Home Blog Page 2836

महाराष्ट्रात 300 मल्टिब्रँड मोबाईल रिपेअरिंग स्टुडिओ सुरु होणार

0

वउद्योजक व रोजगार निर्मितीसाठीचा महत्वाकांक्षी प्रकल्प

पुणे: दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज (डिक्की) व अॅस्पायर नॉलेज अॅण्ड स्किल्स इंडिया प्रा. लि. च्या वतीने मोबाईल रिपेअरिंग करणारे मल्टिब्रँड मोबाईल रिपेअरिंग स्टुडिओ सुरु करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात याचे 300 स्पोक सेंटर्स उभारण्यात येणार असून ते तालुका पातळीवर सुरु करण्यात येणार आहेत. एससी व एसटी प्रवर्गाबरोबरच महिला व इतर प्रवर्गातील नवीन उद्योग सुरु करु इच्छिणाऱ्या स्किल्ड, कौशल्यधारित, अनुभवी व परिश्रम करु इच्छिणाऱ्यांची निवड चाचणीद्वारे यासाठी निवड केली जाणार आहे, अशी माहिती डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे व अॅस्पायर नॉलेज अॅण्ड स्किल्स इंडिया प्रा. लि. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एससी व एसटी प्रवर्गातील होतकरू तरुण-तरुणींना नवउद्योजक बनविण्याच्या दृष्टीकोनातून डिक्की यासाठी मदत करणार असून त्याला केंद्र सरकारच्या स्टँड अप इंडिया मध्ये समाविष्ट करून घेतले जाणार आहे. तसेच, या योजनेस महाराष्ट्र सरकारकडून 15 टक्के सबसिडी मिळणार आहे. डिक्की व अॅस्पायर नॉलेज अॅण्ड स्किल्स इंडिया प्रा. लि. च्या दरम्यान यासंदर्भात मंगळवारी सामंजस्य करार झाला. याप्रसंगी डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे, टेलिकॉम सेक्टर स्किलचे विभागीय व्यवस्थापक प्रदीप जसवाणी व अॅस्पायर नॉलेज अॅण्ड स्किल्स इंडिया प्रा. लि. चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक संजय गांधी उपस्थित होते.

तालुका पातळीवर लघु उद्योजक तयार करणे आणि गाव पातळीवर रोजगार उपलब्ध करून बेरोजगारीचा प्रश्न सोडविणे हा या प्रकल्पाचा मूळ हेतू आहे. आताच्या काळात ग्रामीण भागातही मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मोबाईल दुरुस्तीबरोबरच मोबाईल संदर्भात इतरही काम कुशलतेने होण्याची गरज भासते. हीच गरज ओळखून आणि त्यातील रोजगार निर्मितीची ताकद लक्षात घेऊन मल्टिब्रँड मोबाईल रिपेअरिंग स्टुडिओ महाराष्ट्रात सुरु करण्यात येत आहेत. डिक्की व अॅस्पायर नॉलेज अॅण्ड स्किल्स इंडिया प्रा. लि. एकत्र येऊन हा प्रकल्प राबवित आहेत. यासाठी लागणारे नवउद्योजक शोधण्याचे काम डिक्की करणार आहे, असेही मिलिंद कांबळे व संजय गांधी यांनी सांगितले.

या प्रकल्पांतर्गत सर्व स्पोक सेंटर ही प्लग अॅण्ड प्ले स्वरुपाची असणार आहेत. सर्व स्पोक सेंटर फ्रॅंचाईजी म्हणून काम करतील. सर्व स्पोक सेंटर एकसारखी असतील आणि टेलिकॉम सेक्टर स्किल कौन्सिलकडून प्रमाणित करण्यात येतील. स्पोक सेंटरमध्ये ग्राहक गॅलरी व मुलभूत मोबाईल रिपेअरिंगच्या सुविधा असतील. सर्व मोबाईल कंपन्यांच्या मोबाईलची याठिकाणी दुरुस्ती होईल. महाराष्ट्रात तालुका पातळीवर असणाऱ्या स्पोक सेंटरमध्ये मोबाईलमधील जटील समस्या ज्या दुरुस्त होणार नाहीत त्यासाठी विभागीय पातळीवरील हब सेंटरची मदत मिळणार आहे. हे हब सेंटर पुणे, नवी मुंबई, औरंगाबाद, नागपूर याठिकाणी असणार आहेत. या हब सेंटरमध्ये अद्ययावत उच्च दर्जाची यंत्रणा व कुशल प्रशिक्षित कर्मचारी असणार आहेत. ग्राहकांच्या सर्व शंकांचे निरसन करून त्यांना उच्च दर्जाची सुविधा पुरविणे हा मुख्य उद्देश या हब सेंटरचा असणार आहे, असेही संजय गांधी म्हणाले.

स्पोक सेंटरसाठी नवउद्योजक निवडण्यासाठी चाचणी होणार आहे. त्यामध्ये त्याचे मोबाईल क्षेत्रातील ज्ञान तपासले जाणार आहे. आवश्यक ते प्रशिक्षण देऊन हा व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारा परवाना, त्यासाठीची कागदपत्रे, साधनसामुग्री, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला जाणार आहे, असेही संजय गांधी यांनी यावेळी सांगितले.

ज्ञानार्जनाला नवतंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक- विवेक सावंत

