Home Blog Page 2853

टाटा पॉवरने १०व्या सीआयआय एनकॉन ऊर्जा संवर्धन पुरस्कार सोहळ्यामध्ये प्राप्त केला पुरस्कार

0

पुणे-: ऊर्जासंवर्धन हा जागतिक शाश्वत ऊर्जा प्रणालीतील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. टाटा पॉवरने कायमच एक पर्यावरणपूरक जबाबदार कंपनी म्हणून काम करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कंपनीच्या जोजोबेरा ऊर्जा केंद्राला १०व्या सीआयआय एनर्जी कंझर्वेशन२०१९ (एनकॉन) या पुरस्कार सोहळ्यात फोर स्टार्स मानांकनाने गौरवण्यात आले. या ऊर्जाकेंद्राने ऊर्जाबचतीबाबत ठेवलेल्या कल्पक दृष्टिकोनाबद्दल हा पुरस्कार कंपनीला प्रदान करण्यात आला.

 टाटा पॉवरच्या जोजोबेरा ऊर्जाकेंद्राने केलेल्या सादरीकरणात ते ऊर्जा संवर्धनासाठी करत असलेल्या विविध उपायांची माहिती देण्यात आली. त्यांच्या विशेष प्रकल्पांपैकी एक असलेल्या३ सीडब्ल्यू ऑपरेशन्स इन युनिट २ अँड ३वर सादरीकरणात विशेष भर देण्यात आला. सीआयआय इनकॉन परिषदेत विविध उद्योगातील १००हून अधिक टीम्स सहभागी झाल्या होत्या. ऊर्जाबचतीसाठी करत असलेल्या कल्पक उपायांचे सादरीकरण त्यांनी सर्वांपुढे केले. यापैकी ५० टीम्सना त्यांची कल्पकता व त्यांच्या ऊर्जाबचतीचा एकंदर प्रभाव यांवर आधारित गुणांकन देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आले.  

ऊर्जा व वीज उद्योगांतील अनेक आघाडीचे उद्योजक या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी भारतातील विजेबाबतची परिस्थिती आणि कंपन्या आयओटी, स्मार्ट ग्रिड, ईव्हीज, स्मार्ट मीटरिंग आदी नवीन तंत्रज्ञानांचा वापर करून अधिक चांगली ऊर्जाकार्यक्षमता तसेच शाश्वतता यांसाठी कशा सज्ज होत आहे याबद्दल माहिती दिली

 

जमशेदपूर ऑपरेशन्सचे प्रमुख तसेच आयईएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विजयंत रंजन यांनी टीमने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले, “आपण ऊर्जासंवर्धनाप्रती दाखवत असलेल्या बांधिलकीची दखल घेतली गेली याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि ऊर्जासंवर्धनाच्या आपल्या उद्दिष्टाप्रती पोहोचण्यासाठी आपण अशाच नवोन्मेषकारी पद्धतींचा अवलंब सुरू ठेवू अशी आशा वाटते.”

 

कंपन्या ऊर्जासंवर्धनासाठी मानत असलेल्या उदाहरण द्यावे अशा बांधिलकीची तसेच दृष्टीची दखल एक्सलन्स इन एनर्जी कॉंझर्वेशन (एनकॉन) अवॉर्डद्वारे घेतली जाते. ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी सदस्य कंपन्या करत असलेल्या पद्धतशीर, प्रशंसनीय व भरीव प्रयत्नांना तसेच ऊर्जा संवर्धनात लक्षणीय प्रगती साधण्यासाठी दृष्टीने केल्या गेलेल्या प्रयत्नांना मान्यता देणे हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.

