Home Blog Page 2841

‘नवाज शरीफ यांच्या घरी बिर्याणी खाणाऱ्यांनी पवारांवर आरोप करू नयेत’

0

मुंबई : पाकिस्तानातील शासक-प्रशासक आम्हाला नाही तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच चांगले वाटतात आणि म्हणूनच ते पाकिस्तानात नवाज शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेले होते, असा प्रत्यारोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिक येथील सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांना शेजारी देश चांगला वाटतो, ही त्यांची मर्जी पण पवारांसारख्या अनुभवी व ज्येष्ठ नेत्याने असं राष्ट्रहिताविरोधात वक्तव्य करणं दुर्दैवी आहे, असे पंतप्रधान म्हणाले होते. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार काय बोलले, याची माहिती न घेता पंतप्रधान चुकीचा व खोटा प्रचार करत आहेत. ते म्हणतात तसं विधान पवारांनी केलेलंच नाही. पाकचे राज्यकर्ते आणि सैन्यदलाचे लोक भारत विरोधी आहेत पण तेथील जनता मात्र तशी नाही, असे पवार म्हणाले होते, असे मलिक यांनी नमूद केले. पवारांच्या विधानाचा व्हिडिओ तपासण्याचे आव्हानही मलिक यांनी दिले. मोदींचे आरोप खरे ठरले तर आम्ही राजकारण सोडू आणि त्यात तथ्य आढळलं नाही तर मात्र त्यांनी देशाची माफी मागायला हवी, असे आव्हानच मलिक यांनी दिले. पाकिस्तानचे राज्यकर्ते आणि शासनकर्ते आम्हाला नाही तर तुम्हालाच चांगले वाटतात. म्हणून तर तुम्ही काबूल येथून दिल्लीला येण्यासाठी निघालेले असताना विमान मध्येच उतरवून लाहोरला नवाज शरीफ यांचा वाढदिवस साजरा करायला व तिथे बिर्याणी खायला गेला होतात, असा निशाणाही मलिक यांनी साधला. पाकमधील राज्यकर्त्यांघरी बिर्याणी खाणाऱ्यांनी इतरांवर आरोप करू नयेत, असा टोलाही मलिक यांनी लगावला.

महिलांसाठी आयोगाचे डिजिटल साक्षरता अभियान – राज्यभरात पाचशे कार्यशाळा घेणार; अध्यक्षा विजया रहाटकर यांची माहिती

0

मुंबई-बचत गटांच्या महिलांसाठी प्रशिक्षणाचा प्रज्ज्वला कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने डिजिटल साक्षरता अभियान हाती घेण्याचे ठरविले आहे. यामध्ये राज्यभरात पाचशे कार्यशाळा घेतल्या जाणार असून महिलांना, विशेषतः ग्रामीण महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाची सफर घडवून आणली जाणार आहे.

या अभिनव उपक्रमाची सविस्तर माहिती देताना, महाराष्ट्र राज्य महिला
आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर म्हणाल्या, “एक महिला शिकली की ती
संपूर्ण घराला शिक्षित करते आणि ती आपल्या घराबरोबरच इतरही चार घरांतील
महिलांना शिक्षित करते. डिजिटल साक्षरता ही काळाची गरज आहे. म्हणूनच
महिलांना खर्‍या अर्थाने सक्षम आणि स्वावलंबी करायचे असेल तर डिजिटल
साक्षर करणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही विविध स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये यांच्या मदतीने राज्यभर पाचशे कार्यशाळा घेणार आहोत. त्यासाठी संस्थांना अनुदानही दिलेले आहे.”

श्रीमती रहाटकर पुढे म्हणल्या, की डिजिटल साक्षरता म्हणजे रोजच्या
जीवनात अर्थपूर्ण कार्य करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान समजण्याची आणि
वापरण्याची कुठल्याही महिलेची, व्यक्तिची किंवा समाजाची क्षमता. भारताला
डिजिटली सक्षम समाज बनविणे या महत्वाकांक्षी उद्देशाने सरकारने डिजिटल
इंडिया कार्यक्रम सुरु केलेला आहे. ग्रामीण भागातील महिलांना या प्रवाहात
पूर्णपणे समाविष्ट करणे, हा आयोगाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यशाळेत तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली महिलांमध्ये डिजिटल सेवा आणि तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रॅक्टिकल लर्निंग्जवर भर हे या कार्यशाळांचे वैशिष्ट्य राहील.

ग्रामीण भागातील महिलांना डिजिटल उपकरणांचा (स्मार्ट फोन्स) वापर, इंटरनेटचा कार्यक्षम वापर, दैनंदिन गरजेची महत्वपूर्ण अप्स (उदा. ‘उमंग’, ‘आपले सरकार’, ‘ई-जीईएम’, ‘डिजीलॅकर’, ‘आयआरसीटीसी’) डिजिटल पेमेन्ट (उदा. ‘भीम’, ‘फोनपे’), सायबर सुरक्षा आदींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या अभियानासाठी आयोगाने ५० प्रशिक्षकांची फळीदेखील सज्ज केलेली आहे. त्यांचे दोन दिवसांचे प्रशिक्षणही पुण्यात नुकतेच घेण्यात आलेले आहे.

गेल्या काही महिन्यांत आयोगाने तीन महत्वपूर्ण उपक्रम राबविलेले आहेत. पालखी सोहळ्यांमध्ये ‘वारी नारीशक्ती’ची या सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापराबाबत जनजागृती, ‘प्रज्वला’ योजनेंतंर्गत बचत गटांच्या महिलांना आर्थिक आणि कायदेशीर प्रशिक्षण आणि आता डिजिटल साक्षरता अभियान आयोजित केले जात आहे.

