Home Blog Page 2837

शरद पवार साताऱ्यातून निवडणुकीला उभे राहिले तर माघार घेईन – उदयनराजे

0

सातारा-आपल्या सातारा लोकसभा मतदार संघात आपल्या विरोधात शरद पवार निवडणुकीला उभे राहिले तर मी माघार घेईन असे वक्तव्य भाऊक होवून उदयनराजे भोसले यांनी इथे केलंय.

लोकसभा पोट निवडणूक 21ऑक्टोबर रोजी होणार आहे असल्याने माजी खासदार उदयनराजेंना दिलासा मिळाला आहे,या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जर निवडणुक लढणार असतील तर मी निवडणुकीतून माघार घेईल असे उदयनराजेंनी प्रसार माध्यम यांच्या सोबत बोलताना सांगितले. 21 ऑक्टोबर रोजी ही पोटनिवडणूक होणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यामुळे साताऱ्याचा खासदार दिवाळीपूर्वी ठरणार हे आता निश्चित झालं आहे. साताऱ्याच्या निवडणुकीची तारीख जाहीर होताच, तेथील उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.तर राष्ट्रवादी समर्थकांकडून शरद पवार यांनीच निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, असा आग्रह सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते शशिकांत शिंदे यांचा आपल्या कोरेगाव मतदारसंघासह साताऱ्यातील इतर भागातही चांगला प्रभाव आहे. त्यामुळे उदयनराजेंविरोधात लढण्यासाठी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याचंही समजते. तसेच शशिकांत शिंदे,नितीन लक्ष्मणराव पाटील, अविनाश मोहिते यांची नावेही राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत. मात्र, शरद पवार स्वत: निवडणूक लढवणार असतील, तर मी माघार घेईल,असं उदनयराजेंनी म्हटलं आहे.

वडिलांनंतर शरद पवार यांनीच मला आधार दिला
भाजपात प्रवेश करण्यावरुन होणाऱ्या टीकेबद्दल बोलताना उदयनराजे भोसले यांनी हे सर्व एकदाचे खलास करून टाका असं म्हणत आपला संताप व्यक्त केला. तसंच शरद पवारांबद्दल आपल्या मनात अजूनही तितकाच आदर असून वडिलांनंतर शरद पवार यांनीच मला आधार दिला. ते पोटनिवडणुकीसाठी उभे राहिले तर बरं होईल, म्हणजे मी बोंबलत फिरायला मोकळा होईन असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

राजेशाही असती तर बलात्काऱ्यांना थेट गोळ्या घातल्या असत्या
आपल्यावर राजेशाहीचा आरोप करणाऱ्यांना उत्तर देताना उदयनराजे भोसले यांनी राजेशाही असती तर मी बलात्कार करणाऱ्यांना थेट गोळ्या घातल्या असत्या. विरोधकांनी माझ्यावर राजेशाहीचा आरोप करण्यापेक्षा मुद्द्यांवर आधारित राजकारण करावे असं आवाहन केलं. पुढे बोलताना त्यांनी उगाच कोणाचीही टीका ऐकून घ्यायला आपण काही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. आपण नेहमी अन्यायाच्याविरोधात आवाज उठवला असल्याचं उदयनराजेंनी सांगितलं.

माझी कॉलर आहे…चावेन नाहीतर फाडून टाकेन
टीका करणाऱ्यांना उदयनराजे यांनी माझी स्टाईल हा माझा खासगी प्रश्न आहे. मला गाणी ऐकायला आवडतात. माझी कॉलर मी चावेन नाहीतर फाडून टाकेन. तुम्हाला त्याच्याशी काय देणेघेणे आहे, असा सवालही विचारला.

अन् राजे झाले भावुक

शरद पवार यांच्याबद्दल बोलताना उदयनराजे भावूक झाले होते,त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं ते आदरणीय कालपण होते,आजपण यांच्याबद्दल बोलताना उदयनराजे भावूक झाले होते,त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं ते आदरणीय कालपण होते,आजआहेत, भविष्यातपण राहतील. आज महाळ आहेत,असे म्हणत पूर्वजांची आठवण उदयनराजेंनी काढली. त्यावेळी, त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. त्यांच्यनंतर तेच माझ्यासाठी आहेत. शरद पवार पोटनिवडणूक लढवणार आहेत, अशी चर्चा असल्याचं विचारताच,ते उभारल्यास मी फॉर्म भरणार नाही,असं उदयनराजेंनी जाहीर केलं आहे. पण, दिल्लीतील बंगला आणि गाडी यासाठी मला मुभा द्यावी, असे म्हणत पवारांचं प्रेम मिळावं ही अपेक्षा उदयनराजेंनी व्यक्त केली आहे. त्यामुळे साताऱ्यात शरद पवार विरुद्ध उदयनराजे असा सामना रंगणार नसल्याचं स्पष्ट झालंय.

