दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसाठी गुणांची तरतूद -आशिष शेलार
टाटा मोटर्स मधील क्लोजर चिंताजनक
पिम्परी -उद्योगनगरीचा कणा मानल्या जाणाऱ्या टाटा मोटर्सच्या चिखली प्रकल्पात ‘ब्लॉक क्लोजर’ चे पर्व सुरू आहे. ३० मे पासून २९ जूनपर्यंत महिनाभरातच १० दिवस ‘ब्लॉक क्लोजर’ घेतल्यानंतर कंपनीने आता ५ ते १० ऑगस्ट असे सहा दिवस पुन्हा ‘ब्लॉक क्लोजर’ घेतल्याने उद्योग क्षेत्रातील चिंतेत भरच पडली आहे.
वाहन उद्योगातील सततच्या मंदीमुळे वाहनांच्या विक्रीत घट होत आहे. उद्योगनगरीतील शेकडो उद्योग टाटा मोटर्सवर अवलंबून आहेत. तेथील परिस्थिती चिंताजनक असल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या काही दिवसांच्या अंतरावर कंपनीने सातत्याने ब्लॉक क्लोजर घेतले आहेत.
कार विभागात (कार प्लान्ट) ३० मे २९ जून दरम्यान दहा दिवस ‘ब्लॉक क्लोजर’ होता. पिंपरी प्रकल्पात (जे ब्लॉक) एक ते तीन ऑगस्ट दरम्यान चार दिवसांचा ‘ब्लॉक क्लोजर’ घेण्यात आला. त्या पाठोपाठ, आता वार्षिक देखभाल आणि दुरुस्तीचे कारण देत कंपनीने ५ ते १० ऑगस्ट असे सहा दिवस ‘ब्लॉक क्लोजर’ जाहीर केला आहे.
कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटनेतील करारानुसार, एक जानेवारी ते ३१ डिसेंबर या आर्थिक वर्षांत आवश्यकतेनुसार १८ ब्लॉक क्लोजर घेण्याचे मान्य करण्यात आले आहे. वर्षांतून १८ ब्लॉक क्लोजर करण्याचे धोरण असले तरी, यंदा सात महिन्यात तो आकडा पूर्ण झाला आहे. आणखी काही ब्लॉक क्लोजर याच वर्षांत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पिंपरी प्रकल्पातील ट्रक विभागातही ८ ते १० ऑगस्ट असा स्वतंत्र ब्लॉक क्लोजर घोषित करण्यात आला.
सांगली, कोल्हापुरातील आपत्ती अलमट्टी च्या हटवादी पणामुळे की प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे?
अभिनेत्री स्मिता गोंदकरने केलेले बिकिनी शूट…. येरे येरे 2 च्या सेट वरचे
बिग बॉस मराठी पर्व पहिलेमधील सर्वात जास्त चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता गोंदकर. स्मिता ‘पप्पी दे पारूला’ या गाण्यामुळे घराघरात पोहोचली होती. परंतु बिग बॉस मराठीमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली. बोल्ड लूक, दिलखेचक अदा, ग्लॅमरस अंदाज यासाठी स्मिता विशेष ओळखली जाते. स्मिताचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. नुकताच स्मिताने तिचे बिकिनीमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नुकताच स्मिता ‘ये रे ये रे पैसा २’ या चित्रपटात झळकली होती खरे तर हे बिकिनी शूट नव्हते .. ते येरेयरे 2 च्या सेटवर होते स्मिताने असे स्पष्ट केले आहे.
. या चित्रपटाची निर्मिती अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, पर्पल बुल एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनारोमा स्टुडिओज यांनी केली आहे. हृषिकेश कोळी यांनी पटकथा संवाद लेखन केले. या चित्रपटात अभिनेते संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार अशी दमदार स्टारकास्ट आहे. गायक अवधूत गुप्ते, मुग्धा कऱ्हाडे, शाल्मली खोलगडे आणि मिक्का सिंग यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत.
https://www.instagram.com/p/B08rX4RFkaC/
स्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये स्मिता अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. तिच्या या फोटोंनी अनेकांची मने जिंकली असून सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कमेंटचा वर्षावदेखील केला आहे.
