Home Blog Page 2875

पावसाने पुणे विभागात १६ जणांचा मृत्यू तर २८ हजार कुटुंबांचे स्थलांतरण

0

पुणे- पुणे ,सातारा ,सांगली, सोलापूर कोल्हापूर जिल्हे असलेल्या पुणे विभागात पावसाच्या थैमानाने १६ जणांचा मृत्यू झाला तर २८ हजार कुटुंबांचे स्थलांतरन करण्यात आले .
पुणे विभागात आज अखेर सरासरी 751 मि.मी, 137 टक्केथ पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस सांगली जिल्ह्यात 213 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात 166 टक्के, कोल्हापूर जिल्ह्यात 116 टक्के तर सातारा जिल्ह्यात 173 टक्के तसेच सोलापूर जिल्ह्यात 78 टक्के पावसाची नोंद झाली आहे. पुणे विभागात 58 पैकी 30 तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे.

पुणे विभागातील पूर परिस्थिती बाबतची माहिती खालील प्रमाणे,

1. पुणे :- मावळ ,मुळशी, भोर ,वेल्हा, जुन्नर ,आंबेगाव, शिरुर, खेड या 8 तालुक्यात
अतिवृष्टी झाली आहे .
2. सातारा :- सातारा, कराड, पाटण, वाई या 4 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे .

3. सांगली :- मिरज, वाळवा, शिराळा, पलूस या 4 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे .

4. कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्हयातील सर्व तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे.

• धरणातील पाणीसाठा सदयस्थिती

 पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्हयातील सर्व धरणे 100 % भरली आहेत.

 स्थानांतरांची माहिती- पुणे विभागातील नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असुन नदीकाठच्या गावातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होणेबाबत सुचित करण्यात आले आहे. दि.07/08/2019 रोजी पर्यत.

• पुणे विभागातील जिल्हा निहाय स्थानांतरित केलेल्या कुटूबांचा तपशिल खालील प्रमाणे.

जिल्हा -स्थानांतरीत कुटूंबांची संख्या -स्थानांतरीत व्यक्तींची संख्या
1 पुणे          3343-                           13336
2 सातारा       1462-                          6262
3 सांगली          10282 –                    53228
4 सोलापूर         1878 –                   7749
5 कोल्हापूर          11432 –                   51785
एकूण                 28397-                     132360

• पुलांची व रस्त्यांची माहिती
1. पुणे :- पुणे जिल्हयातील धरणातुन होणारा पाण्याचा विसर्गामुळे ग्रामीण भागातील 103 मोठे
पुल व 433 छोटे पुल यापैकी 34 पुले पाण्याखाली गेले आहेत. पुणे महानगर पालिका
हद्दीतील 3 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील 2, पुणे कॅन्टोलमेंट हद्दीतील -1
असे एकुण पुणे जिल्हयातील 40 पुल पाण्याखाली गेले आहे.
2. सातारा :- सातारा जिल्हयामध्ये 8 पूल पाण्याखाली गेले असून पर्याची मार्ग उपलब्ध आहेत.

3. सांगली :- सांगली जिल्हयामध्ये प्रमुख राज्यमार्ग 6 प्रमुख जिल्हामार्ग 15 व इतर जिल्हा मार्ग 6
पाण्याखाली गेलेले आहेत.
4. कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्हयामध्ये 104 केटीवेअर 89 रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
पुरामुळे मयत व्यक्तींची माहिती..
1 पुणे (04मृत्यू )
2 सातारा (07मृत्यू )
3 सांगली (02मृत्यू )
4 सोलापूर (01मृत्यू )
5 कोल्हापूर( 02मृत्यू )
एकूण 16(मृत्यू )

