Home Blog Page 2856

.तर, भाजपच्या आमदारांना पुणेकरांनी घरी बसवावे – माजी आमदार मोहन जोशी

0

 

पुणे – पुणेकरांना हक्काचे १८ टीएमसी पाणी मिळायलाच हवे ही मागणी डावलून महापालिका आणि जलसंपदा खात्यात करार झाल्यास भाजपच्या आमदारांना पुणेकरांनी पराभूत करुन घरी बसवावे अशी खरमरीत प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे.

पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील पाणी वाटप कराराची मुदत ३१ऑगस्ट रोजी संपत आहे. हा करार परत न झाल्यास पालिकेला दुप्पट दराने पाणी घ्यावे लागणार आहे. त्याचा फटका पुणेकरांना बसणार आहे. या उदासीनतेला पालिका आणि राज्यातील सत्ताधारी भाजप जबाबदार आहे. पुणेकरांना हक्काचे १८ टीएमसी पाणी मिळावे याकरिता गेले वर्षभर काँग्रेस पक्ष मागणी करीत आहे. राज्य सरकारने ११.५० टीएमसी पाणी कोटा मंजूर केला आहे असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत महापौर मुक्ता टिळक आणि भाजपच्या आमदारांनी पुणेकरांना विश्वासात घेऊन खुलासा करणे आवश्यक आहे. अशी मागणी जोशी यांनी पत्रकात केली आहे.

वाढीव लोकसंख्येची अधिकृत माहिती दिल्याशिवाय अधिकचा पाणीपुरवठा होणार नाही अशी भूमिका जलसंपदा विभागाने घेतली आहे. जुन्या कराराला जलसंपदा विभागाने तीन महिने मुदतवाढ देऊनही महापालिकेतील भाजपचे सत्ताधारी आणि आमदार निष्क्रीय राहिले. त्यांच्या अनास्थेचा फटका पुणेकरांना बसत असेल तर काँग्रेस पक्ष हे सहन करणार नाही, त्याविरुद्ध आंदोलन करेल. १८ टीएमसी पाणी पुणेकरांच्या हक्काचे आहे. ते मिळाले नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी भाजपच्या आमदारांना घरी बसवावे अशी तीव्र प्रतिक्रिया मोहन जोशी यांनी दिली आहे. गेल्या वर्षी अनावश्यक पाणीकपात झाली तेव्हा काँग्रेस पक्षाने आंदोलने केली. त्यावेळी भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुणेकरांच्या मागणीला न्याय देणार असल्याचा देखावा केला बाकी काही केले नाही. पुण्याची लोकसंख्या वाढते आहे. अनेक भागात पाण्याच्या समस्या आहेत मात्र, त्याचे गांभीर्य सत्ताधारी भाजपला नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल असे जोशी यांनी म्हटले आहे.

आमदारांच्या घोटाळ्यांच्या फाईल्सची चव्हाट्यावर पूजा -मनसे च्या नगरसेवकांचे आंदोलन

0

पुणे- अनेक घोटाळे आणि त्याबाबतची कागदपत्रे देवूनही कारवाई होत नाही ,मुख्यमंत्री पाठीशी घालतात असा आरोप करीत आज मनसे चे  नगरसेवक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी ..या फाईल्स ची पूजा घालून संताप व्यक्त करणारे आंदोलन आमदारांच्या घरानजीक केले . पहा यावेळी नेमके वसंत मोरे यांनी काय म्हटले आहे .

कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य – कामगार राज्यमंत्री संजय भेगडे

0

पुणे – बांधकाम व्यवसायामध्ये कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कामगार राज्यमंत्री संजय भेगडे यांनी केले.

             मावळ तालुक्यातील कान्हेफाटा येथील रामकृष्णहरी गार्डन येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगारांसाठी आयोजित कल्याणकारी योजनांच्या लाभ वाटप सोहळयामध्ये ते बोलत होते. राज्याचे कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, खा. श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, बाबुराव पाचर्णे, गणेशराव भेगडे, प्रशांत ढोरे, संदीप काकडे, नंदाताई सातकर आदि उपस्थीत होते.

