Home Blog Page 2580

समग्र शिक्षा अभियान : मोफत पाठ्यपुस्तकांच्या वितरणास शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

0

मुंबई, दि. 18;  महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती मार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या लाभार्थी असलेल्‍या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आणि लाभार्थी नसलेल्या इ. १ ली ते इ. १२ वी च्‍या विद्यार्थ्यांना खुल्या बाजारामध्‍ये पुस्तक विक्रेत्यांमार्फत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या वर्षी राज्यामध्ये समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत 5कोटी 73 लाख 30 हजार269 पाठ्यपुस्‍तके आणि बाजारातील विक्री अंतर्गत 3 कोटी 87 लाख 05हजार पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहेत. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. पाठ्यपुस्तक मंडळाच्या मुंबई येथील गोरेगाव या विभागीय भांडारातून पाठ्यपुस्तकांच्या  वितरणास आज शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

आजपासून दहावी या महत्त्वाच्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकांची राज्यातील सर्व भांडारांमधून विक्री सुरू करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तक मंडळाच्या भांडारात तसेच  पुस्तक विक्रेत्यांकडे पाठ्यपुस्तके खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्‍हणून टप्प्याटप्प्याने इतर इयत्तांच्याही  पाठ्यपुस्तकांची विक्री सुरू करण्यात येणार आहे. असेही प्रा. गायकवाड यांनी सांगितले आहे.

पाठ्यपुस्तक मंडळाच्या सर्व विभागीय भांडारांशी व्हिडिओ कॉन्‍फरन्‍सद्वारे प्रा. गायकवाड यांनी संवाद साधून समग्र शिक्षा अंतर्गत व विक्री करण्‍यात येणाऱ्या पाठ्यपुस्‍तकांचा आढावा घेतला व त्‍यासंदर्भांत सर्व अधिकारी/कर्मचारी यांना मार्गदशन केले. यावेळी पाठयपुस्तक मंडळाचे संचालक  विवेक गोसावी, गोरेगाव विभागीय भांडार व्यवस्थापक अजय यादव व भांडारातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्य पुस्तकांचे वितरण

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीसाठी राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागनिहाय भांडारांमार्फत पुढील प्रमाणे  पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात येत आहे.

नागपूर                      42,92,956 प्रती

अमरावती                62,73,284 प्रती

औरंगाबाद                63,57,592 प्रती

नाशिक                     94,19,702 प्रती

गोरेगाव (मुंबई)          34,70,810 प्रती

पुणे                         95,90,324 प्रती

कोल्हापूर                  58,59,416 प्रती

लातूर                      62,64,381 प्रती

पनवेल (रायगड)        51,01,804 प्रती

दिनांक 18.5.2020 पासून मंडळाच्या सर्व विभागीय भांडारांमधून त्यांचे कार्यकक्षेत येणाऱ्या संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषदा/महानगरपालिका यांना समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यास सुरूवात करण्‍यात आली आहे.

पीडीएफ पुस्तकांना भरघोस प्रतिसाद – सुमारे 81 लाख  पीडीएफ झाल्या डाऊनलोड

खाजगी व विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरता ही पाठ्यपुस्‍तके खुल्या बाजारातून पुस्तक विक्रेत्यांमार्फत उपलब्ध करून देण्यात येतात. संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे  इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी च्या सर्व पाठ्यपुस्तकांची PDF File  मंडळाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आल्‍या आहेत. आजपर्यंत इयत्ता 12 वी च्या 20 लाख 54 हजार 194 व इयत्ता 1 ली ते 11 वी च्या 61लाख 20हजार 753 PDF File डाऊनलोड केलेल्या आहेत. असे असुनसुद्धा मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्‍तकांची मागणी होत असल्‍याने आज पासून दहावी या महत्त्वाच्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकांची राज्यातील सर्व भांडारांमधून विक्री सुरू करण्यात आली आहे.

पाठ्यपुस्तक विक्रेते आणि शैक्षणिक संस्थांना करता येणार ऑनलाइन नोंदणी

राज्यातील संचारबंदीच्या काळात मंडळाच्या भांडारात पाठ्यपुस्तक खरेदीसाठी गर्दी होऊ नये, म्‍हणून मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या पाठ्यपुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांकरिता ऑनलाइन पद्धतीने पुस्तकांची मागणी नोंदविण्या करीता पाठ्यपुस्‍तक मंडळाने यंत्रणा विकसित केली असून त्‍याचे प्रात्‍यक्षिक यावेळी शिक्षण मंत्री यांना दाखविण्यात आले.

पुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांना भांडारात न येता ऑनलाईन पद्धतीने 24 तासात केव्हाही मंडळाकडे पुस्तकांची मागणी नोंदवता येणार आहे. त्यासाठी त्यांना कायमस्वरूपी युजर आयडी व पासवर्ड देण्यात येत असून  त्‍याचा वापर करून पुस्तक विक्रेत्यांना मंडळाच्या sales.ebalbharati.in या संकेतस्थळावरून पाठ्यपुस्तकांची ऑनलाईन मागणी नोंदविता येणार आहे. बॅंक ट्रान्सफर/क्रेडिट अथवा डेबिट कार्ड तसेच RTGS/NEFT च्या माध्यमातून या पुस्तकांच्या रकमेचा भरणा मंडळाच्या पेमेंट गेट – वे मार्फत  करता येणार आहे. मंडळाकडे रक्कम भरणा केल्याची खात्री झाल्यानंतर याच सेवेमार्फत पुस्तक विक्रेत्यांना SMS पाठविण्यात येऊन पुस्तके ताब्यात घेण्याबाबत सूचना प्राप्त होणार आहेत. यामुळे वेळेची बचत होणार असून भांडारांमध्ये गर्दी टाळता येणे शक्‍य होणार आहे.

मंडळाच्या सर्व भांडारांमधून पाठ्यपुस्तकांच्या वितरणाला सुरुवात करण्यात आली असल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतःची योग्य ती काळजी घेऊन काम करण्याची सूचना शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सर्वांना केली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी साधला कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर व रुग्णांशी संवाद

0

जळगाव दि. 18 : कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. जळगाव जिल्ह्यातही कोरोनाचे 279 रुग्ण आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथील सामान्य रुग्णालयातून जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर व रुग्णांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला व तेथील परिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर या सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे मनोधैर्य वाढण्यासाठी ते करीत असलेल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक तर केलेच त्याचबरोबर रुग्णांना लवकरच बरे होऊन बाहेर या. अशा सदिच्छाही व्यक्त केल्या.

जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळून येणाऱ्या रुग्णांवर तातडीने उपचार होण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्यात 78 कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, जळगाव व भुसवाळ येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. या रुग्णांवर त्याचठिकाणी उपचार करण्यात येत आहे. या रुगणांशी व डॉक्टरांनी आज संवाद साधताना अमळनेर येथे आतापर्यंत 105 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. यापैकी आतापर्यंत 35 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे तर आज 30 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील रुग्णांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चांगल्याप्रकारचे व योग्य प्रकारे उपचार होत असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण बरे होत आहे याबद्दल पालकमंत्र्यांनी अमळनेरसह जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटरमधील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या टिमचे कौतुक केले. तर कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधून त्यांना मिळत असलेल्या सुविधा, तसेच त्यांचेवर होणारे उपचार, सेंटरमधील स्टाफची रुग्णांशी वागणूक आदि बाबींची विचारपूस केली. त्याचबरोबर डॉक्टर चांगल्याप्रकार उपचार करीत असल्याने आपण या महामारीतून नक्कीच बरे होऊन लवकरच घरी परताल अशा सदिच्छाही दिल्या.

पालकमंत्र्यांची कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळेस भेट

जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यावर उपाय म्हणून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राज्य शासनाने प्रयोगशाळा स्थापन करण्यास मंजूरी दिली आहे. प्रयोगशाळेचे काम अंतिम टप्प्यात असून येथे लवकरच स्वॅबचे नमुने तपासण्यास सुरुवात होणार आहे. या कोरोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळेस पालकमंत्री श्री.पाटील यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक डॉ.किरण पाटील यांचेसमवेत भेट देऊन पाहणी केली. प्रायोगिक तत्वावर याठिकाणी आजपासून नमुने तपासण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.खैरे यांनी दिली तर लवकरच जिल्ह्यातील सर्व रुग्णांचे नमुने याच प्रयोगशाळेत तपासण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रसुती झालेल्या कोरोनाबाधित महिलेस पालकमंत्र्यांची साडीचोळीची भेट

येथील कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित महिलेची दोन दिवसांपूर्वी प्रसुती झाली असून या महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. या दोन्ही बाळांची तब्बेत ठणठणीत आहे. आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कोविड रुग्णालयास भेट देऊन दिली त्यावेळी पालकमंत्र्यांनी या महिलेसाठी तिच्या नातेवाईकांकडे साडीचोळीचा आहेर देऊन आपले भावाचे कर्तव्य पार पाडले व लवकरच बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.  त्याचबरोबर येथील रुग्णांना पोषक आहारही पालकमंत्र्यांच्यावतीने वाटप करण्यात आला.

रब्बी हंगामातील अट रद्द करून सरसकट मका खरेदीस परवानगी द्यावी

0

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांच्याकडे विनंती

नाशिक : किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत मका खरेदी करण्यासाठी खरीप-रब्बी अशी अट रद्द करून केंद्र सरकारने सरसकट सर्व मका खरेदीस परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क केला. यावेळी मका खरेदीबाबत केंद्र सरकारची भूमिका सकारात्मक असून खरीप मका खरेदीसाठी लवकरच परवानगी देण्यात येईल असे रामविलास पासवान यांनी सांगितल्याची माहिती  छगन भुजबळ यांनी दिली.

याबाबत छगन भुजबळ यांनी केंद्र शासनास पत्र सुद्धा दिले आहे. कोरोनामुळे घसरलेले बाजारभाव आणि नंतर भारतातील लॉकडाउनमुळे बंद पडलेल्या बाजारपेठा या कारणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांकडे अद्यापही मोठ्या प्रमाणात खरीप मका पडून आहे. या मक्याचे काय करावे, या विवंचनेत शेतकरी असल्याने मक्याचे कोसळलेले बाजारभाव पाहता केंद्र शासनाने ऑनलाइन नोंदणी व मका खरेदीसाठी रब्बी हंगामाची अट न ठेवता राज्यात शिल्लक असलेला सर्व मका सरसकट खरेदी करावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली आहे.

राज्यात तालुका खरेदी – विक्री संघाला रब्बी हंगामाचा मका ऑनलाइन नोंदणी व खरेदीच्या प्राप्त झालेल्या आदेशानुसार खरीप मक्याची नोंद ग्राह्य धरली जाणार नाही. शेतकरी खरिपाची सर्व कामे संपली की मका विक्री करतात. त्यातच पडलेल्या भावामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतात तसेच खळ्यावर मका साठवून ठेवला असून, आज राज्यात मोठ्या प्रमाणात एफएक्यू दर्जाचा खरीप मका विक्रीसाठी शिल्लक आहे. 1100 ते 1200 रुपये प्रतिक्विंटल कवडीमोल मक्याची विक्री होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. राज्यभर लॉकडाऊनला मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना तलाठ्यांकडे जाऊन रब्बी हंगाम मका नोंद करणेही अवघड झाले आहे. त्यामुळे फक्त रब्बी हंगाम मका खरेदी न करता शिल्लक खरीप हंगामाचाही सर्व मका खरेदी करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळून लॉकडाऊन काळात न्याय मिळेल अशी भुजबळ यांची भूमिका आहे. शिल्लक असलेला खरीप व रब्बी हंगामाचा मकाही एफएक्यू प्रतीचाच आहे त्यामुळे शासनाने खरीप व रब्बी हंगामाची अट वगळावी. आहे त्या खरीप मका नोंदीच्या आधारेच सरसकट ऑनलाइन नोंदणी करून मका खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती छगन भुजबळ यांनी रामविलास पासवान यांच्याकडे केली आहे.

महिलांसाठीच्या उल्लेखनीय कार्याबद्दल रितू प्रकाश छाब्रिया यांना पुरस्कार

पुणे : महिलांच्या शाश्वत विकासासाठी विविध उपक्रमांद्वारे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा रितू प्रकाश छाब्रिया यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘फ्लो’च्या मावळत्या अध्यक्षा हरजिंदर कौर तलवार यांनी त्यांचा सन्मान केला. छाब्रिया यांनी अध्यक्षपदाच्या कालावधीत (२०१९-२०) उस्मानाबाद जिल्ह्यातील १०० विधवा शेतकरी महिलांना बियाणे आणि शेतीचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवले.
 
