Home Blog Page 2821

पुरोगामी, विवेकवादी, समाजवादी, डावे व गांधीवादी या सर्वांची ताकद मोठी आहे. – मधुसूदन मिस्त्री

0

पुणे-आज जेंव्हा भाजपा जमेल त्या मार्गाने सत्ता परत हस्तगत करण्यासाठी कोणताही विधी निषेध न
पाळता ज्या लोकांवर सतत भ्रष्टाचाराचे आरोप केले व ज्यांच्या विरोधात २०१४ साली लढले त्यानांच
आज आमिषे दाखवून जाहीर पक्षप्रवेश देत आहे. भाजपा ला सत्तेसाठी कशाचेही वावडे नाही अशा
परिस्थितीत काँग्रेसकडे मात्र विचारांवर निष्ठा ठेवून लढणारे बरेच जण आकर्षित होत आहेत. आज
पुण्यात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव श्री.मधुसूदन मिस्त्री काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे
माजी खासदार व माजी लोकसभा खासदार ह्यांच्या उपस्थितीत व अध्यक्षतेखाली रचनात्मक काँग्रेसची
महत्वपूर्ण बैठक एस. एम. जोशी सभागृह येथे पार पडली. काँग्रेस पक्षाचे माजी आमदार उल्हासदादा
पवार, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस  मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेअंकुश काकडे, काँग्रेस
पक्षाचे आमदार मा. डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत हया बैठकीत रचनात्मक कार्य करणारे
समाजातील विविध व्यक्ती व संघटना काँग्रेस पक्षाच्या राजकीय प्रवाहाशी कसे जोडले जातील यावर
सखोल चर्चा झाली. अध्यक्षीय भाषणात श्री. मधुसूदन मिस्त्री ह्यांनी धर्मांध शक्ती सोबत मुकाबला
करण्यासाठी उपस्थित सर्वांना काँग्रेस सोबत येण्यास आवाहन केले. या बैठकीला सर्व थरातील
सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत हजर होते. सर्वांनीच आजच्या देशासमोरील संकटांना व विविध प्रश्नांना
तोंड देण्यासाठी एकत्र प्रयत्न करणे गरजेचे आहे व विशेष करून धर्मांध ताकदींना थोपवण्यासाठी हे
एकत्र येणे काळाची गरज आहे असे मत मांडले. देशाचे ऐक्य व अखंडत्व हे धोक्यात आले आहे. आज
झुंडशाही, संविधानिक मूल्यांना दिली जाणारी तिलांजली, संस्थाच्या स्वायत्ततेला निर्माण झालेला धोका
ह्यामुळे व बहुमतवादामुळे देशात यादवी होईल इतकी गंभीर परिस्थिती देशासमोर आहे.

यामुळे सर्वांनीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्रपक्षांना येत्या महाराष्ट्र राज्य विधानसभा
निवडणुकीत देशहीतासाठी भरघोस मतदान करावे.
स्त्रिभृणहत्या रोखण्यासाठी गेले २५ वर्षे सतत लढवय्येपणे समाजकार्य करणाऱ्या गांधीवादी
ॲड. वर्षाताई देशपांडे, गांधी स्मारक निधी चे अन्वर राजन, कायदेतज्ञ व सामाजिक कार्यकर्ते श्री.

असिम सरोदे, किर्तनकार व कवी श्यामसुंदर सोन्नर महाराज, फ्रेंडस् ऑफ डेमोक्रसीचे डॉ. विवेक कोरडे,
टिचर्स डेमोक्रॅटीक फ्रंट चे श्री. हिरालाल पगडाल, सेवादलचे श्री. श्रीकांत लक्ष्मी शंकर, ग्रामश्री संस्थेच्या
ॲड. प्रभा सोनटक्के, अलीभाई शेख, ॲड. एम एस शिंदे, श्री. विकास निकुम्ब, माथेरानचे माजी
नगराध्यक्ष मनोज खेडकर, सातारचे माजी नगरसेवक रविंद्र झुटींग, पर्यावरण चळवळीचे युवक कार्यकर्ते
ह्रृषिकेश पाटील, दिपेंती चिकणे, संतोष देशपांडे, ॲड. चैत्रा, ॲड. वनराज पवार, शाहिर कैलास
जाधव, ॲड. शैलजा जाधव यांनी ह्यापुढे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षासाठी समाजात
जागरुकता निर्माण करण्याचा निर्णय आज जाहिर केला.
पुरोगामी, विवेकवादी, समाजवादी, डावे व गांधीवादी ह्या सर्वांची ताकद विखुरलेल्या अवस्थेत
असली तरी ती फार मोठी आहे व येत्या निवडणुकीत त्याचा प्रभाव नक्की जाणवेल.
त्यामुळे प्रत्येक मतदाराने देशहीतासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांनाच मतदान
करावे असे आवाहन पुरोगामी विचारवंत व संघटनांनी केले आहे.

राहुल गांधी, शरद पवार यांनी काश्मीरमध्ये ३७० असल्याचा देशाला कोणता फायदा आहे हे सांगावे-रविशंकर प्रसाद

0

पुणे-“जम्मू आणि काश्मीरमध्ये ७० वर्षापासुन कलम ३७० लागू होतं. त्यामुळे त्या ठिकाणी दहशतवाद फोफावला. बेरोजगारी वाढली. महिला असुरक्षित होत्या. या सर्व घटनांना काँग्रेस जबाबदार आहे,” अशी टीका केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली. काश्मीरातील जनतेला चांगले जीवन जगता यावे, यासाठी भाजपने कलम ३७० हटविण्याचा निर्णय घेतला गेला. त्यावरून चुकीच्या चर्चा करीत, विरोधकांकडून भाजपाला लक्ष करण्याचे काम केले आहे. त्यामुळे राहुल गांधी, शरद पवार यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये ३७० असल्याचा देशाला काय फायदा आहे हे सांगावे,” असा प्रश्न त्यांनी केला.

