Home Blog Page 2822

उन्हाचा तडाखा असताना देखील सिद्धार्थ शिरोळेंच्या पदयात्रांना जोरदार प्रतिसाद

0

पुणे : गेल्या काही वर्षांत निवडणुकीदरम्यान निघणा-या प्रचारफे-या, पदयात्रा रोडावत चालल्याचे चिन्ह असताना शिवाजीनगर मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारफे-या, पदायात्रांना कायकर्ते आणि स्थानिक मतदार यांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. आज औंध भागातील परिहार चौक, डि. ए. व्ही. शाळा, मेडिपॉईंट हॉस्पिटल, आंबेडकर पुतळा, भाले चौक, औंध गाव गुरुद्वारा, मंगेश सोसायटी, औंध गावठाण, सिद्धार्थ नगर, भाजी मंडई, जय महाराष्ट्र चौक, रोहन नीलय सोसायटी या भागात अशीच परिस्थिती पहायला मिळाली.

परिहार चौकातून सुरू झालेल्या या पदयात्रेत कार्यकर्त्याबरोबर अनेक सामान्य मतदारही उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. काल रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (A) गटाच्या पदाधिका-यांनी सिद्धार्थ शिरोळे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतल्यानंतर आजच्या पदयात्रेत त्यांचा लक्षणीय सहभाग होता. यावरून आता शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात आरपीआय कार्यकर्ते देखील सिद्धार्थ शिरोळे यांना विजयी करण्यासाठी सक्रीय झाले असल्याचे चित्र पहायला मिळाले. यावेळी परशुराम वाडेकर, सुनीता वाडेकर, मधुकर मुसळे, अर्चना मुसळे, सचिन वाडेकर, विजय शेवाळे, अनिल भिसे, गणेश गायकवाड, सुरेश चोंदे, बाळासाहेब रानवडे, गणेश केळापुरे, पौर्णिमा रानवडे आदी उपस्थित होते.

केवळ खासदार पुत्र म्हणून आजपर्यंत आम्ही सिद्धार्थ शिरोळे यांचे नाव ऐकले होते पण गेल्या एक दीड वर्षांत पुण्याची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ते करीत असलेले प्रयत्न, शहरात इलेक्ट्रिक बसेस आणण्यामधील त्यांचे योगदान या बाबी समोर येत गेल्या त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. आमच्या मतदार संघात आम्हाला असेच व्हिजन असलेला तरुण, अभ्यासू आमदार हवा, असे या वेळी अनेक स्थानिकांनी आवर्जून सांगितले. या आधी सकाळी सिद्धार्थ शिरोळे यांनी गोखले नगर परिसरातील निलज्योती येथील गजानन गार्डन, शिवाजी हाऊसिंग सोसायटी येथील प्रकाश बहिरट उद्यान आणि गोखलेनगर येथील कै. शकुंतला निकम उद्यान या ठिकाणी देखील भेट देत उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी नगरसेवक आदित्य माळवे, राजश्री काळे, डॉ. अपर्णा गोसावी, दत्ता खंडाळे, जितू मंडोरा, प्रवीण शेळके, निलेश घोडके आणि विकास डाबी आदी उपस्थित होते. याबरोबरच बोपोडी येथीळ शिवसेनेच्या शाखेला देखील सिद्धार्थ शिरोळे यांनी भेट दिली.

गृहप्रकल्पांच्या महारेरा नोंदणीबद्दलची संदिग्धता दूर

0

पुणे : ज्या गृहप्रकल्पांना आधीच पूर्णत्त्वाचा दाखला किंवा भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) प्राप्त झाले आहे आणि आता त्यांना सदनिका विक्रीसाठी करार करायचा आहे त्यांना महारेराअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक नाही, असा निर्वाळा महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) शुक्रवारी एका पत्रकाद्वारे दिला आहे. भूखंड विकसनामध्येही (प्लॉटेड डेव्हलपमेंट) जमीनीस आधीच बिगर कृषी प्रमाणपत्र मिळाले असल्यास प्रकल्पास रेरा नोंदणी गरजेची नाही.

गृहप्रकल्पांच्या महारेरा नोंदणीबद्दल गेल्या काही दिवसांमध्ये निर्माण झालेली संदिग्धता यामुळे दूर झाली आहे. ऐन सणासुदीच्या काळांत ग्राहकांना सदनिका खरेदीपासून दूर राहावे लागू नये, यासाठी ‘क्रेडाई पुणे मेट्रो’ने राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे आणि महारेराचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांना पत्र पाठवून महारेरा नोंदणीच्या तरतुदींबद्दल स्पष्टता आणण्याची विनंती केली होती. त्यानंतर शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर रोजी महारेराने हे पत्रक प्रसिद्ध केले आहे.

