Home Blog Page 2581

अवघ्या ८ हजार पगारावर लढताहेत ३४० कोरोना योद्धे (व्हिडीओ)

पुणे- पुणे हे उणे नाहीच .. इथे कोरोनाशी 2 हाथ करणारे कोण आहेत ? काय त्यांची अवस्था आहे ? हे देखील जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे . याला निमीत्त झाले ते आज असे अनेक कोरोना योद्धे असलेल्या …तरुणी ,महिला महापालिका आयुक्त कार्यालयात आपली व्यथा मांडायला आल्याचे दिसले . २०१५ पासून ठेकेदारी पद्धतीवर आम्ही महापालिकेच्या आरोग्य खात्यात काम करतोय , अवघ्या 6 हजार रुपये पगारावर त्या जॉईन झाल्यात . आणि तब्बल ५ वर्षात त्यांचा पगार आता झालाय ८ हजार रुपये , जो प्रत्यक्षात त्यांच्या हातात साडेसात हजार रुपये एवढाच पडतोय . ना आम्हाला विमा कवच ना अन्य कुठली सुविधा ,सुरक्षा …अशा अवस्थेत आम्ही यंदा आलेल्या या ऐतिहासिक संकटाचा मुकाबला करतोय हे सांगायला आलेल्या आरोग्य सेविका…आमच्या सारख्याच आरोग्य सेविकांना पिंपरी चिंचवड महापालिकेत मात्र २३ हजार रुपये पगार मिळतो हे हे सांगत होत्या ,एवढी तफावत का ? असा सवाल करत होत्या .
 एकी कडे दिसत असताना दुसरीकडे याच महापालिकेत आरोग्य विभागात सुरु असलेल्या नौकर भरती साठी मुलाखती द्यायला आलेल्यांची गर्दी दिसून येत होती .. मग सांगा कुठे आहे उणे आमचे पुणे …? पहा छोटीसी
व्हिडीओ झलक …. 
  https://www.youtube.com/watch?v=sGHzWUw6XcI

महाराष्ट्राचं साहित्य, कला, सांस्कृतिकविश्व समृद्ध करणारं महान व्यक्तिमत्वं हरपलं

0

 

मुंबई, दि. 18 :- ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्व समृद्ध करणारं महान व्यक्तिमत्वं हरपलं असून साहित्यिक, रंगभूमी, सांस्कृतिक क्षेत्रातलं रत्नाकर मतकरी यांचं योगदान चिरंतन राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, रत्नाकर मतकरी यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. रत्नाकर मतकरी हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेलं नाव आहे. महाराष्ट्रातील आबालवृद्धांसाठी त्यांनी साहित्यनिर्मिती केली. कथा, गुढकथा, कादंबरी, एकांकिका, नाटकं अशा साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी मुशाफिरी केली. रंगभूमीवर यशस्वी नाटककार, दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी लोकप्रियता मिळवली. साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं. चित्रपट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळाला होता. अनेक मान, सन्मान, पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या रत्नाकर मतकरी यांना मराठी साहित्य, कलारसिकांनीही नेहमीच भरभरुन प्रेम, आदर, सन्मान दिला. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या साहित्य, कला विश्वाची मोठी हानी झाली आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

प्रसिद्ध नाटककार रत्नाकर मतकरी यांचं निधन

0

मुंबई – प्रसिद्ध नाटककार रत्नाकर मतकरी यांचं आज निधन झालं. 17 मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मतकरी यांना कोरोना झाला होता असं समजतं आहे. रत्नाकर मतकरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक अशी रत्नाकर मतकरी यांची सर्वांना ओळख आहे.

सेवन हिल्स रुग्णालयात सुरु होते उपचार

गेल्या काही दिवसांपासून त्यांना थोडा थकवा जाणवत होता. म्हणून चार दिवसांपूर्वी त्यांना गोदरेज हॉस्पिटलमध्ये चेकअप साठी दाखल करण्यात आलं होतं.

त्यावेळी तिथे त्यांची कोविड 19ची टेस्ट केली. त्यांची ती टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांना पुढच्या उपचारांसाठी सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. त्यांची कोरोनावरील झुंज अपयशी ठरली आणि तिथेच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रत्नाकर मतकरी ही 81 वर्षांचे होते.

रत्नाकर मतकरी यांची कारकिर्द

1955 साली वयाच्या 17व्या वर्षी, त्यांची ‘वेडी माणसं’ ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन प्रकाशित झाली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे लेखन अव्याहतपणे चालू होते.

मतकरींची ‘लोककथा ७८’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा ‘, आणि इतर अनेक नाटके नाट्य रसिकांच्या मनात कायम घर करुन आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ या मुलांच्या, तसंच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारीत ‘आरण्यक’ या नाटकांनी रंगभूमी चांगलीच गाजवली. वास्तवाचे भान देणाऱ्या गूढकथा हा कथाप्रकार त्यांनी एकहाती वाचकांपर्यंत पोहोचवला.

रत्नाकर मतकरी यांचं साहित्य लेखन

मोठ्यांसाठी 70 तर मुलांसाठी 22 नाटकं, अनेक एकांकिका, 20 कथासंग्रह, 3 कादंबऱ्या, 12 लेख संग्रह त्यांचे प्रसिद्ध झालेत. आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे. ‘गहिरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिका, तसंच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्वेस्टमेन्ट’, अशी त्यांची इतर माध्यमातील कामंही रसिकप्रिय ठरली आहेत.

रत्नाकर मतकरी यांना संगीत नाटक अकादमी आणि साहित्य ॲकेडमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहे. या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तीमत्वात मतकरी यांचा समावेश होतो. रत्नाकर मतकरींना विपुल पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत.

