Home Blog Page 2619

कोविड-19 च्या सर्व चाचण्या आणि उपचार निशुल्क करण्याचा निर्णय -वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख 

0

 

लातूर, दि. 24: – कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालयांमध्ये व रुग्णालयांमध्ये यासंदर्भातील सर्व चाचण्या आणि उपचार निशुल्क करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी यांनी आज येथे दिली.

जागतिक आरोग्य संघटने कडून कोविड-19 प्रादुर्भावास पंडेमिक घोषित करण्यात आले आहे. राज्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे विचारात घेऊन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये कोविड-19 संदर्भातील रुग्णांच्या सर्व तपासण्या व उपचार यापुढे निशुल्क करण्यात आले आहेत.कोविड -19 ग्रस्त रुग्णांना सुलभतेने उपचार घेता यावेत व यावर उपचार घेण्यासाठी अधिकाधिक रुग्णांनी पुढे यावे या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोविड-19 ग्रस्त रुग्णावर उपचारासाठी अधिक पैसे लागतील या भीतीपोटी अनेक रुग्ण आपला आजार लपवतात. असा अनुभव आहे. या निर्णयामुळे अधिकाधिक रुग्ण पुढे येऊन स्वतः वर उपचार करून घेतील त्याचप्रमाणे या निर्णयामुळे अधिकाधिक चाचण्या घेणे शक्य होणार असल्याने कोविड-19 ला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.

पालिका शाळेतील क्वारंटाइन मध्ये बिछाना ,जेवण याची सोय ज्याने त्याने आपापली करावी -महापालिका

0

 

पुणे- पालिका शाळेतील क्वारंटाइन मध्ये बिछाना ,जेवण यांची  सोय नसणार असल्याचे महापालिकेने पीआरओ यांच्यामार्फत प्रसिद्धीस पाठाव्लेल्या संदेशातून स्पष्ट झाले आहे.त्यामुळे पालिकेच्या शाळेत क्वारंटाइन  म्हणजे सारे काही वेळेवर आणि फुकट असे कोणी समजण्याची अवस्था नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय म्हटले आहे पीआरओ संजय मोरे यांनी पहा वाचा जसाच्या तसा मेसेज …

शहरातील दाट वस्तीच्या नागरिकांची मनपा शाळेत तात्पुरत्या निवासाची व्यवस्था,
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे शहराच्या दाट वस्तीच्या विशेषता: झोपडपट्टी व अधिक दाट लोकसंख्या परिसरातील घरात एखादी कोरोना विषाणू लक्षणे संशयित व्यक्ती,बाधित व्यक्ती,अशा व्यक्तीना विलगिकरन करणे,व पुढील उपचार करणे,या दृष्टीने तसेच या व्यक्ती, अथवा रुगणामुळे इतरांना बाधा होऊ नये,तसेच अशा परिसरात एका घरात अनेक व्यक्तींच्या रहिवासमुळे बाधा होणे,प्रादुर्भाव टाळण्याच्या व घरातील संबंधित व्यक्तीशी जलद उपाय होऊन प्रभावी उपाययोजना अंतर्गत घरातील निवास अडचणींचा विचार करता इतरांना अर्थात तात्पुरत्या स्वरूपाची निवास व्यवस्था त्या परिसरातील पुणे मनपाच्या शाळेत करण्याचे आदेश महापालिका आयुक्त मा,शेखर गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱयांना दिले,
मुखत्यवेकरून भवानी पेठ,बिबवेवाडी,कसबा विश्रामबागवाडा, ढोले पाटील रस्ता,येरवडा कळस धानोरी, परिसरातील दाट लोकवस्ती अर्थात पाटील इस्टेट, काशेवाडी, पर्वतीदर्शन,गुलटे कडी,लक्ष्मीनगर,लोहियांनगर,अशा भागात बाधित लोकांच्या संख्येत वाढ होत आहे,
अशा दाट वस्तीच्या परिसरातील घरातून उपाययोजनेतर्गत सोशल distancing सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी किमान रात्री व दिवसा गरजेनुसार तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्यामुळे पुणे मनपाच्या शाळातून व्यवस्था ऊपलब्ध करून देण्यात येत आहे,
सदरच्या वरीलप्रमाणे दाट लोकवस्ती अथवा झोपडपट्टी नजीकच्या मनपा शाळेतून तात्पुरत्या करण्यात आलेल्या व्यवस्थेत ज्या नागरिकांना तात्पुरते दिवस व रात्री गरजेनुसार राहावयाचे आहे अशा नागरिकांनी स्वतःचे जेवण,बिछाना,स्वतः वापरावयाच्या मूलभूत वस्तू,यांची सोय स्वतः करावयाची आहे,या ठिकाणी फक्त राहण्याची व झोपण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे,
येथील सुरक्षा व्यवस्था,स्वच्छतागृह व्यवस्था,स्वच्छता,साफसफाई,निर्जंतुकीकरण,पिण्याचे पाणी ,विद्युतव्यवसथा,मनपाचे वतीने करण्यात येईल,
–संजय मोरे,
माहिती व जनसम्पर्क अधिकारी,
पुणे महानगरपालिका,
२४/०४/२०२०,

