Home Blog Page 2627

पंतप्रधान जनधन योजनेतील महिला खातेदारांना ‘बँक ऑफ बडोदा’तर्फे सहाय्य

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत
दरमहा 500 रुपयांचे 3 महिन्यांसाठी सानुग्रह अनुदान

मुंबई, 3 एप्रिल :पंतप्रधान जनधन योजनेतील (पीएमजेडीवाय) महिला खातेदारांच्या खात्यात पुढील तीन महिन्यांच्या काळात प्रत्येकी 500 रुपये जमा केले जातील, असे सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँक ऑफ बडोदाने म्हटले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी गेल्या 26 मार्च रोजी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान म्हणून ही रक्कम जाहीर केली आहे.

हे पैसे वैयक्तिक बँक खातेदारांना मिळतील. खातेधारकांना जवळच्या शाखेतून किंवा व्यवसाय प्रतिनिधींकडून हे पैसे काढता येतील. ते कधी काढायचे याबाबतचे संदेश त्यांना एसएमएस सुविधेतून पाठविण्यात येतील.

‘बँक ऑफ बडोदा’चे कार्यकारी संचालक विक्रमादित्यसिंग खिची म्हणाले, “पंतप्रधान जनधन योजनेतील महिला खातेदार या बहुतांशी दारिद्र्यरेषेखालील व तळागाळातील आहेत. त्यांना एटीएम वापरणे सोयीस्कर नसेल, हे लक्षात घेऊन बँकेने व्यावसायिक प्रतिनिधींना या कामी नेमले आहे. सध्याच्या अडचणीच्या काळात या महिलांना हे पैसे मिळणे महत्त्वाचे आहे. कोविड-19 विषाणुच्या साथीमुळे या महिलांना बॅंकेतही जाणे शक्य नसल्याने,या लाभार्थ्यांना त्यांच्या सोईची आणि सुरक्षिततेची हमी देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. या खातेदारांना वेळेत, विनाव्यत्यय व सुरळीतपणे पैसे काढता यावेत, यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध करून ठेवावेत, अशा सूचना आमच्या सर्व शाखा व व्यवसाय प्रतिनिधींना देण्यात आलेल्या आहेत.”

सध्याच्या टाळेबंदीच्या काळात सरकारने दिलेल्या आदेशानुसार आणि शाखांमध्ये सामाजिक अंतर कायम ठेवण्याच्या दृष्टीने सर्व खबरदारीच्या उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. पैसे काढण्यासाठी जनधन योजनेतील खातेदारांची गर्दी होऊ नये म्हणून वित्त मंत्रालयाने सुचविल्यानुसार, बँकेने खातेदारांना पैसे देण्याचे एक वेळापत्रक तयार केले आहे.

पंतप्रधान जनधन योजनेतील महिला लाभार्थ्यांचे पैसे काढण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे –

या वेळापत्रकाचे पालन करण्यास एखाद्या खातेदाराला जमले नाही, तर तिने 9 एप्रिलनंतर बॅंकेची शाखा, व्यवसाय प्रतिनिधी किंवा एटीएम येथे संपर्क साधावा, असे आवाहन बॅंकेने केले आहे.

प्रत्येक गोष्टीचा ,संकटाचाही मोदी इव्हेंट, हा मूर्खपणा ! (व्हिडीओ)

0

मुंबई. संकटाच्या काळातही यांना इव्हेंट करायचे आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पीएम नरेंद्र मोदींच्या शुक्रवारच्या जनसंदेशावर  संताप व्यक्त केला. देशात सर्वत्र कोरोनाची भीती पसरली असताना मोदींनी काय बोलणे अपेक्षित होते आणि मोदी काय बोलत आहेत अशी टीका करताना जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले. त्यामध्ये नागिन या जुन्या हिंदी चित्रपटाचा फोटो देत त्यांनी कॅप्शनमध्ये मोदींवर संताप व्यक्त केला. देशाला इतकेही मूर्खात काढू नका असे आव्हाड म्हणाले आहेत.जितेंद्र आव्हाड ट्विट करून म्हणाले, “भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली,एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत. कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही. असे भाषण मोदींकडून अपेक्षित होते. तर त्यांनी या संकटाचाही इव्हेंट करायचं ठरवलं. म्हणे… अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका.”

नेमके आव्हाड यांनी काय म्हटले आहे हे त्यांच्याच शब्दात ऐका ….

