१५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान ‘कोन्निचिवा पुणे’ महोत्सव
लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनांना वेगळे वळण देण्याचा प्रयत्न प्रशासनाने करू नये-रमेश बागवेंचा इशारा
पुणे-मागासवर्गीयांवर अन्याय होताना गप्प बसायचे आणि न्याय मागायला लोकशाही मार्गाने आंदोलने करू पाहणाऱ्यांना वेगळ्या वळणावर न्यायचे असे पाप प्रशासनाने करू नये असा सज्जड इशारा माजी गृहराज्यमंत्री आणि पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष मातंग समाजाचे नेते रमेश बागवे यांनी येथे दिला. मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मातंग एकता आंदोलन यांच्या वतीने धरणे आंदोलन बागवे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते. यावेळी आंदोलकांना स्पीकर वरून बोलण्यास सुरुवातीला मज्जाव करण्यात आला . त्यानंतर बागवे येथे येताच त्यांच्या कानावर हि बाब कार्यकर्त्यांनी घातली तेव्हा बागवे यांनी संबधित अधिकाऱ्याला जाब विचारला .
यावेळी बोलताना रमेश बागवे म्हणाले ,’लाखोंच्या संख्येने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न देणे म्हणजे मागासवर्गीयांच्या विकासाची दारे बंद करून त्यांची अधोगती करण्यासारखे आहे हे खरंतर काही पक्ष व अधिकारी जे मनुविचारांनी कार्य करतात. ते पुन्हा मनु संस्कृती समाजामध्ये रुजू होण्याच्या दृष्टीने मागासवर्गीय आणि दलितांनी शिक्षण घेऊ नये, व्यवसाय करू नये त्यांनी अजूनही शोषितच् रहावे या माध्यमातून काम करत आहेत. त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. आम्ही मातंग समाज महासंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून शांततेत मोर्चा काढून आमच्या मागण्या शासनाकडे दिल्या होत्या, परंतु सरकारने व शासनाने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून येते यामुळे समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत जोपर्यंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही व इतर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असे यावेळी रमेश बागवे यांनी म्हणाले .
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची प्रकरणे लाल फितीत -अविनाश बागवे(व्हिडिओ)
पुणे- मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या लालफितीत अडवून प्रशासनाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रगतीची दारे अडवून ठेवू नयेत या मागणीसह मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मातंग एकता आंदोलन यांच्या वतीने धरणे आंदोलन शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
यावेळी बोलताना नगरसेवक आणि मातंग समाजाच्या संघटनेचे पदाधिकारी अविनाश बागवे म्हणाले ,’सन २०१४ पासून भाजपचे मोठे मोठे नेते, दिवंगत गोपीनाथजी मुंडे, माजी खासदार अनिल शिरोळे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतरांनी संगमवाडी येथील आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे राष्ट्रीय स्मारक शासनाच्या वतीने लवकरात लवकर करण्यात येईल अशा घोषणा केल्या. पुणे मनपाने सन २०१४ पासून अंदाजपत्रकात तरतूद करून आतापर्यंत जवळ जवळ ३० कोटी रु. शासनाकडे जमा केले. गेल्या वर्षी सन २०१८ ला नोव्हेंबर महिन्यात देवेंद्र फडणवीस लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधी स्थळी येऊन कार्यक्रमात म्हटले होते की येत्या १५ दिवसात स्मारकाचे काम सुरू होईल परंतु चुकीच्या पद्धतीची एक समिती गठीत करण्यापलीकडे प्रशासनाने काहीही केले नाही.तसेच सन २०१७ -१८ मध्ये पुणे शहर व राज्यातील लाखो विद्यार्थ्याना ३,१९,५८६ वैध अर्जा पैकी केवळ १,९६५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली ही अत्यंत गंभीर बाब आहे. तरी उर्वरित सर्व मागासवर्गीय विद्याथ्यांना तात्काळ शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. सन २०१८ – १९ मध्ये ४,१६,४१४, पैकी एकही विद्यार्थ्याला अजूनही शिष्यवृत्ती मिळाली नाही हि अतिशय गंभीर बाब आहे. मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी भारत सरकारची फ्री शिप, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती साठी विद्यार्थी आज करतात. समाज कल्याण विभागात महाराष्ट्र राज्यातून ५,७१,३२४ विद्यार्थीनी अर्ज केले त्यामध्ये पुणे मधून ५८,१३१ विद्यार्थीनी अर्ज केले हिते त्या पैकी केवळ १२८ विद्यार्थीना शिष्यवृत्ती मिळाली.
