Home Blog Page 2898

16वर्षानंतर न्यायालयाने दिला निर्णय काढलेल्या कामगारांना कामावर घ्या ….

कामावरून कमी केल्याचा लढा कामगारांनी १६ वर्षांनी जिंकला !

लुमॅक्स  ऑटो टेक्नॉलॉजीस  मधील २१ कामगारांना कामावर घेण्याचे कामगार न्यायालयाचे आदेश 
पुणे :
लुमॅक्स  ऑटो टेक्नॉलॉजीस  (पूर्वीची धनेश ऑटो इलेक्ट्रिकल लिमिटेड ) कंपनीतून बेकायदेशीरपणे नोकरीवरुन काढलेल्या २१ कामगारांना कामगार न्यायालयातील लढयात १६ वर्षांनी यश मिळाले आहे ! या कामगारांना  कामावर घेण्याचे कामगार न्यायालयाचे आदेश दिले आहेत . कामगारांच्या बाजूने लढा देणारे  वकील  अॅड. संतोष म्हस्के यांनी ही माहिती दिली.
लुमॅक्स  ऑटो टेक्नॉलॉजीस  (पूर्वीची धनेश ऑटो इलेक्ट्रिकल लिमिटेड ) या कंपनीतील २१  कामगारांना कोणतेही कारण न देता नियमबाह्य रित्या कमी करण्यात आले होते. त्यांनी म्हस्के यांच्या मार्फत कामगार न्यायालयात धाव घेतली. १६ वर्ष चिवटपणे खटला लढल्यावर २६ जून रोजी निकाल कामगारांच्या बाजूने लागला.या निकालाची प्रत आज ९ जुलै रोजी प्राप्त झाली.
याबाबत अधिक माहिती अशी :या कंपनी व्यवस्थापनाने महाराष्ट्र लेबर युनियन शी संगनमत करून २१ कामगारांना १५ सप्टेंबर २००३ पासून नोकरीवरून कमी केले होते . या कामगारांना उपासमारीचे जीवन जगावे लागत होते . न्यायालयीन लढ्यासाठी खर्च करण्याची ताकदही त्यांच्यात उरली नव्हती . सामाजिक कार्यकर्ते एड . संतोष म्हस्के यांनी विना मानधन या कामगारांचा न्यायालयीन लढा सलग १६ वर्षे लढला . दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्या . मधुरा मुळीक यांनी कंपनीचा कामगारांना कामावरून कमी करण्याचा निर्णय बेकायदेशीर आणि अनुचित कामगार प्रथांचा ठरविला . सर्व २१ कामगारांना कामावर घेण्याचे आदेश दिले .
या २१ कामगारांना कमी केल्याच्या दिवसापासून आजपर्यंतचे निम्मे वेतन ,अनुषंगिक आर्थिक फायदे देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत . कंपनी व्यवस्थापनास ५ हजार रुपये दंड ठोठावला आहे . या दंडाची ५ हजार रुपये रक्कम कमी केलेल्या प्रत्येक कामगारास देण्याचा आदेशही दिला आहे . या निर्णयामुळे २१ कामगारांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे .
कामगारांतर्फे एड . संतोष म्हस्के यांनी तर कंपनीतर्फे एड . मनीषा मोरे  यांनी काम पाहिले .

महापालिकेतील भ्रष्ट कारभारा विरोधात राष्ट्रवादी चे आंदोलन (व्हिडिओ)

पुणे-भाजपची सत्ता आल्यापासून महापालिकेत भ्रष्ट कारभार वाढल्याचा आरोप करत आज शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने महापालिका भवनातील पायऱ्यावर निदर्शने आंदोलन करण्यात आले.
शहर अध्यक्ष चेतन तुपे पाटील. विपक्ष नेते दिलीप बराटे ,विशाल तांबे ,प्रशांत जगताप ,सुनिता पवार ,सतीश मिसळ ,प्रदीप देशमुख ,मानली भिलारे आदी मान्यवर आजी माजी नगरसेवक ,पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते .
पहा यावेळी काय म्हणाले ,chetan तुपे पाटील …

