मुंबई : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल उद्या म्हणजेच गुरूवारी जाहीर होणार असून, मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी पंचवीस हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली आहे.राज्यात सर्वात कमी मतदान कुलाबा, डोंबिवली आणि कल्याण पश्चिम मतदारसंघात झाले आहे. या मतदारसंघातील निकाल अकरा वाजेपर्यंत लागण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे की महाआघाडीचे राज्य येणार हे स्पष्ट होणार आहे त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
विधानसभा निवडणूकीत शिवसेना भाजप मित्र पक्षांची महायुती, कॅांग्रेस आणि राष्ट्रवादी मित्र पक्षांची महाआघाडीसह वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने उतरली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह आदित्य ठाकरे यांनी राज्यातील विविध भागात प्रचार सभा घेवून वातावरण निर्मिती केली होती.विविध खाजगी वृत्त वाहिन्यांच्या कल चाचणीत महायुतीला जास्त जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे उद्याचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील जनतेने कोणाला कौल दिला आहे हे उद्या म्हणजेच गुरूवारी स्पष्ट होणार आहे.काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी महायुतीच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे केल्याचे चित्र आहे तर मुंबईसह राज्यातील काही मतदारसंघात महायुतीत झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेना भाजपला फटका बसतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.राज्यातील सर्वच मतमोजणी केंद्रांवर उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होईल.
दरम्यान सर्व मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे २ वेळा प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. २६९ ठिकाणी २८८ केंद्रावर ही मतमोजणी होणार आहे. एका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात १४ ते २० टेबल ठेवण्यात येतात. एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक, दोन सहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचारी आणि प्रत्येकी एक सूक्ष्म निरीक्षक असतो. मतदारसंघातील ५ बूथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. हे पाच बूथ चिठ्ठी टाकून उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीत निवडले जातात. व्हीव्हीपॅट मधील चिट्ठीतील मते आणि ईव्हीएमवरील मतांची पडताळणी यावेळी केली जाते. प्रारंभी टपाली मते आणि बारकोडद्वारे इटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) मोजली जातील.प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. प्रत्येक टेबलला स्ट्रॉंग रूम पासून ईव्हीएम ने-आण करण्यासाठी वेगळे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.स्ट्रॉंगरूम तसेच मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. स्ट्रॉंगरूम मधून मतपेट्या बाहेर काढणे मतमोजणी व नंतर पेट्या स्ट्रॉंग रूममध्ये जमा करणे या सर्व बाबींचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे.संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक (ऑब्झर्वर) उपस्थित राहतील. फेरीनिहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील. सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत.मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्रॉंगरूमला केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल आणि स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.
राज्यात सर्वात कमी मतदान कुलाबा मतदार संघात ४०.११ टक्के, डोंबिवली मतदारसंघात ४०.७२ तर कल्याण पश्चिम मतदारसंघात ४१.७४ टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघातील निकाल सर्वात लवकर लागून पहिला निकाल सकाळी ११ वाजता हाती येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पहिला निकाल ११ वाजता हाती येणार
भारतातील वैयक्तिक संपत्तीत 2019 मध्ये 9.62% वाढ- झाली 430 लाख कोटी रुपये
कार्वी प्रायव्हेट वेल्थने जाहीर केली इंडिया वेल्थ रिपोर्ट 2019 ची 10वी आवृत्ती
- वैयक्तिक गुंतवणूकदारांचा कल भौतिक मालमत्तांकडून वित्तीय मालमत्तांकडे वळत असून, गेल्या 5 वर्षांत वित्तीय मालमत्तांचे प्रमाण 57.25% वरून 60.95% पर्यंत वाढले आहे.
- वित्तीय मालमत्तांमध्ये डायरेक्ट इक्विटीने पहिले स्थान कायम राखले, आर्थिक वर्ष 2019 मध्ये केवळ 6.39% वाढ झालेली असली तरीही.
- 5 ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे भारताचे स्वप्न वैयक्तिक संपत्तीवरही परिणाम करणार असून वैयक्तिक संपत्तीमध्ये सध्याच्या 430 लाख कोटी रुपयांवरून अंदाजे 799 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.
पुणे, ऑक्टोबर 23: कार्वी प्रायव्हेट वेल्थ या कार्वी ग्रुप या आघाडीच्या वित्तीय सेवा समूहाच्या संपत्ती व्यवस्थापन कंपनीने आज ‘इंडिया वेल्थ रिपोर्ट 2019’ची 10वी आवृत्ती जाहीर केली आहे. हा अहवाल भारतातील प्रत्येक व्यक्तीने सर्व संपत्ती वर्गांमध्ये गुंतवलेल्या प्रत्येक रुपयाचा मागोवा घेतो.
