Home Blog Page 2831

एकनाथ खडसेंना जोरदार धक्का, त्यांच्याऐवजी मुलीला दिली उमेदवारी ?

0

मुंबई- भारतीय जना पक्षातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाने जोरदार धक्का दिला आहे. मागील सहा वेळेपासून भाजपाकडून मुक्ताईनगरातून निवडून येणाऱ्या खडसेंना भाजपच्या दुसऱ्या यादीतही तिकीट मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण, त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत नाव न आल्यानंतर खडसे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भाजपची पहिली यादी जाहीर झाली, त्यात अनेकांची नावे होती. पण, त्यात एकनाथ खडसेंचे नाव नसल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर त्यांचे नाव दुसऱ्या यादीत येईल अशी आशा व्यक्त केली जात होती. पण, आता मिळालेल्या माहितीनुसार पक्षाने त्यांचा पत्ता कट केल्याचे दिसत आहे. खडसेंचं नाव पहिल्या यादीत नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते कालपासून रस्त्यावर उतरले आहेत. मुक्ताईनगर येथील खडसेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जमा होत जोरदार घोषणाबाजी केली. खडसेंना तिकीट न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव म्हणजे, एकनाथ खडसे. पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजना यांच्यासोबत काम केलेले एकनाथ खडसे यांना मागील 3 वर्षांपासून मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले. त्यांच्यावर जमीन बळकावल्याचा आणि दाऊदशी संपर्क असल्याचा आरोप करण्यात आला होता. खडसे या सर्व आरोपातून मुक्त झाले, पण त्यांच्या नशिबी दुय्यम वागणुक आली. यात अनेकांना वाटले होते की, त्यांचे नाव पहिल्या यादीत आले नाही, तरी दुसऱ्या यादीत नक्की येईल. पण आता त्यांच्याऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

खडसेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज- दरम्यान, एकनाथ खडसेंनी आपले नाव उमेदवारी यादीत नव्हते, तरीदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी एक भाजपकडून आणि एक अपक्ष, असे दोन अर्ज दाखल केले. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले की, “यादीत नाव असो की नसो, याबाबत चिंता नाही. पुढील यादीत माझे नाव असेल…पक्षासाठी 42 वर्षे मी प्रामाणिकपणे काम केले व यापुढेही पक्षात राहून काम करीत राहणार. पहिल्या यादीत माझे नाव नाही, यात माझा काय गुन्हा? माझा कोणताही दोष नसताना तीन वर्षे मंत्रीपदापासून दूर रहावे लागले. तेव्हा मी कोणताही गुन्हा केलेला नव्हता व आजही केलेला नाही. याबाबत मी पक्षातील वरिष्ठांकडे जाब विचारणार आहे.” यावेळी खडसेंनी उपस्थित जनतेला तुम्ही माझ्यासोबत आहात का? असा प्रश्न विचारला. दरम्यान, खडसे यांनी आज दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात एक भाजपतर्फे तर एक अपक्ष अर्ज होता.

“25 वर्षे झाली, मी गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि इतर मोठ्या नेत्यांसोबत मिळून आम्ही निर्णय घ्यायचो. तिकीटवाटपाच्या प्रक्रियेत माझा सहभाग होता. राज्यभरात युती तोडण्याची घोषणा असेल किंवा भाजपने ज्या काही जबाबदाऱ्या दिल्या त्या मी पार पाडत आलेलो आहे. आता या गोष्टीला फक्त ‘कालाय तस्मै नमः’ असं म्हणता येईल.”

विधानसभा निवडणुकीत महायुतीचा घटक रिपब्लिकन पक्षाला ६ जागा निश्चित

0

मुंबई  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी मागील 3 दिवस झालेल्या सलग चर्चेत आज अंतिम निर्णय होऊन भाजप शिवसेना महायुतीचा घटक म्हणून रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या ६ जागा अधिकृत सोडण्यात आल्या आहेत. त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण ;सोलापुरातील माळशिरस ; विदर्भात भंडारा ; मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातील नायगाव; परभणी जिल्ह्यातील पाथरी तसेच मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर या ६ जागा रिपाइं ला सोडण्यात आल्या असल्याची अधिकृत घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी बांद्रा संविधान निवासस्थानी पत्रकार परिषदेत केली आहे.
माळशिरसची जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवाराचे नाव निश्चित करण्याचा निर्णय विजय सिंह मोहिते पाटील घेणार आहेत. मात्र त्यांनी माळशिरस मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी निश्चित करावी तसे होणार नसेल तर माळशिरस ची जागा बदलून पुणे कॅन्टोन्मेंट ही जागा देण्यात यावी अशी सूचना आज केंद्रियराज्यमंत्री  रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

रिपाइं च्या उमेदवारांची नावे :-
मुंबईतील मानखुर्द शिवाजी नगर मधून रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे
फलटण मधून दिपकभाऊ निकाळजे
पाथरी मधून मोहन फड ( आमदार )
नायगाव मधून राजेश पवार
ही नावे निश्चित झाली असून माळशिरस ; भंडारा या दोन जागांची नावे लवकरच जाहीर करू असे ना रामदास आठवले म्हणाले.
काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप शिवसेने मध्ये प्रवेश करीत आहेत.रिपाइं साठी आनंदाची बाब म्हणजे भाजप मधील काही कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यानुसार नांदेड मधील भाजप चे नेते राजेश पवार यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला असून त्यांना रिपब्लिकन पक्षाची अधिकृत उमेदवारी नायगाव विधानसभा मतदारसंघातून दिली आहे. तसेच परभणी चे भाजप नेते आमदार मोहन फड यांनी रिपाइं मध्ये प्रवेश केला असून त्यांना रिपब्लिकन पक्षाची अधिकृत उमेदवारी पाथरी विधानसभा मतदारसंघातून देण्यात आली आहे.

मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यात आहे तरी शिवसेने ने सामाजिक दृष्ट्या विचार करून ती जागा रिपाइं ला सोडायला हवी. याबाबत शिवाजी नगर मानखुर्द मतदारसंघ रिपाइं ला सोडण्यात आला असून शिवसेनेच्या उमेदवाराला उमेदवारी मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे आश्वासन दिले आहे. रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून रिपाइं चे अधिकृत उमेदवार असल्याचे  रामदास आठवले म्हणाले.

