Home Blog Page 2844

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची क्षमता वाढविली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

पुणे- महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालये मोठ्या संख्येने सुरू होत आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत आहेत. केंद्र सरकारने एक हजार जागा वाढवून दिलेल्या आहेत. येत्या दोन- तीन वर्षात वैद्यकीय शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होतील, त्याचा लाभ राज्यातील जनतेला होईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती ( जिल्हा पुणे) या महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे ई- लोकार्पण व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम तुकडीचा ई-शुभारंभ, जळगावच्‍या पंडित दीनदयाळ उपाध्याय शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बांधकामाचे ई- भूमीपूजन, मुंबई येथील जे.जे.रुग्णालयाच्या शासकीय अतिविशेष उपचार इमारतीचे ई- भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्य मंत्री संजय (बाळा) भेगडे,, खा. संजय काकडे, खा. गिरीश बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आ. माधुरी मिसाळ, आ. मेधा कुलकर्णी, आ. जगदीश मुळीक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , माजी मंत्री दिलीप कांबळे उपस्थित होते.

प्रास्ताविक वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केले. ते म्हणाले, जे.जे.रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारती साठी 1200 कोटी उपलब्ध करून देण्यात येत आहे. बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाला 2014 मध्ये परवानगी मिळाली होती, त्यासाठी 500 कोटी देण्यात आले. तेथे प्रवेश सुरू झाले आहेत. राज्यात आणखी 7 नवीन वैद्यकीय कॉलेज सुरू होतील. केंद्राकडे एकूण 35 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.  राज्य शासनाने जळगाव येथे वैद्यकीय, दंतवैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी व भौतिकोपचार महाविद्यालयांची निर्मिती करुन शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल सुरू करण्यास 2017 मध्ये मान्यता दिली आहे. एकाच छताखाली विविध प्रकारची चिकित्सा पध्दती एकाच संकुलात मिळावीत म्हणून अशा प्रकारचा शासनाचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. या संकुलाच्या उभारणीमुळे आधुनिक तसेच प्राचीन वैद्यकीय चिकित्सा पध्दतीमध्ये आंतरशाखीय संशोधनास चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

योजनांच्या अंमलबजावणीनंतर झालेले परिणाम व लाभार्थ्याची मते याचा आढावा घ्यावा -केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर

0

पुणे  – केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीनंतर झालेले परिणाम व लाभार्थ्यांची मते याचा आढावा घेण्यात यावा, अशा सूचना भारत सरकारचे केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्या. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सभा (दिशा) चे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

बैठकीस महापौर मुक्ता टिळक, खा.गिरीश बापट, खा.सुप्रिया सुळे,पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक संभाजी लांगोरे तसेच विविध समन्वयन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्हयामध्ये मुद्रा योजनेमधून 145 मेळाव्यांचे आयोजन करण्यात येवून जवळपास 9 लाख युवकांना याचा लाभ मिळाला आहे याबाबतचा आढावा घेवून जास्तीत जास्त मेळाव्यांचे आयोजन करण्यात यावे व त्यावेळी लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे, या योजनेची जास्तीत जास्त प्रसिध्दी करावी, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबधितांना वेळोवेळी पाठवावा अशा प्रकारच्या सूचना केल्या. रेल्वे विभागामार्फत करण्यात आलेल्या नवीन सोई सुविधांची माहिती घेतली. यावेळी पुणे विभागामध्ये 5 नवीन स्वयंचलीत जिन्यांची उभारणी करण्यात आली आहे, एकूण 46 स्टेशनवर देण्यात आलेल्या वाय-फायची सुविधा तसेच नव्याने करण्यात येणा-या कामांचा आढावा घेतला.

यावेळी केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी पासपोर्ट कार्यालये, पोस्ट आणि दूरसंचार विभागांचा आढावा घेवून प्रलंबित कामांबाबत कार्यवाही करण्यात येवून पुढील बैठकीमध्ये माहिती देण्याची सूचना केली. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणा-या राष्ट्रीय आरोग्य अभियान, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना,आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, आरोग्य वर्धीनी केंद्रे, शिक्षण विभागाकडील समग्र शिक्षांतर्गत ग्रंथालये व शालेय साहित्य वाटप इ.चा आढावा घेतला. स्वच्छ भारत मिशन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना इ.योजनांचा आढावा घेवून आवश्यक सूचना केल्या.
केंद्र शासनाच्या वतीने दि.11 सप्टेंबर ते दि.1 ऑक्टोबर या कालावधीमध्ये जनजागृती व श्रमदान मोहिम, दि.2 ऑक्टोबर रोजी गावातील प्लास्टीक कचरा गोळा करणे व ग्रामस्थांचे श्रमदान, दि 3 ते 27 ऑक्टोबर गावातील गोळा झालेले प्लास्टीक कच-याचे व्यवस्थापन करणे इ.बाबींवर चर्चा केली.
या बैठकीपूर्वी प्रकाश जावडेकर यांनी केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयामार्फत प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, महाराष्ट्र व गोवा प्रदेश मार्फत केंद्र शासनाच्या योजनांचे फिरते प्रदर्शनाचे तसेच पाणी बचतीचा संदेश देणा-या जलदूत बसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. राज्याच्या 8 जिल्ह्यांमधून या जलदूत बसमार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच यावेळी उपस्थितांना पाण्याचे संवर्धन बचत, स्वच्छतेचे पालन व प्लास्टीक वापर न करण्याबाबत शपथ देण्यात आली.

