Home Blog Page 2587

कोरोना योध्यांसह गरजूंच्या मदतीसाठी चॅरिटीज एड फाउंडेशन इंडियाचा पुढाकार

पुणे : ‘‘कोविड -१९ अर्थात कोरोनामुळे जग ठप्प झाले आहे. आम्ही अत्यंत

अनिश्चित, कठीण स्थितीत जगत आहोत. याहीपेक्षा कोरोनामुळे

उदभवलेली स्थिती विशिष्ट गटांसाठी अनेक पटीने धोकादायक ठरत आहे

. त्यांचे जगणे अतिशय असुरक्षित झाले आहे. कोरोनाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील सर्वात जास्त नुकसानग्रस्त राज्य आहे. सीएएफ इंडिया आपल्या भागीदारांसोबत सर्वांत वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह असुरक्षित गटांना मदत करण्यासाठी फिल्डवर काम करीत आहे,’’ अशी माहिती चॅरिटीज एड फाउंडेशन (सीएएफ) इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी बत्रा यांनी दिली.

बत्रा म्हणाल्या,‘‘वैद्यकीय कर्मचारी संसर्गजन्य भागात काम करत आहेत. अशा ठिकाणी या कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. तरीही ते त्यांचे आयुष्य धोक्यात घालून इतरांचे जीव वाचवित आहेत. पुणे महापालिकेने विविध भागात आयसोलेशन प्रभाग तयार केले आहेत. त्या ठिकाणी काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी सीएएफ इंडियाने टेट्रा पाक प्रा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) च्या सहकार्याने ३ हजारपेक्षा जास्त ‘पीपीई किट’ची मदत केली आहे. आमची टीम अशा प्रकारच्या कार्यक्रमांना पाठिंबा देत राहील. आम्ही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत उभे आहोत.’’

‘‘सीएएफ इंडियाने आतापर्यंत शहरी झोपडपट्टीत राहणाऱ्या, तसेच गावी परत गेलेल्या नागरिकांना मदत केली आहे. तसेच या संकटाच्या वेळी स्वच्छता राखणारे कर्मचारी, बांधकाम कामगार, आरोग्य कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी सुरक्षित राहण्यासाठी अन्नाची पाकिटे, पीपीई किट्स देऊन मदत केली आहे. आमच्या सर्व देणगीदारांचे आभारी आहोत. ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. वयक्तिक दृष्ट्या मदत करून सदर काम करण्यासाठी प्रोत्साहित केले. अशा आमच्या सर्व देणगीदारांचे आभारी आहोत,’’ असेही बत्रा यांनी सांगितले.
………
सीएएफचे महाराष्ट्रातील योगदान ः
– पुण्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना ३००० पीपीई किट दिल्या
– आरोग्य विभागांसाठी १० हजार एन -९५ मास्क पुरविले
– १४५ पेक्षा जास्त बांधकाम कामगारांना आवश्यक खाद्यपदार्थांचे वाटप केले
– ८०० हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना वैयक्तिक संरक्षक उपकरणे दिली
– मुख्यमंत्री मदत निधीसाठी १ कोटी रुपयांचा निधी
……………
सीएएफचे देशातील अन्य उपक्रम ः
– आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक आणि राजस्थानमधील मुख्यमंत्री 

मदत निधीसाठी प्रत्येकी एक कोटी रुपये.
– मध्य प्रदेश- छत्तीसगडमध्ये ९०० हून अधिक स्थलांतरित कामगारांच्या 

कुटूंबांना अन्न पुरविले
– २,००० हून अधिक निराधार लोकांची आरोग्य तपासणी
– ७८०० पेक्षा जास्त कुटुंबांना सरकारकडून लाभ, आर्थिक मदत मिळवून दिली
– दिल्लीतील जेजे कॉलनीत राहणाऱ्या रोजंदारीवर काम करणाऱ्‍यांना रेशन वाटप
– गुरुग्राम आणि दिल्लीमध्ये स्वच्छता कामगारांना ७८५ पेक्षा जास्त वैयक्तिक

 संरक्षक साधनांचे वितरण
– गुरुग्राम, हरियाणा महानगरपालिकेच्या कामगारांसाठी ५,००० हून अधिक

 फेस शिल्डचे वाटप
– जागरूकता अभियान आणि स्वयंसेवी संस्था सल्ला उपक्रम
– ॲस्ट्रॅजेनिका फार्मा लि. च्या भागीदारीतून पंजाब, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमधील आरोग्य विभागांना १ लाख एन-९५ मास्कचा पुरवठा
– हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमधील सुमारे २००० बांधकाम कामगारांना आवश्यक खाद्यपदार्थ
– गुजरातमधील १२०० हून अधिक पोलिसांना पीपीई किट्स पुरविल्या

सर्व सेवा संघांतर्फे पुण्यासह राज्यभरात अडकलेल्या ६० हजार मजूर कुटुंबांना अत्यावश्‍यक वस्तूंच्या किटची घरपोच मदत

पुणे, : ‘‘वडगाव शेरी येथील सर्व सेवा संघ या स्वयंसेवी संस्थेने लॉकडाउनमध्ये पहिल्या दिवसापासून अडकून पडलेल्या परराज्यातील सुमारे ६० हजार कुटुंबांना जीवनावश्‍यक वस्तूंचे किट वाटप केली. पुण्यातील वारजे, बावधन, आंबेगाव पठार, डुक्कर खिंड, वेद विहार येथे जागेवर जाऊन ही मदत पोच करण्यात येत आहे. याशिवाय उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ बीड येथे मजुरांना शोधून काढून ही मदत करण्यात येत आहे’’, अशी माहिती या संस्थेचे मॅथ्यूज यांनी दिली.