सामाजिक दृष्ट्या विचार करून शिवसेने काही जागा रिपाइं ला सोडायला हव्यात. पिंप्री ; चेंबूर या अमच्या जागा थोड्या मताने मागील 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. शीवसेनेच्या सर्व उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाची मते मिळणार असून त्यांच्या सर्व जागा आम्ही निवडून आणू. त्यासाठी मी स्वतः भाजप प्रमाणे शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले. त्यामुळे शिवसेनेने त्यांच्या कोट्यातील मानखुर्द शिवाजीनगर ही विधानसभेची जागा रिपाइं ला सोडावी अशी आग्रही मागणी ना रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज झालेल्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद तसेच येत्या सन 2020 मध्ये रिक्त होणारी राज्यसभेची एक जागा रिपाइं ला देण्यात यावी; राज्यसरकार मध्ये रिपाइं ला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद तसेच दोन विधान परिषद सदस्यत्व ; राज्यमंत्री दर्जा असलेली तीन महामंडळ अध्यक्षपदे ; प्रत्येक महामंडळात एक सदस्य आणि जिल्हा तालुका शासकीय समित्यांमध्ये रिपाइंला सदस्यत्व तसेच प्रत्येक जिल्ह्यात १०० कार्यकर्त्यांना एस ई ओ पदे असा सत्तेतील वाटा रिपब्लिकन पक्षाला देण्यात यावा असा प्रस्ताव देण्यात आला. त्यावर सरकार निवडून आल्यावर रिपब्लिकन पक्षाला सत्तेतील वाटा देऊन योग्य न्याय देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती  रामदास आठवले यांनी आज दिली.

चंद्रकांतदादांचे कोथरूडमध्ये जोरदार स्वागत -प्रचार सुरु ….मेधा कुलकर्णी अनुपस्थित

0

पुणे-भाजपचे प्रदेशाध्यक्ष ,पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघाची उमेदवारी मिळाल्यानंतर एकीकडे त्यांना ‘बाहेरचा ‘ उमेदवार म्हणून फ्लेक्स फलक बाजीने विरोध होत असताना दुसरीकडे आज सायंकाळी 4 वाजता त्यांनी कोथरूड मध्ये भेटी गाठी घेत आपल्या प्रचारास प्रारंभ केला आहे.

प्रथम त्यांनी पंडित शौनक अभिषेकी यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली.प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर,प्रसिद्ध अभिनेते प्रवीण तरडे यांच्याही सदिच्छा भेटी घेतल्या.यावेळी खासदार गिरीश बापट ,तसेच याच मतदार संघातून विधानसभा लढविण्यास जे इच्छुक होते ते स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ ,संदीप खर्डेकर ,मंजुश्री खर्डेकर ,दीपक पोटे,जयंत भावे ,उज्वल केसकर ,शिवराम मेंगडे,सुशील मेंगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .प्रभाग ३१ चे नगरसेवक सुशील मेंगडे यांनी कर्वेनगरच्या विकास मित्र मंडळ चौकात दादांचे जंगी स्वागत केले ,तर प्रभाग १३ मधे गोसावी वस्ती येथे नगरसेवक दीपक पोटे,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व जयंत भावे यांनी जोरदार स्वागत केले.विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यावेळी प्रकृतीस्वास्था अभावी अनुपस्थित होत्या असे समजते आहे .

कोथरूडमधून त्यांच्या नावाला विरोध झाला होता. ‘दूरचा नको, घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे’ असे फलक कोथरूड परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले होते. कोथरूडमध्ये लावण्यात आलेल्या या पोस्टरला आणि विरोधाला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेसबूकवर एक व्हिडीओ पोस्ट करत उत्तर दिले आहे. ‘मी पुण्याचा, मी महाराष्ट्राचा, मी अवघ्या देशाचा आहे’, असे पाटील यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पोस्ट केलेल्या साडेतीन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये पुणेकरांना मतदान करण्याचे आवहन केलं आहे. पुणेकरांचे आणि माझे खूप जुने आणि घनिष्ठ नाते आहे. माझी पत्नी पुण्याची आहे. शिवाय मी पुण्यात विद्यार्थी सेनेत कार्यरत होतो. त्यामुळे मी पुण्याच्या बाहेरचा नाही. मी तुमच्यापैकीच एक आहे.

केंद्रीय नेतृत्वाने मला कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारे पुण्याशी माझे ऋणानुबंध जोडले गेले आहेत. त्यामुळे मी कोणी परका नसून पुण्याचाच आहे, अशी भावनिक सादही पाटील यांनी या व्हिडीओद्वारे पुणेकरांनी दिली आहे.

 

विद्यमान आमदाराची जागा सोडली म्हणजे उपकार नाही केले; शिवसेना नेत्याचा भाजपाला टोला

0

पुणे-

जिथे विद्यमान आमदार आहेत, तिथे ज्याची सीट त्याला मिळाली. त्यामुळे हे उपकार नाहीत, तो हक्क आहे. हे सगळं उभं करताना दिवसरात्र स्ट्रगल करावा लागतो, असं ठाम मत शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केलं.

अर्थात, पक्षप्रमुखांचे आशीर्वाद नक्कीच आहेत, कारण कुणाला तिकीट द्यायचं याचा अधिकार त्यांना आहे आणि त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे, असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं आणि उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

पुणे शहरातील आठही मतदारसंघात विद्यमान आमदार असल्याचं कारण देत भाजपने आठही जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

इतकेच नव्हे तर, भाजपच्या पहिल्याच यादीत आठही जागांसाठीचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे काही नाराज शिवसैनिकांनी थेट ‘मातोश्री’वर धाव घेतली आहे. आता यावर उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेतात याकडे पुण्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र शिवसेनेने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पुरंदर विधानसभा मतदारसंघासाठी शिवतारे यांचे नाव आहे. त्या संदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला.