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत संपत्तीमध्ये झालेल्या वाढीची तुलना करता, भारतातील वैयक्तिक संपत्ती आर्थिक वर्ष 19 मध्ये 9.62% वाढून 430 लाख कोटी रुपये झाली आहे. यातील बहुतांश वाढ वित्तीय मालमत्तेमध्ये 10.96% वाढ झाल्याने साध्य झाली आहे, तर या तुलनेत भौतिक संपत्तीमध्ये 7.59% वाढ झाली. डायरेक्ट इक्विटीने गुंतवणुकीचा मोठा हिस्सा आकृष्ट करून आघाडीचे स्थान कायम ठेवले आणि 6.39% वाढ नोंदवली. म्युच्युअल फंड, पेन्शन फंड, पर्यायी गुंतवणूक व आंतरराष्ट्रीय मालमत्ता यांनी चांगली वाढ साध्य केली.
यानिमित्त बोलताना, कार्वी प्रायव्हेट वेल्थचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत भावे यांनी सांगितले, “भारतात गुंतवणुकीच्या पर्यायांची निवड करत असताना डायरेक्ट इक्विटीला आजही सर्वाधित प्राधान्य दिले जाते. भारतातील इक्विटी बाजारात किती चढ-उतार आले तरी या बाजारावर असणारा गुंतवणूकदारांचा विश्वास यातून अधोरेखित होतो. 2024 पर्यंत, 5 ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या भारताच्या लक्ष्याचा सकारात्मक परिणाम वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या संपत्तीवर दिसून येईल, असे आम्हाला वाटते. पुढील पाच वर्षांत भारतातील एचएनआय लोकसंख्या 1 दशलक्षपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.”
आर्थिक वर्ष 19 मध्ये, वित्तीय मालमत्तांतीतल वैयक्तिक संपत्तीमध्ये 10.96% वाढ झाली आणि ही संपत्ती आर्थिक वर्ष 18 मधील 236 लाख कोटी रुपयांवरून 262 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली. गेल्या वर्षाप्रमाणे, गुंतवणुकीसाठी आघाडीचे 5 पर्याय डायरेक्ट इक्विटी, फिक्स्ड डिपॉझिट, इन्शुरन्स, बचत खाती व रोख असे होते. त्यांचे वित्तीय मालमत्तांमध्ये एकूण योगदान 72.33% होते.
आर्थिक वर्ष 19 मध्ये, भौतिक मालमत्तांमधील वैयक्तिक संपत्ती 7.59% वाढली. त्यामध्ये, सोने व रिअल इस्टेट यांचे एकत्रित योगदान 92.57% होते. या आर्थिक वर्षात, वैयक्तिक गुंतवणूकदारांनी भौतिक स्वरूपातील मालमत्तांमध्ये केलेली एकूण गुंतवणूक 167 लाख कोटी रुपये आहे.
आर्थिक वर्ष 24 पर्यंत, भातातील एकूण वैयक्तिक संपत्ती 13.19% सीएजीआरनुसार वाढून अंदाजे 799 लाख कोटी रुपये होईल, असा अंदाज आहे. सध्या ही संपत्ती 430 लाख कोटी रुपये आहे. वित्तीय मालमत्तांमध्ये होणारी गुंतवणूक 66.11% असेल, तर भौतिक मालमत्तांमध्ये 33.89% गुंतवणूक केली जाईल, असा अंदाज आहे.
कन्झमशनमध्ये वाढ झाली की, पायाभूत सुविधा व हरित ऊर्जा यामध्ये लक्षणीय गुंतवणूक, तसेच कर सुधारणेसारखे नियमनातील बदल, मोठ्या प्रमाणात तरुण मनुष्यबळ यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 5 ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चालना मिळणार आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी निम-शहरी व ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागही वाटचाल करणार आहे.
कार्वी प्रायव्हेट वेल्थविषयी
कार्वी प्रायव्हेट वेल्थ ही कार्वी समूहाची वेल्थ मॅनेजमेंट कंपनी असून ती हाय नेट-वर्थ इंडिव्हिज्युअल्सना (एचएनआय) व कुटुंबांना त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार विशेष व कस्टमाइज्ड संपत्ती व्यवस्थापन सेवा देते. या क्षेत्रातील दिग्गजांचे पाठबळ असलेल्या विविध उत्पादनांमुळे कार्वी प्रायव्हेट वेल्थ येथे परिपूर्ण संपत्ती व्यवस्थापन उपलब्ध आहे. आमच्या ग्राहकांना सुस्पष्ट, तटस्थ व योग्य गुंतवणूक पर्याय देण्याच्या समूहाच्या मतानुसार सेवा दिली जाते. कार्वी प्रायव्हेट वेल्थ 2 स्तरांवरील ओपन आर्किटेक्चर फर्म आहे – संपत्तीवर्गाचा स्तर व उत्पादन स्तर आणि डेट्, इक्विटी, रिअल इस्टेट व पर्यायी संपत्ती अशा सर्व संपत्तीवर्गांमध्ये सर्वंकष गुंतवणूक पर्याय उपलब्ध करते.
