Home Blog Page 2813

14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत सूर्या काकडे, आयुश पुजारी, राजवीर पाडाळे यांची विजयी सलामी

0

पुणे- पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज अखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरिज 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत सूर्या काकडे, आयुश पुजारी, राजवीर पाडाळे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून करून आगेकूच केली.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत 14वर्षाखालील मुलांच्या गटात पहिल्या पात्रता फेरीत आयुश पुजारी याने पार्थ काळेचा 9-6 असा तर, राजवीर पाडाळेने अथर्व जोशीचा 9-7 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. वेदांत दिक्षीत याने हृदय जैनवर 9-4 असा विजय मिळवला. सूर्या काकडेने निनाद पाटीलचा 9-0 असा सहज पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 14वर्षाखालील मुले: पहिली पात्रता फेरी:
वेदांत दिक्षीत वि.वि.हृदय जैन 9-4;
सूर्या काकडे वि.वि.निनाद पाटील 9-0;
प्रथमेश पाटील वि.वि.नीव कोठारी 9-2;
आयुश पुजारी वि.वि.पार्थ काळे 9-6;
राजवीर पाडाळे वि.वि.अथर्व जोशी 9-7.

शाही अभ्यंगस्नान, फराळाच्या आस्वादाने ‘त्यांचा’ही दीपोत्सव झाला आनंदमय

0
माजी उपमहापौर आबा बागुल, अमित बागुल मित्र परिवाराचा उपक्रम
 
पुणे : रांगोळ्यांचा थाट, मांडलेला पाट, सुगंधी तेल-उटण्यांचा सुवास, औक्षणाचे ताट, गोडाचा घास आणि त्यावर चढलेला नव्या कपड्यांचा साज या साऱ्यांचा अविस्मरणीय अनुभव मिळाल्याने ‘त्यांचा’ही दीपोत्सव आनंदमय झाला. शाही अभ्यंगस्नान आणि मनसोक्त फराळाचा आनंद घेताना ही मुले भारावून गेली.
निमित्त होते, पदपथ-सिग्नलवर राहणाऱ्या मुलांसाठी माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी आयोजित केलेल्या ‘शाही अभ्यंगस्नाना’चे! नामदार गोखले रस्त्यावरील गुडलक चौकात झालेल्या या अनोख्या उपक्रमाने पदपथावर राहणाऱ्या मुलांमुलींची शनिवारची सकाळ सुखद ठरली. खेळण्या-बागडण्याचे आणि शिकण्याचे वय असतानाही परिस्थितीने पोटाची खळगी भरण्यासाठी दररोजची सकाळ रोजगारासाठीच उजाडते. ना दसरा ना दिवाळी असे खडतर जीवन जगणाऱ्या या मुलांना आपल्याप्रमाणेच दिवाळीचा आनंद लुटता यावा, यासाठी बागुल पिता-पुत्र आणि मित्रपरिवाराने गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम हाती घेतला आहे. शाही अभ्यंगस्नानानंतर या मुलांना नवे कपडे, फराळ आणि फटाके अशी मेजवानी मिळाल्याने मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तर या आनंदमय सोहळ्याने पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
कार्यकर्त्यांकडून परिसराची स्वछता करून येथे रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. त्यावर पाट मांडून प्रत्येक मुलाला उटणे लावून स्नान घालण्यात आले. त्यानंतर औक्षण करून, नवे कपडे आणि फराळ देण्यात आला. आबा बागुल, जयश्री बागुल, अमित बागुल, हर्षदा बागुल, दीपा बागुल, स्वरा बागुल, श्रेया बागुल, सागर बागुल, अभिषेक बागुल, हेमंत बागुल आणि समस्त बागुल कुटुंबियांसह कार्यकर्त्याकडून या मुलांना सुवासिक तेल-उटणे लावून मंगलमय वातारणात झालेला अभ्यंगस्नानाचा हा सोहळा रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता आणि नागरिकही त्यात सहभागी होत होते. या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते जयेश कासट, इम्तियाज तांबोळी, सागर आरोळे, अँड चंद्रशेखर पिंगळे, धनंजय कांबळे, गोरख मरळ, महेश ढवळे, योगेश निकाळजे, पप्पू देवकर, हबीद शेख, बाबालाल पोळके, प्रकाश तारू, नितीन गोरे, सुरेश कांबळे, राहुल जगताप आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
संयोजक अमित बागुल म्हणाले, “आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहोत. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. परिस्थितीने पदपथावर राहणाऱ्या आणि पोटाची खळगी भरण्यासाठी शिकण्या-खेळण्याच्या वयात सिग्नलवर फुले किंवा अन्य वस्तू विकणाऱ्या या मुलांना दिवाळीचा आनंद मिळावा, या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवित असतो. त्याबरोबरच वर्षभर विधायक उपक्रम राबविले जातात.”

उद्योजकता विकास कार्यशाळेत डॉ. उजळंबकरांकडून अल्पदरात सुगंधी अत्तर, परफ्युम बनवण्याचे प्रशिक्षण

0

पुणे : बाजारात मिळणाऱ्या स्वच्छतेचे लीक्वीड सोप आणि सुगंधी अत्तर, परफ्युमच्या किंमती दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्राचार्य डॉ. सुधीर उजळंबकर यांनी घरच्या घरी अशी लीक्वीड सोप आणि सुगंधी अत्तर, परफ्युम अगदी अल्प दरात कशी बनवायची याचे प्रात्यक्षिक दाखवून सर्वांना अचंबित केले.

पर्यावरणशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, प्रो. एच. जे. अर्णीकर ट्रस्ट आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी प्रा. उजळंबकर यांनी विविध प्रकारचे लीक्वीड सोप आणि सुगंधी अत्तर, परफ्युम कशी बनवायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले. विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, वसंत शिंदे, डॉ. नीलिमा राजूरकर, डॉ. सुजाता बरगाले, डॉ. रजनी पंचांग, संजय मा. क. आदी मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. सुधीर उजळंबकर म्हणाले, दैनंदिन जीवनात आपण घरात लीक्वीड सोप आणि सुगंधी अत्तर, परफ्युम नेहमी वापरत असतो परन्तु याच्या किमती सर्वसामान्य माणसाला परवडत नाहीत त्यासाठी आपण घरच्या घरीच अशी लीक्वीड सोप आणि सुगंधी अत्तर, परफ्युम बनवून खर्चात बचत करू शकता तसेच आपल्याला याचा व्यवसाय करायचा असेल तर आपण करू शकता आणि चांगला नफा कमवू शकता. त्यासाठी आपल्याला फक्त परवाना काढणे आवश्यक आहे.

बाजारात १३२ प्रकारची अत्तरे तयार आहेत, त्यामध्ये गुलाब, केवडा फुलांचा वापर केला जातो. ८ ते १० मिमीचे अत्तर १५० रुपयापासून २००० रुपयापर्यंत मिळतात. ज्या फुलांचा सुगंध चांगला आहे, त्याला बाजारात जास्त मागणी आहे. हे सर्व शिकण्यासाठी कोणतीही पदवी लागत नाही. कोणीही ही लिक्विड तयार करू शकतात, असेही डॉ. सुधीर उजळंबकर यांनी सांगितले. सूत्रसंचालन डॉ. नीलिमा राजूरकर यांनी केले. डॉ. प्रमोद कांबळे यांनी आभार मानले.