ऑर्डर शाकाहारी ..डिलिव्हरी मांसाहारी ..झोमॅटो आणि हॉटेलला ५५ हजारांचा दंड

पुणे-पुण्यातील ग्राहक मंचाने एका हॉटेलला चक्क ५५ हजारांचा दंड ठोठावला आहे. झोमॅटो या फूड डिलेव्हरी अॅप्लिकेशनवरुन एका ग्राहकाने पनीर असलेल्या पदार्थाची ऑर्डर दिलेली असताना या हॉटेलने मांसाहारी पदार्थ (चिकन) या व्यक्तीच्या घरी पाठवल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे हॉटेलकडून ही चूक एकदा नाही दोन वेळा घडल्याने संतप्त झालेल्या ग्राहकाने ग्राहक मंचाकडे तक्रार केल्यानंतर ही शिक्षा सुनावण्यात आली.षण्मुख देशमुख असे तक्रारदार ग्राहकाचे नाव असून ते मुळचे नागपूरचे आहेत. पेशाने वकील असणाऱ्या षण्मुख यांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी ३१ मे रोजी प्रित पंजाबी स्वाद या हॉटेलमधून स्विगीवरुन पनीर मसाला या डिशची ऑर्डर दिली होती. मात्र स्विगीवरुन पदार्थ घरी आल्यानंतर तो खाल्ल्यावर षण्मुख यांना तो पदार्थ पनीर नसून चिकन असल्याचे समजले. दोन्ही पदार्थ दिसायला सारखेच असल्याने डिलेव्हरी बॉयने आणून दिलेला पदार्थ मांसाहारी पदार्थ असेल याचा अंदाज आला नाही आणि मी तो खाल्ल्याचे षण्मुख म्हणाले. संबंधित प्रकार षण्मुख यांनी हॉटेलला फोन करुन कळवल्यानंतर हॉटेलने घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगीरी व्यक्त केली. तसेच पनीर मसाला दिलेल्या पत्त्यावर पाठवत असल्याचे षण्मुख यांना सांगितले. हॉटेलने दिलेल्या आश्वासनानुसार काही वेळामध्ये षण्मुख यांना दुसरी ऑर्डर मोफत देण्यात आली. मात्र यावेळीही पनीर मसालाऐवजी बटर चिकन हा पदार्थ हॉटेलने पाठवला होता. त्यामुळे षण्मुख चांगलेच संतापले आणि त्यांनी याबद्दल ग्राहक मंचाकडे तक्रार केली. मांसाहारी पदार्थ पाठवल्याने आपल्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून यासाठी हॉटेल आणि स्विगी जबाबदार आहे. घडलेल्या प्रकारासाठी मला पाच लाखांची नुकसान भरपाई आणि जो मनस्ताप झाला त्याचा मोबदला म्हणून एक लाख रुपये देण्यात यावे असे षण्मुख यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले होते.

ग्राहक मंचाच्या सुनावणीदरम्यान झोमॅटोने या सर्व प्रकरणामध्ये आमची काहीच चूक नसून हॉटेलने संबंधित ग्राहकाचा चुकीचा पदार्थ पाठवल्याचे नमूद केले. तसेच देशमुख यांचे पैसेही झोमॅटोने परत केले असल्याने केवळ बदनामीच्या उद्देशाने आम्हाला या प्रकरणात अडकवले जात असल्याचे झोमॅटोने ग्राहक मंचाचसमोर आपली बाजू मांडताना सांगितले. दुसरीकडे हॉटेल व्यवस्थापनाने त्यांच्याकडूनच ही चूक झाल्याचे मान्य केले. मंचाने हॉटेल आणि झोमॅटोला देशमुख यांना ५० हजारांची नुकसान भरपाई आणि मानसिक त्रास झाला त्याबद्दल पाच हजारांची भरपाई अशी एकूण ५५ हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

३८७ बांधकामे धोकादायक -जीवितहानी होऊ नये म्हणून कारवाईची जबाबदारी पोलिसांची देखील ..

पुणे-शहर आणि परिसरात सुमारे ३८७ बांधकामे धोकादायी असल्याची महापालिका दप्तरी नोंद असून या आठवड्यात पालिकेने ३५ धोकादायी बांधकामे उतरवून घेतली आहेत .एकंदरीत एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकामे उतरवून घेणे महापालिकेसाठी जिकीरीचे ठरताना दिसत आहे .दुसरीकडे नागरी जीवितास हानी पोहोचेल अशा धाकादायी इमारतीवर कारवाई करण्याचे अधिकार पोलीसाना देखील आहेत पण दरवर्षी पालिका कारवाई करते आणि पोलीस निव्वळ तुम्ही कारवाई करा हवा तर बंदोबस्त आम्ही देतो अशी नाममात्र भूमिका घेत असल्याचे आजवर दिसून आले आहे .पालिकेच्या अधिकार्यांना मुख्य सभेत उत्तरे द्यावी लागतात पण पोलिसांना मात्र अशी उत्तरे द्यावी लागत नसल्याने कायद्याने त्यांच्यावर असलेल्या भटकी कुत्री ,धोकादायी बांधकामे अशा विविध जबाबदाऱ्या पासून ते अलगद अलिप्त राहत असल्याचेच आजवर दिसून  आले आहे. गुन्हा घडल्यानंतर कारवाई हे पोलिसांचे सूत्र नागरी हानीस कारणीभूत ठरताना वारंवार दिसत आले आहे. गुन्हा अगर दुर्घटना घडन्यापुर्वी योग्य उचित हालचाली पोलिसांनी केल्या तर बरीचशी हानी टाळता येवू शकते याकडे सातत्याने दुलाक्ष करण्यात येत आहे . निव्वळ जुनी बांधकामे, नव्याने हलगर्जीपणाने केलेली बांधकामे धोकादायी प्रकारात मोडतात असेच नाही तर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या इमारतीपैकी काही भाग आणि महापालिकेच्या ताब्यात असलेल्या इमारतींपैकी काही भाग देखील धोकादायी झाल्याच्या बातम्या आहेत .बहुतांशी धोकादायी बांधकामांची माहिती अगर  येनकेन प्रकारे अशा बांधकामांशी अप्रत्यक्ष का होईना राजकीय कार्यकर्ते नेते यांचा संबध असतो असे दिसून  येत असते त्यांची चाल ढकल देखील गंभीर असल्याची बाब बोलून दाखविली जाते .