 

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी घेतला सातव्या आर्थिक गणनेचा आढावा

0
 पुणे दि. 3 : केंद्र शासनाच्या सांख्यिकी मंत्रालयामार्फत सातवी आर्थिक गणना 2019 मध्ये घेण्यात येत आहे. 
आर्थिक गणनेव्दारे कार्यरत सर्व प्रकारच्या आर्थिक कार्यात गुंतलेल्या आस्थापनांची माहिती या माध्यमातून संकलित
 केली जाणार आहे. या गणनेव्दारे उपलब्ध होणारी माहिती राष्ट्रीय उत्पन्नाचे अंदाज अधिक अचुकपणे तयार 
करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यासोबतच राज्य, जिल्हा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावरदेखील 
 प्रशासकीय व्यवस्थापन व नियोजनासाठी या माहितीचा उपयोग होणार आहे. पुणे जिल्हयातील सातव्या आर्थिक 
गणनेच्या कामकाजाचा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी आज आढावा घेतला.
       जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीला जिल्हा सांख्यिकी अधिकारी प्रिती तेलखडे 
यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
         यावेळी जिल्हयात सातव्या आर्थिक गणनेची अंमलबजावणी करण्यासाठी केलेली तयारी, उदभणा-या
 अडचणींचे निराकरण करून नियमित सनिंयत्रण कसे करता येईल, जिल्हास्तरावरील भूमिका व कार्य प्रभावीपणे
 पार पाडण्यासाठी राज्यस्तरीय सनम्वय समितीला सहाय्य, सातवी आर्थिक गणना सुरळीत पार पाडण्यासाठी सेवा
 केंद्रांना यांना मदत करणे आदी  विषयावर चर्चा झाली.

अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर काळाची गरज -अमोल झिरमिले

0

पुणे : “पेट्रोल, गॅस, कोळसा अशा इंधनस्रोताचा ऱ्हास थांबवून निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या पवन, जल आणि सौर ऊर्जेसारख्या नैसर्गिक स्रोतांचा वापर करणे ही काळाची गरज आहे. भविष्यात इंधन टंचाई भासणार आहे. त्यामुळे या नैसर्गिक ऊर्जास्रोतांचा वापर करण्याबाबत जागृती होणे आवश्यक असून, सरकारकडून त्यासाठी प्रोत्साहन म्हणून अनुदान योजना आणल्या जात आहेत,” असे मत अमोल झिरमिले यांनी व्यक्त केले.

मराठी विज्ञान परिषद, दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या वतीने ‘अपारंपरिक ऊर्जास्रोत : सत्य आणि मिथक’ या विषयावर झिरमिले यांचे व्याख्यान झाले. जंगली महाराज रस्त्यावरील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या फिरोदिया सभागृहात झालेल्या या व्याख्यानावेळी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सचे प्रा. राजेंद्र सराफ, विज्ञान परिषदेचे संजय मालती कमलाकर, संतोष गोंधळेकर यांच्यासह विज्ञानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमोल झिरमिले म्हणाले, “अन्न-वस्त्र-निवारा यासह आज वीजही आपल्या आयुष्यातील महत्वाची गरज बनली आहे. तिच्या पूर्ततेसाठी आपण निसर्गाला हानी पोहोचवत आहोत. इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी त्याची टंचाई येत्या काळात भासणार आहे. म्हणून वेळीच गरज ओळखून निसर्गात उपलब्ध ऊर्जेचा वापर आपण करून घ्यायला हवा. तंत्रज्ञानामुळे या नैसर्गिक संसाधनांचे ऊर्जेत रूपांतर करणे अधिक सुलभ झाले आहे. पवनचक्की, सौरपॅनेल याचा वापर आगामी काळात व्हावा.”

प्रा. राजेंद्र सराफ म्हणाले, “प्रत्येक नागरिकांनी सौरऊर्जेचा वापर करावा. विद्यापीठ, कॉलेज यांनी त्या भागात नैसर्गिक पवनचक्कीसाठी माहिती संकलन करून ठेवावे. जेणेकरून भविष्यात प्रकल्प राबवता येईल. वाऱ्याचा वेग जिथे कमी आहे, त्या ठिकाणी सौरऊर्जेचा वापर करून त्यातून ऊष्णता निर्माण करून पवन ऊर्जा निर्माण करता येईल.

