Home Blog Page 2578

कोरोना लढाईत मनोरंजन क्षेत्र मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी

नियम पाळून चित्रीकरण, निर्मितीविषयक कामे सुरु करण्याबाबत अनुकूल; निश्चित कृती आरखडा द्या – मुख्यमंत्र्यांची निर्मात्यांना सुचना-कलाकार, तंत्रज्ञ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही

मुंबई दि २०: शारीरिक अंतर व इतर नियमांचे काटेकोर पालन करीत मर्यादित प्रमाणात चित्रीकरण किंवा निर्मितीनंतरच्या प्रक्रिया सुरु करता येतील का याबाबत निश्चित असा कृती आराखडा दिल्यास त्यावर विचार करता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. महाराष्ट्रातील मनोरंजन उद्योगातील विशेषत: मराठी चित्रपट, नाट्य क्षेत्र, मालिका यांचे निर्माते, कलाकार यांच्याशी ते आज संवाद साधत होते. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री सचिवालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ संजय मुखर्जी तसेच मान्यवर निर्माते, कलाकार सहभागी झाले होते.

या कॉन्फरन्सचे सूत्रसंचालन सुबोध भावे, आदेश बांदेकर यांनी केले. तर खासदार डॉ अमोल कोल्हे, चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसले, प्रसाद कांबळी, निखिल साने, नितीन वैद्य, सुनील फडतरे, केदार शिंदे अतुल परचुरे, अवधूत गुप्ते, मंगेश कुलकर्णी, रवी जाधव, विजू माने, राहुल देशपांडे, अजय भालवणकर, मुक्ता बर्वे, केदार शिंदे, सुकन्या मोने, पुष्कर श्रोत्री, हेमंत ढोमे, प्रशांत दामले, सुभाष नकाशे, प्रसाद महाडकर, शरद पोंक्षे, विद्याधर पाठारे, आदींनी सूचना केल्या तसेच आपल्या समस्या मांडल्या.

टीकेला उत्तर देण्यापेक्षा जबाबदारी पार पाडणे महत्त्वाचे

लॉकडाऊनबाबत काही जण माझ्यावर टीकाही करीत आहेत पण महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी टीकेचा धनी होईल. लॉकडाऊन करणे म्हणजे सर्व थांबविणे असे मी म्हणतच नाही. योग्य ती काळजी घेऊन आपण उद्योग-व्यवसाय- दुकाने आपण सुरु केले आहेत. कंटेनमेंट झोन वगळून काही प्रमाणात व्यवहार सुरु झालेच आहेत. रुग्ण वाढत आहेत हे सत्य आहे. अद्याप संकट घोंघावते आहे. या महिनाअखेरीस आणि जूनमध्ये मोठ्या रुग्ण संख्येचा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. तरी देखील आपण वेळीच पाउले उचलून कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार आत्तापर्यंत रोखला आहे. आता तर आपण अर्थचक्रही थांबवलेले नाही. मी माझ्यावरील टीकेला लगेच उत्तर देणार नाही कारण आत्ता मला माझी जबाबदारी पार पाडणे महत्त्वाचे वाटते आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या सर्वांची काळजी मी घेणारच. यावेळी सर्व कलाकार व निर्मात्यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या या प्रयत्नांत आमची संपूर्ण साथ राहील याची ग्वाही ही दिली.

गरीब लोककलावंत, बॅक स्टेज कलाकार यांच्याशी पाठीशी

मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्य शासन कोरोनाचा मुकाबला कशा रीतीने करीत आहे याची माहिती दिली व सांगितले की आपण आता कंटेनमेंट क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या क्षेत्रांची व्याप्तीही कमी केली आहे. महाराष्ट्रातले करमणूक आणि मनोरंजन क्षेत्र मोठे आहे. यावर रोजीरोटी कमावणारे लहान मोठे कलाकार तर आहेतच शिवाय तंत्रज्ञ, बॅक स्टेज कलाकार, कामगार हा वर्गही मोठा आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी चित्रपटनगरीतील सध्या ज्यांचे सेट्स उभे आहेत त्यांना भाडे सवलत, लोककला, तमाशा कलावंत यांना जगविणे यासंदर्भात निश्चितपणे विचार केला जाईल असे सांगितले.

