Home Blog Page 2596

महादेव नगर येथील पाण्याची टाकी, जलवाहिन्याची कामे अंतिम टप्प्यात

 

पुणे- वडगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून पुणे शहरामधील बर्याच भागांना म्हणजेच सिंहगड रस्ता, धनकवडी गावठाण, आंबेगाव पठार, आंबेगाव बुद्रुक, टिळेकर नगर, बालाजी नगर, दत्तनगर, संतोष नगर, आंबेगाईन खुर्द, कोंढवा खुर्द, येवलेवाडी, कात्रज गावठाण, सुखसागरनागर, दत्तनगर, गुजर वाडी, निंबाळकर वाडी, इत्यादी भागांना पाणी पुरवठा होतो. हा पाणी पुरवठा विविध ठिकाणी असलेल्या साठवण टाक्यांमधून करण्यात येतो. मात्र या टाक्यांवरचा भार कमी करणे व या सर्व भागांना अधिक सुरळीत व नियमित पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने, महादेव नगर येथे ६0 लाख लिटर च्या टाकीचे बांधकाम पुणे महानगरपालिकेमार्फत हाती घेण्यात आलेले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी साठवण क्षमता वाढावी या उद्देशाने चालू करण्यात आलेले हे काम आता पूर्णत्वास आलेले आहे. राजस सोसायटी, सर्वोदय सोसायटी, गुजरवाडी रस्ता, गोकुलनगर, इत्यादी भागांना महादेव नगर टाकीतून पाणी पुरवठा होणार असल्याने केदारेश्वर टाकी वरचा भार बराच कमी होणार आहे. त्याच बरोबर महादेवनगर टाकीला फीडिंग साठी व वितरणासाठी आवश्यक असलेल्या नलिका टाकण्याचे काम जागेवर जोरात सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण होऊन वर नमूद केलेल्या भागांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अधिक सुरळीत व नियमित पाणी पुरवठा प्राप्त होऊ शकणार आहे. कोरोना आजाराने पुण्यामध्ये थैमान मांडलेले असताना नागरिकांच्या गरजेला प्राधान्य देऊन पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभाग मार्फत हे काम हाती घेण्यात आलेले आहे.

महसूलच हवा असेल तर अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घ्या

पुणे :
‘ कोरोना विषाणू साथीच्या प्रतिकूल परिस्थितीत महसुलच हवा असेल तर अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घ्या ‘अशी मागणी रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाच्या पुणे शहर जिल्हा शाखेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. पक्षाच्या पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट,प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे  यांनी शुक्रवारी हे पत्र मेल द्वारे पाठवून मागणी केली आहे. या आधी लोकजनशक्ती पक्षाने मद्य विक्रीची दुकाने सुरु करण्यास विरोध दर्शवला होता .
 ‘कोरोना विषाणू साथीच्या प्रतिकूल परिस्थितीत राज्याला महसुलाची चणचण भासणे अगदी साहजिक आहे,मात्र त्यासाठी मद्य विक्री दुकाने सुरु ठेवण्यासारखे धोकादायक निर्णय घेण्यापेक्षा महसूल वाढीचे अन्य पर्याय तपासावेत. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासारख्या अनेक निर्णयातून महसूल वाढीचा उद्देश साध्य होवू शकतो ,असे लोकजनशक्ती पक्षाने  या पत्रात म्हटले आहे .
राज्यात अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची मागणी प्रलंबित आहे. राज्यातील उपनगरात गरीब आणि मध्यम वर्गीयानी केलेली बांधकामे ,गुंठेवारी नियमित केल्यास आणि ती प्रक्रिया ऑन लाईन ,गतिमान केल्यास राज्याच्या तातडीच्या महसुलाची गरज भागू शकेल ,असे संजय अल्हाट यांनी म्हटले आहे. फक्त पुणे जिल्ह्यातच अशी  ३५ हजार हून अधिक प्रकरणे विचाराधीन आहेत ,नवी आकडेवारी तपासून स्थानिक संदर्भ तपासून निर्णय घेणे शक्य आहे ,असे त्यांनी या पत्रात लिहिले आहे .

कर्मवीर अण्णांचा ‘स्वावलंबना’चा मंत्र आजच्या घडीला उपयुक्त

0

मुंबई, दि. ९:- कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची ज्ञानगंगा खेडोपाडी पोहोचवली.  आजच्या सुशिक्षित आणि प्रगतशील महाराष्ट्राच्या जडणघडणीत कर्मवीर अण्णांच्या कार्याचा मोठा वाटा आहे. ‘कोरोना’ नंतर राज्याला सावरण्यासाठी त्यांचा ‘स्वावलंबना’चा मंत्र उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केले.

कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राज्यात शिक्षणाचे मोठे काम केले. ‘कमवा आणि शिका’ हा स्वावलंबनाचा स्वाभिमानी मंत्र त्यांनी महाराष्ट्राला दिला. रयत शिक्षण संस्थेच्या या योजनेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडले, त्यांनी राज्यासह देशाचे नाव मोठे केले. रयत शिक्षण संस्थेसाठी स्वावलंबन, स्वाभिमान, स्वतंत्र आणि स्वाध्याय ही चतुःसूत्री त्यांनी घालून दिली. ‘कोरोना’नंतरच्या लढाईत महाराष्ट्राला उभारी आणण्यासाठी त्यांची ‘स्वावलंबना’ची शिकवण आपल्याला उपयुक्त ठरेल. कर्मवीर अण्णांचे शैक्षणिक कार्य, विचार, योगदान सदैव प्रेरणा देत राहील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

‘कोरोना विरुद्ध डॉक्टर्स’ ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत सना शेखचे यश

पुणे :
  ‘कोरोना विरुद्ध डॉक्टर्स’या विषयावरील शिरूर पालिका आणि ‘वुई लव्ह शिरूर ‘ संस्थेतर्फे आयोजित ऑन लाईन चित्रकला स्पर्धेत सना शेखने २२ वर्षावरील गटात तृतीय क्रमांक मिळविला.सना शेख ही महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या स्कुल ऑफ आर्ट ची विद्यार्थिनी आहे. तिच्या यशाबद्दल प्राचार्य हेमा जैन यांनी अभिनंदन केले.

एकाचवेळी 50 जणांना व्हिडिओ कॉल, WhatsApp साठी भन्नाट फीचर

0

फेसबुकने गेल्या महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपवरही ‘मेसेंजर रुम्स’ हे फीचर उपलब्ध होईल असे सांगितले होते. यानंतर कंपनीने अँड्रॉइड अ‍ॅपच्या बीटा व्हर्जनवर या फीचरची टेस्टिंग सुरू केली होती. पण, आता मिळालेल्या माहितीनुसार हे फीचर स्मार्टफोनवर येण्याआधी Whatsapp Web साठी रोलआउट केले जाणार आहे. WhatsAppWeb वर व्हिडिओ कॉलिंगचा पर्याय असलेले हे फीचर लवकरच उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं जात आहे लॉकडाउनमुळे व्हिडिओ कॉलिंगचं वाढलेलं प्रमाण बघून फेसबुकने गेल्या महिन्यात मेसेंजर रूम्स हे नवीन फीचर आणले. याद्वारे एकाचवेळी 50 जणांना व्हिडिओ कॉल करता येणे शक्य आहे. ‘Messenger Rooms’ हे फीचर फेसबुक मेसेंजरमध्येच क्रिएट करण्यात आले आहे. आता हे फीचर लवकरच WhatsApp Web च्या युजर्ससाठी उपलब्ध होणार असल्याचं, व्हॉट्सअ‍ॅपचे सर्व फीचर्स ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo कडून सांगण्यात आलंय

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, मेसेंजर रूम्सचा शॉर्टकट आपल्या वेब प्लॅटफॉर्मवर अ‍ॅड करण्याचं WhatsApp कडून काम सुरू आहे. हे फीचर वेब व्हर्जन 2.2019.6 मध्ये उपलब्ध आहे. पण सर्व युजर्ससाठी अद्याप हे फीचर लॉन्च करण्यात आलेले नाही. याशिवाय फोनमधील मुख्य अ‍ॅपमध्ये मेसेंजर रुम्स हे फीचर वेगळं देण्याची कंपनीची योजना आहे. म्हणजे डॉक्यूमेंट्स आणि गॅलरी पर्यायांप्रमाणे मेसेंजर रुम्सचाही नवीन आयकॉन दिसू शकतो. पुढील महिन्यापर्यंत हे फीचर युजर्ससाठी उपलब्ध केली जाण्याची शक्यता आहे.

पुण्यातील रेड झोन पत्रे लावून सील

पुणे- बांबू लावूनही लोक ये जा करतात ,लॉक डाउन चा उद्देश सफल होत नाही म्हणून आज रात्री 11 नंतर पुण्यातील रेड झोन एरिया पत्रे लाऊन सील करण्यास प्रारंभ झाला . घराबाहेर पडू नका म्हणून स्पिकरवरुन सकाळ पासून आवाहन करण्यास आज काही ठिकाणी तर उदयापासुन संपूर्ण रेड झोन परिसरात प्रारंभ होणार आहे. कमी जागेतील , छोट्या छोट्या घरात जास्त व्यक्तसंख्या असलेल्या  कुटुंबांची अवस्था अर्थातच त्रासदायी होणार आहे. घरात राहुनही त्यांना फिजिकली डिस्टन्स पाळता येणे मुश्किल होणार आहे . अशा अवस्थेत रेड झोनला आता आणखी  खड़तर सामना करावा लागणार आहे. 

