Home Blog Page 2862

बाल संगोपन संस्थांमधून बाहेर आलेल्या मुलांसाठी काटेरी वास्तव

0

बाल संगोपन संस्थांमधून बाहेर पडणारी युवापिढी स्वावलंबी होण्यासाठी सक्षम नाही: सर्वेक्षणाचा अहवाल

नवी दिल्ली-:  वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बाल संगोपन संस्थांमधून बाहेर पडावे लागणाऱ्या मुलामुलींपैकी जवळपास ५० टक्के जणांना बाहेरच्या जगातील काटेरी वास्तव सहन करावे लागते.  ज्याच्या आधारे आपले जीवन पुढे नेता येईल असा दरमहा पगार मिळवून देणारी नोकरी करण्याच्या क्षमताच या युवकांमध्ये नसतात.  ज्यांच्यापाशी अशा क्षमता असतात त्यांच्यापैकी ९३% नोकऱ्या करत आहेत तर ७% युवा स्वयंरोजगार करतात.  उदयन केअर या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की या युवकांना मिळणार दरमहा सरासरी पगार ७५०० ते ८५०० रुपयांदरम्यान असतो.  सर्वेक्षणाच्या निष्कर्षांमधून असेही दिसून येते की, यांच्यापैकी ६७% मुलांना बाल संगोपन संस्थांमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासाठी काय तरतुदी आहेत याची काहीही माहिती नसते. 

बाल न्याय अधिनियम२०१५ (मुलांची काळजी व संरक्षण)२०१६ मध्ये तयार करण्यात आलेले याचे नियम आणि बाल संरक्षण योजना (आधीची आयसीपीएस) यांच्या अंतर्गत १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलामुलींना स्वतंत्रस्वावलंबी जीवन जगता यावेसमाजात सामावले जात यावे यासाठी काळजीपाठिंबा यादृष्टीने काही विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.

 बियॉन्ड 18: लीविंग चाईल्ड केअर इन्स्टिट्यूशन्स – सपोर्टींग युथ लीविंग केअर – हे सर्वेक्षण युनिसेफटाटा ट्रस्ट्सदीप कार्ला (मेक माय ट्रिप इंडियाचे सीईओ) व दिल्ली कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स (डीसीपीसीआर) यांच्या सहयोगाने करण्यात आले आहे.  बाल संगोपन संस्थांमधून बाहेर पडलेल्या ४३५ मुलामुलींची व १०० पेक्षा जास्त महत्त्वाच्या लोकांची मतेविचार यांचा समावेश या सर्वेक्षणात करण्यात आला आहे.  दिल्लीगुजरातकर्नाटकमहाराष्ट्र व राजस्थान या राज्यांमध्ये बाल संरक्षण विषयात प्रत्यक्ष सक्रिय असलेल्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला आहे.

 न कळत्या वयापासून बाल संगोपन संस्थांमध्ये राहावे लागल्याचा खूप मोठा प्रभाव या मुलांच्या शिक्षणकौशल्य विकास आणि सामाजिक स्थैर्याच्या भावनेवर पडलेला असते.  तांत्रिकदृष्ट्या या मुलांना केअर लीवर्स‘ अर्थात संगोपनाच्या छत्रछायेतून बाहेर पडलेली असे म्हटले जाते.  बालवयातून मोठेपणापर्यंतच्या परिवर्तनासाठी जी कौशल्ये आत्मसात होणे आवश्यक असते त्यांचा या मुलांमध्ये अभाव असतो.

 टाटा ट्रस्ट्सच्या पॉलिसी अँड ऍडव्होकसीच्या प्रमुख शिरीन वकील यांनी सांगितलेबाल संगोपन संस्थांमधून बाहेर पडणाऱ्या मुलामुलींना सहन कराव्या लागणाऱ्या अडीअडचणी समजून घेण्याची निकड आहे.  वयाच्या दृष्टीने युवावस्थेमध्ये पदार्पण करत असलेल्या या मुलांना कोणत्याही वास्तविक पाठिंब्याशिवाय अचानक एवढ्या मोठ्या जगामध्ये पाऊल ठेवावे लागते.  अशा मुलामुलींना सक्षम आणि सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी त्यांची मदत म्हणून सर्वसमावेशक पुनर्वसन योजना आखणे गरजेचे आहे.”

 अशा मुलांच्या भविष्याचे नियोजन करण्याच्या प्रक्रियेत त्या मुलामुलींनाच सामावून घेतले जात नाही हे या सर्वेक्षणात ठळकपणे मांडले गेले आहे.  बाल संगोपन केंद्रातून बाहेर पडणाऱ्या ४४% मुलामुलींनी सांगितले कीबाल न्याय अधिनियमानुसार त्यांच्या व्यक्तिगत देखभाल नियोजन प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेण्यात आले नाही.

 बाल संगोपन संस्थेतून बाहेर पडलेल्या दिल्लीतील १९ वर्षीय व्यक्तीने सांगितलेदर दिवशी इतके निर्णय घ्यावे लागतातइतक्या गोष्टी ठरवायच्या असतात.  इतकी वर्षे आम्ही ज्याला घर‘ मानत होतो ते सोडून निघून जायचे ही जाणीवच मनाला हादरवून टाकणारी आहे.  मला मोठे होऊन माझ्यासारख्या मुलामुलींसाठी काम करण्याची इच्छा आहे.”     