ज्या गृहप्रकल्पांचे क्षेत्रफळ ५०० चौरस मीटर किंवा त्याहून कमी आहे, तसेच गृहप्रकल्पात ८ किंवा त्यापेक्षा कमी सदनिका आहेत, त्यांच्यासाठी महारेरा नोंदणी गरजेची नाही. याशिवाय जर गृहप्रकल्पांची एकदा रेरा नोंदणी झाली असेल आणि प्रकल्प पूर्ण होऊन त्याला पूर्णत्त्वाचा दाखला (सीसी) किंवा भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) प्राप्त झाले असेल आणि आता या गृहप्रकल्पातील सदनिकांची विक्री करायची असेल, तर विकसकांनी प्रकल्पाची पुन्हा नव्याने रेरा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. या व्यतिरिक्त महारेराच्या नियमांनुसार ज्या विशिष्ट प्रकल्पांना रेरा नोंदणी गरजेची नसल्याचा निर्णय यापूर्वीच देण्यात आला आहे, त्यांचीही रेरा नोंदणी करावी लागणार नाही. ज्या पुर्नविकसन प्रकल्पांमध्ये कोणत्याही प्रकारच्या विपणन वा विक्री प्रक्रियेचा समावेश नाही, तिथे ‘पर्मनंट अल्टरनेटिव्ह अकोमेडेशन अग्रीमेंट’ करताना रेरा नोंदणी गरजेची नाही.

क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट म्हणाले, ‘‘काही दिवसांपूर्वी रेरा नोंदणीबद्दल काढण्यात आलेल्या एका परिपत्रकामुळे काहीसा गोंधळ निर्माण झाला होता आणि ऐेन सणासुदीच्या काळात सदनिकाचे खरेदी-विक्री व्यवहार ठप्प होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र आता महारेराने याबद्दल स्पष्टता आणली असून प्रामाणिक विकसक आणि ग्राहकांना त्यामुळे दिलासाच मिळाला आहे. आता क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने आम्ही राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांना पत्र पाठवून या नवीन परिपत्रकाच्या अंमलबजावणीची विनंती केली आहे.’’

वर्तक बाग आणि सारस बाग येथे ओपन एअर जिम करणार-टिळक

0

पुणे :कसबा विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनी आज वर्तक बाग ,सारसबाग , महाराणा प्रताप उद्यान लोकमान्य जॉगिंग पार्क येथे भेट देत नागरिकांशी सवांद साधला या वेळी बोलताना मुक्ता टिळक यांनी ओपन एअर जिम अधिक सुसहाय करण्याचा मानस व्यक्त केला.
या वेळी नागरिकांनी महायुतीचाच उमेदवार निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला
मुक्ता टिळक यांच्या समवेत शहराध्यक्ष आमदार माधुरीताई मिसाळ या देखील सारस बाग येथे सहभागी झाल्या होत्या
मतदारसंघचे सरचिटणीस प्रमोद कोंढरे ,युवा मोर्चा चे अध्यक्ष राजू परदेशी ,अमित कंक, महिला आघाडीच्या अध्यक्ष वैशाली नाईक नगरसेविका गायत्री खडके ,दीपाली मारटकर ,प्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांच्या सह मतदारसंघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

वडगाव शेरी मतदार संघामध्ये राष्ट्रवादीला खिंडार ..

0
 
वडगाव शेरी –विधानसभा निवडणूका जवळ येऊ लागल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  आज राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुनिल(पप्पू )गोगले आणि किशोर विटकर यांनी कार्यकत्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. भाजपच्या चाणक्यांने राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षामध्ये आणण्यामध्ये यशस्वी होत आहे. या रणनितीचा फायदा भाजपला विधानसभा निवडणूकीमध्ये नक्की होणार आहे. मेगा भरती आणि  मिळणा-या प्रतिसादामुळे विजय नश्चित असल्याचा दावा  भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी करत आहे.
वडगावशेरी मतदार संघातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुनिल(पप्पू )गोगले आणि किशोर विटकर यांच्या सह  राष्ट्रवादीचे कार्यकर्ते   अजित गंगावने, राकेश मोहिते, शैलेश घाडगे संजय शिर्के, प्रविण कणघरे,  अश्विन कुमार गायकवाड, चेतन चव्हाण आणि  प्रशांत धिवार यांनी आज आमदार जगदिश मुळीक यांच्या उपस्थित भाजप मध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाबद्दल आमदार जगदिश मुळीक म्हणाले की, वडगावशेरी मतदार संघामध्ये  गेल्या पाच वर्षामध्ये भाजप पक्ष खुप वाढला आहे. या वडगावशेरी मतदार संघामध्ये सर्वाधिक ताकद ही भाजप पक्षाची  आहे. गेल्या दोन महिन्यामध्ये जवळपास सहा हजार कार्यकत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच या मतदार संघामध्ये ४० हजार पेक्षा जास्त सभासद नोंदणी झाली आहे.  मतदार संघामध्ये भाजपचे 14 नगरसेवक आहेत. शिवसेनाचे तीन नगरसेवक आहे.  वडगावशेरी हा भाजप चा बालेकिल्ला आहे. 
२०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणूकामध्ये वडगावशेरी मतदार संघामधून भाजपला सव्वा लाखां पर्यंत मतदान झाले. २०१४ च्या विधानसभा निवडणूकामध्ये आमदार जगदिश मुळीक निवडणूक आले.  २०१४ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये ४०० बुथपैकी ९१ बुथवर ४० टक्क्यापेक्षा जास्त मतदान भाजपला झाले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ४४० बुथ पैकी ३२७ बुथवर भाजपला ५० टक्क्यापेक्षा मतदान झाले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूकापासून भाजपच्या मतदानाचा टक्का वाढतच चालला आहे.   

