औरंगाबाद: एड्युरन्स् मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर(इएमएमटीसी)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्स् सनराईज् 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात वैभव श्रीराम, अधिरी अवल व सिद्धार्थ मराठे यांनी तर मुलींच्या गटात साहिरा सिंग, परी चव्हाण, सायना देशपांडे व अमोदीनी नाईक यांनी मानांकीत खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
इएमएमटीसी टेनिस कोर्ट,डिव्हिजनल स्पोर्टस् कॉम्पलेक्स् येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपुर्व फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या बिगर मानांकीत वैभव श्रीरामने हरियाणाच्या अव्वल मानांकीत वंश नांदलचा 3-6, 6-1, 7-5 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. दिल्लीच्या अधिरी अवलने चौथ्या मानांकीत महाराष्ट्रच्या वितीन राठीचा 6-2, 6-2 असा तर महाराष्ट्राच्या सिद्धार्थ मराठेने कर्नाटक नवव्या मानांकीत स्कंद रावचा 6-2, 6-2 असा सहज पराभव करत उपांत्यपुर्व फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुले: उप-उपांत्यपुर्व फेरी:
वैभव श्रीराम (महाराष्ट्र)वि.वि. वंश नांदल(1)(हरियाणा) 3-6, 6-1, 7-5
मुली: उप-उपांत्यपुर्व फेरी:



