Home Blog Page 2833

“द्वेष छोडो देश जोडो “विश्वमैत्री सायकल यात्रा 1 तारखेला पुण्यात

0
पुणे-“द्वेष छोडो देश जोडो “असा महात्मा गांधींच्या विचारसरणी वरील शांतीचा संदेश देणारी  विश्वमैत्री सायकल यात्रा 1 तारखेला पुण्यात येते आहे.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीने बा-बापु १५० जयंतीनिमित्त “विश्वमैत्री सायकल यात्रेचे ” आयोजन केले होते..१४नोव्हेंबर २०१६ मध्ये सुरू झालेल्या या यात्रेचे प्रतिनिधित्व नितीन सोनवणे हा युवक करत आहे. आज तो युरोप मध्ये पोहचला असून तो महात्मा गांधींनी दिलेला शांतीचा संदेश देत जगभर फिरत आहे. तेथील जनता त्याचे आनंदाने स्वागत करीत असून त्यास शुभेच्छाही देत आहे.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीने “द्वेष छोडो देश जोडो ” यासाठी कस्तुरबा भवन नागपुर ते गांधी भवन पुणे यादरम्यान सायकल यात्रेचे महाराष्ट्र पातळीवर आयोजन केले आहे. या यात्रेचे नेतृत्व तुषार झरेकर हा युवक करत असुन हि यात्रा १५ सप्टेंबर २०१९ रोजी कस्तुरबा भवन नागपुर येथुन सुप्रसिद्ध लेखिका, समाजसेविका श्रीमती अरुणा सबाणे यांनी हिरवा झेंडा दाखवून शांती यात्रेचा शुभारंभ केला. या यात्रेत तुषार झरेकर (पुणे), अतुल नंदा (अहमदनगर), अविनाश दरेकर (राजगुरुनगर), महेश पाटील (जळगाव), विष्णू बदाले (परभणी) , अनिल बुर्डे (आळंदी देवाची), वेदांती चव्हाण (रायगड)  ऋतूजा पुकाळे (सोलापूर) हे तरुण सहभागी झाले आहेत. 
हि शांतीयात्रा महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या गांधी भवन कोथरूड पुणे येथे दिनांक १ आॅक्टोबर २०१९ रोजी पोहचेल. या यात्रेतील सहभागी कार्यकर्ते भारतीय समाजात शांतता रहावी यासाठी जनजागृती करत आहे आणि लोकांना या यात्रेत सहभागी होण्यासाठी तथा शांततेसाठी आवाहन करत आहे.
विविध जाती, जमाती आणि धर्मात एकत्र नांदणारा आपला भारत देश १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य झाला. हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सर्व जाती-धर्माचे लोक थोर नेते यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसक मार्गाने लढा दिला. तेव्हा देशात स्वातंत्र्य उदयास आले.  त्यासोबतच संविधान अंगीकृत करून लोकशाहीची मुल्ये रूजवली. हा ठेवा जपणे आणि पुढच्या पिढीकडे तो सुरक्षितपणे हस्तांतरित करणे गरजेचे आहे.
आज देशात स्वातंत्र्य, लोकशाही, धर्म, राष्ट्रवाद या विषयी गैरसमज पसरविले जात आहेत. राष्ट्रीय नेत्यांवर गलिच्छ भाषेत टिका केली जात आहे.  लोकांमध्ये जात, धर्माच्या नावावर भांडणे लावुन दिली जात आहेत. यातुन तरूण पिढी भरकटली जात आहे.  यामुळे समाजात शांततेचा भंग होत आहे. महात्मा गांधींनी  हिंदु-मुस्लिम दंगलीचे शमन केले.  शांतता प्रस्थापित केली. हे अतिशय अवघड कार्य त्यांनी करुन दाखवले. म्हणून त्यांना “वन मॅन आर्मी ” अशा शब्दात गौरविण्यात आले .
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी यांनी समाजात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून “शांती दल” स्थापन केले तरूणांपुढे शांतीचा संदेश देणाऱ्या सायकल यात्रेची संकल्पना मांडली. त्याबाबत युवकांना आवाहन ही केले शांततेच्या विचारांनी प्रेरीत झालेल्या काही तरूणांनी यासाठी कटिबद्ध राहुन कार्य करण्याचे ठरविले आहे..

आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होतील -रोहित पवार

0

पुणे-

राष्ट्रवादीचे युवा नेते आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार  यांचा रविवारी (ता.29) वाढदिवस आहे. त्याच्या पूर्वसंध्येला रोहित पवार यांनी ही भावनिक पोस्ट अपलोड केली आहे शनिवारी रात्री उशिरा फेसबुकवर एक संदेश लिहलेली पोस्ट अपलोड केली आहे. 

पहा या पोस्ट मध्ये त्यांनी काय म्हटले आहे

तुमच्या आमच्यांपैकी जो कोणी व्यक्ती आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम करतो , त्याने आपल्या कुटुंबावर आलेल्या अडचणीच्या प्रसंगी जी प्रतिक्रिया दिली असती तितकीच प्रामाणिक प्रतिक्रिया म्हणजे आदरणीय अजित दादांनी आपल्या आमदारकीचा दिलेला राजीनामा.

माझ्या आजोबांच्या म्हणजेच पवार साहेबांच्या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या आजोबांना ठेवा आणि माझ्या अजित काकांच्या ठिकाणी तुम्ही आपल्या काकांना गृहीत धरा , सूडाच्या भावनेच्या राजकारणातून विरोधी पक्षांकडून साहेबांना आणि दादांना जो त्रास दिला जातो तेवढा त्रास जर तुमच्या आजोबांना किंवा काकांना दिला गेला असता तर तुम्ही काय केलं असत ? लक्षात ठेवा जिथं प्रामाणिक प्रेम असतं तिथंच एवढ्या प्रामाणिक भावना असतात. अजित दादांच्या आजच्या भावनाच आमच्या कुटुंबातील एकमेकांवर असलेलं प्रेम दाखवून देतात.

मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेन कि , पवार कुटुंबाला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न होउदे पण आमचं कुटुंब एवढं मजबूत आहे कि आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील . मी मागे पण सांगितलं आहे कि अजिबात कशाची काळजी करू नका , आपला गडी लै खंबीर हाय. समाजाप्रती जे आपलं कर्तव्य आहे ते पवार कुटुंबीय आजपर्यंत पार पाडत आलंच आहे आणि यापुढेही हे काम सुरूच राहील.असंच एकत्र राहूया आणि पवार साहेबांचे हात बळकट करूया.

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे

0

मुंबई: राज्यात मतदारांची संख्या वाढल्याने विधानसभा निवडणुकीसाठी 1 हजार 188 सहाय्यकारी मतदान केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यात मतदान केंद्रांची एकूण संख्या 96 हजार 661 एवढी असणार आहे.

पुण्यात 249 सहाय्यकारी मतदान केंद्रे

विशेष म्हणजे पुण्यात 249 सहाय्यकारी मतदान केंद्रे असणार आहेत. तर त्यानंतर ठाणे आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये 133 सहाय्यकारी मतदान केंद्रे असतील. मुंबई उपनगर मध्ये 100 तर पालघरमध्ये 73 सहाय्यकारी मतदान केंद्रे असणार आहेत.

साधारणपणे 1400 मतदारांमागे एक मतदान केंद्र असण्याचे प्रमाण आहे. गेल्या काही दिवसांत मतदारांना नाव नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. यामध्ये मतदारांची वाढ झाल्याचे दिसून आल्याने मतदान केंद्रांचीही वाढ करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकांसाठी यापूर्वी 95 हजार 473 मतदान केंद्रे स्थापन करण्याचे नियोजन होते. आता मात्र मतदारांची संख्या वाढली असल्याने नव्याने 1 हजार 188 मतदान केंद्रे राज्यभरात वाढविण्यात आली आहेत.

मतदान केंद्र स्थापन करण्याचे निकष, मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्र ठरविताना किमान आणि कमाल मतदार ठरविणे, मतदान केंद्रांच्या यादीची प्रसिद्धी, संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रावरील सुविधा याबाबतचा निर्णय भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतो. मतदार केंद्रांची ‘संवेदनशीलता’ बघून त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा पुरविण्यात येते.

शरद पवारांनंतर कोण या वरून वाद – खा. संजय काकडे यांचे मत (व्हीडीओ)

0
पुणे- आपल्या कुटुंबात कोणताही कलह नसल्याचे शरद पवार आणि अजीत पवार यांनी स्पष्ट  केले आहे. दरम्यान  शरद पवार आणि अजीत पवार यांच्या भोवती दिवसभर राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये चर्चा होत असताना भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी यासंदर्भात आपले मत काही माध्यमांपुढे व्यक्त केले आहे .अजीत पवार यांनीही आपली भूमिका मुंबईतील पत्रकार परिषदेतून स्पष्ट केली आहे .
मात्र शरद पवारांच्या नंतर पक्ष नेतृत्व कोणाकडे यावरून होणाऱ्या अंतर्गत कलहातून अजीत पवार यांनी राजीनामा दिला असावा असे आपले मत असल्याचे खा. संजय काकडे यांनी म्हटले आहे . बाकी वक्तव्ये हि सारवासारव आणि खोटी -नौटंकी सारखी आहेत असे हि ते म्हणाले ..पहा आणि ऐका नेमके खासदार संजय काकडे काय म्हणाले त्यांच्याच शब्दात ….

बदलत्या जीवनशैलीमुळे वंध्यत्वाच्या समस्येत वाढ – डॉ. ममता दिघे

0
पुणे, ”बदलत चाललेली जीवनशैली, मुलींचे वाढलेले वय, मद्यपान आणि धूम्रपाना यासारखी व्यसने, बदलत चालेली आहारशैली यामुळे महिलांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे. वंध्यत्वाची समस्या सोडविण्यासाठी योग्य आहार, व्यायाम यासह जीवनशैलीत सुधारणा आणि व्यसनमुक्त राहणे आवश्यक आहे,” असे मत स्त्रीरोगतज्ञ डॉ. ममता दिघे यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या वतीने ‘वैज्ञानिक कट्टा’ उपक्रमांतर्गत ‘वंध्यत्व : कारणे, उपाय व नवीन संशोधन’ या विषयावर डॉ. ममता दिघे यांचे व्याख्यान झाले. मयूर कॉलनी कोथरूड येथील भारतीय शिक्षण संस्थेमध्ये झालेल्या या व्याख्यानावेळी परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र सराफ, उपाध्यक्षा डॉ. नीलिमा राजूरकर उपस्थित होत्या.
डॉ. ममता दिघे म्हणाल्या, ”मुलीचे वाढलेले वय हे वंध्यत्वामागील महत्त्वाचे कारण आहे. मुलींना करिअर करण्यासाठी वेळ हवा असतो. तीस किंवा चाळीस वर्षांनंतर मुली मूल जन्माला घालण्याबाबत विचार करतात. जन्मताच स्त्रियांमध्ये दोन दशलक्ष स्त्रीबीज अंडी असतात. परंतू मुलींचे वय जसे जसे वाढत जाते तसे तसे बीजअंडी तयार होण्याचे प्रमाण कमी होते. योग्य वयात अंड्याचे फलित झाले नाही तर वंधत्व येते. चांगले स्त्रीबीज अंडी तयार होण्याचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे मूल होण्यास अडचणी निर्माण होतात. वंध्यत्वाची समस्या सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन होत आहे. आता मुलीचे वय विशीच्या दरम्यान असेल, तेव्हाच तिचे स्त्रीबीज अंडे फ्रीज करून ठेवता येते. जेव्हा मुल जन्मला घालायचे असेल, त्या वयात ते फ्रीज केलेले अंडे आणि पुरुष धातू याच्या साह्याने मुल जन्माला घालता येत आहे. टेस्ट ट्यूब बेबीचे तंत्रज्ञान पूर्वीपेक्षा आता खूप विकसित झाले आहे. यामध्ये अंड्यांमधील गुणसूत्र चांगली आहेत कि नाही हेही ओळखता येते, त्यामुळे प्रजोन्नती प्रक्रियेस मदत होते.”
डॉ. शर्वरी शुक्ला यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राजूरकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. थत्ते यांनी आभार मानले.

