Home Blog Page 2629

पुण्यात ‘क्वारंटाइन’साठी ‘म्हाडा’च्या इमारती

0
पुणे-परदेशातून, परराज्यांतून किंवा शहराबाहेरून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये येणाऱ्या नागरिकांना सक्तीने १४ दिवस ‘होम क्वारंटाइन’ करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाच्या चाकण रस्त्यावरील म्हाळुंगे येथे असलेल्या मोकळ्या इमारती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या ठिकाणी ‘म्हाडा’चे ३७६ मोकळे फ्लॅट असून, त्या ठिकाणी संबंधित नागरिकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. ‘करोना’ची लक्षणे आढळल्यास संबंधितांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये हलविण्यात येणार आहे.

‘होम क्वारंटाइन’ करण्यात येणाऱ्या नागरिकांच्या हातावर शिक्का मारून त्यांना सक्तीने १४ दिवस घरात बसण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. मात्र, तरीही अनेक नागरिक ‘होम क्वारंटाइन’च्या काळात बाहेर फिरत असल्याचे किंवा घरात बसून राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाने ‘म्हाडा’च्या रिकाम्या असलेल्या इमारती ताब्यात घेऊन, त्या ठिकाणी शहराबाहेरून येणाऱ्या नागरिकांना सक्तीने ‘होम क्वारंटाइन’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘म्हाडा’च्या पुणे विभागाने चाकण रस्त्यावरील म्हाळुंगे येथे इमारती बांधल्या आहेत. सध्या त्या इमारती रिकाम्या आहेत. त्या इमारतींमध्ये संबंधित नागरिकांची ‘होम क्वारंटाइन’ची व्यवस्था केली जाणार आहे. त्या इमारती जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतल्या असून, त्या ठिकाणी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

‘होम क्वारंटाइन’ केलेल्या नागरिकांमध्ये ‘करोना’ची लक्षणे आढळल्यास संबंधित नागरिकांना उपचारासाठी नायडू हॉस्पिटल, वायसीएम हॉस्पिटल, औंध किंवा भोसरी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. ‘होम क्वारंटाइन’ केलेल्या नागरिकांनी शहरात फिरू नये किंवा त्यांच्यामुळे कुटुंबीयांना लागण होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. म्हाळुंगे येथील ‘म्हाडा’च्या इमारती या पुणे आणि पिंपरी शहरापासून दूर अंतरावर असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

चाकण रस्त्यावरील म्हाळुंगे येथे असलेल्या मोकळ्या इमारतींमध्ये ‘होम क्वारंटाइन’ करण्यात येणाऱ्या नागरिकांची व्यवस्था केली जाणार आहे. या इमारतींमध्ये ३७६ फ्लॅट आहेत. ‘होम क्वारंटाइन’ केलेल्या नागरिकांमध्ये ‘करोना’ची लक्षणे आढळल्यास त्यांना रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. – अशोक पाटील, मुख्य अधिकारी, म्हाडा, पुणे

मृत्यूच्या दारात जाऊन आली ती माघारी…..

0

भारती हॉस्पिटल येथे उपचार घेणारी अंगणवाडी सेविका 14 दिवसांनी आयसीयूतून बाहेर

पुणे – परदेश दौरा किंवा परदेशांतून आलेल्या नातेवाईकाच्या संपर्कात त्या आल्या नाहीत. मात्र, करोनासारख्या जीवघेण्या संसर्गाने त्यांना ग्रासले. आयसीयूमध्ये उपचार सुरू केल्यानंतर हा आजार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. डॉक्‍टरांचे प्रयत्न, जगण्याची इच्छाशक्ती आणि शेकडो पुणेकरांच्या प्रार्थनेच्या बळावर या महिलेने करोनाचा पराभव केला आहे. तब्बल 14 दिवस आयसीयूमध्ये असलेली ही अंगणवाडी सेविका करोनाला हरवून वेगाने बरी होत असून, मंगळवारी या महिलेचा व्हेंटिलेटर काढण्यात आला आहे. अशा अवस्थेतून बरी होणारी संबंधित महिला देशातील पहिली रुग्ण ठरली आहे.

संबंधित अंगणवाडी सेविकेने 3 मार्च रोजी पुणे ते वाशी असा कॅबने प्रवास केला होता. 6 मार्चपासून या महिलेस करोनासदृश लक्षणे होती. मात्र, परदेश प्रवास तसेच परदेशी व्यक्तीच्या संपर्कात न आल्याने हा ताप व्हायरल असेल, असा समज करत या महिलेने सिंहगड रस्ता येथील एका रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर त्रास वाढल्याने या महिलेस 16 मार्च रोजी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने भारती हॉस्पिटल येथील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. या महिलेस स्वाइन फ्लू असण्याची शक्‍यता लक्षात घेऊन डॉक्‍टरांनी त्यांचे घशातील स्रावाचे नमुने एनआयव्हीला पाठवले मात्र, हा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर पुन्हा 19 मार्चला स्रावाचे नमुने पाठवत करोनाची तपासणी करण्यात आली. यावेळी अहवाल पॉझिटिव्ह आली. या महिलेला संसर्ग कसा झाला, या विचारानेच भविष्यात करोना वेगाने पसरण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, भारती हॉस्पिटलने प्रभावीपणे उपचार करत या महिलेला जीवघेण्या आजारातून वाचवले आहे.

महापालिकेने उचलला खर्च
या महिलेवर अत्याधुनिक उपचार करण्यात येणार होते. मात्र, हा खर्च मोठा असल्याने तसेच या महिलेच्या कुटूंबाची आर्थिक स्थिती अडचणीची असल्याने हा सर्व खर्च महापालिका देणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही घोषणा केला होती.

  • भारती हॉस्पिटलनेही प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
  • या अंगणवाडी सेविका अत्यावस्थ स्थितीतच दाखल झाल्या होत्या. मात्र, त्यांना वाचवण्यासाठी आमच्या डॉक्‍टरांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. या महिलेला इतर आजार नव्हते. त्यांची जगण्याची इच्छाशक्ती, सर्वांच्या प्रार्थनेमुळे करोनातून त्या वेगाने बऱ्या होत आहेत. 14 दिवसानंतर त्यांचा व्हेंटिलेटर काढला असून, आज त्यांनी लिक्वीड डायटही घेतले. ही सर्वांसाठी खूप आनंदाची बाब आहे. पूर्ण बऱ्या झाल्यानंतरच त्यांना घरी सोडले जाणार आहे.
    – डॉ. अस्मिता राजेंद्र जगताप, कार्यकारी संचालिका, भारती हॉस्पिटल

तबलीगमध्ये मुंबईचे 431 ; पुण्याचे 136, औरंगाबादेचे 40 सहभागी

0

पुणे-दिल्ली येथे पार पडलेल्या तबलीगी जमातच्या कार्यक्रमातपुणे जिल्ह्यातील 136 जण सहभागी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये पुणे व कॅन्टोमेंट मधील ९२ तर पिंपरी चिंचवड मधील 32 नागरिक आहेत तर उरलेले पुणे ग्रामीण भागातील आहेत.

पोलिसांनी आतापर्यंत सहभागी झालेल्या 30 ते 35 जणांना शोधून काढलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हा आणि पुणे शहरातील नागरिकांचा समावेश आहे.