शेतकरी आत्महत्या या सामाजिक प्रश्नावर लक्ष्य देऊन विधवा शेतकरी महिलांना उभे करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांना कौशल्याचे प्रशिक्षण, जमिनीची मालकी मिळवण्यात मदत आणि नियमित बियाण्यांचा पुरवठा केला जात आहे. यातील ६० टक्के महिला उत्तम शेती करत आहेत. त्यातून त्यानी त्यांच्या कर्जाची परतफेड केली आहे. तर जवळपास ८० टक्के महिला शेतकरी उत्साहाने शेती करत आहेत. नफ्यातील शेती करण्यासह बाजारांमध्ये उत्पादन नेण्याची आणि विकण्याची कला त्यांना अवगत झाली आहे. ८० ते ९० लाखांचे कृषीउत्पादन या महिलांनी घेतले आहे. हा उपक्रम कायमस्वरूपी चालू राहावा, यासाठी पुढील दोन वर्षांकरिता निधी वर्ग केलेला आहे, असे रितू छाब्रिया यांनी नमूद केले.

आशा भोसले यांच्या वाढदिवसापर्यंत आशा गीतांची ऑनलाईन साप्ताहिकी !

गायिका वृषाली आठवले -मावळंकर यांचा ‘आशा – द व्हर्सटाईल’ गीत  उपक्रम
पुणे :कोरोना लॉक डाऊन काळात देखील आशा भोसले यांनी अजरामर केलेल्या  गाण्याचे स्वर रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी  दर रविवारी आशा भोसले यांचे एक गाणे रेकोर्ड करून सोशल मिडिया च्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम  गायिका वृषाली आठवले- मावळंकर यांनी सुरु केला आहे. ८ सप्टेबर २०२० रोजी आशा भोसले यांचा वाढदिवस आहे,तोपर्यंत ‘आशा -द व्हर्सटाईल’  हा गीत उपक्रम सुरु राहणार आहे. १७ मे ते ८ सप्टेंबर या काळात १७ रविवार आहेत. दर रविवारी एक याप्रमाणे १७ आशा  गीते त्यांनी निवडली असून त्यात मराठी -हिंदी गीतांचा समावेश आहे.
 ‘विश्वविख्यात पार्श्वगायिका आशा भोसले या माझ्यासाठी दैवत,श्रद्धास्थान आहेत.त्यांचा ८ सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो. त्यांच्या दैवी सुरांनी  संगीत विश्वाला भुरळ घातली आहे. आशा ताईंच्या संगीतातील ह्या योगदानाबद्दल, सुरेल मानवंदना म्हणून त्यांनी गायलेली वेगवेगळ्या मूड्स,जॉनर ची काही हिंदी व मराठी गाणी रेकोर्ड करून सोशल मिडिया द्वारे  सादर करत आहे. व्हाट्स अप ग्रुप वरून पाठवली जात आहेत. ८ सप्टेंबर २०२०  पर्यंत दर रविवारी एक गाणे रेकॉर्ड करून पाठवायचा मानस आहे,’ असे वृषाली मावळंकर यांनी पत्रकाद्वारे सांगितले. १७ मे रोजी आशा भोसले यांच्या  ‘रुपेरी वाळूत ,माडांच्या बनात ये ना ‘ ,’शारद सुंदर चंदेरी राती ‘  या  दोन गाण्यांचा मेडले सादर करून आगळ्या उपक्रमाला प्रारंभ केला.
  ‘सद्य परिस्थितीत रसिक  प्रेक्षकांसाठी तसेच  सर्व हितचिंतकांसाठी काय करता येईल आणि मी घेत असलेल्या या  सुरांचा आनंद कसा शेअर करता येईल,या  विचारातून ही  संकल्पना सुचली,असे त्यांनी सांगितले. आशा भोसले यांनी गायलेल्या हजारो गीतांमधून १७ ,१८ गीते निवडणे अवघड होते. पण,त्यांच्या आवाजातील वैविध्य आणि सौंदर्य रसिकांपर्यंत पोहोचविणारी निवडक १७ गाणी विचारपूर्वक निवडली,असे वृषाली आठवले – मावळंकर यांनी सांगितले. भक्तीगीत,भाव गीत,लावणी,गझल,कव्वाली,रागांवर आधारित चित्रपट गीत असे अनेक गायन प्रकार या उपक्रमासाठी निवडले आहेत. रसिकांच्या फर्माईशी घेण्याचाही प्रयत्न त्या करणार आहेत. काही रविवारी एका ऐवजी दोन गाणीही सादर केली जाणार आहेत.
वृषाली यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले असून ‘वृष स्वर ‘संस्थेच्या माध्यमातून विविध संकल्पनांवर आधारित गाण्यांचे कार्यक्रम सादर केले आहेत. मधुबाला यांच्या वरील गीतांचा कार्यक्रम,हृदयनाथ मंगेशकर यांच्या रचनांवरील  कार्यक्रम त्यांनी केले आहेत.मनात झिरपलेल्या हिंदी -मराठी गीतांचा ‘माझिया मना’ यासारखे गीतांचे कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. त्यापैकी आशा भोसले यांनी गायलेल्या  गाण्यांच्या  ‘स्वराशा ‘ या कार्यक्रमाचे ५० हून अधिक प्रयोग त्यांनी केले आहेत .