सन २०१९-२० मध्ये ३,६७,५९५, विद्यार्थ्यानी अर्ज केले होते छाननी नंतर काही अर्ज बाद झाले तर ३,१९,५८६ अर्जाची पडताळणी करण्यात आली व १,०२,५१७ अर्ज कॉलेज ने मंजूर केले एकूण अर्ज पैकी २,१६,९६९ अर्ज कॉलेज कडे आजही प्रलंबित आहेत शासनाकडे पाठविलेल्या अर्जा पैकी २६,००१ एवढेच अर्ज मंजूर करण्यात आले. तर ७६,५१६ इतके अर्ज जिल्हा कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. केवळ १,९६५ मागासवर्गीय विद्यार्थ्यालाच शिष्यवृत्ती मिळाली असल्याचे माहिती अधिकार अंतर्गत स्पष्ट झाले आहे. या वरून शासन मागास वर्गीयाच्या विद्यार्थ्याच्या बाबतीत किती सक्रिय आहे हेच दिसून येते.
मातंग समाजाचा आयोग शासनाच्या वतीने जो क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज आयोग स्थापन करण्यात आला होता. त्याच्या शिफारशी शासनाकडे आजही प्रलंबित असल्यामुळे शासनाने त्याची दखल न घेतल्यामुळेच मातंग समाजाचा सर्वांगीण विकासापासून दूर आहे. अशा प्रलंबित आयोगाच्या शिफारशीची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी.
मातंग समाजाला अनुसूचित जाती मध्ये अ ब क ड प्रमाणे लोकसंख्येच्या आधारावर स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे.सरकार व प्रशासन नेहमीच मातंग समाजाची दिशाभूल करत आले असून, यापुढे प्रशासनाने समाजाच्या या मागण्यांकडे गांभीर्यपूर्वक पाहिले नाही व येत्या १५ दिवसात जर सर्व विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती दिली नाही तर सर्व समाज रस्त्यावर उतरेल व समाजाच्या या तीव्र भावनेमुळे अनुचित प्रकार घडला तर त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असे मत नगरसेवक अविनाश बागवे यांनी व्यक्त केले.
आंदोलनाचे नेतृत्व राज्याचे माजी गृहराज्यमंत्री व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश बागवे यांनी केले व आयोजन पुणे मनपा नगरसेवक व संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष श्री. अविनाश बागवे व शहराध्यक्ष विठ्ठल थोरात यांनी केले होते.
प्रशासनाने या मागण्या तातडीने मान्य केल्या नाही तर या पुढील काळात तीव्रआंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे शहराध्यक्ष विठ्ठल थोरात यांनी दिला.
बाल-कुमारांच्या कवितांनी रसिकांना केले विचारप्रवृत्त
पं.विजय घाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘शिखर सन्मान’ पुरस्कार जाहीर
पुणे– मध्य प्रदेश राज्य शासनाच्या संस्कृती विभागाच्या वतीने साहित्य, संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी मान्यवरांना ‘शिखर सन्मान’ पुरस्कार प्रदान केला जातो. अतिशय मानाच्या या पुरस्कारासाठी यंदा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे यांची निवड करण्यात आली आहे. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार दि. १८ नोव्हेंबर २०१९ रोजी भोपाळ येथे पं. विजय घाटे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
बीएसएएम सिक्स रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत पुण्याच्या शिवम अरोरा याला विजेतेपद
काँग्रेसने घेतली उद्धव ठाकरेंसह शिवसेना आमदारांची भेट
मुंबई – राज्यात सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू असतानाच मंगळवारी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. यानंतरही सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरूच आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बुधवारी किमान समान कार्यक्रमावर एक समिती नेमली. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 5-5 सदस्य नेमण्यात आले. या समितीमध्ये सामिल असलेल्या काँग्रेस नेत्यांनी संजय राउत यांची रुग्णालयात जाऊन भेट देखील घेतली. यानंतर काही वेळातच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बाहेर पडत असताना महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आणि लवकरच सरकार स्थापित होईल असे दावा राउत यांनी केला आहे.