आरोग्य विभागामार्फत ४७ हजार स्थलांतरित मजुरांचे मानसिक समुपदेशन

0

मुंबई, दि. २४: कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्रातील अनेक मजूर राज्यातील काही भागात अडकले आहेत. सुमारे ९४४ निवारागृहांमध्ये हे मजूर राहत असून त्यांना प्रशासनामार्फत विविध सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. याच जोडीला त्यांना जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाद्वारे मानसिक समुपदेशन करण्याचे काम आरोग्य विभागामार्फत सुरू आहे. आतापर्यंत राज्यातील ४७ हजार स्थलांतरित मजुरांना या सेवेचा लाभ मिळाला आहे. त्याचबरोबर ज्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे त्यांचेही समुपदेशन केले जात आहे.

कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर राज्यातील आणि राज्याबाहेरील असंघटीत क्षेत्रातील मजूर अडकले आहेत. या स्थलांतरित मजुरांची राहण्याची आणि जेवणाची सोय विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात आली. घरापासून दूर राहणे, आर्थिक कुचंबणा, कोरोना आजाराची सुप्त भीती यामुळे या मजुरांना अनेक मानसिक व्याधींना तोंड द्यावे लागते. यासाठी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाद्वारे या स्थलांतरित मजुरांना समुपदेशन देण्यात येत आहे.

समुपदेशना दरम्यान, ज्या मजूरांना मध्यम ते गंभीर स्वरुपाचे मनोविकार आहेत त्यांना भरती करुन योग्य ते उपचार देण्यात येत आहेत. सध्या सुमारे आठ हजाराच्या आसपास लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. तिथे जाऊन त्यांचे समुपदेशन करुन, त्यांच्या अडचणी समजवून घेण्याचे काम केले जात आहे.

राज्यात सध्या ३० समुपदेशक, २८ मनोविकार तज्ज्ञ, ३६ मनोविकार नर्स यांच्या माध्यमातून हे काम केले जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात साधारणत: दोन ते तीन पथक आहेत. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या माध्यमातून यापथकाद्वारे प्रेरणा प्रकल्पांतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात समुपदेशनाचे काम केले जाते. गेल्या वर्षी कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या पुरानंतर तेथील पूरग्रस्तांनाही समुपदेशनाचं काम या पथकामार्फत करण्यात आले होते.

राज्यात आज ३९४ नवीन रुग्णांचे निदान

0

मुंबई, दि. २४ : आज राज्यात कोरोनाबाधित ३९४ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६८१७ झाली आहे. आज ११७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ९५७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २ हजार १८९ नमुन्यांपैकी ९४ हजार ४८५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६८१७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख १९ हजार १६१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८,८१४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात १८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३०१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ११, पुणे येथे ५ तर मालेगाव येथे २ मृत्यू झाले आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी १२ पुरुष तर ६ महिला आहेत. आज झालेल्या १८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत तर ६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १८ मृत्यूपैकी १२ रुग्णांमध्ये (६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

सध्या राज्यातील कोरोना आजाराचा मृत्यूदर हा ४.४ टक्के आहे. राज्यातील २६९ मृत्यूंचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता ५० वर्षांखालील व्यक्तींचा मृत्यूदर हा कमी आढळून येतो, विशेषतः २१ ते ३० वर्षे वयोगटात मृत्यूदर ०.६४ टक्के इतका आहे तर त्यापुढील वयोगटात मृत्यूदर वाढताना दिसून येतो.  ६१ ते ७० या वयोगटात मृत्यूदर सर्वाधिक म्हणजे १७.७८ टक्के एवढा आहे. यामुळे ५० वर्षांवरील आणि इतर अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तीमध्ये कोरोना आजारामुळे गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असल्याचे अधोरेखित झाले आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ४४४७ (१७८)

