Home Blog Page 2818

काँग्रेसच्या प्रचाराची सांगता भव्य रॅलीने होणार…

0

पुणे-विधानसभेच्या प्रचाराचा समारोप उद्या रॅलीने होणार आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवार रमेश बागवे, अरविंद शिंदे आणि दत्ता बहिरट हे आपापल्या विधानसभा मतदार संघातून दु – चाकी रॅली काढून त्यांच्या प्रचाराचा समारोप करणार
आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे उमेदवार रमेश बागवे यांच्या रॅलीची सुरूवार केदारी पेट्रोल पंप वानवडी येथून होणार आहे. ही रॅली वानवडी – सॅलसबरी पार्क – गुलटेकडी – काशेवाडी – भवानी पेठ – रास्ता पेठ – सोमवार पेठ – पुणे रेल्वे स्टेशन – ढोले पाटील रोड – कोरेगाव पार्क – घोरपडी – बी. टी. कवडे रोड – ढोबर वाडी – कवडे मळा – लष्कर पोलीस स्टेशन – एम. जी. रोड – साचापीर स्ट्रीट – बाबाजान चौक मार्गे- भोपळे चौक येथे समारोप होणार
आहे.
कसबा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अरविंद शिंदे यांच्या रॅलीची सुरूवात महात्मा फुले वाडा – गंज पेठ – फायर ब्रिगेड बिल्डींग – नेहरू रोड – संत कबीर चौक – लक्ष्मी रोड – अलका टॉकीज – टिळक रोड – एस. पी. कॉलेज –
वसंतदादा पुतळा – फडगेट पोलीस चौकी – गंज पेठ पोलीस चौकी – मोमीनपुरा – खडकमाळ आळी – राष्ट्रभुषण चौक – सुभाष नगर – अंबिलओढा कॉलनी – दत्तवाडी येथे समारोप.
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार दत्ता बहिरट यांच्या रॅलीची सुरूवात – मानाजी बाग – खडकी – बोपोडी गावठाण – ब्रेमेन चौक – औंध गाव – आंबेडकर नगर – चिखलवाडी – खडकी स्टेशन – रेंजहिल्स – संगमवाडी –
पाटील इस्टेट – जंगली महाराज रस्ता – पुलाची वाडी – गुडलक चौक – ज्ञानेश्वर पादुका चौक – वडारवाडी – जनवाडी रस्ता – गोखलेनगर – बारामती हॉस्टेल – पोलीस लाईन – गोखलेनगर शाळा येथे समाप्त.
पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी होणार आहे. दुपारी ३.१५ वा., राज्यसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते खासदार आनंद शर्मा यांची पत्रकात्र परिषद
काँग्रेस भवन येथे आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार ॲड. वंदना चव्हाण, घटक पक्षाचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रकाश भालेराव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश बालवडकर, शेतकरी कामगार पक्षाचे सागल अल्हाट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे वसंत पवार, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जयंत चिंचोलीकर, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे लताताई भिसे सोनावणे त्याचबरोबर प्रमुख नेते आणि विधानसभा उमेदवार उपस्थित राहणार आहेत.

अजितदादा प्रमाणे आमच्यावर वेळ येवू नये याची दक्षता घेवूनच काम – गिरीश बापट (व्हिडीओ)

0

पुणे :विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल चुकल्याची कबुली अजितदादा यांनी दिली त्यांच्याप्रमाणे आमच्यावर वेळ येवू नये यासाठी आम्ही दक्षतापूर्वक कामे करीत आहोत ,आगामी काळात खडकी कँटोंमेंट बोर्ड बरखास्त करणे , शिवाजीनगर मतदार संघ गॅस सिलेंडर मुक्त करणे ,वाहतूक कोंडी मुक्त करणे यासाठी आम्ही परफेक्ट कामे करणार आहोत असे येथे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले .
शिवाजीनगर मतदार संघातील भारतीय जनता पक्ष- शिवसेना- आरपीआय (A), रासप आणि शिवसंग्राम महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी शिवाजीनगर मतदार संघाच्या विकासाचा रोडमॅप ‘निर्धारनामा’च्या स्वरूपात तयार केला असून त्याचे प्रकाशन आज पत्रकार परिषदेत करण्यात आले. खासदार गिरीश बापट, खासदार संजय काकडे, माजी खासदार अनिल शिरोळे, आरपीआयचे परशुराम वाडेकर, नगरसेवक शंकर पवार आदी उपस्थित होते.यावेळी ते बोलत होते.

या वेळी बोलताना सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “शिवाजीनगर मतदार संघाच्या विकासाला गेल्या काही वर्षांत एक दिशा मिळालेली असून आता नजीकच्या भविष्यात योग्य दिशेने गतिमान वाटचाल करण्यासाठी एक निश्चित कार्यक्रम समोर असावा या दृष्टीकोनामधून आम्ही हा ‘निर्धारनामा’ तयार केला आहे. या निर्धारनाम्याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये शिवाजीनगर मतदारसंघातील नागरिकांना काय वाटते, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांच्या दृष्टीने समस्या कोणत्या आहेत याची आम्ही पाहणी केली. याबरोबरच डेटा विश्लेषणाच्या माध्यमातून आम्ही युवकांचीही मते जाणून घेतली. या सर्व बाबींमधून समोर आलेल्या मुद्द्यांवर आम्ही हा ‘निर्धारनामा’ तयार केला आहे. शिवाजीनगर मतदार संघासाठी हा ‘निर्धारनामा’ ख-या अर्थाने ‘रोडमॅप’ ठरेल असा माझा विश्वास आहे.

यावेळी बोलताना खासदार गिरीश बापट म्हणाले, “शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ गॅस सिलिंडरमुक्त करण्यासाठीचा प्रकल्प आम्ही राबवित आहोत. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रोपासून विविध उपाययोजना देखील करण्यात येत आहेत. सिद्धार्थ शिरोळे यांचा निर्धारनामा हा पक्षाच्या धोरणांना अनुसरून असून आम्ही सर्व त्याच्या अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न करू.”
शिवाजीनगरमध्ये सुरू झालेली विकास प्रक्रिया या पुढेही सुरू राहणार आहे. मेट्रो, समान पाणी पुरवठा, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आदींचा यामध्ये समावेश आहे. या मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्ष- शिवसेना महायुती कटीबद्ध असल्याचे अनिल शिरोळे यांनी नमूद केले.
या निर्धारनाम्यात मतदार संघातील वाहतूक, मेट्रो प्रकल्प, वातावरणातील बदलांमुळे होणा-या परिणामांवरील उपाययोजना, कृती आराखडा, आधुनिक कचरा व्यवस्थापन, प्रदूषणावर मात करण्यासंबंधीच्या उपाययोजना, उद्योगांना हातभार लावावा यासाठीचे कार्यक्रम, खडकी कॅन्टोन्मेंटचा विकास, उर्जा व्यवस्थापन, पदपथांवरील अतिक्रमण, ओढ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठीच्या उपाययोजना, महिला सुरक्षा आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
शहरातील वाहतुकीसंदर्भात शिवाजीनगर हिंजवडी या २३ किमीच्या मार्गावरील मेट्रोच्या कामास गती देण्याबरोबरच २०२१ पर्यंत ते पूर्ण व्हावे यासाठी पाठपुरावा करणे, शहरातील बसमार्ग व बसचे वेळापत्रक यांची फेरआखणी आणि कायमस्वरूपी प्रदूषणविरहित, किफायतशीर दरातील इलेक्ट्रिक बससेवा उपलब्ध करून देणे यासाठी सिद्धार्थ शिरोळेच्या वतीने प्रयत्न करण्यात आहेत.
वातावरणातील बदलाचे परिणाम हे आता थेट सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचू लागले आहे. या कडे गांभीर्याने पाहत या संकटाना तोंड देण्याच्या दृष्टीकोनाने जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम हाती घेणे, ‘राज्य कृती योजना’च्या माध्यमातून प्रयत्न करण्यावर शिरोळे यांचा भर असेल. याबरोबरच ओढ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी ओढे- नाल्यांच्या पूरेषेतील अतिक्रमणे रोखणे, ओढ्यांची बांधबंदिस्ती अधिक मजबूत करणे, त्यांचा नैसर्गिक प्रवाह कायम राखण्यासाठी खबरदारे घेणे, या ठिकाणी कचरा साचणार नाही याची काळाचे घेणे व स्थानिकांचे संघटन करून त्यांची काळजी घेण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात येतील.