शहराच्या मध्यवर्ती पेठा पत्रे लावून सील करण्यात आल्या

कोणी आत जाऊ शकणार नाही, आणि कोणी बाहेर येवू शकणार नाही असे असले तरी सकाळी 10 ते 2 यावेळेत जीवनावश्यक म्हणजे भाजीपाला, दूध , किराणामालाची इथली आतिल दुकाने रहिवाशाना उपलब्ध असणार आहेत.

त्तपुर्वी  शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत कामगार पुतळा झोपडपट्टी व राजीव गांधीनगर, जुना तोफखाना येथे मेगा फोनद्वारे कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली. नागरिकांना मास्क वापरणे, सॅनिटायझर/ साबणाचा वापर करणे, स्वच्छता राखणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे याबाबत महापालिका सहायक आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांनी नागरिकांना करोनाबाबत सूचना दिल्या.

पुण्यात तपासणी वाढेल अन कोरोना रुग्णांची संख्या वाढेल

पुणे : संशयित कोरोना रुग्णांच्या नमुने तपासण्याची प्रक्रिया वाढविण्यात आल्यामुळे येत्या काही दिवसांत बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होणार आहे. मजुरांच्या परराज्यात स्थलांतरासाठी तीनच राज्यांनी परवानगी दिलेली आहे. मजुरांच्या स्थलांतरासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज भासणार नाही. त्याऐवजी प्रशासनाकडूनच वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलिस आयुक्त के. वेंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांशी संवाद साधला.

डॉ. म्हैसेकर म्हणाले,’मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या तीन राज्यांनी मजुरांच्या स्थलांतरासाठी परवानगी दिली आहे. अन्य राज्याकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही. तसेच, युरोपसह अन्य देशांमधून काही भारतीय व्यक्ती मायदेशी परत येत आहेत. त्यापैकी 80 व्यक्ती पुण्यात येणार असून, त्यांना 14 दिवस संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.

पोलिस आयुक्त के. वेंकटेशम म्हणाले, परराज्यातील व्यक्तींना स्थलांतरित करण्याबाबत पोलिस उपायुक्त यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने राजस्थान, तेलंगणा, बिहारसह आणि काही राज्यांमध्ये बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. पुढील दहा दिवस खूप महत्त्वाचे असून, नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, पुढील दहा ते पंधरा दिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होणार आहे. मृत्यूच्या प्रमाणात घट आणणे आणि बाधित रुग्णांची संख्या कमी करणे ही प्रशासनासमोर दोन मोठी आव्हाने आहेत.
मजुरांच्या स्थलांतरासाठी लवकरच आणखी तीन विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. परराज्यात जाणाऱ्या नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज भासणार नाही. त्याऐवजी प्रशासनाकडून वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी कोणत्याही दवाखान्यात जाण्याची गरज नाही. पुणे शहरात 68 हजार मजुरांनी तसेच पिंपरी-चिंचवड येथून सुमारे 35 हजार मजुरांनी नाव नोंदणी केली आहे. लातूर, नांदेड, यवतमाळ, धुळे यासह विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनाही बसेसच्या मदतीने मूळ गावी पाठविण्यात येत आहे. शहरालगतच्या ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि जिल्हा परिषदेमार्फत पूर्ण लक्ष देण्यात येईल.

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी संक्रमणशील भागात (कंटेनमेंट झोन) सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत दुकाने सुरू राहतील. तसेच अन्य ठिकाणी सकाळी 7 ते सायंकाळी सातपर्यंत दुकाने सुरू राहतील, असे स्पष्ट केले. संशयितांचे नमुने तपासण्यासाठी हॉटस्पॉट असलेल्या भागातच सुविधा सुरू करण्यात येत आहे. दररोज एक हजार नागरिकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या दुपटीने वाढण्याचा दर दहा दिवसांवरुन 11 दिवसांवर गेला आहे. त्यामुळे परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या प्रत्येक घरांमध्ये 15 दिवस पुरेल इतके अन्नधान्याचे किट देण्यात येत आहेत, असे गायकवाड यांनी सांगितले.

कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये 10 ते 17 मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ची कडक अंमलबजावणी करा-

पुणे, दि. 8- पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी 10 मे ते 17 मेपर्यंत कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये ‘लॉकडाऊन’ची (टाळेबंदी) कडक अंमलबजावणी करण्‍याच्‍या सूचना उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्‍या. कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी आरोग्‍य, वैद्यकीय शिक्षण आणि पोलीस विभागाला निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशीही ग्‍वाही त्‍यांनी दिली.

