Home Blog Page 2892

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात मेळावे – उद्योगमंत्री सुभाष देसाई

0

मुंबई : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात 1 लाख स्वयंरोजगार निर्मितीचे शासनाचे उद्दिष्ट असून त्याद्वारे 10 लाख रोजगार निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केली.

राज्य शासनाच्या उद्योग विभाग आणि सीआयआयच्यावतीने चेंबूर येथील अणुशक्तीनगर येथे आज बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री.देसाई बोलत होते.

श्री.देसाई म्हणाले, राज्यातील प्रत्येक तरुणाच्या हाताला रोजगार देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून राज्याच्या कानाकोपऱ्यात बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावे घेतले जात आहेत. या मेळाव्यांना सर्वत्र उदंड प्रतिसाद लाभत असून हजारो मुला-मुलींना नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे.

दरम्यान, तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराला चालना द्यावी यासाठी शासनाने मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम हाती घेतला असून त्यासाठी 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी शासन सर्व आर्थिक सहाय्य करणार आहे. इच्छुकांना केवळ 10 टक्के गुंतवणूक करावी लागणार असून बँका 60 टक्के भांडवल कर्जरुपात उपलब्ध करून देणार आहेत. तर शासन तीस टक्के रक्कम देणार आहे. या कार्यक्रमाद्वारे 1 लाख छोटे-मोठे उद्योजक तयार केले जाणार असून त्याद्वारे 10 लाख रोजगार उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी राज्याच्या 36 जिल्ह्यात स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा श्री. देसाई यांनी यावेळी केली.

येथील बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने सुमारे साडेचार हजार मुला-मुलींनी यासाठी नोंदणी केली असून अडीच हजार जणांनी मेळाव्याला हजेरी लावली. प्रत्येक तरुणाच्या हाताला नोकरी मिळेपर्यंत शासन पाठपुरावा करणार असल्याचे श्री.देसाई यांनी सांगितले.

चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांनी या मेळाव्याचे संयोजन केले. या मेळाव्यात सुमारे 80 कंपन्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी केले तर आभार पी.जी. राठोड यांनी मानले.

केशायुर्वेद १०८ संकल्पपूर्ती व सत्कार सोहळा ….

0
पुणे : भारतातील पहिल्या आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब अँड रिसर्च सेंटर असलेल्या केशायुर्वेदच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्यवर्धिनी चिकित्सालय व बीव्हीजी इंडिया यांच्या वतीने १०८ सेवाशाखा संकल्पपूर्ती सत्कार व केशायुर्वेद पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. शुक्रवार, दि. १९ जुलै २०१९ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे हा सोहळा रंगणार आहे.
 
या सोहळ्यासाठी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, उद्योजक पद्मश्री प्रतापराव पवार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण जामकर, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश डुंबरे, बीव्हीजी इंडियाचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, भारत विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. दत्ताजी गायकवाड आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
 
गेल्या तीन वर्षात केशायुर्वेदच्या देश-विदेशात १०८ सेवा शाखा उभारल्या आहेत. त्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या केंद्रप्रमुखाना केशायुर्वेद गौरव, भूषण, रत्न आणि मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘काया-केश कल्पना’ आणि केशायुर्वेद गौरवग्रंथांचे प्रकाशन होणार आहे, अशी माहिती केशायुर्वेदचे संचालक डॉ. हरिश पाटणकर यांनी दिली आहे.

