Home Blog Page 2848

राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

0

घोरपडी रेल्वे उड्डाणपूलाचे भूमिपूजन

पुणे, दि. 8 :- राष्ट्रीय, राज्य, जिल्हा तसेच ग्रामीण रस्ते विकासाचा भरीव कार्यक्रम शासनाने हाती घेतला असून दळणवळणाच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगतानाच राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री, महसुलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले. घोरपडी रेल्वे उड्डाणपूलाचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, खा. गिरीष बापट, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले,आ. दिलीप कांबळे, आ. योगेश टिळेकर, माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील,आयोजक आणि स्थानिक नगरसेवक नगरसेवक उमेश गायकवाड ,मंगला मंत्री ,लता धायरकर,हिमाली कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यात रस्ते विकासाला गती देण्यात आली असून राष्ट्रीय महामार्ग 17 हजार किलोमीटरने वाढविण्यात आले आहेत. राज्यात 10 हजार किलोमीटर तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत 30 हजार किलोमीटर रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर असल्याचे सांगतानाच मुंबई, पुणे व नागपूर येथील मेट्रो प्रकल्पाची कामे गतीने पुर्ण करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात एकूण 265 रेल्वे फाटक असून तीन वर्षापुर्वीच या रेल्वेफाटकावर उड्डाणपूल व्हावे, यासंदर्भात निर्णय घेत 170 उड्डाणपूलांची कामेही पुर्णत्वास आली आहेत, उर्वरित उड्डाणपूलांची कामेही दोन वर्षात पुर्ण करण्यात येतील, असे सांगून पालकमंत्री पाटील यांनी राज्य शासनाच्या योजनांचा सामान्य नागरिकांना मोठया प्रमाणात लाभ होत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक करताना महापौर मुक्ता टिळक यांनी घोरपडी उड्डाणपूलाचे काम 36 महिन्यात पुर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. यावेळी नागरिक, महिला व युवक मोठया संख्येने उपस्थित होते.

दिलीप कांबळेंना अद्याप अटक का नाही ?

0
खरेपणा आणि हिंमत असेल तर सरकारने उत्तर द्या
पुणे-मंत्री पदाचा गैरवापर करून वाईन शॉप चा परवाना मिळवून देतो अशी बतावणी करून एक कोटी 92 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दिलीप कांबळे याचे वर औरंगाबाद सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर देखील त्यांच्यावर अटकेची कारवाई न करता त्यांना प्रतिष्ठा देण्याचे काम भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे याचा निषेध आज पुणे शहर महिला काँग्रेस कमिटी कडून निदर्शनांद्वारे नोंदवण्यात आला.
उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी आलेल्या पालकमंत्र्यांच्या समोर पुणे शहर  महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष सोनाली मारणे यांच्या नेतृत्वाखाली आज जयहिंद चौक घोरपडी गांव येथे निदर्शनांचे आयोजन करण्यात आले.
भाजपा सरकार सत्तेचा पूर्णपणे गैरवापर करून भ्रष्टाचारामध्ये गुरफटलेल्या सर्वच भाजपेयी मंत्र्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची निंदाव्यजनक कृती मुख्यमंत्र्यांकडून होत आहे .या बाबीचा निषेध करुन दिलीप कांबळे यांच्या अटकेची आग्रही मागणी या निदर्शनात करण्यात आली.*
निदर्शनात सोनाली मारणे,शर्वरी गोतरणे, सुरेखा कवडे मीरा शिंदे,रजिया बल्लारी,लता घडसिग,अमिना शेख,संगीता क्षीरसागर, छाया जाधव,सुरेखा खंडागळे,मीरा दिघे, माया डूरे इत्यादींचा सहभाग होता..

पुणे फेस्टीव्हलममधील बॉक्सिंग स्पर्धा संपन्न

0

 

लहुजी वस्ताद साळवे बॉक्सिंग केंद्रात श ३१ व्या पुणे फेस्टिव्हल
अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत बेस्ट बॉक्सर एस. बेलहैजाची (पी. एम.
सी), बेस्ट लूजर श्रीहरी मोरे (स्टार बी सी) आणि मोस्ट प्रॉमिसिंग स्वप्नील किरवे (यु के बी सी) हे विजयी ठरले.
या स्पर्धेस स्पेन चे बॉक्सिंग कोच मिनोचर बुहारीवाला आणि मेक्सिको चे व्यावसायिक बॉक्सर एर्नेस्टो सँचेझ
यांची विशेष उपस्थिति होती.
या स्पर्धा पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेत ज्युनियर
आणि सब ज्युनियर गटामधुन 15 ते ६० वयोगटातील १८० खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेस बाउट ने
सुरवात करण्यात आली. यावेळी पुणे बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष रमेश बागवे, सेक्रेटरी मदन वाणी, जॉइंट
सेक्रेटरी अशोक मेमजादे, पदाधिकारी अविनाश बागवे, विजय गुजर, अजित ओसवाल, राजेंद्र काटे, राष्ट्रीय
पंच सुरेश गायकवाड आणि पुणे फेस्टिव्हलच्या क्रिडा स्पर्धांचे समन्वयक प्रसन्न गोखले उपस्थित होते आणि
यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

केरळोत्सवातील बहारदार कार्यक्रमातून घडले केरळी संस्कृतीचे दर्शन

0

पुणे- गायन, वादन, नृत्य यांचा मनोहरी संगम असणाऱ्या केरळोत्सवातील बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी
केरळ संस्कृतीचे दर्शन घडवीत उपस्थितांचे मने जिंकली. या महोत्सवाला पुण्यातील मल्याळी नागरिकांसह
शेकडो पुणेकरांनी हजेरी लावत या महोत्सवाचा आनंद लुटला.