कचरा हा महानगरांमधील व्यवस्थापनाचा महत्त्वाचा विषय असून त्याचे व्यवस्थापन करीत असताना ऊर्जानिर्मितीचे धोरण अवलंबणे, महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करणे, मोठ्या सोसायट्यांना ऊर्जानिर्मितीसाठी प्रोत्साहित करणे, हवेतील प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी त्यावर ठोस उपाययोजना करणे यांवर शिरोळे यांचा भर असणार आहे. यामध्ये विविध सामाजिक संस्था, रिक्षाचालक, बसचालक, कारचालक यांना सहभागी करून घेत लहान मुले, युवक यांसाठी मोठ्या प्रमाणात जनजागृत कार्यक्रम राबविणे, शिवाजीनगरचा रोजचा तुलनात्मक निर्देशांक देणे, व्यापक प्रमाणावर स्थानिक प्रजातींच्या वृक्षाची लागवड, प्रमुख चौकात प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी मोठे एइर प्युरिफायर बसविण्याचे काम हाती घेण्यात येईल. मतदार संघातील सोसायट्यांमध्ये सौरउर्जेचा वापर वाढावा यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी देखील प्रयत्न करण्यात येतील.

आयटी सिटी म्हणून पुण्याची ओळख असताना शहरातील मोठ्या उद्योजकांबरोबर लघु आयटी उद्योजकांना सवलती मिळाव्यात आणि आयटी लघु उद्योजकांना घरगुती दराने वीजबिल आकारणी व्हावी यासाठी देखील पाठपुरावा करण्यात येणार आहे. खडकी कॅन्टोन्मेंटच्या विकासाठी आता राज्य शासनाचा निधी मिळण्यास प्रारंभ झाला असून या परिसरातील सुविधा अधिक बळकट करण्यासाठी नागरिक आणि प्रशासन यांमध्ये भविष्यात समन्वय साधण्यात येणार आहे. याशिवाय पदपथांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी पाठपुरावा, फेरीवाल्यांच्या योग्य पुनर्वसनासाठी प्रयत्न आणि महिला वर्गाला एक सुरक्षित मतदार संघ ही ओळख देण्यासाठी सार्वजनिक जागी मोठ्या प्रमाणात सीसीतीव्हे कॅमेरे बसविणे, उद्याने, मैदाने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था उत्तम असावी यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार देखील या निर्धारनाम्यात करण्यात आला आहे.

शरद पवारांना तर राज्यसभा हि मुश्कील होईल – खा. संजय काकडे (व्हिडीओ)

0

पुणे- भाजप सेना युती राज्यभरात २३५ जागा जिंकू शकेल ,भाजपा १४५ पार करेल तर शिवसेना ८० ते ८५ जागा पार करेल असा अंदाज आज येथे व्यक्त करताना खासदार संजय काकडे यांनी शरद पवारांना लक्ष करीत त्यांना तर यावेळी राज्यसभा मिळणे हि मुश्कील होईल असे भाकीत देखील वर्तविले आहे.शिवाजीनगर मतदार संघातील भारतीय जनता पक्ष- शिवसेना- आरपीआय (A), रासप आणि शिवसंग्राम महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी शिवाजीनगर मतदार संघाच्या विकासाचा रोडमॅप ‘निर्धारनामा’च्या स्वरूपात  तयार केला असून त्याचे प्रकाशन आज पत्रकार परिषदेत करण्यात आले. खासदार गिरीश बापट, खासदार संजय काकडे, माजी खासदार अनिल शिरोळे, आरपीआयचे परशुराम वाडेकर, नगरसेवक शंकर पवार आदी उपस्थित होते.यावेळी ते बोलत होते.
खासदार संजय काकडे म्हणाले, सिद्धार्थ शिरोळे यांना राजकीय वारसा असला तरी,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते लाडके आहेत. त्यांच्या विजयासाठी विशेष लक्ष ठेवण्याची जबाबादारी मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर सोपविली आहे. त्यात आम्ही सगळ्यांनीच लक्ष घातले आहे. त्यामुळे सिद्धार्थ किमान ३५ ते ४० हजार मतांनी विजयी होतील असा मला विश्वास आहे.

मोदींची तानाशाही: पुण्यात आपल्या भाषणाच्या वेळीच सिंधिया, आणि अमोल कोल्हे यांचे भाषण होवू नये म्हणून त्यांचे विमान , हेलीकॉप्टर अडवून ठेवले

0

 

पुणे : माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे विमान गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान येणार होते. मात्र त्याचवेळी नरेंद्र मोदी पुण्यात असल्याने एटीसी (एअर ट्रॅफिक कंटोल) यांनी सिंधिया यांना पुण्याकडे येताना रोखले,मोदींच्या तानाशाही चे रूप या घटनेतून स्पष्ट झाल्याचा  आरोप पुणे शहर काँग्रेस चे अध्यक्ष आणि पुणे कँटोमेन्ट विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी केला.दरम्यान भोसरी, चिंचवड़ सह 4 ठिकाणी अभिनेते खासदारअमोल कोल्हे यांच्या सभा देखील हेलीकॉप्टर ला फ्लाइंग परमिशन नाकरल्याने होवू शकल्या नाहीत . या घटनांमुळे मोदींच्या आणि भाजपच्या पायाखालची जमीन सरकल्याने त्यांनी हे कारस्थान केल्याचा आरोप होतो आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या पिंपरी-चिंचवडमधील तीन सभा आज रद्द कराव्या लागल्या. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा असल्याने हेलिकॉप्टर उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली होती. दरम्यान, हे कितपत लोकशाहीच्या तत्वांना आणि मूल्यांना धरून आहे? याविषयी संभ्रम निर्माण होत असल्याची खासदार अमोल कोल्हे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

गुरुवारी वानवडी येथील महात्मा फुले सभागृहात सिंधिया यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र त्या सभेला सिंधिया अनुपस्थित राहिले. याविषयीचे कारण स्पष्ट करताना जोशी आणि बागवे यांनी भाजपवर जोरदार  टीका केली.