‘लालबत्ती’ २६ जुलैला चित्रपटगृहात

0

पोलिसांची लाचखोरी, अधिकाराचा उन्माद, गुन्हेगारांशी असणारे साटेलोटे याच्या बातम्या आपल्याला अनेकदा ऐकायला मिळतात. त्यामुळे पोलिस आणि जनता यांच्यामधील विश्वासाची जागा संशयाने आणि टीकेने घेतली आहे, पण पोलिसांचे शौर्य, वीरता आणि त्यांच्यातील माणुसकी ह्याचा उल्लेख मात्र कमी प्रमाणावर केला जातो. महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी सतत झटणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या ‘क्विक रिस्पॉन्स टीमम’ध्ये (क्यूआरटी) घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारित असलेला लालबत्तीहा मराठी चित्रपट २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साई सिनेमाया चित्रपट निर्मिती संस्थेची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केले असून निर्मिती संतोष सोनावडेकर यांनी केली आहे.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भविष्यात दहशतवादी हल्ले रोखायचे, त्यांना सडेतोड उत्तर द्यायचे, तर तसे प्रशिक्षित कमांडो दल असणे आवश्यक होते व याच गरजेतून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने पोलिसांच्या सबलीकरणासाठीक्विक रिस्पॉन्स टीमची (क्यूआरटी) स्थापना महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी केली. दहशतवाद विरोधी  मोहिमांमध्ये चिघळलेल्या परिस्थितीला हाताळण्यासाठी स्थापन केलेल्या क्यूआरटी च्या कमांडोची ट्रेनिंग अतिशय कठीण असते. याच खडतर ट्रेनिंगचा थरार दाखवत आणि दहशतवादाशी मुकाबला करत, ज्येष्ठ पोलिस अधिकारी एस.बी.पवार आणि त्यांच्या हाताखाली क्विक रिस्पॉन्स टीममध्ये असणारा कमांडो गणेश, यांच्या नातेसंबधाभोवती लालबत्ती चित्रपटाची कथा फिरते.

लालबत्ती या चित्रपटात मंगेश देसाई, भार्गवी चिरमुले, तेजस, रमेश वाणी, मीरा जोशी, अनिल गवस, मनोज जोशी या कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा-पटकथा अभय दखणे यांची असून अरविंद जगताप यांनी संवाद लेखन केले आहे. चित्रपटाचे छायाचित्रण कृष्णा सोरेन तर निलेश गावंड यांच्याकडे संकलनाची जबाबदारी आहे. चित्रपटाच्या कथेला अविनाश-विश्वजीत यांचे संगीत लाभले आहे. चित्रपटाचे कलादिग्दर्शन दिगंबर तळेकर यांचे असून अतुल साळवे हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

लालबत्ती२६ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

‘गढूळ’ ठरला सर्वोत्कृष्ट

0
पुणे : नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी मराठी चित्रपट परिवार आणि आम्ही पुणेकर संस्थेतर्फे आयोजित ९ व्या पुणे लघुपट महोत्सवात पुण्यातीलच गणेश शेलार दिग्दर्शित गढुळ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचे पारितोषिक मिळाले. तर प्रशांत गोखले यांच्या अम्मी या लघुपटास सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले.
भाग्यश्री देसाई निर्मित वैशाख या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचे दुसरे पारिातेषिक मिळाले, तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे दुसरे पोरितोषिक गढुळ या लघुपटासाठी गणेश शेलार यांना मिळाले. सर्वोत्कृष्ठ छायाचित्राणसाठी लिमिटलेस या लघुपटाचे कॅमेरामन राधेय तावरे यांना पारितोषिक देण्यात आले. अम्मी या लघुपटाचे संकलन सर्वोत्कृष्ठ ठरले. गन्स अून्ड लव्हर्स या लघुपटासाठी पटकथेचे पारितोषिक संजय शास्त्री यांनी पटकाविले. अ‍ॅनिमेशन विभागामध्ये तथास सिक्रेट लघुपट सर्वोत्कृष्ठ ठरला. अरमान दुआ दिग्दर्शित पता लघुपटाला विद्यार्थ्यांच्या सर्वोत्कृष्ठ लघुपटाचे पारितोषिक मिळाले. माहितीपटाचे पारितोषिक बंगळुरु येथील प्रवीण पिल्ले यांच्या ड्रिमर्स ऑफ ब्रेसवाना या लघुपटाला मिळाले तर सर्वोत्कृष्ठ कथेचे पारितोषिक गोव्यातील गोपीनाथ चांडेलकर यांच्या सिटी या लघुपटाने पटकाविले.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, मराठी चित्रपट परिवाराचे निवृत्ती जाधव, राहुल सूर्यवंशी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
प्रकाश मगदुम म्हणाले, लघुपटातून विविध विषय हाताळले जात आहे, यासा’ी रनिर्मात्यांनी आपल्या मातीतील विषय मांडले पाहिजे. मेघराज राजेभोसले म्हणाले, लघुपट निर्माते आणि दिग्दर्शकांना भविष्यामध्ये संधी देण्यासा’ी विविध योजनांची गरज आहे. विकास पाटील म्हणाले, लघुपटांना योग्य बाजारपे’ निर्माण करण्यासा’ी प्रयत्न झाले पाहिजे. त्यासा’ी सर्व निर्मात्यांनी एकत्र आले पाहिजे.