दरम्यान सुरक्षाभिंत तसेच इमारत पडण्याच्या घटना घडू लागल्याने धास्तावलेल्या महापालिका प्रशासनाने पुणे पोलिसांना पत्र पाठवून शहराच्या मध्यवस्तीतील २९२ वाड्यांतील नागरिकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याची विनंती केली आहे. या नागरिकांना विनंती करून तसेचनोटिसा बजावूनही ते सुरक्षित ठिकाणी जात नसल्याने प्रशासनाने पोलिसांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

पालिकेच्या बांधकाम विभागाने तसे पत्र पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांना दिले असून, त्यात या वाड्यांतील नागरिकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलविणे गरजेचे असल्याने यामध्ये पोलिसांनी मदत करण्याची विनंती केली आहे. पालिकेने गेल्यावर्षी धोकादायक अवस्थेतील २९२ वाडे शोधले होते. यंदा त्यात नव्याने ३२ वाड्यांची भर पडली आहे. त्यातील सहा वाडे पाडण्यात आले असून, आणखी तीन वाडे पाडण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्या २९२ वाड्यांतील नागरिक आपली घरे सोडत नसल्याने त्यांना घराबाहेर काढणे गरजेचे बनले आहे. भाडेकरू, घरमालक या वादांत तसेच आपले घर जाण्याच्या भीतीने नागरिकांकडून घरे सोडण्यात येत नसल्याची प्रतिक्रिया उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.सध्या सुरू असलेल्या पावसामुळे इमारती, वाडे तसेच सुरक्षा भिंती पडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. पावसाच्या पहिल्याच आठवड्यात कोंढवा आणि सिंहगड कॉलेजच्या परिसरात घडलेल्या घटनेत २१ मजुरांचा मृत्यू झाला. त्यामुळे धास्तावलेल्या प्रशासनाने धोकादायक इमारती खाली करण्यास सुरुवात केली आहे. शहराच्या मध्यवस्तीत प्रामुख्याने गावठाणात २९२ वाडे धोकादायक अवस्थेत आहेत. या वाड्यांतील नागरिकांना घरे खाली करण्यासाठी वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या असल्या तरी त्यांच्याकडून घरे खाली करण्यात येत नाहीत. वाडे पडल्यास दुर्घटना घडून जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे या वाड्यांतील नागरिकांना घरे खाली करण्यासाठी पोलिसांची मदत मिळावी, यासाठी पालिका प्रशासनाने थेट पोलिस आयुक्तांनाच साकडे घातले आहे.वाड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये बहुतांश भाडेकरूंचा समावेश आहे. गरिबीमुळे बाहेर घर मिळवून राहणे परवडणारे नाही. वाड्यातील घर सोडले तर पुन्हा घर कधी मिळेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे या नागरिकांकडून घरे सोडण्यात अनिच्छा व्यक्त करण्यात येते. पालिका प्रशासनालाही त्यांची व्यथा समजत असली तरी, सुरक्षिततेच्या मुद्द्यावर त्यांना हलविणे गरजेचे बनले आहे. काही नागरिकांकडून या घरांच्या बदल्यात पालिकेची घरे मिळावीत, अशी विनंती करण्यात येत आहे. मात्र, रस्ता रुंदीकरणातील बाधितांसाठी असलेली घरे जुन्या वाड्यांत राहणाऱ्या नागरिकांना देण्याची तरतूद नसल्याने प्रशासनाला मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान पुलगेट परिसरातील दुमजली घराची भिंत आणि लगतचा जिना सोमवारी दुपारी पडल्यामुळे सहाजण घरात अडकले होते. या सर्वांची अग्निशमन दलाच्या जवानांनी दोर आणि शिडीच्या मदतीने सुटका केली. नारायण गंगाधर सोनवणे (वय ५५), साक्षी प्रदीप सोनवणे (वय १७), यश प्रदीप सोनवणे (वय-आठ), लीलाबाई गंगाधार सोनवणे (वय ८०), वैशाली प्रदीप सोनवणे (वय ३६) आणि अंजली अतुल सोनवणे (वय २०) अशी सुखरूप सुटका करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

