Home Blog Page 2820

अखेर नारायण राणेंचा ‘स्वाभिमान’ भारतीय जनता पक्षात विलीन

0

सिंधुदुर्ग -पाच वर्षाचा शेंबडा मुलगाही महायुतीचं सरकार येणार सांगतो असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
कणकवलीत भाजपाचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांसोबत भाजपात प्रवेश केला. तर नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करत असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नारायण राणेंचं कौतुक करत नारायण राणे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळं स्थान असून, सर्व विषयाची जाण असणारे नेते असल्याचं म्हटलं. तसंच नारायण राणे भाजपातच होते, त्यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेशाचा प्रश्नच नाही असंही त्यांनी म्हटलं. राणेसाहेब भाजपाचे खासदार म्हणून नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात राज्यसभेत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

नितेश राणे यांनी यावेळी अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. “हा प्रवेश मुंबईत व्हावा अशी अनेकांची इच्छा होती. पण सिंधुदुर्गातील लोकांचं कणकवलीत प्रवेश व्हावा असं म्हणणं होतं त्यामुळेच येथे प्रवेशाचा कार्यक्रम करण्यात आला,” असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त करत एकूण मतदानाच्या ६० ते ७० टक्के मतं मिळतील असा दावा केला. देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना यावेळी संयम बाळगण्याचा सल्ला दिला. “नितेश राणे आक्रमक आहेत, कारण ते नारायण राणेंच्या नेतृत्त्वात घडले आहेत. पण नितेश राणे यांना आता आमच्या शाळेत घेतलं आहे. त्यांना आमच्या शाळेत संयम शिकवणार आहोत. नारायण राणे जिथे आक्रमक व्हायचं तिथं होतात, संयम बाळगायचा तिथे बाळगतात,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.
मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला आहे. स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे कणकवली येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज अखेर भाजपात दाखल झाले. तसेच, त्यांनी आपला स्वाभिमान पक्षही भाजपात विलीन केला आहे. यावेळी नारायण राणेंचे सुपूत्र माजी खासदार निलेश राणे हेदेखील उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात राणे कुटुंबातील कोणीही शिवसेनेचा एकदा ही उल्लेख केला नाही. नितेश राणे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला.

काँग्रेस ने धार्मिक सलोखा जपून देशाचा विकास साधला – रमेश बागवे

0

पुणे-कोणत्याही कट्टरवादापेक्षा धार्मिक सलोखा हाच देशाला एक सांध ठेऊ शकतो. काँग्रेसने धार्मिक एकोपा जपून देशाचा विकास साधला, असे प्रतिपादन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महा आघाडीचे कॉन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे उमेदवार रमेश बागवे यांनी केले. सकाळी कॅन्टोन्मेंट भागात झालेल्या पदयात्रे दरम्यान रमेश बागवे यांनी बाबाजान दर्गा, राम मंदिर, चर्च, बौद्ध विहारांनाही भेटी दिल्या. बाबाजान दर्गा येथे रमेश बागवे यांनी चादर चढवून माथा टेकवत आशीर्वाद घेतला. तर कॅम्प मधील राम मंदिरात जाऊन नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले.

सर्व धर्म समभाव हाच भारताचा आत्मा असल्याचे नमूद करत रमेश बागवे यांनी सर्व धर्मियांच्या गाठी भेटी घेतल्या. त्यांच्या स्थानिक समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

आज सकाळी साचापीर स्ट्रीट वरून या पदयात्रेची सुरुवात झाली. उमरशहा दर्गा, जुना मोदीखाना, सुप्रिया सोसायटी, सागर सोसायटी, बच्चू अड्डा, गवळीवाडा, दस्तुर मेहेर, कोकणी मोहल्ला, श्रीकृष्णा मंडळ, रेडिओ हॉटेल, दबाईर लेन, चारबावडी पोलीस चौकी, बाबाजान चौक, मार्गे केदारी रोड, शिंपी गल्ली, सेंटर स्ट्रीट, भीमपुरा, बंदर वस्ताद तालीम येथे समारोप झाला.

या पदयात्रेस नगरसेवक रफिक शेख,माजी कॅन्टोन्मेंट सदस्या संगीत पवार, माजी कॅन्टोन्मेंट सदस्य प्रसाद केदारी, मंजूर शेख, रशीद खिजर, आसिफ शेख, वाहिद बियाबानी, जॉन मोहमद शेख, अमीर सय्यद, सुवर्णा उरड, धनंजय उरड आदी मान्यवर पदयात्रेस उपस्थित होते.