पुणे फेस्टिवल अंतर्गत पुणे मल्याळी फेडरेशनच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘केरळोत्सवाचे’ आयोजन
करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते
दीपप्रज्वलनाने झाले. पुणे मल्याळी फेडरेशनचे चेअरमन राजन नायर, फेडरेशनचे अध्यक्ष के.
हरीनारायणन, सरचिटणीस टी. डी. जॉनी, खजिनदार राजन आर. नायर, उपाध्यक्ष शाणी नौशाद, ए. एस.
हमसा, सहसचिव पी. प्रभाकरन, एम. एस. राजा, सह खजिनदार एम. टी. रवींद्रन, विजयन नायर, पी.
रवींद्रन, पद्मनाभन, एम. एन. विजयन, श्रीकांत कांबळे, आदी मान्यवर यावेळी रंगमंचावर उपस्थित होते.
पुणे फेस्टिवलचे माजी मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे यांना प्रारंभी श्रद्धांजली वाहण्यात आली.
पूरग्रस्तांना मदतनिधी म्हणून मुख्यमंत्री सहाय्य निधीस यावेळी २ लाखाचा धनादेश राजन नायर, के.
हरिणारायणन व त्यांच्या सहकार्यांनी गोयल यांच्याकडे सुपूर्द केला.
गणेश वंदनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मोहिनी आट्टम या गांधारी रागावर आधारित
पारंपारिक नृत्याने केरळी संस्कृतीचे, कलेचे दर्शन घडले. ख्रिश्चन समाजाची महानता दर्शविणारे आणि सेंट
थॉमस यांच्या जीवनावरील व केरळमधील कार्यावर आधारित ‘मार्गम कली’, केरळातील मुस्लीम समाजाचे
दर्शन घडविणारा ‘ओपन्ना’ या कार्यक्रमांच्या सादरीकरणाने राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्म समभावाचे दर्शन
घडवीत उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय सर्व वयोगटातील मुलामुलींनी सादर केलेले कुचीपुडी नृत्य,
भारत नाट्यम, कथ्थक, शास्त्रीय नृत्य तसेच ‘लावणी बॅलेट’, ‘सिनेमॅटीक डान्स’, ने उपस्थितांची वाहवा
मिळवली. यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्व धर्मियांचा एकोपा दाखविणारे नृत्याविष्काराने
प्रेक्षकांना विशेष आनंद दिला.
उद्घाटनपर भाषण करताना पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले, भारतीय विविध
नृत्यांचे प्रकार आहेत. त्याची सुरुवात प्रथम केरळात होते. भारतीय नृत्यकलेत केरळचे योगदान मोठे असून
केरळ समाजाचा अभिमान वाटतो. ‘अनेकता मे एकता, ही आपली विशेषता आहे’. पुणे जिल्ह्यात
केरळमधून रोजगारासाठी, शिक्षणासाठी आलेले विविध समाजाचे चार लाख लोक आहेत. त्यांना पुणे

मल्याळी फेडरेशनच्या माध्यमातून एकत्रित बांधून ठेवण्याचे कार्य हे अभिनंदनीय आहे. पुणे फेस्टिवलच्या
माध्यमातून आपल्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने केरळ महोत्सवाचे आयोजन केले जाते. पुणे
फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि स्व. कृष्णकांत कुदळे यांच्या नेटक्या नियोजनामुळे अखंडपणे
३१ वर्षे सुरू असलेल्या पुणे फेस्टीवलचे व्यासपीठ अनेक कलाकारांना मिळाले आणि त्यांना पुढे अनेक
मोठ्या संधी मिळाल्या. केरळ समाजाच्या भविष्याचा विचार करून सर्वांना एकत्रित करण्याचे उत्कृष्ट काम
पुणे मल्याळी फेडरेशन करत आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
राजन नायर यांनी पुणे मल्याळी फेडरेशनची माहिती व उद्देश विशद केला. ते म्हणाले, केरळमधून
अनेकजण नोकरी व शिकण्यासाठी पुणे व पुणे जिल्ह्यात येतात.त्यांचा एकमेकांशी परिचय व्हावा हा
उद्देश ठेवून फेडरेशन काम करते. गेल्या १५ वर्षांपासून फेसरीवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी केरळ
महोत्सवासाठी पुणे फेस्टिवलचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यामुळे फेडरेशनच्या कामाला अधिक बळ
मिळाले व समाजही एकत्रित आला. स्व. कृष्णकांत कुदळे यांचे नियोजन आणि संघटन कौशल्य यामुळे
आम्हाला खूप उपयोग झाला. त्यांचे नसण्याचे अतीव दुःख होत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
के. हरीनारायणन यांनी आपल्या प्रस्ताविकपर भाषणात फेडरेशन करत असलेल्या कार्याची माहिती दिली.
ते म्हणाले, पुणे जिल्ह्यात ४ लाख केरळी समाज असून विविध भागात २२ संघटना कार्यरत आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनिता नायर यांनी केले.

त्याग, समर्पणाची भावना हाच भारतीय संस्कृतीचा गाभा : मुळे

0
पुणे : “त्यागभावनेतून केलेले कार्यच आपल्याला यशशिखरावर नेते. जीवनाचा खरा आनंद देत मानवी जीवन समृद्ध करते. त्याग, करुणा, मानवता भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. त्याच आधारावर आपली संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था जगभरात आदर्शवत आहे. या त्यागमूर्तींच्या कार्यातून प्रेरणा घेत आपल्यातील ‘माणूसपण’ जपायला हवे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य व माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.

 

‘सूर्यदत्ता’ संचालित बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सामाजिक कार्यकर्त्या-उद्योजक प्रमिलाबाई व नौपतलालजी सांकला या दाम्पत्यास ‘बन्सी-रत्न आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उद्योजक विजयकांत कोठारी यांना ‘समाजशिरोमणी’, सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज धोका यांना ‘समाजभूषण’, नीता घोडावत यांना ‘समाजरत्न’, तर भारती भंडारी यांना ‘मानवसेवा’ पुरस्कार हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
जैन, गुजराती, अगरवाल आणि माहेश्वरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आचार्य लोकेश मुनीजी, उद्योजक विठ्ठलशेठ मणियार, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे, ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे सल्लागार सचिन इटकर, बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्ष सुषमा चोरडिया आदी उपस्थित होते.
ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, “अनेक देशांत फिरलो. आपल्या सगळ्याना एकत्र बांधून ठेवणारी भारतीय संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था आदर्शवत असल्याचे आढळले. मात्र, भौतिक सुखांच्या मागे लागण्याचा नादात आपण आपली संस्कृती विसरत आहोत. अशावेळी या त्यागमूर्तींचा सन्मान होणे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. कठोर मेहनत, सचोटी, प्रामाणिकपणा आणि त्याग या गोष्टींचा अवलंब करीत या सगळ्यांनी आपले आयुष्य घडवले आहे. मातापित्यांच्या, वडीलधाऱ्यांच्या सन्मान करण्याची आपली परंपरा आहे.”
आचार्य लोकेश मुनी म्हणाले, “वडीलधाऱ्या, कर्तृत्ववान व्यक्तींचा झालेला हा सन्मान त्यांच्याप्रती कृतज्ञता आहे. कर्तव्य हाच धर्म मानून त्यांची आयुष्यभर सेवा केली आहे. निस्वार्थी भावनेने समाजासाठी, देशासाठी त्यांनी योगदान दिले. त्यांचा आदर्श घेत प्रत्येकाने आपल्या मनातील स्वार्थ काढून टाकला पाहिजे. त्यातून आपली आणि समाजाची प्रगती होत असते. या आदर्श व्यक्तिमत्वांकडून नव्या पिढीला संस्काराची शिदोरी देण्याची आवश्यकता आहे.”
विठ्ठलशेठ मणियार म्हणाले, ”नानापेठेच्या मातीतून पुढे आलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव होत आहे. त्याचा खूप आनंद आहे. कर्तबगार तसेच धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य  करणाऱ्यांचा सन्मान करून तरुणांपुढे नवा आदर्श ठेवला जात आहे. माणसे कशी मोठी होतात, काय केल्याने मानसिक समाधान मिळते, हे या कार्यक्रमातून आजच्या पिढीला समजेल. शून्यातून यशाचे शिखर गाठणाऱ्या व्यक्तींकडून आपण शिकले पाहिजे. त्यातून आपले जीवन घडवले पाहिजे.”
प्रा. डॉ. शरदचंद्र दराडे म्हणाले, “आपल्या आयुष्याची जडणघडण मातापित्यांचे संस्कार आणि गुरुची शिकवण यामुळे होते. जीवन जगण्याचा सन्मार्ग गुरु दाखवत असतो. गुरु-शिष्याचे नाते आपल्या भारतीय संस्कृतीत अजूनही अबाधित आहे. चांगले शिक्षण आत्मसात करीत उत्तम नागरिक आणि ‘माणूस’ बनण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने केला पाहिजे.”