0
पुणे : “आज तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. मोबाईलसारख्या उपकरणाच्या मदतीने अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. तेव्हा शिक्षकांनी अधिकाधिक ‘स्मार्ट’ होत अध्यापन करावे. ज्ञानार्जन करताना त्याला नवतंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक सुकर आणि आनंददायी होईल,” असे मत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे संचालक विवेक सावंत यांनी व्यक्त केले.
पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्मार्ट क्लासरूमचे’ उद्धाटन विवेक सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. माजी प्राचार्य प्रा. डॉ. अविनाश वळवडे यांच्या समरणार्थ देवकी वळवडे यांच्या तसेच प्रा. अरविंद  म्हसकर, ज्योत्स्ना म्हसकर यांच्या देणगीतून ही स्मार्ट क्लासरूम उभारण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, कुलसचिव सुनील रेडेकर, संचालक राजेंद्र कडूसकर, संचालक आनंद कुलकर्णी, देवकी वळवडे, म्हसकर यांच्या भगिनी नीला पेंडसे, प्राचार्य डॉ. योगेश नेरकर, उपप्राचार्या डॉ.कल्याणी कुलकर्णी आदी उपस्थित होते. रोबोटिक्सच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोटच्या मदतीने स्मार्ट क्लासरूमचे’चे उद्धाटन झाले. या स्मार्ट क्लासरूपच्या माध्यमातून संस्थेच्या नाशिक येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत तसेच जपान येथील माजी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यात आला.
विवेक सावंत म्हणाले, “महाविद्यालयात ‘स्मार्ट क्लासरूम’ची सुरवात करत एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. यामुळे संस्थेच्या विविध महाविद्यालयाती प्राध्यापक विद्यार्थी एकमेकांशी जोडले जातील. प्रवास न करता महाविद्यायात ‘रिमोट’ च्या सहायाने विषय शिकविला जाईल. वर्गात जास्ती जास्त शैक्षणिक वातावरण निर्माण होईल. नवमाध्यमांचा नवतंत्रज्ञानाची वापर आपण सर्वजण करतो,  याचा उपयोग शिक्षणप्राक्रियेत करून घेणे आवश्यक आहे. आपण वापरत असलेल्या स्मार्ट फोन मध्ये अडीचलाख पेटंट आहेत. याचा उपयोग अध्ययन अध्यापन प्रक्रियेत करता येईल. तेव्हा स्मार्ट क्लासरूम अधिकाधिक स्मार्ट करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी देखील तुम्ही नेमके कोण आहेत, कोणत्या गोष्टीत तुम्हाला गती आहे हे ओळखून पुढची वाटचाल करावी. पुस्तकी ज्ञान सोबतच आवांतर ज्ञान घेण्याकडे भर द्या. तुमची स्पर्धा आर्टिफिशल इंटेलिशन्स सोबत आहे हे लक्षात घेऊन पुढे पाऊल टाका.”
वळवडे म्हणाल्या, ”अविनाश वळवडे हे नेहमी भविष्याचा विचार करायचे म्हणून त्याच्या समरणार्थ स्मार्ट क्लासरूम साकारण्यात आली याचा आनंद आहे. ते शिक्षण क्षेत्रासाठी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नेह्मीची झटत राहिले. विद्यार्थ्यांनी या स्मार्ट क्लासरूमच्या मदतीने शिक्षण घेत प्रगती करावी. स्मार्ट क्लासरूमच्या रूपाने त्यांचे शिक्षणकार्य निरंतर सुरु राहील.”
सुनील रेडेकर यांनी स्मार्ट क्लासरूप संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्न आणि योगदान विषयी माहिती सांगितली. प्रा. वैदही सोहनी, प्रा. निकिता चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. योगेश नेरकर यांनी आभार मानले.

बँक ऑफ बडोदा आणि ह्युदांई मोटर इंडिया लि. यांच्यात ‘प्रीफर्ड फायनान्सर’ सामंजस्य करार

0

मुंबई– सार्वजनिक क्षेत्रातील भारतातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने ह्युदांई मोटर्स इंडिया लि. या देशातील पहिल्या स्मार्ट मोबाइल सोल्यूशन्स तसेच सर्वात मोठ्या निर्यातदार कंपनीबरोबर पसंतीचे वित्त पुरवठादार (प्रीफर्ड फायनान्सर) म्हणून सामंजस्य करार (एमओयू) केल्याचे जाहीर केले.

बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी. एस. जयाकुमार आणि ह्युदांई मोटर्स इंडिया लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सिऑन सिओब किम यांनी कागदपत्रांवर सह्या केल्या.

ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर (ओईम) (मूळ भागांचे उत्पादक) कंपनीसोबत बँक ऑफ बडोदाने अशाप्रकारची पहिलीच भागिदारी केली असून त्याअंतर्गत वितरक आणि ग्राहकांना तपशीलवार आर्थिक आराखडा मिळेल तसेच ह्युदांई मोटर्स इंडिया लि. च्या देशभरातील नेटवर्कमुळे बँकेचे अस्तित्वही विस्तारेल. वितरक वित्तपुरवठा बँकेच्या सध्याच्या पुरवठा साखळी वित्त उत्पादनानुसार केला जाईल.

या भागिदारीबाबत बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी. एस. जयाकुमार म्हणाले, ‘ह्युंदाई मोटर्स इंडिया लि. सारख्या आघाडीच्या प्रवासी वाहन उत्पादक कंपनीबरोबर सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही वाहन उद्योगाला पाठिंबा देण्यासाठी प्रयत्नशील असून या उद्योगाच्या भविष्याबाबत सकारात्मक आहोत. वाहन कर्ज/वितरक वित्त/व्यावसायिक वित्त क्षेत्रात भरपूर संधी असून या करारामुळे बाजारपेठेतील आमचे अस्तित्व विस्तारेल अशी खात्री वाटते.’

सामंजस्य करारावर सही करण्याच्या कार्यक्रमात ह्युदांई मोटर्स इंडिया लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सिऑन सिओब किम म्हणाले, ‘बँक ऑफ बडोदासारख्या भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकेबरोबर करार करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. यामुळे ग्राहक तसेच वितरकांना नव्या युगातील बँकिंग आणि वित्त उत्पादने उपलब्ध होतील. या करारामुळे आमचे वितरक भागीदार त्यांच्या इनव्हेंटरी निधीबाबतच्या गरजा प्रभावीपणे पूर्ण करू शकतील याची आम्हाला खात्री वाटते.’

आयसीआयसीआय बँक यंदा महाराष्ट्रातील रिटेल लोन्सचे वितरण 13,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार

0

पुणे: आयसीआयसीआय बँकेने आर्थिक वर्ष 20 मध्ये, महाराष्ट्रातील रिटेल लोनचे वितरण वार्षिक 20%, म्हणजे 13,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार असल्याचे आज जाहीर केले आहे. या आर्थिक वर्षात, राज्यातील कन्झ्युमर लोन, मॉर्गेज लोन व अॅग्री लोन या रिटेल लोन्सच्या श्रेणींमध्ये झपाट्याने वाढ होणार आहे. (मुंबई शहर व उपनगरे बँकेच्या मुंबई प्रदेशाचा भाग असल्याने त्यांचा समावेश या घोषणेमध्ये करण्यात आलेला नाही)

बँकेने पर्सनल, कार व टू-व्हीलर, कमर्शिअल व्हेइकल व गोल्ड लोन यांचा समावेश असणाऱ्या कन्झ्युमर लोनच्या वितरणामध्ये आर्थिक वर्ष 19 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 20 मध्ये 22% म्हणजे 4,500 कोटी रुपयांपर्यंत वाढ करून ही वाढ साध्य करायचे ठरवले आहे. याचबरोबर, बँक मॉर्गेज लोनच्या वितरणात 11% म्हणजे 4,200 कोटी रुपयांपर्यंत वाढ करणार आहे.

“गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात रिटेल कन्झ्युमर लोन्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याची अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगती करत आहे आणि आर्थिक वर्ष 20 मध्ये राज्यात रिटेल लोनच्या वितरणामध्ये 20% म्हणजे 13,000 कोटी रुपयांहून अधिक वाढ होईल, असा अंदाज आहे. राज्यात कन्झ्युमर लोन्स, होम लोन्स व अॅग्री लोन्स यामध्ये वाढ करण्यावर आम्ही भर देत आहोत”, असे आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची यांनी सांगितले.

“ग्राहकांना तंत्रज्ञान-प्रणित तातडीने कर्जे देणे आणि आमची उत्पादने टिअर 2 व 3 शहरांत उपलब्ध करणे, यामुळे या वाढीला मोठी चालना मिळणार आहे. आमच्या तंत्रज्ञानाच्या क्षमतेच्या आधारे आम्ही आता पूर्व-मंजूर ग्राहकांना डिजिटल चॅनलद्वारे होम लोन, इन्स्टंट पर्सनल लोन व ऑटो लोन यांना तातडीने मंजुरी देतो,“ असे बागची म्हणाले.

मॉर्गेज पोर्टफोलिओमध्ये, अफोर्डेबल हौसिंग श्रेणीच्या वाढीला चालना देण्यावर भर दिला जाणार आहे. अफोर्डेबल हौसिंग श्रेणीमध्ये, बँक सोलापूर, अहमदनगर, नाशिक, नागपूर या शहरांवर आणि पुण्याच्या बाह्यभागावर – तळेगाव, चाकण, मोशी, वाघोली, भर देत आहोत. बँक होम लोनचा विस्तारही मोठ्या प्रमाणात क्षमता असणाऱ्या नागपूर, नाशिक, कोल्हापूर व सातारा या टिअर 2 व 3 शहरांत करत आहे.

बागची यांनी नमूद केले, “आम्ही आर्थिक वर्ष 20 मध्ये महाराष्ट्रातील मॉर्गेज लोन वितरणाचे प्रमाण 11% म्हणजे 4,200 कोटी रुपयांपर्यंत वाढवायचे ठरवले आहे. यास चालना देण्यासाठी, आम्ही बहु-आयामी धोरण अवलंबले आहे. यामध्ये, अफोर्डेबल हौसिंग श्रेणीवर भर, टिअर 2 व 3 शहरांत विस्तार आणि क्रेडिट प्रोसेसिंग सेंटर्सच्या संख्येत वाढ (झटपट निर्णय घेण्यासाठी व होम लोनच्या वितरणासाठी) यांचा समावेश आहे. एक कोटी रुपयांपर्यंतच्या होम लोनला तातडीने डिजिटल पद्धतीने होम लोन मिळण्यासाठी आम्ही या क्षेत्रातील पहिली सुविधा नुकतीच जाहीर केली आहे. हा तंत्रज्ञान-प्रणित उपक्रम पूर्व-मंजुरी मिळालेल्या आमच्या लाखो ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.”

ग्राहकांसाठी होम लोन वितरणाची प्रक्रिया जलद व सोयीची करण्यासाठी बँकेने रत्नागिरी, तळेगाव, अहमदनगर, अमरावती, धुळे व खोपोली या नव्या सहा शहरांमध्ये क्रेडिट प्रोसेसिंग युनिटची संख्या वाढवण्याचे नियोजन केले आहे.

पर्सनल लोन्सविषयी बोलताना बागची यांनी सांगितले की, बँकेला ‘इन्स्टा पीएल’ या इन्स्टंट उत्पादनाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. “या सुविधेद्वारे आमच्या पूर्व-मंजूर ग्राहकांना पर्सनल लोनसाठी अर्ज करता येऊ शकतो आणि तातडीने त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. याचबरोबर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, हिंगोली, भंडारा व उस्मानाबाद अशा टिअर 2 शहरांत/जिल्ह्यांत पगारदार व स्वयंरोजगार असणाऱ्या व्यक्तींकडून पर्सनल लोनसाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

ऑटो लोनविषयी त्यांनी सांगितले, “पूर्णतः डिजिटल पद्धतीने, आमच्या लाखो ग्राहकांना मंजुरीचे पत्र तातडीने देण्यासाठी आम्ही नुकतेच पूर्व-मंजूर ‘इन्स्टा ऑटो लोन’ जाहीर केले आहे.”

आयसीआयसीआय बँक उद्योजकांसाठी आणि मायक्रो स्मॉल अँड मीडिअम एंटरप्राइज (एमएसएमई) उद्योगांसाठी नावीन्यपूर्ण डिजिटल सेवा देण्यावरही भर देत आहे. यामुळे त्यांना व्यवसाय करणे सुलभ होते व व्यवसायाचा विस्तार करण्याच्या संधींचा लाभ घेता येतो.

बँक आपल्या सेल्फ हेल्प ग्रुप (एसएचजी) कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांमधील उद्योजकतेला उत्तेजन देत आहे आणि बँकेने अंदाजे 2,500 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे कर्ज वितरित केले आहे व 12 लाखांहून अधिक महिलांना लाभ दिला आहे. आर्थिक वर्ष 20 च्या अखेरीपर्यंत, बँकेने 15 लाखांहून अधिक महिला लाभार्थींपर्यंत पोहोचण्याचे आणि एकूण 3,000 कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

आयसीआसीआय ग्रुप महाराष्ट्र राज्यामध्ये आयसीआयसीआय अकॅडमी फॉर स्किल्सद्वारे गरजू युवकांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देत आहे. अकॅडमीची महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर व नरसोबावाडी येथे चार केंद्रे आहेत आणि राज्यातील 24,900 हून अधिक गरजू युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 20 मध्ये, शाश्वत रोजगार मिळवण्याच्या हेतूने अकॅडमी  27,000 हून अधिक युवकांना प्रशिक्षित करणार आहे.

वंचित व गरजू युवकांना ‘विक्री कौशल्ये’, ‘कार्यालय प्रशासन’, ‘इलेक्ट्रिकल व होम अप्लायन्सेस दुरुस्ती’, ‘रेफ्रिजरेटर व एअर-कंडिशनिंग दुरुस्ती’, ‘पंप व मोटर दुरुस्ती’, ‘असिस्टंट ब्युटी थेरपीस्ट’, व ‘होम हेल्थ एडी’ अशा कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचे महाराष्ट्रातील स्किल अकॅडमी सेंटर्सचे उद्दिष्ट आहे. दरवर्षी 125 हून अधिक बॅचना प्रशिक्षण देण्याची सेंटर्सशी क्षमता आहे. नागपूरमधील अकॅडमी केवळ महिला प्रशिक्षणार्थींना सामावून घेते.