मुकुल माधव फाऊंडेशनच्या रितू छाब्रिया, बॅंगलोर येथील विप्रो फाऊंडेशन, पर्सिस्टंट फाऊंडेशन, फोर्ब्स मशिन कंपनी, हेल्थ फॉर इननिड, एससीएनएफ फाऊंडेशन, एसीजी कंपनी, सेव्ह द चिल्ड्रेन आदींनी या मदत कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक, सोशल पोलिसिंगचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर, वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

मॅथ्यूज म्हणाले, ‘‘ झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश आदी राज्यांतील मजुरांना ही मदत करण्यात येत आहे. या किटमध्ये तेल, आटा, साखर, साबण, तांदूळ, डाळी आदी वस्तूंचा समावेश आहे. देहविक्री करणाऱ्या महिलांची स्थिती बिकट आहे. अशा ३५० महिलांसह हडपसर येथील किन्नर समाजाच्या १०० जणांना महिनाभर पुरेल अशा या अत्यावश्‍यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. ’’

या बरोबरच सेव्ह द चिल्ड्रेन या संस्थेने सुमारे ३० हजार लोकांपर्यंत मदत पोचविली आहे. जामखेड, इंदापूर आदी ठिकाणच्या ऊसतोड मजुरांच्या मदतीलाही ही संस्था धावून गेली आहे. त्यामुळे हजारो मजुरांचे जगणे सुसह्य होण्यास मदत झाली. या सर्वांच्या मदतीने सर्व सेवा संघ अजूनही तितक्याच सेवाभावाच्या वृत्तीने गरजूंना मदत पोचवित आहे. त्यामुळे मजूरांकडून या संघाच्या कार्याचे कौतुक होत आहे.

प्लॅनेट मराठीची सहा नव्या सिनेमांच्या निर्मितीची घोषणा

निर्माते म्हणतात…

मराठी सिनेश्रुष्टीमध्ये सुसूत्रता आणून कोणत्याही बाबतीत आपण कोलमडून न जाता त्यावर मात करण्याची गरज आहे. म्हणूनच, येत्या काळात प्लॅनेट मराठी सहा नवे कोरे सिनेमे आणि वेब सिरीज घेऊन येणारं आहे. शिवाय, अनेक आर्थिक गणितं स्थिर राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

-अक्षय बर्दापूरकर (निर्माता, प्लॅनेट मराठी)

प्लॅनेट मराठीची पहिलीवहिली निर्मिती असलेला ‘एबी आणि सीडी’ हा धम्माल चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवसापासून करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सिनेमा आणि नाट्यगृह बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे ‘एबी आणि सीडी’ बरोबरीनेच इतर अनेक चित्रपटांच बॉक्स ऑफिसवरील आर्थिक गणित कोलमडल. पण, त्यामुळे डगमगून न जाता निर्माता अक्षय बर्दापूरकर आणि संपूर्ण टीमने हा चित्रपट ‘अॅमेझाॅन प्राइम’वर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधत हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आणि लोकांनी हा सिनेमा उचलून धरला. आता ‘एबी आणि सीडी’च्या भरघोस यशानंतर प्लॅनेट मराठी सहा नव्या कोऱ्या सिनेमा आणि वेबसिरीजची निर्मिती करणार आहे. प्लॅनेट मराठीचा सर्वेसर्वा आणि निर्माता अक्षय बर्दापूरकर याने नुकतीच ही घोषणा केली आहे. शांतनू रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ आणि प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ हे आगामी काळातील त्यांचे दोन महत्त्वाचे चित्रपट.

सिनेमाच्या यश-अपयशाबरोबरीने रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे कोणत्याही संकटापुढे खचून न जाता त्याचा धैर्याने सामना करत येणाऱ्या भविष्याला सामोरं जाण्याची तयारी प्रत्येकाने ठेवायला हवी आणि म्हणूनच अक्षय बर्दापूरकर यांनी या अटीतटीच्या काळातही घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाला धाडसच म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आपण जर ‘फिल्म इंडस्ट्री’ म्हणतो, तर त्यातून सतत निर्मिती होणं अत्यावशक असल्याचंही ते आवर्जून सांगतात. शिवाय, सिनेमाचे दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि पडद्यामागील सगळ्यांना येत्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करायला लागू नये म्हणून हा निर्णय त्या प्रत्येकासाठी मोलाचा ठरणारा आहे.