कार्वी समूहाविषयी
सन 1982 मध्ये स्थापन झालेला व हैदराबाद येथे मुख्यालय असलेला कार्वी समूह हा भारतातील आघाडीचा वित्तीय सेवा समूह आहे. हा समूह गेल्या काही वर्षांत स्थिरपणे वाटचाल करत असून, विविध प्रकारच्या वित्तीय सेवांसह जागतिक स्तरावर अस्तित्व निर्माण करत आहे. हा समूह विविध व्यवसायांच्या बाबतीत व स्पर्धेच्या बाबतीत आघाडीच्या स्थानी आहे. हा समूह सर्व वित्तीय सेवा समाविष्ट करतो – रजिस्ट्री व शेअरचे हस्तांतर, स्टॉक ब्रोकिंग, वित्तीय उत्पादनांचे (इक्विटी, म्युच्युअल फंड, आयपीओ, बाँड मुदत ठेवी) वितरण, संपत्ती व्यवस्थापन, कॉर्पोरेट फायनान्स, कमॉडिटीज ब्रोकिंग, एनबीएफसी, डाटा मॅनेजमेंट सर्व्हिसेस, इन्शुरन्स ब्रोकिंग, इन्व्हेस्टमेंट ब्रोकिंग व डिपॉझिटरी पार्टिसिपंट.
“शिवसेनेला शंभरपेक्षा जास्त जागा – नीलम गोऱ्हे
पुणे-“विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे उद्या लागणाऱ्या निवडणुकीच्या निकालात शिवसेनेला शंभरपेक्षा जास्त जागा मिळतील,” असा दावा शिवसेना उपनेत्या आणि उपसभातपती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला आहे.
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला राज्यात मतदान झाले. उद्या (२४ ऑक्टोबर) उद्या कुणाचा ‘निकाल’ लागणार हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला किती जागा मिळणार यावर पक्षाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपली भूमिका मांडली आहे. कसबा पेठ येथील पवळे चौकात दिवाळी सणानिमित्त ना नफा ना तोटा फराळ स्टॉलचे उद्घाटन डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी त्या बोलत होत्या.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या,”यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यभरात महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. मतदानावेळी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहण्यास मिळाला. तसेच मागील पाच वर्षांत सरकारने चांगले काम केल्याचं, अनेक ठिकाणी नागरिकांनी पुढे येऊन बोलून दाखविलं आहे. त्यामुळे महायुतीला जनता पुन्हा काम करण्याची संधी देणार आहे. हे लक्षात घेता, शिवसेनेला १०० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला. शिवसेनेने निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने, पुढील पाच वर्षात पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आरडब्ल्यूआयटीसीच्या पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019 अंतिम टप्प्यात
- शुक्रवार व शनिवार होणार्या दोन रोमांचकारी अश्वशर्यतींने होणार यंदाच्या पुणे मॉन्सूनअश्वशर्यतीं हंगाम 2019 चा समारोप
पुणे, 23ऑक्टोंबर 2019 : पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019 मधील येत्या शुक्रवार, 25 व शनिवार 26 ऑक्टोबर रोजी होणार्या महत्वाच्या दोन लढतीने द रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या अश्वशर्यतींच्या मौसमाची सांगता होणार आहे. यातील शुक्रवारी होणार्या पहिल्या रंगतदार शर्यतीत द जनरल राजेंद्र सिंहजी मिलियन शर्यत जिंकण्यासाठी प्रशिक्षित केलेल्या अश्वांमधील झुंज पाहता येणार आहे.
शुक्रवार, 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 वाजता सुरु होणार असून हि प्रतिष्ठेची शर्यत सी सदर्न कमांडचे जी.ओ.सी राजेंद्र सिंहजी यांच्या स्मरणार्थ 1967 साली सुरु करण्यात आली. त्यानंतर 1968 मध्ये राजेंद्र सिंहजी कप शर्यतीला द जनरल राजेंद्र सिंहजी मिलियन नाव देण्यात आले. 1600 मीटर अंतराची हि शर्यत स्प्रिंटसाठी महत्वाची मानली जाते. शनिवारी,26 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 वाजेपासून आरडब्ल्यूआयटीसी लिमिटेड गोल्ड ट्रॉफी शर्यत सुरू होणार आहे. द आरडब्ल्यूआयटीसी इन्व्हिटेशनल ट्रॉफी (ग्रेड 2) शर्यत22 फेब्रुवारी 1976 रोजी द आरडब्ल्यूआयटीसी डायमंड जुबली इन्व्हिटेशनल रेस म्हणून सुरु करण्यात आली. सर्वप्रथम मुंबई येथे सुरु करण्यात आलेली हि शर्यत त्यानंतर पुणे येथे स्थलांतरित करण्यात आली. 1987 मध्ये या शर्यतीला महत्वाचा दर्जा प्राप्तझाला.