27 सप्टेंबर दुपारी 2 वाजता ईडी कार्यालयात स्वतः जाणार..विचारणा करणार,दिल्लीच्या तक्तापुढे झुकणार नाही. – शरद पवार

0

 

मुंबई -ईडीने माझ्यासंदर्भात शिखर बँक प्रकरणात जो गुन्हा दाखल केला आहे. त्या गुन्ह्याच्या संदर्भात मी माझी स्वतःची भूमिका अशी आहे की मी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार. नक्की गुन्हा काय केला ते मला समजून घेतलं पाहिजे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. संपूर्ण महिनाभर मी निवडणूक प्रचारासाठी वेळ देणार आहे. त्यामुळे माझं वास्तव्य मुंबईच्या बाहेर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता ईडीच्या ऑफिसमध्ये मी स्वतः जाणार आहे. तिथे जाऊन ईडीचा ‘पाहुणचार’ स्वीकारणार आहे असाही टोला शरद पवार यांनी लगावला. तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांना माझ्याबाबत जी माहिती हवी असेल ती देईन असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. मंगळवारी संध्याकाळी ईडीने शिखर बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भातच शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर माझा पू्र्ण विश्वास आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

” मी राज्य सहकारी बँकेचा कधीही संचालक वा सदस्य कधीच नव्हतो असेही त्यांनी सांगितले. मी महिनाभर राज्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार आहे, त्यामुळे ईडीला माझी गरज लागली तर नी एकदम अदृष्य झालो असं वाटू नये म्हणून मीच ईडीच्या मुंबईतील कार्यालयात दाखल होणार असल्याचे पवारांनी सांगितले.”

दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा संस्कार या महाराष्ट्राला शिकवलेला नाही, अशी कोपरखळीही पवार यांनी कुणाचं नाव न घेता मारली. अशा प्रकारची कारवाई होण्याचा माझ्यावरील हा दुसरा प्रसंग असे त्यांनी सांगितले. १९८० मध्ये अमरावतीमध्ये एका शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मला अटक करण्यात आलीली होती मात्र माझ्या बाजुनं निकाल लागला व प्रश्न शिल्लक राहिला नाही असं ते म्हणाले.

ईडीला संपूर्ण सहकार्य करायची माझी भूमिका असून नक्की गुन्हा काय आहे, हे मला समजावून घ्यायचं आहे असं ते म्हणाले. त्याचबरोबर ईडीच्या अधिकाऱ्यांना जी काही माहिती हवी असेल ती देईन शिवाय अन्य काही पाहुणचार त्यांना करायचा असेल तर त्यासाठीही माझी तयारी असल्याची मिश्किल टिप्पणी पवार यांनी केली आहे. मात्र, शाहू फुले आंबेडकर यांच्यावर आस्था ठेवणारा मी व्यक्ती असून संविधानावर विश्वास ठेवतो असं त्यांनी सांगितलं.

डॉ. दीपक शिंदे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  उपोषण  सुरु 

0

चुकीचे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर  कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन       

पुणे:’एक वर्षापूर्वी हृदयरोगाने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाच्या उपचारात हेळसांड झाल्याचा आरोप करून नुकसानभरपाईच्या नावाखाली भरमसाठ पैशांची मागणी डॉ दीपक शिंदे (आधार हॉस्पिटल) यांच्याकडे करणाऱ्या आणि  खोटा गुन्हा दाखल करणार्‍या काशिनाथ तळेकर  या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर  कारवाई व्हावी’ या मागणीसाठी  डॉ. दीपक शिंदे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २३ सप्टेबर पासून आमरण उपोषण  सुरु असताना डॉक्टर संघटनांनी एकत्रितपणे आज त्यांची भेट घेवून पाठींबा दिला .डॉ दीपक शिंदे आणि डॉक्टर्स संघटनांना २४ सप्टेबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बोलावून  घेवून चर्चा केली आणि  कारवाई करण्यासंदर्भात पोलीस आयुक्तांकडून माहिती घेवून कारवाई करण्याचे आश्वासन  दिले.
कारवाई होईपर्यंत उपोषण सुरु ठेवणार असल्याचे डॉ दीपक शिंदे यांनी यावेळी सांगितले
डॉक्टर असोसिएशन चे पदाधिकारी ,राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेल चे पुणे अध्यक्ष डॉ सुनील जगताप ,डॉ मंदार रानडे (न्याय वैद्यकीय सल्लागार ) ,डॉ संतोष पवार (पीडीए -पुणे डॉक्टर्स असोसिएशन ) ,डॉ मंगेश खटावकर (सिंहगड रोड डॉक्टर्स असोसिएशन ),डॉ राजेंद्र खेडेकर ,डॉ मुश्ताक मुकादम, डॉ महेश  शिंदे,डॉ अनिता मुनोत ,डॉ विजय मुनोत,डॉ आदित्य पाटील,डॉ प्रताप ठुबे ,डॉ राहुल सूर्यवंशी .डॉ अजित पाटील इत्यादी यावेळी उपस्थित होते

डॉ शिंदे का उपोषण करीत आहेत ?        

वर्षभरापूर्वी घडलेल्या गणेश गोरे या  रुग्णाच्या मृत्युच्या  घटनेसंदर्भात आधार हॉस्पिटलवर निवृत्त पोलीस उपअधीक्षक काशिनाथ तळेकर यांनी  आठवड्यापूर्वी खोटा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे रुग्णालयाची आणि डॉ. दीपक शिंदे  यांची  बदनामी तसेच गैरसमज वाढत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी डॉ. दिपक शिंदे यांनी २३ सप्टेबर रोजी  पत्रकार परिषदेत केली.
त्यांच्या या मागणीला एम सी आय एम चे अध्यक्ष डॉ आशुतोष गुप्ता,जनरल  प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या डॉ. संगीता खेनट, एनसीपी डॉक्टर सेल,पुणे डॉक्टर्स असोसिएशन, डॉ राजेंद्र खेडेकर अध्यक्ष-ज्ञानयोग सेवा ट्रस्ट,डॉ मंदार रानडे -न्याय वैद्यकीय सल्लागार,डॉक्टर्स असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, वारजे डॉक्टर्स,राष्ट्रवादी कॉंग्रेस  डॉक्टर सेल चे डॉ सुनील जगताप,डॉ रवींद्र काटकर,पी डी ए डॉक्टर असोसिएशन चे डॉ संतोष पवार,डॉ संभाजी कारंडे,पी एसआर डी ए पुणे सिहगड रोड डॉक्टर असोसिएशन चे डॉ मंगेश खटावकर,डॉ आसावरी पाटील,इंडियन मेडिकल असोसिएशन चे डॉ संजय पाटील,डॉ संजय नवरंगे,वारजे डॉक्टर असोसिएशन यांचा पाठिंबा असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. परिषदेला डॉ. महेश दरेकर, डॉ अभिनंदन बुद्रुक उपस्थित होते.

