Home Blog Page 2877

होंडा 2व्हीलर्स इंडिया आणि कॅस्ट्रॉल इंडिया यांनी केली भागीदारी

विशेषतः होंडा मोटरसायकल्स व स्कूटर्स यांसाठी तयार केलेल्या कॅस्ट्रॉल अॅक्टिव्ह होंडाल्युब्रिकंट्सला होंडा 2व्हीलर्स देणार पाठबळ

दिल्ली: 40 दशलक्षहून अधिक समाधानी व आनंदी ग्राहकांच्या परिवाराला आणखी आनंदी देण्यासाठी, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने कॅस्ट्रॉल या भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह व औद्योगिक ल्युब्रिकंट उत्पादक कंपनीशी भागीदारी केल्याचे आज जाहीर केले आहे. या कराराचा भाग म्हणून, प्रामुख्याने होंडाच्या टू-व्हीलर्ससाठी तयार केलेल्या नव्या कॅस्ट्रॉल अॅक्टिव्ह ल्युब्रिकंट्सला होंडा पाठबळ देणार आहे.

कॅस्ट्रॉल अॅक्टिव्ह होंडा ल्युब्रिकंट्स नव्या नियमांचे पालन करतात, तसेच त्यामध्ये दर्जेदार बेस ऑइल वअॅडिटिव्ह यांचा मेळ साधला आहे. भारतातील सर्व स्थितींमध्ये चांगली कामगिरी केली जावी, यासाठी नव्या इंजिन ऑइलची होंडाने कसून चाचणी केली आहे. ही उत्पादने उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी, इंजिनामध्ये धूळ साचण्यापासून संरक्षण करण्यासाठी आणि होंडा 2व्हीलर्सकडून चांगले अॅक्सिलरेशन व उच्च इंधनक्षमता साधण्यासाठी तयार केली आहेत.

या सहयोगाविषयी बोलताना, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे कस्टमर सर्व्हिसचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप कुमार पांडे यांनी सांगितले, “होंडामध्ये आम्ही नेहमी ग्राहकांना सातत्याने उच्च दर्जाची उत्पादने व सेवा दिल्या आहेत. होंडा व कॅस्ट्रॉल अनेक वर्षे जागतिक ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी उत्पादनाच्या कामगिरीला नवे आयाम देत आहेत. कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडसारख्या विश्वासार्ह कंपनीशी भागीदारी करताना आणि होंडा2व्हीलर्ससाठी विशेषतः तयार केलेले कॅस्ट्रॉल अॅक्टिव्ह होंडा ल्युब्रिकंट्स दाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. भारतीय टू-व्हील उद्योगासाठी नवे बेंचमार्क निर्माण करण्यासाठी भविष्यात हा सहयोग आम्हाला अधिक सक्षम करायचा आहे.”

उत्पादन दाखल करत असताना, कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ओमर डॉर्मन यांनी सांगितले,“ऑटोमोबाइल उद्योगामध्ये तंत्रज्ञानाच्या बाबतीत जागतिक स्तरावर आघाडीवर असणाऱ्या होंडाशी सहयोग करणे, हा आमचा सन्मान आहे. ग्राहकांना सर्वाधिक प्राधान्य देणे, हे दोन्हीही ब्रँडचे उद्दिष्ट आहे, त्यांना या श्रेणीतील सर्वोत्तम सेवेबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उच्च कामगिरी करणारी सोल्यूशन्स देण्याचा हे ब्रँड प्रयत्न करत आहेत. होंडा व कॅस्ट्रॉल यांच्यामध्ये अनेक बाबतीत सहयोग आहे आणि विश्वासार्ह व नावीन्यपूर्ण असणे अशी सामायिक मूल्ये आहेत. आम्ही होंडाबरोबर दीर्घकालीन नाते निर्माण करण्यासाठी आणि वाहतुकीसाठी शाश्वत भविष्य साकारण्यासाठी संयुक्तपणे वाटचाल करण्यासाठी उत्सुक आहोत.

नवे कॅस्ट्रॉल अॅक्टिव्ह होंडा ल्युब्रिकंट्स आता कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडच्या विस्तृत राष्ट्रीय वितरण जाळ्यामध्ये सर्वत्र उपलब्ध होणार आहे.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. (एचएमएसआय) या जपानमधील होंडा मोटर कंपनीच्या (जगातील पहिल्या क्रमांकाची टू-व्हीलर कंपनी) 100% उपकंपनीने मे 2001 मध्ये भारतातील 2व्हीलर व्यवसाय सुरू केला. 19व्या वर्षात असणाऱ्या होंडा टू-व्हीलर इंडियाने भारतात 43 दशलक्षहून अधिक समाधानी ग्राहक जोडले आहेत आणि 4 प्रकल्पांची एकूण उत्पादनक्षमता वार्षिक 6.4 दशलक्ष युनिट आहे. होंडाच्या टू-व्हीलर्सच्या विशेष रेंजमध्ये देशांतर्गत उत्पादनांमध्ये 6 स्कूटर्स (अॅक्टिव्हा 5G, अॅक्टिव्हा 125, अॅक्टिव्हा i, एव्हिएटर, डिओ व ग्रेझिया), 9 मोटरसायकल (CD 110 ड्रीम, ड्रीम युगा, लिव्हो, CB शाइन, CB शाइन SP, CB युनिकॉर्न, CBहॉर्नेट 160R, X-ब्लेड व CBR 250R) आणि 6 फन बाइक्स (CB300R, CBR650R, आफ्रिका ट्विन, CB1000R, CBR1000RR व गोल्ड विंग) यांचा समावेश आहे.

होंडा कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड

कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड ही भारतातील एक आघाडीची ल्युब्रिकंट्स कंपनी असून तिने ल्युब्रिकंट्समधील प्रवर्तक व नवशोधक म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहेकॅस्ट्रॉल CRB, कॅस्ट्रॉल GTX आणि अलीकडच्या काळातीलकॅस्ट्रॉल अॅक्टिव्हकॅस्ट्रॉल मॅग्नाटेक व कॅस्ट्रॉल व्हेक्टन असे पॉवर ब्रँड, हे कंपनीचे ब्रँड देशभरातील लाखो ग्राहक वापरत आहेत. कंपनी ऑटोमोटिव्ह उत्पादनापासून खाणकाम, मशीनरी आण पवन व ऊर्जा अशा उद्योगांत हाय परफॉर्मन्स आणि उद्योगातील ल्युब्रिकंट्स व मेटलवर्किंग फ्लुइड्स अशा निवडक श्रेणींमध्येही कार्यरत आहे.कॅस्ट्रॉल इंडियाचे भारतात मोठे उत्पादन व वितरण जाळे आहे आणि 100,000 हून अधिक रिटेल आउटलेटद्वारे ग्राहकांना विक्री करणाऱ्या 350 वितरकांचे वितरण जाळे आहे. कॅस्ट्रॉल उप-वितरक ग्रामीण भागातील अतिरिक्त आउटलेटपर्यंत पोहोचतात, तर कॅस्ट्रॉल इंडिया 3,000 हून अधिक प्रमुख संस्थात्मक खात्यांना थेट सेवा देते.