ते म्हणाले, आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते सिंधिया यांना आणण्यासाठी विमानतळावर गेलो होतो. सोलापूर येथील सभा घेऊन ते सायंकाळी साडेसहा वाजता वानवडी येथे येणार होते.

परंतु त्याचवेळी सिंधिया यांना सोलापूरवरून उड्डाण करण्यास एटीसीने मज्जाव केल्याचे समजले. याचे मुख्य कारण सिंधिया यांनी एटीएसला विचारले असता त्यांनी “पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे. त्या सुरक्षेच्या कारणास्तव आपल्याला त्याठिकाणी जाता येणार नाही,” असे सिंधिया यांना सांगितले.

एकीकडे एटीसीने सुरक्षाचे कारण देत असली तरी त्यावेळी पुणे विमानतळावर वेगवेगळ्या खासगी कंपनीच्या विमानचे उड्डाण सुरू होते. विशेष म्हणजे गुरुवारी सायंकाळी खासदार रामदास आठवले यांच्या विमानाने लोहगाव विमानतळावरून टेक ऑफ केले. मात्र त्यांच्या विमानाला एटीएसने कुठली हरकत घेतली नाही. एका बाजूला मोदींची सभा सुरू असताना दुसरीकडे त्यांच्या मित्र पक्षातील मंत्री विमानाने प्रवास करतात हे चालते. परंतु विरोधी पक्षांतील नेत्यांच्या विमान प्रवासाला जाणीवपूर्वक विरोध केला जातो.

भाजपने जाणीवपूर्वक विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे काम केले आहे. मोदी यांची सभा पुण्यात आयोजित केल्यापासून टिळक रस्ता, शास्त्री रस्ता दुपारी बारा पासून सायंकाळी उशिरापर्यंत रस्ते बंद करण्यात आले होते. या सगळ्यात सत्ताधारी पक्षाची हुकूमशाही दिसून आल्याची टीका जोशी यांनी केली. फुले सभागृहातच्या आवारात पार पडलेल्या सभेला पुणे कँटोमेन्ट विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, नूतन शिवरकर, माजी खासदार रजनी पाटील, शिवाजी केदारी, सचिन तावरे, विनोद मथुरावाला, संगीता तिवारी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

मतदानावर बहिष्कार नकोच -मतदान हे कर्तव्य ,ते चुकवू नका – नाना भानगिरे

0
पुणे-मतदान हा हक्क आहे, भले आपण कोणावर संतापला असाल ,नाराज असाल ,नैराश्य आले असेल तरी मतदानातून आपल्याला आपल्या भावना व्यक्त करता येतात .लोकशाही टिकविण्यासाठी मतदान गरजेचे आहे असे सांगत काल शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा विचार करू लागलेल्या लोकवस्तीत जावून त्यांची समजूत काढली आणि त्यांना नो वॉटर, नो वोट” चे बॅनर काढायला लावून मतदान करण्यास प्रवृत्त करण्याचा प्र्यत्न केला.
सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वहात आहेत. प्रचाराची रणधुमाळी सर्वदूर पसरली आहे. सर्वच राष्ट्रीय, सामाजिक, राज्यस्तरीय विषयांची चर्चा शिगेला पोहोचली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणूस देखील आपला आवाज कसा ऐकू जाईल या साठी प्रयत्न करत आहेत. पुण्यातील कोथरुड, कोंढवा, हडपसर भागातील अनेक सोसायट्यांनी पिण्याच्या पाण्याच्या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडली आहे. “नो वॉटर, नो वोट” चे बॅनर या ठिकाणी झळकू लागले आहेत.
हडपसर भागातील  शिवसेने चे  नगरसेवक श्री प्रमोद नाना भानगिरे यांनी त्यांच्या प्रभागाच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी अनेक वेळा प्रसंगी आंदोलनाचा मार्ग स्वीकारून त्यावर तोडगा काढला आहे. डुक्कर पालन, पाणी, रस्ते, विकासाची कामे अशा अनेक प्रश्नांसाठी त्यांनी पुणे महानगरपालकेच्या आयुक्तांकडे आणि यंत्रणेकडे पाठपुरावा केला आहे.
त्यांच्या प्रभागातील ड्रीम इस्टेट सोसायटी ने देखील “नो वॉटर नो वोट” चा बॅनर लावल्याने नानांनी या सोसायटी ची सदिच्छा भेट घेतली आणि सोसायटी च्या रहिवाश्यांसोबत चर्चा केली.
रहिवाश्यांनी पाण्या सह अनेक मुद्द्यांवर नानांसमोर गाऱ्हाणे घातले. अभ्यासू वृत्ती च्या नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी सर्व प्रश्नावर सध्या काय काम चालू आहे त्या बद्दल माहिती दिली आणि सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करण्याची शाश्वती दिली
.लोकशाही आपली आहे, मतदान करणे हे आपलं हक्कच तर आहेच ,पण ती जबाबदारी पण आहे.
      येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकी मध्ये ,मतदान करण्यासाठी सेलिब्रिटी अनेक नागरिक, संस्था ,सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी झटापटी करत असतात,आपला हक्काचे मतदानाची अमंलबजावणी करा, असे सांगतात.
पण याचं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदान ,न करणे ,मतदानावर बहिष्कार, काही कारणामूळे ,ड्रीम्स इस्टेट मधील शेकडो नागरीकांनी बहिष्कार घातला.पण ,नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे स्वतः  ,या ठिकाणी उपस्थित राहून ,नागरिकांशी संवाद साधून ,सर्व गोष्टी ची पूर्तता करून मतदान आपलं हक्क आहे .ते तुम्ही करणे गरजेचं आहे.’ हे समजून सांगून गेट वरचा बोर्ड काढण्यासाठी विनंती केली ,आणि सोसायटीच्या च्या सर्व नागरिकांनी तसेच महिला नी बोर्ड काडून;  या सोसायटी मधून शंभर टक्के मतदान होणार ‘याची ग्वाही दिली.

भाजपच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू नका, काँग्रेसच्या रमेश बागवेंना विजयी करा. – तेलंगणाचे काँग्रेस खासदार रेवंथ रेड्डी

पुणे-काँग्रेस मध्ये सर्व जाती, धर्म, भाषा, प्रांत सामावले असून दंगली घडविणाऱ्या भाजपच्या भूलथापांना बळी नका. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे  उमेदवार रमेश बागवे यांनाच बहुमताने विजयी करा असे आवाहन तेलंगणाचे काँग्रेस खासदार रेवंथ रेड्डी यांनी   केले. घोरपडी गाव येथील बालाजीनगर मध्ये आयोजित महाआघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांच्या कोपरा सभेत ते बोलत होते.