सीबीआरने लाँच केला पोस्टाचा खास स्टँप
– भारत सरकारच्या पोस्टल विभागातर्फे हा स्मरणार्थ स्टँप देशभरात उपलब्ध केला जाणार
– देशातील आघाडीचे स्थान राखत सीबीआरईचा 20 टक्क्यांपेक्षा जास्त सीएजीआरने विकास
मुंबई– जगातील आघाडीची रियल इस्टेट कन्सल्टिंग कंपनी असलेल्या सीबीआरई साउथ एशिया प्रा. लि. कंपनीने आज भारत सरकारच्या पोस्ट विभागाबरोबर आपला खास पोस्टेज स्टँम्प लाँच केला. भारतीय बाजारपेठेतील कामकाजाची 25 वर्ष तसेच बाजारपेठेतील आघाडीचे स्थान साजरे करण्यासाठी हा स्टँप लाँच करण्यात आला.
या स्टँपचे अनावरण सीबीआरई ग्रुप इंकचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रॉबर्ट ई सुलेन्टिक आणि श्री. अंशुमन मॅगझिन, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, भारत, दक्षिण आफ्रिका, पूर्व आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिका यांच्या हस्ते करण्यात आले.
कंपनीची एकूण कर्मचारी संख्या 10 हजार असून सीबीआरई भारत 20 टक्क्यांपेक्षा जास्त सीएजीआरसह विकसित होत आहे. कंपनीने देशाच्या प्रत्येक प्रदेशात आपला विस्तार केला आहे. मध्यम तसेच वरिष्ठ नेतृत्व गटातील अतिशय कमी अट्रिशनसाठी असलेल्या या कंपनीने भारत तसेच जगभरात निर्विवाद स्थान प्रस्थापित केले आहे. सीबीआरई राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या बहुतेक सर्व विभागांमध्ये कार्यरत असून आपल्या प्रभावशाली आणि दमदार ग्राहकवर्गासह कंपनीने जागतिक प्रतिष्ठा मिळवली आहे.
महिला सक्षमीकरणासाठी ‘फ्लो हाफ मॅरेथॉन
प्रतिस्पर्धीच्या मदतीला धावून जपली माणुसकीची भावना
गोयल गंगा डेव्हलपमेंट्सने उचलली नामांकित
कंपनीच्या अपूर्ण प्रकल्पांची जबाबदारी.
पुणे .: दरोडे जोग रियाल्टर्स यांना काही कारणास्तव आपले बांधकाम प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करणे शक्य नव्हते. परंतु, व्यवसायिक स्पर्धेपलीकडे जाऊन गोयल गंगाने डेव्हलपमेंट्स त्यांना मदतीचा हात पुढे केला. संबंधित प्रकल्पांच्या पूर्णत्वाची जबाबदारी स्वीकारत गोयल गंगा डेव्हलपमेंट्स यांनी माणुसकीचा वेगळा आदर्श समाजापुढे प्रस्थापित केला.
पुण्यातील दरोडे जोग रियाल्टर्स यांना खराडी या भागातील ‘लिव्हॅनो फेज १’ हा प्रकल्प पूर्ण करण्यास अडचणी येत असल्याची बाब गोयल गंगाचे सुभाष गोयल यांना समजली. त्यांनी लगेच त्यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. तातडीने सर्व नियमांची पूर्तता केली. आता महारेरानुसार, प्रकल्पाची उभारणी गोयल गंगा डेव्हपमेंट्स करत असून नियोजित वेळेत हे प्रकल्प पूर्ण होतील, असा विश्वास त्यांना आहे.यामध्ये विकल्या गेलेल्या अपार्टमेंट्सची संख्या २०५ इतकी आहे.
याविषयी सुभाष गोयल म्हणाले की, बांधकाम क्षेत्रात विश्वासार्हता आणि पारदर्शकता टिकून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. हे जाणून आम्ही या कंपनीस मदत केली. या प्रकल्पातील पहिल्या फेजचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. आयसीआयसीआय बँक आणि संबधित विकसक यांच्या संमतीमुळे हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल, याची खात्री आहे.६० टक्के ग्राहकांनी दुसऱ्या विकसकाला प्रकल्प नवीन मुदतीत पूर्ण करण्यासाठी लेखी संमती दिली आहे. ज्यांना व्याजासकट परतावा पाहिजे आहे अशा ४० टक्के ग्राहकांना व्याजासकट परतावा देण्याच्या सूचना महरेराने दिल्या आहेत. व्यवसाय म्हटलं की, चढ-उतार येत असतात. परंतु, कोणत्याही कारणास्तव ग्राहकांच्या विश्वासास तडा जाऊ नये. या भूमिकेतून आम्ही हा निर्णय घेतला, असेही गोयल यांनी सांगितले.
