Home Blog Page 2598

पुणे विद्यार्थी गृहाचा वर्धापनदिन यंदा साधेपणाने साजरा होणार

पुणे : शिक्षण क्षेत्रातील नामांकित पुणे विद्यार्थी गृह संस्थेचा १११ वा वर्धापनदिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे शासकीय नियमांचे आणि फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करून संस्थेच्या आवारातील धनुर्धारी श्रीराम-लक्ष्मण आणि कुलगुरू कै. दादासाहेब केतकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे यंदा वेदघोष आणि स्वागत समारंभ रद्द करण्यात आले आहेत. संस्थेचे देणगीदार, माजी विद्यार्थी, हितचिंतक आणि कर्मचारी-सेवक वर्गाने याची नोंद घ्यावी. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच थांबून आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

‘आयसीएआय’तर्फे येत्या सोमवारी (११)’ लाईव्ह वेबिनार’द्वारे करिअर कौन्सलिंग

पुणे : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉमर्स व सीए क्षेत्रातील संधी या विषयावर मोफत करिअर मार्गदर्शन सत्र आयोजिले आहे. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा व वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशनचे (विकासा) यांच्या संयुक्त विद्यमाने अभ्यास मंडळाच्या अंतर्गत सोमवार, दि. ११ मे २०२० रोजी सकाळी ११ वाजता युट्युबवरून लाईव्ह वेबिनारद्वारे हे मार्गदर्शन होणार आहे. हे वेबिनार मोफत असले, तरी नियोजनाच्या दृष्टीने पूर्वनोंदणी आवश्यक आहे. https://www.surveymonkey.com/r/M972BZW यावर नावनोंदणी करावी. हे वेबिनार www.youtube.com/puneicaiofficial यावर लाईव्ह पाहता येणार आहे.
‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीए जय छायरा, ‘डब्ल्यूआयआरसी’ खजिनदार सीए आनंद जाखोटीया, पुणे शाखेचे चेअरमन सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष सीए समीर लड्डा, सचिव व खजिनदार सीए काशीनाथ पठारे यांच्यासह विविध विषयांचे अभ्यासक व तज्ज्ञ या मार्गदर्शन सत्रात करिअर कौन्सलिंग करणार आहेत. विदयार्थी आणि पालकांच्या मनात कोणत्या क्षेत्रात काय संधी आहेत, असा मोठा प्रश्न असतो. त्याचे शंका निरसण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजिला आहे. सीएची भूमिका, सीएचे महत्त्व, सीए नंतर विविध क्षेत्रातील संधी, सीए होण्यासाठीची तयारी कशी करावी, अशा वेगवेगळ्या विषयी माहिती दिली जाणार आहे.

रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. ८ : औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी  ५ लाख रुपये मदत जाहीर केली आहे, तसेच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही दिले आहेत. परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. या कामगारांनी धीर सोडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

आज सकाळी या दुर्दैवी घटनेसंदर्भात कळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुख्य सचिव तसेच रेल्वे  प्रशासनाच्या वरिष्ठ  अधिकाऱ्यांशी चर्चा केली व घटनेविषयी जाणून घेतले.

परराज्यातील हे मजूर जालना भागात एका स्टील कंपनीत कामाला होते आणि जालन्याहून रेल्वे मार्गाने चालत निघाले होते. रेल्वे मार्गावरच झोपल्याने पहाटे मालवाहू रेल्वे अंगावरून गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

गेल्या ४-५ दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागातून विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहे. त्यातून सुमारे एक लाख लोक आपापल्या गावी सुखरूप पोहचले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत राज्यात अडकलेले सर्व श्रमिक व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या घरी पोहोचतील असे नियोजन झाले असून रेल्वेशी सातत्याने समन्वय सुरु आहे. नुकतीच मुंबईहून रेल्वे सोडण्याचा निर्णयही झाला असून त्यामुळेही अनेक मजूर घरी परततील. मात्र जीवावर उदार होऊन, स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका, असे आवाहन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

परराज्यातील सर्व मजुरांची निवारा व्यवस्था त्या त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने केली आहे, त्याठिकाणी अगदी शेवटचा मजूर घरी जाईपर्यंत आम्ही त्यांची जेवणाची आणि वैद्यकीय उपचाराची सोय करत आहोत, त्यामुळे आपली निवारा केंद्रे सोडून लगेच बाहेर पडू नका.

रेल्वेच्या वेळापत्रकाविषयी आपल्याला रेल्वे व सरकारमार्फत व्यवस्थित माहिती दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

मजुरांच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

0

परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात सुरक्षित पाठवणार; जीव धोक्यात घालून कुणीही असुरक्षित प्रवास करु नये – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ८ : जालना-औरंगाबाद रेल्वेमार्गावर बदनापूर ते करमाडदरम्यान रेल्वे रुळांवर झोपलेल्या १६ जणांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद, वेदनादायी आहे. लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या मजूरांची घरी परतण्याची अधिरता, तळमळ, चाललेली पायपीट मन विषण्ण करणारी आहे. परप्रांतीय मजूर बांधवांना त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी महाराष्ट्र सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. केंद्र व सबंधित राज्यांच्या सहकार्याने सर्व मजूरांना त्यांच्या राज्यांत पाठविण्यात येत आहे, परंतू आपला नंबर येईपर्यंत, त्यासाठीची व्यवस्था होईपर्यंत मजूरबांधवांनी धीर धरावा, जीव धोक्यात घालून असुरक्षित प्रवास करु नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

औरंगाबादनजिक रेल्वे रुळावर झालेल्या दुर्घटनेतील मृतांना उपमुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली. श्री.पवार म्हणाले की, महाराष्ट्राने लॉकडाऊन दरम्यान राज्यात ठिकठिकाणी अडकलेल्या साडे सहा लाख मजूर बांधवांच्या अन्नपाणी, निवारा, वैद्यकीय उपचारांची सोय केली, ती व्यवस्था आजही सुरु आहे, यापुढेही सुरु राहील. महाराष्ट्रात काम करणाऱ्या आमच्या परप्रांतीय मजूरबांधवांची राज्य शासन काळजी घेत असताना काहींचा असा अपघाती मृत्यू होणे दुर्दैवी, क्लेषदायक आहे.

राज्यात अडकलेल्या व आपापल्या राज्यात, घरी जावू इच्छिणाऱ्या मजूर बांधवांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. केंद्र आणि संबंधित राज्यांच्या सहकार्याने ही जबाबदारी पार पाडली जात आहे. टप्प्याटप्याने सर्वांना आपापल्या राज्यात जाता येणार आहे. ज्यांची इच्छा आहे त्या सर्वांना आपापल्या घरी जाता येईल. परंतू, त्यासाठी घाई करु नये. ही घाई जीवघेणी ठरु शकते. मजूर बांधवांनी जीव धोक्यात घालून असुरक्षित प्रवास करु नये, कोरोनाच्या संकटावर आपण सर्वांनी मिळून लढायचं आहे, जिंकायचं आहे. त्यासाठी प्रत्येकानं स्वत:ची, कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. सर्वांनी सुरक्षितता बाळगली पाहिजे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना रेल्वेने मदत करावी

0

लातूर, दि. ८ : जालना येथून रेल्वेच्या मार्गावरून मध्यप्रदेशात परतणारे १६ मजूर औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे मालगाडी खाली चीरडले गेले. या अपघातात मृत्यू पावलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना मध्य प्रदेश सरकार आणि महाराष्ट्र शासनाने मदत केली आहे. भारतीय रेल्वेनेही या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारुन त्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची  मदत द्यावी, अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे

आज पहाटे औरंगाबाद तालुक्यातील सटाणा परिसरात घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून घराच्या ओढीने रेल्वेमार्गावरून पायी निघालेले मजूर थकल्याने त्यांना झोप लागली आणि त्यातच  माल गाडीने त्यांचा बळी घेतला. रेल्वेमार्गावरून गेल्यास आपणाला कोणीही आडवणार नाही आणि आपला घरापर्यंत प्रवास सुखरूप होईल या भाबड्या आशेने ते निघाले होते. परंतू या दुर्घटनेने त्यांची समजूत खोटी ठरली आणि हा प्रवास त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला आहे.

महाराष्ट्र शासन आणि मध्य प्रदेश सरकारने या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत दिली आहे. भारतीय रेल्वेनेही आपली जबाबदारी ओळखून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत द्यावी, असे आवाहन अमित देशमुख यांनी केले आहे.

लॉकडाऊन मध्ये ठिकठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत एसटीची सोय करण्यात केली जात आहे. विशेष रेल्वेही सोडण्यात येत आहेत त्यामुळे मजुरांनी रेल्वेमार्गावरून प्रवास करण्याचा धोका न पत्करता या सेवेचा लाभ घ्यावा आणि सुखरूप पणे घरी परत जावे, असेही अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

आपल्याला लाज वाटली पाहिजे; औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेवरून राहुल गांधी उद्विग्न

0

नवी दिल्लीः औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नाव न घेता मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात रेल्वे रुळावर थकून झोपलेले १६ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडले गेल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सर्व मजूर मध्य प्रदेश येथील असून, ते जालना येथे लॉकडाऊनमध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते. सटाना परिसरात ते रुळावर झोपले असताना मालगाडीने त्यांना चिरडले. यात १६ जण ठार, तर २ मजूर जखमी झाले. या अपघाताबाबत राहुल गांधींनी दुःख व्यक्त केलं आहे. रेल्वे अपघातात मजूर भाऊ-बहिणींच्या मृत्यूच्या बातमीनं मी दुःखी आहे. राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कामगारांबरोबर होत असलेल्या व्यवहारावर आपल्याला लाज वाटली पाहिजे. मृत मजुरांच्या कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. तसेच या प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली असून, रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली आहे. तसेच या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचंही मोदी म्हणाले आहेत. आवश्यक मदत केली जाईल, असंही आश्वासन मोदींनी दिलं आहे.

रेल्वे दुर्घटनेचं वृत्त वाचून यातना झाल्या, शरद पवारांनी सरकारला काही सूचना केल्या

0

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतील मृत मजूरांबद्दल शोक व्यक्त केला. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या घटनेमुळे मनाला यातना झाल्याचं पवार यांनी म्हटलंय. पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या घटनेबाबत शोक व्यक्त करत राज्य आणि केंद्र सरकारला काही सूचना केल्या आहेत. स्थलांतरी मजूरांचा प्रश्न गंभीर असून तो सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असेही पवार यांनी म्हटलंय.

औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात रेल्वे रुळावर थकून झोपलेले १६ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडले गेल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सर्व मजूर मध्य प्रदेश येथील असून, ते जालना येथे लॉकडाऊनमध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते. जालना येथील स्टील कंपनीचे १९ कामगार भुसावळला जाण्यासाठी रेल्वे रुळावरून पायी निघाले होते. सटाना परिसरात ते रुळावर झोपले असताना मालगाडीने त्यांना चिरडले. यात १६ जण ठार, तर २ कामगार जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही शोक व्यक्त केला आहे. राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुबीयांस ५ लाखांची मदत घोषित करण्यात आली आहे. औरंगाबादमधील या घटनेनंतर खासदार शरद पवार यांनी राज्य सरकारला काही सूचना केल्या आहेत. तसेच, कामगरांच्या स्थलांतरणाचा मुद्दा ऐरणीवर आल्याचेही पवार म्हणाले.

”औरंगाबादजवळील करमाड रेल्वे दुर्घटनेत मजुरांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी अतिशय व्यथित करणारी आहे. कोरोना महामारीच्या काळातील या अपघाताने केवळ मनाला यातनाच झाल्या नाही, तर पायी चालत आपल्या मूळ गावी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचे बिकट प्रश्न ऐरणीवर आले आहेत. असंघटित क्षेत्रातील मजूर सद्यस्थितीत बेरोजगारीच्या भीतीने शहर सोडून जात असेल तर सर्वप्रथम त्याच्या रोजगाराच्या ठिकाणच्या कॉण्ट्रॅक्टर अथवा मालकाने त्यांची काळजी घ्यावी. ते शक्य होत नसल्यास सरकारला कळवावं. राज्य सरकारांनीही या स्थलांतरित मजुरांसाठी भरारी पथकांची नियुक्ती करून सातत्याने त्यांचा पाठपुरावा करून त्यांच्या गरजांबाबत काळजी घ्यावी. केंद्र व राज्य सरकारांनी एकत्रित येऊन तातडीने दखल घेऊन या प्रश्नांची सोडवणूक करावी”, अशा सूचनाही पवार यांनी केल्या आहेत.जालना येथील एसआरजे कंपनीत मध्य प्रदेश येथील १९ मजूर काम करतात. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हे मजूर जालना येथे अडकले गेले. दरम्यान, शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत, अशी माहिती या मजुरांना मिळाली. तसेच भुसावळ येथून मध्य प्रदेशला रेल्वे जाणार असल्याची माहिती या १९ मजुरांना मिळाली असता पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते रेल्वे रुळाच्या मार्गे औरंगाबादच्या दिशेने चालत निघाले. सटाणा परिसरात रात्री थकून हे मजूर रेल्वे रुळावर झोपले. पहाटे अचानक एक मालवाहू रेल्वे त्यांच्या दिशेने आली. काही कळायच्या आत १६ मजूर रेल्वे खाली चिरडले गेले, तर दोघे गंभीर जखमी असून तिघे प्राण वाचविण्यात यशस्वी झाले आहेत.

पुण्याच्या अग्निशामक दलात कोरोनाचा शिरकाव; पन्नास वर्षीय जवानाला लागण

पुणे : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लढत असलेल्या कोरोना योद्ध्यांना कोरोनाचीआगण होऊ लागलेली आहे. 2 महिला पालिका आणि १ पोलीस कर्मचारी शहीद झाल्यानंतर , आणि ३ नगरसेवकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर   आता अग्निशामक दलाच्या जवानाला कोरोनाची लागण झाली आहे. अग्निशामक दलाच्या जवानाला लागण व्हायची ही पहिलीच घटना असून या जवानावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशामक दलाचा संबंधित कर्मचारी ५० वर्षांचा असून तो बंबावर चालक म्हणून काम करतो. पत्नी व मुलीसह दलाच्याच क्वॉर्टर्समध्ये राहण्यास आहे. या कर्मचाऱ्याला मागील आठवड्यात श्वास घेण्यात अडचण जाणवत होती. तसेच अंगदुखीचा त्रास जाणवू लागला होता. स्वतःची तपासणी करून घेत हा कर्मचारी सोमवारी दवाखान्यात दाखल झाला. त्याची स्वाब टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला. स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
हा कर्मचारी अन्य कोणाच्या संपर्कात आला होता का याचा शोध घेण्यात येत आहे. यासोबतच त्याने ज्या शिफ्टला काम केले आहे, त्या शिफ्टमधील जवानांची तपासणी केली जाणार आहे. यासोबतच त्यांनी ज्या ज्या ठिकाणी वर्दीला गाडी नेली होती त्या ठिकाणांचीही माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अग्निशामक दलात पहिला रुग्ण आढळून आल्याने आपत्कालीन व्यवस्थेतील आणखी एका यंत्रणेमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. अन्य जवानांनी काळजी घेण्याचे तसेच सुरक्षा साधने वापरण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे

औरंगाबादजवळ रेल्वे अपघातात १४ ठार, सर्वजण पायी गावाकडे जाणारे मजूर

0

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हतबल होऊन घरी निघालेल्या मजुरांवर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. औरंगाबाद-जालना दरम्यान करमाड येथे लोहमार्गवर झोपलेले मध्यप्रदेशातील 16 मजूर मालगाडीखाली सापडून जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाले. चार मजूर बाजूला झोपले असल्याने सुदैवाने बचावले आहेत. आज (शुक्रवारी) पहाटे चारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हे सर्व 21 मजूर एका खासगी कंपनीत कामाला होते. कंपनीच्या मालकाला न सांगताच मध्यप्रदेशातील त्यांच्या गावी ते पायी निघाले होते. लोहमार्गावरून ते भुसावळच्या दिशेने निघाले होते. चालून दमल्याने ते लोहमार्गावर बसले आणि रेल्वेगाड्या बंद असल्याचे समजून लोहमार्गावरच झोपी गेले. मात्र झोपेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

जालनाकडून औरंगाबादला जाणाऱ्या मालगाडीखाली सापडून 16 मजूर जागीच ठार झाले. एक मजूर गंभीर जखमी अवस्थेत आढळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार मजूर लोहमार्गाच्या बाजूला झोपले असल्यामुळे त्यांच्या सुदैवाने बचावले. दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यामुळे हे मजूर मिळेल त्या रस्त्याने घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, जालना येथील एका कंपनीत मध्य प्रदेश येथील १९ मजूर काम करतात. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हे मजूर जालना येथे अडकले गेले. दरम्यान, शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत, अशी माहिती या मजुरांना मिळाली. तसेच भुसावळ येथून मध्य प्रदेशला रेल्वे जाणार असल्याची माहिती या १९ मजुरांना मिळाली असता पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते रेल्वे रुळाच्या मार्गे औरंगाबादच्या दिशेने चालत निघाले. सटाणा परिसरात रात्री थकून हे मजूर रेल्वे रुळावर झोपले. पहाटे अचानक एक मालवाहू रेल्वे त्यांच्या दिशेने आली. काही कळायच्या आत १६ मजूर रेल्वे खाली चिरडले गेले, तर दोघे गंभीर जखमी असून तिघे प्राण वाचविण्यात यशस्वी झाले आहेत.

जिवंत प्रत्यक्षदर्शी मजूर:-
1) इंद्रलाल कमलसिंग धुर्वे (वय 20 वर्ष), रा. पोवडी, ता. घोगरी, जिल्हा मांडला
2) वेरेंद्रसिंग चेंनसिंग गौर (वय 27 वर्ष), रा. ममान, ता. पाली, जिल्हा उमरिया
3) शिवमानसिंग हिरालाल गौर (वय 27 वर्ष) रा. शाहारगड, ता. शाही, जिल्हा शाहडोल

जखमी व्यक्ती :-
1) सज्जनसिंग माखनसिंग धुर्वे, रा. पोंडी, ता. जुनावणी, जिल्हा मंडल खजेरी

औरंगाबाद रेल्वे अपघातातील मृतांची नावं

1)धनसिंग गोंड रा. अंतवळी जी. शाहडोल, राज्य – मध्य प्रदेश.
2) निरवेश सिंग गोंड, अंतवळी जी. शाहडोल, मध्य प्रदेश
3) बुद्धराज सिंग गोंड, रा. अंतवळी जी. शाहडोल, मध्य प्रदेश
4) अच्छेलाल सिंग, चिल्हारी, मानपुर जी. उमरिया मध्य प्रदेश
5) रबेंन्द्र सिंग गोंड, रा. अंतवळी, जी. शाहडोल, मध्य प्रदेश
6) सुरेश सिंग कौल, जी. सडोळ, मध्य प्रदेश
7) राजबोहरम पारस सिंग, रा. अंतवळी, जी. शाहडोल, मध्य प्रदेश
8) धर्मेंद्रसिंग गोंड, रा. अंतवळी, जी. शाहडोल, मध्य प्रदेश
9) बिगेंद्र सिंग चैनसिंग, रा. ममाज, तहसील पाळी, जी. उमरिया, मध्य प्रदेश
10) प्रदीप सिंग गोंड, रा. जमडी, तहसील पाळी, जी. उमरिया, मध्य प्रदेश
11) संतोष नापित,

12) ब्रिजेश भेयादीन रा. बहिरा इटोला, शहरगड चाटी, सहडोल.

13) मुनीमसिंग शिवरतन सिंग, रा. नेवासा, पोस्ट, बकेली तहसली पाळी, जी. उमरिया.
14) श्रीदयाल सिंग रा. अंतवळी जी. शाहडोल, मध्य प्रदेश
15) नेमशाह सिंग चमदु सिंग, रा. नेवासा, पोस्ट बकेली, जी. उमरिया.
16) दिपक सिंग अशोक सिंग गौड रा. अंतवळी जी. शाहडोल, मध्य प्रदेश

 

 

 

 

 

मे अखेर पर्यंत किती जणांना होवू शकेल कोरोना- पहा महापालिका आयुक्त काय म्हणाले (व्हिडिओ)

पुणे- पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे कोरोना ची लढाई ही दीर्घकाल चालणार असून, मोठी कसरत करत आपल्याला कोरोनावर मात करावी लागणार आहे असे सांगत आज आपल्या भेटीला आलेल्या व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्यांना पहा काय आवाहन केले महापालिका आयुक्त शेखर गायकवाड़ यांनी …  …

महापालिका कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात उद्यापासून मास्क व रेशन देणार

पुणे- काँग्रेस चे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी केलेल्या मागणी नुसार प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना आत व बाहेर जाता येत नसल्याने या परिसरातील नागरिकांना पुणे महानगरपालिकेच्या वतीने उद्यापासून घरोघरी मोफत मास्क व रेशन वितरित केले जाणार आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ व महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली.

नागरिकांना देण्यात येणाऱ्या रेशन किटमध्ये जीवनावश्यक वस्तू अर्थात साखर, पीठ, गोडेतेल, तूरडाळ, तांदूळ, पोहे, मीठ, साबण, मिरची पावडर, चहापावडर व दुधपावडर या जीवनावश्यक वस्तूंचा रेशन किट मध्ये समावेश आहे. प्रतिबंधित ६९ क्षेत्रातील सुमारे ७०,००० घरांमध्ये  जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण करण्यात येणार आहे.

पुण्यातून १०९३ मजूर मध्यप्रदेशात रवाना-श्रमिक स्पेशल पहिलीच रेल्वे रवाना

लॉकडाऊनमुळे अडकलेले परराज्यातील १०९३ मजूर रवाना
पुणे, दि 7: लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या निवारागृहात असलेल्या मध्य प्रदेशातील १०९३ मजुरांना घेऊन उरळी कांचन (पुणे) ते रेवा (मध्य प्रदेश) विशेष रेल्वे आज सायंकाळी रवाना झाली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील,
उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांच्यासह रेल्वे तसेच पोलीस, महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


पुणे जिल्हा प्रशासनाकडून या प्रवाशांसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून चोख व्यवस्था केली होती. या ठिकाणी त्यांची आरोग्य विभागाकडून तपासणीही करण्यात आली. रेल्वेमध्ये पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक करण्यात आले होते. प्रवाशांसाठी चालवण्यात येणारी ही रेल्वे पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात आली असून प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची खात्री करुन घेण्यात येत होती. तसेच प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. याशिवाय सोबत खाद्यपदार्थही देण्यात आले होते.
पुणे जिल्ह्यातून सोडण्यात आलेली ही पहिलीच रेल्वे असून आवश्यकतेनुसार आणखी रेल्वे सोडल्या जातील, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
‘भारत माता की जय’च्या घोषणा देवून आणि टाळ्यांच्या कडकडाट करून या प्रवाशांना निरोप देण्यात आला.

आज १२१६ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १७ हजार ९७४ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि.७: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या  १७ हजार ९७४ झाली आहे. आज  १२१६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज  २०७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३०१ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ०२ हजार १०५ नमुन्यांपैकी १ लाख ८३ हजार ८८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर १७ हजार ९७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख १२ हजार ७४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ४९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील विविध रुग्णालयात भरती असलेल्या ८८१६ रुग्णांचे त्यांच्या लक्षणाच्या तीव्रतेनुसार विश्लेषण केले असता पुढील निष्कर्ष समोर आले आहेत –

●        या एकूण भरती रुग्णांपैकी ५२२८ ( ५९ टक्के) रुग्ण हे लक्षणे विरहित आहेत.

●        ३२०९ (३६ टक्के) रुग्ण हे सौम्य ते मध्यम लक्षणे असणारे आहेत. तर

●        ४२४ ( ५ टक्के) रुग्ण हे गंभीर स्वरुपाचे असून त्यातील २३६ ( ३ टक्के)  रुग्ण ऑक्सिजनची आवश्यकता असणारे आहेत तर ९२ (१ टक्के) रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता लागलेली आहे. उर्वरित ९६ रुग्ण  इतर कारणांमुळे अतिदक्षता विभागात भरती आहेत.

आज राज्यात ४३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ६९४ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील २४, पुण्यातील ७ , वसई विरार मध्ये ५, सोलापूर शहरात २, अकोला शहरात १, पालघरमध्ये १ आणि  औरंगाबाद शहरात १ मृत्यू झाला आहे.  याशिवाय मणिपूरमधील १ आणि बिहारमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी २४ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ४३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २५  रुग्ण आहेत तर १४  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. ४३ रुग्णांपैकी २९ जणांमध्ये ( ६७ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ६९४  झाली आहे.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ११ हजार ३९४ (४३७)

ठाणे: ९३ (२)

ठाणे मनपा: ६५० (८)

नवी मुंबई मनपा: ६५९ (४)

कल्याण डोंबिवली मनपा: २६३ (३)

उल्हासनगर मनपा: १४

भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२)

मीरा भाईंदर मनपा: १८९ (२)

पालघर: ४६ (१)

वसई विरार मनपा: १८७ (९)

रायगड: ७६ (१)

पनवेल मनपा: १२५ (२)

ठाणे मंडळ एकूण: १३,७१७ (४७२)

नाशिक: ४७

नाशिक मनपा: ५४

मालेगाव मनपा:  ४३२ (१२)

अहमदनगर: ४४ (२)

अहमदनगर मनपा: ०९

धुळे: ८ (२)

धुळे मनपा: २४ (१)

जळगाव: ६४ (११)

जळगाव मनपा: १४ (२)

नंदूरबार: १९ (१)

नाशिक मंडळ एकूण: ७१५ (३१)

पुणे: १०५ (४)

पुणे मनपा: १८९९ (१२२)

पिंपरी चिंचवड मनपा: १२५ (३)

सोलापूर: ६

सोलापूर मनपा: १७७ (१०)

सातारा: ९४ (२)

पुणे मंडळ एकूण: २४०६ (१४१)

कोल्हापूर: १० (१)

कोल्हापूर मनपा: ६

सांगली: ३२

सांगली मिरज कुपवाड मनपा: ३ (१)

सिंधुदुर्ग: ४ (१)

रत्नागिरी: १६ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ७१ (३)

औरंगाबाद:३

औरंगाबाद मनपा: ३९७ (१२)

जालना: ८

हिंगोली: ५८

परभणी: १ (१)

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ४६८ (१३)

लातूर: २५ (१)

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ३

नांदेड मनपा: २९ (२)

लातूर मंडळ एकूण: ६१ (३)

अकोला: ९ (१)

अकोला मनपा: ९० (९)

अमरावती: ४ (१)

अमरावती मनपा: ६९ (९)

यवतमाळ: ९३

बुलढाणा: २४ (१)

वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: २९० (२१)

नागपूर: २

नागपूर मनपा: २०४ (२)

वर्धा: ०

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: १

चंद्रपूर मनपा: ३

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: २१२ (२)

इतर राज्ये: ३४ (८)

एकूण:  १७ हजार ९७४ (६९४)

( टीप – आय सी एम आर पोर्टलवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज रोजी दाखविण्यात आलेल्या नवीन ८२६ रुग्णांपैकी १४६ रुग्णांचा समावेश रिकांन्सेलेशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.

(ही माहिती केंद्र सरकारच्या कोविड १९ पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. सदरील अहवाल आयसीएमआर टेस्ट आय डी १३६२०२३ पर्यंतचा आहे. राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता उर्वरित सर्व महानगरपालिका आणि जिल्ह्यांची आकडेवारी डेटा क्लिनिंगनुसार आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या प्रगतीपर आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.यापूर्वी कळविण्यात आलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मृत्यू मुंबई मनपा क्षेत्रातील असल्याने तो आज  मुंबईमध्ये दर्शविण्यात आला आहे.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १०८७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १२ हजार २१ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ५१.७६  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

मुंबईत संस्थात्मक क्वारंटाईनसाठी आक्रमकपणे पावले उचलणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि. ७:  मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईनवर भर देण्यासाठी आक्रमकपणे पावले उचलणे आवश्यक असून त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात सहा जिल्हे ग्रीन झोन मध्ये असून ते पुन्हा ऑरेंज झोन मध्ये जाणार नाहीत आणि ऑरेंज झोन मधील जिल्ह्यांचा रेड झोनकडे प्रवास होणार नाही यासाठी कंटेंटमेंट झोन मधील नियमांचे काटेकोरपणे पालन आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

आरोग्यमंत्र्यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. त्यातील महत्त्वाचे मुद्दे असे :

• केंद्राचे पथक राज्याच्या दौऱ्यावर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत या पथकाची बैठक झाली. त्यांनी मुंबईमध्ये दाट लोकवस्तीतील पॉझिटिव्ह रुग्णांपासून निकट सहवासितांना होणारा संसर्ग टाळण्यासाठी संस्थात्मक क्वारंटाईन करणे आवश्यक असल्याच्या मुद्यावर भर दिला. त्याप्रमाणे मुंबई महापालिकेला सूचना देण्यात आल्या असून आता अधिक आक्रमकपणे संस्थात्मक क्वारंटाईनसाठी कार्यवाही करावी लागेल. त्यासाठी मैदाने, हॉल घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

• मुंबईत रुग्णवाढीचा गणितीशास्त्रानुसार जो अंदाज मांडला जात आहे त्याकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत नाही. मात्र रुग्णसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढत नाही.

• कंटेंटमेंट झोनमधील नागरिकांनी नियमांचे आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. या भागातील नगरिकांनी अधिक जागरूक राहून संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

• मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स, बीकेसी, गोरेगाव येथे रुग्णालय उभारण्याचे काम सुरू असून त्याद्वारे सुमारे २००० नवीन खाटा उपलब्ध होणार आहेत.

• राज्यात सध्या ६४ प्रयोगशाळा असून त्या माध्यमातून दिवसाला सुमारे ९ ते १० हजार चाचण्या होत आहेत.

• प्रयोगशाळांवरील चाचण्यांचा भार कमी करण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या १४ दिवसानंतर करण्यात येणाऱ्या दोन चाचण्यांचा कालावधी कमी करून तो सात दिवसांवर किंवा १० दिवसांवर आणावा का? किंवा दोन ऐवजी एकच चाचणी करावी का याबाबत आयसीएमआर कडून लवकरच मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील.

• लक्षणे असल्यास ती समाजाच्या भीतीने ती लपवू नका. संसर्ग टाळण्यासाठी पुढे येऊन लवकर निदान करून घ्या. समाजाचे नुकसान होऊ देऊ नका. लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी वर्तणुकीतील बदलाबाबत जाणीवजागृती केली जात आहे.

• आरोग्य विभागातील एकही जागा रिक्त राहणार नाही. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी मान्यता मिळाली आहे.

• लॉकडाऊनच्या काळात तंत्रज्ञानाच्या मदतीने पदभरतीचे काम केले जाईल.

• कोरोना वगळता अन्य आजारांच्या रुग्णांवर उपचार शस्त्रक्रिया होणे आवश्यक आहे.

• खासगी रुग्णालयांनी कोरोनाच्या रुग्णांकडून मनमानी पद्धतीने बिल आकारणी करू नये यासाठी राज्य शासनाने अशा मनमानी आकारणीला चाप लावण्याचं काम केले आहे.

• लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी जाऊ इच्छिणारे स्थलांतरित कामगार, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्ती यांना प्रवास सुरु करण्यापूर्वी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी मोफत केली जाणार आहे.

कोरोना विरोधी लढ्यासाठी पुणेरी पाट्याही अग्रभागी (व्हिडिओ) 

पुणे-पुणेकरांच्या नावानं शिमगा करण्यात कोण पुढे नसतं , पण संकटाच्या काळी, वेळप्रसंगी एकत्र आले नाही ते पुणेकर कसले ? एरवी एकमेकांना शालजोडीतून मारणारे .. टोमण्यांनी घायाळ करणाऱ्या पुणेरी पाट्या तशा आमच्या फेमस आहेतच . पण कोरोना च्या विरोधातील लढ्यात त्याही तशा मागे राहिलेल्या नाहीत .कोरोना कोरोना करीत बसण्यापेक्षा कोरोना विरोधात लढा कसा द्यायचा आहे हे सांगण्यात पुणेरी पाट्याही गेल्या ४० दिवसात पुढे आल्याच्या दिसल्या त्यातल्या त्यात  या काही पुणेरी पाट्या सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते बाप्पू मानकर यांनी पाठविल्या आहेत जरा त्याही पाहून घ्या .. आणि कोरोना विरोधातला लढा आता संयमित पण यशस्वी करून दाखवा .अन्यथा आम्ही पुणेकर कसले नाही का ?पहा एक झलक ….