रत्नाकर मतकरींच्या पश्चात निर्मिती आणि अभिनयाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी, कन्या अभिनेत्री सुप्रिया विनोद, पुत्र लेखक/समीक्षक गणेश मतकरी, जावई डॉ. मिलिंद विनोद, पल्लवी मतकरी आणि नातवंडे असा परिवार आहे. मतकरींच्या जाण्याने साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात एक न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

325 विद्यार्थी पहाटे पोहोचले पुण्यात …

पुणे- महाराष्ट्रातील यूपीएससीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून
सोडण्यात आलेली विशेष ट्रेन पुणे रेल्वे स्टेशन येथे आज पहाटे 3:10 वाजता पोहोचली.
त्यामध्ये एकूण 325 विद्यार्थी पोहोचले, त्यापैकी पुणे जिल्ह्यातील 97 विद्यार्थी होते. सर्व विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी वैद्यकीय पथकामार्फत करण्यात आली. कोविड १९ संदर्भात संशयित आढळले नाहीत.
त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या तळहाताच्या मागील बाजूस होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना त्यांच्या जिल्ह्यांमध्ये एसटी बस मार्फत पाठविण्यात आले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांना पीएमपीएमएल बसने पाठवण्यात आले.तसेच काही विद्यार्थी स्वतःच्या वाहनाने घरी गेले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी अमृत
नाटेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी शासनाचे आभार मानले.

पुणे आरटीओ सोमवार पासून कार्यान्वीत ….

पुणे : राज्य सरकारने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील प्रादेशिक व परिवहन कार्यालयांचे कामकाज सोमवारपासून (ता. 18) सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या कार्यालयांमध्ये वाहनांच्या नोंदणीचे काम उद्यापासून सुरू होणार आहे.

राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालये 25 मार्चपासून बंद ठेवण्यात आली होती. कोरोनाच्या लॉकडाउनमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव अजेय मेहता यांनी 17 मे रोजी आदेश काढून सोमवारपासून आरटीओ कार्यालय सुरू करण्याचे संबंधित कार्यालयांना कळविले आहे. त्यानुसार पुण्यातील आरटीओ कार्यालयाचे कामकाज सोमवारपासून सुरू होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.

सोमवारपासून नव्या वाहनांच्या नोंदणीचे काम सुरू होणार आहे. त्यांना नवे नंबरही दिले जाणार आहेत.

आरटीओ कार्यालयांमधील अन्य कामे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. त्याचा आराखडा लवकरच जाहीर करण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले. वाहन परवाना देणे, परवान्यांचे नूतनीकरण करणे, कर आकारणी करणे, वाहनांची मालकी हस्तांतर करणे, आंतरराष्ट्रीय वाहन परवाना उपलब्ध करून देणे आदी कामांचा त्यांत समावेश आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्यातील आरटीओचे कामकाज उद्यापासून सुरू होणार आहे. शासकीय कार्यालय सुरू करताना त्यात किती मनुष्यबळ ठेवायाचे, याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार त्यांचे पालन करण्यात येईल. “रेड झोन’मध्ये आरटीओचे कोणतेही कामकाज होणार नाही. मात्र त्या बाहेरील क्षेत्रात आरटीओची नेहमीप्रमाणे कामे सुरू होतील, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

दिवसभरात २० हजार ४८५ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा

0

१०,७९१ किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्तीपैकी ४,७१३ अनुज्ञप्ती सुरू – राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप  यांची माहिती

मुंबई, दि.१७ : मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती पैकी 4,713 अनुज्ञप्ती सुरू आहेत. आज दिवसभरात 20 हजार 485 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

राज्य शासनाने 3 मे, 2020 पासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. सदर  मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील 33 जिल्ह्यात ( 3 कोरडे जिल्हे वगळता गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर ) काही जिल्ह्यांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मद्यविक्री बंद आहे.

किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु असलेल्या जिल्ह्यांची नावे :- 1. ठाणे, 2. पालघर, 3. रायगड, 4. पुणे, 5. सोलापूर 6. अहमदनगर, 7. कोल्हापुर, 8. सांगली, 9. सातारा, 10. सिंधुदुर्ग, 11. रत्नागिरी, 12. नाशिक, 13. धुळे, 14. नंदुरबार, 15. जळगाव, 16. जालना, 17. लातुर, 18. नांदेड 19. हिंगोली, 20. नागपुर, 21. भंडारा 22. गोंदिया, 23. यवतमाळ, 24. अमरावती, 25. अकोला, 26. वाशिम, व 27. बुलढाणा.

किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु न केलेल्या जिल्ह्यांची नावे :- 1. औरंगाबाद, व 2. बीड,

किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु झाल्या होत्या परंतू पुन्हा अनुज्ञप्ती बंद करण्यात आल्या :- 1. मुंबई शहर, 2. मुंबई उपनगर, व 3. उस्मानाबाद.

किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु होणाऱ्या जिल्ह्यांचे नाव:- 1. परभणी  (दि.18-05.2020 पासून घरपोच मद्यविक्री सुरु करणार आहे.)