 

आचारसंहिता काळात आतापर्यंत राज्यात ३ कोटीहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त

0

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून मागील तीन दिवसात आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग, पोलीस यांनी केलेल्या कारवाईत एकूण 3 कोटी 79 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये एक कोटी 36 लाखांची रोख रक्कम, 1 कोटी 68 लाख किंमतीचे मद्य, 29 लाख रुपये किंमतीचे मादक पदार्थ व 46 लाख रुपये किंमतीचे मौल्यवान दागिने यांचा समावेश असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

आदर्श आचारसंहिता कालावधीत आतापर्यंत शासकीय जागेवरील 75 हजार 981, सार्वजनिक ठिकाणच्या 73 हजार 445 व खासगी ठिकाणावरील 16 हजार 428 जागांवरील अनधिकृत फलक, बॅनर, कटआऊट व झेंडे काढण्यात आले आहेत. सर्व जाहिराती, पोस्टर व कटआऊट हटविण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मुदतीत हे सर्व साहित्य काढण्यात येत आहेत. आचारसंहिता भंग प्रकरणी आतापर्यंत 50 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. कायद्यानुसार बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर करू नये व पर्यावरणाला हानी पोहोचेल अशा वस्तू टाळाव्यात, असेही आवाहन श्री.शिंदे यांनी केले.

शरद पवार, अजित पवारांवर ईडीकडून गुन्हा दाखल:सहकारी बँक घोटाळा

0

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजलेला असताना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीपराव देशमुख, ईश्वरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलावडे, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे आणि मदन पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे चेअरमनसह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत हे गुन्हे दाखल करण्यात आल्यानं राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याचा आरोप या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे.

हा घोटाळा २५ हजार कोटींचा असल्याचं ईडीने म्हटलं आहे. सहकारी बँकेचे आर्थिक स्थितीत कमकुवत असतानाही सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर करण्यात आलं. कर्ज वाटप करताना मोठ्या प्रमाणावर अनियमितता होती, असा ठपका ईडीने ठेवला आहे. तसेच सहकारी साखर कारखाने आजारी पडल्यानंतर चुकीच्या पद्धतीने फायदा घेण्यासाठी अतिशय कमी किमतीत विकली गेल्याचं ईडीने म्हटलं आहे. सहकारी साखर कारखाने काही विशिष्ट राजकारण्यांच्या जवळच्या नातेवाईकांना विकल्या गेल्याचा दावाही ईडीने केला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने अतिशय मनमानीने कर्ज वाटप केले होते. यामुळे बँकेला तब्बल १० हजार कोटींचं नुकसान झालं होतं. या प्रकरणात अण्णा हजारे यांनी तीन वर्षांआधीच याचिका दाखल केली होती. याप्रकरणी चौकशी समिती देखील नेमण्यात आलेली होती. चौकशी समितीने अहवाल सादर केल्यानंतर अखेर कोर्टाने याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर आता तब्बल ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले होते. अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते पाटील आणि शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आले होते. मात्र आता ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केल्याने शरद पवार आणि अजित पवारांवरही गुन्हे दाखल केल्याचं वृत्त आहे.

प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केले वंचितचे 22 उमेदवार, 26 सप्टेंबरला उर्वरित उमेदवार घोषित करणार

0

मुंबई- वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील 22 जागेंवरचे उमेदवार त्यांनी जाहीर केले. एमआयएमने काडीमोड घेतल्यानंतर वंचितने स्वतःच सर्व जागा लढवणार असल्याचे जाहीर केले होते. उर्वरित उमेदवारही लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

26 तारखेपर्यंत अंतिम यादी विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षांबरोबर 288 जागा लढवणार आहोत. यादी फायनल करण्याचे काम सुरू आहे. उर्वरित यादी 26 सप्टेंबरपूर्वी जाहीर केली जाईल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात बोलताना दिली होती.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी

1.डॉ. आनंद गुरव, करवीर 2.बाळकृष्ण शंकर देसाई, कराड-दक्षिण 3.दीपक शामदिरे, कोथरुड 4.सुरेश जाधव, शिराळा 5.बाळासाहेब चव्हाण, कोरेगाव 6.किसन चव्हाण, पाथर्डी-शेवगाव 7.अनिल कुऱ्हाडे, शिवाजीनगर 8.मिलिंद काची, कसबा पेठ 9.दिलीप पांडुरंग कावडे, दक्षिण कोल्हापूर 10.शहानवाला जब्बार शेख, भोसरी 11.शाकीर इसालाल तांबोळी, इस्लामपूर 12.अरुण जाधव, कर्जत-जामखेड (VBA candidate first list) 13.सुधीर शंकरराव पोतदार, औसा 14.चंद्रलाल वकटुजी मेश्राम – ब्रह्मपुरी 15.अरविंद सांडेकर – चिमूर 16.माधव कोहळे – राळेगाव 17.शेख शफी अब्दुल नबी शेख – जळगाव 18.लालसू नागोटी – अहेरी 19.मणियार राजासाब – लातूर शहर 20.नंदकिशोर कुयटे – मोर्शी 21.अड आमोद बावने – वरोरा 22.अशोक विजय गायकवाड – कोपरगाव

भाजपा शिवसेना सरकारचा शिवस्मारकातही भ्रष्टाचार! न्यायालयीन चौकशी करावी – सचिन सावंत व नवाब मलिक यांची मागणी

0

मुंबई,-
शिवछत्रपतींचा आर्शिवाद, चला देऊ मोदींना साथ अशा घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने शिवाजी महाराजांना देखील सोडले नाही. राज्यातील २१ मंत्र्याचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी समोर आल्यावर क्लीन चीट चे वाटप करत स्वतः च्या प्रतिमेवर कोणताही डाग नाही असे म्हणणा-या भ्रष्ट आणि लज्जाहीन भाजप सरकारने शिवस्मारकातही भ्रष्टाचार करण्याचे पाप केले आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केला आहे.