नवी पेठ,राजेंद्रनगरमधील पदयात्रेत अरविंद शिंदेंना प्रतिसाद

0

पुणे-; कॉंग्रेस   राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे यांनी नवी पेठ, राजेंद्रनगर परिसरामध्ये पदयात्रा काढली. त्यामध्ये आघाडीतील ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते.या पदयात्रेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

         महापालिका कर्मचारी वसाहती,राजेंद्रनगर ,दत्तवाडी परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणी,पुनर्वसन अशा समस्या यातून लवकरात लवकर मार्ग निघून सुटका व्हावी .अशी नागरिकांची मागणीअसून.या मागण्या सुटण्यासाठी प्राधान्याने लक्ष घालणार आहे असे कॉंग्रेस ,राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे  उमेदवार अरविंद शिंदे यांनी सांगितले .

        या पदयात्रे मध्ये अंकुश काकडे ,अभय छाजेड, शाम मानकर ,रोहित टिळक ,गोपाल तिवारी,रविंद्र धंगेकर , कमलताई व्यवहारे, अजित दरेकर, विनायक हनमघर,दत्ता सागरे, सुधीर काळे, काका धर्मावत ,दिलीप ढवळे,बाळासाहेब दाभेकर, गणेश नलावडे,सचिन आडेकर,अनिल साप्ते,नदीम पटेल,अनंत गांजवे,अप्पा जाधव ,राजेंद्र इंदुलकर,अजित पोटे, राजू नाणेकर,नरेश पावटेकर,किरण दोशी,नीता रजपूत,अंजली सोलापुरे,मनीषा दळवी,शैलजा टेंबे ,सुमन भोईने,करुणा कुंभारे आदी सहभागी झाले होते.

                पदयात्रेमध्ये सौ .कल्पना अरविंद शिंदे सहभागी झाल्या होत्या. सौ कल्पना शिंदे यांनी  महिला कार्यकत्यांना घेऊन घरोघर जाऊन प्रचार करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

                नारायण पेठ,सदाशिव पेठ,शनिवारपेठ,नवी पेठ,राजेंद्रनगर,दत्तवाडी ,दांडेकर पूल या परिसरात पदयात्रा काढून  अरविंद शिंदे यांनी मतदारांशी संपर्क साधला. राजेंद्रनगर ,दत्तवाडी भागात पाण्याची समस्या महिलांनी अतिशय तीव्रपणे मांडली ,त्यांचे म्हणणे शिंदे यांनी समजावून घेतले.आतापर्यंत लोकप्रतिनिधींनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली.परंतु तुम्ही आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले, समजून घेतले  या बद्दल महिलांनी समाधान व्यक्त केले आणि हा प्रश्न आपणच सोडवावा, अशी विनंती महिलांनी केली. या परिसरात एसआरएचे प्रश्न पुनर्वसनाचे, प्रश्न लोकांनी शिंदे यांच्या समोर मांडले पालिका कर्मचारीवर्गाने त्यांच्या वसाहतींचे फेरबांधणी मालकी हक्क आदि मागण्या शिंदे यांना सांगितल्या. वारसा हक्काने नोकरी लागण्याचे प्रमाण कमी झाले आहे हे लक्षात घेऊन घरे मालकी हक्काची करावीत असे  रहिवाश्यांनी सुचवले या वर शिंदे यांनी सहमती दर्शवली.

         “यहोवा सिदकेनु ख्रिस्ती” संघटनेने अरविंद शिंदे यांना पाठींबा जाहीर केला.संघटनेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण ,उपाध्यक्ष मिलिंद मोरे यांनी पाठिंबयाचे पत्र शिंदे यांना दिले

सोलारिस आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत आरपीटीए सोलारिस, डायमंड्स, एसपी सुलतान्स, महाराष्ट्र मंडळ संघांची विजयी सलामी

0
पुणे: सोलारिस क्लब  व पीएमडीटीएच्या संलग्नतेने आयोजित व रावेतकर हाऊसिंग यांच्या तर्फे प्रायोजित सोलारिस आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत आरपीटीए सोलारिस, डायमंड्स, एसपी सुलतान्स, महाराष्ट्र मंडळ या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
 
मयूर कॉलनी येथील सोलारिस क्लब टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत आरपीटीए सोलारिस संघाने ओडीएमटी ब संघाचा 24-04 असा सहज पराभव करून विजयी सुरुवात केली. आरपीटीए सोलारिस संघाकडून संजीव घोलप,रवी कात्रे, जयंत पवार,हेमंत भोसले, रवी पांडे,फैजल अन्सारी, सिद्धू बी,अन्वित फाटक यांनी सुरेख कामगिरी बजावली.   दुसऱ्या सामन्यात  संतोष शहा, आशिष डिके,  स्वेतल शहा, हरकिरत सिंग,  मंदार मेहेंदळे, अद्वैत जोशी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर  एसपी सुलतान्स संघाने एसीई हंटर्सचा 24-03 असा सहज पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली.
 
डायमंड्स संघाने सोलारिस फायटर्स संघाचा 22-10 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून केदार देशपांडे, अमित नाटेकर, केदार शहा, अभिषेक ताम्हाणे, ध्रुव मेड, कौस्तुभ शहा यांनी अफलातून कामगिरी बजावली. अन्य लढतीत  महाराष्ट्र मंडळ संघाने लॉ चार्जर्स संघावर 24-03 असा विजय मिळवला. 
 