उद्धव ठाकरेंची अडचण; 28 मेपर्यंत आमदार होणे आ‌वश्यक

0
  • निवडणूक जाहीर झाली नाही तर पुन्हा घ्यावी लागेल शपथ 
  • येत्या 24 एप्रिलला विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत

मुंबई . लॉकडाऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी अडचण ठरण्याची शक्यता आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले उद्धव हे सध्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत. घटनेच्या कलम १६४ (४) नुसार त्यांना पदावर राहण्यासाठी मुख्यमंत्री झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत िवधानसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य होणे आ‌वश्यक आहे. ठाकरे यांनी २८ नोव्हेंबरला शपथ घेतली होती. त्यानुसार त्यांना २८ मेपर्यंत आमदार होणे आ‌वश्यक आहे. मात्र कोरोनामुळे राजकीय हालचाली थंडावल्या आहेत. मार्चमधील प्रस्तावित ग्रामपंचायत निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

येत्या २४ एप्रिलला विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होत आहेत. त्या दृष्टीने ठाकरे यांनी विधान परिषद सदस्य बनण्याची तयारी केली होती. मात्र निवडणूक आयोगाने अद्याप याची तारीख जाहीर केलेली नाही. आयोगाने याआधी राज्यसभेच्या निवडणुकाही स्थगित केल्या आहेत. याचीही तारीख नंतर घोषित होणार आहे. यामुळे अडचणीत भर पडली.

राज्याचे मुख्य सचिव अनंत कळसे यांनी सांगितले की, मेपर्यंत निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत तर ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळाला राजीनामा देऊन पुन्हा शपथ घ्यावी लागेल.

असंघटित कामगारांची माहिती पाठवा:गृहनिर्माण महासंघाचे आवाहन

0
पुणे :कोरोना  लॉकडाऊन पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील असंघटित कामगारांची माहिती श्रम मंत्रालय व जिल्हा उपनिबंधकांनी मागविली असल्याचे पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
स्वयंपाक, स्वच्छता, झाडण काम करणारे, ड्रायव्हर या कामगारांना ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन ‘या पेन्शन योजनेमधून आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
तरी गृहनिर्माण सोसायट्यांमधील व घरातील अशा कामगारांची माहिती ई-मेलवर ४ एप्रिलपर्यंत पाठविण्याचे आवाहन त्यांनी सोसायट्यांचे अध्यक्ष व सचिवांना केले आहे.
ई-मेल पुढीलप्रमाणे आहेत :
 दरम्यान, गृहनिर्माण संस्थांनी आपत्कालीन परिस्थितीत पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आर्थिक सहाय्य करावे, असेही आवाहन पटवर्धन यांनी केले आहे.
लॉकडाऊनमुळे पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे कार्यालय व सहकार दरबार  उपक्रम १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे ही माहिती ईमेल वर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रविवार ५ एप्रिलला रात्री ९ वाजता लाईट बंद करून दिवे उजळा- पीएम मोदी (व्हिडीओ)

0

“देशव्यापी लॉकडाउनला आज ९ दिवस होत आहेत. आजपर्यंत ज्या प्रकारे लोकांनी सहकार्य केलं ते उल्लेखनीय आहे. २२ मार्च रोजी सर्वांनी करोनाविरुद्ध लढणाऱ्यांचे आभार मानले त्याची दखल सर्व देशांनी घेतली आहे. या लोकांनी संकट काळात सामूहिक शक्तीचं दर्शन घडवलं आहे. देश एक होऊन करोनाविरुद्ध लढू शकतो हे आपण दाखवून दिलं आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना म्हटलं. तसंच यावेळी त्यांनी देशातील जनतेकडे ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटं देण्याचं आवाहनही केलं.

“देशातील कोट्यवधी लोक आज घरात आहेत. ते विचार करत असतील की एवढी मोठी लढाई आपण एकटं कसं लढू. अजून असे लॉकडाउनचे किती दिवस असतील. आज लॉकडाउन असलं तरी कोणीही एकटं नाही. १३० कोटी लोकांची सामूहिक शक्ती एकत्र आहे. वेळोवेळी या सामूहिक शक्तीच्या भव्यतेचं दर्शन घडवणं आवश्यक आहे. या महामारीमुळे पसरलेल्या अंधारातून आपल्याला प्रकाशाकडे जायचं आहे. ज्यांच्यावर जास्त संकट आलंय अशा गरीब बांधवांना आपल्याला सोबत पुढे घेऊन जायचं आहे. आपल्याला करोना संकटाला हरवायचं आहे,” असं मोदी यावेळी म्हणाले.