अवघ्या 10 जागांमुळेअडलंय शिवसेना-भाजप युतीचं घोडं..

0

मुंबई – शिवसेना-भाजप युतीचं घोडं अवघ्या 10 जागांमुळे अडल्याची सूत्रांची माहिती आहे. काल उशिरा रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तब्बल साडेतीन तास चाललेल्या बैठकीत युतीच्या जागांबाबत तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे युतीच्या घोषणेचा आजचा मुहूर्त पुन्हा एकदा टळला आहे.

काल झालेल्या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे उपस्थित होते. दरम्यान या चर्चेचा तपशील राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना देण्यात येणार आहे. मात्र युतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शाह घेणार आहेत.

 युती न झाल्यास दोन्ही पक्षातील इच्छुक उमेदवारांना एका जागेवर संधी मिळू शकते. मात्र युती झाली तर एका पक्षातील इच्छुक उमेदवाराला त्या जागेवर पाणी सोडावे लागेल. अशात पक्षांतर बंडाळी किंवा पक्षांतरामुळे भाजप-शिवसेनेच्या नेत्यांची डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे पक्षाचे एबी फॉर्म वाटपावेळी होणारा वाद टाळण्यासाठी युतीची घोषणा करण्याची घाई नको असा सूर वरिष्ठ पातळीवर असल्याचे समजतंय.

अश्विनी कदम यांना पर्वतीतून राष्ट्रवादी ची उमेदवारी शक्य

0

पुणे :महापालिकेतील स्थायी समिती च्या माजी अध्यक्षा, आक्रमक पण शिक्षकी पेशाने सुसंस्कृत म्हणून परिचित असलेल्या अश्विनी नितिन कदम यांना राष्ट्र वादी कडून पर्वती मतदार संघातुन उमेदवारी मिळेल अशी शक्यता राजकीय समीक्षकांकडून वर्तविली जाते आहे . येथील महत्वाचे ज्येष्ठ नेते सुभाष जगताप हे नाव इछुकांच्या यादीत नसल्याने कदम यांचे नाव प्रधान्याने घेतले जाते आहे.

भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेली 10 वर्षे  असलेल्या पर्वती मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे लक्ष आहे. परंतू, रविवारी अजित पवार यांनी पुण्यातील चार मतदार संघ राष्ट्रवादी लढनार असे जाहिर केले आणि  पर्वती तील ईल्च्छूकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तिकीट वाटपात ‘ महिला ‘ चेहरा देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.

पर्वती मतदार संघामध्ये १९७८ पासून आजवर जनता पार्टीचा एक, काँग्रेसचे तीन आणि भाजपाचे तीन आमदार झाले आहेत. यामध्ये शरद रणपिसे आणि माधुरी मिसाळ यांना सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याची संधी मतदारांनी दिली. संमिश्र लोकवस्तीच्या या मतदार संघामध्ये भाजपा आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांचा परंपरागत मतदार आहे. गेली दहा वर्षे हा मतदार संघ भाजपाकडे आहे. मोदी लाटेमध्ये २०१४ साली मोठ्या फरकाने भाजपाने पर्वतीचा हा गड राखला होता. त्याला प्रत्त्यूत्तर देण्यासाठी काँग्रेसचे आबा बागूल, राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम तयारी करीत होत्या.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार की नाही याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. काँग्रेसकडून बागूल आणि राष्ट्रवादीकडून कदम यांनी पक्षाकडे आपण लढण्यास इच्छूक असल्याचे सांगितले होते. राष्ट्रवादी पुण्यातील पर्वती, खडकवासला, हडपसर आणि वडगाव शेरी मतदार संघ लढविनार रविवारी पक्षाच्या मेळाव्यात अजित पवारांनी यावर शिक्कामोर्तब केल्यावर पर्वतीमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खूश झाले आहेत. पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या पाचवर गेली आहे. यामध्ये नगरसेविका अश्विनी कदम, त्यांचे पती आणि मतदार संघाचे अध्यक्ष नितीन कदम, शशिकांत तापकीर, संतोष नांगरे आणि अर्चना हनमघर यांचा समावेश आहे. यामध्ये दोन ओबीसी चेहरे आहेत. पुणे जिल्ह्यामधून राष्ट्रवादीकडे केवळ पर्वती मतदार संघात महिलांनी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकतरी महिला उमेदवार देण्याचा पक्षाचा विचार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप यांनी २०१४ साली राष्ट्रवादीकडून पर्वतीमधून निवडणूक लढविली होती. दोन वर्षांपुर्वी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आपण पर्वती विधानसभा लढविणार नसल्याचे स्पष्ट केले होते. जगताप सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदार संघामधून लढतील असे सांगितले जाते.त्यामुळे अन्य इच्छूकांचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते .

महाराजांना दिलेला शब्द अखेरीस भाजपने पाळला – सातारा लोकसभा निवडणूक २१ लाच होणार ..

0

पुणे- अखेर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा  मुहूर्त ठरला आहे. या पोटनिवडणुकीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.

साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला आहे. यापूर्वी त्‍यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यामुळे सातार्‍यात पोटनिवडणूक होत आहे.

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीमध्ये गेल्या शनिवारी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा आणि देशातील लोकसभेच्या ६४ जागांवरील पोटनिवडणुकांच्या कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये महाराष्ट्रातील साताऱ्यातील पोटनिवडणुकीचा समावेश नव्हता. यामुळे सातार्‍याची पोटनिवडणूक लांबणीवर पडली असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, निवडणूक आयोगाने साताऱ्यातील निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. यामुळे उदयनराजेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्‍ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार असून निवडणुकांचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाणार आहे. याचवेळी सातारा लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची अधिसूचना २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. तर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर आहे. अर्जांची छाननी ५ ऑक्टोबरला तर अर्ज मागे घेण्यासाठी मुदत ७ ऑक्टोबर आहे. मतदान २१ ऑक्टोबरला होऊन २४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

काव काव काव .. ये रे ये…. ( लेखिका -पूर्णिमा नार्वेकर )