CL – III (देशीमद्य किरकोळ विक्री अनुज्ञप्ती)
एकूण अनुज्ञप्ती-4159
चालू अनुज्ञप्ती-1789

FL – II ( वाईन शॅाप )
एकूण अनुज्ञप्ती-1685
चालू अनुज्ञप्ती- 639

FL BR – II( बीयर शॉप )
एकूण अनुज्ञप्ती-4947
चालू अनुज्ञप्ती-2285

एकूण अनुज्ञप्ती-10,791
चालू अनुज्ञप्ती-4,713

राज्यात दि.15 मे 2020 पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्य विक्री सेवा देण्यात येत आहे. मद्यसेवन परवाने राज्य उत्पादन शुल्काच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. तथापी IOS प्रणलीबाबत संकेतस्थळावर अडचणी होत असल्याचे निर्देशनास आले आहे. या प्रणालीतील अडचणी दूर करण्यात येत आहेत तो पर्यन्त मद्यसेवन परवाना घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या निर्देशनास आणण्यात येते की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक/दुय्यम निरीक्षक कार्यालये व अधीक्षकांच्या कार्यालयात दरोराज मद्य सेवन परवाने  ऑफलाईन पध्दतीने देण्याची सोय करण्यात आली आहे. सदर मद्य सेवन परवाने एक वर्षाकरिता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरिता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकताता. तरी मद्य विक्री दुकानासमोर गर्दी न करता मद्य सेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घ्यावा.

राज्यात 24 मार्च, 2020 पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.राज्यात शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्वविभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहे. काल दि.16 मे, 2020 रोजी राज्यात 74 गुन्हे नोंदविण्यात आलेअसून 38 आरोपींना अटक करण्यात आली असून  12 लाख 99 हजार  रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि.24 मार्च, 2020 पासुन दि.16 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 5,682 गुन्हे नोंदविण्यात आले असून 2,558 आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर 576 वाहने जप्त करण्यात आली असून रु.15.30  कोटी किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्या करिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7  सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.  यासाठी टोल फ्री क्रमांक –  १८००८३३३३३३  व्हाट्सअँप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून  हा ई-मेल – commstateexcise@gmail.com आहे.

पुण्यात असाही असू शकेल लॉक डाऊन ४ (व्हिडीओ)

पुणे- गेल्या २२ मार्च पासून लॉक डाऊन चा अनुभव घेत कंटाळलेल्या ,रखडलेल्या पुणेकरांना आता लॉक डाऊन ४ कसा असेल याबाबत उत्सुकता निश्चित आहे. पण यामध्ये फारसा त्रास नागरिकांना होणार नाही याची काळजी घेत संसर्ग वाढू नये याबाबतची दक्षता महापालिका आयुक्त घेणार आहेत त्यामुळे हा लॉक डाऊन ४  दिलासा दायी ठरू शकेल काय ? या प्रश्नाला उत्तर होय असेच द्यावे लागणार आहे. फक्त रेड झोन आहे तिथे काटेकोर पणे अंमलबजावणी मात्र प्रशासनाला  करावी लागणार आहे . आणि एकंदरीतच अन्य झोन मध्ये काळजीपूर्वक पद्धतीने नागरिकांना आपली जीवनशैली बदलावी लागणार आहे . अशा पद्धतीने जीवन शैलीत बदल केला तर सर्व व्यवहार लवकरच पूर्ववत सुरु होतील असे मानले जाते या सर्व पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी साधलेला हा अल्पसा संवाद ऐका.. म्हणतात ना शितावरून भाताची परीक्षा ..ऐका तर खरे

कोरोनाचे आज राज्यात २३४७ नवीन रुग्ण

0

एकूण रुग्ण ३३ हजार ५३ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.१७: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ५३ झाली आहे. आज २३४७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ६०० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७६८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २४ हजार १६१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ७३ हजार २३९ नमुन्यांपैकी २ लाख ४० हजार १८६जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३३ हजार ५३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ४८ हजार ५०८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १७ हजार ६३८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. कोविड १९ पोर्टलवरील विश्लेषणानुसार, राज्याचे मार्च २०२० मध्ये प्रयोगशालेय नमुन्याचे दैनंदिन प्रमाण ६७९ एवढे होते ते मे २०२० मधील पहिल्या पंधरवडयात दिवसाला ८,६२८ प्रयोगशालेय नमुने इतके वाढले आहे. राज्याच्या प्रयोगशालेय सर्वेक्षणात मार्च महिन्याच्या तुलनेत सुमारे १३ पट वाढ झाली आहे, हे यावरुन स्पष्ट होते. सध्या देशात दर दशलक्ष लोकसंख्येमागे १६३० प्रयोगशाळा चाचण्या होत असून महाराष्ट्रात हे प्रमाण २१३७ एवढे आहे.

राज्यात ६३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या ११९८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३८, पुण्यात ९,औरंगाबाद शहरात ६, सोलापूर शहरामध्ये ३, रायगडमध्ये ३, आणि ठाणे जिल्ह्यात १, पनवेल शहरात १,लातूर मध्ये १, तसेच अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४४ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ६७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३४ रुग्ण आहेत तर २२ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ६३ रुग्णांपैकी ४१ जणांमध्ये ( ६५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: २०,१५० (७३४)
ठाणे: २२८ (४)
ठाणे मनपा: १५५० (१८)
नवी मुंबई मनपा: १३६८ (१४)
कल्याण डोंबिवली मनपा: ५२० (६)
उल्हासनगर मनपा: १०१
भिवंडी निजामपूर मनपा: ४८ (२)
मीरा भाईंदर मनपा: ३०० (४)
पालघर: ६१ (२)
वसई विरार मनपा: ३५९ (११)
रायगड: २३९ (५)
पनवेल मनपा: २०६ (११)
ठाणे मंडळ एकूण: २५,१३० (८११)
नाशिक: १०५
नाशिक मनपा: ७१ (१)
मालेगाव मनपा: ६७५ (३४)
अहमदनगर: ५६ (३)
अहमदनगर मनपा: १९
धुळे: १० (३)
धुळे मनपा: ७० (५)
जळगाव: २०५ (२६)
जळगाव मनपा: ६१ (४)
नंदूरबार: २३ (२)
नाशिक मंडळ एकूण: १२९५ (७८)
पुणे: १९९ (५)
पुणे मनपा: ३४६४ (१८८)
पिंपरी चिंचवड मनपा: १५८ (४)
सोलापूर: ९ (१)
सोलापूर मनपा: ३६४ (२४)
सातारा: १३१ (२)
पुणे मंडळ एकूण: ४३२५ (२२४)
कोल्हापूर: ३० (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ४२
सांगली मिरज कुपवाड मनपा: ८ (१)
सिंधुदुर्ग: १०
रत्नागिरी: ९५ (३)
कोल्हापूर मंडळ एकूण: १९१ (५)
औरंगाबाद:९७
औरंगाबाद मनपा: ८४२ (३१)
जालना: २८
हिंगोली: ९६
परभणी: ५ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: १०६९ (३२)
लातूर: ४२ (२)
लातूर मनपा: २
उस्मानाबाद: ७
बीड: ३
नांदेड: ५७
नांदेड मनपा: ६२ (४)
लातूर मंडळ एकूण: १२३ (६)
अकोला: २८ (१)
अकोला मनपा: २४१ (१३)
अमरावती: ६ (२)
अमरावती मनपा: १०४ (११)
यवतमाळ: ९९
बुलढाणा: ३० (१)
वाशिम: ३
अकोला मंडळ एकूण: ५११ (२९)
नागपूर: २
नागपूर मनपा: ३५५ (२)
वर्धा: २ (१)
भंडारा: ३
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ४
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ३६८ (३)
इतर राज्ये: ४१ (१०)
एकूण: ३३ हजार ५३ (११९८)