पुण्यात वकिलांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कायदा मंत्री रविशंकर प्रसाद हे बोलत होते. यावेळी रविशंकर प्रसाद म्हणाले, “जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यामुळे तेथील जनता सन्मानाने जगत आहे. आता तेथील परिस्थिती पूर्ववत झाली असून, शाळा महाविद्यालय सुरू झाली. बाजारपेठ सुरू झाली आहे. ही चांगली बाब आहे. आता भविष्यात जम्मू आणि काश्मीरमध्ये उद्योग व्यवसाय येतील. यातून तरुणाच्या हाताला रोजगार मिळेल. इतर राज्यातील शैक्षणिक संस्था येणार आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाचे, शिक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“मागील पाच वर्षात महाराष्ट्रात भाजपा सरकारने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविले आहे. आजवर या राज्यात ज्या पक्षांनी सत्ता भोगली आहे. त्यांनी कधीच सर्वसामान्य जनतेचा विचार केला नाही. आम्ही सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

रामजन्म भूमीची केस जिंकणार –

देशातील अनेक भागात कार्यक्रमाला गेल्यावर तेथील कार्यकर्ते माझ्या राजकीय वाटचालीचा परिचय करून देतात. एक वकील असल्याने, आयुष्यभर अनेक केस जिंकल्या आहेत. त्यामध्ये देशभरात गाजलेल्या चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना जेलमध्ये मी पाठवले.  राम जन्मभूमीचा खटला कित्येक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित होती. ती देखील केस मी जिंकली आहे. ही ओळख कोणत्याही माध्यमातून पुढे येताना दिसत नाही. हे देखील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करण्याची आवश्यकता आहे,” असे आवाहन प्रसाद यांनी केले.

पुण्याचे राष्ट्रवादीवाले माझ्या मतदार संघात प्रचाराला येतात कशासाठी ? पंकजा मुंडे यांचा सवाल

0

पुणे-पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माझ्या मतदार संघात प्रचाराला कशासाठी ? असा प्रश्न राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी येथील जाहीर सभेत बोलताना उपस्थित केला आहे पर्वती विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेद्वार माधुरी मिसाळ यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

येथील वाळवेकर लॉन येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. महायुतीमधील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी ,नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सभेसाठी उपस्थित होते. या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचे स्वागत मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.सभेसाठी नगरसेवक आणि कार्यकर्ते वाजत गाजत आणि मिरवणुकीने सभास्थानी आले. त्यामुळे वातावरण भारून गेले होते. त्यातच पावसाने हजेरी न लावल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले. शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ओसवाल,आणि आरपीआयच्या ( आठवले गट ) वतीने बाबुराव घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले.

पंकजा मुंडे यांनी सांगितले की , शहर आणि जिल्ह्यात महायुतीला चांगले वातावरण आहे. त्यामुळे यशाबद्दल कोणतीही चिंता वाटत नाही. निवडणूक म्हटली कि विविध प्रकारच्या अफवा पसरत असतात .पण त्यावर कोणताही विश्वास न ठेवता कार्यकर्त्यांनी काम करीत रहावे. त्यामुळे विजयश्री खेचून आणणे अवघड होणार नाही . आजची सभा हि प्रचाराची नाही तर विजयाची सभा झाली पाहिजे.

केंद्र सरकारने अनेकविध योजना आणल्या आहेत असे नमूद करून त्यांनी सांगितले कि, निवास ,स्वच्छतागृहांची सुविधा, स्वछता अभियान,अशा अनेक योजना केल्या आहे त्याचप्रमाणे राज्य शासनाने महिलांसाठी योज़ना राबवल्या आहेत.महिला बचत गटांच्या माध्यमातून सुमारे ४४ लाख महिला जोडल्या गेल्या आहेत. निवडणुकीच्या काळात आघाडीच्या वतीने कितीही चुकीचा प्रचार केला गेला तरी त्याचा उपयोग होणार नाही असे त्यांनी ठामपणाने सांगितले.

महायुतीच्या उमेदवार मिसाळ यांनी गेल्या दोन टर्म मध्ये केलेल्या विविध विकास कामाची माहिती सांगितली. याही निवडणुकीत मतदारांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट केले. या प्रतिसादामुळे निवडणुकीतील माझा विजय नक्की आहे असे त्यांनी सांगितले.

