Home Blog Page 2839

पुण्याचा किल्ला मनसे लढविणार

0

पुणे : लोकसभा निवडणूकीत एक पाऊल मागे घेत निवडणूका न लढविण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला होता. मात्र, कार्यकर्त्यांच्या रेटयापुढे आता पक्षाने विधानसभा निवडणूका लढविण्याचा निर्णय घेतला असून पुण्यातील आठही जागांवर मनसे आपले उमेदवार उभे करणार आहे. दरम्यान, पुण्यातील उमेदवारांची यादी निश्‍चित झाली असून या महिन्याच्या अखेरीस ती जाहीर केली जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाबू वागसकर यांनी दिली. त्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत इच्छूकांच्या बैठका सुरू असल्याचेही ते म्हणाले. तसेच पुण्यातून प्रत्येक मतदारसंघासाठी दहा पेक्षा अधिक इच्छूकांनी तयारी दर्शविली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणूकांनतर मनसेने निवडणूका पुन्हा बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. तसेच निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचीही भूमिका घेतली आहे. त्याच वेळी राज्यात मनसेने आघाडीत सहभागी व्हावे अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी आग्रही असली तरी कॉंग्रेसकडून अद्यापही त्याबाबत काही भूमिका न घेतल्याने मनसे आघाडीत राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मनसेकडून विधानसभा निवडणूक लढविली जाणार की नाही याबाबत चर्चांना उधान आलेले असतानाच; पक्षाकडून राज्यात 100 जागांवर निवडणूक लढविली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे .

मनसेकडूनही याबाबत निर्णय  घेण्यासाठी पक्षाच्या बैठका सुरूच आहेत. या बैठकांमध्ये पुण्यातील काही पदाधिकारी विधानसभेलाही पक्षाने थांबावे अशी भूमिका घेत होते.मात्र, इच्छूकांनी त्यास नकार देत पाच वर्षे तयारी केली असून आम्ही निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे स्पष्ट करत निवडणूक लढविण्याचा आग्रह ठाकरे यांच्याकडे धरला होता. अखेर मनसेने इच्छूकांच्या मागणीनुसार, ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून पुण्यात आठ जागांवर तसेच जिल्ह्यातही उर्वरीत 10 ते 12 जागांवर मनसेकडून उमेदवार दिला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्याच वेळी मनसेकडून राज्यात केंद्र व राज्यशासना विरोधात घेण्यात आलेल्या सभांचा फायदा आघाडीच्या उमेदवारांना झाला होता. त्यामुळे मनसेने विधानसभेसाठी उमेदवार दिल्यास त्याचा फटका आघाडीला बसणार की युतीला हे निवडणूक निकालानंतरच समोर येणार आहे.

पुण्यात मनसेकडून आठही जागांसाठी इच्छूक आग्रही आहेत. त्यानुसार, पक्षाकडून सर्व आढावा घेतला असून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातही 10 ते 12 ठिकाणी पक्षाकडून उमेदवार दिले जातील. पक्षाची पुण्याची यादी तयार असून इच्छूकांना मुंबईत बोलवून त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. पक्षाची यादी या महिना अखेरीस जाहीर केली जाईल.असेही वागस्कर यांनी स्पष्ट केले आहे.

शिवाजी महाराज, बाजीराव पेशवा यांच्याकडून नेतृत्वगुण शिकावेत : शिवप्रसाद मंत्री

0
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वात एकमेव राजे आहेत, ज्यांना जनतेने श्रीमंतयोगी आणि जाणता राजा बिरुदे दिली. शिवाजी महाराजांना अवतार आणि परमेश्वर असेही संबोधले जाते. कारण त्यांनी जनतेचे प्रतिनिधित्व केले आणि जनतेला पारतंत्र्यातून मुक्त केले. श्रीमंत बाजीराव पेशवा हेही छत्रपतींप्रमाणे जनतेसाठी लढणारे राजे होते, “असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक शिवप्रसाद मंत्री यांनी केले.
बाणेर रस्त्यावरील यशदा येथे आयोजित पुणे इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशनावेळी बोलत होते. यावेळी विश्वकर्मा पब्लिकेशनचे अध्यक्ष राजकुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, श्री. मा. भावे, संदीप तापकीर आदी उपस्थित होते.
शिवप्रसाद मंत्री म्हणाले, “छत्रपतींसारखा राजा आपल्याला लाभला हे आपले भाग्य आहे. त्यांचे मावळे अजूनही जिवंत आहेत. चरित्रवान राजा असल्यामुळे त्यांचे त्यांच्या कार्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न सर्वजण करतात. परंतु आजची पिढी फक्त त्यांचा उत्सव साजरा करतात आणि त्यांचे कार्यावर चालत नाहीत. शिवाजी महाराजांवर अनेक पुस्तके आले. परंतु हे पुस्तक तुम्हाला त्यांचा वेगळा परिचय करून देईल. शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवा यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. शिवाजी महाराज, बाजीराव पेशवा वाचला तर आपल्यातील नेतृत्वगुण विकसित होतील.”
विशाल सोनी म्हणाले, “गुरुमुळे पुस्तक प्रकाशनपर्यंतचा प्रवास करू शकलो आज विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित करत आहोत. देशातली एकमेव प्रकाशन संस्था आहे, जी १९ राज्यामध्ये आणि ८२ शहरामध्ये पुस्तक प्रकाशित करत आहे. तसेच ही सर्व पुस्तके ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहेत.” सूत्रसंचालन मधुरा गुळवणी यांनी केले

एक देश एक भाषा देशाच्या एकतेसाठी याेग्य नाही : शशी थरुर

0

पुणे :एक भाषा एक देश हे धाेरण भारताच्या एकतेसाठी याेग्य नाही. 1965 मध्ये भारताने त्री भाषीय धाेरण अवलंबले आहे. एक देश एक भाषा धाेरण राबविल्यास भारतातील विविध भाषिक लाेकांना दुय्यम वागणूक दिल्यासारखे हाेईल. असे मत काॅंग्रेसचे खासदार नेते शशी थरुर यांनी व्यक्त केले.