0
“पपांना म्हणजेच माझ्या सासऱ्यांना मुंडीचं मटण खायचं होत. शेवटी शेवटी सर्व काही खावंस वाटतंच माणसाला; पण हे म्हणाले-नको देऊ, त्यांना त्रास होईल. तरीही मी यांचं काही ऐकलं नाही आणि सासऱ्यांना त्यांच्या आवडीचं मटण करून खायला घातलंच ” मालती सांगत होती. “यांना नाही आवडलं, मेल्यावर मग काय कावळ्याला पानात त्यांच्या आवडतं खाऊ घालणार का? त्यापेक्षा पपांना आता काय हवं-नको ते बघूया. त्यांना जे खायची इच्छा होते ते खाऊ दे.” पपा जाण्याआधीचा हा किस्सा, त्यांची आठवण निघाल्यावर मालती सांगत होती. खरंच आहे म्हणा…जिवंतपणी आपल्या माणसाला काय हवं-नको ते बघायला हवं. आधी यातना द्यायच्या आणि मेल्यावर पानाला कावळा शिवण्यासाठी जीवाचा आटापिटा करायचा, याला काय अर्थ.
पितृपंधरवडा सुरू झाला की दुपारच्या वेळी गल्लीच्या तोंडाशी, अंगणात, छतावर किंवा गच्चीवर पान किंवा वाडी ठेवून…काव काव काव…ये रे ये म्हणत कावळ्याला बोलावत आहेत, हे दृश्य हमखास पाहायला मिळतं. ‘कावळा पिंडाला शिवला’ म्हणजे आत्मा तृप्त झाला, असे मानतात. पितृपंधरवडा सुरू झाला आणि सोशल मिडियावर त्याबद्दल बरीच माहिती वाचायला मिळाली – कावळे हे निसर्गाचे साफसफाई कर्मचारी आहेत. कुठेही घाण किंवा मेलेला प्राणी दिसला की हे तातडीने हजर. सर्वत्र आढळणाऱ्या व परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या या पक्ष्याला साहजिकच असे महत्त्व दिले गेले आहे. कावळा संपूर्ण भारतभर आढळणारा पक्षी असून भारताशिवाय तो बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, मालदीव वगैरे देशांमध्ये सपाट भूप्रदेश ते डोंगराळ भागांत सर्वत्र आढळतो. जर त्या आत्म्याची कशातच वासना राहिलेली नसेल तर पटकन कावळा त्या पिंडाला शिवतो. अन्यथा तासनतास गेले तरी शिवत नाही. कारण आत्मा त्या पिंडावर बसलेला असतो व तो कावळ्याला जवळ येऊ देत नाही. असं म्हणतात की, फक्त कावळा आणि कुत्रा या दोनच प्राण्यांना मृत्यू व आत्मा दिसतो. कावळ्याला पितृपक्षात एवढे महत्त्व देण्याची आणखीही बरीच कारणे आहेत. माणसांना फक्त उजेडात दिसते. मांजराला उजेडात तसेच अंधारातही दिसते. वटवाघूळ व घुबडाला फक्त अंधारातच दिसते. यावरून स्पष्ट होते की प्रत्येकाला वेगवेगळी दृष्टी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे पिंडातील जीवात्मा दिसण्याची दृष्टी कावळ्यास मिळाली आहे, असं मानलं जातं. आज आपण एवढी वैज्ञानिक प्रगती केलेली असली आणि डोळ्याप्रमाणे लेन्स तयार केली असली तरी जीवात्मा पाहू शकलेलो नाहीत. कारण लेन्स तयार झालेली असली तरी तिच्यात ती कावळ्याची दृष्टी पाहण्यासाठीचे प्राण नाहीत.
महाराष्ट्रात पितृपंधरवड्याचे जसे महत्त्व आहे तसेच कर्नाटक, तामिळनाडू, केरळात सुद्धा ही प्रथा आहे. एवढेच नाही तर नेपाळ, कंबोडिया, मलेशिया, चीन, जपान या आणि अशा अनेक देशांत निरनिराळ्या पद्धतीने पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. म्हणजेच ही कृतज्ञ राहण्याची भावना जगाच्या पाठीवरही एकसारखीच आहे.
आपले पितर, आपले पूर्वजच आपल्याला आशिर्वाद द्यायला येतात तर मग पितृपंधरवडा हा अशुभ का मानायचा? हे दिवसही शुभ मानायलाच हवेत की! त्या निमित्ताने मदत, दानधर्म किंवा काही सामाजिक कार्य केले तर आपले पूर्वजही आपल्याला भरभरून आशिर्वाद देतील आणि कावळ्याच्या रूपाने आलेला त्यांचा आत्माही पिंडाला नक्कीच शिवेल. जन्मानंतरचा पहिला घास काऊच्या साक्षीनं खाणाऱ्या माणसाचा शेवटचा प्रवास कावळ्याच्या उपस्थितीशिवाय अपूर्ण आहे, एवढं मात्र खरं. कधी अनवधानाने चूक झाली तर माफ करा, कायमच हातून चांगले कार्य घडावे त्यासाठी तुमचे आशिर्वाद हवेत…याच सद्भावनेने नमस्कार करून त्या आत्मरुपी कावळ्याला म्हणावे काव काव काव…ये रे ये…
©पूर्णिमा नार्वेकर ,दहिसर

मुंबई – कन्याकुमारी एक्सप्रेसवर दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक -दौंड जवळील प्रकार

0

पुणे-मुंबई – कन्याकुमारी एक्सप्रेसवर दरोडा टाकण्याच्या तयारीतील चोरटय़ांच्या टोळीला लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले. चोरटय़ांकडून तीक्ष्ण शस्त्रे तसेच २५ मोबाइल संच जप्त करण्यात आले.