स्मिता लवकरच राजू मिश्रा यांच्या ‘लव्ह बेटिंग’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात स्मितासह चिराग पाटील, काजल शर्मा, सायली शिंदे, अनंत जोग, राजेश श्रृगांरपूर, कमलेश सावंत, वैभव मांगले आणि अनिकेत केळकर हे देखील दिसणार आहेत
https://www.instagram.com/p/B07oiWnFXet/
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह म्हणजे कृष्ण-अर्जुनाची जोडी- अभिनेता रजनीकांत
चेन्नई(तमिळनाडू)- सुपरस्टार रजनीकांतने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर केंद्र सरकार्या निर्णयाचे स्वागत केले. रजनीकांतने रविवारी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना शुभेच्छा दिल्या. त्यानी मोदी-शाह यांना कृष्ण-अर्जुनची जोडी असल्याचे म्हटले.मात्र यातील कृष्ण कोण आणि अर्जुन कोण हे मात्र त्यांना च ठावूक आहे अशीही टिप्पणी करून रजनीकांतने काश्मीरवर सरकारच्या निर्णयाला मिशन काश्मीर असे संबोधले. रजनीकांत उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. रजनी यांनी संसदेतील अमित शाहंच्या भाषणाचे कौतुकही केले आणि म्हणाले की, आता लोकांना कळेल कोण आहे अमित शाह.
एक आटपाट नगर होते…(लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)
येथे कहाणी संग्रह मिळेल- गजानन बुक डेपोमधील बोर्ड वाचला आणि कहाणी संग्रहाचे पुस्तक गोष्टींसकट डोळ्यांसमोर फेर धरू लागले. श्रावण महिना चालू झाला की रोज संध्याकाळी त्या त्या वाराची कहाणी प्रार्थना आणि परवाचा म्हणून झाल्यानंतर वाचण्याचा नेम असायचा.
एक आटपाट नगर होते… या वाक्यानेच बहुतेक कहाण्यांची सुरुवात असे… प्रत्येक वाराची अशी कहाणी तर होतीच पण नागपंचमी, रक्षाबंधन , शिळा सप्तमी…अशा खास सणांच्याही वेगळ्या कहाण्या असायच्या. श्रावण महिन्यात तर सणावळांची रेलचेल, त्यामुळे तो विशेष आवडीचा. शाळांनाही भरपूर सुट्ट्या असायच्या. श्रावणी सोमवारी शाळा अर्धा दिवस कारण दिवे लागणीच्या आत उपवास सोडायचा. संध्याकाळी आजीबरोबर शंकराच्या देवळात जाऊन आलो की उपवास सोडायला सगळे एकत्र जेवायला बसायचो. (आजी खूप देव देव करणारी नव्हती, माणुसकी हाच तिचा देव धर्म.) आमच्या घरी काम करणारे सहदेव काकाही आमच्या सोबतच उपवास सोडायला बसायचे. सहदेव काम नंतर कर आधी उपवास सोडायला ये बघू- आजी बोलवूनच आणायची त्यांना
सहदेव काकालाही वाचनाची खूप आवड. श्रावण महिन्यात तो हरी कथासार, महाभारताच्या गोष्टी असे काही ना काही तरी धार्मिक-अध्यात्मिक पुस्तक वाचायचा. त्याने वाचलेली गोष्ट मग तो आम्हा भावंडांना छानपैकी त्याच्या शैलीत रंगवून सांगायचा. त्याची गोष्ट ऐकायला भलतीच मजा यायची.
