Home Blog Page 2832

आप ची तिसरी यादी -आणखी १२ नावे जाहीर

0

मुंबई- आज विधानसभा लढविणाऱ्या आपल्या आणखी १२ उमेदवारांची नावे आप ने जाहीर केली .विदर्भातील ६ मराठवाड्यातील २ मुंबई उपनगरातील २ ,उत्तर महाराष्ट्रातील 1 आणि पश्चिम महाराष्ट्रातील 1 अशा नावांचा समावेश आहे ज्यात पुणे कॅन्तोंमेंट मधून आप ने खेमदेव सोनावणे यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केले आहे .

पहा हि यादी

63 मतदारसंघात 101 उमेदवारांनी दाखल केले अर्ज

0

मुंबई, दि. 30 : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात 63 मतदारसंघात 101 उमेदवारांनी 126 नामनिर्देशनपत्रे दाखल केली, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

यामध्ये जळगाव जिल्ह्यात दोन मतदारसंघात 2 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तर बुलढाणा- एका मतदारसंघात 2 उमेदवार, वाशिम- एका मतदारसंघात 1 उमेदवार, अमरावती- चार मतदारसंघात 5 उमेदवार, वर्धा- एका मतदारसंघात एक उमेदवार, भंडारा- एका मतदारसंघात एक उमेदवार, गोंदिया- एका मतदारसंघात एक उमेदवार, चंद्रपूर- एका मतदारसंघात एक उमेदवार, यवतमाळ- 2 मतदारसंघात 3 उमेदवार, नांदेड- 5 मतदारसंघात 15 उमेदवार, हिंगोली- एका मतदारसंघात एक उमेदवार, परभणी- 2 मतदारसंघात 6 उमेदवार, जालना- एका मतदारसंघात 2 उमेदवार, औरंगाबाद- 4 मतदारसंघात 8 उमेदवार, नाशिक- 3 मतदारसंघात 3 उमेदवार, पालघर- एका मतदारसंघात एक उमेदवार, ठाणे- एका मतदारसंघात एक उमेदवार, रायगड- एका मतदारसंघात 5 उमेदवार, पुणे- 7 मतदारसंघात 8 उमेदवार, अहमदनगर- 5 मतदारसंघात 9 उमेदवार, बीड- 4 मतदारसंघात 9 उमेदवार, लातूर- 3 मतदारसंघात 3 उमेदवार, उस्मानाबाद- एका मतदारसंघात एक उमेदवार, सोलापूर- 2 मतदारसंघात 2 उमेदवार, सातारा- एका मतदारसंघात एक उमेदवार, कोल्हापूर- 3 मतदारसंघात 3 उमेदवार आणि सांगली जिल्ह्यात 4 मतदारसंघात 6 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली.

राज्यात २९९ निवडणूक निरीक्षक

विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि शांततेत पार पडण्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत २९९ निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उमेदवारांची नामनिर्देशने दाखल करण्यापासून ते निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत देखरेख ठेवण्यासाठी १३८ सर्वसाधारण निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून हे सर्व आयएएस (इंडियन ॲडमिनिस्ट्रेटीव्ह सर्व्हिस) दर्जाचे अधिकारी आहेत. प्रत्येकी २ किंवा ३ विधानसभा मतदारसंघासाठी १ सर्वसाधारण निरीक्षक काम बघतील. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शकपणे पार पडण्यासाठी या निरीक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

निवडणूक कालावधीत कायदा आणि सुव्यवस्थेवर नियंत्रण राखण्याच्या दृष्टीने आयपीएस (इंडियन पोलीस सर्व्हिस) दर्जाचे ४१ पोलीस निवडणूक निरीक्षक नेमण्यात आले आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्याच्या दृष्टीने हे निरीक्षक महत्त्वाची भूमिका बजावतील. प्रत्येक पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त कार्यक्षेत्राला १ याप्रमाणे निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उमेदवार आणि पक्षांच्या निवडणूकविषयक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी आयआरएस (इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस) दर्जाचे ११२ खर्चविषयक निरीक्षक नेमण्यात आले आहेत. प्रत्येकी २ किंवा ३ विधानसभा मतदारसंघासाठी हे निरीक्षक काम बघतील. निवडणुकीतील अवैध खर्च रोखण्याच्या दृष्टीने यांची भूमिका महत्त्वाची ठरते. याशिवाय आयोगाकडून राज्यस्तरावर अशा २ विशेष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दिव्यांगांसाठी निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करण्यासाठी निवडणूक आयोग वेगवेगळ्या उपाययोजना राबवित आहे. त्या अनुषंगाने ६ विभागीय आयुक्तांना सुलभ निरीक्षक (Accessible Observer) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी मतदान कालावधीत सोयी-सुविधा उपलब्ध करणे, त्यांची मतदार नोंदणी तसेच प्रत्यक्ष मतदान वाढविणे यासाठी करण्यात येणाऱ्या कामांवर संनियंत्रण ठेवण्यासाठी हे सुलभ निरीक्षक काम करणार आहेत.

