Sign in
  • होम
  • बातम्या
  • स्थानिक पुणे
  • चित्ररंग
  • उद्योगवार्ता
  • राजकीय /सामाजिक
  • आमच्याशी संपर्क साधा
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Privacy Policy
Password recovery
Recover your password
Search
Logo
Menu
Search
Logo
  • होम
  • बातम्या
  • स्थानिक पुणे
  • चित्ररंग
  • उद्योगवार्ता
  • राजकीय /सामाजिक
  • आमच्याशी संपर्क साधा
  • होम
  • बातम्या
  • स्थानिक पुणे
  • चित्ररंग
  • उद्योगवार्ता
  • राजकीय /सामाजिक
  • आमच्याशी संपर्क साधा
Home Blog Page 2824

पाच वर्षात चौदा संचालक -सांस्कृतिक कार्य खात्यात रेकॉर्ड ब्रेक संगीत खुर्चीचा खेळ….!

  • News
SHARAD LONKAR
-
October 10, 2019
0

मुंबई-गेल्या पाच वर्षात सांस्कृतिक कार्य संचालनालायमध्ये  कलावंतांच्या हिताची एकही अशी नाविन्यपूर्ण योजना  अंमलात आणली नसली , तरी या पाच वर्षात  तब्बल  चौदा अधिकाऱ्यांनी  येथील संचालक पदाच्या  खुर्चीसाठी अगदी  “संगीत खुर्चीच्या” खेळा प्रमाणे आतापर्यत कार्यभार स्वीकारून   इतर खात्याचा  रेकॉर्ड  ब्रेक मोडला. ह्या नवीन पायंड्यामुळे मात्र एकच  चर्चा या खात्याबद्दल केली जात आहे.

खात्यात अथवा एखादया महामंडळात किमान दोन वर्षे तरी एखादया अधिकाऱ्याने पूर्ण वेळ काम केले तरच त्यांना एखादी चांगली योजना किंवा धोरणाची अंमलबजावणी  करायला सोयीस्कर जाते.परंतु पदभार स्वीकारल्यानंतर अगदी सात आठ महिने किंवा जास्तीत जास्त एक वर्ष एखादा अधिकारी काम करून लगेच बदली मागत असेल तर तेथील खालचा अधिकारी आणि कर्मचारी वर्ग कामात गांभीर्य घेत नाही.अन योजनांचा बट्ट्याबोळ होतो.

ऑक्टोबर २०१४मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर  त्यांनी सांस्कृतिक कार्य खात्याची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे दिली होती.त्यांनतर त्यांनी सांस्कृतिक कार्य विभागात नवीन योजना आणण्याचा प्रयत्न केला.परंतु त्यापैकी अनेक योजनांना  अधिकारी वर्गाचा तुटवडा असल्याने गती मिळाली नाही.यामुळे महाराष्ट्रातील कलावंतांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.

मात्र या सांस्कृतिक कार्य खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालायामध्ये पाच वर्षात तब्बल चौदा अधिकाऱ्यांनी “संचालक”म्हणून वर्ष- दिड वर्षा पेक्षा अधिक काळ काम करू शकले नाही. अनेक वेळा बाह्यशक्तीच्या दबावापोटी हे अधिकारी काम करीत होते.त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी स्वतःहूनच संचालनालायाचा निरोप घेतला. असे सध्या सांस्कृतिक iकार्य विभागातील अधिकारी म्हटले जाते. काही सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक कलावंत कार्यक्रम सादरीकरणासाठी पात्र नसेल तरी त्यांना काम देण्यासाठी दबाव येत होता.असे या खात्यातील अधिकाऱ्याचे मत आहे.

२०१४पासून आतापर्यत संचालक पदाचा  पदभार स्वीकारलेल्या अधिकाऱ्याची नावे पुढीलप्रमाणे..

१) संजय कृष्णाजी पाटील (२८ जुलै २०१४ते २३डिसेंबर२०१४)

२)अजय अंबेकर (२४ डिसेंबर२०१४ ते २मे २०१६)

३)संजय कृष्णाजी पाटील (३मे२०१६ ते १३ जुलै २०१६)

४) शैलेश जाधव(प्रभारी) (१३जुलै २०१६ ते २५ सप्टेंबर२०१६)

५)संजय कृष्णाजी पाटील (२६ सप्टेंबर२०१६ते २०जून २०१७)

६)सुशील गर्जे  (२१ जून २०१७ ते २४ जुलै २०११७)

७)संजय कृष्णाजी पाटील (२५जुलै २०१७ ते १० सप्टेंबर २०१७)

८)संजीव पलांडे (प्रभारी)  (११ सप्टेंबर२०१७ ते २ ऑक्टोबर २०१७)

९) संजय कृष्णाजी पाटील (३ ऑक्टोबर २०१७ ते ६ डिसेंबर २०१७)

१०)सुशील गर्जे (प्रभारी)।  (७डिसेंबर २०१७ ते १६ डिसेंबर २०१७)

११) संजय कृष्णाजी पाटील  (१७ डिसेंबर २०१७ ते २२ मे २०१८)

१२) संजीव पलांडे (प्रभारी)  (२३ मे २०१८ते १० ऑक्टोबर२०१८)

१३)श्रीमती स्वाती काळे  (११ ऑक्टोबर २०१८ते ११ जुलै २०१९)

१४) बिभीषन चवरे   (सध्या कार्यरत )

अश्विनी कदम यांची मतदार संघाच्या पूर्व भागातील प्रचारफेरीला चांगला प्रतिसाद

  • Local Pune
SHARAD LONKAR
-
October 10, 2019
0
अश्विनी कदम यांची मतदार संघाच्या पूर्व भागातील प्रचारफेरीला चांगला  प्रतिसाद