खगोल विश्वात रमले विद्यार्थी

0

प्रा. लुईस डार्टनेल यांनी साधला गोयलगंगा स्कूलच्या विद्यार्थ्याशी संवाद

पुणे   : “ पृथ्वी हा ग्रह  या अफाट विश्वात छोट्याशा बिंदूएवढा. फक्त पृथ्वीवरच जीवसृष्टी आहे, असं मानणे संयुक्तिक ठरणार नाही. शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, परग्रहावर नक्कीच जीवसृष्टी असायला हवी. ती सूक्ष्म जंतू किंवा साध्या प्राण्याच्या स्वरुपात असू शकेल”  अशी माहिती देणाऱ्या प्रा. लूईस यांचे व्याख्यान  तल्लीनतेने ऐकतानागोयलगंगा इंटरनैशनल स्कूलचे विद्यार्थी खगोलशास्त्र विश्वात रमून गेले.

वेस्टमिन्स्टर विद्यापीठातील प्राध्यापक लुईस डार्टनेल यांनी खगोलजीवशास्त्र (ॲस्ट्रोबायोलॉजी) आणि मंगळावरील सूक्ष्मजीव यांचे जीवन याविषयांवर संशोधन केले आहे. लुईस शाळांमध्ये आणि विज्ञान प्रदर्शनामध्ये खगोल जीवशास्त्राविषयी विद्यार्थांना मार्गदर्शन करत असतात. याच उपक्रमांतर्गत त्यांनी गोयलगंगा इंटरनैशनल स्कूल भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी लुईस यांनी ‘जीवन’ या शब्दाचा खरा अर्थ काय? इतर ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्त्वात आहे का?  या विषयी शास्त्रज्ञांकडून झालेली संशोधने इतर ग्रहांवर जीवनाच्या संभाव्य अस्तित्वाबद्दल त्यांनी आपले विचार मांडले. ते स्वत: ज्या प्रकल्पाचा भाग म्हणून काम करत आहेत अशा ‘एक्सोमार्स २०२०’ या प्रोजेक्टची देखील त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच परग्रहावर सापडल्या जाणाऱ्या प्रजाती यांच्याविषयी विद्यार्थ्यांना ओळख करून दिली.

प्रो. डार्टनेल यांनी वैज्ञानिक सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम पहिले आहे. असंख्य माहितीपट आणि रेडीओ कार्यक्रमांमध्ये देखील काम केले असले तरी विद्यार्थ्यांशी त्यांनी अतिशय मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यांच्या संवादाने प्रभावित झालेल्या विद्यार्थांनी व्याख्यानाचे सत्र संपन्न झाल्यावर जिज्ञासू वृत्तीतून त्याच्याभोवती घेरा घातला. प्रश्न उत्तरांने याची सांगाता झाली.

३७० कलम हटविणे ही ऐतिहासिक घटना प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांचे प्रतिपादन

0

पुणे:“ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज ऐतिहासिक घोषणा करत जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारं वादग्रस्त ३७० कलम अंशतः हटवण्याचा प्रस्ताव सादर केला. त्यामुळे एमआयटी संस्थेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या स्वागताचा ठराव पारित केला. या घोषणेमुळे विश्‍वशांतीसाठी उचलेले एक पाऊल आहे.”असे विचार माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समुहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड यांनी मांडले.
माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समुहातर्फे माईर्स एमआयटीचा ३७ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माईर्स एमआयटी अध्यक्ष डॉ. सुरेश घैसास, संस्थापक विश्‍वस्त प्रा. प्रकाश जोशी, अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, विश्‍वस्त डॉ. चंद्रकांत पांडव, कोलकाता येथील चित्तरंजन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे प्रा.डॉ.बी.पी. चॅटर्जी, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डॉ. आर.एम.चिटणीस व प्रा.डी.पी. आपटे आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय हे उपस्थित होते.
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ ऑगस्ट महिना हा खरच महत्वपूर्ण आहे. १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी, ५ ऑगस्टला एमआयटीचा स्थापना दिवस व काश्मीर येथून ३७० ची धारा हटविण्यात आली, ९ ऑगस्ट क्रांती दिवस आणि १५ ऑगस्ट स्वातंत्र दिवस आहे. जे भारताच्या इतिहासाठी व विश्‍वशांतीसाठी महत्वपूर्ण आहे. २१व्या शतकात भारत विश्‍वगुरू म्हणून उदयास येणाच्या दृष्टीने आमचा काय सहयोग असेल यावर विचार करावा.”
“शिक्षकांच्या निरलस कार्यामुळे ५ खोल्यांतून सुरू केलेल्या संस्थेचा आज मोठा वटवृक्ष झाला आहे. संस्थेचे ४ विद्यापीठे आणि विश्‍वशांतीचा नारा देणारा जगातील सर्वात मोठ्या घुमटाची निर्मिती झाली.”
प्रा.पी.बी.जोशी म्हणाले,“ एमआयटीने सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवल्यामुळे या रोपाचे वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. ही शिक्षकांनी चालविलेली संस्था असल्यामुळे येथील विद्यार्थी हा परिपूर्ण आहे. येथे कार्यरत प्रत्येक कर्मचार्‍यांनी आपले व्यक्तिमत्व वाढविण्यासाठी निरंतर वाचन करावे. तसेच कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये. जो मनापासून काम करेल तोच पुढे जाईल हे सूत्र लक्षात ठेवावे.”
डॉ. चंद्रकांत पांडव म्हणाले,“विश्‍वशांतीचा नारा देण्यासाठी उभारण्यात आलेला या डोम मधून सद्भवना, प्रेम, सहिष्णूता, मानवता, शांती आणि  वसुधैव कुटुंम्ब कमचा नारा दिला जाता आहे. हा संदेश पृथ्वीतलावरील सर्वांनाच आनंद देणारा आहे.”
डॉ. बी.पी. चॅटर्जी म्हणाले,“ विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयाच्या आधारे चालणारी ही संस्था शिक्षण क्षेत्रात नवे मापदंड स्थापित करीत आहे. येथे शिक्षणाबरोबरच, संशोधन, रिसर्च या गोष्टींवर अधिक भर देत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे येथील शिक्षक जे समर्पित भावनेने कार्य करीत आहेत.”
डॉ. मंगेश कराड म्हणाले,“समाजातील गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे विद्यापीठ शिक्षण क्षेत्रात नव नवे बदल घडवून आणित आहे. ज्या पद्धतीने जगात मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहेत त्या अनुसरूण आम्ही लिबरल ऑर्ट, वेगवेगळ्या विषयातील इंजिनियरींगच्या शाखा उघडल्या,जेणे करूण विद्यार्थी हा सर्व आव्हानांचा सामना करू शकेल. एमआयटीच्या विद्यार्थ्यांना तयार करून राष्ट्र निर्मितीचे कार्य केले जात आहे.”
प्रा. राहुल कराड म्हणाले,“ विज्ञान आणि अध्यात्माचा सन्मवय हा नवा विचार एमआयटीने या जगाला दिला आहे. तसेच, जगातील सर्वात मोठ्या घुमटाची निर्मिती करून विश्‍वशांतीचा नारा देणारे कदाचित हे एकमेव विद्यापीठ आहे. एमआयटीची स्थापनेनंतर आजपर्यंतचा कार्यकाळ हा वेगळा होता. परंतू आजच्या परिस्थितीत खूप मोठा फरक दिसून येतो. हा बदल काळानुरूप असल्याने प्रत्येकाने बदलत्या कार्यपध्दतीचा स्वीकार करून पुढे चालत रहावे. त्यातूनच एमआयटीचे नाव जगभरात पोहचण्यास मदत होईल. या बदलात सर्वांनी सहभागी व्हावेे.”
माईर्स एमआयटीच्या ३७ व्या स्थापनादिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या वाटचालीत महत्वाचे योगदान देणार्‍या नऊ कर्मचार्‍यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये एमआयटी स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या कोर्स हेड प्रा.डॉ. करुणा गोळे, एमआयटी डब्ल्यूपीयूचे उप कुलसचिव उत्तम पडवळ, एमआयटी डब्ल्यूपीच्या ग्रंथालयाचे प्रमुख नितिन जोशी, लोणी येथील विश्‍वशांती गुरूकुलाचे विजय अंभोरे, एमआयटी डब्ल्यूपीयूच्या हाऊस किपींग विभागाचे व्यवस्थापक गोकुळ पोमण, तळेगाव दाभाडे येथील मायमर मेडिकलचे कॉलेज सतिश मिटकरी, माईर्स एमआयटीचे मनोज तारू, माईर्स एमआयटीचे प्रभाकर गोर व लातूर येथील एमआयएमएसआर वैद्यकिय महाविद्यालयाचे नैय्यूम पठाण यांचा ‘माईर्स एमआयटी फाउंडेशन डे ’ पुरस्काराने सन्मान केला गेला.
यावेळी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी एमआयटीला आपल्या संदेशतून शुभेच्छा दिल्या.
प्रा. डॉ.एल.के.क्षीरसागर यांनी प्रस्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आर.एम.चिटणीस यांनी आभार मानले.