गुरूदक्षिणेच्या जमवलेल्या निधीतून विविध संस्थाना ‘लाख’मोलाची मदत

पुणे : पं.रोहिणीताई भाटे यांचा वारसा जोपासत नृत्यभारती कथक डान्स अॅकॅडमीच्या विविध शाखेतील शिष्या दरवर्षी एकत्रित येऊन स्वरचित नृत्यरचना गुरुदक्षिणा म्हणून गुरूला अर्पण करतात. गुरुपौर्णिमेनिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमाविषयी ‘नृत्यभारती’च्या सर्व शिष्यांमध्येही
प्रचंड उत्सुकता असते.
परंतु, सद्य:स्थिती पाहता, गेली ७२ वर्षे अव्याहतपणे जपली जाणारी ही प्रथा एकत्रितपणे राबविण्यास मर्यादा आल्या आहेत. प्रथेत खंड न पाडता वेगळ्या स्वरूपात हा कार्यक्रम घेण्याचे संस्थेने योजिले आहे. तरी दरवर्षीप्रमाणे गुरुदक्षिणेचा निधी संस्थेने जमा केला. हा निधी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत अडचणीत आलेल्या विविध घटकांना मदत करणाऱ्या सामाजिक संस्थांना दिला. गुरु-शिष्य परंपरेतील चार पिढ्यांनी स्वयंस्फूर्तीने यात सहभाग घेतला. त्यांच्या समन्वयातून एक लाखाहून अधिक रुपयांचा निधी संकलित झाला. तो निधी नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्यदिनाच्या औचित्यावर ‘खाना बचाव, खाना खिलाओ ‘,  ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती ‘, ‘ झाशीची राणी प्रतिष्ठान ‘ आणि ‘ आय टीच स्कूल’ या सामाजिक संस्थांना सुपूर्त करण्यात आला. चॅरिटेबल ट्रस्ट असून देखील केलेल्या या लाखमोलाच्या कार्यातून वेगळा आदर्शच नृत्यभारतीने समाजापुढे घालून दिला.
या उपक्रमाविषयी संस्थेच्या संचालिका तसेच पं. रोहिणीताई भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या नीलिमा अध्ये यांनी सांगितले की, “ही संकल्पना आम्ही शिष्यांपुढे मांडल्यानंतर सर्वांचा त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे नवोदित आणि बाल नृत्यांगना यांनी देखील आपले खाऊचे पैसे या उपक्रमासाठी स्वखुशीने दिले. अमुक एका रकमेचे बंधन आम्ही घातले नाही. शक्य तेवढी जास्तीत जास्त मदत करण्याचे आवाहन केले. यामुळे एक ठोस रक्कम आम्ही जमा करू शकलो, याचे समाधान वाटते.
 गुरु रोहिणीताई या कलाकार म्हणून जितक्या श्रेष्ठ होत्या, तितक्याच माणूस म्हणूनही वंदनीय होत्या. त्यांनी अनेकदा आपल्या कार्यातून सामाजिक दायित्वाचे दर्शन घडविले होते. त्यामुळे हा उपक्रम म्हणजे त्यांना विनम्र भावनेने अर्पण केलेली गुरुदक्षिणाच आहे, अशा भावनाही अध्ये यांनी व्यक्त केल्या.

महापौर साहेब सर्वांना विश्वासात घेऊन काम करा – पक्षनेत्यांचा सल्ला (व्हिडीओ)

पुणे- महापालिकेची मागील महिन्यातील सर्व मुख्यसभा कोरोना च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर महापौरांवर विसंबून महापौरांना अधिकार देऊन तहकूब करण्यात आल्या .

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/1303442749867071/

या महिन्यातील पहिली मुख्यसभा आज सुरु होताच भाजप व्यतरिक्त अन्य पक्षांच्या सदस्यांनी आणि नेत्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका करत असलेल्या उपाय योजनांची माहिती आणि अर्थसंकल्पाची स्थिती याबाबत माहिती द्यावी अशी मागणी केली . मात्र ती न देताच ,अधिकाऱ्यांना प्रत्यक्षात कामे करू द्यात ,मुख्य सभेच्या कारणाने तास न तास इथे अडकवून ठेवू नये अशी भूमिका घेत आणि या महिन्यात निधन पावलेल्या मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करून सभेची तहकुबी सभागृहनेते यांनी मांडली आणि ती महापौरांनी स्वीकारून सभा तहकूब करत असल्याचे जाहीर केले . त्यानंतर सभागृहनेत्यांनी उद्याची आणि या महिन्यातील सभाही तहकूब करण्याचे अधिकार महापौरांना द्यावेत असे सांगितले यावर कॉंग्रेसचे अरविंद शिंदे, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ आणि दिली बराटे , योगेश ससाणे ,भैय्यासाहेब जाधव ,गफूर खान पठाण यांनी आक्षेप घेतले . गेल्या महिन्यात अधिकार दिले . पण स्थायी समिती च्या सभा मात्र महापौर सुरु ठेवत आहेत . त्या कशा ठेवतात ,त्यांना कोरोनाचे संकट लागू होत नाही काय ? कि निव्वळ टेंडर पास करायचे आणि आर्थिक व्यवहार आहेत म्हणून जर त्या सुरु ठेवण्यात येतात काय ? असे प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी  तर मुख्य सभा हि होऊ द्यात इथे सोशल डीस्टन्स पाळून निव्वळ कोरोना वर तरी माहिती द्या . काय करतोय आपण ते कळू द्यात . अशी भूमिका घेतली अखेरीस पक्षनेत्यांनी महापौरांना पुढील सभा तहकुबीचे अधिकार दिले परंतु सर्वांना विश्वासात घेऊन त्यांनी काम करावे असा आपला निर्णय असल्याकचे स्पष्ट केले .  या महिन्यातील  पुढील  सर्व मुख्य सभा देखील यानंतर महापौरांनी तहकूब केल्या. आता जून महिन्यातच मुख्य सभा होणार आहे .

गांधी भवनतर्फे कोरोना काळातील ताण तणावावर ऑनलाईन समुपदेशन सुरु

पुणे :  लॉकडाऊन संपेपर्यंत भुकेशी लढणा-या नागरीकांसाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी (गांधी भवन) आणि युवक क्रांती दल (युक्रांद)तर्फे १ एप्रिलपासून १८ मे अखेर पर्यंत सुरू असलेल्या मदतकार्याने ३५०० हून अधिक किराणा सामानाच्या किट्स वाटपाचा टप्पा पुर्ण केला आहे.
डॉ. कुमार सप्तर्षी (अध्यक्ष, युक्रांद आणि गांधी भवन) यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

लॉकडाऊन मुळे अडकलेले प्रवासी श्रमिक,  पुणे शहरातील वस्त्यांमधील अडचणीतील नागरीक, तृतीय पंथीय, वेश्याव्यवसायातील स्त्रिया,गरजुंना आणि जिल्ह्यातील आदिवासी भागात एकूण १० लाख खर्चून किराणा सामानाची मदत देण्यात आली. त्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी (गांधी भवन) आणि युवक क्रांती दल (युक्रांद) ने समाजातील विविध घटकांकडून निधी संकलन केले.