पुणे-पर्वती कन्या या नावाने नवी ओळख लाभलेल्या नगरसेविका आणि पर्वती मतदार संघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी च्या उमेदवार अश्विनी नितीन कदम यांनी निवडणुकीच्या आपल्या प्रचारार्थ आज सकाळी गिरीधर भवन – ज्ञानदेव शाळा – समर्थ रामदास मंडळ – दत्त मंदिर – गजानन गॅरेज – ठाकरे कमान – एक दिल तरुण मंडळ – काळे सायकल मार्ट – व्हेईकल डेपो चौक – महाराष्ट्र मंडळ रस्ता – हुंडेकरी गॅरेज – राम मंदिर रस्ता – रांका हॉस्पिटल चौक – देवी मंदिर – झुंजार मंडळ – अरुणा आसेफ अली बाग – जागृती मंडळ – सौभाग्य मंगल कार्यालय – सातारा रस्ता – उत्सव हॉटेल चौक – नंदनवन हॉटेल – नानावटी मार्ग -अभय छाजेड यांचे  संपर्क कार्यालय अशा मार्गाने  प्रचार फेरी काढून  मतदारांशी संवाद साधला . पदयात्रेत घरोघरी महिलांनी औक्षण करून स्वागत केले. ज्येष्ठ नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि सर्व धर्मीय समाज घटकांची सोबत हीच पर्वतीच्या सर्वांगीण विकासासाठी ऊर्जा असणार आहे. प्रचार दौऱ्यात महीलांची उपस्थिती लक्षणीय होती . त्याचप्रमाणे युवक – युवती , नागरिक यांच्यासह महाआघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत सिद्धार्थ शिरोळे यांचा प्रचार सुरु

  • Local Pune
SHARAD LONKAR
-
October 10, 2019
0
सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत सिद्धार्थ शिरोळे यांचा प्रचार सुरु

पुणे : आपल्या मतदार संघातील सामान्यातील सामान्य नागरिकांच्या भेटी घेत, त्यांच्या अपेक्षा जाणून घेत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (A), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे शिवाजीनगर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांचा प्रचार सुरु आहे.

आजही चिखलवाडी, रेल्वे लाईन, ओरिएंट कॉम्प्लेक्स या ठिकाणी पदयात्रे मार्फत त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी त्या भागातील अनेक प्रश्नांवर देखील त्यांनी नागरीकांशी संवाद साधला. या वेळी नगरसेवक विजय शेवाळे, अर्चना मुसळे, बंडू ढोरे, स्वाती लोखंडे, माजी महापौर सुरेश शेवाळे, अनिल भिसे, गणेश नायकरे, मधुकर मुसळे, सचिन वाडेकर, स्वामी नवले, उत्तम बहिरट, सोनाली भोसले, रिटा उपाध्याय, सुभाष बहिरट, सदाशिव मोरे, धनंजय दरे, अनिल तिळवणकर आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खा.संजय काकडेंंनी घडविले कॉंग्रेसच्या १० मातब्बरांचे भाजप प्रवेश

  • Politician
SHARAD LONKAR
-
October 10, 2019
0
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खा.संजय काकडेंंनी घडविले  कॉंग्रेसच्या १० मातब्बरांचे भाजप प्रवेश

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुणे महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डमधील आजी-माजी उपमहापौर व नगरसेवकांनी खासदार संजय काकडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हे सर्वजण कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील असल्याने या मतदार संघात भाजपाची ताकद आणखी वाढल्याने भाजपाच्या विजयाचा मार्ग आणखी सुखकर झाल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचारासाठी आले असताना त्यांच्या उपस्थितीत खासदार संजय काकडे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली या ताकदवर स्थानिक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी शिवाजीनगर मतदार संघातील भाजपाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे व पुणे शहर भाजपाचे सरचिटणीस गणेश बिडकर उपस्थित होते. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजीमंत्री स्व. चंद्रकांत छाजेड यांचे सुपूत्र माजी नगरसेवक आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे, लहु बालवडकर, समाधान शिंदे, तुकाराम जाधव, सुरेश कांबळे, कमलेश चासकर, अभय सावंत व दुर्योधन भापकर यांचा समावेश आहे. या प्रत्येक नेत्यांच्या मागे त्यांची हक्काची मते आहेत. त्यामुळे पुण्यातील कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील भाजपाची ताकद आता आणखी वाढली आहे. परिणामी भाजपाचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास, भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राला वेगळी दिशा दिली आहे. विकासाचे राजकारण करताना महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. दूरदृष्टीकोन ठेवून महाराष्ट्राच्या विकासाची धोरणे आखली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊन सामाजिक समतोल साधण्यात फडणवीस यशस्वी ठरले. शेतीला पाणी मिळावे म्हणून जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविली. मुंबई, पुणे व नागपूर शहरांत मेट्रोचं जाळं अधिक वेगानं निर्माण केले. आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीसांच्या आश्वासन नेतृत्वाला स्वीकारून पुणे महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंटमधील आजी-माजी उपमहापौर व नगरसेवक आणि नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोंन्मेंट विधानसभा मतदार संघातील या नेत्यांच्या भाजप प्रवेशाने आता सर्व राजकीय गणिते बदलली असून त्याचा परिणाम निवडणूक निकालात नक्कीच पाहायला मिळेल.असे काकडे यांनी म्हटले आहे.

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष कॉंग्रेसचे सदानंद शेट्टी हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते आहे.

अरविंद शिंदे यांच्या पदयात्रेत “पाणी प्रश्न” रहिवाशांनी उपस्थित केला.

  • Local Pune
SHARAD LONKAR
-
October 10, 2019
0
अरविंद शिंदे यांच्या पदयात्रेत “पाणी प्रश्न” रहिवाशांनी उपस्थित केला.