जम्मू-काश्मीरबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला आमचा पाठिंबा – केजरीवाल

0

नवी दिल्ली -केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे, अशी भूमिका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आज(दि.5) जम्मू-काश्मीरबाबत ऐतिहासिक निर्णय जाहीर केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया आली आहे. सातत्याने मोदी सरकारच्या निर्णयांवर टीका करणाऱ्या केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाला पाठिंबा दिल्याने त्यांची ही प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जातेय.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत जम्मू-काश्मीरच्या विभाजन करण्याची घोषणा करत त्या संदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक मांडलं. यामध्ये त्यांनी कलम 370 हटवण्याबाबतची माहिती दिली आहे. यासोबतच जम्मू काश्मीर राज्याची पुनर्रचना करण्याबाबतचा प्रस्तावही त्यांनी मांडला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू-काश्मीर व लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश होणार आहेत, तसंच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेचं अस्तित्वही कायम राहणार आहे. केजरीवाल यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, ”केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापीत होईल आणि वेगाने विकास होईल ही अपेक्षा आहे” असं म्हटलंय. ट्विटरद्वारे केजरीवाल यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

७० वर्षांनी देशावरचा कलंक हटवलाः संजय राऊत

0

नवी दिल्ली -गेल्या ७० वर्षांपासून जम्मू- काश्मीरच्या कलम ३७० चा कलंक घेऊन हा देश जगत होता. पण केंद्र सरकारने आज हा कलंक हटवला आहे, असं सांगत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय. जम्मू-काश्मीरचा आज खऱ्या अर्थाने भारतात समावेश झाला, असं राऊत म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर, दीनदयाल उपाध्याय, पंडित श्यामा प्रसाद मुखर्जी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे स्वप्न होतं. या निर्णयाबद्दल हे नेते आज केंद्र सरकार स्वार्गातून पुष्पवृष्टी करत असतील. ७० वर्षांपासून हा निर्णय रोखून धरला होता. संपूर्ण देश या निर्णयाची अतूरतेने वाट पाहत होता. अखंड भारताचा विचार केला तर जम्मू-काश्मीरचा १९४७ ला नाही तर खऱ्या अर्थाने आज भारतात समावेश झाला आहे, असं राऊत म्हणाले. ३७० हटवण्याविरोधात धमक्या दिल्या जात होत्या. तर ३७०ला हात लावाल तर दंगली भडकतील. हात पोळतील. हिम्मत असेल तर हात जाळून दाखवा. हे सरकार गप्प बसणार आहे. पंतप्रधा मोदी आणि गृहमंत्री शांत राहणार नाहीत. ही जाळण्याची आणि धमक्यांची भाषा आता बंद व्हायला हवी. हे सरकार किती भक्कम आहे आणि देश अखंड ठेवण्यासाठी कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो. ती हिम्मत ते धाडस या सरकारनं दाखवलं आहे. सरकार किती भक्कमपण आहे, हे यावरून स्पष्ट होतं, असं संजय राऊत यांनी आधोरेखित केलं.