अन्नपुर्णा संस्थेने या मदतकार्यासाठी १०० किट्स दिले.  मशाल, रोटरी क्लब ऑफ पुणे स्पोर्टस् सिटी, सृष्टी सांस्कृतिक संस्था, जीवन संस्था,भारतीय समाज विकास व संशोधन संस्था,हेल्पींग हॅन्ड -दिघेमावशी परिवार,व्ही एम सॉफ्ट वेअर,आर जे संग्राम,समता सैनिक दल,सहेली संस्था,अन्नपुर्णा संस्था (मेधाताई सामंत),युनियन बँक अशा अनेक संस्था आणि व्यक्तींनी या मदत कार्यासाठी मदत केली. सचिन चौहान,संदीप बर्वे,जांबुवंत मनोहर,मुख्तार मणियार,सचिन पांडूळे,अप्पा अनारसे, रवी लाटे, सुदर्शन चखाले यांनी मदत कार्याचे संयोजन केले.या मदत कार्यासाठी चेक ( धनादेश ) द्यायचा झाल्यास तो ‘ महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ या नावाने द्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारने श्रमिकांना आपल्या गावी परतण्यासाठी रेल्वे आणि इतर सोयींची घोषणा केली आहे. ही प्रक्रिया पुर्ण होण्यासाठी काही दिवस लागतील. तोपर्यंत किराणा सामान वाटप अखंड चालू ठेवण्याचा निर्धार या संस्थांनी केला आहे.

  गांधी भवनच्या संवाद समुपदेशन केंद्राची मदत

        लॉकडाऊन काळात ताणतणाव आणि समस्यांसंदर्भात समुपदेशनाची आवश्यकता असल्याने गांधी भवन कडून समुपदेशनाची सेवा सुरु करण्यात आली आहे.एड प्रभा सोनटक्के यांच्याशी  मोबाईल नंबर 9823624094 वर संपर्क साधता येईल.

आर्थिक मदतीचे आवाहन
या कार्यात सहभागी होण्यासाठी किमान रूपये ३००/- देणगी पाठवावी, ही विनंती. ३०० रूपयात एका व्यक्तीला आठवडाभर पुरेल एवढे  किराणा सामान देता येते,या अनुमानानुसार हे आवाहन करण्यात आले आहे.
देणगी गांधी भवन खात्याचे तपशील    
Maharashtra Gandhi Smarak Nidhi
State Bank of India
Kothrud Branch
Kothrud, Pune – 38.
Account no.
52019302096
IFSC Code  SBIN0020734

चेक ( धनादेश ) द्यायचा झाल्यास तो ‘ महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ‘ या नावाने द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आज २०३३ नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण ३५ हजार ५८ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि.१८: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ५८ झाली आहे. आज २०३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज  ७४९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८ हजार ४३७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २५ हजार ३९२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ८२ हजार १९४ नमुन्यांपैकी २ लाख ४७ हजार १०३ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३५ हजार ५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ६६ हजार २४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १८ हजार ६७८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ५१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १२४९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये २३, नवी मुंबईमध्ये ८, पुण्यात ८, जळगावमध्ये ३, औरंगाबाद शहरात २, अहमदनगर जिल्ह्यात २,नागपूर शहरात २, भिवंडी १ तर पालघरमध्ये १  मृत्यू झाला आहे. या शिवाय बिहार राज्यातील १ मृत्यू मुंबईत झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३५ पुरुष तर १६ महिला आहेत.आज झालेल्या ५१ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत तर १९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. या ५१ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये (६८ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका:  २१,३३५ (७५७)

ठाणे: २३० (४)

ठाणे मनपा: १८०४ (१८)

नवी मुंबई मनपा: १३८२ (२२)

कल्याण डोंबिवली मनपा: ५३३ (६)

उल्हासनगर मनपा: १०१

भिवंडी निजामपूर मनपा: ४८ (३)

मीरा भाईंदर मनपा: ३०४ (४)

पालघर: ६५ (३)

वसई विरार मनपा: ३७२ (११)

रायगड: २५६ (५)

पनवेल मनपा: २१६ (११)

ठाणे मंडळ एकूण: २६,६४६ (८४४)

नाशिक: १०६

नाशिक मनपा: ७४ (१)

मालेगाव मनपा:  ६७७ (३४)

अहमदनगर: ६५ (५)

अहमदनगर मनपा: १९

धुळे: १२ (३)

धुळे मनपा: ७१ (५)

जळगाव: २३० (२९)

जळगाव मनपा: ६२ (४)

नंदूरबार: २५ (२)

नाशिक मंडळ एकूण: १३४१ (८३)

पुणे: २०४ (५)

पुणे मनपा: ३७०७ (१९६)

पिंपरी चिंचवड मनपा: १६० (४)

सोलापूर: ९ (१)

सोलापूर मनपा: ४२० (२४)

सातारा: १४० (२)

पुणे मंडळ एकूण: ४६४०  (२३२)

कोल्हापूर: ४४ (१)

कोल्हापूर मनपा: ८

सांगली: ४५

सांगली मिरज कुपवाड मनपा: ८ (१)

सिंधुदुर्ग: १०

रत्नागिरी: १०१ (३)

कोल्हापूर मंडळ एकूण: २१६ (५)

औरंगाबाद:१६

औरंगाबाद मनपा: ९५८ (३३)

जालना: ३६

हिंगोली: १०४

परभणी: ५ (१)

परभणी मनपा: २

औरंगाबाद मंडळ एकूण: ११२१ (३४)

लातूर: ४७ (२)

लातूर मनपा: ३

उस्मानाबाद: ११

बीड: ३

नांदेड: ९

नांदेड मनपा: ६९ (४)

लातूर मंडळ एकूण: १४२ (६)

अकोला: २८ (१)

अकोला मनपा: २४६ (१३)

अमरावती: ७ (२)

अमरावती मनपा: १०८ (१२)

यवतमाळ: १००

बुलढाणा: ३० (१)

वाशिम: ३

अकोला मंडळ एकूण: ५२२ (२९)

नागपूर: २

नागपूर मनपा: ३७३ (४)

वर्धा: ३ (१)

भंडारा: ३

गोंदिया: १

चंद्रपूर: १

चंद्रपूर मनपा: ४

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: ३८७ (५)

इतर राज्ये: ४३ (११)

एकूण:  ३५ हजार ५८  (१२४९) 

(टीप – आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २३६ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

