Home Blog Page 2826

वडगावशेरी-चंदननगरला  तीन महिन्यामध्ये  भामा-आसखेडच पाणी येणार ः आमदार जगदिश मुळीक

0
  • वडगाव  शेरी ः  राष्ट्रवादीच्या काळात रखडलेल्या भामा आसखेड पाणी पुरवठा योजनाचा प्रकल्पाच योजनाचे काम  रखडलेले होते. मात्र, आता ते काम अंतिम टप्प्यात आल आहे. पुढील तीन महिन्यात भामा- आसखेडच पाणी वडगावशेरी, चंदननगर, धानोरी, टिंगरेनगर, विमाननगर,लोहगाव आणि वाघोली या भागातील नागरीकांना  मिळणार असल्याची माहिती  आमदार जगदिश मुळीक यांनी दिली.

वडगावशेरी विधानसभा मतदार संघामध्ये भाजप आरपीआय, रासप महायुतीचे उमेदावर आमदार जगदिश मुळीक यांची आज  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्प हार अर्पण करून    चंदननगर,  संघर्ष चोक,  चव्हाणनगर, बोराटे वस्ती, बिडी कामगार, यशवंत नगर या भागामध्ये  प्रचार फेरी काढली.  यावेळी आमदार मुळीक बोलत होते. या प्रंसगी    नगरसेविका सुनीताताई गलांडे,नगरसेवक संदीप जऱ्हाड,नगरसेविका शीतल शिंदे,आशा जगताप,विशाल साळी,राजाभाऊ चौधरी,सचिन सातपुते,संतोष भरणे,स्वप्नील चव्हाण,अनिल जावळकर,नवनाथ पठारे,राजेंद्र पठारे,विनोद कर्ताळ, सोमनाथ पठारे,शैलेश बनसोडे,शांताराम कावरे,,बाळा पऱ्हाड, आणि साधुतात्या थोरात तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार मुळीक म्हणाले  की,  पुर्व पुणे भागाचा  पाणी प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाने भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेतून  २.६ टीएमसी पाणी महापालिकेसाठी मंजूर केले आहे. पण, राष्ट्रवादीच्या सरकारला ही योजना पुर्ण करता आली नाही. भाजप सरकारने या कामाला गती दिली. या योजनासाठी फ्रेबुवारीमध्ये 185 कोटीची तरतुद करण्यात आली आहे. तसेच  भामा -आसाखेड योजने अतंर्गत पाण्याच्या टाकी बांधणे, जॅकवेल आणि पाईपलाईनचे काम जवळपास 90 टक्के पुर्ण झाले आहे. यामुळे पुढील तीन महिन्यात नागरीकांना भामा-आसखेडच पाणी मिळणार आहे.या योजनेमुळे पुर्व पुणेचा परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. गेल्या पाच वर्षामध्ये पाणी प्रश्न सोडवण्यासाठी अनेक काम केली आहेत.

मतदानावर बहिष्कार हा पर्याय नाही-चंद्रकांतदादा

पुणे: मतदानावर बहिष्कार हा पर्याय नाही. कोथरूडमध्ये नागरिकांच्या समस्या मला ठाऊक असून त्यावर निश्चित कालबद्ध तोडगा काढण्यासाठी मी ठोस नियोजन केले आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुतीत कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांनी आज येथे केले.
कोथरूड मतदारसंघातील सृष्टी, गुरुगणेशनगर, वात्सल्य नगरी, कुंबरे टाऊनशीप सोसायटीतील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याची भाषा केली होती. या पार्श्वभूमीवर श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी सोसायटीमध्ये आज सर्वसामान्य नागरिकांना समवेत संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतानाच त्यावरील ठोस कालबद्ध तोडण्याबाबत देखील त्यांना आश्वस्त केले.
यावेळी कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधाताई कुलकर्णी, भाजपचे नगरसेवक मुरलीधर मोहोळ, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्यासह स्थानिक नगरसेवक, सोसायटीचे पदाधिकारी आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सृष्टी, गुरुगणेशनगर, वात्सल्य नगरी, कुंबरे टाऊनशीप सोसायटीतील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर श्री पाटील म्हणाले की, माझ्यावर विश्वास ठेवा. स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मदतीने येथील सर्व समस्यांवर स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने ठोस उपाय करण्याचे नियोजनही केले आहे. तसेच राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयांच्या माध्यमातून या सर्व समस्या निकाली लागतील.
ते पुढे म्हणाले की, “गेल्या पाच वर्षात राज्यातील अनेक प्रलंबित विषय आपण सोडवले आहेत. पुढील पाच वर्षात संधी दिल्यानंतर महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करायचं आहे. त्यासोबत औद्योगिक क्षेत्राला उभारी देण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित करायच्या आहेत. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले प्रत्येक गरिबाला घर देण्याचे स्वप्न सत्यात उतरवायचे आहे. यासाठी मोदींचे हातबळकट करावेत. त्यासोबतच, राज्यात गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात विकासाची गती निर्माण केली आहे, ती तशीच कायम ठेवून संपूर्ण देशात एक आदर्श निर्माण करायचा आहे, यासाठी राज्यातील जनतेची सेवा करण्याची आम्हाला पुन्हा एकदा संधी द्यावी,” असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.
दरम्यान, सृष्टी, गुरुगणेशनगर, वात्सल्य नगरी, कुंबरे टाऊनशीप सोसायटीतील रहिवाशांची सर्व मते चंद्रकांत दादा पाटील यांनी पूर्ण वेळ देऊन ऐकून घेतली. महिला ज्येष्ठ नागरिक आदींबाबत प्राधान्याने निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. श्री. पाटील यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा निश्चय व्यक्त केला.

योग्य डॉक्टर मिळाला आहे

कोथरूड परिसरातील नागरिकांनी व्यक्त केलेल्या समस्या या आता चिंताजनक स्वरूप प्राप्त केले असून त्या आयसीयूमध्ये आहेत अशा शब्दात नागरिकांनी मत व्यक्त केले. त्यावर चंद्रकांत दादा पाटील यांनी खास पुणेरी शैलीमध्ये उत्तर दिले. ते म्हणाले की, समस्या आयसीयूमध्ये आहेत हे मान्य आहे पण आत्तापर्यंत योग्य डॉक्टर मिळत नव्हता आता माझ्या माध्यमातून तुम्हाला फॉरवर्ड करून डॉक्टर मिळाला आहे त्यामुळेच मधील पेशंट लवकरच बाहेर येऊन ठणठणीत बरा होईल. यावर उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केलेला विश्वासाला मान्यतेची पावती दिली.