दिवाळी….. (लेखिका: पूर्णिमा नार्वेकर)

0

दिवाळी आली … 

‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’…मोती साबणाची ही जाहिरात टीव्हीवर यायला लागली की दिवाळी जवळ आल्याचे प्रकर्षाने जाणवते. मोती साबण आणि दिवाळीचं नातं आहेच मुळी तसं. अगदी लहानपणापासून या दोघांचं समीकरण अगदी पक्कं डोक्यात बसलं आहे. कारणही तसंच आहे म्हणा. हमाम, लाईफ बॉय आंघोळीसाठी दररोज वापरणार्‍या मध्यमवर्गीयांच्या घरी दिवाळीसाठी खास मोती साबणाची खरेदी ठरलेली असायचीच. केवळ मोती साबणच नाही तर दिवाळी बरोबर बर्‍याच काही गोष्टी जोडलेल्या आहेत. घराची साफसफाई, कंदील, रांगोळी, फराळ, नवीन कपडे…किती आठवणी त्या दिवाळीच्या…दिवाळी जवळ आली की 15 दिवस आधीपासून आजीची धावपळ सुरू व्हायची. खोलीची साफसफाई, आवराआवर आणि मग दिवाळीच्या फराळाला सुरुवात. चकली, चिवडा, शंकरपाळ्या, तिखट शेव, बेसनाचे लाडू, ओल्या नारळाच्या करंज्या…सगळे दिवाळीचे पदार्थ आजी अगदी आवडीने बनवायची. आईची मदतही व्हायची. आजोबांना आवडतात म्हणून अनारसे माटुंग्याची लीला आत्या खास आठवणीने आणून द्यायची.

बाबांबरोबर नवीन कपड्यांची खरेदी व्हायची तर काकाबरोबर फटाके आणायला कधी जायचं याची आतुरतेने वाट पाहायचो. काका मला आणि निलेशला खुप फटाके घेऊन द्यायचा. पण आईला नाही आवडायचं फटाके फोडलेले. ती लहानपणी ह्या फटाक्यांमुळे भाजली होती, म्हणूनच तिला खुप भीती वाटायची. पण मी, निलेश आणि काका खुप फटाके फोडायचो. त्यात लवंगीची माळ न लावता ती एक एक सुटी करुन फोडण्यात भन्नाट मजा यायची. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून तेल व सुगंधी उटण्याने आंघोळ करुन सगळे घरातले फराळ करायला बसायचो. त्यानंंतर आई-बाबांबरोबर देवळातही जाऊन यायचो. बिल्डिंगमध्ये गुजराथी बांधव जास्त असल्याने त्यांच्या नववर्षाच्या दिवशी खुपच धमाल यायची. सगळे घरी साल-मुबारक करायला यायचे. लहान मुलांचा वेगळा ग्रुप, मग सगळ्या मुली, तर काही सगळे सहकुटुंब, सहपरिवार घरी यायचे. तो दिवस कसा निघून जायचा तेच कळायचंही नाही. हल्ली सारखे त्याकाळी मोबाईल फोन तर सोडाच पण साधा फोनही घरोघरी नव्हता. साऱ्या नातेवाईंकाना आणि खास ओळखींच्या माणसांना ग्रीटिंग्ज पाठवण्याची मजा काही औरच होती. पोस्टमनची रोज वाट बघत बसायचो, आपल्याला कुणा कुणाचे ग्रीटिंग्ज येतात ते पाहण्यासाठी. आम्ही शाळेतील मैत्रिणीसुद्धा एकमेकांना आठवणीने ग्रीटिंग्ज पाठवायचो. आजही ती ग्रीटिंग्ज मी जपून ठेवली आहेत. आता ती ग्रीटिंग्जही नाहीत आणि आतुरतेने पोस्टमन काकांची वाट बघणंही नाही. आता फेसबुकचा आणि व्हॉटसऍप चा जमाना आहे. फेसबुकच्या वॉलवर ‘हॅप्पी दिवाली’ लिहून टाकलं की सगळं 1 सेकंदात फटाफट अपलोड होतं. त्याहून व्हॉटसऍप वर तर एका ग्रुपवरुन आलेला मेसेज दुसर्‍या ग्रुपवर फॉरवर्ड करायचा. ना त्यात आतुरता वा आनंद…असतो तो फक्त कोरडेपणा. आनंदाच्या व्याख्याही बदललेल्या आहेत आजच्या काळात. असो…

भाऊबीजेला तर पूर्ण दिवस धावपळीत जायचा. सकाळी आम्ही पनवेलला कुंदा आत्याकडे भाऊबीजेसाठी जायचो तर संध्याकाळी मामांकडे भाऊबीज. आईचं कुटुंब मोठं. आई धरुन पाच बहिणी आणि दोन भाऊ. आम्ही कुणाकडेतरी सगळे एकत्र जमायचो. खुप मजा यायची.

सगळ्या आठवणी डोळ्यांपुढे सरकत होत्या…ॐकारचा फोन आला आणि त्या आठवणींतून जागी झाले… ‘आई कंदील आणायला जायचं आहे ना ?’ मनात म्हटलं कंदीलच काय पण परंपरा कायम ठेवणारा मोती साबणसुद्धा आठवणीने आणायचाय…!

पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068

शिवसेनेसोबत जाणार नाही’, निकालानंतर शरद पवारांचे स्पष्टीकरण

0

बारामती- कालच्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेचे पारडे जडं झाल्याचे दिसत आहे. विधानसभेत भाजपला आपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर आता शिवसेना आपल्या अटींच्या जोरावर सत्ता स्थापन करू शकते. दरम्यान, काल निकालानंतर काँग्रेस शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा देणार असल्याचा चर्चा रंगू लागल्या होत्या. यातच आता राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी याबाब स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “विरोधी बाकावर बसणे पसंत करू, पण सत्तेत जाणार नाही.”

काल विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले. ‘अबकी बार 220 पार’ म्हनणाऱ्या महायुतीला 170 चाही पल्ला गाठता आला नाही. निवडणुकीते भाजप-शिवसेनेच्या महायुतीने 161 जागा मिळवल्या. या निकालानंतर राज्यात त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली आहे. महायुती सत्ता स्थापन करणार हे जवळ-जवळ निश्चित आहे. पण, कालच्या निकालानंतर काँग्रेस शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा देणार, अशा चर्चा रंगू लागल्या. पण, यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रीया समोर आली आहे. शरद पवार म्हणाले की, “आम्ही एकत्र राहून विरोधी पक्षात बसू, पण शिवसेनेसोबत जाणार नाही. त्यांच्यासोबत जाण्याचा काही संबंध नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कायम एकत्र राहील. आम्ही एकत्र राहून महाराष्ट्राचे प्रश्न मांडू. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्याकडून जनतेचे प्रश्न सोडवू. जनतेने आम्हाला विरोधी बाकात बसवले आहे, त्यामुळे आम्ही विरोधक म्हणून भूमिका मांडत राहू.”, असे शरद पवारांनी स्पष्ट केले

स्पृहा जोशीची यंदाची दिवाळी भोपाळमध्ये

0

दिवाळी हा सणच एकत्र मिळून साजरा करण्याचा आहे. त्यामुळे दिवाळीसणाला तरी आपल्या व्यस्त जीवनशैलीतून थोडा वेळ काढण्याचा आणि आपल्या घरच्यांसोबत राहण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो. अभिनेत्री स्पृहा जोशी सुध्दा दरवर्षी न चुकता आपल्या घरच्यांसोबतच दिवाळी साजरी करते. पण यंदाची दिवाळी मात्र अपवाद आहे. स्पृहाची यंदाची दिवाळी तिच्या घरच्यांसोबत नाही आहे. ती एकटी भोपाळला असणार आहे. आणि त्यामूळे ती सध्या तिच्या घरच्यांना खूप मिस करत आहे.