सामाजिक उन्नतीसाठी संस्थात्मक स्वरूप गरजेचे अतिरिक्त -आयुक्त अशोक मोराळे

0
 युज्ड कार डीलर्स असोसिएशनचे उदघाटन

पुणे : “माणूस हा समाजाचा मूलभूत घटक आहे. आपल्या परीने स्वतःची प्रगती करण्याचा त्याचा प्रयत्न सुरु असतो. मात्र, स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असेल आणि स्वतःसह सामाजिक प्रगतीमध्ये वाटेकरी व्हायचे असेल, तर आपण करत असलेल्या कामाला संस्थात्मक स्वरूप देणे गरजेचे आहे. त्यातून एकमेकांच्या प्रगतीत भर घालण्याबरोबरच समस्या सोडविण्यास मदत होते,” असे प्रतिपादन गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी केले.

रेसिडेन्सी क्लब येथे युज्ड कार डीलर्स असोसिएशनचे (युसीडीएपी) उद्घाटन अशोक मोराळे यांच्या हस्ते झाले. प्रसंगी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, व्हेन्टेज कार संग्रहालयाचे सुभाष सणस, ‘युसीडीएपी’चे अध्यक्ष विनोद अहिर, उपाध्यक्ष सचिन साकोरे, सचिव निलेश भागवत, खजिनदार आशिष खंडेलवाल, राजेश ढवळे, मोहसीन सय्यद, प्रकाश उदेशी, अतुल जैन आणि विविध बँकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी १२ ज्येष्ठ विक्रेत्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच ‘ऑटोकट्टा’ या ऑनलाईन पोर्टलचेही अनावरण करण्यात आले.
अशोक मोराळे म्हणाले, “संघटना महत्वाची असून, त्यामुळे आपली आणि इतरांची प्रगती होण्यास मदत होते. चोरीच्या गाड्यांच्या संबंधात वापरलेल्या गाड्यांचा व्यवहार करणाऱ्या विक्रेत्यांशी आमचा संबंध येतो. तेव्हा संघटना म्हणून आपण या कामात पोलिसांना सहकार्य करू शकता. कोणताही उदयोग, व्यवसाय करताना सीसीटीव्ही बसवणे महत्वाचे आहे. शहरात ३० हजार कॅमेरे जोडले गेले आहेत. प्रत्येक संघटनासोबत आम्ही जोडलो गेलो आहोत, जेणेकरून कोणतीही घटना घडल्यास तात्काळ माहिती मिळेल. आतापर्यंत सीसीटीव्हीच्या माध्यमातून १३३ गुन्हे आणि १२५ आरोपी पकडले आहेत. तुमच्या प्रगतीबरोबरच समाजाच्या उन्नतीसाठी संघटनेचा उपयोग करा.”

फत्तेचंद रांका म्हणाले, “काही वर्षापासून पुण्यात जुन्या गाड्यांचा व्यवसाय पिढ्यानपिढ्या लोक करत आहेत. परंतु त्यांची असोसिएशनची नव्हती. व्यवसाय करताना अडचण आली, तर ती सोडविण्यात असोसिएशन महत्वाची ठरते. सन्मानाने व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करते. असोसिएशनच्या माध्यमातून या विक्रेत्यांच्या कल्याणासाठी काम होईल. एखाद्या व्यापाऱ्यावर संकट आले तर सर्वांनी मिळून त्यांना मदत करणे गरजेचे आहे. तसे झाले, तर असोसिएशनचे महत्व अधोरेखित होईल. असोसिएशनची मजबूत असेल, तर तुमचे कोणीही नुकसान करू शकणार नाही. सदस्यत्वावेळी पूर्ण माहिती घ्यायला हवी.”

सुभाष सणस म्हणाले, “आज प्रत्येकाला कार घेण्याचे स्वप्न असते. या माध्यमातून ते पूर्ण होऊ शकते. असोसिएशनमार्फत डिलर्सना ‘ऑटोकट्टा’ हे ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध झाल्याने फायदा होईल. अधिकाधिक विक्रेत्यांनी असोसिएशनशी स्वतःला जोडून घ्यावे.” विनोद अहिर यांनी प्रास्ताविक केले व असोसिएशनच्या स्थापनेमागील भूमिका सांगितली. सायमा शेख यांनी सूत्रसंचालन केले. निलेश भागवत यांनी आभार मानले.