“१३० कोटी लोकांच्या महासंकल्पाला आपल्याला आता पुढे घेऊन जायचं आहे. मला ५ एप्रिल रात्री तुमच्या सर्वांची नऊ मिनिटं हवी आहेत. घरातील सर्व लाईट बंद करून घराच्या दरवाज्यावर उभं राहून ९ मिनिटांसाठी मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅशलाईट सुरू करा. त्यावेळी घरातील सर्व लाईट बंद केल्यानंतर जेव्हा हा प्रकाश उजळेल तेव्हा आपण एकाच ध्येयानं लढत आहोत हे सिद्ध होईल. त्यावेळी प्रत्येकानं आपल्या मनात संकल्प करा की आपण एकटे नाही आहोत,” असंही मोदी यावेळी म्हणाले. “परंतु यावेळी कोणीही एकत्र जमू नये. तसंच सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मण रेषाही आपल्याला तोडायची नाही. करोनाची साखळी तोडण्याचा हा रामबाण उपाय आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

गॅस सिलेंडरचा काळा बाजार; 33 हजाराचे सिलेंडर जप्त

0

पुणे : शहरात संचारबंदी सुरू असताना सिलेंडरचा बेकायदेशीररीत्या साठा करुन ग्राहकांना जादा दराने सिलेंडरची विक्री करण्यात येत असल्याप्रकरणी  गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने 33 हजार रुपयांचे सिलेंडर जप्त करून विनापरवाना विक्री करणाऱ्याविरुद्ध अत्यावश्‍यक वस्तू कायद्यान्वये चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

अमित सुगंधचंद गोयल (वय 30, रा.कोडियाड सोसायटी, सुंदराबाई शाळेजवळ, चंदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या गॅस एजन्सी चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी येथील सागर पार्क, लेन नंबर दोन येथे एका गॅस एजन्सी धारकाकडून अत्यावश्‍यक वस्तु कायद्याचा भंग करून 796 रुपये किंमतीचा घरगुती सिलेंडर ग्राहकांना एक हजार रुपयांना विक्री करीत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी अब्दुल करीम सय्यद यांना मिळाली.

त्यानुसार, पोलिस उपनिरीक्षक विजय झंजाड यांनी बनावट ग्राहक पाठवून सिलेंडर खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गोयल हा ग्राहकांना मुळ किंमतीऐवजी जादा दराने ग्राहकांना सिलेंडर विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे परवाना विचारण्यात आला. त्यावेळी त्याच्याकडे गॅस सिलेंडर विक्रीचा कोणत्याही कंपनीचा अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याच्याकडून विविध गॅस कंपन्यांचे भरलेले 16 गॅस सिलेंडर, रोकड, 48 ग्राहक कार्ड असा एकूण 33 हजार 733 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, खडकी परिसरात याच पद्धतीने बेकायदा गॅस सिलेंडर विक्री करणाऱ्या गॅस एजन्सी चालक, मालक व कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा याच प्रकारची घटना घडली. पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय झंजाड, विवेक सिसाळ, कर्मचारी सुरेंद्र साबळे,संदिप मुंढे, दिपक चव्हाण,मोहन वाळके,आबा गावडे अन्न पुरवाठा व वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांनी केली.

राज्यात कोरोना बाधित नवीन ८८ रुग्णांची नोंद, राज्यातील एकूण ४२३ रुग्ण, ४२ रुग्णांना घरी सोडले

0

मुंबई, दि.२: राज्यात आज कोरोना बाधित ८८ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील ५४ रुग्ण मुंबई येथील असून ९ जण अहमदनगरचे ,११ पुणे येथील आहेत. याशिवाय ९ जण मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील आहेत. २  रुग्ण औरंगाबादचे तर  प्रत्येकी १ रुग्ण सातारा, उस्मानाबाद आणि बुलढाण्याचा आहे. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ४२३ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज राज्यात ४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. या ४ रुग्णांचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत –

1)   ६१ वर्षे , पुरुष – हा रुग्ण दिनांक ३१ मार्च रोजी नायर रुग्णालयात भरती झाला. त्याला रक्ताचा कर्करोग होता. त्याचा काल दुपारी मृत्यू झाला.

2)   ५८ वर्षे पुरुष – मूत्रपिंडाचा जुनाट आजार असणारा हा रुग्ण २९ तारखेला भरती झाला होता. त्याला उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. काल संध्याकाळी त्याचा सायन हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

3)   ५८ वर्षे पुरुष – हा रुग्ण २६ मार्च रोजी एका खाजगी रुग्णालयात भरती झाला. त्याचा काल दुपारी मृत्यू झाला.

