बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सांकला दाम्पत्यास आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
पीवायसी बुद्धिबळ लीग 2019 स्पर्धेत गोल्डन किंग, द बिशप्स चेक, 7 नाईट्स संघांचे विजय
पुणे, 2 सप्टेंबर 2019- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे पीवायसी बुद्धिबळ लीग स्पर्धेत गोल्डन किंग, द बिशप्स चेक व 7 नाईट्स या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आपली विजयी मालिका कायम राखली.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत राउंड रॉबिन फेरीत तन्मय चितळे, आदित्य भट, सारंग उधवर्षे, शुभांकर मेनन, निखिल चितळे यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर 7 नाईट्स संघाने वाडेश्वर विझार्डस संघाचा 5-1 असा एकतर्फी पराभव केला. गोल्डन किंग संघाने गोल्डफिल्ड ट्रायडेंट्स संघाचा 4-2असा पराभव करून तिसरा विजय मिळवला. विजयी संघाकडून निरंजन गोडबोले, अजिंक्य जोशी, हेमंत उर्धवर्षे,प्रियदर्शन डुंबरे यांनी अफलातून कामगिरी बजावली.
अन्य लढतीत द बिशप्स चेक संघाने मराठा वॉरियर्स संघाचा 4-2 असा पराभव करून विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: राउंड रॉबिन फेरी:
गोल्डफिल्ड ट्रायडेंट्स पराभूत वि.गोल्डन किंग 2-4(राजशेखर करमरकर पराभूत वि.निरंजन गोडबोले 0-1; अमोद प्रधान पराभूत वि.अजिंक्य जोशी 0-1; पराग चोपडा पराभूत वि.हेमंत उर्धवर्षे 0-1; विजय ओगळे वि.वि.अर्णव कुंटे 1-0; अमृता देवगावकर पराभूत वि.प्रियदर्शन डुंबरे 0-1; ईशान लागू वि.वि.अभिषेक देशपांडे 1-0);
द बिशप्स चेक वि.वि.मराठा वॉरियर्स 4-2(अश्विन त्रिमल वि.वि.आशिष देसाई 1-0; अभिषेक गोडबोले पराभूत वि.परम जालन 0-1; अनघा भिडे पराभूत वि.मिहीर शहा 0-1; केतन देवल वि.वि.अमित धर्मा 1-0; किरण खरे वि.वि.यश मेहेंदळे 1-0; चारू साठे वि.वि.राजेंद्र एरंडे 1-0);
7 नाईट्स वि.वि.वाडेश्वर विझार्डस 5-1(तन्मय चितळे वि.वि.अक्षय साठे 1-0; आदित्य भट वि.वि.कुणाल भुरट 1-0; माधुरी जाधव पराभूत वि.अमोल मेहेंदळे 0-1; सारंग उधवर्षे वि.वि.कौस्तुभ वाळिंबे 1-0; शुभांकर मेनन वि.वि.रामकृष्णा मेहेंदळे 1-0; निखिल चितळे वि.वि.रोनीत जोशी 1-0).
द सदर्न कमांड गोल्ड ट्रॉफी शर्यतीत सुलतान सुलेमान विजेता
पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019
पुणे, 2 सप्टेंबर 2019: पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019 या स्पर्धेत द सदर्न कमांड गोल्ड ट्रॉफी या शर्यतीत सुलतान सुलेमान या घोड्याने 1400मीटर अंतरावरच्या या मुख्य शर्यतीमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला.
रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब(आरडब्लूआयटीसी)येथे सुरु असलेल्या या स्पर्धेतील द सदर्न कमांड गोल्ड ट्रॉफी या महत्वाच्या लढतीत दिनशा पी. श्रॉफ, मुनची पी. श्रॉफ, अबन एन.चॊथीया आणि सलीम फजलभो यांच्या मालकीच्या सुलतान सुलेमान या घोड्याने 1मिनिट 27सेकंद व 149मिनीसेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. याचा ए संदेश हा जॉकी होता, तर अल्ताफ हुसेन ट्रेनर होता.
सविस्तर निकाल:
द सदर्न कमांड गोल्ड ट्रॉफी
विजेता: सुलतान सुलेमान, उपविजेता: मेमोरेबल आईज
लोकशाही खिळखिळी करण्यासाठी विरोधक संपवण्याचा भाजपचा डाव-सुषमा अंधारे
पुणे : “काही वर्षांपूर्वी आगपाखड करणार्या लोकांना आज भारतीय जनता पक्षाचे नेते मिठ्या मारत आहेत. सक्षम विरोधक हे सदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. मात्र, विरोधक संपवून लोकशाही खिळखिळी करण्याचा भाजपचा डाव आहे. सध्या भाजपत सुरु असलेले इनकमिंग त्याचेच प्रतिक आहे. आज भाजप नावाची गंगा उगम पावली असून, भ्रष्टाचाराचे पाप केलेले अनेकजण भाजपनामक गंगेत डुबकी मारून पवित्र होत आहेत,” अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या आणि गणराज्य संघाच्या अध्यक्षा सुषमा अंधारे यांनी भाजपवर शरसंधान साधले. लोकशाहीचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी भाजपविरोधी आवाज बुलंद करुन विरोधकांनी एकत्र येऊन प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत, असेही अंधारे यांनी सांगितले.
भीम आर्मीतर्फे (बहुजन एकता मिशन, महाराष्ट्र) आयोजित ‘संविधानविरोधी सरकार… चले जाव महापरिषदेत’ सुषमा अंधारे बोलत होत्या. स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडामंच येथे झालेल्या या महापरिषदेला जेष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी, दिल्ली येथील मुस्लिम विचारवंत वली रहमानी, आंबेडकरी विचारवंत कुमार मेटांगे, संयोजक भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष दत्ता पोळ, महिला आघाडीच्या नीता आडसुळे, उपाध्यक्ष हुसेनभाई शेख, मुकेश गायकवाड, संपर्कप्रमुख प्रदीप कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी प्रतीकात्मक बॅलेटपेपरवर मतदान करून ईव्हीएमचा निषेध करण्यात आला. तसेच भीम आर्मीच्या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले
सुषमा अंधारे म्हणाल्या, “भारतीय म्हणून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. समानतेच्या पातळीवर आणणारी आंबेडकरी चळवळ बळकट व्हावी. आज मोदी-शहांची जोडगोळी आणि फडणवीस सरकार जनतेची फसवणूक करीत आहे. परिवर्तनाचा मार्ग मतदानाचा अधिकार आहे. मात्र, बॅलेट पेपर दूर करुन ईव्हीएमच्या घोळात निवडणुका होत आहेत. ईव्हीएम विरोधी मोहिमेत पक्षीय भूमिका येता कामा नये. सगळे एकत्र आले, मतांचे विभाजन थांबवले, तरच या संविधान विरोधी भाजप सरकारला चले जाव म्हणता येईल. त्यासाठी भावनिकतेपेक्षा वास्तव समजून घेण्याची गरज आहे. व्यक्ती, संस्था यापेक्षाही विचारधारेला अधिक प्राधान्य दिले पाहिजे.
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, “आज मुस्लिम जात्यात, तर हिंदू सुपात आहेत. हिंदुत्ववादी मनुवादी राज्य आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लोकशाहीमध्ये जात, धर्म आणता कामा नये. आज बिगरमुस्लिम म्हणजे हिंदू अशी व्याख्या सांगितली जात आहे. भारतीय नागरिक म्हणून आपण लोकशाही विरोधी हिंदुत्ववाद्यांचा डाव उधळून लावण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे.”
अली रहेमानी म्हणाले, “संविधान नसते तर आपण आजच्यासारखे जगू शकलो नसतो. संविधान बदलू पाहणारे टोकाचे पाऊल उचलू शकतात. हिंदू-मुस्लिम आणि इतर धर्मात फूट पाडण्याचा कट हिंदुत्ववादी करत आहेत. मुस्लिमांच्या भारतीयत्वार प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. ‘मॉब्लिंचिंग’ ही तर राजकीय हत्या असून, त्यासाठी दलितांचा, मुस्लिमांचा वापर केला जात आहे.”
कुमार मेटांगे म्हणाले, “संविधान बदलण्याची भाषा करणारे जबाबदार व्यक्ती म्हणवणारे देशद्रोही आहेत. टप्प्याटप्प्याने संविधान कमकुवत करण्याचा डाव आपल्याला हाणून पाडण्यासाठी आपण जागृत राहिले पाहिजे.” दत्ता पोळ यांनी प्रास्ताविकात महापरिषदेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. जैलाबभाई शेख यांनी आभार मानले.
महापरिषदेत यावर विचारमंथन
ईव्हीएम हटाव, संविधान बचाव, झुंडशाही, मुस्लिम युवकांच्या हत्या, वाढते दलित अत्याचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे हल्ले, सांगली-कोल्हापूर पूरपरिस्थितीबाबत बेजबाबदार असलेले सरकार, घटनात्मक संस्थांचा होणार गैरवापर, खासगी क्षेत्रातील आरक्षणाचा प्रश्न, शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी, झोपडपट्टी धारकांची होणारी फसवणूक यासह भीमा कोरेगाव हल्ला अशा विविध मुद्यांवर या महापरिषदेत विचारमंथन झाले.
३७० कलमला विरोध की पाठिंबा? हे प्रथम पवार आणि राहुल गांधींनी स्पष्ट करावे – अमित शहा
सोलापूर –काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध आहे की पाठिंबा आहे, याचा खुलासा करावा, असं आव्हान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलं. जेव्हा जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा आणि हिताचा मुद्दा उपस्थित होतो, तेव्हा तेव्हा काँग्रेस वेगळी भूमिका घेते. चांगल्या निर्णयाला साथ देता येत नसेल तर किमान गप्प तरी बसा, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोलापुरातील महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोपाप्रसंगी केली.
राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक , कॉंग्रेसचे जयकुमार गोरे आणि राष्ट्रावादीचे राणा जगजितसिंह पाटीलमुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोप यात्रेवेळी कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना भाजपाचा झेंडा दिला. याचबरोबर जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांचे नातेवाईक राणा जगजित सिंह यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.
अमित शहा म्हणाले ,शरद पवार यांचे भतीजे यांनी 74 हजार कोटीचा सिंचन घोटाळा केला. हजारो कोटींचा निधी दिला पण एक थेंब पाणी मिळाले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने केलेल्या भ्रष्टाचारामुळेच महाराष्ट्र मागे पडला. मात्र देवेंद्र फडणीस यांनी मागील पाच वर्षात विकास कामे करून महाराष्ट्र नंबर वन बनवला. हा काळ सुवर्णाक्षरांत लिहिला जाईल. काँग्रेस मधील गांधी घराणे हे राजकारणाला घरचा ठेका समजतात, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोलापुरातील महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोपाप्रसंगी केले.
‘शरद पवार यांची वक्तव्ये वाचली. पवार तुम्ही सत्तेत होता त्यावेळेस महाराष्ट्राला काय दिले हे अगोदर सांगा, असे आव्हानही शहा यांनी पवार यांना दिले. तसेच हा प्रश्न पवारांना सोलापूर दौऱ्यावेळी विचारण्याचे आवाहन सोलापूरकारांना केले.
पाकिस्तानच्या सर्व स्वप्नांवर पाणी फेकण्याचे काम मोदींनी केले. राहुल गांधी आणि शरद पवार यांनी 370 हटवले याबद्दल आपली भुमिका स्पष्ट करावी. भाजपाने ज्या – ज्या वेळी विरोधक म्हणून काम केले त्यावेळी देशाचे प्रश्न आले त्यावेळेस भाजपने काँग्रेस सरकारला समर्थन दिले. पुन्हा एकदा देवेंद्र फडणीस यांना मुख्यमंत्री बनणार का, असा सवालही शहा यांनी कार्यकर्त्यांना केला.
गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी म्हटले की, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी यशस्वीपणे कार्यकाळ पूर्ण केला. यावेळी त्यांनी भाजपा व शिवसेनाला दोघांनाही सोबत घेऊन काम केले. तर चंद्रकांत पाटील यांना आम्ही थांबवले आहे म्हणून ठीक आहे, नाहीतर त्यांनी भाजपाचा संपूर्ण दरवाजा उघडला तर शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिवाय कोणीच काँग्रेस व राष्ट्रवादीत राहणार नाही. तसेच, फडणवीस सरकारवर एकही घोटाळ्याचे आरोप नाहीत. तर अजित पवार यांनी करोडोंचा सिंचन घोटाळा केला असल्याचेही शाह म्हणाले.
ईव्हीएमवरून शरसंघान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणामध्ये विरोधकांच्या ईव्हीएमवरील टीकेवरून शरसंधान साधले. सत्तेची मुजोरी होती म्हणूनच काँग्रेस-राष्ट्रवादीला जनतेने नाकारले. बारामतीत सुप्रिया सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगलं, तर सोलापुरात जय सिद्धेश्वर महास्वामी निवडून आले तर ईव्हीएम वाईट असे कसं, असा सवालही उपस्थित करत परिक्षेला नापास झालेल्या मुलाचे उदाहरण दिले. 2004 ते 2014 च्या निवडणुका ईव्हीवर झाल्या. तेव्हा ईव्हीएम खराब नव्हते का, मोदी जिंकल्यावरच ईव्हीएम खराब झाल्याची ओरड मारू लागल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. विरोधकांची झोप उडवणारी महाजनादेश यात्रा आहे. पाच वर्षात काय केले याचा हिशोब देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढलेली आहे. आभार मानण्यासाठी, हिशोब देण्यासाठी, सूचना मागण्यासाठी ही यात्रा काढल्याचे पाटील यांनी सांगितले. आपल्या पक्षातील आमदार-खासदार हे भाजप-शिवसेनेचे जात असल्यामुळे शरद पवार यांचा त्रागा झाला त्यामुळेच पत्रकारांवर ते चिडले अशी टीका करताना पाटील यांनी उदयनराजे काय पोर आहेत का, असा सवालही केला.राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे लवकरच करणार भाजप प्रवेश करतील. विरोधकांना नेहमीच जातीच राजकारण दिसतं, असेही पाटील यांनी सांगितले
अमित शहांच्या उपस्थितीत यांचा झाला सोलापुरात भाजपा प्रवेश
सोलापूर : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोप यात्रेवेळी कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना भाजपाचा झेंडा दिला. याचबरोबर जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांचे नातेवाईक राणा जगजित सिंह यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.
भर पावसात अमित शहा रॅॅली काढून सभास्थानी आल्यानंतर तातडीने झाले या तिघांचे प्रवेश
पीवायसी बुद्धिबळ लीग 2019 स्पर्धेत गोल्डन किंग, द बिशप्स चेक संघांचा दुसरा विजय
पुणे, 1 सप्टेंबर 2019- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे पीवायसी बुद्धिबळ लीग स्पर्धेत गोल्डन किंग, द बिशप्स चेक या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून दुसरा विजय मिळवला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत राउंड रॉबिन फेरीत द बिशप्स चेक संघाने वाडेश्वर विझार्डस संघाचा 3.5-2.5असा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. द बिशप्स चेक संघाकडून अश्विन त्रिमल, अभिषेक गोडबोले, किरण खरे यांनी अफलातून कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
दुसऱ्या लढतीत अभिषेक देशपांडे, निरंजन गोडबोले, अजिंक्य जोशी, हेमंत उर्धवर्षे यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर गोल्डन किंग संघाने किंग्स 64 संघाचा 4-2 असा सहज पराभव करून दुसरा विजय मिळवला. अन्य लढतीत मराठा वॉरियर्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत गोल्डफिल्ड ट्रायडेंट्स संघाचा 4-2 असा पराभव करून सलग तिसरा विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: राउंड रॉबिन फेरी:
वाडेश्वर विझार्डस पराभूत वि.द बिशप्स चेक 2.5-3.5(कौस्तुभ वाळिंबे बरोबरी वि.केतन देवल 0.5-0.5; अनुशा भिडे पराभूत वि.अश्विन त्रिमल 0-1; अक्षय साठ्ये वि.वि.अनघा भिडे 1-0; रोनीत जोशी पराभूत वि.अभिषेक गोडबोले 0-1; कुणाल भुरत पराभूत वि.किरण खरे 0-1; अमोल मेहेंदळे वि.वि.चारू साठे 1-0);
मराठा वॉरियर्स वि.वि.गोल्डफिल्ड ट्रायडेंट्स 4-2(अथर्व हार्डीकर पराभूत वि.विजय ओगळे 0-1; परम जालन वि.वि.ईशान लागू 1-0; राजेंद्र एरंडे वि.वि.राजशेखर करमरकर 1-0; यश मेहेंदळे वि.वि.अमोद प्रधान 1-0; अमित धर्मा पराभूत वि.अमृता देवगावकर 0-1; मिहीर शहा वि.वि.पराग चोपडा 1-0);
गोल्डन किंग वि.वि.किंग्स 64 4-2(अभिषेक देशपांडे वि.वि.रोहिन लागू 1-0; निरंजन गोडबोले वि.वि.राजन जोशी 1-0; अजिंक्य जोशी वि.वि.शर्मिला शहा 1-0; हेमंत उर्धवर्षे वि.वि.जय केळकर 1-0; प्रियदर्शन डुंबरे पराभूत वि.राघव बर्वे 0-1; अर्णव कुंटे पराभूत वि.आदित्य लाखे 0-1).
जेआरव्हीजीटीआयमध्ये पदवी प्रदान समारंभ
पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘जगन्नाथ राठी व्होकेशन गायडेन्स अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’मध्ये (जेआरव्हीजीटीआय) ‘हेरीच इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक ए, के, गोयल यांच्या हस्ते पदवी प्रदान समारंभ संपन्न झाला. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद रावते, संचालक डॉ. श्रीकृष्ण कानेटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्यावसायिक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी दांडगी इच्छाशक्ती, उच्च ध्येय, सातत्यपूर्ण सरावातून कौशल्य विकास करण्यावर भर दिला पाहिजे असे मत श्री. गोयल यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी नोकरी करणार्यांपेक्षा नोकरी देणारे उद्योजक बनावे, त्यासाठी परिस्थितीनुसार बदलण्यापेक्षा परिस्थिती बदलण्याची क्षमता विकसित केली पाहिजे असे मत डॉ. कुंटे यांनी व्यक्त केले.
‘टीडीएस’वर मागर्दशन सत्र
पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि प्राप्तिकर विभाग (इन्कम टॅक्स डिपार्टमेंट) यांच्या वतीने ‘टीडीएस’वर मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे. येत्या बुधवारी (दि. ४ सप्टेंबर) सकाळी १० ते १ या वेळेत बिबेवाडी येथील आयसीएआय भवन येथे हे सत्र होणार आहे. मुख्य प्राप्तिकर आयुक्त अनुराधा भाटिया यांच्या हस्ते सत्राचे उद्घाटन होणार आहे. या सत्रात टीडीएसमधील तरतुदी, कर कपात आणि तांत्रिक अडचणी याविषयी बोलणार आहेत. सनदी लेखापालांसह टीडीएस संबंधित अडचणी असणाऱ्यांना नागरिकांना यामध्ये सहभागी होता येईल. अधिक माहितीसाठी www.puneicai.org या वेबसाईटला भेट द्यावी, अशी माहिती पुणे ‘आयसीएआय’च्या अध्यक्षा सीए ऋता चितळे व उपाध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांनी दिली आहे.
देशाच्या प्रगतीत सनदी लेखापालांची भूमिका महत्वाची-खासदार गिरीश बापट
सूडाचे राजकारण सोडा, देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढा -मनमोहन सिंग
नवी दिल्ली – अर्थतज्ज्ञ, माजी पंतप्रधान आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या आर्थिक संकटावर गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला आर्थिक संकटावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले. मोदी सरकारने सूडाचे राजकारण सोडून देशाला आर्थिक संकटातून बाहेर कसे काढता येईल यावर लक्ष द्यावे असे आवाहन सिंग यांनी रविवारी केले आहे. भारतात ओढावलेले आर्थिक संकट, 5 टक्क्यांवर आलेला जीडीपी या सर्वच गोष्टींसाठी मोदी सरकारचे वाइट व्यवस्थापन जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला.
मनमोहन सिंग म्हणाले, गेल्या त्रैमासिकात आपला विकास दर 5% झाला. यावरून अर्थव्यवस्था मंदावल्याचे स्पष्ट होत आहे. भारतात झपाट्याने विकास करण्याची क्षमता आहे. आपला देश सातत्याने अर्थव्यवस्थेच्या स्लोडाउनचा धोका पत्करू शकत नाही. यासाठी मी सरकारला आवाहन करतो की त्यांनी सूडाचे राजकारण सोडावे आणि देशाला या संकटातून बाहेर कसे काढता येईल या दिशेने पावले उचलावी. भारताच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहून मोदी सरकारचे व्यवस्थापन प्रत्येक स्तरावर कुचकामी ठरल्याचे दिसून येते. यासाठी नोटाबंदी आणि जीएसटी अशा स्वरुपाचे निर्णय देखील जबाबदार आहेत. या निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला जे नुकसान झाले, त्यातून देश अजुनही सावरलेला नाही.
राज्यात 13 सप्टेंबरपासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता- रावसाहेब दानवे
जालना -13 सप्टेंबरपासून राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागणार असल्याचे रावसाहेब दानवेंनी वक्तव्य केले. जालना येथे विकास महामंडळांवर नव नियुक्त झालेल्यांचा समस्त ओबीसी समाजाकडून सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. तसेच ‘पुढच्या काळात मुख्यमंत्री पदाबाबत विचार करणार’ असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत सूचक वक्तव्य केले आहे.
जालन्यात समस्त ओबीसी समाजाकडून पार पडलेल्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे उपस्थित होते. राजकारणात मराठा समाजाला देखील ओबीसीचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. जालन्यात समस्त ओबीसी समाजाकडून विकास महामंडळांवर नवनियुक्त झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ओबीसी समाजाला संबोधित केले. ओबीसी समाजाने आमच्याकडे शत्रू म्हणून बघू नये आम्ही तुमचे मित्र आहोत. पुढील काळात आम्हालाही ओबीसीचा दर्जा द्या अशी मागणी करणार असल्याचे वक्तव्य दानवेंनी केले. सरपंचापासून केंद्रीय मंत्रीपदापर्यंत सर्व पदे भोगून झाली. आता कसलीही अपेक्षा राहिली नाही. पण मुख्यमंत्री पदाबाबत विचार करणार असल्याचे म्हणत रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत सूचक वक्तव्य केले. दरम्यान 13 सप्टेंबरपासून राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
पुणे फेस्टिव्हल अंतर्गत नारदीय कीर्तन महोत्सव
पुणे फेस्टिव्हल मध्ये यंदा प्रथमच नारदीय किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प. निवेदिता मेहेंदळे यांनी याचे आयोजन केले आहे. बुधवार दि. 4 सप्टेंबर रोजी सायं. 5 ते 8 या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर येथे याचे आयोजन केले गेले आहे. यावेळी ज्येष्ठ नेते व संत साहित्याचे अभ्यासक उल्हास पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी उल्हास पवार यांच्या हस्ते हभप ताराबाई राजाराम देशपांडे व हभप श्रीरामचंद्रबुवा बोर्हे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राची सांस्कृतिक-धार्मिक परंपरा असणार्या कीर्तन परंपरेतील विविध प्रकार यामध्ये सादर केले जातील.
यावेळी 12 कीर्तनकार व 5 साथसंगतकारांचा यात समावेश आहे. यात सामुदयीक कीर्तन, सहयोगी कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन, चक्री कीर्तन, युगल कीर्तन-जोड आख्यान आदी कीर्तन प्रकारांचा यात समावेश आहे. याप्रसंगी ह.भ.प. कीर्तनकलानिधी रामचंद्रबुवा प्रभाकर भिडे (निरूपणकार), ह.भ.प. नम्रता मेहेंदळे, ह.भ.प. ओवी काळे, ह.भ.प. आनंदी कर्हाडकर, ह.भ.प. पियुष कुलकर्णी, ह.भ.प. वर्धन बुरसे, ह.भ.प. तन्मयी मेहेंदळे, ह.भ.प. धनदा गदगकर, ह.भ.प. विकासबुवा दिग्रसकर, ह.भ.प. श्रेयसबुवा कुलकर्णी, ह.भ.प. नंदकुमार मेहेंदळे, ह.भ.प. निवेदिता मेहेंदळे आदी कीर्तनकार व कलाकारांचा यात समावेश असणार आहे. याचबरोबर वादक संगतकार म्हणून
रेशीम खेडकर – पायपेटी, सुखदा जोशी – संवादिणी, नचिकेत मेहेंदळे – तबला, मयूर गुजर – तबला, ईशान मेहेंदळे – झांज यांचा समावेश आहे.
यावेळी कीर्तन परंपरेप्रमाणे सर्वांचे कपाळावर बुक्का लावून व प्रसाद देऊन स्वागत केले जाईल.
विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्ती
स. प. महाविद्यालयाला आगरकर करंडक
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे
विजेता – अवधूत पाटील, तेजस शिंदे (स. प. महाविद्यालय)
उपविजेता – आनंद बागवान, ङ्गतीमा मुजावर (अ‘ाना कॉलेज ऑङ्ग ङ्गार्मसी)
सर्वोत्तम वक्ता – अवधूत पाटील, स. प. महाविद्यालय
उत्तेजनार्थ – दौलत नाईकवाड, ङ्गर्ग्युसन महाविद्यालय
विशेष उत्तेजनार्थ – तनय सुतार (प्रतिभा कॉलेज, चिंचवड), तनिषा आचार्य (एमआयटी), मिहीर नेवपुरकर (मॉडर्न कॉलेज ऑङ्ग इंजिनिअरिंग), शिवज उंड्रे (नौरोसजी वाडीया कॉलेज)
अभिनेते अभिराम भडकमकर आणि सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते उद् घाटन आणि ज्येष्ठ विधीज्ञ ऍड जयंत म्हाळगी व महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष ऍड. नीतीन आपटे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.