ठाणे: ३५ (२)

ठाणे मनपा: २२० (४)

नवी मुंबई मनपा: १२५ (४)

कल्याण डोंबिवली मनपा: १३१ (३)

उल्हासनगर मनपा: २

भिवंडी निजामपूर मनपा: १२

मीरा भाईंदर मनपा: ११८ (२)

पालघर: २१ (१)

वसई विरार मनपा: ११४ (३)

रायगड: १४

पनवेल मनपा: ४० (१)

ठाणे मंडळ एकूण: ५२७९ (१९८)

नाशिक: ४

नाशिक मनपा: ७

मालेगाव मनपा:  ११६ (११)

अहमदनगर: २५ (२)

अहमदनगर मनपा: ८

धुळे: ६ (१)

धुळे मनपा: १६ (१)

जळगाव: ६ (१)

जळगाव मनपा: २ (१)

नंदूरबार: ७ (१)

नाशिक मंडळ एकूण: १९७ (१८)

पुणे: ४३ (२)

पुणे मनपा: ८४८ (६३)

पिंपरी चिंचवड मनपा: ७० (२)

सोलापूर: १

सोलापूर मनपा: ३८ (३)

सातारा: २० (२)

पुणे मंडळ एकूण: १०२० (७२)

कोल्हापूर: ७

कोल्हापूर मनपा: ३

सांगली: २५

सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)

सिंधुदुर्ग: १

रत्नागिरी: ८ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ४५ (२)

औरंगाबाद:०

औरंगाबाद मनपा: ४२ (५)

जालना: २

हिंगोली: ७

परभणी: ०

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ५२(५)

लातूर: ९

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ०

नांदेड मनपा: १

लातूर मंडळ एकूण: १४

अकोला: ११ (१)

अकोला मनपा: १२

अमरावती: ०

अमरावती मनपा: १३ (१)

यवतमाळ: २३

बुलढाणा: २१ (१)

वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: ८१ (३)

नागपूर: २

नागपूर मनपा: ९९ (१)

वर्धा: ०

भंडारा: ०

गोंदिया: १

चंद्रपूर: ०

चंद्रपूर मनपा: २

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: १०४ (१)

इतर राज्ये: २५ (२)

एकूण: ६८१७  (३०१)

( टीप – या तक्त्यातील रुग्ण संख्या  रुग्णाने दिलेल्या पत्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा / मनपांनी उपलब्ध करुन दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात  संसर्गग्रस्त  झालेले आहेत. बुलढाणा आणि जालना येथील एकूण ४ रुग्णांची झालेली दुहेरी नोंद आज दुरुस्त करण्यात आलेली आहे)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ५१२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ७७०२ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी २८.८८ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

 

कोरोना प्रतिबंधाकरीता कार्यरत सर्वच वैद्यकीय अधिकारी कर्मचा-यांना विम्याचा लाभ मिळावा -केंद्रीय पथक प्रमुख संजय मल्होत्रा

0

 

पुणे दि.24 :- कोरोना प्रतिबंधाकरिता वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणा-या सर्वच अधिकारी व कर्मचा-यांना विमा सुरक्षेचा लाभ मिळावा, असे प्रतिपादन केंद्रीय पथकातील उर्जा विभागाचे अपर सचिव संजय मल्होत्रा यांनी केले. कोरोना प्रतिबंधाकरिता करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्याकरीता केंद्रीय पथक पुणे जिल्हयाच्या दौ-यावर आले आहे.
या अंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पुणे जिल्हयातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणा-या वैद्यकीय संस्थां तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख यांची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय पथकातील डॉ.पी.के.सेन, डॉ.पवन कुमार सिंग, डॉ.अरविंद अलोन, करमवीर सिंग, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर,जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे उपस्थित होते.
या बैठकीमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील तसेच मेडीकल असोशिएशन,नर्सेस फेडरेशन व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी नर्सिंग विभागातील कर्मचा-यांना येणाऱ्या अडचणी, त्यांच्याकरीता आवश्यक साधनसामग्रीचा पुरवठा तसेच विलगीकरणाकरीता सोई तसेच विमा संदर्भातील अडचणींबाबत चर्चा करण्यात आली .
कार्यरत असणा-या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना व मेडीकल असोसिएशनच्या प्रतिनिधींना विम्याचा लाभ मिळण्याकरीता मागणी केली. तसेच काही जीवनावश्यक वस्तूंच्या व गॅस सिंलेंडरच्या पुरवठयाबाबत तसेच या वस्तूंच्या वितरणाच्या वेळेसंदर्भात तसेच त्याच्या पुरवठयाबाबत सूचना करण्यात आल्या. या सूचनांची योग्य ती दखल घेण्यात येवून शासनास तसे कळविण्यात येईल, असे श्री.मल्होत्रा यांनी सांगितले.
या प्रतिनिधींमार्फत विचारण्यात आलेल्या शंकाचे समाधान यावेळी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
0 0 0 0