ओंकार राजू खरात (वय १९,रा. बारामती), रोहित शंकर पाटील (वय २०, रा. पिंपळे गुरव), कुमार सुभाष खंडागळे (वय ३१, रा. दहिफळ, जि. उस्मानाबाद) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी त्यांचे साथीदार अंकुश पवार, गफार शेख, मुकेश उर्फ बिहारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-कन्याकुमारी एक्सप्रेस गाडी दौंड रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर थांबली होती. त्यावेळी खरात, पाटील, खंडागळे, त्यांचे साथीदार पवार, शेख आणि बिहारी तीक्ष्ण शस्त्रे घेऊन अंधारात थांबले होते. रेल्वे गाडीतील डब्यात शिरून चोरटे प्रवाशांना लुटणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस अधीक्षक दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मौला सय्यद, मिलिंद झोडगे, जगदीश सावंत, अनिल दांगट, सुरेश रासकर यांनी सापळा लावला. महिलांसाठी आरक्षित असलेल्या डब्यात सहा चोरटे शिरले. पोलिसांच्या पथकाने त्यातील तिघांना पकडले. झटापटीत अंधाराचा फायदा घेऊन तिघेजण पसार झाले. चोरटय़ांकडून तपासात २५ मोबाइल संच, कोयता, लोखंडी गज, मिरची पूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

इम्रानही ट्रम्प भेटीला

0

न्यूयॉर्क:  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भेट घेण्याचे ठरवले आहे. ही भेट येत्या सोमवारी, ३० सप्टेंबर रोजी होईल.आठवडाभराच्या भेटीसाठी इम्रान खान यांचे येथे आगमन झाले असून ते संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला आज, मंगळवारी उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी ट्रम्प आणि इम्रान खान यांची भेट व्हाइट हाऊस येथे जुलैमध्ये झाली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी भारत व पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतर भारताने जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केले. हे कलम रद्द केल्यानंतर भारत व पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, ट्रम्प आणि इम्रान यांच्या भेटीविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

काश्मीर -ट्रम्प यांचा पुन्हा मध्यस्थीचा सूर

0

न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्र म्हणून संबोधल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ‘पाकिस्तान आणि भारताची तयारी असेल, तर काश्मीर प्रश्नावर मी मध्यस्थी करण्यास तयार आहे,’ असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. या मध्यस्थीसाठी मात्र दोन्ही देशांची सहमती असणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. ‘मी स्वत: उत्तम मध्यस्थ असून, माझी मदत करण्याची तयारी आहे. काश्मीर प्रश्न गुंतागुंतीचा असल्याने मी ही तयारी दर्शवली आहे,’ असेही ट्रम्प म्हणाले. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट झाली. त्या वेळी ट्रम्प यांनी मध्यस्थीचा सूर पुन्हा आळवला.

आप कडून कोथरूडमधून डॉ. अभिजित मोरे आणि पर्वतीतून संदीप सोनावणे

0

पुणे- आम आदमी पक्षाने यंदा पहिल्यांदाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. पक्षाने आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात पुण्यातील कोथरूडमधून डॉ. अभिजित मोरे आणि पर्वतीतून संदीप सोनावणे यांचा समावेश आहे. प्रीती मेनन यांनी हि माहिती ‘माय मराठी’ला कळविली आहे.

राज्यभरातून इच्छुकांचे अर्ज मोठ्या संख्येने पक्षाच्या राज्य कार्यालयाकडे जमा झाले होते. त्यानंतर छाननी प्रक्रिया आणि पक्षाची केंद्रीय स्तरावरील संसदीय समितीशी सल्लामसलत करून राज्य प्रचार समितीने ही यादी तयार केली. त्याची घोषणा पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन शर्मा यांनी केली. पुण्यातील दोन उमेदवारांव्यतिरिक्त चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी येथून पारोमिता गोस्वामी, मुंबईतील जोगेश्वरी पूर्वमधून विठ्ठल लाड, चांदिवलीमधून सिराज खान, दिंडोशीतून दिलीप तावडे, कोल्हापूरच्या करवीरमधून डॉ. आनंद गुरव, नाशिकमधील नांदगाव येथून विशाल वडघुले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आरोग्यक्षेत्रातील समस्यांबाबत सातत्याने आंदोलन करणारे डॉ. अभिजित मोरे हे एमबीबीएस असून त्यांनी ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंट’मधून उच्चशिक्षणही घेतले आहे. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून परवडण्याजोगी चांगली सार्वजनिक आरोग्यव्यवस्था, रुग्ण हक्क यासाठी ते कार्यरत आहेत. ‘आप युवक आघाडी’चे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या संदीप सोनावणे यांनी वकिलीचे शिक्षण घेतले असून ते सामाजिक चळवळीत विशेषत: शिक्षण हक्क चळवळीत सक्रिय आहेत.