आतापर्यंतचे सर्वाधिक ७४९ रुग्ण आज घरी सोडण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंबई महानगरपालिका- २३२, ठाणे- ५९, पालघर- ३, नाशिक- १३४, धुळे -१४, जळगाव-२, नंदूरबार- ४, पुणे-१६५, सोलापूर-२३, सातारा-६, सांगली व रत्नागिरी प्रत्येकी १, औरंगाबाद- २७, हिंगोली-५, लातूर- १, नांदेड- ५, अकोला-४०, यवतमाळ- १, नागपूर- २६ रुग्ण सोडण्यात आले आहेत.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ( आयसीएमआर), नवी दिल्ली यांनी देशातील २१ राज्यातील ६९ जिल्ह्यांमध्ये कोविड१९ च्या अनुषंगाने समाजाधारित सिरो – सर्व्हे करण्याचे निश्चित केले आहे.  सदर सर्वेक्षण पार पाडण्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, नवी दिल्ली, राष्ट्रीय साथरोगशास्त्र संस्था, चेन्नई आणि राष्ट्रीय क्षयरोग संशोधन केंद्र, चेन्नई या संस्था आवश्यक तांत्रिक सहकार्य करत आहेत. या ६९ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली  या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यामधे रॅन्डम पध्दतीने निवडलेल्या १० समुहातील प्रत्येकी ४० जणांची अशी एकूण ४०० लोकांच्या रक्ताची तपासणी  राष्ट्रीय विषाणू संस्थेने विकसित केलेल्या इलायझा पद्धतीने करण्यात येणार आहे.   रक्तद्रवामधील प्रतिपिंडांचा ( ऍन्टीबॉडी) शोध या प्रकारे घेण्यात येणार आहे. कोविड१९ प्रसाराची व्याप्ती समजण्यासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होईल.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १६८१ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४ हजार ४१ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६०.४७  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

पावसाळ्यापूर्वी कोरोना संकट संपवायचंय: उद्धव ठाकरे

0

मुंबई दि. १८:   कोरोना विषाणूला प्रतिबंध करताना अर्थचक्र सुरु राहावे यासाठी रेडझोन वगळता ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही उद्योग व्यवसायांना मान्यता देण्यात आली आहे. आजघडीला ७० हजार उद्योगांना परवानगी देण्यात आली असून ५० हजार उद्योग सुरुही झाले आहेत. ५ लाख कामगार काम करत आहेत. हे चक्र अधिक गतिमान करताना महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात नव्याने भरारी घेण्यास सज्ज झाला आहे.  याचाच एक भाग म्हणून ४० हजार एकर जमीन उद्योगासाठी राखून ठेवण्यात आली आहे. त्याचा लाभ घेऊन परदेशी उद्योजकांनी पुढे यावे, हरित उद्योग सुरु करावेत, त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, कोणत्याही अटी आणि शर्थीशिवाय राज्यात उद्योग सुरु करता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्थानिक उद्योजकांना  साद घालताना महाराष्ट्र उभा करण्यासाठी भूमिपुत्रांनी पुढे यावे आणि उद्योग संधींचा लाभ घ्यावा,  हा महाराष्ट्र शिवरायांचा लढवय्या महाराष्ट्र आहे हे दाखवून द्यावे असे  आवाहन केले.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/900854200381637/

 

भाडेतत्वावर जमीन

आपल्यासमोर दोन आव्हाने असल्याचे सांगताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, आपल्याला आपले ग्रीन झोन कोरोना विरहित ठेवायचे आहेत. कोणत्याही परिस्थितीत तिथे एकही रुग्ण निर्माण होऊ द्यायचा नाही तर दुसरे आव्हान आहे रेड झोनचे ग्रीन झोन मध्ये रुपांतर करणे. हे ही आव्हान आपल्याला स्वीकारायचे आहे. ग्रीन झोन मध्ये उद्योग सुरु करतांना  जमीन घेण्यासाठी पैसे नसतील तर भाडेतत्वावर जमीन उपलब्ध करून देतांना सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधांची ही उपलब्धता करून दिली जाईल.

लॉकडाऊनमुळे विषाणू प्रसाराची गती रोखण्यात यश

लॉकडाऊन किती काळ राहणार, याचे उत्तर कोणाकडेच नाही, जगाकडेही नाही असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, लॉकडाऊनमुळे विषाणूची साखळी तोडण्यात यश आले नसले तरी त्याची गती कमी करण्यात आपण नक्कीच यशस्वी झालो आहोत. ही काळजी घेतली नसती तर महाराष्ट्रात आणि देशात किती अनर्थ झाला असता याचा विचारही करवत नाही. आता कोरोनानंतर संपूर्ण जग बदलणार असल्याचे बोलले जाते. हा आजार नेहमीच्या सर्दी-पडसे आणि खोकल्यासारखा नाही, गंभीर आहे, तो गांभीर्यानेच घ्यायला हवा.

आरोग्य सुविधांमध्ये वाढ

मुंबईसह महाराष्ट्रात आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुंबईत रुग्णसंख्या वाढल्यास पुरेशी व्यवस्था असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. वरळी एनएससी डोम, रेसकोर्स, गोरेगाव नेस्को, बीकेसी, एमएमआरडीए, सिडको, मुलुंड,  दहिसर- मुंबई मेट्रो, वरळी डेअरी अशा ठिकाणी  मो ठ्याप्रमाणात रुग्णांची व्यवस्था करण्यात येत असून हॉस्पिटलबाहेर पहिल्यांदाच ऑक्सिजनसह आयसीयू बेड्सची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यात १४८४ कोव्हीड केअर सेंटर्स, २ लाख ४८ हजार ६०० खाटांची उपलब्धता असल्याचेही ते म्हणाले.

मुंबईत १९ हजार ५६७ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्यामध्ये ५ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दुर्देवाने काही जणांचा मृत्यू झाला आहे. वेळेत उपचार घेतले तर बरे होऊन घरी जाता येते हेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आणखी कोविड योद्धे हवेत

वैद्यकीय अधिकारी, पोलीस कामांनी थकत आहेत, त्यांची आजारी पडण्याची वाट न पहाता त्यांना  आराम देण्याची गरज आहे  हे लक्षात घेऊन  आणखी कोविड योद्ध्यांनी पुढे येऊन रुग्ण सेवा करावी  असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

जेवढे स्वयंशिस्तीने वागाल तितके लॉकडाऊन लवकर संपेल

जितक्या स्वयंशिस्तीने वागाल तितके लॉकडाऊन लवकर संपेल  असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी या आजाराचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरज व्यक्त केली. अमेरिका, ब्राझील, इटली सारख्या देशात लॉकडाऊन व्यवस्थित न हाताळल्याने काय झाले हे पाहिले तर महाराष्ट्र हितासाठी मी प्रसंगी लॉकडाऊन कायम ठेवत वाईटपणा घ्यायलाही तयार असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती प्रत्यक्षातली स्थिती वेगळी असल्याचे आणि ही संख्या कमी ठेवण्यात यश आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

5 लाखाहून अधिक मजुरांना त्यांच्या राज्यात सोडले

मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडून त्यांना त्यांच्या राज्यात सुखरूप जाऊ द्या ही मागणी आपण सुरुवातीपासून करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला या श्रमिकांचे अजिबात ओझे नव्हते परंतु मजुरांची त्यांच्या राज्यात, घरी जाण्याची तीव्र इच्छा होती. त्या इच्छेचा  सन्मान राखत आता सुरु  श्रमिक ट्रेनद्वारे ५ लाख मजूर नियोजनबद्धरित्या त्यांच्या राज्यात परतले आहेत.  (रेल्वे आणि बसद्वारे)  अजूनही काही मजूर रस्त्यांनी चालत जात आहेत. त्यांना आवाहन करताना मुख्यमंत्र्यांनी जिथे आहात तिथेच थांबा, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तुम्हाला तुमच्या राज्यात पाठवण्याची व्यवस्था केली जाईल, ट्रेन सेवा सुरु झाली आहे असे सांगितले तसेच या सर्वांचा प्रवास खर्च शासन करत असल्याची माहितीही दिली.

