मुंबई – भाजपने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची निवड केली आहे. रावसाहेब दानवे यांची नुकतेच झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात मंत्रिपदी निवड झाली होती. त्यामुळे, दानवे यांच्या जागी भाजपने चंद्रकांत पाटील यांना नियुक्त केले आहे. यासोबतच भाजपने आपल्या उत्तर प्रदेश कार्यकारिणीमध्ये देखील बदल केला. ओबीसी नेते स्वतंत्र देव सिंह यांना उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे. त्यांनी महेंद्र नाथ पांडे यांची जागा घेतली आहे. भाजपकडून मंगळवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
टेमघर धरणात यंदा १०० टक्के पाणीसाठा करणार ; गळती रोखण्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न
पुणे- पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या चार धरणांपैकी टेमघर धरणाच्या गळती रोखण्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे, असे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी सांगितले. उर्वरीत10 टक्के गळती रोखण्याचे काम पुढील वर्षभरात केले जाणार आहे. त्यामुळे टेमघर धरणाची गळती 100 टक्के रोखण्यासाठी वर्षभराचा कालवधी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे म्हणाले, पुणे शहरासाठी खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या चार धरणातून पाणीसाठा केला जातो. मात्र, टेमघर धरणातून 2016 ला मोठ्या प्रमाणावर गळती झाली होती. यानंतर राज्य सरकारने धरणातील पाणी गळतीची गंभीर दखल घेत धरणाचे बांधकाम करणार्या तीन कंपन्यासह 22 अभियंताच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली. सध्या हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. धरण मजबूत करण्याच्या दृष्टीने आणि गळती रोखण्यासाठी राज्य सरकार मार्फत 100 कोटींची विशेष तरतूद करण्यात आली. त्यानुसार 2016 ते आज अखेर 80 कोटी रुपयांच्या तरतुदीमधून 90 टक्के गळती रोखण्यात यश आले आहे. आता उर्वरित 10 टक्के गळती रोखण्याच्या कामास वर्षभराचा कालावधी लागणार आहे. ते पुढे म्हणाले, देशात प्रथमच ग्राऊंटींग या तंत्रज्ञानाचा वापर करुन धरणाची गळती रोखण्यात आली आहे. या पुढील काळात देखील अशाच पद्धतीने गळती रोखण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की, आता टेमघर धरणात यंदाच्या पावसाळ्यात 100 टक्के पाणीसाठा करणार असून पुणे शहराला मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोयल गंगा फाऊंडेशनच्या वतीने वाहतूक पोलिसांना रेनकोटचे वाटप
पुणे – ऊन, पाऊस, थंडीची तमा न बाळगता दिवस रात्र वाहतुकीचे नियोजन, व्यवस्थापन करणारे आणि नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी तत्पर असलेल्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच्या उद्देशाने गोयल गंगा फाऊंडेशनच्या वतीने स्वारगेट वाहतूक विभाग आणि मार्केटयार्ड पोलिस स्टेशन यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल नवगिरे (वाहतूक विभाग) यांच्यासह इतर मान्यवर व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. यातच वाढणारा पाऊस आणि नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक अशा अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. तरीही अशा प्रतिकूल परिस्थितीत वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी ते नेहमी रस्त्यावर सज्ज असतात. यासाठीच पावसाळ्यात वाहतूक पोलिसांची गैरसोय होऊ नये म्हणून गोयल गंगा फाऊंडेशनच्या वतीने हे वाटप करण्यात आले.
मंगल प्रभात लोढा यांची भाजप मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती
मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या मुंबई अध्यक्षपदी मंगल प्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते २५ वर्षापासून आमदार पद भूषवत आहेत. राजकारणात स्वच्छ आणि मजबूत प्रतिमा असलेले मंगल प्रभात लोढा यांनी या नवीन जबाबदारीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांचा ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या संकल्पनेतून पक्षाला अधिक बळकट बनवून पुढे घेऊन जाण्याचे काम करणारा.