4)   ६३ वर्षे,  पुरुष या रुग्णाचा मृत्यू कस्तुरबा रुग्णालयात आज संध्याकाळी झाला

कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २० झाली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील :-

मुंबई                                २३५

पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) ६१

सांगली                                 २५

मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा      ४५

नागपूर                                  १६

यवतमाळ                           ४

अहमदनगर                        १७

बुलढाणा                                      ५

सातारा, औरंगाबाद प्रत्येकी   ३

कोल्हापूर                            २

रत्नागिरी,  सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक, उस्मानाबाद प्रत्येकी                              १

इतर राज्य – गुजरात             १

एकूण   ४२३ त्यापैकी ४२  जणांना घरी सोडले तर   २० जणांचा मृत्यू

राज्यात आज एकूण ६४८ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत.  आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १० हजार ८७३  नमुन्यांपैकी १० हजार २८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४२३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ४२ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८ हजार २४४  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २१३८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता, त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत प्राप्त १०६२ व्यक्तींच्या यादीपैकी ८९० व्यक्तींशी संपर्क झाला असून त्यापैकी ५७६ जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ४ जण कोरोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई मनपा क्षेत्रात यासाठी २९२ टीम काम करत आहेत तर पुणे महानगरपालिका क्षेत्रात ३७३ टीम कार्यरत आहेत. नागपूर मनपा मध्ये २१० टीम घरोघर सर्वेक्षणाचे काम करत आहेत. अशा २ हजार ३३२ टीम संपूर्ण राज्यात काम करत आहेत

कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या :चिंतेची बाब -महापौर

0

पुणे- पुण्यात वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये झालेला प्रादुर्भाव पाहता पुण्यातील हा साथीचा आजार आता चिंतेचा आणि मोठ्या आव्हानाचा विषय बनला असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज स्पष्ट केले आहे.

खाजगी संस्था व कंपन्यांच्या माध्यमातून आयसोलेशन हॉस्पिटल व क्वारंटाइन सुविधा सुरु करणार-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर (व्हिडीओ)

0

पुणे, दि. 2: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या खाजगी संस्था व कंपन्यांच्या माध्यमातून आयसोलेशन हॉस्पिटल व क्वारंटाइन सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे भागातील म्हाडातर्फे बांधण्यात आलेल्या सदनिकाची क्वारंटाइन सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने डॉ. म्हैसेकर यांनी पाहणी केली.
यावेळी पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, खेडचे प्रांतधिकारी संजय तेली, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, सिम्बायसीस हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय नटराजन, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन जाधव आदि उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर यांनी सिम्बायसीस येथील प्रमुख डॉक्टरांशी चर्चा करुन हॉस्पिटल मधील आयसोलेशन व क्वारंटाइन सुविधाबाबत पाहणी करुन उपलब्ध सुविधेबाबत येथील चर्चा केली.
पुणे जिल्ह्यात कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून आयसीयु व आयसोलेशन बेडची तयारी करण्यात येत आहे. त्यादृष्टीने सिम्बायसीस येथे आयसोलेशन बेडची सोय करण्यात येणार आहे. तसेच काही खाजगी कंपन्यानीही क्वारंटाइन सुविधेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यादृष्‍टीने काही खाजगी कंपन्यांच्या सुविधेचे पाहणी करुन माहिती घेण्यात येत असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.

1 कोटी पेक्षा अधिक नाईनफाईव्ह मास्क, राज्यांना देण्यात आले आहेत- आरोग्य मंत्रालय

0

नवी दिल्ली, 2 एप्रिल 2020-गेल्या 24 तासात आणखी 328 जणांना लागण झाली असून एकूण 1965 बाधित आहेत. एकूण 50 जणांचा मृत्यू, तर गेल्या 24 तासात 12 जणांचा मृत्यू झाला. तर  151 जण COVID2019 मधून बरे झाले अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत संयुक्त सचिव श्री लव अगरवाल यांनी दिली.

यावेळी COVID2019 चा संसर्ग होण्याचा धोका जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारकडून मोबाईल App जारी करण्यात आले.

श्री अगरवाल यांनी या परिषदेत खालील माहिती दिली.