किमान समान कार्यक्रमात काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीकडून या समितीमध्ये जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांना सामिल करण्यात आले आहे. या समितीने शेतकऱ्यांचा मुद्दा आणि कर्जमाफी केंद्रस्थानी ठेवण्याचा निर्णय घेतला. यानंतर काँग्रेस नेत्यांनी ट्रायडेंट हॉटेल येथे जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदारांची भेट घेतली. आजपासून चर्चेला सुरुवात झाली याशिवाय उद्धव यांनी माध्यमांशी काहीही बोलण्यास नकार दिला.
उद्धव ठाकरेंसोबत केवळ सदिच्छा भेट -काँग्रेस
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेना पक्ष प्रमुखांसोबत झालेली भेट ही सदिच्छा भेट होती असे सांगितले आहे. हॉटेल ट्रायडेंटमध्ये झालेल्या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते एकमेकांशी सविस्तर चर्चा करतील. त्यानंतर आवश्यकता वाटल्यास आणखी एकदा उद्धव यांच्याशी चर्चा केली जाईल असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
युती ची दारे बंद झाली असतील तर ती आम्ही नाही केली भाजपने केली -उद्धव ठाकरे
मुंबई-निवडणुकी नंतर भाजपचा ऑप्शन मी नाही खतम केला ,तर तो भाजपनेच केला. ठरलेले अमलात आणा असेच आमचे म्हणणे होते . युतीची दारे एकमेकांना बंद झाली असतील तर ती आम्ही नाही केली भाजपनेच केली ,आता घाई काय , राज्यपालांनी महिने दिले आहेत ,राजनीती आहे असे सांगत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपालांच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली मात्र राष्ट्रपती राजवटी विरोधात न्यायालयात जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत युती तुटली का? हा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी बगल दिली आहे. भाजपा अजूनही संपर्कात आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की रोज नवनवे प्रस्ताव येत असतील तर त्या चर्चेला काही अर्थ नाही. जे काही ठरलं होतं ते ठरलं होतं, मला खोटं ठरवण्यात आलं त्यामुळे माझा संताप झाला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. भाजपाने परवा आम्हाला आघाडीसोबत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मित्राचा सल्ला आम्ही ऐकला आहे असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. जे काही ठरेल ते जगजाहीर होणार आहे आम्ही लपूनछपून
महाराष्ट्राचं सरकार चालवणं हा काही पोरखेळ नाही. संख्याबळ आणि पाठिंब्याची पत्रं आमच्याकडे नव्हती. त्यामुळेच आम्ही ४८ तासांची मुदत मागितली होती. मात्र राज्यपालांनी आम्हाला मुदत दिली नाही. राष्ट्रपती राजवट लागल्याने आम्हाला सहा महिन्यांचा कालवाधी दिला आहे. एवढे दयावान राज्यपाल आम्हाला लाभलेच नव्हतेच. वेगळ्या विचारधारेचे प्रश्न एकत्र कसे येणार हा सगळ्यांसमोर पडलेला प्रश्न आहे. भाजपा आणि मुफ्ती मोहम्मद कसे एकत्र आले? पासवान आणि भाजपा कसे एकत्र कसे आले? चंद्राबाबू आणि भाजपा एकत्र कसे आले होते? याची माहिती मागितली आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
भाजपाने आमच्यासोबत ठरवलेल्या गोष्टी होत्या त्यात अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद ठरवलंच होतं. मात्र भाजपाने मला खोटं ठरवलं आणि ते माझ्यासाठी संतापजनक होतं. हिंदुत्त्व ही आमची विचारधारा आहे. हिंदुत्त्वाला वचनबद्धता हे महत्त्वाची आहे. देशात रामराज्य आलं पाहिजे असं आम्हाला वाटतं कारण रामराज्य आणावं ही आमची संकल्पना आहे. अरविंद सावंत यांना धन्यवाद द्यायचे आहेत कारण शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक म्हणून मला अभिमान वाटतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे ४८ तासांची मुदत मागितली. आम्ही सरकार बनवू इच्छितो हा दावा आम्ही केला. मात्र आम्हाला ४८ तासांची मुदत दिली नाही. मात्र राज्यपाल खूप दयावान आहेत त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करुन आम्हाला सहा महिन्यांची मुदत दिली आहे असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. गेल्या अनेक वर्षांत एवढी दयावान व्यक्ती आपल्या राज्याला लाभली नव्हती असाहीट टोला त्यांनी लगावला.
- राष्ट्रपती राजवटीविरोधात याचिका केली नाही.
- राज्यपालांच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंकडून नाराजी व्यक्त
- राज्यपालांनी ४८ तासांची मुदत न दिल्याबद्दल टोला
- आता आम्हाला ६ महिन्याचा अवधी
- शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा कायम
- वेळ वाढून न देणाऱ्या राज्यपालांवर टीका
- भाजप आणि मेहबुबा कसे एकत्र आले? उद्धव ठाकरेंचा सवाल
- हिंदुत्व आमची विचारधारा आहे
- अरविंद सावंतांना मंत्री पदाचा मोह नाही
- अरविंद सावंत कडवट शिवसैनिक
- युती तुटली का? प्रश्नाला उद्धव ठाकरेंची बगल
- आता शिवसेना आणि आघाडी एकत्र बरसतील
- महाराष्ट्रत सरकार बनवणं चेष्टा नाही
- हिंदुत्व आमची विचारधारा
- भाजपशी चर्चा आम्ही नाही बंद केली तर भाजपनं बंद केली
- जे ठरलं ते अमलात आण एवढेच आम्ही म्हटले होते .
- आता जे आमचं ठरेल ते जगजाहीर असेल, लपून छपून काही होणार नाही
आता कुठे शिवसेनेशी चर्चा सुरु होणार … कॉंग्रेस -राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेतला सूर
जुन्नरमध्ये देशी बनावटीचे पिस्तुल जप्त
अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद, राष्ट्रवादीचा शिवसेनेला प्रस्ताव ?
मुंबई-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठबळावर सत्ता स्थापन करण्याचा दावा सोमवारी शिवसेनेने राज्यपालांकडे केला असला तरी १४५ सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यास पक्षाला अपयश आले. पत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याची शिवसेनेची मागणी फेटाळून राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी दिली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा न देता थेट सत्तेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.असे येथे वृत्त आले आहे.
भाजपा आणि शिवसेना सत्ता स्थापन करण्यात असमर्थ ठरल्यानंतर राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं असून रात्री ८.३० वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरु असून काय निर्णय घेतील याची उत्सुकता आहे. तर दुसरीकडे शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही रिट्रीट हॉटेलमध्ये आमदारांशी चर्चा करत आहेत.
दरम्यान महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच सुटू न शकल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालांकडे राष्ट्रपती शिफारस लागू करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी दोन वेळा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असून ही तिसरी वेळ आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करायचे, असा शिवसेनेचा प्रयत्न होता. यातूनच शिवसेनेने केंद्रातील सरकारमधून बाहेर पडावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी व काँग्रेसने व्यक्त केली होती. यानुसार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. सरकार स्थापण्याबाबत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चाही झाली. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्यास विरोध झाला होता. पण राज्यातील नेत्यांची तीव्र भावना लक्षात घेता, पुन्हा बैठक बोलाविण्यात आली.
काँग्रेसने सुमारे साडेतीन तासांच्या बैठकीनंतरही काहीच निर्णय घेतला नाही. काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्र प्राप्त होईल, अशी चर्चा सुरू झाली. साडेसातपर्यंत राज्यपालांनी शिवसेनेला मुदत दिली होती. शिवसेना नेते पावणेसात वाजता राजभवनवर पोहोचले. पण काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्रच प्राप्त झाले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीचा पाठिंबा गृहीत धरून शिवसेनेने सरकार स्थापण्याचा दावाही केला होता. पण पाठिंब्याचे पत्र सादर करू शकले नाहीत.
काँग्रेसची बैठक रात्री आठपर्यंत सुरू होती. काँग्रेसने पाठिंब्याबाबत वेळेत पत्रच दिले नाही. काँग्रेसचे पत्र न आल्याने राष्ट्रवादीनेही राज्यपालांना पत्र दिले नाही. मित्र पक्षांनी तत्त्वत: मान्यता दिली असली तरी पत्र नंतर सादर करू, असे शिवसेनेच्या वतीने राज्यपालांना विनंती करण्यात आली. पण राज्यपालांनी पत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यास नकार दिला.
टेलिव्हिजन व फिल्म मेकिंग क्षेत्रातील संधींचा विद्यार्थ्यांना लाभ व्हावा, यासाठी ‘सूर्यदत्ता प्रॉडक्शन्स’ची स्थापना
सचिन इटकर म्हणाले, ”नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या सूर्यदत्ता ग्रुपने मनोरंजन क्षेत्रात टाकलेले पाऊल कौतुकास्पद आहे. शिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच होत आहे. या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अद्ययावत स्टुडिओ निर्मिती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसोबतच पुणे आणि परिसरातील संस्थांना व तरुणांना याचा फायदा होईल. येथे येणाऱ्या लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, तंत्रज्ञ अशा विविध तज्ज्ञांकडून मुलांना नवीन काहीतरी शिकायला मिळेल. मनोरंजन क्षेत्राशी संबंधित काम करू इच्छिणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि कौशल्यासह प्रात्यक्षिक ज्ञानाचा अनुभव या ‘सूर्यदत्ता प्रॉडक्शन्स’मधून मिळेल, असा विश्वास वाटतो.”
पाचव्या किड्स मॅरेथॉन स्पर्धेत भार्गव बरफ, अनन्या विजय, अवनिश मुळे, ज्ञानेश्वरी फडतरे यांना विजेतेपद
पुणे: सिम्पल स्टेप्स यांच्या वतीने पाचव्या किड्स(लहान मुलांच्या) मॅरेथॉन स्पर्धेत 7कि.मी. मुलांच्या गटात भार्गव बरफ व मुलींच्या गटात अनन्या विजय यांनी तर 5कि.मी. मुलांच्या गटात अवनिश मुळे व मुलींच्या गटात ज्ञानेश्वरी फडतरे यांनी अव्वल क्रमांक पटकवत विजेतेपद संपादन केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पार पडलेल्या या शर्यतीत 1750धावपटूंनी आपला सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचा फ्लॉग ऑफ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्हाईस चन्सलर नितिन करमरकर व निवृत एसीपी सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. 7 कि.मी शर्यतीत मुलांच्या गटात भार्गव बरफने 29ः6 सेकंद अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला तर आकाश साळुंखेने 29ः59 सेकंद व करण वाघने 30ः42 सेकंद अशी वेळ नोंदवत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात अनन्या विजयने 32ः42 सेकंद अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला तर रमा टोनपेने 33ः09 सेकंद व हरीका खत्तीने 33ः10 सेकंद वेळ नोंदवत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
5 कि.मी शर्यतीत मुलांच्या गटात अवनिश मुळेने 23ः06सेकंद अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला तर शौर्य कुलकर्णीने 24ः22सेकंद व राम मगदुमने 24ः46सेकंद वेळ नोंदवत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात ज्ञानेश्वरी फडतरेने 23ः12सेकंद अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला तर हरिणी व्ही हीने 29ः01सेकंद व मोक्षदा चौधरीने 32ः23सेकंद अशी वेळ नोंदवत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील अव्वल तीन स्पर्धकांना पदक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. तर शर्यत पुर्ण करणा-या सर्व स्पर्धकांना पदक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण जम्पस्टार्टचे आदित्य व स्नेहा तापडीया, आदर पुनावाल क्लिन सिटी उपक्रमाचे मल्हार करवंदे व सिम्पल स्टेप्सचे फाउंडर आशिष कसोदेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: (प्रथम, व्दितीय व तृतीय या क्रमानुसार):
7कि.मी. मुले: 1. भार्गव बरफ(29ः6से), 2. आकाश साळुंखे(29ः59से), 3. करण वाघ(30ः42से)
7कि.मी. मुली: 1. अनन्या विजय(32ः42से), 2. रमा टोनपे(33ः09से), 3.हरीका खत्ती (33ः10से)
5कि.मी. मुले: 1. अवनिश मुळे(23ः06से), 2. शौर्य कुलकर्णी(24ः22से), 3. राम मगदुम(24ः46से)
5कि.मी.मुली: 1. ज्ञानेश्वरी फडतरे(23ः12से), 2. हरिणी व्ही(29ः01से), 3.मोक्षदा चौधरी(32ः23से)
‘खरं सांगायचं तर..’ अव्वल…
कराड : महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडळाचे ‘खरं सांगायचं तर’ हे नाटक सर्वोत्कृष्ट ठरले. तर बारामती परिमंडलाचे ‘ब्रीज’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
बारामती परिमंडल आयोजित येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनामध्ये (टाऊन हाँल) मंगळवारी (दि. 12) दोन दिवसीय नाट्यस्पर्धेचा समारोप झाला. महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. सचिन तालेवार, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके, मुख्य अभियंता श्री. अनिल भोसले (कोल्हापूर परिमंडल), प्रभारी मुख्य अभियंता श्री. ज्ञानदेव पडळकर (बारामती परिमंडल) यांच्याहस्ते नाट्यस्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर परिक्षक सौ. सुप्रिया भागवत, श्री. प्रशांत गोखले, श्री. राज कुबेर यांची उपस्थिती होती.
नाट्यस्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी (दि. 12) पुणे परिमंडलाने उदय नारकर लिखित ‘खरं सांगायचं तर..’ हे नाटक सादर केले. मानवी नात्यांचा उत्कंठावर्धक नाट्यातून वेध घेणार्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार दिग्दर्शित या नाटकामध्ये अपर्णा मानकीकर, संतोष गहेरवार, सचिन निकम, विजय जोशी, शैलेंद्र भालेराव आदी प्रमुख भूमिकेत होते. कोल्हापूर परिमंडलाने हणमंत नलवडे दिग्दर्शित ‘चरणदार चोर’ हे सामाजिक विषयावरील नाटक सादर केले व नाट्यरसिकांची दाद मिळविली. या नाटकामध्ये महेश कांबळे, नजीर अहमद मुजावर, शिवराज आणेकर, सोनाली बेंद्रे आदी कलावंतांनी भूमिका केल्या.
नाट्यस्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून पुणे परिमंडलाच्या ‘खरं सांगायचं तर..’ या नाटकाला प्रथम तर बारामती परिमंडलाच्या ‘ब्रीज’ या नाट्यकृतीला द्वितीय क्रमांक मिळाला. यासोबतच दिग्दर्शन – प्रथम – पंकज तगलपल्लेवार (पुणे), द्वितीय – श्रीकृष्ण वायदंडे (बारामती), अभिनय (स्त्री) – प्रथम – अपर्णा माणकीकर (पुणे), द्वितीय- सोनाली बेंद्रे (कोल्हापूर), अभिनय (पुरुष) – प्रथम- संतोष गहेरवार (पुणे), द्वितीय – राम चव्हाण (बारामती), नेपथ्य – भरत अभंग व राजेंद्र हवालदार (पुणे), द्वितीय – अभिमन्यू राख (बारामती), प्रकाशयोजना – प्रथम – किरण दौंड व कुमार गवळी (पुणे), द्वितीय – महावीर शेंडगे (बारामती), पार्श्वसंगीत – संजय नायकवडी व पवन देशमुख (पुणे), द्वितीय – नीलेश गव्हाणे (बारामती), रंगभूषा व वेशभूषा – प्रथम – कीर्ती भोसले, द्वितीय नितीन सावर्डेकर (कोल्हापूर) तर अभिनयाच्या उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी रुकय्या शिलदार (बारामती), निकिता खैरनार (पुणे), व मंगेश कांबळे (कोल्हापूर) यांची निवड करण्यात आली. कल्याण येथे या महिन्यात होणार्या महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुण्याचे ‘खरं सांगायचं तर..’ हे नाटक पुणे प्रादेशिक विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
पारितोषिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक बारामती परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता श्री. ज्ञानदेव पडळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष भोसले यांनी केले तर श्री. स्वप्नील जाधव यांनी यांनी आभार मानले.