याचे उत्तर देताना शिवतारे म्हणाले की, ‘सर्व विद्यमान आमदारांना यावेळी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही. मलाही उमेदवारी देताना उपकार केले नाहीत तर मी कष्ट केले आहेत. तो माझा हक्क आहे. मात्र, पक्षप्रमुखांचे आशीर्वाद नक्कीच आहेत.’

 

: भाजपचा विश्वास मी सार्थ ठरवेन : सिद्धार्थ शिरोळे

0

पुणे : भारतीय जनता पक्षाने पुणे शहरातील शिवाजीनगर मतदार संघातून पक्षाची उमेदवारी देत माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. पक्षाने मला याआधी पुणे महानगरपालिकेचा नगरसेवक आणि पुणे महानगर प्राधिकरण महामंडळचा संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली होती त्यावेळी मी केलेल्या कामाची दखल घेत यावेळी विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून संधी दिली याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात केलेल्या कामाबरोबरच मी करीत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना मतदार पाठिंबा आणि आशीर्वाद देत मला प्रचंड बहुमताने विजयी करतील असा माझा विश्वास आहे, असेही सिद्धार्थ यांनी यावेळी सांगितले.

कसब्यातून मुक्ता टिळकांना शह देणार अरविंद शिंदे तर शिवाजीनगर मधून सिद्धार्थ शिरोळेंच्या विरोधात दत्ता बहिरट

काँग्रेसची दुसरी यादी जाहीर-आता प्रतीक्षा राष्ट्रवादीची

मुंबई:काँग्रेसने आज ५२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून पुण्यातून कसबा पेठेतून काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, तर शिवाजीनगर मतदारसंघातून माजी नगरसेवक दत्तात्रय बहिरट यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने कराड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.पुण्यातील आठहि मतदारसंघात भाजपने शिवसेनेच्या हाथी भोपळा देवूनआपले उमेदवार जाहीर केले त्यानंतर आता कॉंग्रेसच्या वाटेला आघाडीत आलेल्या तिन्ही उमेदवारांच्या नावाची  घोषणा  झाली  आहे. आता केवळ राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा उद्या होईल .
पुण्यातील मनसेच्या उमेदवारांची काही नावे घोषित झाली आहेत ,तर आप ने देखील आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत .
पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.  राळेगाव  मतदार संघातून वसंतराव पुरके यांना  पत्रकार युवराज मोहिते यांची गोरेगावमधून तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीणमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे तीन दिवस उरलेले असताना काँग्रेसने आज रात्री उशिरा ३२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत आजी-माजी आमदार आणि नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. कराडमधून पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर लातूर ग्रामीणमधून विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. कैलास गोरंट्याल यांना जालन्यातून तर अजंता यादव यांना कांदिवली पूर्वेतून उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने आतापर्यंत जाहीर केलेले 103 उमेदवार

1) अॅड. के. सी पाडवी – अक्कलकुवा (नंदुरबार)

2) पद्माकर वळवी – शहादा (नंदुरबार)

3) शिरीष नाईक – नवापूर (नंदुरबार)

4) शिरीष चौधरी – रावेर (जळगाव)

5) हर्षवर्धन सपकाळ – बुलडाणा (बुलडाणा)

6) अनंत वानखेडे – मेहकर (बुलडाणा)

7) अमित झनक – रिसोड (वाशिम)

8) वीरेंद्र जगताप – धामणगाव रेल्वे (अमरावती)

9) यशोमती ठाकूर – तिवसा (अमरावती)

10) अमर काळे – आर्वी (वर्धा)

11) रणजित कांबळे – देवळी (वर्धा)

12) सुनील केदार – सावनेर (नागपूर)

13) नितीन राऊत – नागपूर उत्तर (नागपूर)

14) विजय वडेट्टीवार – ब्रह्मपुरी (चंद्रपूर)

15) सतीश वर्जूरकर – चिमूर (चंद्रपूर)

16) प्रतिभा धानोरकर – वरोरा (चंद्रपूर)

17) बाळासाहेब मंगळूरकर – यवतमाळ (यवतमाळ)

18) अशोक चव्हाण- भोकर (नांदेड)

19) डी पी सावंत – नांदेड उत्तर (नांदेड)

20) वसंतराव चव्हाण – नायगाव (नांदेड)

21) रावसाहेब अनंतपूरकर – देगलूर (नांदेड)

22) संतोष टारफे – कळमनुरी (हिंगोली)

23) सुरेश वर्पूरडकर – पाथरी (परभणी)

24) कल्याण काळे – फुलंब्री (औरंगाबाद)

25) शेख आसिफ शेख रशीद – मालेगाव मध्य (नाशिक)

26) रोहित साळवे – अंबरनाथ (ठाणे)

27) सय्यद हुसेन – मीरा भाईंदर (ठाणे)

28) सुरेश कोपरकर – भांडुप पश्चिम (मुंबई)

29) अशोक जाधव – अंधेरी पश्चिम (मुंबई)

30) नसीम खान – चांदिवली (मुंबई)

31) चंद्रकांत हंडोरे – चेंबूर (मुंबई)

32) झिशान सिद्दीकी – वांद्रे पूर्व (मुंबई)

33) वर्षा गायकवाड – धारावी (मुंबई)

34) गणेश कुमार यादव – सायन कोळीवाडा (मुंबई)

35) अमीन पटेल – मुंबादेवी (मुंबई)

36) अशोक जगताप – कुलाबा (मुंबई)

37) माणिक जगताप – महाड (रायगड)

38) संजय जगताप – पुरंदर (पुणे)

39) संग्राम थोपटे – भोर (पुणे)

40) रमेश बागवे – पुणे कँटोनमेंट (पुणे)

41) बाळासाहेब थोरात – संगमनेर (अहमदनगर)

42) अमित देशमुख – लातूर शहर (लातूर)

43 अशोक पाटील निलंगेकर – निलंगा (लातूर)

44) बसवराज पाटील – औसा (लातूर)

45) मधुकरराव चव्हाण – तुळजापूर (सोलापूर)

46 प्रणिती शिंदे – सोलापूर मध्य (सोलापूर)

47) मौलबी सय्यद – सोलापूर दक्षिण (सोलापूर)