गेल्या विधानसभा  निवडणुकीत वेंकय्या नायडू यांनी येथील तेलगू बांधवाना भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले होते. मात्र भाजप आमदारांनी घोरपडी आणि एकूण कॅन्टोन्मेंटसाठी काहीही विकास काम केले नाही. आता मी खासदार रेवंथ रेड्डी छातीठोकपणे सांगतो की, कॅन्टोन्मेंटच्या सर्वांगीण विकासासाठी रमेश बागवे यांनाच मतदान करून विजयी करा, असे आवाहन  रेड्डी यांनी करताच  हजारो तेलगू बांधव, कार्यकर्ते , यांनी रेड्डी व बागवे यांचा जय जय कार केला.

या  प्रसंगी बोलताना रमेश बागवे म्हणाले की या भागातील घोरपडी रेल्वे गेट, ओव्हर ब्रिज, वाहतुकीचा प्रश्न मी सोडवणार आहे. त्यासाठी विक्रमी मतांनी मला विधानसभेत पाठवा.

यावेळी  काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सरचिटणीस किरण रेड्डी , नगरसेवक अविनाश बागवे , हर्षद बोराटे , संजय कवडे , चंद्रकांत कवडे, सुरेखा  कवडे,  चिन्नया , समीर हाके , बाळा शेट, श्रीनिवास,  प्रदिप परदेशी , रामय्या, महाआघाडीचे कार्यकर्ते व तेलगू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा

0

पंतप्रधान मोदींनी मराठीतून केली भाषणाची सुरूवात

जनतेचा विश्वास आहे, म्हणून मोदी आहेः पंतप्रधान

आपण दिलेल्या विश्वासामुळेच मोदीचा आत्मविश्वास वाढलायः

गेल्या ५ वर्षांत देवेंद्र फडणवीस यांचं स्थिर सरकार आपण सर्वांनी पाहिलं, आता त्याला अधिक बळकटी देण्याची वेळ आली आहेः पंतप्रधान मोदी

समाज आणि व्यवस्थेत सरकार प्रामाणिकपणे काम करतंय

ज्यांनी जनतेची लूट केली, त्यांना तुरुंगात धाडले. ये सिलसिला रूकेगा नही. लुटलेला जनतेचा प्रत्येक पैसा परत येईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही

सातारा कधी काळी यांचा गड होता. मात्र, आता लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकही उमेदवार द्यायला तयार नाहीतः पंतप्रधान मोदी

काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला जनताच शिक्षा देईलः

स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान झाला की, पारा चढतोः

देशाची सुरक्षा आणि राष्ट्रवाद जपण्याला प्राथमिकताः

माझ्यासाठी सातारा गुरूभूमी आहेः

तुळजाभवानी, शिवरायांना मोदींकडून वंदन

मोठ्या अर्थव्यवस्थेमुळे तरुणांच्या आशा-आकांक्षा जलदगतीने पूर्ण करू शकूः

जेवढी मोठी अर्थव्यवस्था, तेवढ्याच गतीने आपण गरिबीला मागे टाकू शकतोः

५ ट्रिलीयन अर्थव्यवस्थेसाठी याच विश्वासाने पाऊल टाकले आहेः

देशातील तरुणांवर माझा पूर्ण विश्वासः

उडाण योजनेअंतर्गत अनेक शहरे एकमेकांना जोडलीः

पुणे ते पंढरपूर महामार्गासाठी सरकार मोठं काम करतंयः

पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये कनेक्टिव्हिटीचा प्रश्न होताः

आगामी ५ वर्षांत पायाभूत सुविधांवर १०० लाख कोटी रुपये खर्च करणारः

गुंतवणूक वाढवण्यासाठी आवश्यक ते निर्णय केंद्र सरकार निश्चितपणे घेईलः

जागतिक स्तरावरील उद्योजक भारतात येण्याची इच्छा व्यक्त करताहेतः

आगामी काळ आव्हानांचा काळः

नव्या भारताच्या सक्षम अर्थव्यवस्थेसाठी आत्तापासून तयारी करायला हवीः

भारताच्या विकासात प्रत्येकाचं योगदानः

नव्या आव्हानांसाठी स्वतः तयार करणे आवश्यकः

जम्मू काश्मीर, लडाखमध्ये स्थिरता येईलः

उद्योग, व्यापार, चांगल्या गोष्टींमुळे जम्मू काश्मीर व लडाखमधील दहशतवाद हळूहळू संपुष्टात येईलः

कलम ३७० मुळे नव्या बदलाची सुरुवातः

नवा भारत हा कुणाला घाबरणारा भारत नाहीः

नव्या भारताचा आत्मविश्वास संपूर्ण जगाला दिसत आहेः

संपूर्ण जगात भारताचा डंका वाजतोयः

१३० कोटी भारतीयांमुळेच जगात भारताचं नाव आदरानं घेतलं जातंयः

लोकमान्य टिकळांनी स्वराज्यासाठी प्रयत्न केले. आता आम्ही सुराज्यासाठी प्रयत्न करतोयः

पंतप्रधान म्हणून जगभर फिरताना १३० कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करत असल्याचा अभिमानः

छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक यांना पंतप्रधान मोदींचे वंदन

देशाला त्याची झळ बसू नये यासाठी सशक्त सरकारची आवश्यकताः

देशासह जागतिक स्तरावर आर्थिक स्थिती घसरली आहेः

महापुरुषांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली ही पुण्यनगरी आहेः

पुणे ही क्रांतिकारकांची, समाजसुधारकांची आणि महावीरांची नगरीः

पुणे देशाला संस्कारही देते आणि स्टार्टअपही देतेः

प्रत्येक निवडणुकीत पुण्याने भाजपला भरभरून दिलंः

 

उमेदवार पसंत नसेल तर ..नोटाचे बटन दाबा ,पण अयोग्य उमेदवारांना मते देवू नका- अण्णा हजारे यांचे आवाहन

0

जागृत मतदार हाच लोकशाहीचा आधार

राज्य आणि राष्ट्राच्या विकासाची चावी निवडणूकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवाराच्या हातात नसून ती चावी मतदारांच्या हातात आहे. उमेदवारांच्या हातात देशाच्या विकासाची चावी आहे असे लोकांना वाटत असेल तर स्वातंत्र्याच्या 73 वर्षानंतरही देशाची ही अवस्था होण्याचे कारण काय?

जागृत मतदार सदृढ व निकोष लोकशाहीचा आधार आहे. राज्य आणि राष्ट्राला बदलण्याची चावी मतदारांच्या हातामध्ये असूनही मतदार ते चावी लावण्यास विसरले आहेत. एक नोट मिळाली की मतदार भ्रष्टाचारी, गुंड, सरकारी तिजोरीची लुट करणारा, व्यभीचारी उमेदवाराला आपले मत देतो. यामुळे विधानसभा व लोकसभा सारख्या पवित्र मंदीरामध्ये कलंकीत व भ्रष्टाचारी उमेदवार निवडून जातात. हे लोक राज्य आणि देशाचे भविष्य कसे घडविणार? यामुळे मतदारांनी विचार करण्याची गरज आहे. भारत मातेची शपथ घेऊन प्रतिज्ञा करायला हवी की मी निवडणूकीमध्ये भ्रष्टाचारी, गुंड, लुटारू, व्यभिचारी उमेदवाराला माझे अमुल्य मत देणार नाही. जो उमेदवार चारित्र्यशिल आहे, समाज आणि राष्ट्राच्या भल्यासाठी दिव्यासारखा रात्रंदिवस जळत आहे, जनतेची सेवा करणाऱ्या उमेदवारालाच माझे मत देईल. ही चावी मतदारांनी लावली तर राज्य आणि देश बदलेल.