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय पथकाने साधला लोकप्रतिनिधींशी संवाद

0

 

पुणे,दि.24- पुणे जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी व केल्या जाणाऱ्या उपाययोजनेच्या अनुषंगाने केंद्रीय पथक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी व्हिडिओ काॕन्फरन्सिंगच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींशी संवाद साधला व मते जाणून घेतली.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या व्हि.सी.रूममधून ते बोलत होते. यावेळी पथक प्रमुख भारत सरकारच्या ऊर्जा विभागाचे अपर सचिव संजय मल्होत्रा, डाॕ.पी.के.सेन, डाॕ.पवनकुमार सिंग, डाॕ.अरविंद अलोने, करमवीर सिंग, विभागीय आयुक्त डाॕ.दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदी उपस्थित होते.
केंद्रीय पथक ठिकठिकाणी दौरा करून परिस्थितीची माहिती घेत आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध आघाड्यांवर प्रयत्न करण्याची गरज आहे. मुंबई नंतर पुण्याची परिस्थिती गंभीर असल्याने वेळीच अटकाव करण्याची आवश्यकता आहे. हे पथक ठिकठिकाणी जाऊन उपयुक्त अशा सूचना करतात. आज त्यांनी लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. खा.अमोल कोल्हे, आ.चंद्रकांत पाटील व अन्य जवळपास 28 लोकप्रतिनिधींशी आज त्यांनी व्हिडिओ काॕन्फरन्सिंगवर संवाद साधून चर्चा केली. त्या-त्या भागातील परिस्थितीची माहिती समजून घेतली.लोकप्रतिनिंधींनी केलेल्या सूचना शासनाला कळविण्यात येईल,असे केंद्रीय पथकाने यावेळी सांगितले.

सकारात्मकता वाढवण्यासाठी कलाकारांचे “पुन्हा एकदा गरुड भरारी घेऊ ” गाणे प्रदर्शित .

0

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांमद्धे भीतीचे वातावरण पसरले आहे, इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधितांची सध्या संख्या कमी असली तरीदेखील हा आकडावाढतच चालला आहे, याचा परिणाम म्हणून अनेकांच्या मनामद्धे नकारात्मकता वाढत आहे. याच धर्तीवर लोकांमध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी अनेक कलावंतांनी एकत्र येऊन “पुन्हा एकदा गरुड भरारी घेऊ” हे नवं कोरं गाणं रसिकांसमोर आणलं आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे ध्वनिमुद्रण आणि चित्रीकरण हे दोन्ही सर्व कलाकारांनी घरातून मोबाईलच्या साहाय्याने केले असून, तांत्रिक बाबींच्या साहाय्याने शक्य तितकं स्टुडिओ ध्वनिमुद्रणाच्या बरोबरीचं करण्याचा प्रयत्न केला आहे.

गाण्यात दीपाली सय्यद, मनोज जोशी, किशोरी शहाणे, मकरंद अनासपुरे, रेणुका शहाणे, शिल्पा अनासपुरे, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, शरद पोंक्षे, वर्षा उसगावकर, मानसी नाईक, गायत्री दातार, नितीश चव्हाण, स्मिता शेवाळे, देवदत्त नागे, किरण गायकवाड असे दिग्गज कलाकार एकत्र दिसणार आहेत. गाण्याचे दिग्दर्शन व संकलन मकरंद शिंदे यांनी केले असून, संगीत जीवन मराठे यांनी दिले आहे, गाण्याचे शब्द वैशाली मराठे, सुरेखा मराठे, शौनक कंकाल यांचे असून हे जीवन मराठे, कविता राम, राजेश्वरी पवार, क्रिशा चिटणीस यांनी गायलं आहे. तर पोस्टर अनिल शिंदे यांनी बनवलं आहे. गाण्याची संकल्पना अभिनेत्री दीपाली सय्यद यांची असून हे गाणं रसिकांसमोर आणण्यासाठी श्रीनिवास कुलकर्णी, अमोल घोडके, राजेंद्र अनासपुरे यांनी पुढाकार घेतला.