पुणे जिल्‍ह्यातील कोरोनाबाधित रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेऊन उपमुख्‍यमंत्री पवार यांनी आज विधानभवनातील (कॉन्सिल हॉल) झुंबर हॉलमध्‍ये बैठक घेतली. त्‍यावेळी ते बोलत होते. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक आरोग्‍य विभागाच्‍या संचालक डॉ. अर्चना पाटील, ससूनचे अधिष्‍ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांच्‍यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्‍यमंत्री  श्री. पवार म्‍हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबई पाठोपाठ पुणे हे महत्‍त्‍वाचे शहर आहे. येथील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण चिंता वाढवणारे आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी सध्‍या कार्यरत असलेले अधिकारी सक्षम असले तरी त्‍यांच्‍या मदतीसाठी इतरही अनुभवी अधिकारी दिले आहेत. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्‍हा प्रशासन, पोलीस विभाग, आरोग्‍य विभाग या सर्वांनी समन्‍वय राखून आपापली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी. कोरोनाचा संसर्ग रोखण्‍याबरोबरच खरीप हंगामाचीही जबाबदारी जिल्‍हा प्रशासनावर येणार आहे. यामध्‍ये योग्‍य तो समन्‍वय राखून नियोजनबध्‍द काम करण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी दिल्‍या. कोरोना रोखण्‍याच्‍या कामाला गती यावी यासाठी महसूल विभागातील वरिष्‍ठ अधिकारी डॉ. नितीन करीर आणि महेश पाठक यांचीही नेमणूक करण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

परराज्‍यातील जे मजूर आपापल्‍या राज्‍यात जाऊ इच्छित असतील त्‍यांना रेल्‍वेने पाठविण्‍याचे नियोजन करण्‍यात यावे, असे सांगून उपमुख्‍यमंत्री पवार यांनी या मजुरांच्‍या प्रवासाचा खर्च राज्‍य शासन किंवा सीएसआर फंडातून (सामाजिक उत्‍तरदायित्‍व निधी) करण्‍यात येईल, असे सांगितले. शहरातील ज्‍या भागात कोरोना बाधित रुग्‍ण अधिक आहेत, तेथून कोणालाही बाहेर जाऊ देण्‍यात येऊ नये, असे स्‍पष्‍ट निर्देश उपमुख्‍यमंत्री पवार यांनी दिले. राज्‍य राखीव पोलीस दलाची मदत घ्‍यावयाची असेल तर तीही मदत उपलब्‍ध करुन दिली जाईल,असेही त्‍यांनी सांगितले.

महापौर मुरलीधर मोहोळ म्‍हणाले, पुणे महापालिकेच्‍या वतीने 70 हजार कुटुंबाना शिधा देण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे. तसेच मास्‍क, सॅनिटायझर्सचे वाटप करण्‍यात येत आहे. याशिवाय नियमित आरोग्य तपासणी उपक्रमही राबविण्‍यात येत आहे.

विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी पुणे विभागात 837 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 885 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 891 असल्याची माहिती दिली. विभागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी सोलापूर जिल्‍ह्याचा दौरा करुन संबंधित विभागांना आवश्‍यक ती कार्यवाही करण्‍याच्‍या सूचना दिल्‍याचे सांगितले. सातारा जिल्‍ह्यातील कराड येथे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्‍याने उद्या सातारा जिल्‍ह्याच्‍या दौऱ्यावर जाणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व अधिकारी परस्‍पर समन्‍वयाने काम करत असून लवकरच कोरोना संसर्ग रोखण्‍यात यश येईल, अशी आशा व्‍यक्‍त केली. दुकाने उघडणे, नागरिकांना पेट्रोल-डिझेल उपलब्‍ध होणे याबाबत स्‍वयंस्‍पष्‍ट सूचना देण्‍यात आल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. परराज्‍यात तसेच पुणे जिल्‍ह्याच्‍या बाहेर दुसऱ्या जिल्‍ह्यात जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांच्‍या सोयीसाठी आवश्‍यक ते उपाय योजल्याचेही  त्‍यांनी सांगितले.

पुणे महापालिका आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी कंटेन्मेंट भागात महानगरपालिकेच्या वतीने घेण्‍यात येत असलेल्‍या खबरदारीची माहिती दिली. कोरोनाचे रुग्‍ण जास्‍त आढळून आलेल्‍या वस्‍तीजवळ 5 स्‍वॅब सेंटर सुरु करण्‍यात आले.  याशिवाय 6 मोबाईल स्‍वॅब युनिटही सुरु करण्‍यात आले आहेत. सार्वजनिक शौचालयांची नियमित स्‍वच्‍छता करण्‍यात येत आहे. आरोग्य सेवेवरील ताण कमी करण्‍यासाठी 200 डॉक्‍टरांच्‍या भरतीची प्रक्रिया उद्यापर्यंत पूर्ण होईल, असेही गायकवाड यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी जीवनावश्‍यक व बिगर जीवनावश्‍यक वस्‍तूंची दुकाने शासनाच्‍या निर्देशानुसार सुरु केल्याचे सांगितले. कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी महापालिकेच्‍या वतीने आवश्‍यक त्‍या सर्व उपायांची काटेकोर अंमलबजावणी करण्‍यात येईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई व जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक आरोग्‍य विभागाच्‍या संचालक डॉ. अर्चना पाटील, ससूनचे अधिष्‍ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनीही त्‍यांच्‍यावर सोपविण्‍यात आलेल्या  जबाबदारीबाबत तसेच करण्‍यात आलेल्‍या कार्यवाहीबाबत माहिती दिली.