आज राजकारणातील अनेक उमेदवार भ्रष्टाचार केल्यामुळे वेगवेगळ्या जेलमध्ये गेलेले आहेत. याला जबाबदार मतदार आहे. मतदार कोणत्याही आमिषाला बळी न पडता राज्य, राष्ट्र आणि समाजाच्या भल्यासाठी सेवाभावाने काम करणाऱ्या उमेदवाराला आपले मत दिले असते तर बदल घडला असता. असे उमेदवार जेलमध्ये गेले नसते.

अनेक मतदार म्हणत आहेत की, असा चारित्र्यशिल उमेदवार मिळणे कठीण आहे त्यामुळे मत द्यायचे कुणाला? अशा वेळी उमेदवारामध्ये जो भ्रष्टाचारी आहे, चारित्र्यशिल नसेल तर ‘नोटा’ च्या चिन्हावर मोहर लावावी. फक्ट ‘नोटा’ वर मोहर लावून बदल घडणार नाही हे आपणाला माहित आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे आमची मागणी होती की ज्या निवडणूक क्षेत्रामध्ये उमेदवाराला जेवढे मत मिळाले आहेत त्यापेक्षा जास्त मत ‘नोटा’ ला मिळाले तर निवडणूक रद्द करून फेरनिवडणूक घ्यावी आणि मतदारांनी नाकारलेल्या उमेदवारांना परत निवडणूकीसाठी उभे राहण्यास परवानगी नसावी. यामुळे पक्ष-पार्ट्या गुंड, भ्रष्टाचारी, लुटारू, व्यभीचारी उमेदवाराला तिकीट देणार नाहीत. ज्यामुळे लोकसभा व विधानसभासारख्या पवित्र मंदीरामध्ये चारित्र्यशिल उमेदवार निवडून जातील. परंतु निवडणूक आयोगाने तसे न करता ईव्हीएम मशीनवर शेवटी ‘नोटा’ आणले. मतदारांनी ‘नोटा’ ला अधिक मतदान केले तर त्या निवडणूक क्षेत्रामध्ये जे उमेदवार निवडणूकीसाठी उभे आहेत त्यांना आपण निवडणूकीसाठी लायक नाहीत त्यामुळेच आपल्यापेक्षा ‘नोटा’ ला अधिक मत मिळाले असे वाटेल.

मतदारांनी 1857 ते 1947 या 90 वर्षाच्या काळात स्वातंत्र्यासाठी ज्या लाखो लोकांनी बलिदान केले त्यांचे स्मरण करून आपले मत सेवाभावी उमेदवारालाच द्यावे.

धन्यवाद.

आपला,

कि. बा. तथा अण्णा हजारे

”श्री राम समर्थ” १ नोव्हेंबर रोजी होणार प्रदर्शित

0
राष्ट्रसंत रामदास स्वामींच्या मुख्य भूमिकेत अभिनेता शंतनू मोघे यांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार
पारंपारिक आरती आणि कंटेम्पररी गाण्यांचा उत्तम मेळ
राष्ट्रसंत रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा परिपूर्ण जीवनाचा मूलमंत्र देणारा
.
वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारी सिनेमाची सुमधुर गाणी सिनेमाला आजीवन संजीवनी देत असतात. संगीत रसिकांच्या तोंडी गुणगुणली जाणारी श्रवणीय गाणी वेगळ्याच विश्वात घेऊन जातात यात शंका नाही. असाच उत्तम संगीताचा आणि कौटुंबिक मनोरंजनाचा मेळ असलेला ”श्री राम समर्थ” सिनेमा येत्या १ नोव्हेंबर २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. विप्र एंटरटेनमेंटच्या अश्विनी माहेश्वरी आणि  दिशादिपा फिल्म्सच्या सौ. दिपा प्रकाश सुरवसे यांची निर्मिती असलेला हा सिनेमा भारती झुंबरलाल राठी आणि संजय राठी यांनी प्रस्तुत केला आहे. दिग्दर्शक संतोष तोडणकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ”श्री राम समर्थ” सिनेमाची मूळ संकल्पना  विधीतज्ञ सौ  विजया प्रवीण माहेश्वरी यांची आहे. घराघरातील संस्कारांचा पाया असलेले “मनाचे श्लोक” याचे उदगाते राष्ट्रसंत रामदास स्वामी यांनी दिलेला अमूल्य ठेवा घराघरात गेल्या कित्येक पिढ्यांपासून जपला जात आहे. त्यांनी लिहिलेला ‘दासबोध’ ग्रंथ आजच्या दैनंदिन कठीण प्रसंगात मार्गदर्शक ठरतो. त्यांनी बलोपासना, नामस्मरणाचे महत्व समजावून दिले. त्यांनी घालून दिलेला आदर्श आणि मार्गदर्शन ”श्री राम समर्थ” सिनेमात उलगडणार आहे. लग्नातील ”सावधान” या शब्दामागील नेमका अर्थ समजावून घेणारा अवघ्या १२ वर्षाचा छोटा नारायण ते अफाट ज्ञान आणि रामरायाच्या भक्तीत आकंठ बुडून प्राप्त केलेली सिद्धी संत रामदास स्वामींच्या ठायी पाहायला मिळते. स्त्रियांचा आदर आणि महिला सबलीकरणाचे समर्थ खरेखुरे पुरस्कर्ते  होते हे देखील सिनेमात पाहण्यास  मिळते.
            श्री राम समर्थ सिनेमाचे संगीत दिग्दर्शन संजय मराठे आणि महेश नाईक या जोडीने केले. सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे तसेच नवोदित गायक बाळासाहेब सावंत आणि गायिका सौ मीना निकम यांच्या सुमधुर आणि एकमेकांशी पूरक असणाऱ्या आवाजात या सिनेमातील पाच गाणी सजली आहेत. आजच्या तरुणाईला आवडेल त्यांच्या पिकनिकची  जान बनेल असं गायक अवधूत गुप्ते यांच्या एनर्जेटिक आवाजातील ”यू टर्न” हे गाणं सिनेमातील दोन पिढ्यांमधील दुवा आहे असं म्हंटलं तर वावगं ठरू नये. आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत श्री गणेशाची रामदास स्वामी रचित ”सुखकर्ता दुःखकर्ता” ही आरती वेगळ्या तालासुरात ऐकायला मिळणार आहे. सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या भारदस्त आवाजातील चढलेल्या स्वरसाजाने या गाण्याला आलेली लकाकी सिनेमा पाहताना अनुभवता येईल. स्त्री रूपाचा महिमा सांगणारी ”दुर्गे दुर्घट भारी” ही आरती निव्वळ कोरसमध्ये गायलेली सिनेमात पाहायला मिळणार आहे. राष्ट्रसंत रामदास स्वामी रचित ”सत्राणें उड्डाणें” ही मारुतीरायाची आरती गायक बाळासाहेब सावंत यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजात स्वरबद्ध केली आहे. महाराष्ट्रातील विविध भागात वसलेल्या अकरा मारुतींचे दर्शन या सिनेमाच्या निमित्ताने घडतं. गीतकार बाबा चव्हाण लिखित गायक बाळासाहेब सावंत आणि गायिका सौ मीना निकम यांनी हे गाणं गायलं आहे. दासबोध ग्रंथातील २८ ओव्या सिनेमातील संवादांना नेमका अर्थ मिळवून देतात. याबाबत अधिक माहिती देताना सिनेमाचे संगीत दिग्दर्शक संजय मराठे आणि महेश नाईक म्हणाले, सिनेमाची धाटणी कुठेही बटबटीत वाटू नये यासाठी पारंपरिक संगीताला आधुनिकतेची जोड दिली आहे. खरंतर हेच मोठं आव्हान होतं. रामदास स्वामींचे शब्द आणि विचारसरणीस कुठेही धक्का न लावता संगीत देणं कठीण काम असल्याने त्याला वेळही बराच लागला. उदाहरण द्यायचं झालं तर या सिनेमातील  ”सुखकर्ता दुःखकर्ता” आरतीसाठी एकूण आठ चाली तयार केल्या होत्या. रामदास स्वामींचा तो ऐतिहासिक काळ आणि आजचे एकूण वातावरण यांना एकत्र बांधेल असे पार्श्वसंगीतही करण्याचं आव्हानही आम्ही पेललं.
             स्वच्छ परिसर आणि समृद्ध समाज ही चारशे वर्षांपूर्वी समाजात रुजवलेली संकल्पना आजही तितकीच महत्वपूर्ण ठरत आहे. अभिनेता शंतनू मोघे, अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, महेश कोकाटे, सौरभ गोखले, सयाजी शिंदे, प्रकाश सुरवसे, हृदयनाथ राणे, करण बेंद्रे, विजयासुमन, बालकलाकार अद्वैत राईलकर आणि अनेक नवोदित चेहरे सिनेमात पाहायला मिळणार आहे. बहुचर्चित सिनेकलाकारांच्या उत्तम आणि खुमासदार अभिनयामुळे या सिनेमाला एक वेगळीच लकाकी मिळाली आहे. हा सिनेमा रामदास स्वामींच्या चरित्रपटापेक्षा  समाजातील सद्य परिस्थितीचे नेमके आणि मार्मिक वर्णन करणारा आहे. सिनेमात दाखविलेल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना उत्तम प्रशासन आणि प्रशासक कसे असावे याबद्दल नेमकं भाष्य करतात.  कथा-पटकथा-संवाद प्रकाश जाधव, मनोज येरुणकर, विठ्ठल आंबुरे यांनी केलं आहे. छायांकन समीर आठल्ये, संकलन सुबोध नारकर, कला महेंद्र राऊत, नृत्यदिग्दर्शन सुजित कुमार यांनी दिले आहे. बुद्धिजीवी व रामरायाचे  निस्सीम  भक्त  असलेल्या राष्ट्रसंत रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा परिपूर्ण जीवनाचा मूलमंत्र देणारा आहे. रंजक तसेच उद्बोधक उबोधक आणि प्रेरणादायी सिनेमा संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्याची उत्तम संधी येत्या १ नोव्हेंबर पासून  प्रेक्षकांना मिळणार आहे.

