपस्थित होते

नगरपरिषद, मनपाच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मंजूर – शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार

0

मुंबई : नगरपरिषद/ महानगरपालिकेमार्फत चालविल्या जाणाऱ्या माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्ष‍क व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मंजूर करण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

सुधारित वेतन संरचनेत निश्चिती करण्यासाठी आवश्यक तो विकल्प शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक महिन्याच्या आत देणे आवश्यक असून एकदा दिलेला विकल्प अंतिम राहणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विषय महानगरपालिकेच्या अखत्यारित येत असल्याने ही महानगरपालिका वगळून राज्यातील सर्व नगरपरिषद/ महानगरपालिकेमार्फत चालविल्या जाणाऱ्या माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्ष‍क व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मंजूर करण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितल

ड्रॅगन पॅलेस टेम्पल विकास आराखड्याला शिखर समितीची तत्वतः मान्यता

0

 

जागतिक पर्यटकांसाठी ठरणार आकर्षणाचे केंद्र

मुंबई, दि. 4 : नागपूर येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल विकास आराखड्याला शिखर समितीने तत्वतः मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ही मान्यता देण्यात आली.

बुद्धिस्ट सर्किट अंतर्गत पर्यटन विभागाने नागपूर जिल्ह्यातील दीक्षाभूमी-नागपूर, शांतीवन-चिंचोली आणि ड्रॅगन पॅलेस टेम्पल-कामठीचा समावेश केला आहे. ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा विकास करून जागतिक पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचे केंद्र ठरेल अशी विकास कामे करण्यात येणार आहेत. जगातील विविध भागात असलेल्या बुद्ध‍िस्ट टेम्पलच्या प्रतिकृती येथे तयार करण्यात येणार आहेत. यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात येणार आहे.

या बैठकीला ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे, राज्यमंत्री अविनाश महातेकर, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, आमदार डॉ. मिलींद माने, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अध्यक्ष शीतल उगले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.