• विस्थापित व्यक्तींची मदत व पुनर्वसन माहिती .
• पुणे विभागातील पुरांमुळे स्थानांतरीत झालेल्या व्यक्तींना महानगरपालिका शाळा , जिल्हा परिषद व इतर सार्वजनिक इमारतीमध्ये अशा ठिकाणी स्थानांतरित करणेत आलेले आहे.
• सांगली जिल्हयात जीवन ज्योत या संस्थेने ढवलीवाडी या गावातील 350 लोंकांच्या जेवणाच्या व्यवस्था केली आहे.
• मदत व बचाव कार्य-
• पुणे विभागातील सोलापूर वगळता चारही जिल्हयांनी NDRF पथकाची मागणी केली आहे.
* कोल्हापूर जिल्हयामध्ये 6 NDRF पथके पोहोचली असून आणखी 6 NDRF पथके रवाना होत आहेत. 1 Navy पथक पोहोचले आहे.
* सांगली जिल्हयामध्ये 3 NDRF पथके पोहोंचली आहेत. आणखी 3 NDRF पथके रवाना होत आहेत.
* सातारा जिल्हयामध्ये 1 NDRF पथके पोहोचले आहे.
तसेच Teritorial Army ची कोल्हापूर मध्ये 4 व सांगलीमध्ये 1 पथके कार्यरत आहेत.
• NDRF व जिल्हा पातळीवरील जीवरक्षक (Life saving) बोटींचा वापर करण्यात येत आहे.
• कोल्हापूर जिल्हयातील करवीर , हातकणंगले व शिरोळ या 3 तालुक्यामधील पुरामुळे 129 गांवे बाधित असून 11432 कुटूंब बाधित आहेत. त्यापैकी 51785 व्यक्तींना तात्काळ हालविणे आवश्यक आहे. कार्यवाही पूर्ण आहे.
• कोल्हापूर जिल्हयातील कागल व गडहिंग्लज या तालुक्यातील रस्ते चालु आहेत. इतर सर्व रस्ते बंद आहेत.
• कोल्हापूर जिल्हयात 3 NDRF पथक व Teritorisal Armmy 2 पथक, 10 बोटी व 140 जवान कार्यरत आहेत.
• महावितरण- पुणे विभागातील एकुण 162515 वीज ट्रान्सफार्मर पैकी 10882 असून ट्रान्सफार्मर बाधित आहेत. व त्यामुळे एकुण 256795 वीज ग्राहक बाधित झाले आहेत .
• वैदयकीय पथके – सांगली 72 व कोल्हापूर 57 व सातारा 72 अशी एकुण 201 पथके कार्यरत आहेत.
• उपलब्ध बोटी – सातारा स्थानिक 7 व NDRF 10 एकुण 17
सांगली स्थानिक 30 व NDRF 11, आर्मी 02 एकुण 43
कोल्हापूर स्थानिक 14 व NDRF 7, आर्मी 4 व नेव्ही 4 एकुण 29
• पुणे विभागात एकुण 89 बोटी कार्यरत

 8 ऑगस्ट रोजी फक्त मुळशी, भोर आणि मावळ या तीन तालुक्यातील शाळांना सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

0

पुणे,दिनांक 7- आपत्कालीन व पूर स्थिती कायम असल्यामुळे उद्या गुरुवारी दि. 8 ऑगस्ट, 2019 रोजी पुणे जिल्ह्यातील फक्त मावळ, भोर आणि मुळशी या तीनच तालुक्यातील सर्व प्री स्कूल, प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक व महाविद्यालये यांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी
सुट्टी जाहीर केली आहे.

क्रांतिकारकांच्या ग्रंथप्रदर्शनातून इतिहासाचे स्मरण -डॉ. न. म. जोशी

0

पुणे : “क्रांतिलेखक वि. श्री. जोशी यांचे लेखन अभ्यासकपूर्वक आणि ललित शैलीतील होते. सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल, अशा स्वरूपातील ही सगळी ग्रंथसंपदा आहे. क्रांतिकारकांच्या कार्यावरील ग्रंथाचे हे प्रदर्शन इतिहासाचे स्मरण करून देणारे आहे. या इतिहासाचे संवर्धन होणे गरजेचे आहे. मात्र, अलीकडच्या काळात लोकांनी इतिहासाकडे दुर्लक्ष केले आहे. स्वातंत्र्याची प्रेरणा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या ग्रंथसंपदेचा परिचय व्हायला हवा,” असे प्रतिपादन डॉ. न. म. जोशी यांनी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर (मुंबई), पुणे मराठी ग्रंथालय, इतिहास प्रेमी मंडळ व स्वानंद प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने थोर क्रांतीलेखक आणि क्रांतीकारकांचे चरित्रकार वि. श्री. जोशी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त भरविलेल्या क्रांतिकारांवरील ग्रंथाचे आणि छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी डॉ. जोशी बोलत होते. प्रसंगी वि. श्री. जोशी यांचे पुत्र चंद्रशेखर जोशी, इतिहास प्रेमी मंडळाचे मोहन शेटे, सावरकर स्मारकाचे नितीन शास्त्री आदी उपस्थित होते. ८, ९, १० ऑगस्ट या तीन दिवशी हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