अजित पवार बारामतीतूनच लढणार -जयंत पाटील

0

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हेच बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलं. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारामतीतील आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या नाट्यावर पडदा पडल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांची बारामतीतील उमेदवारी जाहीर केली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात अजितदादांशिवाय पर्याय नाही. त्यांनी नाही म्हटलं तरी बारामतीतील लोकच त्यांना घरातून बाहेर काढून निवडणुकीला उभे करतील. लोकांचं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यामुळे बारामतीतून तेच लढतील, असं जयंत पाटील म्हणाले. तर जयंत पाटील आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. माझ्या उमेदवारीबाबत ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असं अजितदादांनी सांगितलं. आपल्या उमेदवारीवर शरद पवारांनी शिक्कामोर्तब केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच शिखर बँकेच्या संचालक मंडळावर आम्ही होतो, म्हणूनच पवार साहेबांना टार्गेट केलं जात असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. चौकश्या झाल्या पाहिजेत. चौकश्या झाल्यावरच सत्यबाहेर पडेल. आमच्या चुका असतील तर कारवाईही होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

ऋतुप्रधान लोक संगीताच्या उपशास्रीय रचनांनी श्रोते मंत्र मुग्ध !

0
पुणे: ऋतुप्रधान लोक संगीताशी नातं सांगणार्या कजरी, चैती, होरी अशा ,गायिका अनुराधा पटवर्धन(पं संजीव शेंडे यांच्या शिष्या)यांनी सादर केलेल्या उपशास्रीय रचनांनी श्रोते मंत्र मुग्ध झाले. निमित्त होते भारतीय  विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर झालेल्या ‘अनुबंध’ या कार्यक्रमाचे.
गेल्या अडिच वर्षा तील हा ८८वा सांस्कृतिक कार्यक्रम होता .
विविध ऋतू आणि उत्सवांच्या निमित्ताने , प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार आदी ठिकाणी लोकसंगीताद्वारे गायिल्या जाणार्या रचना गायिका पटवर्धन यांनी यावेळी सादर केल्या.
          ठुमरी क्वीन  शोभा गुर्टू यांच्या स्मृति दिना निमित्त प्रथम मांज खमाज रागातील पारंपरिक कजरी ठुमरी सादर करून गुर्टू यांना आदरांजली वाहण्यात आली.
           “बैरन रतियां कैसे आऊँ ?” ही दीपचंदी तालातील कजरी ठुमरी पटवर्धन यांनी गायली, त्यानंतर पारंपरिक लोकसंगीतातील मिश्र पिलू रागातील कजरी सादर झाली बोल होते “बरसन लागी सावन बूंदियां”.
 यानंतर पटवर्धन यांनी त्यांचे गुरू पं संजीव शेंडे यांची मिश्र गारा रागातील रचना “सावनभादो में झुला झुले रे” सादर केली.
              त्यानंतर सावनी शेंडे यांची राग मिश्र मांड मधील होरी या ऋतूवर अधारित “डारो ना रंग श्याम” ही रचना सादर केली
       चैती पारंपरिक चाचर ताल मधील “चैतर चुनर रंगा दे हो रामा” , तसेच ‘पूरब धून’ मधली “सननन रात करे” अशा बहारदार लोकसंगीतातील रचना पटवर्धन यांनी सुरेल आवाजात सादर केल्या.
 पारंपरिक बारहामासा रचनेने कार्यक्रमाची सांगता झाली. या गीताचे बोल होते “नई झुलनीकी छैय्या”!
 कार्यक्रमात गायिका अनुराधा यांना तबल्यावर केदार तळणीकर , व्हायोलिनवर निलिमा राडकर, व संवादिनीवर  कुमार करंदीकर यांनी समर्पक साथ दिली. कार्यक्रमात रंजना काळे यांनी उत्तम निवेदन केले.
      कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी केले.

उमेदवारांच्‍या निवडणूक खर्चावर जिल्‍हा प्रशासनाचे बारीक लक्ष- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

0

 पुणे- उमेदवारांच्‍या निवडणूक खर्चावर जिल्‍हा प्रशासनाचे बारीक लक्ष असून त्‍यासाठी विविध पथके कार्यरत करण्‍यात आल्‍याची माहिती जिल्‍हा निवडणूक अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. जिल्‍हाधिकारी कार्यालयात केंद्रीय खर्च निरीक्षकांच्‍या उपस्थितीत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अमलेंदू नाथ मिस्रा, रोहित मेहरा, किरण कट्टा, विजय चौधरी, पीयुष मुखर्जी,  अमरसिंग मेहरा, सैलेन समाद्दर, रोशन लाल हे केंद्रीय खर्च निरीक्षक तसेच सह पोलीस आयुक्‍त रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवडणूक खर्च व्‍यवस्‍थापन कक्षाचे प्रमुख अजित रेळेकर, ‍निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी जिल्‍हाधिकारी राम यांनी निवडणूक यंत्रणेच्‍या तयारीचा आढावा सादर केला. जिल्‍ह्यातील 21 विधानसभा मतदार संघातील निवडणुका शांततेत आणि निष्‍पक्ष वातावरणात पार पाडण्‍यासाठी सर्व खबरदारी घेण्‍यात आली असून निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्‍यासाठी भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके आदी पथके तैनात करण्‍यात आली आहेत. आयकर विभाग, बँकांचे अधिकारी, खर्च नियंत्रण कक्षातील अधिका-यांना आवश्‍यक ते प्रशिक्षण देण्‍यात आले आहे.