आमदार जगदिश मुळीक एक लाख मताधिक्याने विजयी होणार – खासदार संजय काकडे

0
वडगाव शेरी ःविधानसभा निवडणूकीमध्ये पुणे शहरातील आठ उमेदवार विजयी होतील. पुणे शहराचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे शहरात सर्वाधिक मताने विजयी होतील. त्यांच्या नतंर वडगाव शेरी मतदार संघातील आमदार जगदिश मुळीक एका लाखा पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होतील. वडगाव शेरी मतदार संघातील विरोधकांना मुळीक यांची धडकी भरली असल्याची मत   खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले. 
वडगावशेरी मतदार संघातील भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप  आणि शिवसंग्राम या महायुतीचे उमेदवार आमदार जगदिश मुळीक यांनी आज  आनंद पार्क, भैरवनगर, मुंजाबावस्ती, धानोरी गावठाण, कवलड मशिद गल्ली, कलवड जकात नाका या भागामध्ये पदयात्रेव्दारे प्रचार केला.  या पदयात्रेत राजू केसकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार काकडे बोलत होते. यावेळी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे,नगरसेवक अनिल टिंगरे,योगेश मुळीक,नाना सांगडे,राहुल भंडारे, नगरसेविका ऐश्वर्या जाधव, आबा खलसे,चंद्रकांत टिंगरे, आनंद गोयल,अशोक कांबळे, सचिन खांदवे,विशाल टिंगरे,किरण भालेराव,धनंजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी काकडे म्हणाले की,   वडगावशेरी मतदार संघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माननारी मोठा वर्ग आहे. या मतदार संघामध्ये आमदार जगदिश मुळीक यांचे काम चांगले आहे.  मतदार संघात आमदार मुळीक नगरसेवक आणि पदाधिका-यांची टीम चांगली आहे. यामुळे वडगाव शेरी मतदार संघामध्ये आमदार जगदिश मुळीक हे निवडणूक येणार हे निश्चित आहे. विरोधकांना अनामत रक्कम जप्त होण्याची भिती आहे. मुळीक यांच्या प्रचाराला नागरीकांचा उत्स्फर्त प्रतिसाद मिळत आहे. 
यावेळी मुळीक म्हणाले की, वडगावशेरी मतदार संघामध्ये केंद्र, राज्य आणि पालिकेच्या माध्यमातून मोठया प्रमाणात विकास काम केली आहेत. यामुळे  लोकसभा निवडणूकीमध्ये भाजप पक्षा चांगले मतदान झाले. लोकसभेची पुनावृत्ती विधानसभा निवडणूकीमध्ये् होणार आहे. 

सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारासाठी खा. संजय काकडे आणि नीलम गो-हे मैदानात

पुणे: विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस बाकी असताना आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे पुणे शहरातील वरिष्ठ कामाला लागले असून आज रविवारचा योग साधत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे आणि खासदार संजय काकडे यांनी शिवाजीनगर मतदार संघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (A), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला.

आज ज्ञानेश्वर पादुका चौक, वडारवाडी, पांडव नगर, दीप बंगला चौक या ठिकाणाहून नीलम गो-हे यांची शिरोळे यांच्या प्रचारासाठी प्रचार यात्रा झाली. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले पुणे शहराचे माजी उपमहापौर मुकारी अण्णा अलगुडे, आनंद मंजाळकर, ज्योत्स्ना एकबोटे,  स्वाती लोखंडे, सागर धोत्रे, नीता मंजाळकर, अपर्णा कुर्हाडे, दत्ता घोगलू, राजेश धोत्रे, राम म्हेत्रे, किरण ओरसे आदी या वेळी उपस्थित होते. यावेळी गोऱ्हे यांनी सिद्धार्थ शिरोळे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन शिवाजीनगर मतदार संघातील मतदारदारांना केले. यानंतर खासदार संजय काकडे यांच्या नेतृत्त्वाखाली जय जवान नगर नाईक वस्ती येथे बंजारा समाजाच्या तरुणांचा मेळावा देखील घेण्यात आला. या वेळी सिद्धार्थ शिरोळे यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले.
या आधी आज सकाळी सिद्धार्थ शिरोळे यांनी खडकी आणि संगमवाडी येथील दोन गुरुद्वारांना भेट देत आशीर्वाद घेतले. व त्यानंतर फर्गसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली येथे सिद्धार्थ शिरोळे यांनी नाष्टा करीत सामान्य मतदारांशी संवाद साधला. शिवाजी चव्हाण, जितू मंडोरा, प्रवीण शेळके, दत्ता खंडाळे आदी यावेळी उपस्थित होते. काल रात्री उशीरा जनवाडी पाच पांडव भागातील कोकणी रहिवासी नागरीकांनी सिद्धार्थ शिरोळे यांना आपला पाठींबा जाहीर केला. त्यावेळी संपूर्ण मतदार संघातून कोकणी लोक उपस्थित होते. याबरोबरच खडकी येथील सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख यांची आढावा बैठक देखील पार पडली. यावेळी उपस्थित सर्व प्रमुखांना सिद्धार्थ शिरोळे यांनी मार्गदर्शन केले.

भाजपचे फसलेले अर्थकारण फटका कष्टकरी आणि मध्यमवर्गाला -अरविंद शिंदे यांची टीका

0

पुणे : भाजपच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे कष्टकरी आणि मध्यमवर्गीय यांच्या मनात भवितव्या विषयी धास्ती निर्माण झाली आहे,अशी टीका कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे यांनी केली.

कसबा विधानसभा मतदारसंघात अरविंद शिंदे यांनी कोपरा सभा घेतल्या. चुकीच्या अर्थकारणाने बांधकाम क्षेत्रातील मजूर, सप्लायर यांच्या रोजगारावर गंडांतर आले आहे, पुण्याच्या एमआयडीसीतील भनेक कारखाने बंद पडल्याने त्यावर अवलंबून असलेला कष्टकरी अक्षरश : पिचला आहे, औद्योगिक क्षेत्रातील अधिकारीसुद्धा नोकरी बाबत धास्तावलेले आहेत. प्रचाराच्या निमित्ताने मतदारांशी संपर्क साधला तेव्हा आर्थिक संकटाबद्दल लोकांनी चिंता व्यक्त केली, असे शिंदे यांनी सांगितले. जागतिक मंदीच्या काळात मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांनी धीराने परिस्थिती हाताळली आणि देशातील गरीबाला मंदीची झळ बसू दिली नाही, असे शिंदे म्हणाले.