रोजगार निर्मितीमध्ये देशात दुसऱ्या स्थानी असले तरी काही अपप्रवृत्तीमुळे बांधकाम क्षेत्राची प्रतिमा गेल्या काही वर्षांत मलीन झाली. असे असताना गोयल गंगा डेव्हपमेंट्स यांनी आपल्या कृतीतून माणुसकीचा वेगळा आदर्श समाजापुढे मांडला आहे. अडचणीत असणाऱ्या कोणालाही माणुसकीच्या नात्याने सहकार्य करण्याची महान शिकवण आपली भारतीय संस्कृती देते. सध्याच्या स्वार्थी युगात माणुसकी लोप पावत चालली आहे की काय असे वाटत असतानाच अशा सुखद घटनातून माणुसकीचा ओलावा अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय येतो.
नरेंद्रांप्रमाणे देवेंद्रांची ही केदारनाथ बाबाकडे धाव
डेहराडून-
महाराष्ट्र विधानसभेचा निकाल उद्या (ता.24) रोजी जाहीर होणार आहे. या आधीच देवेंद्र फडणवीस आपली पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत महादेवाचे दर्शन घेण्यासाठी केदारनाथ येथे गेले आहेत. त्यांनी केदारनाथ येथे पूजा केली आहे. यापूर्वी नरेंद्र मोदी यांनीही लोकसभा निवडणूक झाल्यानंतर 18 मे रोजी येथिल गूफेत ध्यानधारणा केली होती. या केदारनाथ च्या गुहेत दडलय तरी काय ? अशी राजकीय चर्चा या वृत्तामुळे सुरु झाली.
दरम्यान, उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात होणार असून साधारणतः दुपारी दोन वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल
मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण:पंचवीस हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती-अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती
*मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण*
*पंचवीस हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती*
*अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती*
मुंबई, दि. 23: राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या दि. 24 रोजी होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी पंचवीस हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली.
मतमोजणी उद्या सकाळी 8 वाजता सुरू होईल. दरम्यान सर्व मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे 2 वेळा प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. 269 ठिकाणी 288 केंद्रावर ही मतमोजणी होणार आहे. एका मतदार संघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात 14 ते 20 टेबल ठेवण्यात येतात. एका टेबल साठी एक पर्यवेक्षक (सुपरवायझर), दोन सहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचारी आणि प्रत्येकी एक सूक्ष्म निरीक्षक असतो. मतदार संघातील 5 बूथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. हे पाच बूथ चिठ्ठी टाकून उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीत निवडले जातात. व्हीव्हीपॅट मधील चिट्ठीतील मते आणि आणि ईव्हीएम वरील मतांची पडताळणी यावेळी केली जाते. प्रारंभी टपाली मते आणि बरकोडद्वारे इटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) मोजली जातील.
प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. प्रत्येक टेबलला स्ट्रॉंग रूम पासून ईव्हीएम ने आन करण्यासाठी वेगळे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. स्ट्रॉंग रूम मधून मतपेट्या बाहेर काढणे मतमोजणी व नंतर पेट्या स्ट्रॉंग रूममध्ये जमा करणे या सर्व बाबींचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाईल.
संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक (ऑब्झर्वर) उपस्थित राहतील. फेरी निहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील. सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत.
मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्रॉंगरूमला केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल आणि स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.
*मंत्रालयात एलईडीवर निकाल प्रदर्शित करणार*
मंत्रालयात निकालाची माहिती देण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने व्यवस्था केली आहे. मंत्रालयासमोरील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या एलईडी स्क्रीनवरही निकाल प्रदर्शित करण्यात येतील. प्रत्येक विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणी केंद्राबाहेर पत्रकारांना तत्काळ निकाल उपलब्ध करून देण्यासाठी माध्यम कक्ष उभारण्यात आले आहेत.
भारत निवडणूक आयोगाच्या results.eci.gov.in या संकेतस्थळावर तसेच ‘Voter Helpline’ या गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध असलेल्या अँड्रॉइड ऍपवर मतदारसंघाचे फेरीनिहाय निकाल, संपूर्ण राज्यातील पक्षनिहाय आघाडीवरील उमेदवार, विजयी उमेदवार, पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी आदी माहितीदेखील उपलब्ध होणार आहे.
‘युवा’ कलाकारांनी सेटवर साजरी केली दिवाळी!!!
दिवाळी म्हणजे, प्रकाशाचा, दिव्यांचा आणि आनंदाचा सण आहे. सगळेच जण अत्यंत उत्साहाने हा सण साजरा करतात. दिवाळीचा आनंद साजरा करण्यसाठी यावेळी ‘झी युवा’ वाहिनीचे कलाकार सुद्धा एकत्र आले आहेत. सण साजरा करण्यात कुठलीही कसर या सर्वांनी सोडलेली नाही. सर्व कलाकारांनी मिळून दणक्यात हा दिवाळीचा सण साजरा केला आहे. नेहमीच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून सर्वांनी दिवाळीचा आनंद लुटला.