उमेदवारांच्‍या सभा, रॅली आदींचे खर्चाच्‍या दृष्टिकोनातून चित्रीकरण करण्‍यासाठी व्हिडीओ ग्राफर्सना प्रशिक्षण देण्‍यात आले असल्‍याचे जिल्‍हाधिकारी राम यांनी सांगितले. सी-व्‍हीजील अॅपवर दाखल झालेल्‍या तक्रारींची तात्‍काळ दखल घेऊन त्‍यावर आवश्‍यक ती कार्यवाही करण्‍यात येत आहे. जिल्‍ह्याचा निवडणूक व्‍यवस्‍थापन आराखडा तयार असून त्‍यानुसार सर्व यंत्रणा सज्‍ज आहेत. प्रदत्‍त बातम्‍या ( पेड न्‍यूज) आणि माध्‍यम प्रमाणीकरण याबाबत समिती कार्यरत असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

निवडणूक खर्च व्‍यवस्‍थापन कक्षाचे प्रमुख अजित रेळेकर यांनी सहकारी बँका, पत संस्‍था यांच्‍या मार्फत होणा-या आर्थिक व्‍यवहारांवर आवश्‍यक ते लक्ष ठेवण्‍यात येत असून संशयास्‍पद व्‍यवहारांची माहिती आयकर विभागाला कळविण्‍यात येईल, असे सांगितले. खर्च नियंत्रणाबाबत राजकीय पक्षांच्‍या प्रतिनिधींनाही योग्‍य ते प्रशिक्षण देण्‍यात आले आहे.

पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी ग्रामीण भागातील टोल नाक्‍यांसह इतर महत्‍त्‍वाच्‍या ठिकाणांवर नजर ठेवण्‍यात आली असून विविध पथकांच्‍या माध्‍यमातून तपासणीही केली जात असल्याचे सांगितले. अवैध दारुबाबतही योग्‍य ती खबरदारी घेण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

जिल्‍हा निवडणूक यंत्रणेच्‍या तयारीबाबत केंद्रीय खर्च निरीक्षकांनी समाधान व्‍यक्‍त करुन सर्वांना शुभेच्‍छा दिल्‍या. बैठकीस समन्‍वय अधिका-यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.

पीएमडीटीए वरिष्ठ टेनिस मालिका स्पर्धेत रवी कोठारीचा मानांकीत खेळाडूवर विजय

0

पुणे: पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजीत वरिष्ठ  टेनिस मालिका स्पर्धेत बिगर मानांकीत रवी कोठारीने आठव्या मानांकीत  पार्थ मोहपात्राचा पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत 35 वर्षावरील गटात  पहिल्या फेरीत बिगर मानांकीत रवी कोठारीने आठव्या मानांकीत पार्थ मोहपात्राचा 7-4 असा पराभव करत अनपेक्षित निकाल नोंदविला. अव्वल मानांकीत जॉय बॅनर्जीने महेश पारगावकरचा  7-0 असा पराभव केला. अनिल क्षीरसागरने डॉ. विकास बचलुचा 7-4 असा पराभव करत आगेकुच केली. सी कुमारने जयन किशनचा तर हरिष बी याने विशाल तिवारीचा अनुक्रमे 7-0 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

45 वर्षावरील गटात राउंड रॉबिन फेरीत गट ब मध्ये सुनिल लुल्लाने अनुराग शर्माचा 7-6(2) तर नितिन फडतरेचा  7-5 असा पराभव केला. मदार मेहेंदळेने संदिप वाकचौरेचा 7-0 व संदिप आपटेचा  7-5 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. गट क मध्ये मनोज देशपांडेने नितिन गवळीचा 7-3 असा तर उमेश भिडेचा 7-3 असा पराभव केला.

स्पर्धेते उद्घाटन माजी डेव्हिस कप खेळाडू व मेजर ध्यानचंद पुरस्कार विजेते नितिन किर्तने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे, पीएमडीटीएचे सहायक सचिव हिमांशू गोसावी, डेक्कन जिमखाना क्लबचे सदस्य अजय कामत, स्पर्धा सुपरवायझर सुजन परब आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- दुसरी फेरी
35 वर्षावरील गट-

जॉय बॅनर्जी(1) वि.वि महेश पारगावकर  7-0;
अमित रानडे वि.वि मनोज देशपांडे 7-5;
सी कुमार वि.वि जयन किशन  7-0;
हरिष बी वि.वि विशाल तिवारी 7-0;
रवी कोठारी वि.वि पार्थ मोहपात्रा(8) 7-4;
अनिल क्षीरसागर वि.वि डॉ. विकास बचलु 7-4;

45 वर्षावरील गट- राउंड रॉबिन फेरी:
गट ब- सुनिल लुल्ला वि.वि अनुराग शर्मा 7-6(2);
सुनिल लुल्ला वि.वि नितिन फडतरे  7-5;
मदार मेहेंदळे वि.वि संदिप वाकचौरे 7-0;
मंदार मेहेंदळे वि.वि संदिप आपटे  7-5;

गट क- मनोज देशपांडे वि.वि नितिन गवळी 7-3;
मनोज देशपांडे वि.वि  उमेश भिडे 7-3;

कलम ३७० हटवण्यावर शरद पवारांची भूमिका दुटप्पी – संबित पात्रा

0

पुणे- ज म्मू काश्मीरबाबतचे कलम ३७० हटविण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी संसदेत पाठिंबा दिला. परंतू, महाराष्ट्रात आल्यावर ते याला विरोध करतात, या दुटप्पी भूमिकेबाबत येणार्‍या निवडणुकीत शरद पवारांना जाब विचारायला हवा, असे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट,  खासदार संजय काकडे उपस्थित होते.