या नागरिकांमध्ये सध्या तरी कोरोना संदर्भातील कुठलीही लक्षणे नाहीत अशी माहिती पुणे महापालिका आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली. दिल्लीतील या कार्यक्रमासाठी देश विदेशातील नागरिक सहभागी झाले होते.

पोलिसांनी देखील पुण्यातील नागरिक सहभागी झालेल्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 136 नागरिकांची यादी पोलिसांना मिळाली होती. त्यातील काही जणांची माहिती पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून शोधून काढली आहे. तर इतर लोकांचा पोलीस शोध घेत आहेत

‘तबलीग-ए-जमात’ कार्यक्रमात सहभागी होऊन महाराष्ट्रात परतलेल्या शेकडो जणांचा शाेध सुरू आहे. मुंबईतील ४३१ जण, पुणे-पिंपरीचे १३६ जण कार्यक्रमात सहभागी झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.  अकोल्यात १०  तर पुण्यात ४० जणांना शोधले आहे. दाेघे औरंगाबादेत परतल्याची माहिती आहे. क्रांती चाैक पाेलिसांनी मंगळवारी त्यापैकी एकाला घाटीत दाखल केले, तर दुसऱ्याच्या शाेध सुरू आहे. शहरातील ४० नागरिक फेब्रुवारीत कार्यक्रमात सहभागी झाले होते. ते १ मार्चच्या दरम्यान शहरात परतले. त्यांची यापूर्वीच तपासणी करून हाेम क्वाॅरंटाइन केले आहे.

महाराष्ट्रमध्ये नवे ८२ रुग्ण, देशातील आकडा १५४१ वर

देशात मंगळवारी कोरोनाचे १५६ नवे रुग्ण मिळाले. देशातील एकूण रुग्णांचा आकडा १,५४१ वर गेला आहे. ९ बळींसह मृतांचा आकडा ४५ वर गेला आहे. महाराष्ट्रात मंगळवारी ८२ नवे रुग्ण मिळाले. 59 जण तर एकट्या मुंबईत आढळले. देशातील कोणत्याही राज्यात एकाच दिवसात सापडलेले ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा आता ३०२ वर पोहोचला आहे. मुंबईनंतर नगरमध्ये ३ तर पुणे, ठाणे, वाशी, विरार आणि कल्याणमध्ये प्रत्येकी २ रुग्ण सापडले.

राज्यात कोरोनाग्रस्तांनी गाठला 321 चा आकडा

0

मुंबई. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. बुधवारी महाराष्ट्रातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 321 वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबईत 16, पुण्यात 2 आणि बुलडाण्यात 1 नवा करोनाग्रस्त रुग्ण आढळून आला आहे.

मुंबई शहर आणि परिसरात सोमवारी सापडलेल्या ३० रुग्णांसह मंगळवार संध्याकाळपर्यंत २९ रुग्णांची वाढ होऊन आकडा तब्बल ५९ वर पोहोचला आहे. मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १५६ वर गेली आहे. १३ रुग्ण मुंबई परिसरातील शहरी भागातील, ५ रुग्ण पुण्याचे, तीन नगरचे आणि २ बुलडाण्यातील आहेत.

महाराष्ट्रातून दिल्लीतील कार्यक्रमास गेलेल्यांना शोधा : आरोग्यमंत्री टोपे

दिल्लीतील तबलिगी जमात या कार्यक्रमात महाराष्ट्रातील १०० वर जण सहभागी झाल्याची माहिती आहे. त्यांचा शोध घेण्याच्या सूचना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. टोपे म्हणाले, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या राज्याच्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली तर त्यांना लगेच क्वाॅरंटाइन करून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येतील.

अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्तींना १ हजार रुपये

ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्तींनी प्रोत्साहनपर १ हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यांना नियमित वेतन-मानधनाव्यतिरिक्त १ हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम मिळेल. याशिवाय या कर्मचाऱ्यांचा ९० दिवसांसाठी २५ लाख रुपयांचा विमा उतरवण्यासही मान्यता देण्यात आली आहे. मुंबईत मंगळवारी रहिवाशांनी अख्खी इमारतच धुऊन काढली.

६,३३१ पैकी ५,७८० जणांचे नमुने निगेटिव्ह

राज्यात मंगळवारी एकूण ४०६ जण विविध रुग्णालयांत भरती झाले आहेत. मंगळवारपर्यंत पाठवण्यात आलेल्या ६,३३१ नमुन्यांपैकी ५,७८० जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. ३०२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात आतापर्यंत ३९ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडले आहे. सध्या २३,९१३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १४३४ जण संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या

मुंबई १५१, ठाणे मंडळातील इतर मनपा ३६, पुणे शहर व ग्रामीण ४८, सांगली २५, नागपूर १६, नगर ८, यवतमाळ ४, बुलडाणा ३, सातारा, कोल्हापूर २, औरंगाबाद, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोंदिया, जळगाव, नाशिक प्रत्येकी १, गुजरातचा १.

आरोप : डॉक्टरांकडे जाऊ न दिल्यामुळे वृद्धाचा मृत्यू

कुर्ल्यात ३० मार्चला कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे हा भाग बंद करण्यात आला होता. ज्या इमारतीत रुग्ण सापडला होता, त्याच इमारतीत राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. सोमवारी रात्रीच त्यांची तब्येत बिघडली होती. पण पोलिसांनी बिल्डिंग सील केल्यामुळे डॉक्टरांकडे जाऊ दिले नाही, असा आरोप करण्यात आला आहे. परिणामी त्यांची तब्येत जास्त खालावली.

भाजपकडून राष्ट्रीय संकटाच्या मदतकार्यातही व्यक्तीस्तोम माजवण्याचा व राजकीय प्रचार करण्याचा किळसवाणा प्रकार

0

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली टीका

मुंबई – सर्व जग सध्या कोरोना विषाणूच्या गंभीर संकटाचा सामना करत आहे. भारतातही कोरोनाने थैमान मांडले असून अशा संकटावेळी राजकारण बाजूला सारून सर्वांनी एकजूट होऊन या संकटाचा सामना करण्याची गरज आहे, मात्र भाजपा व त्यांच्या नेत्यांची भूमिका दुर्दैवाने असंवेदनशील आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यावेळी सचिन सावंत म्हणाले की, प्रत्येक घटनेचा इव्हेंट करण्याची सवय लागलेल्या भाजपाने कोरोनाच्या गंभीर संकटातही असंवेदनशीलता कळस गाठला आहे. गरीब, कामगार, कष्टकरी तसेच हातावर पोट असलेले लोक या संकटात होरपळले जात असताना त्यांना मदत करणे सर्वांचे कर्तव्य आहे. हजारो हात मदताठी पुढे आले आहेत परंतु भाजपा अनेक राज्यात मोदींच्या नावाने मदत देण्याचे काम करत आहे. गरीब लोकांना गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यासाठी ‘मोदीकीट’ बनवून त्यावर मोदींचा फोटो लावला जात आहे. राष्ट्रीय संकटाच्या मदतकार्यातही असे व्यक्तीस्तोम माजवण्याचा व राजकीय प्रचार करण्याचा हा किळसवाणा प्रकार आहे असल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच कोरोनाच्या या संकटात सर्वसामान्य लोक, उद्योगपती, खेळाडू, चित्रपट कलाकारांसह अनेकजण मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत करत असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मात्र भाजपाच्या सर्व आमदार, खासदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत व जिल्हा परिषद सदस्यांनी एक महिन्याचे वेतन भाजपाच्या आपदा मदत निधीला देण्याचे आवाहन केले आहे. जनतेच्याच पैशातून मिळालेले हे वेतन सरकारच्या मदतनिधीत जमा न करता पक्षाच्या मदतनिधीत जमा करण्याचा प्रकार हा महाराष्ट्रद्रोहीच म्हणावा लागेल असा घणाघात काँग्रेसने केला.