महाराष्ट्र विधानसभेचे पाचव्यांदा सदस्य असलेले लोढा १९९५,१९९९, २००४, २००९ आणि २०१४ मध्ये मुंबईचा मलबार हिल विधानसभा क्षेत्रातून विजय होत आले आहेत. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७० हजार मताधिक्क्याने विजय मिळवत महाराष्ट्रात सर्वधिक मत प्रतिशतांनी विजय मिळविण्याचा कीर्तिमानही त्यांनी रचला होता. १८ डिसेंबर १९५५ जोधपूर विद्यापीठातून बीकॉम एलएलबीचे शिक्षण घेतल्यानंतर ते वकिलीचा पेशामध्ये आले होते. विद्यार्थिदशेपासूनच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या गतिविधिशी जोडलेले असून राष्ट्रीय स्वयम सेवक संघटनेच्या उपक्रमांमध्ये सक्रिय राहिले आहे. विद्यार्थी जीवनात लोढ़ा जोधपुर विश्वविद्यालयाचे महासचिव देखिल होते. त्यांचे वडील सुप्रसिद्ध न्यायमूर्ती गुमानमल लोढा यांनी ३ वेळा खासदार पद भूषवले असून राष्ट्रवाद विचारधारेच्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांना राष्ट्रवादाचे संस्कार त्यांच्या वडिलांकडून मिळाले आहेत. गेल्या पाच वर्षापासून आमदार लोढ़ा रामभाऊ म्हालगी प्रबोधिनीचे महासचिव आणि प्रदेश भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहे.
लोढा यांनी सन १९८७ पासून एकूण ९ लोकसभा निवडणुकीत विविध पदावरील मुख्य जबाबदारी भूषवली असून एक यशस्वी रणानितीकार म्हणून त्यांची छबी निर्माण झालेली आहे. विद्यार्थिदशेत त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातही सक्रिय भूमिका बजावली होती. ते सन १९८१ मुंबईला आले कंस्ट्रक्शन व्यवसाय स्थापित करून त्यांनी हा व्यवसाय आपल्या मुलांना सोपवला असून ते आता पूर्णवेळ राजकारणात सक्रिय असून समाज कार्य करत आहेत. ते म्हणाले की, देशाच्या सर्वात मोठ्या महानगराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी जी त्यांना सोपवण्यात आली आहे, ही जिम्मेदारी ते सर्वांच्या सहकार्याने परी पूर्णपणे पार पाडणार.
सुख, शांती, समाधान हीच खरी संपत्ती- डॉ. विकास आबनावे; गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा सत्कार
‘ती’ व्हिडीओ क्लिप …महापौर दालनात उलगडणार ..(व्हीडीओ)
आंबेगावच्या महिला तहसीलदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडले
मंचर : प्रतिनिधी-
आंबेगावच्या तहसीलदार सुषमा पैकेकरी व लिपीक दिनकर लाडके यांना कुरवंडी येथील शेतकरी व डबर वाहतूक करणारे व्यावसायिक यांच्या तक्रारीवरून एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्हणजे त्यांनी ही लाच घोडेगावच्या तहसील कार्यालयातच स्वीकारली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक दिलीप बोरस्ते यांनी दिली.
प्रांताधिकारी संजय पाटील यांनी कारवाई करून डबर वाहतूक करणारे ट्रक घोडेगाव येथील तहसील कार्यालयाच्या आवारात आणून ठेवले होते. तहसीलदार पैकेकरी यांनी डबर वाहतूक करणार्या ट्रकवर 2 लाख 41 हजार 50 रुपये दंड आकारणार असल्याचे तक्रारदार यांना सांगितले. तक्रारदार व तहसीलदार पैकेकरी यांच्यात झालेल्या तडजोडीनुसार 46 हजार रुपये दंड व 1 लाख रुपये लाच देण्याचे ठरले. यानंतर तक्रारदार यांनी पुणे येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सोमवारी (दि. 15) सायंकाळी 6 वाजता तहसील कार्यालयामध्ये एक लाख रुपयांची रोख लाच घेताना तहसीलदार पैकेकरी व लिपीक लाडके यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
या कारवाईमध्ये पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक दिलीप बोरस्ते, पोलिस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, सीमा मेहंदळे, पोलिस हवालदार रशिद खान, दीपक टिळेकर, अभिजित राऊत यांनी भाग घेतला.
