Home Blog Page 2876

शिवनेरी ते रायगड शिवस्वराज्य यात्रेचा जुन्नरमध्ये शुभारंभ

0
जुन्नर/आनंद  कांबळे
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस  आघाडी, मित्रपक्ष 175 जागा मिळविणार असा आत्मविश्वास व्यक्त करतानाच   सत्ता, सत्तेतुन पैसा , पैशातून सत्ता असे  राज्य सरकारचे  नियोजन आहे.यांच्या काळात  अदानी ,अंबानी यांच्यासारखे उद्योगपती अधिकच श्रीमंत झाले.गरीब गरीबच राहिले, राज्यातील पूरस्थिती  दुर्लक्ष करून सत्ताधारी महाजनादेश प्रचार यात्रेत व्यस्त आहेत.पिकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाही ,यासाठी सत्ताधारी शिवसेना मोर्चे काढते यांच्यातच त्यांचा नाकर्तेपणा दिसून येतो अशी टीका  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
 राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  आयोजित केलेल्या  शिवनेरी ते   रायगड शिवस्वराज्य यात्रेचा      शुभारंभ प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.
 राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  छगन भुजबळ ,   प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील , अजित पवार ,विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, माजी आमदार पोपटराव गावडे,जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर , युवा नेते अतुल बेनके , राष्ट्रवादी प्रदेश युवा अध्यक्ष महेबूब शेख, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या  फोजीया  खान,विद्या चव्हाण,रुपाली चाकनकर आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थितीत  यांच्या प्रमुख उपस्थितीत   होते.
 प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील  यावेळी म्हणाले   उद्याचा महाराष्ट घडविण्याची क्षमता दाखविणारी आमची शिवस्वराज्य   यात्रा आहे.महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी झाले आहे लोकांवर विविध कर लादले आहेत ,बेकारी वाढली आहे याला सत्ताधारी जबाबदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात नेते बाहेर पडत परंतु यातून नवीन युवा नेत्तुत्वाला या माध्यमातून संधी  मिळणार आहे.
मेगाभरती बेरोजगारांसाठी होती का काँग्रेस राष्ट्रवादी मधून पक्ष सोडणाऱ्यासाठी होती.मेगाभरतीत गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्यात आले. राज्य सरकार 50 हजार हेकटर जमीन ओलिता खाली आल्याचा दावा करते प्रत्यक्षात 1 हेक्टर जमीन  देखील ओलिताखाली आलेली नाही.  कर्जमाफीने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे,शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करता आले नाही अशी टीका  धनंजय मुंडे यांनी यावेळी  केली.
छगन भुजबळ यांनी ईव्हीएम मशीनच्या वापराबाबत काहीतरी  गौडबंगाल असल्याचे सांगत मत पत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली. पिकविम्यात शेतकऱ्यांनाकाही मिळत नाही  कंपन्यानंचा फायदा  होतो अशी टीका केली.
खासदार  अमोल कोल्हे म्हणाले,   यात्रेच्या माध्यमातून नव्या स्वराज्याचा नवा  लढा लढला जाणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा तळागावातील  कार्यकर्ता जोपर्यंत भक्कम आहे,तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस  अभेद्य राहणार आहे  असे सांगताना   ३७० कलम रद्द करण्यात सरकारचा  हेतू  कोसळलेली अर्थव्यवस्थेचे आलेले  अपयश झाकण्यासाठीचा प्रयत्न नाही ना याचा विचार व्हावा अशी टीका कोल्हे यांनी केली.
फौजिया खान ,अतुल बेनके यांनी यावेळी  मनोगत व्यक्त केले .

लोकप्रतिनिधींना तुरुंगात डांबून ,संविधानाचे उल्लंघन करून राष्ट्रीय एकीकरन होत नाही -राहुल गांधी

0
नवी दिल्ली –  जम्मू-काश्मीरला तुकड्यांमध्ये विभागून, प्रतिनिधींना तुरुंगात डांबून आणि संविधानाचे उल्लंघन करून राष्ट्रीय एकीकरण होत नाही. तसेच हा देश जमिनीच्या भूखंडाने नाही तर येथील लोकांच्या विचाराने बनला आहे. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याचे सांगत राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरच्या अनुच्छेद 370 हटवण्याचा प्रकरणावर मंगळवारी मौन सोडले.

अमित शहांनी कलम 370 रद्द करण्याबाबत केली होती शिफारस
गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरच्या अनुच्छेद 370 आणि 35 ए हटवण्याबाबत राज्यसभेत शिफारस केली होती. यानंतर सरकारने जम्मू-काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा काढून घेतला. आता जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश असणार आहेत. दरम्यान योग्य वेळ आल्यानंर या केंद्रशासित प्रदेशांना राज्याचा दर्जा देण्यात येणार असल्याचे अमित शाह यांनी संसदेत स्पष्ट केले.

राज्याचे पुनर्गठन करण्यात येत होत्या अडचणी
अनुच्छेद 370 अंतर्गत जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळाला होता. संसदेतील कोणतेही कायदे या राज्याला लागू होत नव्हते. यामुळे जम्मू-काश्मीर राज्याचे पुनर्गठन करता येत नव्हते त्यामुळे ते हटवण्यात आले.

समर्थनार्थ 125 तर विरोधात 61 मते मिळाली
केंद्र सरकार सुरक्षा, विदेश आणि वाहतून यांसारखे महत्वाचे विषय सोडून राज्यातील इतर प्रकरणार दखल देऊ शकत नव्हते. जम्मू-काश्मीर पुनर्गठन कायदा सोमवारी राज्यसभेत संमत करण्यात आले. या कायद्याच्या समर्थनार्थ 125 तर विरोधात 61 मते पडली. जम्मू-काश्मीर दिल्लीप्रमाणे विधानसभा असणारे केंद्रशासित प्रदेश होणार आहे. तर लडाखमध्ये विधानसभा नसणार.

महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांची महापुरातही ग्राहकसेवा

0

मुळशी तालुक्यात रिहे खोऱ्यातील गावांचा वीजपुरवठा सुरु

पुणे,  : मुळशी धरणातील तब्बल 38 हजार क्युसेस पाण्याचा मुळा नदीतून विसर्ग सुरु असताना प्रवाहाच्या उलट्या दिशेने जात महापुरातील रोहित्राचा वीजपुरवठा मुख्य वीजवाहिनीमधून बंद करून रिहे खोऱ्यातील 10 गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची कामगिरी करीत महावितरणच्या मुळशी येथील जिगरबाज अभियंते व कर्मचाऱ्यांनी महापुरातही ग्राहकसेवेच्या बांधिलकीचा प्रत्यय दिला.

याबाबत माहिती अशी, की पूरस्थितीमुळे मुळशी धरणातून मुळा नदीत पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. मुळशी तालुक्यातील घोटावडे पुलाजवळ असलेले रोहित्र पुराच्या पाण्यात बुडाल्याने पुढील धोका टाळण्यासाठी रिहे 22 केव्ही वाहिनीचा वीजपुरवठा महावितरणकडून रविवारी (दि. 4) दुपारी बंद करण्यात आला. परिणामी रिहे खोऱ्यामधील रिहे, शेळकेवाडी, घोटावडे, जवळ, कातरखडक, खांबवळी, पिंपोळी आदी 10 गावांचा वीजपुरवठा सुद्धा बंद झाला होता.

पूरस्थितीमुळे रिहे खोऱ्यातील गावांचा पौंड व पिरंगुट गावांशी संपर्क तुटला होता. दुर्गम भागात असलेल्या या गावांना वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अ़डचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे मुळशी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता फुलचंद फड, सहाय्यक अभियंता बी. एस. वावरे व सहकाऱ्यांनी युद्धपातळीवरून पर्यायी व्यवस्थेतून या 10 गावांना वीजपुरवठा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र नदीच्या पुरामध्ये बुडालेल्या रोहित्राचा वीजपुरवठा मुख्य वीजवाहिनीपासून खंडित करणे व संभाव्य धोके टाळणे अतिशय आवश्यक होते. त्याशिवाय रिहे खोऱ्यातील गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करणे शक्य नव्हते.

त्यानंतर रविवारी सायंकाळी महावितरणकडून मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सहकार्यासाठी तहसीलदार श्री. अभय चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांना परिस्थितीची माहिती दिल्यानंतर महापुरात बोटीने जाऊन रोहित्राचा मुख्य वीजवाहिनीपासून वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आखण्यात आली. सोमवारी (दि. 5) सकाळी 10 वाजता आपत्ती व्यवस्थापनाचे पथक बोटीसह सज्ज झाले. मुळा नदीत यावेळी 32 हजार क्युसेस पाणी प्रवाहित होत असताना तसेच प्रवाहाच्या उलट्या दिशेला रोहित्र असल्याने ही अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. मात्र महावितरणचे जनमित्र राहुल मालपोटे व शुभम ढिले यांनी हे आव्हान स्विकारले. आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमसोबत बोटीने या दोघांनी महापुराचे सुमारे पाऊण किलोमीटर अंतर कापले. मुसळधार पाऊस सुरु असताना राहुल मालपोटे यांनी रोहित्राच्या खांबावर चढून मुख्य वीजवाहिनीपासून वीजपुरवठा खंडित केला. 10 गावांच्या वीजपुरवठ्यासाठी महत्वाची कामगिरी करून हे पथक सुरक्षितपणे परतले. त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रिहे 22 केव्ही वाहिनीचा वीजपुरवठा सुरु केला व रिहे खोऱ्यातील गावे अवघ्या 24 तासांच्या आत पुन्हा प्रकाशमान झाले.

महावितरणच्या ग्राहकसेवेसाठी महापुरातही बांधिलकी दाखविणारे जिगरबाज अभियंते फुलचंद फड, बी. एस. वावरे, जनमित्र राहुल मालपोटे व शुभम ढिले यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकातील प्रमोद बलकवडे, ओंकार बलकवडे, सनी शिर्के, नागेश धनवे, गौरव धनवे, शुभम धनवे, विष्णू गोडांबे, अमोल खानेकर, भरत गुप्ता यांनी मोलाचे सहकार्य केले. या सर्वांचे प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. सुनील पावडे यांनी कौतुक केले. तर पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी प्रत्यक्ष मुळा नदीच्या ठिकाणी जाऊन महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांना शाबासकीची थाप दिली व कौतुक केले. मुळशीचे कार्यकारी अभियंता श्री. रवींद्र बुंदेले यांनी ही कामगिरी यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले.

जलसाक्षरता केंद्र (यशदा पुणे) च्या ‘भू वारसा’ पुस्तकाचे प्रकाशन

0
पुणे:जलसाक्षरता केंद्र(यशदा, पुणे) प्रकाशित ‘भू वारसा ‘ पुस्तकाचे प्रकाशन अर्थ,वन आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार,जलतज्ञ राजेंद्रसिंह,’पानी फौंडेशन’ चे अमीर खान यांच्या हस्ते झाले.
जलशक्ती -जनशक्ती संमेलन व संवाद या कार्यशाळेत कार्यक्रमात प्रियदर्शिनी सभागृह (चंद्रपूर) येथे दिनांक  ४ ऑगस्ट २०१९ रोजी हे पुस्तक प्रकाशित झाले.जलसाक्षरता केंद्र(यशदा, पुणे) चे डॉ सुमंत पांडे आणि सहकारी उपस्थित होते .
जलसाक्षरतेच्या चळवळीत सहभागी होणा-या  फळीच्या क्षमता बांधणीसाठी , ज्ञानवृद्धीसाठी यशदाच्या जलसाक्षरता केंद्राच्या वतीने वाचन साहित्य तयार करण्यात येत आहे.
संतवाणीतील जलसाक्षरता’,‘परंपरेतील जलवन माहात्म्य’ ही दोन पुस्तकानंतर ‘भू-वारसा’ हे तिसरे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.परंपरा आणि शास्त्र यामधील भूविज्ञान आणी जलविज्ञानाबाबत माहितीचे  संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे.
जलशास्त्राबाबत विविध  उल्लेख व त्यावियी असलेल्या आदराचा वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, छत्रपती शाहू महाराज यानी केलेली लोकोपयोगी कामे ,महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याांचे  प्रबोधन या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहे.
आधूनिक तंत्रज्ञान, अचूक नकाशे व माहिती यांचा जलविषयक कामातील वापर या बाबींचा ऊहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील पुणे जिल्हयातील पूरस्थितीचा घेतला आढावा