चंद्रशेखर जोशी म्हणाले, “क्रांतीकारकांची सर्व माहिती एकत्र करण्यासाठी वि. श्री. जोशी यांनी अनेकांना लेखनासाठी पत्रव्यवहार केला. यातून त्यांनी क्रांतीकारकांवर ग्रंथ लिहले. याच माध्यमातून इतिहासाचे संग्रह केला गेला आहे. त्याचा फायदा इतिहास अभ्यासकांना होईल. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांची कादंबरी पहिली प्रकाशित झाली. त्यांनी केलेल्या लेखनाचे पुरावे असल्याने त्याबाबत एक विश्वासार्हता प्राप्त झाली होती.”
पुणे मराठी ग्रंथालयात भरलेले क्रांतिकारकांवरील हे ग्रंथांचे आणि फोटोचे प्रदर्शन १० ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.  मोहन शेटे यांनी प्रस्ताविक केले. विद्यूत पावगी यांनी सूत्रसंचालन केले. नितीन शास्त्री यांनी आभार मानले.

देशभरातील विमानतळांना बीसीएएसचा अतिदक्षतेचा इशारा

0

मुंबई – विमानतळांवर दहशतवादी हल्ले होण्याच्या शक्यतेने नागरी हवाई वाहतूकीची सुरक्षा सांभाळणाऱ्या ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेफ्टी (बीसीएएस) ने मुंबईसह देशभरातील विमानतळांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. देशातील हवाई वाहतूक क्षेत्राला वाढलेल्या धोक्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.१० ऑगस्ट ते २० ऑगस्ट या कालावधीत विमानतळावर आगंतुकांना प्रवेश दिला जावू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. १५ ऑगस्टला असणाऱ्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. दहशतवाद विरोधी पथक, जलद कृती दलांना सर्व विमानतळांवर कार्यरत करावे, निरीक्षण वाढवावे, विमानतळाकडे जाणाऱ्या नाक्यांवर वाहनांची व नागरिकांची तपासणी करावी, कार्गो टर्मिनलवरील सुरक्षेत वाढ करावी, सशस्त्र जवानांनी यावर लक्ष ठेवावे, टर्मिनल इमारत, ऑपरेशनल विभाग यामध्ये प्रवेश करणाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करावी, प्रत्येक प्रवाशावर लक्ष ठेवावे, विमानतळाच्या इमारतीत प्रवेश करण्याच्या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक तैनात ठेवावे, टर्मिनल इमारतीजवळ कोणतेही वाहन पार्क करण्यात येणार नाही याची काळजी घ्यावी, पार्किंगमध्ये लक्ष ठेवावे, टर्मिनल इमारतीत येणाऱ्या प्रत्येकावर बारीक लक्ष ठेवावे, विमानतळावर येणाऱ्या वाहनाची पूर्ण तपासणी करावी, चालकाचे ओळखपत्र तपासावे, हवाई रुग्णवाहिका (एअर अ‍ॅम्ब्युलन्ससहित) वेळापत्रकात नसलेल्या विमानांच्या उड्डाणांवर व आगमनावर लक्ष ठेवावे, विमानात कोणतीही अनधिकृत व्यक्ती प्रवेश करणार नाही याची काळजी घ्यावी, बॅगेज क्षेत्रावर देखील लक्ष ठेवावे, अशा विविध सूचना बीसीएएसच्या उप संचालक सी.के. रंगा यांनी दिल्या आहेत. विमानतळावरील सुरक्षेसोबत कोणतीही त्रुटी होणार नाही याची काळजी घ्यावी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) मुख्य विमानतळ सुरक्षा अधिकारी, बीसीएएसचे विभागीय संचालक यांनी परिस्थितीचा व्यक्तिश: आढावा घ्यावा व सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करावी असे निर्देश बीसीएएसच्या संचालकांकडून देण्यात आले आहेत. विमानतळांसोबत एअरिस्ट्रप, फ्लाईंग स्कूल, हवाई वाहतूक प्रशिक्षण केंद्रांवरील सुरक्षा वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पुणे-मुंबई ट्रेन अजून दोन दिवस राहणार बंद

