Home Blog Page 2807

कराओके ट्रॅक गायन स्पर्धा

0

कधीतरी आपण हातात माईक घेऊन आपल्याला आवडणारे गाणे म्हणावे,आपण गात असताना साथीला त्या गाण्याचे संगीत वाजत असावे आणि समोर आपल्याला प्रोत्साहित करणारा,कौतुक करणारा प्रेक्षक असावा असे वाटते की नाही ? भले देवाने गाता गळा दिला नसेल पण प्रत्येकाला गावेसे वाटतेच. हीच प्रेत्येकाच्या मनातली सुप्त ईच्छा ओळखून विले पार्ले पूर्व येथील ‘सुर-ताल कराओके क्लब’ ने ही अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे.

नवोदित, हौशी गायक गायिकांसाठी ही संस्था वर्षभर विविध उपक्रम आयोजित करीत असते. नोकरी, व्यवसायात अडकल्याने आपली आवड जोपासता येऊ न शकलेल्या पण थोडे फार अंगभूत गायन कौशल्य असलेल्या नवोदित गायक – गायिकांसाठी सुर-ताल कराओके क्लब एक हक्काचं व्यासपीठ आहे. या स्पर्धेतून चांगले गायक गायिका तयार व्हावेत हेच व्यापक उद्दिष्ट ठेऊन हौशी गायक – गायिकांसाठी सुर-ताल कराओके क्लब ची ही स्पर्धा असून जेष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर, नानू गुर्जर आणि रसिक प्रेक्षकांचे प्रतिनिधी या नात्याने श्री. आनंद देवधर हे मान्यवर परीक्षकांच्या भूमिकेत असणार आहेत.

या स्पर्धेत नवोदित हौशी गायक – गायिकांना सहभागी होता येईल. स्पर्धकांनी हिंदी चित्रपटातील गाणी गाणे अभिप्रेत आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी २५ नोव्हेंबरच्या आत खालील इमेल किंवा व्हाट्सअँप वर  नोंदणी करायची आहे.

या स्पर्धेचे प्राथमिक, सेमी फायनल व फायनल असे तीन राऊंड असणार आहेत. प्रथम पुरुष विजेत्यास रोख रु. ५०००/-, प्रथम महिला विजेतीस रोख रु.५०००/-, तसेच दोन्ही रनर अप स्पर्धकांना रु. २५००/- रोख रक्कम व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. अधिकाधिक गायक, गायिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

*अधिक माहिती व नाव नोंदणी साठी संपर्क* : मो. 9769348413 / 9004564960. इमेल: soortaal5@gmail.com तसेच ऑनलाइन नोंदणी https://forms.gle/f9NXtna28u6gvvSv5 या लिंकवर करता येईल.

भाजपा सरकारच्या चूकीच्या आर्थिक धोरणाच्या निषेधार्थ काँग्रेसचा शुक्रवारी मोर्चा

0

पुणे-आर्थिक मंदी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, महागाई, गुन्हेगारी, महिलांवरती
होणारे अत्याचार आदी रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या प्रश्नांवर सरकारचे लक्ष
वेधण्यासाठी व या प्रश्नांला वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशव्‍यापी
आंदोलन दि. ५ ते दि. १५ नोव्‍हेंबर २०१९ पर्यंत आयोजित केले आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस
कमिटीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आमदार  पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वखाली व
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिटणीस सोनलबेन पटेल, माजी
सरचिटणीस मोहन प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शुक्रवार दि. ८ नाव्‍हेंबर २०१९
रोजी सकाळी ११.०० वा., फडके हौद चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे पर्यंत ‘निषेध मोर्चा’
काढण्यात येणार आहे.अशी  माहिती येथे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली .

केंद्र सरकारच्या सर्व क्षेत्रातील गैरव्यवस्थापनामुळे देशात मंदीची परिस्थिती निर्माण झाली
आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक उद्योगधंदे व्यवसाय आणि सेवा ठप्प झाल्या आहेत. त्याचा
विपरीत परिणाम देशभरातील युवक, शेतकरी, शेतमजूर तसेच समाजातील गरीब, मागास,
अल्पसंख्यांक आणि दारिद्रय रेषेखालील लोकांना सहन करावा लागत आहे.

या मोर्चास पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. रमेश बागवे, पक्षाचे आजी –
माजी आमदार, आजी – माजी नगरसेवक, पदाधिकारी, विविध सेलचे प्रमुख, ब्लॉक अध्यक्ष व
कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

शिवसेना पाठीत खंजीर खुपसत नाही, दिलेला शब्द नेहमी पाळला -संजय राऊत

0

मुंबई -शिवसेना कधीच पाठीत खंजीर खुपसत नाही. शिवसेनेने नेहमीच दिलेला शब्द पाळला, हीच आमची भूमिका आहे. 2014 आ णि 2019 मध्ये खूप फरक आहे. त्यावेळी भाजपने अल्प मताचे सरकार आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, आता ते करणे त्यांना शक्यच नाही. बहुमत असेल तर सरकार स्थापित होईल अन्यथा जनतेला सामोरे जाऊ शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असून राज्याचे नेतृत्व शिवसेनेचा मुख्यमंत्रीच करणार असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक झाली. यामध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जी भूमिका घेतील ती सर्वांना मान्य राहील असे सर्वांनी सांगितले आहे. 24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. तेव्हापासूनच शिवसेनेने आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरे स्वतःहून युती तोडण्याचे पाप करणार नाहीत. मुख्यमंत्री पद आणि सरकारच्या सम-समान वाटपावरून शिवसेना माघार घेणार नाही असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री कसा होईल हे सभागृहात दाखवू

शिवसेना कधी आशेवर जगत नाही आत्मविश्वासावर जगते. लोकांचा पाठिंब्यावर शिवसेनेने प्रवास केला. भाजपने जाहीर करावे की ते सत्ता स्थापित करू शकत नाही. त्यानंतर शिवसेना पुढील पावले उचलणार आहे. सोबतच, शिवसेनेचा मुख्यमंत्री कसा आणि कधी होणार, कोण पाठिंबा देणार हे सभागृहातच दाखवू असे संजय राउत म्हणाले आहेत.

यामुळे हॉटेलात थांबले शिवसेना आमदार

शिवसेना आमदार महाराष्ट्रातील विविध भागातून येतात. मुंबईतील मनोरा आमदार निवास तोडण्यात आले आहे. त्यांना राहण्यासाठी नवीन आमदार निवास नाही. त्यामुळेच, शिवसेनेचे नवीन आमदार मुंबईतील एका हॉटेलात थांबले आहेत असे संजय राउत म्हणाले. आमदारांची खरेदी किंवा विक्री होत असल्याच्या भीतीने त्यांना हॉटेलात ठेवण्यात आलेले नाही. आम्हाला कुणाचीही भीती नाही. सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना कधीही आमदारांची गरज पडू शकते. त्यांनी एकत्रित राहावे त्यामुळेच एका ठिकाणी हॉटेलात थांबवण्यात आले आहे असेही ते पुढे म्हणाले.

फडणवीस यांच्या नेतृत्वातच राज्यात सरकार स्थापन होणार- नितीन गडकरी

0

मुंबई – महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात सरकारची स्थापना होईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी गुरुवारी स्पष्ट केले. सरकार स्थापनेच्या घडामोडींवर ते माध्यमांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरी यांचे देखील नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे. परंतु, आपण सध्या केंद्रातच आहोत आणि राज्यात परतण्याची काही इच्छा नाही असे म्हणताना गडकरींनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. राज्यात सरकार स्थापनेसाठी अतिशय कमी कालावधी आहे. अशात कुठल्याही पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केला नाही, तर राष्ट्रपती राजवट सुद्धा लागू केली जाऊ शकते.उल्लेखनीय बाब म्हणजे, सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी शिवसेना नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिले होते. यानंतर मोहन भागवत यांच्याशी देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही चर्चा केली. यामध्ये सरसंघचालकांनी गडकरींना काय गुरुमंत्र दिला याची चर्चा सुरू आहे. परंतु, संघाचा आणि राज्यातील सरकार स्थापनेचा काहीच संबंध नाही. या दोन्ही गोष्टींचा संबंध जोडणे चुकीचे ठरेल असे नितीन गडकरी म्हणाले आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार फोडण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु …

0

मुंबई: सत्तेचे समीकरण जुळवून आणण्यासाठी भाजपकडून आमच्या काही आमदारांना फोन येत आहेत. त्यांना प्रलोभन दाखवले जात आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. असे कितीही प्रयत्न झाले तरी आमचा एकही आमदार फुटणार नाही, असा विश्वासही या नेत्यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन १३ दिवस उलटले तरी महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. उद्यापर्यंत सत्तास्थापनेचा घोळ मिटला नाही तर राज्यात घटनात्मक पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी रात्री १२ वाजता विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपत असून त्यानंतर राज्य राष्ट्रपती राजवटीकडे जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून आता फोडाफोडीचं राजकारणंही सुरू झालं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या आमदारांना भाजपकडून फोन केले जात असून त्याचा गौप्यस्फोट खुद्द जयंत पाटील आणि वडेट्टीवार यांनी केला.

शिवसेनेचे सर्व आमदार हॉटेलमध्ये मुक्कामी

0

मुंबई- मातोश्री निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांची रंगशारदा हॉटेलमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. पक्षप्रमुखांच्या निवासस्थानापासून हे हॉटेल जवळ आहे.शिवसेनेच्या आमदारांनी ठराव मंजूर करुन महाराष्ट्रात सरकार स्थापनेसंबंधी अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहेत.

कुठलाही धोका नको म्हणून सर्व आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्व आमदारांनी एकत्र असणे आवश्यक आहे. उद्धवजींचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला सर्वांना मान्य आहे असे आमदार सुनील प्रभू म्हणाले. महाराष्ट्रात कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. महायुतीने एकत्र निवडणूक लढवली होती. त्यांच्याकडे बहुमत आहे.

भाजपाकडून आमदारांची फोडाफोडी होऊ नये म्हणून कालपासून शिवसेना आमदारांना हॉटेलमध्ये एकत्र ठेवण्यात येईल अशी चर्चा होती. शिवसेना नेते संजय राऊत यांना आज सकाळी याबद्दल विचारले त्यावेळी त्यांनी आमदारांना हॉटेलमध्ये हलवण्याची शक्यता फेटाळून लावली होती. शिवसेनेचे आमदार फोडण्याची कोणाची हिंमत नाही असेही संजय राऊत म्हणाले होते.

 

काश्मीरमध्ये प्रचंड बर्फवृष्ठी, अपघातात 2 जवानांसहित 6 जणांचा मृत्यू,श्रीनगर-जम्मू हायवे बंद,गुलमर्गमध्ये सर्वात जास्त बर्फवृष्टी,

0

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारपासून सुरू असलेल्या वर्फवृष्ठीमुळे जन-जीवन विस्कळीत झाले आहे. बर्फवृष्ठीदरम्यान झालेल्या अपघातांमध्ये लष्कराच्या 2 जवानांसहित 6 जणांचा मृत्यू झाला आहे. श्रीनगर एअरपोर्टवर लो व्हिजिबिलिटीमुळे सर्व विमाने रद्द केली आहे. तसेच, श्रीनगर-जम्मू हायवेदेखील बंद करण्यात आला आहे.अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, श्रीनगरमध्ये गुरुवारी सकाळपर्यंत 11 सेमी बर्फवृष्टी झाली होती, तर घाटीचे गेटवे शहर काजीगुंडमध्ये 12 सेमी पर्यंत बर्फवृष्ठी झाली. गुलमर्गमध्ये सर्वात जास्त 62 सेमी पर्यंत बर्फवृष्टी झाली.

श्रीनगरच्या लानगेट परिसरात लो व्हिजिबिलिटीमुळे लष्कराच्या वाहनाला अपघात झाला. अपघातात रायफलमॅन भीम बहादुर आणि गनर अखिलेश कुमार यांच्या मृत्यू झाला. तसेच, कुपवाडमध्ये हिमस्खलनामुळे लष्कराच्या पोस्टवर माल भरणाऱ्या दोन व्यक्ती मंजूर अहमद आणि इशाक खान यांच्या मृत्यू झाला. याप्रकारेच श्रीनगरमध्ये विद्युत विभागातील एक कर्मचारी आणि हबाक परिसरातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

श्रीनगर एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी सांगितले की, खराब हवामान आणि लो व्हिजिबिलिटीमुळे सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. हवामना विभागाने पुढील 24 तास बर्फवृष्ठीचा अलर्ट दिल्यामुळे विमान सेवा कधी सुरू हे सांगता येणार नाही. आज सकाळी रनवे साफ करण्याचे काम सुरू केले होते, पण बर्फवृष्ठी सुरू असल्याने ते पूर्ण होऊ शकले नाही. एका अधिकाऱ्याने सांगितले की, जोपर्यंत बर्फवृष्ठी बंद होणार नाही, तोपर्यंत विमान सेवा सुरू होणार नाही.

पीर पंजालमध्ये राजौरी स्थित मुगल रोड पूर्णपणे बंद झाला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, राजधानी श्रीनगरमधील काही भाग जसे, गुरेज, माछिल, केरन आणि तंगधारला जोडणारे रस्ते पूर्णपणे बंद आहेत. त्यामुले हायवेवर अंदाजे 2 हजार वाहने अडकली आहेत.

 

सरकारने देशाला कॅशलेस केले : खासदार राजीव गौडा

पुणे : चुकीची आर्थिक धोरणे राबवून भाजपने या देशाला “कॅशलेस’ केले आहे. सर्व सामान्यांची बचत करण्याची शक्तीही त्यांनी काढून घेतली असल्याची टिका कॉंग्रेसचे खासदार राजीव गौडा आणि प्रवक्‍त्या अमी यागनिक यांनी बुधवारी केली.

खासदार गौडा आणि यागनिक या पुणे दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारच्या करभारावर जोरदार टिका केली. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, उल्हास पवार, अभय छाजेड, अरविंद शिंदे, रमेश अय्यर आदी उपस्थित होते. यावेळी यागनिक आणि गौडा यांनी गेल्या पाच वर्षातील मोदीच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुंळे देशात कशी मंदीची परिस्थीती निर्माण झाली आहे, यांची माहीती दिली.दिवाळी नुकतीच संपली. मात्र, सामन्य माणसाजवळ पैसा दिसला नाही.नोटबंदीमुळे सर्व पैसा गेला. डॉ. मनमोहन सिंग यांनी ही सुरुवात असल्याचे म्हटले होते, ते आता खरे होत आहे, ही तर सुरुवात आहे, आणखी गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार, असा इशाराही यावेळी देण्यात आला. बेरोजगारांना रोजगार नाही. दोन कोटी रोजगार देणार असल्याच्या अश्वासनाचे काय झाले? छोट्या मोठ्या कंपन्या बंद पडत आहेत. पण, सरकार काहीही बोलायला तयार नाही. छोट्याशा पाकिस्तानवर चर्चा होते. मात्र, मुलांचे भविष्य मोदी सरकारला दिसत नाही. ते शिक्षणावर का बोलत नाही? असा सवालही अमी यागणिक यांनी उपस्थित केला.

कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देत आहेत. पण, यातून लोकांच्या खिशातून पैसे काढण्याचे काम सुरू आहे. देशात गरिबी झपाट्याने वाढती आहे. शेतकऱ्यांसाठी काहीही योजना नाही. ‘राईट टू एज्युकेशन’ चे काय झाले? किती लोकांना रोजगार दिले? काहीही बोलत नाही.

‘पीएमसी’ बँक घोटाळ्यावर काहीही बोलत नाहीत. ‘मेक इन इंडिया’चे काय झाले? ‘आरबीआय’ मधून पैसा काढण्यात आला. तो कुठे गेला? तरीही ‘इकॉनॉमी’ खाली का जात आहे? 5 ट्रेलियन डॉलर इकॉनॉमी काशी पूर्ण होणार? असे अनेक सवाल राजीव गौडा आणि अमी यागणिक यांनी उपस्थित केले.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोनिया गांधी, प्रियंका गांधी प्रचारात सहभागी न झाल्याने काँग्रेसचे नुकसान झाले? असे सांगितले असता, याची कल्पना सोनिया गांधी यांना देणार असल्याचे राजीव गौडा यांनी सांगितले.

कॉंग्रेस सरकारच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली देशाचा आर्थिक विकासाचा दर टिकून राहीला होता. परंतु, भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर आर्थिक विकासाचा दर घसरत चालला आहे. चुकीची आर्थिक धोरण राबविल्याचा परीणाम भोगावा लागत आहे. नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला पहीला धक्का बसला, त्यानंतर जीएसटीची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने केल्याने भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण सुरु झाली. देशांत गेल्या 45 वर्षांत प्रथमच सर्वांत जास्त बेरोजगारी निर्माण झाली, असे गौडा यांनी सांगितले.

खासगी क्षेत्रातील गुंतवणुक गेल्या 16 वर्षांत प्रथमच कमी झाली, औद्योगिक विकास, उत्पादन क्षेत्राचा विकास दर, निर्यात यासर्वच ठिकाणी घसरण सुरू आहे. बॅंकीग क्षेत्रात सुमारे 8 लाख कोटी रुपये इतका एनपीए आहे. बॅंकींग क्षेत्रात 1 लाख 74 हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे.

“मेक इन इंडीयाचे काय झाले’, असा सवाल करून यागनिक म्हणाल्या, “नोटबंदीचे परीणाम आता दिसु लागले आहे. लघुउद्योगाला त्याचा फटका बसला आहे, अनेक कंपन्यांना कुलुप लावण्याची वेळ आली आहे. एकीकडे डिजीटल व्यवहार करण्याची भाषा केली जाते. पण त्याचवेळी इंटरनेटचे नेटवर्कच उपलब्ध नसते अशी स्थिती आहे.”

माझ्या पाठीत खंजीर खुपसला. आज त्यांनाच त्रास होतोय-एकनाथ खडसे

0

शिर्डी-मधल्या काळात विविध आरोप करून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. राजकीय प्रवासात काही लोक माझ्याजव‌ळ आले. ते मोठ्या जागेवर जाऊन बसले. नंतर त्यांनीच माझ्या पाठीत खंजीर खुपसला. आज त्यांनाच त्रास होतोय. त्यांना वाटत असेल तर आज नाथा भाऊ सोबत असते तर परिस्थिती वेगळी असती

एकनाथ खडसे आज शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे भाष्य केलं. शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदाचा हट्ट नाही. निवडणुकीपूर्वी जे ठरलंय त्याची अंमलबजावणी व्हावी असा शिवसेनेचा आग्रह आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये नक्की काय ठरलंय? ते बाहेर यायला हवं. सर्वांना कळायला हवं. ज्यांच्यासमोर हे ठरलंय त्यांनीही त्यावर बोलायला हवं, असं खडसे म्हणाले. निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असं अनेकदा स्पष्ट केलंय. त्यामुळे आमच्यासाठी फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
साधारणपणे लोक विजयी झाल्यावर साईबाबाच्या दर्शनाला येतात. मी आताच आलोय. राज्यात स्थिर सरकार येऊ दे, असं साईबाबांना साकडं घातलंय, असं सांगतानाच राज्यात महायुतीचंच सरकार येईल. दोन्ही पक्षातील वाद, ताणतणाव मिटतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधीमंडळाचा नेता म्हणून सर्वांची मान्यता आहे. फडणवीस हे सर्वात मोठ्या पक्ष्राचे नेते आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील. शिवसेनेचे त्यास दुमत असू शकेल. त्यांची मागणी कोणत्या आधारावर हे शिवसेनाच सांगू शकेल, असंही त्यांनी सांगितलं शिवसेनेचा  जे ठरलंय त्याची अंमलबजावणी व्हावी असा शिवसेनेचा आग्रह आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये नक्की काय ठरलंय? ते बाहेर यायला हवं. सर्वांना कळायला हवं. ज्यांच्यासमोर हे ठरलंय त्यांनीही त्यावर बोलायला हवं, असं खडसे म्हणाले. निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असं अनेकदा स्पष्ट केलंय. त्यामुळे आमच्यासाठी फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

दोन दिवसात नुकसानीचे पंचनामे पूर्ण करणार -विभागीय आयुक्त डॉ म्हैसेकर

0

पुणे: पुणे विभागात अतिवृष्टीमुळे 1 लाख 89 हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाले असून बुधवार सकाळ पर्यंत 90 हजार हेक्टरवरील पिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. येत्या दोन दिवसात सर्व बाधीत क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात येणार असून ते शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.
डॉ म्हैसेकर यांनी आज पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी केली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, उपजिल्हाधिकारी अजय पवार, उपविभागीय कृषी अधिकारी संगीता माने, आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी, जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर, आंबेगावचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, जुन्नरचे गटविकास अधिकारी विकास दांगट, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे, टी. के. चौधरी, सतीश शिरसाट उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 74 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे, त्या खालोखाल सांगली जिल्ह्याला फटका बसला आहे. सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनचे, सांगली जिल्ह्यात द्राक्ष-डाळिंबाचे, सातारा जिल्ह्यात भाताचे तर पुणे जिल्ह्यात कांदा, बटाटा, सोयाबीन, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्यानुसार वेगाने काम सुरू आहे. दोन दिवसात पंचनामे पूर्ण करण्यात येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळू शकेल.
जिओ टॅगिंगचा वापर
शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून भरपाई मिळण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी जिओ टॅगिंगचा वापर करून फोटो काढून पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच याबाबत विमा कंपन्याच्या अधिकारी-प्रतिनिधींची बैठक घेऊन शेतकऱ्यांना योग्य ते सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रब्बीसाठी तातडीने कर्ज
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांना रब्बी हंगामासाठी तातडीने कर्ज देण्याच्या बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी बँकांच्या प्रतिनिधीची बैठक घेण्यात आली असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज खेड तालुक्यातील वडगाव (घेनंद) येथील संपत भिकू बवले, ज्ञानेश्वर बवले, रामचंद्र मधुकर कुलकर्णी, बबन नरहरी घेनंद-पाटील यांच्या शेतातील कोबी, मका, सोयाबीन, भुईमूग, बीट या पिकांच्या नुकसानीची पहाणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
तसेच आंबेगाव तालुक्यातील पेठ येथील सुरेश धोंडिबा धुमाळ आणि जयंत काशिनाथ थिटे यांच्या शेतातील बटाटा, कांदा, मका या पिकांची पहाणी केली. एकलहरे गावातील प्रमोद ढमाले यांच्या शेतीची पाहणी केली.
जुन्नर तालुक्यातील सावरगाव-आर्वी येथील शांताराम कोरडे, पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील विठ्ठल खांडके, हिराबाई खांडके, गुंजाळवाडी येथील तुळशीराम ढवळे यांच्या शेतीची पाहणी केली.

जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून देशाला जलस्वंयपूर्ण करणार-केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंन्द्रसिंग शेखावत

0

पुणे -देशातील पाण्याच्या स्त्रोतांचे मोजमाप करण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच जलस्त्रोतांच्या मोजमापाचे हे काम पुर्ण होणार असून जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून देशाला जलस्वंयपूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री  गजेंन्द्रसिंग शेखावत यांनी आज येथे केले.

जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल विज्ञान प्रकल्पाअंतर्गत पुण्यात शाश्वत पाणी व्यवस्थापन या विषयावर आज दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद पुण्यातील नगर रोडवरील हॉटेल हयात रीजेंसी येथे

सुरू झाली. या परिषदेच्या उद्धाटनप्रसंगी शेखावत बोलत होते.  यावेळी खासदार वंदना चव्हाण, जलशक्तीचे सचिव यु. पी सिंग, जलसंसाधन विकासचे प्रधान सचिव आय. एस. चहाल, राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाचे वरिष्ठ सहआयुक्त राकेश कश्यप, जलशक्ती मंत्रालयाचे प्रकल्प समन्वयक अखील कुमार, आँस्ट्रेलियन दूतावास टोनी हुबेर, दिपक कुमार, जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे महासंचालक एन. व्ही. शिंदे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता वी.जी. रजपूत, राजेंद्र मोहिते, जल विज्ञान प्रकल्पाचे मुख्य अभियंता श. द भगत आदी उपस्थित होते. इंडिया डब्लु डब्लु आर एस डाटा एन्ट्री या मोबाईल, कुकडी इरिगेशन रोटेशन अँपचे उद्घाटन आणि जलदूत या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

जलशक्ती मंत्री  शेखावत म्हणाले, शाश्वत पाणी व्यवस्थापन ही अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यशाळा आयोजित केली, ही चांगली बाब आहे. पाणी बचतीसोबतच पाणी व्यवस्थापनावर चर्चा होत आहे. देशात विविध बदलते भाग आहेत. पाण्याचे महत्व हे पूर्वीपासून सांगितले जाते. आताही ते सांगितले जात आहे. बदलत्या हवामानाच्या काळात पाण्याचे महत्व आणखी वाढले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचे महत्व आणखी वाढत आहे. देशात प्रदेशनिहाय पाण्याची स्थिती बदलते आहे. महाराष्ट्रात दिवाळीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. हा बदलत्या हवामानाचा परिणाम आहे. पाण्याचा विषय लक्षात घेऊन  जलशक्ती मंत्रालय स्थापन करण्यात आले. त्यामुळे पाण्याचे महत्व आणखी वाढले आहे. पाण्याशिवाय जीवन हे अशक्य आहे.

देशातील पाण्याच्या स्त्रोतांचे मोजमाप करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मार्च 2020 पर्यंत मोजमाप करण्याचे पहिल्या टप्प्यातील काम पुर्ण होणार असून उर्वरित काम दोन वर्षात पुर्ण होईल असे सांगून शेखावत म्हणाले, 2024 पर्यंत घराघरांत पिण्याचे पाणी देण्याचे उद्दीष्ठ ठेवले आहे. पंतप्रधानानी जे उद्दीष्ठ ठेवले आहे. त्याची चर्चा जगभर होत आहे. शेतीखालील पाण्याची बचत करण्यासाठी ठिंबक सिंचनाला महत्व दिले आहे. त्यावर शासन काम करत आहे. त्यामुळे पाण्याची मोठी बचत होत होऊन उत्पादन घेण्याचे आवाहन केले जात आहे. नदीमध्ये स्वच्छ पाणी वाहिले पाहिजे.  शासन नदी स्वच्छतेचे काम हाती घेणार असून पाणी हा विषय फक्त राज्याचा विषय राहिला नाही. तर ते देशाचे मिशन झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

टोनी हुबेर म्हणाले की, “ हवामान बदलामुळे पावसावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून हे काम होत आहे. भारतातील पाणी व्यवस्थापन चांगले असल्याचे त्यांनी सांगितले.

जलशक्तीचे सचिव यु. पी सिंग म्हणाले, शाश्वत पाण्याचे व्यवस्थापन करावे लागणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून पाण्याचे महत्व सांगितले आहे. स्वच्छ भारत अभियान, जलशक्ती अभियान राबविण्याचा  केंद्राने निर्णय घेतला आहे. भारतात पाण्याचे चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन होऊ शकते. यामध्ये हिवरेबाजार हे मुख्य उदाहरण आहे. प्रधान सचिव आय. एस. चहाल यांनी प्रास्तविक केले. चेअरमन खलील अन्सारी यांनी आभार मानले.

या परिषदेसाठी जागतिक बँक तसेच सिंचन व निचरा  विषयक कमिशन कमिशनचे तज्ज्ञ  तसेच ऑस्ट्रेलिया, यु.एस. यु.के.नेदरलँड, कॅनडा, दक्षिण कोरीया, युरोपियन युनियन, जर्मनी, थायलंड, श्रीलंका आणि नेपाळ,  या देशांमधील आंतरराष्ट्रीय  तज्ज्ञ सहभागी झाले आहेत.

‘विद्यापीठ व्यवस्थापनातील माहिती तंत्रज्ञानाचे नवे प्रवाह ‘ विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे पुण्यात उदघाटन

0
पुणे :’असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज’ आणि भारती अभिमत विद्यापीठाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या’विद्यापीठांच्या व्यवस्थापनातील माहिती तंत्रज्ञानाचे नवे प्रवाह’ या विषयावरील ३ दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उदघाटन बुधवारी  भारती अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू आणि  असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज’ चे अध्यक्ष डॉ माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते झाले.
   ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप  डेव्हलपमेंट ‘आयएमईडी‘   पौड रस्ता येथील कॅम्पस मध्ये ही कार्यशाळा झाली . उद्घाटन कार्यक्रमात संयोजक डॉ अमरेंद्र पणी ,डॉ एस एफ पाटील,आय एम ई डी चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर उपस्थित होते . विद्यापीठांचे देशभरातील ५० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत . 
 
डॉ उषा राय नेगी,डॉ सचिन कदम ,डॉ श्याम शुक्ला ,डॉ स्वाती देसाई ,डॉ श्रद्धा वेर्णेकर ,डॉ श्वेता जोगळेकर हे संयोजन समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते . ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता कार्यशाळेचा समारोप होणार आहे . 

पु.ल. देशपांडे जन्मशताब्दी वर्षात ‘ग्लोबल पुलोत्सव ‘ साजरा !

0

पुणे:

मराठी मनातील मानाचे हसरे ,आनंदी पान असलेल्या पु ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जगभर पसरलेल्या मराठी जनांनी पुलंच्या स्मृती जागवाव्यात यासाठी पुण्यभूषण फौंडेशन ने घेतलेला पुढाकार यशस्वी झाल्याची माहिती फौंडेशन चे अध्यक्ष डॉ सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली . जन्मशताब्दी समारोपानिमित्त पुण्यभूषण फौंडेशन ‘च्या  प्रयत्नांची माहिती डॉ देसाई यांनी दिली .

अजरामर साहित्यिक पु.ल.देशपांडे यांच्या नोव्हेंबर २०१८ ते नोव्हेंबर २०१९ या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारताबाहेर संपूर्ण जगात ग्लोबल पुलोत्सव साजरा करण्याचे आव्हान पुण्यभूषण फौंडेशन ने  पेलले .  त्यासाठी पाचही खंडातील सुमारे ८० महाराष्ट्र मंडळांशी इ-मेल,दूरध्वनी द्वारे मे २०१८ पासून वारंवार संपर्क साधण्यात आला.आणि पाचही खंडात उत्साहात कार्यर्क्रम पार पडले .

महाराष्ट्र मंडळांचे अध्यक्ष,सचिव यांना ग्लोबल पुलोत्सवाची संकल्पना विषद करून आपापल्या शहरात स्थानिक पातळीवर हा पुलोत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात आले होते .  या आवाहनाला अनेक महाराष्ट्र मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन ग्लोबल पुलोत्सव आयोजित करण्याचे ठरवले.

पुण्यभूषण फौंडेशन चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यासाठी झुरिच व पॅरीस या शहरांत भेट देऊन आले. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना तेथील मराठी मंडळांना ग्लोबल पुलोत्सव आयोजित करावा असे सुचविले व त्यासाठी पुण्यातील पुण्यभूषण फौंडेशन बरोबर संपर्क करण्यास सांगितले.

सिंगापूर,शांघाय,हॉंगकॉंग,मॉरिशस,जेरुसलेम,पॅरिस,डल्लास,सिडनी येथील मराठी मंडळांचे प्रतिनिधी पुण्यात आले असता,त्यांच्याबरोबर डॉ. सतीश देसाईंच्या प्रत्यक्ष बैठका झाल्या. नॉर्थ अमेरिकेच्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षांशी सुद्धा मोबाईल वर बोलणे झाले. ज्यांना शक्य आहे त्यांनी स्थानिक कलाकार बरोबर घेऊन व इतरांनी भारतातील प्रसिध्द मराठी कलाकारांच्या मदतीने ग्लोबल पुलोत्सव साजरा करावा अशी विनंती करण्यात आली आणि बघता बघता पुलंची जन्मशताब्दी हा महामहोत्सव झाला .

चंद्रकांत काळे,गिरीश कुलकर्णी,विनय कोपरकर,संदीप खरे,वंदन नगरकर आणि ठिकठिकाणच्या स्थानिक रसिक कलाकारांनी पुलंच्या स्मृती जागविणारे कार्यक्रम केले.

युरोपमध्ये झुरीच ,नेदरलँड्,फ्रँकफर्ट ,डेन्मार्क, पॅरिस  येथे कलाकार चंद्रकांत काळे व गिरीश कुलकर्णी  यांनी पुल यांच्यावर बहारदार कार्यक्रम केले. सिंगापोर,मॉरिशस,शांघाय,जेरुसलेम-इस्राइल,सलाला-ओमान येथे  कलाकार वंदन नगरकर व सहकाऱ्यांचा कार्यक्रम रंगला . ओस्ट्रेलिया,नॉर्थ अमेरिका येथे स्थानिक मराठी रसिकांचे कार्यक्रम झाले,

‘जगात शेक्सपिअर चे नाव जसे प्रसिद्ध आहे ,त्याप्रमाणे जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे पु.ल. देशपांडे हे नाव पोचावे,व प्रत्येकाला शक्य आहे त्याप्रमाणे त्याने पुलोत्सव साजरा करावा हा विचार आम्ही जगभर देण्याचा प्रयत्न केला व त्यात आम्ही बव्हंशी यशस्वी झालो’,असे डॉ सतीश देसाई यांनी सांगितले.

राष्ट्रपती राजवट लागू होवू  देणार नाही-हुसेन दलवाई

0

मुंबई-भाजपने राज्याची वाट लावली आहे. नेते आणि आमदारांना ईडीची भीती दाखवून धमकावले आहे. आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या त्यांच्या हालचाली आहेत. मात्र कोणत्याही परिस्थितीत आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होवू  देणार नाही, असा इशारा देतानाच जनतेने महायुतीला कौल दिला आहे. त्यांनी खुशाल सरकार बनवावं, असंही असं काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितलं.

दलवाई यांनी आज सामना कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी बंद दाराआड सुमारे अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना थेट भाष्य केल्याने राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात सत्तेचा पेच निर्माण झालेला असतानाच पहिल्यांदाच काँग्रेसच्या नेत्याने शिवसेना नेत्यांशी चर्चा केल्यानेही काँग्रेस-शिवसेनेचे सूर जुळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आह

भाजपपेक्षा शिवसेना कधीही चांगलीच आहे, हे मी नेहमीच सांगत आलोय. हे माझं आजचं विधान नाही. शिवसेना आणि भाजप हिंदुत्वामुळे एकत्र आले. पण दोन्ही पक्षाच्या हिंदुत्वात जमीन-आस्मानचा फरक आहे, असंही ते म्हणाले. राज्यातील सध्याचं सरकार हे भाजपचं नव्हतं. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सरकार होतं. स्वातंत्र्य काळात संघाने ब्रिटीशांना मदत केलीय, अशी टीकाही त्यांनी केली.

पुण्यातील बीव्हीजी ग्रुपच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे-आकसापोटी कारवाई:हनमंतराव गायकवाड

0

पुणे: प्रसिद्ध उद्योजक हणमंतराव गायकवाड चेअरमन असलेल्या बीव्हीजी ग्रुपच्या कार्यालयावर आज आयकर विभागाने छापे मारले. आयकर विभागाचे धाडसत्र अजूनही सुरूच असल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. तर आम्ही नियमाविरोधात काहीही केलेले नसल्याचं सांगत आकसापोटी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. बीव्हीजी ग्रुपचे चेअरमन हनमंतराव गायकवाड यांनी वैयक्तिक द्वेषापोटी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप करतानाच आयकर विभागाच्या चौकशीला आम्ही पूर्ण सहकार्य करणार असल्याचं स्पष्ट केलं. आम्ही नियमांविरोधात कोणतंही काम केलं नाही. कंपनीची प्रगती होत असल्यानेच ही कारवाई होत आहे. आयकर विभागाचे अधिकारी त्यांच्या नियमित प्रशासकीय प्रक्रियेचा भाग म्हणून बीव्हीजी कार्यालयाकडे आले आहेत. तळागाळातल्या सामान्य माणसाला रोजगार देणाऱ्या आमच्या समुहात कोणतेही चुकीचे काम होत नाही,चालत ही नाही. उलटपक्षी विविध समाज हिताच्या क्षेत्रात बीव्हीजी समूह मोलाचे योगदान देत आहे. कृपया याची नोंद घ्यावी, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.

पिंपरी-चिंचवड येथे बीव्हीजी ग्रुपचं कार्यालय आहे. आज पहाटे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक बीव्हीजीच्या कार्यालायत छापे मारले. बीव्हीजीच्या मुंबई, पुणे आणि दिल्लीतील कार्यालयावरही धाडी मारण्यात आल्या आहेत. अद्यापही आयकर विभागाची कारवाई सुरू असून बीव्हीजी कार्यालयात येण्यास इतरांना मज्जाव करण्यात आला आहे. विविध प्रकारच्या सेवा पुरविणाऱ्या बीव्हीजी ग्रुपवर धाडी मारण्यात आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

वैद्यकीय सेवा, बियाणं, खतं आणि किटकनाशके निर्मिती अशा विविध क्षेत्रात बीव्हीजी ग्रुपचं काम सुरू आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेसाठीही या कंपनीने काम केलं आहे. राष्ट्रपती भवनासह विविध ठिकाणी अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्याने स्वच्छतेचे काम या कंपनीद्वारे केले जाते.