ऋषितुल्य गुरुजनांप्रती समाजाने आदर व्यक्त करावा -ज्येष्ठ बासरीवादक केशवराव गिंडे

0

पुणे, ता. ३ – कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्‍वामित्र, गौतम, जमदग्नी व वसिष्ठ या ऋषी सप्तश्रींनी ज्ञानाचे घडे भरून ठेवले आहेत. तसेच कार्य आजच्या विज्ञान युगात वैज्ञानिक आणि संशोधक करीत आहेत. अशा विविध क्षेत्रांतील ऋषितुल्य गुरुजनांप्रती समाजाने आदर व्यक्त केला पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ बासरीवादक केशवराव गिंडे यांनी केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत श्री. गिंडे, लोकशाहीर दादा पासलकर, मृदुंगवादक पांडुरंग दातार, साहित्यिक दीपक चैतन्य यांचे ऋषिपंचमीनिमित्त पूजन करण्यात आले. शाला समितीचे अध्यक्ष अशोक पलांडे कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी होते. सोसायटीचे संचालक मिलिंद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. पासलकर म्हणाले, ‘कोणत्याही सेवेचे मोल कमी किंवा अधिक नसते. कमकुवत मनामुळे सेवेची प्रतिष्ठा किंवा महत्त्व लक्षात येत नाही. सेवेला प्रतिष्ठा असते. ती मनोभावे केली पाहिजे.’
श्री. चैतन्य म्हणाले, ‘आपण दुसर्‍याला काही देत नाही, तोपर्यंत आपल्याला घेण्याचा अधिकार नसतो. अहंकार सोडल्यास अपेक्षित प्राप्ती व प्रगती होते. बदलत्या काळानुसार होणार्‍या परिवर्तनासाठी सज्ज राहाणे आवश्यक असते.’
मु‘याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांनी प्रास्ताविक, राधिका देशपांडे यांनी परिचय, सुहास देशपांडे यांनी सूत्रसंचालन आणि पर्यवेक्षक दिलीप रावडे यांनी आभार प्रदर्शन केले.

मॉडर्न हायस्कूलमध्ये पुस्तक हंडी साजरी

0
पुणे – प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर पुणे 5 येथे गोपाळकाला म्हणजे पुस्तकहंडीचा आनंदोत्सव ‘शैक्षणिक पुस्तक हंडी ‘ साजरी करून चिमुकल्यांनी साजरा केला. सजवलेल्या पुस्तक हंडीसोबत पाटी, पेन,पेन्सिल, वही, पुस्तक, छान छान गोष्टींची पुस्तके, शैक्षणिक साहित्य बांधून पुस्तक हंडीचा आनंद लुटला.लहानपणी श्रीकृष्ण आपल्या नटखट लीलांमधून सवंगड्यांसह घराघरातून लोण्याची चोरी करून गोपालांना वाटून खात. विद्यार्थ्यांनी गोष्टीची पुस्तके लुटून ती वाचनाचे ज्ञानरुपी लोण्याची चव चाखली.टिपऱ्यांच्या विविध गीतांवर ठेका धरला,तसेच फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला. पोहे, दही, दूध, साखर, लोणी यांचा प्रसाद वाटण्यातआला.संस्कृतीची जोपासना करत पुस्तक हंडीच्या उत्सवातून विद्यार्थ्यांना ज्ञानरुपी लोण्याचा आस्वाद देत वाचनाची गोडी लावणारा हा सण बालगोविंदांनी उत्साहात साजरा केला. त्यानंतर पुस्तक हंडी फोडण्यात आली.लहान वयापासून विद्यार्थ्यांवर भारतीय संस्कृतीचे संस्कार व्हावेत, या हेतूने शाळेत विविध उपक्रम आयोजित केले जातात. म्हणूनच दर वर्षी पुस्तक हंडीचा सण शाळेत उत्साहात साजरा केला जातो. यंदाही शाळेतील 1400 विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला. सकाळी आठ वाजल्यापासून शाळेत पुस्तक हंडीची तयारी सुरू झाली. श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका संगीता लकारे, उपमुख्याध्यापिका रोहिणी काळे, पर्यवेक्षिका सीमा कुळधरण यांनी  केले.गोविंदांनी भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला.मॉडर्न शाळेत कोणताही उपक्रम असला तरी पालकांचे भक्कम पाठबळ मिळते. पुस्तक हंडीच्या कार्यक्रमातही नेहमीच त्यांचा सक्रिय सहभाग असतो.या उपक्रमासाठी नवेश पाटील,खंडू खेडकर, नितीन डेरे,दिनेश कुलकर्णी,संतोष भागीत,विकास पवार,महेश सुपेकर,सुमिता पाटील,वंदना सोनोने,दादाभाऊ शिनलकर,प्रमोद शिंदे,गणपत नांगरे,अमित ओमासे,प्रशांत बुधिहाळ,सुनिता शिरसाट यांनी सहकार्य केले.या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे व सहकार्यवाह नगरसेविका पुणे महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती सभापती प्रा ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर -अथर्वशीर्षपठण….(व्हिडीओ)