नागपंचमी, रक्षाबंधन सगळेच सण आवडायचे आणि खास आवडता सण म्हणजे जन्माष्टमी. दहीहंडी फोडताना बघायची एक वेगळीच मजा होती. त्या दिवशी सकाळी सकाळी बाबा नाहीतर सहदेव काका वर्दी देऊन जायचे की विजयनगरची हंडी बांधली, रानडे रोडची अजून बांधली नाही. साधारण मग सकाळी १० नंतर बाबा हंडी बघायला घेऊन जायचे. ३-४ हंड्या बघून जेवणाच्या वेळेपर्यंत घरी यायचो. मग परत जेवून झाले की सहदेव काकाबरोबर हंड्या बघायला. संध्याकाळी घरी परतलो की आजी विचारायची – झाल्या का सगळ्या हंड्या फोडून का अजून बाकी आहेत?… आताच्या दहीहंडीत ती मजा नाही. हल्ली सगळं व्यावयासिक झालं आहे.
मंगळागौरीच्या खेळांची एक वेगळीच मजा होती. कुणाचे आमंत्रण आले की भारी आनंद व्हायचा, मंगळागौरीचे खेळ खेळायला मिळणार म्हणून. तिकडच्या आजीच्या ( आईची आई) बिल्डींगच्या गच्चीत मी, नीता मावशी, भावना मावशी आणि त्यांच्या मैत्रिणी आम्ही सगळ्या मिळून फुगड्या, दंड फुगडी, बस फुगडी, कोंबडा … रोजच खेळ खेळायचो. किती त्या गमतीजमती आणि किती त्या आठवणी ….
श्रावणी सोमवार, मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, पिठोरी अमावस्या… कहाणी संग्रहाचे एक एक पान उलगडता एक एक आठवण फेर धरून नाचू लागली डोळ्यांसमोर. साध्यासुध्या कहाण्या पण त्यातून बोध घेण्यासारखे खूप काही. आठवणींच्या रूपाने कहाणी संग्रहातील गोष्ट पुन्हा नव्याने वाचू लागले . एक आटपाट नगर होतं…
पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068
महावितरण पुणे परिमंडळातून ३ पथके सांगली व कोल्हापुरासाठी रवाना
पुणे –
महापुराच्या संकटामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात विस्कळीत झालेल्या वीज यंत्रणेला पूर्ववत करण्यासाठी
महावितरणच्या पुणे परिमंडळातून साधनसामुग्रीसह अभियंते व कुशल तारमार्ग कर्माचा-यांची पथके कोल्हापूर
व सांगली जिल्ह्यात रवाना करण्यात आलेली आहे.
पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री सचिन तालेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्यात ३ अभियंते व
१६ कुशल तारमार्ग कर्मचा-यांची ३ पथके कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पाठविण्यात आलेली आहेत.
तातडीची साधनसामुग्रीची व्यवस्था म्हणून ३१५ के.व्ही क्षमतेचे ३ रोहित्रे, १०० के.व्ही क्षमतेचे ४६ रोहित्रे,
१०-४० अम्पीयर थ्री फेजचे ५१६० मिटर तसेच टी अंड पी साधनसामुग्री ७ ट्रकद्वारे आज सकाळी रवाना
करण्यात आलेली आहे.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री संजीव कुमार यांनी सर्वतोपरी मदत करण्यासाठी
शेजारच्या जिल्ह्यातून अतिरिक्त मनुष्यबळ व साधनसामुग्री पुरविण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार पुणे
परिमंडळ येथून यापुढे गरजेनुसार मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक श्री
सुनील पावडे यांनी पूरग्रस्त भागात हल्ली मुक्काम ठोकला असून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामाला
वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहे. प्रतिकूल परिस्थितीसोबत मुकाबला करीत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी
महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न केल्या जात आहे.