प्लॅनेट मराठी नेहमीच मराठी सिनेमा आणि कलाकार कोणत्याही बाबतीत मागे पडू नये म्हणून सतत प्रयत्नशील असतो. आता प्लॅनेट मराठीच्या या भविष्यातील विविध प्रोजेक्ट्समध्ये प्लॅनेट टॅलेंट मधील कलाकारांसोबतच नव्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नवीन कलाकारांना संधी देणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली. शिवाय वैविध्यपूर्ण अशा या अनेक चित्रपटामध्ये बॉलीवूडच्या बड्या कलाकारांच्या देखील भूमिका असणार आहेत. आता या सिनेमा आणि वेबसिरीजमध्ये कोण कलाकार असतील? त्यांचे दिग्दर्शक कोण असतील? आणि बॉलीवूडचे कोणते चेहरे यात झळकतील ही माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे.

ससून रुग्णालय नियंत्रणाचे सर्व प्रशासकीय अधिकार जमाबंदी आयुक्त एस. चोकलिंगम यांच्याकडे

पुणे : ससून रुग्णालय नियंत्रणाचे सर्व प्रशासकीय अधिकारी विभागिय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडून काढून जमाबंदी आयुक्त एस. चोकलिंगम यांच्याकडे गुरुवारी (ता.१४) देण्यात आलेपुण्यातील ससून रुग्णालयात सर्वाधिक कोरोना रुग्णांचे मृत्यू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची गेल्या महिन्यात तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यानंतर अधिष्ठातापदाचा कार्यभार डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे सोपविण्यात आला. तर, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय यांच्या नियंत्रण आणि प्रशासकीय निर्णयाचे अधिकार डॉ. म्हैसेकर यांना देण्यात आले होते.

त्या आदेशात बदल करून हे अधिकार आता चोकलिंगम यांना देण्यात आले आल्याचा निर्णय सरकारने घेतला. त्या बाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाचे उपसचिव संजय कमलाकर यांनी दिले आहेत.

डॉ. म्हैसेकर यांनी ससून रुग्णालयाच्या प्रशासकीय नियंत्रक पदाचा कार्यभार चोकलिंगम यांना सूपूर्द करावा. ससून रुग्णालयातील कामकाज, तेथील मनुष्यबळ आणि साधनसामग्री याची सविस्तर तपशिलवार माहिती डॉ. म्हैसेकर यांनी चोकलिंगम यांना द्यावी, असे या आदेशात म्हटले आहे.

डॉ. चंदनवाले यांच्या बदलीनंतर अधिष्ठाता पदाची सूत्रे हाती घेतलेल्या डॉ. तांबे यांच्याकडे आर्थिक अधिकार देण्यात आले होते. ते अधिकार या कायद्याने आबाधित ठेवले आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आले नाही.

डॉ. म्हैसेकर यांच्याकडे पुणे महसूल विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार आहे. विभागातील पाचही जिल्ह्यात कोरोनामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत सर्व प्रशासकीय यंत्रणांचे समन्वय व नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ही वस्तूस्थिती विचारात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.

पुणे विभागात 10 हजार 876 स्थलांतरित मजुरांना निवारा तर 69 हजार 321 मजुरांना भोजनाची सोय

 

पुणे दि. 15 : – सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 95 कॅम्प, कामगार विभागामार्फत 56 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 13 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 164 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 10 हजार 876 स्थलांतरित मजूर असून 69 हजार 321 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
0000

मंदिरांच्या पैशावर जगणाऱ्यांचा पोटसुळ नक्की उठेल. पण…!

सर्व धार्मिक स्थळांचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे.

पुणे-संभाजी ब्रिगेड ची भूमिका मांडली संतोष शिंदे यांनी..त्यांच्याच शब्दात वाचा जशी च्या तशी…

सगळे ‘देव’ सध्या ‘लाॕकडाऊन’ आहेत. कारण प्रत्येक धर्म आणि धार्मिक स्थळे (मंदिर) हे माणसांवर अवलंबून आहे. त्यांचा पैसा ‘मंदिर, मज्जित आथवा चर्च’ यांच्या तिजोरीत जातो. जर माणसं जिवंत राहिली तरच मंदिर मज्जित, चर्च किंवा गुरूव्दार यांना किंमत येईल… अन्यथा या कोरोना’च्या महामारीमुळे सर्व बेचिराख होईल. कदाचित मंदिरांवर जगणाऱ्याच्या पोटात पोटसूळ उठेल. मात्र सरकारने माणसं जिवंत ठेवली पाहिजेत. त्यांच्या आरोग्य आणि शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणून संकटाच्या काळात राज्यासह देशातील सर्व धार्मिक स्थळांचे राष्ट्रीय करण करून तो पैसा जनतेच्या हितासाठी वापरावा..हीच संभाजी ब्रिगेडची आजपर्यंत मागणी राहिलेली आहेत.