कलम ३७० हटवण्याला विरोध करणारे तेच आहेत ज्यांनी ७० वर्षांपासून जम्मू-काश्मीरच्या जनतेचे शोषण केलं. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखलं. भारत आपला शत्रू आहे हे शिकवं. पण काश्मिरी पंडित असो की तेथील मुस्लिम बांधव सर्वांचीच ३७० कलम हटवण्याची इच्छा होती. पण ते होऊ दिले नाही जात नव्हते. मात्र आता हा निर्णय झालाय. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, ८ ऑगस्ट क्रांती दिन आणि आजचा ५ ऑगस्ट हा दिवसही एक क्रांतिकारी ठरला आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
हा अतिशय कठीण निर्णय आहे. धाडसी आहे. याला विरोध होणार. पण विरोधक झोपलेत. त्यांना झोपू द्या. आपण काम करू. आज जम्मू- काश्मीर आले. उद्या बलुचिस्तान मिळवू आणि अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करू. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा नक्कीच अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करतील, अशी आशा आहे, असं सांगत राऊत यांनी सरकारचे अभिनंदन केले.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/715758498864355/

भाजपाने राज्यघटनेची हत्या केली आहे – गुलाम नबी आझाद(व्हिडीओ)

0

नवी दिल्ली -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेत जम्मू-काश्मीरला लागू असलेले घटनेचे कलम ३७० हटवण्याची शिफारस मांडली. यामुळे जम्मू काश्मीरमध्ये मंत्रिमंडळ असेल परंतु या कायद्याला केंद्रशासित राज्याचा दर्जा असेल. तर लडाख हा मंत्रिमंडळ नसलेला केंद्रशासित प्रदेश असेल असा प्रस्ताव अमित शाह यांनी राज्यसभेत मांडला. यामुळे काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्यात येणार आहे. या तरतुदीमुळे जम्मू व काश्मीर यांचा दर्जा अन्य राज्यांप्रमाणेच होणार आहे. अमित शाह यांनी ही शिफारस मांडताच संसदेत मोठया प्रमाणावर गदारोळ झाला.

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत टीका करताना भाजपाने आज राज्यघटनेची हत्या केल्याचं म्हटलं आहे. “आमचा भारतीय राज्यघटनेवर पूर्ण विश्वास आहे. राज्यघटनेची सुरक्षा करण्यासाठी आम्ही जिवाची बाजी लावू. पण आज भाजपाने राज्यघटनेची हत्या केली”, असं गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.यांनी माध्यमांशी बोलताना पहा काय म्हटले आहे

बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं, देशाने आनंदोत्सव साजरा करावा; काश्मीरच्या ऐतिहासिक निर्णयावर उद्धव ठाकरे

0

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या काश्मीरवरील ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले. देशाने यावर आनंदोत्सव साजरा करावा असे ठाकरे म्हणाले. सोबतच, शिवसेना आणि भाजप सरकारने निवडणुकीत जनतेला कलम 370 हटवण्याचे आश्वासन दिले होते. तेच आश्वासन आज पूर्ण होत आहे असेही शिवसेना पक्ष प्रमुख म्हणाले आहेत.

पोलादी नेतृत्व आजही आहे हे मोदींनी दाखवले
उद्धव ठाकरेंनी या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारचे तोंडभर कौतुक केले. गेल्या अनेक वर्षांपासून कलम 370 आणि काश्मीरवर कुण-कुण सुरू होती. परंतु, काही गोष्टी वेळेवरच उघड करायच्या असतात. मोदींनी पोलादी नेतृत्व देशात आजही आहे हे सिद्ध करून दाखवले. आता दुसऱ्या देशांना यात नाक खुपसायची गरज नाही असेही उद्धव यांनी ठणकावले आहे.

35 A हटवल्यास देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील – डॉ. प्रकाश आंबेडकर

0

पुणे – काश्मिरी लोकांना राज्यघटनेतील 35 A व्या कलमाने मिळालेले संविधानिक संरक्षण काढून टाकण्याच्या गोष्टी सुरू आहेत. याचे देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील. काश्मिरातील सैन्य आहे. तो पर्यंत तेथील जनता शांत राहिल. सैन्य मागे घेतल्यावर अथवा लढण्याची ताकद मिळताच जनता पुन्हा सैन्यासोबत लढेल. हा भारतीय जवान शहिद जवानाला शहिद करण्याचा सरकारचा डाव आहे. पोकळ राष्ट्रवादाची भूमिका सरकार मांडत आहे. याचे गंभीर परिणाम आपल्या देशाला भोगावे लागतील. असा इशारा डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. सरकारने काश्मिरी जनतेसोबत चर्चा करावी. असा सल्ला केंद्रसरकारला दिला. लोकांनी मतदान करून पंतप्रधानपदी बसवलं म्हणजे देशाचे नाही. म्हणून यावर निर्णय घेऊ शकत नाही. देशातील जनतेला विश्वासात घेऊनच हा प्रश्न सोडवावा लागेल. अशी टीका आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

श्रीनगर शहर भीतीच्या छत्रछायेखाली
काश्मिर प्रश्नावर सरकार घेत असलेल्या भूमिकेविरोधात जागोजागी मोर्चे आंदोलने करतील.
काश्मीर मधील स्थानिक राजकीय पक्ष व तेथील जनता सरकार विरोधात आहे. काश्मीर मधील लडाख प्रांतातील लामा भितीच्या छत्रछायेखाली आहेत. नेहमी सरकार सोबत असणारे श्रीनगर शहर भितीच्या छायेत आहे. काश्मिरमध्ये कोणतीही कारवाई करण्याअगोदर सरकारने विरोधी पक्षांना विश्वासात घ्यायला हवे.

काश्मीरात कलम 370 हटवून मोजक्याच तरतूदी ठेवणार, राज्यसभेत शिफारस

0

नवी दिल्ली – जम्मू आणि काश्मीवर मोठा निर्णय घेण्यासाठी केंद्रीय कॅबिनेटची महत्वाची बैठक सोमवारी सकाळी पार पडली. यानंतर काश्मीरवर झालेला सर्वात मोठा निर्णय संसदेला देण्यासाठी राज्यसभेच्या कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम 370 हटवण्याची शिफारस केली. 370 कलम हटवून त्यातील मोजक्या तरतूदी लागू ठेवल्या जातील असेही गृहमंत्री म्हणाले. यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्याच्या अवघ्या काही महिन्यात हा निर्णय घेण्यात आला. देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा निर्णय मानला जात आहे.

Live Updates

– काश्मीरवर देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा प्रस्ताव, काश्मीरची पुनररचना करण्याची शिफारस

– काश्मीरातून कलम 370 हटवणार, गृहमंत्री अमित शहा यांची शिफारस

– काश्मीरात कलम 370 च्या मोजक्याच तरतूदी लागू राहणार, राज्यसभेत अमित शहा यांची स्पष्टोक्ती

– काश्मीरवर 3 विधेयके आणि 1 ठराव मांडणार अमित शहा

– गृहमंत्री अमित शहा म्हणाले, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जाईल

– काश्मीरात युद्धसदृश्य परिस्थिती -गुलाम नबी आझाद

– काश्मीरच्या सर्व माजी मुख्यमंत्र्यांना नजरकैदेत का ठेवले? सर्वप्रथम या परिस्थितीवर उत्तर द्या, गुलाम नबी आझाद यांची सभापतींना विनंती

– काश्मीर मुद्द्यावर चर्चेसाठी राज्यसभेच्या कार्यवाहीला सुरुवात

तीन माजी मुख्यमंत्री नजरकैदेत, कलम 144 लागू
जम्मू-काश्मीरमध्ये अस्वस्थतेच्या वातावरणात रविवारी रात्री १२ वाजता श्रीनगरमध्ये तीन माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. पोलिसांनुसार, संवेदनशील जम्मू-काश्मीरमध्ये रात्री १२ वाजता कलम-१४४ लागू करण्यात आले. जाहीर सभा-मोर्चांवर बंदी घालण्यात आली. मोबाइल इंटरनेट बंद करण्यात आले. सोमवारी सर्व शाळा-कॉलेज बंद राहतील.