केजेज् ट्रिनिटी महाविद्यालयाच्या टीमची ‘सुप्रा इंडिया’मध्ये उल्लेखनीय कामगिरी
बाधीत कुटुंबांना 5 हजारांची मदत रोखीने;उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा होणार
पुणे दि. 11: पुणे विभागातील पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील पूरपातळी ताशी एक इंचाहून अधिक या वेगाने ओसरत आहे. पावसाची स्थिती सामान्य राहिल्यास उद्यापर्यंत 70 ते 75 टक्के गावांचा संपर्क पूर्ववत सुरू होईल. सध्या संपूर्ण विभागातील 4 लाख 41 हजार 845 व्यक्तींना सुरक्षीत स्थळी हलवून त्यांची 524 निवारा शिबीरात व्यवस्था करण्यात आली आहे. यापुढे आरोग्यसेवा, स्वच्छतेसह मदत कार्याला प्राधान्य देण्यात येणार असून बाधीत कुटुंबांना 5 हजार रुपयांची रोख मदत दिली जाणार आहे. उर्वरीत रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली. तसेच बाधितांना युआडीच्या आधारे मदत देण्यात यावी त्यांना अन्य कोणत्याही पुराव्याची मागणी करू नये, अशा सूचना बँकांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे विभागातील पूरस्थिती, बचाव व मदत कार्याबाबत माहिती देण्यासाठीविभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. म्हैसेकर बोलत होते.
डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात पावसाचा जोर ओसरला असून अलमट्टी धरणातून 5 लाख 30 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, मात्र धरणात 6 लाख 45 हजार क्युसेक एवढी पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे पूर पातळी कमी होण्यास वेळ लागत आहे. सांगली आणि कोल्हापूरच्या नद्या अजूनही धोका पातळीच्यावर सरासरी सात ते आठ फूट वाहत आहेत. विभागातील 163 रस्ते बंद असून 79 पूल पाण्याखाली आहेत. कोल्हापूरशी अजूनही रस्ते वाहतूक सुरु झालेली नाही, पुणे-बंगळूरु महामार्गावरील वाहतूक अजूनही बंद आहे, आज संध्याकाळपासून रस्त्यांची चाचणी करून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक कोल्हापूरला करण्यात येणार आहे. मात्र सध्या सामान्य वाहनांसाठी बंदच राहणार आहे. पावसाची स्थिती सामान्य राहिल्यास उद्यापर्यंत 70 ते 75 टक्के गावांचा संपर्क पूर्ववत होण्यास मदत होणार आहे.
4 लाख 41 हजार 845 व्यक्तींचे स्थलांतर
पुणे विभागातील एकूण 4 लाख 41 हजार 845 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून त्यांची 524 निवारा केंद्रात सोय केलेली आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 1 लाख 58 हजार 97, कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लाख 45 हजार 229, सातारा जिल्ह्यातील 10 हजार 486, सोलापूर जिल्ह्यातील 26 हजार 991 तर पुणे जिल्ह्यातील 161 लोकांचा समावेश आहे. पुरामुळे विभागात एकूण 40 व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 19 लोक, कोल्हापूर जिल्ह्यातील 6 लोक, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी 7 लोक तर सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील ब्रम्हनाळ येथील बोट दुर्घटनेतील बेपत्ता असणाऱ्या 5 व्यक्तींचे मृतदेह आज सापडले असून एक व्यक्ती जिवंत आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या 17 एवढी आहे, या दुर्घटनेतील आणखी कोणीही बेपत्ता नाही.