पुणे : ज्येष्ठ कार्यकर्ते ,प्रमुख नागरिक ,आणि उत्साही युवक कार्यकर्ते यांच्या समवेत कसबा विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार अरविंद शिंदे यांच्या पदयात्रा कसबा पेठ आणि महात्मा फुले मंडई परिसरात बुधवारी काढण्यात आल्या .पेठांमधील पाणीप्रश्न सोडवावा अशी विनंती अनेक रहिवाशांनी शिंदे यांच्याकडे केली.

                कॉंग्रेस ,राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षाच्या आघाडीचे उमेदवार    अरविंद शिंदे यांच्या प्रचाराचा प्रारंभ सकाळी  दारूवाला पूल येथील श्री नागेश्वर मंदिरापासून करण्यात आला.ही पदयात्रा कमला नेहरू हॉस्पिटल,कागदीपुरा, कुंभार वाडा, पवळे चौक,अजंठा मंडळ,त्वष्टा कासार मंडळ ,मोटे मंगल कार्यालय,नवग्रह मंदिर,फणी आळी तालीम,मुजुमदार बोळ, ,शिंपी आळी, ,फडके हौद, व्यवहार आळी,झांबरे चावडी, गावकोस मारुती या मार्गाने काढण्यात आली. ठिकठिकाणी रहिवाशांनी   शिंदे यांचे स्वागत केले. कसब्यासह सर्व पेठांमधील पाणीप्रश्नात  लक्ष घालून ,तो सोडवावा अशी विनंती नागरिकांनी शिंदे यांना केली .

                या पदयात्रेत रोहित टिळक ,रवींद्र धंगेकर ,सदानंद शेट्टी, सुजाता शेट्टी,बुवा नलावडे,जयसिंग भोसले, विद्याताई भोकरे,अजित दरेकर,मुख्तार शेख,विजय खराडे,गणेश नलावडे,प्रवीण करपे,राजेंद्र खराडे,नरेश नलावडे ,मयूर भोकरे,योगेश भोकरे,शैलेश भोकरे,परवेज तांबोळी,विजय तिकोने,बबलू कोळी,गीता तारु,वनिता जगताप  आदी सहभागी झाले होते.

                महात्मा फुले मंडईतील  श्री शारदा -गजाननाचे  दर्शन घेऊन तसेच लोकमान्य टिळक आणि लोकनेते यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मंडई परिसरातील पदयात्रेला  अरविंद शिंदे यांनी प्रारंभ केला .मंडईतील भाजीविक्रेते ,छोटे व्यावसायिक यांच्या भेटी घेतल्या.

        या पदयात्रेत  रोहित टिळक ,डॉ सतीश देसाई,रवींद्र धंगेकर,कमलताई व्यवहारे,वनराज आंदेकर अजित दरेकर,बाळासाहेब मारणे ,बाळासाहेब अमराळे,सुनील खाटपे,राजेंद्र भणगे,संजय मते,अनिल सोंडकर,प्रवीण करपे,प्रकाश पवार,सुर्यकांत मारणे ,अविनाश ताकवले,तीलेश मोता,अजय दराडे, सोनाली मारणे ,भारती कोंडे,नीता राजपूत,मनीषा नेवसे ,बटूल अपा शेख,शशिकला बोरकर आदी सहभागी होते    

महापालिकेची कारकीर्द हाच विधानसभा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा…

  • Local Pune
SHARAD LONKAR
-
October 10, 2019
0
महापालिकेची कारकीर्द हाच विधानसभा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा…

पुणे-महापालिकेतील महापौर मुक्ता टिळक ,स्थायी समिती अध्यक्ष  सुनिल कांबळे ,कॉंग्रेसचे गटनेते अरविंदशिंदे आणि नुकतेच विरोधीपक्षनेते पदाचा भार सोडलेले आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पदावर विराजमान झालेले चेतन तुपे ,मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि काही  नगरसेवक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमवण्यासाठी उतरले आहेत. त्यांच्या जोडीला अन्य प्रमुख पक्षांचे शहराध्यक्ष निवडणुकीत उतरले असून  महापालिकेच्या  कारकीर्दीवरच या साऱ्या शिलेदारांचे भवितव्य अवलंबून राहील असे म्हणता यायला हवे .या शिवाय राज्य शासनाने या शहराच्या सुव्यवस्थेचा मुद्दा कसा हाताळला हि बाब हि ध्यानात घेतली जाण्याची शक्यता आहेच . देशात काश्मीरचा समावेश नेमका कधी  झाला ,पुलवामा हल्ला कसा झाला .. या अशा राष्ट्रीय मुद्द्यांना या निवडणुकीत स्थान मिळण्याऐवजी आपल्या कुटुंबाची आणि विशेषतः शहराची अवस्था यावर आता मतदान होईल असे वाटते आहे .