पात्रा म्हणाले, जम्मू आणि काश्मीरबाबतचे कलम ३७० हटवल्यानंतर विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर राजकारण केलं, ही बाब योग्य नाही. कारण कलम हटवल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे. मागील ७० वर्षात काश्मीरमध्ये केवळ तीन कुटुंबांचीच सत्ता होती. त्यामुळे तिथे भ्रष्टाचाराला वाव मिळाला. ‘लेटस बीट इंडिया’ या मोहिमेतून या तीन कुटुंबियांनी फुटिरतावादाला चालना देऊन काश्मीर मिळविण्याचा डाव रचला. यामध्ये ४२ हजार स्थानिक लोकांचा मृत्यू झाला. तसेच २०१८/१९ मध्ये काश्मीरव्यतिरिक्त इतर राज्यातील लोकांवर प्रत्येकी आठ हजार रुपये सरकारकडून खर्च करण्यात आला. तर, काश्मीरमधील लोकांवर सर्वाधिक प्रत्येकी २८ हजार रुपये खर्च करण्यात आला. मात्र, तरी देखील गरिबी तशीच राहीली.

पात्रा पुढे म्हणाले, जम्मू आणि काश्मीर मधील कलम ३७० हटवावे अशी देशातील सर्व जनतेची मागील ७० वर्षांपासूनची इच्छा होती. मात्र, आत्तापर्यंतच्या सरकारांमध्ये राजकीय इच्छाशक्ती नसल्याने ते होऊ शकले नाही, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

अजित पवार बाजुला जाणं शरद पवारांना खूप महागात पडेल-खासदार संजय काकडे यांचे राष्ट्रवादीतील घडामोडींवर भाष्य

0

शरद पवार सांगतात ते कारण राजीनाम्यामागे असू शकत नाही

पुणे: राज्य बँक एकट्या अजित पवारांनी चालवली नाही. बँकेतील घोटाळ्यासंदर्भात ईडीने अजित पवारांसह 70 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी जे कारण सांगितले ते यामागे असूच शकत नाही. खरं तर, अजित पवार यांनी दिलेला राजीनामा हा गेल्या काही वर्षांत त्यांना जाणीवपूर्वक बाजुला ठेवल्याचा परिणाम आहे आणि अजित पवार हे तळागाळापर्यंत पोहोचलेले नेते असल्याने ते राजकारण सोडू शकत नाहीत. अजित पवार हे शांत बसणारं व्यक्तिमत्व नाही, असे मत भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधील घडामोडी व अजित पवार यांच्या राजीनाम्यावर व्यक्त केले आहे.

अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी खासदार संजय काकडे यांना विचारले असता ते बोलत होते. खासदार काकडे म्हणाले की, अजित पवार यांच्या राजीनाम्याची जी कारणं शरद पवार यांनी दिली ती कारणं त्यामागे असू शकत नाहीत. अजित पवार हे पक्का निर्णय घेणारे आहेत. महाराष्ट्रात शरद पवार यांच्यानंतरचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार हेच सर्वात मोठे नेते आहेत. राज्यात सर्वदूर अजित पवार यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. त्यामुळे अजित पवार यांना बाजुला केल्यास ते त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून देणार नाहीत. राज ठाकरेंप्रमाणे ते पक्ष काढतील किंवा वेगळा गट करतील. गेल्या 20 वर्षांपासून मी अजित पवार यांना जवळून ओळखतो. ते शांत बसणारं व्यक्तिमत्व नसल्याने ते राजकारण सोडणार नाहीत. आणि त्यामुळे अजित पवार यांना बाजुला करणं शरद पवारांना खूप महागात पडेल.

अजित पवार यांनी राजीनामा देण्याची घटना हा स्टंट नसेल. ते भाजपच्या संपर्कात आहेत किंवा नाहीत, किंवा त्यांना भाजपमध्ये घ्यायचं की नाही हे पक्षश्रेष्ठीच ठरवतील, असेही खासदार काकडे म्हणाले.

शरद पवार यांच्यावर ईडी चा गुन्हा दाखल होणं ही प्रक्रिया आहे. यात सरकार किंवा भाजपाचा काहीही संबंध नाही. शरद पवारांकडून याचे भावनिक राजकारण केले गेले. परंतु, संपूर्ण महाराष्ट्राला हे प्रकरण माहिती आहे. त्यामुळे पवारांना सहानुभूती मिळणार नाही, असेही खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

भाजपसह महायुती 240 जागा जिंकेल!
भाजपाला महाराष्ट्रात अतिशय चांगले वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांमुळे राज्यातील जनता भाजपाच्या मागे आहे. त्यामुळे भाजपसह महायुती 240 जागा जिंकेल, असा विश्वास खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला. तसेच, अजित पवार बाजुला निघाले तर, त्याचा आणखी जास्त फायदा भाजप महायुतीलाच होईल, असेही खासदार काकडे म्हणाले.

मुख्यमंत्री माझ्याबाबतीतला निर्णय घेतील
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या बाबतीत जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल आणि त्याप्रमाणेच मी काम करेल, असे खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

शरद पवारांनी सांगितलय ,’मी सांगेन तसेच वागायचं ..आणि मी तसेच वागणार …राजीनाम्याच्या बाबत सर्वांची माफी मागतो -अजीत पवार

0

मुंबई – आम्ही पण माणसे आहोत ,आम्हाला पण भावना आहेत शिखर  बँक प्रकरणात शरद पवार संचालक पदावर नव्हते, सभासद नव्हते त्यांचा दुरान्वये संबंध नाही तरीही त्यांचं नाव या सगळ्या प्रकरणात आणलं गेलं. हा सगळा निव्वळ बदनामीचा डाव आहे. या सगळ्यामुळे मी प्रचंड अस्वस्थ झालो, व्यथित झालो असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. हे सगळं बोलत असताना अजित पवार यांना अश्रू अनावर झाले. अजित पवार भावूक झाले. अश्रू पुसतच त्यांनी शरद पवार यांच्याबाबत आदर व्यक्त केला.तुम्ही निवडणूक लढवणार की नाही? असा प्रश्न अजित पवार यांना विचारला असता त्यांनी सांगितलं की मी शरद पवारांची आज भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की अजित मी तुझं सगळं ऐकून घेतलं आहे. आता मी सांगेन तसंच सगळं करायचं असं त्यांनी मला बजावलं आहे. मी त्यांच्या नजरेला नजर देऊ शकलो नाही. शरद पवार जे सांगतील ते मी वागणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसंच त्यांनी सगळ्यांची माफीही मागितली.