रजा मुराद म्हणाले, ”मुलांना शिक्षण देऊन त्यांचे भविष्य घडवणे हे पुण्याचे काम आहे. शिक्षणाबरोबरच जेष्ठांचा सन्मान करत नव्या पिढीसमोर आदर्श ठेवण्याचे कार्य सुषमा व संजय चोरडिया करीत आहेत. खूप मेहनत, काबाडकष्ट करून आई-वडील मुलांना शिक्षण आणि चांगले आयुष्य देण्यासाठी झटतात. त्यांच्या त्यागाचा, बलिदानाचा विसर पडता कामा नये. संपूर्ण जगात भारत एक असा देश आहे, जिथे जेष्ठांच्या पाया पडले जाते. ज्येष्ठांच्या आशीर्वादाची शक्ती मोठी असते.”

सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, ”आपल्या हृदयात प्रेम आणि करुणा हवी. आयुष्यात सतत प्रयत्नशील राहणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळेच आज ही सगळी मंडळी आपल्यासमोर आदर्श म्हणून सन्मानित होत आहेत. ज्यांच्याकडे दूरदृष्टी, संयम असतो, तोच ‘लीडर’ बनू शकतो. आजूबाजूला चांगले काम करणाऱ्या वक्तींकडून प्रेरणा घ्यायला हवी.”

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना चांगले संस्कार मिळावेत, यासाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अशा प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करत असते. अभ्यास, मेहनत, व्यायाम, आई-वडिलांचा, जेष्ठांचा सन्मान केला पाहिजे. माता-पिता व गुरूंचे स्मरण करणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्यांचे संस्कार ही आपल्या आयुष्याची खरी संपत्ती आहे.”
नौपतलाल सांकला म्हणाले, “बन्सीलाल हे माझे मित्र होते. त्यांच्या नावाने मिळणारा पुरस्कार म्हणजे प्रेमाचे प्रतीक आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आम्ही सर्वानीच उद्योग सुरु केले. मात्र, कामातील प्रामाणिकता, सचोटी यामुळे यशस्वी होता आले. माझ्या या प्रवासात माझी धर्मपत्नी प्रमिलाबाईने मोलाची साथ दिली.”
प्रमिला सांकला म्हणाल्या, “आम्ही नेहमी गुरू आणि धर्माच्या संस्कारावर चालत आलो. यामुळेच सर्वांची प्रगती झाली. आमचे आई-वडील नेहमी गोरगरिबांची सेवा करायचे. त्यामुळे ते बाळकडू माझ्यामध्येही आले आणि तो वारसा पुढे आमच्या हातून सुरू आहे याचा आनंद वाटतो.”
विजयकांत कोठारी म्हणाले, “व्यवसाय करताना समाजातील प्रश्नांकडेही आपण लक्ष दिले पाहिजे. आपल्यासोबत आपला समाजही पुढे येईल, याचा प्रयत्न प्रत्येकाने केला, तर देशाचेही विकास होतो. समाजाला बरोबर घेऊन जाणारी व्यक्ती अधिक जोमाने प्रगती करते. माझ्या हातून काही समाजकार्य घडले आणि त्याचा सन्मान झाला, याचा आनंद वाटतो.”
पृथ्वीराज धोका म्हणाले, “हा सन्मान आई-वडिलांच्या चरणी अर्पण करतो. अनेकांचे संसार उभारण्याचे काम करताना आनंद मिळतो. वाढते शहरीकरण, व्यग्र जीवनशैलीमुळे लग्न जुळवण्याचे काम अवघड होत चालले आहे. तरीही हे काम नेटाने करत असून, अनेक संस्था आणि लोक आपल्याशी जोडले जात आहेत, याचे समाधान आहे.”
नीता घोडावत म्हणाल्या, ”परिश्रमाला आत्मविश्वासाची साथ मिळाली, तर तुमच्या कामाला यश मिळते. समाजाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. संजय घोडावत ग्रुपच्या माध्यमातून विविध क्षेत्रात काम करत आहोत. समाज विकासासाठी तत्पर आहोत. पर्यावरण रक्षणासाठी देखील काम सुरू आहे.”
भारती भंडारी म्हणाल्या, “भौतिक सुखांच्या मागे धावण्याच्या नादात आपण आपल्यातील माणूसपण विसरता कामा नये. मानवसेवेतून मिळणारा आनंद विलक्षण असतो. पती विजय भंडारी यांच्या साथीने मला विविध व्यक्ती, संस्थांबरोबर हे मानवसेवेचे काम करता आले, ही आनंदाची बाब आहे.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी प्रास्ताविक व पुरस्काराच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा चोरडिया यांनी आभार मानले.

बाप्पा माझाही आहे (लेखिका-पूर्णिमा नार्वेकर)

0

सकाळी सकाळी रजनीचा फोन आला. ‘बाप्पा काय हो फक्त मुलाचाच असतो का हो. मुलीचा काहीच हक्क नाही का?’ मला नीट कळले नाही म्हणून परत विचारले तिला. मला म्हणाली– ‘एखाद्या कुटुंबात गणपती असेल तर वडील गेल्यावर गणपती आणायची प्रथा ही मुलानेच चालू ठेवायची का? मुलगा नसेल आणि मुलगी असेल तर तिला हक्क नाही का? बाप्पा जसा मुलाचा आहे तसा माझाही आहे ना…’ तिचे बोलणे ऐकून मी दिग्मूढ झाले. काय बोलावे हे मलाही क्षणभर सुचलेच नाही. रजनीने फोन ठेवला पण माझ्या डोक्यातून हा प्रश्न जातच नव्हता.

खरंच एकुलती एक मुलगी असेल तर तिला वंशपरंपरांगत असलेली प्रथा पुढे चालू ठेवण्यास हक्क नाही ???? सगळीकडेच तर समानता आहे, मुलामुलींमध्ये भेदभाव नको यावर सगळीकडेच  बोललं जातं. पेपरमध्ये सुद्धा मथळेच्या मथळे छापून येतात. पण प्रत्यक्ष कृतीत आणणारे मात्र थोडकेच.