0

पुणे – शहरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर यंदाही ‘ओम् नमस्ते गणपतये ओम गं गणपतये नम: मोरया, मोरया’च्या जयघोषाने सुमारे 32 हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर केला. पारंपरिक वेशात पहाटे पाच वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली. गणरायाच्या नामाचा जयघोष करत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या महिलांचा आनंदही पाहण्याजोगा होता.

दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्यास विधान परिषदेच्या उपसभापती आमदार नीलम गोऱ्हे, परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, शुभांगी भालेराव यांसह महिला कार्यकर्त्या आणि परदेशी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणातील या उपक्रमाचे ३३ वे वर्ष होते. तब्बल ३३ वर्षांपूर्वी महिलांचा सहभाग या गणेशोत्सवात असावा. याकरीता ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांनी या उपक्रमाला सुरुवात झाली. केवळ १०१ महिलांपासून सुरु झालेल्या उपक्रमात आज 32 हजार महिला सहभागी झाल्या होत्या.

भारत देश हा जगातील नंबर एकचा नॉलेज पॉवर देश होवो-नितीन गडकरी-

0

पुणे : ज्ञानाची शक्ती ही देशातील सर्वात मोठी शक्ती आहे. इनोव्हेशन, सायन्स, टेक्नॉलीजी याला आपण ज्ञान म्हणतो. कन्व्हर्जन आॅफ क्नॉलेज इंटो वेल्थ हे आपल्या देशाचे भविष्य आहे. त्यामुळे भारत देश हा जगातील नंवर एकची क्नॉलेज पॉवर होवो, अशी प्रार्थना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गणेशचरणी केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे १२७ व्या वर्षानिमित्त ॅगणेशोत्सवात साकारण्यात आलेल्या श्री गणेश सूर्यमंदिर सजावटीचे व मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद््घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार गिरीष बापट, भाजपा पुणे शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, उत्सवप्रमुख व नगरसेवक हेमंत रासने, महेश सूर्यवंशी यांसह विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.
यंदाची सजावट असलेले श्री गणेश सूर्यमंदिर ओडिशा राज्यातील विश्वप्रसिद्ध प्राचीन आश्चर्य ठरलेल्या कोणार्कच्या सूर्यमंदिरावर आधारित आहे. लाखो मोतिया रंगाच्या दिव्यांनी हे मंदिर उजळून निघाले असून अत्याधुनिक लाईटने विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. मंदिरामध्ये तसेच रस्त्याच्या दुतर्फा २२५ झुंबर लावण्यात आले आहेत.
नितीन गडकरी म्हणाले, आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा दिवस आहे. माझे वडिल माधवनाथ महाराज यांचे शिष्य होते आणि दगडूशेठ हे त्यांचे शिष्य होते, त्यामुळे मी दगडूशेठ गणपती व दत्तमंदिराचा इतिहास ऐकलेला आहे. आपण सगळेजण गणपतीला विद्येचे दैवत मानतो आणि विद्या ही समाजाला अंध:कारातून प्रकाशाकडे नेणारी आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गणरायाचे पूजन करीत आरती देखील केली. ट्रस्टतर्फे त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
* यंदाची सजावट असलेल्या श्री गणेश सूर्यमंदिराचे वैशिष्टय
यंदाच्या मंदिराच्या प्रतिकृतीची साकारण्यात येणारी संकल्पना भारताच्या प्राचीन वेद, पुराणे, शास्त्रे यावर आधारित आहे. उंच शिखरे, मंडप असलेले हे सूर्यमंदिर आहे. सूर्याच्या प्रभात, माध्यान्य आणि सायंकालीन अवस्थांचे मनोहारी दर्शन तसेच १२ आदित्य आणि सूर्यास प्रिय असलेल्या कमल, पुंडरिक आणि उत्पालांच्या लता-वेलींच्या डौलदार नक्षींनी व्यापलेले मंदिर भाविकांना यंदा पाहता येणार आहे. अनेक स्तंभ, मालांची तोरणे आणि सिंह, कीर्तिमुख, हंस, यक्ष, सुरसुंदरी आणि आकाशगामी गंधर्वांनी मंदिर सजविले आहे.
सोन्यासारख्या प्रकाशाने व्यापलेले मंदिर गजांत लक्ष्मीने नटलेले आहे. समृद्धीचे प्रतिक असलेले हत्ती, अरुणाच्या सारथ्याने प्रचंड सूर्यरथाचे धावणारे अश्व व रथचक्र आहेत. मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये अनेक स्तंभी पद्मपीठाच्या सुवर्णी सिंहासनावर श्रीं ची मूर्ती विराजमान झाली आहे.
 कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात देखील गडकरींनी घेतले दर्शन
नितीन गडकरी त्यांनी त्यांच्या घरातच दगडूशेठ गणपती व दत्तमंदिराचा इतिहास ऐकलेला आहे. त्यामुळे त्यांनी दगडूशेठ गणपती च्या सजावटीचे उद््घाटन केल्यानंतर कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात देखील दत्तमहाराजांचे दर्शन घेतले. यावेळी मुख्य गाभा-याच्या मागे असलेली लक्ष्मीबाईंची व इतर तैलचित्रे त्यांनी आवर्जून पाहिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार आणि कार्यकारी विश्वस्त युवराज गाढवे यांनी त्यांचे स्वागत केले.

शिवरकर आणि टिळेकर एका व्यासपीठावर ; राजकीय वर्तुळात चर्चा

0

पुणे- कॉंग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर आणि भाजपचे आमदार योगेश टिळेकर हे विधानसभेच्या तोंडावर येथे एका व्यासपीठावर दिसल्याने राजकीय वर्तुळात  चर्चा उसळली होती .हे दोघे नेते माळी समाजाचे आहेत आणि हडपसर विधानसभा मतदार संघातील आहेत . 

महालक्ष्मी निधी लिमिटेडची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली . वानवडीमधील युटोपिया सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या पहिली वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी श्री महालक्ष्मी निधी लिमिटेडचे संचालक पोपटराव बोराटे , माजी  राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर , आमदार योगेश टिळेकर , श्री महालक्ष्मी निधी लिमिटेडचे चेअरमन संतोष जाधव , नगरसेविका कालिंदी  पुंडे , जनसेवा सहकारी बँकेचे संस्थापक संचालक रघुनाथ कचरे व सर्व संचालक वर्ग उपस्थित होते .

या सभेचे प्रास्ताविक, उपस्थितांचे स्वागत  व सूत्रसंचालन श्री महालक्ष्मी निधी लिमिटेडचे संचालक सुधीर होले यांनी केले तर अहवालवाचन श्री महालक्ष्मी निधी लिमिटेडचे संचालक राजू सातव यांनी केले तर वार्षिक आढावा  श्री महालक्ष्मी निधी लिमिटेडचे चेअरमन संतोष जाधव यांनी घेतला तर आभार श्री महालक्ष्मी निधी लिमिटेडचे संचालक  राजेंद्र कामठे यांनी मानले .

श्री महालक्ष्मी निधी लिमिटेडचे चेअरमन संतोष जाधव यांनी सांगितले कि , श्री महालक्ष्मी निधी लिमिटेड हि २७ डिसेंबर २०१८ रोजी स्थापना असून तळागाळातील नागरिक , छोटे व्यावसायिक यांना  सुलभ पद्धतीने तारण कर्जे उपलब्ध करून दिली जातात , त्यामुळे ठेवी या सुरक्षित असतात . तसेच जेष्ठ नागरिकांना ठेवीवर जादा व्याजदर दिला जातो .श्री महालक्ष्मी निधी लिमिटेडमध्ये ४५ लाखपर्यंत ठेवी जमा असून ३७ लाख रुपयांची कर्जे दिलेली आहेत . भागधारक ३६० असून वार्षिक उलाढाल ८१ लाख रुपयांची आहे . अंदाजे वार्षिक नफा २ लाख रुपये आहे . यावेळी ताळेबंदाचे वाचन करून सभासदाना माहिती देण्यात आली .

यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी सांगितले कि ,  श्री महालक्ष्मी निधी लिमिटेड हि गोरगरिबांना कर्ज उपलब्ध करून देत असल्यामुळे गोरगरिबांसाठी आधारवड आहे . गरजू लोकांना त्यांच्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी नेहमीच या संस्थेचा पुढाकार असतो . 

गणेशोत्सव – सामाजिक एकता व सलोख्याचं प्रतिक -खा. संजय काकडे

0

पुणे- गणेशोत्सव ;सामाजिक एकता व सलोख्याचं प्रतिक असून   यंदाचे वर्ष महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून आव्हानात्मक आहे. सांगली, कोल्हापूर व कोकण भागात अतिवृष्टी व पुरामुळं अतोनात नुकसान झालेलं असतानाच मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात अद्याप पाऊस न पडल्याने दुष्काळाची परिस्थिती आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या अन्नदात्यावरील हे संकट व दुष्काळाचे ढग दूर होऊ देत हीच श्री गणराया चरणी प्रार्थना आहे. असे आज येथे खासदार संजय  काकडे आणि उषा काकडे यांनी म्हटले आहे . आज आपल्या निवासस्थानी काकडे कुटुंबीयांनी आराधनेने गणेशाची प्रतिस्थापना केली .

यावेळी ते म्हणाले ,’श्री गणेश ही बुद्धीची देवता. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपतीच्या पूजनानं आणि त्याचा आशिर्वाद घेऊनच आपण करतो. श्री गणरायाला इतकं महत्व आपल्या भारतीय संस्कृतीत आहे. आणि हे महत्व ओळखूनच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांविरोधात भारतीयांमध्ये जनजागृती करण्यासाठी व त्यांच्यात एकी निर्माण करण्यासाठी म्हणून गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले.

सार्वजनिक गणेशोत्सव शतकोत्तर रौप्य महोत्सव पार करून पुढे आलाय. आता हा गणेशोत्सव महाराष्ट्राच्या संस्कृतीचं विशेष अंग बनला आहे. गणेशोत्सवाला फक्त धार्मिक स्वरूप नसून सामाजिक, सांस्कृतिक दृष्टीकोनातून सार्वजनिक गणेशोत्सव अतिशय महत्त्वाचा व समाजाचा अविभाज्य घटक बनला आहे.

ब्रिटिशांविरोधात भारतीय समाजात एकी निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू झालेला गणेशोत्सव हा सामाजिक एकता व सलोख्याचं प्रतिक बनला आहे. फक्त हिंदू नव्हे तर, मुस्लिम, बौद्ध, शीख इत्यादी अनेक समाज बांधवदेखील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना दिसतात. हेच भारतीय एकतेचं प्रतिक आहे.

अतिशय उदात्त हेतुतून सुरू झालेला हा गणेशोत्सव सार्वजनिक स्तरावर आता आणखी उच्च पातळीवर नेण्याची जबाबदारी तुम्हा-आम्हा सर्वांचीच आहे. याचं भान आपण सर्वांनी ठेवायला हवे. गणेशोत्सवाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या रॉयलस्टोन निवासस्थानी श्रींची उत्साहात प्रतिष्ठापना

0

मुंबई, दि. 02 : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी गणरायाचे आज मोठ्या उत्साहात आगमन झाले. मंत्री पंकजा मुंडे व कुटूंबियांनी श्रींची उत्साहात प्रतिष्ठापना केली.

राज्यावरील सर्व विघ्ने दूर करण्यासाठी राज्य शासनाला बळ मिळो, पिकपाण्याने बळीराजा सुखी समाधानी होवो तसेच जातीपातीच्या भिंती झुगारून राज्यातील जनतेला भरभरून विकास मिळावा, यासाठी आम्हाला शक्ती द्यावी अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना

0

महाराष्ट्रावरील संकटांचा सामना करण्याची शक्ती दे – मुख्यमंत्र्यांची श्रीगणेशाचरणी प्रार्थना

मुंबई, दि. 2 : जगभरात मोठ्या उत्साहात प्रारंभ झालेल्या गणेशपर्वानिमित्त आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. महाराष्ट्रावरील संकटांचा सामना करण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थना त्यांनी श्रीगणेशाचरणी केली.

जगभरातील गणेशभक्तांना गणेशपर्वाच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्री म्हणालेगणेशउत्सव हा सर्वांसाठी आनंदाचा पर्व आहे. सर्वांना गणरायाचा आशिर्वाद मिळावा. विशेषत: राज्यातील पूरपीडित बांधवांना त्यांच्या जीवनात समाधान मिळावेअशीही प्रार्थना त्यांनी केली.

‘मी माझ्या अटींवरच भाजपा प्रवेश करेन, मी काय करावं हे दुसरे सांगू शकत नाहीत’- उदयनराजे

0

सातारा- साताऱ्याचे खासदार उदयनराजे भासले भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. दरम्यान, त्यांनी आपल्या पक्ष प्रवेशावर कोणतीही प्रतिक्रीया दिली नव्हती. पण अखेर आज (2 सप्टेंबर) त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “माझ्या अटींवर मी प्रवेश करेन. मी काय करावं हे कोणी दुसऱ्यांनी सांगायची गरज नाही. मला जे करायचय ते मीच ठरवणार.” असे उदयनराजे म्हणाले. दरम्यान, उदयनराजेंनी पक्ष सोडून जाऊ नये म्हणून राष्ट्रवादीने खासदार अमोल कोल्हेंना त्यांची मनधरणी करण्यासाठी पाठवले असल्याचे समोर आले आहे.

काय म्हणाले उदयनराजे?
“मी माझ्या अटींवर प्रवेश करेन. मी काय करावं हे कोणी दुसरे सांगू शकत नाही. मला काय करायचय ते मीच ठरवणार. मला शोभेल असे आणि लोक हिताच्या अटी मान्य झाल्यास मी माझा निर्णय घेईन. उद्योग बंद पडत आहेत. त्यांना पुन्हा कसं सुरू करता येईल, यावर विचार करावा लागेल. अन्यथा भारतावर दिवाळखोरीची वेळ येईल. आपण पैसे कुठून आणणार? आपण पैशाचे नाटक करू शकत नाहीत. मी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. त्यांनी ठरवावं आणि मला सांगावं. जायचं असेल तर हो, नसेल तर नाही.”

मुख्यमंत्र्यांना विचार करायला सांगितला आहे
माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले आहे. फडणवीस मुख्यमंत्री नव्हते आणि आमदारही नव्हते तेव्हापासून माझे मित्र आहेत. मी त्यांना व्यवस्थित विचार करायला सांगितला आहे.

स्पृहा जोशीने केली ट्री-गणेशाची प्रतिष्ठापना

0

अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशीची ओळख सजग आणि संवेदनशील कलाकार अशी आहे. तिच्या कृतीतूनच तिचे समाजभान वेळोवेळी प्रत्ययाला येत असते. स्पृहाच्या गावी गणपती बसतो. त्यामूळे जर गावी जाता नाही आले, तर मंगलमुर्ती घरात आल्यानंतरचे चैतन्यमयी वातावरण ती मिस करते. त्यावर आता उपाय म्हणून यंदा प्रथमच तिने घरात इको फ्रेंडली गणपतीची स्थापना केली आहे. आपल्या परीने निसर्ग संवर्धनासाठी हातभार लागावा म्हणून तिने ट्रिगणेशाचे पूजन केले आहे. गणरायाच्या ह्या इको फ्रेंडली मूर्तीत एका रोपट्याचे बीजअसल्याने 15 दिवसांनंतर त्यातून रोप उगवणार आहे.