(टीप – आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २३६ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो..)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १६८८ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४ हजार ९७२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६३.८३ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

अशोकराव केंद्रावर टीका करण्यापूर्वी आधी आपण काय केले सांगा- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रत्युत्तर

पुणे–राज्यात कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी जे काम चालू आहे ते केंद्र सरकारच्याच मदतीने चालू आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असूनही राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेचे पालकत्व पार पाडण्यासाठी स्वतंत्रपणे काहीही केलेले नाही. केंद्र सरकारवर पालकत्वाच्या जबाबदारीवरून टीका करण्याच्या आधी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारने आपल्या तिजोरीतून कोरोनाच्या संकटात राज्यासाठी स्वतंत्रपणे काय केले याचा हिशेब द्यावा, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी दिले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोरोनाच्या संकटात राज्यातील बहुतेक कामे केंद्र सरकारमुळे चालू आहेत. गरीबांना मोफत धान्य देणे, कोरोना रोखण्यासाठी निधी आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करणे, समाजातील गरजू लोकांसाठी थेट बँक खात्यात पैसे जमा करणे, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी थेट खात्यात पैसे पाठविणे अशी कामे केंद्र सरकारने केली आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्वतःहून काही केले नाहीच उलट केंद्राने जी सामान्य लोकांना मदत केली त्यामध्ये अडथळे निर्माण केले. केंद्राने पाठविलेले रेशनवरील मोफत धान्य वाटपात राज्य सरकारने कसा घोळ घातला हे सर्वांना माहिती आहे.

त्यांनी सांगितले की, राज्यातील परप्रांतिय मजूरांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध नेत्यांनी केंद्राला विनंती केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने गाड्या उपलब्ध केल्या. या गाड्यांच्या खर्चापैकी ८५ टक्के भार केंद्राने सोसला व राज्यांनी सवलतीच्या तिकिटाच्या स्वरुपातील पंधरा टक्के भार सोसणे अपेक्षित होते. महाविकास आघाडी सरकारने त्यातही जबाबदारी टाळली आणि मजूरांकडून तिकिटाचे पैसे वसूल केले. उलट केंद्रावर जबाबदारी ढकलून कांगावा करण्याचा प्रयत्न आघाडीच्या नेत्यांनी केला. अखेर खूप टीका झाल्यावर मुख्यमंत्री निधीतून ही सवलतीची तिकिटे घेण्याचा निर्णय केला. केंद्र सरकार मागेल तितक्या रेल्वेगाड्या देण्यास तयार असताना महाविकास आघाडी सरकार गाड्या मागविण्यात टाळाटाळ करत आहे. राज्याने मोठ्या संख्येने केंद्राकडून रेल्वेगाड्या मागवून कामगारांना योग्य रितीने पाठवले तर त्यांच्यावर भर उन्हात चालत जाण्याची वेळ येणार नाही. परप्रांतीय मजूरांना महाविकास आघाडी सरकारने वाऱ्यावर सोडले आहे.

ते म्हणाले की, कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने झळ बसलेल्या समाजातील दुर्बल घटकांसाठी शेजारच्या कर्नाटक सरकारने सोळाशे कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. उत्तर प्रदेश आणि गुजरात ही राज्ये स्वतः पुढाकार घेऊन या संकटात आर्थिक भार सोसत आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने स्वतःच्या खजिन्यातून राज्यातील जनतेसाठी कोणतेही मोठे पॅकेज जाहीर केलेले नाही. राज्याने सध्याच्या स्थितीत स्वतःच्या पुढाकाराने स्वतंत्रपणे काय केले ते दाखवून द्यावे, असे आपले आव्हान आहे.

लॉकडाउन ४ साठी केंद्राची नियमावली

0

नवी दिल्ली- केंद्र सरकारकडून लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात मेट्रो, रेल्वे, विमानसेवा बंदच राहणार आहे. तसंच कॉलेज, शाळा, सिनेमागृह, धार्मिक प्रार्थनास्थळंदेखील बंदच राहणार आहेत. राजकीय कार्यक्रमांवरील बंदीही कायम राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही नियमावली जाहीर केली आहे. आंतरराज्य तसंच आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त एअर अॅम्ब्युलन्सला परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहममंत्रालयाने नियमावलीत हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोनमध्ये निर्बंध कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. हाय रिस्क असणाऱ्या कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउनचं कठोरपणे पालन केलं जाणार आहे.