पुण्यातील काॅंग्रेसभवन येथे आयाेजित केलेल्या ऑल इंडिया प्राेफेशनल काॅंगेसच्या बियाॅन्ड पाॅलिटिक्स या कार्यक्रमात ते बाेलत हाेते.

गृहमंत्री अमित शहा यांनी एक देश एक भाषा या धाेरणाबद्दल व्यक्तव्य केले हाेते. हिंदी हि संपूर्ण देशाची भाषा व्हावी असे ते म्हणाले हाेते. यावर बाेलताना थरुर म्हणाले, एक देश एक भाषा हे भारताच्या विविधतेसाठी तसेच एकतेसाठी याेग्य नाही. त्री भाषीय धाेरणाचा आपण अंगिकार केला पाहिजे. भाजपाचे राजकारण हे हिंदी, हिंदुत्व याच्या भाेवतीच चालते. त्यांना दक्षिण भारतामध्ये मते मिळत नाहीत. एक देश एक भाषा केल्यास भारतातील विविध भाषिक लाेकांना दुय्यम वागणूक दिल्यासारखे हाेईल.

काॅंग्रेसबद्दल बाेलताना ते म्हणाले, काॅंग्रेस हे एकात्मेबाबत बाेलते. गेल्या काही वर्षांमध्ये माॅब लिंचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 2014 च्या निवडणुकीनंतर लाेकांमध्ये इतका बदल झाला की माॅब लिंचिंग करण्याची लाेकांमध्ये हिंमत आली. माॅब लिंचिंग करणारा आपला भारत नाही. हिंदू असल्याचा मला अभिमान आहे परंतु लाेकांचा जीव घेण्यास सांगणारा हिंदू धर्म माझा नाही. रामाच्या नावावर माॅब लिंचिंग करणं हा रामाचा अपमान आहे.

हिंदुत्वाच्या नावावर हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधकांनी विरोध केला की त्यांना पाकिस्तानात जाण्यास संगण्यात येते. भाजप जरी सत्तेत असलं तरी त्यांना सर्व भारतीयांचे समर्थन नाही. युपीए च्या काळात भारताची अर्थव्यवस्था प्रगती करत होती. मोदी मन की बात करतात, परंतु त्यांच्या अर्थमंत्री धन की बात करत नाहीत. भाजप कडून तोडण्याचे राजकारण केले जाते. असेच राजकारण पुढे ही चालले तर देशाची अवस्था बिकट होईल. असेही ते यावेळी म्हणाले.

हृदयविकार टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल आवश्यक- श्रीकांत मुंदडा

0
पुणे : “बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार होत आहेत. भारतामध्ये हृदयविकार होण्याचे सरासरी वय ४३ झाले आहे. हे विकार टाळण्यासाठी धूम्रपान, मद्यपान, तंबाखू, मांसाहार, जँकफूड आदींपासून दूर राहायला हवे. तणावमुक्त जीवन जगात नियमित व्यायाम केला पाहिजे. जीवनशैली सुधारली, तर हे आजार टाळता येतात. आजारांना बळी पडल्यास अ‍ॅलोपॅथी औषधासोबतच निसर्गोपचारही सुरु ठेवावेत,” असा सल्ला निसर्गोपचार तज्ज्ञ आणि हृदयमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत मुंदडा यांनी दिला.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभागतर्फे श्रीकांत मुंदडा यांचे ‘निसर्गोपचार आणि हृदय रोग’ या विषयावर व्याख्यान झाले. एस. एम. जोशी फाऊंडेशनच्या सभागृहात झालेल्या या व्यख्यानाला परिषदेचे अध्यक्ष विनय र. र, उपाध्यक्ष राजेंद्र सराफ उपस्थित होते.

श्रीकांत मुंदडा म्हणाले, “भोपळ्याचा रस आरोग्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या होतात. पचन चांगले होते तसेच चरबी कमी होते. फक्त कडू भोपळ्याचा रस किंवा काढून ठेवलेला रस बऱ्याच वेळाने पिऊ नये. भोपळ्याचा रसासोबत मधुपर्णीचा (स्टीव्हिया वनस्पती) रस, जवस, दालचिनी याचे सेवन आयोग्यासाठी चांगले असते. या वनस्पती हृदयरोग, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा अशा विविध आजारांवर गुणकारी आहेत. हृदयाविकार झालेल्या जेष्ठांना शस्त्रक्रियेचा पर्याय सुचविला जातो. परंतु, वय वाढल्यामुळे त्यांची शस्त्रक्रिया करण्याची इच्छा नसते. अशांनी अ‍ॅलोपॅथी औषधासह निसर्गोपचार घेण्यास सुरवात करावी. त्यांना त्याचा फायदा दिसून येईल, आजाराची तीव्रता बऱ्याच प्रमाणात कमी होईल. निसर्गोपचाराचे विविध फायदे आहेत. तसेच या औषधांना कोणता विपरीत परिणाम नाही.”

राजेंद्र सराफ यांनी प्रस्तावना केली. विनय र. र यांनी आभार मानले.

महिलांमधील कलागुणांना वाव मिळावा – स्वप्ना गोरे

0

पुणे : महिला सक्षम झाल्या असून, जीवनाच्या विविध क्षेत्रात समर्थपणे वाटचाल करत आहेत. घराच्या जबाबदाऱ्या सांभाळत नोकरी, व्यवसायाच्या क्षेत्रातही यश मिळवत आहेत. महिलांमधील निरनिराळ्या कलांना व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. लायन्स क्लबप्रमाणे इतर संस्थांनीही महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करावा. त्यांच्यामधील कौशल्याला आणि कल्पकतेला प्रोत्साहन द्वावे,” असे मत पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी व्यक्त केले.