बैलेट पेपरवर मतदान घ्या, ईव्हीएम चा हट्ट का ? राज ठाकरे निवडणूक आयोगाकडे

0

नवी दिल्ली -सोनिया गांधींच्या भेटीला जाण्याआधी राज ठाकरेंनी सकाळी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. ईव्हीएमध्ये मोठा घोळ झाला आहे, जे जिंकले आहेत त्यांना जिंकून कसे आलो याबाबत शंका आहे. मतदाराना त्यांनी कुणाला मतदान केलं ते समजलं पाहिजे. मी त्याच संदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. निवडणूक आयोगाकडून मला शून्य अपेक्षा आहे. कारण त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव होते त्यावरूनच हे लक्षात येत होतं की त्यांना आमच्या बोलण्यात काहीही स्वारस्य नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

मी बॅलेट पेपरची मागणी केली आहे. मी औपचारिकता म्हणूनच भेट घेतली आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मॅच फिक्स असेल तर तयारी करण्याला काय अर्थ आहे असंही राज ठाकरेंनी विचारलं आहे. तसंच ईव्हीएमची चीप अमेरिकेहून येत असेल तर हॅकिंगची शक्यता आहेच असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

‘देवदूत’ हे राष्ट्रवादी चं ‘पाप ‘-तातडीने काम थांबवा -भिमालेंचे आदेश (व्हिडिओ)

पुणे- ‘सकाळ ‘ ने चव्हाट्यावर आणलेल्या ‘देवदूत ‘ नावाचा बकासुर घोटाळा हे राष्ट्रवादीचेच पाप असल्याचा दावा महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी केला आहे . ते म्हणाले सकाळ मुले हा घोटाळा आम्हाला समजला . आणि तो राष्ट्रवादीची सत्ता असताना महापालिकेत घडला ,तेव्हा स्थायी समितीचे अध्यक्ष आणि महापौर हे दोघे राष्ट्रवादीचेच होते .आता हा प्रकार समजल्यावर आम्ही तातडीने याबाबतचे पेमेंट थांबवा आणि काम हि थांबवा व चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे .

राज ठाकरेंनी दिल्लीत जावून घेतली सोनिया गांधींची भेट

दिल्ली- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीची अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज आणि सोनिया यांच्या भेटीमुळे अनेक चर्चांणा उधाण आले आहे. ईव्हीएमच्या मुद्यावर निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी राज ठाकरे दिल्लीत आले होते, सकाळी त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी थेट सोनिया गांधींची भेट घेतली. 14 वर्षानंतर राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. सोनिया गांधींची भेट हा निव्वळ योगा-योग आहे का, निवडणूक आयुक्तांची भेट सांगून सोनिया यांना भेटण्याचा हेतू होता, अशी अनेक प्रश्ने यावेळी उपस्थित होत आहेत.
काँग्रेस सध्या पक्षासाठी नवा अध्यक्ष शोधत असून, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधींसोबतच भेट घेतल्यामुळे याकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाहिले जात आहे. कारण, लोकसभेला राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसच्या राज्यातील काही नेत्यांचा विरोध होता, पण नंतर काँग्रेसच्या नेत्यांनीच मनसेला सोबत घ्यायला हवे होते, असे मत व्यक्त केले होते. विधानसभेसाठी राज्यात नवे समीकरण जुळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. ही सदिच्छा भेट होती की यामध्ये काही राजकीय चर्चा झाली याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाहीये.

धर्माच्या नावावर मते मागितल्यामुळे इम्तियाज जलील यांचे सदस्यत्व रद्द करा -हायकोर्टात याचिका

औरंगाबाद- एमआयएम पक्षाचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील अडचणीत येण्याची शक्यता आहे. जलील यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे. धर्माच्या नावावर मते मागितल्यामुळे इम्तियाज जलील यांचे सदस्यत्व रद्द करण्याची आणि त्यांना निवडणुकीतून अपात्र ठरवण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

धर्माच्या नावावर मते मागणे, प्रतिज्ञापत्रात दाखल गुन्ह्याची कलमे लपवणे आणि खर्चाचा हिशोब न मांडणे या कारणावरून याचिका दाखल झाली. शेख नदीम शेख करीम या लोकसभेतील पराभूत उमेदवाराने याचिका दाखल केली आहे. धर्माच्या नावावर मते मगितल्याच्या सीडी आणि इतर पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. या पुराव्यांमुळे इम्तियाज जलील यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

जलील यांनी औरंगाबादमध्ये शिवसेनेचे उमेदवार चार वेळेसचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. चार वेळेस निवडणूक जिंकलेल्या खैरेंना पराभव जिव्हारी लागला होता, त्यातच आता अपक्ष उमेदवाराने जलील यांच्यावर विविध आरोप करत याचिका दाखल केली आहे. प्रतिज्ञापत्रात स्वतःवर असलेले गुन्हे सार्वजनिक करणे उमेदवाराला अनिवार्य आहे, तसेच याबाबत सुप्रीम कोर्टाचेही आदेश आहेत. इम्तियाज जलील यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास सदस्यत्व रद्द होऊ शकते.