पुणे विमानतळावर महिलेकडून सोन्याची बिस्कीटे जप्त
पुणे : गोवा येथून विमानाने आलेला महिला प्रवाशाकडून सीमा शुल्क विभागाने १८ लाख ९० हजार रुपये किंमतीची सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत. हे सोने बँकाक येथून तस्करी करण्यात आल्याचा संशय आहे. अलीकडच्या काळात देशांतर्गत विमानातील प्रवाशाकडून तस्करी केल्याची ही पहिलीच घटना आहे. उषा सिंग असे या महिला प्रवाशाचे नाव आहे. स्पाईस जेट कंपनीच्या विमानातून ती दि. १० जुलै रोजी गोवा येथून पुणेविमानतळावर आली. विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी या महिलेची तपासणी केली. या तपासणीमध्ये महिलेकडे ५५७.६४ ग्रॅम वजनाची सोन्याची तीन बिस्किीटे आढळून आली. त्याची किंमत १८ लाख ९० हजार ४०० रुपये एवढी आहे. या बिस्कीटांना काळ्या रंगाची चिकटपट्टी लावून तिने आपल्या बुटामध्ये लपविले होते. ही महिला प्रवासी गोव्यातून विमानात बसली असली तरी हे सोने बँकाकवरून आल्याचा संशय आहे. गोव्यातून पुण्यात आलेल्या विमानाचा मार्ग बँकाक ते कोलकाता होता. कोलकातामध्ये आल्यानंतर हे विमानाची देशांतर्गत वाहतुक सुरू झाली. कोलाकाता-बंगलुरू-गोवा-पुणे असा या विमानाचा मार्ग होता.विमानातील स्वच्छतागृहामध्ये सोने लपवून ठेवण्यात आले होते. संबंधित महिला गोव्यात विमानात चढल्यानंतर तिने हे सोने काढून बुटामध्ये लपविले. या बिस्कीटांवर मेटालर, सिंगापुर असे लिहिले आहे, अशी माहिती सीमाशुल्क विभागाच्या सहआयुक्त वैशाली पतंगे यांनी दिली. हे सोने बँकॉकमध्ये लपविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मागील काही वर्षात पुणे विमानतळावर देशांतर्गत विमानातून सोन्याची तस्करी झाल्याचा हा पहिलाच प्रकार आहे. विमानतळावरून दुबई येथून येणाऱ्या प्रवाशांकडून सोन्याची तस्करी अनेक पकडण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाचे उपायुक्त महेश पाटील यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
अजित पवारांकडूनच सत्तेचा गैरवापर; गोपीनाथ मुंडेंवर लाठी हल्ला व मावळच्या शेतकऱ्यांवर गोळीबार-खा. संजय काकडेंचा अजित पवारांवर प्रतिहल्ला
पीकविमा कंपन्यांच्या विरोधात शिवसेनेचा बुधवारी धडक मोर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘विकास दर्शक’ डॅश बोर्डचे उद्घाटन
शहांनी एमआयएम नेत्यांना बोट दाखवण्यावरून उडाला गदारोळ
नवी दिल्ली – संसदेच्या कनिष्ठ सभागृहात सोमवारी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्था कायद्यात बदलाला सोमवारी मंजुरी देण्यात आली. या दरम्यान सुरू असलेल्या चर्चेच्या वेळी भाजपचे गृहमंत्री अमित शहा आणि एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यात चांगलीच जुंपली. लोकसभेत भाजप खासदार बोलत असताना ओवैसींनी मध्ये बोलण्यावरून शहांनी त्यांच्याकडे बोट दाखवून शांत राहण्याचे आवाहन केले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.
नेमके काय घडले….
लोकसभेत एनआयए संशोधन विधेयकावर चर्चा सुरू होती. त्यावर बागपत येथून भाजपचे खासदार आणि माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह आपले मत मांडत होते. हैदराबादेतील एका राजकीय नेत्याकडून तेथील पोलिस आयुक्तावर तपास बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता असे आरोप सत्यपाल सिंह यांनी केले. त्यावेळी आपण मुंबईत पोलिस आयुक्त असल्याने आपल्याला या घटनेची माहिती होती. संबंधित पोलिस आयुक्ताने तपास फिरवला नाही तर त्यांची बदली केली जाईल असेही कथितरित्या त्या नेत्याने धमकावले होते. यावर वेळीच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसींनी आक्षेप घेतला. त्यावेळी नेमके काय घडले याचे संपूर्ण दस्ताऐवज आणि रेकॉर्ड सत्यपाल सिंह यांनी लोकसभेत मांडावेत असे ओवैसी म्हणाले.