स्पर्धेचे उदघाटन सोलारिस क्लबचे संचालक जयंत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सोलारिस क्लबचे रवी बांदेकर व मंदार काळे, संतोष साटम, मकरंद जोशी, सुरेश महागांवकर, डेक्कन जिमखानाचे मुकुंद जोशी, अमित पाटणकर आणि राजेंद्र भामरे आदी मान्यवर उपस्थित होते.    

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: 

आरपीटीए सोलारिस वि.वि.ओडीएमटी ब 24-04(100अधिक गट: संजीव घोलप/रवी कात्रे वि.वि.उमेश दळवी/राम नायर 6-0; 90अधिक गट: जयंत पवार/हेमंत भोसले वि.वि.ज्ञानेश्वर कारकर/ज्ञानेश्वर जैद 6-1; खुला गट: रवी पांडे/फैजल अन्सारी वि.वि.सिद्धेश्वर वाघमारे/ विशाल जाधव 6-1; खुला गट: सिद्धू बी/अन्वित फाटक वि.वि.राहुल पाटील/राज कपूर 6-2;  

डायमंड्स वि.वि.सोलारिस फायटर्स 22-10(100अधिक गट: ध्रुव मेड/हनीफ मेमन पराभूत वि.मनोज पालवे/महेंद्र गोडबोले 4-6; 90अधिक गट: केदार देशपांडे/अमित नाटेकर वि.वि.राजू पिंपळे/सौरभ कारखानीस 6-2; खुला गट: केदार शहा/अभिषेक ताम्हाणे वि.वि. संतोष दळवी/महेंद्र गोडबोले 6-1; खुला गट: ध्रुव मेड/कौस्तुभ शहा वि.वि.राजेंद्र देशमुख/सचिन खिलारे 6-1);

एसपी सुलतान्स वि.वि.एसीई हंटर्स 24-03(100अधिक गट: प्रमोद उमरजे/मंदार मेहेंदळे पराभूत वि.मनीष आर्या/संजय बाबर 0-6; 90अधिक गट: संतोष शहा/आशिष डिके वि.वि.सुरेंद्र देशमुख/दीपक दिसा 6-1; खुला गट: स्वेतल शहा/हरकिरत सिंग वि.वि.दिपक गलगली/लक्ष्मीकांत शोत्री 6-2; खुला गट: मंदार मेहेंदळे/अद्वैत जोशी वि.वि.मयूर कुलकर्णी/आनंद परचुरे 6-0);

महाराष्ट्र मंडळ वि.वि.लॉ चार्जर्स 24-03(100अधिक गट: कमलेश शहा/संजय सेठी वि.वि.नितीन खैरे/नितीन राऊत 6-0; 90अधिक गट:अनिल कोठारी/आर देशमुख वि.वि.संदीप माहेश्वरी/पराग चोपडा 6-1; खुला गट: अभिषेक चव्हाण/रवी कोठारी वि.वि.राहुल मंत्री/समीर बाफना 6-1; खुला गट: अर्पित श्रॉफ/संजय सेठी वि.वि.केतन लुईकर/श्रीनिवास 6-1). 

भारतीय अर्थव्यवस्थेची गंभीर संकटाकडे वाटचाल: रघुराम राजन

0

नवी दिल्ली:
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशाच्या वित्तीय तुटीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाची असलेली भारतीय अर्थव्यवस्था वाढत्या वित्तीय तुटीमुळे अत्यंत चिंताजनक स्थितीकडे ढकलली जात आहे, असा इशारा त्यांनी दिला. प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ रघुराम राजन ब्राउन विद्यापीठातील ओपी जिंदाल व्याख्यानमालेदरम्यान बोलत होते.

गेली अनेक वर्षे अर्थव्यवस्था उत्तम होती

तुम्हाला राज्य चालवायचं आहे, स्वयंपाक करायचा नाही: शिवसेनेला सणसणीत टोला

0

बार्शी-: पुन्हा सरकार आल्यानंतर १० रुपयांत जेवण देण्याच्या शिवसेनेच्या घोषणेची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार खिल्ली उडवली आहे. ‘शिवसेनेची झुणका-भाकर योजना कधी बंद झाली ते कळलंही नाही आणि आता ते थाळी देणार आहेत. तुम्हाला राज्य चालवायचं आहे, स्वयंपाक करायचा नाही,’ असा सणसणीत टोला पवार यांनी शिवसेनेला हाणला आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आज आपला वचननामा जाहीर केला आहे. त्यात महाराष्ट्रातील जनतेला १० रुपयांत भोजन देण्याचं प्रमुख वचन देण्यात आलं आहे. हाच धागा पकडून पवार यांनी आपल्या खास शैलीत शिवसेनेवर हल्लाबोल केला. ‘युतीचं सरकार असताना शिवसेनेनं १ रुपयांत झुणका-भाकर ही योजना सुरू केली होती. मात्र, ही योजना कधी बंद झाली ते कळलंही नाही,’ असं पवार म्हणाले.

संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारासाठी आज बार्शीमध्ये आयोजित सभेमध्ये शरद पवार बोलत होते . ते म्हणाले,’राज्याच्या राजकारणात बदल करण्याची गरज आहे. यासाठी मी लोकांशी संपर्क साधतो आहे. काही लोक विकासाचे नाव सांगून आपल्याला सोडून गेले. बार्शीकर अशा पळपुट्या राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही.