            श्री. भेगडे म्हणाले की, कामगारांसाठी  केंद्र व राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. यामध्ये बांधकाम कामगार योजनेच्या मंजूर लाभार्थ्यांना “सुरक्षा संचाचे” वाटप करण्यात येत असून राहिलेल्या लाभार्थ्यांनाही  लवकरच साहित्य पुरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी घेतला रमाई आवास योजनेचा आढावा

0

पुणे दि.30 : सामाजिक न्याय विभागांतर्गत रमाई आवास योजना (ग्रामीण) घरकुल निर्माण समितीच्या वतीने घरकुल योजनेचा महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आढावा घेतला.
विधान भवन सभागृह येथे झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाड , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संभाजी लांगोरे उपस्थित होते.
रमाई आवास योजनेची स्थिती, ग्रामीण क्षेत्रात निवड केलेल्या अनुसुचित जातीच्या लाभार्थ्यांची संख्या व योजनेला आणखी गती देण्यासोबतच पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी योजनेचा आढावा घेतला.
रमाई आवास योजनेंतर्गत 435 पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये आंबेगाव 36, बारामती 109, दौंड 39, हवेली 29, इंदापूर 96, जुन्नर 51, खेड 40, मावळ 6, मुळशी 9, पुरंदर तालुक्यातील 20 घरकुलांना मंजुरी देण्यात आली.यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रवेश व्हावा अशी उदयनराजेंची इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होईल-

0

पुणे – पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रवेश व्हावा अशी उदयनराजेंची इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होईल, शेवटी ते राजे आहेत. अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष,पुण्याचे   पालकमंत्री चंद्रकांतदादा  पाटील यांनी उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर  वक्तव्य केले आहे. तर नारायण राणे यांच्या संदर्भात बोलताना राणेंचा विषय इतका मोठा आहे की तो माझ्या ताकदीच्या बाहेरचा विषय आहे. त्याबाबतचा निर्णय घ्यायला राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा समर्थ आहेत, असा टोला पाटील यांनी लगावला.

ते म्हणाले ,युतीच्या जागा वाटपाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे घेतील.  जो जो पक्षात येईल त्या सगळ्याचे स्वागतच आहे. फक्त त्यांच्यावर कुठले गंभीर गु्न्हे दाखल नसावेत, आरोप नसावेत, त्यांना कुठला शब्द दिला जाणार नाही. ज्यांची चर्चा आहे ते सगळे १ सप्टेबरला भाजपात येणार असल्याचेही ते म्हणाले. त्यानंतरही भाजपमध्ये येणारे येतच राहतील. गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात भाजप-शिवसेनेवर लोकांचा विश्वास निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले.

आपल्या मतदारसंघात विकास व्हावा, आपले अजेंडे पूर्ण व्हावेत या अपेक्षेने लोक भाजपमध्ये येतात. त्यांचे स्वागत असून त्यांचे राजीनामे वगैरे अशा तांत्रिक बाबी लक्षात घेऊन त्यांचा प्रवेश होतील असे पाटील म्हणाले

रिपब्लिकन ला सत्तेचे वाटा मिळवून देणार – डॉ.निलम गोऱ्हे

0

पुणे-दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवशक्ती -भीमशक्ती संकल्पनेत त्यावेळीही सहभागी होणारे तसेच आजही शिवसेनेबरोबर युतीत असणारे आंबेडकरी चळवळीचे नेते ,साहित्यिक अर्जुन डांगळे यांच्या रिपब्लिकन जनशक्तीला येत्या विधानसभा निवडणुकीत आणि सत्तेत सहभागी करण्यासाठी आग्रह धरणार असल्याचे विधानपरीषदेच्या उपसभापती व शिवसेनेच्या उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी जनशक्तीच्या कार्यकर्ता मेळाव्यात आस्वासन दिले .
पुढे त्या म्हणाल्या की मागासवर्गीय महामंडळ मधून महिलांसाठी स्वतंत्र योजना सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे .या बरोबरच दलित महिलांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी मी सदैव कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल जनशक्तीच्या वतीने डॉ.निलमताई गोऱ्हे यांचा नागरी सत्कार अर्जुन डांगळे यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी रिपब्लिकन जनशक्ती चे प्रदेश अध्यक्ष शैलेंद्र मोरे उपस्थित होते .
या वेळी रिपब्लिकन जनशक्ती चे संस्थापक अर्जुन डांगळे म्हणाले की येत्या विधानसभा निवणुकीत सेनेने आमच्या पक्षला किमान 5 जागा सोडण्याची मागणी केली .त्यामध्ये श्रीरामपूर,धारावी ,देवळाली ,फलटण,आणि भोर या मतदार संघाचा समावेश आहे .
प्रदेशअध्यक्ष शैलेंद्र मोरे यांनी आपल्या प्रास्तविकात रिपब्लिकन जनशक्ती ने केलेल्या कार्याचा आढावा सांगितला शिवाय काही पदाधिकाऱ्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली .
या मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातुन रिपब्लिकन जनशक्ती चे महिला ,युवक आणि प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

‘पुणे फेस्टिव्हल ‘ मध्ये ६ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मुशायरा

0
पुणे : ‘पुणे फेस्टिव्हल ‘ मध्ये ६ सप्टेंबर रोजी उर्दू ,हिंदी शेरोशायरीचा आंतरराष्ट्रीय मुशायरा आयोजित करण्यात आला आहे ‘अवामी महाज’ सामाजिक संस्था आणि इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडून आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा केंद्र(स्वारगेट) येथे होईल. ‘अवामी महाज’चे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .
पुणे फेस्टिव्हल मधील हा मुशायरा १९९२ पासून सुरु आहे आणि पुण्यातील गणेशोत्सवातील मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सहभाग या कार्यक्रमात असल्याने या मुशायऱ्याला दोन्ही समाजातील स्नेह आणि  सलोख्याचे प्रतीक मानले जाते .
या कार्यक्रमात राज्याचे माजी अल्पसंख्यक विकास मंत्री मोहमद अरिफ नसीम खान यांच्या हस्ते ‘लाईफ टाइम अचिव्हमेंट ‘ पुरस्कार आणि ‘फक्र -इ -महाराष्ट्र ‘ पुरस्कार दिले  जाणार आहेत.
पॉप्युलर मेरठी(मीरत),मंझर भोपाली(भोपाळ),इक्बाल अशर(दिल्ली ),अफरोज आलम(दुबई),अतुल अजनबी (ग्वाल्हेर),रियाझ सागर (मुझफ्फर नगर ),शाहीद अदिली (हैद्राबाद),शाईस्ता सना(कानपूर),डॉ मुमताज मुनव्वर (पुणे),अंजली अदा(काश्मीर),रेहाना शाहीन (अलीगड),शर्फ नानपर्वी(दिल्ली) हे शायर कवी सहभागी होणार आहेत .डॉ मेहताब आलम(भोपाळ) हे सूत्रसंचालन करणार आहेत.
मुशायऱ्याच्या आयोजनासाठी  संयोजन समिती  स्थापन करण्यात आली असून त्यात डॉ परवेझ इनामदार,डॉ मुश्ताक मुकादम ,वाहिद बियाबानी ,इम्तियाझ मुल्ला ,प्रा . उझ्मा तस्नीम यांचा समावेश आहे

आयडीबीआय बँकेने दाखल केले रेपो लिंक्ड सुविधा प्लस होम लोन व ऑटो लोन

0

मुंबईआयडीबीआय बँकेने दोन रेपो लिंक्ड उत्पादने दाखल केली आहेत – सुविधा प्लस होम लोन व सुविधा प्लस ऑटो लोन. ही उत्पादने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) रेपो रेटला अनुसरून असतील आणि ग्राहकांना 10 सप्टेंबर 2019 पासून उपलब्ध होतील.

चांगला क्रेडिट स्कोअर व वार्षिक किमान 6 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांना सुविधा प्लस होम लोन वसुविधा प्लस ऑटो लोन ही उत्पादने दिली जातील.

सुविधा प्लस होम लोन 35 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 75 लाख रुपयांपर्यंत दिले जाईल. बँक नव्या प्रकाराअंतर्गत,प्रक्रिया शुल्क न आकारता, टॉप-अप सुविधेद्वारे बॅलन्स ट्रान्स्फर करणार आहे. सध्या, होम लोनवरील व्याजदर वार्षिक 8.30% पासून असेल.

ऑन रोड प्राइस समाविष्ट करत, 7 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 25 लाख रुपयांपर्यंत सुविधा प्लस ऑटो लोन दिले जाणार आहे. विशेषतः नव्या 4 व्हीलरसाठी कर्जे दिली जाणार आहेत. सध्या, ऑटोन लोनवरील व्याजदर वार्षिक8.90% पासून असेल.

हरित उपक्रमाला उत्तेजन देण्यासाठी, सुविधा प्लस ऑटो लोन अंतर्गत इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी अतिरिक्त 10 बेसिस पॉइंटची सवलत दिली जाईल.

यानिमित्त बोलताना, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश शर्मा यांनी सांगितले, आमचे रिटेल श्रेणीतील लोन बुक वार्षिक 19% वाढत आहे आणि या उत्पादनांमुळे या श्रेणीतील व्यवसाय वाढवण्यासाठी  आम्हाला मदत होणार आहे.

