Home Blog Page 2863

गायकवाड यांना ‘समाजभूषण’, तर सातारकर यांना ‘कार्यभूषण’ पुरस्कार

0

पुणे : श्री शिवसाई प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात येणारा ‘महर्षी धोंडो केशव कर्वे समाजभूषण पुरस्कार’ अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सचिव व जिजामाता हायस्कुलच्या माजी मुख्याध्यापिका प्रमिला गायकवाड यांना, तर वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात येणारा ‘डॉ. आयडा स्कडर कार्यभूषण पुरस्कार’ ऍक्युपंक्चर स्पेशालिस्ट डॉ. सुमिता सातारकर यांना जाहीर झाला आहे.

येत्या रविवारी (दि. २५ ऑगस्ट २०१९) दुपारी १२ वाजता नवी पेठेतील पत्रकार भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून, पुणे शहर महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शलाका पाटील आणि इलेक्टॉहोमिओपँथी तज्ञ प्रतिमा सिंग या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आहेत. तर महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. सुमिता सातारकर यांनी जपान, चीन आणि अमेरिका या देशात जाऊन एक्यूपंक्चरवर पीएचडी केली आहे. आजवर त्यांनी ८५०० पेक्षा अधिक लोकांना व्याधीमुक्त केले आहे. 

काश्मीर केवळ प्रेमानेच जिंकता येईल : संजय सोनवणी

0

पुणे-‘ काश्मीरचा इतिहास प्रेम, समन्वय, सलोख्याचा आणि सर्व धर्माच्या सहअस्तित्वाचा आहे. काश्मीर हे जागतीक ज्ञानाचे प्रदीर्घकाळ ज्ञानकेंद्र राहिलेले आहे. काश्मीर हे केवळ प्रेमानेच जिंकता येते, त्याच्यावर बळजबरी झाल्यास काश्मीर बंड करते, हाही इतिहास आहे, ३७o च्या उरल्या सुरल्या तरतुदी चुकीच्या पद्धतीने दडपशाहीचे वातावरण निर्माण करत रद्द करुन आपण काश्मीरींचा विश्वास गमावला आहे. तो आत्या पुन्हा प्राप्त करणे हे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे ‘ असे प्रतिपादन लेखक संजय सोनवणी यांनी केले.

‘ काश्मीर : काल, आज आणि उद्या ‘ या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी व युवक क्रांती दल यांनी हे व्याख्यान आयोजित केले होते.

गांधी भवनच्या सभागृहात २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी हे व्याख्यान झाले.

अध्यक्षस्थानी अन्वर राजन हे होते

सोनवणी म्हणाले, “काश्मीरच्या रक्तातच कडवेपणा नाही. तेथील मुळचा बौद्ध असलेल्या राजा रिंचेनला हिंदू धर्मात प्रवेश नाकारल्यामुळे त्याने मुस्लीम धर्म स्वीकारला लागला. डोग्रा घराण्याच्या राज्य काळात तेथील मुस्लिमांचे दमन झाले. अनेक अन्यायकारक कर लादत त्यांना भुमीहीन करण्यात आले. असंतोष निर्माण झाला. काश्मीरी पंडित आणि मुस्लीम यांच्या सहअस्तित्वात मुलतत्ववाद्यांमुळे दरी निर्माण करायला हे घटक कारणीभूत झाले. काश्मीर प्रश्नाला हे दमन सर्वाधिक कारणीभूत आहे.

“जमीनी खरेदी बाहेरच्यांना रोखण्याचा कायदा ब्रिटिशांना रोखण्यासाठी आला. कलम ३७० कोणाच्या चुकीने आले हे समजून घेतले पाहिजे.

ते पुढे म्हणाले, “हरीसिंग यांच्या आग्रहामुळे ३७० कलम आले. तरी पंडित नेहरूंना दोष दिला जातो आहे आणि डॉ.आंबेडकर यांचा विरोध असल्याचा खोटा प्रचार केला जातो. भारताने मुत्सद्दीपणाने कलम ३७o पातळ केले. १९५४ मध्येच काश्मीरला काश्मीरच्याच राज्यघतनेत भारताचा अविभाज्य भाग ठरवण्यात आले आणि लगेचच घटनासमितीही बरखास्त करण्यात आली.

राष्ट्रपतींच्या अध्यादेशाने केंद्राचे अधिकार वाढवत केंद्र-राज्य संबंधातील ९७ पैकी ९४ तरतुदी रद्द करण्यात आल्या. उरलेल्यापैकी जमीन खरेदीचे अधिकार हे इतर राज्यात देखील नाहीत, ही वस्तुस्थिती लक्षात घेतले पाहिजे.३७० कलम रद्द होणे म्हणजे काश्मीरचा सामीलनामा रद्द होणे होय. त्यामुळे ३७० कलम आजही पुर्ण रद्द करण्यात आलेले नाही पण तसे केल्याचा भ्रम मात्र निर्माण करण्यात आला आहे.

“काश्मीरमधील दमनाच्या असंतोषाविरूध्द लिबरेशन फ्रंटचा जन्म झाला. तोपर्यंत प्रशासन आणि सर्व स्तरावर पंडितांचे वर्चस्व होते. त्या वर्चस्वाला आव्हन देणे हा दहशतवाद्यांचा हेतू होता. १९८९-९० मध्ये झालेले पंडितांवरचे खुनशी हल्ले हे दमन आणि धर्म यांचे भेसळ करत केले गेले.

हिमाचल, आसाम, नागालँड येथेही जमीनी खरेदी करता येत नाहीत. आदिवासी, तसेच वतनाच्या जमीनीही खरेदी करता येत नाहीत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

आपण फसवले गेलो आहोत, बळाच्या जोरावर आपल्याला वागवले जात आहे, असे अविश्वासाची भावना आज काश्मीरमध्ये आहे. त्यामुळे हे एकसंध राष्ट्र म्हणून उभे राहणार का ? याचा अंदाज आपण करू शकतो, असेही ते म्हणाले.