मुख्यमंत्री म्हणतात इथे सक्षम विरोधक नाही. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. पण कुस्ती पैलवनाशी होते, इतरांशी नाही. जर सत्ताधाऱ्यांच्या मते इथे काही ताकदीच्या निवडणुका नाहीत तर मग देशाचे पंतप्रधान, पंतप्रधान राज्यात प्रचाराला का येतात? देशाचे गृहमंत्री म्हणतात शरद पवार यांनी ५० वर्षात काय केलं? त्यांना एकच प्रश्न करतो की तुमच्यातील एक माय का लाल दाखवून द्या जो सलग १४ वेळा निवडणूक जिंकला असेल.

हे शिवाजी महाराजांच्या नावाचे राजकारण करून सत्तेत आले. सत्तेत आल्यावर अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक बांधण्याचे आश्वासन खोटं ठरलं. इतक्यावरच थांबले नाही तर महाराजांची परंपरा जपणारे गडकिल्ले पर्यटनासाठी खुले केले. हीच किल्ल्यांची प्रतिष्ठा तुम्ही करता? इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे करण्याचे जाहीर केले मात्र तेही पूर्ण केलेलं नाही.

मुख्यमंत्री म्हणतात आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना ५० हजार कोटी दिले. हे म्हणजे नुसती उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. यांनी कर्जमाफी दिल्याचा पत्ता नाही म्हणूनच राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मुख्यमंत्री शेतकऱ्यांना लहान पोरंटोरं समजू लागले आहेत. फक्त मोठा आकडा दाखवून शेतकरी समाजाला फसवण्याचा काम त्यांनी केलं आहे.

आम्ही सत्तेत असताना शेकडो कारखाने काढले यातून लाखो हाताला रोजगार मिळाला. आजचे सत्ताधारी असलेले कारखाने बंद करण्याच्या भूमिका घेत आहे. लाखो तरुणांनी यातून आपला रोजगार गमावला. अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

आता एकायला येतंय की १० रुपयात जेवणाची थाळी मिळेल. राज्यात कुठे आणि किती ठिकाणी ही थाळी देणार. तुम्हाला राज्य करायला सांगतोय की स्वयंपाक करायला सांगतोय हाच प्रश्न पडलाय. अन्नधान्याचा प्रश्न आहेच, पण त्यासोबतच राज्यात इतर देखील प्रश्न आहेत.

 

सर्वात श्रीमंत ‘टॉप-५’ यादीत ४ गुजराती:अंबानी अव्वल तर अदानींची दुसऱ्या क्रमांकावर

0

अदानी समुहाचे सर्वेसर्वा उद्योजक गौतम अदानी यांनी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. फोर्ब्सने जारी केलेल्या नव्या यादीमध्ये देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे पहिल्या स्थानी आहेत. तर या यादीमध्ये अदानींने आठ स्थानांची झेप घेत दुसरे स्थान पटकावले आहे.

फोर्ब्सच्या यादीतील ‘टॉप १०’

१) मुकेश अंबानी – एकूण संपत्ती (३.५ लाख कोटी)
२) गौतम अदानी – एकूण संपत्ती (१.१० लाख कोटी)
३) हिंदुजा ब्रदर्स – एकूण संपत्ती (१.०९ लाख कोटी)
४) पालोनजी मिस्त्री – एकूण संपत्ती (१.०५ लाख कोटी)
५) उदय कोटक – एकूण संपत्ती (१.०२ लाख कोटी)
६) शिव नादर – एकूण संपत्ती (१.००८ लाख कोटी)
७) राधाकृष्ण दमानी – एकूण संपत्ती (१.००१ लाख कोटी)
८) गोदरेज फॅमिली – एकूण संपत्ती (८४००० कोटी)
९) लक्ष्मी मित्तल – एकूण संपत्ती (७३५०० कोटी)
१०) कुमारमंगलम बिरला – एकूण संपत्ती (६७२०० कोटी)

फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार ६२ वर्षीय मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही ५१.४ बिलियन डॉलर (अंदाजे ३ लाख ७० हजार कोटी) इतकी आहे. तर दुसऱ्या स्थानी असणाऱ्या अदानी यांची संपत्ती १५.७ बिलियन डॉलर (अंदाजे १ लाख १५ हजार कोटी) इतकी आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या दहामध्ये उद्योजक हिंदूजा बंधू, बांधकाम क्षेत्रातील पलोनजी मिस्त्री, बँकर उदय कोटक, तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे नाव असणारे शीव नादार, गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानिया, गोदरेज कुटुंबिय, पोलाद उद्योजक लक्ष्मी मित्तल, उद्योजक कुमार बिर्ला यांचा समावेश आहे.

तर देशातील १०० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये सहा जणांचा पहिल्यांदाच समावेश झाला आहे. यामध्ये बायजू या अॅपचे संस्थापक बायजू रविंद्रन, हल्दीरामचे मनोहर लाल आणि मधुसूदन अग्रवाल, टाइल्स व अन्य उत्पादने करणारी जॅग्वार या कंपनीचे मालक राजेश मेहरा यांचा पहिल्यांदाच अव्वल १०० श्रीमंतांमध्ये समावेश झाला आहे.

भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी अझीम प्रेमजी यांची दुसऱ्या स्थानावरुन १७ व्या स्थानावर घसरण झाली आहे. मार्च महिन्यामध्ये प्रेमजी यांनी गरीब, वंचितासाठी देण्यात येणाऱ्या देणगीमध्ये तब्बल ५२,७५० कोटी रुपयांची वाढ केल्याने श्रीमंत व्यक्तीच्या यादीमध्ये त्यांची पडझड झाली आहे. प्रेमजी यांच्या या निर्णायामुळे त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या एकूण देणगीची रक्कम १ लाख ४५ हजार कोटी रुपये इतकी झाली. समाजसेवासाठी देण्यात येणाऱ्या देणगीमध्ये त्यांनी बिल गेट्स यांनाही मागे टाकले आहे. आपली ५० टक्के संपत्ती दान करू अशी घोषणा काही वर्षांपूर्वी अझीम प्रेमजी यांनी केली होती. त्यानुसार व्हिप्रोच्या नफ्यातील मोठा वाटा ते अझीम प्रेमजी फाउंडेशनला दान करतात.

 

ऐका हो ऐका ,शिवसेनेचा वचननामा- आरे वृक्ष तोडीला विरोध ,एका रुपयात आरोग्य चाचणी, 10 रुपयांत जेवण; वीजही स्वस्त…

0

मुंबई – शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी आपला वचननामा शनिवारी प्रसिद्ध केला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर तो जाहीर करण्यात आला. यामध्ये एका रुपयात संपूर्ण आरोग्य चाचणी, 10 रुपयांत पोटभर जेवण आणि स्वस्त घरगुती वीज दरांसह विविध आश्वासने देण्यात आली आहेत. सोबतच, आरे मेट्रो कारशेडसाठी होणाऱ्या वृक्षतोडीला शिवसेनेचा विरोध कायम आहे असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकत्र लढणारे शिवसेना आणि भाजप महायुतीचा जाहीरनामा देखील एकत्रित प्रसिद्ध करणार अशी चर्चा होती. परंतु, आरे प्रकल्पासह विविध मुद्द्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत होऊ शकले नाही. त्यामुळेच, शिवसेना आणि भाजपने आपल्या पक्षाचे जाहीरनामे वेग-वेगळे प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, या जाहीरनाम्यात (वचननामा) विविध आश्वासने देत असताना उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचा आरे प्रकल्पाला विरोध कायम राहील असेही स्पष्ट केले आहे.

पूरग्रस्तांना घरे मालकी हक्काने देण्याचा निर्णय ऐतिहासिक

0

पुणे :पानशेत पूरग्रस्तांच्या सर्व मागण्या सोडविण्यात भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारला गेल्या पाच वर्षांमध्ये यश आले आहे. मुख्य म्हणजे पानशेत पूरग्रस्तांची घरे मालकी हक्काने करून देण्याचा निर्णय ऐतिहासिक ठरतो आहे, असे मत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले.

पाटील यांच्या प्रचारार्थ नुकतीच पूरग्रस्त वसाहत प्रभाग क्र 13 मध्ये पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेला भागातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीने या पदयात्रेचे स्वागत करण्यात आले.
पूरग्रस्त वसाहतीतील साई मंदिरात श्री. साईंचे दर्शन घेऊन श्री. पाटील यांनी या पदयात्रेस प्रारंभ केला. तर गणेशनगरमधील शनी-मारुती मंदिरात या पदयात्रेचा समारोप झाला. या पदयात्रेवेळी श्री दादांनी संपूर्ण परिसरातील नागरिकांशी संवाद साधला.
ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीने पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. तर महिलांनी औक्षण करुन दादांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यमान आमदार मेधाताई कुलकर्णी, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरीताई सहस्रबुद्धे, नगरसेवक दीपक पोटे आणि जयंत भावे आदी उपस्थित होते. या पदयात्रेमध्ये तरुणांसोबतच महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

गेल्या अनेक वर्षांपासून पानशेत पूरग्रस्तांचा प्रलंबित प्रश्न श्री. पाटील यांनी केवळ दोन बैठकीत सोडवल्याने पानशेत पूरग्रस्तांकडून श्री. पाटील यांचे प्रभागात जंगी स्वागत करण्यात आले. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत दादांना प्रभागातून मोठ्या मताधिक्य मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याची ग्वाही यावेळी पूरग्रस्त समितीचे मंगेश खराटे यांनी यावेळी दिली.

जुने वाडे आणि,पाणी प्रश्न सोडवण्यास पुढाकार घेणार – अरविंद शिंदे

0

पुणे  –  मध्यवस्तीतील पेठांमध्ये पाणीपुरवठ्याच्या तक्रारी लोकांनी मांडल्याच शिवाय जुन्या वाड्यांची दुरुस्ती, फेरबांधणी यातही लक्ष घालण्याची मागणी लोकांनी केली. लोकांना न्याय मिळून प्रश्नाची तड लागेपर्यंत पाठपुरावा करेन असे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे यांनी सांगितले.