महिला सक्षमीकरण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ पूना सारसबागतर्फे महिला व्यवसायिकांच्या वस्तूंचे प्रदर्शन मुकुंदनगर येथील शिवशंकर सभागृहात भरविण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन स्वप्ना गोरे यांनी केले. यावेळी क्लबचे अध्यक्ष नितीन मेहता, माजी प्रांतपाल फत्तेचंद रांका, शशिकला रांका, रितू नाईक, योगेश कदम, चैताली पटनी, दिपाली गांधी, आशा ओसवाल, मनीषा शहा आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन रविवारी (२२ सप्टेंबर) सकाळी १०.३० ते रात्री ९ या वेळात खुले राहणार आहे.

समाजीतील गरजू, वंचित रुग्णांना मोफत डायलेसिस करता यावे, यासाठी या प्रदर्शनातून निधी संकलन केले जाते. प्रदर्शनात जवळपास १०० स्टॉल्स उभारण्यात आले असून, यामध्ये घरातील सुशोभित वस्तुंपासून ते कपडे, हाताने बनविलेले कलाप्रकार, शोभेच्या वस्तू, खाद्यपदार्थ यांचा समावेश आहे. नवरात्री निमित्त लाईटवेट घागरा- चोली, कानात व गळ्यात परिधान करायचे दागिने, सजवलेल्या दांडिया व पणत्या, वॉलपेन्टिंग आशा आकर्षक वस्तू देखील मांडण्यात आल्या आहेत. गेली सहा वर्षे हा उपक्रम राबविला जात आहे. यावेळी स्वप्ना गोरे यांनी प्रदर्शनात मांडलेल्या वस्तूंची पहाणी केली आणि महिलांच्या कलाकुसरीचे कौतुक केले.

विश्वशांतीसाठी माध्यमांची भूमिका महत्वाची जयप्रकाश नारायण यांचे प्रतिपादन

0

पुणे-. जगातील प्रत्येक देश हा अनेक समस्या आणि  दहशतीतून मार्गक्रम करत आहे. प्रत्येकांना शांती,  सुख आणि समाधान हवे आहे. मात्र प्रत्येकांनी केवळ माध्यमांवर विसंबून न राहता दोघांनी एकत्र यावे. माध्यमांनी जगातील प्रत्येक नागरिकांना शांतीची शाश्वती आणि विश्वास द्यावा. केवळ नफा न पाहता विश्वशांतीसाठी माध्यमांनी आपली महत्वपूर्ण भूमिका आदा करावी, असे प्रतिपादन हैद्राबाद येथील लोकसत्ता पार्टीचे अध्यक्ष जयप्रकाश नारायण यांनी केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या राष्ट्रीय माध्यम आणि पत्रकारिता परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी नवी दिल्ली येथील द वायरचे संस्थापक अध्यक्ष एम.के. वेणू,  कोलकोत्ता प्रेस क्लबचे अध्यक्ष स्नेहास सूर, वरिष्ठ पत्रकार  आर.एन.भास्कर, दिल्ली येथील वरिष्ठ पत्रकार निरिजा चौधरी, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, प्र- कुलगुरू आर. एम. चिटणिस, प्र-कुलगुरू प्रा. डी. पी आपटे, माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता डॉ. शरदचंद्र दराडे पाटील,  माईर्स एमआयटीचे विश्वस्त डॉ. चंद्रकांत पांडव, अधिष्ठाता डॉ. अनुराधा पाराशर, डॉ. ठाकूर आदी उपस्थित होते.

डॉ. जयप्रकाश नारायण म्हणाले, जगातील सर्वात मोठ्या घुमटाची निर्मिती ही भारतासाठी भूषणावह बाब आहे. माध्यम हे नैतिक विचारांची आदान-प्रदान करणारी संस्था आहेत. भारतीय माध्यम अनेक चांगले-वाईट अनुभव घेत आहे. माध्यमे समाजाला मुक्ततेचा संदेश देतात. माध्यम देशाच्या विकासासाठी नेहमी तत्पर असतात. मानवी विकासातील समस्यांच्या अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी माध्यम नेहमी पुढे असतात. माध्यमांनी केवळ नफा कमविण्यासाठी कामे करू नयेत. समाजाचे देणे म्हणून विरोधकांची भूमिका निभवावी. तत्वज्ञ हे देशाच्या विचारांची गुरूकिल्ली असतात. राजकीय पक्ष आणि धर्म, जातीच्या पलीकडे जाऊन पत्रकारिता करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले, बदलत्या काळानुसार पत्रकारितेच्या भूमिकेत आणि वागण्यातही मोठा बदल होत आहे. आजच्या घडीला पत्रकारांची भूमिका बदलल्यामुळे माध्यम नैतिकता विसरत चालले आहेत. जाहिरातीचे काम बातमीदारांना करावे लागत असल्यामुळे केवळ नफा याच एकमेव भूमिकेतून बातमीदारी केली जात असल्याची खंत ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड म्हणाले, माध्यमाच्या विचाराने देश चालत असतो. जगाला सुख, शांती, समाधानाचा मार्ग स्वामी विवेकानंद यांच्यानंतर माध्यमांनी दाखविला आहे. ज्ञान आणि विज्ञानाचे संगम उन्नतीसाठी झाला. पत्रकार समाजाला आणि देशाला दिशा देण्याचे काम करत असतो.  शांततापूर्ण आणि तणावमुक्त समाज निर्मितीसाठी माध्यमांची भूमिका महत्वाची असते. जगाला एक परिवार बनविण्यासाठी भारत आपले कार्य करत आहे. या घुमटामध्ये मानवतेच्या इतिहासातील जगाला दिशा दाखविण्याचे काम केलेल्यांची पुतळे उभी केली आहेत. वैश्विक भारतीय संस्कृतीचे दर्शन या घुमटाच्या माध्यमातून होत आहे.