शिवाजीनगर मतदार संघ पिंजून काढत सिद्धार्थ शिरोळे यांचा प्रचार

0

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवस शिल्लक असताना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (A), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे शिवाजीनगर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे आपला मतदार संघ पिंजून काढत आहेत. गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये सिद्धार्थ शिरोळे हे संपूर्ण मतदार संघामध्ये पदयात्रा, प्रचारफे-या याबरोबर विविध समाजाचे मेळावे, मंदिरे, गुरुद्वारा आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देत त्या त्या भागातील नागरिकांशी संवाद देखील साधत आहेत.

आजही शिवाजीनगर मधील पुलाची वाडी, खंडोजीबाबा चौक, खिलारे वसाहत या ठिकाणी पदयात्रेद्वारे त्यांनी नागरिकांच्या गाठी भेटी घेऊन शुभ आशीर्वाद घेतले. या वेळी नागरीकांनीही त्यांच्या पाठीवर हात ठेवीत आपल्या अपेक्षा त्यांना मनमोकळेपणाने सांगितल्या. भाजपा शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, नगरसेविका नीलिमा खाडे, ज्योत्स्ना एकबोटे, दीपक पोटे,श्याम सातपुते, शिरीष आपटे, स्वाती लोखंडे, अतुल दिघे, अनिरुद्ध पायगुडे, जालिंदरनाथ मोरे, रवींद्र मोरे, भूषण देवकर, मोहन दिघे, राम दिघे, अतुल दिघे, दत्ता खंडाळे, जितू मंडोरा आदी या वेळी उपस्थित होते.

याशिवाय काल माजी आमदार विनायक निम्हण आणि माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी देखील सिद्धार्थ शिरोळे यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली. माजी खासदार अनिल शिरोळे हे देखील या वेळी उपस्थित होते. शिवाजीनगर मतदार संघासाठी महायुतीकडून दूरदृष्टी असलेल्या सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आल्या नंतर त्यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यात येईल, असे निम्हण या वेळी म्हणाले.

कसब्या’त काँग्रेस आघाडीच्या कोपरा सभांना प्रतिसाद

0
पुणे: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीच्या नेत्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे यांच्यासाठी ठिकठिकाणी कोपरा सभा घेऊन सोमवारी प्रचाराचा धडाका लावला. प्रत्येक सभेला लोकांनी गर्दी केली आणि घोषणा देऊन जोरदार प्रतिसाद दिला.
कसबा मतदारसंघातील अपुरा पाणी पुरवठा, वाहतूक कोंडी अशा दैनंदिन जीवनाला भेडसावणाऱ्या प्रश्नांपासून महाराष्ट्रातील बंद पडलेले दोन लाख छोटे मोठे कारखाने, नोकरकपात, भाजपने दिलेल्या आश्वासनांमधील खोटेपणा यावर वक्त्यांनी भर देऊन सरकारवर जोरदार टीका केली. कसबा मतदारसंघातील पेठांमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न अगदी बिकट आहे, महिलांमध्ये याविषयी तीव्र असंतोष असून सत्ताधारी भाजपच्या निष्क्रीयतेबद्दलचा राग मतपेटीत उमटेल असे वक्त्यांनी सांगितले. पेठांमधील पाणीप्रश्न  कॉंग्रेसने वारंवार मांडला, आंदोलन केली असे सांगितले आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार अरविंद शिंदे पाण्याचा प्रश्न सोडवायला प्राधान्य देतील अशी ग्वाही नेत्यांनी दिली.
,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार अरविंद शिंदे यांच्या प्रचारार्थ नागेश्वर मंदिर ,दारुवाला पूल, डुल्या मारुती ,गोविंद हलवाई या चौकांमध्ये कोपरा सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये रविंद्रजी माळवदकर, वनराज आंदेकर,.गणेश नलावडे,विरेंद्र किराड,दिपक जगताप,राजेंद्र आलमखाने,.किरण कद्रे,.विजय खराडे,अजित दरेकर,.बुवा नलावडे,जयसिंग भोसले,.हेमंत येवलेकर,चेतन मोरे,प्रवीण करपे, सुरेश परदेशी आणि बाळासाहेब सोनवणे व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रीय कामगार संघा ( इंटक)चे अध्यक्ष सुनिल शिंदे आणि संलग्न संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अरविंद शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. इंटकचे सभासद प्रचारात सक्रीय झाले आहेत

उद्योग क्षेत्राने अद्ययावत तंत्रज्ञान लवकर अवगत करून घेणे आवश्यक- शेखर मांडे

0
-‘डीसीसीआयए’ तर्फे मांडे यांच्या हस्ते वार्षिक पुरस्कारांचे वितरण

पुणे :“अत्यंत अद्ययावत असे ‘इंडस्ट्री फोर पाँईंट झीरो’ तंत्रज्ञान, ‘आयओटी’ अर्थात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’,  ‘आर्टिफिशियल इंटलिजन्स’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि ‘मशीन लर्निंग’ हे आजच्या जगातील परवलीचे शब्द झाले आहेत. उद्योग क्षेत्रातील ही आव्हाने असून लवकरात लवकर त्यांचा सामना करून नवे तंत्रज्ञान अवगत करून घेणे गरजेचे आहे. “,असे मत ‘काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रीसर्च’चे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी व्यक्त केले.

पुण्यातील ‘डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर’च्या (डीसीसीआयए) सतराव्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात मांडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. संस्थेचा रौप्य महोत्सव देखील  या वेळी साजरा करण्यात आला. ‘डीसीसीआयए’चे अध्यक्ष प्रकाश धोका आणि  उपाध्यक्ष एच. पी. श्रीवास्तव यांनी या वेळी संस्थेच्या पंचवीस वर्षांच्या वाटचालीचा आढावा सादर केला, तसेच सध्याच्या आर्थिक स्थितीवर भाष्य केले. संस्थेचे सचिव रथिन सिन्हा, खजिनदार सुरिंदर अगरवाल, योगेश वाघानी, व्ही. एल. मालू, राजीव लोकरे, पंडित पाळंदे, अनिल गुप्ता आदि या वेळी उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून रक्तदान शिबिरे आयोजित करण्याबरोबरच गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाचे डबे पुरविणा-या राजकुमार खिंवसरा यांना डीसीसीआयएतर्फे सामाजिक सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘स्वारोस्की इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक वेर्नर प्लॉनर यांना मांडे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार  प्रदान करण्यात आला, तर सहल क्षेत्रातील उद्योजक केसरी पाटील यांना ‘बेस्ट इंडस्ट्रिआलिस्ट’  पुरस्काराने गौरविण्यात आले. केसरी पाटील यांच्या वतीने त्यांच्या कन्या झेलम चौबळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मांडे म्हणाले,‘‘उद्योग क्षेत्रास इंडस्ट्री फोर पॉईंट झीरो, आयओटी, आर्टिफिशियल इंटलिजन्स आणि मशीन लर्निंगसंदर्भात मदत करण्यास ‘सीएसआयआर’ नेहमीच तयार आहे. एकत्रितपणे या विषयांमध्ये काम केल्यास देशाच्या प्रगतीला आपण निश्चित हातभार लावू शकू आणि भारताला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून देऊ शकू.”

मांडे यांच्या हस्ते या वेळी संस्थेच्या ‘स्पर्श’ या वार्षिक अंकाचेही अनावरण करण्यात आले.

या वेळी ‘बेस्ट एचआर प्रॅक्टिसेस अवॉर्ड’ वाईका इन्स्ट्रुमेंटस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ला, तर ‘बेस्ट सेफ्टी प्रॅक्टिसेस अवॉर्ड’ ‘इन्फायलूम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ला प्रदान करण्यात आला. याबरोबरच ‘ओरिएंटल रबर इंडस्ट्रीज लिमिटेड’, ‘केमेटॉल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एव्हरी डेनिसन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ला ‘एचआर’ आणि ‘सेफ्टी प्रॅक्टिसेस’ स्पर्धेतील सहभागाबद्दल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

‘आयओटी’ क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधन स्पर्धेत पुणेकर आनंद ललवाणी यांना जागतिक यश

0

– सर्वोत्तम संशोधनासाठी सांघिक १००,००० डॉलरचे पारितोषिक प्रदान

पुणे: ‘आयओटी’ अर्थात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधनाद्वारे मानवी समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी घेण्यात आलेल्या जागतिक स्पर्धेत पुण्यातील आनंद ललवाणी यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. ‘कीसाईट आयओटी इनोव्हेशन चॅलेंज’ नावाच्या या स्पर्धेत आनंद यांच्या संघाने सर्वोत्तम संशोधनासाठीचे एकूण तब्बल १००,००० डॉलरचे पारितोषिक पटकावले आहे.

‘कीसाईट टेक्नॉलॉजीज’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतील सादरीकरणे नुकतीच न्यूयॉर्कमध्ये तज्ञ परीक्षकांच्या उपस्थितीत पार पडली. पुण्यातील आनंद ललवाणी हे सध्या कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठात पीएचडीचे अध्ययन करीत असून या स्पर्धेसाठीच्या त्यांच्या संघात मॅक्स हॉलिडे या विद्यार्थ्याचाही समावेश होता.