फडणवीस हे दमदार मुख्यमंत्री – खासदार संजय काकडे

0

पुणे, : जात, धर्म,पंथ विरहीत केवळ महाराष्ट्राच्या हिताचे, भल्याचे आणि विकासाचे निर्णय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत काम केले. मुख्यमंत्री फडणवीस हे दमदार मुख्यमंत्री असून त्यांनी धडाडीने निर्णय घेतलेत. जे काम गेल्या 35 वर्षांत एकाही मराठा मुख्यमंत्र्याला जमले नाही ते मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता केले. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी जलशिवार योजना, पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळ, कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, पुणे, नाागपूर, मुुंबईसह महाराष्ट्रात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्मिती इत्यादी अनेक आघाड्यांवर महाराष्ट्राला प्रगती पथावर नेण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे दमदार व धडाडीचे निर्णय घेणारे मुख्यमंत्री आहेत, असे भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची कामगिरी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या समोर मांडण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आज पुण्यात आले होते. पुण्यातील विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातून ही महाजनादेश यात्रा काढण्यात आली. यावेळी शिवाजीनगर येथे खासदार संजय काकडे व मित्र परिवाराच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. ढोल-ताशा, तुतारीच्या जयघोषात संपूर्ण वातावरण पूर्णपणे महाजनादेश यात्रामय झाले होते.

पुणेकरांनी मागच्या वेळी भारतीय जनता पक्षाला जनादेश देत पूर्णपणे साथ दिली होती. यावेळी देखील पुणेकर पुन्हा एकदा शंभर टक्के साथ देतील, असा विश्वास खासदार संजय काकडे यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महाराष्ट्रात अतिशय चांगले काम केल्याने विरोधकच शिल्लक राहिला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात रखडलेले प्रकल्प फडणवीस सरकारने मार्गी लावले. त्यामुळे सामान्य जनतेचा विश्वास संपादन करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. म्हणूनच पुन्हा फडणवीस सरकार महाराष्ट्रात येण्यास काहीच अडचण नाही, असेही खासदार काकडे म्हणाले.
——————————-

पुण्यात इच्छुकांच्या क्रेनफुलमाळांंनी,ढोल ताशांनी ,फटाक्याच्या आतिशबाजीत महाजनादेश यात्रेचे जंगी स्वागत

0

पुणे :पुण्यात विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या क्रेनफुलमाळांंनी,ढोल ताशांनी ,फटक्याच्या आतिशबाजीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजानादेश यात्रेचे जंगी  स्वागत करण्यात आले . राज्यभर भारतीय जनता पक्षाने काढलेली महाजनादेश यात्रा ही जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी काढली आहे आणि त्यासाठी मी पुण्यात आलो आहे असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत  पालकमंत्री चंद्रकांत पाटील,गिरीश महाजन ,खासदार संजय काकडे ,खासदार गिरीश बापट, आणि अन्य मान्यवर सहभागी झाले होते

उरली कांचन ,हडपसर पासून पुण्यातील भाजप नेत्यांनी या यात्रेचे जंगी स्वागत शेवटपर्यंत मोठ्या हिकमतीने आणि नानाविध युक्त्या प्रयुक्त्या वापरून करण्याचा प्रयत्न केला .

महाजनादेश यात्रेच्या  स्वागतासाठी स्वारगेट परिसर भाजपामय झाला होता. रस्त्यावर सर्वत्र कमळ, नेते, कार्यकर्ते स्वागतासाठी तयारीत दिसत होते. सेव्हन लव्ह चौकपासून ते सारसबाग पर्यंत सर्वत्र रस्त्यावर ढोल ताशांच्या गजरात महाजनादेश यात्रेच्या स्वागताची जोरदार तयारी झाली होती. ठिकठिकाणी स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते या यात्रेचे स्वागतासाठी उभे होते. पर्वती मतदारसंघातून सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी कुमार मॉल, सेव्हन लव्ह चौक, पौर्णिमा टॉवर परिसरात ठिकठिकाणी वाद्य पथक, हलगी पथक, ढोलताशा पथकं उभी केली होती. तसेच हजारो कार्यकर्ते, महिला फेटे घालून हातात स्वागताचे फलक घेऊन स्वागतासाठी उभे होते. दरम्यान, सारसबागेजवळ भाजपकडून स्वागताची जय्यत तयारी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, मावळे अशी वेशभुषा केलेले कलाकार मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला उभे होते. या ठिकाणी शनिवारवाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती. याच्या माध्यमातून फडणवीस सरकारने राज्यात आतापर्यंत राबविलेल्या योजना फ्लेक्स झळकवले जात होते.हीच परिस्थिती पुण्याच्या विविध परिसरात होती . नगरसेवक धीरज घाटे यांनी यात्रेच्या वाहनावर चढून जाण्याचा हिकमतीने केलेला यशस्वी प्रयत्न मोठ्या उत्सुकतेने पाहिला गेला .सुशील मेंगडे ,मुरलीधर मोहोळ महेश वाबळे ,योगेश टिळेकर आदींच्या क्रेनफुलमाळा या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या . डाव्या बाजूला खासदार बापट यांनी मुख्यमंत्र्यांच्या शेजारी आपला ठिय्या कायम ठेवला .बापटांच्या मागे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील कायम राहिले तर मुख्यमंत्र्यांच्या मागे खासदार काकडे यांनी बापटांप्रमाणेच आपला ठिय्या कायम ठेवला  तर उजव्या बाजूला महापौर मुक्ता टिळक .आमदार माधुरी मिसाळ, नंतर आमदार विजय काळे असे चेहरे बदलत गेले .

विविध ठिकाणी फुले उधळणे, भेट वस्तू देणे ,बँँडबाजी ,ढोल बाजी ,एका ठिकाणी तर जिवंत देखावा तसेच फटाक्यांची आतिषबाजी करणे या सह विविध फलक ,भव्य दिव्य पोस्टर लक्ष वेधून घेत होते.

नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व भाजप चे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्या पुढाकाराने दिव्यांग बंधु भगिनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगळेवेगळे स्वागत केले दिव्यांग बांधवांनी आज रात्रौ ९ वाजता नळस्टॉप चौक येथे माननीय मुख्यमंत्र्यांचे अभिनव स्वागत केले – दिव्यांग व्यक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी जी सन्मानाची वागणूक दिली व त्यांच्यासाठी ज्या विविध योजना आणल्या त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एनेब्लर चॅरिटेबल ट्रस्ट,चे आधारस्तंभ अमोल शिनगारे,अभिजीत शेडगे,मरियप्पा आचकेरी,संतोष भालेराव,राजू हिरवे,संतोष गायकवाड,रामा चलवादी,
त्यांच्या सहकाऱ्यांसह सर्व बांधवांनी त्यांनी बनविलेल्या वस्तू भेट देउन अभिवादन केले.

शुक्रवार (दि. १३ सप्टेंबर)पासून महाजानदेश यात्रेच्या तिसऱ्या टप्पाला सुरुवात झाली आहे. .तिसऱ्या टप्प्यात ही यात्रा १३ जिल्ह्यातील ६० विधानसभा मतदारसंघातून १,५२८ कि. मी. प्रवास करणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले कि, मागील पाच वर्षांत सरकारने केलेली कामे जनतेच्या दरबारी मांडून जनतेचा आशीर्वाद मिळवायचा आणि पुन्हा एकदा पाच वर्षांकरिता जनतेच्या सेवेत कार्यरत व्हायचं याकरिता ही यात्रा काढली आहे.मी केवळ तुमचा जनादेश घ्यायला आहे. तुमचा आशीर्वाद हाच जनादेश समजून आम्ही मुंबईला जातो आणि विधानसभेवर महायुतीचा झेंडा लावून परत येऊ असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

मुख्यमंत्र्यांनी दिले राहूल कुल यांना मंत्रिपदाचे संकेत

0

पुणे-दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांना आता अशी जबाबदारी देणार आहे की त्यांना आम्हाला कामाच्या बाबत आता मागण्या करण्याची गरज पडणार नाही तर त्या पूर्ण करण्याची धमक ही स्वतः त्यांच्यामध्येच असणार आहे असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरवंड येथील सभेत देऊन पुन्हा एकदा दौंडकरांच्या मंत्रीपदाच्या आशा पल्लवित केल्या असून जनतेनेही त्यांना मागच्यापेक्षा तिप्पट मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

उपस्थित महाजनसमुदाय पाहून आता राहुल दादांना प्रचार करायची गरज उरली नाही असे वाटत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका करताना त्यांनी आता राष्ट्रवादीचे सगळे पैलवान चितपट झाले असून बारामतीमध्ये या यात्रेचे झालेले प्रचंड स्वागत पाहून बारामतीच्या नेत्यांनासुद्धा आज झोप येणार नाही. आम्ही कामे केली म्हणून जनता आमच्या सोबत आली मात्र आजही विरोधक ईव्हीएम बाबत हे प्रश्न उपस्थित करतात मग ज्यावेळी तुमचे सरकार होते तुमच्या निवडणुका झाल्या त्यावेळी हे प्रश्न का उपस्थित केले नाहीत असा प्रश्न त्यांनी विरोधकांना केला.

ईव्हीएम बाबत बोलताना त्यांनी विरोधकांची अवस्था वर्गातल्या बुद्धू पोरा सारखी झाली असून ईव्हीएम मध्ये बिघाड झाला नसून, बिघाड यांच्या खोपडीमध्ये झाला आहे अशी प्रखर टिका केली. सरकार बदलण्याबाबत बोलताना त्यांनी आता २५ वर्ष यांना विरोधी पक्षातच राहावे लागेल कारण आता २५ वर्षे तरी यांना सत्ता मिळणार नाही असे म्हणत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ५ वर्षात ५० हजार कोटी आमच्या सरकारने दिले, यांनी १५ वर्षात २० हजार कोटी दिले हा फरक असल्याचे सांगितले. कारखाण्यावबाबत बोलताना त्यांनी राहुल दादांचा कारखाना अडचणीत आला त्यावेळी शासनाने त्यांना मदत केली कारण सहकाराचे कारखाने सहकाराच्या ताब्यात राहावेत, धनदांडग्याच्या ताब्यात जायला नकोत हे आमचे ध्येय होते असे म्हणत यापुढेही आम्ही मदत करत राहू असे आश्वासन दिले.

रस्ते, पाणी व विविध गरजा या सरकारने ध्यानात घेऊन मोठ्या प्रमाणावर विकास निधी उपलब्ध केला व बंद पडलेले प्रकल्पही सुरू केले असे सांगत टाटा व मुळशी चे पाणी दौंडला आणन्यायचे नियोजन लवकरच करण्यात येईल असे आश्वासन दिले. शेवटी बोलताना त्यांनी १५ वर्षांमध्ये जी कामे होऊ शकली नाही ती कामे या सरकारच्या ५ वर्षांच्या काळात झाली असून ५ वर्षांत ११ लाख घरांची निर्मिती सुरू केली असून शासकीय जमिनींवरील अतिक्रमण नियमित करण्याची प्रोसेस सुरू झाली असून घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येत असून २०२२ साला पर्यंत एक ही कुटुंब बेघर राहणार नाही याची हमी त्यांनी दिली.

दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी बोलताना जानाई शिरसाई चे ८१ % पाण्याचे बिल शासन भरत असून यामुळे या योजनेतील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला आहे. अष्टविनायक मार्ग, क्रीडा संकुल, प्रांत कार्यालय यांमुळे दौंडला एक वेगळेच वैभव प्राप्त होणार असून सत्र न्यायालय दौंडमध्ये व्हावे यासाठीचे प्रयत्न अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.

मुस्लिम व ख्रिश्चन समाजाला अल्पसंख्यांक निधी दिला असून हा निधी खूप मोठ्या प्रमाणात शासनाकडून उपलब्ध करण्यात येत असल्याचे नमूद केले. दौंड तालुक्यासाठी विविध स्वरूपाच्या मागण्या करताना त्यांनी कारखान्याला पुन्हा शासकीय मदत व्हावी ही अशी अपेक्षा व्यक्त करत वरवंड मधील पूल व साईड रोड, कुरकुंभ एमआयडीसी चा नागरिकांना होत असलेला त्रास कमी व्हावा व केमिकल विरहित एमआयडीसी व्हावी, पुणे दौंड लोकल सेवा सुरू व्हावी, पाण्याची टंचाई लक्षात घेता मुळशी धरणाचे पाणी या परिसरात वळवण्यात यावे अश्या विविध मागण्या केल्या.

तर शासनाच्या शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमित करण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना याचा फायदा तालुक्यातील लोकांना होत असल्याचे सांगत प्रधान मंत्री आवास योजना, पीएमआरडीए ची कामे सुरू झाली असून कामगार कल्याण योजनेमुळे अनेकांना लाभ होत असल्याचा आवर्जून उल्लेख केला. या सभेसाठी संपूर्ण दौंड तालुक्यातून सुमारे ५० हजारांच्या पुढे जनसमुदाय जमला होता.

बुरे काम का बुरा नतीजा क्यों भाई चाचा..हॉँ भतीजा : देवेंद्र फडणवीस

0

बारामती : हम मोदीजी के बाशिंदे है ,हमारा अवाज कोई बंद नही कर सकता,असा इशारा देत बुरे काम का बुरा नतीजा क्यों भाई चाचा हाँ भतीजे, अशा शेरोशायरीतुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका केली.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शनिवारी बारामतीत आली असता स्वागत सभेत ते बोलत होते. सभेसाठी यासाठी लावलेली ध्वनीक्षेपक यंत्रणा काढण्यासाठी ´राष्ट्रवादीसह मनसे पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली होती. हा संदर्भ देत फडणवीस म्हणाले, सभेचा राष्ट्रवादीने धसका घेतला आहे.साऊंड सिस्टीम काढून घेण्यास सांगितले. मात्र, मी माझी साउंड सिस्टीम घेऊनच चालतो आणि जनतेपर्यंत पोहचतो. आता छत्रपतींचे घराणे देखील भाजपसोबत आहे. आपल्याला माहिती आहे.

 फडणवीस म्हणाले, उत्स्फूर्त स्वागत पाहता बारामतीमध्ये परिवर्तनाची हवा दिसत आहे, हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अवस्था अशी झाली आहे की कोणीही त्यांच्यासोबत जाण्यास तयार नाही. धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सवलती भाजप सरकारने लागु केल्या. गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांना ५०हजार कोटीची थेट मदत केली.राष्ट्रवादी चे सरकार होते त्यावेळी शेतकऱ्यांना १२०० कोटी प्रतिवर्ष मिळत असत, आमच्या सरकारने शेतकऱ्यांना वर्षाला १० हजार कोटी शेतकऱ्यांना दिले.राज्याच्या सिंचनाचे काय झाले हे सर्वांना ज्ञात आहे. बंद पडलेले सिंचन प्रकल्प आमच्या शासनाने सुरु केले.

पराभवाला इव्हीएमला जबाबदार धरणाऱ्यांच्या खोपडीत बिघाड : फडणवीस
पराभवास इव्हीएम मशीनला जबाबदार धरणाऱ्या विरोधकांची अवस्था वर्गातल्या बुद्धु विद्याथ्यासारखी आहे. त्यांच्या खोपडीमध्ये बिघाड झाला आहे, टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. जम्मू- काश्मीरच्या विलीनीकरणासाठी मतदान का केले नाही. तुम्ही समोर येऊन का बोलला नाही, असा सवाल त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसला केला.

बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

0

बारामती- भाजप आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर महानाजेश यात्रेनिमित्त जनतेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत. ही महाजनादेश यात्रा आज(14 सप्टेंबर) शरद पवारांच्या बाले किल्यात म्हणजेच बारामतीत आली होती. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासोबत नुकतंच भाजपात आलेले हर्षवर्धन पाटील, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील इत्यादी नेते होते. यावेळी पवारांवर टीका केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि भाजपविरोधी घोषणा देण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे शांतता परिसरात डीजे लावण्या वरुन आणि चौका-चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लावलेले पोस्टर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून काढण्यात आल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. या सर्व वादानंतर पोलिसांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला.

भाजपची महाजनादेश यात्रा आज पवारांच्या बारामतीत आली होती. यानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे पोस्टर लावले होते. हे सर्व पोस्टर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून काढण्यात आले. तसेच शांतता परिसरात डीजे लावल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून तो काढण्यात आल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. या यात्रेदरम्यान, भर रस्त्यात सभा भरण्यात आली. शहरात दोन मोठे मैदान असूनही, भर रस्त्यात सभा घेतल्यामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे मैदानात सभा न घेता रस्त्यावर सभा घेतल्याने नागरिकांमध्येही नाराजीचा सुर आला.

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठीच उदयनराजे भाजपात, नवाब मलिक यांची टीका

0

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक जमिनी विकण्यासाठी, परवानगी मिळावी म्हणून उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यावर बोलताना मलिक यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.