फुटबॉल स्पर्धेत ‘सूर्यदत्ता’ची हॅट्रिक

0
पुणे : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या मुळशी तालुकास्तरीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धेत १९ वर्षाच्या गटात सूर्यदत्ता पब्लिक स्कूलने इंडस इंटरनॅशनल स्कूलचा ४-२ असा पराभव करीत विजयी हॅट्रिक साधली. मुळशी तालुकास्तरीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धा ब्लू रिडज पब्लिक स्कूल, हिंजवडी येथे नुकत्याच पार पडल्या. यावेळी १९ वर्षाच्या गटातील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत सुर्यदत्ता पब्लिक स्कूलने प्रथम क्रमांक पटकाविला.
अंतिम सामना सूर्यदत्ता पब्लिक स्कूल व इंडस इंटरनॅशनल स्कूल यांच्यात झाला. अटीतटीच्या या सामना शेवटी शून्य गोल बरोबरीत सुटला. त्यानंतर पेनल्टी शूट आउटमध्ये सूर्यदत्ता पब्लिक स्कूलने  इंडस इंटरनॅशनल स्कूलचा ४-२ अशा मोठ्या फरकाने पराभव करत मुळशी तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांच्या गटात सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळविला. सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रथमोपचार आणि आगीपासून संरक्षणाचे विद्यार्थिनींना प्रशिक्षण

0
आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम 
पुणे :प्रथमोपचार आणि आगीपासून संरक्षणाचे  प्रशिक्षण  महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींना देण्यात आले . डॉ स्वाती बजाज आणि देविदास लाड यांनी मार्गदर्शन केले आणि प्रात्यक्षिके दाखवली .उपप्राचार्य गफार सय्यद  यांनी स्वागत केले . शुद्ध हरपणे ,साप चावणे ,आग ,श्वास घेण्यास अडचण ,जखमेवर प्रथमोपचार ,नाकातून रक्त येणे अशा अनेक गोष्टींवर मार्गदर्शन करण्यात आले . कृत्रिम श्वासोच्छवासाबद्दल देखील माहिती देण्यात आली .

फडणविसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा -राष्ट्रवादी ची मागणी

0
महिला -मुलींवर वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादीची मुक निदर्शने
 पुणे : महिला व बालिका यांच्यावर सातत्याने होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे शहर च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर  पावसात मुक निदर्शन करण्यात आली.
 महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला अाहे ,  महिलांवर , बालिकांवर अन्याय ,अत्याचार , खून , बलात्कार  यासारख्या धटना वारंवार होत आहेत , प्रशासनाचा अश्या नराधमांवर वचकच राहीलेला नाही  जे यांच्याकडे गृहमंत्री पद आहे तेच मुख्यमंत्री ही आहेत स्वपक्षाच्या प्रचारयात्रा काढण्याच्या नादात त्यांना आपल्या कर्तव्याचाही विसर पडलेला आहे , माता भगिनींच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारचीच आहे ती झेपत नसल्यामुळे  गृहमंत्री पदाचा   त्यांनी त्वरित. राजीनामा द्यावा ही प्रमुख मागणी आज करण्यात आली  प्रदेशाध्यक्षा रूपाली  चाकणकर  शहराध्यक्षा सौ स्वाती पोकळे यांच्या अध्यक्षतेखाली मुक आंदोलन करण्यात आले आंदोलनास   जयदेव गायकवाड ,कमल ढोले पाटील , लक्ष्मी दुधाने ,दीपाली धुमाळ , रोहिणी चिमटे प्रदीप देशमुख , रविन्द्र माळवदकर , वनराज आंदेकर , महेश हांडे ,अश्विनी परेरा विशाल मोरे , अजीम गुडाखुवाला, भोलासिंग अरोरा ,फहीम शेख ,  आदि उपस्थित होते.

घरगुती कामगारांचे मानवाधिकार: समस्या आणि आव्हाने” या विषयावरील प्रादेशिक परिषद संपन्न

0

पुणे : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (एनएचआरसी) माध्यमातून येथील आयएलएस लॉ कॉलेजच्या सहकार्याने “घरगुती कामगारांचे मानवाधिकार: समस्या आणि आव्हाने” या विषयावरील प्रादेशिक परिषद आज संपन्न झाली. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान, आंध्र प्रदेश,तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांच्या विविध स्वयंसेवी संस्था, तज्ञ, अभ्यासक,विद्याशाखा सदस्य आणि विद्यार्थ्यांनी या परिषदेत सहभाग घेतला.

येथील आयएलएस लॉ कॉलेजच्या सभागृहात उदघाटन झालेल्या या परिषदेला   राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सरचिटणीस जयदीप गोविंद, मानद सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, प्राचार्य वैजयंती जोशी उपस्थित होते.

प्राचार्य वैजयंती जोशी यांनी आयएलएस लॉ कॉलेजची थोडक्यात ओळख करुन दिली आणि मानवाधिकार क्षेत्र, मानव अधिकार केंद्र, कायदेशीर सहाय्यता कक्ष आणि महाविद्यालयाचे इतर कक्ष आणि केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याबाबत माहिती दिली. आयएलएस लॉ कॉलेज एनएचआरसीमध्ये भाग घेत असलेल्या कार्यावरही त्यांनी प्रकाश टाकला.