आपली जबाबदारी झटकण्यासाठी आयुक्तांची बदली- विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

मुंबई दि. ८ -कोरोनाच्या संकटमय परिस्थितीत सरकार व प्रशासन यामधील अंतर्गत विसंवाद उघड झाला असल्याची टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.असूनआपली जबाबदारी झटकण्यासाठी आयुक्तांची बदली हा मार्ग नव्हेअसे म्हटले आहे.

ते असेही म्हणाले,’   गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासन आणि सरकार यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे जे चित्र आहे, आजची बदलीही हे मूर्तिमंत उदाहरण आहे. कोरोनो रोखण्याच्या दृष्टीने राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याची बाब कालच्या व्हिडीओ कॉन्फरसिंमध्ये आम्ही सरकारच्या निर्दशनास आणून दिली. अजय मेहता व प्रविण परेदशी यांच्यामधील युध्दाचा अंत झाला आहे की मध्यंतर झाला आहे याची मला कल्पना नाही पण या निमित्ताने प्रशासनातील समन्वयाचा अभाव उघड झाला आहे. सरकार व सरकारमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा व आरोग्य व्यवस्था कमकुवत झाली आहे. ज्यावेळी आपत्तीजनक परिस्थिती असते त्यावेळी सरकारी अधिकी-यांची बदली करण्याची परंपरा नाही. कोरोनो च्या परिस्थितीत मंत्रालय व महापालिका आयुक्त स्तरावर घेतलेल्या निर्णयामुळे यामध्ये मतभेद निर्माण झाले. त्यामुळे या कोरोनाच्या संकटमय परिस्थितीत सरकार व प्रशासन यामधील अंतर्गत विसंवाद उघड झाला.

आज १०८९ नवीन रुग्णांचे निदान-एकूण संख्या झाली १९ हजार ६३

0

मुंबई, दि. ८ : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ६३ झाली आहे. आज १०८९ नवीन रुग्णांचे निदान­ झाले आहे. राज्यात आज १६९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३४७० रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख १२ हजार ३५० नमुन्यांपैकी १ लाख ९२ हजार १९७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह तर १९ हजार ६३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ३९ हजार ५३१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ४९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ३७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ७३१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २५, पुण्यातील १०, जळगाव जिल्ह्यात १ तर अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १९ पुरुष तर १८ महिला आहेत. आज झालेल्या ३७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहेत. ३७ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये (७३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: १२,१४२ (४६२)

ठाणे: १०१ (२)

ठाणे मनपा: ७२४ (८)

नवी मुंबई मनपा: ७१६ (४)

कल्याण डोंबिवली मनपा: २८४ (३)

उल्हासनगर मनपा: १५

भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२)

मीरा भाईंदर मनपा: १९२ (२)

पालघर: ४६ (२)

वसई विरार मनपा: १९४ (९)

रायगड: ८१ (१)

पनवेल मनपा: १३२ (२)

ठाणे मंडळ एकूण: १४,६४८ (४९७)

नाशिक: ४७

नाशिक मनपा: ६०

मालेगाव मनपा:  ४५० (१२)

अहमदनगर: ४४ (२)

अहमदनगर मनपा: ०९

धुळे: ८ (२)

धुळे मनपा: २४ (१)

जळगाव: ८२ (१२)

जळगाव मनपा: १४ (२)

नंदूरबार: १९ (१)

नाशिक मंडळ एकूण: ७५७ (३२)

पुणे: ११० (४)

पुणे मनपा: १९३८ (१३२)

पिंपरी चिंचवड मनपा: १२९ (३)

सोलापूर: ६

सोलापूर मनपा: १७९ (१०)

सातारा: ९४ (२)

पुणे मंडळ एकूण: २४५६ (१५१)

कोल्हापूर: १० (१)

कोल्हापूर मनपा: ६

सांगली: ३२

सांगली मिरज कुपवाड मनपा: ३ (१)

सिंधुदुर्ग: ५

रत्नागिरी: १७ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ७३ (३)

औरंगाबाद: ५

औरंगाबाद मनपा: ४१८ (१२)

जालना: १२

हिंगोली: ५८

परभणी: १ (१)

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ४९५ (१३)

लातूर: २५ (१)

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ३

नांदेड मनपा: २९ (२)

लातूर मंडळ एकूण: ६१ (३)

अकोला: ९ (१)

अकोला मनपा: ११२ (९)

अमरावती: ४ (१)

अमरावती मनपा: ७६ (१०)

यवतमाळ: ९५

बुलढाणा: २४ (१)

वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: ३२१ (२२)

नागपूर: २

नागपूर मनपा: २१० (२)

वर्धा: ०

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: १

चंद्रपूर मनपा: ३

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: २१८ (२)

इतर राज्ये: ३४ (८)

एकूण:  १९ हजार ६३ (७३१)

(टीप – आय सी एम आर पोर्टलवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक ७ मे २०२० रोजी दाखविण्यात आलेल्या १४६ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या कोविड१९ पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. सदरील अहवाल आय सी एम आर टेस्ट आय डी १४४५०१८ पर्यंतचा आहे. राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता उर्वरित सर्व महानगरपालिका आणि जिल्ह्यांची आकडेवारी डेटा क्लिनिंगनुसार आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या प्रगतीपर आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ११३९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १३ हजार ५५२ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ५२.६४  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे

अनेक राज्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अनेक स्थलांतरित मजूर खोळंबले

0

मुंबई, दि. ८ : महाराष्ट्र सरकार विविध राज्यांत स्थलांतरित मजुरांना पाठविण्यासाठी कटिबद्ध आहे, मात्र बहुतांश राज्य आपल्या नागरिकांना घ्यायलाच तयार नसल्याने स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे, या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून स्पष्ट निर्देश जाहीर करायला हवेत अन्यथा मजुरांच्या भावनांचा उद्रेक होईल, अशी चिंता राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, स्थलांतरित मजूरांना त्यांच्या राज्यात पाठविण्याचे काम सुरू असले तरी इतर राज्ये सहकार्य करत नसल्याने त्यांना पाठविण्यात अनेक अडचणी येत आहेत. महाराष्ट्रातून आपल्या गृहराज्यात जाऊ इच्छिणाऱ्या स्थलांतरित मजुरांची संख्या अंदाजे १० लाखांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत स्थलांतरित मजूरांना घेऊन ३२ ट्रेन वेगवेगळ्या राज्यात गेल्या आहेत. परंतू विविध राज्य सरकारांची महाराष्ट्रातून परत येणाऱ्या मजुरांबाबतच्या भूमिकेमुळे यात समस्या येत आहेत. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पश्चिम बंगाल आणि ओरिसा या दोन राज्यातील कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. गृहराज्यात जाऊ इच्छिणाऱ्या मजुरांच्या याद्या तयार आहेत पण पश्चिम बंगाल सरकार महाराष्ट्रात अडकलेल्या कामगारांना परत त्यांच्या राज्यात येण्यास परवानगी देत नाही.

ओरिसा हायकोर्टाच्या एका निर्णयामुळे कोविड टेस्ट झालेल्या आणि कोरोनाची लागण न झालेल्या मजूरांनाच राज्यात प्रवेश देण्याचा निर्णय ओडिशा सरकारने घेतला आहे. त्यामुळे ओरिसाचे कामगार महाराष्ट्रात अडकून पडले आहेत.कर्नाटक सरकार मुंबई आणि महाराष्ट्रात अडकलेल्या मजूरांना परत घ्यायला तयार नाही. गुजरात सरकारने मुंबई आणि महाराष्ट्रात अडकलेल्या मजूरांना परत घेण्यास नकार दिला आहे. तामिळनाडू सरकारची मुंबई आणि महाराष्ट्रात अडकलेल्या मजूरांना परत राज्यात घेण्याची प्रक्रिया अत्यंत जटील, किचकट आणि प्रचंड वेळखाऊ आहे. उत्तर प्रदेश सरकारनेही सुरुवातीला मजूरांना आपल्या राज्यात घेण्यास परवानगी नाकारली होती त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती पण त्यांनी त्यांचा निर्णय बदलून मजूरांना उत्तर प्रदेशात येण्याची परवानगी दिल्याने उत्तर प्रदेशात मजूरांना पाठवण्यास सुरुवात झाली आहे, मात्र ही प्रक्रिया सुलभ नाही त्यांच्या अटी मोठ्या प्रमाणावर असल्याने अडचणी तशाच आहेत. बिहार सरकार मजूरांना राज्यात घेण्याबाबत परवापर्यंत सहकार्य करत होते. हजारो मजूरांच्या प्रवासाचा खर्च करून त्यांना मूळगावी बिहारमध्ये पाठवले पण बिहार सरकारने परवानगी नाकारल्याने बिहारला जाणाऱ्या ट्रेन सुटू शकल्या नाहीत, असे थोरात म्हणाले.

आज औरंगाबाद जवळ झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी असून या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून थोरात म्हणाले की, या संकटकाळात महाराष्ट्र सरकार मजूर बांधवांसोबत आहे. स्थलांतरित बांधवांनी जेथे आहेत तिथेच थांबावे, त्यांना त्यांच्या गृहराज्यात पाठविण्यासाठी महाराष्ट्र सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे.

तेलंगणाचे १३४ जण आपल्या गावी रवाना

 

भाजप प्रदेशाध्यक्ष  आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून दोन विशेष बस व्यवस्था

पुणे- लॉकडाऊननंतर पुण्यात अडकलेले तेलंगणाचे १३४ नागरीक गुरुवारी रात्री आपल्या मूळ गावी जाण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यांना आपल्या गावी सुखरूप जाता यावे, यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुड पोलिसांच्या मदतीने विशेष बस उपलब्ध करून दिल्या.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यानंतर अनेकजण विविध ठिकाणी अडकून पडले होते. ४ मेनंतर यामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात येत होती. यानंतर प्रशासनाच्यावतीने अनेकांची आरोग्य तपासणी करुन, त्यांना मूळ गावी जाण्यासाठी फीट असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र आपापल्या गावी जाण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत असल्याने तपासणी केंद्रे कमी पडत होती.

याची दखल घेऊन श्री. पाटील यांनी स्थानिक प्रशासन आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कोथरुडमध्ये ५ मेपासून तीन दिवस आरोग्य तपासणी शिबिर राबविले. यात सुमारे सहा हजार जणांची तपासणी करुन त्यांना वैद्यकीय तपासणीचे प्रमाणपत्र दिले. त्यापैकी तेलंगणातील सुमारे १३४ जणांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी पुणे पोलिसांच्या मदतीने विशेष आराम बसेस उपलब्ध करून दिल्या. गुरुवारी रात्री आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी श्रीफळ वाढवून सर्व प्रवाशांना शुभेच्छा दिल्या, यानंतर या सर्व बसेस प्रवाशांना घेऊन रवाना झाल्या.

लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केल्यास यातून लवकर सुटका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद (व्हिडिओ)

0

मुंबई दि. ८ : महाराष्ट्र हा शिवरायांचा लढवय्या महाराष्ट्र असून मुंबईत लष्कराची गरज नाही. येथील प्रत्येक नागरिक हाच जवान आहे. त्यामुळे मुंबईत लष्कर आणणार किंवा, लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तुंची सर्व दुकाने बंद होणार या अफवा असून लोकांनी यावर विश्वास ठेऊ नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले तसेच ते पुढे म्हणाले की, लॉकडाऊन संपवणे आपल्या हातात आहे. आपण जेवढी शिस्त पाळू, संयम ठेऊन वागू तेवढी आपल्याला कोरोनाची साखळी तोडणे शक्य होणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी आतापर्यंत केले तसेच सहकार्य यापुढेही करावे, शिस्त पाळावी आणि कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3699038323502944&id=1501539223422053

आज मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमातील थेट प्रक्षेपणाद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते.

अस्वस्थ होऊ नका मुख्यमंत्र्यांचे आवाहन

औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर झालेल्या अपघाताने व्यथीत झाल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यातील मजूर-कामगार आणि लोकांना महाराष्ट्र शासन खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा, तुमच्या राज्याबरोबर, केंद्र सरकारबरोबर बोलणी सुरु असून तुम्हाला तुमच्या घरी, तुमच्या राज्यात सुखरूप पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, रेल्वे, बसची व्यवस्था करण्यात येत आहे त्यामुळे संयम सोडू नका, अस्वस्थ होऊ नका,गर्दी करू नका आणि अफवांना बळी पडू नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आरोग्य सुविधेत वाढ

कोरोनाचे संकट मोठे होत आहे तशा आपण आरोग्य सुविधाही वाढवत आहोत, रेसकोर्स मैदान, वांद्रे-कुर्ला संकुल, गोरेगावचे एक्झिबिशन सेंटर येथे आपण रुग्णांच्या विलगीकरणाची, उपचाराची व्यवस्था करत आहोत.  हे करतांना तोंडावर येऊन पोहोचलेल्या पावसाचाही विचार करावा लागत आहे. ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी  रेल्वे, बीपीटी आणि लष्कराची रुग्णालये वापरण्याची परवानगी आपण केंद्र शासनाकडे मागितली आहे. त्यास केंद्राने मान्यताही दिली आहे. सध्या सगळी यंत्रणा तणावाखाली आहे. पोलीस, डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार हे आपल्यासाठी लढत आहेत, आजारी पडत आहेत, दुर्देवाने काही पोलिसांचे मृत्यू देखील झाले आहेत. ते आजारी पडल्यानंतर त्यांना बाजूला करणे चुकीचे आहे, त्यांना थोड्या काळासाठी विश्रांती मिळावी म्हणून, पोलिसांना आलेला थकवा जावा म्हणून केंद्र सरकारकडे अतिरिक्त मनुष्यबळ देण्याची विनंती आपण करत आहोत.