महाराष्ट्राने काश्मीरी जनतेची पाठराखण भक्‍कम केली पाहिजेः पं. वसंतराव गाडगीळ

0

पुणे-‘‘आम्‍हाला काश्मीरात भारतीय म्‍हणूनच जगायचे आहे आणि भारतीय म्‍हणूनच मरायचे आहे. ‘भारतमाता की जय अन वंदे मातरम् ’असा जय घोष करीतच आम्‍ही येथे जगू इच्‍छितो. आपल्‍या विश्वशांति महायागामुळे आमची आम्‍ही भारतीय ही श्रध्दा भक्‍कम होते. यामुळे असेच विश्वशांती यागाचे राष्ट्रएैक्‍यासाठीचे उपक्रम जम्‍मू भागातील १० आणि काश्मीर राज्‍यातील १० जिल्‍ह्यातून संपन्न व्‍हावेत असे मानस जम्‍मू काश्मीर राज्‍यातील सामान्‍य जनतेकडून ऐकायला मिळाले. महाराष्ट्राने काश्मीरी जनतेची पाठराखन भक्‍कम केली पाहिजे.’’असे एमआयटी विश्वशांती विश्वविद्यालयाचे गुरूकुलाचे आचार्य शारदा ज्ञानपीठ संस्‍थापक पं. वसंतराव गाडगीळ यांनी एका आठवडाच्‍या जम्‍मू काश्मीर दौऱ्यानंतर येथे सांगितले.
मनतलाई ( उधमपूर) येथे काश्मीरच्‍या सर्वज्ञपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य श्री अमृतेश्वरानंदन देवतीर्थ महाराज यांच्‍या चतुर्मास्य समाप्‍तीचा सोहळा पं. गाडगीळ यांच्‍या ९० व्‍या वर्धापन निमित्ताने विशेष बहुमानाने १४ सप्‍टेंबर २०१९ भाद्रपद पौर्णिमेला संपन्न झाला. काठमांडूहून नेपाळी पंडित, आंध्र, तामिळनाडूचे दक्षिणी वैदिक आणि महाराष्ट्रातून निमंत्रिलेले एमआयटी विश्वविद्यालयाचे पं. गाडगीळ यांच्‍या सहभागाने विश्वशांतीयाग संपन्न झाला. चैत्रेच्‍या रामानुजमिशन ट्रस्‍ट तर्फे विश्वशांती महायागाच्‍या काश्मीर राज्‍यभर २० ठिकाणी संकल्‍पित कार्यक्रमासाठी पं. गाडगीळ यांच्‍या हस्‍ते एकलक्ष आठ हजार रूपयांचा निधी जगद्गुरूचरणी अर्पण करण्यात आला. जगद्गुरू शंकराचार्य सर्वज्ञपीठ आणि चैत्रेव रामानुजमिशन ट्रस्‍टने पं. गाडगीळ यांना नव्वदी निमित्त बहुमान केला.
आपण आपले नव्वदीवे पूर्ण वर्ष महराष्ट्र आणि जम्‍मू काश्मीर या राज्‍यांचे स्‍नेहबंध सुदृढ व्‍हावेत म्‍हणून संपूर्ण काश्मीर संचार करणार आहे. पं. गाडगीळ यांनी सांगितले.

‘स्टीमलॉक इंजिनिअरिंग’तर्फे जगातील पहिला झिरो लिक फ्लोट ट्रॅप एसएलएफटी75 सादर

0

       ऊर्जासंवर्धन व स्वच्छ पर्यावरणाची वाढती गरज एसएलएफटी75 पूर्ण करणार

पुणे-ग्राहक सुरक्षित स्टीम इंजिनिअरिंग उत्पादने बनवणाऱ्या स्टीमलॉक इंजिनिअरिंग या पुणे-स्थित कंपनीने जगातील पहिला झिरो लिक फ्लोट ट्रॅप एसएलएफटी75 सादर केला आहे. ग्राहकांना ऊर्जासंवर्धन व स्वच्छ पर्यावरणाच्या मोहिमेत सक्षम करणारी अद्वितीय, विश्वसनीय व देखभालीस सोपी उत्पादने मिळवून देण्याच्या कंपनीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून हे उत्पादन बाजारात आणले आहे. त्याचे उद्घाटन अमेरिकेतील एनेम्टेक कॅपिटल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश देसाई यांच्या हस्ते आज पुण्यातील हॉटेल प्राईड येथे आज (१८ सप्टेंबर २०१९) झालेल्या एका समारंभात करण्यात आले.

 स्टीमलॉक इंजिनिअरिंग ही सप्टेंबर २०१७ मध्ये सुरु झालेली स्टार्टअप कंपनी स्टीम इंजिनिअरिंग उत्पादने बनवते. ती स्टीम इक्विपमेंट्स या समूहातील उपकंपनी आहे. स्टीम इक्विपमेंट्स हा भारतातील एसडब्ल्यूएएस सिस्टिम्समधील आघाडीचा समूह असून त्याची स्थापना अध्यक्ष रशीद सईद यांनी वर्ष २००४ मध्ये केली. शून्य भांडवलापासून सुरवात करुन १५ वर्षांत या समूहाने ६० कोटी रुपये उलाढालीचा टप्पा गाठला असून त्याचा अभिमान असल्याचे रशीद सईद यांनी बोलून दाखवले.

 कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरपेंद्र सिंग म्हणाले, “स्टीमलॉक भारत व परदेशांत झपाट्याने विस्तारत असून तिने अभिनव दर्जेदार उत्पादने व उच्च श्रेणीची ग्राहकसेवा देऊन सातत्यपूर्ण प्रगतीचा आकृतिबंध कायम राखला आहेच, शिवाय वाढत्या प्रमाणात विश्वासू व संतुष्ट ग्राहकवर्गही प्राप्त केला आहे.”

एसएलएफटी75 हे स्टीमलॉक श्रेणीच्या उत्पादनांमधील सर्वांत आधुनिक आहे जे देखभाल काळ कमी करणारी उत्पादने ग्राहकांना देण्याच्या कंपनीच्या कटिबद्धतेवर भर देते. एसएलएफटी75 उत्पादन ग्राहकांच्या जागेची बचत करुन सांध्यांतील गळत्याही (लिकेज जॉइंट्स) कमी होतील याची खात्री देते.

“स्टीमलॉक बॉल फ्लोट ट्रॅप केवळ ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करणारा नसून ऊर्जा संवर्धनाबाबतच्या अपेक्षा ओलांडणाराही आहे. समाजाला स्वच्छ पर्यावरण मिळवून देण्याच्या आमच्या प्रयत्नांत हे उत्पादन बिनीचे ठरेल. सर्वोत्तम अभिनवतेमुळे एसएलएफटी75 हा झिरो स्टीम लिक ट्रॅप ठरला आहे.”, असे नरपेंद्र सिंग यांनी नमूद केले.