गांधीभवन येथे संयुक्त पत्रकारपरिषदेला संबोधित करताना नवाब मलिक म्हणाले की, ज्यांचे नाव घेऊन सत्तेत आले त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भाजप शिवसेना सरकारने भ्रष्टाचार केला आहे. पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारकाचे जलपुजन झाले होते,  मात्र अद्यापही  स्मारकाचे काम सुरू झालेले नाही पण भ्रष्टाचार मात्र सुरु झाला आहे असे नवाब मलिक म्हणाले.
सचिन सावंत म्हणाले की, राज्य सरकारने राज्यातील जनतेला अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधणार असे आश्वासन दिले होते. त्यानुसार शिवस्मारकाची २०१७ साली निविदा काढण्यात आली. यामध्ये ‘एल & टी’ या कंपनीने जवळपास ३ हजार ८२६ कोटी रूपयांची बोली लावली.  शिवस्मारकाची  निविदेमधील नोंद असलेली उंची ही एकूण १२१. २ मी. होती. त्यामध्ये ८३.२ मी. उंचीचा पुतळा आणि ३८ मी. लांबीची तलवार अंतर्भूत होती. पंरतु ‘एल & टी’ कंपनीबरोबर केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करून वाटाघाटीमधून कंत्राटाची रक्कम २ हजार ५०० कोटी रूपयांपर्यंत कमी केली गेली. आणि यासाठी पुतळ्याच्या संरचनेत बदल करून एकूण उंची १२१. २ मी. ही कायम ठेवली असे दाखवून पुतळ्याची उंची ७५.७ मी पर्यंत कमी करण्यात आली व तलवारीची लांबी ४५.५ मीटरपर्यंत वाढवण्यात आली. त्याचबरोबर स्मारकाचे एकूण क्षेत्र १५.६ हेक्टरवरून १२.८ हेक्टरपर्यंत कमी केले. त्यातही पहिल्या टप्प्यात केवळ ६.८ हेक्टर क्षेत्रच विकासाकरिता वापरले जाणार आहे. यामुळे तांत्रीक दृष्टीकोनातून हा प्रकल्प व्यवहार्य आहे का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे सदर प्रकल्पात २८ फेब्रुवारी २०१८ रोजी मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली त्यानंतर एल & टी कंपनीच्या सहमतीसाठी बांधकाम विभागाने पत्र पाठवले. एल & टी कंपनीने या सर्व गोष्टींचा एका दिवसात अभ्यास करून १ मार्च रोजी सकाळी आपली सहमती दर्शवली. आणि त्याच दिवशी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कंपनीला देकारपत्र देण्यात आले. शिवस्मारकाच्या कामाचा करारनामा २८ जून २०१८ रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता आणि एल & टी कंपनीमध्ये करण्यात आला. परंतु हाच करारनामा करण्यावेळी सदर प्रकल्पाचे वरिष्ठ विभागीय लेखापाल यांनी त्याच दिवशी आपली असहमती हस्त लिखीत स्वरूपात नोंदवली. त्यामध्ये त्यांनी
१.   मला स्वतःला कंत्राटदाराशी केलेल्या वाटाघाटी आणि करारनाम्याच्या संदर्भातील कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आलेले नाही.
२.   “As negotiation of tendered rate is prohibited by CVC, however a drastic cost of contract reduced through negotiation from 3800 cr to 2500 cr which is a violation of CVC guidelines. (केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्दर्शक तत्त्वानुसार  निविदेमध्ये भरलेली रक्कम वाटाघाटीद्वारे कमी करता येत नाही. पंरतु या प्रकऱणात ती रक्कम ३८०० कोटी रूपयांवरून २५०० कोटी रूपयांवर आणून मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत. हे केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात आहे)
३.   निविदाकार अंतिम झाल्यानंतर Scope of Work म्हणजेच कामाच्या स्वरूपात बदल करावयाचा झाल्यास फेरनिविदा काढण्याची आवश्यकता आहे. तथापी तसे न केल्याने केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्दर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले आहे.
४.   “cost reduction through negotiation may result substandard work and any reduction in scope of work may impact adversely to the project.” (प्रकल्पाच्या एकूण किंमत वाटाघाटीद्वारे कमी केल्याने कामाचा दर्जावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे आणि कामाच्या स्वरूपात बदल केल्याने प्रकल्पावरही विपरीत परिणाम होईल.)
सदर प्रकल्पाच्या वरिष्ठ विभागीय लेखापाल असलेल्या या अधिका-याने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तिथेच न थांबता पुन्हा २४ जुलै २०१८ रोजी कार्यकारी अभियंत्याला पत्र लिहून यासंदर्भात गंभीर आक्षेप उपस्थित केले. त्यात ते असे म्हणतात. “निविदेच्या मूळ मसुद्यानुसार, मूळ बोलीनुसार व देकार पत्रानुसार या प्रकल्पाचे शासनाच्या वतीने मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदार यांच्यामध्ये करार होणे अपेक्षित होते. तथापी तेथे कार्यकारी अभियंता आणि कंत्राटदार यांच्यामध्ये करार झाला आहे, ही बाब गंभीर अनियमितता व निविदेच्या अटी शर्तींचा भंग करणारी आहे.” व याबरोबरच सदर अधिका-याने या प्रकरणाची लेखा परीक्षण करण्याची गरज व्यक्त करित सदर पत्राची प्रत मुख्य लेखापरीक्षक ऑडीट -१ यांना पाठवली.
सदर प्रकल्पाचे काम सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी आदेशाने बंद झाल्यावरही या प्रकल्पाच्या जवळपास ८० कोटी रूपयांचा खर्च शासनातर्फे दाखवण्यात आला आहे. सदर कंपनीला कंत्राट आणि रक्कम देण्याकरिता शासनाचा प्रचंड दबाव आहे हे या अधिका-यांच्या पत्रांवरून स्पष्ट होते. सदर वरिष्ठ विभागीय लेखापाल यांची बदली झाल्यानंतर दुस-या विभागीय लेखापाल गट – १ “अधिकारी विकाश कुमार” यांनी २६ फेब्रुवारी २०१९ रोजी अगोदरच्या वरिष्ठ विभागीय लेखापालांनी २४ जुलै २०१८ रोजी दिलेल्या पत्राचा उल्लेख करत या प्रकल्पाचे लेखापरीक्षण करण्याची मागणी केली. यामध्ये त्यांनी व्यक्त केलेली निरीक्षणे अधिक गंभीर आहेत. त्यात ते असे म्हणतात की, “या प्रकल्पामध्ये असलेल्या अनियमिततांकडे दुर्लक्ष करता येत नाही. या अनियमिततेबरोबरच हा प्रकल्प पुढे रेटावा की नाही मानसिक द्वदांमध्ये मी आहे. वरिष्ठ अधिका-यांकडून या प्रकल्पाच्या कामाची बिले सदर कंपनीला देण्याकरिता प्रचंड दबाव येऊ शकतो. त्यामुळे ही बिले मंजूर करणे हे योग्य की अयोग्य हा माझ्यापुढील गहन प्रश्न आहे. ”
या पत्राच्या अनुषंगाने पुढे मुख्य अभियंत्यांनीदेखील स्वतः प्रधान लेखापरीक्षक यांच्या कार्यालयाला पत्र लिहून लेखा परीक्षणाची मागणी केली.
या संदर्भात राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास न आणता या सर्व अधिका-यांनी स्वतःहून लेखापरीक्षणाची मागणी करणे यातच शासनाचा किती मोठा दबाव होता हे दिसून येते. मुख्य अभियंत्यांनी करारनाम्यावर स्वाक्षरी न करता आपल्या कनिष्ठ अधिका-यांकडून करारनामा करून घ्यावा हेच या अधिका-यांची मानसिक स्थिती दर्शवते.
शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला हे स्पष्ट आहे. भ्रष्टाचाराच्या डोंगरावर उभे राहून पारदर्शकतेच्या गप्पा मारणा-या क्लीन चीटर मुख्यमंत्र्यांनी खालील प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
१.   शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेत केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक नियमांचे उल्लंघन झाले आहे की नाही? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे.
२.   शिवस्मारकाच्या कामाचा करार मुख्य अभियंता आणि कंत्राटदार यांच्याऐवजी कार्यकारी अभियंता व कंत्राटदार यांच्यात का केला?
३.   लेखा विभागाच्या दोन अधिका-यांनी लिहीलेल्या तीन पत्रांमध्ये या प्रकल्पात गंभीर अनियमितता असल्याचे म्हटले आहे त्याबद्दल सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी.
४.   काम केले नसतानाही कंत्राटदार कंपनीची बिले मंजूर कारवीत म्हणून प्रकल्पाचे वरिष्ठ निभागीय लेखापाल यांच्यावर सकारमधून नेमके कोण दबाव टाकत आहे?
५.   मुख्य अभियंत्यासह सर्व अधिका-यांनी या प्रकल्पाची चौकशी व लेखापरीक्षण व्हावे या करिता प्रधान लेखापरीक्षकांकडे मागणी केली परंतु सरकारला मात्र हे कळवले नाही. त्यामुळे त्यांच्यावर ही वेळ का आली?
हिम्मत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत अन्यथा नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत असे सचिन सावंत आणि नवाब मलिक म्हणाले.