म्हणतात ना, घर भक्कम तर गाव भक्कम ,गाव भक्कम ,तर शहर आणि शहर तर राज्य आणि राज्य भक्कम तर देश भक्कम … सुरुवात आपल्या घरापासून होते . त्यामुळे आपले कुटुंब त्यात येणाऱ्या अडचणी ,आपले शहर तिथे असलेल्या सोयी सुविधा या गोष्टीवर मतदानाचा आता भर राहील असे वाटते आहे. आणि या सर्व गोष्टी महापालिकेच्या कारभाराशी प्रथमतः निगडीत केल्या जावू शकतात .स्मार्ट सिटी च्या नावाखाली एकीकडे पारितोषिके घेत मार्केटिंग चा फंडा तर राबविला पण म्हणतात ना हातच्या कंकणाला आरसा कशाला त्याप्रमाणे शहरा ची बकाल अवस्था लपून राहू शकली नाही . या पावसाळ्यात आपल्या शहराला क्षणार्धात होत्याचे नव्हते करणारा कारभार पालिकेने कसा हाकलेला आहे ते दाखवून दिलेले आहेच .दुसरीकडे महापालिकेने अधिकृत  नौकर भरती टाळून बेरोजगार तरुणांची चालविलेली ठेकेदार पद्धतीवरील पिळवणूक आणि फसवणूक ,निसर्गाने जलसंपदा मुबलक उपलब्ध करून दिलेली असताना वर्षानुवर्षे कारभार हाकणारी महापालिका त्यावर सातत्याने फेल होत असल्याचे वास्तव .राजकरणी आणि बिल्डर ,आणि प्रशासन अशा त्रिकुटाने पुण्यातील निसर्गावर  केलेल्या वर्षानुवर्षे अतिक्रमणाने काय उपद्रव होवू शकतो हे या पावसाळ्याने दाखवून दिलेले आहेच . रस्त्यावर वाहतुकीला विनाकरण पोलिसी यंत्रणेकडून  ,आणि पालिकेच्या कारभाराने येणारे अडथळे आता बोचू लागले आहेत .

भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या चारही प्रमुख पक्षांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. सत्ताधारी भाजपचे पालिकेतील तीन आणि शहर स्तरावरील आणखी एक असे चार प्रमुख पदाधिकारी निवडणूक लढविणार आहेत. महापौर मुक्ता टिळक आणि कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे,शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे कसबा पेठेतून, स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे पुणे कँटोन्मेंटमधून; चेतन तुपे ,वसंत मोरे हडपसर मधून लढत आहेत .  त्यांच्यासह ‘राष्ट्रवादी’चे सचिन दोडके, सुनील टिंगरे  हे आणखी तीन नगरसेवक महापालिकेतून विधिमंडळात जाण्याचे स्वप्न घेऊन निवडणूक लढविण्यासाठी रिंगणात उतरले आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर पुणे शहराचे स्वरूप आणि ते सुव्यवस्थित राखण्यासाठी महापालिकेने राबविलेला कारभार हाच मुद्दा या निवडणुकीत महत्वाचा मानला गेला पाहिजे असे अनेकांना वाटते आहे . ‘आम्ही सारे भाऊ मिळून मिसळून खावू खाऊ’हि अँटीचेम्बर मधील कार्यपद्धती ठेवणाऱ्यांच्या आणि अँटीचेम्बर बाहेरील सार्वजनिक  जीवनात  रंगमंच बनवून त्यावर एकमेकांचे विरोधक असल्याचा आभासी अभिनय करणाऱ्या नेत्यांच्या अभिनयाला मतदार निश्चित आता भुलणार नाही असे म्हणता येणार आहे

 

 

 

जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवणे हा आमचा श्रद्धेचा विषय- चंद्रकांतदादा पाटील

  • News
SHARAD LONKAR
-
October 9, 2019
0
जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवणे हा आमचा श्रद्धेचा विषय-  चंद्रकांतदादा पाटील

पुणे: जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवणे हा आमचा श्रद्धेचा विषय असून,  आम्ही आमच्या ३० मिनिटाच्या भाषणात पाच मिनिट बोललो तर त्याच गैर काय. किंबहुना राष्ट्रीय अस्मितेचा आनंद व्यक्त केल्याने नागरिकांचा देखील त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. पुण्यामध्ये कलम ३७० आणि ३५ ए या विषयावर आयोजित चर्चा सत्रात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर लडाखचे खासदार जमयांग सेटिंग नामग्याल, पुण्याचे खासदार गिरीश बापट, कार्यक्रमाचे आयोजक शेखर मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, “जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवणे हा आमचा श्रद्धेचा विषय आहे. या विषयासाठी जनसंघाचे संस्थापक आणि आमचे मार्गदर्शक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ‘एक देश मै दोन निशान, दो संविधान नही चलेगा’चा नारा देत बलिदान दिले. जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा झेंडा फडकवण़यासाठी आंदोलनं केली. यासाठी तुरुंगवास भोगला.”

ते पुढे म्हणाले की “अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आम्ही जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यासाठी आंदोलन केले. हे आंदोलन माझ्या नेतृत्वाखाली झाले होते. पण यावेळी आम्हाला अटक झाली होती. यानंतर आम्ही तत्कालिन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांची भेट घेऊन तिरंगा झेंडा भेट दिला, आणि तुम्ही तरी हा झेंडा श्रीनगरच्या लाल चौकात फडकवा, अशी विनंती केली होती. आता हाच विषय देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सोडवला आमच्या ३० मिनिटाच्या भाषणात त्याचा आनंद साजरा करणं, यात गैर काय?” असा सवाल उपस्थित केला.
काश्मीरमधील या भारतीय अस्मितेच्या मुद्याला सर्व घटकांमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या आनंदामध्ये सहभागी पुण्याची संधी या निमित्ताने आम्हाला मिळत आहे, असेही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

लडाखचे खासदार जमयांग सेटिंग नामग्याल म्हणाले की, “जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम आणि ३५ ए हटवल्यानंतर अनेकांना मानवतावादाचे उमारे फुटले आहेत. मुंबई-दिल़लीतील अनेक तथाकथित बुद्धिवजीवी सरकार कशाप्रकारे इथल्या जनतेची मुस्कटदाबी करत आहे, यावर मगराश्रू ढाळत आहेत. पण ३७० आणि ३५ ए मुळे इथली जनता जेव्हा नरकयातना सहन करत होती, त्यावेळी हे बुद्धिजीवी गप्प का होते? त्यांना जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील जनतेच्या यातना दिसल्या नाहीत का?” असा सवाल उपस्थित करुन काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काश्मीर संदर्भातील बोटचेप़या धोरणाची पोलखोल केली.