पाण्यात बुडवून ठेवण्याजोग्या आयओटी सेन्सर्सद्वारे दुरूनही पाण्याच्या गुणवत्तेवर कसे लक्ष ठेवता येईल, हा आनंद यांच्या संघाच्या सादरीकरणाचा विषय होता. त्यासाठी त्यांना ५०,००० डॉलरचे रोख ‘ग्रँड प्राईज’ प्रदान करण्यात आले, तसेच त्यांच्या विद्यापीठास ५०,००० डॉलर मूल्याची ‘कीसाईट’ निर्मित चाचणी उपकरणे देण्यात आली. पाण्याच्या प्रदूषणावर या उपकरणामुळे एक सक्षम उपायच शोधला गेला आहे.

आनंद ललवाणी म्हणाले, ‘‘या स्पर्धेमुळे विद्यार्थी म्हणून मी करत असलेल्या संशोधनास नवी दिशा मिळाली आहे. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ या क्षेत्राच्या व्याप्तीची आणखी चांगली माहिती आम्हाला झाली आणि त्यामुळे आमच्या विचारांना चालनाच मिळाली.’’

या वर्षी या स्पर्धेत नावीन्यपूर्ण संशोधनाच्या ३०० कल्पना मांडण्यात आल्या होत्या. अमेरिका, फ्रान्स, मलेशिया, इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि भारतातील स्पर्धकांनी त्यात भाग घेतला.

खेळाडू, कलावंतांचा चंद्रकांत दादा पाटील यांना पाठिंबा

0

पुणे –
कला आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुतीचे कोथरूड विधानसभा मतदार संघातील उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. जनताभिमुख विकासाचे पर्व यापुढेही असेच सुरू राहील विश्वास व्यक्त करीत या कलावंत व खेळाडूंनी चंद्रकांत दादा पाटील यांच्या समवेत क्रीडा क्षेत्रासाठीच्या योजनांबाबत सकारात्मक चर्चा केली.
क्रीडा क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या अर्जुन पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार आणि श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त एका निवेदनाद्वारे चंद्रकांत दादा पाटील यांना पाठिंबा दिला. त्यामध्ये गौरव नाटकर, नितीन कीर्तने, संदीप कीर्तने, अभिजीत कुंटे, जलजा शिरोळे, अरविंद पटवर्धन, माधव सपकाळ, जयंत गोखले, रमेश विपट, विनय मराठे,
अजय मोघे, मधुरा पाटील, विराज ढोकळे, रणजीत चमले,
आदित्य राऊत, युगा बिरनाळे, संजय करंदीकर, संजय अगरवाल, केदार दीक्षित, सुनील बाब्रस, सुजाता बाब्रस, शरद कुलकर्णी, शंतनू पवार मृणालिनी कुंटे, मनोज एरंडे, अस्मिता कर्णिक आदींचा समावेश आहे.

कलावंतांचा मेळाव्याच्या माध्यमातून पाठिंबा
पुणे हे सांस्कृतिक शहर आहेच, या शहराचे महत्त्व वाढावे, यासाठी कलेच्या जोपासनेसाठी आवश्यक ते सर्व करू, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले.

कोथरूडमधील चित्रपट, नाटक,  संगीत, साहित्य, नृत्य व अन्य कला क्षेत्रातील कलाकारांशी मा. चंद्रकांत दादा पाटील यांनी संवाद साधला.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, सिने दिग्दर्शक राजदत्तजी, प्रसिद्ध संगीत नाट्य अभिनेत्री कीर्ती शिलेदार, इतिहास अभ्यासक गो. ब. देगलूरकर, प्रसिद्ध सिने अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे, प्रसिद्ध सितार वादक उस्ताद उस्मान खाँ साहेब, यांच्यासह मराठी चित्रपट, नाटक,  संगीत, साहित्य, नृत्य व अन्य कला क्षेत्रातील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महायुतीच्या सरकारने केलेल्या कामांची माहिती देताना श्री. चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, “गेल्या पाच वर्षात आपल्या सरकारने पोटाची भूक भागविणाऱया ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करुन, इथल्या जनतेसाठी अनेक योजना राबविल्या. आता मनाची भूक भागवण्यासोबतच बुद्धीची भूक भागवणं गरजेचं आहे. यासाठी पुढील पाच वर्षात युती सरकारचा नक्कीच प्रयत्न राहिल.”
सांस्कृतिक क्षेत्रातही सकस अभिरुची जोपासण्यासाठी आगामी काळात आकांक्षी प्रकल्प हाती घेतले जातील “असेही ते यावेळी म्हणाले.
चंद्रकांत दादा पाटील यांच्या कोथरूडमधील उमेदवारीवर राजकारण करणाऱ्यांना लक्ष्य करुन सिनेदिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीच्या प्रभावामुळे आज भारताला जगमान्यता मिळाली आहे. संपूर्ण जगात भारताचा डंका वाजत आहे. मग अशावेळी चंद्रकांत दादा पाटील यांच्या पाठिशी कोथरूडची जनता नक्कीच उभे राहील. तसेच सर्व कलाकारांनी दादांच्या पाठिशी खंबीर पणे उभे राहून, सोशल मीडिया अथवा इतर माध्यमांद्वारे मतदारांना आवाहन केले पाहिजे, असे आवाहनही तरडे यांनी केले.