0

पुणे  : पुणे जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे  नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे बहुतांश धरणातून विसर्ग सुरू आहे. नुकसान झालेल्या भागात पंचनामे करून अहवाल सादर करा, नुकसानग्रस्तांना शासनाच्या निकषाप्रमाणे मदत केली जाईल. आपत्तीच्या काळात जिल्हयातील सर्व यंत्रणांनी समन्वय  ठेवत सतर्क रहावे, असे निर्देश महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज दिले.

पुणे जिल्हयात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री श्री. पाटील पुणे जिल्हयाच्या दौ-यावर आले होते. बालेवाडी येथील श्री. शिवछत्रपती क्रिडा संकुल सभागृहात पूरस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन ,भूकंप पुनर्वसन संजय (बाळा ) भेगडे, महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव,  सर्वश्री आमदार बाबुराव पाचरणे,  राहुल कुल, योगेश टिळेकर, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त सौरभ राव, पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, पुणे जिल्हयातील बहुतांश धरणे भरली आहेत. धरणक्षेत्रात पाऊस सुरूच आहे, आणखी दोन दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत धरणांचे सनियंत्रण करावे, आरोग्य विभागाने दक्ष राहावे, आवश्यक त्या लशीसह औषधांचा पुरेसा साठा ठेवावा, गरजेप्रमाणे औषधांची मागणी तातडीने नोंदवावी,  सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करावी, तसेच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यासंबंधिचा अहवाल सादर करावा. असुरक्षित रस्ते, पुल बंद करा, कोणतीही दुर्घटना होणार नाही, याबाबतची काळजी घ्यावी, पुणे जिल्हयात पुढील दोन दिवस पावसाचा जोर राहील, असा अंदाज वेध शाळेने वर्तविला आहे.  त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, प्रशासन वेळोवेळी करत असलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पालकमंत्री  श्री. पाटील यांनी केले.

राज्यमंत्री भेगडे यांनी मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी पाण्याचा साठा होवून खोळंबा होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी सूचना केली.

जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, पुणे जिल्हयात 917.48 मिलीमीटर पाऊस झाला आहे. बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर वगळता उर्वरित सर्वच तालुक्यात अतिवृष्टीची परिस्थिती आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातून तीन मोठया नद्या वाहत आहेत, त्यामुळे योग्य दक्षता घेतली जात आहे. पुरस्थितीमुळे आतापर्यंत 3 हजार 343 कुटुंबाला स्थलांतरीत करण्यात आले असून यामध्ये 13 हजार 336 नागरिकांचा समावेश आहे. आपत्ती कालावधीत सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून पूरबाधीत व्यक्तींचे पंचनामे करून नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असे सांगून पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन समन्वयाने काम करीत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. राम यांनी सांगितले.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी मनपार्फे करण्यात आलेल्या उपायायोजनांची माहिती दिली. भोजन, निवास व्यवस्था व स्वच्छता आदींची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आपत्ती व्यवस्थापनाशी सबंधित सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

लोणावळा, सांगवी व पिंपळेनिलख येथे भेट

लोणावळा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेत मयत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची भेट घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांत्वन केले. यावेळी पुनर्वसन राज्य मंत्री संजय (बाळा) भेगडे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, लोणावळ्याच्या नगराध्यक्ष सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, उप विभागीय अधिकारी संजय भागडे, लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पवार तसेच पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

लोणावळ्यातील हनुमान टेकडी येथे भिंत पडून कुणाल अजय दोडके या 12 वर्षाच्या मुलाचे निधन झाले होते. भांगरवाडी येथे भिंत पडून जयप्रकाश जगन्नाथ नायडू (42 वर्षे) यांचे निधन झाले. पालकमंत्री श्री. पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. तसेच कुटुंबियांना आर्थिक मदतीचा धनादेश यावेळी प्रदान केले. तत्पूर्वी, परमार हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी मुलगी नंदिनी अजय दोडके हिची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच सांगवी व पिंपळेनिलख भागातील पूरबाधितांच्या भेटी घेवून तेथील परिस्थितीची माहिती घेतली.

पुण्यात भारताची पहिली अरोमाथेरपी हेअर केअर श्रेणी सादर

अरोमाथेरपी (सुगंधोपचार) क्षेत्रातील प्रवर्तक असलेल्या ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिकने आपली खास अरोमाथेरपी हेअर केअर श्रेणी पुण्यात प्रथमच सादर केली आहे. ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिकसाठी सौंदर्य हे समग्र असून ते आंतरिक व बाह्य अशा दोन्ही सौंदर्यांवर अवलंबून असते. त्याचीच पूर्तता करण्यासाठी या ब्रँडने अशी खास केश निगा श्रेणी (हेअर केअर रेंज) सादर केली आहे, जी व्यक्तीला सौंदर्य, तसेच भावनात्मक, मानसिक, शारीरिक व सौंदर्यात्मक आत्मविश्वासाची अनुभूती मिळण्यास मदत करेल. ही श्रेणी पॅराबेन्स, पेट्रोकेमिकल्स, थॅलेट्स, सल्फेट्स, विषारी घटक, कृत्रिम रंग व गंध यापासून संपूर्णपणे मुक्त आहे.