छत्रपतींच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजे यांना परवानगी देण्याचे आमिष भाजपने दाखवले असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रयत्न हाणून पाडेल, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला. शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा अबाधित राहिला पाहिजे, त्याला जर कोणी धक्का लावत असेल तर जनतेला सोबत घेऊन आम्ही कडाडून विरोध करू, अशी स्पष्ट भूमिकाही नवाब मलिक यांनी मांडली.

उदयनराजे भोसले हे 1999 पूर्वी भाजपचे आमदार व मंत्री होते. 1999 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा पराभव केला होता. नंतर ते त्यांच्या आईच्या माध्यमातून शरद पवार साहेबांना भेटले, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना खासदार केले. त्यांना खासदार केल्यानंतरही ते वारंवार पक्षविरोधी भूमिका घेत होते. निवडणुका जवळ आल्या की, ते पुन्हा आईच्या माध्यमातून पवार साहेबांना भेटायचे. तिकीट मिळवायचे आणि पुन्हा निवडून यायचे अशी मिश्किल टिप्पणी नवाब मलिक यांनी केली.

सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड आहे, त्यामुळे पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव होईल. 1999 च्या पराभवाची त्यांना आठवण करून देऊ. ते कुठल्या पद्धतीने कामे करतात, रात्री व दिवसा कुठल्या अवस्थेत असतात हे सातारा जिल्ह्यातील जनतेला माहित आहे. जरी ते पक्ष सोडून गेले असले तरी ती जागा आम्ही निवडून आणू, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

भारतातील राजे, संस्थानिक यांना भाजपमध्ये आणण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी काही माणसे सोडली आहेत. सातारा किंवा अन्य कोणत्याही संस्थानांतील जमिनी कायद्याने विकता येत नाहीत, स्वतःसाठी वापरता येत नाहीत. भाजप सरकार या जागा विकण्याच्या आमिषापोटी राजे, संस्थानिकांना भाजपमध्ये आणत आहेत. उदयनराजे हे सुद्धा याच आमिषाने भाजपमध्ये गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जमिनी अबाधित राहिल्या पाहिजेत. त्यामुळे उदयनराजे जेव्हा केव्हा ते निवडणूक लढवतील तेव्हा आम्ही त्यांना पराभूत करू, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

सप्तचक्र योगसाधनेमुळे स्थैर्य, आत्मविश्वास व यशप्राप्ती

0
नीता सिंघल यांचे प्रतिपादन; ‘सप्तचक्र योग साधना-यु आर मोअर’वर मोफत कार्यशाळा
पुणे : “आपल्या शरीरातील सात चक्र आपल्या आयुष्याला कलाटणी देत असतात. या सात चक्रांचे संतुलन गरजेचे असते. सप्तचक्र योगांमध्ये या सात चक्रांचा अभ्यास केला जातो. सप्तचक्र योगसाधनेमुळे जीवनात स्थैर्य, आत्मविश्वास आणि यशप्राप्ती होते. त्याच्या योग्य साधनेतून आयुष्यात सकारात्मक बदल घडतात. त्यामुळे सप्तचक्र योगसाधनेला आपण महत्वाचे स्थान द्यायला हवे,” असे प्रतिपादन चक्रयोग फाउंडेशनच्या संस्थापिका नीता सिंघल यांनी केले.
चक्रयोग फाउंडेशन, रुद्र सेंटर आणि नीना नाहटा यांच्या वतीने सातारा रस्त्यावरील हॉटेल उत्सव येथे आयोजित नीता सिंघल यांच्या ‘सप्तचक्र योग-यु आर मोअर’ या विषयावरील मोफत कार्यशाळेत त्या बोलत होत्या. प्रसंगी संयोजिका नीना नाहटा, ‘मिसेस इंडिया २०१८’ डॉ. पल्लवी प्रसाद आदी उपस्थित होते. यावेळी सप्तचक्र साधना, त्याचा उपयोग, व्यक्तीगत व व्यावसायिक प्रगतीसाठी योगसाधना, योगसाधनेद्वारे चक्रसाधनेचा समतोल याबाबत नीता सिंघल यांनी मार्गदर्शन केले. सहभागी झालेल्या प्रत्येकाला विशेष उर्जास्त्रोत असलेले रुद्राक्ष व चक्रसाधनेची माहितीपुस्तीका देण्यात आली.
नीता सिंघल म्हणाल्या, ”सप्तचक्र योग हा ज्ञानयोग असून, त्यात ज्ञान आणि ध्यानाच्या माध्यमातून समुपदेशन केले जाते. सप्तचक्र योगाच्या सहाय्याने लोकांच्या मनातील भीती, काळजी, ताण-तणाव दुर होतो. शरीरातील चक्रांचे असंतुलन का होते, ते संतुलीत ठेवण्यासाठी काय करायला हवे, याबद्दल मागर्दर्शन केले जाते. लोकांमधील नकारात्मकता वाढत आहे, अशा परिस्थितीत त्यांना सप्तचक्र योग साधनेतून साकारत्मकतेकडे नेण्याचा प्रयत्न आहे. चक्रसाधना शास्त्राला आज बऱ्याच ठिकाणी मान्यता मिळत आहे. रुद्राक्ष शंकराचा अंश आहे. त्याचा वापर केल्याने आपल्या जीवनात आनंदाचे क्षण येतात. रुद्राक्ष कोणीही, कोणत्याही वयात घालू शकते. त्याबद्दलच्या चुकीच्या कल्पना आपण मनातून काढून टाकाव्यात.”
 नीना नाहटा म्हणाल्या, ”सप्तचक्र योगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या विषयावर केनिया, दुबई, जम्मू कश्मीर, गुजरात, मुंबई आदी ठिकाणी कार्यशाळा घेण्यात येतात. या साधनेच्या माध्यमातून आर्थिक, शारिरीक, मानसिक समस्या सोडविण्यात यश मिळत आहे. हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा, यासाठी आम्ही मोफत कार्यशाळेचे आयोजन करत आहे. आजवर देशभरात आणि परदेशातही अनेक कार्यशाळा झाल्या असून, वीस हजारांहून अधिक लोकांनी सप्तचक्र योगसाधना केली आहे.”