स्पृहा जोशी ह्याविषयी सांगते, “सध्या मी भोपाळमध्ये माझ्या आगामी हिंदी वेबसीरिजच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. लवकरच ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने सध्या वेगाने चित्रीकरणाचे काम सुरू आहे. इथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फक्त अर्ध्या दिवसाची सुट्टी आहे. त्यामुळे आसपास राहणारे अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ त्यांच्या घरी जातील. पण भोपाळपासून मुंबई खूप दूर असल्याने मला घरी पोहोचणे शक्य होणार नाही. त्यामुळे मी दिवाळीत भोपाळला अगदी एकटी असणार आहे.”

स्पृहा जोशी पूढे म्हणते, “खरं तर, दिवाळी हा माझा सर्वात आवडता सण आहे. आजवरचा इतक्या वर्षांचा माझा नियम होता, की, दिवाळीला तर घरीच राहायचं. पण यंदा मात्र पहिल्यांदा घरच्यांपासून दूर एकटीच दिवाळीत राहत असल्याने मन भरून आलंय. अशावेळी जाणवतं, की, सणाच्यादिवशी आपली माणसं जवळ असणं किती महत्वाचं असतं. मला घरच्यांची खूप आठवण येतेय.”

चिमुकल्यांनी केली पर्यावरणपूरक दिवाळीची जय्यत तयारी

0

पुणे :- बावधन मधील गंगा लेजंड येथे गोयल गंगा इंटरनैशनल मधील चिमुकल्यांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची जय्यत तयारी केली. यावेळी सर्ववयोगटातील  मुलांनी आपल्या पालकांसोबत उत्साहाने सहभागी  घेत पर्यावरणपूरक आकर्षक कंदील, तोरणे, पणत्या बनविण्याचे काम केले. चिमुकल्यांनी हातात रंगीबेरंगी कागद, स्केच पेन, खडू,माती आदींच्या सहाय्याने उत्कृष्ट कंदील आणि नक्षीदार पणत्या बनवल्या.

सर्वांच्या सहभागातून दिवाळीच्या उत्सवाला अधिक अर्थपूर्ण बनविण्यासाठी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दिवाळीच्या मंगलपर्वादरम्यान आपल्या कुठल्याच कृतीतून पर्यावरणाला हानी होणार नाही. याची सर्वांनी काळजी घ्यावी, अशा भावना स्कुलच्या संचालिका सोनू गुप्ता यांनी व्यक्त केल्या.

‘त्यांनी ‘२८८ ठिकाणी लढा देवून कॉंग्रेस आघाडीचे घेतले ४२ बळी, मात्र …

0
मुंबईः लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला बसला आहे. राज्यातील २८८ मतदारसंघात वंचित ने निवडणूक लढविली पण प्रत्यक्षात या बदल्यात वंचित चा असा कोणता आलेख उंचावला असा प्रश्न करत आपण विजयी होवू शकत नाही हे वंचित ला माहिती असताना या निवडणुका आजपर्यंत लढविल्या जात आहेत असे बोलले जाते आहे तर दुसरीकडे २८८पैकी ४२ जागांवर वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीला अपेक्षेहून अधिक यासह मिळाले आहे आणि त्यानंतर आता आपण जास्त लक्ष दिले असते तर आणखी जागा मिळवू शकलो असतो असे कॉंग्रेस नेते समजून चुकले आहेत.पण आता वेळ मात्र निघून गेली आहे . राज्यातील २८८ मतदारसंघात वंचितने उमेदवार उभे केले होते. भाजपची बी टीम असल्याचा वंचितवर आधीपासूनच आरोप केला जात आहे. परंतु, हा आरोप वंचितच्या नेत्यांनी वारंवार फेटाळून लावला आहे.
राज्यातील जवळपास ४२ जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार अगदी ५ ते १० हजार मतांच्या फरकाने पडले आहेत. तर त्याच मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी १० हजारांहून अधिक मते घेतली आहेत. वंचितला मिळणारी ही सर्व मते काँग्रेस राष्ट्रवादीला मिळणारी मते असल्याचे बोलले जात आहे.आता नेमकी वंचित ला मिळणारी मते आघाडीचीच कशी असाही प्रतिप्रश्न निर्माण जरूर होईल .

पुणे कॅंटोंमेंट मध्ये भाजपच्या सुनील कांबळे ना ५२ १६० मते मिळाली तर कॉंग्रेसच्या रमेश बागवे यांना ४७ १४८ मते मिळाली आणि वंचित च्या लक्ष्मण आरडेना १० हजार २६ मते मिळाली.

राळेगाव मतदारसंघात भाजपच्या अशोक उईके यांना ९० हजार ५३० मते मिळाली. काँग्रेसच्या वसंत पुरके यांना ८० हजार ७०६ मते तर वंचितच्या माधव कोहाले यांना १० हजार ६८२ मते मिळाली.

  • पक्षीय बलाबल भाजप- १०५
    शिवसेना – ५६
    राष्ट्रवादी काँग्रेस- ५४
    काँग्रेस- ४४
    बहुजन विकास आघाडी- ३
    एमआयएम- २
    समाजवादी पार्टी- २
    प्रहार जनशक्ती पार्टी- २
    माकप- १
    जनसुराज्य शक्ती- १
    क्रांतिकारी शेतकरी पार्टी- १
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना- १
    राष्ट्रीय समाज पक्ष- १
    स्वाभिमानी पक्ष- १
    अपक्ष- १३
    एकूण जागा- २८८

चाळीसगावमध्ये भाजपच्या मंगेश चव्हाण यांना ८५ हजार २८६ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजीव देशमुख यांना ८१ हजार २८८ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या राकेश जाधव यांना ३८ हजार ३६१ मते मिळाली.

बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड यांना ६७ हजार ३८ मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन सपकाळ यांना ३० हजार ८१० मते मिळाली. या ठिकाणी वंचितचे उमेदवार विजय शिंदे यांना तब्बल ४१ हजार १७३ मते मिळाली.

चिखली मतदारसंघात भाजपच्या श्वेता महाले यांना ९२ हजार ७६० मते पडली तर काँग्रेसचे उमेदवार राहुल बोंद्रे यांना ८६ हजार ७२ मते मिळाली. वंचितचे उमेदवार अशोक सुराडकर यांना या ठिकाणी ९ हजार ६०५ मते पडली.

सिंदखेड राजात राष्ट्रवादीच्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ८० हजार ८०८ मते पडली. तर शिवसेनेच्या डॉ. शशिकांत खेडेकर यांना ७२ हजार ११ मते पडली. वंचितच्या सविता मुंडे यांना ३९ हजार ६१७ मते पडली.

खामगाव मतदार संघात भाजपच्या आकाश फुंडकर यांना ९० हजार १६७ मते मिळाली. तर काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांना ७३ हजार ४६४ मते मिळाली. वंचितचे उमेदवार शरद वसतकर यांना २५ हजार ८३९ मते मिळाली.