48) ऋतुराज पाटील – कोल्हापूर दक्षिण (कोल्हापूर)

49) पी एन पाटील सडोलीकर – करवीर (कोल्हापूर)

50) डॉ. विश्वजीत कदम – पलुस कडेगाव (सांगली)

51) विक्रम सावंत – जत (सांगली)

52) कुणाल पाटील – धुळे ग्रामीण

53) राजेश एकाडे – मलकापूर

54) राहुल सिद्धिविनायक बोंद्रे – चिखली

55) स्वाती संदीप वाकेकर – जळगाव (जामोड)

56) संजय रामदास बोडके – अकोट

57) विवेक रामराव पारस्कर – अकोला पूर्व

58) रजनी महादेव राठोड – वाशिम

59) अनिरुद्ध सुभानराव देशमुख – अचलपूर

60) शेखर शेंडे – वर्धा

61) राजू परवे – उमरेड

62) गिरिश पांडव – नागपूर (दक्षिण)

63) विकास ठाकरे – नागपूर (पश्चिम)

64) सहसराम कारोटे – आमगाव

65) आनंदराव गेडाम – आरमुरी

66) डॉ. चंदा कोडावते – गडचिरोली

67) सुभाष धोटे – राजुरा

68) विश्वास झाडे – बल्लारपूर

69) वामनराव कासावार – वणी

70) वसंतराव पुरके – राळेगाव

71) शिवाजीराव मोघे – आर्णी

72) विजय खडसे – उंबरखेड

73) भाऊराव पाटील – हिंगोली

74) सुरेशकुमार जेठालिया – परतूर

75) किसनराव गोरंटियाल – जालना

76) डॉ. तुषार शेवाळे – मालेगाव (बाह्य)

77) शिरिषकुमार कोतवाल – चांदवड

78) हिरामण खोसकर – इगतपुरी

79) शोएब अश्फाख उर्फ गुड्डू – भिवंडी (पश्चिम)

80) कांचन कुलकर्णी – कल्याण (पश्चिम)

81) राधिका गुप्ते – डोंबिवली

82) कुमार खिलारे – बोरिवली

83) अरविंद सावंत – दहिसर

84) गोविंद सिंग – मुलुंड

85) सुनिल कुमरे – जोगेश्वरी (पूर्व)

86) अजंता यादव – कांदिवली (पूर्व)

87) कालू करमनभाई बुधेलिया – चारकोप

88) युवराज मोहिते – गोरेगाव

89) जगदीश आमीन – अंधेरी (पूर्व)

90) जयंती सिरोया – विलेपार्ले

91) प्रविण नाईक – माहिम

92) उदय फणसेकर – शिवडी

93) हिरा देवासी – मलबारहिल

94) डॉ. मनिष पाटील – उरण

95) नंदा म्हात्रे – पेण

96) दत्तात्रय बहिरत – शिवाजीनगर

97) अरविंद शिंदे – कसबा पेठ

98) धीरज देशमुख – लातूर ग्रामीण

99) दिलीप भालेराव – उमरगाव

100) पृथ्वीराज चव्हाण – कराड (दक्षिण)

101) अविनाश लाड – राजापूर

102) राहुल खंजिरे – इचलकरंजी

103) पृथ्वीराज पाटील – सांगली

आम आदमी पक्षाचे कॅन्टोन्मेंट मधील उमेदवार खेमचंद सोनवणे यांच्या प्रचाराला प्रारंभ

0
पुणे: कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदासंघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार खेमचंद उर्फ शाम सोनवणे यांच्या प्रचाराला आज 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी प्रारंभ झाला
 आज  रोजी संध्याकाळी  ६  वाजता शाम सोनवणे (आप)यांचा   प्रचार प्रारंभ नारळ फोडून  करण्यात आला.
 पुणे स्टेशन ,आंबेडकर पुतळा येथून प्रचारा ची सुरुवात करण्यात आली.
श्रीकांत आचार्य (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वाहतूक विभाग आम आदमी पार्टी) यांनी श्रीफळ वाढवून प्रचार प्रारंभ केला.
 उमेदवार सोनवणे, मनोज थोरात, श्रीकांत आचार्य,  राहुल पगारे, अमोल सोनवणे, लक्ष्मी खेमचंद सोनवणे, वनीता साळवे, नरेश राजपूत, वैभव पोरे इ. उपस्थित होते

गायक सुदेश भोसले आणि महानायक अमिताभ बच्चन यांची खास भेट, सुवर्ण काळाला दिला उजाळा

0
  गायक सुदेश भोसले यांचा स्वप्नपूर्ती करणारा उपक्रम नुकताच त्यांनी लाँच केला आहे. तो उपक्रम म्हणजे त्यांचा ‘ग्रॅव्हिटी स्टुडिओज्’, आणि यासाठी त्यांना त्यांच्या फॅन्स आणि इंडस्ट्री मधून अनेक शुभेच्छा देखील मिळत असून आता ह्या मध्ये अजून एक नाव जोडले गेलेले आहे ते म्हणजे महानायक अमिताभ बच्चन यांचे. नुकतीच सुदेश भोसले व अमिताभ बच्चन यांची भेट जुहू येथील जनक येथे झाली.

ह्या भेटीबद्दलचा आनंद व्यक्त करत सुदेश जी म्हणाले की, “अमिताभजींशी भेट हा माझ्यासाठी मोठा सुखाचा प्रसंग होता. तसे, आम्ही नेहमीच कार्यक्रमांद्वारे भेटत असतो, परंतु बर्‍याच दिवसांनंतर मला त्यांच्याशी निवांत बोलण्याची संधी मिळाली.” पुढे या भेटी बद्दल सांगताना ते म्हणाले की, “सुपरस्टार असूनही ते  माझ्या आणि माझ्या कार्यक्रमांबद्दल विचारपूस करण्यास विसरले नाही आणि विशेष म्हणजे, गेल्या सहा वर्षांपासून माझ्या वाढदिवसाच्या दिवशी न चुकता रात्री १२:०१ वाजता मला शुभेच्छा देणारे अमिताभ जी आहेत. मी माझी काही स्केचेस त्यांना दाखविली, आम्ही आयुष्याबद्दल आणि जुन्या आठवणींबद्दल गप्पा मारल्या आणि हे असे क्षण आहेत जे मी आयुष्याभर जपेन. मी, अमिताभजींना माझ्या सुधारित स्टुडिओला भेट देण्याची आणि आमच्या संगीताच्या उपक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी येण्याची विनंती केलेली आहे. मी आशा करतो लवकरच माझ्या ग्रॅव्हिटी स्टुडिओज मध्ये माझी त्यांच्याशी पुन्हा माझी भेट होईल आणि या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत आहे!”