शासनाच्या वैद्यकीय सहायता योजना सर्वसामान्यांपर्यत पोहचविणे गरजेचे-पालकमंत्री

बारामती दि.८-  शासनाच्या वैद्यकीय सहायता योजनांचा लाभ  सर्वसामान्य नागरीकांपर्यत पोहचविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील ‍ प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांनी केले.

बारामती  हॉस्पिटलला आज पालकमंत्री पाटील यांनी भेट दिली. रुग्णालयाच्या  विविध कक्षांची त्यांनी पाहणी केली. यावेळी  उपविभागीय  अधिकारी हेमंत निकम, तहसिलदार  विजय पाटील, बारामती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. दिलीप लोंढे, उपाध्यक्ष डॉ. जे.जे.शहा, संचालक डॉ.संजय पुरंदरे, संचालक डॉ.गोकुळ काळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, हॉस्पिटलमध्ये दाखल होणा-या रुग्णांना वेळीच आवश्यक ते उपचार ‍ मिळाले पाहिजेत. उपचारासोबतच सर्वसामान्य रुग्णांना त्यांच्यासाठी  असणाऱ्या शासनाच्या  महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधी आदी योजंनाबाबत रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून रुग्णांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. सर्वसामान्य रुग्णांपर्यंत मदत पोहचण्याकरीता प्रयत्न करावेत. या मदतीमुळे सर्वसामान्य कुटुंबावरील उपचाराचा आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल.

यावेळी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून रुग्णांना दिल्या जाणा-या वैद्यकीय सुविधांचा आढावा पालकमंत्री पाटील यांनी घेतला. तसेच शासनाच्या विविध वैद्यकीय योजना व सुविधाचा लाभ सर्वसामान्य रुग्णांना देण्याकरीता  विशेष प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री चंद्रकांत(दादा)पाटील यांनी घेतला प्रशासकीय कामांचा आढावा

बारामती दि.८-  महसूल,सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज बारामती दौ-यामध्ये प्रशासकीय कामांचा आढावा घेतला. पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस ‍ ‍ उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसिलदार विजय पाटील तसेच शासकीय यंत्रणांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी दृकश्राव्यमाध्यमाद्वारे बारामती तालुक्यातील केंद्र व राज्य शासनाच्या योजना तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना,खरीप अनुदान वाटप सन २०१८-१९, DSP MIS अहवाल, ई-पिक पाहणी, बारामती तालुक्यातील शेतकरी आत्महत्या बाबतची ‍ माहिती,मागील ५ वर्षातील मंडलनिहाय सरासरी पर्जन्यमान, सध्या सुरु असलेल्या चारा छावण्या, पाणी  टँकर खेपांची माहिती, जानाई-शिरसाई योजनेंतर्गत होणा-या पाणीपुरवठा,महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना,जलयुक्त शिवार, पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना आदी योजनांबाबत तालुक्यातील सद्यस्थितीची ‍ माहिती दिली.

यावेळी पालकमंत्री यांनी  महत्वाच्या शासकीय यंत्रणांच्या अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांच्या मुख्यालयी थांबून  नागरिकांच्या अडी अडचणींचा तात्काळ निपटारा करावा, तसेच विभागप्रमुखांनी  कर्मचा-यांची कार्यक्षमता वाढविण्याकरीता त्यांना आवश्यक ते ‍ प्रशिक्षण द्यावे, नागरीकांच्या गरजांप्रमाणे त्यांची कामे वेळेवर करावीत, तसेच ज्या विभागांना निधीची आवश्यकता आहे त्यांनी अंदाजपत्रकासह अहवाल तात्काळ मंजुरीकरीता पाठवावेत अशा सूचना केल्या. त्याचप्रमाणे  सार्वजनिक बांधकाम, महावितरण,पोलीस,भूमी अभिलेख,वैद्यकीय विभाग, नोंदणी विभाग आदी विभागांच्या कामकाजाविषयी माहिती घेवून त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.