याप्रसंगी बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या कि “कोरोनामुळे लोकांमद्धे भीतीचे वातावरण आहे, वाढत्या लॉकडाऊन मुळे, सतत घरात राहून नकारात्मकता वाढू शकते, या गाण्याच्या माध्यमातून लोकांमद्धे सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचा आम्हा सर्व कलावंतांचा प्रयत्न होता, लोकांना नक्कीच तो आवडेल अशी आम्हाला खात्री आहे”. कलावंतांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे गाणे रसिकांसमोर आणले असून लोकांचा त्याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

पुण्याची आजची कोरोना स्थिती पहा काय आहे …(व्हिडीओ)

0

पुणे विभागात कोरोना बाधित 1085 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि.24 :- विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1085 झाली असून विभागात 181 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 831 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 73 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 38 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 1085 बाधित रुग्ण असून 73 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 985 बाधीत रुग्ण असून 67 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 21 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 41 बाधीत रुग्ण असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 28 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 10 बाधीत रुग्ण आहेत.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 12 हजार 755 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 12 हजार 86 चा अहवाल प्राप्त आहे. 669 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 10 हजार 939 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1 हजार 85 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 49 लाख 58 हजार 977 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्या अंतर्गत 1 कोटी 91 लाख 16 हजार 464 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 989 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
0000

केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्‍या दरात धान्‍य वितरित करणार – जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

0

 पुणे, दिनांक 24- कोविड १९ प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्‍यात आलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर मे व जून २०२० या महिन्‍यांकरिता अंत्‍योदय अन्‍न योजना व अन्‍नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्‍या उर्वरित केशरी शिधापत्रिकाधारकांना दि २५ एप्रिलपासून रास्‍तभाव धान्‍य दुकानातून सवलतीच्‍या दरात धान्‍य वितरित करण्‍यात येणार असल्‍याचे जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी कळविले आहे शनिवारपासून मे महिन्‍याचे धान्‍य दुकानातून उपलब्‍ध होणार असून गहू ८ रुपये प्रति किलो, तांदुळ १२ रुपये प्रति किलो या दराने कार्डवरील प्रति व्‍यक्‍ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ वितरित करण्‍यात येणार आहे. पुणे शहरात केशरी शिधापत्रिकांची संख्‍या सुमारे ४ लाख ६० हजार असून लाभार्थी संख्‍या सुमारे २० लाख आहे. पिंपरी-चिंचवडमध्‍ये हीच संख्‍या २ लाख ६५ हजार असून लाभार्थी संख्या सुमारे १० लाख इतकी आहे. मे महिन्‍याकरिताचा ३८८७ मे. टन गहू व २५७२ मे. टन तांदूळ स्‍वस्‍त धान्‍य दुकानामध्‍ये पोहोच करण्‍यात आलेला आहे. या धान्‍याचे वाटप रेशनकार्डवर 25 एप्रिलपासून सुरु करण्‍यात येत आहे. २५ एप्रिलपासून हे धान्‍य केवळ उर्वरित केशरी रेशनकार्ड धारकांनाच वाटप करण्‍यात येणार आहे. तसे अंत्‍योदय व अन्‍नसुरक्षा लाभार्थ्‍यांना मे महिन्‍याचे धान्‍य वाटप ५ मे पासून करण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे.रास्‍तभाव दुकाने पोलिसांच्‍या सूचनांप्रमाणे पूर्ण वेळ सुरु राहतील, असे जिल्‍हाधिकारी राम यांनी स्‍पष्‍ट केले असून रास्‍तभाव धान्‍य दुकानांत पुरेसा धान्‍यसाठा उपकरुन देण्‍यालब्‍ध त आलेला आहे. या धान्‍याचे वितरण लाभधारकांना ३१ मे पर्यंत करण्‍यात येणार असल्‍याने धान्‍य घेण्‍यासाठी गर्दी करु नये, असे आवाहनही त्‍यांनी केले आहे. 

 

रेशनकार्डधारकांसाठी हेल्‍पलाईन

रेशनकार्ड धारकांच्‍या तक्रार निवारणासाठी दूरध्‍वनी क्रमांक उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहेत.