राहुल कराड म्हणाले, लोकशाहीच्या वाढीसाठी आणि लोकशाही सुरक्षित बनविण्यासाठी महत्वाचा खांब म्हणून माध्यमांकडे पाहिले जाते. माध्यमांचा महत्वाचा रोल देशाच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी असतो. एमआयटी संस्था नेहमी शांती आणि विकासासाठी कार्यरत आहे. शांतीसाठी जगातील सर्वात मोठ्या घुमटाची उभारणी करण्यात आली आहे.  तत्वज्ञ, विचारवंत, धर्मगुरू आणि देवता यांचा एकत्र मेळ याठिकाणी घालण्यात आला आहे. या परिषदेला देशात मोठी परिषद बनविण्याचे काम सुरू झाले आहे. पत्रकार संघाच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातील पत्रकारांना एकत्र बांधण्याचा धागा आज बांधण्यात आला आहे.
पत्रकारिता ही सतत शिक्षणाचे काम करीत असते. हा लोकशाहीचा चौथा खांब आहे.
दरम्यान कोलकत्ता पत्रकार संघाचे सदस्य  स्नेहाशीस सूर यांच्याद्वारे लिखित महात्मा गांधी आणि पत्रकारिता व एडिटींग व पुणे पत्रकार संघाच्या पत्रिकेचे प्रकाशन यावेळ करण्यात आले.
विश्वशांतीच्या प्रस्थापनेत माध्यम आणि पत्रकारितेची भूमिका या विषयावरील पहिल्या सत्रात आर. एन भास्कर म्हणाले, विश्वशांतीसाठी प्रत्येक माणूस आपापल्या पद्धतीने काम करत असतो. मात्र सर्वात मोठी जबाबदारी ही माध्यमांची असते. माध्यमांनी नैतिकतेचा वापर करून समाजसुधारणेसाठी कार्य करत रहावे.
एम. के वेण्णु म्हणाले, माध्यमांचे नैतिक वागणे हे जगाच्या निर्मितीची आणि विकासाची पाया भरणी करीत असतात. माध्यमांनी नेहमी विरोधकांच्या भूमिकेतून सरकाराला प्रश्न विचारले पाहिजे. सरकारने ही माध्यमांना त्यांचे स्वातंत्र्य  दिले पाहिजे.
निरजा चौधरी  म्हणाल्या, काही काळापूर्वी वृत्तपत्रातील बातम्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवला जात होता. मात्र आता कोणत्या वृत्तपत्राने आणि कोणत्या बातमीदारांनी ती लिहली आहे, याची विचारणा केली जाते. सरकारला आणि समाजाला आरसा दाखविण्याचे काम माध्यमांचे असते. माध्यमांची चुपी देशाला आणि समाजाला घातक असते. सध्याच्या काश्मीरच्या परिस्थितीवर काही ही बोलले जात नाही. सरकारकडे त्यांचा माध्यम आहेत, मात्र खासगी माध्यमांनी आपली भूमिका विसरू नये.
स्नेहासीस सूर म्हणाले, माध्यमांनी जबाबदारीने काम करावे, कारण समाजात आपल्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. माध्यमांनी आपली नैतिकता सोडली तर मोठे न भरून निघणारे नुकसान होते.
प्रा. स्वप्निल बापट यांनी सूत्रसंचालन केले.

पुणे मेट्रो मार्गिका ३ हिंजवडी ते शिवाजीनगर प्रकल्पाच्या सवलत करारनाम्यावर पीएमआरडीए व टाटा-सिमेन्स यांकडून स्वाक्षऱ्या

0
  • हा प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून राबविण्यात येत असून  केंद्र सरकारच्या २०१७ च्या नवीन मेट्रो रेल धोरणांतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) केला जात असलेला देशातील हा पहिला मेट्रो प्रकल्प आहे
  • मेट्रो प्रकल्पाची मार्गिका संपूर्णतः उन्नत असून हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्कपासून सुरु होऊन बालेवाडीमार्फत शिवाजीनगर पर्यंत जाईल
  • टाटा-सिमेन्स या जागतिक दर्जाच्या मोठ्या संस्था एकत्रितपणे पुढील साडेतीन वर्षांत प्रकल्पाचे काम पूर्ण करणार असून त्यांना सुरवातीस  पस्तीस वर्षे मुदतीसाठी प्रकल्प चालवण्यासाठी देण्यात येणार आहे

पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून राबविण्यात येणारा पुणे मेट्रो मार्गिका ३ (हिंजवडी ते शिवाजीनगर) हा प्रकल्प सार्वजनिक  खासगी भागीदारीतून विकसित करण्यासाठी प्राधिकरणाने ट्रील  अर्बन ट्रान्सपोर्ट  ( टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची उपकंपनी) आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेन्चर्स जीएमबीएच ( सीमेन्स फायनान्शियल सर्व्हिसेसची उपकंपनी) यांच्या संयुक्त भागीदारीसोबत सदर प्रकल्पाच्या सवलत करारनाम्यावर आज स्वाक्षया केल्या. सार्वजनिक खाजगी भागीदारीद्वारे संकल्पना/रचना करा, बांधा, वित्तपुरवठा करा, चालवा आणि हस्तांतरण करा (डीबीएफओटी) या तत्वावर हा प्रकल्प विकसित करण्यात येत असून कराराचा कालावधी सुरवातीस ३५ वर्षांचा असणार आहे.