कोकणवासियांनो धीर धरा

महाराष्ट्रात जिल्ह्या जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना  विशेषत: कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील लोक जे मुंबईत आहेत, घरी जाऊ इच्छितात त्यांना मुख्यमंत्र्यांनी घरी जाण्याची घाई करू नका, आपल्यामुळे कुटुंब आणि गावाला अडचणीत आणू नका, आपल्याला आपले ग्रीन झोन जपायचे आहेत, हा विषाणु तिथे पोहोचू द्यायचा नाही आहे असे ही आवाहन केले.

बाहेर पडताना आता सावधनता आवश्यक

परदेशातून राज्यात लोक येत असल्याचे सांगतांना त्यांचे विलगीकरण करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.   आतापर्यंत घरी राहा सुरक्षित राहा असे म्हणत होतो. परंतु हळुहळु घराबाहेर पडताना आपल्याला सावधही राहावे लागेल, स्वच्छता, स्वयंशिस्त, शारीरिक अंतराचा निकष पाळावाच लागेल, नाक, डोळे,चेहऱ्याला हात लावता येणार नाही ही सावधानता बाळगुनच भविष्यात पुढचे काही दिवस वावरावे लागेल. आजपर्यत राज्यातील नागरिकांनी शासनाला सहकार्य केले आहेच, शिस्त पाळली आहे पण आता त्यात आणखी कडकपणा हवा असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. अजूनही लोक विनाकारण बाहेर फिरताना दिसतात. तसे होऊ नये, आजही कोणत्याही धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाही, सण-समारंभ उत्सवांना परवानगी नाही. ग्रीन झोनमध्ये काही गोष्टी सुरु झाल्या आहेत. हळूहळू तेथील सगळी बंधने आपण उठवत आहोत, परंतू हे करतांना शिस्त पाळत आहोत. सुरु केलेली दुकाने, उद्योग व्यवसाय आपल्याला पुन्हा बेशिस्तीने वागून बंद होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. शैक्षणिक वर्ष, शाळा प्रवेश, ऑनलाईन शाळा यासारखे  प्रश्न आहेतच. परंतू कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक वर्ष वाया जाऊ दिले जाणार नाही. येत्या पावसाळ्यापूर्वी आपल्याला कोरोनाचे संकट संपवायचे आहे, आपण सर्व मिळून हे संकट पुर्णपणे परतवून लावू, जनजीवन पूर्वपदावर आणू, त्यासाठी कोरानाची साखळी तोडणे, विषाणूला हद्दपार करणे आवश्यक  आहे यासाठी काही काळ अजून नक्की लागेल पण आपण या युद्धात नक्की जिंकू असा विश्वासही  मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

 

आगामी शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

•       शाळा सुरु झाल्या नाही, तरीही शिक्षण सुरूच राहील.

•       शिक्षण आणि माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या चर्चेतून नियोजन करा.

•       ग्रामीण व शहरी भागांसाठी व्हर्च्युअल क्लासरूम्स, ई-लर्निंग, डिजिटल पर्यांयाचा विचार करा

•       जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सामावून घेणारी प्रणाली विकसित करा.

मुंबई, दि.१८ :-  कोरोना विषाणू प्रादुर्भावा नंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामध्ये जागतिक स्तरावरही बदल होऊ शकतात. त्यामुळे आपल्याकडेही नियमित शैक्षणिक वर्ष सुरु होईल अशा रितीने शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करा. शाळा सुरु झाल्या नाही. तरीही शिक्षण सुरूच राहील. यासाठी शिक्षण आणि माहिती व तंत्रज्ज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतर आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी शालेय शिक्षण तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी व्हिसीच्या माध्यमातून आढावा घेतला. या बैठकीत मुख्य सचिव अजोय मेहता ,शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय तसेच शिक्षण विभागाचे संचालक आदी वरीष्ठ अधिकारी सहभागी झाले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, शाळा सुरू होणार नाहीत. पण शिक्षण सुरूच राहील, असे नियोजन करणे आवश्यक आहे. विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चार भिंतीतील शाळा सुरु शकली नाही तर ऑनलाईन-शिक्षण, डिजिटल माध्यमाच्या पर्यांयाच विचार करावाच लागेल. विशेषतः कंटेन्मेंट झोन मधील शाळा बंद राहतील. ग्रीन झोन मध्ये सुरु शाळा करता येतील. पण झोनची परिस्थिती बदलली तर अडचणी निर्माण होतील. महापालिका क्षेत्रांमध्ये ग्रीन झोन कमी आहेत. त्यामुळे हा मोठा प्रश्न आहे. शहरात इंटरनेट सेवा उपलब्ध असते. त्यामुळे या ठिकाणी ऑनलाईन, व्हर्च्युअल क्लासरूम्स पर्याय वापरता येईल. ग्रामीण भागात ग्रीन झोन जास्त आहेत. पण त्याठिकाणी वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऑनलाईन, ई-लर्र्निंग, डिजीटल क्लास या माध्यमातून सामावून घेणारी प्रणाली विकसित करावी लागेल. त्यासाठी शिक्षण आणि तंत्रज्ज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून राज्यातील शाळांतील आराखडा तयार करण्यात यावा. दरवर्षी प्रमाणेच नियमित असे शैक्षणीक वर्ष सुरु होईल असे नियोजन करण्यात यावे. यासाठी जगातील अन्य ठिकाणच्या परिस्थितीची माहिती घेण्यात यावी, अभ्यास करून आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्य सचिव श्री. मेहता यांनी कोविड-१९ चे नियमांचा पालन करून शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु होईल असे गृहीत धरून नियोजन करण्याचे निर्देश दिले.