”आप’ देशात सर्वाधिक वेगाने वाढणारा राजकीय पक्ष असून अल्पावधीतच दिल्लीमध्ये या पक्षाने आपले सरकार स्थापन केले आहे. भाजप-शिवसेना सरकारचे पाच वर्षातील अपयश व सरकारला धारेवर धरून जनतेचे खरे मुद्दे मांडण्यात कमी पडलेले विरोधी पक्ष यामुळे जनतेला त्यांचा खरा आवाज मिळवून देण्यासाठी पक्ष ही निवडणूक लढवत आहे,’ असे पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

‘भ्रष्टाचारी राज्याची ओळख फडणवीस यांनी बदलली’-जे. पी. नड्डा

0
 
पुणे-पाच वर्षांपूर्वी राज्यातील सर्व पैसा उचलून स्वत:ची घरे भरणाऱ्या नेत्यांमुळे महाराष्ट्राची ओळख भ्रष्टाचारी राज्य म्हणून झाली होती. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे चित्र बदलले’, असे प्रशस्तिपत्र भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी दिले. राज्याला प्रगतिपथावर पुढे नेण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीतही पुन्हा भाजपलाच विजयी करण्याची संधी दवडू नका,’ असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
 
भाजपतर्फे पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या विजय संकल्प मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आगामी निवडणुकीची रणनीती स्पष्ट करताना कलम ३७० सह केंद्र सरकारने घेतलेले निर्णय आणि राज्यातील फडणवीस सरकारच्या योजनांची माहिती प्रत्येक घराघरांत पोहोचवा, अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या. कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी निवडणुकीत पक्षाला अधिक चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिक्षण आणि आरोग्यातील पिछाडी राज्याने भरून काढली असून शेतकऱ्यांना कर्जमाफी, सिंचन प्रकल्प, रस्ते विकास, पायाभूत सुविधा, मेट्रो अशा अनेक विकास प्रकल्पांना राज्याचा चेहरामोहरा बदलण्याचे काम वेगाने सुरू आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
 
जम्मू-काश्मीरमधील कलम ३७०, तिहेरी तलाक, कॉर्पोरेट करातील सवलत यासारख्या अनेक निर्णयांमुळे नागरिकांना फायदा होत आहे. त्याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवा, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘देशातील बहुतांश राजकीय पक्ष हे एखाद्या कुटुंबाशी संबंधित आहेत. त्यांचे राजकारण कुटुंबातील ठरावीक व्यक्तींभोवतीच फिरते; पण भाजपमध्ये ही स्थिती नाही. त्यामुळे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही मोदींसारखा सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान होऊ शकतो’, असे नमूद करत कार्यकर्ता हीच भाजपची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.
 
या मेळाव्याला पक्षाचे सरचिटणीस आणि प्रदेश संघटनमंत्री व्ही. सतीश, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील खासदार, आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपच्या कार्यक्रमाला उदयनराजेंची गैरहजेरी…

0

पुणे- काही दिवसांपूर्वी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये आलेले उदयनराजे भोसले यांनी भजपच्या भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विजय संकल्प मेळाव्याला गैर हजेरी लावल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. या कार्यक्रमात भाजपचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. पण, दिवसभर साताऱ्यात असूनही उदयनराजे कार्यक्रमाला आले नाही. विधानसभेसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर न झाल्याने राजे कदाचित नाराज असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्यात झालेल्या मेळाव्याला पश्चिम महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, खासदार अमर साबळे, हर्षवर्धन पाटील शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. पण उदयनराजेंची कार्यक्रमात अनुपस्थिती होती.