शासनाच्या कर्जमाफी योजनेबाबतच्या तक्रारीसाठी तालुकास्तरावर समिती गठीत

0

पुणे :-शासनाने राज्यातील शेतक-यांना कर्जमाफी देण्यासाठी दिनांक 28 जुन 2017 रोजी निर्णय घेतलेला आहे. सदर निर्णयातील तरतुदीनुसार कृषि कर्जास कर्जमाफी, कृषि कर्जाची परतफेड विहीत वेळेत करणा-या शेतक-यांना प्रोत्साहनात्मक अनुदान तसेच  एकवेळ परतफेड योजना (OTS) राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत वेळोवेळी ग्रीन लिस्ट निर्गमित करुन त्याआधारे पात्र लाभार्थ्यांची निश्चिती करुन लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येतो. तथापि ब-याच कर्जखात्यावर अपुरी माहिती, चुकीची माहिती, चुकीचे फलॅगिंग इत्यादी कारणामुळे प्रक्रिया करणे शक्य झाले नाही. या योजनेचा लाभ अद्याप मिळाला नसल्याबाबत अनेक शेतक-यांच्या तक्रारी शासनाकडे तसेच सहकार विभागाच्या विविध कार्यालयाकडे प्राप्त होत आहेत. तसेच या योजनेचा लाभ मिळालेल्या शेतक-यांना बँकांकडुन नव्याने कर्जपुरवठा केला जात नाही अशाही तक्रारी शासनाकडे व सहकार विभागातील कार्यालयाकडे प्राप्त होत आहेत.

या योजनेअंतर्गत शेतक-यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी खालीलप्रमाणे तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. संबंधीत तालुक्यातील उप / सहाय्यक निबंधक सहकारी संस्था हे अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा तालुक्यातील प्रतिनिधी, अग्रणी बँकेचा तालुक्यातील प्रतिनिधी, संबंधीत तालुक्यातील लेखापरिक्षक  हे सदस्य तर सहकार अधिकारी श्रेणी-1 हे सदस्य सचिव आहेत.

या समितीची सभा प्रत्येक सोमवारी व गुरुवारी उप / सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था कार्यालयात आयोजित करण्याच्या सूचना सहकार आयुक्त व निबंधक,सहकारी संस्था,म.रा.पुणे यांनी दिलेल्या आहेत. शासन निर्णयानुसार संबंधीत शेतक-यांनी  या समितीकडे संर्पक करण्याबाबत  सहकार आयुक्तालयामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

महात्मा फुले राष्ट्रीय पुरस्कार कृपाल पलुसकर यांना प्रदान

0
पुणे : नवी दिल्ली येथील माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीतर्फे दिला जाणारा महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय पुरस्कार पुण्यातील के. पी. पॅरामेडीकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक कृपाल पलुसकर यांना नुकताच प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल देण्यात येणारा हा पुरस्कार लोकसभेच्या माजी अध्यक्ष श्रीमती मीराकुमार यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे उपस्थित होते.

पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन

0

मुंबई : भारतातील सर्वोच्च माऊंट कांचनजूंगा शिखर सर केलेल्या पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले.

या यशस्वी चढाईत जगात पहिल्यांदा दहा जणांच्या चमूने एकत्रित एकाच दिवशी हे शिखर सर करण्याचा विश्वविक्रम नोंदविल्याची माहिती गिरीप्रेमीचे प्रमुख उमेश झिरपे यांनी दिली. गिरीप्रेमीच्या या चमुत आनंद माळी, भूषण हर्षे, रूपेश खोपडे, किरण साळस्तेकर, सुमित मांदळे, जितेंद्र गवारे, विवेक शिवदे, कृष्णा ढोकले, प्रल्हाद जोशी, आशिष माने यांचा समावेश आहे.

या चमूने प्रत्यक्ष ४५ दिवसांच्या चढाईत १५ मे २०१९ रोजी कांचनजुंगाचे हे ८ हजार ५८६ मीटर उंचीचे शिखर सर केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चमूचे या यशस्वी चढाईसाठी कौतुक करून पुढील मोहिमांसाठी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यात पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा

0

नवी दिल्ली : पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने देशातील एकूण 406 जिल्ह्यांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये अशी परवानगी देण्यात आली आहे.

पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाअंतर्गत कार्यरत पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळ हे देशातील विविध जिल्ह्यात पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना परवानगी देते. या मंडळाने 10 व्या लिलाव फेरीपर्यंत महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांसह देशातील एकूण 406 जिल्ह्यांमध्ये भौगोलिक क्षेत्रांना परवानगी दिली आहे.

महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, रायगड ,पुणे ,रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, बृह्नमुंबई, पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि लगतचे हिंजवडी, चाकण, तळेगाव क्षेत्र, अहमदनगर, औरंगाबाद, लातूर , उस्मानाबाद, सांगली, सातारा,सिंधुदुर्ग, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना परवानगी देण्यात आली आहे.

पेट्रोलियम व नैसर्गिक गॅसमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली .

हाफकिन महामंडळ पोलिओ लसींच्या ५०८ दशलक्ष डोसेसचे उत्पादन आणि पुरवठा करणार

0

मुंबई : येथील हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ पुढील काही वर्षात पोलिओ लसीच्या सुमारे 508 दशलक्ष इतक्या डोसेसचे उत्पादन आणि वितरण करणार आहे. यासाठी केंद्र शासनासह युनिसेफ आणि मोझाम्बिक देशाकडून महामंडळास नुकतेच पुरवठा आदेश प्राप्त झाले आहेत.

राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल यांनी हाफकिन महामंडळास नुकतीच भेट देऊन महामंडळाच्या सक्षमीकरणासंदर्भात ग्वाही दिली होती. मंत्री श्री. रावल यांच्यासह राज्यमंत्री मदन येरावार, विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख आदींच्या माध्यमातून महामंडळाच्या विकासासाठी व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. पोलिओ लस पुरवठ्यासह आता इतर लसी आणि ओषधांच्या निर्मितीसाठीही महामंडळाने पुढाकार घेतला आहे.

भारतातील पोलिओ लस तसेच इतर जीवरक्षक लसी व विविध प्रकारची औषधे बनविणारी हाफकिन महामंडळ ही अग्रगण्य कंपनी आहे. तसेच अशा प्रकारचा भारतातील हा एकमेव सार्वजनिक उपक्रम आहे. महामंडळास जागतिक आरोग्य संघटनेचे मानांकन प्राप्त आहे. मागील चार दशकापासून हाफकिन महामंडळ हे भारत सरकारच्या सार्वत्रिक लसीकरण मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावार पोलिओ लसीचे उत्पादन करुन देशभर पुरवठा करत आहे. भारतास पोलिओमुक्त करण्यामध्ये महामंडळाने मोठे योगदान दिले आहे. तसेच युनिसेफमार्फत महामंडळ आशिया, आफ्रिका व लॅटीन अमेरिका या खंडातील अनेक देशामध्ये पोलिओ लसीचा पुरवठा करत आहे. या माध्यमातून महामंडळ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलिओ निर्मूलनामध्ये मोठे योगदान देत आहे.

महामंडळाने स्वास्थ्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी काढलेल्या 2019-2020, 2020-2021 व 2021-2022 या वर्षासाठीच्या पोलिओ लस पुरवठा निविदेमध्ये भाग घेतला व यशस्वी निविदाधारक ठरला आहे. त्यामुळे महामंडळास पुढील तीन वर्षासाठी (2019-20, 2020-2021 व 2021-2022) पोलिओ लसीच्या 368 मिलियन डोसेसचे (bOPV1&3) पुरवठा आदेश प्राप्त झाले आहेत. ज्याचे मूल्य 200.46 कोटी रुपये आहे. तसेच महामंडळास युनिसेफमार्फत 66 मिलियन डोसेसचे 2019-20 साठीचे पुरवठा आदेश प्राप्त झाले आहेत. ज्याचे मूल्य 50.86 कोटी रुपये आहे. याशिवाय अजून अतिरिक्त 60 मिलियन डोसेस पोलिओ लसीचे भारत सरकारकडून पुरवठा आदेश अपेक्षित आहे. 13 मिलियन डोसेस हे मोझाम्बिक या देशास निर्यात आदेश अपेक्षित आहेत. हे पुरवठा आदेश पूर्ण करण्याकरिता नियोजन करण्यात आले आहे. उत्पादनाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

वर्ष पोलिओ लस (bOPV1&3) पुरवठा आदेश मुल्य
2019-20 112.5 मिलियन डोसेस+अतिरिक्त 60 मिलियन डोसेस अपेक्षित भारत सरकार रु.93.84 कोटी
60 मिलियन डोसेस+6.2 मिलियन डोसेस (mOPV1) युनिसेफ रु.46.20 कोटी