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 3 हजार 239 उमेदवार-पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक तर सर्वात कमी सिंधुदूर्ग जिल्ह्यातून उमेदवार

0

मुंबई, दि. 7 : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यात 288 मतदारसंघात 1 हजार 504 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले असून एकूण 3 हजार 239 उमेदवार निवडणूक रिेंगणात आहेत. सर्वात जास्त 246 उमेदवार पुणे जिल्ह्यातून तर सर्वात कमी 23 उमेदवार सिंधुदूर्ग जिल्ह्यातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

दरम्यान शनिवारी झालेल्या छाननीअंती 4 हजार 743 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातून 1 हजार 504 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. नंदुरबार जिल्ह्यात 4 मतदारसंघात 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. धुळे जिल्ह्यात 5 मतदारसंघात 38 उमेदवार, जळगाव जिल्ह्यात 11 मतदारसंघात 100 उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात 7 मतदारसंघात 59 उमेदवार, अकोला जिल्ह्यात 5 मतदारसंघात 68 उमेदवार, वाशिम जिल्ह्यात 3 मतदारसंघात 44 उमेदवार, अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघात 109 उमेदवार, वर्धा जिल्ह्यात 4 मतदारसंघात 47 उमेदवार, नागपूर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 146 उमेदवार, भंडारा जिल्ह्यात 3 मतदारसंघात 42 उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात 4 मतदारसंघात 47 उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात 3 मतदारसंघात 38 उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 71 उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात 7 मतदारसंघात 88 उमेदवार, नांदेड जिल्ह्यात 9 मतदारसंघात 135उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

तर, हिंगोली जिल्ह्यात 3 मतदारसंघात 33 उमेदवार, परभणी जिल्ह्यात 4 मतदारसंघात 53 उमेदवार, जालना जिल्ह्यात 5 मतदारसंघात 79 उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात 9 मतदारसंघात 128 उमेदवार, नाशिक जिल्ह्यात 15 मतदारसंघात 148 उमेदवार, पालघर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 53 उमेदवार, ठाणे जिल्ह्यात 18 मतदारसंघात 214 उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात 26 मतदारसंघात 244 उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 89 उमेदवार, रायगड जिल्ह्यात 7 मतदारसंघात 78 उमेदवार, पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघात 246 उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 116 उमेदवार, बीड जिल्ह्यात 6 मतदारसंघात 115 उमेदवार, लातूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 79, उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात 4 मतदारसंघात 50 उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात 11 मतदारसंघात 154 उमेदवार, सातारा जिल्ह्यात 8 मतदारसंघात 73 उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात 5 मतदारसंघात 32 उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात 3 मतदारसंघात 23 उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 106 उमेदवार, सांगली जिल्ह्यात 8 मतदारसंघात 68 उमेदवार निवडणूक रिंगणात असणार असल्याची माहितीही श्री. शिंदे यांनी दिली.

सर्वाधिक उमेदवार नांदेड दक्षिण मध्ये तर सर्वात कमी चिपळूण मतदारसंघात

सर्वात कमी 3 उमेदवार रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मतदार संघात तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 38 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नांदेड दक्षिण, बीड, औरंगाबाद पूर्व, जालना या चार मतदारसंघात 31 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने एका ईव्हीएमसाठी 3 बॅलेट युनिटची (बीयु) आवश्यकता राहणार असून कंट्रोल युनिट (सीयु) एकच लागणार आहे. अकोट, रिसोड, धामणगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती, नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, साकोली, गोंदिया, गडचिरोली, वणी, नांदेड उत्तर, वैजापूर, नाशिक पश्चिम, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, उल्हासनगर, बेलापूर, पिंपरी, पुणे कॅन्टोन्मेंट, नेवासा, गेवराई, माजलगाव, परळी, लातूर शहर, तुळजापूर, सोलापूर शहर मध्य, पंढरपूर, सांगोला, हातकणंगले अशा 30 मतदारसंघांमध्ये 15 पेक्षा अधिक उमेदवार असल्याने दोन बॅलेट युनिट लागणार आहेत. राज्यात ईव्हीएमच्या अत्युच्च उमेदवारसंख्येच्या मर्यादेपेक्षा कमी उमेदवारांची संख्या असल्याने कुठेही मतपत्रिकेवर (बॅलेटपेपर) मतदान घ्यावे लागणार नाही.

नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदार संघात सर्वाधिक 91 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यामधून अर्जमाघारीनंतर केवळ 7 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात 11 कोटी 39 लाख रुपयांची रोकड, 12 कोटी 47 लाख रुपयांची दारु, 15 कोटी 29 लाख रुपये किमतीचे मादक पदार्थ आणि 8 कोटी 87 लाख रुपये किमतीचे सोने, चांदी व अन्य मौलवान दागिणे असा सुमारे 48 कोटी 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्यात विविध कलमांखाली 442 प्रकरणांमध्ये कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये भा.दं.वि.अंतर्गत विविध कलमांखाली 102, लोक प्रतिनिधीत्व अधिनियमाखाली 15, अंमली पदार्थ विषयक एनपीडीएस अधिनियमांतर्गत 72, मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत 228 तर मालमत्तेचे विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत 25 प्रकरणांचा समावेश आहे, अशीही माहिती श्री. शिंदे यांनी दिली.

राज्यात मतदार नोंदणी तसेच मतदार यादी अचूक होण्याच्या दृष्टिकोनातून जुलै महिन्यात विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यामध्ये प्रारूप मतदार याद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी दावे आणि हरकती दाखल करण्याची संधी सर्वांना उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच या मतदार याद्यातील त्रुटी दाखवून देण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) मदत करण्यास राजकीय पक्षांना मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नेमण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार 1 लाख 10 हजार बीएलए नेमण्यात आले होते. या बीएलएच्या साहाय्याने मतदार यादी जास्तीत जास्त अचूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी माहिती सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना यावेळी दिली.

इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’ तर्फे रस्ता सुरक्षा अभियान

0

पुणे:

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी च्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’ तर्फे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या सहकार्याने रस्ता सुरक्षा अभियान आयोजित करण्यात आले होते. हाय टेक हॉल आझम कॅम्पस येथे जनजागृती पर कार्यक्रम झाला. संस्थेचे सचिव लतिफ मगदूम, सहसचिव इरफान शेख, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ व्ही एन जगताप , पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक उपस्थित होते.

तस्लिम कुरेशी यांनी सूत्रसंचालन केले. सबा शेख यांनी आभार मानले.

गांधीजींचे  अर्थशास्त्र खऱ्या समानतेचे :डॉ क्रांती रेडकर

0

‘भांडवलशाहीची गांधीवादी समीक्षा ‘ व्याख्यानाला चांगला प्रतिसाद

पुणे :
” गांधीजींचे  अर्थशास्त्र हे गरिबीचे अर्थशास्त्र अशी केली जाणारी  टीका  योग्य नाही ,गांधीजींचे  अर्थशास्त्र हे खऱ्या समानतेचं  होते ”  असे प्रतिपादन अभ्यासक डॉ क्रांती रेडकर यांनी केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित गांधी सप्ताह निमित्त ” भांडवलशाहीची गांधीवादी समीक्षा ” या विषयावरील  व्याख्यानात त्या बोलत होत्या .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  डॉ.कुमार सप्तर्षी (अध्यक्ष महाराष्ट्र गांधी स्मारक निधी) हे होते
कुटीर उद्योग वाढून उत्पादनाचे विकेंद्रीकरण करणे आणि मोठ्या उद्योगांशी त्यांची स्पर्धा होऊ देऊ नये, याकडे राज्य संस्थांनी लक्ष देणे गरजेचे आहे, अशी गांधीजिंची भूमिका होती,असे मत  डॉ.चैत्रा रेडकर यांनी  मांडले.आंतरराष्ट्रीय मागणीनुसार उत्पादन न करता स्थानिक गरजा आणि मागणीनुसार उत्पादन करून मग जादा उत्पादन झाल्यास निर्यात करणे हा योग्य मार्ग आहे.पूर्वी च्या जातीव्यवस्थेत मर्यादीत विकासाची शक्यता होती, वडिलोपार्जीत कौशल्य शिकून तोच धंदा करणे यात त्याचा व कुटुंबाचा विकासाला मर्यादा पडत.त्यामुळे जाती निर्मूलन होत नाही तोवर विकास होण्याची शक्यता कमी असे.
डॉ रेडकर पुढे म्हणाल्या ,’ गांधीवादी अर्थशास्त्राचा विचार हा मुख्यता त्यांच्या ग्रामोद्योग  ट्रस्टी शिप म्हणजे विश्वस्त संकल्पनेवर अधारित आहे, राज्यसंस्थांनी देशाचा कारभार हा एक प्रामाणिक विश्वस्त बनून पाहिला पाहिजे, अशी गांधींची भूमिका होती .गांधींना प्रातिनिधीक लोकशाहीची अपेक्षा व संकल्पना होती, पण आज लोकांनी प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले नेते एकदा निवडून गेले की मनाचा कारभार करतात, हम करेसो कायदा अशा तऱ्हेची नेत्यांची  दादागिरी  जनतेला सोसावी लागते. एकदा निवडून दिले की नेत्यावर जनतेचा कंट्रोल राहात नाही.ही लोकशाहीची आणि गांधीजींना अपेक्षित असलेल्या विश्वस्त संकल्पनेची मर्यादा आहे,.
गांधींबरोबर राहून सी ए असणारे अर्थ तज्ञ पी सी कुमारप्पा यांनी गांधींच्या अर्थ नितीचा, विचारांचा जवळून  अभ्यास केला, त्यावर लेखन केले.त्यांच्या मते कोणत्याही समाजाचा विकासाचा आराखडा समाज सापेक्ष असायला हवा, एकच आराखडा सर्वांना लागू करणे योग्य नाही, त्यामुळे विषमता वाढीस लागेल,असेही रेडकर म्हणाल्या
याच कार्यक्रमात  नरेश बदनोरे लिखित ‘आपले बापू’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले .प्रास्तविक अन्वर राजन यांनी केले .सूत्र संचालन संदीप बर्वे यांनी केले.

विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्हयातील 246 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

0

पुणे दि.7: विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्हयातील 246 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहिले असून सर्वाधिक पुणे कॅन्टोमेंटमध्ये 28 तर आंबेगाव मतदारसंघात सर्वाधिक कमी 6 उमेदवार निवडणुकीत आपले नशीब आजमावणार आहेतविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये पुणे जिल्हयातील 21 विधानसभा मतदार संघात 246 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण 373 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली होती, त्यापैकी 127 उमेदवारांनी माघार घेतली असून 246 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.
विधानसभा मतदार संघ निहाय निवडणूकीच्या रिंगणातील उमेदवारांची संख्या (कंसात माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या) खालीलप्रमाणे आहे.
जुन्नर -11 (1), आंबेगाव 6 (3), खेड-आळंदी -9 (4), शिरुर -10 (5), दौंड-13 (4), इंदापूर-15 (15), बारामती-10 (2), पुरंदर – 11 (5), भोर-7 (4), मावळ-7 (3), चिंचवड-11 (3), पिंपरी-18 (13), भोसरी-12 (6), वडगावशेरी-12 (5), शिवाजीनगर 13 (0), कोथरुड-11 (10), खडकवासला-7 (2), पर्वती-11 (4), हडपसर-14 (5), पुणे कॅन्टोमेंट-28 (30), कसबा पेठ-10 (3) अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.