महापालिका करणार दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आमदार जगदीश मुळीक यांची माहिती

पुणे-इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला यशस्वीपणे सामोरे जाता यावे यासाठी अभ्यासाचे तंत्र व मंत्र, परीक्षा पद्धती, ताण-तणाव व्यवस्थापन, करिअरची निवड आदी विषयांचे मार्गदर्शन करण्यासाठी येत्या नोव्हेंबर महिन्यापासून महापालिकेच्या वतीने प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयानुसार व्या‘यानमालांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार जगदीश मुळीक यांनी दिली.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने येरवडा, चंदननगर, खराडी, वडगावशेरी परिसरातील इयत्ता दहावी आणि बारावीतील एक हजारहून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आमदार मुळीक मार्गदर्शन करीत होते.

आमदार मुळीक पुढे म्हणाले, ‘इयत्ता दहावी म्हणजे शालेय जीवनातील शेवटचे वर्ष आणि दहावीची परीक्षा जीवनातील महत्त्वाची म्हणून ओळखली जाते. कुटुंबातील सदस्य आणि समाजाचे दहावीच्या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष असते. या परीक्षेला यशस्वीपणे सामोरे जाता यावे यासाठी या व्या‘यानमाला होणार आहेत. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा.’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह महेश करपे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक, नगरसेवक बाबुराव कर्णे गुरुजी, संदीप जर्‍हाड, सुनीता गलांडे, शीतल शिंदे, राहुल भंडारे, मुक्ता जगताप, श्‍वेता गलांडे, नाना सांगडे, मतदार संघाचे अध्यक्ष संतोष राजगुरू, प्रभाग समितीचे सदस्य आशा जगताप, सुधीर गलांडे, विशाल साळी, संदीप नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘देवदूत’ या बकासुर घोटाळ्यात महापौरांचा सहभाग- दिलीप बराटे (व्हिडिओ)

पुणे- ‘सकाळ ‘ ने चव्हाट्यावर आणलेल्या ‘देवदूत ‘ नावाच्या बकासुर घोटाळ्यात .. महापौरांचा सहभाग असल्याचा दाट संशय येतो म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी केली आहे. आज बराटे यांनी ..महापालिका भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करताना माध्यमांच्या पुढे बोलताना केली आणि नंतर हि त्यांनी याबाबत आपली हि भूमिका एका व्हिडिओ द्वारे मध्यम प्रतिनिधींपर्यंत पोहोचवली .
गेली काही दिवसांपासून पुण्यातील सकाळ या वृत्तपत्राने ,’देवदूत च्या नावे महापालिकेकडून 81 लाखांच्या वाहनांची 11 कोटींना खरेदी’झाल्याचे वृत्त आणि त्याचा पाठपुरावा करण्याचे काम सुरु ठेवले आहे . देवदूत नावाने आपत्ती व्यवस्थापन कक्षाने खरेदी केलेली हि यंत्रणा अगर सुरु केलेली हि यंत्रणा प्रत्यक्षात २०१६ साली मंजूर करण्यात आली असेही म्हटले आहे .आणि नंतर या यंत्रणेत आणखी वाहने घ्यावीत असे आयुक्तांना दिलेले महापौरांचे पत्र हि सकाळ प्रसिद्ध केलेले आहे . या प्राश्वभूमिवर राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर आणि विद्यमान विपक्ष नेते बराटे यांनी आज महापौरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे .पहा बराटे यांनी काय म्हटले आहे …
तत्पूर्वी नेमके काय म्हटले आहे सकाळ च्या बातमीत ते पुढे पहा …

महापालिकेच्या “देवदूत’ योजनेतील एका वाहनाची किंमत (शोरूम प्राइज) आजघडीला साडेतेरा लाख रुपये आहे. परंतु, हेच वाहन महापालिकेने दोन वर्षांपूर्वी तब्बल 1 कोटी 84 लाखांत खरेदी केल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. महापालिकेने एका वाहनासाठी मोजलेली किंमत ही कंपनीच्या दरपत्रकाच्या (कोटेशन) प्रमाणात तेरापट अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारची 81 लाखांची वाहने 11 कोटी 41 लाखांत घेण्यात आली आहेत. या किमतीत वाहने खरेदीचा प्रस्ताव मांडून तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी तो मंजूर करून घेतला.

महापालिकेने खरेदी केलेल्या वाहनाची कंपनी, वाहनाची क्षमता, त्यातील सेवा-सुविधा याची माहिती घेऊन वरिष्ठ “आरटीओ’ अधिकाऱ्यांनी
संबंधित कंपनीकडे शहानिशा केली, तेव्हा महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी वाहनांच्या किमती फुगवून दाखविल्याचे दिसून आले आहे.
आपत्ती निवारणाच्या “देवदूत’साठी महापालिकेने 1 कोटी 83 लाख 97 हजार रुपयांचे एक अशी सहा वाहने 11 कोटी 41 लाखांत खरेदी केली आहेत.