या हेअर केअर रेंजमध्ये क्रीम कंडिशनर, डँड्रफ कंट्रोल शाम्पू, हेअर ऑइल, हेअर सेरम, हेअर फॉल कंट्रोल शाम्पू, लीव्ह-इन स्प्रे कंडिशनर, मॉइश्चर बूस्ट शाम्पू, ऑइल बॅलन्सिंग शाम्पू, ऑयली स्काल्प बॅलन्सिंग टोनर अँड शाईन व व्हॉल्युम शाम्पू या उत्पादनांचा समावेश आहे. याखेरीज अरोमाथेरपी हेअर केअर रेंजमध्ये क्टिव्हेटेड बांबू चारकोल शाम्पू अँड कंडिशनर, स्टिम्युलेट ऑइल (मिश्र तेल – केसांच्या संवर्धनासाठी उत्कृष्ट), फ्लॅकी ऑइल (कोंड्यावर उपचारासाठीचे मिश्र तेल), हेअर रिव्हायटलाइज सेरम (केसांच्या वाढीस साह्यकारी) या तेलांचाही समावेश आहे. ही श्रेणी एसजीएस मॉलमधील ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिक किऑस्क, आघाडीची ब्युटी कॉस्मेटिक स्टोअर्स व अरोमामॅजिक.कॉम (Aromamagic.com) संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

यासंदर्भात माहिती देताना डॉ. ब्लॉझम कोच्चर म्हणाल्या, अरोमाथेरपी हेअरकेअर रेंजमधील आवश्यक तेलांच्या उत्तम गुणधर्मामुळे केसांच्या समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर समग्र दृष्टीकोनातून उपचार करण्यास मदत मिळते. या श्रेणीतील शाम्पू केसातील कोंड्यावर उपचारासाठी, केसगळती रोखण्यासाठी, केसांना चमक आणण्यासाठी, केसांचा पोत सुधारण्यासाठी, केसांचे पोषण राखण्यासाठी, मस्तिष्क तेलकट राहणे रोखण्यासाठी किंवा केस खूपच तेलकट बनणे रोखण्यासाठी साह्य करतात, तर टोनरमुळे मस्तिष्कावरील तेलाचे संतुलन साधले जाते. केस निगा राखण्यासाठी नैसर्गिक पर्याय मिळण्याच्या ग्राहकांच्या मागणीतून मला भारताची पहिली अरोमाथेरपी आधारित हेअर केअर सोल्यूशन्स निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

डॉ. ब्लॉझम कोच्चर या दूरदर्शी व्यक्तीमत्त्व आहेत. भारतात अरोमाथेरपी उपचारांच्या त्या प्रवर्तक असून त्यांच्या कार्यासाठी जगभर मान्यता मिळवलेल्या आहेत. त्या ब्लॉझम कोच्चर ग्रुप ऑफ कंपनीजच्या अध्यक्ष असून त्यांचे नाव ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिक व ब्लॉझम कोच्चर कॉलेज ऑफ क्रिएटिव्ह आर्ट्स अँड डिझाईन (बीकेसीसीएडी) या यशस्वी ब्रँडशी जोडले गेले आहे.

‘ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिक’विषयी

‘ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिक’ हा भारतातील सर्वांत मोठा अरोमाथेरपी ब्रँड आहे. त्याची १७० हून अधिक अरोमाथेरपी-आधारित उत्पादने असून त्यात स्किन केअर, हेअर केअर, इसेन्शियल ऑइल्स व क्युरेटिव्ह ऑइल्सचा समावेश आहे. या जोरावर ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिकने सौंदर्यप्रसाधने उद्योगात विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. या विशाल श्रेणीत सुगंधोपचारनिष्ठ अशी स्किन, हेअर व वेलनेस उत्पादने आहेत, जी काळजीपूर्वक संशोधनानंतर विकसित केली असून मन, शरीर व आत्म्यावर सकारात्मक कल्याणकारी परिणाम होण्यासाठी त्यांचे मिश्रण करण्यात आले आहे.

प्रत्येक उत्पादन तयार करताना पारंपरिक पद्धती वापरण्यात आल्या असून त्यात अरोमाथेरपी शास्त्राचा समन्वयही साधला आहे, ज्यात वनस्पती, फुले व बियांपासून तेल काढले जाते. सर्व आवश्यक तेले काळजीपूर्वक मागवली जातात आणि डॉ. ब्लॉझम कोच्चर यांच्या नजरेखाली त्यांचे अचूक मिश्रण केले जाते.

डॉ. ब्लॉझम व त्यांचे पती कर्नल व्ही. कोच्चर (दिवंगत) यांनी एकत्रित ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिकची स्थापना वर्ष १९९३ मध्ये केली. आज त्यांची कन्या समंथा कोच्चर यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी दमदार विस्तारली असून भारतातील अरोमाथेरपी क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी बनली आहे.

‘समाजसेवा म्हणजे नक्की काय रे भाऊ?’वर चर्चासत्र

0
डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, श्रीगौरी सावंत करणार मार्गदर्शन
पुणे : लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट पुणे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे ‘समाजसेवा म्हणजे नक्की काय रे भाऊ?’ अर्थात ‘रिडिफायनिंग सोशल वर्क’ यावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ११ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत कोथरूड येथील एमआयटी कॅम्पसमधील स्वामी विवेकानंद सभागृहात हे चर्चासत्र होणार असून, समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाताई आमटे यांच्यांसह एचआयव्ही एड्स पीडितांसाठी आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या बालकांच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या  श्रीगौरी सावंत यांना ऐकण्याची आणि त्यांच्याकडून समाजसेवेची व्याख्या समजावून घेण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती एमआयटीचे डॉ. मिलिंद पांडे, लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्टचे शिल्पा तांबे, योगेश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. मिलिंद पांडे म्हणाले, “तुमची आमची प्रत्येकाची ‘समाजसेवेची’ व्याख्या वैयक्तिक पातळीवर पूर्णपणे भिन्न असू शकते. बाबा आमटेंसारखे महान समाजसेवक असोत वा आपल्या कॉलेजच्या समाजसेवा प्रबंधात जीव ओतून काम करणारा एखादा विद्यार्थी कार्यकर्ता असो, सामाजिक बांधिलकी जपणारी एखादी कोर्पोरेट बॉस असो वा आपल्या घरातील वरकाम करणाऱ्या मावशींना प्रेमाने औषध देणारी एखादी गृहिणी असो, आपणही समाजासाठी काहीतरी करावे, असे आपल्यातील बहुतेकांना वाटत असते. ही समाजसेवा म्हणजे नेमकी काय आणि कशी असते, हे समजावून घेण्यासाठी हे चर्चासत्र आयोजिले आहे. त्यामध्ये याच क्षेत्रात सर्वस्व वाहून देत काम करणारे तीन मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