कोणत्या गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत ?
– आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा
– मेट्रो सेवा
– शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. ऑनलाइन शिकवणीला परवानगी
– हॉटेल, रेस्तराँ बंद राहणार
– चित्रपटगृह, शॉपिंग मॉल, जीम, पूल, पार्क, बार बंद राहणार
– सामाजिक, धार्मिक कार्यक्रमावंर बंदी कायम
– सर्व धार्मिक प्रार्थनास्थळं बंद राहणार आहेत
– ६५ हून जास्त वय असणारे ज्येष्ठ नागरिक, व्याधी असणारे, गरोदर महिला, १० वर्षापेक्षा लहान मुलांनी घरातच थांबावं.

कोणत्या गोष्टींना परवानगी –
– बस किंवा इतर वाहनांमधून प्रवाशांच्या आतंरराज्य प्रवासाला परवानगी. यावेळी दोन्ही राज्यांनी एकमेकांची संमती घेणं आवश्यक असणार आहे.
– कंटेनमेंट झोनला यामधून वगळण्यात आलेलं आहे.

कंटेनमेंट, बफर, रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनसाठी नियमावली –
– झोनप्रमाणे निर्णय घेण्याची जबाबदारी आणि स्वातंत्र्य राज्यांना देण्यात आलं आहे. पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत अनेक राज्यांनी तशी मागणी केली होती.
– रेड, ऑरेंज, कंटेननेंट आणि बफर झोनचं सीमांकन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. यावेळी केंद्राच्या नियमावलींची दखल घेणं गरजेचं आहे
– कंटेनमेंट झोनमध्ये फक्त जीवनाश्यक गोष्टींना परवानगी असेल.
– मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, घरोघरी जाऊन पाहणी गरजेचं
– रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे. फक्त जीवनाश्यक गोष्टींना परवानगी असेल.
– कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी ठरवून दिलेल्या वेळेत सर्व दुकानं आणि मॉल सुरु करण्याची परवानगी.
– स्थानिक प्रशासनाने कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी दुकानं आणि मार्केट ठरलेल्या वेळेतच सुरु राहतील याची काळजी घ्यावी.
– सर्व दुकानांनी ग्राहकांमध्ये सहा फूटांचं अंतर राहील याची काळजी घ्यावी. एका वेळी दुकानावर पाचपेक्षा जास्त ग्राहकांना परवानगी नसावी.

पुण्यात काँग्रेस मोबाईल क्लिनिकद्वारे १७ हजार जणांवर मोफत उपचार

पुणे – कोरोना संसर्गजन्य आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी काँग्रेसचे मोबाईल क्लिनिक सक्रीय झाले आहे. त्याद्वारे पुण्यातील १७ हजारजणांची आरोग्य तपासणी करुन त्या सर्वांना मोफत औषधोपचारही देण्यात आले आहेत अशी माहिती काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात विविध क्षेत्रात काँग्रेस पक्ष काम करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून १७ एप्रिलपासून पक्षाच्या वतीने मोबाईल क्लिनिक उपलब्ध करुन देण्यात आले. १७ एप्रिल रोजी मंगळवार पेठेतील कडबाकुट्टी येथे मोबाईल क्लिनिकचे उदघाटन करण्यात आले. तेव्हापासून आजतागायत ही सेवा अखंडपणे सक्रीय आहे.

लॉकडाऊनच्या काळात शहराच्या अनेक भागात, झोपडपट्ट्यांमध्ये डॉक्टरांकडे जाऊन तपासणी आणि उपचार करुन घेणे अतिशय मुश्कील झाले. डॉक्टरांची कमतरता जाणवत होती. औषधे मिळत नव्हती, परवडतही नव्हती त्यामुळे कोरोना तसेच त्याव्यतिरिक्त अन्य आजारांवरही उपचार आणि औषधे मिळणे अनेकांना अवघड झाले होते. समाजाची गरज लक्षात घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशन ची पुणे शाखा, भारतीय जैन संघटना, फोर्ब्स मोटर्स यांच्या सहकार्याने काँग्रेस पक्षाने मोबाईल क्लिनिक ही मोहीम हाती घेतली. शहरातील वाड्या-वस्त्या, झोपडपट्ट्या, कन्टेंन्मेंट क्षेत्र अशा ठिकाणी जाऊन लोकांची तपासणी केली. हे काम अतिशय जोखमीचे होते. परंतु साऱ्या टीमने अतिशय धैर्याने हे काम केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सर्व लोकांमध्ये जावून याउपक्रमाची, आरोग्य विषयाबाबत जनजागृती केली. त्यामुळे उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. मोबाईल क्लिनिकमधील अत्याधुनिक आरोग्य यंत्रणा आणि एमबीबीएस, एमडी असलेले तज्ज्ञ डॉक्टर्स यांच्यामुळे या सेवेचा दर्जा उच्च राहिला. प्रशासनालाही मोबाईल क्लिनिक सेवेद्वारे चांगले सहकार्य मिळाले असे जोशी यांनी सांगितले.

या मोहीमेमध्ये ४१ रुग्ण असे आढळले की ते कोरोना संसर्गाच्या प्राथमिक अवस्थेत होते. हे निदान वेळीच झाले. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. कोरोनाबाधित रुग्णांच्या निदानाची माहिती प्रशासनालाही उपयुक्त ठरली. ते रुग्ण ज्या परिसरातील होते तिथे तातडीने साथ नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना करता आल्या. मोबाईल क्लिनिकचा असाही चांगला उपयोग झाला. सर्दी, खोकला, ताप, पोट बिघडणे, बीपी आदी आजारांवरही मोबाईल क्लिनिकमध्ये तपासण्या होऊन उपचार करण्यात आले. आबालवृद्धांना या सुविधेचा फायदा झाला असेही मोहन जोशी यांनी सांगितले.