नेहमी चित्रीकरणात व्यस्त असलेल्या कलाकारांना प्रत्येक सण कुटुंबासोबत साजरा करणे शक्य होत नाही. पण यंदा, ‘झी युवा’ वाहिनीने या कलाकारांना दिवाळी साजरी करण्याची संधी दिली आहे. वाहिनीच्या संपूर्ण ‘कुटुंबाने’ सेटवर एकत्र येऊन दिवाळी साजरी केली. ‘तू अशी जवळी रहा’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘साजणा’, ‘प्रेम, पॉयजन, पंगा’ या सगळ्याच मालिकेतील कलाकारांनी एकत्र येऊन फराळाचा आनंद लुटला. भरपूर गप्पांसह, घरच्यांसाठी दिवाळीत काय काय विशेष करणार आहेत याविषयी सुद्धा कलाकारांनी चर्चा केली. शूटिंगमधून मिळालेल्या सुट्टीत घरी जाऊन दिवाळीच्या कामात हातभार लावणार असल्याचं सगळ्याच कलाकारांचं म्हणणं आहे. शरयू सोनावणे घरी खास कंदील करायला मदत करणार आहे. दामले कुटुंबाने नवे घर घेतले आहे; नव्या घरात आपल्या खरेदीचा वाटा काय असेल हेदेखील निखिलने या गप्पांमध्ये सांगितले. गप्पांसोबतच या कलाकारांचा अंताक्षरीचा डाव सुद्धा रंगला. कलाकारांनी आपल्या मालिकांची शीर्षकगीतं म्हणत हा आनंद वाढवला. दिवाळीच्या दिवसात सुट्टी मिळाली असल्याने दोन महिन्यानंतर घरी जात असल्याचा आनंद गौरीच्या चेहऱ्यावर दिसत होता. फराळातील पदार्थांपैकी, बनवण्यासाठी सगळ्यात कठीण असल्याने अनारसे आवडत असल्याचं अभिजितने सांगितलं. आईबाबांना दिवाळीत खास सरप्राईज देणार असल्याचं पूजाने सांगितलं आहे. दिवाळीचा माहोल सेटवर साजरा होत असताना, सर्व कलाकारांनी करण बेंद्रे याला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या.
यंदाची दिवाळी साजरी करण्यासाठी तितिक्षा तावडे आणि सिद्दार्थ बोडके यांचे काही खास प्लॅन्स आहेत.या दोघांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. इतरांना त्रास होणार नाही अशाप्रकारे दिवाळी साजरी करण्याचं आवाहन सगळ्यांना केलं. शिवाय त्यांच्या प्लॅन्सबद्दल बोलताना हे दोघे म्हणाले;
“झी युवाच्या कटुंबासोबत दिवाळी साजरी केली जाणार आहे. तसंच ‘तू अशी जवळी राहा’ मालिकेच्या सेटवर सुद्धा दिवाळीचा आनंद लुटण्याची संधी यंदा मिळणार आहे. दिवाळीसाठी मोठी सुट्टी मिळणार असल्याने मी घरी सुद्धा जाणार आहे. त्यामुळे यंदा तीनवेळा दिवाळी साजरी करायला मिळणार असल्याने मी खूप खुश आहे.”
-तितिक्षा तावडे
“झी युवा सोबत दिवाळी साजरी करण्याचं हे दुसरं वर्ष आहे. सेटवर दिवाळीचा माहोल आणि मिळणार असलेली मोठी सुट्टी या दोन्ही गोष्टींमुळे मला खूप आनंद झालेला आहे. मागच्या वर्षी दिवाळीत घरी जायला मिळालं नव्हतं, पण यंदा मोठी सुट्टी असल्याने मी घरी जाऊ खूप धमाल करणार आहे. यंदा तीनवेळा दिवाळी साजरी करायची असल्याने उत्सुकता खूप उत्सुकता लागून राहिली आहे.”
-सिद्धार्थ बोडके
पॉयजन’मुळे होणार नाही ना, जुईच्या प्रेमाचा पंगा!!!!
‘झी युवा’ वाहिनीवरील ‘प्रेम पॉयजन पंगा’ या मिलकेतून पहिल्यांदाच मराठी टेलिव्हिजनवर इच्छाधारी नागीण दिसणार आहे. ही निराळी भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणे तिच्या या भूमिकेविषयी आणि मालिकेबद्दल काय सांगतेय, ते बघूया;
१.’प्रेम, पॉयजन, पंगा’ या मालिकेसाठी तुझी निवड कशी झाली?