अमिताभ बच्चन यांना यंदाचा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर

0

मुंबई- बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांना यंदाचा “दादासाहेब फाळके” पुरस्कार जाहीर झाला आहे. सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सर्वानुमते अमिताभ बच्चन यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. ट्वीटमध्ये त्यांनी लिहीले की, ‘महानायक अमिताभ बच्चन, ज्यांनी 2 पिढ्यांसाठी मनोरंजन आणि प्रेरणा दिली आहे, त्यांची दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड झाली आहे. संपूर्ण देश आणि आंतरराष्ट्रीय समुदाय खूप आनंदीत आहे. त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.”

डिक्की घडवणार पाचशे नवउद्योजक!

0

अपेडा आणि एमएआयडीसीचे मिळणार सहकार्य

एससी व एसटी प्रवर्गातील नवउद्योजकांसाठी स्टँड अप इंडियाचा आधार

पुणे : एससी व एसटी प्रवर्गातील तरुण नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) संस्थेच्या वतीने भारत सरकारच्या अपेडा आणि राज्य सरकारच्या एमएआयडीसीच्या सहाय्याने प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत पाचशे नवउद्योजक घडविण्याचे काम होणार असून हा प्रकल्प भारत सरकारच्या स्टॅंडअप इंडिया प्रकल्पांतर्गत राबविला जाणार असल्याची माहिती डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी आज दिली.

डिक्की व अपेडा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी व अन्नधान्य प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यात क्षेत्रातील संधी याविषयावर आज पुण्यात जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मिलिंद कांबळे बोलत होते. यावेळी अपेडाचे उपसरव्यवस्थापक आर. के. मंडल, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापक सत्यजीत वार्डे, पश्चिम भारत डिक्कीचे अध्यक्ष निश्चय शेळके, उद्योजक राजकुमार धुरगुडे पाटील, महाराष्ट्र डिक्कीचे अध्यक्ष संतोष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ व डिक्की यांच्या दरम्यान सामंजस्य करार झाला.

कृषी आणि अन्नधान्य प्रक्रिया उद्योगात निर्यात क्षेत्रातील संधीबाबत आज नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाबरोबर सामंजस्य करार झाला. आणि ही संस्था व भारत सरकारची अपेडा संस्था यामुळे एससी व एसटी प्रवर्गातील तरुण उद्योजक होण्यासाठी मदत होणार आहे. सरकारच्या या विभागाशी संबंधीत योजना आणि उद्योग करण्यासंदर्भातील माहिती, प्रशिक्षण देण्यासंदर्भात डिक्की काम करीत आहे. हा उपक्रम भारत सरकारच्या स्टॅंडअप इंडिया प्रकल्पांतर्गत जोडला जाणार असल्याने त्याला विशेष मदतदेखील मिळेल. याचा उपयोग वंचित घटकांतील तरुणांना नोकरी मागणारे नाही तर, देणारे बनविण्यासाठी होऊ शकेल, असा विश्वास मिलिंद कांबळे यांनी यावेळी व्यक्त केला.

अपेडा या संस्थेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांच्या उद्धारासाठी इतके मोठे काम होत असल्याचा आनंद आहे. याबरोबरच डिक्की या संस्थेमुळे वंचित घटकांतील तरुणांना उद्योजक बनविणे शक्य होणार आहे. अपेडाच्या अनेक योजना असून यासंदर्भात उद्योग सुरु करण्यास इच्छुक असलेल्यांनी अपेडाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी व संपर्क करावा, असे आवाहन आर. के. मंडल यांनी केले.बाबासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने वास्तवात आणण्यासाठी डिक्की कार्य करीत असल्याचा अतिशय आनंद आहे. डिक्कीच्या उपक्रमांना मदत करण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे उद्योजक राजकुमार धुरगुडे पाटील यांनी सांगितले.निश्चय शेळके यांनी डिक्कीतर्फे करण्यात आलेल्या कार्याची माहिती देण्यात आली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्वतयारी प्रशिक्षण संपन्न

0
पुणे, दि. 24 – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या पूर्वतयारीसाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, समन्वय अधिकारी व क्षेत्रिय अधिकारी यांचे  प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाला विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेतील महत्वाच्या सर्वच विषयावर प्रशिक्षण प्रमुख डॉ. ज्योत्स्ना पडीयार यांनी मार्गदर्शन केले.

          यावेळी  उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पडीयार यांनी निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचना, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या सूचना, मतदान यंत्रे वापरण्याबाबत चेकलिस्ट, मतदान केंद्र तयार करणे, मॉक पोल घेणे, मतदान प्रक्रियेसंदर्भातील विविध प्रपत्रे भरणे, मतदान प्रक्रियेबाबत वेळोवेळी येणाया संभाव्य अडचणीचे निवारण

त्यादीविषयी सविस्तर माहिती दिली.