 स्टीमलॉकची कार्यशाळा म्हाळुंगे येथे २५००० चौरस फूट क्षेत्रात विस्तारलेली आहे. केवळ १८ महिन्यांच्या काळात स्टीमलॉकने ५० विविध उत्पादने विकसित केली आहेत. पहिल्याच वर्षी कंपनीने पाच कोटी रुपयांच्या आसपास उलाढाल गाठली असून नऊ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स बुक केल्या आहेत. चालू आर्थिक वर्षात १८ कोटी रुपये उलाढालीचे लक्ष्य समोर ठेवण्यात आले आहे. कंपनीने भक्कम ग्राहकवर्ग मिळवला असून त्यात आघाडीच्या कंपन्या व बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. स्टीमलॉक आपल्या ग्राहकांना जागतिक दर्जाची उत्पादने व सेवा देत आली आहे.

‘पीआयएलफ’मध्ये ‘विश्वकर्मा’कडून ६० पुस्तकांचे प्रकाशन

0
डॉ. मीरा बोरवणकर, डॉ. के. व्यंकटेशम, सिद्धार्थ शिरोळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन; लेखकांशी संवादाची संधी
पुणे : विश्वकर्मा पब्लिकेशन्स प्रस्तुत व डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने २० ते २२ सप्टेंबर २०१९ या कालावधीत यशदा येथे होत असलेल्या सातव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलमध्ये विश्वकर्मा पब्लिकेशन्सतर्फे तब्बल ६० मराठी व इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. तसेच ‘मराठी आज व उद्या’ या विषयावर चर्चासत्र, ख्यातनाम व नवोदित लेखकांशी वाचकांचा थेट संवाद होणार आहे, अशी माहिती विश्वकर्मा पब्लिकेशनच्या संचालिका तृप्ती अगरवाल व मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी ख्यातनाम लेखक वीरेंदर कपूर, संपादक मनोहर सोनवणे, लेखक संदीप तापकीर आदी उपस्थित होते.
विशाल सोनी म्हणाले, “पुण्यासह राज्यात आणि देशात विश्वकर्मा पब्लिकेशन्स अनेक लेखकांना लिहिते करीत आहे. विदेशातील लेखकही आपली पुस्तके भारतात आणू इच्छित असून, त्यासाठी विश्वकर्माने पुढाकार घेतला आहे. मराठीच्या, साहित्याच्या भल्यासाठी जेजे करणे शक्य आहे, तेते करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यामुळेच आज आम्ही १८ राज्यांत, ५६ जिल्ह्यात २९१ पेक्षा अधिक पुस्तकालय, जवळपास १०० वितरक आणि २०-२५ पुस्तक प्रदर्शन अशा स्वरूपात काम करत आहोत. पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलच्या निमित्ताने ३० मराठी व ३० इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. त्यामध्ये माजी पोलीस अधिकारी डॉ. मीरा बोरवणकर यांच्या ‘इन्स्पेक्टर चौगुले, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या संकल्पनेतून साकारलेले पुणे पोलिसांच्या कामगिरीचा आढावा घेणारे ‘पोलीस फाईल्स’, पीएमपीएलचे संचालक सिद्धार्थ शिरोळे लिखित ‘आजचा दिवस माझा’, नरेंद्र गोईंदानी लिखित एकूण १२ पुस्तके, प्रतिभा रानडे लिखित ‘अमीर खुसरो’, संदीप तापकीर लिखित ‘अपरिचित दुर्गांची सफर’, वर्धमान जैन लिखित ‘मिठाचा गोडवा’ यासह ग्रुप कॅप्टन दीपक आपटे, वीरेंद्र कपूर, इस्कॉनमधील डॉ. केशवानंद दास यांच्या पुस्तकांचा यात समावेश आहे. विश्वकर्मा पब्लिकेशन्सने अनेक नवोदित लेखकांना लिहिण्याची संधी दिली आहे. देशभरातून हे युवा लेखक या महोत्सवात सहभागी होणार असून, वाचकांशी थेट संवाद करणार आहेत.”
“मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ‘मराठी आज आणि उद्या’ या विषयावर विशेष चर्चासत्र ठेवण्यात आले असून, त्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे व डॉ. लक्ष्मीकांत देशमुख आपले विचार मांडणार आहेत. डॉ. सदानंद बोरसे या दोघांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या किल्ल्यांच्या न सांगितलेल्या गोष्टी यावर संवाद करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्याकडून काय शिकावे, यावर शिवप्रसाद मंत्री चर्चा करणार आहेत. कादंबरीव्यतिरिक्तचे लेखन व कला याविषयी वीरेंद्र कपूर बोलणार आहेत. पुस्तक वाचन, लेखन यावर विशेष मार्गदर्शन सत्रे या महोत्सवात होतील. ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांचे विचार यावेळी ऐकायला मिळणार आहेत,” असेही विशाल सोनी यांनी नमूद केले.