कार्यक्रम हाउसफुल

जम्मू काश्मीरमधील कलम 370 संदर्भातील हा कार्यक्रम रद्द झाला अशा आशयाची दिशाभूल करणारे खोडसाळ पोस्ट समाज माध्यमांवर प्रसारीत करण्यात आली होती. कोथरूड विधानसभा च्या निवडणुकीमध्ये काश्मिरच्या 370 कलमाचे काय काम, त्याऐवजी स्थानिक विकासकामांबाबत बोला, असा खास पुणे पुढारी टोला देखील चंद्रकांत दादा पाटील यांना सोशल मीडिया वरून लावण्यात आला होता.
प्रत्यक्षात मात्र सोशल मीडियावरील हा खोडसाळपणा ला आणि विरोधकांच्या कांगाव्याला कोणीही भीक घातली नाही. उलटपक्षी हा कार्यक्रम सर्वसामान्य नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हाऊसफुल ठरला.

भाजप सरकार कडून ,निव्वळ आश्वासने ..प्रत्यक्षात नागरिकांच्या पदरात निराशा – बाळासाहेब थोरात

  • Politician
SHARAD LONKAR
-
October 9, 2019
0
भाजप सरकार कडून ,निव्वळ आश्वासने ..प्रत्यक्षात नागरिकांच्या पदरात निराशा – बाळासाहेब थोरात

पुणे :भाजपच्या सरकारने निव्वळ आश्वासने दिली ती पूर्ण केली नाहीत, त्यामुळे प्रत्यक्षात नागरिकांच्या पदरात निराशाच पडली ,त्यांनी कोणताही प्रकल्प नव्याने आणला नाही ,आमच्या काळातील जुने  प्रकल्प देखील रेटत असून त्यांचे श्रेय घेत आहेत .त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला 160 मिळतील असा अंदाज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी वर्तवला.पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत , शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे ,तसेच उल्हास पवार आदी मान्यवर उपस्थित होते  मोठया संख्येने उपस्थित होते. ते म्हणाले की, आम्ही आभासी आकडा सांगत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मागील वेळेपेक्षा साधारण दुप्पट म्हणजे 160 जागा मिळतील. गृहमंत्री अमित शहा यांनी ओबीसी समाजकरिता खूप काम केल्याचा दावा केला मात्र नेमके काय काम केले हे त्यांनी सांगत नाही.याउलट 2008मध्ये काँग्रेस सरकार असताना आम्ही ओबीसी समाजाला आरक्षण दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आघाडीला १७५ जागा मिळतील असा अंदाज वर्तविला आहे.

यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :
– पाच वर्षात पुणे स्मार्ट सिटी झाले का ? आत्तापर्यंत स्मार्ट सिटी अंतर्गत कोणतीही तरतूद आली नाही. सर्व प्रकल्प रेंगाळलेल्या अवस्थेत आहेत. कोणतीही तरतूद झाली नाही.

– सांगली कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना कोणतीही मदत नाही. सरकारची निराशाजनक कामगिरी

– आचारसंहितेपुर्वी आश्वासन दिले मात्र कोणतेही काम केले नाही ही वस्तूस्थिती

– राज्यशासनाने केंद्राकडे 8 हजार 500 कोटींचा प्रस्ताव पाठवला होता पण आत्तापर्यन्त दमडीही आली नाही.

शिवाजी महाराज, टिळक आणि फुले घराण्यानंतर सरदार पटेलांच्या वशंजानी केला भाजपमध्ये प्रवेश

  • News
  • Politician
SHARAD LONKAR
-
October 9, 2019
0

धुळे- मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेली भाजपची मेगाभरती थांबायचे नावच घेत नाहीये. इकडे विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्व उमेदवारांनी आपले अर्जही दाखल केले. तरीदेखील भाजपची मेगाभरती सुरुच आहे. आतापर्यंत भाजपात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले, शाहू महाराजांचे वंशज संभाजीराजे, लोकमान्य टिळकांच्या वंशज मुक्ता टिळक आणि महात्मा फुलेंच्या वंशजानी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता प्रत्यक्षात देशाचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वशंजांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सरदार पटेलांच्या घराण्यातील आमदार अमरिशभाई पटेल यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. “ज्या महापुरुषांनी या देशासाठी बलिदान दिले त्यांच्या वंशजांना भारतीय जनता पार्टी हीच देशसेवेसाठी काम करत असल्याची भावना आहे. अमरिशभाई पटेल यांना भाजपत घेण्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. ते जरी दुसऱ्या पक्षात होते, तरी त्यांच्याशी चांगले संबंध राहिले आहे. त्यांनी शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून राज्याला खऱ्या अर्थाने दुष्काळ मुक्तीचा मार्ग दाखवला आहे.” असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते शिरपूर येथील भाजपचे उमेदवार काशीराम पावरा यांच्या प्रचार सभेसाठी आले होते.

यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री अमरीश पटेल यांनी आपल्या दहा हजारांपेक्षा जास्त समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने शिरपूर मतदार संघ शतप्रतिशत भाजपमय झाली आहे. यावेळी मंत्री जयकुमार रावल, खासदार सुभाष भामरे, खासदार हीना गावित, अमरीश पटेल आदी उपस्थित होते.