कोपरा सभांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सभांना गर्दी झाल्याने वाहतुकीची कोंडी होवू नये याकरिता कार्यकर्त्यांनी दक्षता घेतली. गंजपेठेतील मासे आळी येथे झालेल्या सभेत वीरेंद्र किराड , अजित दरेकर, महेश शिंदे , आदींची भाषणे झाली. राज्य सरकारने पुण्याच्या विकासाचे एकही नवे ठोस काम केलेले नाही अशी टीका वक्त्यांनी केली

,गंज पेठ परिसरातून शुक्रवारी पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये विरेंद्र किराड, वनराज आंदेकर, अजित दरेकर, कमलताई व्यवहारे,शांतीलाल मिसाळ, दयानंद अडागळे, बाळासाहेब मोरे, शकील शेख, आयुब पठाण, राजू नामेकर, उमेश काची विनय ढेरे, शिल्पा भोसले, मनीषा नेवसे, सारीका पारेख, सारीका जाधव, सुशिला गुंजाळ आदी सहभागी होते

चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रचारार्थ बालेवाडी बाणेर परिसरात आयोजित बाईक रॅलीला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

पुणे: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवार दि. १२ अॉक़टोबर रोजी प्रभाग क्रमांक ९ मध्ये आयोजित बाईक रॅलीला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक तरुण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेने झेंडे हातात रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारात चंद्रकांत दादा पाटील दिवसेंदिवस आपली पकड घट्ट करीत आहेत.
महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या बालेवाडी येथील कार्यालयापासून बाईक रॅलीला सुरुवात झाली. बालेवाडी गाव, बाणेर गाव,पासपोर्ट भवन, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, पाषाण गाव, शिवाजी पुतळा इथून ही रॅली मार्गस्थ झाली. तर सोमेश्वर मंदिर येथे रॅलीचा समारोप झाला. अनेक तरुण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेने झेंडे हातात या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर ठिकठिकाणी फटाक्याच्या आतिषबाजीने दादांचे जंगी स्वागत करण्यात आले.

या रॅलीत कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रकाश तात्या बालवडकर, नगरसेविका ज्योतिताई कळमकर, स्वप्नाली ताई सायकर यांच्यासह भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांतीचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.

पाषाण भागातील श्री सोमेश्वर मंदिर परिसरात रॅलीचा समारोप झाला. यावेळी दादांनी भगवान महादेवांची मनोभावे पूजा करुन, विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयासाठी महादेवांना साकडं घातलं.

टीम इंडियाकडून ही दादांना शुभेच्छा

बाईक रॅली बाणेर रोडवरून जात असताना, पुण्यातील गहुंजे येथील स्टेडियमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकादरम्यानच्या कसोटीतील खेळ संपवून टीम इंडिया बसमधून मुक्कामी हॉटेलवर जात होती. यावेळी टीम इंडियाला पाहून रॅलीतील तरुणांनी मोठा जल्लोष केला. या जल्लोषाला प्रतिसाद देत टीम इंडियाकडून दादांना शुभेच्छा देण्यात आल्या. तर दादांनी देखील टीम इंडियाला कसोटी विजयासाठी व्हिक्टरी निशाणी दाखवून प्रतिसाद दिला!

नागरी गरजांकडे दुर्लक्ष करून केवळ 370 वर भाजपचा जोर : डॉ. विश्वजित कदम

0

पुणे-राज्यात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, सांगली – कोल्हापूरचा महापूर याकडे भाजपने दुर्लक्ष करून विधानसभा निवडणुकीत केवळ 370 कलमवर जोर दिल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केली. काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विजय खळदकर उपस्थित होते.

370 कलम लागू करायला हवे होते. पण, त्यासाठी काश्मीरमधील जनतेला विश्वासात घेणे गरजेचे होते. हुकूमशाही पद्धतीने हे कलम रद्द करण्यात आले? या कलमाचा महाराष्ट्र्राचा निवडणुकीशी काय संबंध? राज्यातील स्थानिक प्रश्न वेगळे आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जनतेच्या मनात आक्रोश आहे. तो मतदानातून व्यक्त होईल. खासदार राहुल गांधी यांची महाराष्ट्रात सभा होणार आहे. तसेच ज्योतिरादित्य सिंधिया यांचाही सभांचे नियोजन सुरू आहे. राहुल यांनी सांगलीत वेळ दिला तर तिथेही सभा होणार असल्याचे विश्वजित कदम यांनी सांगितले.

राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सांगली – कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना कोणतीही मदत मिळाली नाही. अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. मात्र, केंद्राचे कोणतेही पॅकेज मिळाले नाही. व्यापारी, शेतकरी, नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या दरम्यान भाजपची मंडळी जल्लोष यात्रा काढण्यात व्यस्त असल्याची आठवणही त्यांनी करून दिली. प्रशासन पूर्ण अपयशी ठरले असून, आचारसंहितेचे कारण देऊन लोकांना काहीही मदत करण्यात आली नाही.

राज्यातील लाखो शेतकऱ्यांची शिवाजी महाराज यांचा कर्जमाफी योजनेखाली पोकळ घोषणा करण्यात आली. कागदोपत्री अनेक अटी या योजनेत टाकण्यात आल्या. शेतकरी योजनेसाठी पात्र ठरू नये, असेच नियम करण्यात आले. दरम्यान, कोथरूड मतदारसंघांत काँग्रेसकडे विजय खळदकर यांच्यासारखा प्रामाणिक कार्यकर्ता होता. त्यांना 2017 चा पुणे महापालिका निवडणुकीत कर्वेनगरमधून चांगली मते मिळाली होती. तरीही त्यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी का मिळाली नाही? मनसेला पाठिंबा का दिला ? अशी विचारणा केली असता, हा वरिष्ठांचा निर्णय असल्याचे विश्वजित कदम म्हणाले.