मर्यादित प्रमाणात चित्रिकरणाचा विचार

यावेळी अनेक निर्मात्यांनी चित्रीकरण व पोस्ट प्रॉडक्शन सुरु करण्यास परवानगी देण्याबाबत सूचना केली होती त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, ग्रीन किंवा ऑरेंज झोन मध्ये आपल्याला दक्षता घेऊन व सर्व नियम पाळून मर्यादित स्वरूपात का होईना कसे चित्रीकरण सुरु करता येईल याचा विचार करता येईल पण त्यासाठी कंटेनमेंट झोन्समध्ये चित्रीकरण स्थळे नाहीत ना ,तसेच चित्रीकरण पथकातील लोकांची संख्या, त्यांचे राहणे-जेवणे या गोष्टी देखील पाहाव्या लागतील. संपादन प्रक्रिया करणाऱ्या स्टुडीओमध्ये परवानगी द्यायची असेल तर तेथील जागा, वातानुकुल यंत्रणा याबाबतही सुचना द्याव्या लागतील. पावसाळयापूर्वी अशी काही चित्रीकरणे शक्य होतील का ते पाहण्यास त्यांनी सांस्कृतिक कार्य विभाग व निर्मात्यांना सांगितले.

मनोरंजन क्षेत्र हे केवळ करमणूक करणारे नाही तर लोक त्यांचे अनुकरण करतात, त्यांच्यापासून शिकतात, तुम्ही दाखवीत असलेली सुख आणि दू:ख वास्तव जीवनात शोधण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे या क्षेत्राचे एक महत्व आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, नाट्य आणि चित्रपटगृहे ही सार्वजनिकरीत्या एकत्र येण्याची ठिकाणे असल्याने तिथे लगेच काही परवानगी देता येईल असे वाटत नाही.

विविध मागण्या

यावेळी नितीन वैद्य यांनी माहिती दिली की, ७० हिंदी, ४० मराठी आणि १० ओटीटी अशा ११० मालिकांची चित्रीकरणे कोरोनामुळे थांबली असून ३ लाख कामगार व तंत्रज्ञ यांची रोजीरोटीवर परिणाम झाल्याचे संगितले. ३० हजार एपिसोड दर वर्षी तयार होतात. ५ हजार कोटींची गुंतवणूक हिंदी मालिकांची तर २५० कोटींची गुंतवणूक यात आहे अशी माहिती दिली. निर्मात्यांना विना तारण कर्ज तसेच कमी व्याजाचे कर्ज, एक पडदा चित्रपटगृहाना वाचविणे, गरीब संगीतकारांना मदत, मराठी चित्रपटाना अनुदान रक्कम देणे, चित्रपट निर्मिती जीएसटी माफ करणे, सांगली-कोल्हापुरात चित्रीकरणाला परवानगी देणे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

येणाऱ्या गणपती व पुढील हंगामासाठी शारीरिक अंतर, मास्क घालणे आदि नियम पाळून विविध शो आणि कार्यक्रमाना परवानगी मिळावी त्यमुळे नुकसान काही प्रमाणात भरून निघेल असेही काही जणांनी सांगितले.

राज्यात आठ ते दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध

0

रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन

मुंबई, दि.२०: राज्यात यापुढे आठ ते दहा दिवस पुरेल एवढा रक्तसाठा उपलब्ध असून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. कोविड-१९ या विषाणूच्या झालेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्तपुरवठा, पीपीई कीट, मास्क याची उपलब्धता जाणून घेण्यासाठी उत्पादकांसोबत चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीनंतर ते बोलत होते.

या बैठकीला अन्न व औषध प्रशासन आयुक्त अरुण उन्हाळे, हाफकिन संस्थेचे कार्यकारी संचालक राजेश देशमुख यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोरोना झालेल्या व्यक्तीला उपचाराचा भाग म्हणुन रक्ताची आवश्यकता नसली तरी अशा व्यक्तीला जर ॲनेमिया किंवा इतर आजार असतील अशा परिस्थितीत त्याला रक्ताची आवश्यकता भासू शकते. याशिवाय इतर शस्त्रक्रिया, बाळंतपण आणि थॅलेसेमिया, काही कॅन्सर सारख्या आजारपणासाठी रक्ताची आवश्यकता असते. राज्यातील सर्व ब्लड बॅंक यांचा व्हॉट्‍सॲप गृप तयार करुन वेळोवेळी याची माहिती घेतली जाते. आपल्या जवळच्या ब्लड बॅंकेत, रुग्णालयात किंवा आपल्या सोसायटीमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करून रक्तदान करावे असेही  आवाहन डॉ. शिंगणे यांनी केले आहे. सध्या राज्यात उपलब्ध असलेला रक्तसाठा लक्षात घेता रक्तदात्याची संपूर्ण सुरक्षितता राखून छोटे छोटे कॅम्प घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

प्लाज्मा थेरपीच्या परवानगीसाठी औषध प्रशासनाचा पुढाकार

कोरोनाच्या उपचारासाठी  प्लाज्मा थेरपीच्या परवानगीसाठी  केंद्राकडून लागणाऱ्या सर्व परवानग्या तातडीने मिळवून देण्यात औषध प्रशासन विभागाने पुढाकार घेऊन सर्व परवानगी केवळ दोन दिवसात मिळवून दिल्या त्याबद्दल उपस्थित रक्तपेढी चालकांनी अधिकाऱ्याचे यावेळी आभार मानले.

खासगी डॉक्टरांना मिळतील पीपीई किट

खासगी डॉक्टरांनी रुग्ण तपासण्यासाठी आपले  दवाखाने सुरु करावेत, असे डॉ. शिंगणे यांनी  आवाहन केले आहे. पीपीई किट आणि एन ९५ मास्क याचा आवश्यक पुरवठा करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील किमान दहा केमिस्टच्या दुकानांमधून पीपीई किट आणि एन ९५ मास्क विक्रीस ठेवण्याची मान्यता देण्यात आली आहे.  कोरोना या आजारा व्यतिरिक्त इतर रुग्ण तपासण्यासाठी खासगी दवाखाने सुरु ठेऊन रुग्ण सेवा करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

क्वारंटाईनसाठी खासदारांनी दिले स्वत:चे घर

0

कोल्हापूर, दि. २० : निगेटिव्ह अहवालानंतर कराड येथून रुकडीत परतणाऱ्या विद्यार्थ्याला खासदार धैर्यशील माने यांनी स्वत:चं घर देवून ‘आपुलकी गृह’ या कोल्हापुरी पॅटर्नची सुरुवात स्वत:पासून आज केली. आपुलकी गृहाच्या माध्यमातून गावातील भाऊबंदकीतील कडवटपणा संपवून बंधूभाव वाढीस लागेल हा संदेश या निमित्ताने खासदार श्री. माने यांनी दिला. प्रत्यक्ष कृतीतून स्वत:चं घर देणारे देशातील पहिले खासदार असतील.

रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला संस्थात्मक अलगीकरण व्हावे लागते. ही संख्या मोठी असल्याने दिवसेंदिवस ताण वाढत आहे. यावर उपाय म्हणून खासदार धैर्यशील माने यांनी गावच्या सुरक्षिततेसाठी आणि गावच्या सहकार्यातून नव्या कोल्हापुरी पॅटर्नचा विचार दोन दिवसापूर्वी व्यक्त केला होता. यामध्ये रेड झोनमधून येणाऱ्या व्यक्तीच्या निगेटिव्ह अहवालानंतर त्याची त्यांच्याच घरी राहण्याची सोय करायची आणि घरातल्या सदस्यांनी आपल्या भावकीत, शेजारी रहायचे ही त्यांची संकल्पना होती.

गृह अलगीकरणाच्या या संकल्पनेला ‘आपुलकी गृहा’चे नाव देत या कोल्हापुरी पॅटर्नला हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील स्वत:चे घर देवून आज प्रत्यक्षात उतरविले आहे. स्वत:च्या संकल्पनेची स्वत:पासूनच सुरुवात करुन समाजाला आदर्श प्रेरणा देणारे खासदार श्री. माने हे देशातील एकमेव खासदार असावेत. कराड येथील महाविद्यालयात अकरावी, बारावीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी काही दिवसांपूर्वी आपल्या गावी रुकडीमध्ये आला. कोविड केअर सेंटरमध्ये त्याच्या स्वॅबचा निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर आज त्याची खासदार श्री. माने यांनी स्वत:च्या घरी राहण्याची सोय केली.

‘‘संस्थात्मक अलगीकरणाच्या ठिकाणी सुविधांवर मर्यादा येत असतात. त्याचबरोबर काही प्रमाणात भेदभाव दिसून येतो. सामाजिक अंतर म्हणजे मानसिक दुरावा नाही यातून मनावर मोठा ताण येत असतो. परंतु खासदार श्री. माने यांनी स्वत:चे घर उपलब्ध करुन दिल्याने माझ्या मनावरील ताण कमी झाला आहे,’’ अशी भावना या विद्यार्थ्याने यावेळी व्यक्त केली.

रुकडीचे सरपंच रफिक कलावंत या विषयी म्हणाले, गावाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व खबरदाऱ्या घेत आहोत. आपुलकी गृह ही संकल्पना केवळ मांडून थांबले नाहीत तर खासदार श्री. माने यांनी स्वत:पासून त्याची सुरुवात करुन इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे. निश्चितपणे ही संकल्पना गावांमध्ये वाढीस लागेल.

…मानसिक दुरावा नाही’

घरावरील आपुलकीच गृहाचा लक्ष वेधून घेणारा फलक

•        रुकडी येथील खासदार श्री. माने यांच्या घराच्या दरवाज्यावर ‘आपुलकी गृह’ चा फलक लावण्यात आला आहे.

•        बांधिलकी आपुलकीची, विलगीकरणातील जिव्हाळ्याची व माणुसकीची.

•        नाव प्रथमेश कुमार लोहार, वय-18.

•        विलगीकरण कालावधी 11 मे 2020 ते 24 मे 2020

•        बाहेरुन आलेले लोक हे आपलेच बांधव, माता-भगिनी व नातेवाईक आहेत. आपणास आजाराशी दोन हात करायचे आहेत. आप्तस्वकीय यांच्याशी नाही.

•        सोशल डिस्टन्सिंग याचा अर्थ शारीरिक अंतर आहे मानसिक दुरावा नाही.

असा संदेश देणारा हा फलक जाताच क्षणी लक्ष वेधून घेतो.

भाऊबंदकीतील कडवटपणा संपेल, बंधूभाव वाढीस लागेल- खासदार श्री. माने

कोरोनाच्या लढ्यामध्ये संपूर्ण जग उतरलं आहे. अनेकजण आपापल्या पध्दतीने मदत करत आहेत, असे सांगून खासदार धैर्यशील माने म्हणाले, माझी सामाजिक जबाबदारी म्हणून माझे स्वत:चे घर आपुलकी गृह या संकल्पनेला दिले आहे. गावा गावांमध्ये अशी आपुलकीची गृह निर्माण व्हावीत. शासनावर मोठ्या प्रमाणात येणाऱ्या ताणामुळे काही कमतरता राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसहभागातून गरोदर माता, वडीलधारी मंडळी, लहान मुले, नोकरीच्या निमित्ताने अथवा शिक्षणाच्या निमित्ताने अडकलेले आपलेच लोकं असतील,  अशांना आपुलकीच्या ओलाव्याची गरज आहे. त्यांना आपुलकी गृहाच्या माध्यमातून आधार आणि आश्रय मिळणार आहे.

गावामध्ये येणारे आपलेच नातेवाईक आहेत. त्यांच्यासाठी गावागावाने पुढे यावे आणि आपुलकीच्या ओलाव्याचा आधार द्यावा. मी माझ्यापासून सुरुवात केली आहे. तुम्ही तुमच्यापासून करा, असे आवाहन करतानाच गावामध्ये भाऊबंदकीत जर काही कडवटपणा असेल तर तोही निघून जाईल आणि खऱ्या अर्थाने बंधूभाव वाढीस लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कोरोनाच्या लढाईत अजितदादा रोज  महापौरांना फोन करतात हेच बापटांचे दुखणे – प्रशांत जगताप (व्हिडीओ)

पुणे- कोरोनाशी पुणे महापालिका आणि राज्य सरकार दोघेही लढत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पालकमंत्री अजितदादा रोज सकाळी पुण्याच्या महापौरांना फोन करून विचारपूस करतात हेच खासदार असलेल्या गिरीश बापटांचे दुखणे असावे असा टोला माजी महापौर प्रशांत जगताप यांनी लगावला आहे .केंद्रीय मंत्री म्हणून टेंभा मिरविणारे प्रकाश जावडेकर आणि ४० वर्षाच्या राजकारणाची परंपरा असलेले आता केंद्रात खासदार असलेले गिरीश बापट या दोहोंनी कोरोना विरोधातील या लढाईत नेमके काय योगदान दिले ? असा सवाल हि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केला आहे. 
काल खासदार बापटांच्या नेतृत्वाखाली महापौर आणि अन्य पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन कोरोना च्या लढाईत  पालकमंत्री ,राज्य सरकार आणि पुण्याचे स्थानिक प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप केला होता. याला रोख ठोक उत्तर देताना नेमके माजी महापौर प्रशांत जगताप यांनी पहा आणि ऐका नेमके काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात ….
https://youtu.be/iDLxNZw4Zfo

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली ताडीवाला रोड येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

0

पुणे दि. 20 : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व साखर आयुक्त सौरभ राव यांनी ताडीवाला रोड येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. प्रशासनामार्फत या ठिकाणी सुरु असलेल्या विविध उपाययोजनांबाबत माहिती घेऊन येथील कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सुचना त्यांनी संबधित विभागांच्या अधिका-यांना केल्या.

यावेळी ढोले – पाटील क्षेत्रिय कार्यालयांतर्गत असणा-या पुणे महानगरपालिकेच्या महात्मा जोतिबा फुले प्राथमिक विद्यालयात सुरु असलेल्या स्वॅब तपासणी केंद्राला तसेच संस्थात्मक अलगीकरण केलेल्या नागरिकांच्या विविध कक्षांना डॉ. दीपक म्हैसेकर व सौरभ राव यांनी भेटी देऊन येथील नागरिकांशी संवाद साधला. तसेच ताडीवाला रोड परिसरातील विविध वसाहतींची पाहणी करुन कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने येथील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने मास्क, सॅनिटायझर व अन्य सुविधा देण्यात येत असल्याची खात्री केली. तसेच नागरिकांना पुरविण्यात येणा-या जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा, देण्यात आलेल्या सुविधा, त्यांची भोजन व्यवस्था, आरोग्य विषयक सेवा सुविधा, सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफसफाई इत्यादी बाबींची सविस्तर माहिती घेतली. तसेच येथील नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करताना कोणकोणत्या विषयी माहिती संकलित करावी, हे करत असताना कोणत्या बाबींची खबरदारी घ्यावी, याबाबत त्यांनी सुचना केल्या.

यावेळी नगरसेविका लता राजगुरु, महापालिकेचे उपायुक्त विजय दहिभाते, सहाय्यक आयुक्त दयानंद सोनकांबळे, सहाय्यक आयुक्त संदिप कदम, विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा गलांडे, डॉ. संदिप धेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र रसाळ आदि उपस्थित होते.

पावसाळ्यापूर्वी अत्यावश्यक कामे पूर्णत्वास न्यावीत-जिल्हाधिकारी नवल किशोर राम

0

पुणे दि. 20 : – संभाव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये करण्यात येणाऱ्या निवारण कार्यात सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून पावसाळ्यापूर्वी अत्यावश्यक कामे पूर्णत्वास न्यावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून पूर्व तयारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी श्री.राम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस अधीक्षक संदीप पाटील आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी धरणनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. जिल्हयातील सर्व धरणांचे बांधकाम तपासणी पावसाळयापूर्वी करुन घ्यावी. धरणांचे गळतीबाबत पावसाळ्यापूर्वी कार्यवाही करावी. पाटबंधारे विभागाने जिल्हयातील सर्व धरणांच्या धरण सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन करावे. तसेच नदीपात्रालगत, पात्रातील झोपडपट्टया व इतर धोक्यांच्या ठिकाणाचा अभ्यास करुन त्याची माहिती घेवून नदीपात्रातील अतिक्रमणे काढावीत. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेने जिल्हयातील धोकादायक पुलांची पावसाळ्यापूर्वी पाहणी करावी. जुन्या इमारती, वाडे बांधकामांची तपासणी करावी. पावसाळयापूर्वी सर्व रस्त्यांचे पट्टे भरुन घ्यावेत. तसेच महामार्गालगत, रस्त्यालगत उत्खननामुळे बंद झालेल्या मोऱ्या कार्यान्वित करणे. धोकादायक ठिकाणी संबंधिक विभागाशी समन्वय ठेवून प्रवेश निषिध्द करावा. याबाबत बोर्ड लावण्यात यावेत.
जिल्हा शल्यचिकीत्सकांनी व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पूर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापनासाठी आरोग्य विषयक स्वतंत्र कक्ष स्थापन करावा. आपत्कालीन ॲम्ब्यूलन्सचा टोल फ्री क्रमांक सर्व विभागांना देण्यात यावा. तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी समन्वय अधिकारी, कर्मचारी यांचे पत्ते व संपर्क क्रमांकासह जिल्हा नियंत्रण कक्षास यादी सादर करावी. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये शहरात व ग्रामीण भागात कोरोनाबरोबरच इतर साथीच्या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात.
कृषी विभागाने गारपीट, अवकाळी पाऊस झाल्यास, शेतकऱ्यांच्या पिकांचे, फळपिकांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करुन अहवाल सादर करावा. या कामासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी, यांनी समन्वय ठेवावा. पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, छावणी नगरपरिषद, सर्व नगर परिषदा यांनीही आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच पोलीस आयुक्तालय पुणे व पिंपरी चिंचवड शहर, ग्रामीण विभाग, उपविभागीय अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विभाग, नागरी संरक्षण दल, राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग, भारत संचार निगम विभाग औद्योगिक सुरक्षा, हवामान विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, महसूल विभाग या सर्व यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवून पावसाळ्यापूर्वी चांगले नियोजन करावे, अशाही सूचना श्री. राम यांनी दिल्या.
यावेळी सर्व संबंधित यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

आरोग्य विभागातील कर्मचा-यांच्या कामाचे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले कौतुक