बाप्पू पठारे भाजपात : टिंगरेच्या पुढे मोठे आव्हान – मुळीक सुसाट..

0

पुणे :  वडगांव शेेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचा  कार्यकर्त्यासह भाजपमध्ये प्रवेश केला  आहे

भाजपा आमदार जगदिश मुळीक आणि बापूसाहेब पठारे मुंबईत मुख्यमंत्र्यांना रात्री  भेटायला गेले .आणि  तिथे मुख्यमंत्र्याच्या हस्ते हा  प्रवेश झाला.

वडगाव शेरी मतदार संघातून राष्ट्रवादीने सुनील टिंगरे याना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार जगदीश मुळीक आणि सुनिल टिंगरे यांच्यात या मतदार संघात लढत होणार आहे. आता बाप्पू पठारे यांनी भाजपात प्रवेश केल्याने हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

या संदर्भात बोलताना पठारे म्हणाले की, मी पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणली होती. मी माजी आमदार झाल्यापासून मला पक्षाने विचारले नाही. पाच वर्षात एका ही बैठकीला बोलवले नाही.

माझ्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे मी भाजप मध्ये जात आहे. पवार कुटुबांचा मला नेहमी आदर आहे. आता वडगाव शेरी मतदार संघातील राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी माझ्या सह भाजप मध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे.

पठारे हे प्रथम काॅंग्रेसमध्ये होते. 2007 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीत आले. राष्ट्रवादीची पुणे महापालिकेत पहिल्यांदा सत्ता आल्यानंतर त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. 2009 मध्ये ते आमदार झाले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा मुळीक यांच्याकडून पराभव झाला.

खराडी-चंदननगरमध्ये त्यांना मानणारा मोठा मतदारवर्ग आहे. ते 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून इच्छुक होते. मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते. त्यांच्याऐवजी नगरसेवक सुनील टिंगरे यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचारातही पठारे उतरले होते. मात्र त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय अखेरीस घेतला. त्यांच्या पत्नी संजिला पठारे आणि पुतणे महेंद्र पठारे हे राष्ट्रवादीचे पुणे महापालिकेत नगरसेवक आहेत.

पठारे यांचा प्रवेश भाजपसाठी वडगाव शेरीत `मास्टर स्ट्रोक` ठरला आहे. भाजपची आणखी ताकद वाढली आहे, अशी प्रतिक्रिया मुळीक यांनी दिली.

राष्ट्रवादीकडून सच्च्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे पठारे यांनी सांगितले. माझे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जुने संबंध आहेत. भाजपमध्ये योग्य सन्मान देण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. माझ्या भागाच्या विकासासाठी भाजप प्रवेशाचा उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले

बाळासाहेब असते तर शिवसेना लाचार दिसली नसती- राज ठाकरे

0

पुणेः पुण्यात भाजपाने शिवसेनेला शिल्लक ठेवलं नाही. नाशिक, पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिवसेनेला युतीत एक जागा मिळत नाही? कुठून येते ही हतबलता, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. पुण्यात शिवसेना दिसत नाही, नाशिक आणि पुण्यासारख्या शहरात जागा देत नाही. सत्तेसाठी शिवसेना लाचार म्हणून भाजपाबरोबर युती केली, भाजपा शिवसेनेला मान देत नाही, तरी युती का?, माननीय बाळासाहेब असते तर शिवसेना लाचार नसती. आज अशी करायची कोणाची हिंमत झाली नसती, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही हल्लाबोल केला आहे. ते कसब्यातील सभेत बोलत होते.

ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप लावले तेच आज भाजपात गेले आहेत. काँग्रेसचा विरोधी पक्षनेताही भाजपात गेला. म्हणजे इथूनही तेच राज्य करणार तिथूनही तेच राज्य करणार. ही तुमच्याशी प्रतारणा नाही का?, असं म्हणत राज ठाकरेंनी राधाकृष्ण विखे-पाटलांनीही खडे बोल सुनावले आहेत. मला विरोधासाठी विरोध करण्याचं काम करायचं नाही. बहुमताचं सरकार कुणालाही न जुमानता निर्णय घेत असतं. हे का होतं? कारण त्यांच्यासमोर तगडा विरोधी पक्ष नसतो. मला विरोधासाठी विरोध करायचा नाही. ज्या वेगात नोकऱ्या जात आहेत, ते पाहता प्रत्येक तरुणाच्या मनात एक धाकधूक आहे की, ‘माझी नोकरी कधीही जाऊ शकते’. ह्याचं कारण सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आलेली भीषण आर्थिक मंदी असल्याची टीकाही राज ठाकरेंनी केली आहे.