आमच्याच एका ओळखीत आई गेल्यावर मुलीनेच सगळे विधी पार पाडलेत. खांदाही दिला. तिला भाऊ नाही मग तिनेच हे सगळे सोपस्कार पार पाडलेत.  काही कुटुंबात तर भाऊ असून सुद्धा आईवडिलांची जबाबदारी मुलीवर येऊन पडते. त्या सांभाळ करतात. समानता सर्व क्षेत्रांत आहे की. जग कुठे चाललं आहे. चांद्रयान २ च्या मोहिमेचं नेतृत्व  देखील दोन महिलांनी केलं आहे. त्यांनी ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. तरीही काही ठिकाणी मात्र ‘मुलगाच हवा’ असा आग्रह असतो. तीन मुली झाल्या तरी अजून मुलासाठी एक चान्स घे गं… घराण्याला वारस हवा ना, असा सल्ला एक स्त्रीच एका स्त्रीला देते. अशा घटना ऐकल्या की हसावं का रडावं तेच कळत नाही.

रजनी, आईवडिलांची एकुलती एक मुलगी. खरं तर वडील गेल्यावर एखाद्या गणपती मंडळाला मूर्तीचे पैसे द्यावे असं तीचं मत होतं. पण कुटुंबातील काही जणांचे मत असं पडलं की वंशपरंपरेने चालू असलेला गणेश उत्सव बंद करू नये. मग तिनेच ठरवलं, मी आहे की त्यांचा वंश! मग मी करणार सगळं. आईचा सांभाळ आणि माहेरचे रीतीरिवाज आपला संसार सांभाळून सगळं परंपरेने चालू ठेवणारी ही गौराई. पण स्त्री म्हणून तिने ही जबाबदारी स्वीकारली म्हणून कुटुंबातील काही लोकांनी तिच्याकडे पाठ फिरवरली. वंश हा फक्त मुलांनीच चालवायचा असतो. फक्त बाकी जबाबदाऱ्या घेतल्या नाहीत तरी चालतील असे हे आपल्या सोयीनुसार केलेले नियम. विचारांच्या गर्तेत गढून गेले होते तेवढ्यात परत रजनीचा फोन वाजला…

‘शेजारीच मामींकडे गौराईच्या दर्शनाला जाऊन आले मी आणि  गौराईला सांगूनच आले कोणी काहीही म्हणू दे, पण बाप्पा माझाही आहे. काही झाले तरी बाप्पा वंशपरंपरेने मीच बसवणार. त्याच निश्चयाने घरी आले. आपल्या बाप्पाला नैवद्य दाखवला. मघाशी गडबडीत तुम्हाला विचारायचं राहून गेलं…तुमच्या सासूबाई कधी येणार आहेत माझ्या बाप्पाच्या दर्शनाला !!!’

पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068

पुण्यातील रमेश बागवेंसह कॉंग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण ,अशोक चव्हाण ,बाळासाहेब थोरातांसह ६० उमेदवारांची नावे निश्चित

0
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी.काँग्रेस येत्या 10 सप्टेंबरला आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. यामध्ये एकूण 60 उमेदवारांचा समावेश असणार आहे.यामध्ये पुण्यातील  कन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात रमेश बागवे  तर कराड मधून पृथ्वीराज चव्हाण भोकर मधून अशोक चव्हाण ,संगमनेर मधून बाळासाहेब थोरात लातुरातून अमित देशमुख यांचा समावेश असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे .काँग्रेसकडून  एकूण 30 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जाते आहे .
काँग्रेसचे पहिल्या यादीतील संभाव्य उमेदवार
संजय जगताप (पुरंदर) 
रमेश बागवे (पुणे कन्टोन्मेंट)
पृथ्वीराज चव्हाण (कऱ्हाड)
अशोक चव्हाण (भोकर)
प्रणिती शिंदे (सोलापूर)
अमित देशमुख (लातूर शहर )
बाळासाहेब थोरात (संगमनेर)
यशोमती ठाकूर (तिवसा)
नितीन राउत (नागपूर उत्तर)
मुजफ्फर हुसेन (मीरा भाईंदर)
पी.एन.पाटील (करवीर)
पद्माकर वळवी (शहादा)
शिरीष नाईक (नवापूर)
ऋतुराज पाटील (कोल्हापूर दक्षिण)
विश्वजित कदम (पलूस कडेगाव )
कल्याण काळे (फुलंब्री)
अमीन पटेल (मुंबादेवी)

‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने आयोजित चित्र रंगवा स्पर्धा उत्साहात संपन्न.

0

पुणे    ‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित  करण्यात  आलेल्या  चित्र रंगवा  स्पर्धेला  संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या लहान मुला-मुलींनी  उत्स्फूर्त प्रतिसाद  दिला.  संस्थेच्या  प्रभात रोड येथील मुख्यालयात  यावेळी सर्व चित्रे प्रदर्शित करण्यात आली.

प्रसिद्ध चित्रकार व छायाचित्रकार अतुल वाघ यांनी चित्रांचे परीक्षण करून बक्षिसपात्र  चित्रांची   निवड केली.  यामध्ये  प्रथम  क्रमांक प्रिशा  गोरे, गायत्री मोरे व सेजल खिलारे यांना विभागून देण्यात आला. तर व्दितीय  क्रमांक  यश  खेंगरे  व तृतीय क्रमांक  दिया कोद्रे या  विद्यार्थ्यांनी  पटकावला. संस्थेच्या संचालिका  शोभा कुलकर्णी व संचालक  अजय रांजणे  यांच्या  हस्ते  विजेत्यांना  बक्षीसे  प्रदान करण्यात  आली. याशिवाय प्रत्येक सहभागी स्पर्धकानांही यावेळी बक्षीस  देऊन  गौरविण्यात  आले.   याप्रसंगी कार्यक्रमाला  संस्थेचे  सर्व कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

महिलांच्या कल्पक पेंटिंगने बालगंधर्व कलादालन सजले  

0

पुणे-

३१व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत दरवर्षी प्रमाणे यंदाही बालगंधर्व कलादालन येथे महिलांच्या पेंटिंग्जची स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन शनिवार दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता ललित कला अकॅडेमी दिल्लीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांचा हस्ते दीप प्रज्वलन करून  संपन्न झाले. निवेदिता प्रतिष्ठान अंतर्गत असणाऱ्या महिलांच्या ‘आकृती’ ग्रुप तर्फे या महिलांसाठी पेंटिंग स्पर्धेचे आयोजन अनुराधा भारती यांनी केले. उद्घाटन प्रसंगी अॅड अभय छाजेड, डॉ सतीश देसाई, मोहन टिल्लू उपस्थित होते. हे प्रदर्शन दि. 9 पर्यंत सकाळी १० ते रात्री ८.३० यावेळेत सर्वांसाठी खुले असेल.