        पुण्यात पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात प्राधिकरणामार्फत महानगर आयुक्त श्री. विक्रम कुमार यांनी या महत्वपूर्ण करारावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी महाराष्ट्र शासन, पीएमआरडीए तसेच टाटा व सीमेन्सचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

      ही अत्याधुनिक मेट्रो मार्गिका २३.३ किमी. लांबीची आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे पुणेकरांना सक्षम वाहतुक यंत्रणा, सुविधाजनक प्रवास आणि वेळेची लक्षणिय बचत असे अनेक फायदे मिळतील. एमआयडीसी, पीएमआरडीए, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका अशा ४ संस्थांच्या परिक्षेत्रातून ही मेट्रो धावणार आहे.

            “प्रकल्पाचे बांधकाम पुढील  साडेतीन वर्षांत करण्यात येणार असून प्रकल्पाच्या बांधकाम कालावधीत वाहतूक व्यवस्थेत फारसे अडथळे येऊ नयेत या दृष्टीने सर्वोतोपरी काळजी घेण्यात येत आहे. प्राधिकरणाने टाटा सीमेन्स हा सवलतदार व इतर शासकीय संस्था तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सोबत समन्वय साधून पर्यायी मार्गाची आखणी केली आहे. मेट्रोच्या कारडेपो आणि सेवा रस्त्यांसाठी मुळशी तालुक्यातील माण येथे भूसंपादन सुरु करण्यात आले असून प्रस्तावित २३ स्थानकांची यादी सहपत्र – १ मध्ये जोडली आहे. मेट्रो मार्गिका  ३  सारखा व्यापक  प्रकल्प हाती घेतल्याने प्राधिकरण स्थापनेच्या मूळ  उद्देशास चालना मिळाली आहे. सदर प्रकल्पामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर हे अंतर चाळीस मिनिटांमध्ये पार करता येईल. तसेच मेट्रो प्रकल्पामुळे रस्त्यावरील   खासगी वाहने कमी होऊन कार्बन उत्सर्जन व प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. मेट्रो प्रकल्पांसोबतच पुणे मुंबई  हापरलूप, रिंग  रोड  यांसारख्या दळणवळण व पुणे महानगराच्या  सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण अश्या प्रकल्पांचे नियोजन प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहे.”, अशी माहिती महानगर आयुक्त श्री. विक्रम कुमार यांनी दिली. टाटा सन्सच्या इन्फ्रास्ट्रक्चरडिफेन्स अँड एरोस्पेसचे प्रेसिडेंट श्रीबनमाली अग्रवाल यांनी सांगितलेकोणत्याही देशाची प्रगती तेथील पायाभूत सोयीसुविधांवर अवलंबून असते.  वाहतुकीचे शाश्वत आणि सक्षम नेटवर्क पुरवून लोकांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणण्याच्या सरकारच्या उपक्रमांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे.  पुणे हे देशातील महत्त्वाचे शहर असून स्मार्ट सिटीज मिशनमध्ये देखील त्याचा समावेश आहे.  आम्हाला पूर्ण खात्री आहे की पुणे मेट्रो मार्गिका  मुळे पुण्यातील पायाभूत सोयीसुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा घडून येतील.  वेगवान आणि सुविधाजनक प्रवासामुळे लोकांचे जीवन सुखकर होईलह्या प्रकल्प विकासाचे काम अत्यंत जलद गतीने केल्याबद्दल पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आभार. “

सीमेन्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर  चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्रीसुनील माथूर यांनी सांगितले, “अतिशय प्रतिष्ठेच्या मेट्रो प्रकल्पात पीएमआरडीएसोबत काम करायला मिळणे ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहेया प्रकल्पामुळे पुण्यातील जीवनमानामध्ये सकारात्मक परिवर्तन घडून येणार आहे.  टाटा समूहासोबत भागीदारीमार्फत आम्ही अत्याधुनिक मेट्रो व्यवस्थेला आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा पुरविणार आहोत ज्यामुळे पुण्यातील वाहतूक यंत्रणेत आमूलाग्र विकास घडून येईल.”

सहपत्र – १

  1. पीएमआर १ – माण
  2. पीएमआर २ – क्वाड्रन
  3. पीएमआर ३ – डोहलर
  4. पीएमआर ४ – इन्फोसिस फेज २
  5. पीएमआर ५ – विप्रो टेक्नॉलॉजि फेज २
  6. पीएमआर ६ – पाल इंडिया
  7. पीएमआर ७ – शिवाजी चौक हिंजवडी
  8. पीएमआर ८ – कोर्टयार्ड मॅरियट
  9. पीएमआर ९ – वाकड चौक
  10. पीएमआर १० – बालेवाडी क्रीडासंकुल
  11. पीएमआर ११ – निकमार
  12. पीएमआर १२ – रामनगर
  13. पीएमआर १३ – बालेवाडी हाय स्ट्रीट
  14. पीएमआर १४ – बालेवाडी फाटा
  15. पीएमआर १५ – बाणेर गाव
  16. पीएमआर १६ – बाणेर
  17. पीएमआर १७ – कृषी अनुसंधान
  18. पीएमआर १८ – यशदा / सकाळनगर
  19. पीएमआर १९ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
  20. पीएमआर २० – आरबीआय
  21. पीएमआर २१ – कृषी विद्यापीठ
  22. पीएमआर २२ – शिवाजीनगर
  23. पीएमआर २३ – दिवाणी न्यायालय

राज्यातील हे 54 विधानसभा मतदार संघ आरक्षित

0

पुणे-महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी 54 जागांवर आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या 54 मतदारसंघात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात उभारतील. त्यामध्ये 29 जागा अनुसूचित जातींसाठी तर 25 जागा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे 54 मतदारसंघातील उमेदवार हे आरक्षणाचा आधार घेत निवडणूक लढवणार आहेत.