पावसामुळे पुण्यातील राज ठाकरेंची सभा अखेर रद्द…

  • Local Pune
SHARAD LONKAR
-
October 9, 2019
0
पावसामुळे पुण्यातील राज ठाकरेंची सभा अखेर रद्द…

पुणे- विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्व पक्षांनी आपल्या प्रचार सभा सुरू केल्या आहेत. मनसेनेही पुण्यातून आपल्या प्रचाराचा नारळ फोडण्याचे ठरवले होते. पण, आता राज यांच्या सभेवर पावसामुळे विघ्न आले आहे. पुण्यात सध्या जोरदार पाऊस पडत असल्याने नातू बागेतील मैदानावर होणारी राज ठाकरेंची सभा अखेर रद्द करण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून प्रचार सभा आणि रॅली काढल्या जात आहेत. या दरम्यान मनसेची पहिली सभा पुण्यात आयोजित केली होती. पण, काल पुण्यात रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नातू बागेतील मैदानावर पाणीच पाणी पाहण्यास मिळाले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी मैदानावरील बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दिवसभर पाऊस पडला नाही, त्यामुळे सभा होईल असे सांगितले जात होते. पण, दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे मैदानात परत पाणी साचले आणि अखेर राज ठाकरेंची सभा रद्द करण्यात आली.

मैदान सुकवण्यासाठी वाळू आणि माती टाकली. पण पावसाने या सर्व मेहनतीवर पाणी फिरवले आहे. हवामान खात्याने आज संध्याकाळी सुद्धा पावसाची शक्यता वर्तवली होती आणि तसेच घडले. त्यामुळे अखेर ही सभा रद्द झाली आहे. आजची सभा रद्द झाली असली तरी उद्या गोरेगाव आणि बांद्रा येथे दोन सभा होतील.

पीएमपीएमएल बसमध्ये फिरत केला प्रचार …

  • Local Pune
  • Politician
SHARAD LONKAR
-
October 9, 2019
0
पीएमपीएमएल बसमध्ये फिरत केला प्रचार …
पुणे – वंचित बहुजन आघाडीचे हडपसर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार घनश्याम(बापू) हाके यांनी आज फातिमानगर ते केशवनगर पीएमपीएल ने प्रवास करून हडपसर परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या .या वेळी महिलानी उभे राहून प्रवास करावा लागत असल्याचे सांगितले तर विद्यार्थ्यां नी बस वेळेत येत नसल्यामुळे शाळेत आणि महाविद्यालयाच्या वेळेत पोहचता येत नसल्याची तक्रार व्यक्त केली .तसेच ज्येष्ठ नागरिकांनी बस मधील गर्दीचा फार त्रास होत असल्याची खंत व्यक्त केली .या बरोबरच हाके यांनी व्यक्तीश सर्व प्रवाश्यांशी संवाद साधला व या वेळी वंचीत बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्याला  हडपसर मधून आमदार म्हणून निवडून येण्याची संधी दयावी असे या आवाहन केले .त्याबरोबरच आपण निवडून आल्यानन्तर हडपसर परिसरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी पहिले प्राधान्य देणार असल्याचे सांगितले
तसेच महिला आणि ज्येष्ठ  नगरिकासाठी स्वतंत्र बस बरोबरच बसे स ची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .
            फातिमानगर येथून बसमध्ये बसल्यांनातर त्यानी सर्वप्रथम पैसे देऊन तिकीट काढून घेतले . प्रवाशयांच्या समस्येबरोबरच त्यानी पीएमपीएल च्या चालक आणि वाहक यांची विचारपूस करून अडचणी जाणून घेतल्या .आपण समाजातील वंचीत ,कामगार ,कस्टकरी यांच्या साठी कायम कार्य करीत राहणार असल्याचे या वेळी  सांगितले .

रेरा अंमलबजावणीपूर्वी पूर्णत्त्वाचा दाखला व ओसी मिळालेल्या गृहप्रकल्पांना नोंदणीची सक्ती नको – ‘क्रेडाई पुणे मेट्रो’चे नोंदणी महानिरीक्षकांना पत्र

  • Local Pune
SHARAD LONKAR
-
October 9, 2019
0
रेरा अंमलबजावणीपूर्वी पूर्णत्त्वाचा दाखला व ओसी मिळालेल्या गृहप्रकल्पांना नोंदणीची सक्ती नको – ‘क्रेडाई पुणे मेट्रो’चे नोंदणी महानिरीक्षकांना पत्र

पुणे- : महाराष्ट्रात रेरा कायद्याची अंमलबजावणी होण्यापूर्वी ज्या गृहप्रकल्पांना पूर्णत्त्वाचा दाखला किंवा भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) प्राप्त झाले आहे त्यांची रेरा कायद्याअंतर्गत नोंदणी करणे आतापर्यंत आवश्यक नव्हते. मात्र महसूल विभागाने नुकत्याच जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार ही नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. दिवाळी तोंडावर आली असताना काढण्यात आलेल्या या नव्या परिपत्रकामुळे घरांची खरेदी-विक्री अडचणीत आली असून मुहूर्त साधून सदनिका खरेदी करणा-या ग्राहकांना त्याचा फटका बसणार आहे.

या पार्श्वभूमीवर विकसकांची संघटना असलेल्या ‘क्रेडाई पुणे मेट्रो’ने राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे आणि महारेराचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांना पत्र पाठवून या तरतुदींबद्दल स्पष्टता आणली जावी अशी विनंती केली आहे.

रेरा कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी पूर्णत्त्वाचा दाखला वा भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या प्रकल्पांना आता विक्री करार नोंदणी करायची असेल तरीही मूळ प्रकल्पाची तेव्हाच्या परिस्थितीनुसार रेरा नोंदणी नसल्यामुळे या सदनिकांच्या विक्री व्यवहारांना खीळ बसली आहे.  हीच समस्या रेरा येण्यापूर्वीच्या भूखंड विकसन प्रकल्पांच्या बाबतीतही उद्भवली आहे. याबरोबरच रेरा कायद्याच्या सेक्शन क्रमांक ३ (२) अनुसार ज्या गृहप्रकल्पांचे क्षेत्रफळ ५०० चौरस मीटरपेक्षा कमी आहे, तसेच गृहप्रकल्पात ८ पेक्षा कमी सदनिका आहेत, त्यांच्यासाठी अद्याप रेरा नोंदणी गरजेची नव्हती. ती आता अनिवार्य झाली आहे. याशिवाय सदनिका व भूखंडांच्या पुर्नविक्रीत विकसक हा कागदोपत्री भागीदार नसेल तर त्याला नोंदणी अनिवार्य नसावी, असे क्रेडाई पुणे मेट्रोने म्हटले आहे.