अकोटमध्ये भाजपच्या प्रकाश भारसाखळे यांना ४८ हजार २९९ मते मिळाली तर काँग्रेसच्या संजय बोडखे यांना २७ हजार ५०१ मते मिळाली. वंचितचे उमेदवार अॅड. संतोष राहाटे यांना ४१ हजार १३९ मते मिळाली.

बाळापूर मतदारसंघात शिवसेनेच्या नितीनकुमार टाले यांना ६८ हजार ९४५ मते मिळाली. वंचितचे धैर्यवर्धन पुंडकर यांना ५० हजार २८४ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या संग्राम गावंडे यांना केवळ १६ हजार ३२९ मते मिळाली. एमआयएमचे उमेदवार डॉ. रहेमान खान हाजी खान यांना ४४ हजार ३१३ मते मिळाली.

अकोला पश्चिम मध्ये भाजपच्या गोवर्धन शर्मा यांना ७२ हजार ८३८ मते मिळाली. राष्ट्रवादीचे साजीद खान यांना ७० हजार मते मिळाली. तर वंचितच्या मदन भारगड यांना २० हजार मते मिळाली.

अकोला पूर्वध्ये भाजपच्या रणधीर सावरकर यांना ९९ हजार ७५८ मते मिळाली. तर वंचितचे उमेदवार हरिदास भदे यांना ७५ हजार २६३ मते मिळाली. काँग्रेसच्या विवेक पारसकर यांना ९ हजार ४४४ मते मिळाली.

मुर्तीजापुरात भाजपच्या हरिश पिंपळे यांना ५९ हजार २४० मते मिळाली तर वंचितच्या प्रतिभा अवचार यांना ५७ हजार ३९९ मते मिळाली. वंचितच्या उमेदवाराचा या ठिकाणी दोन हजारांहून कमी मताधिक्याने पराभव झाला. काँग्रेसच्या उमेदवाराला या ठिकाणी ४० हजार ८४९ मते मिळाली.

वाशिममध्ये भाजपच्या लखन मलिक यांना ६५ हजार ६४१ मते मिळाली तर वंचितच्या सिद्धार्थ देओले यांना ५२ हजार ५० मते मिळाली. काँग्रेसच्या रजनी राठोड यांना ३० हजार ४९३ मते मिळाली.

धामनगाव रेल्वेत भाजपच्या प्रताप अडसाड यांना ९० हजार ३९३ मते मिळाली. तर काँग्रेसच्या वीरेंद्र जगताप यांना ८० हजार ९७८ मते मिळाली. वंचितच्या निलेश विश्वकर्मा यांना २३ हजार ७०० मते मिळाली.

नागपूर दक्षिणमध्ये काँग्रेसच्या गिरीश पांडव यांना ७९ हजार ८८७ मते मिळाली. भाजपच्या मोहन मते यांना ८३ हजार ८७४ मते मिळाली तर वंचितच्या रमेश पिसे यांना ५ हजार ५३५ मते मिळाली.

बल्लाळपूरमध्ये भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांना ८५ हजार ६९७ मते मिळाली तर काँग्रेसच्या डॉ. विश्वास झाडे यांना ५२ हजार ६१९ मते मिळाली. वंचितच्या ३९ हजार ७७९ मते मिळाली.

चिमुरमध्ये भाजपच्या बंटी भांगडिया यांना ८६ हजार ८५२ मते मिळाली. काँग्रेसच्या सतीश वारजूकर यांना ७७ हजार १४६ मते मिळाली तर वंचितच्या अरविंद सांडेकर यांना २४ हजार ३८४ मते मिळाली.

यवतमाळमध्ये भाजपच्या मदन येरावार यांना ७९ हजार ९१३ मते मिळाली. काँग्रेसच्या अनील मंगळुरकर यांना ७७ हजार २७८ मते मिळाली तर वंचितच्या योगश पारवेकर यांना ७ हजार ८१२ मते मिळाली.

अर्णी मतदारसंघात भाजपच्या डॉ. संदीप धुर्वे यांना ८१ हजार २४८ मते मिळाली. काँग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांना ७८ हजार ८९ मिळाली तर वंचितच्या निरंजन मसराम यांना १२ हजार २५३ मते मिळाली.

किनवटमध्ये भाजपच्या भीमराव केराम यांना ८८ हजार ९७८ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदीप जाधव यांना ७५ हजार ८६४ मते मिळाली तर वंचितच्या प्रा. हेमराज उईके यांना ११ हजार ६३९ मते मिळाली.

नांदेड उत्तर मधून शिवसेनेचे बाजाली कल्याणकर यांना ६१ हजार ९३४ मते मिळाली. काँग्रेसच्या डीपी. सावंत यांनी ४९ हजार ९१६ मते मिळाली तर वंचितच्या मुकुंदराव चावरे यांना २६ हजार ३७६ मते मिळाली.

जिंतूरमधून भाजपच्या मेघना बोर्डीकर यांना १ लाख १६ हजार १४६ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांना १ लाख १२ हजार ५९७ मते मिळाली तर वंचितच्या मनोहर वाकळे यांना १३ हजार १०७ मते मिळाली.

फुलंब्रीत भाजपच्या हरिभाऊ बागडे यांना १ लाख ५ हजार ७५५ मते मिळाली. काँग्रेसच्या डॉ. कल्याण काळे यांना ९० हजार ५६० तर वंचितच्या जगन्नाथ रिठे यांना १५ हजार १९९ मते मिळाली.

पैठणमध्ये शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांना ८३ हजार ६१ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या दत्तात्रय गोर्डे यांना ६८ हजार ९८७ मते तर वंचितच्या विजय चव्हाण यांना २० हजार ५६४ मते मिळाली.

उल्हासनगमध्ये भाजपच्या कुमार आयलानी यांना ४३ हजार ५७७ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांना ४१ हजार ६३१ मते मिळाली तर वंचितच्या साजन सिंग यांना ५ हजार ६७७ मते मिळाली.

एमएसएलटीए योनेक्स सनराईज अखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरिज 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत देशभरातून 200हुन अधिक खेळाडू सहभागी

0

पुणे- पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज अखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरिज 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत देशभरांतून 200हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. हि स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्ट येथे दि.26 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2019 या कालावधीत रंगणार आहे.

स्पर्धेचे संचालक प्रविण झिटे यांनी सांगितले की, स्पर्धेसाठी मुंबई, कोल्हापुर, सांगली, नगर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, खामगाव, सोलापुर, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, चंदिगड, तमिळनाडू येथुन प्रवेशीका आल्या आहेत. स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने शनिवार, 26 ऑक्टोंबर व रविवार, 27 ऑक्टोंबर या दिवशी होणार असून मुख्य फेरीच्या सामन्यांना सोमवार, 28 ऑक्टोंबर 2019 पासून प्रारंभ होणार आहे.

सीएम कडून काकडेंना शाब्बासकी !

पुणे : खासदार संजय काकडे यांनी भाजपामध्ये केलेलं ‘इनकमिंग’ भाजपाच्या शिवाजीनगर, कोथरुड आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील विजयामध्ये अतिशय महत्वपूर्ण ठरले. या तीनही मतदार संघातील भाजपाच्या उमेदवारांचा त्यामुळे विजय सोपा झाल्याचे निकालावरुन स्पष्ट झाले. खासदार काकडेंच्या या महत्वपूर्ण कामाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांना शाब्बासकी दिली.

विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल खासदार संजय काकडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुंबईमध्ये भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल खासदार काकडे यांनी दोघांचेही पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे जिल्ह्यातील निकालाबाबत त्यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. पुणे जिल्ह्यातील भाजपाच्या उमेदवारांचे घटलेले मताधिक्य, चार आमदारांचा झालेला पराभव आणि पुढील काळात करावयाची कामे यासंदर्भात ही चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासदार काकडे यांनाच शाब्बासकी देत त्यांनी पुण्यातील तीन मतदार संघात केलेल्या कामाचे विशेष कौतुक केले.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर खासदार संजय काकडे यांनी अतिशय महत्वाच्या क्षणी कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात इतर पक्षातील स्थानिक तगड्या नेत्यांचे इनकमिंग घडवून आणले. त्यांचा भाजपातील पक्ष प्रवेश खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच उपस्थित घडवून आणला. पक्ष प्रवेश केलेल्यांमध्ये काँग्रेस पक्षाचे माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी, माजी नगरसेवक तुकाराम जाधव, माजी आमदार चंद्रकांत छाजेड यांचे सुपूत्र आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे, लहु बालवडकर, समाधान शिंदे, सुरेश कांबळे, कमलेश चासकर, अभय सावंत व दुर्योधन भापकर यांचा समावेश होता. यामुळे कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील भाजपची ताकद वाढली. आणि यामुळे या मतदार संघातील भाजपाच्या उमेदवारांचा विजय सोपा झाल्याची चर्चा सर्वदूर होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिका निवडणुकीतही खासदार संजय काकडे यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपविली होती. त्यावेळी खासदार संजय काकडे यांनी ताकदीचे स्थानिक नेते भाजपची ताकद नसलेल्या ठिकाणी आणले आणि दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले आणि त्याचीच पुनरावृत्ती या विधानसभा निवडणुकीत कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात पाहायला मिळाली. यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासतला माणूस आणि जबाबदारी टाकली की ती फत्ते करणारा माणूस म्हणून खासदार काकडेंची ओळख निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

“मुख्यमंत्रिपद हवं की उपमुख्यमंत्री पद : शिवसेनेने ठरवावे – भुजबळ

0

मुंबई-

विधानसभा निवडणुकीचे निकाल आता लागले आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री कोणाचा हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. मुख्यमंत्रिपदासाठीही आता रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी निकालानंतर पत्रकार परिषद घेतली. जागावाटपाच्या वेळी वाटाघाटी केल्या परंतु आता प्रत्येक वेळी अडचण समजून घेणार नसल्याचं सांगत अप्रत्यक्षरित्या उद्धव यांनी भाजपाला इशारा दिला. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला खुली ऑफर देत भाजपासोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपद घेणार का आपल्यासोबत येऊन मुख्यमंत्रिपद घेणार असं म्हटलं.

शिवसेनेने भाजपासोबत राहून उपमुख्यमंत्रिपद घ्यायचं का आमच्या सोबत येऊन मुख्यमंत्रिपद घ्यायचं हे आता शिवसेनेनेच ठरवावं, असं भुजबळ यांनी नमूद केलं.

भाजपबरोबर जागावाटपाचे सूत्र आधीच ठरले होते. पण भाजपची अडचण समजून घ्या, अशी विनंती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्याने कमी जागांचा प्रस्ताव मान्य केला. प्रत्येक वेळी भाजपच्या अडचणी समजून घेता येणार नाहीत, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये शिवसेनेला निम्मा वाटा हवा, असे स्पष्ट केले. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का, असे विचारता ‘तुमच्या तोंडात साखर पडो’, अशी ‘मार्मिक’ टिप्पणी ठाकरे यांनी केली. समान सत्तावाटपाचे सूत्र पारदर्शकपणे ठरल्यानंतरच सरकार स्थापनेचा दावा महायुतीकडून केला जाईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीच्या आधी युती करताना भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत जागावाटपात निम्म्या जागा आणि सत्तेचे समान वाटप असेच सूत्र ठरले होते. पण निम्म्या जागा देण्यात भाजपपुढे अडचणी असल्याने तडजोड करण्याची विनंती पाटील यांनी केली होती. पण आता मी भाजपच्या अडचणींचा प्रत्येक वेळी विचार करू शकत नाही. माझ्या पक्षाच्या वाढीकडे पाहिले पाहिजे, असे ठाकरे यांनी स्पष्ट करीत मुख्यमंत्रिपदाचेही समसमान वाटप व्हावे, असेच संकेत दिले. मला सत्तेची हाव नाही, त्यामुळे मी वेडेवाकडे काही करणार नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. जनतेला गृहीत धरून काही लोक चालायला लागतात, तेव्हा त्यांचे पाय जमिनीवर ठेवण्याचे काम जनता करते. सर्वच राजकीय पक्षांच्या डोळ्यात जनतेने या निकालातून झणझणीत अंजन घातले आहे. डोळे चुरचुरत असताना मुख्यमंत्रिपदावरून भांडत राहिल्यास जनता आणखी कठोर उपाय करेल, असे ठाकरे यांनी सुनावले. काही चुका झाल्या असतील, तर त्या सुधारल्या जातील, असे सांगून आदित्य ठाकरे यांच्या विजयाबद्दल उद्धव ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला होता.

 

विधानसभा निवडणुक निकाल २०१९ -आमदारांची संपूर्ण यादी

0

मुंबई : भाजपाच्या चौफेर उधळलेल्या वारुला जनतेने लगाम घातला असून, त्यांची घोडदौड 158 जागांच्या आसपास थांबवली आहे. 220 चा दावा करणाऱ्या भाजपची 160 जागांपर्यंत पोहोचण्यासाठीही दमछाक झाली आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपामध्ये अनेक नेत्यांची मेगाभरती झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते आणि उमेदवार शिवसेना-भाजपने स्वतःच्या पक्षात घेतले. त्यांना उमेदवारीही देण्यात आली. त्यामुळे पक्षामधील निष्ठावंतांची नाराजी आणि त्यातून आलेल्या बंडखोरीचा परिणाम निकालावर दिसून येत आहे. तुमचा आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी

*मुंबई*

कुलाबा – राहुल नार्वेकर, भाजप
धारावी – वर्षा गायकवाड काँग्रेस
भायखळा – यामिनी जाधव, शिवसेना
मलबार हिल – मंगलप्रभात लोढा, भाजप
माहिम – सदा सरवणकर, शिवसेना,
मुंबादेवी -अमिन पटेल, काँग्रेस
वडाळा – कालिदास कोळंबकर, काँग्रेस
वरळी – आदित्य ठाकरे, शिवसेना
शिवडी – अजय चौधरी, शिवसेना
सायन कोळीवाडा – कॅ. आर. तमिल सेल्वन, भाजप
अंधेरी पश्चिम – अमित साटम, भाजप
अंधेरी पूर्व – रमेश लटके, शिवसेना
अणुशक्ती नगर – नवाब मलिक, राष्ट्रवादी
कलिना – संजय पोतनीस, शिवसेना
कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर, भाजप
कुर्ला – मंगेश कुडाळकर, शिवसेना
गोरेगाव – विद्या ठाकूर, भाजप
घाटकोपर पश्चिम – राम कदम, भाजप
घाटकोपर पूर्व – पराग शाह, भाजप
चांदिवली – दिलीप लांडे, शिवसेना
चारकोप – योगेश सागर, भाजप
चेंबूर – प्रकाश फातर्पेकर, शिवसेना
जोगेश्वरी पूर्व – रवींद्र वायकर
दहिसर – मनिषा चौधरी, भाजप
दिंडोशी – सुनील प्रभू, शिवसेना
बोरीवली – सुनील राणे, भाजप
भांडुप पश्चिम – रमेश कोरगावकर, शिवसेना
मागाठणे – प्रकाश सुर्वे, शिवसेना
मानखुर्द शिवाजीनगर – अबू आझमी, सपा
मालाड पश्चिम – अस्लम शेख, काँग्रेस
मुलुंड – मिहीर कोटेचा, भाजप
वर्सोवा – डॉ. भारती लव्हेकर, भाजप
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार, भाजप
वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी, काँग्रेस
विक्रोळी – सुनील राऊत, शिवसेना
विले पार्ले – पराग अळवणी, भाजप