पाचारणे म्हणाले कि, तुमच्या कलेला तुमच्या भूमीचा गंध असला पाहिजे. ज्या मातीवर तुम्ही उभे राहता त्या मातीच्या संस्कारांचे ऋण असले पाहिजे आणि तीच कला श्रेष्ठ. प्राचीन काळापासून चालत आलेल्या आदिवासी कलेला (ट्राईबल आर्ट) जगभरातून आजही भारतीय कला म्हणून ओळखले जाते. कला हि विकण्यासाठी नसते. तुमच्या आमच्या कलेला जगाच्या बाजारपेठेत किंमत असली तरी त्यास भारतीयतत्व नाही असा शिक्का लागतो आणि तो पुसण्याची जबाबदारी तुमची आहे. पुणे फेस्टिव्हलमध्ये आत्ता पर्यंत झालेल्या १२ वर्षातील महिला पेंटिंग स्पर्धांमधील पेंटीगचा कॅटलॉग ललित कला अकॅडेमी तर्फे प्रकाशित केला जाईल असे हि त्यांनी टाळ्यांचा गजरात जाहीर केले.

या स्पर्धेत १०४ महिला कलावंतांनी सहभाग घेतला असून त्यांची एकूण १३० पेंटिंग प्रदर्शित केली गेली. यावेळी अभिनव कला विद्यालय, पुणे याचे माजी प्राचार्य रावसाहेब गुरव, जयप्रकाश जगताप व प्राध्यापक सुधाकर चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याच बरोबर तुलसी ग्रुप आर्ट फौंडेशनचे सुरेश लोणकर व अभिनव कॉलेजचे फाऊंडर कै. पुरम यांची कन्या प्रा. राजेश्वरी कार्ले उपस्थित होते.

पुणे फेस्टिव्हलमध्ये यंदाचे वर्षी हे निवेदिता प्रतिष्ठान’ तर्फे १२वे चित्र प्रदर्शन आहे. या वर्षी ३ गटात स्पर्धा करण्यात आली. पेंटिंग स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे : पहिला गट वॉटर कलर/पोस्टर कलरमध्ये प्रज्ञा काळे (प्रथम) आणि अनन्या गवाडे (द्वितीय), दुसरा गट ऑईल कलर/एक्रीलिक कलरमध्ये सायली कांबळे (प्रथम) आणि पूजा पांगम (द्वितीय), आणि तिसरा गट पेन्सिल/पेन स्केच/चारकोलमध्ये शर्मन मान (प्रथम) आणि शुभांगी देसाई (द्वितीय). परिक्षक म्हणून सुरेश लोणकर, राजेश्वरी कार्ले आणि अतुल गेंदले यांनी काम पहिले.

‘आकृती’ या नावाने चित्र प्रदर्शन भरविले जाते. ‘आकृती’ हा १७ वर्षां पूर्वी स्थापना झालेला महिला चित्रकार असलेला ग्रुप आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून इथे महिला सहभागी होतात. गेले ४ वर्षे हैदराबाद, वाराणसी, दिल्ली, इंदोर व अमेरिका इथूनही चित्रकार महिला सहभागी आहेत.

पुण्यातील नावाजलेले व नॅशनल अवार्ड विजेता तरुण कलाकार प्रेम आवळे यांनी तैल व्यक्तीचित्राचे, त्याचप्रमाणे प्रसिद्ध कलाकार अतुल गेंदले यांनी लँडस्केपचे व चंद्रकांत शिंदे यांनी पेन्सिल स्केचचे प्रात्यक्षिक दाखवले. प्रदर्शन बघण्यासाठी मोठी गर्दी होती.

“दिलसे जन्नत का पैगाम लायी हूँ, अपने काश्मीर का सलाम लायी हूँ, सिलसिला प्यार का युही चलता रहे, वो न बदले चाहे जमाना बदलता रहे

0

एकात्मतेच्या वातावरणात पहाटेपर्यंत रंगला मुशायरा

पुणे : बदलती राजकीय रचना, काही भागात असलेली सामाजिक अस्वस्थता पण प्रतिकूल परिस्थितीतहि भारतीय जनतेत असलेली एकात्मता याचे प्रतिबिंब शुक्रवारी दि. ६ सप्टेंबर रोजी पुणे फेस्टिव्हलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय उर्दू मुशायरा कार्यक्रमात उमटले. हास्य आणि टाळ्यांच्या कडकडाटात शनिवार पहाटे ४ वाजेपर्यंत गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रंगलेल्या या कार्यक्रमाने रसिकांना अंतर्मुख करतानाच एकात्मतेचाही संदेश दिला.

पहिल्या पुणे फेस्टिव्हल पासून सुरु झालेल्या या कार्यक्रमाचे यंदाचे ३१ वे वर्ष. या महोत्सवाचे संस्थापक सुरेश कलमाडी यांनी हा उत्सव सुरु ठेवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना इकबाल अंसारी यांनी अशा व्यक्तीमुळे ‘जोश पैदा होता है’ असे सांगितले.

आवामी महज पुणे आणि इनामदार स्पेशालिटी हॉस्पिटल, यांच्या वतीने हा मुशायरा सादर करण्यात आला. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटीयन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. . इनामदार आणि डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा आबेदा इनामदार यांनी याचे आयोजन केले होते. ४ शायरा आणि ११ शायर यात सहभागी झाले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे माजी वस्त्रोद्योग मंत्री मोहम्मद नसीम आरिफ खान तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटीयन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. . इनामदार होते. महोत्सवाचे संस्थापक सुरेश कलमाडी यावेळी उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यात पुराच्या काळात आपल्या छोट्याशा मच्छीमारी बोटीतून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ३०० पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याची कामगिरी करणारे पुंदी गावाचे एजाज अब्दुल पठाण आणि हसन अब्दुल पठाण या दोघा भावांना पी. . इनामदार यांनी प्रत्येक रु. पन्नास हजारांची रक्कम प्रोत्साहन म्हणून प्रदान केली. या दोघा भावांना मानपत्रही देण्यात आले. सामाजिक सलोखा निर्माण करण्यात त्यांना पाठबळ देणारे सरपंच दीपक पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.

या मुशायराचे उद्घाटन मोठी मेणबत्ती प्रज्वलित करून झाले. पॉप्युलर मेरठी (मेरठ), मंझर भोपाली (भोपाळ), इक्बाल अश्हार (दिल्ली), रियाज सागर (मुझफ्फरनगर), अफरोज आलम (दुबई), अतुल अजनबी (ग्वालियर), शहीद अदिली (हैदराबाद), शाईस्ता सना (कानपूर), अंजली अदा (काश्मीर), रेहाना शहीन (अलीगड), डॉ. मेहताब आलम (भोपाल), शरफ नांपर्वी (दिल्ली), मुमताज मुन्वर (पुणे) यांनी शेरोशायरीची अक्षरश: बरसात केली. अस्लम चिस्ती यांनी शायरांना आपल्या खास शैलीत खुलवतानाच राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा शायरी पेश केली.

मंझर भोपाली यांनी सध्या सामाजिक सलोखा का कमी झाला आहे असा सवाल करतानाच इस देश को किस की नजर लग गाई अशा स्वरुपाची वेदना प्रकट केली. तर डॉ. मेहताब आलम यांनी कौमी एकता के सामने खतरा है असे म्हणताना ‘प्रेम के ढाई अक्षरसे दुनिया का दिल जीता जा सकता है” असा आशावाद प्रकट केला.