सरकारने आज इतिहासाची प्रेरणा घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही शत्रूला हात लावू दिला नव्हता. शेतकरी अडचणीत असताना त्यांचा शेतसारा माफ केला होता. शेतकऱ्यांना पेन्शन देणारा राजा म्हणजे शिवाजी महाराज होय. स्वराज्यात प्रत्येकाचा संरक्षण महाराजांनी केलं होतं. ‘छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले होते. बहुजनांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी सरकारची तिजोरी रिकामी केली होती.’ आर्थिकदृष्ट्या गरीब दीन दलित व बहुजनांचे कैवारी म्हणून शाहू महाराजांची ओळख होती. बहुजनांच्या मुलांची शैक्षणिक कुवत वाढावी व सर्वांना शिक्षण सक्तीचं आणि मोफत मिळाले पाहिजे. त्यासाठी राज्यातील सर्व मंदिरांचा पैसा मुलांच्या शिक्षणासाठी वापरावा. हीच आजच्या काळाची गरज आहे. *माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण साहेब उशिरा बोलले मात्र खरं बोलले.’* आम्ही संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून गेली १५-२० वर्षापासून सतत पत्रव्यवहार करून सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. मा. अॕड. पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्यापासून माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्या पर्यंत प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीला किंवा संकटाच्या काळात (अधिवेशन असो किंवा आंदोलन अथवा जयंती) वेळोवेळी मागणी करत आलेला आहे.

सर्व धार्मिक स्थळांच्या ट्रस्टची नोंदी सरकारकडेच झालेली आहे. सर्व धार्मिक स्थळे व ट्रस्ट ‘धर्मदाय आयुक्तांच्या’ अंतर्गत येतात. महाराष्ट्र सरकारने राज्यात KG to PG पर्यंतचे शिक्षण दर्जेदार सर्वांना सक्तीचे व मोफत करून सर्वांसाठी खुले करावे आणि सर्वांनी राज्यातील सर्वांच्या आरोग्यासाठी ‘सर्व धार्मिक स्थळांचा पैसा सरकारने समाजहितासाठी या नैसर्गिक आपत्तीच्या काळात वापरलाच पाहिजे… अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे.

सर्व मंदिरांच्या पैशावर जगणाऱ्यांचा पोटसुळ नक्की उठेल. पण…! सर्व धार्मिक स्थळांचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे. तो पैसा राज्य सरकारने जनहितासाठी वापरला पाहिजे.

– संतोष शिंदे,
जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे.

पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता

0

मुंबई. कोविड १९ संसर्गाचा फटका राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास बसणार आहे. नियोजनानुसार २२ जूनपासून प्रारंभ होणारे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.

सोमवारी (दि.१८) कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारी रोजी सुरू झाले होते. ते २० मार्चपर्यंत चालणार होते. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघात असावेत आणि प्रशासनावर अतिरिक्त ताण नको म्हणून अंतरिम अर्थसंकल्प मांडल्यानंतर लगेच १४ एप्रिल रोजी म्हणजेच एक आठवड्यापूर्वीच अधिवेशन गुंडाळण्यात आले होते.

सभागृह संस्थगित केल्यानंतर झालेल्या घोषणेनुसार २२ जूनपासून मुंबईत पावसाळी अधिवेशन आयोजित केले जाणार होते. हे अधिवेशन ३ आठवड्यांचे होणार होते. प्रश्नांचा चक्रानुक्रम दाखवण्यात आला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात कायम आहे. त्यामुळे विधिमंडळाचे सदस्य अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्या पार्श्वभूमीवर सोमवारच्या बैठकीत अधिवेशनासंदर्भात चर्चा होईल. कोरोनोला अटकाव करण्यासाठी सरकारने मोठा खर्च केला. यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनचे पालन करत,वैदिक मंत्रोच्चारात सकाळी 4.30 वाजता उघडले बद्रीनाथचे कपाट

0

बद्रीनाथ. शुक्रवारी पहाटे 4.30 वाजता बद्रीनाथ मंदिराचे कपाट (दरवाजे) उघडण्यात आले. कपाट उघडण्याचे विधी रात्री 3 पासूनच सुरु झाले होते. रावल ईश्वर प्रसादनंबूदरी यांच्या हस्ते विशेष पूजा करण्यात आली. या दरम्यान गुरु शंकराचार्यांची गादी, उद्धवजी, कुबेरदेवाची पूजा करण्यात आली. कपाट उघडल्यानंतर लक्ष्मी देवीची परिसर स्थित मंदिरात स्थापना करण्यात आली. भगवान बद्रीनाथ यांचा तिळाच्या तेलाने अभिषेक करण्यात आलाधर्माधिकारी भुवनचंद्र उनियाल यांच्यानुसार श्री बद्रीनाथ धामचे कपाट मनुष्य पूजेसाठी पहाटे 4:30 वाजता उघडण्यात आले. उत्तराखंड चारधाम देवस्थान बोर्डाचे मीडिया प्रभारी डॉ. हरीश गौड यांनी दिलेल्या माहितीनुसार बद्रीनाथ पुष्प सेवा समितीने 10 क्विंटल पेक्षा जास्त फुलांनी मंदिराला सजवले आहे.