                   राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सरचिटणीस जयदीप गोविंद यांनी आपल्या भाषणात घरगुती कामगार हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असूनही तो एक उपेक्षित वर्ग कसा राहीला, हे अधोरेखित केले. घरगुती कामगारांचे जीवन अधिक चांगले होण्यासाठी प्रयत्नांची अपेक्षा व्यक्त करून सर्व भागधारकांनी त्यांच्या अधिकार आणि त्यांना उपलब्ध असलेल्या उपायांबद्दल घरगुती कामगारांमध्ये जागरूकता कशी वाढविली पाहिजे. जेव्हा जेव्हा पीडित व्यक्ती जवळ येते तेव्हा तक्रारी सोडविण्यासाठी एनएचआरसीकडे एक मजबूत चौकट आहे आणि त्याबद्दल घरेलू कामगारांनी जागरूक असले पाहीजे, असे त्यांनी सांगितले.

                   मानवाधिकार आयोगाचे मानद सदस्य डॉ ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, कामगाराने विचार-विनिमय करण्याचे उद्दीष्ट ठेवले पाहिजे. भारतातील घरगुती कामगारांच्या प्रश्नांना अधोरेखित करताना लोकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणणारी धोरणे आणि कायदे प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले. देशातील घरगुती कामगारांच्या समस्यांकडेच पाहू नये तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हानांवर जाणीवपूर्वक विचार करावा असा सल्लाही त्यांनी दिला.

            सूत्रसंचालन प्रा. डॉ तेजस्विनी माळेगावकर यांनी केले तर आभार एनएचआरसीचे सहसंचालक (संशोधन) डॉ. एम. डी. एस. त्यागी यांनी मानले.

पीएनजी व सीएनजी प्रदान करण्यासाठी पुणे नॅचरल गॅस सज्ज

पुणे:  टॉरंट उद्योग समुहातील महेश गॅस लिमिटेड या उपकंपनीतर्फे ‘पुणे नॅचरल गॅस’ या ब्रँडच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यात पाईपड् नॅचरल गॅस (पीएनजी) आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) यांचा पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. याबाबतची घोषणा आज येथे करण्यात आली. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडला (एमएनजीएल) आधीपासूनच बहाल करण्यात आलेली क्षेत्रे वगळता पुणे जिल्ह्यातील सर्व औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी ग्राहकांना पुणे नॅचरल गॅसच्या वतीने नैसर्गिक वायू उपलब्ध होईल.

पुणे नैसर्गिक वायूला प्राधिकृत केलेल्या क्षेत्रांमध्ये पुणे जिल्ह्यातील रांजणगाव, बारामती, कुरकुंभ, इंदापूर, पिरंगुट, वाघोली, सासवड, सणसवाडी, खेड शहर, राजगुरुनगर, लोणावळा, तळेगाव फेज 2, शिरुर, शिक्रापूर, जेजुरी व इतर तालुक्यांचा समावेश आहे. यामध्ये 15 हजार चौ. किलोमीटर क्षेत्रफळात गॅसचे वितरण करण्यात येईल.

कंपनीने ‘पुणे नॅचरल गॅस’साठी सीएनजी स्थानके आणि पीएनजीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू केले आहे. रांजणगाव, लोणीकंद व कार्ला येथील तीन सीएनजी स्थानके कार्यान्वित करण्यात आली असून बारामती, शिवणे आणि पुणे-बंगळुरू महामार्गावर आणखी तीन सीएनजी स्थानके येत्या 3 महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. यातील पहिला टप्पा 31 मार्च 2021 पर्यंत सुरू होईल. या अंतर्गत, पुणे जिल्ह्यात सीएनजीची व्यापक उपलब्धता निश्चित करण्यासाठी 50 सीएनजी स्थानकांची उभारणी करण्याचा विचार करीत आहे. तसेच एक लाखाहून अधिक रहिवाशांना पीएनजीची कनेक्शन्स देण्यात येतील. पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांमधील उद्योगांना नैसर्गिक वायूचा पुरवठा या टप्प्यात करण्यात येईल आणि 1,800 इंच कि.मी. गॅस पाइपलाइनचे नेटवर्क उभारण्यात येईल.