 

आधार हॉस्पिटल वरील खोट्या कारवाईप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल डॉ दीपक शिंदे यांच्या पाठीशी

0
राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल चे निवेदन
पुणे:आधार हॉस्पिटल मध्ये हृदयविकाराने झालेला रुग्णाचा मृत्यू संदर्भात जाणूनबूजून केलेल्या खोट्या तक्रार   प्रकरणी डाॅ. दिपक शिंदे यांच्या पाठीशी   पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल  ऊभी आहे आणि सर्वतोपरि मदत करत आहे, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल चे अध्यक्ष डॉ सुनील जगताप यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
 या संदर्भात   २१ सप्टेंबर रोजी सेल ची बैठक घेण्यात आली.  डाॅ. शिंदे यांनी प्रकरणाची माहिती दिली. निवृत्त पोलिस अधिकारी आपले वजन वापरून जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचे , ससून च्या तज्ज्ञ समितीने याप्रकरणी उपचारात हेळसांड झाली नसल्याचा अहवाल दिल्याचेही त्यांनी या बैठकीत सांगितले.
 सेलचे विधानसभा अध्यक्ष व कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
कात्रज येथे  डाॅ सुनिल जगताप  यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या प्रकरणी सर्व वैद्यकीय संघटना डॉ दीपक शिंदे यांच्या पाठीशी असून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा असल्याचे डॉ सुनील जगताप यांनी सांगितले

सोमवारी २४ तारखेला युतीची घोषणा शक्य ..

0

मुंबई- अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या युतीच्या जागा वाटपाचा तिढा अखेर सुटल्याचे चित्र आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे उद्या म्हणजेच 24 सप्टेंबरला संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा करणार आहेत. सध्या युतीबाबत बोलण्यासाठी शिवसेना आमदारांची एक बैठक मुंबईत होत आहे, त्यामुळे युतीच नेमकं काय होणार हे उद्या कळू शकते.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असून उद्या याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबईत शिवसेना आमदारांची सध्या बैठक आहे, यात जागा वाटपाचे सूत्र ठरू शकते. त्यामुळे बहुप्रतीक्षित युतीची घोषणा आणि जागा वाटपाबद्दलची उत्सुकता अखेर संपणार आहे.

युज्ड कार डीलर्स असोसिएशनचे पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

0
पुणे : जुन्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीमध्ये पारदर्शकता यावी, ग्राहकांना कोणत्याही मध्यस्थीशिवाय छुपे खर्च घेता व्यवहार व्हावेत आणि वापरलेल्या गाड्यांच्या क्षेत्रात होणारे नवनवीन बदल याविषयीची सविस्तर माहिती उपलब्ध व्हावी, तसेच विक्रेत्यांना मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने युज्ड कार डीलर्स असोसिएशन पुणेची (युसीडीएपी) स्थापना करण्यात आली आहे. या असोसिएशनचे उद्घाटन व ज्येष्ठ विक्रेत्यांचा सत्कार सोहळा येत्या शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी ७.०० वाजता रेसिडेन्सी क्लब येथे होणार असून, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम व व्हेन्टेज कार संग्रहालयाचे सुभाष सणस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ‘युसीडीएपी’चे अध्यक्ष विनोद अहिर यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी उपाध्यक्ष सचिन साकोरे, सचिव निलेश भागवत, खजिनदार आशिष खंडेलवाल, राजेश ढवळे, मोहसीन सय्यद, प्रकाश उदेशी, अतुल जैन आदी उपस्थित होते.
विनोद अहिर म्हणाले, “असोसिएशनच्या माध्यमातून डिलर्सना ‘ऑटोकट्टा’ हे ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे ग्राहकांशी थेट संपर्क करून चांगला आणि पारदर्शी व्यवहार करणे शक्य होणार आहे. ग्राहकांना आपल्या गाडयांना योग्य किमंत मिळेल. आज अनेक ऑनलाईन पोर्टल्स आहेत. मात्र, त्यात अनेकदा फसवणूक झाल्याचे आपल्या लक्षात येते. आपल्या देशात आजही स्वतःच्या गाडीचे स्वप्न पाहणारे अनेक लोक आहेत. त्यांना कमी व्याजदरावर अर्थसहाय्य मिळाले, तर या उद्योगाला प्रोत्साहन मिळेल. भविष्यात असोसिएशनमार्फत वापरलेल्या गाड्यांचे मेळावे भरविणे, एका छताखाली वेगवेगळ्या गाड्या आणि डीलर्स आणणे यासह रस्ते सुरक्षा विषयक जागृतीपर कार्यक्रम राबविणे आदी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.”