राज्यात ७५० शाळांत व्हर्च्युअल शिक्षण सुरु असल्याची माहिती श्रीमती कृष्णा यांनी दिली.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी अंतिम वर्ष वगळून अन्य वर्षातील विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात दाखल करण्याच्या तसेच प्रथम वर्ष प्रवेशाच्या नियोजनाची माहिती दिली. सीईटीच्या परीक्षांसाठीही तयारी करण्यात येत असल्याचे सांगितले.

बालभारतीची पाठ्यपुस्तके पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करण्यात आल्याने, ही पुस्तके ६७ लाख वेळा डाऊनलोड करण्यात आल्याची तसेच अन्य उपक्रमांची माहितीही बैठकीत देण्यात आली.

चार दिवसांत ६२ हजार ९१६ ग्राहकांना घरपोच मद्य विक्री

0

मुंबई दि.18:  राज्यात 15 मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत गेल्या चार दिवसात 62 हजार 916 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात  असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.  15 मे 2020 रोजी 5,434 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यास आली. तर 16 मे 2020 रोजी 8,268 ग्राहकांना, 17 मे 2020 रोजी 20,485 ग्राहकांना आणि 18 मे 2020 रोजी 28,729  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यास आली.

मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10 हजार 791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 5 हजार 221 अनुज्ञप्ती सुरू आहेत.

राज्यात दि.15-05-2020 पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्य विक्री सेवा देण्यात येत आहे. मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्काच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तथापी IOS प्रणलीबाबत संकेत स्थळावर अडचणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रणालीतील अडचणी दुर करण्यात येत आहेत तो पर्यन्त मद्यसेवन परवाना घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या निर्देशनास आणण्यात येते की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक/दुय्यम निरीक्षक कार्यालये व अधीक्षकांच्या कार्यालयात दरोराज मद्य सेवन परवाने  Offline पध्दतीने देण्याची सोय करण्यात आली आहे. सदर मद्य सेवन परवाने एक वर्षाकरीता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकताता. तरी मद्य विक्री दुकानासमोर गर्दी न करता मद्य सेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घेता येणार आहे.

पुणे विभागातून 78 हजार 19 प्रवाशांना घेऊन 60 विशेष रेल्वेगाडया रवाना

मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार राज्यातील प्रवाशी
– विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे, दि. 18 – लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार हिमाचल, झारखंड, छत्तीसगड राज्यामधील 78 हजार 19 मजुरांना घेऊन पुणे विभागातून 60 विशेष रेल्वेगाडया रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 16, उत्तरप्रदेशसाठी 27, उत्तराखंडसाठी 1, तामिळनाडूसाठी 2, राजस्थानसाठी 5, बिहारसाठी 6, हिमाचल प्रदेशसाठी 1 झारखंड साठी 1, छत्तीसगडसाठी 1, अशा एकूण 60 रेल्वेगाडया 78 हजार 19 प्रवाशांना घेवून रवाना झाल्या आहेत. 18 मे 2020 रोजी दिल्लीवरुन एक रेल्वेगाडी आली असून त्यामध्ये एकूण 324 प्रवासी आहे (पुणे 111, सांगली 31, सातारा 38, सोलापूर 54, कोल्हापूर 45)
तसेच 19 मे 2020 रोजी पुणे विभागातून उत्तरप्रदेशसाठी 1, जम्मू आणि काश्मिर साठी 1 बिहारसाठी 2 तसेच छत्तीसगडसाठी 1 अशा एकूण 5 रेल्वेगाडया नियोजित असून यामध्ये एकूण 7 हजार 84 प्रवाशी अपेक्षित आहेत.
यापैकी पुणे स्थानकावरून उत्तरप्रदेश, जम्मू आणि काश्मिर बिहार व छत्तीसगड यांच्यासाठी प्रत्येकी एक रेल्वे 5 हजार 628 प्रवाशांसह नियोजीत आहे. तर कोल्हापूर रेल्वे स्थानकावरुन बिहारसाठी 1 हजार 456 प्रवाशांसह एक रेल्वेगाडी नियोजीत आहे. या नागरीकांच्या प्रवासाच्या नियोजनाकरीता सबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, संबंधित तहसील कार्यालय आणि रेल्वे विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावत असल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
0 0 0 0 0 0

मिनी कंटेन्मेंट झोन वगळून स्टोन क्रशरला परवानगी – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे- पुणे जिल्हयात मिनी कंटेनमेंट झोन वगळून शासकीय नियमाप्रमाणे ज्या स्टोन क्रशरला परवाना देण्यात आला आहे, असे सर्व स्टोन क्रशर सुरू करण्यास हरकत नसल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज सांगितले.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे जिल्हयात मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी अनेक उद्योग सुरू केले आहेत. लॉकडाऊन कालावधीत नियमावलीचे पालन करून उद्योगांना परवानगी देण्यात आल्याने अनेक मजुरांचे स्थलांतर थांबविण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्ह्यात अनेक मजुरांचा रोजगार अवलंबून असलेले स्टोन क्रशर मिनी कंटेनमेंट झोन वगळून सुरू करण्यास हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्णसंख्या झाली 2 हजार 233

पुणे विभागातील 2 हजार 275 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 4 हजार 744 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 18 :- पुणे विभागातील 2 हजार 275 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 हजार 744 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2 हजार 233 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 236 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 177 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 4 हजार 123 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 14 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 903 आहे. कोरोनाबाधित एकूण 206 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 166 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात 122, सोलापूर जिल्ह्यात 12, कोल्हापूर जिल्ह्यात 8, सातारा जिल्ह्यात 9 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 138 कोरोना बाधीत रुग्ण असून 69 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 67 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 390 कोरोना बाधीत रुग्ण असून 150 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 214 आहे. कोरोना बाधित एकूण 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 50 कोरोना बाधीत रुग्ण असून 32 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 17 आहे. कोरोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 43 कोरोना बाधीत रुग्ण असून 10 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 32 आहे. कोरोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 52 हजार 462 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 44 हजार 983 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 7 हजार 539 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 40 हजार 180 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 4 हजार 744 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 1 कोटी 14 लाख 65 हजार 859 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 92 लाख 30 हजार 712 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 3 हजार 80 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
परदेशातून आलेल्या व्यक्तीचे विलगीकरण
पुणे विभागामध्ये 10 मे 2020 पासून ते 18 मे 2020 पर्यंत परदेशातून एकूण 476 व्यक्तींचे आगमन झालेले आहे. या सर्वांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेले आहे.
0000