सुरुवातीच्या टप्प्यात, वाघोली, लोणीकंद, शिक्रापूर, रांजणगाव, शिरूर, राजगुरूनगर आणि बारामती येथील निवासी ग्राहकांना पीएनजीची सेवा देण्याची कंपनीची योजना आहे. यासाठी इच्छुक ग्राहक www.punenaturalgas.com वर कनेक्शनसाठी नोंदणी करू शकतात. या परिक्षेत्रातील सर्व प्रमुख निवासी, औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना गॅस पुरवण्यासाठी 1,800 इंच कि.मी. पाईपलाईन टाकण्याचे काम यापूर्वीच सुरू करण्यात आलेले आहे. या प्रकल्पामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यातील ग्राहकांना पर्यावरणपूरक व किफायतशीर इंधन असलेल्या नैसर्गिक वायूचा लाभ घेता येणार आहे. हा लाभ आतापर्यंत केवळ पुणे शहरातील रहिवाश्यांसाठी मर्यादित होता.

पुणे जिल्ह्यात सीजीडी (सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन) नेटवर्कच्या औपचारिक सादरीकरणाविषयी टिप्पणी करताना टॉरंट गॅस लिमिटेडचे संचालक दीपक दलाल म्हणाले, “ जागतिक पातळीवर प्राथमिक उर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा अंदाजे 24 टक्के वाटा आहे. मात्र भारताच्या नैसर्गिक वायूचा हा वाटा केवळ 6 टक्के इतकाच आहे. हवामान बदलाची वाढती चिंता लक्षात घेता, येत्या काही वर्षांत नैसर्गिक वायूसारखे पर्यावरणासाठीचे स्वच्छ इंधन भारताच्या आर्थिक वाढीत प्रबळ भूमिका निभावेल, अशी अपेक्षा आहे. सन २०२० पर्यंत शहर गॅस वितरण 78 वरून 250शहरांपर्यंत वाढविण्याचे आणि 2025 पर्यंत उर्जेच्या मिश्रणामध्ये नैसर्गिक वायूचा वाटा १5टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. या लक्ष्यामध्ये आमचेही योगदान असावे, या हेतूने 7 राज्यांमधील 32 शहरांमध्ये जागतिक दर्जाचे सीजीडी नेटवर्क आम्ही तयार करीत आहोत. पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी पीएनजी आणि सीएनजी आणून आम्हाला आनंद होत आहे. आमच्या ग्राहकांना वाजवी किंमतीत चांगली सेवा देण्याचा आमचा मनापासून हेतू आहे.”

याप्रसंगी बोलताना महेश गॅस लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्रीधर तांब्रपर्णी म्हणाले, “सध्या उपलब्ध असलेल्या इंधनांमध्ये पीएनजी आणि सीएनजी ही सर्वात स्वच्छ इंधने आहेत आणि देशाच्या वाढत्या उर्जा गरजा भागविण्यासाठी ती मदत करतील. पर्यावरणास अनुकूल असण्याव्यतिरिक्त पीएनजी आणि सीएनजी यांचे इतर इंधनांपेक्षा असंख्य फायदे आहेत. पीएनजीमुळे इंधनाचा अविरत पुरवठा, सोय आणि सुरक्षितता मिळते, तर सीएनजीमुळे कमी किंमतीचा लाभ, चांगली इंधन कार्यक्षमता, कमी देखभाल खर्च आणि त्याद्वारे कुटुंबांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत असे लाभ होतात. आम्हाला खात्री आहे की एकदा ग्राहकांनी ही इंधने स्वीकारल्यानंतर त्यांना त्यांचे दृश्यमान फायदे दिसतील.”

दिल्ली, मुंबई, पुणे (शहर), अहमदाबाद, सूरत इत्यादी मोठ्या शहरांमधील ग्राहकांनी यापूर्वीच नैसर्गिक वायूचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यास सुरुवात केली आहे.

महेश गॅस लिमिटेड (एमजीएल) बद्दल..

टॉरंट समुहाची सहयोगी कंपनी महेश गॅस लिमिटेडतर्फे (एमजीएल) पुणे नॅचरल गॅस उपलब्ध करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात एमएनजीएलला बहाल केलेली अधिकृत क्षेत्रे वगळता, इतरत्र सीजीडी नेटवर्क विकसित करण्यासाठी एमजीएल या कंपनीला पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (पीएनजीआरबी) अधिकृत मान्यता दिली आहे.

टॉरंट समुहाबद्दल..

टॉरंट समुहाचा भारतात वीजनिर्मिती व औषधे या क्षेत्रांत मोठा दबदबा आहे. या समुहाचा महसूल २१,००० कोटी रुपये (3 अब्ज डॉलर्स) इतका आहे. टॉरेन्ट गॅस लिमिटेड या कंपनीला सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन (सीजीडी) व्यवसायासाठी मान्यता मिळाली आहे. या समुहातील प्रमुख कंपनी टॉरंट फार्मा ही हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि मध्यवर्ती चेता संस्था या साठीची औषधे बनविते. 40 देशांमध्ये तिचे कामकाज विस्तारलेले आहे. टॉरंट पॉवर ही वीज निर्मिती, पारेषण व वितरण या उपक्रमात देशातील सर्वात मोठी खासगी कंपनी आहे. तिने 3721 मेगावॅट क्षमतेची उत्पादन क्षमता स्थापित केली आहे आणि 3 राज्यांमधील8 शहरांत 32 लाख ग्राहकांना ती वीज वितरण करते.