स्वातंत्र्याच्या 7 वर्षांनंतर राष्ट्रपतींच्या आदेशाने घटनेत हे जोडले होते
कलम 35A स्वातंत्र्याच्या 7 वर्षांनंतर म्हणजे 1954 मध्ये जोडण्यात आले. हे कलम नेहरू मंत्रिमंडळाच्या शिफारशीवर तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या एका आदेशाद्वारे घटनेत जोडण्यात आले. 35 A कलमात काश्मीरच्या कायम रहिवाशांसाठी नियम केले. यात काश्मीरच्या कायम रहिवाशांसाठी विशेष अधिकार व सुविधा आहेत. त्यामध्ये नोकऱ्या, संपत्ती खरेदी-वारसा, स्कॉलरशिप, सरकारी मदत व कल्याणकारी योजनांशी संबंधित सुविधा आहेत.

35-A मधील तरतुदी 
> अन्य रहिवासी कायम रहिवासी म्हणून वास्तव करू शकत नाहीत.
> बाहेरचे लोक जमीन घेऊ शकत नाहीत. सरकारी नोकरीही मिळत नाही.
> राज्याच्या महिलेने अन्य राज्यात लग्न केल्यास हक्क हिरावले जातात.

मध्यरात्री काश्मीरमध्ये कारवाई, तीन माजी मुख्यमंत्री फारुख, उमर, मेहबूबा नजरकैदेत

0

श्रीनगर/नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये अस्वस्थतेच्या वातावरणात रविवारी रात्री १२ वाजता श्रीनगरमध्ये तीन माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. पोलिसांनुसार, संवेदनशील जम्मू-काश्मीरमध्ये रात्री १२ वाजता कलम-१४४ लागू करण्यात आले. जाहीर सभा-मोर्चांवर बंदी घालण्यात आली. मोबाइल इंटरनेट बंद करण्यात आले. सोमवारी सर्व शाळा-कॉलेज बंद राहतील. काँग्रेस नेते उस्मान माजिद व माकप आमदार एम. वाय. तारिगामी यांनी रात्री ट्विट करून आपल्याला ताब्यात घेतले जात असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, दिवसा गृहमंत्री अमित शहा व एनएसए अजित डोभाल यांची दिल्लीत बैठक झाली. दुसरीकडे श्रीनगरमध्ये फारुख अब्दुल्लांच्या निवासस्थानी मेहबूबा मुफ्ती आणि स्थानिक पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. या नेत्यांनी केंद्राच्या कारवाईचा निषेध केला.

जम्मू-काश्मीरमधील सर्व शाळा, कॉलेज बंद, सोमवारच्या परीक्षाही रद्द

> ११ वाजता मोबाइल इंटरनेट बंद केले. यामुळे काश्मीरमधून बातम्या बाहेर येणेच बंद झाले.

> राजभवनात ११.३० वाजता सुरक्षेबाबत बैठक सुरू झाली. दीड तास बैठक चालली आणि कलम १४४ लागू.

> रात्री १२.०० वाजता सुरक्षा दलांनी फारुख अब्दुल्लांच्या घरी बंदोबस्त वाढवला, श्रीनगरमध्ये चौक्या वाढवल्या.

> रात्री १२.०० वाजता श्रीनगरच्या लाल चौकास सुरक्षा दलांच्या तुकड्यांनी घेरले.

काश्मीर खोऱ्यातील नेत्यांना कठोर कारवाईची भीती…

रात्री ११ वाजता उमर अब्दुल्लांचे टि्वट…
‘आज मध्यरात्री मला घरातच नजरकैद केले जातेय असे वाटत अाहे. काश्मीरच्या अन्य प्रमुख नेत्यांना अटक करण्यासाेबत ही प्रक्रिया सुरू झाली आहे. अल्लाहच आता आमचे रक्षण कराे.’

रात्री ११.३४ वाजता मेहबूबांचे टि्वट…
‘माेबाइल कव्हरेजसह इंटरनेट सेवा बंद झाल्याच्या बातम्या येत अाहेत. संचारबंदीचे पासही जारी केले जात ऐहेत. अल्लाह जाणाे, काश्मीरमध्ये उद्या काय हाेईल. मला वाटते ही खूप लांबणारी रात्र ठरतेय.’

काश्मीरवर निर्णयाची वेळ आली : पाक पंतप्रधान
काश्मीरच्या स्थितीबाबत पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनीही इस्लामाबादमध्ये लष्कराचे उच्चाधिकारी व राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेतली. या वेळी त्यांनी काश्मीरवर निर्णयाची वेळ आल्याचे सांगितले. इम्रान खान यांनी यूएनला त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली.

सरकार दहशतीचे वातावरण तयार करतेय : मेहबूबा
मेहबूबा म्हणाल्या, यात्रेकरू, पर्यटक, मजूर, विद्यार्थी व क्रिकेटपटूंना हटवले जात आहे. दहशत निर्माण केली जात आहे, मात्र या स्थितीत काश्मिरींना दिलासा किंवा सुरक्षा देण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नाही. कुठे गेली माणुसकी, काश्मिरियत व लोकशाहीॽ

दिल्ली : साधारणपणे बुधवारी होणारी मंत्रिमंडळ बैठक सोमवारी सकाळीच बोलावली आहे.

> सोमवारी सकाळी ९.३० वाजता मंत्रिमंडळाच्या बैठकीत काश्मीरवर चर्चा होईल.

> अमित शहा संसद अधिवेशनानंतर ८ ते १० ऑगस्टला काश्मीर दौऱ्यावर जाऊ शकतात.

> जम्मू-काश्मीरमधील आर्थिक दुर्बल घटकांना १०% आरक्षण देणारे विधेयक शहा सोमवारी राज्यसभेत मांडतील.

श्रीनगर : एअर इंडियाच्या भाड्यावर ६ हजारांची मर्यादा, विविध संस्थांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

> पोलिसांनी हॉटेलमध्ये बैठक घेण्याची परवानगी नाकारली. मेहबूबांच्या घरी आयोजित बैठक अचानक उमर अब्दुल्लांच्या निवासस्थानी झाली.