विरोधकांनी ऐकून घेण्याची सवय लावावी -अमित शहा
ओवैसींच्या आक्षेपावर गृहमंत्री अमित शहा सुद्धा आपल्या जागेवर उभे ठाकले. तसेच त्यांनी ओवैसींकडे बोट दाखवून विरोधकांनी ऐकून घेण्याची सवय लावावी असे म्हटले. विरोधक जेव्हा सभागृहात बोलतात तेव्हा सत्ताधारी मध्येच काहीही बोलत नाहीत. त्यामुळे, विरोधकांनी सुद्धा असेच करावे. त्यावरच ओवैसी आणखी भडकले. मला बोट दाखवू नये मी घाबरणार नाही असे ओवैसींनी ठणकावले. त्यास उत्तर देताना भीती आपल्या डोक्यात आहे त्याला मी तरी काय करणार! असा टोला शहांनी लगावला.
कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून शाश्वत विकास शक्य – अनुपमा पवार
पुणे: कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून देशाचा शाश्वत विकास शक्य आहे, असे सांगत विद्यार्थी व पालकांनी क्रमिक शिक्षणाप्रमाणेच कौशल्य विकास प्रशिक्षणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे असे मत, पुणे जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राच्या सहाय्यक संचालिका अनुपमा पवार यांनी व्यक्त केले.
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ‘यशस्वी’ संस्थेच्या विद्यार्थ्याचे ‘अभियांत्रिकी व हस्तकौशल्य वस्तूंचे प्रदर्शनाचे’ उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रदर्शनाची पाहणी केल्यानंतर आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले कि, विद्यार्थ्यानी खूप नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करून बनविलेले प्रकल्प नक्कीच वास्तवात येण्यायोग्य आहेत. आपल्या भवताली असणाऱ्या प्रदूषण, वीजेचा तुटवडा, वाहतूक समस्या यांचा विचार करून आग विझवण्यासाठी, आगीतून लोकांची सुटका करण्यासाठी रोबोचा वापर, वर्दळीच्या ठिकाणच्या जिन्यावरील पायऱ्यांच्या माध्यमातून वीज निर्मिती, टाकाऊ पाणीप्रवाहाच्या मार्गाद्वारे वीज निर्मिती, घरात कोणीही नसताना सेन्सरद्वारे वीज बंद करून वीज बचत,सौर ऊर्जेचा वापराद्वारे गाडी धुतली जाणे,सौर उर्जेवर चालणारे कीटकनाशक फवारणी यंत्र, टाकाऊ प्लस्टिक बाटल्यातून पेन स्टॅन्ड अशा विविध वस्तूंची विद्यार्थ्यानी केलेली निर्मिती ही निश्चितच कौतुकास्पद आहे. हे सर्व प्रकल्प महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत तसेच लवकरच शासनाच्यावचातीने घेण्यात येणाऱ्या जिल्हा व्यवसाय कल्पना स्पर्धेतही विद्यार्थ्यानी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व पुस्तक भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या समारोप सत्रात भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या मेंटॉरिंग इंडिया प्रकल्पाचे संचालक सचिन अडसरे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना सांगितले कि, तुमच्याकडे कौशल्य असल्यावर केवळ नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे होण्यासाठी स्वयंरोजगाराचा मार्ग कसा निवडता येईल यादृष्टीने प्रयत्न करा, यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य, मार्गदर्शन बीवायएसटी तर्फे करण्यात येईल असे आश्वासन दिले. उद्दिष्ट म्हणजेच ध्येय निश्चिती, ज्ञान किंवा कौशल्य आणि कष्ट करण्याची मानसिकता या तीन गोष्टींमुळेच यशस्वी बनता येते असा मोलाचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्याना दिला.
यावेळी कार्यक्रमाला बीवायएसटीचे समन्वयक मोहनीश वाघ, ‘यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स’च्या संचालिका स्मिता धुमाळ, यशस्वी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ.सुनिता पाटील, ‘यशस्वी’च्या ऑपरेशन्स विभागाचे उपाध्यक्ष कृष्णा सावंत, मार्केटिंग विभाग प्रमुख अमृता तेंडुलकर यांच्यासह संस्थेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनिता पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी राजेंद्र शेळके, ईशा पाठक, निसार शेख,श्रीकांत तिकोने, शाम वायचळ ,प्राची राऊत, शमिका तांबे, सचिन कुंभारकर,हर्षा पटेल, श्वेता साळी, अश्विनी घनवट, रश्मी शिंदे, गंगाधर डुकरे,निखिल चव्हाण व अजिंक्य गायकवाड आदींनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी केले.