कोथरूड मध्ये ब्राम्हण-मराठा अशी भेदाभेद नाहीच -खर्डेकर

0

पुणे-कोथरूड मतदार संघात चंद्रकांत दादा पाटील यांना भाजपने उमेदवारी दिल्याने ब्राम्हण -मराठा अशी भेदाभेद अजिबात नसून याबाबत च्या अशा वृत्ताचे जोरदार खंडन भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि याच मतदार संघातील उमेदवारीसाठी असलेले 1 इच्छुक संदीप खर्डेकर यांनी केले आहे . आठ दहा लोकांचे मत म्हणजे तमाम ब्राम्हण  समाजाचे मत होत नाही हे कृपया माध्यमांनी ध्यानात घ्यायला हवे असे ते म्हणाले .

त्यांनी असे म्हटले आहे कि ,’मी व नगरसेविका सौ.मंजुश्री ने कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती, आम्ही गेली ३ दशक प्रामाणिकपणे करत असलेले पक्षकार्य आणि व्यापक जनसंपर्क हा आमच्या उमेदवारीचा बेस होता….अद्याप पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही,पण वृत्तपत्रे,इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियावर आज सकाळपासून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याचे वृत्त व्हायरल झाले आणि एकच खळबळ उडाली – प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने याचे विश्लेषण करु लागला आणि प्रतिक्रियांचा महापूरच  आला…..आम्ही मात्र अतिशय निर्विकारपणे सर्व घडामोडींकडे बघत होतो, जर पक्षाने निर्णय घेतला असेल तर तो पूर्ण विचाराअंतीच याबाबत आमच्या मनात तीळमात्रही शंका नव्हती.आम्ही निष्ठेने पक्षकार्यात सक्रिय आहोत आणि पक्षाने आम्हाला भरभरून दिले आहे.माझे नेते गोपीनाथराव मुंडे म्हणायचे की पार्टी नेहमी अन्यायच करते – म्हणजे काय तर कोथरूड मधून आम्ही १४ इच्छुक ,यापैकी कोणालाही तिकीट दिले असते तर उर्वरित १३ जणांना व त्यांच्या समर्थकांना तो त्यांच्यावरील अन्याय वाटला असता नाही का ??
  संदीप खर्डेकर यांनी असेही म्हटले आहे की ,आज ह्या चर्चेच्या निमित्ताने काहींनी त्यांचा जातीयवादाचा मुद्दा ही गरम केला – मी स्वतः ब्राह्मण असून मला ही माझ्या ब्राह्मण असण्याचा अभिमान आहे – पण हा मुद्दाच येथे गैरलागू आहे , यापूर्वी एकीकृत शिवाजीनगर आणि कोथरूड मधून दोनदा शशीकांत सुतार तर दोन वेळा विनायक निम्हण आणि एकदा चंद्रकांत मोकाटे असे ५ टर्म मराठा उमेदवार निवडून आले आहेत …. माझा समाज विचारी आहे …. त्याला असे व्यक्तिगत स्वार्थातून किंवा व्यक्तिगत आकसातून केली गेलेली विधाने निश्चितच समजतात – आणि मग ८/१० लोकांचे मत हे ब्राह्मण समाजाचे मत होत नाही….

चंद्रकांतदादा पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ,संघ अधिकारी, अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेचे प्रचारक ,पदवीधर मतदारसंघाचे निर्वाचित आमदार ,पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री,भाजपचे प्रदेशाध्यक्ष अश्या विविध पदांवर कार्यरत राहिले आहेत – त्यांच्या उमेदवारीचा निर्णय पूर्ण विचाराअंतीच झाला असणार.

शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीची घोषणा, पण जागावाटपाचा फॉर्म्यूला अद्याप गुलदस्त्यात

0

मुंबई- अखेर शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीवर शिक्कामोर्तब झाला आहे. महायुतीच्या निर्णयाबाबत एक पत्रक समोर आले असून यात राष्ट्रीय समाज पक्ष(रासप), शिवसंग्राम, भारतीय रिपब्लिकन पक्ष(रिपाइं) आणि रयतक्रांती पक्षांचाही समावेश करण्यात आला आहे.अनेक चर्चांनंतर अखेर एका संयुक्त पत्रकाद्वारे भाजपा-शिवसेनेसह मित्र पक्षांच्या महायुतीची सोमवारी (दि.३०) घोषणा करण्यात आली. या पत्रकावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील कार्यक्रमात युतीच्या घोषणेचा पुनरुच्चार केला.

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे. आजच ठाकरे घराण्यातील पहिल्या उमेदवाराने म्हणजेच आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवसेना-भाजप युतीबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

या पत्रकामध्ये भाजपा-शिवसेना युतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलाचा तसेच महायुतीतील रिपाई, रासप, शिवसंग्राम आणि रयत क्रांती या पक्षांसाठी सोडण्यात येणाऱ्या जागांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाच्या पारड्यात ३ जागा पडल्या असून यामध्ये पंढरपूर, अक्कलकोट आणि फलटण या जागांचा समावेश असल्याचे सुत्रांकडून कळते. याची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

पत्रकात म्हटले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य मित्र पक्षांचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांच्यात झालेल्या चर्चेअंती विधानसभेची आगामी निवडणूक ही महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे, त्यानुसार आम्ही महायुतीची घोषणा करीत आहोत.

या महायुतीत कोणता पक्ष कोणती व किती जागा लढवणार इत्यादी तपशील लवकरच जाहीर केला जाईल. ही महायुती महाराष्ट्रामध्ये राज्यातील जनतेचा अभूतपूर्व आशिर्वाद प्राप्त करेल हा विश्वास आम्ही व्यक्त करीत आहोत, असेही या पत्रकामधून स्पष्ट करण्यात आले आहे.

मालाज रवाईन रन माउंटन मॅरेथॉन स्पर्धेत मिकीयास येमता, रेश्मा केवटे, आदिनाथ भोसले, आकांक्षा शेलार यांना विजेतेपद

0

पुणे- रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित व मालाज पुरस्कृत पाचगणी येथे पार पडलेल्या चौथ्या मालाज रवाईन रन माउंटन मॅरेथॉन स्पर्धेत 21कि.मी. पुरुष व महिला गटात मिकीयास येमता, रेश्मा केवटे यांनी, तर 10कि.मी. पुरुष व महिला गटात आदिनाथ भोसले, आकांक्षा शेलार यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.

रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित रवाईन रन माउंटन मॅरेथॉन हि स्पर्धा 21किलोमीटर, 10किलोमीटर प्रकारात पार पडली. स्पर्धेत एकूण 2000धावपटूंनी आपला सहभाग नोंदविला होता. स्पर्धेला पाचगणी येथील संजीवन हायस्कुल येथून प्रारंभ झाला आणि  संपूर्ण शहरातून तसेच ऐतिहासिक सेंट पिटर्स स्कुल येथून आणि ऐतिहासिक अशा भव्य वृक्ष राजीतून आणि पाचगणी व महाबळेश्वरच्या निसर्गरम्य अशा पर्वतरांगामधून, तसेच राजपुरी केव्स मार्गे पुन्हा फिरून संजीवन मैदान असा मार्ग स्पर्धकांना पूर्ण करावयाचा होता.

हाफ मॅरेथॉन(21कि.मी.)खुल्या पुरुष गटात केनियाच्या मिकीयास येमताने 01:07:59सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. तर, केनियाच्या स्टीफन कोसगीने दुसरा आणि दिलीप जामदारने तिसरा क्रमांक पटकावला. याच महिला खुला गटात रेश्मा केवटे हिने 01:40:11सेकंद वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. 10कि.मी. खुल्या पुरुष गटात  आदिनाथ भोसले याने 00:37:43सेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. तर, महिला गटात आकांक्षा शेलारने 00:46:52सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद मिळवले.

स्पर्धेत एकूण 3लाख रुपयांची पारितोषिक रक्कम देण्यात आली. स्पर्धेचा फ्लॅग ऑफ हिशम सुनेसरा(21किलोमीटर आयएफएफबी प्रो विजेता) व आय लव पाचगणी संघटनेचे भरत पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आला. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: (प्रथम, व्दितीय व तृतीय या क्रमानुसार):

हाफ मॅरेथॉन 21कि.मी.: पुरुष खुला गट: 1. मिकीयास येमता(01:07:59से), 2.स्टीफन कोसगी(01:18:34से), 3.दिलीप जामदार(01:26:36से);

हाफ मॅरेथॉन 21कि.मी.: महिला खुला गट: 1. रेश्मा केवटे(01:40:11से), 2.स्नेहल हिरवे(01:51:36से),  3.शलाजा पाटणकर(02:19:48से); 

10कि.मी. पुरुष खुला गट: 1.आदिनाथ भोसले(00:37:43से), 2.आदित्य भोसले(00:38:09से), 3.दिनेश म्हात्रे(00:38:14से);

10कि.मी.महिला खुला गट: 1.आकांक्षा शेलार(00:46:52से), 2.सायली कोकितकर(00:48:05से), 3.विशाखा साळुंखे(00:52:25से). 

इंडिया बिझनेस लिटरेचर फेस्टिवल ५ ऑक्टोबरला

0

फेस्टिवलच्या दुसऱ्या वर्षीही २० मातब्बर आद्योगिक लेखकांना ऐकण्याची पुणेकरांना पर्वणी

पुणे : औद्योगिक साहित्याची पर्वणी असलेले इंडिया बिझनेस लिटरेचर फेस्टिवल (आयबीएलएफ) येत्या शनिवारी (ता. ५ ऑक्टोबर) सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या किर्लोस्कर सभागृहात होणार आहे. फेस्टिवलचे हे दुसरे वर्ष असून, यामध्ये उद्योग जगतातील जवळपास २० मात्तबर लेखकांना ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे, अशी माहिती फेस्टिवलचे संयोजक आणि लेखक समीर दुआ, ‘सीओईपी’चे संचालक डॉ. बी. बी. अहुजा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड फायनान्सियल अनॅलिस्ट्स ऑफ इंडिया बिझनेस स्कुल (आयसीएफएआय), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी), बीडब्ल्यू बिझनेसवर्ल्ड, इन्स्टिट्यूट ऑफ जनरेटिव्ह लीडरशिप, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, कुल-एक्स, फीदरलाईट, नॅसकॉम, ऑनलाईन बिझनेस, टीआयई पुणे आणि माझाना या संस्थांच्या सहयोगाने हे दुसरे फेस्टिवल होत आहे.  समीर दुआ यांच्यासह होप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या अध्यक्षा अरुणा कटारा, बिझनेसवर्ल्डचे चेअरपर्सन अनुराग बात्रा यांच्या कल्पनेतून हे फेस्टिवल होत आहे.