पाठांतर चिंतन-मनन आणि मातृभाषेतील शिक्षणाला महत्त्व द्या – डॉ.गजानन एकबोटे

0
पुणेप्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल येथे दादासाहेब एकबोटे आंतरशालेय संस्कृत पाठांतर स्पर्धेचा बक्षीस समारंभ संत ज्ञानेश्वर सभागृहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, प्रमुख पाहुणे विघ्नहरी महाराज देव, संस्थेचे कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख, संस्थेच्या सहकार्यवाह,नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे,समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे,नियामक मंडळ सदस्य डॉ.नंदकिशोर एकबोटे, उपकार्यवाह डॉ.निवेदिता एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष व उपकार्यवाह चित्तरंजन कांबळे, शाळेचे व्हिजिटर उद्धव खरे, नियामक मंडळ सदस्य मृगजा कुलकर्णी,मुख्याध्यापिका सांगिता लकारे,उपमुख्याध्यापिका रोहिणी काळे,पर्यवेक्षिका सीमा कुळधरण,माजी पर्यवेक्षक पी.के.जोशी  उपस्थित होते.पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व संस्कृत गीत सादर करून केले. मुख्याध्यापिका संगीता लकारे यांनी प्रस्ताविक केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा परिचय शुभांगी घेवडे यांनी करून दिला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विघ्नहरी महाराज देव म्हणाले,संस्कृत मंत्राच्या उच्चरणामुळे स्मरणशक्ती वाढते,बुद्धी तल्लख होते.वाणी शुद्ध व स्पष्ट होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेची आवड निर्माण केली पाहिजे.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे म्हणाले,संस्कृत ही अतीप्राचीन भाषा आहे.तसेच वेदांची जननी आहे,देव वाणी आहे,ज्ञानाचा महासागर असलेली संस्कृत भाषा खूप सुंदर असून संस्कृत पाठांतर स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळत आहे.विद्यार्थी मित्रांनो पाठांतर शिवाय पर्याय नाही.पाठांतरावर माणूस जीवनात मोठा होतो पाठांतर चिंतन-मनन वाचलेलं जन्मभर विद्यार्थ्यांना त्याची शिदोरी म्हणून पुरत असते.पूर्वी पाठांतराला भरपूर महत्त्व होते.मातृभाषेतूनच विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे तरच विद्यार्थी परिपूर्ण घडतो आणि जीवनात यशस्वी होतो.आज मला आमच्या शिक्षकांची आठवण होते तसेच विद्यार्थ्यांना शिक्षकांची आठवण येईल असे शिक्षण दिले पाहिजे.अनेक शिक्षणतज्ञ म्हणतात पाठांतर नको पण पाठांतर शिवाय शिक्षणाला महत्त्व नाही.संस्कृत भाषेचे व पाठांतराचे महत्त्व ओळखून आपल्या संस्थेने संस्कृत पाठांतर स्पर्धेचे आयोजन केले होते.सातशे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.स्पर्धेतील तीनही परितोषिके महापुरुषांच्या नावाने देण्यात येतात.पहिले बक्षीस – संस्कृत पंडित शहाजीराजे भोसले पुरस्कार- रूचा गोरीवले, आशा भालेकर, भक्ती रेणुसे, अनन्या गोवंडे, सानिया भंडारे, अनुश्री पोळेकर दुसरे बक्षीस – संस्कृत प्रेमी छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार- श्रेया जिरगे, सौम्या कुलकर्णी,सिद्धांत पटवे,नील पत्की,संदेश सरवदे,साक्षी मेहेंदळे तिसरे बक्षीस – लेखक छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार – प्रांजल महाडिक,निशा बन,मधुरा शेळके,आर्या गरगटे,आकांक्षा वाडेकर, ईशान ठाकूर या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले यांचा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभांगी घेवडे,सतीश लिंबेकर, सुमिता पाटील,ईशानी ढेरे,खंडू खेडकर,अमित ओमासे व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

चित्ररसिक घेत आहेत लाईव्ह चित्र-शिल्प स्केचेसचा आनंद

0
पुणे-सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्याच्या हेतूने भारतातील तब्बल दीडशे चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. ‘जाणीव पूरग्रस्तांची’ या नावाने भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आर्ट बिट्स फाउंडेशनच्यावतीने आयोजित हे प्रदर्शन आज (शुक्रवार) आणि उद्या (शनिवार) रसिकांसाठी बालगंधर्व कलादालन येथे सकाळी दहा ते सायंकाळी आठ या वेळेत विनामूल्य पाहायला मिळणार आहे.
        या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनव कला महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल बळवंत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक, दिग्दर्शक मुकेश चौधरी, प्रकाश कोळेकर, चक्रधर बाढेकर, आर्ट बिट्स फाऊंडेशन अध्यक्ष संतोष पांचाळ आदी उपस्थित होते.
        भारतातल्या विविध प्रांतातून तब्बल दीडशे प्रसिद्ध चित्रकार या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात चित्रकारांचा सहभाग असल्याने एकाहून एक सरस चित्रे रसिकांना पाहायला मिळत आहेत. प्रदर्शनाला भेट देणारे रसिक लाईव्ह स्केच आणि निसर्ग चित्रांच्या रेखाटनाचाही अनुभव घेत आहेत. तसेच स्वतःची स्केचही प्रसिध्द चित्रकारांकडून काढून घेत आहेत. पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात भारती विद्यापीठ कला महाविद्यालयातील विद्यार्थी अक्षय दाळे यांनी चित्रशिल्प प्रात्यक्षिके सादर केली. ही प्रात्यक्षिके पाहून कलारसिक हरखून गेले. दुपारच्या सत्रात सातारा येथील चित्रकार प्रदीप क्षीरसागर यांनी निसर्गचित्र प्रात्यक्षिके सादर केली.
        या प्रदर्शनात अनेक चित्रकार कलारसिकाना आपली स्केचेस काढून घेण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत. यातून मिळणारी रक्कम ही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिली जाणार असल्याचे आयोजक आर्ट बिट्स फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पांचाळ यांनी सांगितले.

टीसीएस आयटी विझ २०१९ ची पुणे फेरी प्रतिभा इंटरनॅशनल शाळेने जिंकली

0

पुणे:  माहिती तंत्रज्ञान, सल्ला सेवा आणि व्यवसाय सुविधा पुरविणारी आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) टीसीएस आयटी विझ २०१९ च्या पुणे फेरीच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. टीसीएस आयटी विझ ही देशातील सर्वात मोठी आंतरशालेय तंत्रज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा असून याची पुणे फेरी १९ सप्टेंबर २०१९ रोजी पार पडली.

विजेतेप्रतिभा इंटरनॅशनल स्कूल, पुणे, रिषी एल. आणि रीग्वेद डी.

उपविजेते हचींग्स हाय स्कूल, पुणे, अनिश के. आणि आर्यन जैन

यंदाच्या वर्षी टीसीएस आयटी विझच्या पुणे फेरीत इयत्ता आठवी ते बारावीच्या ६५० हून जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या टोटल या संस्थेच्या रिफायनरी 4.0 प्रोग्रामचे डिरेक्टर सिल्व्हेन कॉमिटी आणि टीसीएस पुणे चे सेंटर हेड सचिन रत्नपारखी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. भाग्यशाली विजेत्यांना ट्रॉफी व ६०,००० रुपयांची गिफ्ट व्हाउचर्स देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांना यावर्षीच्या अखेरीस मुंबई येथे होणार असलेल्या राष्ट्रीय अंतिम फेरीत पुणे शहराचे प्रतिनिधित्व करण्याचा मान देखील मिळणार आहे. राष्ट्रीय अंतिम फेरीत त्यांच्यासोबत इतर ११ क्षेत्रीय विजेते असतील. पुणे फेरीच्या उपविजेत्यांना खास डिझाईन केलेले मेडल्स व ४०,००० रुपयांचे गिफ्ट व्हाउचर्स देण्यात आले. तसेच पुणे फेरीच्या अंतिम टप्प्यातील चार संघांना देखील ५००० रुपयांची गिफ्ट व्हाउचर्स देण्यात आली.