सुहास कुलकर्णी, अनिल रसम , नितिन तोशनीवाल, मनिष रावत, सतिश कुलकर्णी, सुबोध देशपांडे, सारिका वरदे , अनघा जोशी, उज्वला मराठे यांना विजेतेपद
- टी लॅक अकादमी , पीवायसी हिंदू जिमखाना अ या संघांना विजेतेपद
पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजीत दुस-या डॉ.प्रमोद मुळे स्मृती करंडक प्रौढ राज्य मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत सुहास कुलकर्णी, अनिल रसम , नितिन तोशनीवाल, मनिष रावत, सतिश कुलकर्णी, सुबोध देशपांडे, सारिका वरदे , अनघा जोशी व उज्वला मराठे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले. सांघिक गटात टी लॅक अकादमी व पीवायसी हिंदू जिमखाना अ या संघांनी विजेतेपद पटकावले.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत 65 वर्षावरील पुरूषांच्या गटात मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत सुहास कुलकर्णीने मुंबई उपनगरच्या तिस-या मानांकीत पार्सी मेहताचा 11/7,12/10,11/9 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 60 वर्षावरील पुरूष गटात मुंबई उपनगरच्या दुस-या मानांकीत अनिल रसमने मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत प्रकाश केळकरचा 7/11,8/11,11/6,11/8,11/7 असा तर 50 वर्षावरील पुरूषांच्या गटात सोलापुरच्या अव्वल मानांकीत नितिन तोशनीवालने मुंबई उपनगरच्या तिस-या मानांकीत राम कदमचा 12/10,11/2,11/3 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 40 वर्षावरील पुरूष गटात सोलापुरच्या अव्वल मानांकीत मनिष रावतने पुण्याच्या केदार मोघेचा 11/4,11/8,11/9 असा तर 70 वर्षावरील पुरूष गटात मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत सतिश कुलकर्णीने पुण्याच्या दुस-या मानांकीत दिलिप कुडतरकरचा 11/6,7/11,11/5,11/7 आणि 75 वर्षावरील पुरूष गटात पुण्याच्या सुबोध देशपांडेने नाशिकच्या अव्वल मानांकीत सतिश शिरसाटचा 11/3,11/1,11/4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
40 वर्षावरील महिला गटात पुण्याच्या तिस-या मानांकीत सारिका वरदेने ठाण्याच्या अव्वल मानांकीत सुषमा मोगरेचा 13/15,8/11,11/3,12/10,11/6 असा तर 50 वर्षावरील महिला गटात मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत अनघा जोशीने मुंबई उपनगरच्या दुस-या मानांकीत स्नेहा पाध्येचा 11/4,11/2,11/4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 60 वर्षावरील महिलांच्या गटात मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत उज्वला मराठेने पुण्याच्या तिस-या मानांकीत सुहासीनी बकरेचा 11/7,11/2,11/4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