 

समीर दुआ म्हणाले, “पहिल्या फेस्टिवलच्या प्रचंड प्रतिसादानंतर यंदा आणखी सकस साहित्य देण्यासाठी सज्ज आहोत. ‘आयबीएलएफ’ हे उद्योगांवर लेखन करणाऱ्यांसाठी, आपले कार्य, साहित्य लोकांसमोर मांडून त्याचा व्यावसायिक क्षेत्रावर चांगला परिणाम घडवून आणण्यासाठी, तसेच उद्योग साहित्य लिहिण्याची व वाचण्याची गोडी लागण्यासाठी हे फेस्टिवल महत्वपूर्ण ठरत आहे. ‘टेडएक्स’च्या धर्तीवर यातील सत्रे होणार असून, प्रत्येक लेखकाला १८ मिनिटे बोलण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे श्रोत्यांना रटाळ भाषणे ऐकावी लागणार नाहीत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, नॅसकॉमचे माजी अध्यक्ष किरण कर्णिक, ‘केपीआयटी’चे  सहसंस्थापक रवी पंडित, आयसीएफएआय बिझनेस स्कुलच्या संचालिका प्रा. ज्योती टिळक, डॉ. शिरीष जोबळे, लेखक आर. गोपालकृष्णन, किशोर चक्रवर्ती, जयराम ईश्वरन, अपर्णा राजे, अवार्ड विनिंग व्हायरल व्हिडीओ मार्केटर आशिष चोप्रा, टूलटेक ग्लोबल इंजिनिअरिंगचे संस्थापक अतुल खन्ना, एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च अधिष्ठाता डॉ. रंजन बॅनर्जी, उद्योजक डॉ. गणेश नटराजन, डॉ. बी. बी. अहुजा, लेखक-पत्रकार पवन लाल, जाहिरात दिग्दर्शक प्रल्हाद कक्कर, लेखक-संपादक शशांक शहा, मानसोपचारतज्ज्ञ सैलजा मनाचा, लेखक नरेंद्र गोईदानी, लेखक-वकील मुक्ता महाजनी या फेस्टिवलमध्ये बोलणार आहेत.”

डॉ. बी. बी. अहुजा म्हणाले, “उद्योग विषयक साहित्याला प्रोत्साहन मिळावे, नव्या पिढीला त्याची गोडी लागावी, यासाठी हे फेस्टिवल उपयुक्त आहे. या उद्योग लेखकांची मनोगते ऐकून अनेक विद्यार्थी आंत्रप्रेन्युअरशिपकडे वळत आहेत. आमच्या विद्यार्थी, प्राध्यापकांनाही याचा लाभ होणार आहे. या उद्योग साहित्यिकांचे विचार ऐकण्यासाठी अधिकाधिक पुणेकरांनी यावे. हे फेस्टिवल सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.”

बँक ऑफ बडोदातर्फे बडोदा किसान पंधरवडा उद्घाटन

0

पुणे, 30 सप्टेंबर 2019 – सर्वांसाठी विस्तारित आर्थिक सेवा पुरवण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांना चालना
देण्यासाठी बँक ऑफ बडोदाने ‘बडोदा किसान पंधरवडा ’चे उद्घाटन केले असून त्याअंतर्गत शेती क्षेत्रातील कर्जाचे प्रमाण
वाढवण्याचा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा हेतू आहे.
बँक ऑफ बडोदाने देशभरात बडोदा किसान पखवाडा हा उपक्रम सुरू केला होता व त्याला प्रचंड यश मिळाले होते.
बँकेच्या विविध शाखांद्वारे आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे 2,40,817 शेतकऱ्यांचा फायदा झाला
होता. यावर्षीही हा उपक्रम आयोजित करण्यात ठरले असून 1 ते 15 ऑक्टोबरदरम्यान तो आयोजित केला जाणार आहे.
या उपक्रमाची 16 ऑक्टोबर रोजी ‘बडोदा किसान दिवस’च्या निमित्ताने सांगता केली जाणार असून या दिवशी जागतिक
अन्न दिवसही साजरा केला जातो. ‘बडोदा किसान दिवस’ आपल्या शेतकऱ्यांचे धैर्य आणि उत्साह साजरे केले जाते तसेच
यानिमित्ताने शेती आणि ग्रामीण भागातील कर्जाचे प्रमाण वाढवण्यास चालना देण्याचे उद्दिष्ट आहे.
‘बडोदा किसान पखवाडा’ हा बँक ऑफ बडोदाचा पॅन- भारत उपक्रम असून तो सर्व शाखांद्वारे मोठ्या उत्साहात साजरा
केला जातो. हा उपक्रम जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बँकेच्या सेवांशी जोडण्यास चालना देतो. ‘बडोदा किसान पखवाडा’
या उपक्रमाचा भाग म्हणून बँकेच्या शाखांद्वारे वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये शेतकरी मेळावे, गावांत
रात्रीच्या बैठका, शेतकरी तसेच गाईगुरांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, आर्थिक साक्षरता शिबिरे, शेतकऱ्यांसाठी सत्कार
कार्यक्रम यांचा समावेश आहे. ग्रामीण आमि शेती क्षेत्रातील कर्जाचा प्रवाह सुधारण्यासाठी बडोदा किसान पखवाडा आणि
बडोदा किसान दिवस आयोजित केले जातात.
या अभिनव उपक्रमाविषयी आपले विचार व्यक्त करत बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक श्री. विक्रमादिल्य सिंग
खिची म्हणाले, ‘बँक ऑफ बडोदामध्ये आम्ही शेती क्षेत्र आणि ग्रामीण भागात नाविन्यपूर्ण व प्रवर्तकीय काम करत बँकेचा
वारसा जपत आहोत. भारत सरकार शेती क्षेत्राकडे पूर्ण लक्ष देत नवे उपक्रम सुरू करण्यासाठी सातत्याने काम करत आहे.
उत्पादनक्षमता, शेतकऱ्यांची आवड जपणे, त्यांची उत्पन्न पातळी वाढवून जीवनमानाचा दर्जा उंचावणे हे त्यामागचे
सरकारचे उद्दिष्ट आहे. बँक ऑफ बडोदाचे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सरकारचे प्रयत्न सुसंगत असून ते शेतकऱ्यांना प्रत्येक
टप्प्यावर सक्षम करण्याच्या, त्यांची विकास पातळी उंचावण्याच्या आणि उत्पादनक्षमतेच्या राष्ट्रीय ध्येयाला पाठिंबादेण्याच्या उद्दिष्टाने आखलेले आहेत. भारत सरकारने 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे आणि
सरकारच्या या उपक्रमाला यश मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वप्रकारचे प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. त्याचप्रमाणे
शेतकऱ्यांमध्ये आर्थिक साक्षरता पसरवणेही महत्त्वाचे आहे, ज्यामुळे त्यांना आपल्या शेतीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी
सावकाराच्या पकडीतून सुटून राष्ट्रीयकृत बँकांना संपर्क साधता येईल.’
बँक ऑफ बडोदाने या ध्येय मोहिमेची माहिती देण्यासाठी माहितीपर पुस्तके, परिपत्रके छापली आहेत तसेच शेतकऱ्यांना
मदत करण्यासाठी शेती कर्ज उत्पादनांवर आधारित पुस्तिका तयार केली आहे. त्यांचा शेती क्षेत्राच्या उज्ज्वल
भविष्यासाठी माध्यम तयार करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय सुधारण्यासाठी उपयोग होईल.