टॉरंट गॅसच्या माध्यमातून, टॉरंट समूहाने उर्जा क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाची गरज सोडवण्यासाठी सीजीडी व्यवसायात प्रवेश केला आहे. पीएनजीआरबीच्या वतीने आयोजित तेराव्या आणि दहाव्या सीजीडीच्या निविदा फेऱ्यांमध्ये टॉरंट गॅसला भारतातील 7 राज्यातील 32 जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक वायूचे वितरण करण्याचे हक्के देण्यात आले. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि पंजाब या राज्यांमध्ये या उद्योगाचा विस्तार करण्याची कंपनीची आक्रमक योजना आहे.

पीएनजी (पाईपड नॅचरल गॅस) विषयी..

पीएनजीचे ज्वलन स्वच्छ आणि संपूर्ण प्रकारचे असते. हे इंधन स्वच्छ आणि हरीत म्हणून व्यापकपणे मानले गेले आहे. एलपीजीशी तुलना केली असता; पीएनजीचे ग्राहकांसाठी बरेच वेगळे फायदे आहेत – सिलिंडर्स साठविण्यासाठी जागेची कटकट नाही, आगाऊ नोंदणी करण्याची व सिलिंडर बदलून घेण्याची डोकेदुखी नाही आणि सुरक्षित व विश्वासार्ह पुरवठा होण्याची खात्री. याव्यतिरिक्त, पीएनजी आर्थिकदृष्ट्या परवडण्याजोगे आहे. पाईपमधून वाहणाऱ्या आणि मीटरने मोजल्या जाणाऱ्या या गॅसमुळे तणावमुक्त, स्वस्त आणि कार्यक्षम पर्याय ग्राहकांना मिळतो.

सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) विषयी..

सीएनजी हा इंधनाचा पर्याय आता स्मार्ट आणि पर्यावरणास जागरूक अशा वाहन मालकांच्या पसंतीस उतरला आहे. शिसे आणि गंधक मुक्त अशा वैशिष्ट्यांमुळे त्यास सामान्यतः हरीत इंधन म्हणून संबोधले जाते. सीएनजीमुळे घातक घटकांचे उत्सर्जन कमी होते आणि त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव कमी होतो. सीएनजी केवळ एक स्वच्छ इंधनच नाही, तर ते गंजविरोधकबी असल्यामुळे, ते वाहनाच्या इंजिनाच्या शक्तीवर  कोणताही परिणाम करीत नाही. तसेच इंजिनाची इंधन कार्यक्षमताही वाढवते. त्यामुळे इंजिन दीर्घायुषी बनते. पेट्रोलपेक्षाही सीएनजी स्वस्त आहे आणि गाडी चालविण्याच्या पद्धतीनुसार, ग्राहक त्यांच्या मासिक इंधन खर्चावर सुमारे 35-40 टक्के बचतीची अपेक्षा करू शकतात.

सध्या कार, रिक्षा, बस आणि इतर सार्वजनिक वाहतूक वाहनांचे मोठे उत्पादक त्यांच्या कारखान्यांत बसविलेल्या सीएनजी इंजिनासह गाड्या सादर करीत आहेत. विद्यमान पेट्रोल कार मालकांसाठी सीएनजी किटचे अनेक स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड बाजारात उपलब्ध आहेत, ज्यामुळे पारंपारिक इंधनावर चालणारी वाहने सीएनजीवर चालू शकतात.

बँकांच्या विलिनीकरणाची घोषणा-27 बँकांऐवजी आता फक्त 12 सरकारी बँका

0
१)ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक पंजाब नॅशनल बँकेत
 विलीन झाली
२)कॅनरा बांका आणि सिंडिकेट बँक विलीन झाली
३)युनियन बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक, कॉर्पोरेशन बँक विलीनीकरण केले 
जाईल
४)इंडियन बँक अलाहाबाद बँकेत विलीन होत आहे
५)बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या प्रमाणे कार्य करत राहील.