 युनिसेफ इंडियाचे डेप्युटी रिप्रेझेन्टेटिव्ह फोरूह फोयौझात यांनी सांगितले, “या सर्वेक्षणातून हाती आलेल्या निष्कर्षांचा विचार करता असे जाणवते कीबाल संगोपन केंद्रांमधून बाहेर पडणाऱ्या या मुलामुलींना त्यांच्या जीवनात घडून येणाऱ्या या मोठ्या बदलासाठी तयार करणे गरजेचे आहेत्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष योजनातरतुदी यांची संपूर्ण माहिती त्यांना असली पाहिजे.  ज्यांच्या आधारे स्वतःचे स्वतंत्र जीवन जगता येईल अशी पुरेशी कौशल्ये या मुलामुलींना शिकवली गेली पाहिजेत.  या तरुण मुलामुलींना सोसाव्या लागणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यामध्ये प्रसिद्धीमाध्यमे मोलाची भूमिका बजावू शकतात जेणेकरून शासन आणि समाजाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जाईल आणि सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमधून या मुलामुलींच्या कल्याणासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबविल्या जाऊ शकतील.”  

 युनिसेफ इंडियाच्या चाईल्ड प्रोटेक्शन स्पेशालिस्ट वंदना कंधारी यांनी सांगितलेबाल संगोपन संस्थेतून बाहेर पडल्यानंतर अर्ध्याअधिक मुलामुलींना राहण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसणे आणि तितक्याच मुलामुलींकडे घराचा पुरावा म्हणून काहीच कागदपत्र नसणे याचा जरी विचार केला तरी लक्षात येते की या युवकांना किती गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत असेल.  बालपणी भोगाव्या लागलेल्या अनेक समस्यांमुळे त्यांनी आधीच खूप काही सहन केलेले असते.  अशा मुलामुलींना मदतीसाठी भारतामध्ये धोरण व कार्यक्रमांमध्ये सुधारणा व बदल घडवून आणणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासाठी सर्वच क्षेत्रांमधून सहकार्य मिळणे आवश्यक आहे.”

 

सर्वेक्षण अहवालाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने उदयन केअरच्या कार्यकारी संचालिका अनीशा वाधवा यांनी आवर्जून सांगितले कीराष्ट्रीय युवा धोरण २०१४ (२०१९ मध्ये सुधारणा होणे अपेक्षित आहे)राष्ट्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता धोरण २०१५ तसेच युवकांसाठीच्या इतर विविध केंद्रीय धोरणांमध्ये बाल संगोपन संस्थांमधून बाहेर पडणाऱ्या मुलामुलींना संवेदनशील‘ म्हणून गृहीत धरले जावे.

 

अशा मुलामुलींच्या पुनर्वसनाबाबतच्या सध्याच्या दृष्टिकोनामध्ये लैंगिक भेदाभेद केला जातो ही बाब देखील या सर्वेक्षणात आढळून आली आहे.  ६३% युवती आणि ३६% युवकांच्या बाबतीत असे दिसून आले आहे की त्यांच्या शैक्षणिक पात्रता एकसमान असूनही युवकांकडे उत्पन्नाचे स्वतंत्र स्रोत उपलब्ध आहेतजे मुलींकडे नाहीत.  या सर्वेक्षणात सहभागी करवून घेण्यात आलेल्या पाच राज्यांपैकी फक्त दोन – दिल्ली व महाराष्ट्र्रात या मुलींना राहण्यासाठी संस्था आहेत.  सर्वसामान्यतः वयाची १८ वर्षे पूर्ण झाली की मुलींची लग्ने लावून देणे किंवा त्यांना स्वाधार गृहांमध्ये पाठवणे हा दृष्टिकोन दिसून येतो.  या मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबनासाठी सक्षम करण्याचे प्रयत्न फारशा प्रमाणात केले जात नाहीतअसेही या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

 

उदयन केअरचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. किरण मोदी यांनी सांगितलेया सर्व मुलामुलींनी देशाच्या सक्षम युवापिढीमध्ये स्थान मिळवावे यासाठी त्यांना घरशिक्षण आणि स्वतंत्र जीवन निर्वाहासाठी आवश्यक आर्थिक पाठिंबा दिला जाणे गरजेचे आहे.  बाल संरक्षण योजनेनुसार आफ्टरकेअर उपक्रम राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना राज्य बाल संरक्षण सोसायटीतर्फे दर व्यक्तीसाठी दर महिन्याला दिली जाणारी २००० रुपये ही रक्कम अतिशय तुटपुंजी आहे.  एक विशेष आफ्टरकेअर फंड असला पाहिजे आणि एक खिडकी सहकार्य यंत्रणेमार्फत त्याचे प्रभावीपणे वाटप झाले पाहिजे.”  

 

एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत असलेल्या रमेशने * सांगितले, “१२ वर्षांचा असताना मला बाल संगोपन संस्थेत दाखल केले गेले.  याठिकाणी मला मानसिक आधार मिळाला तसेच करिअरबद्दल मार्गदर्शन देखील  मिळाले. त्यामुळे मी इंजिनियर बनू शकलो.  मला जेव्हा बाल संगोपन संस्थेतून बाहेर जाण्यास सांगितले गेले तेव्हा मी मनातून पुरता कोलमडून गेलो.  वयाच्या १२ व्या वर्षापासून मी संस्थेलाच माझे घर आणि कुटुंब मानत होतो.  तिथून बाहेर पडल्यानंतर माझ्या मनात कायम असुरक्षिततेची भावना असायची.  मला असे वाटते कीआमची ही स्थिती सर्वांनी समजून घेतली पाहिजेतरच सुखीस्वतंत्र जीवनाचा मार्ग आम्हाला सापडू शकेल.”

 

बाल संगोपन संस्थांमध्ये राहणाऱ्या सर्व मुलामुलींसाठी व्यक्तिगत देखभाल नियोजन करत असताना त्यांच्या वयाच्या १४व्या वर्षापासूनच त्यांच्या आयुष्यात नंतर घडून येणार असलेल्या बदलांचेही नियोजन करणे अनिवार्य केले गेले पाहिजे अशी गरज या सर्वेक्षणामधून प्रकर्षाने जाणवते.  असे केले गेल्यास संस्थेतून बाहेर पडल्यानंतर त्यांची काळजी घेतली जाऊ शकेल व स्वतंत्र जीवनाचा मार्ग त्यांच्यासमोर खुला होईल.