अमन किया मोटर्सच्या शोरुमचे चिंचवड मध्ये शुभारंभ

0

चिंचवड : दक्षिण कोरियन वाहन निर्माता कंपनी किआ मोटर्सने चिंचवडच्या अमन कीया मोटर्समध्ये सेल्टोस कार उपलब्ध करुन दिली आहे. पिंपरी – उद्योगनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिंचवडमध्ये अमन कीया मोटर्सचे उद्घाटन पुणे व पिंपरी-चिंचवडमधील शेकडो मान्यवर व कंपनीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
किया सेल्टोस कारच्या विक्रीचे उद्घाटन करताना अमन किआ मोटर्सचे संचालक अमन देवीचंद अग्रवाल व आदित्य अग्रवाल म्हणाले की, पिंपरी – चिंचवड, देहूरोड, मावळ मध्ये गाड्यांची वैशिष्ट्ये आणि कमी किंमतीमुळे सेल्टस कारला खूप पसंती मिळाली आहे. पाहताच क्षणी कार बुक करण्याची इच्छा निर्माण होते. सेल्टोस कार विविध आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
अमन किया मोटर्स शोरुमच्या शुभारंभ प्रसंगी अग्रवाल फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, पुणे शहर अग्रवाल समाजचे अध्यक्ष ईश्‍वचंद अग्रवाल, मित्तल ग्रुपचे सर्वेसर्वा नरेश मित्तल, गोयल गंगाचे चेअरमन जयप्रकाश गोयल, स्कसेस ग्रुपचे देवीचंद अग्रवाल, आज का आनंद चे मुख्य संपादक शाम अग्रवाल, बव्हेरिया मोटर्सचे घनशाम अग्रवाल, वंदा गु्रपचे रमेश गोयल, पिंपरी चिंचवड अग्रवाल समाजचे अध्यक्ष भीमसेन अग्रवाल, मोहन गुप्ता, प्रेमचंद मित्तल, डी.व्ही मोडक, माधव किलोस्कर, शकुर चौधरी, रामकुमार गोयल आदी उपस्थित होते.

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात दक्षिण कोरियाची प्रख्यात वाहन निर्माता किआ मोटर्स द्वारा सेल्टोस कारची निर्मिती केली जात आहे. कंपनी या प्लांटमध्ये अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर करते. कंपनी प्लांटमध्ये 300 हून अधिक रोबोट वापरते. भारतीय बाजारपेठ लक्षात घेऊन सेल्टोस तयार करण्यात आली आहेत. किआ मोटर्सने हिंदुस्थानमध्ये दोन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. त्यात 1 वर्षाकाठी तीन लाख युनिट उत्पादन करण्याची क्षमता असणर्‍या या प्लांटवर 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. या वैशिष्ट्यांसह सुसज्ज, किया सेल्टोस किया मोटर्सच्या या एसयूव्ही सेल्टोस कारमध्ये तीन इंजिन पर्याय आहेत. 1 4-लिटर टर्बोचार्ड पेट्रोल, 1. 5 – लिटर पेट्रोल आणि 1. 5 लिटर डिझेल इंजिन आहे. सर्व इंजिन बीएस 4 एमिशन नॉर्स अनुरूप आहेत.