अमित शाह यांच्या रॅली मार्गावरील दुकानं, हॉटेल्स बंद ठेवण्याचे शिरूर पोलिसांचे आदेश

0

पुणे-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज शिरूर शहरात भाजपचे उमेदवार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रचारार्थ रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीला कोणताही अडथळा होऊ नये यासाठी या मार्गावरील सर्व दुकाने, हॉटेल्स बंद ठेवण्यासाठी पोलिसांनी व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या. मात्र दुकाने बंद ठेवल्यामुळे आपले नुकसान होणार असल्याचे दुकानदारांनी पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी दुकान सुरू ठेवण्यास परवानगी दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज शिरूर शहरात भाजपचे उमेदवार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रचारार्थ दुपारी साडेतीन ते पाच या वेळेत शिरूर शहरातील पाबळ फाटा ते बी जे कॉर्नर या मार्गावर ही रॅली होणार आहे. या रॅलीला कोणताही अडथळा होऊ नये यासाठी या मार्गावरील सर्व दुकाने, हॉटेल्स बंद ठेवण्यासाठी पोलिसांनी व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या.

मात्र दुकाने बंद ठेवल्यामुळे आपले नुकसान होणार असल्याचे दुकानदारांनी पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी दुकान सुरू ठेवण्यास परवानगी दिली.परंतु या दुकानासमोर कुठलीही वाहने पार्क करू नये अशी सक्त ताकीद दिली..

राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र केल्यावरच राजकारण स्वच्छ होईल – पंकजा मुंडे

0

चिंचवड – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस मुक्त देश व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मुक्त महाराष्ट्र ही दिलेली घोषणा प्रत्येक्षात आणल्याशिवाय राजकारण स्वच्छ होणार नाही. आघाडी हे जातीपातीचे राजकरण करत आहे. अशी टिका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी थेरगाव येथे केली.

चिंचवड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ थेरगावात आयोजित केलेल्या सभेत मुंढे बोलत होत्या.

त्यावेळी महापौर राहुल जाधव, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, राज्यसभा खासदार अमर साबळे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य खादी व ग्रामद्योग मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. हेमंत तापकीर, एकनाथ पवार, उमा खापरे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, “राष्ट्रवादीच्या घडाळ्यात १० वाजून १० मिनिटे असतात, हे घड्याळ २४ ऑक्टोबरला कायमचे बंद करायचे आहे. देशातील जनतेचा भाजपवर विश्वास असून त्यामुळे जनतेने भाजपला लोकसभेत निवडून दिले. भाजपने ३७० कलम रद्द करण्याचा दणदणीत निर्णय घेतला. त्याचा महिलांना अभिमान आहे, कारण देशात सर्वत्र तिरंगा फडकत आहे.”

पंकजा मुंडेंच्या सभेत नागरिकांचा गोंधळ, पोलिसांनी ताब्यात घेतलं!

0

पुणे-पिंपरी चिंचवड शहरात पंकजा मुंडे यांचे भाषण सुरु असताना  अवैध बांधकामे, रिंग रोड आणि शास्तीकर या मुद्द्यांकडे रहिवाशांनी त्यांचे  लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला दुसऱ्या पक्षाने पाठविले आहे असे पंकज मुंडे यांनी म्हटल्यानेया सभेत गोंधळ उडाला .काही नागरिकांनी गोंधळ घातल्याच्या प्रकरणी पोलिसांनी त्यांना  ताब्यात घेतले आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारानिमित्त आज (13 ऑक्टोबर) पंकजा मुंडे यांची थेरगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, सदाशिव खाडे उपस्थित होते.

पंकजा मुंडे यांचे भाषण सुरू असताना सभेतील काही महिलांसह नागरिकांनी पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामे, रिंग रोड आणि शास्तीकर या मुद्द्यांकडे मुंडे यांचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला. रिंगरोडचा प्रश्न सुटला पाहिजे. तसेच रिंग रोडमुळे अनेकांची घरे बाधित होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे असे म्हणतात. इथे मात्र आमच्या घरांवर हातोडा मारून आम्हाला बेघर केले जात आहे. अवैध बांधकामे, शास्तीकर 100 टक्के रद्द झाला पाहिजे अशी सभेला उपस्थित असलेल्या महिलांनी मागणी केली. त्यामुळे स्टेजवरील स्थानिक नेते मंडळी देखील अवाक झाले. भांबावून गेले.

गोंधळ सुरू असताना देखील पंकजा मुंडे यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. तुमच्यावर दुसऱ्या पक्षाची छाप आहे असा आरोप मुंडे यांनी करताच आम्ही कोणत्या पक्षाचे नसल्याचे नागरिकांनी त्यांना ठणकावून सांगत आम्हाला कोणी पाठविले नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर शांत राहा… शांत राहा… लोकशाहीत हे घडणे अपेक्षित आहे. घराचा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ घोषणा देणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