चेतन तुपे पाटील मुसंडी मारणार ? (व्हिडीओ)

0

पुणे- महाराष्ट्रात विधानसभेच्या रणांगणात राजकीय रंगाची धुळवड दिसत  असताना पुण्यातील सर्व मतदार संघात  सध्या उमेदवारीसाठी जोरदार स्पर्धा होताना दिसते आहे .  पूर्वेकडेचा हडपसर विधानसभा मतदार संघ या दृष्टीने महत्वाचा असा मतदार संघ मानला जातो . राष्ट्रवादी च्या स्थानिक मातब्बर नेते मंडळींनी येथून सत्ताधाऱ्यांपुढे जोरदार आव्हान निर्माण केले आहे . मात्र निवडणुकीच्या प्रारंभी त्यांना पक्षांतर्गत आव्हानांना सामोरे जावे लागते आहे .महापालिकेतील धुरंधर म्हणून गणना होणारे तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि सध्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील आणि माजी महापौर प्रशांत तुपे यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार स्पर्धा दिसून येते आहे. पक्षांतर्गत पातळीवर बरोबर असलेली हि नेते मंडळी उमेदवारी साठी मात्र एकमेकांचे जोरदार स्पर्धक बनलेले दिसत आहेत. या मध्ये तुपे पाटील  उमेदवारी मिळविण्यात मुसंडी मारणार काय ? आणि जर मिळालीच तर सर्व स्वपक्षीयांना ,मित्र पक्षांना बरोबर घेऊन सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांना निवडणुकीच्या रणांगणात नामोहरम करणार काय ? अशा प्रश्नांवर राजकीय वर्तुळात  जोरदार मंथन होताना दिसत आहे . या पार्श्वभूमीवर एका माध्यम प्रतिनिधीने  तुपे पाटील यांच्याशी साधलेला हा संक्षिप्त संवाद आम्ही येथे देत आहोत ..पहा,आणि ऐका , नेमके तुपे पाटील काय म्हणाले हे त्यांच्याच शब्दात ….

श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्ट असा असेल या वर्षीचा नवरात्रौत्सव

0

 

  1. नवरात्र उत्सव दि. २९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०१९
  2. घटस्थापना रविवार दि. २९ सप्टेंबर २०१९ सकाळी ७.३० वाजता
  3. सकाळी ६ ते ९ अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करणे
  4. दररोज सकाळी १० व रात्री ९ वा. महाआरती
  5. गणपती मंदिरात रोज दुपारी भजने
  6. सोमवार दि. ७ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री ९.३० वाजता नवचंडी होम
  7. मंगळवार ८ ऑक्टोबर दुपारी ५ पासून सिमोल्लंघनाची पालखी मंदिरापासून बँड, ढोल, झेलीम, नगारा, चौघडा, भुते, वाघ्या मुरळीसह, देवीच्या सेवेकर्‍यांचा सहभाग हेलिकॉप्टरमधून देवीवर पुष्पवृष्टी
  8. श्री अभिषेक अरुण अनगळ या वर्षीचे सालकरी
  9. पौरोहित्य श्री नारायण कानडे गुरुजी
  10. नवरात्र उत्सवानंतर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु करणार, यात सरकता जीना ची सोय उपलब्ध करणार. त्यामुळे वृद्ध, अपंग यांना देवीच्या दर्शनाचा लाभ मिळणार
  11. यंदाच्या नवरात्र उत्सवात स्तनपान कक्षाची व्यवस्था श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे
  12. श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टतर्फे   सांगली व कोल्हापुर जिल्हातील पुरग्रस्तांसाठी रु. ३,००,०००/- ची देणगी मु‘यमंत्री रिलीफ फंडाला देण्यात आली
  13. पूजा व प्रसाद साहित्याचे पाच स्टॉल
  14. पोलीस, होमगार्ड, खाजगी सुरक्षा रक्षक, मंदीरात बंदुकधारी सुरक्षा रक्षक
  15.  व्यवस्थापन सहाय्यासाठी अनिरुद्ध सेवा केंद्राचे १५० स्वयंसेवक
  16. सुरक्षिततेसाठी २० सीसीटीव्ही कॅमेरे
  17. महानगर पालिकेमार्ङ्गत किटनकनाशकांची फवारणी, कचरा उचलणेसाठी जादा कंटेनरची व्यवस्था, पाण्यात जंतुनाशके टाकणे
  18. ग्रीन हिल्स ग्रुपच्या सहकार्याने निर्माल्याचे खत निर्माण करण्याचा प्रकल्प
  19. अग्निशामक दलाची गाडी (घटस्थापना ते दसर्‍यापर्यंत)
  20. २४ अवर्स सर्व्हिसेसतर्फे भाविकांसाठी रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहे. युवराज तेली मेमोरिअल ट्रस्ट तर्फे cardiac ambulance ची सोय करण्यात आली आहे. तसेच ८ तासाच्या ड्युटीमध्ये ६ डॉक्टर असे २४ तासात १८ डॉक्टर भाविकांच्या सेवेला असणार आहेत. औषधोपचार मोङ्गत दिले जाणार आहेत.
  21. पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मेदानावर विनामूल्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
  22. भाविकांना दर्शन घेऊन लवकरात लवकर बाहेर पडता यावे यासाठी बॅरिकेटची व्यवस्था
  23. मंदिर परिसरात रंगरंगोटीची कामे अंतिम टप्यात
  24. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई, लाईट गेल्यास जनरेटरची व्यवस्था
  25. सर्व भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा रुपये दोन कोटीचा मंदिराच्या परिसरात विमा
  26. यात्रेतील रांगेत उभे रहाणार्‍या भक्तांसाठी पिण्याचे पाणी देण्याची व्यवस्था
  27. यंदा पुरूषांसाठीचे सार्वजनिक स्वच्छतागृहाचे पूर्ण नूतनीकरण करण्यात आले आहे.
  28. यंदा मंदिराच्या मुख्य गाभार्‍यात चांदीचे छत बसविण्यात आले आहे
  29. दि. ३/१२/२०१९ रोजी World disabilit day निमित्त रोटरी क्लब ऑफ खडकी यांचे  तर्फे देवस्थानच्या परिसरात सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत जयपूर फुट कँप आयोजित करण्यात आला आहे. पोलियो ग्रस्तांना मोफत कॅलीपर्स आणि कुबड्या दिल्याजातील. सर्व वयोगटांच्या व्यक्तींनी शिबीराचा लाभ घ्यावा.