0

पुण्यासह मुंबईमध्ये गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रेल्वेने पुणे-मुंबई धावणाऱ्या डेक्कन क्वीन, इंटरसिटी, सिंहगड आणि इंद्रायणी एक्स्प्रेस या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या मनमाड मार्गे वळवण्यात आल्या आहेत. मंगळवारी पुणे आणि मुंबई दरम्यान धावणाऱ्या सर्व रेल्वे पावसामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्या सुरळीत होण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील असा अंदाज मध्य रेल्वेनं व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी रेल्वे रूळ पाण्याखाली गेले आहेत. काही रेल्वे स्थानकांमध्येही पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रूळाला तडेही गेले आहेत. कर्जत-लोणावळा आणि बदलापूर-कर्जत दरम्यान दरड कोसळल्या आहेत. या परिस्थितीत गाडय़ा सोडणे धोक्याचे ठरू शकते, त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दोन्ही बाजूने गाडय़ा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच बुधवारी (७ ऑगस्ट) पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस आणि शुक्रवारी (९ ऑगस्ट) एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस या गाडय़ाही रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक सुरळीत

पुणे-मुंबई मार्गावरील गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झालेली रस्ते वाहतूक मंगळवारी सुरळीत झाली. पुण्याहून ठाणे, बोरिवली आणि दादरसाठी रवाना झालेल्या गाडय़ा, तसेच ठाणे, बोरिवली, दादर येथून पुण्यासाठी रवाना झालेल्या एसटी गाडय़ा विहित कालावधीत दाखल आल्या. रेल्वे गाडय़ा रद्द झाल्याने एसटी गाडय़ांना गर्दी वाढली होती. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीनुसार पुण्यातून मुंबईकडे जादा गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत.

कलम 370/ पाकिस्तानने भारतासोबतचे राजकीय संबंध तोडले, भारतीय उच्चायुक्तांना परत पाठवून द्विपक्षीय व्यापार केला बंद

0

इस्लामाबाद- जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध रद्द केले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी आज(बुधवार) राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत भारतासोबत कुटनितीक संबंध आणि द्विपक्षीय व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला.पाकिस्तानच्या खलीज टाईम्स ने यासंदर्भात वृत्त दिले आहे आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्या  इंस्ताग्राम आकावूंट वर या संदर्भात फोटो सह पोस्त टाकण्यात आली आहे जिचा हवाला खलीज टाईम्स ने दिला आहे .

या शिवाय न्यूज एजेंसी एएफपीनुसार, पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तर पाकिस्तानने आपला पुढील राजदूत भारतात न पाठवण्याचे ठरवले आहे. भारतासोबतच्या प्रकरणांना पाहण्यासाठी एक कमेटी तयार करण्यात आली आहे. कलम 370 प्रकरणी पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वीने संसदेचे संयुक्त सत्र बोलवले होते. येथे पाकिस्तानचे खासदार भारताविरुद्ध काळा पट्ट्या बांधून आले होते.

जुलै 2018 ते जानेवारी 2019 दरम्यान व्यापार झाला
पुलवामा हल्ल्यापूर्वी जुलै 2018 पासून जानेवारी 2019 दरम्यान दोन्ही देशांमध्ये 6,230 कोटी रुपयांचा व्यापार झाला होता. जानेवारी-जून 2018 च्या तुलनेत यात 5% वाढ झाली होती. तर, 2018-19 मध्ये दोन्ही देशांमध्ये 18 हजार कोटी रुपयांचा व्यापर झाला होता. हा 2017-18 च्या तुलनेत 1600 कोटी रुपये जास्त होता. यात भारताची पाकिस्तानात निर्यात 80% तर आयात फक्त 20% आहे.

जगाला काश्मीरची माहिती नाहीये

इम्रान म्हणाले होते, “भारत काश्मीरच्या लोकांना मिटवण्याचे ठरवत आहे. तो दहशतवादी ठरवून मुस्लिमांना हद्दपार करण्याची योजना आखत आहे. ही परिस्थिती पाहून परत एकदा पुलवामा होईल असे वाटत आहे. नंतर ते माझ्यावर आरोप लावून एअर स्ट्राइक करतील. आम्ही परत याचे उत्तर देऊत. परत युद्ध होईल. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत युद्ध करू. मी आणि माझा पक्ष जगातील इतर नेत्यांना काश्मीरमध्ये काय होत आहे हे सांगणार आहोत. आम्ही त्यांना सांगू की, भारत सरकार काश्मीरच्या लोकांसोबत आणि अल्पसंख्यांकासोबत काय करत आहे.”