मुलांनी आई-बाबा, तर आई-बाबांनी मुलांच्या भूमिकेत जायला हवे : डॉ. सलील कुलकर्णी

0
पुणे-
आई-बाबा आणि मुलांनी एकमेकांच्या भूमिका बदलून बघितल्या पाहिजेत. कधी मुलांनी आई-बाबा, तर कधी आई-बाबांनी मुलांच्या भूमिकेत जायला हवे, अशी अपेक्षा डॉ. सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केली. 
            ग्लोबल ग्लोबल स्टार फाउंडेशन व इंडियन टॅलेंट सर्च अकॅडमी यांच्यातर्फे संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त नीतू मांडके सभागृह येथे ‘डॉ. सलील कुलकर्णी संगीत साधना पुरस्कार’ तसेच आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त ‘स्वरसलील’ ही गाण्याची विशेष मैफिल ग्लोबल स्टार संस्थेच्या कलाकारांनी सादर केली. यावेळी संस्थेच्या संस्थापिका सारिका दीक्षित, तेजस चव्हाण, रघुनाथ खंडाळकर, जाधवर एज्युकेशन ग्रुपचे उपाध्यक्ष शार्दुल जाधवर, वूमन हाईक संस्थेच्या संचालिका सुजाता मेंगाने, चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचे संचालक संजय देशपांडे, प्रिया कोठारी, डाॅ.अर्चना जगताप आदी उपस्थित होते.
           यंदाचा ‘डॉ. सलील कुलकर्णी संगीत साधना पुरस्कार’ ध्वनी अभियंते श्रेयस दांडेकर यांना, ‘आदर्श शाळा पुरस्कार’ स्माईली फेस प्री स्कुल, पुणे यांना, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार रश्मी पाडगावकर यांना, आदर्श शाळा पुरस्कार सीएम इंटरनॅशनल स्कूल बालेवाडी यांना, आदर्श शिक्षक पुरस्कार रामचंद्र सकट, बेबीनंदा सकट, बाळासाहेब घोडे, मनीषा घोडे यांना प्रदान करण्यात आला. 
         डॉ. सलील कुलकर्णी म्हणाले, की आज धावपळीमुळे आईवडील आणि मुले यांच्यातला संवाद कमी होत चालला आहे. हा संवाद वाढण्यासाठी कधी मुलांनी आईवडिलांच्या भूमिकेत, तर कधी आईवडिलांनी मुलांच्या भूमिकेत जायला हवे. आजी आजोबा आपल्या नातवाला ज्या गोष्टी सांगतात, त्या कुठल्याही पुस्तकात किंवा लिखित स्वरूपात आपल्याला मिळणार नाहीत. ध्वनिमुद्रण हे चित्रपट, संगीत, गाणी यांचा अविभाज्य घटक बनले आहे. त्यामुळे गायकांनी गायलेली किंवा संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली गाणी उत्तमरित्या मुद्रित करणे गरजेचे असते, तेव्हाच ते लोकांपर्यंत पोहोचते. 
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक अविनाश रसाळ यांनी, प्रास्ताविक संस्थापिका सारिका दीक्षित यांनी, तर आभार फाउंडेशनच्या अध्यक्ष राजश्री दवनी यांनी मानले.

मित्रत्व कि शिष्टत्व : कसब्यात कळीचा मुद्दा…

पुणे – प्रत्यक्षात आता जाती पाती च्या बाहेर जावून मित्रत्वाच्या वातावरणात मतदाराला  सामावून घेऊन,आपली समस्या स्वतःची समजून , प्रसंगी अभ्यासू कार्यशैलीने अडचणींवर मात करून सुरळीत सुसह्य जीवन उपलब्ध करून देणाऱ्या उमेदवाराला कसबा कायम स्वीकारत आला आहे आणि याच मार्गावर आज हि कायम असूनही,राहूनही   आता मात्र कसब्यात इतिहास घडेल असा आशावाद वैचारिक मतदारांच्या पातळीवर दिसतो आहे.

कसब्याचा  ‘जातीय रंग ‘खोटा ?

खरे तर वैयक्तिक आणि खाजगी जीवनात आजकाल जाती पातीचे कोणाला काही फारसे उरलेले  नाही . पण जाती पातीत तेढ निर्माण करणारे प्रसंग,घटना आणि विचारांची पेरणी  मात्र नेहमी सातत्याने होत आली आहे. आणि त्यास अनेकदा सामान्य ,ज्याच्या जीवनशैलीत  प्रत्यक्षात जाती पातीला महत्व नाही असाच माणूस बळी पडल्याचे दिसले आहे. कसबा मतदार संघ हा ब्राम्हण मतदारांचे वर्चस्व असलेला मतदार संघ आहे हा कसब्यावर बसलेला शिक्का आहे . त्यास कारण देखील आहेच.ते हि कि, इथे सातत्याने ब्राम्हण समाजाचाच आमदार निवडून आला आहे . भाजपचे बापट इथे 25 वर्षे आमदार होते आणि आता ते खासदार आहेत .पण त्यांनी ज्यास विधानसभेत पाडले त्यात रोहित टिळक नावाचे अन्य एक ब्राम्हण उमेदवार देखील होते याकडे देखील् लक्ष वेधले जाते आहे.

कसबापेठ मतदारसंघातील जातीय समीकरण

समाज जात/धर्म तपशील अंदाजे म. संख्या
मुस्लीम 27500
अनुसूचित जाती (एस. सी.) 29000
अनुसूचित जमाती (एस. टी.) 12500
इतर मागासवर्गीय 97500
मराठा व कुणबी 78000
ब्राह्मण 37000
इतर घटक (जैन,ख्रिश्चन इ.) 18500
एकूण मतदारसंख्या सरासरी 300000

म्हणजेच निव्वळ ‘मोठ्ठ घर आणि पोकळवासा …असे नकोय तर कसब्याला आपल्या कोणाशी हि बोलेल ,प्रश्न जाणून घेईल ,त्यावर उत्तर शोधायचा प्रयत्न करेल असाच आमदार हवाय , दादागिरी करणारा , शिष्ट किंवा शाही थाटात वागणारा नकोय असे हि म्हणता येईल .आणि बापट हे बहुतांशी काळ विरोधी पक्षाचे आमदार होते आणि त्यावेळी त्यांचा  अन्य पक्षांतील लोकांशीही सुसंवाद होता .नेमका हाच त्यांचा स्वभाव इथे कायम विजय मिळवून देत गेला . पण तरीही मूळ पुण्याच्या समस्या मात्र अजूनही मूळ पुण्याला चिकटून आहेत हे मात्र दुर्दैव आहे .खरे तर इथे ब्राम्हण समाजाचा मतदार केवळ ३७ हजाराच्या आसपास आहे आई अन्य समाजाची मते सुमारे २ लाख ७० हजाराच्या घरात आहेत .आता ब्राम्हण समाजाची मते एक गठ्ठा राहतात आणि इतर समाजची मात्र विभागली जातात असे कोणी म्हणेल पण तशा म्हणण्याला कुठे आधार सापडत नाही. कारण