SC, ST साठी महाराष्ट्रातील राखीव मतदारसंघ

SC
भुसावळ
मेहकर
मूर्तिजापूर
वाशिम
दर्यापूर
उमरेड
नागपूर उत्तर
भंडारा
अर्जुनी मोरगाव
चंद्रपूर
उमरखेड
देगलूर
बदनापूर
औरंगाबाद पश्चिम
देवळाली
अंबरनाथ
कुर्ला
धारावी
पिंपरी
पुणे कॅन्टोन्मेंट
श्रीरामपूर
केज
उदगीर
उमरगा
मोहोळ
माळशिरस
फलटण
हातकणंगले
मिरज

ST
अक्कलकुवा
शहादा
नंदुरबार
नवापूर
साक्री
शिरपूर
चोपडा
मेळघाट
अमगाव
आरमोरी
गडचिरोली
अहेरी
राळेगाव
अर्णी
बागलाण
कळवण
दिंडोरी
इगतपुरी
डहाणू
विक्रमगड
पालघर
बोईसर
भिवंडी ग्रामीण
शहापूर
अकोले (जि. अहमदनगर)

मतदान केलेल्या मतदारांनाच सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मतदारांना जागृक करताना मुख्यमंत्री म्हणाले, की “लोकशाहीत लोक सरकारला सवाल करतात, सरकारकडून त्यांना काही अपेक्षा असतात. परंतु, ज्यांनी मतदान केले त्यांनाच सरकारला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार असतो. मी सर्वांनाच मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करतो.” महाराष्ट्र आणि हरियाणात एकाचवेळी मतदान आणि मतमोजणी केली जाणार आहे.

महाराजांना दिल्लीश्वरांचा धक्का…?

0

नवी दिल्ली – सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडनुक विधानसभा निवडणुकीसोबत घेतली जाईल अशी शक्यता असताना आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत सातारा पोटनिवडणुकीबाबत कोणतीही घोषणा केली नाही.

त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लांबणीवर पडली आहे.

लोकसभा निवडणूक होऊन अवघे काही महिने झाले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन उदयनराजे भोसले यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी या रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक घेतली जाईल अशी अपेक्षा स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती.

भाजपात प्रवेश करताना उदयनराजे भोसले यांनी काही अटी ठेवल्याचं सांगण्यात येत होतं. यामध्ये लोकसभेची पोटनिवडणूक ही विधानसभेसोबत घेण्यात यावी अशीही अट होती. कारण विधानसभा निवडणुकीनंतर कदाचित भाजपाच्या पक्षांतर्गत राजकारणातून उदयनराजेंना पोटनिवडणूक कठीण जाऊ शकते अशी भीती त्यांना होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने सातारा पोटनिवडणुकीवर निर्णय न घेतल्याने उदयनराजेंना धक्का बसला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, छत्रपतींचे 13 वे वंशज असलेले उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ते आता पक्षाचे पदाधिकारी आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार उदयनराजे जोरात करतील. राज्यात युती झाली तरी बंडखोरी नाही. शिवसेना-भाजपाचे संघटन मोठं आहे, नाराजी व्यक्त होऊ शकते पण बंडखोरी होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

लघुपटातून उलगडणार ‘पोलिस फाईल्स’

0
पुणे : “पोलिसांबाबत आस्था वाटणारे अधिकारी आपल्यात आहेत. त्यांच्या व्यथा समजण्यासाठी असे साहित्य निर्माण व्हायला हवे. वर्दीतल्या कठोर पोलीसांमागे भावनाशील माणूस दडलेला असतो. तो माणूस या ‘पोलीस फाईल्स’मधून व्यक्त झाल्याचे दिसत आहे. या तपासकथा वाचताना विषयांचे वैविध्य त्यांना आलेले अनुभव यात आले आहे. पोलिसांचे जगणे, त्यांच्या भावनिक कथा याव्यात. त्यासाठी लवकरच एका लघुपटातून पोलिसांचे जीवन उलगडणार आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले.
पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलमध्ये विश्वकर्मा पब्लिकेशन्सच्या वतीने प्रकाशित आणि पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम संकल्पित ‘पोलीस फाईल्स’ पुणे पोलिसांच्या तपासकथा पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. बाणेर रस्त्यावरील यशदामध्ये झालेल्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस महासंचालक डॉ. मीरा बोरवणकर होत्या. डॉ. के. व्यंकटेशम, अपर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, विश्वकर्मा ग्रुपचे चेअरमन राजकुमार अगरवाल, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे विश्वस्त ऍड. प्रताप परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, पुस्तकाच्या समन्वयिका विदुला टोकेकर आदी उपस्थित होते.
नागराज मंजुळे म्हणाले, “पोलिस अकार्यक्षम असल्याचे बोलले जाते. मात्र, आपण समाज म्हणून आपल्या जबाबदारी पाळतो का? याचा विचार केला पाहिजे. पोलीस रात्रंदिवस आपल्या सुरक्षेसाठी तैनात असतात. जीवाची पर्वा न करता वेगवेगळ्या अंगाने गुन्हा उलगडण्यासाठी काम करतात. त्यांचे अनुभव अशा स्वरूपात यावेत, हे त्यांच्या कार्याची दखल आहे. त्यांच्यात दडलेला कवी, लेखक, कलाकार जागा झाला पाहिजे.”
मीरा बोरवणकर म्हणाल्या, “पोलिसांबाबत जनतेने विश्वास दाखवला तर आणखी जोमाने काम करता येईल. गुन्हेगारांच्या स्वभावाचे पैलू जाणून घेताना नानाविध शकला लढवाव्या लागतात. पोलीसांनी बोलते व्हायला हवे. पोलिस बोलत नाहीत, याचा अर्थ त्यांना भावना नाहीत असे नाही. एक केस उलगडताना नेमके काय काय होते हे आपल्या लक्षात येईल. वर्दीमध्ये असल्याने आम्ही साचेबद्ध झालो आहोत. आमच्यातील भावनाशील माणूस जागा व्हायला हवा.”
डॉ. के. व्यंकटेशम म्हणाले, “पोलीस प्रज्ञाशील असतात. विविध परिस्थितीत गुन्ह्यांचा उलगडा करतात. त्यांच्या कुशलतेला शब्दबद्ध करुन लोकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न केला आहे. तपासादरम्यान पोलिसांना खूप वेगवेगळे अनुभव येत असतात. हे अनुभव पुस्तकरूपात आल्यामुळे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी आपले अनुभव कथेत मांडतील.”
अतुलचंद्र कुलकर्णी म्हणाले, “या पोलिस कथांमधून इतर पोलिस अधिकारी लिहीते होतील. पोलिसांसंबधीत संशोधनात आपण योगदान द्यावे. त्यासाठी विविध संस्थांबरोबर सामंजस्य करार करत आहोत.” संतोष घुले यांनी सूत्रसंचालन केले. विदुला टोकेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रवींद्र शिसवे यांनी आभार मानले.
—————-
‘सैराट’चा मथळा होतो : मंजुळे
सैराट चित्रपटानंतर अनेक गुन्हे आणि मुले-मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले, असा समाज समाजात आहे. मात्र, चित्रपट येण्याआधीही हे घडतच होते. ‘सैराट’ने जातीधर्मापलीकडे जाण्याचा संदेश दिला आहे. चित्रपट लोकप्रिय झाल्यामुळे सर्वजण ‘सैराट’ला दोषी ठरवू लागले. आज मंत्री जरी कुठे गोंधळ घालत असेल, तर वर्तमानपत्रात ‘मंत्री झाले सैराट’ असे मथळे पाहायला मिळतात.