इतिहास शालेय पुस्तकांमध्ये सांगितला जात नाही. स्मारक तयार करण्याच्या घोषणा केल्या जातात. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला, पण अद्याप शिवस्मारक उभारते आले नाही. स्मारकाचे केवळ राजकारण केले जाते. स्मारक तयार करण्यापेक्षा गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी खर्च करण्याची आवश्यकता आहे. सिंचन झालेले नाही. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देश मागे आला. सोशल मीडियामुळे देशात काय वातावरण आहे हे कळतं. देशात सध्या भीषण परिस्थिती आहे. नोटाबंदी फसली तर देश खचेल असं मी म्हणालो होतो.

आघाडीची ताकद ‘ कसब्या ‘ वर मोहोर उमटवेल- अरविंद शिंदे

0

पुणे : भाजप सरकारविषयी झालेला भ्रमनिरास, बदलते राजकीय वातावरण आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस , मित्रपक्ष आघाडीतील जोश पहाता यावेळी कसबा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाची विजयी मोहोर उमटेल, असा विश्वास काँग्रेस पक्षाचे उमेदवार अरविंद शिंदे यांनी व्यक्त केला.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस , मित्रपक्ष यांच्या कार्यकर्त्यांसमवेत अरविंद शिंदे यांनी रविवारी दारूवाला पूल, कसबा पेठ, सुभाषनगर आदी परिसरात पदयात्रा काढल्या. सध्या राजकीय वातावरण बदलते आहे याची चुणूक लोकांच्या बोलण्यातून जाणवली. नोकरदार, व्यापारी असे समाजातील वेगवेगळे वर्ग आर्थिक कारणाने त्रस्त  आहेत. नोकरदारांना भवितव्याची चिंता आहे तर जीएसटीमुळे व्यापारी हैराण आहेत.मंदीचा सामना करावा लागतो आहे. या परिस्थितीमुळे निराश झालेल्या लोकांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांची आघाडी जवळची वाटते, सर्वांना सामावून घेणाऱ्या आघाडीबाबत विश्वास वाटतो, असे शिंदे यांनी चर्चांमध्ये सांगितले.आघाडीतील जोश कसब्यात परिवर्तन घडवेल असे ते म्हणाले.

मतदारसंघात रविवारी निघालेल्या पदयात्रांमध्ये बुवा नलावडे, सुनिल खाटपे, सुजाता शेट्टी,नीता रजपूत, दत्ता सागरे, विद्याताई भोकरे, राजेंद्र भणगे, भाई कात्रे, नरेश नलावडे, मयूर भोकरे, सूर्यकांत मारणे, सतिश मोहोळ, योगेश भोकरे, अरुण गवळे, गणेश नलावडे, राजश्री शिंदे, अर्चना साळुंके, सुप्रिया कांबळे, स्वाती गायकवाड, जितेंद्र भागवत, प्रशांत गांधी, बबलू कोळी, उषाताई काकडे, राहुल राऊत,अजिंक्य पालकर, विवेक भरगुडे,दीपक जगताप, वनिता जगताप,राजश्री कसबेकर, शशिकला बोरकर आदी सहभागी झाले होते

माणसं वाहून चाललीत अन तुम्हाला साधं प्यायला पाणी नळानं देता येत नाही काय ?

0

मूळ पुण्याच्या दुरावस्थेचं भयान चित्र … कुठवर लपविणार ,कुठवर झाकणार ?

पुणे- कसबा … नावातच दम आहे इतिहास आहे, पुण्याचं ताकदवान अस हे नाव … शिवाय भाजपचा बालेकिल्ला 25 वर्षे इथे भाजपचा आमदार सातत्याने नगरसेवक याच विधानसभा मतदार संघातील मुक्ता टिळक महापौर झालेल्या, तब्बल अडीच वर्षे ..त्या या पदावर .. दिल्ली ट जावून तर कधी परदेशात जावून शान मध्ये त्यांनी स्मार्ट पुण्याची पारितोषिके स्वीकारलेली ….पण त्यांच्या या बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा मतदार संघाची अवस्था काय आहे ? ते कॉंग्रेसच्या अरविंद शिंदे यांना आणि त्यांच्या समवेत प्रचारासाठी फिरणाऱ्याना चांगलीच जाणवू लागली आहे …