शहरातील पीएमपीच्या डेपोंमध्ये कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. औषधोपचारही देण्यात आले. कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देवदासींचीही आरोग्य तपासणी करुन त्यांना योग्य ती औषधे देण्यात आली.

मोबाईल क्लिनिकमधील डॉक्टर्स आणि सहकाऱ्यांना पीपीई कीट, मास्क्स, सॅनिटायजर आदी सुविधा पुरविण्यात आल्या, उपचारांच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले. आरोग्य सेवा सहजपणे उपलब्ध करून देता आली यांचे आम्हाला समाधान आहे. ही आरोग्य सेवा यापुढेही चालूच राहाणारे आहे.

या मोहीमेत इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे चे पदाधिकारी डॉ.राजन संचेती, डॉ.आरती निमकर, डॉ.संजय पाटील, डॉ.सुनील इंगळे, डॉ.आशुतोष जपे, डॉ.हिलरी रॉड्रीक्स आणि असंख्य डॉक्टरांचे सहकार्य लाभले.

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही सज्ज आहोतच. पुणेकरांनीही काळजी घ्यावी, गर्दी टाळावी, आरोग्य राखावे, आपल्याला या साथीवर लवकरात लवकर मात करायची आहे असे आवाहन मोहन जोशी यांनी केले आहे.

बेस्ट कामगारांना न्याय मिळवून देणार -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0

बेस्ट कामगार संघाच्या पदाधिका-यांनी घेतली भेट
मुंबई दि. १७ मे- मुंबई परिसरात कोरोनोच्या प्रार्दुभावामुळे अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचा-यांना पालघर, पनवेल व बदलापूर येथून ने-आण करण्याचे काम बेस्ट कर्मचारी दिवस-रात्र करित आहे. बेस्ट कर्मचारी अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे त्यांना देखील राज्य सरकारी कर्मचा-याप्रमाणे कोरोनोच्या परिस्थितीत विमा कवच व अन्य आवश्यक सुविधा पुरविण्याची मागणी भाजपप्रणित बेस्ट कामगार संघाच्या पदाधिका-यांनी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्त व बेस्ट प्रशासनाशी चर्चा काढून मार्ग काढण्याचे आश्वासन यावेळी दरेकर यांनी दिले.
भाजपप्रणित बेस्ट कामगार संघाच्या पदाधिका-यांनी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची भेट घेतली व त्यांना आपल्या प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले. बेस्ट मध्ये कर्तव्यावर असताना सुमारे १५० बेस्टच्या कामगारांना कोरोनोची लागण झाली आहे. तर १२ कामगारांच्या मृत्यू झाला आहे, अश्या गंभीर परिस्थितीतही बेस्ट कर्मचारी आपली सेवा देत आहेत. यासंदर्भात राज्य सरकार व पालिका आयुक्तांशी पत्र व्यवहार करुनही ते बेस्टच्या कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करित आहेत, त्यामुळे आता विरोधी पक्ष नेत्यांना मध्यस्थी करुन कामगारांना न्याय मिळवून देण्याची विनंती यावेळी बेस्ट कामगार संघाचे सरचिटणीस गजानन नागे यांनी केली आहे. यावेळी दरेकर आणि संघाचे पदाधिकारी यांच्याध्ये चर्चा झाली. याप्रसंगी आमदार भाई गिरकर, संघाचे उपाध्यक्ष विजय माळवे, उपाध्यक्ष बाबुसिंग शिंदे, आगार अध्यक्ष विनोद रुणबाळ,बाबुलाल कहार आदी उपस्थित होते.
बेस्ट कर्मचा-यांना ५० लाखाचे विमा संरक्षण देण्यात यावे, बेस्ट कर्मचारी करोनाबाधित झाल्यावर त्याचं आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांचं विलगीकरण करण्यात यावं, प्रत्येक आगारात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असून प्रत्येक बेस्ट कामगारांची करोना चाचणी रोज करण्यात यावी, बेस्ट कर्मचाऱ्यांची ने आण करण्यासाठी राखीव व स्वतंत्र बसगाड्या सुरू कराव्यात, करोनाबाधित मात्र कोरोनाचे लक्षण नसलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात यावे आणि तेथेच त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत, करोनाच्या विरोधात लढण्यासाठी कर्तव्यावर उपस्थित असलेले आणि करोनाबाधित होऊन मृत्यूमुखी पडलेले बेस्ट, पालिका व अन्य आस्थापनातील, पोलीस कर्मचारी यांना शहीद दर्जा देऊन इतर सर्व सवलती त्यांना देण्यात याव्यात, दिव्यांग, आजारी व ५५ वयोवर्षांवरील कामगारांना या परिस्थितीत कामावर न बोलविता त्यांचे वेतन नियमित करावे अशा अनेक मागण्या बेस्ट कामगार संघाने विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्याकडे केल्या आहेत.
कोरोनाच्या परिस्थितीत अत्यावश्यक सेवा पुरविणा-या बेस्ट कामगारांच्या सर्व मागण्या रास्त आहेत, त्यामुळे यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्त व बेस्ट प्रशासन यांच्याशी चर्चा करुन त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दरेकर यांनी यावेळी दिले.