ती चालविण्यासाठी महापालिकेने ठेकेदाराला 42 कोटी मोजले. ही योजना महागडी असल्याच्या खर्चाच्या तपशिलावरून उघड होताच त्यातील गैरव्यवहार “सकाळ’ने उघडकीस आणला. त्यापलीकडे जाऊन योजनेचा प्रस्ताव, स्थायी समितीचा ठराव आणि त्यातील वाहनाच्या किमतीची कागदपत्रे तपासली असता, मूळ वाहनच तेरापट जादा दराने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आपत्ती नियंत्रणासाठीची रचना असल्याने ही वाहने खरेदी केल्याचा दावा महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांचा आहे. मात्र, वाहनाची रचना आणि यंत्रसाम्रगी आम्हीच बसविल्याचा दावा ठेकेदाराचे अधिकारी करीत आहेत. त्यामुळेच महापालिका एका वाहनासाठी महिन्याला दहा लाख रुपये देते, असे सांगून ठेकेदारानेही महापालिकेचा खोटेपणा उघड केला आहे.

‘वाहनाचे मॉडेल आणि त्याच्या स्पेसिफिकेशननुसार साडेतेरा लाख रुपये किंमत आहे. या कंपनीच्या अशा वाहनांची किंमत 22 लाखांपेक्षा अधिक नाही.”
– प्रादेशिक परिवहन विभाग

वाहन खरेदीचा प्रस्ताव मंजूर 27 डिसेंबर 2016
एकूण वाहने खरेदी सहा
एका वाहनाची क्षमता 17 सीटर
शोरूम प्राइज 13 लाख 50 हजार
महापालिकेने दाखविलेली किंमत 1 कोटी 84 लाख

कात्रजच्या उड्डाणपूलाखाली व्यापाऱ्याला अडवून ५ लाख पळविले …गुन्हेगार मोकाट ? सामान्यांवर पोलिसी दहशत ?

पुणे : खेड-शिवापूर येथील व्यापाऱ्यांचे सुमारे पाच लाख रुपये तिघा जणांनी अडवून लुटल्याचा प्रकार रविवारी घडला.एकीकडे सामान्यांना पोलिसी जाच रस्तोरस्ती होताना दिसत असताना दुसरीकडे असे गुन्हेगार मात्र अशा परिस्थितीतून कसे सुटतात ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आहे.

व्यापारी हे पैसे कोथरूड व कोंढवा येथे देण्यासाठी निघाला होता. कात्रज येथील उड्डाणपूलाखालील सेवा रस्त्यावर तिघांनी अडवून त्याच्या जवळ असलेले पाच लाख रुपये लांबविल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजता घडली. भारती विद्यापीठ पोलिस पुढील तपास करीत आहे.

खेड शिवापूर येथे कल्याणसिंह राजपुरोहीत याचे मिठाईचे दुकान आहे. कल्याणसिंह कामानिमित्ताने पुण्याला निघाला होता. त्याच्या शेजारी असलेल्या किरणा माल दुकानदार रमेश चौधरी यांनी कल्याणसिंहला दोन व्यापाऱ्यांना देण्यासाठी रक्कम दिली. कल्याणसिंह याने नवले ब्रीज येथे कोथरूडच्या व्यापाऱ्याचे अडीच लाख रुपये दिले. त्यानंतर कोंढव्याचे व्यापारी प्रकाश पाटील यांना पाच लाख रुपये देण्यासाठी जात असताना कात्रज चौकातील उड्डाणपूलाखालील सेवा रस्त्यावर त्यांना लुबाडण्यात आले. समोरुन दोन दुचाकीवरून आलेल्या तिघांनी कल्याणसिंह याला अडवून दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्याचवेळी अचानक डोळ्यात चटणी टाकून त्यांच्या जवळ असलेले पाच लाख रुपये घेऊन पसार झाले.

कल्याणसिंह यांनी तत्काळ नियंत्रण कक्षाला माहिती दिली. भारती विद्यापीठ पोलिस या घटनेचा सखोल तपास करीत आहेत. सहाय्यक पोलिस आयुक्त व पोलीस उपआयुक्त यांनी भारती पोलिस स्टेशनमधील घटनेची माहिती घेतली. पोलिस निरीक्षक विष्णू पवार व गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे तपास करीत आहेत

लखनऊ ते दिल्ली;भरधाव बस यमुना एक्सप्रेसवेच्या पुलावरून नाल्यात पडली; 29 जणांचा मृत्यू, 20 जखमी

0

लखनऊ – उत्तरप्रदेशातील यमुना एक्सप्रेसवेवर सोमवारी सकाळी साडे चार  वाजता बस नाल्यात पडली. या दुर्घटनेत 29 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात पहाटे साडे चार वाजता आग्रापासून 9 किमी लांब एत्मादपूरजवळ घडला. मृतांमध्ये 27 पुरुष आणि दोन मुलींचा समावेश आहे.