मदत कार्याला प्राधान्य
सध्या पूराच्या पाण्याची पातळी कमी होत असल्याने कोठेही बचावाची मागणी नव्याने होत नाही. त्यामुळे मदत कार्याला प्राधान्य देण्यात येत आहे. शासनाच्यावतीने 10 हजार ब्लँकेट, साडे बारा हजार चटई एनडीआरएफच्या टीमव्दारे सांगलीकडे पाठविण्यात आल्या आहेत. उद्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी मदत रवाना होईल. महावितरणच्या माध्यमातून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या पुरामुळे 30 उपकेंद्रातील 412 वाहिन्या, 9 हजार 489 रोहित्रे व 3 लाख 29 हजार 603 ग्राहक बाधीत झाले आहेत. त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. आतापर्यंत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लाख 18 हजार 467 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
पासबुक, चेकची सक्ती नाही
पुरामुळे बाधीत झालेल्या कुटुंबांकडील पासबुक, चेकबुक खराब झाले असल्याचे गृहीत धरून मदत देताना बँकांनी युआयडीच्या माध्यमातून बाधीतांना पैसे देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच शासनाकडून देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानापैकी 5 हजार रुपयांची मदत प्रत्येक कुटंबांना रोख स्वरूपात देण्यात येणार आहे. तर उर्वरीत रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. तसेच बाधित क्षेत्रातील 469 एटीएम पैकी 218 बंद असून 251 एटीएम सुस्थितीत आहेत. बंद एटीएम तातडीने दुरूस्त करून घेण्याबरोबरच प्रत्येक एटीएममध्ये पुरेशी रक्कम ठेवण्याच्या सुचना बँकांना देण्यात आल्या आहेत. तसेच एसबीआय व ट्रेझरी बँकांनी जिल्हा मध्यवर्ती बँकांना तातडीने रक्कम उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही मृत जनावरांचे स्वतंत्र शवविच्छेदन न करता संबंधित बाधीतांना वीमा रक्कम मंजूर करण्याच्या सूचना वीमा कंपन्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पाणी पुरवठा योजनांच्या दुरूस्तीला प्राधान्य
पुणे विभागातील बाधीत झालेल्या पाणी पुरवठा योजना प्राधान्याने दुरूस्त करून पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काम सुरू आहे. सध्या मीरज शहराच्या पाणी पुरवठा योजनेतून सांगली शहराला तर कोल्हापूर शहराला शिवाजी विद्यापीठाच्या पंपींग स्टेशनवरून पाणी पुरवठा केला जात आहे. कोल्हापूर आणि सांगली शहरांचा पाणीपुरवठा शहरातील पाणीपातळी घटताच करण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाणी पुरवठा योजना प्राधान्याने दुरूस्त करण्यात येणार आहेत.
स्वच्छतेचे काम सुरू
पुरामुळे बाधीत झालेल्या ठिकाणी कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरू नयेत म्हणून स्वच्छतेची कामे सुरू करण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी पाणी ओसरले आहे त्याठिकाणी स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापनासाठी टेंडर काढण्यात येणार असून मशीनव्दारे स्वच्छता करण्यात येणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्यावतीने स्वच्छता कार्मचाऱ्यांची टीम व साहित्य बाधीत भागात रवाना करण्यात आले आहे.
बँक ऑफ बडोदा सादर करीत आहे नवीन गृह कर्ज योजना
मुंबई, ११ ऑगस्ट, २०१९: भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांच्या पंक्तीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बँक ऑफ बडोदाने नवीन गृह कर्ज योजना सादर केली आहे. बँक ऑफ बडोदाची ही नवीन गृह कर्ज योजना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटला लिंक्ड आहे. नवीन गृह कर्ज योजनेमध्ये व्याज दर हे बाह्य मापदंडाला लिंक्ड असतील, याठिकाणी बाह्य मापदंड रेपो रेट आहे. अशाप्रकारची थेट लिंक असल्यामुळे आर्थिक धोरणानुसार दरांमध्ये केल्या जाणाऱ्या बदलांचे थेट लाभ निष्पक्ष व पारदर्शी पद्धतीने ग्राहकांना मिळू शकतील.या नवीन प्रकारच्या योजनेमध्ये बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना बँकेच्या फंड्सच्या किमतीनुसार इंडेक्स करण्यात येणाऱ्या एमसीएलआर लिंक्ड दर आणि बाह्य मापदंडाला लिंक्ड असलेला रेपो रेट यापैकी आपल्याला हवा तो पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.सध्या गृह कर्जाचा एमसीएलआर लिंक्ड दर हा ८.४५% पासून सुरु होत असून, एमसीएलआरमध्ये १५ बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आल्यानंतर ७ ऑगस्टपासून तो लागू करण्यात आला आहे.नवीन गृह कर्ज योजना प्रकारामध्ये रेपो रेट लिंक्ड व्याज दर देखील उपलब्ध असेल जो ८.३५% पासून सुरु होतो. अशाप्रकारे सध्या यामध्ये एमसीएलआर दरानुसार असलेल्या किमतीच्या तुलनेत १० बेसिस पॉइंट्सचे लाभ मिळू शकतात.भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो अर्थात व्याज दरांमध्ये ३५ बेसिस पॉइंट्सची कपात केल्यानंतर बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आरबीआयचा सध्याचा रेपो रेट गेल्या पाच वर्षातील सर्वात कमी म्हणजे ५.४०% आहे.