 कसबा पेठ लोकसभा 2019 मते
भाजप 103583
काँग्रेस 51192
वंचित 2471
नोटा 1831
पोस्टल वोट विभागून 2079
एकूण मतदान 161156
एकूण मतदार अं 285890

कारण भाजपच्या बापटांना कसब्या ने अलीकडच्याच लोकसभेला  दिलेले मताधिक्य प्रचंड आहे .पण म्हणून तेच विधानसभेला राहील असे मात्र म्हणता येणार नाही कारण आता भाजपचा उमेदवार च बदललाय एवढेच  नाही तर नागरी समस्यांशी थेट संबधित निर्णय घेणारी हि निवडणूक आहे.विधानसभा ,मंत्रालय आणि महापालिकेला आदेश देवून कामे करवून घेणारे मंत्रालय या निवडणुकीशी थेट संबधित असणार आहे .

खरे तर मेख इथेच आहे . जुने ते सोने असे लोक विविध क्षेत्रात अजूनही बोलतात . तसेच जुन्या पुण्याचे गोडवे ते काय गावे …खरोखर एक शांत , निसर्गरम्य असे पुणे शहर होते .मूळ पुणे होते ,जे ऐतिहासिक देखील आहे . पण या जुन्या पुण्याची आता वाट लागलीय .जुने  वैभव आता नाहीसं झालंय, बदलत्या जमान्याला सामोरे जात का होईनात पण इथे हि लोकांचे मुलभूत हक्क जपले गेले पाहिजे होते ज्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत गेल्याने मूळ पुणे सोडून लोक राहण्यासाठी बाहेर ,बाहेर जावू लागले.बाहेरून येणाऱ्या लोकांची वाहने यावीत जावीत ,आणि ती उभी करता यावीत म्हणून या मूळ पुणेकरांच्या हक्कावर गदा आणली गेली ,त्यांच्या जागा हिरावून घेण्यात आल्या .बाहेरील पाहुण्यांनी कोतवाल चावडी सारखी ऐतिहासिक वास्तू हि शिल्लक ठेवल्या नाहीत .अशा हि अवस्थेत मूळ पुणेकराने साऱ्या व्यथा सोसत तक्रारी केल्या नाहीत .

पण आता हे सारे सोसून आमचे हक्क ,आमचे प्रश्न घेऊन आम्ही आमच्या मतांवर निवडून आलेल्या आमच्या लोकप्रतिनिधीकडे गेलो आणि त्याने शिष्ट कारभार केला ,’मी कोणी फार मोठा ‘ आहे असा आवेश ठेवून वर्तन ठेवले तर निमुटपणे माघारी यायचे काय ?हा प्रश निराम्न होवू पाहतो आहे. मला हक्काने सांगता येईल कुठे हि कधी हि बोलता येईल ,गाऱ्हाणी  सांगता येतील आणि ‘तो ‘ हो तातडीने आपली स्वतःची अडचण समजून त्यावर हालचाली करेल ,प्रेमाने मित्रत्वाने आपल्याशी संवाद करेल , आणि असलाच भ्रष्ट कारभार तर त्याला मोडून काढेल असा लोकप्रतिनिधी खरे तर आता जनतेला हवाय ..निव्वळ नाव मोठ्ठ, आणि शिष्टाई चा डोंगर मेंदूत …  काय झालं जर ,इतरांच मेलं  ; स्वतःच तर  भागलं ..अशी वृत्ती असणारी पुढारी मंडळी कसबा या निवडणुकीत हद्दपार करू शकणार आहे.

‘नोटा’ हा सुद्धा कायदेशी अधिकार आणि खऱ्याखुऱ्या लोकशाहीचा सुयोग्य महामार्ग –

गेल्या पाच वर्षापूर्वीच म्हणजे 2014 च्या कसब्याच्या  विधानसभा निवडणुकीत ४८९ मतदारांनी योग्य लायक उमेदवार नसल्याने नोटाला मतदान केले होते हि संख्या आता झालेल्या लोकसभेला १८६० वर गेली आहे. यामध्ये २९ पोस्टल म्हणजेच शासकीय नोकरदार मतदारांनी सर्व उमेदवारांना नाकारले आहे.  म्हणजेच विद्यमान खासदार यांना देखील लोकसभा निवडणुकीत १८६० मतदारांनी नाकारले आहे.मतदान करणे हा हक्क आणि कर्तव्य जरूर आहे. पण म्हणून का कोणाही अपात्र उमेदवाराला मतदान करून पायावर धोंडा पाडून घ्यायचा काय ?तर अशा वेळी ‘नोटा ‘म्हणजे यातील एक हि उमेदवार पसंत नाही हा पर्याय दिला आहे आणि तो देखील मतदाराचा कायदेशीर हक्क आहे हे विसरता कामा नये . आता काही राजकीय लोक असा प्रचार करतात ,कि मत वाया कशाला घालविता ? पण हा प्रचार निव्वळ स्वार्थी प्रचार असतो हे ध्यानांत घ्यायला हवे . झालेल्या मतदानात सर्वाधिक  टक्केवारी अशा ‘नोटा’ मतदानाची निघाली तर न्यायालयांना देखील हि यात निवडून आलेल्या उमेदवाराला घरीच पाठवावे लागेल , ग्राह्य धरता येणार नाही हे निर्विवाद आहे. .हळू हळू आता ‘नोटा ‘ चे हे महत्व नागरिकांना समजू लागलेय आणि ते जसे सर्व व्यापी होईल तसा भारतीय लोकशाहीत अमुलाग्र बदल होवून; शिस्तीच्या नावाखाली शिष्ट स्वभावाचा कारभार हाकणारे ,राजेशाही राबवू पाहणारे ,मनमानी करणारे ,फसवेगिरी आणि संधी साधू राजकारण्यांचा यांचा पाडाव होईल आणि लोकात मिसळणारे ,जन मैत्रीची भावना दृढ करणारे नागरिकांची समस्या हि आपली स्वतःची समस्या मानून त्यावर उपाय योजना करणारे ,प्रशासनातील हेकेखोर ,अपप्रवृत्तीला वेळीच ठेचणारे यांचा राजकारणात उदय होईल आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीची हिरवळ ,लोकशाहीचा सुगंध देशभर दरवळू लागेल यात शंका नाही .’नोटा ‘चा उद्देशच चांगली ,सत्प्रवृत्तीची माणसे राजकारणात येणे हा आहे हे लक्षात घेतले पाहिजे .एवढे सारे असले तरी राजकीय पक्ष मात्र उमेदवारी देताना काय पाहतात ?हा प्रश्न जर प्रत्येकाने स्वतःला विचारून पाहिला तर आपले उत्तर निश्चितच मिळेल .