खा. संजय काकडेंचा सिद्धार्थ शिरोळेंच्या प्रचारात सक्रीय सहभाग

पुणे : शिवाजीनगर मतदार संघातील शेवटच्या मतदारापर्यंत पोचण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबरच संपूर्ण प्रचारयंत्रणेमध्ये सध्या खा. संजय काकडे यांचा सक्रीय सहभाग आहे. भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे शिवाजीनगर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारात गेल्या पंधरवड्यापासून खासदार संजय काकडे हे बारकाईने लक्ष घालत आहेत.

संपूर्ण मतदारसंघातील वेगवेगळे मेळावे, पदयात्रा, प्रचारफेऱ्यांचे आयोजन आणि प्रचाराची सगळी यंत्रणा चोख आहे ना याकडे काकडेंचे विशेष लक्ष आहे. बुधवारी सायंकाळी काकडेंच्या हस्ते आनंद छाजेड यांच्या निवडणूक कार्यालयाचे बोपोडीत उद्घाटन झाले आणि त्यानंतर भव्य पदयात्रा पार पडली. या पदयात्रेत सिद्धार्थ शिरोळेंसोबत संजय काकडेही सहभागी झाले होते. या वेळी नगरसेवक दुर्योधन भापकर, अभय सावंत, सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर, अर्चना मुसळे, बंडू ढोरे, मधुकर मुसळे, उत्तम बहिरट, ओंकार कदम, विजय शेवाळे, कैलास टोणपे, मनीष बासू, चंद्रकांत मोरे हे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान मातंग समाजाचा भव्य मेळावा मॉर्डन कॉलेजच्या सभागृहात बुधवारी घेण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन नगरसेविका स्वाती लोखंडे यांनी केले होते. त्यावेळी सिद्धार्थ शिरोळे यांनी मातंग समाजाच्या अपेक्षा जाणून घेतल्या. भाजपा शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, राजश्री काळे, हरिभाऊ घोडके, तुषार मोहिते या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर किलबिल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक प्राचार्य रफीक सौदागर यांची सिद्धार्थ शिरोळेंनी भेट घेत त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली.

सिद्धार्थ शिरोळे यांनी डेक्कन जिमखाना क्लब आणि टिळक स्विमिंग टँकला देखील   गुरूवारी सकाळी भेट देत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी क्लबच्या क्रीडा समिती सदस्य आणि अथलेटिक्सचे सचिव अतुल रूणवाल, नियामक मंडळ सदस्य प्रमोद बकरे, सरचिटणीस विश्वास लोकरे, जलतरण विभागाचे सचिव अमित गोळवलकर, टेनिस समतीचे सल्लागार किशोर परांजपे, सुशील पाटील, विजय गवारे, मिलिंद लुंकड, एस बी मंत्री, इंद्रसेन घोरपडे, शरद नाटेकर, अनिल गायकवाड उपस्थित होते.

विज्ञान परिषदेतर्फे ‘लैंगिक उत्क्रांती’वर चर्चा

0
पुणे : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आयोजित ‘लैंगिक उत्क्रांती’वर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. डॉ. शंतनु अभ्यंकर व डॉ. मिलिंद वाटवे या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. येत्या शुक्रवारी (दि. १८ ऑक्टोबर २०१९) रोजी सायंकाळी ६.१५ वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहामध्ये हे चर्चासत्र होणार आहे. 
 
मनुष्यप्राण्यात उत्क्रांती होताना लैंगिकतेची आणि लैंगिक जाणिवेची उत्क्रांती होत आजपर्यंत वाटचाल कशी झाली? याविषयी या चर्चासत्रात भर दिला जाणार आहे. तरी अधिकाधिक पुणेकर विज्ञान प्रेमींनी हा विषय समजून घेण्यासाठी चर्चासत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्रकुमार सराफ यांनी केले आहे.