सोनवणी म्हणाले, ‘आज काश्मीरची अर्थव्यवस्था ढासळली आहे. काश्मीरचे पर्यावरण नाजूक असल्याने तेथे उद्योग वाढीस मर्यादा आहेत, हे सांगीतले जात नाही. स्थानिकांचे सहकार्य असल्याशिवाय जगात कोठेही उद्योग उभारला जाऊ शकत नाही. जैतापूरचे उदाहरण अगदी ताजे आहे.

जागतिक वातावरणही अनुकुल आहे, आणि तसेच राहील , असे सांगीतले जात आहे. तसेच लष्कर किती काळ ठेवणार , हाही प्रश्न आहे.

जगातील कोणताही प्रश्न प्रामाणिकपणा असेल तर गांधीजींच्या मार्गाने सुटू शकतो, असेही सोनवणी यांनी सांगीतले.

काश्मीरींचा आता विकास करू, असे पंतप्रधान म्हणत आहेत, मग, आधी कोणी अडवले होते, असा सवालही त्यांनी केला.

“काश्मीरच्या भूमीत आपल्याला रस आहे, काश्मीरींमध्ये रस नाही, हे दुःखदायक आहे, तेथील जनतेत अविश्वास वाढवत नेणे चुकीचे ठरू शकते. काश्मीरींना त्यांची चांगली – वाईट , जी असेल ती प्रतिक्रिया व्यक्त करू द्यायला हवी होती “,असे अन्वर राजन यांनी अध्यक्षस्थानावरुन बोलताना सांगीतले . काश्मीर हा आपला बंधू आहे की बंधक आहे ? असा सवालही त्यांनी केला.

डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या वाढदिवसानिमित्त हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ‘युक्रांद ‘ शहराध्यक्ष सचिन पांडुळे यांनी सूत्रसंचालन केले. तुषार झरेकर यांनी संयोजन केले. अतुल नंदा यांनी प्रास्ताविक केले. कमलाकर शेटे यांनी आभार मानले.

तामिळनाडू प्रीमियर लीगमधील बीकेटीच्या पर्यावरणीय मोहिमेमध्ये आंतरराष्ट्रीय आणि भारतीय नामवंत क्रिकेटपटू सहभागी

0

स्कॉट स्टायरिस, शेन वॉटसन, हेमांग बदानी, रविचंद्रन अश्विन, विजय शंकर, वॉशिंग्टन सुंदर, नारायण जगदीसन यांच्या हस्ते दिंडीगुल आणि चेपाक येथे वृक्षारोपण

सोमवार, 21 ऑगस्ट 2019 : भारतीय अष्टपैलू रविचंद्रन अश्विन यांच्यासह माजी भारतीय खेळाडू हेमांग बदानी आणि भारतीय अष्टपैलू विजय शंकर आणि वॉशिंग्टन सुंदर, दिंडीगुल ड्रॅगन्सचा कर्णधार नारायण जगदीसन यांनी बालकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (बीकेटी) या टायर उत्पादक कंपनीने आयोजित केलेल्या वृक्षारोपण मोहिमेचे नेतृत्व केले. न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू स्कॉट स्टायरिस आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार शेन वॉटसन हेही या मोहिमेत सामील झाले.

सध्या सुरू असलेल्या शंकर सिमेंट तमिळनाडू ट्वेंटी-२० प्रीमियर लीग (टीएनपीएल) दरम्यान क्रिकेटमधील कौशल्य आणि निसर्गाचे संवर्धन यांचा सुरेख मिलाप बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेडने (बीकेटी) साधला.

मिड विकेट आणि लाँगऑन दरम्यानच्या सीमेपासून काही मीटर अंतरावर असलेल्या प्रचंड आकाराच्या बीकेटी टायरच्या दिशेने फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांच्या वतीने, लीगच्या सहयोगी प्रायोजकांनी हजारो रोपट्यांची लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. हा उपक्रम सद्गुरूशी संबंधित ईशा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने घेण्यात आला.

बीकेटी टायर्सचे सहव्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार यांनी टीएनपीएलच्या उपक्रमातून 50 हजार रोपे लावण्याची आशा बाळगली आहे. ते म्हणाले, “ईशा फाऊंडेशन या सद्गुरूशी संबंधित स्वयंसेवी संस्थेशी आम्ही हातमिळवणी केली आहे. टीएनपीएलच्या माध्यमातून आम्ही तमिळनाडूमध्ये सुमारे 50 हजार रोपांची लागवड करू, अशी आमची अपेक्षा आहे.”

प्लेऑफमध्ये, जर बीकेटी टायरला चेंडू लागला तर 10,000 रोपांची लागवड केली जाईल आणि अंतिम फेरीत 20,000 रोपे लावली जातील.

फलंदाजांनी सामन्यादरम्यान बीकेटी टायरला अधिक वेळा फटकवावे, जेणेकरून जास्त रोपे लावता येतील, अशी इच्छा वॉटसन यांनी व्यक्त केली. “तामिळनाडू राज्यात सर्वत्र अधिक झाडे लावणे हा एक चांगला उपक्रम बीकेटीने सुरू केला आहे. आपल्या सर्वांना वृक्षारोपणाचे असे उपक्रम सुरूच ठेवावे लागणार आहेत, कारण केवळ भारतातच नव्हे तर जगभरात बरीच झाडे तोडली जात आहेत. मला आशा आहे की षटकार मारल्यानंतर जमिनीवर पडणाऱ्या चेंडूंपैकी काही चेंडू टायरला भिडतील आणि जास्तीत जास्त झाडे लावता येतील, असे वॉटसन यांनी म्हटले.