कसबा विधानसभा मतदारसंघातील नाना पेठ, गणेश पेठ, बुधवार पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ परिसरात गुरुवारी पदयात्रा काढून अरविंद शिंदे यांनी लोकांशी संवाद साधला. वाड्यांमधील रहिवासी, जुन्या सोसायट्यांमधील रहिवासी यांनी आवर्जून भेटून आपल्या भागात पुरेश्या दाबाने पाणी येत नाही, अपुरा पाणीपुरवठा होतो अशा तक्रारी मांडल्या. विशेषतः महिला वर्गाने या तक्रारी मांडल्या. जुन्या वाड्यांच्या दुरुस्ती, फेरबांधणीत लक्ष घालावे, सर्वांना न्याय मिळेल अशी कामे व्हावीत अशी मागणी केली. शहराचा पाणीपुरवठा, जुन्या वाड्यांचे प्रश्न याविषयी महापालिकेत मी वारंवार बोललो आहेच, वेळप्रसंगी सत्ताधारी आणि प्रशासनाशी संघर्षही केला आहे असे सांगून शिंदे म्हणाले,  लवकरच मालक, भाडेकरू यांच्या बैठका घेऊन या प्रश्नाची तड लागेपर्यंत पाठपुरावा करेन.

मतदारसंघातील कामगार मैदान, पालखी विठ्ठल मंदिर, साखळी पीर तालीम, घसेटी पूल, रामोशी गेट, ढोर गल्ली, डुल्या मारुती, पोटसुळ्या मारुती, हमजेखान चौक, किराड ऑफिस, सोमेश्वर मंदिर, बढाई गल्ली, तांबोळी मशीद, जगोबादादा तालीम, कसबा गणपती, विष्णूपुरा, ढमढेरे बोळ, तपकीर गल्ली, दगडी नागोबा, देवजीबाबा चौक, दूध भट्टी या परिसरातून गुरुवारी पदयात्रा काढण्यात आली.

या पदयात्रेत विरेंद्र किराड, रविंद्र धंगेकर, बंडूअण्णा आंदेकर, वनराज आंदेकर, अजित दरेकर, सुनील शिंदे, दत्ता सागरे, रविंद्र माळवदकर, संतोष आरडे, राजेंद्र भणगे, सोमनाथ कुलकर्णी, गणेश नलावडे, राजू शेख, युसूफ शेख, मश्कुर शेख, मनिष आंदे, विलास जैन, तुषार सणस, बाबा चोक्सी, प्रवीण करपे, अजय दराडे, संदीप आटपाळकर, राजेंद्र आलमखाने, गोरख भिकुले, नितीन इंदलकर, वनिता जगताप, सरिता काळे, रत्ना नाईक आदी सहभागी झाले होते.

श्री अंबाजी मंदिराचा जीर्णोद्वार व सुवर्णमहोत्सवी वर्ष उत्साहात

0

पुणे- सातारा रोडवरील आदिनाथ सोसायटीमधील श्री अंबाजी मंदिरचा जीर्णोद्वार व सुवर्णमहोत्सवी वर्ष उत्साहात संपन्न झाला . आदिनाथ सोसायटीमधील पन्नास वर्ष जुने असलेले राजस्थान – गुजरात के धर्तीपर सांस्कृतिक व धार्मिक पारंपरिक रास दांडिया , माता कि चौकी व महाआरती कार्यक्रम संपन्न झाले . तसेच उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला . यावेळी लकी ड्रा काढण्यात आला .  यावेळी हजारो माताजी भक्त पूजा व सेवेसाठी या उत्सवात सहभागी झाले होते . नव्या मंदिरात अंबाजी , महालक्ष्मी सरस्वती , ओखीयाजी सुंदाजी माताजी व अन्य दोन मंदिरांना मिळून त्रिशिखरीय मंदिराची उभारणी मार्बलमध्ये करण्यात आली आहे . पुणे शहरात पहिल्यांदा अशा प्रकारे मंदिराची उभारणी करण्यात आली आहे . या मंदिराच्या उभारणीसाठी दहा हजार स्के. फूट मार्बलचा वापर करण्यात आला आहे .

श्री अंबाजी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून गरजू , होतकरू व अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाते . तसेच वैद्यकीय मदत केली जाते . वैद्यकीय तपासणी शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन देखील केले जाते . कला क्षेत्रामध्ये युवक युवतीना स्पर्धा व परीक्षेद्वारे प्रोत्साहित केले जाते . महिला व युवतींना योग्य सन्मान दिला जातो . व्यवसायिक कलाकारांच्या माध्यमातून नव्या कलाकारांना तयार केले जाते . अशी माहिती श्री अंबाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष  महेंद्र जैन यांनी दिली .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नितीन भंडारी , प्रमुख पाहुणे म्हणून अभय छाजेड , प्रविण चोरबेले , विशेष आमंत्रित मोहनलाल ओसवाल , विजय गांधी , मोहनलाल सोनिग्रा , कन्हेय्यालाल वाघरेशा , रमेश बाफना , लिलाचंद बाफना , अशोक पोरवाल , हितेश नीबजीया , ललित खिंवसरा , जयंत बाफना , सुनिल सरनोत , प्रकाश नीबजीया , विजयादशमी प्रयोअजक प्रिती बाफना , बडी सांझी प्रायोजक चंद्ररेखा प्रविण सोलंकी आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी श्री अंबाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भोगीलाल शहा , चेअरमन महेंद्र जैन , मॅनेजिंग ट्रस्टी महेंद्र खिंवसरा , मणिलाल ओसवाल , मदनलाल बलदोटा , प्रदीप गुंदेशा , हेमंत मसालिया , राजेश जैन , सल्लागार प्रविण गुंदेशा , राजेंद्र शहा, चंद्ररेखा सोळंकी , रेखा सोळंकी , भाग्यवती जैन , प्रभावती ओसवाल , शैला शहा , गीता जैन  आदीनी उत्सवासाठी विशेष परिश्रम घेतले . 