लॉककडाऊन’मधील जप्त वाहने विनादंड त्वरित सोडावीत : रिपाइं

पुणे : सध्या जगभर कोरोनाचे संकट आहे. राज्यातही कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या संकटाच्या काळात नियमभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी अनेक नागरिकांची वाहने जप्त केली आहेत. कायद्याच्या दृष्टीने ही कारवाई योग्य असली, तरी लॉकडाऊनमुळे सर्वांचेच उत्पन्न थांबलेले आहे. लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोक जीवनावश्यक वस्तू आणि जगण्यासाठी धडपडत आहेत. ही बाब लक्षात घेऊन ही वाहने कोणत्याही प्रकारचा दंड न आकारता संबंधितांना समज देऊन नागरिकांना परत करावीत, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वकील आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब यांना निवेदन पाठवून ही मागणी करण्यात आल्याचे ‘रिपाइं’चे राष्ट्रीय निमंत्रक अॅड मंदार जोशी, पुणे ‘रिपाइं’ वकील आघाडीच्या अध्यक्षा अॅड. चित्रा जानुगडे, कार्याध्यक्ष अॅड. आनंद कांबळे यांनी सांगितले.

अॅड. मंदार जोशी म्हणाले, “आधीच नागरिकांना उत्पन्न नाही, त्यात हा दंड आणि दंडासाठी रक्कम नसल्याने कामावर जाणे मुश्किल, अशी अनेकांची परिस्थिती आहे. त्यामुळे आमच्या मागणीचा सहानभूती पूर्वक विचार होऊन जप्त वाहनांचा दंड माफ करून ती सोडण्याचा आदेश आपणा कडून त्वरित काढण्यात यावा आणि नागरिकांना त्वरित दिलासा द्यावा.”

सर्व क्षेत्रे खासगी कंपन्यांसाठी खुली करणार-अर्थमंत्री निर्मला सीतारमण

0

नवी दिल्ली-अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत रविवारी पाचव्या पत्रकार परिषदेत दिलासा पॅकेजची पाचवी ब्लू प्रिंट देखील सांगितली. हे दिलासा पॅकेट 20 लाख कोटींचे नाही, तर 20 लाख 97 हजार 53 कोटी रुपयांचे आहे.

सरकारने पंतप्रधानांनी देशाला संबोधित करण्यापूर्वी सांगितलेल्या 1 लाख 92 हजार 800 कोटी घोषणांचा देखील या पॅकेजमध्ये समावेश केला आहे. यात 22 मार्चपासून करामध्ये सूट मिळाल्यामुळे झालेल्या महसुलात 7800 कोटी रुपयांच्या तोट्याचा समावेश आहे. आरबीआयने आतापर्यंत केलेल्या विविध घोषणांचे 8 लाख कोटी रुपये देखील या पॅकेजचा भाग आहेत.

अर्थमंत्र्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत 8 घोषणा केल्या. यात मनरेगा, आरोग्य, व्यवसाय, कंपनी कायदा, ईज ऑफ डूइंग बिझनेस, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि राज्य सरकारे यांच्याबाबत होत्या. दोन मोठ्या गोष्टी म्हणजे स्ट्रॅटेजिक क्षेत्र वगळता उर्वरित सार्वजनिक क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले केले जाईल आणि कोरोनामुळे एखाद्या कंपनीचे नुकसान झाले असेल तर त्यावर एक वर्षापर्यंत दिवाळखोरीची कारवाई होणार नाही.

अर्थमंत्री म्हणाल्या…> आज शेवटचा हप्ता जाहीर करीत आहे. मी पंतप्रधानांच्या भाषणाच्या शब्दांनी सुरुवात करेन. एक राष्ट्र म्हणून आपण एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहोत. आपत्तीच्या वेळी ही भारतासाठी एक संधी आहे आपल्याला स्वावलंबी भारत निर्माण करण्याची गरज आहे. स्वावलंबी भारताच्या उद्देशाने मदत पॅकेजमध्ये जमीन, कामगार, लिक्विडिटी आणि कायदा या सर्वांचा विचार केला गेला आहे.

> लॉकडाउन जाहीर होताच आम्ही पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज आणले. आम्ही पुढील तीन महिन्यांपर्यंत गरजूंना धान्य देण्याची व्यवस्था केली.

सर्व स्तरातील लोकांपर्यंत फायदा पोहचवला

> आव्हाने असूनही, एफसीआय, नाफेड आणि राज्य सरकारांनी प्रवासी कामगारांच्या जेवणाची व्यवस्था केली. घरी जाऊ न शकणार्‍या प्रवाशांची व्यवस्था केली. 8.19 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात 2000 रुपयांची मदत पोहचवली. 20 कोटी जनधन खात्यांमध्ये 10 हजार 25 कोटी रुपये दिले.

> 2.20 कोटी रुपये बांधकाम कामगारांच्या खात्यात थेट वर्ग केले. 12 लाखाहून अधिक ईपीएफओ खातेधारकांना लाभ दिला.

> आम्ही अन्न आणि स्वयंपाकाच्या गॅसद्वारे त्वरित लोकांना मदत पोहचवली. लॉकडाऊन वाढवल्यानंतर विनामूल्य दाळ आणि तांदूळ पुढील दोन महिन्यांसाठी वाढविण्यात आला.

> ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना भोजन दिले. आम्ही लोकांच्या जीवनाला प्राधान्य दिले. कोविड -19 नंतरचे आयुष्य लक्षात घेऊन पूर्ण मदत देणे देखील आवश्यक आहे.

1. शिक्षण

> कोविड संकटात शिक्षण क्षेत्र अडचणीत येऊ नये, यासाठी काळजी घेत आहोत. मुलांना शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करायला आवडत आहे.

> शिक्षक व विद्यार्थी यांच्यात लाइव्ह सेशन घेतली जात आहेत. खाजगी डीटीएच प्रोव्हाइडर देखील शैक्षणिक सामग्री प्रदान करीत आहेत.

> शालेय शिक्षणासाठी पंतप्रधान ई-लर्निंग प्रोग्राम लवकरच सुरू होईल. इयत्ता 1 ते 12 पर्यंत प्रत्येक वर्गासाठी एक चॅनेल असेल.