  • COVID2019 चा संसर्ग होण्याचा धोका जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारकडून मोबाईल App जारी. ब्लुटूथ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यावर आधारित हे ऍप आहे.
  • सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी, लॉकडाऊनचे काटेकोर पालन करण्याचे गृह सचिवांचे निर्देश, सर्वोच्च न्यायालयाच्या 31 मार्च 2020 च्या आदेशातही यावर भर
  • लॉकडाऊनचा भंग हा आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत दंडनीय अपराध. लॉकडाऊनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी, लॉक डाऊनच्या तरतुदींचा व्यापक प्रसार करावा – गृह मंत्रालय
  • Covid2019 संदर्भातल्या शंकांचे राज्य स्तरावर निरसन करण्यासाठी, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनीही, अचूक आणि विश्वसनिय माहितीसाठी अशीच यंत्रणा उभारण्याची गृह सचिवांची, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विनंती. त्यानुसार माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत कोविड-19 बाबत सत्यता पडताळणी पथक कार्यरत
  • तबलीग जमातीच्या कार्यक्रमाशी संबंधित सुमारे 9000 लोकांना शोधून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये 1306 विदेशी नागरिक. तबलीग जमात कार्यक्रमाशी संबंधित लोकांच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू. अशा 400 व्यक्ती आढळल्या असून अतिरिक्त तपासणी सुरू आहे.  त्यातून आणखी काही व्यक्ती पॉझिटिव्ह  आढळण्याची शक्यता.
  • अपप्रचार किंवा दिशाभूल करणाऱ्या  बातम्या रोखण्यासाठी,सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गृह मंत्रालयाने राज्यांना लिहिले पत्र, आरोग्य मंत्रालयाने ही तांत्रिक बाबींवर अचूक  माहिती देण्यासाठी खालील ईमेल आयडी सुरु केला technicalquery.covid19@gov.in
  • डायलिसिस सुरू असलेल्या किडनी रुग्णांनी, खबरदारी आणि काळजी घेण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत, आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्वे जारी
  • वृद्ध आणि लहान मुले यांच्यामध्ये निर्माण झालेला ताण आणि चिंता  कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्वे जारी- संयुक्त सचिव
  • लॉकडाऊन सुरू झाल्यापासून फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 352 रेल्वे डब्यातून 9.86 लाख मेट्रिक टन अन्नधान्य वाहतूक केली आहे.
  • राष्ट्रीय  अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत तसेच पीएम गरीब कल्याण योजनेअंतर्गत अन्न धान्याची अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठीही एफसीआय सज्ज-
  • पंतप्रधान @narendramodi यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद.  #COVID2019 चा मुकाबला करण्यासाठी केल्या सूचना. निदान तपासणी,रुग्णांचा आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध, विलगीकरण यावर भर हवा अशी सूचना केली.
  • जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापन गट निर्माण करण्याच्या आवश्यकतेबाबत, आरोग्य सेवा क्षेत्रातल्या मनुष्यबळाचे अप-ग्रेडेशन, ऑन लाईन प्रशिक्षण, स्वयंसेवक यांचा उपयोग याबाबत  पंतप्रधानांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
  • एकजूट हे आपले बळ, COVID2019 विरुद्धची लढाई आत्ता सुरू झाली आहे. प्रत्येक नागरिक, सरकारी कर्मचारी यांनी एखाद्या योध्याप्रमाणे हा लढा देण्याची गरज. सर्व धर्म, पंथाच्या लोकांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज, पंतप्रधानांनी वरील व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये व्यक्त केली.
  • मुंबईतल्या धारावी परिसरातल्या पॉझिटिव्ह रुग्ण आणि मृत्यू बाबत माहिती देताना श्री अगरवाल म्हणाले, “कुटुंबीय आणि इमारतीतील रहिवाश्यांची तपासणी करण्यात येत आहे, संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आणि तपासणी या कार्यात 4000 आरोग्य कार्यकर्ते गुंतलेले आहेत. नियमानुसार पावले उचलण्यात येत आहेत”.
  • COVID2019 च्या लढ्यात आघाडीवर राहून काम करणाऱ्या आपल्या डॉक्टर आणि इतर वैद्यकीय व्यावसायिकांसमवेत आदराने वागण्याची प्रत्येकाला आमची पुन्हा एकदा विनंती. त्यांच्याप्रती कृतज्ञता राखा, भेदभाव करू नका.
  • 1.5 कोटी हुन अधिक PPE साठी आम्ही मागणी नोंदवली आहे,पुरवठा सुरू झाला आहे, परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही राज्यांना पीपीई पुरवत आहोत. देशांतर्गत उत्पादक निश्चित करण्यात आले असून पुरवठा सुरू झाला आहे आणि 1 कोटी पेक्षा अधिक  N95 मास्क, राज्यांना देण्यात आले आहेत-

Other updates:

  • राष्ट्रीय छात्र सेनेने (एनसीसी) ‘एनसीसी योगदान अभियान’ अंतर्गत आपल्या कॅडेटच्या सेवांचा विस्तार करत कोविड-19 विरुद्धच्या राष्ट्रव्यापी अभियानात नागरी प्रशासनाला मदतीचा हात पुढे केला आहे. साथीच्या आजारा विरुद्धच्या लढाईत सहभागी असलेल्या विविध संस्थाच्या कार्यात आणि त्यांच्या प्रयत्नांमध्ये सहकार्य करण्यासाठी एनसीसीने त्यांच्या कॅडेट्सच्या तात्पुरत्या रोजगारासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
  • कोविड -19 महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानांचा सामना राष्ट्र करीत असताना, संरक्षण मंत्रालयाच्या (एएसएम) माजी सैनिक कल्याण विभागाने (ईएसडब्ल्यू),आवश्यक तेथे मनुष्यबळ वाढवून राज्य आणि जिल्हा प्रशासनास मदत करण्यासाठी माजी सैनिकांची मदत घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एखादा संपर्क क्रमांक शोधणे, सामुदायिक पाळत ठेवणे, विलगीकरण सुविधांचे व्यवस्थापन किंवा त्यांना नेमून दिलेले कोणतेही सार्वजनिक उपक्रम राबविण्यात राज्य आणि जिल्हा प्रशासनास मदत करणे अशी कामे ते करतील
  • माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका रिट याचिकेवर सुनावणी करताना, खोट्या बातम्यांमुळे स्थलांतरित मजुरांमध्ये भीती निर्माण होऊन ते मोठ्या संख्येने शहर सोडून जात असल्याची  गंभीर दखल घेतली आहे. यामुळे या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
  • कोविड -19 लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर  थर्ड पार्टी मोटार विमा आणि आरोग्य पॉलिसी धारकांना केंद्रसरकारने  दिलासा दिला आहे. 25 मार्च 2020 ते 14 एप्रिल 2020 या काळात नुतनीकरण तारीख असलेल्या आरोग्य आणि मोटार विमा पॉलिसीसाठी नुतनीकरणाच्या तारखेला 21 एप्रिल 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
  • केंद्र सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने मंगळवारी घरी मास्क बनवण्याविषयी पुस्तिका जारी केली आहे. यामध्ये  स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तीना स्वतः मास्क बनवण्यासाठी माहिती देण्यात आली असून मास्क तयार करणे, वापरणे आणि त्याचा पुन्हा उपयोग कसा करावा याबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज कोविड 19 – जिल्हाधिकारी आणि भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांचे (2014-2018 ) राष्ट्रीय सज्जता सर्वेक्षण प्रसिद्ध केले.
  • पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील लाभार्थ्यांना पैशांचे वितरण सुरळीत व्हावे यासाठी गृह मंत्रालयाने राज्येकेंद्रशासित प्रदेशांना जारी केल्या मार्गदर्शक सूचना

 

Maharashtra update

राज्यात आज कोरोना बाधित 33 नवीन  रुग्णांची नोंद झाली. यातील 30  रुग्ण मुंबईचे, पुणे येथील 2 तर बुलढाण्याच्या 1 रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या 335 झाली आहे अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांनी दिली.

दोन दिवसात 2 लाख 10 हजार 208 कुटुंबाना धान्यवाटप -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

0

पुणे, दि.2: पुणे विभागात 1 एप्रिल पासून आजपर्यंत 2 लाख 10 हजार 208 कुटुंबाना धान्यवाटप करण्यात आले आहेत. त्याचे प्रमाण एकूण शिधापत्रिकेच्या जवजवळ 10 टक्के आहे. नागरिकांनी राशन घेतांना सोशल डिस्टन्सींग ठेवूनच राशन घ्यावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज केले आहे.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात भाजीपाल्याची आवक 15 हजार 188 क्विटंल, फळांची 3 हजार 261 क्विंटल तसेच कांदा बटाटयाची 16 हजार 389 क्विंटल आवक झाली आहे. तसेच दुधाचे विभागात 85 लाख लिटर संकलन झाले असून 24 लाख लिटर पॅकेटिंगच्या स्वरुपात वितरण करण्यात आले आहे. विभागात अन्नधान्य, दुध आणि किराणा वितरणात काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहनही डॉ म्हैसेकर यांनी केले आहे.
पुणे विभागातील कोरोना सदृश्य परिस्थीतीत आपले दवाखाने सुरु ठेवावेत व आपल्या दवाखान्याकडे येणा-या रुग्णांना (SARI) सर्दी, खोकला, घसादुखी या आजाराची लक्षणे असल्यास त्यांना कै.द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल, बोपोडी कार्यन्वित करण्यात आले असून येथे पाठविण्याची व्यवस्था करावी, असे आवाहनही डॉ. म्हैसेकर यांनी सर्व खाजगी वैदयकीय व्यावसायिकांना केले आहे.
**