मला ऑडिशनसाठी बोलावलं गेलं आणि मी तिथे गेले. साधारणपणे ४-५ ओळींचं स्क्रिप्ट असेल अशी माझी अपेक्षा होती. पण जवळपास २० ओळींचं स्क्रिप्ट बघून आधी मला भीती वाटली होती. एवढं पाठांतर करणं मला कठीण वाटत होतं. पण, वाचायला सुरुवात केल्यावर त्यातलं वेगळेपण मला जाणवलं. ही व्यक्तिरेखा फार वेगळी असल्याचं लक्षात आल्यामुळे मी योग्यप्रकारे मेहनत घेतली. या मेहनतीचं फळ मला मिळालं आणि ही वेगळी भूमिका करण्याची संधी मला मिळाली. अर्थात, मॉक शूट झाल्यावर सुद्धा अंतिम निर्णय कळेपर्यंत मनात धाकधूक होतीच. अंतिम निर्णय केल्यानंतर मात्र शूट कधी सुरु होईल याची उत्सुकता लागून राहिली होती.
२. तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल थोडक्यात सांग.
जुई भोळे असं माझ्या भूमिकेचं नाव आहे. एकुलती एक असल्याने घरात सगळ्यांचीच फार लाडकी आहे. मजामस्ती करणं, आपल्या आवडीनिवडी जपणं याची तिला आवड आहे. सेल्फीक्वीन, टिकटॉकची आवड असलेली अशी ही मुलगी सोशल मीडियावर नितांत प्रेम करते. सोशल मीडियावर ती खूप प्रसिद्ध सुद्धा आहे. मित्रमंडळींच्यात असतानाही आपली वेगळी छाप पडण्याची कला तिच्याकडे आहे. लहान मुलांची आवड असल्याने त्यांच्याशी खेळणं, त्यांना शिकवणं, या गोष्टी ती करत असते. थोडक्यात सांगायचं झालं, तर आयुष्य मजेत जगणारी बिनधास्त अशी तरुण म्हणजे ‘प्रेम पॉयजन पंगा’मधील जुई!!!
३. इच्छाधारी नागीण मराठी मालिकेत पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. ही व्यक्तिरेखा तू साकारते आहेस. त्याविषयी काय सांगशील?
‘इच्छाधारी’ नागीण या शब्दातच एक गम्मत आहे. जुई आपलं छान आयुष्य जगात असताना अचानक ती नागीण होते, त्यामुळे तिला दुहेरी जीवन जगावं लागणार आहे. आपल्या इच्छा पूर्ण करत असताना, इच्छाधारी नागीण असल्याचं भान जुईला ठेवावं लागतं. अर्थात, ती जरी नागीण असली, तरी कुणाचाही बदल घेण्यासाठी ती आलेली नाही. सगळयांना समजून घेणं, सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहणं या गोष्टी तिला हव्या आहेत. मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच नागीण अवतरणार आहे, हे जितकं खरं आहे, तितकंच ही नागीण वेगळी आहे यातही तथ्य आहे. ही निराळी भूमिका साकारताना मला सुद्धा खूप मजा येतेय. ही भूमिका सगळ्यांना आवडेल याची खात्री आहे.
४. ही भूमिका साकारण्यासाठी काही खास मेहनत घ्यावी लागली का?
जुई ही एक बिनधास्त मुलगी आहे. तिला सेल्फीक्वीन म्हणावं, इतकी तिला सेल्फीजची आवड आहे. पण, अचानक ती नागीण असल्याचं तिला लक्षात येतं. नागीण झाल्यानंतरची जुई साकारत असताना, ‘स’चा उच्चार लांबवण्याची गरज पडत आहे. यासाठी मेहनत घ्यावी लागते. इच्छाधारी नागिणीला, चंद्रप्रकाश, आग वगैरे गोष्टींपासून धोका असतो. त्यामुळे, हे पात्र साकारत असताना त्यानुसार अभिनय करण्याची गरज पडते. या गोष्टी आव्हानात्मक आहेत. अर्थातच, हे आव्हान पेलायची इच्छा सुद्धा ‘इच्छाधारी’ नागीण साकारन्यासाठी माझ्याकडे आहे.
५. मालिकेचे प्रोमोज बघितल्यानंतर, चाहत्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या कशा होत्या?
प्रोमो पहिल्यांनंतर अनेकांनी मला फोन केले. प्रत्येकाने ज्याचा-त्याचा अंदाज बांधला होता. काही जणांना मी रोबोट वाटले, तर काहींनी मी भूत आहे असं सांगितलं. अनेकांना असंच वाटलं असताना, काहींनी मात्र नागीण असल्याचा योग्य अंदाज बांधला होता. हे पात्र रोबोट आहे असं समजलेल्या अनेकांनी मला ते साकारण्यासाठी मी काय करावं याबद्दल सल्ले दिले होते. पण, एकूणच या सगळ्या फोनकॉल्समधून मालिकेविषयी प्रेक्षकांना खूप उत्सुकता असल्याचं दिसून आलं आहे.