> दिव्यांग मुलांसाठी दर्जेदार साहित्य उपलब्ध करुन देईल.

> टॉप -100 विद्यापीठांना 30 मे पर्यंत ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी दिली जाईल.

2. मनरेगा

> मनरेगाच्या बजेटचा अंदाज 61 हजार कोटी रुपयांचा होता. त्याअंतर्गत रोजगार वाढविण्यासाठी 40 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

> आरोग्याच्या पायाभूत सुविधांसाठी खर्च वाढविला जाईल. शहरी-ग्रामीण भागात आरोग्य आणि निरोगीपणाची केंद्रे उभारली जातील. सर्व जिल्ह्यात संसर्गजन्य आजारांसाठी रुग्णालये असतील.

3. कंपनीज अॅक्ट

> दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्यासाठी कर्जाची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 1 कोटी केली जात आहे. पुढील एक वर्षासाठी कोणाविरूद्ध दिवाळखोरी प्रक्रिया सुरू केली जाणार नाही. याचा अधिक फायदा एमएसएमईंना होईल.

> कायद्यांतर्गत किरकोळ चुकांना गुन्हेगारी प्रवर्गात मानले जाणार नाही. अशा 7 गुन्ह्यांना कायद्यातून वगळण्यात येईल. यासाठी अध्यादेश आणला जाईल.

> स्टॉक एक्सचेंजमध्ये परिवर्तनीय डेबेंचर्स ठेवणारी खासगी कंपन्या सूचीबद्ध कंपन्या मानल्या जाणार नाहीत. भारतीय कंपन्या थेट परदेशी बाजारात याद्या मिळवू शकतील.

> सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांविषयी नवीन धोरण तयार करण्यात येईल. सामरिक क्षेत्रांची यादी तयार केली जाईल. त्यांच्या बाहेर असलेल्या कंपन्यांचे योग्य वेळी खासगीकरण केले जाईल. या योजनेत विलीनीकरणाच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. सामरिक क्षेत्रात किमान एक पब्लिक एंटरप्राइजेस राहिल याची काळजी घेतली जाईल.

4. व्यवसाय

> राज्यांचा आणि केंद्राचा महसूल कमी होत आहे. असे असूनही, आम्ही सतत त्यांना मदत करत आहोत. आम्ही त्यांच्या कर्ज घेण्याची मर्यादा 3% वरून 5% पर्यंत वाढविली आहे. यामुळे त्यांच्यासाठी 4.28 लाख कोटी रुपयांची अतिरिक्त पैशाची व्यवस्था झाली.

> राज्यांनी आतापर्यंत त्यांच्या मर्यादेपैकी केवळ 14% कर्ज घेतले आहे. 86% मर्यादेचा वापर झाला नाही.

कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भागातील सर्वाधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले

0

बरे झालेल्या रुग्णांपैकी निम्मे रुग्ण एकाच आठवड्याच्या कालावधीतील – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. १७: कोरोनाचे रूग्ण बरे होण्याची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यात बरे झालेल्या एकूण रुग्णांच्या निम्मे रुग्ण या एका आठवड्यात बरे झाले आहेत. आज आतापर्यंत सर्वाधिक ६०० हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुमारे ७६८८ एवढी आहे. विशेष म्हणजे बरे होणारे सर्वाधिक रुग्ण हे मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव या भागातील आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

केंद्र शासनाने सुमारे एक आठवड्यापूर्वी कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत सुधारित धोरण जाहिर केले होते. त्यानुसार कुठलीही लक्षणे नसलेल्या  रुग्णांना १४ दिवसांऐवजी दहाव्या दिवशी घरी सोडण्यात येत आहे. यामुळे बरे झालेल्या रूग्णांची  संख्या देखील वाढली आहे.

गेल्या रविवारी म्हणजे १० मे रोजी ३९९ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर ११ मे रोजी ५८७, १२ मे रोजी ३३९, १३ मे रोजी ४२२, १४ मे रोजी ५१२, १५ मे रोजी ५०५, १६ मे रोजी ५२४ आणि आज १७ मे रोजी ६०० हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. अशा प्रकारे या एका आठवड्यामध्ये ३७०० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत ७६८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत त्यातील ५० टक्के रूग्ण हे १० ते १७ मे या कालावधीतील आहेत.  साधारणत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बरे झालेल्या कोरोनाबाधीत रुग्णांना घरी सोडले जात आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन अंकी झाली.

दि.२७ मार्चला २४, २८ मार्चला २६, २९ मार्चला ३५, ३० मार्चला ३९, ३ एप्रिलला ५०, ४ एप्रिलला ५२, ५ एप्रिलला ५६, ६ एप्रिलला ६६, ७ एप्रिलला ७९, ८ एप्रिलला ११७, ९ एप्रिलला १२५, १० एप्रिलला १८८, ११ एप्रिलला २०८, १२ एप्रिलला २१७, १३ एप्रिलला २२९, १४ एप्रिलला २५९, १५ एप्रिलला ३६, १६ एप्रिलला ५, १७ एप्रिलला ३१, १८ एप्रिलला ३४, १९ एप्रिलला १४२, २० एप्रिलला ६५, २१ एप्रिलला १५०, २२ एप्रिलला ६७, २३ एप्रिलला ५१, २४ एप्रिलला ११७, २५ एप्रिलला ११९, २६ एप्रिलला ११२, २७ एप्रिलला ९४, २८ एप्रिलला १०६, २९ एप्रिलला २०५, ३० एप्रिलला १८०, १ मे रोजी १०६, २ मे रोजी १२१, ३ मे रोजी ११५, ४ मे रोजी ३५०, ५ मे रोजी ३५४, ६ मे रोजी २७५, ७ मे रोजी २०७, ८ मे रोजी १६९ तर ९ मे रोजी ३३० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.