या स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांमधील कितीतरी जणांनी ट्विटर व इन्स्टाग्राम स्पर्धेत भाग घेतला. टीसीएस आयटी विझ २०१९ च्या पुणे फेरीबद्दल  3046 ट्विट्स व 36 इन्स्टाग्राम स्टोरीज करण्यात आल्या. ‘सर्वात जास्त ट्विट्स’ आणि ‘दिवसभरातील सर्वात चांगले ट्विट’ या स्पर्धांच्या विजेत्यांना विशेष बक्षिसे देण्यात आली. इन्स्टाग्रामवरील ‘दिवसभरातील सर्वात चांगल्या स्टोरी’ला २००० रुपयांची गिफ्ट व्हाउचर्स देण्यात आली.

तंत्रज्ञान कौशल्यांचा वाढत्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या क्विझमुळे विद्यार्थ्यांना नवनवीन टेक्नॉलॉजी ट्रेंड्सची माहिती मिळते. स्पर्धक तसेच प्रेक्षकांचा उत्साह अधिक वाढावा यासाठी ऍनिमेशनचा यावेळी करण्यात आला. क्विझमास्टर गिरी ‘पिकब्रेन’ बालसुब्रमणियम यांनी स्पर्धेच्या पाचही बझर फेऱ्यांमध्ये आपल्या सूत्रसंचालनाने स्पर्धेची रंगत वाढविली – डेटा सायंटिस्ट, डेटा अनॅलिस्ट, टेक पॅट्रीऑट व ब्लॉक द चेन आणि टीसीएससंदर्भातील विशेष फेरीचा यामध्ये समावेश होता. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग, याच्याशी निगडीत उद्योग, लोक, नवनवीन ट्रेंड्स व लिजंड्स यावर आधारित प्रश्न यावेळी विचारण्यात आले.

भारतात इतर ११ ठिकाणी देखील टीसीएस आयटी विझ २०१९ चे आयोजन केले जाणार आहे – अहमदाबाद, बंगलोर, भुबनेश्वर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, इंदोर, नागपूर, कोची, कोलकाता, मुंबई आणि पुणे. गेल्या वर्षी देशभरातून या स्पर्धेमध्ये १२०६ शाळांचे १३,९०८ विद्यार्थी सहभागी झाले होते.

‘शरद पवारांनी राष्ट्रहिताविरोधात वक्तव्य करणं दुर्दैवी’-पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

नाशिक:
‘शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. विरोधक म्हणून त्यांनी आमच्यावर टीका करावी पण राष्ट्रहिताविरोधात वक्तव्य करणं दुर्दैवी आहे. शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटतो. ही त्यांची मर्जी. तेथील नेते त्यांना कल्याणकारी वाटतात. पण हे संपूर्ण देशाला माहिती आहे की, दहशतवाद्यांची फॅक्टरी कुठे आहे?,’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. नाशिकमध्ये आज भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप झाला. या समारोपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती लाभली होती. त्यावेळी ते बोलत होते.गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात चांगली गुंतवणूक, शेतकरी, महिलांचा विकास झाला. भटक्या विमुक्त जाती, मागासवर्गीय जनतेला आवाज मिळाला. पूर्ण बहुमत नसतानाही महाराष्ट्रात प्रगतीशील सरकार भाजपच्या रुपात मिळालं. गेल्या ६० वर्षांत पहिल्यांदा देशात स्थिर सरकार आलं. हे केवळ फडणवीस सरकारचं रिपोर्ट कार्ड नाही; जनतेने स्थिर सरकारचे फायदे लक्षात घ्यायला हवेत. राजकीय अस्थिरतेमुळे गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ बसली होती, पण गेल्या पाच वर्षात महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असं प्रतिपादन मोदींनी केलं. राममंदिर प्रकरणी सुप्रीम कोर्टवर विश्वास ठेवा, असं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले, ‘राम मंदिरावरून वाट्टेल तशी बडबड करू नका. सध्या अनेक लोक वायफळ बडबड करत आहेत.’एक महिना ४,२५० कि.मी. चा प्रवास करत मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेचा आज समारोप केला. मोदी म्हणाले, ‘ज्योतिबा फुलेंपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत कित्येक महापुरुष ज्या महाराष्ट्राने दिले, अशा महाराष्ट्रात कोणतं सरकार, कोणता मुख्यमंत्री सलग पाच वर्षे चालू नये? केवळ दोनच उदाहरणं आहेत एक वसंतदादा आणि दुसरे देवेंद्र फडणवीस. फडणवीसांनी राज्याचं पाच वर्षे सक्षम नेतृत्व केलं आणि महाराष्ट्राला स्थिर सरकार दिलं.भाजपत नुकतेच दाखल झालेले माजी खासदार उदयनराजे भोसले या सभेला व्यासपीठावर उपस्थित होते. केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जयकुमार रावल,आशिष शेलार,पंकजा मुंढे,राधाकृष्ण विखे पाटील,विनोद तावडे, गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते.

छत्रपती उदयनराजे यांनी नाशकात केला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान

0

 

नाशिक-
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा आज गुरुवारी (19 सप्टेंबर) नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप होत आहे. पंचवटीतील तपोवनात ही सभा सुुरु आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यावेळी छत्रपती उदयनराजे यांनी  सन्मान केेला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंट्टीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच पंकजा मुंडे, विनोद तावडे, राम शिंदे, जयकुमार रावळ आदींसह अनेक मंत्रीगण उपस्थित आहे.