रु.4.66 कोटी

13.35 मिलियन डोसेस मोझाम्बिक (निर्यात) रु.10.98 कोटी
2020-21 166 मिलियन डोसेस भारत सरकार रु.90.30 कोटी
2021-22 90 मिलियन डोसेस भारत सरकार रु.48.96 कोटी
एकूण 508मिलियन डोसेस रु.294.94 कोटी

मतदार यादीत दुरुस्त्या करण्याची संधी

0

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या छायाचित्र मतदार याद्यांच्या दुसरा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमाची सुरुवात झाली असून हा कार्यक्रम दिनांक 19 ऑगस्ट 2019 पर्यंत राबविण्यात येणार आहे. मतदार यादीतील नाव, पत्ता आदी दुरुस्त्या करण्याची संधी यामुळे मिळणार आहे, अशी माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित प्रारुप मतदार याद्या सोमवार दिनांक 15 जुलै 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रारुप मतदार याद्यांमध्ये ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केलेली नसतील असे मतदार नाव नोंदणीसाठी विहित नमुन्यात अर्ज करु शकतील. या याद्यांतील नावांबाबत आक्षेप असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती, सुधारणा करावयाच्या असल्यासही दावे व हरकती दि. 30 जुलै 2019 पर्यंत प्रत्येक विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) यांच्या कार्यालयात स्वीकारल्या जाणार आहेत.

दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत दि. 13 ऑगस्ट 2019 पर्यंत आहे. डाटाबेसचे अद्ययावतीकरण आदी ‍दि.16 ऑगस्ट पर्यंत करुन दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. पुन:रिक्षण कार्यक्रमादरम्यान दि. 20, 21, 27 आणि 28 जुलै या सार्वजनिक सुट्टयांच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान केंद्रांच्या ठिकाणी विशेष मोहिमेचे (स्पेशल कॅम्पेन) आयोजन करण्यात येणार आहे.

पूर्वीच्या मतदार यादीतील मयत झालेल्या, इतरत्र स्थलांतरित झालेल्या किंवा दुबार नोंदणी झालेल्या काही मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. अशा वगळण्यात आलेल्या नावांची यादी जिल्हाधिकारी व जिल्हा‍ निवडणूक अधिकारी कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.

सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची (बूथ लेव्हल एजन्ट) (बीएलए) नेमणूक करावी आणि शासनाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बूथ लेव्हल ऑफीसर) (बीएलओ) यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे. ऑनलाईन अर्ज नोंदणीची सुविधा http://www.nvsp.in/ या वेबपोर्टलवरही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

महापौर बंगला झक्कास ,समोरचे मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह मात्र भकास (व्हिडीओ)

0
पुणे-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज महानगरपालिकेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या गैरसोयी विरोधात आंदोलन करण्यात आले.

आंदोलन प्रसंगी  राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने या विद्यार्थ्यांना साडेतीन हजार रुपये अनुदान देण्यात यावे व बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाची इमारत सर्व सोयींनी सुसज्ज करावी विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा नीट पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली
याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे म्हणाले की पुण्याची ओळख विद्येचे माहेरघर अशी आहे  ज्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने वसतिगृह बांधले आहे तेथील विद्यार्थ्यांवर अशी वेळ येणे दुर्दैवी आहे त्यांना त्या ठिकाणी अमानवी अशी वागणूक मिळत आहे संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक गरीब विद्यार्थी शिक्षणासाठी या ठिकाणी आलेले आहेत परंतु महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा फटका या विद्यार्थ्यांना बसत आहे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने वसतिगृह आहे याची तरी लाज भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवली पाहिजे असा संताप त्यांनी व्यक्त केला.विरोधी पक्षनेते दिलीप बराटे म्हणाले की या घटनेची चौकशी करून जबाबदार आधिकाऱ्यांवर कारवाई करावी. विद्यार्थ्याना जेवण न मिळणे यासारखी लाजीरवाणी बाब नाही.सत्ताधाऱ्यांना फक्त भ्रष्ट्राचार करण्यास वेळ आहे महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष चाललेले आहे.या सर्व गोष्टींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो. यावेळी शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक अशोक कांबळे,योगेश ससाणे,समन्वयक राकेश कामठे,युवक अध्यक्ष महेश हांडे,विद्यार्थी अध्यक्ष विशाल मोरे,विक्रम जाधव,अच्युत लांडगे,चेतन शिवले, सवेंदू शिंदे,शुभम माताळे,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ

0

पुणे:-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत  पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ उपायुक्त, (पुरवठा)श्रीमती निलीमा धायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली  16जुलै रोजी पार पडला.  यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, अन्नधान्य वितरण अधिकारी,श्रीमती अस्मिता मोरे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती अमिता तळेकर व प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या जिल्हा नोडल अधिकारी  श्रीमती अनघा गद्रे उपस्थित होत्या.

पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा कालावधी   दिनांक 15 जुलै ते 15 ऑगस्ट 2019 आहे. या अभियानाचे प्रमुख उद्दिष्टे सर्व पात्र कुटुंबांना 100%  शिधापत्रिका वाटप करणे, सर्व पात्र शिधापत्रिकांना 100% धान्य वाटप करणे, सर्व कुटुंबांना 100%  गॅस कनेक्शन देणे हे आहेत.

पुणे जिल्हयातील सर्व शहरी व ग्रामीण  कुटुंबांना 100% गॅस कनेक्शन उपलब्ध करून देऊन सर्व कुटुंबातील महिलांना स्वच्छ व चांगले इंधन मिळावे. तसेच कोणत्याही कुटुंबातील महिला चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या जळाऊ लाकडाचा उपयोग करू नये. तसेच धुरमुक्त व चुलमुक्त महाराष्ट्र या अभियांतर्गत 100% गॅस वितरण उद्दिष्ट साध्य करणे हे या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

या अभियांतर्गत प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेविषयी पात्र लाभार्थी कुटुंबाविषयी व आवश्यक कागदपत्रांचे पुर्ततेविषयी सखोल माहिती श्री भानुदास गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे यांनी उपस्थितांना समजावून सांगितली. त्यानंतर श्रीमती अनघा गद्रे, जिल्हा नोडल अधिकारी  यांनी पंतप्रधान उज्वला गॅस  योजनेबाबत सविस्तर माहिती दिली.

या विशेष मोहिमेअंतर्गत  अन्न सुरक्षा योजनेतील  पुणे जिल्हयातील पात्र कुटुंबांना 100% शिधापत्रिका वितरीत करण्यात येणार असून त्याव्दारे निवड करण्यात आलेल्या पात्र शिधापत्रिकाधारकांना 100% धान्य वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करणेबाबतचे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारीश्री.गायकवाड यांनी  सर्व तालुका स्तरावरील अधिकारी ,कर्मचारी यांना  केले.

पुणे जिल्हयातील  सद्यस्थितीत जिल्यामध्ये एकूण 1 लाख 42 हजार 649  इतके गॅस कनेक्शन उज्वला योजनेंतर्गत देणेत आलेले असून जिल्हयामध्ये  एकूण 73 हजार 899 लाभार्थ्यांना 252 के.एल. इतके केरोसीन वाटप करणेत येत आहे. तरी तालुका स्तरावरून 73 हजार 899 लाभार्थ्यांना  संबंधित गॅस डिलर कडून आवेदन पत्र (KYC) भरून घेऊन उज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन देण्याचे उदिष्ट या विशेष मोहिमेंतर्गत 100% पूर्ण करण्याच्या सूचना सर्व अधिकारी, कर्मचारी व पुणे जिल्हयातील सर्व गॅस वितरक यांना  करण्यात आल्या .

जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जिल्हयातील सर्व गॅस वितरक तसेच सर्व तहसिल कार्यालयाचे अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.

००००

कृषी मंत्री डॉ. अनिल

भारताच्या औद्योगिक विकासामध्ये पुणे जिल्ह्याचे भरीव योगदान -संजय (बाळा) भेगडे

0

पुणे  :  नॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ पेर्सोनेल  मॅनेजमेंट (एनआयपीएम) च्या पुणे विभागाच्या वतीने मराठा चेंबर्स  ऑफ कॉमर्सच्या सभागृहात आयोजित  करण्यात आलेल्या  मनुष्यबळ  व्यवस्थापकांशी  परिसंवाद  कार्यक्रमात  बोलताना  राज्याचे कामगार राज्यमंत्री  संजय (बाळा) भेगडे  म्हणाले कि,   भारताच्या  एकूण  औद्योगिक विकासात  पुणे  जिल्ह्याचे  भरीव योगदान  असून  जिल्ह्यात औद्योगिक शांतता  नांदण्याच्या दृष्टीने  कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून  आपण योग्य ती जबाबदारी  पार पाडू  व कोणत्याही प्रसंगाला  किंवा औद्योगिक क्षेत्राला  अडचण  येऊ नये यासाठी  खंबीरपणे  उद्योगक्षेत्रासोबत उभे असल्याचे आश्वासन  दिले. तसेच मनुष्यबळ  व्यवस्थापकांच्या विविध  तक्रारी व अडचणी  यावेळी त्यांनी समजून घेतल्या व त्यावर शासन दरबारी सर्व प्रकारांचा सखोल  अभ्यास करून त्याचे निराकरण करण्यात येईल असे सांगितले. कारखाना  कायद्यातील जाचक तरतुदींबद्दल  मनुष्यबळ  व्यवस्थापकांनी  उपस्थित  केलेल्या प्रश्नांवर  त्यांनी सकारात्मक चर्चा केली.