“प्यार खुशबू है, ये छुपता नही

आप कितनी भी नजरे छुपा लीजिये”

दिल्लीचे इक्बाल अश्हार यांनी उर्दू भाषेबद्दल अभिमान व्यक्त करताना “हसीनो से कोई हिजारत न करना, ये कम नापते है ये  कम तोलते है” असे म्हणून टाळ्या मिळवल्या. त्याच वेळी त्यांनी “मेरी वफाओंको सबूत न मांगे” असेही सुनावले.

ग्वालियरचे अतुल अजनबी यांनी “बडे सलीके, बडे साद्गी से काम कर दिया, जलाके अंधेरेसे इंतकाम लिया” अशी टोलेबाजी केळी.

पुण्याच्या मुमताज मुनव्वर यांनी “नफरते सारी मिट जायेगी एक दिन, दुश्मन को भी दिल से लगा कर देखो, खाक हो जायेंगे नफरत के पतंगे, तुम भी प्यार की शमा जलाकर देखो” या शायरीवर टाळ्या मिळवल्या.

काश्मीरमधून आलेल्या अंजली अदा यांनी पदार्पणातच टाळ्या मिळवल्या. “दिलसे जन्नत का पैगाम लायी हूँ, अपने काश्मीर का सलाम लायी हूँ, सिलसिला प्यार का युही चलता रहे, वो न बदले जमाना बदलता है” या शायरीने श्रोत्यांची मने जिंकली.

हैदराबादचे शहीद अदिली यांची प्रेमाची गंमत सांगणारी शायरी रंगली “चार दिन मेकअप मे थी, घर मे उजाला हो गया, चार दिनकी चांदनी थी, फिर अंधेरा हो गया, मैने अपनी अहमियत को खूब पिया ख्वाबो मे, फिर हुवा बेजार मै, ख्वाब उलटा हो गया!”

रेहाना शहीन यांनी राजकारण्यांबाबत वेदना व्यक्त करताना शायरी पेश केली. “तुम दिलोंको बाट रहे हो कुर्सीके वास्ते  टुकडोंमे मेरे देशको तकसीम ना करो.”

 इक्बाल अश्हार यांनीही देशावरच्या आमच्या निष्ठेचे हेच काय फलित अशी वेदना व्यक्त करताना “एडिया रगडी थी इस नहर मे मैने, लेकीन पानी न भरने देते ये लोग” अशी शायरी पेश केली.

दुबईहून आलेले अफरोज आलम यांनी ही अशाच वेदना व्यक्त केल्या “तू मेरी नींदे तलाशता है ये भी बहुत है, तू मेरी ख्वाबो मे जागता है ये भी बहोत है” या ओळी पेश केल्या.

मेहताब आलम म्हणाले की “आप बरसाओ मोहब्बत के फूल, आपका जिक्र किया जायेगा खुशबू की तरहा.

अखेरच्या टप्पात कानपूरच्या  शाईस्ता सना यांनी त्यांच्या पहाडी आवाजात सादर केलेल्या जबरदस्त शायरीने रसिकांवर मोहिनीच घातली आणि भरपूर हसवताना अंतर्मुखही केले “समझमे नही आता की अब कहाँ जाऊं, जिसके वास्ते जिंदा हूँ उसीने मार दिया”.

देशविदेशात आपला उर्दू शायरीने लोकप्रिय असलेले मेरठचे पॉप्युलर मेरठी यांनी समारोपात शायरी पेश केली तेव्हा पहाटेचे साडेतीन वाजले होते. रसिक त्यामुळे अधिक उत्साहित झाले आणि दीर्घकाळ चाललेल्या कार्यक्रमात खूप काही मिळाल्याच्या भावनेत रमून गेले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी मंत्री नसीम खान यांनी देशाची वाटचाल चुकीच्या दिशेने सुरु आहे, असे मत व्यक्त करताना सरकार कोणाचेही असले तरी देश महत्वाचा आहे हे लक्षात घेऊन सर्वांनी एकजुटीने आव्हानांचा सामना करावा असे आवाहन केले. या कार्यक्रमास प्रेक्षिकांनी मोठी गर्दी केली होती.

पुणे फेस्टिव्हल गोल्फ स्पर्धेत कार्तिक कृष्णराज विजयी.

0

पुणे-३१व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘पुणे फेस्टिव्हल गोल्फ स्पर्धा’ संपन्न झाली. पुण्यातील येरवडा येथील ‘पुणे गोल्फ कोर्स’ येथे झालेल्या या स्पर्धेस सकाळी ६.३० वाजता सुरुवात झाली. एकूण ९८ विविध वरिष्ठ अधिकारी व क्लब मेंबर्स या स्पर्धेत सहभागी झाले होते. हॅंडीकॅप प्रकारात स्टेबल फोर्ड फॉरमॅटमध्ये प्लॅटीनम, गोल्ड व सिल्वर अशा ३ भागात ही स्पर्धा संपन्न झाली. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, मीरा कलमाडी, पूना क्लब चे अध्यक्ष राहुल ढोले पाटील, पुना गोल्फ क्लब चे कॅप्टन स्वस्तिक शिरसाट, टुर्नामेंट चेयरमेन श्री. नाडकर्णी, रॅली ड्रायव्हर संजय टकले, क्रीडा समिती प्रमुख प्रसन्ना गोखले आदी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आले. या स्पर्धेचे स्वागत प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रसन्ना गोखले यांनी केले.

या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-

१. प्लॅटीनम विभाग – हॅंडीकॅप ० ते १२

 

प्रथम क्रमांक – कार्तिक कृष्णराज (३९ गुण)

 

उपविजेता – शरद दत्ता (३६ गुण)

 

२. गोल्ड विभाग – हॅंडीकॅप १३ ते २४

प्रथम क्रमांक – महेश शहाणे (४० गुण)

उपविजेता – सुरेश के. प्रसाद (४० गुण)

३. सिल्वर विभाग – हॅंडीकॅप २५ ते ३६

प्रथम क्रमांक – प्रत्यूष दलाल (३६ गुण)

उपविजेती – बी डी देशपांडे (३४ गुण)

 