सोलारिस आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत डेक्कन चॅलेंजर्स, टेनिस टायगर्स, डेक्कन ऍवेंजर्स, पीसीएलटीए यांचा उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश

0
पुणे : सोलारिस क्लब  व पीएमडीटीएच्या संलग्नतेने आयोजित व रावेतकर हाऊसिंग यांच्या तर्फे प्रायोजित सोलारिस आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत  डेक्कन चॅलेंजर्स,   टेनिस टायगर्स,  डेक्कन ऍवेंजर्स,  पीसीएलटीए यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. 
 
मयूर कॉलनी येथील सोलारिस क्लब टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत डेक्कन ऍवेंजर्स संघाने सोलारीस फायटर्स संघाचा 24-09 असा पराभव करत उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. यात पद्माकर कर्वे,सचिन आराध्ये, केदार जोगळेकर, राजीव पागे,  आलोक गोळे, अमुल बापट,  केदार दिक्षित व सचिन आराध्ये यांनी विजयी कामगिरी केली. दुस-या लढतीत डेक्कन चॅलेंजर्स संघाने एस हंटर्स संघाचा 24-01 असा एकतर्फी पराभव करत उप-उपांत्यपुर्व फेरी गाठली. यात  मुकुंद जोशी, नितिन जोशी, मदन गोखले, अजय कामत,  चिराग रुनवाल, आशिष पुंगलीया ,  मिहिर केळकर व मुकुंद जोशी यांनी विजय संपादन केला.
 
अन्य लढतीत टेनिस टायगर्स संघाने क्विनस् टाऊन संघाचा 24-12 असा पराभव केला. यात तुषार वाकडे,विजय हतनकर  ताकर पारीख, अभिजीत मराठे, शिवाजी यादव,इंद्रजीत दाते , केदार पाठक व सुरेश घुले यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाला विजय विजवून दिला. तर पीसीएलटीए संघाने आरपीटीए सोलारीस संघाचा 24-02 असा सहज पराभव करत उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.  
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी    

डेक्कन ऍवेंजर्स वि.वि सोलारीस फायटर्स 24-09(100 अधिक- पद्माकर कर्वे/सचिन आराध्ये वि.वि मनोज पालवे/महेंद्र गोडबोले 6-1; 90 अधिक- केदार जोगळेकर/राजीव पागे वि.वि राजू पिंपळे/सचिन खिलारे 6-2; खुला गट- आलोक गोळे/अमुल बापट वि.वि संतोष दळवी/महेंद्र गोडबोले 6-5 (7-5); खुला गट- केदार दिक्षित/सचिन आराध्ये वि.वि राजेंद्र देशमुख/अनुज पिंपळे 6-1);

डेक्कन चॅलेंजर्स वि.वि एस हंटर्स 24-01(100 अधिक- मुकुंद जोशी/नितिन जोशी वि.वि लक्ष्मीकांत श्रोत्री/संजय बाबर 6-0; 90 अधिक- मदन गोखले/अजय कामत वि.वि दिपू गलगली/सुरेंद्र देशमुख 6-0; खुला गट- चिराग रुनवाल/आशिष पुंगलीया वि.वि आनंद परचुरे/ मयुर कुलकर्णी 6-1; खुला गट- मिहिर केळकर/मुकुंद जोशी वि.वि दिपू गलगली/दयानंद देशपांडे 6-0);

टेनिस टायगर्स वि.वि क्विनस् टाऊन 24-12(100 अधिक- तुषार वाकडे/विजय हतनकर वि.वि संतोष जयभाय/जितेंद्र जोशी 6-0; 90 अधिक- ताकर पारीख/अभिजीत मराठे वि.वि रुपेश मेटकर/सुरेंद्र 6-5(7-5); खुला गट- शिवाजी यादव/इंद्रजीत दाते वि.वि महेंद्र प्रभु/सरवानन 6-5(7-2); खुला गट- केदार पाठक/सुरेश घुले वि.वि मंदार पाटील/अमृत खोडके 6-2);

पीसीएलटीए वि.वि आरपीटीए सोलारीस 24-02(100 अधिक- राजेश/गिरीष वि.वि संजीव घोलप/जयंत पवार 6-1; 90 अधिक- रवी जौहानी/निर्मल वाधवानी वि.वि रवी बजाज/हेमंत भोसले 6-1; खुला गट- नंदू रोकडे/विशाल साळवी वि.वि अन्वित पाठक/सिध्दु 6-1; खुला गट- जॉय बॅनर्जी/अनंत गुप्ता वि.वि संजीव घेलप/शैलेश पटवर्धन 6-1). 

एफसी फाल्कन्स वि.वि सोलारीस डायनामोज् 24-07(100 अधिक- रवी बजाज/एसके प्रसाद वि.वि रवी भांडेकर/संभाजी शिंदे 6-4; 90 अधिक- कपिल बारवके/निलेश भोेसले वि.वि अभय कुलकर्णी/संजय अगरवाल 6-1; खुला गट- संज्योत तावडे/केदार राजपाठक वि.वि मंदार काळे/यशराज उभे 6-1; खुला गट- वैभव अवघडे/गणेश देवखीळे वि.वि श्रीकांत पवार/पार्थ सहस्त्रबुध्दे 6-1). 

मर्सिडिज-बेंझ जी-क्लास नव्या रूपात दाखल – G 350 d

0

नव्या मर्सिडिज-बेंझ G 350 d ची किंमत 1.5 कोटी रुपयांपासून, एक्स-शोरूम, भारत अशी आहे.  

मुंबईमर्सिडिज-बेंझ या भारतातील सर्वात मोठ्या लक्झरी कार उत्पादकाने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण, अद्वितीय जी-क्लाससाठी डिझेलचा पर्याय उपलब्ध करून एसयूव्ही पोर्टफोलिओ आज अधिक सक्षम केला आहे. जी-क्लास ही उल्लेखनीय कामगिरी करणारी ऑफ-रोडर आहे व तिने अनेक वाहनांसाठी आदर्श निर्माण केला आहे. नवे G 350 d दाखल करून, ही ऑफ-रोडर अधिक कार्यक्षम “G” बनणार आहे. मर्सिडिज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक यांनी आज मुंबई येथे नवी मर्सिडिज-बेंझ G 350 d दाखल केली.