पुणे विभागात 85 रुग्ण पाझिटिव्ह -डॉ. दीपक म्हैसेकर(व्हिडीओ)

0

पुणे, दि.2: पुणे विभागात कोरोना सांर्सगिक रुग्णसंख्या 2 एप्रिल सायंकाळ अखेर 85 असून पुणे महानगरपालिका 41, पिंपरी चिंचवड 14, सातारा 3, सांगली 25 आणि कोल्हापूर 2 अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, तपासणीसाठी पाठविलेले एकूण नमुने 1899 होते. त्यापैकी 1669 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 176चे अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालापैकी 1544 नमुने निगेटीव्ह आहेत व 85 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत 18 रुग्णांना बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे.
विभागामधील 7746 प्रवाशापैकी 4591 प्रवाशांबाबत फ़ॉलोअप सुरू असून 3155 प्रवाशांबाबत पूर्ण झालेला आहे, म्हणजेच 3155 व्यक्तींचा होम क्वारंटाइंन पूर्ण झालेला असून 4591 व्यक्ती अजूनही क्वारंटाइन आहेत.
आजपर्यंत 14,99,431 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 70,32,601 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. रुग्णलयाबाबत बोलतांना ते म्हणाले, विभागातील शासकीय रुग्णालयामध्ये एकूण PPE (Personal Protective Equipment) २२८२, N ९५ Mask २९६००, Triple Layer Mask 16582 व 1594 व्हेंटिलेटर्स उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे शहरात गरजूंना भोजन वाटपाचा उपक्रम विद्यार्थी, वयस्कर व्यक्ती आणि गरीब कुटुंबातील अनेकांना आधार

0

पुणे-
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व भोजन वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. न्यू प्रशांत इंटरप्राईजेस केटरिंग या केटरिंग सर्विसेसकडून पुण्यातील गोखलेनगर येथील वडारवाडीतील 55 जळीत कुटुंबांना आणि त्यातील 150 व्यक्तींना दुपारचे जेवण देण्यात येते. यामध्ये लायन्स क्लब इंटरनॅशनल, ओम प्रकाश पेठे व अशोक नगर गोल्ड यांचे महत्त्वाचे योगदान आहे
चाकण येथील महिंद्रा आणि महिंद्रा ग्रुपकडून पुणे शहरातील दीड हजार व्यक्तींना दुपारचे जेवण पुरविण्यात येते. पुणे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख व तहसिलदार तृप्ती कोलते आणि हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर, हवेली तहसिलदार सुनील कोळी यांच्या टीममार्फत शहरातील गरजू व्यक्तींना भोजन वाटप करण्यात येते. हे भोजन वाटप ‘लॉक डाऊन’ सुरू असेपर्यंत चालू ठेवण्यात येईल, असे महिंद्रा ग्रुपकडून स्पष्ट करण्यात आले आहे
महावीर प्रतिष्ठान, सैलीसबरी पार्क, गुलटेकडी, रेन्बो ग्रूप आणि आदिनाथ फ्रैंड्ज सर्कल यांच्यातर्फे दररोज 1000 विद्यार्थी, वयस्कर व्यक्ती आणि गरीब कुटुंबातील व्यक्तींना जेवणाचे वाटप केले जाते. हा उपक्रम ‘लॉक डाऊन’ घोषित झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून अविरतपणे सुरू आहे. यामध्ये सुनील नहार, अजिंक्य चोरडिया, डॉ. धनराज सुराणा, दिलीप बोरा, अनिल नहार यांचे योगदान लाभले आहे.

हडपसर येथे दिव्यांग व्यक्तींना घरपोच जीवनावश्यक वस्तू तर लोहगाव कळस येथे 300 व्यक्तींना दररोज भोजन

0

पुणे-कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीतून गरजू, स्थलांतरीत लोकांना जिल्हा प्रशासनाच्या मदतीने वेळेत मदत पोहचविण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या पुढाकारातून जिल्हयात परप्रांतातील अडकलेल्या मजूर तसेच गावातील गरजू कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येत आहे.