 

सुषमा स्वराज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0

दिल्ली – माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. सुषमा स्वराज यांचे पार्थिव शरीर लोधी रोड येथील स्मशानभूमीवर आणण्यात आले. यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी निवासस्थानी लोकांच्या रांगा लागल्या होत्या. यानंतर सुषमा यांचे पार्थिव शरीर दुपारी भाजप मुख्यालयात आणण्यात आले. येथूनच सुषमा यांच्या अंतिम प्रवासाला सुरुवात झाली होती. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि इतर पक्षांचे नेते तसेच अनेक मान्यवर उपस्थितहोते .

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांनी सुषमा स्वराज यांच्या जंतर-मंतर येथील निवासस्थानी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मोदींनी यावेळी सुषमा यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि भावूक झाले. सुषमा यांना अंतिम निरोप देण्यासाठी पोहोचलेल्या इतर मान्यवरांमध्ये योग गुरू बाबा रामदेव, हेमा मालिनी, केरळचे माजी मुख्यमंत्री ओमेन चांडी, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल, बसप प्रमुख मायावती, कैलाश सत्यार्थी, अनुराग ठाकूर यांचाही समावेश होता.

वयाच्या 25 व्य वर्षी मिळाले होते मंत्रिपद, पहिल्या महिला विरोधीपक्ष नेत्या

1977 मध्ये कॅबिनेट मंत्री झाल्या त्यावेळी त्यांचे वय फक्त 25 वर्षे होते. त्या देशातील सर्वात युवा महिला कॅबिनेट मंत्री होत्या. इंदिरा गांधी यांच्यानंतर परराष्ट्र मंत्री पद भूषविणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या. दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या सुषमा स्वराज पहिल्याच महिला होत्या. भाजप सरकारमध्ये प्रथमच महिलेला मंत्री करण्यात आले, त्या देखील सुषमाच होत्या. 2009 मध्ये प्रथमच सुषमा स्वराज यांच्या नावे देशाला पहिल्या महिला विरोधीपक्ष नेत्या मिळाल्या होत्या.

पुन्हा ठरू नये कोणी पूरग्रस्त -राष्ट्रवादी चा नवा प्रस्ताव (व्हिडीओ)

0
पुणे-कोणत्याही स्वरूपाचे आढेवेढे न घेता ज्या ज्या लोकांचे संसार गेल्या काही दिवसात पावसाच्या पाण्याने ,नदी ,नाल्याच्या पुराने उघड्यावर पडलेत त्यांना 25 हजार रुपयांचे अर्थ सहाय्य करत ,या पुढे कोणी पूरग्रस्त ठरू नये यासाठी योजना राबविण्याची मागणी आज शहर राष्ट्रवादी चे अध्यक्ष चेतन तुपे पाटील आणि माजी आमदार बाप्पुसाहेब पठारे यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना भेटून केली .
 
यासंदर्भात तुपे पाटील म्हणाले कि , ५ आणि ६ हजार रुपये अशी मदत शासन आणि महापालिका यांच्या कडून दिली जाते पण ती सद्यस्थितीत खूप तुटपुंजी आहे .आणि शिवाय यात हि पात्र -अपात्र असा घोळ घालून जेरीस आणले जाते . कित्येकांचे संसार उध्वस्त झालेत अशा सर्वांना 25 हजाराची मदत मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे . शिवाय
आता यापुढे कोणत्याही वर्षी  ५० हजार क्युसेस पाणी नदीला सोडले तरी कोणी पूरग्रस्त राहणार नाही ,कोणाचे संसार उध्वस्त होणार नाहीत , या साठी पूर रेषा ठरवून त्या त्या ठिकाणी नागरिकांसाठी मोकळ्या जागा करून ,संबधित पूरग्रस्तांना विश्रांतवाडी येथील नॉन प्लान स्कीम मध्ये घरे द्यावीत ..तसेच  अन्य ठिकाणच्या पूरग्रस्तांना त्या त्या ठिकानाहून जवळची  घरे देता येतील या साठी झोपडपट्टी निर्मुलन पुनर्वसन योजनेतील वसाहतींचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहेत . अशा वसाहतीत असंख्य जादा घरे बांधली गेलीत आणि ती मोकळी आहेत ,किंवा त्याचा वापर बिल्डर कडूनच केला जातोय अशी घरे पूरग्रस्तांना देता  येतील . आणि पूर रेषेत पुन्हा अतिक्रमण होवू नये ,राडा रोडा कोणी टाकू नये यासाठी पूर रेषेतील जागा ताब्यात घेवून तिथे सुशोभिकरण,बागा ,अनुषंगिक प्रकल्प राबवून त्या जागा मोकळ्या ठेवाव्यात जेणे करून पावसाळा व्यतरिक्त त्यांचा नागरिकांसाठी योग्य उपयोग होवू शकेल .