एकीकडेमाणसे  वाहून चाललीत आणि तुम्ही साधे नळाला प्यायला पाणी देवू शकत नाही काय ?  अशा प्रश्नाना सामोरे जावे लागतेय … स्मार्ट पुण्याची,ऐतिहासिक पुण्याची  हि खरी अवस्था .. कुठवर लपवून ठेवणार आणि झाकून ठेवणार ? अशा प्रश्नांनी संताप व्यक्त करण्याची कामे मतदार करताहेत …

कसबा विधानसभा मतदार संघात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी चे उमेदवार अरविद शिंदे यांच्या प्रचार फेरीतील हि पहा 1 अल्पशी झलक …

पदासाठी सारे काही ..पती भाजपाच्या तर पत्नी कॉंग्रेसच्या प्रचारात…सदानंद आणि सुजाता शेट्टी यांची करामत

0

पुणे- पूर्वी सत्ता गेल्यानंतर जनता पक्षातून कॉंग्रेस मध्ये नंतर कॉंग्रेसमधून शिवसेनेत आणि पुन्हा कॉंग्रेस आणि आता पुन्हा कॉंग्रेस सोडून भाजप मध्ये गेलेल्या सदानंद शेट्टी नी जरी कॅन्टोन्मेंट मधून कॉंग्रेसचा उमेदवार आपण पाडू असा प्रचार चालविला आहे तर दुसरीकडे त्यांच्याच पत्नी ज्या कॉंग्रेस च्या नगरसेविका आहेत त्या  कॉंग्रेसच्याच उमेदवाराला निवडून द्या असे आव्हाने करणारी भाषणे प्रचार दरम्यान ठोकीत आहेत . कॉंग्रेस कडून स्थायी समिती अध्यक्ष पद , सदा आनंद नगर उभारण्याची मिळालेली संधी अशी सारी पक्षाची देण विसरत शेट्टी यांनी नेहमीप्रमाणे आपण निष्ठावंत आहोत असा अजब दावा करत विधानसभेची उमेदवारी मागितली होती .पण त्यांची पक्ष निष्ठा सार्यान्नंच ठाऊक आहे. आणि उमेदवारी मिळाली नाही . त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसचे बागवे यांच्या प्रचारात काही काळ सहभाग घेतला . त्यांच्या पत्नी नगरसेविका सुजाता या बागवे यांचा उमेदवारी अर्ज भरण्या पासून बागवे यांच्या समवेत दिसत आल्या आणि शेट्टी मात्र कॉंग्रेसच्या विरोधात राजकीय कुरघोड्या करीत राहिले. पुण्यातील कॉंग्रेस मध्ये आणखी असे कुरघोडे बाज काँग्रेसी आहेत .पण त्यांच्याकडे सध्या लक्ष कोणाही नेत्यांनी न देता प्रचार यंत्रणेवर लक्ष केंद्रित केले आहे. एकंदरीत आपल्या नगरसेवक पदाबाबत पक्षाने कोणतीही कारवाई करू नये या साठी सुजाता शेट्टी या विशेष दक्षता घेत असाव्यात असे सांगितले जाते.
कॉंग्रेसच्या वतीने अधिकृत पणे याबाबत असे सांगितले गेले कि ,महा आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांच्या विजयासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे सर्व कार्यकर्ते एकवटले असून त्याचा प्रत्यय येतो आहे,मंगळवार पेठे झालेल्या सभेत देखील आला. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील मंगळवार पेठ येथील श्रमिकनगर येथे झालेल्या सभेत बोलताना नुकत्याच
भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या सदानंद शेट्टी यांच्या पत्नी ,काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका सौ. सुजाता शेट्टी म्हणाल्या ‘आम्ही रमेश बागवे यांनाच बहुमताने निवडून आणणार”. रमेश बागवे यांचा दांडगाजनसंपर्क, मतदार संघातील सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेणून केलेली प्रचंड विकास कामे यांच्या जोरावर मंगळवार पेठेतील सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन कॅन्टोन्मेंटच्या विकासासाठी रमेश  बागवे यांनाच निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. भीम आर्मी चे नेते दत्ता पोळं यांनीही  बागवे यांना पाठिंबा देऊन भाषण केले.याप्रसंगी नगरसेविका सुजाता शेट्टी, नगरसेवक रवींद्र धंगेकर, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, विजयचंडालिया, भगवान धुमाळ, सौ. निलीमा लालबिगे, रशीद खिजर, आमिर शेख , विजय खळदकर , विशाल मलके,सौं . वैशाली रेड्डी, अड नितीन परतानी, रवी आरडे, साहिल केदारी , राजेश शिंदे, जगताप वाल्मिकी जगताप,कल्पना भोसले व सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोट्या संख्येने उपस्थित होते.