बीएमसीसीत ऑनलाईन अभ्यासक्रम
पुणे, ता. ११ ः डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे ऑनलाईन क्रेडिट अभ्यासक‘म सुरू करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांनी कळविली आहे.
रीटेल मॅनेजमेंट, ऑफिस मॅनेजमेंट, बिझनेस एथिक्स, बिझनेस इकॉनॉमिक्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, हिंदुस्थानी रागा संगीत आदी अभ्यासक‘मांसाठी प्रवेश प्रकि‘या सुरू आहे. त्यासाठी www.swayam.gov.in संकेतस्थळावर नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
समाजसेवा दुर्बलांचे आयुष्य ‘आनंदमय’ करणारी असावी- डॉ. प्रकाश आमटे
डॉ. मिलिंद पांडे म्हणाले, “प्रत्येकाची ‘समाजसेवेची’ व्याख्या भिन्न असू शकते. प्रत्येकाने आपल्या परीने योगदान द्यावे. एमआयटीच्या स्थापनेपासून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम सुरु आहे. लातूरमधील किल्लारीचा किंवा गुजरातेतील भुजचा भूकंप असो किंवा उत्तराखंडचा महाप्रलय असो अशा अनेक आपत्तीमध्ये एमआयटीने सहभाग घेत पीडितांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे. संस्थेच्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भावना रुजावी, या उद्देशाने अशा प्रकारचे कार्यक्रम नियमितपणे आयोजिले जातात.” शिल्पा तांबे यांनी सूत्रसंचालन केले. योगेश कुलकर्णी यांनी आभार मानले.
पुण्यातील परदेशी विद्यार्थ्यांनी साजरी केली बकरी ईद !
आझम कॅम्पसमध्ये अत्तर, गुलाब, चॉकलेट वाटप
पुणे :
शिक्षणासाठी पुण्यात राहणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यानी रविवारी ११ ऑगस्ट रोजी आझम कॅम्पस येथे बकरी ईद ( ईद -अल -अधहा ) साजरी केली.
रविवारी सकाळी साडेसात वाजता अरब, आखात आणि अनेक देशातील सुमारे १ हजार विद्यार्थी आझम कॅम्पस मशिदीमध्ये एकत्र आले.नमाज पठण केल्यानंतर त्यांनी प्रेमाने एकमेकांच्या गळाभेटी घेतल्या. त्यानंतर या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प ,अत्तर, चॉकोलेट देण्यात आले . महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी सर्वांना शुभेच्हा दिल्या.
या विद्याथ्र्यांनी एकमेकांसमवेत फोटो काढण्याचा, सेल्फीचा आनंद लुटला आणि घरच्यांना लगोलग सोशल मीडियाद्वारे ख्याली खुशाली कळवली.
जि.प प्राथ़ शाळा ठाकरवाडी (तेजूर)येथे “जागतिक आदिवासी दिन” साजरा.
सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष
दिल्ली -येथे पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी यांच्याच नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांची काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
याआधी राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. राहुल गांधी यांनी ३ जुलै २०१९ रोजी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल यांनी पक्षाध्यक्षपद नाकारलं. त्यानंतर तीन महिन्याहून अधिक काळ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्तच होते. शनिवारी रात्री झालेल्या बैठकीत सर्वमताने सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्षपदी निवड झाली आहे.