नवी दिल्ली- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज(शुक्रवार) अर्थव्यवस्थाच्या पुढील दिशेबाबत सरकारकडून घेण्यात आलेल्या काही निर्णयांबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या की, 5 ट्रिलियन डॉलरच्या इकोनॉमीचे लक्ष पूर्ण करण्यासाठी सरकार अनेक मोठी पाऊले उचलत आहे. तसेच लोन रिकव्हरी रेकॉर्ड स्तरावर झाली आहे आणि 250 कोटी रुपयांपैक्षा जास्तीच्या प्रत्येक कर्जावर सरकार लक्ष ठेवेले.

सीतारमण यांनी घोषणा केली की, पीएनबी, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, यूनाइटेड बँक ऑफ इंडिया या बँका विलीन होतील. या तिन्ही बँक मिळून मोठी सरकारी बँक तयार होईल, यांचा एकत्रित व्यापर 17.95 लाख कोटी रुपये असेल. कॅनरा आणि सिंडिकेट बँकदेखील विलीन होतील आणि चौथी मोठी बँक तयार होईल. यूनियन बँक आंध्रा बँक आणि कार्पोरेशन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन होतील, ही पाचवी सर्वात मोठी बँक असेल, या बँकेचा व्यापार 14.59 लाख कोटी रुपये असेल. इंडियन बँक, इलाहाबाद बँकेत विलीन होउन 7वी मोठी बँक बनले,व्यवसाय 8.08 कोटी रुपये. आता 27 बँकांऐवजी फक्त 12 सरकारी बँक असतील. 8 सरकारी बँकांनी रेपो रेटशी निवडीत प्रोडक्ट लॉन्च केले. त्या पुढे म्हणाल्या की, “भगोड़ा आर्थिक अपराध” कायद्या अंतर्गत अनेक पळपुट्यांची संपत्ती जप्त केली, त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरुच आहे. नीरव मोदीसारख्या प्रकरणांना थांबवण्यासाठी स्विफ्ट बँकिंग सिस्टीम (सीबीएस) लागू केला आहे. आतापर्यंत 3.85 लाख शेल कंपनिया बंद करण्यात आली आहेत. तसेच बँकना रेपो रेटशी निवडीत प्रोडक्ट लॉन्च करण्यास सांगितले आहे. याच्या निकाल असा आला की, 8 सरकारी बँकानी याच्याशी निगडीत होम, व्हीकल, कॅश-क्रेडिट लोनसारखे प्रोडक्ट लॉन्च केले. एनपीएची रकम 8.65 लाख कोटी रुपयांतून कमी होऊन 7.90 लाख कोटी रुपये झाली आहे. कर्ज वसूलीने 14 सरकारी बँकांचे उत्पन्न वाढले आहे

तुमचे नातेवाईक पक्ष का सोडत आहेत…?या प्रश्नावर पत्रकार परिषदेत भडकले शरद पवार

0

अहमदनगर- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एका पत्रकाराने प्रश्न विचारताच भडकले.राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून पक्षाचे मोठे नेते पक्षाला राम-राम ठोकत आहेत. आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारला. तुमचे नातेवाईक पक्षापासून दूर का जात आहेत, असा प्रश्न विचारताच शरद पवार हे संतापले. यात नातेवाईकांचा काय संबंध, नातेवाईकांचा प्रश्न आला कुठून, असे म्हणत ते पत्रकार परिषद सोडून जाऊ लागले. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराने माफी मागावी अशी त्यांनी मागणी केली. त्यावेळी इतर पत्रकारांनी त्यांची माफी मागितली. त्यानंतर पत्रकार परिषद पुढे सुरु झाली.

शरद पवारांचे नातलग असलेले उस्मानाबादमधील नेते पद्मसिंह पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. याबाबत श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नामुळे शरद पवार भडकले. ‘इथं नातेवाईकांचा प्रश्न येतोच कुठं?, असे प्रश्न तुम्ही कसे काय विचारू शकता?, तुम्ही माफी मागा, असं म्हणत थेट निघून जाऊ लागले. पत्रकार परिषद सुरू असताना घडलेल्या या प्रसंगामुळे सगळेच चकीत झाले. राजकारणात नातेवाईकांचा संबंध आहे का? हे असं बोलायचं असेल तर मला बोलायचं नाही असं सांगत पवार जागेवरून उठले त्यानंतर इतर पत्रकारांच्या सांगण्यानंतर शरद पवार पुन्हा जागेवर बसले. त्यावेळी अशा लोकांना बोलवत जाऊ नका, ज्यांना सभ्यता नाही, यांना बोलवणार असाल तर मला बोलावू नका, आपण निघून गेलात तर बरं होईल अशा शब्दात पवारांनी आपला राग व्यक्त केला. या घटनेवरुन हे सिद्ध होते की, नेत्यांच्या गळतीमुळे राष्ट्रवादीले पडलेले खिंडार शरद पवारांच्या जिव्हारी लागले आहे.