सुदेश यांनी महान गायक किशोर कुमार यांच्याबरोबर गायले आहे आणि संजीव कुमारसाठी आवाज डब केले आहे. परंतु  पण १९९१ मध्ये ‘हम’ या चित्रपटात बच्चनसाठी ‘जुम्मा चुम्मा दे दे’ हे गीत गायले तेव्हापासून ख्याती मिळाली.

सूर आणि संगीताच्या साथीने उलगडल्या लतादीदींच्या आठवणी

0
पुणे : मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे लतादीदींसह आमच्यावर झालेले संस्कार, मंडई आणि पुण्याच्या परिसरामध्ये गेलेले बालपण, लहानपणीच वडिलांचे हरवलेले छत्र, त्यामुळे सर्व भावंडांची लतादीदींनीवर आलेली जबाबदारी, ती सांभाळताना केलेला गाण्यांचा रियाज, वयाच्या तेराव्या वर्षी मिळालेली पहिली संधी आणि त्या संधीचे कष्टातून केलेले सोने अशा लतादीदींचा विविध आठवणी ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी सूर आणि संगीताच्या साथीसह उलगडल्या.
पुणे नवरात्र महोत्सव समिती, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित २५ व्या पुणे नवरात्र महोत्सवात दुसऱ्या सत्रात जेष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, विभावरी आपटे, मनीषा निश्चल यांनी लतादीदींचा प्रवास ‘लतादीदी आणि मी’ या कार्यक्रमातून उलगडला. यावेळी स्वामी समर्थ अक्कलकोट अन्नछत्राचे अध्यक्ष जैनमेजे राजेभोसले, सौमित्र गुपचूप, आयोजक आबा बागुल, जयश्री बागुल उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ‘जय देव जय देव जय जय शिवराया’ या गीताने झाली. गायिका विभावरी आपटे यांनी गाण्याचे सादरीकरण केले त्यांना हृदयनाथ मंगेशकर यांनी साथ दिली. त्यानंतर
‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’ या गाण्याचे सादरीकरण झाले. यावेळी डॉ. राजेंद्र धुरकर व कौशल गणरतवार (तबला), ऋतुराज भोरे (रिदम), निलेश देशपांडे (बासरी), रमाकांत परांजपे (व्हायोलिन), यश भंडारे (कीबोर्ड) यांनी साथसांगत केली. विवेक परांजपे यांनी संगीत संयोजन केले. निवेदन वैशाली गोस्वामी यांनी केले.
‘लग जा गले फिर ऐसी रात हो न हो’, ‘रहे ना रहे हम’, ‘यारा सिली सिली’, ‘आजा रे परदेशी’, ‘होटो मै ऐसी बात’, ‘आजीब दास्ता है’, ‘ओ भूली दास्ता’, ‘एक प्यार का नगमा है’ या आणि अशा बहारदार हिंदी मराठी गीतांनी कार्यक्रम अधिकाधिक रंगत गेला.
हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, “वडिलांचे प्रत्येक गुण घेऊन लताताई जन्माला आली आहे. वयाच्या तेराव्या वर्षी पहिल्यांदा लतादिदींनी गाण्यासाठी वन्स मोर घेतला, त्यानंतर परत गाण्यासाठी प्रेक्षकांनी विनंती केली, त्यावेळी तीन वेळा ते गाणं म्हणले. परत प्रेक्षकांनी दुसरं गाणं गाण्यासाठी जेव्हा विनंती केली तेव्हा लतादीदींनी तेथुन पळ काढला आणि थेट पुणे गाठलं आणि आईला झालेला प्रकार सांगत म्हणल्या साक्षात वडिलांचा आवाज मला मिळाला आहे यावरून तीच वडीलांबद्दलचे प्रेम आस्था दिसून येते.”

बिलियर्डस्‌ अँड स्नुकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी राजन खिंवसरा यांची निवड