त्याचसोबत भाजपाचे काही नेते तर कोरोनावर मात करण्यासाठी अनेक अशास्त्रीय उपाय सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत. गाईचे शेण व गोमुत्राने कोरोना बरा होऊ शकतो असे तारेही त्यांनी तोडले आहेत. या सर्वांवर महाराष्ट्र भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी कळसच गाठला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री जयंत पाटील यांनी कोरोना संकटावेळी पंतप्रधान मोदी यांनी ज्यापद्धतीने देश लॉकडाऊन केला त्यावर काही प्रश्न उपस्थित केले होते. पाटील यांनी मोदींवर टीका केली म्हणूनच इस्लापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडण्याची शिक्षा झाली असे असंबंध व बेताल वक्तव्य वाघ यांनी केल्याचं सावंत यांनी बोलून दाखवलं.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार कोरोना संकटाचा मुकाबला अत्यंत उत्तमरितीने करत असताना उगाचच विरोधास विरोध म्हणून राज्य सरकारवर टीका करणे, मदतीमध्ये स्वतःचे अस्तित्व दाखवून श्रेय लाटणे असे उद्योग करणे म्हणजे भाजपाला या परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचेच प्रतिक आहे असा टोलाही काँग्रेसनं भाजपाला लगावला.

आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून पुण्यात २० हजार मास्कचे वाटप

0

पुणे-,

कोरोनापासून मुकाबला करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्यावतीने पुणे महापालिकेचे कर्मचारी, पोलीस, पत्रकार, वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉक्टर, परिचारिका यांना दैनंदिन वापरासाठी २० हजार मास्क महापौर मुरलीधर  मोहोळ यांच्याकडे वाटपासाठी सुपूर्द करण्यात आले.

कोरोनापासून बचावासाठी राज्यात मास्कचा तुटवडा आहे. याची दखल घेऊन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आ. मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी संवेदना फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थांच्या वतीने २० हजार मास्क तयार करुन घेऊन पुण्याचे महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्याकडे सुपूर्द केले. या मास्कपैकी महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्यांना दहा हजार, पोलीस कर्मचाऱ्यांना पाच हजार, पत्रकारांना एक हजार आणि विविध रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉक्टर, परिचारिका यांना चार हजार मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.

कोरोनापासून बचावासाठी राज्यात भारतीय जनता पक्षाकडून संपूर्ण राज्यात सेवाकार्य राबविले जात असून, याचाच एक भाग म्हणून आज पुण्यात अत्यावशक सेवेचा भाग असलेले पोलीस, पत्रकार, वैद्यकीय विभागातील कर्मचारी, आदींच्या सुरक्षेसाठी मास्क तयार करुन घेतले. हे सर्व मास्क महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्याकडे आज सुपूर्द केले, असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

त्यासोबतच कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालयात कोरोनापासून बचावासाठी डॉक्टरांना एक हजार एचवन मास्कचे संवेदना फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले. पुण्यातही अशाप्रकारे डॉक्टर, परिचारिकांना कोरोनापासून बचावासाठी एच वन मास्कचे वाटप करणार असल्याचेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

शिवभोजन केंद्रांमार्फत फूड पॅकेटद्वारे थाळी विक्री – जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

0

 

पुणे, दिनांक 31- सद्यस्थितीत पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 14 शिवभोजन केंद्रे सुरु असून या केंद्रावरुन शासन निर्देशाप्रमाणे फूड पॅकेट थाळी रु. 5/- या दराने विक्री सुरु आहे. सोशल डिस्टंसिंगची कठोरपणे अंमलबजावणी करण्‍याबाबत केंद्रांना आदेश देण्‍यात आलेले आहेत. केंद्रचालकांना फूड पॅकेटव्दारे थाळी विक्री करण्‍यास परवानगी दिली असून गरीब, गरजू व्यक्तींच्या ठिकाणी जाऊन त्यांना थाळी विक्री करण्याची मुभा देण्यात आली असल्याची माहिती जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले, दि. 24 मार्च 2020 पासून कोविड- 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर माहे एप्रिल, मे व जून 2020 या तीन महिन्यांचे एकत्रित आगाऊ धान्य अंत्योदय अन्न योजना व अन्नसुरक्षा योजना रेशन कार्ड धारकांना पुरविण्यात येणार आहे.

माहे एप्रिल 2020 करिताचे 3868.50 मे. टन गहू व 2548 मे. टन तांदूळ स्वस्त धान्य दुकानामध्ये पोहोच करण्‍यात आलेला आहे. या धान्याचे वाटप रेशनकार्डवर दि. 1/4/2020 पासून सुरू करण्‍यात येत आहे.

माहे मे व जून करिताचे धान्य 7737 मे. टन गहू व 5096 मे. टन तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांना दिनांक 10 एप्रिल 2020 पासून पुरविण्याचे नियोजन असल्याचेही त्‍यांनी सांगितले. हे धान्य हे केवळ अंत्योदय व अन्नसुरक्षा योजना रेशनकार्डधारकांनाच वाटप करण्यात येणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. वरील कार्डधारकांना धान्य वाटप करण्याचे सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांनी कार्डधारकांना धान्य वाटप करण्‍यासाठी निर्धारित वेळापत्रक तयार केले आहे. एका निर्धारित वेळापत्रकामध्ये 10 कार्डधारक धान्य घेण्यासाठी येतील. सोशल डिस्टंसिंग करिता दुकानासमोर एक मीटर अंतर राखून मार्किंग करणेत आले आहे. निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे कार्डधारकांना दुकानदाराकडून दूरध्वनीवरुन बोलविण्‍यात येणार आहे. कार्डधारकांनी धान्य घेण्यासाठी गर्दी करु नये याकरीता आवश्यकता भासल्यास जरुर तेथे पोलीस बंदोबस्त पुरवण्‍याबाबत पोलीस आयुक्त, पुणे व पिंपरी चिंचवड यांना कळविण्यात आले आहे.

झोपडपट्टी भागात धान्य व्दारपोहोच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे व पिंपरी चिंचवड मधील झोपडपट्टयात एकूण 270 दुकानांमधून अन्नधान्य व्दारपोहोच करण्यात येईल. प्रत्येक वस्तीत धान्यवाटपाचे निर्धारित वेळापत्रक ठरविले असून त्याप्रमाणे धान्य डिलिव्हरी करण्यापूर्वी कार्डधारकांना कळविण्‍यात येईल. कार्डधारकाच्या सोयीसाठी दुकानदारांना शासकीय अन्नधान्यासोबत इतर जीवनावश्यक वस्तू जसे डाळ, तेल, साखर, साबण, मीठ इ. गोष्टी कार्डधारकांच्या मागणी व गरजेप्रमाणे विक्री करण्याची मुभा देण्यात आली असल्‍याचे जिल्‍हाधिकारी राम यांनी सांगितले.