‘नमन नटवरा’तून कलांचा त्रिवेणी संगम

0
२५ व्या पुणे नवरात्र महोत्सवात आनंद भाटे यांचे बहारदार गायन

पुणे : सुरेल नाट्यसंगीतावर अप्रतिम पदलालित्याने सादर केलेले नृत्य, त्याच तालावर चित्राच्या कॅनव्हासवर फिरणारा ब्रश आणि त्यातून निर्माण होणारे सुंदर चित्र अशा नृत्य, नाट्य आणि संगीताचा अप्रतिम कलाविष्काराचा त्रिवेणी संगम ज्येष्ठ गायक आनंद भाटे यांच्या नमन नटवरा या कार्यक्रमातून झाला.

पुणे नवरात्र महोत्सव समिती, फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २५ व्या पुणे नवरात्र महोत्सवत आनंद भाटे यांचा ‘नमन नटवरा’ हा कार्यक्रम झाला. यामध्ये अजरामर नाट्य संगीत, तरुणाईचे नृत्य आणि चित्रांचा अविष्कार अशा तीन कलांचा एकाच रंगमंचावर रसिकांना आनंद घेता आला. महोत्सवाचे संयोजक आबा बागूल, जयश्री बागूल आदी यावेळी उपस्थित होते.
गायिका धनश्री कुलकर्णी यांनी शाकुंतल नाटकातील ‘कालिदास हे शाकुंतल रचितो’ या पदाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी संगीत स्वयंवर नाटकातील ‘सजन कसा मन चोरी’ या पदातून दोन प्रेमी युगलांचा लडीवाळपणा दाखविला. संगीत मानापमान नाटकातील ‘नाही मी बोलत नाथा’ या पदामधून त्यांनी भामिनी आणि धैर्यधर या प्रियकारांमधील प्रेमळ संवाद अप्रतिमरित्या सादर केले. या गाण्यांवर मयूर वैद्य आणि त्यांच्या सहकाऱ्यानी सहजरित्या पदलालित्याने भामिनी आणि धैर्यधर यांच्यामधील प्रसंग अक्षरश जिवंत केले. आनंद भाटे यांनी सादर केलेल्या ‘या नव नयनासव’ या गाण्याने कार्यक्रम वेगळया उंचीवर नेऊन ठेवला.
मंदारमाला नाटकातील ‘साहम हर डमरु बाजे’ हे शिस्तीपर गीत, संगीत कान्हापात्रा नाटकातील ‘पतित तु पावना, जरी सांभाळी वचना’ तसेच ‘जोहार मायबाप जोहार, तुमच्या हाराचा मी महार’ या गाण्यांनी रसिकांना मराठी संगीत नाटकांच्या सुवर्णकाळाची आठवण करुन दिली. या गाण्यांच्या चालीवर आश्विनी चोथे-जोशी यांनी अप्रतिम चित्र साकारले.
तृप्ती गुरव (गायन), स्वाती खळदकर, (गायन), ओकार पाटणकर (सिंथेसायझर), भरत कामत, नरेंद्र साठे (तबला), प्रसाद मांडवलकर (पखवाज), विश्वास कळमकर (टाळ) यांनी साथसंगत केली. मयूर वैद्य, अदित्य गरुड, रुपेश मोरे, विरेश शेटकर, प्रथमेश गावडे, मधुरा देशपांडे, रश्मी बागवे, निशाद चव्हाण यांनी अप्रतिम नृत्य सादरीकरण केले.

क्विक राईडच्या पहिल्या “बाईकपूल अँड कारपूल रिवॉर्ड्स”चे पुण्यात आयोजन

0

सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी युजर्सना २०० हेल्मेट्सचे वाटप

आयपीएस श्री. सुरेंद्रनाथ देशमुख व क्विक राईडचे रिजनल हेड श्री. अमित कौरव यांची उपस्थिती

 पुणे,:  भारतातील आघाडीचे कार आणि बाईक-पूलिंग अप्लिकेशन क्विक राईडने त्यांच्या पहिल्या बाइकपूल आणि कारपूल रिवॉर्ड्स”चे पुण्यात आयोजन केले होते.  पुण्यातील क्विक राईडच्या जबाबदार, जागरूक आणि कायम क्विक राईड सुविधेचा लाभ घेणाऱ्या बाईक आणि कार पूलर्ससाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.  नुकतीच क्विक राईडवरील रजिस्टर्ड युजर्सची संख्या २.५ मिलियन्सवर पोहोचली आहे.  बंगलोर, मुंबई, दिल्ली-एनसीआर, पुणे, हैदराबाद, चेन्नई, कोची आणि कोलकाता याठिकाणचे लोक मोठ्या संख्येने या सुविधेचा लाभ घेत आहेत.  या बंगलोर स्थित स्टार्ट-अपची सुरुवात २०१५ साली झाली आणि आज हे देशातील सर्वात मोठे कारपूलिंग नेटवर्क बनले आहे.

 क्विक राईडचे हे आजवरचे पहिले बाइकपूल आणि कारपूल रिवॉर्ड्स आहेत.  यामध्ये त्यांच्या युजर्सना पुण्यातील गाड्यांमुळे होणारे प्रदूषण आणि रस्त्यांवरील गाड्यांची गर्दी कमी करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल बक्षीस दिले गेले.  यामध्ये टॉप बाईक व कार पूलर्स निवडले गेले, त्याचबरोबरीने प्रवासात सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले जावे यासाठी क्विक राईडतर्फे रायडर्सना २०० हेल्मेट्सचे वाटप केले गेले.  या कार्यक्रमाला आयपीएस श्री. सुरेंद्रनाथ देशमुख व क्विक राईडचे रिजनल हेड श्री. अमित कौरव उपस्थित होते.