0
मुंबई: पुना क्लबचे राजन खिंवसरा यांची बिलियर्डस्‌ अँड स्नुकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम)च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईत पी.जे.हिंदू जिमखाना येथे पार पडलेल्या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दरम्यान झालेल्या निवडणूकीत हा निर्णय घेण्यात आला.
मुळ पुण्यातील खिंवसरा यांना हा मान दुसर्‍यांदा मिळाला आहे. याआधी त्यांनी 2015-16 या वर्षी अध्यक्षपद भूषवले होते. तसेच, गेल्या सात वर्षांपासून त्यांनी भारतीय बिलियर्डस्‌ अँड स्नुकर संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
अध्यक्ष खिंवसरा यांच्यासह अन्य सर्व पदाधिकार्‍यांची निवडही बिनविरोध करण्यात आली. सिध्दार्थ पारिख(पीजे हिंदू जिमखाना), सौमील करकेरा(गरवारे क्लब हाऊस)यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच, मानव पांचाळ(मलबार हिल क्लब), ऋषभ कुमार(बॉम्बे जिमखाना)यांची मानद सहसचिवपदी निवड करण्यात आली. शेखर सुर्वे(वेस्टर्न रेल्वे)यांचीही मानद खजिनदारपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्यकारी समितीच्या सदस्यांसाठी सहा पदांकरिता 9 उमेदवार असल्याने मतदान घेण्यात आले. यातील निवड झालेले सहा सदस्य पुढीलप्रमाणेः-विशाल मदन(चेंबुर जिमखाना), प्रणव चिखल(पीजे हिंदू जिमखाना), वेंकटेश्वरण सुब‘मण्यम(माटुंगा जिमखाना), अमित सप्रु(पार्क क्लब), अंगद भट्टी(पोटर्स्‌ क्लब) आणि आदित्य देशपांडे(पीवायसी हिंदू जिमखाना).  आदित्य देशपांडे यांनी 2009 मध्ये कुमार आशियायी स्पर्धेत तेरावे स्थान पटकावले होते, तसेच त्याच पुण्यात विविध स्पर्धा आयोजनात करण्यात मोलाचा वाटा आहे.
यावेळी बोलताना नुतन अध्यक्ष खिंवसरा म्हणाले की, मी आणि माझे नवीन सहकारी यांचा मुंबईत क्यु स्पोर्टस्‌ अकादमीत आणि प्रशिक्षण कार्यक‘म सुरू करण्याचा प्रयत्न आहे. किंबहुन ही आमच्या अजेंडावरील पहिली महत्वाची कार्यक्रम पत्रिका असणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी दोन वेळचा माजी आशियाई स्नुकर विजेता यासिन मर्चंट याने अगोदरच काम सुरू केले असून या युवा खेळाडूंना याचा प्रामुख्याने फायदा होणार आहे. वरिष्ठ खेळाडू हळूहळू निवृत्त होत असल्याने त्यांची जागा युवा खेळाडू घेत असल्याने ही एक सातत्याने चालणारी प्रकि‘या ठरते. परंतु गुणवान युवा खेळाडू पुढे येणे आवश्यक असल्याने या प्रशिक्षण कार्यक्रमाची खर्‍या अर्थाने आवश्यकता आहे.
आम्ही या योजनेसाठी राज्याचे मंत्री विनोद तावडे यांच्याशी याआधीच संपर्क साधला असून मुंबई येथे क्यु स्पोर्टस्‌ अकादमी सुरू करण्याबाबत चर्चा झाली आहे. तसेच, राज्य सरकारने अकादमीसाठी भूखंड देण्याचेही तोंडी आश्वासन दिले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या सहकार्याने लवकरात लवकर ही अकादमी सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबईतील अकादमीचे काम व्यवस्थित सुरू झाल्यानंतर पुण्यात दुसरी अकादमी सुरू करण्याचे आमचे लक्ष आहे आणि त्यासाठी आर्थिक निधीच्या स्वरूपात किंवा अन्यप्रकारे साहाय्य देण्यास आमचा प्रयत्न राहिल. परंतु मुंबईत अकादमी सुरू करणे हेच आमचे पहिले ध्येय आहे.
जुन्या कार्यकारी समितीतील अनेक सदस्य नव्या कार्यकारिणीत असल्याबद्दल खिंवसरा यांनी विशेष आनंद व्यक्त केला. याआधीच्या कार्यकारिणीने खुप चांगले काम केले असून त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. कोणतेही विशेष आर्थिक साहाय्य मिळत नसतानाही त्यांनी आपल्या कालखंडात 20पेक्षा अधिक स्पर्धा आयोजित केल्या आहेत. आम्ही त्यांची ही चांगली कामगिरी पुढे कायम सुरु ठेवण्याचा 100टक्के प्रयत्न करू.
बीएसएएमची कार्यकारिणी सदस्य समिती पुढीलप्रमाणे(2019-2021)
अध्यक्ष- राजन खिंवसरा(पुना क्लब) बिनविरोध निवड

उपाध्यक्ष- सिध्दार्थ पारीख(पी.जे.हिंदू जिमखाना), सौमिल कारकेरा(गरवारे क्लब हाऊस) बिनविरोध निवड
सह मानद सचिव- मानव पांचाल(मालाबार हिल क्लब), ऋषभ कुमार(बॉंबे जिमखाना) बिनविरोध निवड
खजिनदार- शेखर सुर्वे(डब्ल्यु आर एस ए)- बिनविरोध निवड
कार्यकारीणी समिती सदस्य- विशाल मदन(चेंबुर जिमखाना), प्रणव चिखले(पी.जे हिंदू जिमखाना), व्येंकटेश्वरा सुब्रमनिअन(माटुंगा जिमखाना), अमित सप्रु(पार्क क्लब), अंगद भाट्टी(आदर्स क्लब), आदित्य देशपांडे(पीवायसी हिंदू जिमखाना)  

आरपीआय ब्राह्मण आघाडीचा चंद्रकांत पाटील यांना पाठींबा-मंदार जोशी

0

पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून दिलेल्या उमेदवारीचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) ब्राह्मण आघाडीतर्फे स्वागत करण्यात आले आहे. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन आपण विकासाचा विचार केला पाहिजे. भाजपने चंद्रकांत पाटील यांना काहीतरी विचाराअंतीच उमेदवारी दिली असणार आहे. त्यामुळे महायुतीचा घटक पक्ष आणि ब्राह्मण समाज म्हणून आपण पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे आरपीआय ब्राह्मण आघाडीचे अध्यक्ष ऍड. मंदार जोशी यांनी म्हटले आहे.

विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी आणि स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ व महायुतीच्या सर्व पदाधिकारी यांनी केलेल्या कामामुळे भाजपा केंद्रीय समितीने केलेल्या सर्व्हेमध्ये कोथरूड मतदारसंघ ‘सेफझोन’मध्ये असल्याने चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीसाठी विचार केला आहे. ही गोष्ट पुण्याच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. मात्र, काही लोक या गोष्टीला विनाकारण जातीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. वास्तविक असा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही आणि कोणी सवंग प्रसिद्धीसाठी असे प्रकार करू नयेत. ते खपवून घेतले जाणार नाहीत.
तसेच चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी मिळाल्यामुळे ते कोथरूड मतदार संघातील सर्व इच्छुक उमेदवारांना योग्य न्याय देतील.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि ‘आरपीआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले जो आदेश देतील त्याप्रमाणे ‘आरपीआय’च्या सर्व आघाड्या आदेश पाळून महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करतील, असा विश्वासही ऍड. जोशी यांनी व्यक्त केला.