> इरफान पठाणसह १०० क्रिकेटपटू काश्मीरमधून बाहेर. सुरक्षा वाढवली.

> एअर इंडियाने कमाल भाडे ६ हजार केले. श्रीनगर-दिल्ली भाडे १० हजार रुपयांपर्यंत गेले होते.

राज ठाकरेंच ईव्हीएम विरोधातील आंदोलन म्हणजे पळकुटेपणा आणि फसवेपणा-प्रकाश आंबेडकर

0

पुणे-राज ठाकरेंच ईव्हीएम विरोधातील आंदोलन म्हणजे पळकुटेपणा आणि फसवेपणा आहे. ईव्हीएम बाबातच्या आक्षेपांबाबत सुप्रिम कोर्ट आणि निवडणूक आयोगात लढा देणे गरजेचे आहे. तसे न करता केवळ आंदोलन करणार असाल तर तो पळपुटेपणा ठरेल. ईव्हीएम बाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे.असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाचा बाण सुटला आहे भाजप आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात येत आहे. कशा पद्धतीची भाषा यात वापरली जाते यावर पुढचे अवलंबून आहे. शिवेसेनेकडून बाण सुटला आहे. आता भाजप शिवसेनेच्या बैठकीत शिवसेना काय भूमिका घेते यावर सर्व अवलंबून आहे.

लोकसभेच्या निवडणुकांना काँग्रेसने वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता. त्याबाबत काँग्रेसने स्पष्टीकरण दिल्याशिवाय पूढील बोलणी करण्यात येणार नाही. पक्षांतराबाबत ते म्हणाले, ब्लॅकमेलिंग चे राजकारण सुरू आहे हे मी मानतो, परंतु राष्ट्रवादीतून जे पक्षांतर सुरू आहे त्यात अनेक नेत्यांच्या चौकश्या सुरू आहेत. त्यामुळे तिहार ऐवजी भाजप चा जेल या नेत्यांनी स्वीकारला आहे.

पक्ष फोडणे हे हिटलरशाहीचे लक्षण आहे. काँग्रेसने या आधी तसेच केले होते. आता भाजप कडून तेच चालू आहे. परंतु मी पक्ष फोडणार नाही. तसेच काँग्रेस राष्ट्रवादी मधील कोणाला पक्षात घेणार ही नाही.

दहा वर्षातील रेकॉर्ड मोडला…पुण्यातील चारही धरणे भरली

0

पुणे-
संततधार पडणाऱ्या पावसाने पुण्यात जुलैमधील गेल्या दहा वर्षांतील “रेकॉर्ड’ मोडले. यापूर्वी 2014 मध्ये 282.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. या वर्षी जुलैच्या तीस दिवसांमध्ये 359.2 मिलिमीटर पाऊस नोंदला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.सन २००५ नंतर यावर्षी इतक्या मोठ्या प्रमाणावर नदीपात्रात पाणी आल्याने नागरिकांत औत्सुक्याचा विषय आहे. अनेक जण नदी किनारी जाऊन पुराचे पाणी पाहण्याचा आनंद लूटताना दिसत आहेत.

सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग वगळता पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांसह विभागातील इतर धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून कोयना धरणात सकाळी ११ वाजेपर्यंत ९४.९४ टिएमसी पाणी साठा झाला असून उजनी धरणातही ८८.७९ टिएमसी पाणी साठा झाला आहे. पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये पाण्याचा मोठा साठा झाला असून भूगर्भातील पाणी साठा वाढण्यास मदत होणार आहे.
या पावसामुळे खरीप पिकांच्या पीकांना नवसंजिवनी मिळाली आहे. काही धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे.

पुणे जिल्हा-

पुणे जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे बहुतांश धरणे भरली आहेत. लोणावळा जलाशयात गेल्या पाच ते सहा तासामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. भामआसखेड धरणातून भामा नदीला विसर्ग वाढविण्यात आला आहे. मुळशी धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असून गेल्या 48 तासात 900 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुळशी धरणातून विसर्ग सुरू आहे, चासकमान धरण परिसरात पर्जन्य वाढल्यामुळे भीमा नदीला विसर्ग सुरू आहे.
खडकवासला धरणातून सकाळी 11 वाजल्यापासून विसर्ग सुरू असून पानशेत वरसगाव धरण शंभर टक्के भरल्यामुळे या दोन्ही धरणातून वाढविण्यात आला आहे. एकूणच पुणे जिल्ह्यात दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे बहुतांश धरणे भरली आहेत.

पुणे जिल्ह्यातील ब्रिटिश कालीन भाटघर धरण शंभर टक्केले आहे. धरणाचे सगळे दरवाजे उघडण्यात आले आहे. 8 हजार क्यूसेस पाणी सोडण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शहराच्या पश्‍चिम क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसाने धरणे भरुन वाहू लागली आहेत. सर्वच धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग चालू आहे. यामुळे मुळा मुठा नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. येथील एम आय टी काॅलेजच्या आवारात पाणी मोठ्या प्रमाणात शिरले आहे.

मांजरी येथील पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच लोणी काळभोर येथील एमआयटी संस्थेतील काही भागाला पुराच्या पाण्याने वेढले आहे. थेऊर येथील स्मशानभूमीत पाणी शिरले आहे. कोलवडी थेऊर दरम्यान असलेला मुळा- मुठा नदीवरील पुलास पाणी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एमआयटी कॉलेजच्या इमारती जवळ पाणी साचल्याने महाविद्यालय आवारात तसेच गार्डन परिसरातील ईमारतीना पाण्याने वेढले आहे.

विश्रांतवाडी येथील शांतीनगर वसाहतीत पावसाचे पाणी घुसले आहे. सुमारे 40 घरात हे पाणी घुसले असून नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.शनिवारी रात्री झालेल्या पावसाने हा प्रकार घडला आहे. रात्रीपासून या भागात पाणी आल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. दरम्यान, झोपडपट्टीतील घरांमध्ये पाणी घुसल्याने अनेकांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले आहे.

इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी गाठली असून रुद्र रूप धारण केले आहे. गेल्या आठवड्यातच इंद्रायणी धोक्याची पातळी गाठून वाहत होती. गेल्या कही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पाणी ओसरत होते पण,  पुन्हा पावसाने जोर धरल्याने इंद्रायणीची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आळंदीत  इंद्रायणी नदीने रुद्र रुप धारण केले आहे. भक्ती – सोपान पूल पाण्याखाली गेला आहे तर नव्या व जुन्या पुलाला पाणी लागले असून दिवसभरात पाऊस सुरुच राहिल्याने त्यावरूनही पाणी जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पोलिसांनी सुरक्षेचा उपाय म्हणून या पुलावरील वाहतूक बंद केली आहे. घाटावरून माऊली मंदिराकडे जाणारा रस्ता देखील पाण्याने भरला असून शनीमंदिराला पाणी लागले आहे यामुळे येथून देखील ये जा बंद करण्यात आली आहे. पाणी वाढल्याने घाटाच्या दुतर्फा बघ्यांची गर्दी वाढली असून हौशी लोक जीव धोक्यात घालून सेल्फी घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे घाटावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी उद्या, सोमवारी पुणे शहर आणि ग्रामीण भागातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. सोमवारी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत.

“जलयुक्त शिवार” तुडुंब…
जिल्हाभर सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे गाव शिवारात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेतील नाला खोलीकरण, सिमेंट बंधारे, सिमेंट नालाबांध, ओढा खोलीकरणर, ओढा सरळीकरण, सीसीटी पाण्याने तुडुंब भरले आहेत. गावशिवारातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
दहा वर्षातील रेकॉर्ड मोडला…
संततधार पडणाऱ्या पावसाने पुण्यात जुलैमधील गेल्या दहा वर्षांतील “रेकॉर्ड’ मोडले. यापूर्वी 2014 मध्ये 282.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. या वर्षी जुलैच्या तीस दिवसांमध्ये 359.2 मिलिमीटर पाऊस नोंदला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.
आपत्कालीन यंत्रणा सज्ज...
पुणे जिल्या तील पश्चिम भागात सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, वरसगाव, टेमघर, पानशेत ही चार धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पुणेकरांना वर्षभराच्या पाण्याची बेगमी झाली आहे. जिल्हृयात सुरू असणाऱ्या पावसाने धरणातून पाणी सोडण्यात येत असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे.
पुणे जिल्हा संक्षिप्त माहिती
पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणी साठा (टीएमसी मध्ये)

टेमघर 3.06 (85 टक्के), वरसगाव 11.99(96 टक्के), पानशेत 10.65 (100 टक्के), पवना8.34 (98.92 टक्के), मुळशी17.91 (97.05 टक्के),चासकमान7.54(99.55 टक्के), भामा आसखेड 7.61(99.29 टक्के), भाटघर 21.87 (93.07टक्के), नीरा देवघर 11.53 (98.29टक्के), वीर 8. 87 (94.26 टक्के), माणिकडोह 5.02 (49.33 टक्के), येडगाव 1.85 (95.28 टक्के), वडज 0.84 (71.64 टक्के), डिंभे 11.84 (94.79 टक्के), घोड 3.40 (66.20 टक्के)उजनी 19.42 ,(36.25)
भामा आसखेड धरण परिसरात अतिवृष्टी चालू असून गेल्या २४ तासात सरासरी170 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. आवक मोठ्या प्रमाणात आहे. भामा आसखेड धरणातून 20527 क्युसेक्स विसर्ग वाढवण्यात आला आहे.
खडकवासला धरणातून विसर्ग चालू असून धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असल्यामुळे व पानशेत आणि वरसगाव धरणे शंभर टक्के भरली असल्यामुळे त्या दोन्ही धरणातून अनुक्रमे 12936 व 9035 असा विसर्ग चालू असून पावसाचा जोर धरण क्षेत्रामध्ये वाढलेला असल्यामुळे खडकवासला धरणातून एकूण 41756 क्युसेक्स इतका विसर्ग मुठा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
चासकमान धरण परिसरात व भिमाशंकर भागात अतिवृष्टी चालू असून गेल्या २४ तासात ३०० मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. आवक मोठ्या प्रमाणात आहे.
चासकमान धरणातून ५०१२० क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार यानंतर विसर्ग वाढवण्यात येईल. नदीकाठच्या लोकांना त्याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.आपले जीविताची व मालमत्तेची काळजी घेण्यात यावी,असा इशारा देण्यात आला आहे.
१५ परदेशी नागरीकांसह गर्भवती महिला व मुलीची सुटका;625 कुटुंबियांचे स्थलांतर
मुळशी धरणाचे पाणी मुळशी तालुक्यातील वाले गावच्या पुलावरुन वाहत असल्याने मानगाव येथे ताम्हिणी घाट मार्गे पुण्याला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पुण्यातील सांगवी-मधुबन सोसायटी भागातून 15 परदेशी नागरीक,1गर्भवती महिला,1स्पेशल मुलगी यांची बोटीच्या साहाय्याने अग्निशामक दल,आपत्ती व्यवस्थापन टीम,पोलीस टीम यांनी सुटका केली मधुबन सोसायटी येथून एका बैलाची पुरातून सुटका करण्यात आली आहे.
सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. महापालिकेच्या नियंत्रण कक्षातील माहितीनुसार आतापर्यंत शहराच्या विविध भागातील ६२५ कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. या कुटुंबांची राहण्याची व्यवस्था स्थानिक क्षेत्रीय कार्यालयस्तरावर केली आहे. पाण्यामुळे बाधीत झालेल्या भागांवर लक्ष ठेवण्यात आले आहे. पावसाची परिस्थिती बघता एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यास सांगण्यात आले आहे. हे पथक महापालिकेच्या मुख्य इमारतीत हे पथक तैनात राहणार आहे. गरजेच्या ठिकाणी हे पथक तत्काळ पाठविण्यात येणार आहे.
ठिकाणे आणि स्थलांतरीत केलेल्या कुटुंबाची माहिती.
१) आदर्शनगर, बोपोडी- २६० कुटुंब – राजेंद्र प्रसाद शाळा
२) शांती नगर येरवडा – ३०० कुटुंब- परुळेकर शाळा
३) कामगार पुतळा – १३ नागरिक- दहा नंबर शाळा
४) पाटील इस्टेट – पाच कुटुंब – घोले रस्ता पीएमसी कॉलनी शाळा शिवाजीनगर
५) खिलारे वस्ती- ५० कुटुंब – उपाध्याय शाळा.