महाराष्ट्र आणि गुजरात कधी काळी एकाच ताटात जेवायचे – नरेंद्र मोदी

महाराष्ट्र आणि गुजरात कधी काळी एकाच ताटात जेवायचे. गुजरातमध्ये सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री म्हणून सेवा करण्याची संधी मला दिली. जो फायदा देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे तो कधीकाळी मला मिळाला होता – – नरेंद्र मोदी

दिव्यांगांना मदत ही एक मानव सेवाच होय -डॉ.शिवमुनींजी

0

पुणे-सकल जैन संघ, पुणे ह्यांच्या सौजन्याने व आचार्य सम्राट, परमपुज्य, डॉ.शिवमुनीजी म.सा. यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वर्धमान सांस्कृतिक भवन, गंगाधाम कोंडवा रोड, येथे राज्यभरातील  पहिलेच 300 पेक्षा जास्तचे दिव्यांगांचे मोफत शिबिर यशस्वीरित्या सम्पन्न झाले.

यावेळी आचार्य राष्ट्रसंत सम्राट डॉ.शिवमुनींजी म्हणाले की दिव्यांगासाठी  मदत करणे म्हणजे ही एक उत्तम मानव सेवा होय. पैसा कमवून जो आनंद घेऊ शकत नाही तो आनंद दिव्यंगाची  सेवा केल्याने सहज मिळतो, सोबत आत्मिक समाधानाने माणसाचे आयुष्य वाढते असेही शिवमुनींजी पुढे बोलले.ह्या शिबिरात प्रामुख्याने दिव्यांगांसाठी, ज्याला उभे राहता येत नाही, त्याला उभे करणे, ज्याला चालता येत नाही, त्याला पाय देऊन चालवणे व ज्याला पळता येत नाही, त्याला ट्रायसिकल, व्हीलचेअर देऊन गतिमान करणे, हा उद्देश ठेवल्याने चतुर्मासातील सर्व कार्यक्रमापेक्षा दिव्यांगांचे मोफत शिबीर खऱ्या अर्थाने सार्थक झाल्याने विविध राज्यातील जैन समाजासोबत  पुणेकरांनी देखील  कौतुक केले.

5 ते 15 वर्ष वयोगटातील 150 पेक्षा जास्त दिव्यांगांची तपासणी करून 122 मुलाची शस्त्रक्रिया करणेसाठी निवड केली. कृत्रिम हात व पाय – विकास फूट शिबिर मध्ये 44 लोकांनी सहभाग घेऊन त्यांना लवकरच कृत्रिम हात व पाय – ‘विकास फूट’ देणार आहेत. गरजवंत दिव्यांगांना 14 ट्रायसिकल, 12 व्हीलचेअर चे यावेळी मोफत वाटप देखील केले गेले. ह्या कार्यक्रमातच लायन्स क्लब पुणे – मनस्वी, डिजिटल, प्राईम, सुप्रीम व नवचैतन्य यांच्यातर्फे 150 दिव्यांगांची नेत्रचिकित्सा, डायबिटीस चाचणी व कॅन्सर तपासणीही केली गेली.

या कार्यक्रमास  आचार्य डॉ. शिवमुनीजी महाराज, आचार्य श्री देवचंद्र सुरेश्वरजी म.सा., श्री अचल ऋषीजी महाराज आणि आय.जी.आयरन मॅन कृष्णकुमार जी आवर्जून उपस्थित होते. तसेच सकल जैन संघाचे अध्यक्ष विजयकांतजी कोठारी, राजेशजी सांकला, विजयजी भंडारी, सौ.सुरेखा व लखिचंद खींवसरा तसेच जैन कॉन्फरन्स, नवी दिल्लीचे अध्यक्ष श्री पारसजी मोदी, उपाध्यक्ष अशोकजी पगारिया व त्यांची पूर्ण टीम तसेच महिला अध्यक्ष सौ विमल बाफना जैन, जिल्हा परिषद सी.ई.ओ. उदय जाधव, संजय चोरडिया, सुभाष बाबू लुंकड आदी मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भारत विकास परिषदेतर्फे अध्यक्ष दीपक गुंदेचा,  प्रांतीय अध्यक्ष अनिरुद्ध तोडकर, विकलांग केंद्राचे, श्री विनय खटावकर, जयंत जेस्ते, प्रवीण दोशी, सौ सुशिलाबेन व मोतीलालजी शहा, सौ रेखा व प्रवीणजी जैन, फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन चे अध्यक्ष रघुनाथ ढोक, अतुल सलाग्रे, वासुदेव केंच, मदनलाल दर्डा, आनंद अचल गुरु फाउंडेशनचे अध्यक्ष श्री कुंदन दर्डा, अभय दर्डा, विलास राठोड, वि. टी पालरेषा, डॉक्टर रानडे, लायन्स क्लब तर्फे भाग्यश्री चौंडे, श्रीराम भालेराव व त्यांच्या पूर्ण टीमने परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सीए ऐश्वर्या गुंदेचा आणि विलास राठोड यांनी केले.तर आभार जेष्ठ समाजसेविका सौ. सुशीलाबेन शहा यांनी मानले. यावेळी  अनके बांधवानी देणगी जाहीर करून मोठी मदत केली परंतु या कामासाठी मोठया निधीची,दानसुर लोकांची गरज असल्याचे माहिती गुरुवर्य यांनी दिली. ह्या वेळी प्रचंड जनसमुदाय व  मान्यवर मंडळी उपस्थित होते.

बॅलेट पेपर इतिहासजमा ! निवडणूक EVM वरच होणार-मुख्य निवडणूक आयुक्त

0

मुंबई : अन्य कोणत्याही मशीनप्रमाणे ईव्हीएममध्येसुद्धा तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता नाकारत येत नाही. मात्र, ईव्हीएम हॅक करणे किंवा त्यात छेडछाड करणे अशक्य आहे. मतपत्रिकेवरील मतदान हा इतिहास झाला असून ईव्हीएमद्वारेच मतदान घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी आज केले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आयोगाचे पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोगाने आज दिवसभर सह्याद्री अतिथीगृहात विविध राजकीय पक्ष, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांसह निवडणुकीशी संबंधित विविध यंत्रणांच्या अधिकारी, प्रतिनिधींशी चर्चा केली.