स्वारगेट भुयारी मार्गाच्या निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी घंटानाद आंदोलन

0
पुणे :स्वारगेट भुयारी मार्गाच्या निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी  आज माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश प्रकाश निकम यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले.
आज दि ७ ऑगस्ट रोजी कार्यकारी अभियंता,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ, ( शिबिर कार्यालय, पुणे ) येथे  हे आंदोलन झाले.
स्वारगेट जेधे चौक येथील वाहन भुयारी मार्गामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याकारणाने पुराव्यासहित केलेल्या तक्रारी अर्जावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही म्हणून त्या निषेधार्थ घंटानाद आंदोलन करण्यात आले.
 निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारा विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी,  हा पूर्णपणे खराब दर्जाचा रस्ता बनवला आहे ,त्याची आय.आय.टी मुंबई यांच्याकडून चाचणी करण्यात यावी, तसेच सल्लागाराला व ठेकेदाराला काम झाल्यानंतर दिलेल्या आगाऊ दिलेल्या बिलाबाबत  जबाबदार व्यक्तीवर  तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
तक्रारी अर्ज पुराव्यासहित देऊन सुद्धा त्यावर कारवाई करून काम का केले नाही ,याबाबत चौकशी समिती बसवून त्या चौकशी समिती मध्ये नागरिक, आंदोलकांचा सदस्य प्रतिनिधी नियुक्त करून त्याचा अहवाल प्राप्त करावा.या प्रकरणात ठेकेदाराकडून काही आर्थिक  देवाण -घेवाण झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्याची शहानिशा करण्यात यावी.
कारवाईचे  लेखी स्वरूपात आश्वासन द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनाला निलेश निकम,प्रकाश निकम,गणेश जोशी,विशाल अलकुंटे,सुजित हांडे,कुणाल हेंद्रे, विजय रेड्डी,तम्मा कुसळकर, दीपक तुसाम  इत्यादी   उपस्थित होते.
कारवाईबाबत मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल व त्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची राहील असा इशारा निलेश प्रकाश निकम यांनी दिला आहे.

पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर…

0

नवी दिल्ली : देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. दरम्यान, आज सकाळपासून सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय नेत्यांसह सर्वसामान्यांनी त्यांचे अंमित दर्शन घेतले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंतिम दर्शन घेतले. अंतिम दर्शनावेळी पंतप्रधानांना आपले अश्रु अनावर झाले. यावेळी त्यांनी सुषमाजींच्या कुटूंबियांचे सांत्वन केले.उत्तम वक्‍त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा स्वराज यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे.

सर्वांनी त्यांचे आज अंतिम दर्शन घेतले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत भावूक होताना दिसले. तसेच त्यांनी सुषमा स्वराज यांच्या कुटूंबियांचे सांत्वनदेखील केले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनीदेखील सुषमा स्वराज यांचे अंतिम दर्शन घेत त्यांना आदरांजली वाहिली.