बँक ऑफ बडोदाने शेतकऱ्यांसाठी सुरु केला राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म

0

पुणे  भारतातील तिसरी सर्वात मोठी कर्ज देणारी बँक म्हणून नावाजल्या जाणाऱ्या बँक ऑफ बडोदाने देशभरातील शेतकऱ्यांसाठी “बडोदा किसान” हा शेतीशी निगडित डिजिटल प्लॅटफॉर्म सुरु केला आहे.  २१ सप्टेंबर २०१९ रोजी बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी एस जयकुमार यांनी याचे उदघाटन केले.  यावेळी बँकेचे कार्यकारी संचालक श्री. विक्रमादित्य सिंग खिची, शेती व आर्थिक समावेश – मुख्य व्यवस्थापक (चीफ को-ऑर्डिनेशन) श्री. बी आर पटेल, बँकेचे मुख्य व क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि इतर उपस्थित होते.  शेतकरी, स्वयं-सहायता गटांच्या महिला सदस्या आणि गावकऱ्यांनीही मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

“बडोदा किसान” हा शेतीशी निगडित राष्ट्रीय पातळीवरील डिजिटल प्लॅटफॉर्म असून शेतकऱ्यांच्या विविध गरजा याठिकाणी पूर्ण होतील.  हे वेब आधारित पोर्टल असून मोबाईलवर सहज वापरता येऊ शकते.  यामध्ये लँडिंग पेज म्हणून एम कनेक्ट प्लस मोबाईल अप्लिकेशनचा वापर केला जाईल.  हा प्लॅटफॉर्म माहिती तंत्रज्ञानावर आधारित असून शेतकऱ्यांच्या सर्व प्रमुख गरजा याठिकाणी पूर्ण होतील.  यामध्ये विविध प्रकारच्या सूचना, हवामानाचा अंदाज, पिकांची स्थिती, जमिनीतील आर्द्रतेचे प्रमाण, वेगवेगळ्या किडींबद्दल माहिती, बाजारभाव, पिकांसंबंधी सल्लासेवा आणि कृषी उत्पादनांच्या विक्रीसाठी नवनवीन आर्थिक पर्याय इत्यादींचा यामध्ये समावेश असेल.  यापैकी काही सेवांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, उदाहरणार्थ, आगाऊ अंदाज, विश्लेषण, इमेज सेन्सिंगवर आधारित पिकांचे ग्रेडिंग, किडींबद्दल आगाऊ माहिती इत्यादी.  भविष्यात टप्प्याटप्प्याने या प्लॅटफॉर्ममधे विविध सेवांचा समावेश करण्यात येईल.  सध्या याची सुरुवात गुजरातपासून करण्यात आली आहे.

यावेळी “बडोदा किसान” या शेतीशी निगडित डिजिटल प्लॅटफॉर्मचा शुभारंभ करण्याबरोबरीनेच अनेक इतर उपक्रम देखील सुरु करण्यात आले.  देशभरातील शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक प्रस्तावांवरील कार्यवाही केंद्रीय पद्धतीने व्हावी यासाठी बँकेने गांधीनगर आणि हैदराबाद येथे सुरु केलेल्या केंद्रांचे उदघाटन, स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतागृहे व पिण्याच्या पाण्यासाठी घरगुती सुविधांचे बांधकाम, नूतनीकरण यासाठी कर्ज योजनेचा शुभारंभ, ग्रामीण भागांमध्ये घरबांधणीसाठी कर्ज योजनेचा शुभारंभ हे कार्यक्रम देखील यावेळी पार पडले.

याशिवाय बँकेच्या किसान क्रेडिट कार्ड, स्वयं-सहायता गट, दुग्धव्यवसाय, स्मार्टफोन्स, शेती उपकरणे इत्यादी योजनांतर्गत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्ज स्वीकृती पत्रे व धनादेश यांचेही वाटप यावेळी करण्यात आले.  प्रधान मंत्री सुरक्षा बिमा योजना, प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजना यासारख्या विविध सामाजिक योजनांच्या लाभार्थींना देखील धनादेश यावेळी देण्यात आले.  बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविण्याच्या उद्देशाने बँकेने स्थापन केलेल्या आरएसटी संस्थांमधून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना यावेळी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.  मुख्य व्यवस्थापक व ऍग्रिकल्चरल ऍडव्हान्स विभागाचे प्रमुख श्री. पी. विनोद कुमार रेड्डी यांनी आभारप्रदर्शन केले व कार्यक्रम समाप्त झाला.