प्रत्येक वर्षी हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये कपाट उघडले जातात, परंतु यावर्षी लॉकडाऊनमुळे कपाट उघडताना केवळ 28 लोक उपस्थिती होते. रावल नंबूदरी, धर्माधिकारी भुवनचंद्र उनियाल यांच्या व्यतिरिक्त येथे मंदिर समितीचे लोक, प्रशासनाचे अधिकारी आणि काही स्थानिक लोक उपस्थित होते. सर्वानी मास्क घातलेले होते. सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्यात आले.

आत्तापर्यंत दोन पंतप्रधानांनी सोने जमा करण्याच्या योजना राबवल्या, ते दोन्ही पंतप्रधान हे भाजपचेच

पुणे-कोरोना महामारीमुळे देशावर जे आर्थिक संकट आले आहे त्यापार्श्वभूमीवर देशातील विविध व्यक्ती आणि धार्मिक संस्थांकडे जे सोने पडून आहे ते बॅंकाकडे व्याजावर जमा करण्याची अपील मी काल केली होती.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्वीट केल्याच्या बातम्या प्रसारित झालेल्या होत्या. मात्र आता याबाबत चव्हाण यांनी स्वतःचे मत मांडले असून आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ पसरवला गेल्याचा आरोप केला तसेच मी केलेली अपील हि काही नवीन गोष्ट नाही. १९९८ साली पोखरण अनु चाचणीनंतर निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीनीं १४ सप्टेंबर १९९८ साली गोल्ड डिपॉझिट स्कीम आणली होती. ज्यातून सरकारकडे बरेच सोने जमा झाले होते. त्यानंतर २०१५ साली पंतप्रधान मोदी यांनी यात बदल करून गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम नोव्हेम्बर २०१५ मध्ये सुरु केली असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण सांगितलेली कल्पना हि नवीन नसून आत्तापर्यंत दोन पंतप्रधानांनी सोने जमा करण्याच्या योजना राबवल्या असल्याचे सांगितले आहे. तसेच ते दोन्ही पंतप्रधान हे भाजपचेच असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम च्या पहिल्याच वर्षात देशातील मोठ्या आठ मंदिरांनी आपल्याकडीन सोने विविध बँकामध्ये ठेवले. याबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी लोकसभेत माहिती दिली आहे. यात शिर्डी देवस्थान आणि तिरुपती देवस्थानाचाही समावेश आहे. अर्थ मंत्रालयाच्या एका रिपोर्ट नुसार नोव्हेंबर २०१५ पासून ३१ जानेवारी २०२० पर्यंत या योजनेअंतर्गत जवळ जवळ ३००० जणांनी ११ बँकामध्ये साडे वीस टन सोने सरकारला दिले आहे. आपल्या देशात खूप सोने आहे. विश्व सुवर्ण परिषद (वर्ल्ड गोल्ड कौन्सिल) यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात श्रीमंत वर्ग आणि काही देवस्थानाकडे प्रचंड प्रमाणात सोने आहे अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान, आपल्याकडे असणाऱ्या सोन्याचा या संकटाच्या वेळी योग्य उपयोग व्हावा या उद्देशाने मी व्याजावर सोने घेण्याची घोषणा केली होती. मात्र काही भक्त चॅनेलनी आणि राजकीय नेत्यांनी याला मी एखाद्या विशिष्ट धर्माला मध्ये घेऊन अशी सूचना केल्याचा आरोप केला आहे. आत्तापर्यंत २ पंतप्रधानांनी सोने जमवण्यासाठी गोल्ड मोबिलायझेशन योजना बनवल्या आहेत. आणि दोघेही पंतप्रधान भाजप पक्षाशी निगडित आहेत असं चव्हाण यांनी सांगितले आहे.

उपाय योजनांचा आढावा- क्षेत्रीय कार्यालय स्तरावर 16 मे पर्यंत बैठका- धीरज घाटे

पुणे : कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर येणाऱ्या समस्या तसेच या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी पालिकेचे सभागृहनेते धीरज घाटे यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालय स्तरावर 16 मे पर्यंत बैठका बोलविल्या आहेत. या बैठकीत प्रशासनासह, त्या भागातील लोकप्रतिनिधीं उपस्थित रहणार आहेत.

दरम्यान, बुधवारी घाटे यांनी हडपसर आणि नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या बैठका घेतल्या. यावेळी लोक प्रतिनिधीच्या सूचना ऐकून घेत, साथीला अटकाव घालण्यासाठी तातडीनं उओआय योजना करण्याच्या सूचना घाटे यांनी प्रशासनास दिल्या आहेत.

या बाबत बोलताना घाटे म्हणाले की, कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता विविध उपाय योजना पुणे महानगरपालिका यशस्वीरीत्या राबवित आहे.