‘सुषमाजींच्या निधनाने अभ्यासू, कर्तृत्ववान नेतृत्त्व देशाने गमावले’

0

पुणे : उत्तम वक्‍त्या, अजातशत्रू राजकारणी आणि सहृदय व्यक्‍ती अशा देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. सुषमा स्वराज यांच्या निधनाने खासदार सुप्रिया सुळेंनीही हळहळ व्यक्त केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माजी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्‍कादायक आहे. सुषमाजी यांच्या जाण्याने अभ्यासू, कर्तृत्ववान नेतृत्त्व देशाने गमावले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे, अशी भावना व्यक्त केली आहे

एका वर्षात दिल्लीने गमावले तीन मुख्यमंत्री

0

नवी दिल्ली -भाजपातील प्रभावशाली नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राजधानी दिल्लीने एका वर्षात तीन मुख्यमंत्री गमावले आहेत. यापूर्वी शीला दीक्षित आणि मदन लाल खुराणा या दोन माजी मुख्यमंत्र्यांचे देहावसान झाले आहे.

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केंद्रातील सत्तेबरोबर दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदीही काम केले होते. १९९८ मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत सुषमा स्वराज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी होत्या. सुषमा स्वराज यांच्याबरोबरच तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे सांभाळणाऱ्या शीला दीक्षित यांचेही चालु वर्षातील जुलै महिन्यात निधन झाले.

शीला दीक्षित यांचे निधनही कॉर्डियाक अॅटॅकनेच झाले होते. १९९३ ते १९९६ या काळात दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी असलेल्या मदन लाल खुराणा यांचेही याच वर्षी निधन झाले आहे.

 

..अन फारुक अब्दुल्लांना अश्रू अनावर

0

नवी दिल्ली -लोकसभेत जम्मू काश्मीरमधील ३७० कलम रद्द आणि राज्याच्या विभाजनाबाबतच्या विधेयकावर चर्चा सुरु होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे बुजूर्ग नेते फारुक अब्दुल्ला काश्मीर बाबत अत्यंत महत्वाची चर्चा सुरु असताना उनुपस्थित आहेत याकडे लक्ष वेधले. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना ताब्यात घेतल्याची किंवा अटक केली नसल्याचा खुलासा केला. दरम्यान, फारुक अब्दुल्ला या संपूर्ण प्रकरणावर बोलताना भावूक झाले. त्यांनी मला ताब्यात घेतले होते गृहमंत्री खोटे कसे बोलू शकतात? अशी प्रतिक्रिया दिली.

८१ वर्षांच्या फारुक अब्दुल्लांनी त्यांना ताब्यात घेतल्याचा दावा एका वृत्त वाहिनीकडे केला आहे. त्यांनी ‘माझे राज्य जळत असताना, माझा लोकांना तुरुंगात टाकत असताना मी स्वतः कशाला घरात बसू मी सुरक्षा अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले आहे की तुम्ही मला का ताब्यात घेताय गृह मंत्र्यांनी तर मला ताब्यात घेतले नसल्याचे सांगितले आहे.’ असे सांगितले. त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलण्यासाठी दरवाजा तोडल्याचा दावा केला.

तसेच ज्या भारतावर विश्वास होता तो हा भारत नाही अशी भावुक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले ‘त्यांनी भागाचे तुकडे केलेत, ते ह्रदयाचे तुकडे करु शकतात? ते हिंदू मुस्लिमांना वेगळे करु शकतात? माझ्या मते माझा भारत हा सगळ्यांचा आहे ज्यांचा सेक्युलर आणि एकात्मतेवर विश्वास आहे

शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्यासाठी समिती स्थापन, अहवाल कधी येणार यावर मात्र अस्पष्टता

0

मुंबई, ता.  ६ :