डॉ. गणेश देवी व डॉ. सुरेखा देवींना महापालक सन्मान पुरस्कार जाहीर
प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांना संस्थापालक पुरस्कार
डीपर व सर फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा 27 व 28 जुलै रोजी वितरण समारंभ
पुणे, दि. 15 : डीपर आणि सर फाउंडेशन या शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी दिला जाणारा महापालक सन्मान पुरस्कार यावेळी प्रसिद्ध विचारवंत व भाषा संवर्धनासाठी कार्यरत असलेले डॉ. गणेश देवी व डॉ. सुरेखा देवी यांना तर, संस्थापालक सन्मान पुरस्कार मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष व विद्यार्थी सहाय्यक समितीचे विश्वस्त प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती डीपर व सर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिश बुटले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
महापालक पुरस्काराचे हे सातवे वर्ष व संस्थापालक पुरस्कारचे हे चौथे वर्ष आहे. येत्या 27 जुलै (शनिवार) रोजी संस्थापालक व 28 जुलै (रविवार) रोजी महापालक पुरस्कार वितरण समारंभ पुण्यातील कोथरुडमधील जे पी नाईक जे पी नाईक ट्रेनिंग सेंटरमध्ये सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. महापालक सन्मानासाठी निवड झालेले डॉ. गणेश देवी यांनी आदिवासींसाठी व भाषा संवर्धनासाठी असामान्य असे कार्य केले आहे. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांची यंदाच्या महापालक सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानपत्रासहित सन्मानचिन्ह आणि सौभाग्यलेणं असे आहे. यापूर्वी हा सन्मान डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे, डॉ. कुमार आणि डॉ. उर्मिला सप्तर्षी, डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे, दिलीप व सुनीता अरळीकर, डॉ. राजाभाऊ व रेणुताई दांडेकर आणि भारताचे जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा आणि मीना सिंह यांना प्रदान करण्यात आला आहे.
संस्थापालक सन्मान पुरस्कारासाठी अतिशय निस्पृहपणे संस्थेचे पालकत्व निभावणाऱ्या व्यक्तीची निवड केली जाते. यावर्षीच्या पुरस्कारासाठी निवड झालेले प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांनी मराठवाडा मित्र मंडळ व विद्यार्थी सहाय्यक समिती या संस्थांसाठी अतिशय भरीव कार्य केले आहे. या पुरस्काराचे स्वरुप 51 हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे आहे. यापूर्वी हा पुरस्कार नाशिक जिल्हा प्रसारक समाजाच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार, लातूर पॅटर्नचे जनक प्राचार्य अनिरुद्ध जाधव, वरोऱ्याच्या ज्ञानदा वसतिगृहाचे संस्थापक मधुकरराव उपलेंचवार यांना प्रदान करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील दिग्ग्ज मान्यवरांची उपस्थिती असते. पुरस्कार वितरण समारंभाबरोबरच शैक्षणिक आणि सामाजिक घडामोडी व विकासासंदर्भातील परिसंवादाचेही आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, असेही हरीश बुटले यांनी म्हटले आहे.
अनधिकृत पार्किंग: महापालिकेने सात दिवसांत वसूल केला २३ लाखांचा दंड
मुंबई-अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर सध्या महापालिकाने कारवाईचा बडगा उगारला असून सार्वजनिक वाहनतळांलगत ५०० मीटरच्या आत गाडय़ा नियमबाह्य़ उभ्या केल्यास पाच हजार ते पंधरा हजारांपर्यंत दंड आकारण्यात येत आहे. ७ जुलैपासून महापालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली असून सात दिवसांत २३ लाखांची दंडवसुली केली आहे. सर्वात जास्त दंडवसुली ९ जुलै रोजी करण्यात आली आहे. यादिवशी महापालिकेने १०७ वाहनांचे टोचन (टो) केलं होतं. त्यांच्याकडून एकूण ५.२ लाखांचा दंड वसूल कऱण्यात आला. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या २३ सार्वजनिक वाहनतळांलगत कारवाई करण्यात येत आहे.
वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे गाडय़ा उभ्या करण्यासाठी (पार्किंग) मुंबईत जागा मिळणे मुश्कील होऊ लागले आहे. वाहनचालक नियमांचे पालन न करता रस्त्यावर मिळेल तेथे गाडय़ा उभ्या करत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. अशा वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पालिकेने वाहनतळाच्या आसपास नियमबाह्य़ पार्किंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे ठरवले आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी तशी घोषणा केली होती.