मात्र, त्यानंतरही रोज प्राप्त होणारी आकडेवारी कशी कमी करता येईल, पुणे शहर कोरोना मुक्त करण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन सर्व शहरात करण्यात येणार आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना तसेच त्यांची मदत आवश्यक आहेत. या त्यादृष्टीने क्षेत्रीय कार्यालय परिसरातील संपूर्ण आढावा घेतला जात आहे.

आज हडपसर मुंढवा व नगररस्ता वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयात बैठक घेण्यात आली . त्यात यामध्ये आजपर्यंत करण्यात आलेल्या उपाययोजना, मनुष्यबळ, मास्क, सॅनिटायजेर, किट्स, निर्जंतुकीकरण, रेशन वितरण, विलगिकरणाच्या व रुग्णालयातील व्यवस्था, उपाययोजनांच्या दृष्टीने पुढे नियोजनाकरिता दिशा ठरविणे याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार, प्रशासनास आवश्यक सूचना देण्यात आल्या असून याचा एक अहवाल आयुक्तांनीही देण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिकभागात साथ रोखण्यासाठी आवश्यक उपाय योजना करणे शक्य असल्याचे घाटे यांनी स्पष्ट केले.

कोरोना जगातून कधीच जाणार नाही

0

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याची घंटा वाजवली आहे. कोरोना जगातून कधीच जाणार नाही. काही विषाणू कधीच नष्ट होत नाहीत कोरोना हा त्यापैकीच एक असू शकतो HIV सारखाच तो जगात कायमचा राहू शकतो अशी भीती डब्ल्यूएचओच्या आरोग्य आपत्कालीन विभागाचे कार्यकारी संचालक डॉक्टर मायकल रायन यांनी व्यक्त केली.जगात कोरोना महामारीत मृत्यू जाण्याचे सत्र सुरूच आहे. हा भयंकर विषाणू कसा नष्ट करायचा याबाबत वेगवेगळे उपाय शोधले जात असतानाच WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या या विधानाने जगाची चिंता वाढली आहे. डॉक्टर रायन म्हणाले की ‘मी एचआयव्ही आणि कोरोना या दोन रोगांची तुलना करत नाही. मात्र आपण वास्तविकतेचा स्वीकार करणे गरजेचे आहे. कोरोना कधी आणि कसा गायब होईल याबाबत कोणीही भविष्यवाणी करेल ते मला वाटत नाही.’ डब्ल्यूएचओ कोविद-19चे विशेष दूत डॉक्टर डेव्हिड नॅबोरो यांनीही कोरोनावर अजून लसीचा शोध  न लागणे ही सर्वात मोठी चिंतेची बाब ठरू शकते असे म्हटले आहे.डॉक्टर रायन यांच्या विधानानंतर एचआयव्ही रोगाची गंभीर आकडेवारी प्रकाशझोतात आली आहे. HIV ने मागील चाळीस वर्षात तब्बल तीन कोटी 20 लाख बळी घेतले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर बळी गेल्यानंतरही या रोगावर लस तयार करता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर कोरोना बळींचा आकडा किती भीषण असेल याची चिंता संपूर्ण जगाला सतावत आहे.

 

देवस्थानांकडे संपत्ती मागण्यासाठी हात पुढे करताना लाज वाटत नाही? भाजपा कार्यकर्त्याचा हल्ला

मुंबई: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकारनं ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोनं कर्जाने ताब्यात घ्यावं, असा पर्याय माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचवला. त्यावरुन भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आचार्य तुषार भोसलेंनी चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चव्हाणांचं डोकं ठिकाणावर आहे का?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.आचार्य तुषार भोसलेंनी चव्हाण आणि काँग्रेसवर शरसंधान साधत सरकारला देवस्थानांचं सोनं ताब्यात घेण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं

चव्हाण, देवस्थानं खासगी मिळकत आहे का? त्यांच्या संपत्तीला ताब्यात घेण्याचा अधिकार तुम्हाला दिलाच कोणी? ज्यावेळी देवस्थानांना काही देण्याची वेळ होती तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा, तेव्हा तुमच्या हाताला लकवा मारला होता आणि देवस्थानांकडे संपत्ती मागण्यासाठी तेच हात पुढे करताना लाज वाटत नाही? एवढीच जर तुम्हाला सरकारची काळजी आहे, तर तुम्ही ज्यांची हुजरेगिरी करता त्या तुमच्या नेत्यांना सांगा. सोनिया गांधींना सांगा त्यांची संपत्ती सरकारला द्यायला. त्यांचा जावई रॉबर्ट वाड्रांना सांगा. पी. चिदंबरमला सांगा. सुरेश कलमाडीला सांगा. सामान्य जनतेच्या कष्टाचा पैसा त्यांनी घरात पुरुन ठेवला, त्यातला रुपया देण्याची त्यांची नियत नाही आणि लोकांनी श्रद्धेनं देवस्थानांना, मंदिरांना दान दिलेली संपत्ती तुम्ही ताब्यात घ्यायला सांगता? तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा अधिकार नाही,’ अशा शब्दांत भोसले माजी मुख्यमंत्र्यांवर बरसले.