पुणे शहर जिल्ह्यातील मतदारसंख्या व उमेदवार संख्या
अ.क्र. संघक्र. मतदारसंघ एकूण संख्या उमेदवार संख्या
1 195  जुन्नर 299648 11
2 196  आंबेगाव 283531 6
3 197  खेड आळंदी 327262 9
4 198  शिरुर 383886 10
5 199  दौंड 309168 13
6 200  इंदापूर 305579 15
7 201  बारामती 341657 10
8 202  पुरंदर 361480 11
9 203  भोर 361415 7
10 204  मावळ 348462 7
11 205  चिंचवड 518309 11
12 206  पिंपरी 353545 18
13 207  भोसरी 441125 12
14 208  वडगाव शेरी 456487 12
15 209  शिवाजीनगर 305587 13
16 210  कोथरुड 404765 11
17 211  खडकवासला 486948 7
18 212  पर्वती 354292 11
19 213  हडपसर 504044 14
20 214  पुणे कॅन्टोन्मेंट 291344 28
21 215  कसबा पेठ 290683 10
एकूण 7729217 246

विश्‍वदर्शन देवतेचा मानवतेला भक्ति आणि सेवेचा संदेश

0
श्री श्री विश्‍वेशतीर्थ स्वामीजी यांचे प्रतिपादन; श्री विश्‍वदर्शन देवता मानवता मंदिराची प्राणप्रतिष्ठापना
पुणे, ७ :- जगात आज दहशत आणि भेदभावाचे वातावरण आहे. भविष्यात या विश्वदर्शन मानवता मंदिरातून मानव कल्याण आणि विश्वशांतीसाठी भक्ति आणि सेवेचा संदेश दिला जाईल, असे प्रतिपादन कर्नाटकच्या उड्डपी येथी पेजावर मठ येथील ज्ञानमठाधिपती परमपूज्य श्री श्री विश्‍वेशतीर्थ स्वामीजी यांनी केले.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे आणि परमपूज्य श्री. श्रीकृष्ण (विश्‍वनाथ) गोपाळ कर्वे उर्फ कर्वे गुरूजी यांच्या विश्‍वकल्याण व विश्‍वशांतीच्या मानवतावादी संकल्पनेतून साकार झालेल्या “श्री विश्‍वदर्शन देवता मानवता मंदिराचा” प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी संतवृत्तीचे थोर शास्त्रज्ञ व जगप्रसिद्ध संगणक तज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू पद्मभूषण डॉ. विजय भटकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, तुळशीराम. दा. कराड, पं. वसंतराव गाडगीळ, काशीराम. दा. कराड, एमआयटी- एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे, प्रा. स्वाती कराड- चाटे, प्रा. सुनीता मंगेश कराड उपस्थित होते.
श्री श्री विश्‍वेशतीर्थ स्वामीजी म्हणाले, विश्व कल्याणाचा आणि मानवतेचा संदेश श्री कृष्ण यांनी जगाला दिला आहे. दुसऱ्याच्या सुख, दु:खात सर्वांनी सहभागी व्हावे. वाहणारे पाणी थांबल्यास त्यातून दुर्गंधी येते, तसेच भक्ति आणि प्रेमाचे आहे. प्रेम प्रवाहित होत राहिल्यास भगवंताच्या चरणातून सुगंधाचा झरा नित्य वाहत राहतो. विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. पंढरीच्या विठ्ठलाच्या प्रतिमातून आम्हाला विष्णुचे दर्शन घडते. केवळ संपत्तीसाठी लक्ष्मीची पूजा करू नका, तर नारायणाची ही पूजा ही करा. राष्ट्र रक्षणासाठी सेवेचे वृत्त सर्वांनी आंगिकारावे.
विजय भटकर म्हणाले, विश्वदर्शन देवता मंदिरातील मुर्तीच्या प्राण प्रतिष्ठा केले. याचे वर्णन वेद, पुराण आणि उपनिषेधात आहे. भारतीय संस्कृतीचे दर्शन यातून होईल. विश्वरुपाचे दर्शन कृष्णाने अर्जून आणि धृतराष्ट्र यांना दिला. त्यानंतर या मंदिरातून विश्वरुपाचे दर्शन सर्व जगाला घडेल. आध्यात्म आणि वैदिक संस्कृतीचे दर्शन याठिकाणातून संपूर्ण मानवजातीला होत राहिल.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, मानवतेच्या कल्याणासाठी या विश्वरुप दर्शन मंदिराची निर्मिती केली आहे. यातून वैश्विक भारतीय संस्कृतीचे दर्शन घडेल. हिंदु संस्कृती ही भारतीय एकतमेचे प्रतिक आहे. पुराण आणि कुराण यातून मानवतेला एका धाग्यात बांधण्याचे कार्य केले जात आहे. या मंदिरातून दिला जाणारा मानवता आणि विश्व कल्याणाचा संदेशातून दहशतवादाचे पाळेमुळे नष्ट होईल. संपूर्ण विश्व हे ज्ञान स्वरूप व चैतन्य स्वरूप आहे. प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड यांनी प्रस्ताविक केले.

बीकेटीने स्पॅनिश फूटबॉल लीग लालिगाशा केला जागतिक करार

0

तीन वर्षांच्या करारान्वये कंपनी बनली लालिगाचा अधिकृत जागतिक भागीदार

  • भारतातील व जगभरातील प्रमुख स्पोर्ट्स लीगमध्ये गुंतवणूक करणारी बीकेटी ठरला नवा भारतीय ब्रँड

मुंबई, ऑक्टोबर 7, 2019 – बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (बीकेटी)  या भारतातील आघाडीच्या ऑफ-हायवे टायर उत्पादकाने “लालिगाचा अधिकृत जागतिक भागीदार” म्हणून करार केला आहे. बीकेटीने एखाद्या खेळाप्रमाणे, कोणत्याही मर्यादांविना कामगिरी करायचे उद्दिष्ट ठेवले आहे. आणि लिगा दे फुटबॉल प्रोफेशनल (लालिगा) प्रमाणे बीकेटी जागतिक स्तरावर कार्यरत आहे. यामुळेच नव्या भागीदारीसाठी अनुकूल स्थिती निर्माण होते.

ही नवी भागीदारी तातडीने अमलात येणार आहे आणि 2021/2022 हंगामाच्या अखेरीपर्यंत, म्हणजे तीन वर्षे सुरू राहणार आहे.

लालिगा हे उत्कृष्टकतेचे प्रतिक आहे आणि कॅपिटल एफसह फूटबॉलसाठी समानार्थी आहे,” असे बीकेटीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार यांनी सांगितले. ते म्हणाले, आजपासून, आम्ही स्पॅनिश फूटबॉल विश्वामध्ये नव्या मार्केटिंग उपक्रमाचा अवलंब करणार आहोत, आणि याचा मला अतिशय आनंद व अभिमान आहे. लालिगा हा उत्कृष्ट मूल्य असणारा ब्रँड आहे. त्यासोबत काम करणे गौरवास्पद आहे.

बीकेटी आणि क्रीडा विश्व किंबहुना संपूर्ण फूटबॉल जगत यांच्यातील नाते आम्ही अधिक गहिरे करू शकतो, ही आनंदाची बाब आहे. निश्चय व जिंकण्याची ईर्षा याबरोबरच, फूटबॉल जगतातील नियम व वैशिष्ट्ये आमच्या मूल्यांसारखीच आहेत, असे आम्हाला वाटते,” असे पोद्दार यांनी नमूद केले.

ब्रँडविषयी जागृती वाढवण्यासाठी बीकेटी करत असलेल्या वाटचालीतील हे निर्णायक उद्दिष्ट आहे. कम्युनिकेशन व प्रसिद्धी यांचा विचार करता, कंपनी अत्यंत सक्रियपणे कार्यरत असून, हे कंपनीचे उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. बीकेटीचे जागतिक स्तरावरील कार्य अधोरेखित करण्यासाठी क्रीडा हे आदर्श साधन आहे. याचे श्रेय लालिगाच्या काही ठळक वैशिष्ट्यांना जाते, जसे न्याय्य खेळ, स्पर्धा, धोरण व स्पर्धकांचा आदर.

लालिगा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जोस अँटोनिओ कॅकझा यांनी सांगितले, “बीकेटीने आपल्या प्रमुख भागधारकांशी संवाद साधत असताना नेहमी खेळांची क्षमता ओळखली आहे. लालिगाप्रमाणेच मूल्य असणाऱ्या बीकेटीचे पुढील तीन वर्षांसाठी भागीदार म्हणून सहर्ष स्वागत आहे. एकत्रितपणे आम्ही लालिगाला जगभरातील चाहत्यांच्या आणखी जवळ आणू शकू, तसेच आमचा ब्रँड जागतिक स्तरावर प्रगती करत राहील, याची खात्री आहे.

बीकेटी जगभर विविध क्रीडा उपक्रमांसाठी पाठिंबा देत असताना, त्यामध्ये लालिगाचा अधिकृत जागतिक भागीदार बनण्याचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमांमध्ये, बीकेटी टायर लावलेले भव्य माँस्टर ट्रक थरारक स्टंट करतात त्या माँस्टर जॅम सर्किट या अमेरिकन मोटरस्पोर्टबरोबरचा 2014 करार; इटालियन सेकंड लीग चॅम्पिअनशिपची प्रशासकीय संघटना असणाऱ्या लेगा नाझीओनेल प्रोफेशनिस्ती बीबरोबर प्रायोजकत्व करार, जो गेल्या वर्षी करण्यात आला व जून 2021 पर्यंत लागू राहणार आहे व त्याचे नाव “सेरी बीकेटी” असे करण्यात आले आहे.

या भागीदारीविषयी, लालिगा अम्बेसिडर डिएगो फोरलान यांनी सांगितले, “भारतात फूटबॉल अतिशय लोकप्रिय आहे आणि जागतिक फूटबॉल बनण्यासाठी प्रचंड क्षमता आहे. भारतात असताना मी भारतीय फूटबॉल खेळाडूंशी, इच्छुक खेळाडूंशी व देशात फूटबॉलसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी गुंतवणूक केलेल्या अन्य संबंधित घटकांशी संवाद साधला. अधिक जागृती करण्यासाठी बीकेटीसारखा भारतीय ब्रँड लालिगाशी सहयोग करत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे.”

याबरोबरच, बीकेटीने जून 2024 पर्यंत फ्रेंच “कूप दे ला लिग बीकेटी” ही फूटबॉल स्पर्धाही प्रायोजित केली आहे, तसेच केएफसी बिग बॅश लीगसह ऑस्ट्रेलियन क्रिकेट चॅम्पिअनशिपबरोबरही भागीदारी केली आहे आणि ही भागीदारी आणखी दोन वर्षांसाठी आहे.

स्थानिक स्तरावर, बीकेटीसाठी स्पेन ही मोक्याची व प्रामुख्याने शेती क्षेत्रातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. विविध विशेष क्षेत्रांत वापरले जाणारे टायर बीकेटी उपलब्ध करते. तरीही, बीकेटीने सुरुवात शेती क्षेत्रापासून केली, आणि कंपनीने हे क्षेत्र खरेच गाजवले आहे.बीकेटी ब्रँड प्रामुख्याने स्पॅनिश युजर्समध्ये लोकप्रिय आहे. युजर्स व ब्रँड यांच्यातील नाते अधिक घट्ट करण्याची ही योग्य वेळ आहे. त्यासाठी खेळापेक्षा चांगला पर्याय दुसरा असू शकतो का?

पाण्यासाठी महिलांचा महापालिकेच्या आवारातच मोकळ्या हंड्यांनी गरबा

0

पुणे : दसऱ्याचा सण तोंडावर असताना घरात पाण्याचा थेंबही नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही गेल्या दीड वर्षांपासून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याचा निषेध म्हणून बोपोडीतील महिलांनी सोमवारी महापालिकेवर हंडामोर्चा काढत पालिकेच्या आवारात मोकळ्या हंड्यानी दांडिया खेळला. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी तातडीने पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी हा हंडामोर्चा थांबवला. आचारसंहितेमुळे महापालिका प्रशासनाचे नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्याचाच फटका नागरिकांना बसत असून अनेक रस्त्यांना खड्डे पडलेत, तर अनेक भागात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी बोपोडीतील महिलांनी थेट महापालिकेवर हल्लाबोल केला.

बोपोडी प्रभाग क्रमांक आठमध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. अनेकांच्या नळांना पाणी येत नाही. आले तरी अतिशय कमी दाबाने येते. सणासुदीच्या काळातही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाला ही बाब लक्षात आणून देण्यासाठी, तसेच हक्काचे पाणी लवकर मिळावे, या मागणीसाठी स्थानिक नगरसेविका सुनीता वाडेकर यांच्या नेतृत्वात जवळपास १०० महिलांनी पालिकेवर हंडा मोर्चा नेला. तिथे महात्मा फुले पुतळ्याजवळ घेर करत मोकळ्या हंड्यानी दांडिया खेळला. पालिकेच्या पायऱ्यांवर बसून प्रशासनाविरोधात घोषणा देत पाणी देण्याची मागणी केली. सामाजिक कार्यकर्ते परशुराम वाडेकर, नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे आदी उपस्थित होते.

आयुक्त सौरभ राव यांनी याची दखल घेत सुनीता वाडेकर व शिष्टमंडळाला बोलावून घेतले. त्यांच्याशी चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून याबाबत जाब विचारला. एक दिवसात पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. एसएनडीटी व चतुःशृंगी जलकेंद्रातून पाणी देण्याचा, तसेच दोन पम्पिंग करण्याच्या सूचना त्यानी दिल्या. एक-दोन दिवसात पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर महिलांनी आपले हंडा दांडिया आंदोलन थांबवले.

पुणेकरांना -पाणीकपातीसह करोडोचा फटका ;गजब सरकारची अजब कहाणी

0
पुणे-पाटबंधारे खाते आणि पुणे महापालिका यांच्यातील पाणी पाणीपुरवठा संदर्भातला करार संपून आठ महिने उलटले ,पण पाटबंधारे खात्याने नव्या करारनाम्याचा मसुदा बनविला नाही म्हणून पुणेकरांना पुन्हा २०१३ च्या करारनाम्यानुसारच साडेअकरा टीएमसी पाणी मिळते आणि मिळेल आणि त्यावर उचललेल्या पाण्याबाबत दंड लावून पाटबंधारेखाते  महापालिकेच्या तिजोरीतून तो वसूल करीत असल्याची माहिती उजेडात आली आहे.खुद्द महापालिका आयुक्त सौरव राव आणि महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी स्थायी समिती पुढे सादर केलेल्या मागील महिन्याच्या प्रस्तावावातून हि बाब उघड झाली आहे . यावर कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी कडाडून टीका केली आहे .दरम्यान सध्या आणि यापुढे काही काळ पुण्याला अधिकृतपणे पाटबंधारेखाते महापालिकेला  साडे अकरा टीएमसी एवढेच पाणी देईल हे स्पष्ट झाले असून महापालिकेने २०१७ -२०१८ मध्येच 17.95 तर २०१८-२०१९ मध्ये साडेसतरा टीएमसी पाणी उचलून त्याबाबत अनुक्रमे २८ कोटी आणि ४७ कोटी रुपये पाटबंधारे खात्याला अदा केल्याचे या प्रस्तावात मुख्य अभियंता यांनी म्हटले आहे.
गेल्या महिन्यात महापालिका आयुक्तांनी याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती पुढे ठेवला आहे. जुन्या करारनाम्याचे नूतनीकरण करणे आणि नवा करारनामा करण्यासाठी मसुदा मान्य करणे यासाठी महापालिका आयुक्तांना अधिकार प्रदान करावेत यासाठी हा प्रस्ताव दिला आहे . .या प्रस्तावात असे म्हटले आहे कि, 31 मार्च २०१३ ते २८ फेब्रूवार २०१९ या कालावधी साठी पूर्वी पाटबंधारे खात्याशी महापालिकेने करार केला होता .तो संपल्यानंतर पाटबंधारे ने नव्या करार नाम्याचा मसुदा करून सदर करावा आणि महापालिकेने वाटर बजेट करून सादर करने आणि नवा करार करणे अपेक्षित होते . महापालिकेने वाटर बजेट पाट बंधारे ला सादर तर केले पण पाटबंधारे ने मसुदा बनविला नाही . आणि नवा करारनामा केलेला नसताना महापालिकेने पाणी उचलले म्हणून पाटबंधारे दंडनीय दराने पाणी बिल आकारत आहे .तर दुसरीकडे जलप्राधिकरणानेनवीन कारनामा मसुदा आणि वाढीव पाणी कोटा मंजूर होईपर्यंत जुना करारनामा साडेअकरा टीएमसी कोट्याप्रमाणे नूतनीकरण करवून घ्यावा असे सुचविले आहे .
सबब स्थितीत जलसंपदा आणि महापालिका यांच्यातील जुन्या कराराचे नुतनीकरण करणे आणि नव्या करारासाठी मसुदा मान्य करणे यासाठी आयुक्तांना अधिकार देण्यात यावेत असे आयुक्तांनी या प्रस्तावात म्हटले आहे .
तर प्रस्तावासोबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी आपली टिपणी सोबत जोडली आहे . त्यात असे म्हटले आहे कि  आता करारनाम्याची मुदत 1 सप्टेंबर २०१९ पासून ६ वर्षांची आहे साडेअकरा टीएमसी पाणी ,त्यावर पाणी वापरल्यास दंड म्हणजे दुप्पट दराने आकारणी अशा महत्वाच्या अटी आहेत .तथापि पुण्याला  पाण्याची यापेक्षा वाढीव गरज असून त्यानुसार वाडीव कोट्यासाठी वाटर बजेट महापालिकेने जलसंपदा विभागाला सादर केले आहे . महापालिकेने २०१७ -२०१८ मध्येच 17.95 तर २०१८-२०१९ मध्ये साडेसतरा टीएमसी पाणी उचलून त्याबाबत अनुक्रमे २८ कोटी आणि ४७ कोटी रुपये पाटबंधारे खात्याला अदा केल्याचे  मुख्य अभियंता यांनी म्हटले आहे.
या साऱ्या प्रकरणातून पुण्याला अधिकृत रित्या पाणी कमी मिळणे , आणि त्यापुढे पाणी दंडाची आकारणी करून मिळणे हा प्रत्यक्षात ला फटका पुणेकरांना बसत असून यास राज्य सरकार सह महापालिका खऱ्या अर्थाने दोषी आहे असे अरविंद शिंदे यांनी म्हटले आहे . पुण्याच्या लगतच्या ५ किमी हद्दीला पाणी देणे महापालिकेला शासनाने बंधनकारक केलेलं आहे. शिवाय वर्षानुवर्षे महापालिकेची हद्द वाढते आहे ,लोकसंख्या वाढते आहे आणि पाण्याचे जुनेच करार नामे नुतनीकरण करण्यासाठी देखील टाळाटाळ चालविली आहे तर हे कधी नवा वाढीव पाणी कोटा मंजूर करणार आणि कधी नवा करारनामा करणार ? तोपर्यंत पुणेकरांची अशीच फरफट चालू राहणार काय ? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत .

स्टैम्प पेपर वर लिहून देणाऱ्या बंडोबांचे ही बंड झाले ठंड

0

पुणे : स्टैम्प पेपर वर लिहून देवू काय, माघार घेणार नाही म्हणणाऱ्या सेनेच्या रमेश कोंडे सह 5 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख बंडखोरांनी सोमवारी माघार घेतली. त्यामुळे पुण्यात भाजप- शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी, अशी सरळ लढत होणार आहे.