मनसे :कसब्यातून रुपाली पाटील नाही तरअजय शिंदे,भाजपच्या टिळेकरांचा सामना वसंत मोरेंशीच …

0

मुंबई: मंत्रालयात विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांच्यासह मनसेने २७ जणांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुण्याच्या हडपसर मधून वसंत मोरेंना तर उमेदवारी देण्यात आली आहेच मात्र कसब्यातून भाजपच्या मुक्ता टिळकांना रुपाली पाटलांचा शह मिळेल असे वाटत असताना मनसे ने येथून अजय शिंदेंना उमेदवारी दिली आहे. कोथरूड मधून किशोर शिंदेंना उमेदवारी देण्यात आली आहे .

मनसेचे पहिल्या यादीतील उमेदवार

>> प्रमोद पाटील – कल्याण ग्रामीण
>> प्रकाश भोईर – कल्याण पश्चिम
>> अशोक मुर्तडक – नाशिक पूर्व
>> संदीप देशपांडे – माहिम
>> वसंत मोरे – हडपसर
>> किशोर शिंदे – कोथरुड
>> नितीन भोसले – नाशिक मध्य
>> राजू उंबरकर – वणी
>> अविनाश जाधव – ठाणे
>> नयन कदम – मागाठाणे
>> अजय शिंदे – कसबा पेठ, पुणे
>> नरेंद्र धर्मा पाटील – सिंदखेड
>> दिलीप दातीर – नाशिक पश्चिम
>> योगेश शेवेरे- इगतपुरी
>> कर्णबाळा दुनबळे – चेंबूर
>> संजय तुर्डे – कलिना
>> सुहास निम्हण – शिवाजीनगर
>> गजानन काळे – बेलापूर
>> अतुल बंदिले – हिंगणघाट
>> प्रशांत नवगिरे – तुळजापूर
>> राजेश वेरुणकर – दहीसर
>> अरुण सुर्वे – दिंडोशी
>> हेमंत कांबळे – कांदिवली पूर्व
>> वीरेंद्र जाधव – गोरेगाव
>> संदेश देसाई – वर्सोवा
>> गणेश चुक्कल – घाटकोपर पश्चिम
>> अखिल चित्रे- वांद्रे पूर्व

जगावर आजही गांधीं नावाचे गारुड : डॉ. आबनावे

0
महाराष्ट्र हरिजन सेवक संघातर्फे गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला व्याख्यान
पुणे : ”अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या  निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असलेली भारतीय वंशाची महिला कमला हॅरिस मुलाखतीत महात्मा गांधी आणि मार्टिन लुथर किंग माझे आदर्श असल्याचा उल्लेख करते. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत हा देश बुद्धांचा आणि गांधींचा असल्याचे सांगतात. जगातील सर्वच देश भारताकडे गांधींचा देश म्हणून बघतो. गांधीजींच्या विचारांत प्रचंड ताकद आहे. आजही जगावर गांधीं नावाचे गारुड आहे,” असे मत महाराष्ट्र हरीजन सेवक संघाचे सहसचिव व महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र हरीजन सेवक संघातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त टिळक रस्त्यावरील अशोक विद्यालयात आयोजित व्याख्यानात डॉ. आबनावे ‘अज्ञात गांधी’ या विषयावर बोलत होते. महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सदस्य प्रज्योत आबनावे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे, प्रसाद आबनावे, विभागप्रमुख रेखा दराडे, कल्याणी साळुंखे, अशोक विद्यालयाच्या प्राचार्या विद्या कांबळे, इंद्राणी रानडे आदी उपस्थित होते. यावेळी कलाशिक्षक भागुजी शिखरे यांनी काढलेले गांधींजींचे चित्र भेट देऊन डॉ. आबनावे यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. विकास आबनावे म्हणाले, ”गांधींनी देशभ्रमंती करताना दारिद्र्य पाहिले. त्याच्या संवेदनशील मनाने सुटाबुटातील कपड्यांचा त्याग करत पंचा आणि धोतर परिधान केले. गांधीजी जिथे गेले तिथे त्यांचे अनुयायी निर्माण झाले. रेडिओ, टीव्ही यासारखी माध्यमे नसताना ते देशातील ४५ कोटी लोकांपर्यंत पोहचले. चरख्यावर सुत कातून कामातून भारतातील महिलांना स्वतंत्रलढ्यात सहभागी करून घेतले. आज १४० देशात गांधीजींचे पुतळे आहेत. त्यांची जयंती जागतिक अहिंसा दिवस म्हणून पाळण्यात येते. सत्याग्रहाचा मार्ग ही कस्तुरबांची देण होती. डॉ. आंबेडकरांसोबत पराकोटीचे मतभेत झालेले असूनही, त्याना मंत्रिमंडळात घ्यावे हा गांधीजींचा आग्रह होता. गांधीजींनी अंहिसा, सत्याच्या आधारे जगावर राज्य केले. वेगवेगळ्या माध्यमानी गांधींजीची मोठ्या प्रमाणावर बदनामी केली. पण गांधी आणि गांधीजींचे विचार कधीही संपले नाहीत आणि संपणारही नाहीत. विचारांतून ते कायम आपल्यासोबत आहेत, याची प्रचिती येते.”
प्रज्योत आबनावे यांनीही अध्यक्षयीय भाषणात गांधींजींविषयीच्या भावना व्यक्त केल्या. प्रा.गौरी पास्ते यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ज्योती हिरे यांनी सूत्रसंचालन केले. वंदना अनारसे यांनी आभार मानले.

आता पुण्यात ……कोल्हापूरची …. पाटीलकी …….