टीएनपीएलशी युती करणे आणि वृक्षारोपणासारखा उपक्रम राबविणे यातून बीकेटीची पर्यावरणाबद्दल असलेली चिंता अधोरेखीत होते, असे मत पोद्दार यांनी व्यक्त केले. “आम्ही एक कंपनी म्हणून आपल्या पर्यावरणाबद्दल खूप जागरूक आहोत. ही आमची जागरुकता सध्याचीच नव्हे तर गेल्या अनेक दहा वर्षांपासूनची आहे. उत्तर भारतातील आमच्या दोन कारखान्यांना लागणाऱ्या विजेपैकी जवळपास 50 टक्के वीज ही पवनचक्क्यांद्वारे उत्पादित केली जाते. हे 2004 पासून सुरू आहे. ऊर्जा संवर्धन आणि त्याचे शाश्वत प्रयत्न यासाठी राष्ट्रपतींकडून आम्हाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आम्हाला दोन वर्षे हा पुरस्कार मिळाला आहे आणि पुन्हा तो मिळावा, अशी आमची इच्छा आहे. पर्यावरण रक्षणाच्या कामात आम्ही मोठी गुंतवणूक केली आहे. आम्ही एक लाखापेक्षा अधिक जास्त झाडे लावली आहेत. या आमच्या कामगिरीबद्दल आम्ही खूप जागरूक आहोत, ” असे पोद्दार म्हणाले.

जगातील अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये बीकेटी टायर्सची पूर्वीपासून उपस्थिती आहे. परंतु क्रीडा स्पर्धा आणि पर्यावरणविषयक कृती असा एकत्रित उपक्रम घेण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे पोद्दार यांनी सांगितले. “जागतिक स्तरावर आम्ही फ्रान्स आणि इटलीमधील फुटबॉलशी संबंधित आहोत. अमेरिकेत आमचे टायर वापरले जातात, या कारणामुळेही अनेकदा आम्ही विविध स्पर्धांशी जोडले जातो. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश क्रिकेट लीगशीही आमचा संबंध आहे. भारतात आम्ही प्रो-कबड्डी आणि आता टीएनपीएलशी व्यापकपणे संबंधित आहोत. आम्ही भारत सुपर लीग कबड्डीदेखील प्रायोजित केली. या स्पर्धेच्या चार सत्रांपैकी एक तामिळनाडूतील कोईंमतूरमध्ये आयोजित करण्यात आले होते, असे पोद्दार यांनी नमूद केले.

तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव आर. आय पलानी म्हणाले, की बीकेटीचा हा वृक्षारोपणाचा उपक्रम आता खूपच व्यापक झाला आहे आणि निसर्गाच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्यात लीगमध्ये या उपक्रमाने बरीच प्रगती गाठली आहे. ते म्हणाले, “बीकेटीची ही मैदानावरील आणि मैदानाबाहेरील कृती ही संघांमधील चर्चेचा विषय ठरली आहे. क्रिकेटपटूंनी रोपांची लागवड केल्याने हे सिद्ध होते की भविष्यातील हिरव्यागार प्रयावरणासाठीदेखील ते फलंदाजी करण्यास उत्सुक आहेत.”

अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर काळाची गरज

0
अमोल झिरमिले यांचे मत; विज्ञान परिषद, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सतर्फे व्याख्यान
पुणे : “पेट्रोल, गॅस, कोळसा अशा इंधनस्रोताचा ऱ्हास थांबवून निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या पवन, जल आणि सौर ऊर्जेसारख्या नैसर्गिक स्रोतांचा वापर करणे ही काळाची गरज आहे. भविष्यात इंधन टंचाई भासणार आहे. त्यामुळे या नैसर्गिक ऊर्जास्रोतांचा वापर करण्याबाबत जागृती होणे आवश्यक असून, सरकारकडून त्यासाठी प्रोत्साहन म्हणून अनुदान योजना आणल्या जात आहेत,” असे मत अमोल झिरमिले यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद, दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या वतीने ‘अपारंपरिक ऊर्जास्रोत : सत्य आणि मिथक’ या विषयावर झिरमिले यांचे व्याख्यान झाले. जंगली महाराज रस्त्यावरील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या फिरोदिया सभागृहात झालेल्या या व्याख्यानावेळी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सचे प्रा. राजेंद्र सराफ, विज्ञान परिषदेचे संजय मालती कमलाकर, संतोष गोंधळेकर यांच्यासह विज्ञानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमोल झिरमिले म्हणाले, “अन्न-वस्त्र-निवारा यासह आज वीजही आपल्या आयुष्यातील महत्वाची गरज बनली आहे. तिच्या पूर्ततेसाठी आपण निसर्गाला हानी पोहोचवत आहोत. इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी त्याची टंचाई येत्या काळात भासणार आहे. म्हणून वेळीच गरज ओळखून निसर्गात उपलब्ध ऊर्जेचा वापर आपण करून घ्यायला हवा. तंत्रज्ञानामुळे या नैसर्गिक संसाधनांचे ऊर्जेत रूपांतर करणे अधिक सुलभ झाले आहे. पवनचक्की, सौरपॅनेल याचा वापर आगामी काळात व्हावा.”

प्रा. राजेंद्र सराफ म्हणाले, “प्रत्येक नागरिकांनी सौरऊर्जेचा वापर करावा. विद्यापीठ, कॉलेज यांनी त्या भागात नैसर्गिक पवनचक्कीसाठी माहिती संकलन करून ठेवावे. जेणेकरून भविष्यात प्रकल्प राबवता येईल. वाऱ्याचा वेग जिथे कमी आहे, त्या ठिकाणी सौरऊर्जेचा वापर करून त्यातून ऊष्णता निर्माण करून पवन ऊर्जा निर्माण करता येईल.”