रेशन कार्डधारकांनसाठी हेल्पलाईन

रेशनकार्ड धारकांच्या तक्रार निवारणासाठी पुढील दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

टोल फ्री क्रमांक 1077

मदत केंद्र क्रमांक 020-26123743 (सकाळी 8.00 ते रात्री 8.00)

मोबाईल क्रमांक 9405163924

जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी (ब्लॅक मार्केटिंग) रोखण्‍याकरीता परिमंडळनिहाय 11 पथकांव्दारे दररोज तपासणी करण्‍यात येत आहे. जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य, भाजीपाला, दूध व औषधे यांची सद्यस्थितीत एकूण 27 हजार 210 दुकाने सुरळीतपणे सुरु आहेत.

सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही याकरीता मार्केट कमिटी, होलसेलर व्यापारी, किराणा भुसार असोसिएशन व्यापारी महासंघ यांच्‍याशी समन्वय ठेवण्‍यात येत असून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरळीत होईल, याची दक्षता घेण्यात येत आहे. काही जिल्हाबाह्य व राज्यबाह्य वाहतुकीने येणारी अन्नधान्य वाहने पोलीसांकडून अडविण्यात येत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मात्र 92 गाडयांची काल आवक झाली आहे.

लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवांकरीता पेट्रोल, डिझेल तुटवडा होऊ नये याकरिता पुढील कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा व शासकीय वाहनांकरिता पेट्रोल व डिझेल साठा राखीव ठेवण्यात यावा, असे पेट्रोलियम कंपन्यास कळविण्‍यात येत आहे. अत्यावश्यक सेवांकरिता लागणा-या मनुष्यबळाला पुरवठा कार्यालयातर्फे ओळखपत्र देण्यात येत असून 4096 ओळखपत्र विविध आस्थापनांना वितरित करण्‍यात आलेली आहेत.

बांधकाम साईट्सवर अडकलेल्‍या बांधकाम मजुरांना भोजन

0

 

पुणे, दिनांक 31- ‘लॉकडाऊन’मुळे पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बांधकाम साईट्सवर अडकलेल्‍या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्‍यास आजपासून सुरुवात झाली आहे. आज 19 वाहनांतून 95 साईट्सवरील 15 हजार 869 मजुरांना भोजन उपलब्‍ध करुन देण्‍यात आले. कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील मार्गदर्शनानुसार जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी कामगार विभागाच्‍या मदतीने ही सोय केली. ‘क्रेडाई’ या संस्‍थेकडे उपलब्‍ध असलेल्‍या आकडेवारीनुसार तसेच बांधकाम मंडळाकडे नोंद असलेल्‍या मजुरांना अटल आहार योजनेंतर्गत माध्‍यान्‍ह भोजन देण्‍याची योजना आहे. जिल्‍हाधिकारी राम यांच्‍या निर्देशानुसार बांधकाम साईट्सवरील सर्वच मजुरांना भोजन देण्‍यात येत आहे. ही संख्‍या 30 हजारांपर्यंत वाढण्‍याची शक्‍यता अपर कामगार आयुक्‍त शैलेंद्र पोळ यांनी व्‍यक्‍त केली.

महाराष्ट्रात दिवसाला साडेपाच हजार कोरोनाच्या चाचण्यांची क्षमता – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि. 31: राज्यात कोरोना चाचण्यांची सुविधा देशात महाराष्ट्रात सर्वाधिक असून १३ शासकीय आणि ८ खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज ५ हजार ५०० चाचण्या करू शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. राज्यात आतापर्यंत ६ हजार ३२३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून ५ हजार ९११ जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चाचण्यांची सुविधा वाढविण्यासाठी सुरूवातीपासून केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. राज्याच्या मागणीची दखल घेऊन केंद्र शासनाने तातडीने शासकीय महाविद्यालय आणि खासगी प्रयोगशाळांना चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आली आहे.

सध्या राज्यात १३ शासकीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी केली जात आहे. त्याद्वारे दररोज २ हजार ३०० चाचण्या केल्या जाण्याची क्षमता आहे. आता त्यामध्ये अजून ३ शासकीय प्रयोगशाळांना मान्यता देण्यात येणार असून राज्यात शासकीय प्रयोगशाळांची संख्या १६ होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात सध्या ८ खासगी प्रयोगशाळांमधून चाचण्या केल्या जात असून त्याद्वारे दररोज सुमारे २ हजार ८०० चाचण्या केल्या जाऊ शकतात. मात्र सध्या तरी राज्यात मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्याची आवश्यकता नसून  कोरोना उपचाराच्या प्रोटोकॉलनुसार चाचण्या केल्या जात असल्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी संगितले.

राज्यात कोरोनाला सामोरे जाण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडे पुरेशी साधनसामुग्री उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात सध्या दीड लाख एवढे एन ९५ मास्क उपलब्ध असून सुमारे ३५ हजार पीपीई किटस् तर २१ लाख ७० हजार ट्रीपल लेअर मास्क उपलब्ध आहेत. अजूनही ही साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात येणार असून उद्यापासून राज्यात या योजनेमध्ये सुमारे एक हजार रुग्णालये सहभागी होणार आहेत त्याद्वारेही कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जातील, असेही आरोग्यमंत्र्यांनी संगितले.

राज्यात दररोज १० लाख लिटर दुधाची २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

0

कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा 

मुंबई, दि. 31 : ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज दहा लाख लिटर दुधाची 25 रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करेल. येत्या चार-पाच दिवसात हे संकलन सुरु होईल आणि ‘कोरोना’चा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने ही खरेदी सुरु राहील, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला.

‘कोरोना’ प्रादुर्भावामुळे राज्यातील दूधव्यवसाय, दूधउत्पादक शेतकरी संकटात आहे. दूधविक्री घटल्यामुळे गावागावात दूध स्वीकारले जात नाही. राज्यात उत्पादित 12 लाख लिटर दुधापैकी 10 लाख दूध अतिरिक्त ठरत आहे. खाजगी बाजारात दुधाचा दर 15 ते 17 रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली घसरला आहे. शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब दूध उत्पादकांना याचा फटका बसत आहे. या शेतकऱ्यांना दिलासा, आधार देण्यासाठी तसेच ‘कोरोना’च्या धक्क्यातून सावरण्यासाठी राज्यात अतिरिक्त ठरत असलेले 10 लाख लिटर दूध दूधसंस्थांच्या माध्यमातून शासन 25 रुपये प्रतिलिटर दराने खेरदी  करेल. त्या दुधाची भुकटी करुन ती साठवली जाईल, नंतर त्याची ऑनलाईन विक्री केली जाईल, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. राज्य दूध महासंघाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार असून यातून शेतकऱ्यांना आधार व दिलासा मिळेल. यासाठी साधारणपणे 200 कोटी रुपये निधी लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, दुग्धविकासमंत्री सुनील केदार (दूरध्वनीद्वारे), वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह वरिष्ठ अधिकारी व दूध महासंघाचे व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

करोना प्रतिबंधासाठी कार्यरत ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्तींना मिळणार १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम आणि २५ लाखाचे विमा संरक्षण