उत्तरप्रदेश रोडवेजची ‘जनरथ सेवा’ बस लखनऊहून दिल्लीकडे जात होती. बसमध्ये 50 पेक्षा अधिक प्रवासी होते. बस भरधाव वेगात होती आणि चालकाला डुलकी लागल्यामुळे अपघात झाल्याची शंका आग्रा एनजी रवी कुमार यांनी व्यक्त केली आहे. क्रेनच्या मदतीने बसला नाल्यातून बाहेर काढले.

5 लाख रुपये मदतीची घोषणा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि परिवहन मंत्री स्वतंत्र देव सिंह यांना घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, या दुर्घटनेतील पीडितांना शक्य तितकी मदत करण्यात येत आहे

नाशिक जिल्ह्यात मुसळधार; गाेदावरीला पूर, रामकुंडातील अनेक मंदिरे बुडाली पुराच्या पाण्यात

0

नाशिक – उशिरा का हाेईना वरुणराजाने नाशिक शहर व जिल्ह्यावर कृपादृष्टी दाखवली. शनिवारी रात्री परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे रविवारी सकाळपासूनच गाेदावरी नदीपात्राच्या पाणीपातळीत वाढ हाेऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. नदीपात्रातील दुताेंड्या मारुती मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत पाणी लागले हाेते. पावसाची संततधार तसेच धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे गाेदाघाटावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली हाेती. परिसरातील दुकादार, नागरिकांनी तातडीने आपले सामान सुरक्षित ठिकाणी हलवले. पूर पाहण्यासाठी माेठी गर्दी झाली हाेती. गाडगे महाराज पूल परिसरात पार्किंग करण्यात आलेली एक कार पुरात अडकली हाेती.

धार्मिक विधी रस्त्यावरच
नाशिक शहरातील रामकुंड परिसरात नदीपात्राला पूर आल्यामुळे अनेक नागरिकांना रस्त्यावरच धार्मिक विधी करावे करण्याची वेळ आली. तसेच रामकुंड, गाेदाघाट परिसरातील अनेक छाेटी मंदिरेदेखील पाण्याखाली गेली हाेती.

घाटात दरड कोसळली
इगतपुरी – नाशिक- मुंबई मार्गावरील नवीन कसारा घाटात गेल्या आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू आहे. परिणामी रविवारी सकाळी घाटातील ब्रेकफेल पाॅइंटजवळ दरड कोसळली, त्यामुळे मुंबईला जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. टोल प्लाझावरील कर्मचारी व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरड हटवून वाहतूक सुरळीत केली. घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात धुके पसरल्यामुळे वाहनचालकांना दिवसाही दिवे लावून गाड्या चालवाव्या लागत हाेत्या.

भावली धरण ३५ तर दारणा २६ टक्के भरले
इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे भावली धरण ३५ टक्के तर दारणा धरण २६ टक्के भरले आहे.

दारणा नदीच्या उगमस्थानी असलेल्या भावली धरणाची क्षमता दीड टीएमसी आहे. रविवारी सकाळपर्यंत या भागात २४ तासांत २११ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत एकूण १०४४ मिमी पाऊस झाला आहे. दारणा धरण परिसरात २४ तासांत ६५ मिमी झाला. इगतपुरी शहरातही १७० मिमी पावसाची नाेंद झाली. घोटी (१०५ मिमी), नांदगाव बु. ६५ (मिमी), टाकेद (५९ मिमी), वाडीवऱ्हे (८४ मिमी), धारगाव (१३० मिमी) इतकी नाेंद झाली. इगतपुरीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक गाडीचे इंजिन इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ रविवारी सकाळी ७.५० च्या सुमारास रुळावरून घसरले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी इंजिनापासून डबे मोकळे करून मालवाहतूक गाडी परत रेल्वे यार्डात नेली. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला नाही.

त्र्यंबकेश्वर- नाशिक वाहतूक काही काळासाठी बंद
त्र्यंबकेश्वर – त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी सायंकाळपासून ते रविवारी सकाळी साडेसातपर्यंत १३५ मिमी पाऊस पडला. त्यामुळे शहरातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले हाेते. पावसाचा वेग वाढल्याने नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्ता काही वेळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

दारणा, वालदेवी आणि नासर्डी नद्यांनाही पूर
इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह पेठ, सुरगाणा, नाशिक तालुका चिंब भिजून निघाला आहे. रविवारी सकाळी आठपासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नाशिक शहरात ६२ तर तालुक्यात ९४ मिमी पावसाची नाेंद झाली. पावसामुळे दारणा, वालदेवी आणि नासर्डी नदीला पूर आला होता.