१०८ ही सेवा-राज्यात ९३७ रुग्णवाहिका कार्यरत; आतापर्यत ४२.४५ लाख रुग्णांना मिळाले जीवनदान

0

पुणे :अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत करण्यासाठी सुरू झालेली १०८ ही सेवा राज्यभरातील लाखोंना जीवनदान देणारी ठरली आहे. पूरग्रस्त भागातही या रुग्णवाहिकांमुळे हजारो नागरिकांना मदत झाली आहे. ९३७ रुग्णवाहिकांद्वारे २०१४ पासून जुलै २०१९ पर्यंत ४२ लाख ४४ हजार २२२ रुग्णांना जीवनदान देण्याचे काम या सेवेमुळे शक्य झाले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २०१४ मध्ये महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू केली आहे. अपघाताच्या ठिकाणावरून कोणीही १०८ या क्रमांकावर फोन केल्यावर तातडीने वैद्यकीय मदत दिली जाते. ही सेवा नागरिकांसाठी मोफत आहे. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेत सुमारे ३३ हजार बाळंतपण सुखरुपपणे पार पडले आहेत. गेल्या आठवड्यात सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या पूरग्रस्त भागात देखील या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सुमारे हजारो नागरिकांना पूरग्रस्त भागातून रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.

२०१४ ते जुलै २०१९ पर्यंत सुमारे 3 लाख 46 हजार रस्ते अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम या रुग्णवाहिकेमुळे शक्य झाले आहे. अपघातानंतर लगेचच आवश्यक ती प्राथमिक उपचार सेवा मिळाल्याने लाखोंचे प्राण वाचले आहेत. आतापर्यंत विविध १३ प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीतील रुग्णांना वेळेत उपचार मिळाले आहेत. रस्ता अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळण्याकरिता अत्याधुनिक रुग्णवाहिकेची ही सेवा सुरु करण्यात आलेली आहे. त्यासाठी १०८ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला असून राज्यातील लाखो नागरिकांसाठी हा क्रमांक जीवनदायी ठरला आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत आलेल्या लाखो कॉल्सच्या माध्यमातून रुग्णांना तातडीची वैद्यकीय उपचाराची सुविधा या रुग्णवाहिकेने दिली आहे.
चाकावरचे प्रसूतिगृह
लक्षणीय बाब म्हणजे ही रुग्णवाहिका चाकावरचे प्रसुतीगृहही ठरले आहे. मागील पाच वर्षांत सुमारे ३३  हजार गर्भवतींचे सुखरुप बाळंतपण करण्यात यश मिळाले आहे. या सेवेंतर्गत ९३७ रुग्णवाहिका राज्यात चालविल्या जात आहेत. तसेच दोन वर्षांपूर्वी राज्यात मुंबईमध्ये बाईक ॲम्बुलन्स सुरु करण्यात आली. त्या माध्यमातून आतापर्यंत २२ हजार रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. या सेवेचा विस्तार करीत मुंबईमध्ये १८, पालघर, अमरावती येथे प्रत्येकी पाच तर सोलापूर आणि गडचिरोली येथे प्रत्येकी एक अशा एकूण ३० बाईक ॲम्बुलन्स सध्या कार्यरत आहेत.
रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण झाले कमी
महाराष्ट्रासह जगभरात दिवसेंदिवस रस्ते अपघाताची टक्केवारी वाढत आहे. रस्ते अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळाल्यास त्यांना जीवनदान मिळण्याची शक्यता वाढते. हेच आता महाराष्ट्रातही सिद्ध झाले आहे. २०१४ मध्ये ११.४८ (१ लाख लोकसंख्येसाठी) वर असलेले हेच गुणोत्तर २०१६ मध्ये राज्यात १०.०८ इकते खाली आलेले आहे. सरकारी आकडेवारीच्या महिनुसार हे गुणोत्तर कमी झाल्याचे स्पष्ट झालेले आहे.

पुणे जिल्ह्यात या वैद्यकीय सेवेचा सन २०१४ पासून ४४०२७९ रुग्णांनी लाभ घेतला आहे. लाभ घेतलेल्या सर्वच रुग्णांचे प्राण वाचविण्यात महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थेला यश आले आहे. 

सन २०१४ पासून आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांची यादी खालील प्रमाणे 

अपघात : २२८२२
हल्ला : २९८२ 
भाजलेले रुग्ण : १३८७
ह्रदयविकार : ८२० 
पडणे : ९२४९ 
विषबाधा : ८३०४८
विजेचा दाब व शॉक : १६२ 
मोठी दुर्घटना : १२५९
मेडिकल : २०९०७४
इतर : १०३१९७
पॉली ट्रॉमा : ५७८
आत्महत्या / आत्महत्ये पासून होणारी इजा : ३४४

युवक क्रांती दलातर्फे पूरग्रस्त भागात सफाई आणि मदत मोहीम

0

पुणे:महाराष्ट्र गांधी स्मारक निधी पुणे व युवक क्रांती दल यांच्यावतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना मदत पोहोचविण्याचे काम 9 ऑगस्ट पासून सुरू आहे .त्याचप्रमाणे स्थानिक युवकांच्या मदतीने साफसफाई काम जोरात चालू आहे.

डॉ. प्रवीण सप्तर्षी तसेच सचिन पांडुळे(अध्यक्ष, युवक क्रांती दल, पुणे शहर)  यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .

पुणे शहरात तसेच युवक क्रांती दलाच्या महाराष्ट्रभर  असलेल्या भागातून मदत निधी , औषधे, कपडे, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू गोळा करण्याचे काम चालू आहे. त्यास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वस्तूंचे वाटप गरजुंपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यासाठी युवक क्रांती दलाच्या पुणे, अहमदनगर, सांगली, सातारा, धुळे, यवतमाळ, बुलढाणा या शाखांतून सुमारे पन्नास कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

त्यांनी अंकलखोप, कनेगाव, हरिपूर,मसुचीवाडी,बोरगाव, भरतवाडी, बहाद्दूरवाडी, सित्तुर, सांगलीवाडी, येलुर, बहे या सांगली जिल्ह्यातील गावांत मोठ्या प्रमाणात धान्य, कपडे, औषधे वाटण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे स्थानिक युवकांच्या मदतीने साफसफाई काम जोरात चालू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने चंदूर, मजरेवाडी, शिरोळ या गावीही मदतकार्य सुरू आहे. हे कार्य करत असताना असे निदर्शनास आले आहे की मदतीचा ओघ अतिशय चांगला असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांची संवेदनशीलता जागृत असल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणून तथापि मदत कार्य पोहोचविण्याबाबत गावांमध्ये रास्त पध्दतीने होत नसल्याचे दिसले. मुख्यत्वे करून नदीकाठी राहणारे वंचित समाजाच्या लोकांचे जीवन उध्वस्त होऊनही त्यांच्यापर्यंत मदत पोहोचत नाही. म्हणूनच युवक क्रांती दलाने पुराचा तडाखा जास्त बसलेल्या दलित वस्त्यांमध्ये शक्य तेवढा प्रयत्न केला.

अजूनही मोठ्या प्रमाणात आर्थिक व वस्तुरूपाने मदतीची गरज आहे. त्याबरोबरच टिमबरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्याबरोबर आणखी युवकांची गरज आहे. तरी या कामासाठी अन्नदान, अर्थदान, समयदान देऊन शेतकरी, कष्टकरी यांच्या पुनर्वसन साठी सर्वांनी हातभार लावावा असे कळकळीचे आवाहन युवक क्रांती दलाने केले आहे .
,अप्पा अनारसे, रवी लाटे, युवराज मगदुम, संगीता माने, ऋतुजा पुकाळे, अभिजीत मंगल, विजय पाटील, तुषार झरेकर, सारिका सोकटे, प्रतिभा कदम, अक्षय पाटील, महेश पवार, ऍड. संदीप मेहेत्रे,महावीर जाधव,मनीषा काटे ,निशांत देशमुख ,मकरंद पवार,शुभम बागवान  अनेक कार्यकर्ते या मदत मोहिमेत सहभागी झाले आहेत .

तसेच पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करायचे असून त्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे वास्तूमध्ये वह्या,कंपास, ,दप्तर,पेन,पेन्सिल,चित्रकला वही,टिफिन बॉक्स,शाळेसाठी फळा,डस्टर,कचरा पेटी, टेबल,खुर्ची,फोल्डर,
संपर्कासाठी सचिन पांडुळे 9096313022 यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे

महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967 व नियम सुधारणा समितीची 25 ऑगस्ट रोजी बैठक

0

पुणे -महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम 1967 व या अधिनियमाच्याअंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या नियमामध्ये सुधारणा करण्यासाठी ग्रंथालय संचालकसु. हि. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या सुधारणा समितीची पुणे विभागाची बैठकरविवार दिनांक 25 ऑगस्ट 2019 रोजी पुणे मराठी ग्रंथालय व मोफत वाचनालय, केशव सभागृह,नारायण पेठ, पुणे येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हयातील सर्व शासनमान्य ग्रंथालयांचे ग्रंथपाल, अध्यक्ष, सचिव, कार्यवाह, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व कार्यवाह, तसेच ग्रंथालय चळवळीशी संबंधीत स्थानिक लेखक, साहित्यिक, वृत्तपत्रसंपादक, मुद्रक, प्रकाशक, ग्रंथ विक्रेते, शासनमान्य ग्रंथालयांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवक, वाचकव सभासद, शैक्षणिक ग्रंथापाल, ग्रंथालय व्यावसायिक, संस्था, लोकप्रतिनिधी, महिला, जनता,महाविद्यालय, विद्यापिठीय ग्रंथालय व माहितीशास्त्राचे प्राध्यापक, संचालनायातील माजीअधिकारी व कर्मचारी ज्या कोणाला महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम 1967 व त्याच्याअंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या नियमात काही सुधारणा सुचवायच्या असतील अशासर्व व्यक्तींना उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांनीयांनी केले आहे.