‘राजेशाही’चा अनुभव देणारा ‘राजवाडा’ ग्राहकांच्या भेटीला
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद व इंडीयन मेरिटाईम फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार संपन्न…
पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद,पुणे व इंडीयन मेरिटाईम फाउंडेशन पुणे यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. मेरिटाईम रिसर्च सेंटर बरोबरच मेरिटाईम म्युझियम व ग्रंथालयाची स्थापना होणार आहे. या करारामुळे नौदल, जहाज बांधणी व दुरुस्ती, सागरी पर्यावरण, बंदरे, भारताचा समुद्री वारसा आणि त्याचे ऐतिहासिक महत्व, समुद्री कला आणि अंडरवॉटर टेक्नॉलॉजी या विषयीच्या संशोधनास चालना मिळणार आहे.या करारामुळे भारतीय महासागर सेव्हर्स या योजनेला देखील प्रोत्साहन मिळणार आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांना अंडरवॉटर टेक्नॉलॉजी वर संशोधन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे तसेच आंतरराष्ट्रीय कोस्टल क्लीनअप या विषयावर कार्याशाळा,व्याख्याने यांचे आयोजन करता येणार आहे. मेरिटाईम म्युझियम व ग्रंथालयामुळे विविध जहाजांच्या प्रतिकृती पहाण्यासाठी उपलब्ध होतील व तज्ञ नौदल अधिकाऱ्या कडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.
या सामंजस्य करारावर संस्थेच्या सरचिटणीस सौ.प्रमिला गायकवाड, संयुक्त चिटणीस अँड. संदीप कदम, अँड. भगवानराव साळुंखे, खजिनदार श्री.विजयसिंह जेधे, श्री. किशोर बाबर व इंडीयन मेरिटाईम फाउंडेशनचे कमांडर राजन वीर, अध्यक्ष इंडीयन मेरिटाईम फाउंडेशन, कॅप्टन आनंद दीक्षित, कॅप्टन रवी हजरनवीस, कमांडर अजय चिटणीस, कमांडर अर्नब दास यानी स्वाक्षरी केली. सदर सामंजस्य करार करताना अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे,सर्व विभाग प्रमुख व इंडीयन मेरिटाईम फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.
दीपक मानकर यांना जामीन मंजूर
पुणे- जितेंद्र जगताप यांस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी उपमहापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यासह दोघांची मुंबई हायकोर्टाने एक लाख रुपयांच्या जामिनावर सुटका करण्याचा आदेश दिला. मोकाच्या गुन्ह्यातून वगळण्याच्या मागणीला तूर्तास हायकोर्टाने दिलासा दिला नाही. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती रणजित मोरे, ए. जे. जमादार यांनी हा आदेश दिला.. लोकसभा, विधानसभा निवडणूक झाल्यावर ही प्रक्रिया झाली .
दीपक मानकर आणि सुधीर सुतार या दोघांची जामिनावर सुटका करण्याचा आदेश कोर्टाने दिला. त्यांच्यातर्फे अॅड. अबद पोण्डा, अॅड. प्रफुल सोनी, अॅड. अजिंक्य उडणे, अॅड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली.
मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या जगताप यांनी दोन जून 2018 साली घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद रमेश भोळे (वय 34, रा जोशी वाडी, घोरपडी पेठ), सुधीर दत्तात्रेय सुतार (वय 30,रा जयभवानी नगर, कोथरूड), अमित उत्तम तनपुरे (वय 28, रा मांडवी खुर्द), अतुल शांताराम पवार (वय 36 ) आणि विशांत श्रीरंग कांबळे (वय 30, रा शांतिनगर येरवडा), नाना कुदळे (रा.केळेवाडी) आणि अजय कंधारे यांना अटक केली होती.उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर मानकर पोलिसांत हजर झाले होते. या प्रकरणात दोषारोपपत्र देखील दाखल आहे. तब्येत खराब झाल्यामुळे त्यांच्यावर काही दिवस खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान त्यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला होता.
मानकर आणि सुतार या दोघांतर्फे त्यांच्यावर लावण्यात आलेला ‘मोका’चा गुन्हा वगळण्यात यावा आणि त्यांना जामीन देण्यात यावा म्हणून हायकोर्टात अर्ज दाखल करण्यात आला होता. हायकोर्टाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर या दोघांची एक लाख रुपयांच्या जामिनावर सुटका करण्याचा आदेश दिला. प्रथमदर्शनी या प्रकरणात ‘मोका’ लागू होत नसल्याचे निरीक्षण कोर्टाने नमूद केले आहे.दीपक मानकर यांच्यावर ‘मोका’नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गेली एक वर्षे मानकर तुरुंगात आहेत.