शुक्रवारी मी अचानक राजीनामा दिला, त्यातून आमचे पक्षप्रमुख, नेते, कार्यकर्ते यांना सगळ्यांनाच वेदना झाल्या. त्यांना समजलंच नाही की मी राजीनामा का दिला? आता मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो जेव्हा अशी काही वेळ आली तर समजा मी पक्षातल्या लोकांशी बोललो असतो तर त्यांनी मला राजीनामा देऊ नका असंच सांगितलं असतं. ज्यांना मी न सांगता हे केलं त्यांची मी माफी मागतो असं अजित पवार यांनी सांगितलं. मी हरिभाऊ बागडेंना तीन दिवसांपूर्वी एक फोन केला होता आणि त्यांना विचारलं होतं की तुम्ही मुंबईत कधी असणार आहात? आम्ही सगळे शिखर बँकेत संचालक म्हणून काम करत होतो. आता निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे माझ्या राजीनाम्यामुळे ज्यांना वेदना झाल्या त्यांची सगळ्यांची मी माफी मागतो.

अजित पवार यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. त्यामुळे याच विषयाची चर्चा सुरु आहे. अजित पवार जेवढे आक्रमक आहेत तेवढेच ते भावूकही आहेत असं जयंत पाटील यांनी सांगितलं. कालपासून अजित पवार नॉट रिचेबल होते. अजित पवार यशवंत राव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड आणि दिलीप वळसे पाटील यांचीही अजित पवार यांच्यासोबत उपस्थिती होती.

शिखर बँक प्रकरणात शरद पवार यांचा दुरान्वये काहीही संबंध नाही तरीही त्यांचं नाव यामध्ये गोवण्यात आलं. ईडीने शरद पवार यांचं नाव अशासाठी दिलं की अजित पवार संचालक म्हणून कार्यरत होते. माझं आणि शरद पवार यांचं नातं असल्याने ईडीने त्यांचं नाव या प्रकरणात आणलं. या सगळ्यामुळे मी खूप अस्वस्थ झालो. पवारांवर गुन्हा दाखल केल्याने मी व्यथित झालो म्हणूनच राजीनामा दिला असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच निवडणूक जाहीर झाल्यानंतरच हे सगळं समोर का आलं? असाही प्रश्न त्यांनी विचारला. 2010 च्या प्रकरणात 2019 मध्ये गुन्हा का दाखल केला ? असाही प्रश्न अजित पवार यांनी विचारला. तसंच पवार कुटुंबात काहीही कलह नाही, कशाचा गृहकलह ? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. तसेच शरद पवारांचा शब्द आमच्या कुटुंबात अंतिम असतो असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

मी माझ्या विवेकबुद्धीला स्मरुन राजीनामा दिला असं अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.  शिखर बँक प्रकरणात 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. ज्या बँकेच्या ठेवीच 12 हजार कोटीपर्यंत आहेत त्यात एवढ्या मोठ्या रकमेचा घोटाळा होईलच कसा? असाही प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.

, “ईडीने शरद पवार यांचं नाव अशासाठी दिलं की अजित पवार संचालक म्हणून कार्यरत होते. माझं आणि शरद पवार यांचं नातं असल्याने ईडीने त्यांचं नाव या प्रकरणात आणलं. या सगळ्यामुळे मी खूप अस्वस्थ झालो. पवारांवर गुन्हा दाखल केल्याने मी व्यथित झालो म्हणूनच राजीनामा दिला असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर “माझं नाव नसतं तर छातीवर हात ठेवून सांगतो, हे प्रकरणच पुढे आलं नसतं,” असा दावा पवार यांनी केला.

शरद पवार यांच्या घरी निवासस्थानी बैठक झाली. शरद पवार हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत ते सांगतील तसं वागणार असल्याचंही अजितदादांनी सांगितलं. त्यामुळे आता अजित पवार निवडणूक लढवणार की नाही? प्रचार करणार की नाही हे सगळं आता शरद पवार ठरवणार आहेत. दरम्यान ज्या शिखर बँक प्रकरणात नाव गोवलं गेलं आहे ते प्रकरण अजित पवार हे नाव नसतं तर पुढेच आलं नसतं असाही दावा अजित पवार यांनी केला. दरम्यान अजित पवारांना शरद पवार यांच्याबाबत बोलत असताना अश्रू अनावर झाले होते. त्यामुळेच मी कुणालाही कल्पना दिली नाही, अगदी शरद पवार यांनाही कल्पना दिली नाही आणि राजीनामा दिला असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

पुरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी -रामदास आठवले

0

पुणे : “पुणे शहर आणि जिल्ह्यातील काही भागात ओढवलेली पूर परिस्थिती गंभीर आहे. अनेकांचे जीव गेले आहेत. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांना अधिकाधिक मदत मिळायला हवी. आचारसंहिता लागू असली, तर प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच या भागातील लोकांना पक्की घरे देऊन त्यांचे कायमस्वरूपी पुनवर्सन करण्याबाबत प्रयत्न करणार आहे,” असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी दिले.