याप्रसंगी  पिंपरी चिंचवड  महानगरपालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार, पुणे जिल्ह्याचे कामगार उप आयुक्त  विकास पनवेलकर, एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष  विश्वेश  कुलकर्णी, एनआयपीएम पुणे विभागाचे उपाध्यक्ष  कॅप्टन डॉ. सी. एम. चितळे, लेबर  लॉ प्रॅक्टिशनर्स  असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. आदित्य  जोशी, व्हायब्रंट  एच आर चे अध्यक्ष  शंकर  साळुंखे, ओएचआर चे प्रशांत  इथापे  आदी  उपस्थित  होते.

यावेळी बोलताना एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष  विश्वेश  कुलकर्णी यांनी सांगितले कि, मनुष्यबळ  व्यवस्थापकांना  राष्ट्रीय दर्जा  प्राप्त होण्यासाठी  एनआयपीएमच्यावतीने  एक चळवळ  उभी राहत असून यात  सर्वांनी  सहभागी  होण्याचे त्यांनी  आवाहन केले.औद्योगिक क्षेत्रात पुणे जिल्हा देशात अव्वल  असून या  जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वाकडे  कामगार  राज्यमंत्रीपदाची  जबाबदारी आल्याने या भागातील  औद्योगिक क्षेत्रातील  समस्या, प्रश्न  लवकर निकाली निघतील, तसेच  जिल्ह्यात औद्योगिक शांतता निर्माण होईल असा विश्वास  त्यांनी व्यक्त केला.

यावेळी संजय (बाळा ) भेगडे यांचा कामगार राज्यमंत्रीपदी नियुक्ती  झाल्याबद्दल पुणेरी पगडी, उपरणे व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनआयपीएमच्या  कार्यकारी  समिती  सदस्य  हेमांगी  धोकटे यांनी आभार प्रदर्शन एनआयपीएमचे  सचिव नरेंद्र  पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन योगेश  रांगणेकर यांनी केले. या कार्यक्रमाला  पुणे जिल्ह्यातील विविध  औद्योगिक कंपन्यांचे  मनुष्यबळ  व्यवस्थापक  मोठ्या  संख्येने  उपस्थित  होते.

जुन्नर येथे एटीएम फोडण्याच्या अयशस्वी प्रयत्न ,दरोड्याच्या प्रयत्नातील एकूण 7 आरोपींना अटक,

0
जुन्नर /आनंद कांबळे 
 जुन्नर शहरात  हिताची कंपनीचे एटीएम फोडण्याच्या प दरोडे खोरांना प्रयत्न  फसला.तर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एटीएम फोडणाऱ्या टोळीतील 7 जनांना अटक करण्यात आली.जुन्नर पोलिसांच्या या कारवाईत अटक आरोपीकडील हत्यारे तसेच दुचाकी वाहन जप्त करण्यात   आले असुन पोलीसांच्या या धाडसी कारवाईचे  कौतुक होत आहे.पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी ही माहिती दिली.जुन्नर शहराचे  प्रवेशद्वाराजवळ हिताची कंपनीचे एटीएम आहे.मंगळवारी रात्री जुन्नर पोलीस ठाण्यात  एका नागरिकाने सतर्कता दाखवीत सदर एटीएम फोडण्याचा अज्ञात चोरटे प्रयत्न करत असल्याची माहिती फोनवरून दिली.जुन्नर पोलिसांचे पथक तातडीने याठिकाणी जाऊन पोहचले असता त्या ठिकाणी एटीएम बाहेर दोन जन अंधारात उभे होते तर एकजण एटीएम बाहेर गुप्ती घेऊन उभा होता.पोलिसांनी हटकले असता एटीएम मधुन पाच जण बाहेर पडले.हे पाच जण एटीएम मध्ये लोखंडी  गजांच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत होते.पोलिसांनी यातील  दोघांना पकडले तर पाच जण पळून जाण्याचा यशस्वी झाले.यातील तिघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले.ज्ञानेश्वर वारखेडे,भीम  भोईर ,योगेश लिहे रहाणार वेळे तालुका मुरबाड,रेहान उर्फ  बच्चू हसन सय्यद रा जुन्नर,संकेत गायकवाड,रहाणार जुन्नर,कांताराम महाबरे,युवराज साळवे रा जुन्नर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार जुन्नर येथील कां ताराम महाबरे,युवराज साबळे यांनी इतर आरोपींना फोन करून जुन्नर येथे एक काम वाजवायचे आहे असे सांगुन बोलावून घेतले होते.सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद साबळे,पोलीस हवालदार मुकुंद मोरे ,राजेंद्र बुरुड,भरत सुर्यवंशी ,प्रशांत पवार,सुनील काटे,संदीप लोहकरे गणेश जोरी,या कर्मचाऱ्यांनी दरोडे खोरांना रंगेहाथ पकडले असून फरारी आरोपींचा शोध सुरू आहे.पोलीस निरीक्षक युवराज मोहिते करत आहेत.