योगेश कुलकर्णी म्हणाले, “सोशल मिडियावर झळकणारे ‘सेल्फी’च्या जमान्यातले समाजकार्य खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या घटकांचे स्वरूप आहे का? हे एका संवेदनशील समाजाचे प्रत्यक्ष दर्शन आहे की फक्त आभासी सूज? शाळा-कॉलेजमधली तरुण पिढी समाजकार्याकडे नेमक्या कश्या दृष्टीने बघते? जो समाज आपल्याला घडवतो, त्या समाजाच्या ऋणाची परतफेड करायची गरज असते का? जर असेल तर ती कोणत्या मार्गाने करणे योग्य? अश्या अनेक प्रश्नांवर विचारमंथन या चर्चासत्रात होणार आहे. सामाजसेवेप्रती नवी क्षितिजे, नवे पैलू उलगडणारे ‘रीडीफायनिंग सोशल वर्क’ हे चर्चासत्र असणार आहे. सामाजिक बांधिलकी जपणारे जास्तीत जास्त तरुण पुढे यावेत आणि त्यांनी एका नव्या संवेदनशील समाजाच्या राष्ट्रनिर्मितीत सक्रीय सहभाग घ्यावा हे उद्दिष्ट समोर ठेऊन हे व्यासपीठ तरुणांसाठी उपलब्ध केले आहे.”
शिल्पा तांबे म्हणाल्या, “ज्यांचे संपूर्ण आयुष्यच समाजसेवेचे परिमाण म्हणून ओळखले जाते ते डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाताई आमटे यांना पहिल्या, तर दुसऱ्या सत्रांत एड्सबाधित आणि शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी आयुष्य वेचणाऱ्या श्रीगौरी सावंत बोलणार आहेत. चर्चासत्र सर्वांसाठी विनामूल्य खुले असले, तरी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी http://lokbiradari.deazzle.in संकेतस्थळावर जावे. प्रथम येणाऱ्यांस प्राधान्य असेल. आमटे दाम्पत्य आणि सावंत यांच्यासह माईर्स एमआयटी पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचे संचालक अनिकेत आमटे आदी उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क: ९२२६९५८८८८ / ९८२२२७३५४५ / ९६०७०५९२१४ किंवा lokbiradarimitramandalpune@gmail.com यावर संपर्क साधावा.”

दहावीच्या विद्यार्थांसाठी मोफत मार्गदर्शन

0
पुणे : विद्यार्थांनी मागील वर्षी बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित अभ्यास नेमका कसा करावा? याचे सखोल आणि शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करण्यासाठी सुपरमाईंड फाऊंडेशन, रोटरी क्लब पुणे युवा आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ युवा नेक्स्ट यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्र आयोजिले आहे. येत्या सोमवारी (दि. 12 ऑगस्ट) सकाळी 10 वाजता स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडामंच येथे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत या मार्गदर्शन सत्राचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती सुपरमाईंड फाऊंडेशनच्या संचालिका अर्चिता मडके, मंजुषा वैद्य, रोटरी क्लब ऑफ युवाचे अध्यक्ष राहुल गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी श्रीकांत जोशी, निनाद जोग, अमेय जोग, ऋषिकेश कुलकर्णी उपस्थित होते.
अर्चिता मडके म्हणाल्या, “दहावीच्या अभ्यासाविषयी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ (एसएससी बोर्ड) व बालभारती पाठ्यपुस्तक सदस्य विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. मागील वर्षीचा एसएससी बोर्डाचा निकाल कमी लागण्याचे कारण विद्यार्थांची भाषा विषयांमधील अध्ययन कौशल्ये व स्वमताच्या प्रश्नांच्या लेखन तंत्राचा अभाव ही असल्याचे प्रामूख्याने आढळून  आले आहे. त्यामूळे भाषा विषयांची तयारी कशी करावी, हे या सत्राचे प्रमुख आकर्षण आहे. याशिवाय गणित व शास्त्र विषयांमध्ये 90% पेक्षा अधिक गुण मिळविण्याचे विशेष मार्गदर्शन तज्ज्ञ करणार आहेत.”

राहुल गडकरी म्हणाले, “आताचा अभ्यासक्रम स्व-अध्ययनावर आधारीत आहे. त्यामुळे स्व-अध्ययन म्हणजे काय? ते कसे करावे? याचे मार्गदर्शन शैक्षणिक समुपदेशिका मंजुषा वैद्य करणार आहेत. डॉ. सुलभा विधाते (शास्त्र), डॉ. जयश्री अत्रे (गणित), डॉ. स्नेहा जोशी (मराठी), अच्युत सोमण (इंग्रजी) या तज्ज्ञ शिक्षकांकडून अभ्यासाचे तंत्र यावर विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला जाणार आहे. सत्राचे उद्घाटन रोटरी क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल रवि धोत्रे यांच्या हस्ते होणार असून, विद्यार्थ्यांना सर्वोत्तम गुणवत्ता मिळविण्यासाठी हे सत्र उपयुक्त ठरणार आहे.

काश्मीरसाठी जीव देण्याचीही तयारी -अमित शहा

0

नवी दिल्ली – जम्मू आणि काश्मीर पुनर्रचनेचा विधेयक राज्यसभेत मंजुरी मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यावर लोकसभेत चर्चा सुरू करण्यात आली. अमित शहा काही वेळातच लोकसभेत हा ठराव मांडला. तत्पूर्वी लोकसभेत सुद्धा याचे सादरीकरण करण्यात आले होते. परंतु, विरोधी पक्षांनी वॉकआउट केल्याने त्यावर चर्चा होऊ शकली नव्हती. दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा झाल्यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवले जाणार आहे. राष्ट्रपतींची स्वाक्षरी होताच जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन वेग-वेगळे केंद्रशासित प्रदेश म्हणून नावारुपाला येतील. या चर्चेत बोलताना, काश्मीरसाठी जीव देण्याची तयारी असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले आहेत.

सरकारने राज्यघटनेचे उल्लंघन केले -काँग्रेस
काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी काश्मीरवर बोलताना सुरुवातीला संपूर्ण इतिहास मांडला. कोणत्या परिस्थितीत राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 लागू करण्यात आले याची माहिती दिली. त्यानंतर सरकारने ही कलम रद्द करून राज्यघटनेची कलम 3A चे उल्लंघन केले असा आरोप केला. या कलमानुसार, कुठल्याही राज्याची सीमा बदलताना किंवा विभाजन करताना तेथील विधानसभा किंवा विधान परिषदेचे मत घेणे आवश्यक आहे. परंतु, मोदी सरकारने काश्मीरात राष्ट्रपती राजवट लागू करून तेथील नागरिक किंवा लोकप्रतिनिधींची मते न घेताच हा निर्णय घेतला. असेही मनीष तिवारी म्हणाले आहेत. यूपीए सरकारने आपल्या राजवटीत कधीच अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. थेट कलम 370 परस्पर रद्द करून भाजप सरकार इतर राज्यांना काय संदेश देऊ इच्छिते. काही राज्यांमध्ये कलम 371 नुसार विशेष अधिकार आहेत. त्यांच्याकडून सुद्धा अशाच प्रकारे ते हिरावून घेतले जातील का? असा सवाल काँग्रेस खासदारांनी उपस्थित केला.

व्याप्त काश्मीरसह जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य घटक, जीव देऊ शकतो यासाठी
लोकसभेत कलम 370 आणि काश्मीवर चर्चा सुरू असताना काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी एक शंका उपस्थित केली. “अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांच्याशी चर्चा करताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले होते, की काश्मीर भारत आणि पाकिस्तानचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यामध्ये हस्तक्षेप करू नका. अजुनही (कलम 370 रद्द केल्यानंतर) काश्मीर हा दोन्ही देशांचा अंतर्गत मुद्दा राहील का? 1948 पासूनच या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रची नजर आहे. आपण (भारताने) शिमला करार आणि लाहोर डिक्लेरेशन केले आहे. ते काय होते अंतर्गत मुद्दा की द्वीपक्षीय मुद्दा? असा सवाल त्यांनी केला.
> काँग्रेसच्या या प्रश्नाचे उत्तर देताना अमित शहांनी काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे असे ठणकावून सांगितले. सोबतच, काश्मीरचा उल्लेख करताना संसदेत नेहमीच मी काश्मीरसह पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साइ चीन या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला आहे. काश्मीरसाठी आपली जीव देण्याची तयारी आहे असे उत्तर अमित शहांनी संसदेत बोलताना दिले आहे.

(वाचकांना ,दर्शकांना फेसबुक च्या पेजवर काही लाईव व्हिडीओ पाहायला मिळतील https://www.facebook.com/MyMarathiNews)

कलम ३७० रद्द केल्याच्या निर्णयाचे रिपब्लिकन पक्षाकडून पेढे वाटून स्वागत

0

पुणे : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटविण्याच्या, तसेच जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेच्या निर्णयाचे स्वागत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून (A) पेढे वाटून करण्यात आले. केंद्र सरकारने उचलेले हे धाडसी पाऊल असून, यामुळे काश्मिरी जनता खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाच्या अखत्यारीत येईल आणि तेथील जनतेचा विकास होईल, असा आशावाद व्यक्त करीत रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यानी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पुणे शहर अध्यक्ष अशोक कांबळे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, मातंग आघाडीचे प्रदेशअध्यक्ष हनुमंत साठे, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष ऍड. अयुब शेख, संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संजय सोनावणे, सचिव महिपाल वाघमारे, बाबुराव घाडगे आदी उपस्थित होते.

डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, “केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक आहे. जम्मू-काश्मीर, लडाख यांना वेगळे करून तेथील नागरिकांना स्वायत्तता देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. काश्मीर भारताचा अविभाज्य घटक असून, तो यापुढेही भारताचा भाग राहणार आहे, हे दाखवून देणारा हा निर्णय आहे. आता तेथे उद्योगधंदे, शैक्षणिक संस्था, कंपन्या आणि पायाभूत सुविधा उभ्या राहतील. पुणे शहराच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना धन्यवाद देतो.”

बाळासाहेब जानराव म्हणाले, “या निर्णयामुळे जम्मू काश्मीरच्या लोकांना न्याय मिळेल. इतर राज्यातील लोकांप्रमाणे त्यांनाही उद्योग, व्यवसायाच्या संधी समान प्रमाणात मिळतील. त्यांचा विकास होईल. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केंद्र सरकारचे अभिनंदन करतो.” ऍड. अयुब शेख म्हणाले, “या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करतो. या धाडसी निर्णयामुळे जम्मू-काश्मीर, लडाखचा विकास होईल. तेथील तरुणांना रोजगार मिळतील. नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ या संकल्पाला सत्यात आणले आहे.”

पूरग्रस्तांना तातडीची मदत देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी

0

पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या १०-१२ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब भरले असून, त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी नद्यांना पूर आला असून, पाणी नागरी वस्त्या, झोपडपट्यांमध्ये शिरले आहे. परिणामी हजारो नागरिकांचे अतोनात हाल होत असून, अनेकजण अंगावरच्या कपड्यांनिशी विस्थापित झाले आहे. या पूरग्रस्तांना प्रशासनाने तातडीची मदत करावी, अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (A) वतीने देण्यात आले.

निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी हे निवेदन स्वीकारत तातडीने आदेश देऊन पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवासी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पुणे शहर अध्यक्ष अशोक कांबळे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, मातंग आघाडीचे प्रदेशअध्यक्ष हनुमंत साठे, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष ऍड. अयुब शेख, संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संजय सोनावणे, सचिव महिपाल वाघमारे, बाबुराव घाडगे आदी उपस्थित होते.

मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली असून, सरकारी शाळा, धार्मिक स्थळे, समाज मंदिरे अशा ठिकाणी आश्रय घेतला आहे. शहरातील येरवडा, शांतीनगर, आदर्शनगर, इंदिरानगर, बोपोडी, औंध, कामगार पुतळा, पाटील इस्टेस्ट, म्हात्रे पूल, सिंहगड रास्ता, एरंडवणा, ताडीवाला रस्ता यासह नदी काठाच्या अनेक भागातील घरांमध्ये पाणी घुसले आहे. जवळपास ४-५ हजार नागरिक विस्थापित झाले आहेत. प्रशासनाने अद्यापही म्हणावी तशी दखल घेतली नसून, आपद्ग्रस्त नागरिकांना मदत मिळालेली नाही. प्रशासनाने त्वरित पाहणी करून आपद्ग्रस्तांना नागरी सुविधा व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून द्याव्यात, तसेच ५० हजार ते एक लाखापर्यंत आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

पुणे विभागातील पुराने बाधित १८ हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

0

-विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

-मदत व पुनर्वसनासाठी एन.डी.आर.एफ चे पथक

पुणे : मागील चार दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पुणे विभागातील पुणे, सांगली, कोल्हापूर व सातारा या जिल्हयातील नद्या दुथडी भरुन वाहत असून बहुतांशी भागास पुराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पुरामुळे बाधित पुणे विभागातील ४ हजार ७१२ कुटुंबातील १८ हजार ६७० नागरिकांना आतापर्यंत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पूर परिस्थितीत मदत व पुनर्वसनासाठी पुणे, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात एनडीआरएफ चे पथक दाखल झाले आहे, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्‍त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली.

सतत कोसळणारा पाऊस आणि धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे नद्यांना पुराचे स्वरुप आले आहे. पुणे जिल्हयातील पवना, इंद्रायणी, मुळा, मुठा या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा, वारणा, कृष्णा यासोबतच अन्य सर्व नद्यांना पुर आला आहे. सांगली जिल्ह्यातील कृष्णा, कोयना तर सातारा जिल्हयातील कृष्णा, कोयना, तारळी, उरमोडी या नद्यांना पूर आला आहे. पुणे महसूल विभागात आतापर्यंत १२५.४० टक्‍के पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस सांगली जिल्ह्यात १९९.२० टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात १५८ टक्के, कोल्हापूर जिल्ह्यात ९९ टक्‍के तर सातारा जिल्ह्यात १५९ टक्‍के तसेच सोलापूर जिल्ह्यात ७८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पूर परिस्थितीबाबत प्रशासन दक्ष असून संबंधित सर्व विभाग सतर्क राहून कार्यरत आहेत.

पुणे – मुळा, मुठा व पवना या नदया पुणे शहरातून जात असल्यामुळे शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे २ हजार ४०५ कुटुंबातील ८ हजार ८४२ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील जुनी सांगवी, दापोडी, रहाटणी, वाकड, रावेत, पिंपरी या परिसरातील काही भाग बाधीत झाला आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला, वरसगाव, पानशेत, पवना, निरा-देवघर, चासकमान, मुळशी या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नदयांच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला आहे.

सातारा – सातारा जिल्ह्यातील २२६ कुटुंबांतील ९२१ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यामधील कृष्णा व कोयना नद्यांना पूर आला असून या दोन्ही नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला आहे. कोयना धरणातून १ लाख ३ हजार ६०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग चालू आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा-लोणंद, जुना सातारा-पुणे, तारगाव-नांदगाव रोड, पाटण-मुळगाव, कराड-तांबवे, उंब्रज- मसूर, वाई- मांढरदेव आदी मार्ग पुरामुळे बंद झाले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशा सूचना देण्‍यात आल्‍या आहेत.

सांगली —कृष्णा व कोयना नदीला आलेल्या पुरामुळे सांगली व मिरज शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. सांगली जिल्हयातील ९१४ कुटुंबातील ३ हजार ९०७ लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.

कोल्हापूर — कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या दुतर्फा वाहत असून पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराने बाधित कोल्हापूर जिल्ह्यातील १ हजार १६७ कुटुंबातील ५ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

सोलापूर –सोलापूर जिल्हयामध्ये पर्जन्यमान कमी आहे. पुणे जिल्हयातील जवळ जवळ सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यामुळे उजनी धरणाचा पाणी साठा ७३ टक्‍क्‍यांपर्यंत पर्यंत गेला आहे. सोलापूर जिल्हयातील इंद्रायणी नदी किना-यावर राहणा-या नागरिकांना सतर्क राहण्‍याच्या सूचना देण्‍यात आल्या आहेत.

पावसाचा जोर वाढत असल्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केले आहे.

पीकविम्यासाठी शिवसेनेचा ‘ओरिएंटल इन्शुरन्स’वर मोर्चा

0

पुणे : शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे त्वरित मिळावेत, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आज (सोमवारी) ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीवर मोर्चा काढण्यात आला. तेथील अधिकाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे आणि माहिती नसल्याचे आढळून आले. त्यामुळे शिवसेना नेत्यांनीच त्यांना कागदपत्रे पुरवून पिकविम्याचे पैसे देण्याबाबत जाब विचारला. तब्बल २ लाख शेतकऱ्यांनी जवळपास ६०० कोटीची रक्कम विमा कंपनीकडे आली असूनही, ते शेतकऱ्यांना ती देत नाहीत. याउलट विम्याचे पैसे मागायला आलेल्या शेतकऱ्यांना उद्धटपणे बोलून त्यांना हाकलून दिले जात आहे. सादर कंपनीला पैसे न दिल्यामुळे आयआरडीएनेही दंड केलेला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना समस्यांचे गांभीर्य समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील सात दिवसात सर्व शेतकऱ्यांना थकीत रक्कम मिळेल, असे आश्वासन ओरिएंटल इन्शुरन्सकडून मिळाले असल्याचे पुणे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख बाळा कदम यांनी सांगितले आहे. या मोर्चामध्ये रवींद्र मिर्लेकर, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे महादेव बाबर,शहर समन्वयक आनंद दवे यांच्यासह अनेक नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पुण्यातील पूरस्थिती गंभीर नागरिकांनी सतर्कता बाळगावी : खासदार गिरीश बापट

0

पुणे -धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरणे भरली आहेत. धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नद्यांना महापूर आला आहे. पुढील काही तास हवामान खात्याने अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला असून नागरिकांनी सतर्कता बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी केले आहे. बापट म्हणाले की,  गेले काही दिवस धरणक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे शंभर टक्के भरली असल्याने पाण्याचा विसर्ग वाढवावा लागत आहे.  शेवटची माहिती माझ्याकडे आली तेव्हा खडकवासला धरणातून 45474 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाण्याचा प्रचंड प्रवाह असल्याने नदी पात्रालगत असलेल्या पाटील इस्टेट, मंगळवार पेठ, विश्रांतवाडी,शांतीनगर वसाहतीमध्ये पाणी शिरल्यामुळे जवळपास एक हजार बाधित कुटुंबांना अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शाळा, समाज मंदिर अशा सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. अशी माहिती मला प्राप्त झाली आहे.सध्या संसदेचे अधिवेशन सुरु असून बापट दिल्ली येथे आहेत. तरीही परिस्थितीवर लक्ष ठेऊन महापालिका पदाधिकारी,स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहे.  या आपत्कालीन स्थितीमध्ये नागरिकांना प्रशासनाच्या  वतीने सर्वतोपरी मदत केली जात आहे. मात्र नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे. आवश्यकता नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नद्यांची पाणी पातळी जास्त आहे. कोणत्याही क्षणी पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने पूर पाहण्यासाठी गेलेल्या नागरिकांनी पाण्याजवळ न जाता सुरक्षितता बाळगावी. असे आवाहन बापट यांनी या प्रसिद्धी  माध्यमातून केले आहे.

कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर, जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश

0

दिल्ली – जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्यात आले आहे. यापुढे जम्मू आणि काश्मीर हे राज्य राहणार नसून केंद्रशासित प्रदेश म्हणवले जाईल. सोबतच, लडाख हा वेगळा केंद्रशासित प्रदेश राहील. जम्मू आणि काश्मीवर मोठा निर्णय घेण्यासाठी केंद्रीय कॅबिनेटची महत्वाची बैठक सोमवारी सकाळी पार पडली. यानंतर काश्मीरवर झालेला ऐतिहासिक निर्णय संसदेला देण्यासाठी राज्यसभेच्या कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम 370 हटवण्याची शिफारस केली. 370 कलम हटवून त्यातील मोजक्या तरतूदी लागू ठेवल्या जातील असेही गृहमंत्री म्हणाले. हे ऐकताच सभागृहात एकच गोंधळ उडाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्याच्या अवघ्या काही महिन्यात हा निर्णय घेण्यात आला. देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा निर्णय मानला जात आहे. विशेष म्हणजे, काँग्रेस आणि इतर विरोधीपक्षांनी यास विरोध केला असताना अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या नेत्यांनी भाजपला या मुद्दयावर समर्थन दिले आहे.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/2318711488341616/

तीन माजी मुख्यमंत्री नजरकैदेत, कलम 144 लागू
जम्मू-काश्मीरमध्ये अस्वस्थतेच्या वातावरणात रविवारी रात्री १२ वाजता श्रीनगरमध्ये तीन माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. पोलिसांनुसार, संवेदनशील जम्मू-काश्मीरमध्ये रात्री १२ वाजता कलम-१४४ लागू करण्यात आले. जाहीर सभा-मोर्चांवर बंदी घालण्यात आली. मोबाइल इंटरनेट बंद करण्यात आले. सोमवारी सर्व शाळा-कॉलेज बंद राहतील.

तंत्र्याच्या 7 वर्षांनंतर राष्ट्रपतींच्या आदेशाने घटनेत हे जोडले होते
कलम 35A स्वातंत्र्याच्या 7 वर्षांनंतर म्हणजे 1954 मध्ये जोडण्यात आले. हे कलम नेहरू मंत्रिमंडळाच्या शिफारशीवर तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या एका आदेशाद्वारे घटनेत जोडण्यात आले. 35 A कलमात काश्मीरच्या कायम रहिवाशांसाठी नियम केले. यात काश्मीरच्या कायम रहिवाशांसाठी विशेष अधिकार व सुविधा आहेत. त्यामध्ये नोकऱ्या, संपत्ती खरेदी-वारसा, स्कॉलरशिप, सरकारी मदत व कल्याणकारी योजनांशी संबंधित सुविधा आहेत.

35-A मधील तरतुदी
> अन्य रहिवासी कायम रहिवासी म्हणून वास्तव करू शकत नाहीत.
> बाहेरचे लोक जमीन घेऊ शकत नाहीत. सरकारी नोकरीही मिळत नाही.
> राज्याच्या महिलेने अन्य राज्यात लग्न केल्यास हक्क हिरावले जातात.