दिवसभर चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सुनिल अरोरा म्हणाले की, काही राजकीय पक्षांनी ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली. मात्र, मतपत्रिका आता इतिहासजमा झाल्या आहेत. मतदान ईव्हीएमद्वारेच होणार असल्याचे आयोगाने संबंधित राजकीय पक्षांना सांगितले आहे. अन्य कोणत्याही मशीनप्रमाणे ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो. मात्र ईव्हीएम हॅक करणे अथवा त्याच्याशी छेडछाड निव्वळ अशक्य आहे. वयाबाबतच्या शंकाचे आयोगाने निरसन केले आहे. तांत्रिक बिघाडांचे प्रमाणही अगदीच नगण्य असून तातडीने पर्यायी व्यवस्थाही केली जाते. शिवाय, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व्हीव्हीपॅटचाही वापर करण्यात येत असल्याचे अरोरा यांनी स्पष्ट केले.

काही पक्षांनी निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे की दिवाळीनंतर निवडणूक घ्या. सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी आलेल्या पुराचाही उल्लेख सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत केला. या भागातल्या लोकांना ज्या संकटाचा सामना करावा लागला त्याची निवडणूक आयोगाला कल्पना आहे असंही अरोरा यांनी स्पष्ट केलं.

यावेळी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष टपाल तिकीट आणि पाकिटाचे अनावरण करण्यात आले. कॉफी टेबल पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्याचे सह मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे लिखित ‘निवडणूक प्रक्रियेचे नियम व कायदे’ या मराठी पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

खासगी कोचिंग क्लासेसवर आयकर विभागाच्या धाडी

0

औ रंगाबाद – औरंगाबाद आणि नांदेडच्या खासगी कोचिंग क्लासेसवर आयकर विभागाने बुधवारी धाडी टाकल्या. यामध्ये नामवंत कोचिंग क्लासेसची नावे समोर येत आहेत. खासगी शिकवण्यांच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईतून कर चुकवले जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावरूनच ही कारवाई करण्यात आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून जीएसटीचे पथक काही खासगी शिकवण्या घेणाऱ्या संस्थांच्या परिसरात तळ ठोकून होते. यानंतर बुधवारी अचानक पहाटेपासूनच आयकर विभागाने धाड टाकण्यास सुरुवात केली. अचानक पडलेल्या या धाडसत्रांमुळे खासगी शिकवण्यांच्या मालक आणि संचालकांचे धाबे दणाणले आहेत. औरंगाबाद आणि नांदेड हे मराठवाड्यातील खासगी कोचिंग क्लासेसचे हब मानले जाते. संपूर्ण मराठवाड्यातील छोट्या-छोट्या शहरांमधून नीट, मेडिकल, सीईटी आणि इतर परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी या शहरांमध्ये येतात. या विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात फी आकारली जाते. तरीही त्या फीमधून येणारा जीएसटी आणि आयकर लपवला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. आयकर विभागाने खासगी क्लासेसवर धाड टाकण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही विभागाने वेळोवेळी तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी धाडी टाकल्या आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, औरंगाबादेत नागपूर आणि नाशिकचे तर नांदेडमध्ये औरंगाबादच्या विभागाचे अधिकारी पाठवण्यात आले आहेत. परंतु, या चौकशी आणि धाडीतून काय निष्पन्न झाले हे अद्याप समोर आलेले नाही.

विश्‍वासराव सरपोतदार प्रसंग नाट्य स्पर्धेत यशवंतराव मोहिते महाविद्यालय प्रथम

0
पुणे- बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) वतीने घेण्यात येणार्‍या विश्‍वासराव सरपोतदार आंतरमहाविद्यालयीन प्रसंगनाट्य स्पर्धेत यशवंतराव मोहिते महाविद्यालयाच्या ‘पॅड’ या प्रसंगनाट्याने प्रथम आणि विश्‍वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘डीप’ने दुसरा क‘मांक पटकाविला.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पहिला क‘मांक पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि दुसरा क‘मांक स. प. महाविद्यालयाला मिळाला. स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके पुढील प्रमाणे ः
अभिनय प्रथम – सिद्धेश नेने, (मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड) आणि अनन्या चट्टोपाध्याय, (डी. वाय. पाटील स्कूल ऑङ्ग इंजिनिअरिंग, लोहगाव)
अभिनय द्वितीय – भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयाचे चार विद्यार्थी आणि रितीका श्रोत्री, पूर्वा देशपांडे (स. प. महाविद्यालय)

या स्पर्धेत ३४ संघांनी सहभाग घेतला. अभिनेत्री नेहा शितोळे आणि अभिनेता ऋतुराज शिंदे यांनी परीक्षण केले. प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, उपप्राचार्य डॉ. आशीष पुराणीक, तन्वी सरपोतदार यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

स्पिटल्स ग्रुपने दाखल केला अपोलो प्रोहेल्थ -आरोग्य व्यवस्थापन कार्यक्रम

0

 

चेन्नई-अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप या भारतातील पहिल्या मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटल्सच्या साखळीने आज अपोलो प्रोहेल्थ प्रोग्रॅम हा अत्यंत प्रभावी, सक्रिय आरोग्य व्यवस्थापन कार्यक्रम दाखल केला आहे. अपोलो प्रोहेल्थ हा पीएचआरएचे (पर्सनलाइज्ड हेल्थ रिस्क असेसमेंट) पाठबळ असणारा, आर्टिफिशिअल इंटलिजन्सवर आधारित पहिलावहिला कार्यक्रम असणार आहे.

अपोलोने केलेल्या 20 दशलक्षांहून अधिक आरोग्य तपासण्यांच्या आधारे, अपोलोमधील प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर क्षेत्रातील तज्ज्ञांनी व संशोधकांनी प्रामुख्याने हा कार्यक्रम तयार केला आहे. आरोग्याला असणारे धोके ओळखण्यासाठी व कमी करण्यासाठी आणि निरोगी व आनंदी आरोग्य जगण्यासाठी प्रोहेल्थ कार्यक्रम व्यक्तींना व व्यवसायांना कृतीयोग्य हेल्थ अॅनालिटिक्सने सक्षम करतो. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीला आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यास मार्गदर्शन करण्यासाठी आणि उत्तम आरोग्य व आनंद मिळवण्यासाठी वैयक्तिक आरोग्य मार्गदर्शक उपलब्ध करून, हा कार्यक्रम तंत्रज्ञान व मानवी घटक यांना एकत्र आणतो.