0

पुणे-भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीसह पुण्यातील तीन विद्यमान आमदारांना डच्चू येत भाजपने शिवसेनेकडे सतरंज्या उचलायचे काम ठेवत आपल्या आठही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

  • पुण्यातील मतदारसंघ आणि उमेदवार
  • कोथरूड- चंद्रकांत पाटील
  • पर्वती- माधुरी मिसाळ
  • हडपसर- योगेश टिळेकर
  • वडगाव शेरी- जगदीश मुळीक
  • शिवाजीनगर- सिद्धार्थ शिरोळे
  • पुणे कॅन्टोमेंट- सुनील कांबळे
  • कसबा- मुक्ता टिळक
  • खडकवासला- भीमराव तापकीर
या तीन विद्यमान आमदारांना मिळाला डच्चू

गिरीश बापट हे खासदार झाल्याने रिक्त झालेल्या कसब्याच्या जागेवर गेली अडीच वर्षे महापौरपदावर असलेल्या  मुक्ता टिळक तर कॅन्टोमेंट मतदारसंघात माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना डच्चू देत त्यांचे बंधू, स्थायी समितीचे अध्यक्षपदावर विराजमान असलेले  सुनील कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पर्वतीत विअद्यामान आमदार यांना भाजपचे शहराध्यक्ष पद देवूनही पुन्हा विधानसभेची तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिंरजीव नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनाही उमेदवार देत शिरोळे कुटुंबावर झालेला अन्याय दूर करण्यात आला आहे. कोथरूड येथील विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना डच्चू देत त्या ठिकाणाहून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे रिंगणात उतरले आहेत. पाटील यांनी ‘सुरक्षित’मतदार संघ शोधत थेट कोल्हापूर येथून पुण्यात प्रवेश केला. सर्वांत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कोथरूड येथून त्यांना लढविण्यात येत आहे. लोकसभेला अनिल शिरोळे या विद्यमान खासदारांचे तिकिट कापत पुण्यातून बापट यांना यावेळी उमेदवारी देण्यात आली. लोकसभेच्यावेळीच शिरोळे यांना शिवाजीनगर विधानसभेची उमेदवारी देण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. ते आश्वासन पाळत शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ यांना शिवाजीनगर विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

ज्याप्रमाणे कांबळे यांच्यावर आरोप आहेत तसेच काहीसे आरोप टिळेकर यांच्यावर हि आहेत मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. टिळेकर यांना त्यांच्यावरील आरोपांनी या पूर्वीच हैराण केले पण फडणवीस त्यांच्या पाठीशी उभे राहिलेत हे स्पष्ट झाले आहे. निवडणूक काळात त्यांच्यावरील आरोप त्यांचा पिच्छा सोडणार नाहीत आणि अशा स्थितीत आता मतदार पाठीशी राहील काय ? याचे उत्तर मिळणार आहेच .या सर्व उमेदवारात जगदीश मुळीक आणि सिद्धार्थ शिरोळे हे तरुण आणि कोणताही आरोप नसलेले उमेदवार आहेत .मुळीक यांना  ५ वर्षात केलेल्या कामाचा पाढा पुन्हा मतदारांपुढे वाचवा लागणार आहे .शिरोळे यांना नगरसेवक पद ,पीएमपीएमएल च्या संचालकपदी केलेल्या कारभाराबाबत उजळणी करावी लागणार आहे. तसेच मिसाळ यांच्याकडे  १० वर्षे आमदारकी आहे. या १० वर्षातला हिशेब मतदार मागणार कि निव्वळ मोदी ,फडणवीस यांच्या नावावर मतदान करणार हे स्पष्ट होणारच आहे. कसब्यात महापौरांची अडीच वर्षाची कारकीर्द त्यांच्या समोर उभी ठाकणार आहे . आणि या अडीच वर्षातल्या कारकीर्दीचा हिशेब देत त्यांना येथे सामना करावा लागणार आहे. कोथरूड मध्ये चंद्रकांत पाटलांना कोण कोण किती कशी साथ देतेय ते पाहावे लागणार आहे . मात्र पाटील यांची उमेदवारी हि पुण्याचे नेतृत्व म्हणून पाहिली जाणार आहे . अर्थात बाहेरचा -आतला या वादाला सामोरे जात ते हा लढा कसा देतात ते दिसणारच आहे. कलमाडींची भाईगिरी संपली. अजीतदादांची पवारशाही मावळताना जाणवू लागली आहे आणि आता कोल्हापूरच्या चंद्रकांत दादांची पाटीलकी पुण्यात या निमित्ताने सुरु होणार काय ? हे देखील पाहायला मिळणार आहे .

 

 

विश्वंभर चौधरी विधानसभा लढणार काय -कोथरूड मध्ये उत्सुकता

0

पुणे-सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांना कोथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऑफर दिली गेली आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्वतः चौधरी यांनी सांगितले आहे. दरम्यान, ते निवडणूक लढवण्यास तयार झाले तर भाजपाचे उमेदवार चंद्रकांत पाटलांना कडवे आव्हान देऊ शकतात, अशी पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.विश्वंभर चौधरी यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. .दरम्यान केजरीवाल यांचे सहकारी ,कुमार सप्तर्षी,संजय सोनवणी ,तृप्ती देसाई यांच्या सह कोथरुड मधील साहित्यिक ,कलावंत ,लेखक ,विचारवंत विश्वंभर यांच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी  आप च्या वतीने लढावे असा हि सूर आहे.कॉंग्रेस ,राष्ट्रवादी ,मनसे  आणि शिवसेनेत  त्यांच्या नावाला पाठींबा देणारी मंडळी दिऊन येत आहेत .आणि कोल्हापूरच्या पाटलांना उमेदवारी दिल्याने दुखावलेली भाजप मधील काही मंडळी त्यांना मदत करण्याची शक्यता दिसते आहे. भाजप मधील अशा राजकारणाचा फायदा अर्थात चौधरी घेतील काय ? हा प्रश्न असला तरी , चांगल्या हेतूसाठी  पुढे जाण्यासाठी काही तडजोडी ते स्वीकारणार काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .

फेसबूकवरील पोस्टद्वारे त्यांनी सध्यातरी आपला राजकारणात येण्याचा मानस नसल्याचे सांगत याबाबत प्रस्ताव असल्याने जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.विश्वंभर चौधरी यांनी पोस्टमध्ये म्हटले की, “कोथरूडमधून स्वाभिमानीच्या तिकिटावर मी लढावं असा प्रस्ताव आमचे मित्र माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज मांडला. सर्वांचे मत विचारून लवकरच कळवतो असे मी त्यांना सांगितले आहे. मन अजून राजकारणात जाण्यास तयार होत नाही. उलट माझ्याऐवजी त्यांची स्वतःची उमेदवारी चांगली राहील असेही त्यांना मी सुचवले आहे.”