*ठाणे आणि कोकण*

*पालघर*

डहाणू – विनोद निकोले, सीपीआय
विक्रमगड – सुनील भुसारा, काँग्रेस
पालघर – श्रीनिवास वनगा, शिवसेना
बोईसर -राजेश पाटील, बविआ
नालासोपारा – क्षितीज ठाकूर, बविआ
वसई – हितेंद्र ठाकूर, बविआ

*ठाणे*

भिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे, शिवसेना
भिवंडी पश्चिम – महेश चौघुले, भाजप
भिवंडी पूर्व – रईस शेख, सपा
शहापूर – दौलत दरोडा, राष्ट्रवादी
मुरबाड – किसन कथोरे, भाजप
अंबरनाथ – डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना
उल्हासनगर – कुमार आयलानी, भाजप
कल्याण पूर्व – गणपत गायकवाड, भाजप
कल्याण पश्चिम – विश्वनाथ भोईर, शिवसेना
कल्याण ग्रामीण – प्रमोद पाटील, मनसे
डोंबिवली – रवींद्र चव्हाण, भाजप
मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड
मीरा-भाईंदर – गीता जैन, अपक्ष
ओवळा-माजिवडा – प्रताप सरनाईक, शिवसेना
कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे, शिवसेना
ठाणे – संजय केळकर, भाजप
ऐरोली – गणेश नाईक, भाजप
बेलापूर – मंदा म्हात्रे, भाजप

*सिंधुदुर्ग*

सावंतवाडी – दीपक केसरकर, शिवसेना
कुडाळ-मालवण – वैभव नाईक, शिवसेना
कणकवली-देवगड – नितेश राणे, भाजप

*रत्नागिरी*

राजापूर – राजन साळवी, शिवसेना
रत्नागिरी – उदय सामंत, शिवसेना
चिपळूण – शेखर निकम, राष्ट्रवादी
गुहागर – भास्कर जाधव
दापोली – योगेश कदम, शिवसेना

*रायगड*

महाड – भरत गोगावले, शिवसेना
श्रीवर्धन – अदिती तटकरे, राष्ट्रवादी
अलिबाग – महेंद्र दळवी, शिवसेना
पेण – रवीशेठ पाटील, भाजप
उरण – महेश बाल्दी, अपक्ष
कर्जत – महेंद्र थोरवे, शिवसेना
पनवेल – प्रशांत ठाकूर

*पश्चिम महाराष्ट्र*

*पुणे*

आंबेगाव – दिलीप वळसे पाटील, राष्
इंदापूर – दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी
कसबा – मुक्ता टिळक, भाजप
कोथरुड – चंद्रकांत पाटील, भाजप
खडकवासला – भिमराव तापकीर, भाजप
खेड-आळंदी – दिलीप मोहिते, राष्ट्रवादी
चिंचवड – लक्ष्मण जगताप, भाजप
जुन्नर – अतुल बेनके, राष्ट्रवादी
दौंड – राहुल कुल, भाजप
पर्वती – माधुरी मिसाळ, भाजप
पिंपरी – अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी
पुणे छावणी – सुनील कांबळे, भाजप
पुरंदर – संजय जगताप, काँग्रेस
बारामती – अजित पवार, राष्ट्रवादी
भोर – संग्राम थोपटे, काँग्रेस
भोसरी – महेश लांडगे, भाजप
मावळ – सुनील शेळके, राष्ट्रवादी
वडगाव शेरी – सुनील टिंगरे, राष्ट्रवादी
शिरुर – अशोक पवार, राष्ट्रवादी
शिवाजीनगर – अनिल शिरोळे, भाजप
हडपसर – चेतन तुपे, राष्ट्रवादी

*कोल्हापूर*

इचलकरंजी – प्रकाश आवडे, अपक्ष
करवीर – पी एन पाटील, काँग्रेस
कागल – हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी
कोल्हापूर उत्तर – चंद्रकांत जाधव, काँग्रेस
कोल्हापूर दक्षिण – ऋतुराज पाटील, काँग्रेस
चंदगड – राजेश नरसिंहराव पाटील, राष्ट्रवादी
राधानगरी – प्रकाश आबिटकर, शिवसेना
शिरोळ – राजेंद्र पाटील, अपक्ष
हातकणंगले – राजू आवळे, काँग्रेस
शाहूवाडी – विनय कोरे, जनसुराज्य पक्ष

*सांगली*

इस्लामपूर – जयंत पाटील, राष्ट्रवादी
खानापूर – अनिलभाऊ बाबर, शिवसेना
तासगांव-कवठे महांकाळ – सुमन पाटील, राष्ट्रवादी
पलुस-कडेगाव – विश्वजीत कदम, काँग्रेस
मिरज – डॉ.सुरेश खाडे, भाजप
शिराळा – मानसिंग नाईक, राष्ट्रवादी
सांगली – धनंजय गाडगीळ, भाजप
जत – विक्रमसिंह सावंत, काँग्रेस

*सातारा*

कराड उत्तर – बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी
कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस
कोरेगाव – महेश शिंदे, शिवसेना
पाटण – शंभूराजे देसाई, शिवसेना
फलटण – दीपक चव्हाण, राष्ट्रवादी
माण – जयकुमार गोरे, भाजप
वाई – मकरंद जाधव, राष्ट्रवादी
सातारा – शिवेंद्रराजे भोसले, भाजप

*सोलापूर*

अक्कलकोट – सचिन शेट्टी
करमाळा – संजय शिंदे अपक्ष
पंढरपूर – भारत भालके, राष्ट्रवादी
बार्शी – राजेंद्र राऊत, अपक्ष
माढा – बबन शिंदे, राष्ट्रवादी
माळशिरस -राम सातपुते, भाजप-रिपाइं
मोहोळ – यशवंत माने, राष्ट्रवादी
सांगोला – शाहजी बापू पाटील, शिवसेना
सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख, भाजप
सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख, भाजप
सोलापूर शहर मध्य – प्रणिती शिंदे

*अहमदनगर*

अकोले – डॉ. किरण लहामटे, राष्ट्रवादी
अहमदनगर शहर – संग्राम जगताप, राष्ट्रवादी
कर्जत-जामखेड – रोहित पवार, राष्ट्रवादी
कोपरगाव – आशुतोष काळे, राष्ट्रवादी
नेवासा – शंकरराव गडाख, क्रांतीकारी शेतकरी पक्ष
राहुरी विधानसभा – प्राजक्त तानपुरे, राष्ट्रवादी
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील, भाजप
शेवगाव – मोनिका राजाळे, भाजप
श्रीगोंदा – बबनराव पाचपुते, भाजप
श्रीरामपूर – लहू कानडे, काँग्रेस
संगमनेर – बाळासाहेब थोरात, काँग्रेस
पारनेर – निलेश लंके, राष्ट्रवादी

*उत्तर महाराष्ट्र*

*नाशिक*

इगतपुरी – हिरामन खोसकर, काँग्रेस
कळवण – नितीन पवार, राष्ट्रवादी; कॉ. जिवा गावित, सीपीआय
चांदवड – राहुल अहेर, भाजप
दिंडोरी – नरहरी झिरवाल, राष्ट्रवादी
देवळाली – सरोज अहिरे, राष्ट्रवादी
नांदगाव – सुहास कांदे, शिवसेना
नाशिक पश्चिम – सीमा हिरे, भाजप
नाशिक पूर्व – राहुल ढिकळे, भाजप
नाशिक मध्य – देवयानी फरांदे, भाजप
निफाड – दिलीपराव बनकर, राष्ट्रवादी
बागलाण – दिलीप बोरसे, भाजप
मालेगाव बाह्य – दादा भुसे, शिवसेना
मालेगाव मध्य – मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक, एमआयएम
येवला – छगन भुजबळ, राष्ट्रवादी
सिन्नर – माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी

*धुळे*

साक्री – मंजुळा गावित, अपक्ष
धुळे ग्रामीण – कुणालबाबा पाटील, काँग्रेस
धुळे शहर – शाह फारुक अन्वर, एमआयएम
शिंदखेडा – जयकुमार रावल, भाजप
शिरपूर – काशिराम पवार, भाजप

*नंदुरबार*

अक्कलकुवा – केसी पाडवी, काँग्रेस; आमशा पाडवी, शिवसेना;
शहादा – राजेश पाडवी, भाजप
नंदुरबार – विजयकुमार गावित, भाजप
नवापूर – शिरीषकुमार नाईक, काँग्रेस

*जळगाव*

अमळनेर – अनिल पाटील, राष्ट्रवादी
एरंडोल – चिमणराव पाटील, शिवसेना
चाळीसगाव – मंगेश चव्हाण, भाजप
चोपडा – लताबाई सोनावणे, शिवसेना
जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील, शिवसेना
जळगाव शहर – सुरेश भोळे, भाजप
जामनेर – गिरीश महाजन, भाजप
पाचोरा – किशोर पाटील, शिवसेना
भुसावळ – संजय सावकारे, भाजप
मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील, अपक्ष
रावेर – मधुकरराव चौधरी, काँग्रेस

*विदर्भ*

*बुलडाणा*

खामगाव – आकाश फुंडकर, भाजप
चिखली – श्वेता महाले, भाजप
जळगाव जामोद – संजय कुटे, भाजप
बुलडाणा – संजय गायकवाड, शिवसेना
मलकापूर – राजेश एकाडे, काँग्रेस
मेहकर – संजय रायमुलकर, शिवसेना
सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी

*अकोला*

अकोट – प्रकाश भारसाकळे, भाजप
अकोला पश्चिम – गोवर्धन शर्मा, भाजप
अकोला पूर्व – रणधीर सावरकर, भाजप
बाळापूर – संग्राम गावंडे, राष्ट्रवादी
मूर्तिजापूर – हरीश पिंपळे, भाजप

*वाशिम*

कारंजा – राजेंद्र पाटनी, भाजप
रिसोड – अमित झनक, काँग्रेस
वाशिम – लखन मलिक, भाजप

*अमरावती*

अचलपूर – बच्चू कडू, प्रहार
अमरावती – सुलभा खोडके, काँग्रेस
तिवसा – यशोमती ठाकूर, काँग्रेस
दर्यापूर – बळवंत वानखडे, काँग्रेस
धामणगाव रेल्वे – प्रताप अडसड, भाजप
बडनेरा – रवी राणा, अपक्ष
मेळघाट – राजकुमार पटेल, प्रहार
मोर्शी – देवेंद्र भुयार स्वाभिमानी पक्ष

*वर्धा*

आर्वी – दादाराव केचे, भाजप
देवळी – रणजीत कांबळे, काँग्रेस
हिंगणघाट -समीर कुनावार, भाजप
वर्धा – डॉ. पंकज भोयर, भाजप

*नागपूर*

काटोल – अनिल देशमुख, राष्ट्रवादी
सावनेर – केदार छत्रपाल, काँग्रेस
हिंगणा – समीर मेघे, भाजप
उमरेड – राजू पारवे, काँग्रेस
नागपूर दक्षिण-पश्चिम – देवेंद्र फडणवीस
नागपूर दक्षिण – मोहन मते, भाजप
नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे, भाजप
नागपूर मध्य – विकास कुंभारे, भाजप
नागपूर पश्चिम – विकास ठाकरे, काँग्रेस
नागपूर उत्तर – नितीन राऊत, काँग्रेस
कामठी – सुरेश भोयर, काँग्रेस
रामटेक – आशिष पेंडम, अपक्ष

*भंडारा*

तुमसर – राजू कारेमोरे, राष्ट्रवादी
भंडारा – अरविंद भलाधरे, भाजप
साकोली – नाना पटोले, काँग्रेस

*गोंदिया*

अर्जुनी-मोरगाव – मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी
तिरोरा – विजय रहांगडले, भाजप
गोंदिया – गोपालदार अग्रवाल, भाजप
आमगाव – सहसराम कोरोटे, काँग्रेस

*गडचिरोली*

आरमोरी – कृष्ण गजबे, भाजप
गडचिरोली – देवराव होली, भाजप
अहेरी – धरमरावबाबा अत्राम, राष्ट्रवादी

*चंद्रपूर*

चंद्रपूर – किशोर जोर्गेवार, अपक्ष
चिमूर – बंटी भांदडिया, भाजप
बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार, भाजप
ब्रह्मपुरी – विजय वडेट्टीवार, काँग्रेस
राजुरा – सुभाष धोटे, काँग्रेस
वरोरा – सुरेश धानोरकर, काँग्रेस

*यवतमाळ*

वणी – संजीवरेड्डी बोडकुरवार, भाजप
राळेगाव – अशोक वोईके, भाजप
यवतमाळ – मदन येरावार, भाजप
दिग्रस – संजय राठोड, शिवसेना
आर्णी – संदीप धुर्वे, भाजप
पुसद – इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी
उमरखेड – नामदेव सासणे, भाजप

*मराठवाडा*

*औरंगाबाद*

औरंगाबाद पश्चिम – संजय शिरसाट, शिवसेना
औरंगाबाद पूर्व – अतुल सावे, भाजप
औरंगाबाद मध्य – प्रदीप जयस्वाल, शिवसेना
कन्नड – उदयसिंह राजपूत, शिवसेना
गंगापूर – प्रशांत बंब, भाजप
पैठण – संदीपान भुमरे, शिवसेना
फुलंब्री – हरीभाऊ बागडे, भाजप
वैजापूर – रमेश बोरनारे, शिवसेना
सिल्लोड – अब्दुल सत्तार, शिवसेना

*हिंगोली*

वसमत – चंद्रकांत नवघरे, राष्ट्रवादी
कळमनुरी – संतोष बांगर, शिवसेना
हिंगोली – नाजी मुटकुळे, भाजप

*परभणी*

जिंतूर – मेघना बोर्डिकर, भाजप
परभणी – डॉ. राहुल पाटील, शिवसेना
गंगाखेड – रत्नाकर गुट्टे, रासप
पाथरी – सुरेश वरपुडकर, काँग्रेस