टोल फ्री क्रमांक १०७७, मदत केंद्र क्रमांक ०२०-२६१२३७४६ (सकाळी ८.०० ते रात्री ८.००)

मोबाईल क्रमांक ८१४९६२११६९ / ८६०५६६३८६६

टोकन पध्‍दतीने धान्‍याचे वाटप – उक्‍त कार्डधारकांना धान्‍य वाटप करण्‍याचे सविस्‍तर नियोजन करण्‍यात आले आहे. सर्व स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांनी कार्डधारकांना धान्‍य वाटप करण्‍यासाठी निर्धारित वेळापत्रक तयार केले असून कार्डधारकांना टोकन पध्‍दतीने धान्‍याचे वाटप करण्‍यात येणार आहे. सर्वप्रथम सकाळी निर्धारित वेळेचे टोकन कार्डधारकांना वाटप करण्‍यात येईल. सदर टोकनवर कार्डधारकाने कोणत्‍या वेळी धान्‍य घेण्‍यासाठी यावे याची नोंद असेल. त्‍यानुसार दिलेल्‍या वेळेतच दुकानामध्‍ये जाऊन धान्‍य घ्‍यावे. लाभार्थ्‍यांनी धान्‍य घेताना सोशल डिस्‍टंस (सामाजिक शिष्‍टाचार) ठेवावा आणि मास्‍कचा वापर करावा, असे आवाहन अन्‍न धान्‍य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी केले आहे.

महाराष्ट्रात ‘पूल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपीला’ मान्यता

0

मुंबई, दि. २४ : कोरोना उपचारासाठी महाराष्ट्रात पूल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडून आज मान्यता मिळाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

याबाबत अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कोरोना प्रतिबंधाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज दुपारी देशातले सर्व आरोग्यमंत्री व सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

राज्य शासनाकडून मागणी करण्यात आलेल्या पूल टेस्टींग व प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीला मान्यता देण्यात आली. याबैठकीत महाराष्ट्राकडून मांडण्यात आलेल्या पोर्टेबल पल्स ऑक्सिमीटर व एक्सरे चाचणीच्या मदतीने कोरोना रुग्णाचे लवकर निदान करणे शक्य होईल आणि त्यातून मृत्यूदर कमी करता येऊ शकेल, असा मुद्दा मांडण्यात आला. त्याचबरोबर पीपीई कीटचे निर्जंतुकीकरण करून त्याचे पुर्नवापर करण्यासाठी मुद्दे सुचविण्यात आले. त्याचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले.

राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना चाचणी सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे विभागात 31 हजार 196 क्विंटल अन्नधान्याची तर 5 हजार 274 क्विंटल भाजीपाल्याची आवक -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

0

पुणे, दि.24 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 31 हजार 196 क्विंटल अन्नधान्याची तर 5 हजार 274 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 945 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 13 हजार 948 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
पुणे विभागात 23 एप्रिल 2020 रोजी 99.76 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 23.28 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे विभागात 67 हजार 601 स्थलांतरित मजुरांची सोय
1 लाख 40 हजार 71 मजुरांना भोजन

सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 153 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 562 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 715 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 67 हजार 601 स्थलांतरित मजूर असून 1 लाख 40 हजार 71 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

सर्कस कलाकार,शेतकरी,मजूर,आदिवासी,वीटभट्टी कामगारांना मदत

0

पुणे :कोरोना विषाणू साथ आणि लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर वनराई संस्थेतर्फे ग्रामीण महाराष्ट्रातील सातारा, पुणे,जालना,नासिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनजागृती आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपद्वारे मदत कार्य करण्यात आले.किराणा सामान आणि जीवनोपयोगी साहित्याचे सुमारे १ हजार गावकऱ्यांना वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
जालना,नासिक,पुणे,सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या लक्षणांबाबत,सुरक्षिततेबाबत जागृती करण्यात आली.याकरिता माहितीपर पोस्टर्सही लावण्यात आली.
सातारा जिल्हयात लोणंद,पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यात भूमिहीन शेतकरी, वीटभट्टी कामगार,परप्रांतीय मजूर व गरीबांना किराणा माल आणि जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.खंडाळा(सातारा)येथे बेरोजगार झालेल्या सर्कस कामगार,कलाकारांना महिनाभर पुरेल इतका शिधा गरजू कुटुंबाना देण्यात आला.नासिक जिल्ह्यातील आदिवासी भागात आदिवासी भागात मदत देण्यात आली. ग्रामपंचायतींना जंतूनाशक फवारणीमध्ये मदत करण्यात आली. स्थानिक संस्थांबरोबर देखील मदतकार्य करण्यात आले. या जनजागृती व मदतकार्याच्या मोहिमेत जयवंत देशमुख,सतीश आकडे,नीलिमा जोरवर,ज्ञानेश्वर सरडे,मांगीलाल महाले इत्यादी स्वयंसेवक,पदाधिकारी सहभागी झाले.विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्ति व संस्थांनी या सामाजिक कार्यासाठी वनराई संस्थेला मदत केली.

फडणवीसांद्वारे भाजपाच्या कोव्हिड हेल्पलाईनची सुरुवात

0

मुंबईमहाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ह्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कोव्हिड हेल्पलाईनची सुरुवात केलीमाजी मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवास स्थान सागर बंगलो येथे मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढ़ा ह्यांच्या उपस्थितीमध्ये कोरोना संकटाचा सामना करणायांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या मलबार हिल क्षेत्राशी निगडीत ह्या कोव्हिड हेल्पलाईनप्रमाणेच मुंबईच्या सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपा कोव्हिड हेल्पलाईन सुरू करणार आहे.

माजी मुख्यमंत्री फडणवीस ह्यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेल्या ह्या हेल्पलाईनमुळे लोकांना कोरोना संकटाच्या ह्या अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये मदत मिळेलमहानगरपालिकेद्वारे अधिकृत केलेले कोव्हिड डॉक्टरक्वारंटाईन सेंटर्सकोव्हिडसाठी आरक्षित रुग्णालयेबिगर कोव्हिड रुग्णालयबिगर कोव्हिड सामान्य क्लिनिकपोलिस स्थानकरेशन दुकानमंत्रालय नियंत्रण कक्षवार्ड कंट्रोल रूमआरोग्य अधिकारी व रुग्णवाहिकेशी संबंधित मदतसुविधा व सेवांच्या संदर्भात आवश्यक माहिती ह्या हेल्पलाईनद्वारे घेता येऊ शकतेमलबार हिलशी संबंधित हेल्पलाईन क्रमांक 7021584358 आणि 8879774368 वर स्थानिक लोक आपल्या भागातील कोरोना संकटाच्या परिस्थितीमध्ये सहाय्यसुविधा व सेवा प्राप्त करू शकतातहेल्पलाईन सुरू होण्याच्या प्रसंगी दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष शरद चिंतनकर व मलबार हिल भाजपाचे अध्यक्ष विनय अंतरकरसुद्धा उपस्थित होतेविरोधी पक्ष नेते फडणवीस ह्यांनी ह्या प्रसंगी म्हंटले कीकोरोना संकटाच्या काळात ही अतिशय उपयोगी हेल्पलाईन ठरेल व त्याद्वारे सामान्य व्यक्तींना कोरोना संकटामध्ये आपल्या आवश्यक सुविधा प्राप्त करण्यासाठी सहजपणे संपर्क करता येईलत्यांनी असेही म्हंटले कीअशा प्रकारची हेल्पलाईन मुंबईतील प्रत्येक भागासाठी बनवली जावी ज्यामुळे सामान्य जनतेला आपल्या गरजेच्या वेळी संपर्क करताना कोणतीही अडचण येणार नाहीमुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढ़ा ह्यांनी फडणवीसांच्या विधानाला दिला व लवकरच मुंबईतील सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये अशी हेल्पलाईन सुरू केली जाईलअसे सांगितले.

लॉकडाऊनमधून आणखी सूट : मेट्रो तसेच मान्सूनपूर्व कामे, पिठाची गिरणी, ज्येष्ठांचे मदतनीस यांचा समावेश

0

मुंबई, दि. २३ – राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमधून ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणारे कर्मचारी व काळजीवाहक, पिठाची गिरणी, मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड या महानगरपालिका आयुक्तांनी मंजुरी दिलेल्या मेट्रो रेल्वेची कामे व इतर मान्सूनपूर्व कामांना सूट देण्याचा आदेश राज्य शासनाने आज काढला आहे.

राज्य शासनाने आज जारी केलेल्या आदेशात काही सेवांना सूट देण्यात आली आहे. त्यामध्ये पॅक हाऊस, बियाणे व फलोत्पादनाच्या तपासणी व उपचार सुविधांची आयात निर्यात, शेती व बागायतीशी संबंधित संशोधन संस्था, वृक्ष लागवड व मधमाशी वसाहती, मध व त्यासंबंधीच्या उत्पादनांची राज्याअंतर्गत व आंतरराज्यीय वाहतूक, ब्रेड फॅक्टरी, दूध प्रक्रिया प्रकल्प, डाळ मिल, पंख्यांची दुकाने यांचा समावेश आहे. त्याशिवाय वन विभागाच्या कार्यालयासह वनीकरण, वृक्षारोपण व त्यासंबंधित कामांनाही लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या मानकानुसार (एसओपी) भारतीय बंदरांमधील समुद्री जहाजांना आवक-जावक व त्यांच्या हालचालींना परवानगी देण्यात आली आहे.

लॉकडाऊनमधून सूट दिली असली तरी ही कामे करताना शासनाने घोषित केलेले नियम, सामाजिक अंतर व स्वच्छता यांची काळजी संबंधित आस्थापनांनी घ्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.

आज ७७८ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या ६४२७ -आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि. २३ : आज राज्यात कोरोनाबाधीत ७७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६४२७ झाली आहे. आज ५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८४० रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९६ हजार ३६९ नमुन्यांपैकी ८९ हजार ५६१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख १४ हजार ३९८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८७०२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात १४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २८३ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ६, पुणे येथील ५, नवी मुंबई येथे १, नंदूरबार येथे १ आणि धुळे मनपा येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यात ८ पुरुष तर ६ महिला आहेत. आज झालेल्या १४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २ रुग्ण आहेत तर ९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. दोन रुग्णांबाबत इतर आजाराची माहिती अद्याप मिळू शकली नाही उर्वरित १२ मृत्यूंपैकी ७ रुग्णांमध्ये ( ५८ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
*राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)*
मुंबई महानगरपालिका: ४२०५ (१६७)
ठाणे: ३४ (२)
ठाणे मनपा: २१४ (४)
नवी मुंबई मनपा: ९७ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: १२४ (३)
उल्हासनगर मनपा: २
भिवंडी निजामपूर मनपा: ८
मीरा भाईंदर मनपा: ११६ (२)
पालघर: २१ (१)
वसई विरार मनपा: १०९ (३)
रायगड: १४
पनवेल मनपा: ३६ (१)
*ठाणे मंडळ एकूण: ४९८० (१८७)*
नाशिक: ४
नाशिक मनपा: ७
मालेगाव मनपा: १०९ (९)
अहमदनगर: २४ (२)
अहमदनगर मनपा: ८
धुळे: ४ (१)
धुळे मनपा: १३ (१)
जळगाव: ६ (१)
जळगाव मनपा: २ (१)
नंदूरबार: ७ (१)
*नाशिक मंडळ एकूण: १८४ (१६)*
पुणे: ४१ (१)
पुणे मनपा: ८१२ (५९)
पिंपरी चिंचवड मनपा: ५७ (२)
सोलापूर: १
सोलापूर मनपा: ३२ (३)
सातारा: २० (२)
*पुणे मंडळ एकूण: ९६३ (६७)*
कोल्हापूर: ६
कोल्हापूर मनपा: ३
सांगली: २५
सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ७ (१)
*कोल्हापूर मंडळ एकूण: ४३ (२)*
औरंगाबाद:०
औरंगाबाद मनपा: ४० (५)
जालना: ३
हिंगोली: ७
परभणी: ०
परभणी मनपा: १
*औरंगाबाद मंडळ एकूण: ५१(५)*
लातूर: ८
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: १
*लातूर मंडळ एकूण: १३*
अकोला: ११ (१)
अकोला मनपा: ९
अमरावती: ०
अमरावती मनपा: ७ (१)
यवतमाळ: १७
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
*अकोला मंडळ एकूण: ६९ (३)*
नागपूर: २
नागपूर मनपा: ९८ (१)
वर्धा: ०
भंडारा: ०
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
*नागपूर मंडळ एकूण: १०३ (१)*
*इतर राज्ये: २१ (२)*
*एकूण: ६४२७ (२८३)*

*( टीप – या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा / मनपांनी उपलब्ध करुन दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत. *मुंबई मनपाच्या आजच्या आकडेवारीत प्रयोगशाळेकडील १३ एप्रिल पासूनच्या प्राप्त अहवालांचा समावेश करण्यात आलेला आहे.*)*

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ४७७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ७४९१ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २७.२६ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.