बांद्रा-कुर्ला संकुल हे व्यवसायासाठी देशातील आदर्श स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

जपानच्या बांधकाम क्षेत्रातील कंपनीस बीकेसीतील भूखंडाचे देकारपत्र प्रदान 

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा बांद्रा कुर्ला संकुलातील सी ६५ हा भूखंड जपानच्या मे. गोईसू रियल्टी प्रा. लिमिटेड कंपनीला देण्यासंदर्भातील देकार पत्राचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कंपनीचे अध्यक्ष कोजून निशीमा यांच्याकडे करण्यात आले. यावेळी बांद्रा-कुर्ला संकुल हे व्यवसायासाठी मुंबई व देशातील आदर्श स्थान असून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राच्या स्थापनेनंतर हे संकुल जागतिक घडामोडीचे केंद्र होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात जपानचे भारतातील मुख्य कौन्सिल मासाहिडे सोतो, कंपनीचे संचालक हिसातोषी काटायामा, संपादन विभागाचे प्रमुख रायजू अमामिया, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे यावेळी उपस्थित होते.

गोईस रियल्टी ही जपानमधील बांधकाम क्षेत्रातील कंपनी आहे. थेट परकीय गुंतवणूक अंतर्गत या कंपनीची उपकंपनी असलेली सुमोटोमो रियल्टी डेव्हपलमेंट कंपनी ही भारतात गुंतवणूक करणार आहे. त्यासाठी प्राधिकरणाच्या वतीने बांद्रा कुर्ला संकुलातील सी-65 हा भूखंड गोईस रियल्टी कंपनीस 2 हजार 238 कोटी इतक्या रकमेस भाडेपट्टीने देण्यात आला आहे. यासंबंधीचे देकार पत्र आज कंपनीला देण्यात आले. 12 हजार 486 चौ.मी. भूखंडावर ही कंपनी इमारत उभी करणार आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, बांद्रा-कुर्ला संकुलात मोठमोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. गोईस रियल्टीच्या सुमोटोमो कंपनीने बांद्रा-कुर्ला संकुलात गुंतवणूक केल्यामुळे येत्या पाच वर्षात तिची भरभराट होईल. सुमोटोमो व एमएमआरडी यांच्यातील सहकार्याचा हा क्षण भविष्यासाठी मोलाचा ठरणार आहे. बांधकाम क्षेत्रातील हा सर्वात मोठा सौदा असून या व्यवहारामुळे गुंतवणूकदारांसाठी नवीन मार्ग खुला झाला आहे.

बांद्रा कुर्ला संकुलाची माहिती देऊन महानगर आयुक्त श्री. राजीव म्हणाले की, वेगाने विकसित होत असलेल्या बांद्रा-कुर्ला संकुलामध्ये अधिकाधिक जागतिक कंपन्या गुंतवणूक करीत आहेत.

श्री. निशीमा म्हणाले की, गोईसू ही कंपनी जपानमधील बांधकाम व्यवसायात अग्रेसर आहे. मुंबई हे ठिकाण व्यवसायासाठी उत्तम असल्यामुळे येथे गुंतवणूक करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. यापुढील काळातही कंपनी येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. त्यातून राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल.