तुकोबांवरील नाट्याने चढवला नवरात्र महोत्सवाला कळस
सिद्धार्थ शिरोळे यांचा विजयादशमी संचालनात सहभाग
चित्तरंजन वाटिका, अय्यंगार योगा इऩ्स्टीट्यूट, रेंज हिल आदी ठिकाणी घेतल्या नागरिकांच्या भेटीगाठी
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त शहरात मंगळवारी झालेल्या संचलनात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (A), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे शिवाजीनगर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी देखील सहभाग घेतला. पुणे महानगराच्या विद्यापीठ भागातील शिवाजीनगर परिसर आयोजित संचालनात सिद्धार्थ शिरोळे हे पूर्ण गणवेषासह सहभागी झाले होते.

दस-याच्या दिवशी सकाळी सात वाजता तानाजी वाडी येथील खाशाबा जाधव शाळेपासून संचलनाला सुरुवात झाली. शिवाजी बसस्थानक, इराणी वस्ती, पीएमसी कॉलनी, मुंबई पुणे महामार्ग या मागावरून पार पडलेल्या या संचलनात तब्बल २५० स्वयंसेवक सहभागी झाले होते. नगराचे संघचालक डॉ. अविनाश वाचासुंदर, अनिल शिरोळे, विद्यापीठ भागाचे सहकार्यवाह संजय एडके, जनता सहकारी बँकेचे संचालक बीरू खोमणे, सुभाष जेऊर, दिलीप पळशीकर, राहुल भोर, सुधीर आल्हाट आदी देखील या वेळी सहभागी झाले होते.
विजयदशमीच्या निमित्ताने लॉ कॉलेज रस्त्यावरील भांडारकर प्राच्च विद्या संशोधन मंदिराच्या आवारात सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले. नगरसेवक आदित्य माळवे, अशोक येनपुरे, योगेश बाचल, रवींद्र साळेगावकर, संदीप काळे, गणेश बगाडे व शैलेश बडदे आदी या वेळी उपस्थित होते. याशिवाय आज मॉडेल कॉलनी परिसरातील रमामणि अय्यंगार मेमोरियल योग इऩ्स्टीट्यूट आणि चित्तरंजन वाटिका या ठिकाणी देखील शिरोळे यांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या. आज खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रेंज हिल भागातील प्रभाग ५ आणि ६ ठिकाणी देखील आज सिद्धार्थ शिरोळे यांची प्रचारफेरी पार पडली. या भागातील नागरिकांनी उत्साहाने सिद्धार्थ शिरोळे यांना औक्षण करीत त्यांचे स्वागत केले. उपस्थित नागरिकांनी आपल्या अपेक्षा यावेळी सिद्धार्थ शिरोळे यांना सांगितल्या. नगरसेविका कार्तिकी हिवरकर यांच्या बरोबर विशाल पिल्ले, मुकेश गवळी, बंडू कदम, सुरेंद्र भाटी, श्याम काची, अमर देशपांडे, संजय फेणसे आदी या प्रचारफेरी वेळी उपस्थित होते.
जनता दरबार हवा कि वाडा – आ. योगेश टिळेकरांचा सवाल (व्हिडिओ)
कोथरुडकरांचं भाग्य; चंद्रकांत दादांमुळे विकासाचे प्रश्न मार्गी लागतील!
पती भाजपत, तर पत्नी राष्ट्रवादीत- लोकांसमोर विरोधक- घरात मात्र घरोबा , वाह…रे मिलीभगत …
पुणे – पती एका पक्षात तर पत्नी दुसर्या. ते घरात गुण्यागोविंदाने आणि लोकांसमोर कट्टर विरोधक असलेले हे दांपत्य आपआपल्या पक्षांचा प्रचार करत आहेत. मात्र त्यांच्या या पॉलिटिकल ड्राम्यामुळे एकूणच राजकारणात सर्व पक्षियांची आतल्या दालनात ‘आम्ही सारे भाऊ भाऊ: भूमिका ठेवून मतदारांना कसे बनविले जाते याचे उदाहरण च या दांपत्याने समोर ठेवले आहे. आता एवढे सारे दिसून पाहुन समजून मतदार च :हमने कुछ देखा नही , कुछ सुना नही ‘ची भूमिका ठेवणार असतील तर ..काय करणार कोण?
पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीने भाजप प्रवेश करून भाजप उमेदवाराचा प्रचार सुरू केला. तर नगरसेविकेनेही राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे. मात्र त्यांनी हे राजकारण आपल्या घरात आणलेले नाही. त्यामुळे दिवसभर एकमेकांना जाहीरपणे शिव्या देणारे हे जोडपे राजकारण घराबाहेर ठेऊन गुण्यागोविंदाने जगत आहेत. आहे की नाही मजा, दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये… याच धोरणाने सर्व राजकीय पक्षांच्या खेळी चालू असतात असे दावे अनेकदा होतात त्याची खुले आम कबूली या प्रकाराने दर्शविली आहे.
त्यावेळी बाळासाहेबांवर खटला का दाखल केला?, उद्धव ठाकरेंचा पवारांना सवाल
मुंबई – मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना दसरा मेळाव्यात शरद पवार आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अजित पवारांचा हवाला देत त्यांनी शरद पवारांवरही टीकास्त्र सोडलं आहे. शरद पवारांना उद्देशून ते म्हणाले, 2000साली जे तुम्ही करत होतात, त्यावेळी का महाराष्ट्र धगधगता ठेवला होतात. शिवसेनाप्रमुखांना अटक झाली, लोकांची धावपळ झाली. 1992-93ला बाबरी कुठे पाडली, पण शिवसेनाप्रमुखांना इथे अटक करण्यात आली. त्यावेळी शरद पवारांच्या हाती सत्ता होती, तरीही बाळासाहेबांवर खटला का दाखल केला?, असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि पवारांना विचारला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाला शिवसेनेच्या थीम साँगने सुरुवात झाली. भाषणाच्या अगदी सुरुवातीलाच त्यांनी विधानसभेवर भगवा फडकवणार असा दावा केला. सोबतच, या एकाच महिन्यात दोन विजयादशमी साजऱ्या केल्या जाणार आहेत. एक विजयादशमी दसऱ्याला साजरी होत आहे. आणि दुसरी विजयादशमी आता 24 ऑक्टोबरला साजरी करू असे उद्धव म्हणाले आहेत. विशेष म्हणजे, 24 तारखेला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादी विलीनीकरण होईल: सुशीलकुमार शिंदे
शरद पवारांना माझ्या विरोधात साधा उमेदवार देता आला नाही -चंद्रकांत दादा
कोल्हापूर -राधानगरी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील राधानगरी तुरंबे या ठिकाणी आले होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं.
मला कोथरुडमध्ये अडकवून ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना साधा उमेदवार देता आला नाही त्यावरुन त्यांच्या पक्षांची ताकद किती उरली आहे ते कळून येतं” असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ” मी कोथरुडमधून निवडून येणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही” असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.विधानसभा निवडणुकीनंतर राजकारण आणि समाजकारण यातून शरद पवार यांना कायमची निवृत्ती देणार असं वक्तव्य देखील चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. कोल्हापुरात झालेल्या सभेत ते बोलत होते
राधानगरी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील राधानगरी तुरंबे या ठिकाणी आले होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव ईडीने शिखर बँक घोटाळ्यात घेतले होते. ज्यानंतर शरद पवार यांनी स्वतःच ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन आणि ईडीने येऊ नका सांगितल्याने मी जाणार नाही असा निर्णय शरद पवार यांनी घेतला. त्यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार यांनी ईडीच्या प्रकरणाचा इव्हेंट केला अशी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावर शरद पवार यांना विचारलं असता ज्या माणसाने निवडणूकही लढवली नाही त्याच्याबद्दल काय बोलणार असा टोला लगावला होता.
दरम्यान आज चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात बोलताना शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांना राजकारणातून आणि समाजकारणातून कायमची विश्रांती देणार असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
फडणवीस सरकार घालविण्याशिवाय महाराष्ट्राला गत्यंतर नाही -रुपाली चाकणकर,अश्विनी कदम (व्हिडीओ)
महात्मा फुलेंची पगडी घालूनच कॉंग्रेस उमेदवार अरविंद शिंदे यांच्या पदयात्रांना प्रारंभ
पुणे:- कॉंग्रेस ,राष्ट्रवादी कॉंग्रेस रिपब्लिकन पक्ष(कवाडे गट) आघाडीचे एकजुटीचे दर्शन
घडवीत कसबा विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार अरविंद शिंदे यांच्या
पदयात्रांचा प्रारंभ आज (बुधवारी ) करण्यात आला.
गंज पेठेतील महात्मा जोतीबा फुले वाड्यातील महात्मा फुले,आणि
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे
आणि अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यांत आला. त्यानंतर पदयात्रेला प्रारंभ
झाला.ज्येष्ठ कार्यकर्ते ,युवक कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी
झाल्या होत्या .कॉंग्रेस आणि राष्ट्र्वादी कॉंग्रेस आणि मित्रपक्षांच्या जिंदाबाद च्या घोषणा
देण्यांत आल्या. ही पदयात्रा महात्मा फुले स्मारक ,गंज पेठ लोहियानगर ,मनपा कॉलनी
क्र.७,८,९ या परिसरातून काढण्यात आली .यामध्ये,प्रा. विकास देशपांडे,अविनाश बागवे ,रवींद्र धंगेकर,
लता राजगुरू,अजित दरेकर ,वनराज आंदेकर ,वीरेंद्र किराड, हाजी नदाफ, बंडूआण्णा
आंदेकर,उदयकांत आंदेकर,मिलिंद काची, रफिक शेख,बाळासाहेब अमराळे, बाळासाहेब
दाभेकर,विशाल मलके, प्रकाश पवार,द.स.पोळेकर,गणेश नलवाडे,फिरोज शेख , अजय
दराडे,शांतीलाल मिसाळ,सुमित डांगी,रमेश साठे,रोहन पायगुडे ,रवी पाटोळे,हेरॉल्ड
मेस्सी,झुबेर दिल्लीवाला,आयुब पठाण, ऋषिकेश वीरकर,विशाल मोरे,विजय खालटे,मारुती
पाटोळे,सचिन नवघडे,किरण कद्रे, तसेच बेबी युसुफ सय्यद,मीरा शिंदे,शिल्पा भोसले,चांदबी
शेख,अनिता शिंदे,उमा गुंजाळ,आदी सहभागी झाले होते.
मातंग समाजाच्यावतीने रवी पाटोळे,जनार्दन पेटाडे,रमेश साठे,मारुती
पाटोळे यांनी वीर लहुजी वस्ताद साळवे यांची पगडी आणि घोंगडी देऊन अरविंद शिंदे
यांचे स्वागत केले.
जगाच्या कल्याणासाठी युद्धाची नव्हे तर बुद्धांची गरज आहे – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
समाजमनातून हिंसा ;अहंकार काढून टाकल्यास मॉबलिंचिंगसारखे प्रकार पुन्हा होणार नाहीत.
मुंबई- प्रत्येकाला माणसाला जगण्याचा अधिकार आहे हे मान्य करून इतरांशी स्नेह;प्रेम; शांती;समता ; आणि अहिंसा या बुद्ध तत्वज्ञानाने दिलेल्या जीवनमूल्यांचा स्वीकार करून वागल्यास कोणीही सूडबुद्धीने हल्ले करणार नाही. समाजमनातून हिंसा आणि अहंकार मिटविल्यास मॉबलिंचिंग सारख्या हिंसक घटना घडणार नाहीत. भारताला अधिक शक्तीशाली होण्यासाठी बुद्धांच्या शांती आणि अहिंसेच्या विचारांची गरज आहे. जगाच्या कल्याणासाठी युद्धाची नव्हे तर बुद्धांची गरज आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
माता रमाबाई आंबेडकर नगर येथील शाहिद स्मारक येथे आयोजित 63 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित धम्मसंमेलनात रामदास आठवले बोलत होते. यावेळी बौद्ध भिक्खू संघाला ना.रामदास आठवले यांच्या हस्ते चिवरदान करण्यात आले. यावेळी पूज्य भन्ते डॉ राहुल बोधी महाथेरो यांच्यासह भिक्खू संघ उपस्थित होते. राज्यमंत्री ना अविनाश महातेकर; गौतम सोनवणे; रिपाइं डी. एम चव्हाण;बाळासाहेब गरुड; काकासाहेब खंबाळकर; आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
तथागत भगवान बुद्धांनी जगाच्या कल्याणासाठी बौद्ध धम्म दिला आहे. बौद्ध धम्म हा अखिल मानवजातीसाठी आदर्श जीवनमार्ग आहे. बौद्ध धम्म शांतताप्रिय ; समतावादी; वैज्ञानिक दृष्टिकोन देणारा परिवर्तनवादी बौद्ध धम्म आहे. सम्राट अशोकाने बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मचक्र प्रवर्तित केले. त्यानंतर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मचक्र प्रवर्तित केले. बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात धम्मक्रांती घडविली. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली याचा आम्हाला अभिमान आहे असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.
नुकताच अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला आहे असे सांगत जगाला बुद्धांच्या विचारांची गरज असल्याचे महत्व सांगितले होते याची आठवण करून देत रामदास आठवले यांनी केवळ भारताच्या प्रगती साठी नव्हे तर संपूर्ण जगाच्या हितासाठी बुद्धांनी दिलेला अहिंसा आणि शांती चा विचार आवश्यक आहे असे मत मांडत 63 व्या धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या
मतदान केंद्रांवर उपलब्ध सोयी-सुविधांचा घेतला आढावा
पुणे, दि. 8 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या. सर्व मतदान केंद्रावर वीज, दिव्यांगासाठी व्हील चेअर, रॅम्प, पाणी , स्वच्छतागृह इत्यादी किमान सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आणि दिव्यांगांना मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी मतदान केंद्र तळमजल्यावर आणण्यात येणार असून त्यासाठी तात्पुरत्या मतदान केंद्राची उभारणी 15 ऑक्टोबरपर्यंत करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी राम यांनी सर्वप्रथम हडपसर येथील श्रीमती लक्ष्मीबाई मगर प्राथमिक विद्यालयात उभारणी सुरू असलेल्या तात्पुरत्या मतदान केंद्राची पाहणी केली. त्यानंतर मनपा शाळा क्रमांक 100 बंटर शाळा गाडीतळ हडपसर, महात्मा फुले माध्यमिक विद्यालय येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रावरील पिण्याच्या पाण्याची सुविधा, संपर्काचे साधन, दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, रॅम्पची सुविधा यासह इतर बाबींचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. सर्व मतदान केंद्रावर वीज, रॅम्प, दिव्यांगासाठी व्हील चेअर, पाणी , स्वच्छतागृह इत्यादी किमान सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले.
ट्रम्प यांनी तुर्कस्तानला धमकी दिली- ‘आम्ही तुम्हाला उध्वस्त करू’
वॉशिंग्टन: वादग्रस्त निर्णय आणि वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांनी यावेळी थेट धमकीच दिली आहे. ट्रम्प यांनी तुर्कस्तानला धमकी दिली
घ्या, १६ किलो सोन्याची साडी नेसलेल्या महालक्ष्मीचे दर्शन (व्हीडीओ)
पुणे : सारसबागेसमोर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला मंदिर प्रशासनाकडून दस-यानिमित्त सोन्याची साडी अर्पण करण्यात आली. शुद्ध सोन्यात बनवलेली सुमारे १६ किलो वजनाची ही साडी आहे. वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांनी मोठी गर्दी केली.
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग च्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी ही साडी नेसविण्यात येते. यावेळी मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, रमेश पाटोदिया, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रविण चोरबेले आदी मान्यवर उपस्थित होते.
राजकुमार अग्रवाल म्हणाले, दक्षिण भारतातील कारागिरांनी ८ वर्षांपूर्वी ही सोन्याची साडी साकारली आहे. सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली असून श्री महालक्ष्मी देवीला सोन्याच्या साडीने आभूषित करण्याचे हे ९ वे वर्ष आहे. दस-याच्या दिवशी हळदी-कुंकू व ओटीच्या कार्यक्रमाने नवरात्रोत्सवाचा समारोप झाला.
नवरात्र उत्सवात यंदा धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारे नानाविध उपक्रम राबविण्यात आले. धार्मिक कार्यक्रमांसोबतच महिला पोलीस, दिव्यांग शिक्षीका, महिला सफाई कामगार, वीरमाता-वीरपत्नी, महिला खेळाडू, अंध महिला वृद्धाश्रम, अग्निशामक दलातील जवान, दिव्यांग सैनिक सन्मान सोहळा असे सामाजिक कार्यक्रम देखील मंदिरात आयोजित करण्यात आले होते. दस-यानिमित्त मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती.
गांधी कुटुंबावर पाळत ठेवण्यासाठीच मोदी सरकारनं उचलले हे पाऊल -आरोप
नवी दिल्ली-
राहुल गांधी सध्या कंबोडिया दौऱ्यावर आहेत. नेमक्या याचवेळी मोदी सरकारनं एसपीजीशी संबंधित नियमांमध्ये बदल केला. गांधी कुटुंबावर पाळत ठेवण्यासाठीच मोदी सरकारनं हे पाऊल उचलल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. मात्र भाजपानं या आरोपाचा इन्कार केला आहे. काँग्रेस सोडून भाजपावासी झालेले दिग्गज नेते टॉम वडक्कन यांनी सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. ‘अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या संरक्षणाची जबाबदारी केंद्र सरकारची असते. प्रत्येक ठिकाणी या व्यक्ती सुरक्षित राहतील हे पाहणं सरकारचं कर्तव्य असतं,’ असं वडक्कन म्हणाले.
सरकारने सुरक्षा दलाच्या (एसपीजी) नियमांमध्ये बदल केले आहेत. यामुळे आता एसपीजीच्या संरक्षणात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक ठिकाणी त्यांना सोबत न्यावं लागेल. त्यामुळे आता परदेशात जातानाही एसपीजीचं पथक व्हीव्हीआयपींसोबत असेल. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गांधी कुटुंबातील तीन सदस्यांना एसपीजी सुरक्षा पुरवली जाते. यामध्ये काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधींचा समावेश असेल.
एसपीजीच्या नियमात करण्यात आलेले बदल सुरक्षेसाठी करण्यात आलेले असून त्यामागे पाळत ठेवण्याचा हेतू नसल्याचं वडक्कन यांनी स्पष्ट केलं. त्यांना (गांधी कुटुंबाला) जिथे जायचं असेल, तिथे ते जाऊ शकतात. त्यांचं स्वातंत्र्य अबाधित आहे. मात्र त्यांच्या बाबतीत एखादा अनुचित प्रकार घडू नये यासाठीच हे पाऊल उचलण्यात आल्याचं ते पुढे म्हणाले. सध्या राहुल गांधी परदेश दौऱ्यावर असल्याचं बोललं जातं. काल ते बँकॉकला असल्याची चर्चा होती. राहुल यांच्या परदेश दौऱ्यावर अनेकदा भाजपानं निशाणा साधला आहे. राहुल गांधी नेमके जातात कुठे हे त्यांनी देशाला सांगायला हवं, अशी मागणी करत भाजपानं अनेकदा त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