0

– ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई, दि. ३१ : सध्या करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतस्तरावर जोखीम पत्करून काम करणारे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती यांना मिळणाऱ्या नियमित वेतन, मानधनाव्यतिरिक्त त्यांना १ हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली. याशिवाय केंद्र शासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी काढलेल्या ५० लाख रुपयांच्या विम्याच्या धरतीवर या कर्मचाऱ्यांचा ९० दिवसासाठी २५ लाख रुपयांचा विमा उतरविण्यासही मान्यता देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यासंदर्भातील परिपत्रक आज निर्गमित करण्यात आले असून सर्व जिल्हा परिषदांना कार्यवाहीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, ग्रामीण पातळीवर या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. यासंदर्भात मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी आवश्यक ते निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती यांच्यामार्फत लोकांमध्ये जनजागृती, स्वच्छता मोहीम राबविणे, आरोग्याची काळजी घेणे, आवश्यकतेनुसार सर्वेक्षण करणे इत्यादी कामे अहोरात्र मेहनत घेवून जिवाची पर्वा न करता करण्यात येत आहेत. हे कर्मचारी आपल्या जिवाची जोखीम पत्करून ही कामे करीत असल्याने त्यांना मिळणाऱ्या नियमित वेतन, मानधनाव्यतिरिक्त त्यांना १ हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

तसेच केंद्र शासनाने करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३० मार्च २०२० रोजीच्या पत्रान्वये या विषाणुच्या विरोधात लढा देणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत न्यू इंडिया ॲश्युअरन्स कंपनीमार्फत ९० दिवसांसाठी ५० लाख रुपयांचा विमा उतरविला आहे. त्याच धर्तीवर ग्रामपंचायतीअंतर्गत ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती या कर्मचाऱ्यांचा ९० दिवसासाठी २५ लाख रुपयांचा विमा उतरविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हा खर्च १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भागविण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयातून राज्यातील ग्रामीण भागातील करोना विषाणूच्या विरोधात लढा देणाऱ्या २ लाख ७३ हजार कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम मिळणार असून या कर्मचाऱ्यांना विम्याचेही संरक्षण दिले जाणार असल्याची माहिती मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली.

विलगीकरणाची गरज पडल्यास 3 लाख 20 हजार खाटा मावतील अशी डब्यांची फेररचना करायला भारतीय रेल्वे सज्ज

0

कोविड-19 च्या रुग्णांसाठी आवश्यक त्या सुविधांनी सुसज्ज अशा विलागीकरण डब्यांची व्यवस्था करायला सुरुवात

नवी दिल्ली, 31 मार्च 2020-कोविड-19 बाबत देशात सुरु असलेल्या विलगीकरण प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी 20 हजार डब्यांचे विलगीकरण/अलगीकरण कक्षांमध्ये रूपांतर करायचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. त्यासाठी सशस्त्र दल,वैद्यकीय सेवा, विविध रेल्वे परिमंडळातील वैद्यकीय विभाग आणि भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयांतर्गत आयुष्मान भारत इत्यादी विभागांशी सल्लामसलत सुरु होती. रेल्वेच्या पाच परिमंडळांनी विलगीकरण/अलगीकरण कक्षाचे प्रारूप बनविले आहे. रेल्वेच्या या फेररचना केलेल्या 20 हजार डब्यांमध्ये अलगीकरणाची गरज पडल्यास 3 लाख 20हजार खाटा मावतील. सुरुवातीला 5 हजार डब्यांचे विलगीकरण/अलगीकरण कक्षात रूपांतरण सुरु केले आहे. 80,000 खाटा मावतील अशी क्षमता या 5 हजार डब्यांची आहे. एका डब्यात साधारण 16अलगीकरणासाठीच्या खाटा मावण्याची अपेक्षा आहे.

या विलगीकरण/अलगीकरण कक्षात रूपांतरण करण्यासाठी आयसीएफ अर्थात इंटिग्रल कोच फॅक्टरीचे वातानुकूलित नसलेले शयनयान डबेच वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एका भारतीय बनावटीच्या शौचालयाचे बाथरूममध्ये रूपांतरण करण्यात येणार असून त्यात बादली, मग,साबण असे साहित्य असेल. वॉशबेसिनमधील नळाला लिफ्टसारखे हॅन्डल असेल. अशाप्रकारचा नळ योग्य उंचीवर असेल जेणेकरून बादली भरता येईल.

न्हाणीघराजवळील पहिल्या केबिनमध्ये रुग्णालयात लावतात तसे किंवा प्लास्टिकचे दोन पडदे जायच्या वाटेवर आडवे लावलेले असतील जेणेकरून संपूर्ण आठ बर्थ केबिनमध्ये जाणाऱ्या येणाऱ्यांचे स्क्रिनिंग होईल. ही केबिन साठवण किंवा निमवैद्यकीय विभाग म्हणून वापरण्यात येईल. वैद्यकीय विभागामार्फत दोन ऑक्सिजन सिलिंडर देण्यात येतील त्यासाठी या केबिनच्या जवळ असलेल्या बर्थवर ते ठेवण्याची सोया करण्यात येईल.

प्रत्येक डब्यातील मधले दोन बर्थ काढून टाकण्यात येणार असून वैद्यकीय सामुग्री ठेवण्यासाठी प्रति बर्थ दोननुसार प्रत्येक केबिनमध्ये पाण्याची बाटली ठेवण्याचे स्टॅन्ड लावले जातील. प्रत्येक डब्यात अतिरिक्त 3 हुक (खुंट्या), बसवल्या जातील.हवा खेळती राहील अशी मच्छरदाणीही प्रत्येक खिडकीवर लावण्यात येईल. कचरा टाकण्यासाठी प्रत्येक डब्यात लाल, निळ्या आणि पिवळ्या रंगाचे, पायाच्या साहाय्याने उघडझाप करता येणारे, कचऱ्याच्या पिशव्या लावलेले डबे ठेवले जातील.विद्युत अवरोधक म्हणून छताला आणि खिडकीच्या खाली आणि वरती बांबूची तावदाने लावली जातील जेणेकरून डब्यात उष्णतासुद्धा राखली जाईल. मोबाईल,लॅपटॉपच्या चार्जिंगचे पॉईंट कार्यरत असतील. जेव्हा या डब्यांची मागणी असेल तेव्हा ते सर्व सुखसोयींनी युक्त असतील.

सुरुवातीला 5 हजार डब्यांचे रूपांतरण करण्यासाठी परिमंडळ स्तरावर अशी रचना असेल:-

Sl. No. Zone

 

 

Number of

Coaches to be Converted

 

Sl. No. Zone

 

Number of

Coaches to be Converted

 

1. CR 482 9 NWR 266
2. ER 338 10 SR 473
3. ECR 208 11 SCR 486
4. ECoR 261 12 SER 329
5. NR 370 13 SECR 111

 

6 NCR 290 14 SWR 312
7. NER 216 15 WR 410
8 NFR 315 16 WCR 133

 

या रेल्वे डब्यांच्या अलगीकरण/विलगीकरण कक्ष रूपांतरणानंतर त्याच्या क्रियान्वयन आणि वापरासंबंधी रेल्वे आरोग्य सेवेचे महासंचालक विस्तृत प्रमाणित कार्यप्रणाली जारी करतील. या रूपांतरण प्रक्रियेसाठी सर्व रेल्वे परिमंडळांनी त्वरित नियोजन करावे आणि तयारी झाल्यावर तसे रेल्वे मंडळाला कळवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