द हायलँड रुल ट्रॉफी क्लास 1 शर्यतीत स्क्वेअर मुन विजेता

0

पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019
पुणे, 21 ऑगस्ट 2019: पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019 या स्पर्धेत द हायलँड रुल ट्रॉफी क्लास I या शर्यतीत स्क्वेअर मुन या घोड्याने 2000मीटर अंतरावरच्या या मुख्य शर्यतीमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला.

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब(आरडब्लूआयटीसी)येथे सुरु असलेल्या या स्पर्धेतील  द हायलँड रुल ट्रॉफी क्लास I या  महत्वाच्या लढतीत किशोरी पी.रुंगता व अधिराजसिंग जोधा यांच्या मालकीच्या स्क्वेअर मुन या घोड्याने 2मिनिट 4सेकंद व 993मिनीसेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. याचा दशरथ सिंग हा जॉकी होता, तर अधिराजसिंग जोधा ट्रेनर होता.

सविस्तर निकाल:

द हायलँड रुल ट्रॉफी क्लास I

विजेता: स्क्वेअर मुन, उपविजेता: ओरीयाना.

नंदकुमार रोपळेकर आणि दत्ताराम घुगे यांना जीवन गौरव

0

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचा

७० वा वृत्तपत्र लेखक दिन

मुंबईच्या दैनिकांमधून सातत्याने वृत्तपत्रलेखन करणारे २२ ऑगस्ट १९४९ रोजी फोर्टच्या तांबे उपाहारगृहात संमेलनाच्या निमित्ताने एकत्र आले होते. या पहिल्या संमेलनास मोठ्या उत्साहाने पार पडले होते.या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा अनंत काणेकर हे होते. तर प्रा. वा. ल. कुलकर्णी, आप्पा पेंडसे, र.गो.सरदेसाई, वा.रा.ढवळे, नि.श.नवरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याचवेळी मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. या घटनेला ७० वर्षे पूर्ण होत आहेत.तेव्हापासून हा दिवस संघाच्या वतीने दरवर्षी ‘वृत्तपत्रलेखक दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून गुरुवार, दिनांक २२ ऑगस्ट २०१९ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक नंदकुमार रोपळेकर आणि दत्ताराम घुगे यांना जीवन गौरव प्रदान करण्यात येणार असल्याचे संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी सांगितले. कार्यक्रमाला दै. नवशक्तीचे संपादक सुकृत खांडेकर आणि मुंबई मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुंबई ठाण्यातील पत्रकार,साहित्यिक आणि वृत्तपत्रलेखकांनी रुसी मेहता हॉल, जनता सेवा केंद्र, ताडदेव,मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन -पश्चिम जवळ येथे उपस्थित राहावे असे आवाहन संघाचे प्रमुख प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे.

४४ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल घोषित

0

मुंबई-

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई च्या वतीने घेण्यात आलेल्या ४४ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला असून का र मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक म्हणून शब्ददीप (पुणे) या अंकाची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पु ल देशपांडे स्मृती उत्कृष्ट अंक पुण्यनगरी (कोल्हापूर), गणेश केळकर स्मृती उत्कृष्ट अंक रायगड माझा ( कर्जत), साने गुरुजी स्मृती उत्कुष्ट अंक उद्याचा मराठवाडा (नांदेड),प्रतापराव माने स्मृती उत्कृष्ट अंक मुंबई तरुण भारत (मुंबई), पांडुरंग रा भाटकर स्मृती उत्कृष्ट अंक कमलदूत (पुणे) या अंकांची तर तेजोमय (पुणे), मोहनगरी (पुणे),अक्षरभेट(मुंबई),वास्तव (मुंबई ),जीवनज्योत (मुंबई), लोकजागर (सातारा) या अंकांची उत्कृष्ट म्हणून तर मराठी सांस्कृतिक (अमेरिका),बदलते जग (कोल्हापूर),शब्दालय (श्रीरामपूर),मुक्तछंद (महाड),क्षत्रिय संजीवनी (मुंबई),संयम (भाईंदर ), जीवनज्योत (मुंबई), रानभरारी (शहापूर ठाणे), उत्सवप्रभा (मुंबई),कोकण मीडिया (रत्नागिरी),दीपस्तंभ (मुंबई), पृथा (पुणे) या अंकांची उल्लेखनीय अंक म्हणून निवड करण्यात आली आहे. गुरुवार दि. २२ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ७० व्या वृत्तपत्र लेखक दिनी सायंकाळी ५.३० वा रुसी मेहता हॉल, जनता सेवा केंद्र, ताडदेव,मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन -पश्चिम जवळ येथे पारितोषिक होणार असल्याचे संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमास दै नवशक्तीचे संपादक सुकृत खांडेकर आणि मुंबई मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. वृत्तपत्र लेखक,साहित्यिक,दिवाळी अंकांचे संपादक-प्रकाशकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे.