तसेच तीन विशेष बक्षिसे यामध्ये

Closest टू स्पिन – सुरेश प्रसाद यांना

Straightest Drive – चेतन रीग्झिंग

Longest Drive – अनन्या गर्ग

मॉडर्न हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

0

पुणे – प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर पुणे येथील प्रशालेत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस… हाच दिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला.शिक्षक दिनानिमित्त डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व गुरुवर्य शंकररावजी कानिटकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाचे सचिव डॉ.अशोक भोसले, शाळा समिती अध्यक्ष व उपकार्यवाहक चित्तरंजन कांबळे, मुख्याध्यापिका संगीता लकारे, उपमुख्याध्यापिका रोहिणी काळे, पर्यवेक्षिका सीमा कुळधरण, नियामक मंडळ सदस्य प्रमोद शिंदे,पालक संघाचे उपाध्यक्ष शाम हर्षे, दादाभाऊ शिनलकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता लकारे, पाहुण्यांचा परिचय रोहिणी काळे यांनी केला.प्रसंगी डॉ.भोसले म्हणाले मुलांनी जन्म घेतल्यानंतर तो विद्यार्थी म्हणून शाळेत येतो त्याला घडविण्याचे काम शिक्षक करत असतात शिक्षक म्हणून आपण अध्ययन अध्यापन तर चांगलेच करतात त्याचबरोबर विद्यार्थ्यांना इतर उपक्रमात सहभागी करा. कांबळे म्हणाले, शिक्षक हा बहु आयामी असला पाहिजे तरच विद्यार्थी विकास होईल आणि आपल्या शिक्षकांच्या आठवणींना उजाळा दिला. शालेय वेळापत्रकानुसार शिक्षक बनलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी परिपाठापासून ते सर्व तासिका शिकवण्याचे काम केले. विद्यार्थी मुख्याध्यापक झालेल्या निरंजन मिंडे या विद्यार्थ्यांने शेवटी असे सांगितले की,शिक्षकी पेशा हा पवित्र आहे.पण लहान मुलांना शिकवणे अवघड काम आहे. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी स्मिता पवार यांचा पालक संघाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.आणि मीना बांबळे यांचा पीएचडी प्राप्त केल्यामुळे सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना सोनोने आणि शिक्षक मनोगत खंडू खेडकर यांनी व्यक्त केले.शिक्षकांचे गुणविशेष सांगत यादी वाचन नवेश पाटील,सुमिता पाटील यांनी केले.या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे व संस्थेच्या सहकार्यवाह, नगरसेविका, पुणे महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा प्रा.ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले.

चांद्रयान 2 च्या अपयशानंतर इस्त्रो प्रमुखांना अश्रु झाले अनावर; पंतप्रधानांनी गळाभेट देऊन केले सांत्वन

0

बेंगलोर – पंतप्रधान नरेंदी यांनी शनिवारी सकाळी इस्त्रो सेंटरमध्ये पोहोचून शास्त्रज्ञांची भेट घेतली. या भेटीनंतर मोदी मुख्यालयातून बाहेर पडत असताना इस्त्रो प्रमुख सिवन यांना अश्रु अनावर झाले. सिवन यांची अवस्था पाहताच मोदींनी गळाभेट देऊन त्यांचे सांत्वन केले.

इस्त्रो मुख्यालयातील नियंत्रण केंद्राशी चंद्रयान-2 मिशनचा संपर्क तुटला असला तरी या संपूर्ण प्रक्रियेचे  साक्षीदार राहिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बंगळुरु येथील इस्रो वैज्ञानिकांनी सांगितले की,

“आमच्या वैज्ञानिकांचा  भारताला  सार्थ अभिमान आहे! त्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि नेहमीच भारताचा गौरव वृद्धिंगत केला आहे. हे धैर्यवान होण्याचे क्षण आहेत आणि आम्ही धैर्यवान होऊ! ”

वैज्ञानिकांचे मनोबल वाढवण्याच्या  त्यांच्या  वैयक्तिक प्रयत्नात पंतप्रधान म्हणाले, “देश तुमच्या बरोबर आहे, मी तुझ्याबरोबर आहे. प्रयत्न  उत्तम होते म्हणून इथपर्यंतचा प्रवास घडला”.“तुम्ही असे लोक आहात जे  मायभूमीच्या विजयासाठी  संघर्ष करत आहात तिचा अभिमान बाळगण्याचा दृढ निश्चय  तुमच्या जवळ आहे.”“काल, जेंव्हा चांद्रयान-2 चा नियंत्रण केंद्राशी संपर्क तुटला तेंव्हा रात्री मी तुमची निराशा व भावना समजू शकत होतो. कारण मी तुमच्यातच होतो. संपर्क कसा तुटला वैगरे अनेक अनुत्तरीत प्रश्न  तुम्हाला पडले आहेत पण  मला खात्री आहे की, त्याची  उत्तरे तुम्हाला  सापडतील. मला माहित आहे की या  मागे  खूप मेहनत होती.”“आम्हाला कदाचित या प्रवासात एखादा छोटासा धक्का बसला असेल, परंतु यामुळे आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठीचा आपला उत्साह कधीही  कमी होणार नाही”यामुळे आपला संकल्प अधिक दृढ झाला आहे.

“आमच्या वैज्ञानिक बंधू -भगिनींच्या प्रयत्नांच्या फलनिष्पत्तीला संपूर्ण देश काल रात्री एकत्रित झाला होता.  आम्ही चंद्राच्या पृष्ठभागाच्या  अगदी जवळ आलो आहोत. हा  प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहे.”“आम्हाला आमच्या अंतराळ कार्यक्रमाचा आणि वैज्ञानिकांचा अभिमान आहे, त्यांच्या कठोर परिश्रम व दृढनिश्चयामुळे केवळ आमच्या नागरिकांनाच नव्हे तर इतर राष्ट्रांचेही जीवनमान सुधारणार आहे. त्यांच्या अभिनव उत्कटतेचा हा त्यांचा परिणाम आहे की बऱ्याच लोकांना चांगली  आरोग्य सेवा आणि शिक्षणासहित दर्जेदार जीवनशैली मिळाली.”“भारताला माहित आहे की, आनंद  मनविण्याच्या अनेक संधी आणि अनेक अभिमानाचे क्षण असतील.””अंतराळ कार्यक्रमाची  सर्वोत्कृष्ठता  येणे बाकी आहे.”“आपल्याकडे  नवीन संशोधनासाठी नवीन सीमारेषा  आहेत आणि नवीन ठिकाणे आहेत. आम्ही  यशाची नवी शिखरे पादाक्रांत करू आणि यशाची  उंची वाढवू.”“मला आमच्या वैज्ञानिकांना असे  सांगायचे आहे की, भारत तुमच्याबरोबर आहे. तुमच्या वैज्ञानिक  संशोधन स्वभावाप्रमाणे, तुम्ही अशा ठिकाणी प्रवेश केला आहे जेथे यापूर्वी कोणीही कधी गेलेले  नाहीत.”आमच्या वैज्ञानिक चमूने खूप परिश्रम घेतले आणि बराच  यशस्वी प्रवास केला ही शिकवण नेहमी आमच्या पाठीशी राहील.“आजचे शिक्षण उद्या आम्हाला बळकट व उत्तम बनवेल”“मी आमच्या अंतराळ वैज्ञानिकांच्या कुटुंबांचे आभार मानतो. त्यांचा मूक परंतु मौल्यवान पाठिंबा आमच्या प्रयत्नांमध्ये एक प्रमुख शक्ती आहे.”