दक्षिण पुण्यावरअन्याय-आप च्या उमेदवाराचा आरोप

0

आम आदमी पक्षाचा पर्वती साठी जाहीरनामा प्रसिद्ध

पुणे:सर्वाधिक वर्दळीच्या स्वारगेट – सातारा रस्ता मार्गिकेवर मेट्रो प्रकल्प आखताना अन्याय झालेला आहे. डी पी आर मंजूर नाही. यासंदर्भात सत्ताधारी भाजपा -शिवसेनेकडून काहीही काम झाले नाही, अशी टीका आम आदमी पक्ष पर्वती मतदार संघातील उमेदवार संदीप सोनावणे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.पर्वती विधानसभा मतदार संघासाठी आम आदमी पक्षाने तयार केलेल्या जाहीरनाम्याबाबत माहिती देण्यासाठी संदीप सोनवणे यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती .या जाहीरनाम्यात त्यांनी पायाभूत सुविधेला प्राधान्य ,दिल्लीच्या ‘आप’ मॉडेल नुसार दर्जेदार सरकारी शाळा ,’आरोग्य सेवा हक्क कायदा ‘,महिला सुरक्षेसाठी १० हजार सीसीटीव्ही जाळ्याची उभारणी ,युवकांना रोजगार संधी, लोकसहभागातून शाश्वत विकास,विकेंद्रित कचरा व्यवस्थापन ,टेकड्या -नद्या -नाले यांच्यावरील अतिक्रमणे हटवणे ,टँकर माफियांना लगाम घालून समान दाबाने पाणीपुरवठा आणि आमदार निधी खर्च करताना जनतेचे प्राधान्यक्रम -मत जाणून घेण्याचे मुद्दे मांडले आहेत .

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आज संदीप सोनावणे यांनी पर्वती विधानसभा मतदार संघासाठीच्या जाहीरनाम्याची माहिती दिली. यावेळी इंद्रजित सदलगे ,प्रणित तावरे, सागर फाटक, सुभाष कारंडे याेगेश इंगळे, मोहनसिंग रजपूत आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी पर्वती मतदार संघात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचे आश्वासन दिले होते.ते आश्वासन कधीही पूर्ण झाले नाही . त्यासाठी निवडलेल्या लक्ष्मीनगर, बिबवेवाडी येथील जागा खासगी विकासकांच्या ताब्यात गेल्या आहेत. मित्र मंडळ चौकातील जिजामाता प्रसूती गृह हे हॉस्पिटल सत्ताधाऱ्यांकडून नीट चालवले जात नाही ,असे आरोप संदीप सोनवणे यांनी केले .स्वच्ह आणि प्रामाणिक राजकारण करून आम आदमी पक्षाने दिल्लीत परिवर्तन करून दाखवले आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी या प्रामाणिकपणाला साथ द्यावी ,असे आवाहन इंद्र नील सदलगे यांनी यावेळी बोलताना केले.जनतेच्या लोक वर्गणीतून आपण निवडणूक लढवीत आहोत .

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन

0

–    हिंदुस्थानातील मानाच्या पहिल्या सार्वजनिक गणपतीची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

पुणे- देश-विदेशातील श्री गणरायांचे भक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या भेटीसाठी आवर्जून पुण्यात येत असतात. गणपती दर्शनासाठी आवर्जून पुण्यात येणाऱ्या भक्तांमध्ये विदेशी पर्यटकांची संख्याही मोठी आहे. सध्या भारताच्या दौऱ्यावर असलेल्या आणि पुण्यात कसोटी सामना खेळण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंनी हिंदुस्थानातील मानाचा पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला कुटुंबियांसह भेट दिली व श्री गणरायाचे दर्शन घेतले.

विविध खेळांच्या निमित्ताने पुण्यात नेहमीच आंतरराष्ट्रीय खेळाडूंची रेलचेल असते. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट खेळाडूंनी जगभर ख्याती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या गणपतीचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांनी या क्रिकेटपटूंच्या इच्छेचा आदर करत त्यांना श्रींचे दर्शन घडवले.

दक्षिण आफ्रिका किकेट संघातील एनरिक नॉजे, जुबेर हमजा, डेन पीएड्ट आणि त्याची पत्नी, व्हर्नोन फिलँडर आणि त्याची पत्नी यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनातील दालनास भेट देत तेथील शस्त्रास्त्रे, अवजारे आणि फोटोंचे अवलोकन करत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी  यांच्याबद्दलची माहिती जाणून घेतली. त्या नंतर बोलताना खेळाडू म्हणाले की, आफ्रिकेच्या स्वातंत्र्य लढ्यात नेल्सन मंडेला यांनी निकराने लढा दिला होता. मंडेला यांनी आपल्या देशवासियांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी करून घेतले आणि भाऊ रंगारी यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनसामान्यात स्वातंत्र्याची बीजे रोवली, या दोघांच्याही कार्यात समानता असल्याचे मत या खेळाडूंनी मांडले.