 बाइकपूल आणि कारपूल हा नोकरी, व्यवसाय करणाऱ्या प्रोफेशनल्ससाठी पैसे आणि वेळ या दोन्हींची बचत करणारा मार्ग असल्यामुळे यांचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे.  पुणे हे कॉर्पोरेट्ससाठी सर्वाधिक पसंतीचे शहर बनलेले असल्यामुळे याठिकाणी रस्त्यांवर वाहनांची गर्दी कमीत कमी असावी यादृष्टीने लोकांना दरदिवशी कामावर जाताना कारपूल आणि बाइकपूल करण्यास प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

 क्विक राईडच्या सुविधेचा वापर नियमितपणे करणाऱ्या लोकांचा तसेच या अप्लिकेशनला सहकार्य करणाऱ्या टेक पार्क्स व कोर्पोरेट्सचा सन्मान केला जावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  अधिक चांगले व पर्यावरणस्नेही भविष्य निर्माण करण्यात या सर्वांकडून क्विक राईडला दिली जात असलेली साथ अतिशय मोलाची आहे.

 सध्या पुण्यात जागा मर्यादित आणि खाजगी वाहनांच्या संख्येत वाढ अशी समस्या निर्माण झाली आहे.  खाजगी वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे रस्त्यांवरील गर्दी वाढत आहे.  वाहनांची गर्दी आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी योगदान देण्यास इच्छुक, जागरूक नागरिकांचा समुदाय निर्माण केला जावा हे क्विक राईडचे उद्धिष्ट आहे.

 क्विक राईड

क्विक राईड हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय राईड-शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे.  देशातील सर्व महानगरांमध्ये कारपूलिंग क्रांती घडवून आणण्यात क्विक राईड आघाडीवर आहे.  सर्वात मोठ्या १० पैकी ८ आयटी कंपन्या क्विक राईड वापरत असून इच्छित ठिकाणी वेळेवर आणि सुरक्षित पोहोचण्यासाठी हा विश्वसनीय प्लॅटफॉर्म असल्याचे या कंपन्या मानतात.  क्विक राईडची स्थापना २०१४ साली झाली.  आज हा भारतातील सर्वाधिक वेगाने वाढत असलेला कारपूलिंग समुदाय बनला आहे

द सप्टेंबर हँडीकॅप शर्यतीत रापसोदी विजेता

0

पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019

पुणे: पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019 या स्पर्धेत द सप्टेंबर हँडीकॅपच्या मुख्य शर्यतीत रापसोेदी या घोड्याने 1600 मीटर शर्यतीमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला.

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (आरडब्लूआयटीसी) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेतील द सप्टेंबर हँडीकॅप या लढतीत विजय बी शिर्के,राकेश आर.झुंझुनवाला आणि बेर्जीस मिनो देसाई यांच्या मालकीच्या रापसोदी या घोड्याने 1मिनिट 41 सेकंद व 609 मिनी सेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला.याचा एस झेवन हा जॉकी होता, तर पी श्रॉफ ट्रेनर होता.

सविस्तर निकाल: द सप्टेंबर हँडीकॅप विजेता: रापसोदी, उपविजेता: होकाडो.

आपदग्रस्त किरकिटवाडी आणि सणसनगर भागाची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली पहाणी

0

पुणे दि.३०- नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आपदग्रस्त किरकिटवाडी आणि सणसनगर भागाला जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भेट देऊन पहाणी केली. नांदेड सिटीमधील जे.पी.नगरमध्ये जाऊनही त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

सणसनगर भागातील पुराच्या पाण्यामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचनामे करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्हाधिकारी राम यांनी भातशेती, दगडाच्या ताली, खराब झालेल्या रस्त्यांचीही पहाणी केली. अपदग्रस्तांना नियमानुसार मदत दिली जाईल असेही त्यांनी सांगितले.

 

अभिनेते विजू खोटे यांचं निधन

0

अखेर मनसेची तोफ कडाडणार , लढविणार १०० जागा .. सोमवारी घोषणा

0

मुंबई-गेल्या काही दिवसांपासून काहीसे शांत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मेळावा घेणार आहे.या मेळाव्यात राज ठाकरे मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहेत .  मुंबईतील वांद्रे या ठिकाणी असलेल्या एमआयजी क्लब या ठिकाणी हा मेळावा घेतला जाणार आहे.आणि  याच मेळाव्यातून राज ठाकरे हे १०० ते १२५ जागा लढविण्याची घोषणा करतील आणि पुण्यासह अन्य उमेदवारांच्या नावांची देखील घोषणा करतील असे मनसेच्या वरीष्ठ नेत्यांनी सांगितले

राज ठाकरे या मेळाव्यात सगळ्या इच्छुक उमेदवारांसोबत संवाद सांधणार आहेत अशी माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली आहे. या मेळाव्यात राज ठाकरे विधानसभा निवडणुकीची रुपरेषा ठरवणार असल्याचीही शक्यता आहे. या मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ कडाडणार असल्याचे बोलले जात आहे.लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेनेच्या विरोधात प्रचार केला होता. खास करुन मोदी आणि अमित शाह यांना हटवा अशी भूमिका घेतली होती. त्यांचं ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्यही चांगलंच प्रसिद्ध झालं होतं.आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे काय भूमिका घेणार हे बहुदा सोमवारी स्पष्ट होऊ शकतं. कारण मनसे 100 जागा लढवणार अशीही माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती.मात्र त्याबाबत राज ठाकरे यांनी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. कदाचित हीच घोषणा राज ठाकरे सोमवारी करण्याची शक्यता आहे.निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या अशी आग्रही भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती. मात्र निवडणूक आयोगाने निवडणूक ईव्हीएमवरच होणार हे स्पष्ट केले त्यामुळे मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही अशी चर्चा होती.मात्र मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून राज ठाकरे यांनी त्यांचा निर्णय बदलला आहे असेही समजते आहे.