महसूल विभागाच्या नवीन परिपत्रकामुळे सदनिकांच्या विक्री व्यवहारांत संदिग्धता निर्माण झाली असून त्यामुळे विकसक आणि ग्राहक या दोघांनाही समस्या भेडसावत आहेत, त्यामुळे या परिपत्रकाबाबत लवकरात लवकर स्पष्टता आणली जावी, अशी विनंती क्रेडाई पुणे मेट्रोने पत्राद्वारे केली आहे.

क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकामांना आळा घालणे आवश्यक असून त्यासाठी शासन करत असलेल्या प्रयत्नांना आमचा पाठिंबाच आहे. परंतु या परिपत्रकामुळे ऐेन सणासुदीच्या काळात सदनिकांच्या खरेदी-विक्री व्यवहारांना फटका बसतो आहे. प्रामाणिक विकसक आणि ग्राहक यात भरडले जात असल्यामुळे या तरतुदींचा पुर्नविचार होणे आवश्यक आहे.’’

सप्तसूरांनी सजली ‘संगीतरजनी’

  • Local Pune
SHARAD LONKAR
-
October 9, 2019
0
सप्तसूरांनी सजली ‘संगीतरजनी’

पुणे : ‘मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा’ यासारखी ठसकेबाज लावणी, ‘मॉ तुझे सलाम’सारखे देशभक्ती जागविणारे गीत, ‘बाहो मे चले आ’सारखे रोमँटिक गीत या आणि अशा भावनाप्रधान गाण्यांच्या सादरीकरणाने नवीन पिढीतील गायक-वादकांनी संगीतरजनी फुलवली. पुणे नवरात्र महोत्सव समिती, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फौंडेशनतर्फे आयोजित २५ व्या पुणे नवरात्र महोत्सवात युवा गायक आणि कलाकारांनी ‘संगीतरजनी’ या विशेष कार्यक्रमात कलाकारांनी आपल्या अप्रतिम अदाकारीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. महोत्सवाचे संयोजक आबा बागूल, जयश्री बागूल, घनःश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल, विकी खन्ना यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

अभिषेक सराफ, वेदा नेरुरकर आणि क्रिशा चिटणीस यांनी आपल्या सुमधूर गायनाने नवीन आणि जुन्या हिंदी-मराठी गीतांचे सादरीकरण केले. आरजे बंड्या आणि आरजे सानिका यांच्या खुमासदार निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली. तुषार दिक्षित, ओंकार पाटणकर (किबोर्ड), गौरव जोशी (बेस गिटार), संकेत नाशिककर (लिट गिटार), सागर साळुंके (बासरी), अभिषेक भुरुक (ड्रम्स), यांनी साथसंगत केली. ‘दुर्गे दुर्गट भारी’ या देवीच्या आरतीने आणि ‘मोरया मोरया’ या गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘कजरा मोहब्बतवाला’, ‘आओ हुजुर तुमको’, ‘सितारो मे ले चलू’ यांसारख्या हिंदी गीतांसह ‘डिपाडी डिपांग’, ‘अश्विनी ये ना’, ‘जीव रंगला’ अशा मराठी गीतांनी रसिकांच्या मनाला भुरळ घातली.

अभिरुची परिसराची शून्यकचरा निर्मितीकडे वाटचाल -ज्ञानेश्वर मोळक

  • Local Pune
SHARAD LONKAR
-
October 9, 2019
0
अभिरुची परिसराची शून्यकचरा निर्मितीकडे वाटचाल -ज्ञानेश्वर मोळक

पुणे : “शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकावर आहे. आपल्याला स्वराज्य उभारणीत छत्रपतींचा मावळा होता आले नाही की स्वातंत्र्यलढ्यात योगदान देता आले नाही. पण आपण काळाची गरज आणि आपली जबाबदारी ओळखून प्रत्येकाने स्वच्छतासैनिक आणि स्वच्छतामित्र बनावे,” असे आवाहन घनकचरा विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी पुणेकरांना केले. अभिरुची परिसराची वाटचाल शून्यकचरा निर्मितीकडे होत आहे, ही आनांदाची बाब आल्याचेही त्यांनी नमूद केले.

माय अर्थ फाउंडेशन व अभिरुची मॉलच्या संयुक्त विद्यमाने ‘कचरा व्यवस्थापन व निर्मूलन’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात मोळक बोलत होते. सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल येथे सॅनिटरी नॅपकीन डिस्पोजल इन्सिलेटरचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी पुनावाला वेस्ट मॅनेजमेंटचे मल्हार करवंदे, आरोग्य अधिकारी केतकी घाडगे, ‘बोला गारबेज’चे विशाल ठिगळे, ‘अभिरुची’चे यशोधन भिडे, कचरा व्यवस्थापन सल्लागार ललित राठी, माय अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत, एन्व्हार्यमेंट क्लब ऑफ इंडियाचे निलेश इनामदार आदी उपस्थित होते. या कचऱ्याचे व्यवस्थापन ‘बोलाजी सर्व्हिसेस’ करणार आहे.