पर्वती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल, कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी जावळे, भाजपच्या अनुसूचित जाती जमाती सेलचे शहराध्यक्ष डॉ. भरत वैरागे, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सदानंद शेट्टी, खडकवासला मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, कसबा मतदारसंघातून माजी महापौर आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या कमल व्यवहारे, वडगाव शेरी मतदारसंघातून नगरसेवक संजय भोसले यांनी रिंगणातून माघार घेतली आहे.

बंडखोरी करणारे अनेक जण नगरसेवक होते, तसेच निवडणूक जिंकण्याचाचा त्यांनी निर्धार केला होता. परंतु, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या शहर पातळीवरील नेत्यांनी यामध्ये हस्तक्षेप केला आणि या बंडखोरांची समजूत घातली, त्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेण्यात आले आहेत.

काँग्रेसच्या सर्व बंडखोरांना थंड करण्यात पक्षाला यश आले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये एकही प्रमुख बंडखोर आता रिंगणात उरला नाही. कॉंग्रेसचे उमेदवार असणाऱ्या तीनही मतदारसंघात भाजपशी थेट लढत होईल. तसेच, भोर विधानसभा मतदारसंघात भाजपचे किरण दगडे यांनाही माघार घेतली आहे.

कसबा मतदारसंघात भाजपकडून मुक्ता टिळक विरोधात काँग्रेसचे अरविंद शिंदे निवडणूक लढवणार.शिवसेनेचे विशाल धनवडे यांची  बंडखोरी कायम ..
– शिवाजीनगर मतदारसंघात भाजपकडून माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे याच्या विरोधात काँग्रेसकडून दत्ता बहिरट निवडणूक लढवत आहेत…
– कोथरुडमध्ये यावेळी रंगत निर्माण होईल असे वाटत असताना अनेक उमेदवारांनी घेतली माघार.येथे चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरोधात मनसेच्या किशोर शिंदे यांच्यात लढत असेल
– खडकवासला मतदारसंघात भाजपकडून भीमराव तापकीर याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सचिन दोडके निवडणूक रिंगणात आहेत.

– हडपसर मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होते.भाजपकडून योगेश टिळेकर तर राष्ट्रवादीकडून चेतन तुपे यांच्यात लढत तर मनसेकडून वसंत मोरे निवडणूक लढत आहेत.
– कॅन्टोमेन्ट विधानसभा मतदारसंघात काँग्रेस रमेश बागवे यांच्या विरोधात भाजपकडून सुनील कांबळे तर इकडून यांच्यात थेट लढत
– पर्वती मतदारसंघात काँग्रेस बंडखोर आबा बागुल यांनी माघार घेतल्याने भाजपच्या माधुरी मिसाळ व राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांच्यात सरळ लढत होते.
– वडगावशेरी मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी यांच्यात सरळ लढत होते.भाजपकडून जगदीश मुळीक तर राष्ट्रवादीकडून सुनील टिंगरे निवडणूक लढवत आहेत.

  • पुणे ग्रामीण विधानसभा चित्र स्पष्ट

इंदापूरमध्ये यावेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील यांची लढत दत्ता मामा भरणे यांच्यात दुरंगी लढत होणार.
बारामतीत राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या विरोधात भाजपकडून गोपीचंद पडळकर निवडणूक लढवत आहेत.
दौंडमध्ये भाजपकडून राहुल कुल निवडणूक लढवत आहेत तर त्याच्या विरोधात राष्ट्रवादीकडून रमेश थोरात निवडणूक रिंगणात आहेत.
– यावेळी पुरंदरमध्ये लक्षवेधी लढत होणार आहे.लोकसभा निवडणूक वेळी अजित पवार यांनी विजय शिवतारे यांना कसे निवडून येतो अशी धमकी दिली.त्यामुळे शिवसेनेकडून विजय शिवतारे विरोधात काँग्रेसकडून संजय जगताप निवडणूक लढवत आहेत.
भोर वेल्हा मुळशी मतदारसंघात काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांच्या विरोधात शिवसेनेकडून कुलदीप कोंडे निवडणूक रिंगणात आहेत.
मावळ मतदारसंघात यावेळी चुरशीची लढत आहे.ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या सुनील शेळके यांची लढत भाजप राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्यात लढत होणार आहे.
खेड आळंदी राष्ट्रवादीकडून दिलीप मोहिते याच्या विरोधात शिवसेनेकडून सुरेश गोरे निवडणूक लढवत आहेत.
– जुन्नर मतदारसंघात  राष्ट्रवादीकडून अतुल बेनके निवडणूक लढवत आहेत.तर त्याच्या विरोधात शिवसेनेकडून शरद सोनवणे उभे आहेत.
– शिरूर हवेली मतदारसंघात भाजपचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून अशोक पवार निवडणूक लढवत आहेत.इथल्या राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप कंद यांनी भाजपला पाठींबा दिल्याने रंगत निर्माण झालीय.
– आंबेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात शिवसेनेचे राजाराम बाणखेले निवडणूक रिंगणात आहेत.आहेत.

सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारात शिवसैनिकांचा लक्षणीय सहभाग

0

पुणे: भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (A), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे शिवाजीनगर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना या  विधानसभा निवडणुकीत बहुमताने निवडून देण्यासाठी आता शिवसैनिकही सज्ज झाले आहेत. आज शिवाजीनगर गावठाण येथे झालेल्या प्रचारफेरी दरम्यान शिवसैनिकांनी एकत्र येत सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारामध्ये मध्ये सक्रीय सहभाग घेतला. आज सायंकाळी पुन्हा एकदा या भागातील शिवसैनिकांची बैठक होणार असून दोन्ही पक्षाच्या केंद्रीय व राज्यातील नेतृत्वाच्या आदेशानुसार आम्ही कामाला लागलो असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.

आज शिवाजीनगर मतदार संघातील शिवाजीनगर गावठाण येथे सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कामगार पुतळा, तोफखान, राजीव गांधी वसाहत, शिवाजीनगर गावठाण, जंगली महाराज रोड, साई पेट्रोल पंप, पुलाची वाडी या ठिकाणी सिद्धार्थ शिरोळे यांनी भेटी देत हा संपूर्ण परिसर पिंजून काढला. याबरोबरच महायुतीच्या कार्यकर्त्याबरोबर स्थानिकांच्या भेटीही घेतल्या.