वडगावशेरीत मेट्रोचे काम निर्धारीत वेळेत पूर्ण होईल- आमदार जगदीश मुळीक

0

पुणे, ता. २२ ः पुणे मेट्रो प्रकल्पाच्या शिवाजीनगर धान्य गोदाम (सिव्हिल कोर्ट) ते रामवाडीपर्यंतच्या (रिच ३) मार्गावरील काम गतीने पुढे सरकत असल्याने ते निर्धारीत वेळेत पूर्ण होईल त्यामुळे नागरिकांना सुलभ, सुरक्षित आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होऊ शकेल अशी अपेक्षा आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केली.
आमदार जगदीश मुळीक यांनी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील येरवडा ते रामवाडी या मेट्रो मार्गाच्या कामाची पाहाणी करून आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते. महामेट्रोचे रामनाथ सुब‘मण्यम, मु‘य प्रकल्प व्यवस्थापक प्रकाश वाघमारे, अमोल मोहोळकर, नगरसेवक योगेश मुळीक, सुनीता गलांडे, शीतल सावंत, संदीप जर्‍हाड, नाना सांगडे, संतोष राजगुरु यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार मुळीक म्हणाले, ‘सिव्हिल कोर्ट ते रामवाडी या मेट्रो मार्गावर १३२४ खांब उभारणे अपेक्षित आहे. त्यापैकी ६२५ खांब उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यात वडगावशेरी मतदारसंघातील ११६ खांबांचा समावेश आहे. या मार्गावर १७४ पीलर कॅपचे तर वडगावशेरीत २५ पिलर कॅपचे काम पूर्ण झाले आहे. पोर्टल पिअर्स, पिअर ङ्गर्स्ट लिफ्ट, पिअर कॅप, सेग्मेन्ट कास्टिंग व उभारणीचे काम योग्य गतीने पुढे जात आहे. त्यामुळे सप्टेंबर २०२० या निर्धारीत वेळेत हा मार्ग पूर्ण होणे अपेक्षित आहे.’
आमदार मुळीक पुढे म्हणाले, ‘पर्णकुटी चौक ते गुंजन चौक आणि पुढे रामवाडी ते ङ्गिनिक्स मॉलपर्यंत महामेट्रोकडून काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी ३८८ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, रुबी हॉल क्लिनिक, बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी अशा मेट्रो स्टेशनचे बांधकामांना गती दिली जात आहे. मेट्रो रामवाडीपासून पुणे विमानतळापर्यंत नेण्यास केंद्रीय कॅबिनेट समितीनेही शिङ्गारस केली आहे. विमानतळापर्यंतच्या मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी मनपा अंदाजपत्रकात दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विमानतळ मार्गे वाघोलीपर्यंत मेट्रो नेण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. विस्तारीत टप्प्यात लवकरच त्याला मान्यता मिळणे अपेक्षित आहे.’
सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्‍वर शिंदे, महेश गलांडे, गणेश देवकर, राजेंद्र एंडल, कुंतीलाल चोरडिया यांची उपस्थिती होती.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ- जिल्हाधिकारी राम

0
  • 2हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना सहभागी होता येणार
  • 60 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळणार
  • सामाईक सुविधा केंद्रामार्फतसीएससी(कॉमन सर्व्हीस सेंटर) शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार

  पुणे, दि. 22 – केंद्र शासनामार्फत देशातील 18 ते 40 वर्षे वयोगटातील अल्प व अत्यल्प भुधारक शेतक-यांना सामाजिक सुरक्षा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पी.एम.के.एम.वाय) सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 60 वर्षे वयानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

          या योजनेसाठी भु-अभिलेखानुसार ज्या शेतक-यांच्या नावे 2 हेक्टरपर्यंत लागवडीलायक क्षेत्र आहे, असे शेतकरी पात्र आहेत. ही योजना ऐच्छिक व अंशदायी पेन्शन योजना आहे. शेतक-यांनी त्यांच्या 1 ऑगस्ट, 2019 रोजीच्या वयानुसार रक्कम रुपये 55  ते दोनशे रुपये याप्रमाणे वयाच्या 60 वर्षापर्यंत मासिक हप्ता भरावयाचा आहे. शेतक-ऱ्यांच्या मासिक हप्त्याइतकीच रक्कम केंद्र शासन पेन्शन फंडामध्ये भरणार आहे. या योजनेत सहभागी शेतक-यांना 60 वर्षे वयानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. या योजनेतंर्गत शेतक-यांनी सामाईक सुविधा केंद्रामार्फत (सीएससी)https://www.pmkmy.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. केंद्र शासनाकडून लाभार्थी नोंदणी फी रक्कम रुपये 30/- सामाईक सुविधा केंद्रास अदा करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांकडून कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. नोंदणीसाठी लाभार्थी शेतकरी यांनी आधारकार्ड, बॅक पासबुक, मोबाईल नंबर इत्यादी सामाईक सुविधा केंद्रात घेऊन जाणे आवश्यक आहे. या योजनेत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारीनवल किशोर राम यांनी केले आहे.

राजेश पांडे यांची प्रदेश भाजपा सचिव म्हणून नियुक्ती

0

पुणे, ता. २२ ः राजेश पांडे यांची प्रदेश भाजपचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. पांडे पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य असून, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी मकरंद देशपांडे यांचे सहप्रमुख म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नवीन जबाबदारीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
श्री. पांडे यांनी १९९४ ते ९७ या कालावधीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राज्य संघटन सचिव म्हणून काम पाहिले आहे. १९९८ ते २००४ या कालावधीत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे ते सदस्य होते. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे सिनेट मेंबर म्हणून २००३ ते २०१३ या कालावधीत जबाबदारी पार पाडली.
नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष म्हणून २००७ पासून कार्यरत असलेले श्री. पांडे सृजन, लोकमान्य शिक्षण मंडळ, अंमळनेर, विद्यापीठ विकास मंच या संस्थांचे विश्‍वस्त आणि वनसंपदा बहुउद्देशिय मंडळाचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. कौशल्य विकास कार्यक‘माअंतर्गत दरवर्षी ४० हजार विद्यार्थ्यांना व्यवसायभिमुख प्रशिक्षण देण्याचे काम ते करीत आहेत. सन २०१३ ते २०१६ या कालावधीत ते पुणे शहर भाजपचे सरचिटणीस होते.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा: अजित पवारांसह ५० नेते अडचणीत

0

मुंबई: राज्य सहकारी बँकेच्या 25 हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह 50 जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्चन्यायालयाने दिले आहेत. त्यामुळेच अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रावादी यांच्यातील राजकारणात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार चर्चेत आला होता.

25 हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशी अहवालात तत्कालीन संचालक मंडळावर ठपका ठेवण्यात आला होता. 2011 मध्ये रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त केले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांची नावे होती. या घोटाळ्याप्रकरणी सुरिंदर अरोरा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने पुढील पाच दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण?
महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटीव्ह बँकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे, त्यामुळे गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी मुंबई उच्च न्यायालयात काही वर्षांपूर्वी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून सुनावणी सुरू होती. त्यावरील सुनावणी 31 जुलै रोजी संपली. यावेळी बँकेच्या संचालक मंडळावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे का असा प्रश्न न्यायमूर्तींनी विचारला असता, राज्य सरकारच्या वकिलांनी नाही, असे उत्तर दिल्यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली होती.