 

चांगल्या कामासाठी कल्पकता, इच्छाशक्ती महत्वाची -साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे

0
अनास्कर, किराड, डॉ. खुर्द, मुसळे, देशपांडे यांना ‘श्री लक्ष्मी माता कला-संस्कृती जीवनगौरव पुरस्कार’
पुणे : “कोणतेही चांगले काम करण्यासाठी केवळ पैसा, सत्ता आणि पद महत्वाचे नसते. आपल्यातील कल्पकता, प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर मेहनतीची तयारी त्यासाठी आवश्यक असते. पुणे नवरात्रौ महोत्सवाची चळवळ गेली २५ वर्षे त्याच स्वरूपात सुरु आहे. सांस्कृतिक उपक्रमांना सामाजिक जोड दिल्याने हा महोत्सव उत्तरोत्तर बहरत जाईल,” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी केले.
कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य यांचा मनोहारी मिलाफ असणार्‍या आणि पुणे नवरात्र महोत्सव समिती, फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २५ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे गणेश कला क्रीडा मंच येथे नवदुर्गांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले. यावेळी डॉ. अरुणा ढेरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता पुणतांबेकर, निर्मला कांदळगावकर, शिक्षणतज्ज्ञ आबेदा इनामदार, भारती बऱ्हाटे, काव्या लडकत, पौर्णिमा लुनावत, डॉ. संगीता मुलानी या नवदुर्गा, आमदार शरद रणपिसे, मोहन जोशी, अंकुश काकडे, सतीश देसाई, मुक्तार शेख, रवींद्र माळवदकर, संयोजक आबा बागुल, जयश्री बागुल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार होते. यावेळी विद्याधर अनास्कर, शंतनु देशपांडे, वीरेंद्र किराड, डॉ. संजीव खुर्द, मानसी मुसळे यांना ‘श्री लक्ष्मी माता कला संस्कृती जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमात सुरवातीला मानसी मुसळे व सहकाऱ्यांनी गणेशवंदना, शमा भाटे यांच्या नादरूप ग्रुपच्या वतीने महाकाली कपालिनी नृत्याचे बहारदार सादरीकरण, विनोद धोकटे व सहकाऱ्यांनी जागरण गोंधळ नृत्य सादर केले. चित्रपटसुष्टीतील शंभर वर्षाचा धावता आढावा निवडक गाण्याच्या नृत्यातुन रत्नाकर शेळके डान्स अकादमीने घेतला. सँडी मांजरेकर व सहकाऱ्यांनी बॉलीवूड का जलवा हा नृत्यांचा बहारदार कार्यक्रम केला. अभिनेत्री भार्गवी चिरमुले, गिरीजा प्रभू, वैष्णवी पाटील, शर्वरी जमनीस, सायली पराडकर, ऐश्वर्या काळे, स्मिता शेवाळे, तेजा देवकर, करिष्मा वागळे, सायली जिया, निकिता मोघे यांच्या फ्युजन डान्सने कार्यक्रमात रंगत आणली.

उल्हास पवार म्हणाले, “विविध क्षेत्रातील स्त्रीशक्तीचा सन्मान करणे कौतुकास्पद आहे. आपल्या पायावर उभ्या राहिलेल्या स्त्रियांना नवदुर्गांच्या रूपात पाहायला मिळाले. या सगळ्या व्यक्तींचे कार्य समाजासाठी खूप मोठे आहे. तळागाळातील, दुर्लक्षित, दुर्बल घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या व्यक्ती करत आहेत. या महोत्सवाने अशा व्यक्तींना सन्मान देऊन नव्या पिढीला सामाजिक कार्य करण्यासाठी, चांगल्या गोष्टी राबविण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. हा महोत्सव म्हणजे पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा आहे.”

प्रास्ताविकात आबा बागुल म्हणाले, “पुण्यावर पुराचे दुर्देवी संकट आले. असे संकट पुन्हा येऊ नये. शिक्षण, साहित्य, उद्योग, व्यवसाय, वैद्यकीय, अभिनय अशा क्षेत्रातील कामाबद्दल नवदुर्गांना गौरविण्यात येत आहे. आम्ही समाजाचे देणे लागतो या उद्देशाने काम करत असतो. समाजात येणाऱ्या कोणत्याही संकटात आमचे कार्यकर्ते मदत करण्यासाठी जातात. देवीची जशी पूजा करता तशी तुम्हाला ज्यांनी घडवलं त्या आई वडिलांची पूजा, सेवा करा.”

विद्याधर अनास्कर, वीरेंद्र किराड, शंतनू देशपांडे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. घनश्याम सावंत यांनी आभार मानले.