दहशतवादा विरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत : खा. बापट यांचा वाणिज्य दूतांशी संवाद

0

पुणे ता २१ :  दहशतवाद ही गंभीर समस्या आहे. जगातील बहुतूक देश त्यामुळे त्रस्त झालेले आहेत.  दहशतवादाच्या लढाईत अमेरिका सर्व शक्तीनिशी भारताच्या पाठीशी उभी आहे. असा विश्वास अमेरिकेचे वाणिज्य दूत डेव्हिड रांझ यांनी शनिवारी व्यक्त केला. पुणे भेटीत रांझ यांनी लोकसभेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष खा. गिरीश बापट यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

महापौर मुक्ता टिळक, भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा स्वरदा बापट, डेव्हिड रांझ यांच्या पत्नी टॅली लिंड,  दूतावासाचे प्रतिनिधी रॉबर्ट पॉलसन – हॉसर, माहिती अधिकारी निक नोवॉक,  सल्लागार अरुंधती मुंडलाय, सुरक्षा अधिकारी डेव्हिड पराईल यावेळी उपस्थित होते.

रांझ यांनी  राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींसह, दहशतवाद,  राज्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूका, जम्मू काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर, कलम ३७०, भारत अमेरिका सबंध याविषयी विवरण केले.

त्यावेळी बोलताना बापट म्हणाले की ,देशात भाजप सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सुरक्षिततेच्या दृष्टीने कठोर पावले उचलायला सुरुवात केली. याचे परिणाम आता  दिसत आहेत. भारतावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर  त्याला सर्जिकल स्ट्राईक द्वारे चोख प्रत्युत्तर भारताने  दिले. सीमेपलीकडील दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही हे ठणकावून सांगितले. कलम ३७० द्वारे काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा समाप्त केला. आता काश्मीर हे भारतातील इतर राज्यांप्रमाणेच एक राज्य आहे. बहुतेक काश्मीरी जनतेनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे.  हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. हे त्रिवार सत्य आहे.  काश्मीरचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे. काही दिवसांनी तो भारताचा हिस्सा असेल.नुकतेच परराष्ट्र मंत्र्यांनी या बाबतची घोषणा केली आहे. देशात मंदीचे वातावरण आहे. असे बोलले जाते. त्याबाबत  काळजी करण्याचे काम नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लवकरच  दूर होईल. भारतीय नागरिकांनी भाजप सरकारच्या  निर्णयांचे स्वागत केले असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल या बद्दल विरोधकांनाही खात्री आहे.

डेव्हिड रांझ यांनी  बापट यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच भारतासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या देशाच्या मदतीसाठी अमेरिकेचे नेहमीच सहकार्य राहील असे मत व्यक्त केले.

महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान, 24 ऑक्टोबरला निकाल …

0

नवी दिल्ली: संपूर्ण देशाला उत्सुकता लागलेल्या महाराष्ट्र, हरयाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा अखेर झाली आहे. त्यानुसार महाराष्ट्र आणि हरयाणा दोन्ही विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दोन्ही निवडणुकांचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. दिवाळीपूर्वी निवडणुकीचा निकाल लागून नवं सरकार स्थापन होणार आहे.केंद्रीय निवडणूक आयोगानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दोन्ही राज्यांतील निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला. ९ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे. महाराष्ट्रात ८.९४ कोटी मतदार आहेत. विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे

* अर्ज भरण्याची सुरुवातीची तारीख : 27 सप्टेंबर
* अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 4 ऑक्टोबर
* अर्ज छाननी : 5 ऑक्टोबर
* अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 7 ऑक्टोबर
* मतदानाची तारीख : 21 ऑक्टोबर
* निकाल : 24 ऑक्टोबर

मतदान आणि निकाल
मतदान – 21 ऑक्टोबर
निकाल- 24 ऑक्टोबर

2014 मधील पक्षीय बलाबल
भाजप – 122 जागा
शिवसेना – 63 जागा
काँग्रेस – 42 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस – 41 जागा
इतर – 20 जागा
एकूण – 288 जागा

2014 मध्ये विभागनिहाय कोणत्या पक्षाला किती जागा?