महाराष्ट को ऑप बँक ही शिखर बँक आहे. या बँकेच्यावतीने 2005 ते 2010 या काळात मोठ्या प्रमाणात कर्जवाटप केले होते. हे कर्ज सहकारी साखर कारखाने आणि सहकारी सूत गिरण्याना आणि इतर कंपन्या, कारखाने यांना दिले होते. हे कर्ज देताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. मुख्य म्हणजे हे कर्ज राज्यातील अनेक राजकारण्यांच्या कंपन्या, कारखान्यांना दिले गेले. पुढे हे कर्ज वसूल झालेच नाही. त्यामुळे हा एक मोठा गैरव्यवहार आहे असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे.

कसे झाले राज्य सहकारी बँकेचं नुकसान?
* संचालक मंडळाने नाबार्डच्या सूचनांचे उल्लंघन केलं
* नऊ साखर कारखान्यांना 331 कोटींचा कर्जपुरवठा
* गिरणा, सिंदखेडा कारखाना, सूतगिरण्यांना ६०कोटींचे कर्ज
* केन एग्रो इंडियाची थकहमी रद्द झाल्यानं ११९ कोटींचा तोटा
* २४ साखर कारखान्यांना विनातारण कर्ज, २२५कोटींची थकबाकी
* २२ कारखान्यांकडील १९५ कोटी रूपयांचे कर्ज असुरक्षित
* लघुउद्योगांना दिलेल्या कर्जामुळे सव्वा ३ कोटींचे नुकसान
* कर्जवसुलीसाठी मालमत्ता विक्री करूनही ४७८कोटींची थकबाकी
* खासगी पद्धतीने मालमत्ता विक्री, ३७ कोटींचे नुकसान
* ८ थकबाकीदारांच्या मालमत्ता विक्रीत ६.१२ कोटींचा तोटा

पूरग्रस्तांना सेनेच्या नाना भानगिरे यांची थेट प्रत्यक्ष मदत आणि सेवा

0
पुणे-सातारा,सांगली,कराड,कोल्हापूर,या भागात पावसाने घातलेल्या थैमानाने पुरात अडकलेल्या पूरग्रस्ताना शिवसेना नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे तसेच हडपसर विधानसभा मतदारसंघातिल शिवसैनिक व महिला या पूरग्रस्ताना जीवनावश्यक आणि शालेय उपयोगी साहित्य इ.प्रमोद नाना भानगिरे यांनी स्वखर्चातुन स्वतः उपस्थित राहून प्रत्यक्ष पोहोचविण्याचे काम केले.शिवसेना युवा नेते अदित्य ठाकरे तसेच आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना युवा खासदार धैर्यशील माने हे पूरग्रस्त भागामध्ये दौऱ्यावर असताना  प्रमोद नाना  भानगिरे यांच्या प्र्त्यक्ष् सेवेचे  त्यांनी कौतुक केले.
या वेळी नाना भानगिरे  यांच्या समवेत डॉ.अमोल पाटील ( कराड ), डॉ.गुरव सर, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे विभाग प्रमुख अभिमन्यू भानगिरे, प्रभाग प्रमुख विशाल वाल्हेकर , आकाश भानगिरे, सचिन भानगिरे, गणेश भानगिरे, पोपट भानगिरे, अजय भानगिरे, करन भानगिरे, राजेंद्र भानगिरे, सुधीर भानगिरे, बापू भानगिरे, अक्षय भानगिरे, रवी भानगिरे, अण्णा भानगिरे,नितीन भानगिरे, नाना तरवडे,दत्ता तरवडे,मनोज तरवडे,सतिश राजवडे,लंकेश तरवडे, दत्तात्रय शेलार, विश्वास पोळ,,गणेश रोकडे, विकास शेवाळे,संतोष जाधव,रमेश गायकवाड,राजुशेट बिनावत,अनिल जाधव,पप्पू जाधव,सुरज घुले, अक्षय कांधारे,लखन शिंदे,बाळासाहेब आल्हाट, इत्यादी कार्यकर्ते व महिला अधिकारी नीता भोसले, सलमा भाटकर,आशा काळे, तसेच मोठ्या प्रमाणात शिवसैनिक कार्यरत  होते

मोदी सरकारकडून सूड घेण्यासाठी सीबीआय, ईडीचा वापर -काँग्रेस

0

नवी दिल्ली -आयएनएक्स मीडियाशी संबंधित प्रकरणात काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली. चिदंबरम यांना झालेल्या अटकेवरून काँग्रेसने मोदी सरकारवर हल्ला चढावला. अर्थव्यवस्था आणि देशातील इतर मुद्यांवरून लक्ष वळवण्यासाठी हा खेळ सुरू आहे. सरकारकडून सीबीआय आणि ईडीचा वापर सूड घेण्यासाठी केला जात आहे, असा आरोप काँग्रेसने केला.

आयएनएक्स भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने पी. चिदंबरम यांना सीबीआयने बुधवारी रात्री अटक केली होती. त्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून, चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयात हजर करण्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, मागील दोन दिवसांपासून लोकशाहीची हत्या होत असल्याचे देश माध्यमांवरून बघत आहे. भाजपा सरकारने ईडी आणि सीबीआय या तपास संस्थाचा वापर सूड उगवण्यासाठी केला आहे. या आकसातूनच माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम यांना अटक केली आहे. अर्थसमोरील संकट, बेरोजगारी, रूपयाची होत असलेली घसगुंडी इतके सगळे प्रश्न सध्या देशासमोर उभे आहेत. त्यावरून लक्ष हटवण्यासाठीच ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. मोदी सरकार कोणत्या थराला आम्ही बघणार आहोत, असा इशारा सुरजेवाला यांनी दिला.