*जालना*

परतूर – बबनराव लोणीकर, भाजप
घनसावंगी – राजेश टोपे, राष्ट्रवादी
जालना – कैलास गोरंट्याल, काँग्रेस
बदनापूर – नारायण कुचे, भाजप
भोकरदन – संतोष दानवे, भाजप

*उस्मानाबाद*

उमरगा – ज्ञानराज चौगुले, शिवसेना
तुळजापूर – राणाजगजीतसिंह पाटील, भाजप
उस्मानाबाद – कैलास पाटील, शिवसेना
परांडा – तानाजी सावंत, शिवसेना

*नांदेड*

किनवट – भिमराव केराम, भाजप
देगलूर – रावसाहेब अंतापूरकर, काँग्रेस
नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर, शिवसेना
नांदेड दक्षिण – मोहनराव हंबर्डे, काँग्रेस
नायगाव – राजेश पवार, भाजप
भोकर – अशोक चव्हाण, काँग्रेस
मुखेड – डॉ. तुषार राठोड, भाजप
लोहा – शामसुंदर शिंदे, शेकाप
हदगाव – माधवराव पवार, काँग्रेस

*लातूर*

अहमदपूर – बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी
उदगीर – संजय बनसोडे, राष्ट्रवादी
औसा – अभिमन्यू पवार, भाजप
निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर, भाजप
लातूर ग्रामीण – धीरज देशमुख, काँग्रेस
लातूर शहर – अमित देशमुख, काँग्रेस

*बीड*

गेवराई – लक्ष्मण पवार, भाजप
परळी – धनंजय मुंडे, राष्ट्रवादी
माजलगाव – प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी
केज – नमिता मुंदडा, भाजप
बीड – संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी
आष्टी – बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी

खासदार काकडेंच्या माध्यमातून झालेले पक्ष प्रवेश कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंटच्या विजयात ठरले निर्णायक

0
पुणे: कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात झालेल्या पक्ष प्रवेशाने या तीनही मतदार संघातील भाजपाच्या उमेदवारांचे मताधिक्य पाहिल्यावर त्यांच्या विजयात खासदार संजय काकडे यांनी मोलाची भूमिका बजावल्याचे दिसून येते. पुणे महापालिका निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी खासदार संजय काकडे यांनी चोखपणे पार पाडली आहे.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर खासदार संजय काकडे यांनी कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी, माजी नगरसेवक तुकाराम जाधव, माजी आमदार चंद्रकांत छाजेड यांचे सुपूत्र आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे, लहु बालवडकर, समाधान शिंदे, सुरेश कांबळे, कमलेश चासकर, अभय सावंत व दुर्योधन भापकर यांचा भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश घडवून आणला. यामुळे कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील भाजपची ताकद वाढली. कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील 25 हजार 495 मताधिक्यानी निवडून आले, शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे 5 हजार 124 तर, पुणे कॅन्टोन्मेंट मधून सुनिल कांबळे 5 हजार 12 मतांनी विजयी झाले आहेत. खासदार संजय काकडे यांनी भाजपमध्ये आणलेल्या या नेत्यांमुळे तीनही मतदार संघातील मतदान वाढले आणि त्यामुळे भाजपचे उमेदवारांचा आजचा विजय सोपा झाला.
खासदार संजय काकडे यांनी प्रचार सुरु होताच कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील त्यांना माननाऱ्या कार्यकर्त्यांना प्रचारात सक्रिय केले. तसेच, नव्याने प्रवेश केलेल्या स्थानिक नेत्यांमध्ये माजी उपमहापौर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, माजी नगरसेवक आणि ताकदवर नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे या तीनही मतदार संघातील भाजपाच्या उमेदवारांचा विजय सोपा झाला. याबरोबरच रॅली, सभा यांच्या माध्यमातून शेवटच्या माणसांपर्यंत भाजप, शिवसेना व महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात केलेली कामे पोहचविली.
पुणे महापालिका निवडणुकीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय काकडे यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपविली होती. त्यावेळी खासदार संजय काकडे यांनी ताकदीचे स्थानिक नेते भाजपची ताकद नसलेल्या ठिकाणी आणले आणि दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळे 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले. तशीच पुनरावृत्ती या विधानसभा निवडणुकीत कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात पाहायला मिळाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शिवसेना,काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येतील अशी सुतराम शक्यता नाही – चंद्रकांतदादा पाटील

0

पुणे-कोथरुड मधून विजयी झालेल्या चंद्रकांत पाटील यांच कोथरुड मतदारसंघात भाजपच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले.फटाके आणि गुलाल उधळत भाजपने विजयाचा जल्लोष साजरा केला…यावेळी त्यांनी कोथरुड मधील शिवाजी पुतळ्याला अभिवादन केले.

यावेळी  चंद्रकांतदादा पाटील म्हणाले,कोथरुडमध्ये मी बाहेरचा आहे असा प्रचार केला गेला, मात्र मला कोथरुडकरांनी स्वीकारले त्याबद्दल आभार…

राज्यातील निकालाबाबत फार मोठा धक्का बसला अस म्हणता नाही येणार, उलट जिंकण्याचा रेट 77 टक्के झालाय…अनेक ठिकाणी बंडखोरी झाली त्या संपवता आल्या नाहीत म्हणून फटका…

महाराष्ट्रात भाजप सेना युतीचंच सरकार येणार, दुसरा कुणाचा काही विचारच नाही.निवडून आलेल्या 22 अपक्ष आमदारांपैकी 15 आमदारानी मुख्यमंत्री यांना पाठींबा दिलाय…

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा सातारा आणि परळीचा पराभव आमच्या मनाला लागलाय, पराभूत मत्र्याविषयीच विश्लेषण केले जाईल.

शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येतील अशी सुतराम शक्यता, नाही उद्धवजी बाळासाहेब यांचे वंशज आहेत ते काँग्रेसला सोबत घेणार नाही.

कोथरूडकर जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार मानून कोथरूडच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केला. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून दणदणीत विजयानंतर आज श्री पाटील यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले, यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

श्री. पाटील पुढे म्हणाले की, कोथरूडच्या सुज्ञ नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी सर्वांचा शतश: आभारी आहे. या विधानसभा निवडणुकीत कोथरूडच्या विकासाचा जो शब्द इथल्या जनतेला दिला होता, तो पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्याच बरोबर राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने जो जनादेश दिला आहे, त्या बद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले.

यावेळी कोथरूड विधानसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. विजयानंतर श्री. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महर्षी कर्वे यांना वंदन केले. तर कोथरूडचे ग्रामदैवत श्री. म्हातोबाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली.

पर्वतीतून माधुरी मिसाळ यांची हॅटट्रीक

0

पुणे :  पूर्वी 2 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या माधुरी मिसाळ यावेळीही आपला गड राखण्यात यशस्वी झाल्या आहेत. 36, 767 मतांनी त्यांनी राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांना पराभूत केले आहे. मिसाळ यांना 97, 012 मतं मिळाली, तर कदम यांना 60, 245 मतं मिळाली आहेत.

काँग्रेसचे आबा बागुल या मतदार संघातुन इच्छुक होते, उमेदवारी न मिळाल्या ने त्यांनी बंडखोरी केली होती, पण ऐन वेळी त्यांनी माघार घेतली.त्यामुळेच भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका अश्‍विनी कदम यांच्यात पर्वती मतदारसंघात सरळ लढत   झाली .