कोरोनाचा सामना करण्यासाठी पैसा कसा उभा करायचा, त्याची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील, असंदेखील भोसलेंनी म्हटलं आहे. ‘या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी सक्षम आहेत. त्यांनी २० लाख कोटींचं पॅकेज देशासाठी जाहीर केलंय आणि कमी पडलं तर अजूनही ते जाहीर करतील आणि तो पैसा कसा आणायचा यासाठीही ते सक्षम असतील. तुमच्या सल्ल्याची गरज नाही. कारण तुम्हाला तुमच्या पक्षातही कुठलंही स्थान उरलेलं नाही आणि सरकारमध्येही कुठलंही स्थान उरलेलं नाही, म्हणून तुम्ही अशी विधान करत आहात. पण एक गोष्टी कान उघडून ऐका. या आमच्या देवस्थानांना मुघलांनी लुटलं, इंग्रजांनी लुटलं. पण आता आमच्या देवस्थानांना लुटण्याची नियत तुमच्यासारख्या नेत्यांची आणि काँग्रेस पक्षाची असेल, तर हे कदापि शक्य होणार नाही. हा देश आदरणीय पंतप्रधानांच्या हातात अतिशय सुरक्षित आहे,’ असं भोसले म्हणाले. चव्हाण यांनी त्यांचं विधान ताबडतोब मागे घ्यावं, अशी मागणी त्यांनी केली.

काय म्हणाले होते  पृथ्वीराज चव्हाण?
केंद्र सरकारनं ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जानं ताब्यात घ्यावे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्याअंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतकं सोनं आहे. सरकारनं हे सोने १ किंवा २ टक्के व्याजानं परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावं, अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही सूचना करताना, चव्हाण यांनी पीएमओ कार्यालयास मेन्शन केलं आहे.

कोरोनाचे आज १६०२ नवीन रुग्ण; राज्यात एकूण २७ हजार ५२४ रुग्ण

0

मुंबई, दि.१४: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ५२४ झाली आहे. आज १६०२ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५१२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६०५९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २० हजार ४४६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ४० हजार १४५ नमुन्यांपैकी २ लाख १२ हजार ६२१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २७ हजार ५२४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख १५ हजार ६८६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५ हजार ४६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ४४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या १०१९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २५, नवी मुंबईत १०, पुण्यात ५,औरंगाबाद शहरात २, पनवेलमध्ये १ तर कल्याण डोंबिवलीमध्ये १ मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत आज नमूद करण्यात आलेले मृत्यू दि. १४ एप्रिल ते १४ मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी ३१ पुरुष तर १३ महिला आहेत.

आज झालेल्या ४४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत तर २० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहेत. या ४४ रुग्णांपैकी ३४ जणांमध्ये ( ७७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: १६,७३८ (६२१)
ठाणे: १६६ (३)
ठाणे मनपा: १२१५ (११)
नवी मुंबई मनपा: १११३ (१४)
कल्याण डोंबिवली मनपा: ४२४ (४)
उल्हासनगर मनपा: ८२
भिवंडी निजामपूर मनपा: ३९ (२)
मीरा भाईंदर मनपा: २४८ (२)
पालघर: ४२ (२)
वसई विरार मनपा: २९५ (११)
रायगड: १६६ (२)
पनवेल मनपा: १६१ (९)
ठाणे मंडळ एकूण: २०,६८९ (६८१)
नाशिक: ९८
नाशिक मनपा: ६०
मालेगाव मनपा: ६४९ (३४)
अहमदनगर: ५५ (३)
अहमदनगर मनपा: १५
धुळे: ९ (२)
धुळे मनपा: ६२ (४)
जळगाव: १७१ (२२)
जळगाव मनपा: ५२ (४)
नंदूरबार: २२ (२)
नाशिक मंडळ एकूण: ११९३ (७१)
पुणे: १८२ (५)
पुणे मनपा: २९७७ (१६६)
पिंपरी चिंचवड मनपा: १५५ (४)
सोलापूर: ९ (१)
सोलापूर मनपा: ३३५ (२०)
सातारा: १२५ (२)
पुणे मंडळ एकूण: ३७८३ (१९८)
कोल्हापूर: १९ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३६
सांगली मिरज कुपवाड मनपा: ७ (१)
सिंधुदुर्ग: ७
रत्नागिरी: ८३ (३)
कोल्हापूर मंडळ एकूण: १५८ (५)
औरंगाबाद:९५
औरंगाबाद मनपा: ६२१ (१९)
जालना: २०
हिंगोली: ६१
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ७९९ (२०)
लातूर: ३२ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ४
बीड: १
नांदेड: ५
नांदेड मनपा: ५२ (४)
लातूर मंडळ एकूण: ९४ (५)
अकोला: १८ (१)
अकोला मनपा: १९० (११)
अमरावती: ५ (२)
अमरावती मनपा: ८७ (११)
यवतमाळ: ९९
बुलढाणा: २६ (१)
वाशिम: ३
अकोला मंडळ एकूण: ४२८ (२६)
नागपूर: २
नागपूर मनपा: ३२९ (२)
वर्धा: १ (१)
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ४
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ३३९ (३)
इतर राज्ये: ४१ (१०)
एकूण: २७ हजार ५२४ (१०१९)