येवले चहाच्या वतीने २ हजार मास्क आणि सॅनिटाईझर चे वाटप

0

पुणे- येवले अमृततुल्य संचलित एक नवीन पर्वाला सुरवात केली आहे ती म्हणजे येवले फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने करोना विषाणू च्या पार्श्वभूमी वर आस्करवाडी व भिवरी या ठिकाणी 2000 मास्क व सॅनिटाईझर चे वाटप केले.भिवरी येथील पत्रकार परिषद आयोजित रक्तदान शिबीर येथे रक्तदान केलेल्या सर्व व्यक्तींना व ग्रामस्थांना भेटून आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.
कोरोनो व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही मदत करत आहे. परंतु,सध्या या व्हायरसपासून स्वत:चा बचाव करणाऱ्या साधनांचा तुटवडा जाणवत आहे. याच हेतूने आम्ही, येवले फांऊडेशनच्या वतीने आमच्या (आस्करवाडी व भिवरी या संपुर्ण गावकरी, कोरोनाशी दोन हात करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच पोलिसांना मास्क तसेच सॅनिटायझरचे मोफत वाटप केले त्याचबरोबर माननीय आमदार संजय जगताप,येवले कुटुंबिय,आस्करवाडी व भिवरी ग्रामस्थ या मोहिमेत सहभागी होते

कोरोना – जागतिक आजाराच्या काळात मनाचे संतुलन सांभाळा

0

नवी दिल्ली, 31 मार्च 2020-जगभरात वाढत असलेले कोविड-19चे थैमान आणि त्याबद्दल दूरचित्रवाणी, समाज माध्यमे, वर्तमानपत्रे, कुटुंबातील लोक आणि मित्रमंडळी यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीमुळे सध्याचा काळ हा अतिशय खडतर झाला आहे. आपणा सर्वांनाच भीतीने ग्रासले आहे. त्यामुळे आपण अस्वस्थ होतो, आणि अत्यंत घाबरून जाऊन असा विचार करतो, बोलतो, किंवा असे कृत्य करतो, जे सर्वसाधारण परिस्थितीत कदाचित आपल्याला योग्य वाटले नसते.

लॉकडाऊनचे महत्व

लॉकडाऊनचा मूळ उद्देश, एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होणारी लागण रोखणे हा आहे, जेणेकरून आपले आणि इतरांचे संरक्षण होईल. याचा अर्थ असा की, आवश्यक वस्तूंची खरेदी करण्याव्यतिरिक्त घराबाहेर न पडणे, बाहेरच्या चकरा कमी करणे आणि खरंतर कुटुंबातल्या एकाच सुदृढ माणसाने गरज असेल तेव्हा घराबाहेर पडणे. जर घरात कुणी आजारी असेल ज्याला वैद्यकीय मादितीची गरज असेल तर आपल्या जवळच्या वैद्यकीय केंद्राची आपल्याला माहिती असलीच पाहिजे.

सामाजिक विलगीकरण हाताळणे

घरात राहणे थोडा काळ चांगले वाटू शकते, पण त्याचबरोबर काही दिवसांनी हे कंटाळवाणे आणि बंदिस्त असल्यासारखे देखील वाटू शकते. अशा स्थितीत, सकारात्मक आणि आनंदी राहण्याचे हे काही मार्ग आहेत.

1. व्यस्त राहा. एक नियमित वेळापत्रक ठरवून घ्या. घरकामात मदत करा.

2. संगीत, पुस्तके, दूरचित्रवाणीवरचे मनोरंजनात्मक कार्यक्रम, यातून नकारात्मक विचारांना दूर ठेवा. जर तुम्हाला चित्रकला, बागकाम, शिवणकाम यांसारख्या जुन्या आवडी असतील तर त्याकडे वळा. आपल्या आवडी पुन्हा एकदा वाढवा.

3. व्यवस्थित खा आणि भरपूर द्रव पदार्थ घ्या.

4. शारीरिकदृष्ट्या कार्यरत राहा. तुम्हाला सुदृढ ठेवणारे घरगुती व्यायाम करा.

5. एकमेकांची काळजी घ्या. जर तुमच्या आजूबाजूला कुणाला सल्ला, अन्न किंवा इतर आवश्यक वस्तूंची गरज असेल तर, त्यांना ते देण्यास तयार रहा.

6. वयोवृद्ध व्यक्ती गोंधळलेल्या, हरवलेल्या असू शकतात आणि त्यांना मदतीची गरज असू शकते. त्यांना त्यांची औषधे, रोजच्या गरजेच्या वस्तू आणून द्या.

7. घरात जर मुले असतील तर त्यांना घरकामात गुंतवून ठेवा. त्यांना जबाबदारी शिकवा, नवीन कौशल्ये शिकण्यास मदत करा.

वस्तुस्थितीकडे लक्ष द्या, अफवांकडे दुर्लक्ष करा

1. माहितीमध्ये ताकद आहे. विशिष्ट समस्यांबद्दल आपल्याला जितकी जास्त माहिती असते, तितकी आपली भीती कमी होते. स्वतःच्या बचावासाठी सर्वात विश्वसनीय स्रोतांकडूनच माहिती घ्या आणि त्यावरच विश्वास ठेवा.

2. आपल्या मनावर परिणाम करू शकणाऱ्या खळबळजनक बातम्या आणि समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या पोस्ट्सकडे दुर्लक्ष करा. खात्री न करता कुठलीच बातमी आणि माहिती पसरवू नका.

3. कोण आणि कसं आजारी पडलं याची जास्त चर्चा करू नका. त्यापेक्षा कोण बरं झालं त्याची माहिती घ्या.

4. स्वच्छता आणि इतरांपासून अंतर ठेवण्याच्या सल्ल्याचं काटेकोरपणे पालन करा. हे स्वतःची तसेच इतरांची देखील काळजी घेणेच आहे.

5. सर्वसामान्य सर्दी पडसे म्हणजे कोरोना संसर्ग नव्हे. कोरोनाची लक्षणं व्यवस्थित सांगितलेली आहेत. शिंकताना, खोकताना शिष्टाचार पाळा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.

6. अनेक रुग्णांमध्ये, कोरोनाच्या संसर्गाची किरकोळ लक्षणं दिसून येतात आणि त्या व्यक्तीने संसर्ग कमी होईपर्यंत सामाजिक विलगीकरण कटाक्षाने पाळायचे असे. हा काळ साधारणपणे दोन आठवड्यांचा असतो. किरकोळ लक्षणांसाठी रुग्णांना इस्पितळात दाखल करण्याची गरज नसते. केवळ ज्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, अशांनाच इस्पितळात दाखल करावे लागते. अधिकांश लोक यातून बरे होतात.

भावनिक प्रश्न हाताळणे

1. अस्वस्थ वाटत असेल तर काही मिनिटे हळूहळू श्वासोच्छवास करा. अस्वस्थ करणारे विचार प्रयत्नपूर्वक दूर ठेवा. काही शांत आणि सुंदर विचारांनी मन शांत करा.

2. अस्वस्थ वाटत असेल आणि चिडचिड होत असेल तर 10 ते 1 पर्यंत आकडे उलटे मोजा, मन दुसरीकडे वाळवा.

3. भीती वाटत असेल तर स्वतःला हे विचारून ती स्थिती हाताळा:

a. माझे कशावर नियंत्रण आहे?

b. काही तरी वाईटच होणार आहे या विचाराने मी उगाचच काळजी करत आहे का?

c. आधी जेव्हा मी तणावात होतो, तेव्हा मी ते कसे हाताळले होते?

d. स्वतःला सावरायला आणि सकारात्मक ठेवायला मी काय काय करू शकतो?