भ्रष्टाचारी,फसवेगिरी करणाऱ्या उमेदवाराला मतदार थारा देणार नाहीत – रमेश बागवे

0

पुणे-पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील मतदार हे कधी हि भ्रष्टाचारी ,फसवेगिरी करून नागरिकांना लुटणाऱ्या उमेदवाराला थारा देणार नाहीत . असा स्पष्ट दावा करत आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय (कवाडे व गवई गट युवा मोर्चा ) आघाडीचे अधिकृत उमेदवार  रमेश बागवे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला लक्ष करीत ,स्वतःच्या कामांच्या आणि लोक संपर्काच्या जोरावर  आपण सहज विजयी होवू असा दावा केला .
त्यांनी आज आपल्या प्रचारार्थ लष्कर  परिसरात पदयात्रा काढली .
पदयात्रेमध्ये  नगरसेवक  रफिक शेख, सोनाली मारणे, ,मंजूर शेख ,रशीद खिजर, माजी कॅन्टोन्मेंट सदस्या संगीत पवार, माजी कॅन्टोन्मेंट सदस्य प्रसाद केदारी, आसिफ शेख, वाहिद बियाबानी, जॉन मोहमद शेख, अमीर सय्यद, सुवर्णा उरड, धनंजय उरड,विठ्ठल थोरात आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते

निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर अधिकारी,कर्मचा-यांवर कारवाई होणार

0

पुणे दि. 14: विधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणास गैरहजर 2 हजार 773 अधिकारी, कर्मचा-यांवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षाचे अपर जिल्हाधिकारी महेश आव्हाड  यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात एकूण 7 हजार 915 मतदान केंद्रावर दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी एकूण 34 हजार 812    अधिकारी, कर्मचा-यांना मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी या प्रमाणे जबाबदारी देण्यात आलेली आहे व त्याप्रमाणे सर्व कर्मचारी यांना आदेश बजाविण्यात आले आहेत. या सर्व मतदान कर्मचारी यांचे निवडणूक कामकाज विषयक दुसरे प्रशिक्षण दिनांक 12 ऑक्टोबर व 13 ऑक्टोबर 2019 रोजी आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षणासाठी सर्व नियुक्त मतदान कर्मचारी यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते. परंतु 864 विविध कार्यालयातील एकूण 2 हजार 773  अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षणास गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा सर्व गैरहजर अधिकारी, कर्मचारी यांना जिल्हा निवडणूक अधिकारी  यांच्या कार्यामार्फत लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 134 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार फौजदारी कारवाईबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. या नोटीसनुसार 17 ऑक्टोबर 2019 पूर्वी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. उपस्थित न राहणा-या नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल  करण्याबाबत संबंधित सहाय्यक निवडणूक  निर्णय अधिकारी यांना आदेशित करण्यात आले आहे.

काही विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांचे अधिकारी, कर्मचारी यांनी निवडणूक कामकाजाच्या आदेशाच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका क्रमांक 8300/2019 दाखल केली. या याचिकेमध्ये 1 ऑक्टोबर 2019 रोजीच्या आदेशानुसार  विना अनुदानीत संस्थांनी देखील निवडणुकीचे कामकाज करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व विना अनुदानीत संस्थांमधील अधिकारी, कर्मचारी यांनी निवडणुकीचे कर्तव्य बजावण्याबाबत आदेश प्राप्त असल्यास तात्काळ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थिती नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

खाजगी आस्थापनांवरील कामगारांना मतदानासाठी पगारी सुटी देण्याचे आदेश -कामगार उप आयुक्त पनवेलकर

0

पुणे दि. 14: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी  २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विविध खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी- कामगारांना मतदानाच्या दिवशी पगारी सुटी देण्यात यावी, असे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत असे कामगार उप आयुक्त विकास पनवेलकर यांनी कळविले आहे.

            पुणे जिल्हा क्षेत्रातील दुकाने, निवासी हॉटेल्सखाद्यगृह, नाट्यगृह, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा अन्य आस्थापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्समॉल्स, रिटेल्स आदी आस्थापनांवरील कामगार, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जे कामगार आपल्या निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी  भरपगारी सुटी देण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत  पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसल्यास दोन ते तीन तासाची सुटी देता येईल. त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी मालकांनी घेणे आवश्यक असेल. या संदर्भात काहीही तक्रार असल्यास संबंधित कामगारांनी संपर्क साधावा, असे आवाहन कामगार  उप आयुक्त पुणे यांनी केले आहे.