सोलापुरातील शेतकर्यांना
दमदार पावसाची प्रतिक्षा

सोलापुरातील सर्व तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. सोलापूरला परतीचा पाऊस पडतो. यंदा परतीचा पाऊस चांगला होईल, असे कृषी विज्ञान केंद्राचे संचालक लालासाहेब तांबडे यांनी सांगितले.
दरम्यान, पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी पुर्वमशागतीची कामे केली आहेत. जलयुक्त शिवार योजनतून झालेल्या विविध जलस्त्रोतात पाणी साठा होण्याची अपेक्षा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी सांगितले.
उजनी धरणाच्या पाणी साठ्यात वाढ
सोलापूर जिल्याच्साठी उजनी धरण अत्यंत महत्वाचे असून पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनी धरणातील पाणी साठ्यात चांगली वाढ होत आहे. ही सोलापूर जिल्ह्यातील सर्वांना आनंद देणारी बाब आहे. उजनी धरणात आज 88.79 टीएमसी पाणी साठा होता.
वीर धरणातून निरा नदीच्या पात्रात ६० हजार क्युसेस पाणी सोडल्यामुळे नीरा नदीत पाणी आले आहे. वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे निरा आणि भीमा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे दोन्ही नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नीरा नदीचे पाणी नीरा नृसिंहपूर संगम येथून भीमा नदीला मिळते व त्याचा फायदा जिल्ह्यातील भीमा नदीकाठच्या लोकांना होतो. त्यामुळे शेतकरी आनंदी आहेत.
सोलापूर जिल्हा संक्षिप्त माहिती
१) गेल्या २४ तासात पडलेला पाऊस-४.०७ मिलीमीटर
२)आतापर्यंत झालेला पाऊस- ११०.५५ मिलीमीटर
३)धरणनिहाय पाणीसाठा- उजनी धरण ८८.७९ टीएमसी
४)नदीनिहाय पूर परिस्थिती – वीर धरणातील विसर्गामुळे नीरा नदीच्या पात्रात पाणी आले आहे.
५)बाधित गांव,घरांची संख्या – निरंक
६)पूरग्रस्तांची प्रशासनाने केलेली सोय-पूर परिस्थिती नाही
७) जीवित हानी- निरंक

सातारा जिल्हा
कोयनेचे दरवाजे ११ फुटांवर
सातारा जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरण असणाऱ्या कोयना धरणात सकाळी ११ वाजता ९४.९४ टिएमसी इतका पाणी साठा झाला आहे. धरणातील पाण्याची आवक लक्षात घेता कालपासून दोन फुटांवर असणारे धरणाचे दरवाजे रविवारी दुपारी १ वाजता ११ फुटांवर करण्यात आले आहेत. त्यामुळे धरणातून कोयना नदीपात्रात ६५ हजार ५३ क्युसेस पाण्याचा विसर्ग आहे. कोयना व कृष्णा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पावसामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरातील काही भागातील वीज पुरवठा खंडित

0

पुणे –
पुणे शहर, पिंपरी चिंचवड महानगर पालिका भागातील तसेच पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात मुसळाधार
पावसामुळे व धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे खबरदारी म्हणून काही भागातील वीज पुरवठा महावितरणला आज
सकाळपासून बंद ठेवावा लागला.
प्राप्त माहितीनुसार आज सकाळपासून पुणे महानगर पालिका, पिंपरी चिंचवड महानगर पालिका तसेच पुणे जिल्ह्यातील
ग्रामीण भागातील नद्यांमध्ये धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने सखल भागात पाणी साचले. नागरिकाच्या
सुरक्षेसाठी काही भागातील विजयंत्रणा सकाळपासून बंद ठेवण्यात आली. त्याप्रमाणे काही भागात वीज वाहिनीवर झाडे
पडल्याने व फिडर पिलर मध्ये पाणी शिरल्याने वीज पुरवठा बंद ठेवावा लागला.
मुळा, मुठा, पवना व रामनदी नदीकाठी असलेल्या काही सखल भागात पाणी साचल्यामुळे वीज पुरवठा बंद ठेवण्यात
आला. औध, बोपोडी, बावधन, बाणेर, बालेवाडी, मधुबन कॉलोनी, जुनी संघवी, वाकड गावठाण, कस्पटे वस्ती,
पवनानगर, चिंचवड, पिंपळे निलख, कासारवाडी, काळेवाडी, शिवतीर्थ, इ.भागातील काही वस्त्यांमधील रोहित्रे
पाण्याखाली आल्यामुळे तेथील वीज पुरवठा नागरिकांच्या सुरक्षेसाठी बंद ठेवावा लागला.
जिल्हा प्रशासनाने पुढील ४८ तासात मुसळधार पाऊस होणार असल्याचे कळविले असून महावितरणला नागरिकाच्या
सुरक्षेतेसाठी योग्य ती काळजी घेण्याचे आदेश दिलेले आहेत. तेंव्हा ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे
आहवान पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री सचिन तालेवार यांनी केले आहे.

फर्ग्युसनमध्ये……

0

आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिके

पुणे, ता. ४ ः डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात (स्वायत्त) आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. आपतकालीन परिस्थितीत कोणती काळजी घ्यावी, जखमींना बाहेर कसे काढावे आणि आग विझविण्यासाठी वापरल्या जाणार्‍या उपकरणांचा वापर कसा करावा याची माहिती देण्यात आली. महापालिकेचे अग्निशमन विभाग प्रमुख प्रशांत रणपिसे, नंदकुमार धोत्रे, एस. टी. इंगवले यांनी मार्गदर्शन केले. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी यांची भाषणे झाली.

साताऱ्यातील ‘रयत’मध्ये सहावे विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन

0
रयत शिक्षण संस्थेस क्रांतीदूत, तर डॉ. भाऊसाहेब कराळे यांना ‘आदर्श रयतसेवक’ पुरस्कार
पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा यांच्या वतीने सहावे विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलन सातारा येथे आयोजित करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी (दि. ९ ऑगस्ट) रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील सभागृहात प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत आहे. संमेलनात दिला जाणारा ‘कर्मवीर भाऊराव पाटील क्रांतीदूत पुरस्कार’ रयत शिक्षण संस्थेला, तर ‘कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श रयतसेवक पुरस्कार’ डॉ. भाऊसाहेब कराळे यांना ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत ऍड. भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
संमेलनात शुक्रवारी सकाळी ९ वाजता बंधुता साहित्य प्रबोधनयात्रा काढण्यात येणार असून, त्यामध्ये महाविद्यालयातील ५०० सावित्रीच्या लेकींचा सहभाग असेल. १० वाजता संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. कवी शंकर आथरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रबोधनयात्री कविसंमेलन होईल. त्यामध्ये मधुश्री ओव्हाळ (पुणे), संतोष मोहोळकर (नांदेड), विजय जाधव (ठाणे), डॉ. भीम गायकवाड (पुणे) आणि संगीता झिंजुर्के (बीड) हे निमंत्रित कवी सहभागी होतील. यावेळी दादासाहेब खांदवे (सोलापूर), माधव गव्हाणे (परभणी), प्रा. धर्मवीर पाटील (इस्लामपूर) यांना ‘प्रबोधनयात्री पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येईल. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांची प्रकट मुलाखत होईल. परिसरातील विद्यार्थी आणि शिक्षकांना या संमेलनामध्ये विशेषत्वाने सहभागी होता येईल. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रवींद्र पाटील, प्रा. प्रशांत रोकडे आणि महेंद्र भारती यांनी पुढाकार घेतला आहे, असे बंधुता परिषदेचे अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी सांगितले.