4. दुःखी आणि एकटे वाटणे देखील सामन्य आहे. इतरांशी संपर्कात राहा. कुटुंब आणि मित्रांशी संपर्कात राहिल्याने मोठी मदत होते. ज्यांना आपण भेटलो नाहीत अशांना फोन करून आश्चर्याचा धक्का द्या. चांगल्या घटनांची चर्चा करा, समान आवडी निवडींची चर्चा करा, पदार्थांच्या कृती एकमेकांना सांगा, गाणी आणि संगीत शेयर करा.

5. जर प्रयत्न करूनही या भावना मनातून अनेक दिवस जात नसतील, तर त्याविषयी कुणाशी तरी बोला. जर परिस्थिती आणखी बिघडली तर त्या व्यक्तीला हतबल, निराश आणि जीवन व्यर्थ वाटू शकते. असे झाल्यास मानसोपचार तज्ञाच्या मदतीसाठी (080-46110007) या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करा किंवा आपल्याडॉक्टरांशी संपर्क करा.

काय करू नये

1. तंबाखू, दारू आणि इतर अमली पदार्थांचे सेवन टाळा. मानसिक स्थितीवर उपाय म्हणून किंवा कंटाळा घालविण्यासाठी तंबाखू, दारू किंवा इतर अमली पदार्थांचे सेवन शारीरिक आणि मानसिक स्वस्थ बिघडवून रोग प्रतिकार शक्ती कमी करू शकते. ह्या पदार्थांचे व्यसन असणाऱ्या व्यक्तींना तणावाच्या आणि उदास वाटण्याच्या परिस्थितीत तज्ञांची मदत लागू शकते.

2. कोविड संसर्ग झालेल्या व्यक्तींना वाळीत टाकू नका. तुम्हाला संसर्ग होऊ नये म्हणून जसे सामाजिक विलगीकरण गरजेचे आहे, त्याचप्रमाणे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. जर आपल्या परिचयात कुणाला संसर्ग झाला असण्याची शक्यता असेल तर त्यांना खबरदारीचे उपाय आणि गरज पडल्यास वैद्यकीय मदत कशी मिळवावी याबद्दल माहिती द्या.

3. जर तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झालाच, तर लक्षात ठेवा, बहुतांश लोक यातून बरे होतात. घाबरून जाऊ नका. स्वतःला विलग करा आणि डॉक्टरांनी दिलेली औषधे घ्या.

बरे झाल्यावर मानसिक समस्या

1. कोविड संसर्गातून बरे होण्याची भावना सुंदर असली तरी, पूर्ण बरे झाल्यावर समाजात पुन्हा जाताना तणाव वाटू शकतो. आपले कुटुंबीय आणि प्रिय व्यक्ती आजारी पडू शकतील अशी भीती आपल्याला वाटू शकते.

2. ज्या लोकांना या आजाराबद्दल माहिती नाही, ते तुमच्यापासून अंतर ठेवू शकतात. हे अतिशय तणावपूर्ण आणि एकटे पाडणारे असू शकते.

3. काही काम किंवा इतरांची मदत न करू शकल्याबद्दल तुम्हाला अपराधी वाटू शकते. यामुळे नैराश्य, असहायता आणि चिडचिड होऊ शकते.

4. ह्या विचारांचा सामना करण्यासाठी वर सांगितलेले उपाय करावे. कोविड संसर्गातून बरे होणे शक्य असल्याचा आपला सकारात्मक अनुभव इतरांना सांगा.

आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तींना असलेल्या मानसिक समस्या ओळखा

ज्याप्रमाणे आपण आपल्या मानसिक समस्या ओळखतो, त्याप्रमाणेच आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तींना भेडसावत असलेल्या अशा समस्यांविषयी संवेदनशील राहणे गरजेचे आहे. या समस्या खालील प्रमाणे असू शकतात:

1. झोपेच्या पद्धतीत बदल.

2. झोप न लागणे आणि एकाग्रता न होणे

3. आरोग्याच्या समस्या वाढणे

4. दारू, तंबाखू किंवा अमली पदार्थांचे सेवन वाढणे

त्यांना मदतीचा हात द्या. जर समस्या सुटली नाही तर (080-46110007) या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करा किंवा आपल्या डॉक्टरांचा किंवा मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्या.

मानसिक आजार असलेल्या व्यक्ती

ज्या व्यक्ती आधीपासून मानसिक आजाराने ग्रस्त आहेत, त्यांना सध्याच्या कोविड आजार आणि स्वयं अलगीकरणाच्या पार्श्वभूमीवर नवनव्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

1. त्यांनाही इतर लोकांसारखीच भीती किंवा मानसिक तणावाची भावना त्रास देऊ शकते, त्यांच्या आधीच्या मानसिक आजाराच्या पार्श्वभूमीवर त्यांना अधिक ताण पडण्याची शक्यता असते.

2. सामाजिक अलगीकरणामुळे त्यांना, वेगळे ठेवल्याची भावना वाढून चिडचिडेपणा अथवा त्रागा होऊ शकतो.

3. त्यांना औषधे आणि समुपदेशनाची मदत सहज उपलब्ध न होण्याची शक्यता असते.

त्यामुळे अशा मानसिक रुग्णांना या काळात मदत व आधार देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांचे कुटुंबिय आणि इतर लोकांनी ही काळजी घ्यायला हवी. आरोग्य विषयक हेल्पलाईनमधूनही त्यांना आधार दिला जाऊ शकेल, त्याशिवाय त्यांची नियमित औषधे त्यांना दिले जातील याचीही काळजी घ्यायची आहे.

लक्षात ठेवा, उत्तम मानसिक आरोग्यामुळेच या संकटकाळात खंबीर राहूनच आपण ही लढाई जिंकू शकतो!

पुणे विभागामध्ये 3155 व्यक्तींचा होम क्वारंटाईन पूर्ण ; 4591 व्यक्ती अजूनही क्वारंटाईन…

0

पुणे विभागीय आयुक्तांनी दिलेल्या अधिकृत माहिती नुसार …

1) पुणे विभागामध्ये कोरोना सांर्सगिक रुग्णसंख्या आज दि.30/03/2020 अखेर एकूण 72 आहे. (पुणे 31, पिंपरी चिंचवड 12, सातारा 2, सांगली 25 आणि कोल्हापूर 2).
तपासणीसाठी पाठविलेले एकूण नमुने 1465 होते. त्यापैकी 1379 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 84 चे अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालापैकी 1278 नमुने निगेटीव्ह आहेत व 72 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत 16 रुग्णांना बरे झाल्यामूळे रुग्णालया मधून सोडण्यात आलेले आहे. विभागामधील 7746 प्रवाशापैकी 4591 प्रवाशांबाबत फ़ॉलोअप सुरू असून3 155 प्रवाशांबाबत पूर्ण झालेला आहे, म्हणजेच 3155 व्यक्तींचा Home Quarantine पूर्ण झालेला असून 4591 व्यक्ती अजूनही Quarantine आहेत. आजपर्यंत 861199 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4067282 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 296 व्यक्तीना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