शहरातील पुराचे खरे आरोपी कोण ?

0

‘शहरी पूरसमस्येवर परिसंवाद

पुणे : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया यांच्या वतीने ‘शहरी पूरसमस्या सत्य व मिथक’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी (दि.१५ ऑक्टोबर) सायंकाळी ६.१५ वाजता फिरोदिया सभागृह, दि  इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, शिवाजीनगर येथे हा परिसंवाद होणार असून, तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. डॉ. वि. वि. भोसेकर, डॉ. दि. मा. मोरे, अभिजित घोरपडे, डॉ. मंगेश कश्यप आदी मान्यवर या परिसंवादात सहभाग घेणार आहेत, अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र सराफ यांनी दिली.
”वादळासहित पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्याचे तीन मुख्य मार्ग आहेत, वादळ पाण्याचे गटारे, पाणी जमिनीत मुरवणे आणि साठवण टाक्यांमध्ये संग्रह करणे. आपल्याकडे बहुतेक सर्व शहरात वादळी पावसाच्या नियोजनकडे गांभीर्याने बघितल्या जात नाही. गटारातून वादळाचे पाणी व सांडपाणी वाहून जात असे. शहरीकरण झाल्यामुळे नैसर्गिक अडथळे आणि पाण्याचे जमिनीत मुरणे मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. निचरा न झाल्यामुळे पावसाचे पाणी तुंबते वा खूप वेगाने वाहायला लागते. भूमी वापराच्या पद्धती बदलल्यामुळे पाणी तुंबण्याचा व वाहण्याचा वेग वाढला आहे. त्यामुळं शहरात पूर सदृश परिस्थिती निर्माण होते. ह्यालाच शहरी पूर असे म्हणले जाते. नगररचना व विकासाचा एक भाग म्हणून पावसाच्या पाण्याच्या व्यवस्थापनाविषयी विचार करण्याची तातडीने गरज आहे. शहरास स्मार्ट बनविण्यासाठी हे देखील एक महत्वाचे मापदंड आहे. ‘शहरी पूरसमस्या सत्य व मिथक’ या परिसंवादाच्या माध्यमातून या विषयावर प्रकाश टाकण्यात येणार आहे,” असेही सराफ यांनी नमूद केले.

अध्यात्माच्या मार्गावर चालणे गरजेचे -डॉ. विकास आबनावे

0
अलख निरंजन’ विशेषांकाचे प्रकाशन
पुणे : “ब्रह्मचर्य, अपरिग्रह, अस्तेय, अहिंसा, सत्य या पायावर अध्यात्म शास्त्राची निमिर्ती होते. खऱ्या अर्थाने नऊ दिवस उपवास केले, तर पचनसंस्थेला विश्रांती मिळते. यातून वाचलेल्या प्राणशक्तीतून शरीरातील नऊ विकार नाश पावतात. चित्तशुदधी, मनशुदधी आणि वाचाशुदधी होते. त्यामुळे अध्यात्माच्या मार्गावर चालणे गरजेचे आहे,” असे मत प्रसिद्ध व्याख्याते महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांनी व्यक्त केले.
नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्टच्या वतीने प्रकाशित ‘अलख निरंजन’ विशेषांकाचे प्रकाशन देवेन्द्रनाथ मठामध्ये झाले. अंकाचे हे ४५ वे वर्ष आहे. यावेळी कालभैरव मठ, पायधुणी मुंबई येथील श्री श्री श्री १००८ महंत पीर-योगी, भाईनाथ महाराज, नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्टचे चेअरमन खालकर, कार्यकारी मंडळाचे सदस्य सामंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे आणि नाथभक्त मोठया संखेने उपस्थित होते.
डॉ. विकास आबनावे म्हणाले, “भारतीय संस्कृती अध्यात्माच्या पायावर उभी आहे. जगातील सर्व देश भारतीय संस्कृतीला मानतात. यामध्ये प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय जोड असलेली पाहायला मिळते. उपवास करण्यामागे एक शास्त्र आहे. आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून आपण आपल्या धर्मातील चाली- रीती, रूढी-परंपरा जपल्या पाहिजेत.” संयोजन सुदीप प्रधान यांनी केले. या ‘अलख निरंजन’ अंकाला गेली अनेक वर्षे सर्वोत्कृष्ट अंकाचे पारितोषिक मिळत आहे.