यावेळी बोलताना, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे अध्यक्ष डॉ. प्रतास सी. रेड्डी यांनी सांगितले, “आपण सर्व जण आजार झाल्यावर ते बरे करण्यावर भर देतो, आजार होऊ नयेत म्हणून काळजी घेण्यावर भर देत नाही. लोकांनी आरोग्यसेवेतील केअरवर भर द्यावा, असे मला वाटते. आजारांवर उपचार करणे, हा आरोग्याकडे जाणारा एकमेव मार्ग नाही. आपण आरोग्याची काळजी घेतली तर आपल्याला आजार बरे करण्याची गरज पडणार नाही. जगासमोर एनसीडींची (नॉन-कम्युनिकेबल डिसिजेस) लाट आली आहे. या लाटेचा धोका तरुण पिढीलाही निर्माण झाला आहे. महत्त्वाकांक्षी व आक्रमक असणाऱ्या आपल्यासारख्या अर्थव्यवस्थेत, आपली क्षमता खऱ्या अर्थाने ओळखण्यासाठी निरोगी नागरिकांची गरज आहे. लाइफस्टाइल डिसिजेस किंवा एनसीडी यांचे प्रमाण वाढत असल्यास हे कधीही साध्य करता येणार नाही. कॅन्सर, डायबिटीस, स्ट्रोक, ओबिसिटी, धूम्रपान यांचा आपल्या क्षमतेवर परिणाम होत जातो. त्यामुळे आपली उत्पादकता व आर्थिक प्रगती यावरही परिणाम होतो. आपल्या आरोग्याला आपण कसे हाताळतो, यामध्ये बदल करण्याच्या दृष्टीने टाकलेले अपोलो प्रोहेल्थ हे एक पाऊल आहे.”

अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपने चार दशकांपूर्वी देशात पहिले ‘पर्सनलाइद्ड प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक’ दाखल केले आणि आता आरोग्यसेवेला नवे आयाम देण्यासाठी आम्ही जगातील सर्वात प्रभावी  प्रिव्हेंटिव्ह हेल्थ मॅनेजमेंट प्रोग्रॅम दाखल करत आहोत. एनसीडींमुळे होणारे अंदाजे 80% मृत्यू रोखता येऊ शकतात आणि अपोलो प्रोहेल्थ कार्यक्रम हे मृत्यू थोपवण्यासाठी मदत करू शकतो,” असे त्यांनी सांगितले.

प्रत्येक व्यक्तीला निरोगी जीवनाच्या दिशेने वाटचाल करताना, एआय-एनेबल्ड पर्सनलाइज्ड हेल्थ रिस्क असेसमेंट (पीएचआरए), आरोग्य मार्गदर्शक व लाइफस्टाइलमधील बदल यामार्फत प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले जाते.”

यानिमित्त अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेडच्या अपोलो फाउंडेशनच्या उपाध्यक्ष उपासना केमिनेनी कोनिडेला यांनी सांगितले, “काम व वैयक्तिक आयुष्य यांची गणिते झपाट्याने बदलते आहे. लाइफस्टाइल डिजिसेजस किंवा एनसीडी (नॉन-कम्युनिकेबल डिसिजेस) यांचे प्रमाण वाढते आहे. आपले मनुष्यबळ एनसीडींना बळी पडते आहे, प्रतिबंध करता येईल अशा मृत्यूंचा त्रास सहन करत आहे आणि स्ट्रोक, डायबिटीस, कॅन्सर, ओबिसिटी, झोप न लागणे, कार्डिआक आजार यामुळे अपंगत्वाचा सामना करत आहे. तरुण वयातच असंख्य जण या आजारांच्या विळख्यात सापडत असल्याने परिस्थिती नाजूक आणि चिंताजनक आहे. कॉर्पोरेटनी आरोग्य हा विषय नियोजनाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे आवश्यक आहे. एनसीडींच्या लाटेचा फटका केव्हाही, कोणालाही बसण्याची भीती असल्याने या समस्येवर उपाय करण्यासाठी अंदाजक्षम साधनांच्या मदतीने एनसीडींची लाट थोपवणे व त्यापासून मनुष्यबळाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. आजच्या गुंतागुंतीच्या व झपाट्याने बदलत्या आरोग्यसेवा विचारात घेता, द्रष्ट्या एम्प्लॉयर्सनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबद्दल व कल्याणाबद्दल नावीन्यपूर्ण दृष्टिकोन अंगिकारण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. मध्यम ते दीर्घकालीन दृष्टकोनातून, क्युरेटिव्ह ते प्रिव्हेंटिव्ह हेल्थ असा बदल केल्यास तो कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल”.

अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपच्या उपाध्यक्ष प्रीता रेड्डी यांनी सांगितले, “नॉन-कम्युनिकेबल डिसिजेस हे आरोग्यसेवेच्या बाबतीतील सर्वात मोठे आव्हान आहे. प्रतिबंधात्मक उपाय केल्यास क्रोनिक लाइफस्टाइल आजार सांभाळता येऊ शकतात, असे डब्लूएचओने म्हटले आहे. आजारांच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांचे निदान होण्यासाठी पर्सनलाइज्ड व आरोग्य व्यवस्थापन कार्यक्रम या स्वरूपातील प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर महत्त्वाची भूमिका बजावू शकते. अपोलो प्रोहेल्थची निर्मिती तीन तत्त्वांवर आधारित आहे – लोकांच्या जीवनात मूर्त, मोजण्यायोग्य बदल आणण्यासाठी प्रेडिक्ट, प्रिव्हेंट व ओव्हरकम. 20 दशलक्षहून अधिक आरोग्य तपासणीद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे जोखीम मोजण्यासाठी एआयचा वापर केला जात आहे. या कार्यक्रमामुळे, देशातील स्वरूपातील प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअरची संकल्पना बदलून जाणार आहे.

अपोलो प्रोहेल्थ चेन्नई व हैदराबाद येथे आज दाखल करण्यात आला आहे आणि यानंतर अन्य मेट्रोंमध्ये दाखल करण्याचे नियोजन आहे. अपोलो प्रोहेल्थ वर्षाअखेरीस संपूर्ण अपोलो इकोसंस्थेमध्ये दाखल केला जाईल व उपलब्ध केला जाईल.