“बंधू- भगिनींनो, कणखरपणा आणि दर्जा हे भारताच्या केंद्र स्थानी आहेत. आमच्या गौरवशाली इतिहासामध्ये आपण कदाचित  अशा काही क्षणांचा सामना केला असेल ज्यांनी आम्हाला माघार घ्यावी लागली असेल  परंतु आम्ही कधीही हार मानली  नाही. यामुळेच आपली सभ्यता उंच आहे. ”“आम्ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मला ठाऊक आहे की, कालच्या  संपर्क तुटण्यामुळे मिळालेली अयश्स्वीता इस्रो देखील मान्य करणार नाही. आणि त्यासाठीच हे मिशन अयशस्वी ठरत नाही ”“उद्या एक नवीन पहाट होईल. आजपेक्षाही उत्तम. परिणामांची चिंता न करता आपण पुढे जाऊ आणि हा आपला इतिहास आहे.”“आम्ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.  इस्त्रोही  अशा प्रयत्नांना सोडण्यास तयार नाही”माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुमची स्वप्ने माझ्यापेक्षा उंच आहेत. आणि मला तुमच्या आशांवर पूर्ण विश्वास आहे.तुमच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी मी तुम्हाला भेटत आहे. आपण प्रेरणा सागर आणि प्रेरणेचा जिवंत पुरावे  आहेत

मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो आणि तुमच्या प्रयत्नांना शुभेच्छा देतो.

औरंगाबाद देशाच्या औद्योगिक घडामोडींचे केंद्रही ठरेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

औरंगाबाद-औरंगाबाद शहर नवी स्मार्ट सिटी म्हणून पुढे येत आहेच, त्याचबरोबर हे शहर देशाच्या औद्योगिक घडामोडींचे केंद्रही ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज औरंगाबाद इथे महिला बचत गटांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केला. औरंगाबादमध्ये मोठ्या औद्योगिक कंपन्यांनी काम सुरु केले आहे. आणखीही कंपन्या इथे येऊन लाखो युवकांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असेही पंतप्रधान म्हणाले.

महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या उज्ज्वला योजने अंतर्गत 8 कोटी’व्या लाभार्थीला एलपीजी कनेक्शन पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात आले. 8 कोटी मोफत गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट वेळे आधीच पूर्ण झाले. या 8 कोटीं पैकी 44 लाख कनेक्शन महाराष्ट्रात देण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. देशात एलपीजी कनेक्शनविना एकही कुटुंब राहता कामा नये, यासाठी सरकार काम करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

महिला आर्थिक सशक्तीकरणाबरोबरीने सामाजिक परिवर्तनाचाही महत्वाचा भाग आहेत, असे प्रशंसोद्गार त्यांनी काढले.

महिलांना उद्योजक बनवण्यामध्ये मुद्रा योजनेची महत्वाची भूमिका राहिली आहे. या योजने अंतर्गत 20 कोटी लाभार्थींना कर्जे देण्यात आली असून, त्यापैकी 14 कोटी महिला आहेत. महाराष्ट्रात दीड कोटी लाभार्थींना कर्जे देण्यात आली असून, त्यात सव्वा कोटी महिलांचा समावेश असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

महिला बचत गटांसाठीच्या व्याजासाठीचे अनुदान संपूर्ण देशात लागू होत आहे.

प्रत्येक कुटुंबाला 2022 पर्यंत घर देण्यासाठी आपल्या सरकारने सर्वंकष दृष्टीकोन स्वीकारला असून, केवळ चार भिंती नव्हे, तर सर्व सुविधांनी युक्त घर पुरविण्यासाठी विविध सरकारी योजना एकत्र जोडल्या आहेत. स्थानिक लोकांच्या इच्छा आणि गरजा लक्षात घेऊनच या घरांची निर्मिती करण्यात येत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या सरकारने पारदर्शकतेवर भर दिला असून, घर विकत घेणाऱ्यांना ‘रेरा’ कायद्यामुळे आधार मिळाला आहे.

नव भारतात महिला कल्याणच नव्हे तर महिलांच्या नेतृत्वाखाली विकासाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

मराठवाड्यातले पहिले वॉटर ग्रिड प्रशंसनीय आहे. हे वॉटर ग्रिड तयार झाल्यानंतर या क्षेत्रात पाण्याची उपलब्धता वाढेल आणि प्रत्येक गावापर्यंत तसेच सिंचनासाठी शेतापर्यंत पाणी पोहोचवायला यामुळे मदत होईल. शेतकऱ्यांना सिंचनाला पाणी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांना पाण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या कष्टाची आपल्याला जाणीव आहे, यातून त्यांना मुक्त करण्यासाठी जलजीवन मिशनची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानासाठी 3.5 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

मुलींप्रती समाजाच्या विचारात व्यापक परिवर्तनाची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली.

देश हागणदारीमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, महाराष्ट्राच्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण करु असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. यादृष्टीने कोकणातले समुद्रात जाणारे 167 टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात वळवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात बचत गटाची चळवळ उभी केली गेली. 5 वर्षात 50 लाख कुटुंब बचतगटाशी जोडली गेली. इंडस्ट्रीयल पार्कमध्ये महिला बचत गटांसाठी 30 टक्के जागा राखीव ठेवणार असल्याचे ते म्हणाले. महिला बचत गटांना दिलेला पैसा 100 टक्के परत आलेला आहे. हे लक्षात घेऊनच त्यांना व्याजमुक्त कर्ज देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ऑरिक अर्थात औरंगाबाद औद्योगिक शहर परियोजनेचे, इमारतीचे तसेच नियंत्रण कक्षाचे लोकार्पण पंतप्रधानांनी केले. ग्रामीण महाराष्ट्रामधले परिवर्तन यासंदर्भातल्या एका पुस्तकाचे प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

 

वस्तू आणि सेवांच्या निर्यातीवर शून्य करदर – सुधीर मुनगंटीवार

0

मुंबई, दि. 7 : भारतातून अधिकाधिक वस्तू आणि सेवांची निर्यात व्हावी, या उद्देशाने वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये निर्यातदारांच्या  निर्यातीवर शून्य करदर ठेऊन उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारण्यात आल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत यामुळे आपली निर्यात स्पर्धात्मक राहात असून  निर्यातदारांना निर्यातीवर कोणताही कर द्यावा लागत नाही परंतुत्यांनी खरेदीवर भरलेल्या कराची वजावट मात्र मिळते. ही वजावट निर्यातदार इंटिग्रेटेड वस्तू आणि सेवा कर (आयजीएसटी) न भरता बाँड अथवा लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलयुटी) च्या अंतर्गत निर्यात करून न वापरलेले इनपुट टॅक्स क्रेडिट परताव्या स्वरूपात घेऊ शकतात किंवा निर्यातीवर आयजीएसटीच्या परताव्याचा दावा ते करू शकतात.

लेटर ऑफ अंडरटेकिंग ऑनलाईन सादर करता येते. ही सुविधा  एका आर्थिक वर्षासाठी दिली जाऊ शकते. यामुळे निर्यातदाराचे खेळते भांडवल अडकून पडत नाही. ही कर परताव्याची उत्तम यंत्रणा आहे, अशी माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिली आहे.

निर्यातदारांनी योग्य आणि पूर्ण परतावा दावा सादर केल्यानंतर ९० टक्के रक्कम सात दिवसात तर संपूर्ण परताव्याची रक्कम ६० दिवसात मंजूर करण्यात येते अशी माहिती वित्तमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली आहे.