मुंबई (36) : भाजप 15, शिवसेना 14, काँगेस 05, राष्ट्रवादी काँग्रेस 00, इतर 02

कोकण (39) : भाजप 10, शिवसेना 14, काँगेस 01, राष्ट्रवादी काँग्रेस 08, इतर 06

पश्चिम महाराष्ट्र (70) : भाजप 24, शिवसेना 13, काँगेस 10, राष्ट्रवादी काँग्रेस 19, इतर 04

उत्तर महाराष्ट्र (35) : भाजप 14, शिवसेना 07, काँगेस 07, राष्ट्रवादी काँग्रेस 05

विदर्भ (62) : भाजप 44, शिवसेना 04, काँगेस 10, राष्ट्रवादी काँग्रेस 01, इतर 03

मराठवाडा (46) : भाजप 15, शिवसेना 11, काँगेस 09, राष्ट्रवादी काँग्रेस 08, इतर 03

इतर : 02

एकूण (288) : भाजप 122, शिवसेना 63, काँगेस 42, राष्ट्रवादी काँग्रेस 41, इतर 20

१०० जागांवर मनसे लढणार…?

0

मुंबई: इव्ही एम विषयी संशय निर्माण झाल्याने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुका लढवण्यापासून अलिप्त राहिलेली मनसे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उतरणार का, हा प्रश्न मनसे कार्यकर्त्यांपासून, विविध राजकीय पक्ष आणि जनतेसाठीही उत्सुकतेचा ठरला होता. अखेर आज पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी मनसे १०० जागांवर उमेदवार उभे करणार आहे.  या १०० जागांमध्ये प्रामुख्यानं मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि काही ग्रामीण मतदारसंघाचा समावेश असेल असे  समजते  आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, आम्ही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांचंही मत जाणून घेतलं. सर्वांनीच निवडणुका लढवण्याच्या बाजूनं कौल दिलाय. आम्ही ही बाब राज ठाकरेंसमोर ठेवू. आम्हाला आशा आहे की ते कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून योग्य निर्णय घेतील.

दरम्यान   सध्या आपल्या अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या राज ठाकरेंसाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे. विधानसभेत पूर्ण ताकदिनिशी उतरण्याकरताच राज यांनी लोकसभा न लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता तर, काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार ही निवडणूक न लढल्यास कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल आणि ते पक्षापासून लांब जाऊ शकतात. एक राजकीय पक्ष या नात्यानं निवडणुकीला सामोरं जाऊन लोकांना पर्याय देणं आपलं काम आहे. या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर राज यांनी निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे.

राज यांनी नुकतंच ईव्हीएमविरोधात सर्व विरोधी पक्षांना एकाच मंचावर आणलं होतं. इव्ही एम वर विश्व्वास नसल्याने राज निवडणुका लढविन्यास उत्सुक नसल्याचे स्पष्ट दिसत होते.

 

सुंदरा मनामध्ये भरली ‘ कार्यक्रमाने जिंकली मने

0
गायनातून सादर झाला लावणीचा सुरेल खानदानी प्रवास !
पुणे :नृत्य, संगीत अन अभिनयाचे सुंदर सादरीकरण म्हणजे ‘लावणी. पण ‘ सुंदरा मनामधे भरली ‘ या कार्यक्रमातून फक्त गायनातून लावणीचा सुरेल खानदानी प्रवास सादर झाला आणि रसिकांची मने जिंकली.
‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत  ‘सुंदरा मनामध्ये भरली ‘  या ‘स्वरश्रुती’ प्रस्तुत कार्यक्रमात लावणीचा गायनातून सुरेल खानदानी प्रवास सादर झाला !
२०  सप्टेबर (शुक्रवार) रोजी सायंकाळी ६ वाजता  ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, (सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम  झाला.‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.
या कार्यक्रमात  राहुल जोशी,अभिजित वाडेकर ,श्रुती देवस्थळी हे गायक आणि अमित कुटे ,राजेंद्र साळुंखे ,डॉ राजेंद्र दूरकर ,प्रसन्न बाम हे वादक सहभागी झाले. प्राजक्ता मांडके –परहर यानी  खुमासदार निवेदन, सूत्र संचालन केले. हा कार्यक्रम विनामूल्य होता.
‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ८७ वा कार्यक्रम होता.
‘शुभमंगल चरणी गण नाचला’ हा पेशवाईतील पठ्ठे बापुराव यांचा गण सुरुवातीला सादर झाला. 1951 मधील चित्रपटातील ‘ सांगा मुकुंद कोणी पाहिला’ ही गवळण , कृष्णाची लावणीला चांगला प्रतिसाद मिळाला.छबिदार छबी, कुण्या गावाचं आलं पाखरू, मुंबईची लावणी,होनाजी बाळा यांनी पेशव्यां च्या प्रेरणेने पुढे आणलेली बैठकीची लावणी, लावणीच्या प्रभावाने आलेली “वद जाऊ कुणाला शरण’ अशी नाट्यगीते,”माझी मैना गावाकडे राहिली” ही पाच चौकी लावणी ,  कसं काय पाटील बरं हाय का, अहो बरं हाय का ?
काल काय ऐकलं, ते खरं हाय का ?अशा वैविध्यपूर्ण लावण्यांच्या जोरकस सादरीकरणाने हा कार्यक्रम गाजला.
वसंत प्रभू, राम कदम यांच्यापासून आनंद मोडक यांच्यापर्यंत प्रतिभाशाली संगीतकारांच्या संगीताने सजलेल्या, पठ्ठे बापुराव ते शांता शेळके ,जगदीश खेबुडकर यांचे कोमल, शृंगारपूर्ण शब्द आणि ख्यातनाम गायक गायिकांच्या लाडिक आवाजांच्या साजाची बरसातच या कार्यक्रमात झाली. रेशमाच्या रेघांनी, अरे कान्हा या प्रसिद्ध लावण्याच्या गायनाने समारोप झाला