“1979 मध्ये निर्मिती झाल्यापासून, जी-क्लास जगभर अतुलनीय व वैशिष्ट्यपूर्ण राहिला आहे. लक्झरी ऑफ-रोड वाहनांमध्ये हा बेंचमार्क आहे. आज, मर्सिडिज-बेंझने भारतातील चाहत्यांसाठी व ग्राहकांसाठी पहिलावहिला डिझेल जी-क्लास, म्हणजे मर्सिडिज-बेंझ G 350 d दाखल केली आहे. कस्टमायझेशनच्या असंख्य संधी असणारी G 350 d हे चाहत्यांसाठी लाइफस्टाइल वाहन आहे. या वाहनामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिनिधीत्व दिसू शकते. जी-क्लासमधील ऑफ-रोडिंग क्षमतांमुळे हे वाहन अधिक आकर्षक ठरते. 40 वर्षांहून अधिक समृद्ध इतिहास असणाऱ्या जी-क्लासने या श्रेणीतील कमालीच्या स्पर्धेमध्ये स्वतःचे खास स्थान निर्माण केले आहे. जी-क्लासच्या उत्साही चाहत्यांना त्यांची आवडती लक्झरी ऑफ रोडर नव्या स्वरूपातही आवडेल, अशी खात्री आहे,” असे मर्सिडिज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले, “आम्ही 2019 साठी आमच्या उत्पादनांमध्ये बदल करण्यास आज सुरुवात केली आहे. त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण जी-क्लासपेक्षा चांगले उत्पादन दुसरे कुठले असणार. नव्या G 350 d च्या निमित्ताने, आम्ही चोखंदळ ग्राहकांसाठी 15 हून अधिक स्पेशालिटी व एएमजी कार देणार आहोत. जी-क्लास हे उल्लेखनीय वाहन असून, त्यामध्ये ऑफ-रोडिंग क्षमता व दररोज गाडी चालवण्याचा आनंद यांची सांगड घातली आहे. हे वाहन दाखल केल्याने भारतासाठीचे आमचे ‘टॉप ऑफ पिरॅमिड’ उत्पादन धोरण अधिक बळकट होणार आहे. आम्ही चौथ्या तिमाहीसाठी उत्पादनांमध्ये विविध बदल करण्याचे नियोजन केले आहे आणि आम्ही लक्झरी श्रेणीतील आमचे आघाडीचे स्थान कायम राखू, याची खात्री आहे,” असे त्यांनी सांगितले.

नव्या मर्सिडिज-बेंझ G 350 d च्या तांत्रिक वैशिष्ट्यांवर एक दृष्टिक्षेप

इंजिन इन-लाइन 6 सिलिंडर
डिस्प्लेसमेंट 2925 cc
आउटपुट 210 kW (286 hp) at 1200-3200 rpm
पीक टॉर्क 600 Nm at 2500-3500 rpm
ड्राइव्ह सिस्टीम 4MATIC ऑल-व्हील ड्राइव्ह, रिअर-बाएस्ड टॉर्क डिस्ट्रिब्युशन 40:60
ट्रान्समिशन 9G-TRONIC
अक्सिलरेशन (0-100 km/h) 7.4 सेकंद
टॉप स्पीड 199 km/h

 

अधिक चपळता व ट्रॅक्शन: 4MATIC ऑल-व्हील ड्राइव्ह

नवी ट्रान्स्फर केस थेट 9G-TRONIC वर फ्लँज-माउंटेड असते. 40 टक्के ड्राइव्ह टॉर्क फ्रंट अक्सलवर व 60 टक्के रिअर अक्सलवर असतो. हे कॉन्फिगरेशन प्रामुख्याने रस्त्यावर विविध वैशिष्ट्ये हातळण्यासाठी उपयोगी ठरते. कायमस्वरूपी ऑल-व्हील ड्राइव्हमुळे जास्तीत जास्त ट्रॅक्शन मिळते. “G” हे “G” असल्याने तेथे नेहमीच काहीतरी वेगळे असते. लो-रेंज ऑफ-रोड रिडक्शन गिअरमुळे ड्राइव्ह व्हील्सवर टॉर्कमध्ये वाढ होते व त्यामुळे आव्हानात्मक रस्त्यावरही वाहन चालवणे शक्य होते.

 

आयव्हरी कोस्टमध्ये बीव्हीजी कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणार : गॉसौ टॉरे

0

पुणे-बीव्हीजी कृषी तंत्रज्ञानामुळे विषमुक्त शेतमालाचे दुप्पट उत्पादन मिळते.

आयव्हरी कोस्टमधील शेतमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी आम्ही बीव्हीजी कृषी

तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे असल्याचे प्रतिपादन अफ्रिकेतील आयव्हरी

कोस्टचे कृषी मंत्री गॉसौ टॉरे यांनी केले.

 

सातारा मेगाफुड प्रकल्पाला त्यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी आयोजित

करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सातारा मेगाफुड पार्कचे

अद्यक्ष विजयकुमार चोले, नाबार्डचे संदीप शर्मा, नायाब तहसीलदार दयानंद

कोळेकर, उपविभागीय कृषी अधिकारी महेश झेंडे उपस्थित होते. यावेळी बोलताना

टॉरे म्हणाले, आयव्हरी कोस्टमध्ये विषमुक्त शेतमालाचे उत्पादन वाढवण्याचा

आमचा मानस आहे. बीव्हीजीने विषमुक्त शेतमाल निर्मितीची चळवळ भारतात

सुरु केली आहे. त्याच आधारावर आम्हाला आयव्हरी कोस्टमध्ये विषमुक्त

शेतमाल निर्मितीची चळवळ सुरु करायची आहे. मेगाफूड पार्कमधील शेतमालावर

प्रक्रीया करून दर्जेदार खाद्याची निर्मिती होत आहे. मेगा फूड प्रकल्पाद्वारे

आयव्हरी कोस्टमध्ये रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होणार आहे.

 

चोले म्हणाले की, प्रक्रीया उद्योगासाठी लागणाऱ्या शेतमालाची खरेदी

शेतकऱ्यांनाकडून केली जाते. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना सुद्धा

मेगाफुडपार्कमुळे अधिकचा नफा मिळतो आहे. मेगाफुड पार्कमध्ये तयार होणाऱ्या

सर्वच उत्पादनांना भारतभरातुन मागणी वाढली आहे. बीव्हीजीने मेगाफुड

पार्कच्या माध्यामातून ग्रामिण भारतात अर्थव्यवस्थेचे रोल मॉडेल तयार केले

आहे. याच मॉडेलचा फायदा आयव्हरी कोस्टमधील शेतकऱ्याना होणार आहे.

पाण्याचे संकट नैसर्गिक नाही तर  भाजपाचे पाप – अरविंद शिंदे (व्हिडिओ)

पुणे- धरणे भरून वाहत असताना ,रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असताना ,गेली चार वर्षे सातत्याने पुरेसा जलसाठा असताना कसबा पेठ आणि पुण्याच्या परिसरात पिण्याच्या पाण्याचे निर्माण झालेले संकट हे नैसर्गिक नसून हे भाजपचे पाप आहे आणि ते महापौर आणि तत्कालीन कसब्याचे आमदार ,मंत्री यांच्या माथ्यावर आहे असा घणाघाती आरोप आज कसब्याचे कॉंग्रेस -राष्ट्रवादी  आघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे यांनी केला .आज त्यांनी आपल्या प्रचारार्थ काढलेल्या बाईक रेली चा समारोप महात्मा फुले स्मारकाजवळ करताना केलेल्या भाषणातून केला .
 महापालिकेतील अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना महापौर जबाबदार आहेत . आपण पुराव्यानिशी जाहीर पणे  याबाबत खुलेआम प्रश्न विचारू त्यांनी उत्तरे देण्यास स्वतः किंवा आपला प्रतिनिधी येवून आमने सामने करावे असे आपले खुले आवाहन यावेळी त्यांनी दिले ..पहा ते नेमके काय म्हणाले ,ऐका त्यांच्याच शब्दात ….