राज्यात सुरू असलेल्या केंद्रीय शिक्षण मंडळासह इतर मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय अनिवार्य करण्यासाठी सरकारने शासनस्तरावर तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा आज शासन निर्णय जाहीर केला आहे. या मराठी भाषा विकास मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली १५ जणांची ही समिती असून त्यात शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार उपाध्यक्ष आणि इतर सदस्य आहेत.
मराठी भाषा विभागाने आज जारी  केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील इतर मंडळाच्या शाळांमध्ये असलेल्या अभ्यासक्रमात मराठी भाष विषय अनिवार्य करण्यासाठी ही समिती अभ्यास करून त्यासाठीचा अहवाल सरकारला सादर करणार आहे. मात्र हा अहवाल नेमका किती दिवसांत आणि महिन्यात सादर केला जाईल याबद्दल कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही, मात्र या समितीत असलेल्या सदस्यांना प्रवास भत्ता, आदी भत्ते देण्याविषयीचा मुद्दा स्पष्ट करण्यात आला आहे.
ही समिती शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मराठी भाषा हा विषय अनिवार्य करण्यासाठी राज्यात असलेल्या इतर मंडळांच्या शाळांचा भाषाविषयक अभ्यासक्रमाचा तुलनात्मक अभ्यास करून आपला अहवाल आणि शिफारसती सादर करणार आहे.
सरकारने स्थापन केलेल्या या समितीत सदस्य म्हणून साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, प्रा. कौतिकराव ढाले पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. नागनाथ कोतापल्ले, रंगनाथ पाठारे, डॉ. रेणू दांडेकर, डॉ. रमेश पानसे, डॉ. दादा गोरे, रमेश कीर, विभावरी दामले, सुधीर देसाई आणि शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णा आणि मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांचा समावेश आहे.
मराठीच्या भल्यासाठी केवळ अर्धवट निर्णय
राज्यातील मराठी भाषा टिकविण्यासाठी पावसाठी अधिवेशनात ‘मराठीच्या भल्यासाठी’ हे साहित्यिक आणि मराठी भाषा प्रेमींनी जनआंदोलन पुकारले होते. त्यामुळे मराठी भाषा विकास मंत्री विनोद तावडे यांनी यासाठी समिती नेमून महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले होते. आता ही  समिती नेमण्यात आली तरी अहवाल कधी सादर केला जाईल हे यात स्पष्ट करण्यात आले नसल्याने याविषयी साहित्यिकांमध्ये वाद निर्माण  होण्याची शक्यता आहे.
केवळ मराठी अनिवार्यचाच मुद्दा बाकींना बगल
तर दुसरीकडे ‘ मराठीच्या भल्यासाठी’  या आंदोलनात मराठी भाषेसाठी बृहत आराखडा मंजूर करावा, राजभाषा मराठीसाठी प्राधिकरण स्थापन करावे, मुंबईतच रंगभवनसाठी जागा देण्यात यावी, वाचन संस्कृतीचा विकास होण्यासाठी कार्यक्रम आखावा आणि मराठी शाळा वाचविण्यासाठी धोरण जाहीर करावे अशा मागण्या होत्या. त्यापैकी केवळ इतर शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्यासाठी सरकारने शासन निर्णय काढल्याने यावर येत्या काळात अनेक टीका होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं निधन

0

नवी दिल्ली: माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं हृदय विकाराच्या धक्कानं निधन झालं आहे. छातीत वेदना होत असल्यानं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ६७ वर्षांच्या होत्या.

मोदी सरकार १ मध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम करताना स्वराज यांनी त्यांच्या कामानं छाप पाडली होती. इराक च्या धुमश्चक्री मध्ये अडकलेल्या  असंख्य भारतीय मजुरांना मायदेशी परतण्यासाठी पुण्यातील पत्रकार शरद लोणकर यांनी केलेल्या  विनंतीवर  (मेल द्वारे ) त्यांनी तातडीने कार्यवाही करून कोलकाता , चेन्नई आणि महाराष्ट्रातील लातूर च्या युवक मजुरांची जातीने लक्ष घालून सुटका करवून त्यांना मायदेशी परत आणण्याची भूमिका पार पाडली होती .

दरम्यान आज तीन तासांपूर्वीच स्वराज यांनी ट्विट करुन काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याबद्दल मोदी सरकारचं कौतुक केलं होतं. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले होते. या क्षणाची मी आयुष्यभर वाट पाहत होते, असं स्वराज यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर काही वेळातच स्वराज यांची प्रकृती नाजूक असल्याचं वृत्त आलं. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हर्षवर्धन त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर थोड्या वेळातच त्यांचं निधन झालं.

भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या असलेल्या सुषमा स्वराज यांनी मोदी सरकार-१ मध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलं. जगभरातील भारतीयांना त्यांनी अतिशय तत्परतेनं मदत केली. त्याशिवाय पाकिस्तानसह अनेक देशातील रहिवाशांना त्यांनी माणुसकीच्या नात्यानं वेळोवेळी सहाय्य केलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या कायम मदतीसाठी तत्पर असायच्या. त्यांच्यातील संवेदनशीलतेचा अनुभव अनेकदा आला होता. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी मागील लोकसभा निवडणूक लढवली नाही. याबद्दलची घोषणा त्यांनी मागील नोव्हेंबर महिन्यात केली होती.