मुंबईत धावणार पुन्हा व्हिक्टोरिया…

0

मुंबई, दि. २०(प्रतिनिधी)- मुंबईचे खास करून  मरीन ड्राईव्ह आणि गेट आँफ इंडियाच्या परिसरात देश विदेशातून येणा-या पर्यटकांचे आकर्षण असलेल्या व्हिक्टोरियावर(घोडागाडी) बंदी आल्यानंतर आता मुंबईचे आकर्षण जपण्यासाठी आता मुंबईतल्या प्रमुख पर्यटनस्थांवर इलेक्ट्रिकल व्हिक्टोरिया धावणार आहे. बॅटरीवर धावणारी व्हिक्टोरिया आता मुंबईच्या आकर्षणात भर घालणार आहे
मुंबईत ब्रिटिशकाळापासून व्हिक्टोरिया धावत होत्या. गेट वे आँफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, नरिमन पाँईट व गिरगाव चौपाटीवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व्हिक्टोरिया धावत होत्या. पण या व्हिक्टोरियांच्या विरोधात प्राणीप्रेमी संघटनांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर सुमारे चार वर्षांपूर्वी न्यायालयाने व्हिक्टोरियावर बंदी घातली. त्यामुळे व्हिक्टोरिया चालकांसमोर बेरोजगारी व उपासमारीचे संकट  निर्माण झाले होते. दरम्यानच्य काळात या व्हिक्टोरिया चालकांचे पुनर्वसन करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.
त्यानंतर व्हिक्टोरिया चालकांच्या पुनर्वसनासाठी  व पर्यटनाला चालना देण्यासाठी एका कंपनीने परिवहन कंपनीने इलेक्ट्रिकल व्हिक्टोरियाचा प्रस्ताव सादर केला होता. मुंबईत मरीन ड्राईव्ह, चौपाटी, गेट वे आँफ इंडिया आदी ठिकाणी व्हिक्टोरिया धावत होत्या. त्या ठिकाणीच बँटरीवर धावणा-या व्हिक्टोरिया चालवण्याची योजना आहे. या व्हिक्टोरियामध्ये सहा पर्यटक बसतील आणि चालकमार्फत ही व्हिक्टोरिया चालवली जाईल. मात्र या व्हिक्टोरियांची परिवहन श्रेणीत नोंद करावी लागेल. त्यामुळे मोटार वाहन कायद्यातील तरतुदीप्रमाणे परिवहन विभागाकडून प्रमाणपत्र घ्यावे लागेल. या व्हिक्टोरियांची परिवहन विभागात नोंदणी केल्यानंतर व्हिक्टोरिया चालकाला परिवहन विभागाचा बॅज घ्यावा लागेल. त्याशिवाय त्याला गणवेश सक्तीचा केला आहे.
राज्य सरकार भाडे निश्चित करणार
राज्याच्या गृहविभागाने आज  या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे मुंबईत इलेक्ट्रिकल व्हिक्टोरिया धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिध्द झाला आहे. आता इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया सुरु झाल्यापासून पहिल्या सहा महिन्यांपर्यंत प्रत्येक फेरीचे भाडे हे परवानाधारकास त्याने निश्चित केलेल्या दराप्रमाणे घेता येईल. पण निश्चित केलेल्या भाड्याची आगाऊ माहिती मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाला देणे आवश्यक राहिल. या कालावधीत इलेक्ट्रीकल व्हिक्टोरिया चालवण्याचा अपेक्षित खर्च गृहित धरून पुढे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत भाडे निश्चित करण्यात येईल. त्यामुळे पर्यटकांची लूट होणार नाही. बँटरीवरील व्हिक्टोरिया ताशी तीश किमी वेगाने धावेल. यामध्ये पर्यंटकांना जीपीएस यंत्रणाही बसवण्यात येणार असून पर्यटकांना ध्वनिक्षेपक यंणेव्दारे आसपासच्या महत्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती दिली जाईल.

सार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

0

पुणे दि.20 : – समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे, त्याचप्रमाणे सार्वजनिक उत्सवांच्या समित्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा, त्यांच्या सहभागामुळे त्या उत्सवामध्ये सुसंस्कृतपणा वाढेल, असे प्रतिपादन महसूलमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा -2018 च्या पारितोषीक समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खा.गिरिष बापट, महापौर मुक्ता टिळक,आ. माधुरीताई मिसाळ, योगेश टिळेकर, नगरसेवक हेमंत रासने, प्रविण चोरबेले, गणेश बिडकर, अजय खेडेकर, माजी महापौर अंकुश काकडे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पाटील म्हणाले, लोकमान्य टिळकांनी जनतेला ब्रिटीशांच्या विरोधात संघटीत करता येईल, त्यांचे प्रबोधन करता येईल अशा विचाराने पुण्यामध्ये गणपती उत्सवाची सुरुवात केली. याच हेतूने आता गणेशोत्सवाच्या माध्यमातून सार्वजनिक मंडळे सामाजिक प्रबोधनाचे देखावे सादर करीत असतात. त्यामुळे गणेशोत्सवामागील उद्देश पूर्ण होत असतो. या गणेशोत्सवामुळे त्या त्या भागातील कार्यकर्ते नागरिक एकत्र येतात, त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण होते. व सामाजिक प्रबोधनाचे कार्य होत असते. काही मंडळे वर्षभर सामाजिक कार्यक्रम राबवित असतात. अशा मंडळाचे कौतुक होणे आवश्यक आहे. आपापल्या भागातील अडचणी सोडविण्याकरीता अशा मंडळांनी वर्षभर प्रयत्न करावेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना, वृघ्दांना, महिलांना मदत मिळून पुणे शहरातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल. यावर भर दिला पाहिजे. डॉल्बीचा प्रश्न प्रबोधनाने सोडविण्याकरीता प्रयत्न करावेत. पुण्यातील गणेशोत्सवासंदर्भात असलेल्या अडीअडचणींबाबत प्रशासनाबरोबर चर्चा करुन त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. गणेशोत्सवामध्ये पावित्र्य राखून उत्सव साजरा करीत असल्याबाबत तसेच दगडूशेठ गणपती सार्वजनिक ट्रस्टमार्फत कोल्हापूर अथवा सांगलीमधील पूरग्रस्त भागातील गाव दत्तक घेण्याच्या व याकरीता 10 कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना खासदार गिरिष बापट यांनी गणेशोत्सव ही आता चळवळ झाली आहे. आणि आता अशा चळवळीची समाजाला गरज आहे. ज्यातून सर्वच घटकांचे प्रबोधन होते. या गणेशोत्सवामध्ये कार्यकर्त्यांना उत्तेजन देण्याकरीता स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे, असे सांगितले. महापौर मुक्ता टिळक, आ.माधुरीताई मिसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांनी या स्पर्धेच्या आयोजनाची पार्श्वभूमी सांगितली..
या स्पर्धेमध्ये एकूण 156 मंडळाचा सहभाग होता. त्यापैकी 98 मंडळे बक्षीसपात्र ठरली होती. यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषीक काळभैरवनाथ तरूण मंडळ, द्वितीय पारितोषीक महाराष्ट्र तरूण मंडळ, तृतीय पारितोषीक श्रीकृष्ण तरुण मंडळ, चौथे पारितोषीक वीर शिवराय तरुण मंडळ आणि पाचवे पारितोषीक संयुक्त प्रसाद मित्र मंडळाला मिळाले. तसेच हिंद तरुण मंडळ,कॅम्प, अरणेश्वर मित्र मंडळ, सेवा मित्र मंडळ, साईनाथ मित्र मंडळ यांना जय गणेश भुषण प्राप्त मंडळाचे पारितोषीक देण्यात आली. 0 0 0 0

डॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

0
पुणे : श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन समाजातर्फे दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ पुण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शाकाहाराचे पुरस्कर्ते सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांना अहिंसा, प्राणिदया आणि शाकाहार प्रसारात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल नुकताच प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. वाकडेवाडी येथील राजयोग सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी डॉ. गंगवाल यांच्यासमवेत पत्नी डॉ. चंद्रकला गंगवाल, मुलगा डॉ. पारितोष, डॉ. आनंद, स्नुषा डॉ. सीमा, डॉ. लिशा, नातवंडे तेजस्विनी, सिद्धार्थ व विहान यांचाही सत्कार करण्यात आला. पाचशे पेक्षा अधिक जैन बांधव यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. गंगवाल यांनी १.५० लाखाची औषधें कोल्हापूर-सांगली भागातील पूरग्रस्तांना पाठवली, तर श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन समाजाच्या वतीने एक लाखाचा मदतनिधी देण्यात आला. यावेळी देवेन्द्र बाकलीवाल, नंदकुमार ठोले, महेन्द्र पाटनी, कैलाश ठोले, प्रकाश बड़जात्या, सुनील कटारिया, विनय चुडीवाल, मनीष बड़जात्या, कमल लोहाडे, मनीष कासलीवाल, पंकज पाटनी, भूपाली पहाड़े, अनीता गंगवाल, क्षमा अजमेरा, महेन्द्र गंगवाल, संदेश गंगवाल आदी उपस्थित होते.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “आजवर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. पण ज्या जैन समाजाचा मी घटक आहे, त्याच समाजाकडून मिळालेला हा पुरस्कार म्हणजे कौटुंबिक सन्मान आहे. अहिंसा, जीवदया आणि शाकाहार यासाठी हा जैन समाज आग्रही असतो. आणि माझ्याकडून प्रेरणा घेऊन माझे अनेक सहकारी अहिंसेच्या क्षेत्रात काम करत आहेत. आजवर केलेल्या कार्याची दखल घेऊन केलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.”

ओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.

0
पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक व ओतूर पोलीस स्टेशन यांची सयुक्त कारवाई
जुन्नर /आनंद कांबळे –
पुणे  ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन हरिबा मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक व ओतूर पोलीस स्टेशन यांनी सयुक्त कारवाई करून ओझर ता.जुन्नर येथून सोमनाथ राजाराम साळुंके वय 26 वर्षे  रा. धनगरवाडी ता.जुन्नर यास त्याच्या कब्जातील  15 तलवारी सह सापळा लावून सोमवारी (१९/८/२०१९) ताब्यात घेतले.
सोमनाथ साळुंके वर यापूर्वी गुन्हे दाखल असुन तो कारखाना फाट्यावरून ओतूर च्या दिशेने दुचाकीवरून निघाला होता. तो दुचाकीवर पांढर्‍या गोणीमध्ये 15 तलवारी बांधून निघाला आहे अशी माहिती पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीवरून ओतूर पोलिसांची मदत घेऊन त्यास ओझर येथे ताब्यात घेण्यात आले.
सदर कार्यवाही श्री संदीप पाटील पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, श्री विवेक पाटील अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, श्री.पद्माकर घनवट पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,श्री रमेश खुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओतूर पोलीस स्टेशन  यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहायक फौजदार विश्वास खरात, सुनील ढगारे,राजु पवार,किरण कुसाळकर, मोसिन शेख या पथकाने ओतूर पोलीस स्टाफ यांनी केली.

‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र

0

मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या नीना कुळकर्णी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या स्वप्नील जोशी सोबत ‘मोगरा फुलला’ या चित्रपटात दिसल्या, तसेच  अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवणारे अभिनेते रवींद्र मंकणी हे विधि कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्सची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या, मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘मीडियम स्पाइसी’, या चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. ही घोषणा करण्याचा योग नीनाजींच्या वाढदिवशी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी जुळून आला, हे विशेष.

आजवर काही उल्लेखनीय चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले हे जेष्ठ कलाकार नव्या पिढीच्या नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. चित्रपटात सई ताम्हणकर, पर्ण पेठे आणि ललित प्रभाकर हे प्रमुख भूमिकेत असून सागर देशमुख, नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी यांची समर्थ साथ लाभल्याने मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकीय पदार्पण लक्षवेधी ठरले आहे.

मोहित टाकळकर हे रंगभूमीवर प्रतिष्टित आणि नावाजलेले नाव आहे. लॅन्डमार्क फिल्म्स या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या विधि कासलीवाल यांना ‘वजनदार’, ’रिंगण’ आणि ‘पिप्सी’ यासारख्या लोकप्रिय आणि आशयसंपन्न चित्रपटांसाठी ओळखले जाते. ‘मीडियम स्पाईसी’ चे बहुतांश चित्रीकरण झाले असून, चित्रपट पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

अवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार

0
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी अवकाश पर्यटनासाठी “360 स्पेस-ए” कंपनीची सुरवात केली.
रशियन स्पेस टूर कंपनीच्या एकतरीना झोनतोवा यांच्यासोबत झाल्या करारावर स्वाक्षरी.
मॉस्को(रशिया) : गिर्यारोहक व उद्योजक असलेले व पुणे विद्यापीठात फिजिक्स विषयात पी.एच.डी. करणारे संशोधक एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोरर कंपनीसोबत रशियन स्पेस टूर कंपनीने करार केला असून असा करार करणारी भारतातील एकमेव कंपनी ठरली आहे. आनंद बनसोडे यांनी “360 स्पेस-ए” असे नवीन व्हेंचरला नाव दिले असून लवकरच व्हेंचरमार्फत अवकाशात जाण्यासाठी लागणारे ट्रेनिंग, मिग विमान व पॅराशूट प्रशिक्षण, झिरो ग्राव्हिटी फ्लाईट, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावरील (ISS) प्रशिक्षण व प्रत्यक्ष अवकाशसफरी बद्दल सर्व नियोजन केले जाणार आहे.
हे सर्व प्रशिक्षण स्टार सिटी स्पेस सेंटर व बैकानूर येथील स्थानकावर होणार असून याच ठिकाणाहून भारताचे प्रथम अवकाशयात्री राकेश शर्मा यांनी अवकाशात उड्डाण केले होते.
       2001 मध्ये डेनिस टिटो यांनी प्रथम पर्यटक म्हणून अवकाशस्थानकाला भेट दिली होती. यानंतर बऱ्याच लोकांनी पर्यटक म्हणून अवकाशस्थानकाची सैर केली आहे. अवकाश प्रवास कित्येकांचे स्वप्न असते आणि ते तेव्हढेच खर्चिकही आहे. येणारया काळात अवकाशात बऱ्याच संधी उपलब्ध आहेत आणि त्यासाठी एलोन मस्क, रिचर्ड ब्रँसन यांच्यासारखे उद्योजक मोठी कामगिरी करत आहेत.
              गेले जवळपास 6 महिने चर्चा व ऑनलाईन मिटिंग झाल्यानंतर आज मॉस्को येथील भेटीत रशियन स्पेस टूर च्या एकतरीना झोनतोवा व आनंद बनसोडे यांनी करारावर स्वाक्षरी केल्या. आनंद बनसोडे यांच्या “360 स्पेस-ए” च्या लोगोचेही अनावरण एकतरीना झोनतोवा यांच्याहस्ते करण्यात आले. एखाद्या छोट्या युवा उद्योजकाने एव्हड्या मोठ्या स्तरावर कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ असून संपूर्ण महाराष्ट्र व भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. लहानपणापासून अवकाशाची आवड असणारे आनंद बनसोडे यांनी आतापर्यंत 4 खंडातील 4 सर्वोच्च शिखरे सर केली आहेत. याशिवाय 5 पुस्तकेही लिहिली आहेत व अनेक विक्रम त्यांच्या नावे आहेत.
—————————-
“भविष्यात अवकाश या विषयात खूप मोठे बदल होणार आहेत. या क्षेत्रात खूप मोठी संधी असून हा करार म्हणजे माझ्या लहानपणीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक छोटेसे पाऊल आहे. भारत, सिंगापूर, मलेशिया, दुबई, अमेरिका यादेशातील लोकांसाठी हे टूर आयोजित करण्याचा करार रशियन स्पेस टूर कंपनीशी झाला असून 9 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष कामास सुरवात केली जाणार आहे. यामार्फ़त माझे व शेकडो लोकांचे अवकाशाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या करारामुळे आत्मविश्वास वाढला असून स्वप्नांच्या मार्गावर विश्वास ठेवला तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते.’
आनंद बनसोडे
(संशोधक, युवा उद्योजक, गिर्यारोहक)

आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग

0

आठवी सातारा हिल हाफ मॅरेथॉन २५ ऑगस्टला

पुणे : सातारा रनर्स फौंडेशन आयोजित सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा येत्या रविवारी (२५ ऑगस्ट) होत असून, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटूंसह आठ हजार ५०० हून अधिक धावपटू साताऱ्यातील रस्त्यांवरुन धावणार आहेत. पुण्यातील जवळपास ८४२ धावपटू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. ही मॅरेथॉन स्पर्धा साताऱ्यातील पोलिस कवायत मैदानावरुन सुरू होऊन पोवईनाका, कर्मवीर पथावरुन राजवाडामार्गे बोगदा व तेथून यवतेश्‍वर घाटाकडे मार्गस्थ तर परत येताना बोगदा, अदालतवाडा, नगरपालिका, रविवार पेठ पोलिस चौकीमार्गे कर्मवीर पथावरुन पोवई नाका व पुन्हा पोलिस कवायत मैदान असा मॅरेथॉनचा ढोबळ मार्ग असेल, अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रतापराव गोळे, व सचिव जितेंद्र भोसले यांनी दिली.
मॅरेथॉनविषयी बोलताना संस्थापक डॉ. संदीप काटे, डॉ. शेखर घोरपडे यांनी सांगितले की, ‘‘आंतरराष्ट्रीय दर्जाची ही मॅरेथॉन साताऱ्याचा मानबिंदू ठरली आहे. स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस प्रशासन, वाहतूक नियंत्रण कक्ष, सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा नगरपालिका, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि वन विभाग यांनी आवश्‍यक सर्व प्रशासकीय नियोजन केले आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ढाणेज् मेघा इंजिनीअरिंग क्लासेस, किराणा भुसार रिटेल व्यापारी संघटना, १०० केपी ग्रुप, महाराजा ग्रुप, सावकार इंजिनिअरिंग कॉलेज, विद्यार्थी वाहतूक सेवा संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वर्कफोर्स सोल्युशन सातारा, एस.के. करिअर ॲकॅडमी, शेंद्रे येथील कै. अभयसिंहराजे भोसले टेक्निकल इन्स्टिटयूट, कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ फिजिओथेरपी, कै.संजय भोसले स्मृती प्रतिष्ठान, जेष्ठ नागरिक संघ, प्रतिभा हॉस्पिटल, मीनाक्षी हॉस्पिटल स्टाफ, कन्याशाळेच्या विद्यार्थिनी, आयडीबीआय बँक निवृत्त कर्मचारी संघटना, महात्मा गांधी क्रीडा मंडळ, मारवाडी भुवन गणेशोत्सव मंडळ, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सातारा इंग्लिश मिडीयम स्कूल तसेच विविध सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनीदेखील कंबर कसली आहे.’’
यवतेश्वर व सांबरवाडी येथील ग्रामस्थांनीदेखील पाहुण्यांची उत्तम व्यवस्था होण्यासाठी व पाहुण्यांच्या स्वागतासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे. स्पर्धकांसाठी साताऱ्यातील सर्व हॉटेल्स आणि लॉजचे बुकिंग फुल्ल झाले असून विविध कार्यालयांमध्येही स्पर्धकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. काहींना निवासाची व्यवस्था उपलब्ध न झाल्यास सातारकरांनी या पाहुण्या स्पर्धकांची निवास व्यवस्था आपल्या घरी करावी, असे आवाहन उपाध्यक्ष डॉ. सुचित्रा काटे यांनी केले आहे.
असा असेल मॅरेथॉन मार्ग
सातारा हिल हाफ मॅरेथॉनला पोलिस कवायत मैदानावरुन सुरूवात होईल. तेथून पोवई नाकामार्गे कर्मवीर पथावरुन (खालचा रस्ता) पोलिस मुख्यालय, शेटे चौकमार्गे कमानी हौद, तेथून राजपथावरुन मोती चौक, गोल बाग, यादोगोपाळ पेठ, समर्थ मंदिर, बोगदा, यवतेश्वर घाटातून प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टच्यापुढे २०० मीटर मॅरेथॉन जाईल. परत त्याचमार्गे यवतेश्वर घाटातून समर्थ मंदिर, अदालत वाडा, केसरकर पेठ, शाहू चौक, बगाडे हॉस्पिटल, रविवार पेठ पोलिस वाहतूक शाखेपासूनखाली वळून खालच्या रस्त्याने, पोवई नाका व तेथून पुन्हा पोलिस कवायत मैदान असा मॅरेथॉनचा मार्ग राहिल, अशी माहिती रेस डायरेक्टर डॉ. देवदत्त देव यांनी दिली,

२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा

0
 युवक क्रांती दल आणि शिक्षक उमेदवारांचा इशारा 

पुणे: केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षेत (सीईटी) पात्र ठरूनही राज्यभरातील २५१ उमेदवारांचे स्वप्न लालफितीत अडकल्याने शासनाने २७ ऑगस्ट पर्यंत निर्णय न घेतल्यास निर्णायक आंदोलन करण्याचा इशारा युवक क्रांती दल आणि शिक्षक उमेदवार प्रतिनिधींनी आज पत्रकार परिषदेत दिला.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे २० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता  झालेल्या पत्रकार परिषदेला युवक क्रांती दलाचे कार्यवाह  संदीप बर्वे  तसेच प्रशांत भोयर,चित्तरंजन धुमे ,दिनेश ठाकूर   व इतर शिक्षक उमेदवार उपस्थित होते .या शिक्षकांनी १९ ऑगस्ट रोजी सत्याग्रही आंदोलन पुण्यात शिक्षण संचालक कार्यालयासमोर केले.प्रभारी शिक्षण संचालक (प्राथमिक विभाग) दत्तात्रय जगताप यांनी याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन आंदोलक शिक्षकांना दिले होते. हे आश्वासन पूर्ण झाले नाही तर 2 सप्टेबर पासून पुण्यात निर्णायक आंदोलन केले जाणार आहे .
रखडलेल्या शिक्षक भरतीबाबत अधिक माहिती:                                                    शासनाने 2010 मध्ये शिक्षक भरती घेतली त्यात गुणांची पुर्नपडताळणीत 3139 पात्र उमेदवारांना शिक्षक म्हणून घेण्यात यावे असे  उच्च न्यायालय खंडपीठ ( औरंगाबाद) यांनी निर्णय दिला. त्या नुसार सर्व उमेदवारांना अस्थापनांचे वाटप करण्यात आले. परंतु काही उमेदवार जागा अतिरिक्त किंवा त्या प्रवर्गाच्या जागा रिक्त नसल्या कारणावरून संचालक ऑफिस ला परत आले.असे करता करता शेवट २५१ उमेदवार शिल्लक राहिले,ज्यांना अजून पण पदस्थपना मिळालेली नाही. आणि ते सर्व नौकरीच्या प्रतीक्षेत असतांना सरकारने नवीन भरती राबून 12,000 पदे भरवण्याचे घोषित करून पवित्र पोर्टल शिक्षक भरती मार्फत प्रक्रिया राबण्यात येत आहे. अजून पण जुन्या भरतीतील 2५१ शिक्षक नौकरीच्या प्रतीक्षेत असतांना नवीन भरती राबून 9 वर्षापासून वाट पाहणाऱ्यां उमेदवारांवर अन्याय होत आहे.

या शिक्षक उमेदवारांनी पाठपुरावा चालूच ठेवल्याने शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव चारुशीला चौधरी यांनी ३१ मे रोजी प्राथमिक शिक्षण संचालकांना नियुक्तीचे  आदेश दिले .मात्र पुढे काहीही हालचाल झाली नाही.या सर्व शिक्षक उमेदवारांना पात्रता असूनही हलाखीच्या परिस्थितीतून जावे लागत आहे.शासन मात्र कागदी घोडे नाचविणे आणि दफ्तरदिरंगाईकरणे याच्या पुढे जात नसल्याचा या उमेदवारांचा आरोप आहे .