(टीप – आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २२० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १५१२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४ हजार २५३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५९.०४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

पिंपरी चिंचवड भागातील उद्योग सुरू करण्यास परवानगी

पुणे, दि.१४- नव्या अधिसूचनेनुसार रेड झोनमध्ये मर्यादित प्रमाणात उद्योग सुरू करण्याची तसेच बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली असली तरीही मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशात ही परवानगी नव्हती, यामधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका वगळण्यात आल्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आदेशित केले आहे.
राज्यातील कोवीड 19 चा प्रभाव असलेले कंटेन्टमेंट झोन वगळता इतर भागातील उद्योग सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली होती.
कोविड 19 संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजनांकरिता रुग्णांच्या संख्येच्या आधारावर तीन भाग करण्यात आले आहेत – रेड, ऑरेंज आणि ग्रीन. रेड झोनमध्ये दोन भाग आहेत – पहिला मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश आणि मालेगाव महापालिका हा एक भाग आणि दुसरा रेड झोनमधील उर्वरित भाग. पुणे महानगर प्रदेश मधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका वगळण्यात आली असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
कोवीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविल्यानंतर राज्य शासनाच्या वतीने सुधारित नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यात नमूद केले आहे की, केंद्र शासनाने राज्यातील 14 जिल्हे हे रेडझोनमध्ये समाविष्ट केले आहेत. याशिवाय राज्य शासनाने मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महानगरपालिका हद्द, पुणे महानगरप्रदेशातील सर्व महानगरपालिका व मालेगाव महापालिका हद्दीचा समावेश रेडझोनमध्ये केला आहे. यातून पिंपरी चिंचवड महानगरपालिका वगळण्यात आली असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्र शासनाने ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये काही अपवाद वगळता बहुतेक निर्बंध शिथिल केले आहेत.
ग्रीन व ऑरेंज झोनमधील खासगी कार्यालये 100 टक्के सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मुंबई (एमएमआर) व पुणे प्रदेश (पीएमआर) मधील पिंपरी चिंचवड महानगरपालिका वगळता खासगी कार्यालये बंदच राहणार असून येथील केंद्र व राज्य शासनाची कार्यालये ही 5 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील. तर इतर रेड झोनमधील शासकीय व खासगी कार्यालये ही 33 टक्के मनुष्यबळ वापरून सुरू राहतील, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.
रेडझोनमधील कंन्टेंटमेंट झोन वगळता बाकीच्या सर्व झोनमध्ये ई कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी दिली असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील परवानगी मिळालेल्या उद्योग, औद्योगिक आस्थापनांनी ३३ टक्के कामगारांच्या उपस्थितीची अट पाळणे बंधनकारक आहे. हे सर्व कामगार पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात राहणारे असावेत, त्यांच्या प्रवासासाठी डेडीकेटेड वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे किंवा ते आपल्या चार चाकी वाहनाने प्रवास करू शकतील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे विभागातून 35 हजार 163 प्रवाशांना घेऊन 28विशेष रेल्वेगाडया रवाना

उत्तर प्रदेश,मध्यप्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार राज्यातील प्रवाशी– विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे, दि. 14 – लॉकडाऊनमुळे अडकलेल्या उत्तर प्रदेश,मध्यप्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार राज्यामधील 35 हजार 163 मजुरांना घेऊन पुणे विभागातून 28 विशेष रेल्वेगाडया रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 11, उत्तरप्रदेशसाठी 11, उत्तराखंडसाठी 1, तामिळनाडूसाठी 1 राजस्थानसाठी 3 व बिहारसाठी 1 अशा एकूण 28 रेल्वेगाडया 35 हजार 163 प्रवाशांना घेवून रवाना रवाना झाल्या आहेत. 15 मे रोजी पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 3 रेल्वेगाडया नियोजित असून यामध्ये एकूण 3600 प्रवाशी अपेक्षित आहेत.यापैकी पुणे स्थानकावरून तीन रेल्वेगाडयांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच उत्तरप्रदेशसाठी तीन रेल्वेगाडयांचे नियोजन करण्यात आले असून यामध्ये 4 हजार 312 प्रवाशी अपेक्षित आहेत. यापैकी पुणे रेल्वे स्थानकामधून एकू तर कोल्हापूर रेल्वे स्थानकामधून दोन रेल्वेगाडयांचे नियोजन आहे तर बिहारसाठी कोल्हापूर स्थानकामधून एक रेल्वेगाडी नियोजित असून एक हजार 456 प्रवाशांचे नियोजन या रेल्वेगाडीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यासाठी सबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, संबंधित तहसील कार्यालय आणि रेल्वे विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावली असल्याचेही असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.