2) दि.३०/०३/२०२० रोजी कोरोना बाधीत मयत रुग्णाबाबत माहीती :- दि.३०/०३/२०२० रोजी पुणे शहरातील ५२ वय वर्षे असणा-या एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये मृत्य झाला आहे. सदर रुग्णास मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. सदर रुग्णाने दि. ११ ते १३ मार्च दरम्यान ठाणे येथे प्रवास केला असून सदर प्रवासादरम्यान त्यास कोरोना विषाणूची बाधा झाल्याची शक्यता आहे. सदर रुग्णास दि.१८/०३/२०२० पासून ताप व कोरडा खोकला असल्याचे जाणवले. त्यानंतर त्याने दि.२०/०३/२०२० पासून ‍ दि.२२/०३/२०२० पर्यंत पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. परंतु सदर रुग्ण कोरोनासदृश्य लक्षणे दिसून आलेने त्यांना दि.२२/०३/२०२० रोजी नायडू हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. यावेळी त्यांची swab चाचणी घेण्यात आली व पुढील उपचारा करीता सुपर स्पेशालीटी दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर दि.२२/०३/२०२० ते दि.३०/०३/२०२० या कालावधीत सदर रुग्ण दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटलमध्येच उपचार घेत होता.दि.२३/०३/२०२० रोजी त्यांची पुन्हा swabतपासणी NIV मार्फत करण्यात आली होती. दि.२३/०३/२०२० रोजी त्यांचा कोरोना Positive असल्याचा अहवाल प्राप्त झाला. यानूसार पुढील उपचार करण्यात आले. हया कालावधीत त्याचे बरेच अवयव काम करेनासे झाले (Multiple Organs Failure). त्यात सदर रुग्णाचा मृत्यू दि.३०/०३/२०२० रोजी दुपारी १२.३० वा. झाला आहे. सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुंटूबीयांसहीत सुमारे ३४ लोकांचे द्रवाचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

3) विभागातील शासकीय रुग्णालयामध्ये एकूण PPE (Personal Protective Equipment) २२८२, N ९५ Mask २९६००, Triple Layer Mask १९३३६५ व २२१३ वेटीलेंटर्स उपलब्ध आहे. तसेच सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांचेकडील माहितीनुसार 1438 PPE (Personal Protective Equipment), N ९५ Mask २३६७६ व २ ply & ३ ply चे १९४७२४इतके mask उपलब्ध आहेत. तसेच Sanitizer१,३५,१३८ एवढे उपलब्ध आहेत.

4) विभागात अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा साठा – पुणे विभागातील शासकीय धान्य गोदामात 19 हजार 975 मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध आहे. मार्केट मध्ये विभागात 9 हजार 330 क्विंटल अन्नधान्याची तर 18 हजार 330 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली आहे. पुणे जिल्ह्यात 4 हजार 473 मेट्रिक टन धान्यसाठा, सातारा जिल्ह्यात 4 हजार 88 मेट्रिक टन, सोलापूर जिल्ह्यात 3 हजार 354 मेट्रिक टन, सांगली जिल्ह्यात 5 हजार 463 मेट्रिक टन, कोल्हापूर जिल्ह्यात 2 हजार 582 मेट्रिक टन धान्यसाठयाची आवक झाली आहे. विभागात 18 हजार 330 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली आहे. यात पुणे जिल्ह्यात 12 हजार 458 क्विंटल भाजीपाला, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 315 क्विंटल, कोल्हापूर जिल्ह्यात 1हजार 204 क्विंटल, सांगली जिल्ह्यात 1 हजार 848 क्विंटल, सातारा जिल्ह्यात 1 हजार 505 क्विंटल भाजीपाला आवक करण्यात आला आहे. विभागात 3 हजार 842 क्विंटल फळांची तसेच 11 हजार 122 क्विंटल कांदा- बटाट्याची आवक झाली आहे. विभागात 18 हजार 535 क्विंटल अन्नधान्य मार्केटमध्ये उपलब्ध आहे. विभागात दि.30/03/2020 रोजी 89.14 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.32 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले असून उर्वरित दूध सुट्ट्या स्वरुपात वितरित करण्यात आले आहे.
तसेच अन्नधान्याच्या उपलब्धतेबाबत काही अडचण भासल्यास संबधीत जिल्हयातील खालील अधीका-यांशी त्यांच्या नावासमोर दर्शवीलेल्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
पुणे जिल्हा : 1) श्री.भानूदास गायकवाड,‍ जिल्हा पुरवठा अधीकारी – 020-26061013
2) श्रीमती अस्मीता मोरे, अन्नधान्य वितरण अधीकारी – 020-26123743

सातारा जिल्हा : 1) श्रीमती स्नेहल किसवे,‍ जिल्हा पुरवठा अधीकारी – 02162-234840

सांगली जिल्हा : 1) श्रीमती वसुधंरा बारवे,‍ जिल्हा पुरवठा अधीकारी – 0233-2600512

कोल्हापूर जिल्हा :1) श्री.दत्तात्रय कवीतके, जिल्हा पुरवठा अधीकारी – 0231-265579

सोलापूर जिल्हा : 1) श्री.उत्तम पाटील, जिल्हा पुरवठा अधीकारी – 0217-2731003/8

5) पुणे शहरातील सर्व खाजगी वैदयकीय व्यावसायिकांना आवाहन:- पुणे शहरातील सर्व खाजगी वैदयकीय व्यावसायिकांना आवाहन करण्यात येतेकी, आपण कोरोना सदृश्य परिस्थीतीत आपले दवाखाने सुरु ठेवावेत व आपल्या दवाखान्याकडे येणा-या रुग्णांना (SARI) सर्दी,खोकला ,घसादुखी या आजाराची लक्षणे असल्यास त्यांना कै.द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल, बोपोडी कार्यन्वित करण्यात आले असून येथे पाठविण्याची व्यवस्था करावी. सदर हॉस्पिटलकडे पहिल्या व दुस-या मजल्यावर असे एकुण 25 बेड चे प्रीआयसोलेशन सेंटर कार्यन्वीत करण्यात आले आहे. त्या अनुंषगाने सदर हॉस्पिटलकडे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आलेले असून तपासणीची व औषधोपचाराची सोय करण्यात आलेली आहे. तसेच सदर हॉस्पिटलकडे आलेल्या कोरोना संशयित रुग्णाचे अहवाल पॉजिटिव्ह आल्यास सदर रुग्णाला शासनाच्या सर्व प्रोटोकॉलनूसार रुग्णवाहिकेतून पुणेमहानगरपालिकेच्या डॉ.नायडू सांसर्गिक रोगरुग्णालय येथे दाखल करण्यात येईल. यास्तव कै. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल, बोपोडी येथे खालील क्रमांकावर संपर्क साधावा.दुरध्वनीक्रमांक020-25818323
डॉ.स्वाती बढीये (निवासी वैद्यकीय अधिकारी, कै.द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल, बोपोडी 880666874 )
याच प्रमाणे पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्रामध्ये महापालिकेच्या अथवा इतर खाजगी दवाखान्यांमध्ये जर कोरोनाची लक्षणे असलेला रुग्ण आढळून आला तर अशा रुग्णास यशवंतराव चव्हाण हॉस्पीटल अथवा भोसरी येथील नुतन भोसरी हॉस्पीटलमध्ये (कोरोनाबाधित रुग्णांसाठी विशेष व्यवस्था असलेले) दाखल करून त्यावर पुढील उपचार करण्यात येतील. यासाठी नुतन भोसरी हॉस्पिटलच्या या क्रमांकावर संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक 020-67331307.