रामदास आठवले यांनी अरण्येश्वर, टांगेवाला कॉलनी, आंबेडकर वसाहत, आंबीलओढा, राजेंद्रनगर येथील पूरग्रस्त भागांना भेटी देऊन नागरिकांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. आचारसंहिता असली, तरी प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून अधिकाधिक मदत देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी पूरग्रस्तांना दिले. त्यांनतर पत्रकारभवन येथे रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे, महिला आघाडीच्या संगीता आठवले, ऍड. अयुब शेख, ऍड. मंदार जोशी, शहर संपर्कप्रमुख अशोक कांबळे, निलेश आल्हाट, नगरसेविका हिमाली कांबळे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, बसवराज गायकवाड, सचिव बाबुराव घाडगे, शाम सदाफुले, वसीम शेख, वसंत बनसोडे, मोहन जगताप यांच्यासह इतर पदाधीकारी उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, “टांगेवाले कॉलनी येथील बांधकाम व्यावसायिकाने येथील नागरिकांना पुनवर्सन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पाळलेले नाही. त्याबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी प्रयत्न करावेत. अनेक सामाजिक संस्थांनी पूरग्रस्तांना जेवण, निवास व इतर वस्तुरूप मदत केली आहे. मात्र, अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. जनावरे दगावली आहेत. अशा सगळ्या लोकांना मदत देण्यासाठी सरकार व प्रशासन प्रयत्न करील, यावर माझे लक्ष आहे.”

विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला दहा जागा हव्या आहेत. त्यामध्ये कॅंटोन्मेंट, पिंपरी, फलटण, मोहोळ, माळशिरस आदी जागांचा त्यात समावेश आहे. कमीतकमी आठ-ते नऊ जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे. वंचित बहुजन आघाडीचा यावेळी फारसा प्रभाव जाणवणार नाही. त्यामुळे वंचिताना सत्ता मिळायची असेल, तर त्यांनी महायुतीसोबत यावे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर चौकशीची कारवाई होणे योग्य नाही. अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, निवडणूक तोंडावर असल्याने त्याला फार काही महत्व नाही, अशा अनेक मुद्द्यांवर रामदास आठवले यांनी पत्रकारांना उत्तरे दिली.

उद्विग्नेतून राजकीय क्षेत्र सोडण्याच्या मनस्थितीत अजीत पवार असल्याची शरद पवारांची माहिती (व्हीडीओ)

0

पुणे-गेल्या चाळीस वर्षांपासून जास्त काळ राजकारणात असलेल्या आणि समाजकारण करणाऱ्या काकांवर ईडीने गुन्हा दाखल केला त्यामुळे आपण अस्वस्थ झालो आहोत असं अजित पवार यांनी त्यांच्या मुलांना सांगितलं. इतकंच नाही तर आपण राजकारण सोडून देऊ शेती किंवा व्यवसाय करु असाही सल्ला अजित पवार यांनी त्यांच्या मुलांना दिला. ही माहिती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या वृत्तासंदर्भात ते बोलत होते.

” अजित पवार यांनी राजीनामा दिल्याची माहिती मला पुण्याला येताना समजली. त्यानंतर मी अजित पवार यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यावेळी अजित पवार यांनी कुटुंबीयांना त्यांची अस्वस्थता बोलून दाखवली. अजित पवार म्हणाले की राजकारणाची पातळी दिवसेंदिवस घसरत चालली आहे. आपण राजकारण सोडून देऊ त्यापेक्षा शेती किंवा व्यवसाय केलेला बरा असं अजित पवार यांनी मुलांना सांगितलं ” अशी माहिती शरद पवारांनी दिली.

आता शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत जे सांगितलं त्यावरुन अजित पवार हे राजकीय संन्यास घेणार की काय? अशा चर्चा सुरु झाल्या. त्याबाबत शरद पवार यांना प्रश्नही विचारण्यात आला. ज्याबाबत शरद पवार असं म्हणाले की, ” अजित पवार यांनी राजीनामा का दिला हे मलाही जाणून घ्यायचं आहे. मात्र ईडीने माझ्यावर जो गुन्हा दाखल केला त्यामुळे अजित पवार अस्वस्थ झाले. त्या अस्वस्थेतून त्यांनी हा राजीनामा दिला असावा. त्यांच्या राजीनाम्याबाबत मला कल्पना नव्हती. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मी तुमच्या प्रश्नांचं उत्तरं देऊ शकेन ”

त्याचसोबत शरद पवार यांना पवार कुटुंबातील अंतर्गत कलहामुळे अजित पवार यांनी राजीनामा दिला का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले, ” पवार कुटुंबात कोणतेही अंतर्गत कलह नाहीत. आम्ही सगळे एक आहोत. कुटुंबप्रमुख म्हणून मी अजित पवारांशी चर्चा करणार आहे. मात्र पवार कुटुंबात कोणतेही कलह किंवा मतभेद नाहीत आमच्या कुटुंबात कुटुंबप्रमुखाचा शब्द अंतिम असतो. त्यामुळे अशा काही चर्चांना अर्थ नाही. अजित पवार यांनी राजीनामा का दिला हे मलाही जाणून घ्यायचं आहे. मात्र जे गलिच्छ राजकारण सुरु आहे त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असावा असा माझा अंदाज आहे”

अजित पवार यांनी राजीनामा का दिला असावा? याचं कारण त्यांनी सांगितल्यावर स्पष्ट होईल तूर्तास तरी शरद पवार यांनी जी चर्चा सांगितली त्यावरुन अजित पवार राजकीय संन्यास तर घेणार नाही याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.