हॉस्पिटलमध्ये गलथानपणा चालणार नाही

हॉस्पीटलधील गलथानपणा अजिबात सहन केला जाणार नाही असा इशारा देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीस, डॉक्टर हे आपल्यासाठी देव आहेत, त्यांच्यावर हल्ला करू नका, कडक कारवाई होईल. पण हे करतांना डॉक्टरांनीही गलथानपणे काम करू नये, कारवाईची वेळ आणू नये. टास्कफोर्स, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, आपल्यासोबत आहेत,  ही लढाई आपण एकमेकांच्या सहकार्याने सक्षमपणे लढत आहोत. तरी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आयुष, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टरांनी पुढे येऊन सर्वसामान्य रुग्णांना सेवा देण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये राज्याची विभागणी केली आहे रेड झोनमधील नियम अधिक कडक करतांना इतरत्र काही अटी आणि शर्थीच्या अधीन राहून आपण व्यवहार सुरु केले आहेत. लॉकडाऊन हे गतिरोधक आहे, त्यामुळे गती कमी झाली परंतू साखळी तोडण्यात अजून यश आले नाही. अजून काही ठिकाणी लोक शिस्त पाळताना दिसत नाहीत, तसे होऊ नये, आपल्याला कोरोनाची साखळी तोडायची आहे. आपण सर्व मिळून एकदाच कडक बंधने पाळू आणि ही साखळी तोडू असेही मुख्यमंत्री म्हणाले.

2 लाख चाचण्या

परदेशातून येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन केले जाणार आहे अशी माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, दोन लाखाच्या आसपास राज्यात कोरोना चाचण्या  झाल्या आहेत. काही जण अगदी शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात दाखल होत आहेत त्यामुळे इच्छा असूनही त्यांना वाचवता येत नाही. जर सर्दी, पडसे आणि खोकला असेल तर न घाबरता फिव्हर रुग्णालयात स्वत: येऊन तपासणी करून घ्या, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केले.

सव्वा तीन हजार रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात कोरोनाच्या १८ हजार केसेस पैकी सव्वातीन हजार लोक बरे होऊन घरी गेले आहेत. ही संख्या वाढते आहे काही गर्भवती महिला  ज्या कोरोना पॉझेटिव्ह आहेत त्या प्रसुत झाल्यानंतर बाळाला कोरोनाची लागण नाही हा चमत्कारही दिसून येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले

रस्ते ,गटारे,पदपथ अर्धवट कामे तातडीने पूर्ण करा -संदीप खर्डेकरांची मागणी

पुणे- शहरात  अनेक ठिकाणी रस्ते ,गटारे ,पदपथ अर्धवट खोदून त्यांची कामे लॉकडाऊन मुळे आणि अर्थसंकल्पीय समस्येमुळे तशीच अर्धवट सोडून देण्यात आली आहेत ज्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतो आहे. आता पावसाळा येईल, तुमची तांत्रिक समस्या काय असतील त्या शासकीय पातळीवर जरूर सोडवा पण रस्त्यावर परिस्थिती अशीच अर्धवट ठेवू नका ती कामे तातडीने पूर्ण करा अशी मागणी क्रिएटीव्ह फौंडेशन चे संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे

या निवेदनात असे म्हटले आहे कि,  मी केलेल्या मागणीनंतर आपण विकासकामे पूर्ण करण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंत मुदतवाढ दिली होती.मात्र Lockdown १७ मे पर्यंत वाढविण्यात आल्यानंतर विकासकामां बाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नसल्याचे समजते.केवळ पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई व इतर कामे सुरु करण्यात आली आहेत.मात्र अनेक ठिकाणी रस्ते / पदपथ खणलेल्या अवस्थेत आहेत.अनेक ठिकाणी ड्रेनेज वा बांधकाम अशी विकासनिधीतील अनेक कामे अर्धवट स्थितीत असल्याने पावसाळ्यात याचा नागरिकांना मोठा त्रास भोगावा लागण्याची शक्यता आहे.सध्या आपण ग्रीन झोन मधे लॉकडॉउन शिथिल केले आहे.अश्या सर्व भागातील अर्धवट स्थितीतील कामे युद्धपातळीवर पूर्ण करुन घेतल्यास नागरिकांना मन:स्ताप होणार नाही.तरी लॉकडॉउन काळातील सर्व नियम पाळून अर्धवट विकासकामे पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत ही विनंती

पुणे विभागात कोरोना बाधित 2 हजार 885 रुग्ण

-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 8:- पुणे विभागातील 837 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 885 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 891 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 91 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 2 हजार 885 बाधित रुग्ण असून 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 2 हजार 537 बाधीत रुग्ण असून 141 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 762 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 634 आहे. तर 86 रुग्णगंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.
सातारा जिल्हयात 114 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 14 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 98 आहे.
सोलापूर जिल्हयात 182 बाधीत रुग्ण असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 29 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 141 आहे.
सांगली जिल्हयात 37 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर 26 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 आहे.
कोल्हापूर जिल्हयात 15 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर 6 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे.
आजपर्यंत विभागात एकुण 29 हजार 319 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 27 हजार 795चा अहवाल प्राप्त झाला आहे. 1 हजार 524 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 24 हजार 930 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 2 हजार 885 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागात 85 लाख 23 हजार 712 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 3 कोटी 46 लाख 46 हजार 506 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 74 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
00000