महापौरांची गाडी नो पार्किंगमध्ये, सर्वसामन्यांना दंड ठोठावणारी पालिका काय कारवाई करणार ?
‘नो पार्किंग’ फलकांविनाच चालकांना दंड!
पहिल्याच दिवशी पालिकेचा ६३ वाहनांवर बडगा
महापालिका सहआयुक्त देवेंद्र कुमार जैन यांच्या जी साऊथ वॉर्डमध्ये सहा सार्वजनिक वाहनतळं असून सुरुवातीला येथे विरोध झाला होता, पण सध्या स्थानिकांचा विरोध मावळला आहे. “आम्ही स्थानिकांना या वाहनतळांवर खूप जागा असल्याचं समजावून सांगितलं. या सहा वाहनतळांवर १० हजार वाहनं पार्क केली जाऊ शकतात” अशी माहिती जैन यांनी दिली आहे. या वॉर्डमध्ये १.६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला असून वाहनतळांवर पार्किंग होणाऱ्या गाड्यांच्या संख्येत पाच हजाराने वाढ झाली आहे.
“सुरुवातीला १३ हजार वाहनं पार्क केली जात होती. पण आता हा आकडा १८ हजारांवर पोहोचला आहे. याचाच अर्थ रस्त्यावर जास्त जागा मोकळी झाली आहे”, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
वाहन नियमबाह्य़ उभे केल्यास आजपासून महादंड
सार्वजनिक वाहनतळांवर स्थानिकांना सवलत
कारवाईचे नियोजन व व्यवस्थापन हे २४ प्रशासकीय विभागांत साहाय्यक आयुक्तांच्या स्तरावर करण्यात येत असून कारवाईचा दैनंदिन अहवाल तयार करण्यात येत आहे. कारवाईसाठी आवश्यकतेनुसार वाहतूक पोलिसांचे साहाय्य घेण्यात येत आहे. या कारवाईअंतर्गत नियमबाह्य़ उभ्या केलेल्या वाहनांचे टोचन (टो) करण्यात येत आहे. टोचन केलेल्या वाहनांवर मालकी हक्काचा दावा होईस्तोवर वाहनांवर प्रतिदिन विलंब आकारदेखील लावण्यात येत आहे. टोचन केलेली वाहने संबंधित मालकांद्वारे ३० दिवसांच्या आत सोडवून न नेल्यास ती वाहने बेवारस असल्याचे समजून त्यांची लिलावात विक्री केली जाईल, असा इशाराही पालिकेने दिला आहे. या कारवाईच्या दुसऱ्या टप्प्यात काही रस्ते ‘नो पार्किंग झोन’ म्हणून निर्धारित करण्यात येणार असून या रस्त्यांवर गाडी उभी केल्यास महापालिकेद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व ७ परिमंडळीय उपायुक्तांना व सहआयुक्तांना त्याकरिता रस्ते निर्धारित करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
कारवाई कशी?
महापालिकेद्वारे विविध १४६ ठिकाणी तब्बल ३४ हजार ८०८ वाहने ‘पार्क’ करण्याची सुविधा उपलब्ध आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या २३ ठिकाणी असणाऱ्या सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटर परिसरात कारवाई केली जाणार आहे. पालिकेच्या वाहतूक खात्याद्वारे याबाबत जनजागृती करणारे फलकही लावण्यात आले आहेत.
सार्वजनिक वाहनतळांवर स्थानिकांना सवलत
पालिकेच्या २६ सार्वजनिक वाहनतळांवर गाडय़ा उभ्या करण्यासाठी सध्या जे दर लावण्यात आले आहेत त्यात स्थानिक नागरिकांना सवलत मिळणार आहे. स्थानिक नागरिकांना तब्बल अर्ध्या किमतीत मासिक पास मिळणार आहे. येत्या महिन्याभरात ही सवलत लागू होणार आहे. सार्वजनिक वाहनतळांपासून ५०० मीटरच्या परिसरात गाडय़ा लावणाऱ्यांवर पालिकेने कारवाई सुरू केल्यानंतर पार्किंगचे दर कमी करण्याची मागणी विविध विभागांतून होऊ लागली होती. त्यानंतर पालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.