सकाळपासूनच प्रचारफेरीमुळे शिवाजीनगर गावठाण भागात उत्साहाचे वातावरण होते. महिला आणि युवा वर्ग देखील यामध्ये बहुसंख्येने सहभागी झाला होता. तरुण आणि विचारी व्यक्तीमत्त्व असलेल्या सिद्धार्थ शिरोळे यांनी यावेळी अनेक विषयांवर मतदारांशी संवाद साधला. मतदारांनी देखील आपल्या अपेक्षा त्यांच्यासमोर मांडल्या. यावेळी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, नीलिमा खाडे, स्वाती लोखंडे, भावना शेळके, भाजप शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, शैलेश बडदे, शकील सय्यद, मंगेश खेडेकर, राहुल शिरोळे, राहुल सांडभोर, चंद्रजितसिंग शहाणी, तानाजीराव शिरोळे, प्रमोद शिरोळे, दिलीप घुले, मयूर शिरोळे, श्रीकांत वझे, सुनील सांडभोर, अरविंद परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आशिष कांटे यांची माघार-चंद्रकांत दादा पाटील यांना पाठिंबा

0

 

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आशिष कांटे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेत, विकासाच्या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य आघाडीवर राहण्यासाठी भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार  चंद्रकांत दादा पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

आशिष कांटे यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान  नरेंद्र मोदी आणि राज्याचे तरुण तडफदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन, तसेच विकासाच्या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य अग्रेसर राहण्यासाठी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन भारतीय जनता पक्ष, शिवसेना महायुतीचे उमेदवार . चंद्रकांत दादा पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.

यावेळी  आशिष कांटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील .कांटे यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देत पक्षात स्वागत केले.

कांटे यांच्या पक्ष प्रवेशाबद़दल बोलताना श्री. पाटील म्हणाले की, “देशाचे लोकप्रिय तथा कर्तव्यदक्ष पंतप्रधान  नरेंद्र मोदी आणि राज्याचे तरुण तडफदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीने प्रभावीत होऊन अनेक तरुण भारतीय जनता पक्षात सक्रिय काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यानुसार आशिष कांटे यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पक्षात स्वागत करतो.”

चंद्रकांत दादा यांनी शस्त्र पूजन करून जोपासली संघ परंपरा

0

पुणे : निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संभाजी भागाच्या वतीने आयोजित शस्त्र पूजन कार्यक्रमाला, कोथरूड मतदारसंघातील उमेदवार व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी संघाच्या गणवेशात एन्ट्री करत शस्त्रपूजन करून संघ परंपरा जोपासली.

चंद्रकांतदादा यांनी विशेष उपस्थिती लावत संघ गणवेशात पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजन करून संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय समरसता गतीविधी मंडळ सदस्य रमेश आढाव, रमेश पांडव, सुधीर जवळेकर ,संदीप खरडेकर, मुरलीधर माहोळ तसेच संभाजी भाग कार्यवाहक उपस्थित होते.

आठवणींना मिळाला उजाळा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांचा अतिशय प्रामाणिक सेवक म्हणून चंद्रकांत दादा पाटील यांचा लौकिक आहे. त्याचीच प्रचिती आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा पहायला मिळाली. कोथरूडमध्ये एमआयटी संस्थेच्या मैदानावर विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव संपन्न झाला. या कार्यक्रमात चंद्रकांतदादा   शिस्तबद्ध स्वयंसेवकाप्रमाणे सहभागी होताना पाहून, अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण, पुण्यात  पाटील यांनी संघाचे काम केले आहे. तीन दशकांहून अधिक काळ पुण्यातील कार्य वाटचालीतील आठवणींना या वेळी उजाळा देण्यात आला.

विजयादशमी हा अवघ्या भारतवर्षांचा मोठा उत्सव. १९२५ मध्ये विजयादशमीच्याच दिवशी केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे हा दिवस संघस्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. विजयादशमीच्या दिवशी शस्त्र पूजनाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरोघरी तसेच सार्वजनिकरित्या शक्तीरूपी दुर्गा, कालीमाता यांच्या पूजेसोबत शस्त्रांचे पूजन करण्याची परंपरा हिंदू धर्मात आहे. हा उत्सव देशाचे सरंक्षण व कायद्याचे रक्षण या कामात शस्त्रांचे वापर करणाऱ्याकरिता विशेष आहे. संकटसमयी शस्त्र आपल्या प्राणांचे रक्षण करतात या विश्‍वासाने शस्त्रांचे पूजन केले जाते.

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या समुहनृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न

0

पुणे : शिवरायांचा इतिहासापासून प्रचलित असणारे पोवाडे, भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील विविध प्रेरणादायी गाणी आणि सध्याच्या प्रसिद्ध गाण्यांवर दिव्यांग मुलांनी ठेका धरत आपले नृत्य कौशल्य पुणेकरांना दाखवले. सर्वसामान्य मुलांप्रमाणे दिव्यांग मुलांना गाता यावे, नाचता यावे, त्यांना आपल्या सुप्त गुणांना समाजासमोर प्रकट करता यावे त्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पूना वेस्टच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मतिमंद गटासाठी समूहनृत्य स्पधेचे आयोजन करण्यात आले होते.

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल या करिता लायन्स क्लब तर्फे दरवर्षी या समूहनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी स्पर्धेत एकूण १६ शाळा व कार्यशाळा सहभागी झाल्या होत्या. अस्मिता ठकार व श्रेया ठकार हे या स्पर्धेचे परीक्षक होते. या कार्यक्रमास मालती भामरे, अभय शास्त्री, डॉ. संजय चोरडीया, प्रतिभा भगत, अल्पेश गुजराथी, योगेश कदम, स्पर्धा प्रमुख सीमा दाबके उपस्थित होत्या. सूत्रसंचालन पल्लवी देशमुख यांनी केले तर आभार मृदूला केळकर यांनी मानले.

स्पर्धेचा निकाल:

शाळा गट –

प्रथम क्रमांक – कामायनी निगडी, द्वितीय – सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालय, पिंपळे जगताप, तालूका शिरूर, तृतीय क्रमांक – कामायनी गोखलेनगर, चतूर्थ क्रमांक – ज.र. तरटे मुक्तशाळा, उत्तेजनार्थ – ओम साई पुनर्वसन केंद्र व सेवासदन दिलासा केंद्र

कार्यशाळा गट –

प्रथम क्रमांक – ओम साई पुनर्वसन केंद्र, द्वितीय – कामायनी गोखलेनगर, तृतीय – जीवनजयोत शेल्टर वर्कशॉप