ज्ञानेश्वर मोळक म्हणाले, “महापालिका आज अनेक उपक्रम राबवत आहे. शहरातील कचरा शहरातच जिरवण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. १४०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया होत असल्याने शहरालगतच्या परिसरात कचरा टाकण्याचे थांबले आहे. सोसायट्यांमध्ये कंपोस्ट खत, रेन वाटर हार्वेस्टिंग, सोलर एनर्जीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. प्लास्टिकमुक्त शहरासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याकरिता सामाजिक प्रबोधनाबरोबरच दंडात्मक कारवाईचा पर्यायही वापरला जात आहे. कोणत्याही उपक्रमाच्या यशासाठी नागरी सहभाग महत्वाचा आहे.” कचरा उचलण्याची जबाबदारी पालिकेची आणि कचरा करण्याचे माझा हक्कच आहे, ही मानसिकता पुणेकरांनी बदलावी, असेही आवाहन मोळक यांनी केले.

मल्हार करवंदे म्हणाले, “शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी आपण प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी आदर पुनावाला फाउंडेशनच्या प्रयत्नातून काम सुरु आहे. असाच प्रयत्न इतर संस्थानी करावा. शहराच्या सुंदरतेची आणि पर्यावरण रक्षणासाठी काही कल्पना, तंत्रज्ञान असल्यास आदर पुनावाला फाउंडेशन त्यामध्ये सहकार्य करण्यास तयार आहे.” कचरा व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या इतर मान्यवरांनीही आपली मते मांडली. अनंत घरत यांनी सूत्रसंचालन केले. यशोधन भिडे यांनी प्रास्ताविक केले. ललित राठी यांनी आभार मानले. यावेळी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली.

वडगावशेरीत राजे छत्रपती शिवाजी महाराज उदयान सर्वोत्कृष्ठ – आमदार जगदिश मुळीक

  • Local Pune
SHARAD LONKAR
-
October 9, 2019
0
वडगावशेरीत राजे छत्रपती शिवाजी महाराज उदयान सर्वोत्कृष्ठ – आमदार जगदिश मुळीक
वडगाव शेरी ःवडगाव शेरी मतदार संघामध्ये नागरीकांना चांगले आरोग्य मिळावे. बाल गोपाळांना खेळण्याचे हक्काचे ठिकाण देण्याकरिता लोकसंख्या नुसार उद्यान करण्याचे नियोजन केले आहे. वडगाव शेरी साठी राजे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोत्कृष्ठ उद्यानआहे. या उद्यानामध्ये बुलेट ट्रेन,  म्युजिकल कारंजे,आंतरराष्ट्रीय दर्जाचे अक्युपेशन ट्रक, ओपन जीम, ऑक्सिजन कॉर्नर,आणि लहान मुलांसाठी विविध खेळणे आहे. या सुविधांमुळे उद्यानात सकाळी व संध्याकाळी मोठया प्रमाणात गर्दी  असल्याची माहिती आमदार जगदिश मुळीक यांनी दिली
वडगावशेरी मतदार संघातील भाजप, शिवसेना, रिपाई, रासप  महायुतीचे उमेदवार  आमदार जगदिश मुळीक यांची प्रचार फेरी आज गांधीनगर, म.हो. बोर्ड या  ठिकाणी झाली. यावेळी आमदार मुळीक बोलत होते. या प्रसंगी नगरसेवक बापुसाहेब कर्ण गुरूजी, अॅड अविनाश साळवे, राहुल भंडारी, नगरसेविका शितल सावंत,  श्र्वेता गलांडे, मुक्ता जगताप, माजी नगरसेवनक भगवान जाधव, भीमराव खरात, नौशाद शेख,  नामदेव घाडगे, राजू बाफना, संतोष सुकाळे, विशाल साळी आणि आशा जगताप   आदी मान्यवर होते.  यावेळी मुळीक म्हणाले की, राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्याना प्रमाणे विश्रांतवाडीत पाम उद्यान, वडगाव शिंदे येथे वन पर्यटन केंद्र, खराडीमध्ये बोलोद्यान  उद्यान सुरू करण्यात आले आहे. वडगाव शेरी मतदार संघातील प्रत्येक परिसरामध्ये सुविधायुक्त उद्यान केले. कल्याणीनगर, गणेशनगर, विमाननगर, सोपाननगर, बॉम्बे सॅपर्स, चंदननगर, मैत्री उद्यान, जैव वैविध उदयान, मारूतीनगर, नगररोड, खराडी, टिंगरेनगर, धानोरी, येरवडा या उद्यानात विविध काम करण्यात आली आहेत.    सुरक्षितेच्या दुष्टीने उद्यानामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहेत. या उद्यानामध्ये विविध प्रकारची वृक्ष  आहेत. गेल्या पाच वर्षात वडगावशेरी मध्ये हजारो वृक्षांची लागवड केली आहे.  हजारो वृक्षांची लागवड करून मतदार संघ हरित केला 

1...2,8232,8242,825...3,729Page 2,824 of 3,729

About us

Facebook
Instagram
Twitter
Youtube

The latest

सध्याचा काळ हा जगासाठी कठीण काळ,गांधी पुन्हा जन्म घेतील-ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचे प्रतिपादन

Feature Slider March 9, 2025 0
पुणे : अमेरिकेत डोनॉल्ड ट्रम्प, चीनमध्ये क्षी जिनपिंग, रशियात...

भररस्त्यात लघुशंका_तरुणाची ओळख पटली, वडील म्हणाले,त्याचे कृत्य लज्जास्पद

Feature Slider March 8, 2025 0
आरोपी अल्पवयीन नाहीत, त्यांना पकडण्यासाठी पथके रवाना, लवकरच ताब्यात...

“हा विषय केवळ एका तरुणाच्या उद्दाम वर्तनाचा नाही, तर समाजातील वाढत्या बेशिस्त वृत्तीचा, तातडीने कारवाई करणे गरजेचे”– डॉ. नीलम गोऱ्हे

Feature Slider March 8, 2025 0
पुण्यातील एका तरुणाचा उद्दामपणा, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची...

© Since 2013. Designed By Siddharth Vithlani | CSpaceHostings