ट्रि-गणेशाची प्रतिष्ठापना केल्यावर स्पृहा जोशी म्हणाली, ” दरवर्षी गावी जाणं शक्य होत नाही. म्हणून यावर्षी मी ठरवलं की आपल्या घरीच बाप्पाची छोटीशी मूर्ती आणून त्याची प्रतिष्ठापना करायची. म्हणून मी ट्रीगणेशाची स्थापना केली. दररोज त्याला पाणी घातल्यावर १५व्या दिवशी त्यातून छान रोपटे तरारून येणार आहे. मला हि कल्पना फारच आवडली त्यामुळे मी ठरवलंय कि आपल्या घरी जरी बाप्पा बसत नसले तरी यावर्षीपासून हि नवीन सुरवात करता येईल. मला वाटतं गणेशोत्सव साजरा करायची हि सगळ्यात सुंदर पद्धत आहे.”

स्पृहा पूढे सांगते, “कोणत्याही चांगल्या गोष्टींची सुरूवात आपल्या घरापासूनच होते. त्यामूळे निसर्ग संवर्धनाचा श्रीगणेशा आपल्या घरापासूनच अशापध्दतीने सुरू करण्याची आता गरज आहे. “

३१व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘फुल्टू टाईमपास’ आणि ‘फक्त पुणे’ नवे कार्यक्रम

0

पुणे-

३१व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये दि. ९ व १० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ‘फुल्टू टाईमपास’ आणि ‘फक्त पुणे’ या २ नव्या कार्यक्रमांची भर पडली आहे. नृत्य, विनोद, संगीत, मस्ती आणि धमाल यांचा एकत्रित मिश्रण असणारा ‘फुल्टू टाईमपास’ हा विशेष कार्यक्रम सोमवार ९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न होईल. प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोत्री या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असून समीर चौघुले, शशिकांत केरकर, विनोद बोंडे, विशाखा सुबेधार आणि योगिनी पोफळे हे कलावंत यात सहभागी होतील. नृत्यांगना भार्गवी चिरमुले, पुष्कर जोग, मयुरेश पेम, तन्वी पालव आणि सुकन्या कालण हे नृत्याविष्कार सादर करतील.

मंगळवार दि. १० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ‘फक्त पुणे’ हा विशेष कार्यक्रम सादर होईल. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्याची वैशिष्ठे, इतिहास आणि पुणेकरांचे स्वभाव ह्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद इंगळे आणि संजय मोने करणार आहेत. श्रीकर पित्रे, दया गायकवाड, विग्नेश जोशी, योगिनी पोफळे आणि मुग्धा परांजपे हे कलावंत यात सहभागी होत असून शर्वरी जेमनीस, पुष्कर जोग, स्नेहा चव्हाण विश्वासराव आणि मीरा जोशी हे कलावंत नृत्याविष्कार सादर करतील. पुणे फेस्टिव्हलच्या मंचावर सादर होणारे हे २ अतिरिक्त कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना विशेष आनंद देतील.

पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना संपन्न

0

पुणे- ३१व्या पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना आज सोमवार दि. ०२ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता हॉटेल सारसनेहरू स्टेडियम येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते विधीवत संपन्न झाली. याप्रसंगी अभिनेत्री गिरीजा प्रभू, अभिनेत्री मानसी मुसळे, अभिनेत्री आयली घिया व एफबीबी मिस इंडिया कॅम्पस प्रिन्सेस २०१८ विजेती अमृता चव्हाण या उपस्थित होत्या. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडीउपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांसबरोबर, अभय छाजेड, डॉ. सतीश देसाई, काका धर्मावत, रविंद्र दुर्वे, नगरसेवक प्रसन्न जगताप, श्रीकांत कांबळेअतुल गोंजारीबाळासाहेब अमराळेसुप्रिया ताम्हाणेसंयोगिता कुदळे, दीपाली पांढरे, निकिता मोघे, जुई सुहास, रमेश भांडरवि चौधरीसुहास रानवडेराजू साठे, तानाजी चव्हाण, करूना पाटील,श्रुती तिवारी, सोनम मस्कारा आदी यावेळी उपस्थित होते. वेदमूर्ती धनंजय घाटे गुरूजी यांनी याचे पौराहित्य केले. पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना हॉटेल सारस येथील हॉलमध्ये करण्यात आली आहे. तेथे आकर्षक सजावट करण्यात आली आहे.