जिल्हास्तरीय शालेय स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत तानिया आहुजा, अर्णव नाडकर्णी, कियान लॉयर, श्रुती माने, होवरा भानपुरवाला यांना विजेतेपद

0

पुणे: क्रिडा व सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा कार्यालय पुणे व पुणे स्क्वॅश रॅकेट संघटना यांच्या तर्फे आयोजित जिल्हास्तरीय शालेय स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत पुणे जिल्हा विभागात अंतिम फतानिया आहुजा, अर्णव नाडकर्णी, कियान लॉयर, श्रुती माने, होवरा भानपुरवाला या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

वेस्टीन हॉटेल येथील प्रो स्क्वॅश अकादमीच्या स्क्वॅश कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 14 वर्षाखालील मुलींच्या गटात सेंट मेरी स्कुलच्या तानिया आहुजा हिने रावसाहेब पटवर्धन विद्या मंदिरच्या जान्हवी इंगळेचा 11-8, 11-6 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. तर मुलांच्या गटात दिल्ली पब्लिक स्कुलच्या अर्णव नाडकर्णी याने सेंट मेरी स्कुलच्या विवान रांकाचा 11-7, 11-9 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले.

17वर्षाखालील मुलांच्या गटात सेंट मेरी स्कुलच्या कियान लॉयर याने विखे पाटील मेमोरियल स्कुलच्या प्रियांक शिधयेचा 11-5, 11-7 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. तर मुलींच्या गटात विबग्योर हायस्कुलच्या होवरा भानपुरवाला रावसाहेब पटवर्धन विद्या मंदिरच्या गौरी साबळेचा 11-3 ,11-0 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

19वर्षाखालील मुलींच्या गटात सिम्बायोसिस कॉलेज वाणिज्य व कला विद्यालयाच्या श्रुती माने हिने रावसाहेब पटवर्धन विद्या मंदिरच्या सुप्रिया फडकेचा 11-1, 11-2 असा एकतर्फी पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुणे स्क्वॅश रॅकेट संघटनेचे अध्यक्ष कालिदास मगर, पुणे स्क्वॅश रॅकेट संघटनेचे सचिव आनंद लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रो स्क्वॅश अकादमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश पोतदार, माधव बागल आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: 14 वर्षाखालील मुली:
तानिया आहुजा(सेंट मेरी स्कुल)वि.वि.जान्हवी इंगळे(रावसाहेब पटवर्धन विद्या मंदिर) 11-8, 11-6;

14 वर्षाखालील मुले: अर्णव नाडकर्णी(दिल्ली पब्लिक स्कुल) वि.वि.विवान रांका(सेंट मेरी स्कुल) 11-7, 11-9;

17वर्षाखालील मुले: कियान लॉयर(सेंट मेरी स्कुल)वि.वि.प्रियांक शिधये(विखे पाटील मेमोरियल स्कुल) 11-5, 11-7;

17वर्षाखालील मुली:
होवरा भानपुरवाला(विबग्योर हायस्कुल)वि.वि.गौरी साबळे(रावसाहेब पटवर्धन विद्या मंदिर)11-3 ,11-0;

19वर्षाखालील मुली:
श्रुती माने(सिम्बायोसिस कॉलेज वाणिज्य व कला विद्यालय) वि.वि.सुप्रिया फडके(रावसाहेब पटवर्धन विद्या मंदिर)11-1, 11-2.

बलुतेदारांचे प्रश्न सोडविण्यास शासन कटिबध्द – नीलम गोऱ्हे

0

वीर जिवाजी महाले चौकात वीर मावळा शिल्पाचे लोकार्पण संपन्न

पुणे-बारा बलुतेदार हे गावगाड्यातील सेवा वृत्तीने प्रामाणिकपणे काम करणारा महत्वाचा घटक त्यामुळे त्यांना शासन न्याय देण्यास कटिबध्द असून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले . बारा बलुतेदार संघाच्या मागणी व पाठपुराव्यातून तसेच , नगरसेविका पल्लवी जावळे यांच्या विकासनिधीतून साकारलेल्या रास्ता पेठेतील शूरवीर जिवाजी महाले चौकातील वीर मावळा व भव्य पगडीचे त्यांच्या हस्ते लोकार्पण केल्यानंतर झालेल्या भव्य सभेत त्या बोलत होत्या .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर मुक्ता टिळक , प्रमुख पाहुणे नगरसेविका स्मिता रायकर , नगरसेविका पल्लवी जावळे , बारा बलुतेदार संघाचे प्रदेश अध्यक्ष रामदास सूर्यवंशी , माजी नगरसेविका सोनम झेंडे , नाभिक समाजाच्या जेष्ठ महिला कार्यकर्त्या सुमन पवार , विजय खळदकर , सागर पवार , बेबी कऱ्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते .

याप्रसंगी बलुतेदार पुण्यभूषण पुरस्कार गुरुवर्य माउली महाराज वाळुंजकर , उपसभापती नीलम गोऱ्हे , महापौर मुक्ता टिळक ,नगरसेविका पल्लवी जावळे , परिट समाज प्रदेश अध्यक्ष देवराम सोनटक्के , शिंपी समाज ना. स. प. चे प्रदेश अध्यक्ष सुधीर पिसे , उद्योगपती जे. बी. सराफ , शिव व्याख्याता सौरभ करडे , जेष्ठ लोककलावंत प्रवीणराजे सूर्यवंशी , सामाजिक कार्यकर्ते रोहित यवतकर व सुनिल शिंदे यांना बारा बलुतेदार संघाच्यावतीने प्रदान करण्यात आला .

सदर कार्यक्रमास कुंभार , शिंपी , नाभिक , चर्मकार , परिट , लोहार , सोनार आदी बलुतेदार समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता . कार्यक्रमानंतर लोकार्पण सोहळा व गणेश उत्सवानिमित्त गणेश भक्ताना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले .

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बारा बलुतेदार संघाचे सचिव राजेंद्र पंडित , राज्य कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर जावळे , पुणे शहराध्यक्ष राजेश भोसले , उमेश क्षीरसागर , सूर्यकांत भोसले , नानासाहेब आढाव , शोभा यवतकर , विनायक गायकवाड , सागर पवार , दत्त्ता पंडित , माउली रायकर , उत्तम मंडलिक , सचिन राऊत , राजू पोटे , बालाजी तिरमकदार , नंदकुमार सुतार , विक्रम थोरात , पांडुरंग शिंदे , बबनराव काशिद , महेश सांगळे , नितीन भुजबळ , सतीश पांडे , तानाजी निढाळकर , राजू रायकर आदींनी प्रयत्न केले .

यावेळी नगरसेविका पल्लवी जावळे यांनी सांगितले कि , वीर मावळा यांचा आदर्श समाजाला प्रेरणादायी आहे , म्हणून या स्मारकाचे पुण्यनगरीत महत्व मोठे राहील असा मला विश्वास राहिल.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी , यांनी केले तर सूत्रसंचालन चंद्रशेखर जावळे यांनी केले तर आभार सचिव राजेंद्र पंडित यांनी मानले .

भाजपने सुरु केली ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ मोहिम

0
मुंबई-१४ सप्टेंबर- भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुण पिढीसोबत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपल्या पक्षासोबत जोडण्यासाठी डिजीटल प्लॅटफॉर्मवर ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ या मोहिमेची सुरवात केली आहे. या मोहिमेला लवकरात लवकर तळागाळापर्यत पोहचवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी सोशल मिडीयातील फेसबुक, इंन्टाग्राम, ट्विटर, एंड्रॉइट फोनचा आधार घेतला जात आहे. तरुणांना या मोहिमेशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देशातील तरुण पिढीचा दृढ विश्वास आहे. या विश्वासाला अधिक मजबूत करण्यासाठी डिजीटल प्लॅटफॉर्मवर ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ हि मोहिम सुरु करण्यात आल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ मोहिमेची सुरवात करताना भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि कार्यकर्त्यांचा सन्मान हा फक्त भाजपमध्ये मोठ्याप्रमाणत होतो. त्यामुळे भाजपने कार्यकर्त्यांना प्राधान्य देत हि डिजीटल मोहिम सुरु केल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी दिली. ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ या मोहिमे अंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तरुणांची एक नविन फौज तयार करण्याचे काम केले जाणार आहे. यामध्ये तरुण आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्या बहुसंख्य मतदारांचा समावेश असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावर देशातील तरुण पिढीचा विश्वास आहे. त्याचबरोबर भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून, तो देशातील तरुणांना नवी दिशा देण्याचे सातत्याने काम करत आहे. आणि या तरुण पिढीचा भाजपवर दृढ विश्वास आहे. त्यामुळे ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे, महसुल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. राज्यात या मोहिमेत पहिल्याच दिवशी ८ हजार २७९ कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला आणि भाजपचे सदस्य झाले. येणाऱ्या तीन दिवसात हि संख्या अडीच लाख होण्याची शक्यता आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर भाजप आणि त्यांच्या नेत्यांची उपस्थिती ही इतर पक्षातील नेत्यापेक्षा अधिक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नव्या भारताचे स्वप्न साकारण्यामध्ये डिजिटल इंडीया आणि तरुण पिढीचा मोठा सहभाग असणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले. ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ या मोहिमेअंतर्गत भाजपचे सर्वाधिक लक्ष हे कॉलेजमधील तरुणांवर असणार आहे. हे तरुण आहेत, जे मतदार तर झाले आहेत मात्र ते अद्यापही कोणत्याही पक्षाचे सदस्य झालेले नाहीत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा प्रयत्न आहे की, या तरुणांचे पहिले मत हे भाजपला मिळावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात अधिक बळकट करण्यात सहभागी व्हावे. त्यामुळेच ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ हि मोहिम डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरु करण्यात आली आहे.

पहा असा झाला दिल्ली दरबारी महाराज उदयनराजेंचा भाजपामध्ये प्रवेश (व्हिडीओ)

0

पुणे-उदयनराजे भोसले यांनी शनिवारी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. अमित शाह, जे. पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी कमळ हाती घेतलं. त्यांनी यापूर्वी शुक्रवारी मध्यरात्री आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला होता.

“छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज भाजपासोबत आले आहेत. भाजपाच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करतो. त्यांनी आज तीन महिन्यातच खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. भाजपा पूर्वीपासून छत्रपतींच्या विचारातून प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकसभेपेक्षाही विधानसभेत आणखी मोठा विजय मिळेल,” असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. “2014 मध्ये महाराष्ट्राची जनता मनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडली गेली होती. 2019 मध्येही महाराष्ट्राच्या जनतेने याची प्रचिती दिली. विधानसभेतही मोठं यश मिळेल. उदयनराजेंच्या प्रवेशान सर्व खुष आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचं नाव ज्यांनी मोठं केलं असे उदयनराज यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला ही अभिमानास्पद बाब आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला तेव्हाही उदयनराजेंनी मोदींची साथ दिली होती. उदयनराजे लोकांमध्ये राहणारे नेते आहेत. ते राजे जरी असले तरी लोकशाहीवर विश्वास ठेवून आहेत. जनतेत काम करत असल्यानं युवकांचं त्यांच्यावर मोठं प्रेम आहे. त्यांच्या येण्यानं भाजपाची ताकद वाढली आहे,” असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं. तसंच यावेळी चंद्रकांत पाटील यांनीदेखील आपलं मत व्यक्त केलं. “उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. तसंच ते साताऱ्याचं नेतृत्व करत आहेत. त्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून ते अन्य पक्षाशी जोडलेले असले तरी भाजपाशी उत्तम संबंध आहेत,” असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील चार खासदारांपैकी उदयनराजे भोसले हे एक होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडंल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, साताऱ्यात आता पोटनिवडणूक पार पडणार असून ती विधानसभेबरोबर पार पडेल किंवा त्यानंतर हे पाहावे लागणार आहे. परंतु हा गड आपल्याकडे राखणं हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठे आव्हान असणार आहे. यापूर्वी उदयनराजे यांचे बंधू शिवेंद्रराजे भोसले यांनीदेखील भाजपामध्ये प्रवेश केला. तसंच विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हेदेखील भाजपाच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु शुक्रवारी त्यांनी सध्या आपण राष्ट्रवादीत असून पुढचं पुढं पाहू असं म्हणत तुर्तास या चर्चेला पूर्णविराम दिला होता.

यापूर्वी 1995 मध्ये उदयनराजे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. परंतु पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला त्यांचा फायदा न झाल्यानं त्यांना भाजपानं दूर केलं होतं. शुक्रवारी उदयनराजे भोसले यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. “आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील,” असं त्यांनी यात म्हटलं होतं.

गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेदेखील उपस्थित होते. बैठकीत उदयनराजे यांचं मन वळवण्यात शरद पवारांना यश आलं आहे असं म्हटलं जात होतं. पण भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मी आणि मुख्यमंत्री उदयनराजेंच्या संपर्कात असून ते भाजपात येतील याबद्दल आशावादी असल्याचं सांगितलं होतं. यामुळे नेमकं काय होणार याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते. पण अखेर चर्चेला पूर्णविराम मिळाला.

फटाक्यांच्या आतिषबाजी ने वेधले लक्ष

0
पुणे- यंदा  शोभेच्या फटाक्यांची आतिषबाजी ,ढोल ताशाचा गजर आणि फुलांनी सजविलेला रथ अशी लक्षवेधी मिरवणूक छत्रपती राजाराम मंडळाने काढली होती
या विसर्जन मिरवणुक सुमारे ८ वाजता रात्री  सुरवात झाली. कार्यकर्ते विसर्जन मिरवणुकीस मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
” गणपती बाप्पा मोरिया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला ” या जय घोषणात बाप्पा चे विसर्जन करण्यात आले. अलका टॉकीज चौकात महापौर मुकता  टिळक यांनी गणपती बाप्पा ची व छत्रपती राजाराम मंडळ कारविर निवासीनी कोल्हापूर येथील महालक्ष्मी अंबाबाई  ची  आरती केली, या वेळी  छत्रपती राजाराम मंडळचे अध्धाक्ष युवराज निंबाळकर व मंडळातील पधादिकारी उपस्थित होते. महापौर यांनी युवराज निंबाळकर यांचे श्रीफळ देऊन स्वागत केले. विसर्जन  अलका टॉकीज जवळ घाटावर  बाप्पांचे  विसर्जन ३. ३० वाजता करण्यात आले.

‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ गाण्यावर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी धरला ठेका

0

पुणे-  पुण्यात गुरुवारी मोठ्या उत्साहात गणपती विसर्जन सोहळा पार पडला. विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांसह अनेक नेतेमंडळीही सहभागी झाले होते. महापौर मुक्ता टिळक यादेखील विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत्या. यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ गाण्यावर ठेका धरत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

तसे महापौर कोणीही असो कधीही असो ,गणेश विसर्जन मिरवणूकीचा आनंद आपापल्या परीने घेत असतात ,तसा त्यांनी आनंद घेतला …

आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. याचदरम्यान गणेशोत्सव आल्याने राज्यातील अनेक भागात इच्छुक उमेदवार गणेश मंडळांच्या गाठीभेटी घेताना पहावयास मिळाले. गुरुवारी लाडक्या गणरायाला सर्वांनी निरोप दिला. विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होत राजकीय मंडळीनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

पुण्यात देखील सकाळपासून भव्य अशा मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकीला पुणेकर नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. तर या सर्व मंडळाचे स्वागत महापौर मुक्ता टिळक यांनी अलका चौकात उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये श्रीफळ देऊन केले. यावेळी महापौर मुक्ता टिळक यांना एका गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही . ते गाणं होतं ‘मला आमदार झाल्यासारखे वाटतंय’…त्यांनी पाहता पाहता या गाण्यावर ठेका धरला.

महापौर मुक्ता टिळक या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कसबा मतदार संघातून भाजपकडून इच्छुक आहेत. याच मतदारसंघातून भाजपकडून अनेक नेते मंडळी इच्छुक असल्याने महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देणार काय ? हे पाहावे लागणार आहे.