 

कोरोना संसर्ग परिस्थितीत प्रशासन एकीकडे आरोग्य सेवा पुरविणे, काही सेवा नव्याने उभ्या करणे यामध्ये व्यस्त आहे. तसेच पोलीस प्रशासनावरही संचारबंदीबाबत बंदोबस्ताचे कार्य आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून ठिकठिकाणी गरजू व स्थलांतरीत लोकांसाठी व्यवस्था करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून लोहगाव कळस येथे 300 व्यक्तींना दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली तर हडपसर येथे दिव्यांग व्यक्तींना घरपोहच जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अत्यंत गरजेच्या कालावधीत सुरू असलेल्या या उपक्रमाने अनेकांना आधार दिला आहे.
ज्येष्ठ नागरीक व दिव्यांगासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या नियंत्रण कक्षात सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत संपर्क करुन आपली तक्रार देऊ शकतात. त्यासाठी विजय गायकवाड, सहायक आयुक्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उप विभागीय अधिकारी सचिन बारावकर व तहसिलदार सुनील कोळी यांच्या पुढाकारातून हडपसर येथे दिव्यांग व्यक्तींना थेट त्यांच्या घरी जावून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. लोहगाव कळस भागातील 300 व्यक्तींच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यवस्थेतही दररोज वाढ करण्यात येत आहे. लोहगाव कळस चौकातही भोजन वाटप सुरू आहे. स्थानिक नागरिक, मजूर व गरजू कुटुंबांनी जिल्हा प्रशासनाच्या या मदत वाटप कार्याने आपल्याला गरजेच्या वेळी मदत मिळाल्याचे समाधान व्यक्त केले. कोरोना संसर्गाच्या कालावधीत प्रशासन सर्वच पातळयांवर करीत असलेल्या प्रयत्नांबाबत नागरिक अनेकांनी शासनाचे आभार मानले आहेत.

राज्यात कोरोना उपचारासाठी ३० विशेष रुग्णालये घोषित – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

0

मुंबई, दि. २: कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी आरोग्य संचालकांनी अधिसूचना काढली आहे. या रुग्णालयामुळे २ हजार ३०५ खाटा कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

या अधिसूचनेमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना  केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असेल.

जिल्हा आणि अधिसूचित रुग्णालयाचे नावे, कंसात खाटांची संख्या:

ठाणे- जिल्हा रुग्णालय, टी.बी बिल्डींग (१००), मीरा भाईंदर- पंडीत भीमसेन जोशी रुग्णालय (१००), वाशी- सामान्य रुग्णालय (१२०), कल्याण-डोंबिवली म.न.पा.- शास्त्री नगर दवाखाना (१००), रायगड- पनवेल उपजिल्हा रुग्णालय (१००), नाशिक- कुंभमेळा बिल्डींग व महानगरपालिका कठडा हॉस्पीटल अनुक्रमे (१००) (७०), अहमदनगर- जिल्हा रुग्णालय (१००), नंदूरबार- डोळ्यांचा दवाखाना (५०), धुळे- जिल्हा रुग्णालय शहारातील इमारत (५०), पुणे- जिल्हा रुग्णालय, औंध (५०), सातारा- सामान्य रुग्णालय (६०), सिंधुदुर्ग- नवीन इमारत एएमपी फंडेड (७५), रत्नागिरी- सामान्य रुग्णालय  व कळंबोळी उपजिल्हा रुग्णालय अनुक्रमे (१००) (५०), औरंगाबाद- जिल्हा रुग्णालय (१००), हिंगोली- जिल्हा रुग्णालय (१००), हिंगोली- कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय (५०), लातूर- उदगीर उपजिल्हा रुग्णालय (५०), उस्मानाबाद- जिल्हा रुग्णालय, नवीन इमारत (१००), उमरगा उपजिल्हा रुग्णालय टीसीयू बिल्डींग (५०) आणि तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारत (५०), नांदेड- जिल्हा रुग्णालय जुने (५०) आणि मुखेड उपजिल्हा रुग्णालय (५०). अमरावती- विशेषोपचार रुग्णालय नवीन इमारत (१००),वाशीम- जिल्हा रुग्णालय, डीईआयसी इमारत (५०), बुलढाणा-स्त्री रुग्णालय नवीन इमारत (१००), वर्धा- सामान्य रुग्णालय (५०), भंडारा- सामान्य रुग्णालय एएमसीएच विंग नवीन इमारत (८०) आणि गडचिरोली- जिल्हा रुग्णालय (१००) या सर्व जिल्हा रुग्णालयातील सर्व खाटा मिळून २ हजार ३०५ खाटा कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपलब्ध होतील.