चिदंबरम यांना केलेली अटक म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मोदी सरकारच्या राजकीय आणि वैयक्तिक द्वेषातून केलेली कारवाई आहे. चिदंबरम यांच्यावर जे आरोप सीबीआय आणि ईडी करीत आहे. वस्तुस्थिती मात्र त्याविरूद्ध आहे, असेही सुरजेवाला यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, चिदंबरम यांना बुधवारी ताब्यात घेतल्यानंतर रात्री चौकशी केली. आज सीबीआय त्यांना सर्वोच्च न्यायालयात हजर करणार आहेत.

मनसेचे पदाधिकारी आणि २०० हून अधिक कार्यकर्त्यांची धरपकड

0

मुंबई: कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी चौकशीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात सहकुटुंब दाखल झाले आहेत. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं असलं तरी, खबरदारी म्हणून ईडीच्या कार्यालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मनसेचे पदाधिकारी आणि २०० हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

राज ठाकरे हे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. या दरम्यान मनसे कार्यकर्ते आक्रमक होऊन आंदोलन करण्याची शक्यता असल्यानं खबरदारी म्हणून पोलिसांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच धरपकड सुरू केली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, संतोष धुरी, ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे, ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आदी नेत्यांसह दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

 

चिदंबरम यांच्या वर आरोप असलेले INX मीडिया प्रकरण आहे तरी काय ?

0

आयएनएक्स गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी ३०५ कोटीं रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. हे प्रकरण नेमके काय आहे

– चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडिया प्रकरणात भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे.

– आयएनक्स मीडिया ही पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जीची कंपनी आहे. हे दोघेही सध्या शीना बोरा हत्याप्रकरणात तुरुंगात आहेत.

– आयएनएक्स मीडियामधील परकीय गुंतवणुकीचा प्रस्ताव परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (एफआयपीबी) स्वीकारला होता. त्यापाठोपाठ अर्थमंत्रालयाने १८ मार्च २००७ रोजी ४ कोटी ६४ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीला मान्यता दिली होती.

– आयएनएक्स मीडियाने नियमांचे उल्लंघन करत आयएनएक्स न्यूज या नवीन कंपनीत २६ टक्के गुंतवणूक करताना परकीय गुंतवणूकदारांना समभागांची विक्री ८०० रुपये दराने केली. यामुळे फक्त ४. ६२ कोटी रुपयांची परवानगी असताना परकी गुंतवणूक ३०५ कोटींपर्यंत पोहोचली.

– प्राप्तिकर खाते आणि महसूल विभागाने या प्रकरणात कंपनीला नोटीसही बजावली. मात्र, त्यावेळी कार्ती चिदंबरम कंपनीच्या मदतीला धावून आले, असे सांगितले जाते. त्यांनी वडील पी. चिदंबरम यांच्या पदाचा वापर करत कंपनीला नव्याने परवानगी मिळवून दिली. त्यावेळी पी. चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते.

– या मोबदल्यात कार्ती यांच्याशी संबंधीत कंपन्यांमध्ये साडे तीन कोटींहून अधिक रक्कम देण्यात आल्याचा आरोप आहे.

– सीबीआयने या प्रकरणात मे २०१७ मध्ये कार्ती चिदंबरम, त्यांची चेस मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी, तसेच अॅडव्हॉन्टेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग कंपनीच्या पद्मा विश्वनाथन, आयएनएक्स मीडियाचे संचालक पीटर व इंद्राणी मुखर्जी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

– ईडीने २०१८ मध्ये या संबंधी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता

– पी. चिदंबरम, त्यांची पत्नी नलिनी व मुलगा कार्ती चिदंबरव हे तिघेही वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नलिनी यांच्यावर पश्चिम बंगालमध्ये गाजलेल्या शारदा चिटफंड घोटाळ्यात कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप आहे. तर कार्ती यांच्यावर राजस्थान रुग्णवाहिका गैरव्यवहाराप्रकरणी आरोप झाले होते. एअरसेल- मॅक्सिस प्रकरणातही चिदंबरम पिता-पुत्रांवर आरोप झाले होते.

पी चिदंबरम यांना अखेर त्यांच्या घरातून अटक

0

नवी दिल्ली : पी चिदंबरम यांना अखेर सीबीआयने त्यांच्या जोरबागमधील घरातून अटक केली आहे. पी चिदंबरम मागील २७ तासापासून अटकेच्या समन्सनंतर गायब होते, यानंतर त्यांनी अकबररोडच्या काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी आपल्याला आणि आपल्या मुलाला फसवण्यात येत असल्याचं सांगितलं, तसेच आपल्यावरील आयएनएसक्स मीडियाचे आरोप अचानक करण्यात येत असल्याचं सांगितलं.

पत्रकार परिषद आटोपल्यानंतर ते आपल्या जोरबागच्या घरी पोहोचले आणि त्यांच्या मागे पुन्हा सीबीआय आणि ईडीची टीम त्यांच्या अटकेसाठी पोहोचले आणि त्यांना जोरबागच्या घरी अटक करण्यात आली.

पी चिदंबरम यांच्यासोबत त्यांच्या घरी कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंघवी हे उपस्थित होते. पी चिदंबरम हे देखील आपल्या घरी असल्याचं सांगण्यात येत होतं.(रात्री ९ वाजून ४६ मिनिटांनी भिंतीवरून उडी मारून सीबीआय टीम चिदंबरम यांच्या घरात)

 पी चिदंबरम यांच्या घरी सीबीआयची टीम अटक करण्यासाठी पोहोचली. सीबीआय टीमसाठी पी चिदंबरम यांच्या घराचा दरवाजा उघडण्यात आला नाही. यामुळे सीबीआय टीमला भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश करावा लागला. सीबीआयने आपल्या मदतीसाठी दिल्ली पोलिसांची मदत घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी ईडीची टीम देखील दाखल झाली. 

सतीश कौशिक मराठी चित्रपट निर्मितीत

0

‘मन उधाण वारा’ ११ ऑकटोबरला प्रदर्शित होणार

ज्येष्ठ अभिनेता व दिग्दर्शक सतीश कौशिक हे हिंदी चित्रपटसृष्टीतलं नावाजलेलं नाव. आजवर आपल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि चतुरस्त्र दिग्दर्शनातून त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. रंगमंच, छोटा पडदा आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजविल्यानंतर सतीश कौशिक आता मराठी चित्रपटसृष्टीत निर्माते म्हणून पदार्पण करतायेत. मन उधाण वारा’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. ‘द सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स’ आणि ‘लोका एंटरटेनमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ‘पेन मुव्हीज्’चे जयंतीलाल गडा यांच्या प्रस्तुतीखाली मन उधाण वाराहा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर अतिशय तरल आणि सुंदर प्रेमकथा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे. या चित्रपट निर्मितीबद्दल बोलताना सतीश कौशिक सांगतात की संहिता व आशय या दोन गोष्टी मराठी चित्रपटाच्या बलस्थान राहिल्या आहेत. एक वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या या मराठी चित्रपटाची निर्मिती आपण करावी असं मला वाटलं त्यातूनच मन उधाण वारा’ ही हळवी प्रेमकथा मराठी रसिकांसाठी आणली आहे. ही प्रेमकथा असली तरी आयुष्याचे वेगवेगळे पदर यातून अनुभवायला मिळणार आहेत.

निशांत कौशिक, अक्षय गडा, धवल गडा चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा प्रदीप कुरबा यांची असून पटकथा-संवाद सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी लिहिले आहेत. छायांकन मिलिंद जोग तर संकलन कृष्णत घार्गे यांचे आहे. किशोर कदम, उत्तरा बावकर, सागर कारंडे, शर्वरी लोहकरे, मोनल गज्जर, रित्विज वैद्य, डॉ.शरद भुताडिया, विनोद कुलकर्णी, भारती पाटील, वैभव राजाध्यक्ष, साक्षी गांधी, ज्युलिया मोने, अनुराधा अटलेकर या कलाकारांच्या यात भूमिका आहेत.

‘एक सूर एक ताल’मधून भारतीय संगीत संस्कृतीचे दर्शन

0
पुणे : ‘एक तुतारी द्या मज आणुनी’ हे मराठीतील स्फूर्तिदायक गीत, ‘वैष्णव जन तो तेने कहियो’ हे लोकप्रिय भजन, ‘आकाशकेहू नीता’ हे प्रसिद्ध कन्नड गीत, ‘मानुहे मनुहोर बाबे’ हे आसामी गीत, ‘भारोतेरी माटीर घोरे’ बंगाली गीत, ‘पारुक्कुल्ळे नल्ला नाहू’ हे तामिळी गीत, ‘इक बाग है यह दुनिया’ हे जगाचे वर्णन करणारे हिंदी गीत, ‘अमे गीत गगन नां गाशु’ हे गुजराती गीत, ‘ढोलिया वे ढोलिया’ हे थिरकायला लावणारे पंजाबी गीत सादर करीत विविधतेतून एकता जपणाऱ्या भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले.
निमित्त होते, युवक बिरादरी, भारत आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट (अंडरग्रॅज्युएट) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एक सूर एक ताल’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे. आठ भारतीय भाषांमधील रचना सादर करीत विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे मने जिंकली. या लोकप्रिय गीतांचे गायन करतानाच विद्यार्थ्यांनी त्यावर उपस्थितांना तालही धरायला लावला. एमआयटीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात हे सादरीकरण झाले. एकूण आठ भाषांतील आठ गीते आणि तीन भजनाचे सादरीकरण झाले. त्यासाठी आधी दोन दिवस त्यांचा सर्व करून घेण्यात आला. अतुल सुंदरकर, एकता जोशी व सहकाऱ्यांनी गायन केले. संगीत सर्वजीत मौर्य, कृष्णा रत्नपारखी यांनी दिले. भरतनाट्यम गुरु सरिता बाला, संयोगिता पटेल यांनी कोरियोग्राफी केली. अक्षय जाधव यांनी नृत्य केले. लीना शेट्ये यांनी दिग्दर्शन केले.
यावेळी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया, युवक बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह, ‘एमआयटी’चे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, कार्यकारी संचालक प्रा. राहुल कराड, प्र-कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, अधिष्ठाता डॉ. कल्याण स्वरुप, सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ अंजली साने, बिरादरीच्या स्वर क्रांती, संयोजिका प्रा. कल्याणी बेलसरे आदी उपस्थित होते.
लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, “सगळ्याना एकत्र आणणारी ही कल्पना आहे. गीत आणि संगीत यांना जोडणारा दुवा या कार्यक्रमात दिसला. मानवतेचा संदेश देणारा हा मिलाफ आहे. बहुभाषिक देशात प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती असून, त्याची देवाणघेवाण होतेय, हे मानवतेचे लक्षण आहे.”
डॉ. विशवनाथ कराड म्हणाले, “संगीत साधनेतून ईश्वर दर्शन आणि शांतरसाची अनुभूती मिळते. या सादरीकरणातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले. पाश्चिमात्य संगीताच्या जमान्यात भारतीय सूर, ताल आणि लय यांचा त्रिवेणी संगम येथे झाला. ‘वैष्णव जन तो’, ‘एक तुतारी द्या मज आणूनी’ अशी स्फूर्तिदायी गीते ऐकून भारावून गेलो.”