सांघिक गटात 40 व 50 वर्षावरील गटात टी लॅक अकादमी संघाने पीटीकेएस अ संघाचा 3-2 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. यात ओंकार जोग, दिवेंदू सी व पंकज यांनी विजयी कामगिरी केली. 60वर्षावरील गटात पीवायसी हिंदू जिमखाना अ संघाने फोर्झा संघाचा 3-1 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. यात सुहास कुलकर्णी, प्रकाश केळकर यांनी एकेरी व दुहेरी अशा दोन्ही गटात चमकदार कामगिरी करत संघाला विजेतेपद मिळवून दिले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक पारितोषिक देण्यात आले. सांघिक गटात विजेत्या संघांना करंडक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ सुधीर भाटे, क्लबचे मानद सचिव आनंद परांजपे, डॉ विद्या मुळ्ये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ अरुंधती मुळ्ये, डॉ संजय मुळ्ये, पुणे जिल्हा टेनिस संघटनेच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस, क्लबचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, एमएसटीटीएचे सुहास दांडेकर, मानसी परळे, वसंत चिंचाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपेंद्र मुळ्ये यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
उपांत्य फेरी- 65 वर्षावरील पुरूष
अंतिम फेरी- सुहास कुलकर्णी(1,मुंबई उपनगर) वि.वि पार्सी मेहता (3,मुंबई उपनगर) 11/7,12/10,11/9
उपांत्य फेरी- 60 वर्षावरील पुरूष
प्रकाश केळकर (1,मुंबई उपनगर) वि.वि जयंत कुलकर्णी (5,मुंबई उपनगर)8/11,12/10,11/5,11/7
अनिल रसम(2,मुंबई उपनगर) वि.वि रोहिदास गरुड(3, पुणे)12/10,7/11,11/4,11/9
उपांत्य फेरी- 50 वर्षावरील पुरूष
नितिन तोशनीवाल(1, सोलापुर) वि.वि अजय कोठावले(4, पुणे)11/13,9/11,11/9,11/8,11/9
राम कदम(3,मुंबई उपनगर)वि.वि विवेक आलवणी(7, जळगाव) 11/8,4/11,9/11,11/5,11/6
अंतिम फेरी- नितिन तोशनीवाल(1, सोलापुर) वि.वि राम कदम(3,मुंबई उपनगर) 12/10,11/2,11/3
मनिष रावत(1, सोलापुर) वि.वि दिपेश अभ्यंकर(4, पुणे)11/5,11/6,8/11,11/8
केदार मोघे(15, पुणे) वि.वि पंकज रहाणे(3, नाशिक) 11/8,11/8,9/11,7/11,11/7
अंतिम फेरी- मनिष रावत(1, सोलापुर) वि.वि केदार मोघे(15, पुणे) 11/4,11/8,11/9
उपांत्य फेरी- 70 वर्षावरील पुरूष
सतिश कुलकर्णी(1, मुंबई उपनगर) वि.वि कामेश भोंडे(पुणे)11/3,11/5,11/3
दिलिप कुडतरकर(2,पुणे)वि.वि रमेश थडानी(पुणे) 9/11,11/5,11/4,8/11,11/9
अंतिम फेरी – सतिश कुलकर्णी(1, मुंबई उपनगर) वि.वि दिलिप कुडतरकर(2,पुणे) 11/6,7/11,11/5,11/7
सतिष शिरसाट(1, नाशिक) वि.वि विकास सातारकर(पुणे) 11/8,11/8,8/11,9/11,11/8
अंतिम फेरी- सुबोध देशपांडे(पुणे) वि.वि सतिष शिरसाट(1, नाशिक) 11/3,11/1,11/4
उपांत्य फेरी- 40 वर्षावरील महिला
सुषमा मोगरे(1, ठाणे) वि.वि सिवाप्रिया नाईक (मुंबई उपनगर)11/6,11/6,11/7
सारिका वरदे(3, पुणे) वि.वि श्रावणी धप्रे(2, मुंबई उपनगर) 12/10,11/4,9/11,13/11
अंतिम फेरी- सारिका वरदे(3, पुणे) वि.वि सुषमा मोगरे(1, ठाणे) 13/15,8/11,11/3,12/10,11/6
अनघा जोशी(1, अनघा जोशी) वि.वि चंद्रमा रामकुमार(पुणे) 11/6,7/11,11/8,8/11,11/8
स्नेहा पाध्ये(2, मुंबई उपनगर) वि.वि वैशाली मालवणकर(मुंबई उपनगर)13/11,11/9,9/11,14/16,11/7
अंतिम फेरी- अनघा जोशी(1, मुंबई उपनगर) वि.वि स्नेहा पाध्ये(2, मुंबई उपनगर) 11/4,11/2,11/4
उज्वला मराठे(1, मुंबई उपनगर)वि.वि मिना शहा(पुणे)11/4,12/10,11/9
सुहासीनी बकरे(3, पुणे)वि.वि रंजना पत्की(पुणे) 11/4,12/10,12/10
अंतिम फेरी- उज्वला मराठे(1, मुंबई उपनगर)वि.वि सुहासीनी बकरे(3, पुणे) 11/7,11/2,11/4