0

डॉ. दीपक सेकर, सौरभ राव व सचिंद्र प्रताप सिंग यांची संसर्ग चाचणी केंद्रास भेट

पुणे दि. 20 : कोरोना प्रतिम्हैबंधाच्या दृष्टीने शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट नजीक नागरिकांच्या तपासणीसाठी उभारण्यात आलेल्या संसर्ग चाचणी केंद्रास विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, साखर आयुक्त सौरभ राव व पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी भेट देऊन पाहणी केली. याठिकाणी पीपीई किट घालून तपासणी करणारे व वैद्यकीय सुविधा पुरविणारे डॉक्टर व वैद्यकीय अधिका-यांशी डॉ.म्हैसेकर यांनी संवाद साधून त्यांच्या कामाचे कौतुक केले.

यावेळी त्यांच्यासोबत अपर पोलीस आयुक्त सुजित फुलारी, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल, उपायुक्त नितीन उदास, सहाय्यक आयुक्त विजय दहिभाते, किशोरी शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मुळे, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजिरी कोलते आदी उपस्थित होते.

शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट, इराणी वस्ती, पाटकर प्लॉट, महात्मा गांधी वसाहत येथील नागरिकांच्या तपासणीसाठी संसर्ग चाचणी केंद्र उभारण्यात आले आहे. याठिकाणी आजवर तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या, त्यापैकी बाधित रुग्णसंख्या येथिल प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्णदर व मृत्यूदर, चाचणी केंद्रामधून करण्यात येणारा औषधोपचार आदी बाबींची डॉ. म्हैसेकर व वरिष्ठ अधिका-यांनी माहिती घेतली. यावेळी पीपीई किट घालून तपासणी करणा-या डॉक्टर व वैद्यकीय अधिका-यांच्या कामाचे कौतूक करुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. प्रशासनाच्यावतीने आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असे आश्वासनही डॉ.म्हैसेकर यांनी यावेळी दिले. तसेच पुरेसे मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट उपलब्ध असल्याबाबत माहिती खात्री केली.

या चाचणी केंद्रातून तपासणी करुन घेतलेल्या नागरिकांची व बाधित रुग्णांची वैद्यकीय पार्श्वभूमी व अन्य माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मुळे व सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजिरी कोलते यांनी दिली.

लॉक डाउन 4 , पुण्याची नियमावली वाचा-7 च्या आत सर्वच घरात….

पुणे – लॉकडाऊन ४ मधील पुणे महापालिका कार्यक्षेत्राकरिता नवीन सुधारित आदेश जारी करण्यात आले असून, संपूर्ण शहरात संध्याकाळी सात ते सकाळी सातपर्यंत कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. तसेच सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये ६५ वयोगटापेक्षा जास्त व १० वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना अत्यावश्यक सेवा व आरोग्य विषयक कारणाव्यतिरिक्त घराबाहेर पडता येणार नाही. तर कंटेन्मेंट झोनमध्ये (प्रतिबंधित क्षेत्रात) केवळ औषध विक्रीची दुकाने, बाह्य रूग्ण सेवा व दवाखानेच सुरू राहणार असून, किराणा माल, भाजीपाला विक्रीस आता बंदी घालण्यात आली आहे.

पुण्यातील बाधित क्षेत्रांसाठी जीवनावश्य क वस्तुंच्या दुकानांसह या क्षेत्राबाहे रील   बहुतांशी व्यवहार बुधवारपासून (दि.20) सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, सर्व प्रकारची सावर्जनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे “पीएमपी’, कॅब, रिक्षांसह मॉल, मल्टीप्लेक्स्, हॉटेल, सलून बंद राहणार आहेत. बाधित क्षेत्र वगळता अन्य भागांतील बॅंका, सरकारी कार्यालये, आयटी कंपन्या, बांधकाम सुरू होतील. विशेष म्हणजे, काही “रस्ते    वगळता बहुतांशी परिसरात पथारी व्यावसायिकांना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, बाधित क्षेत्रात अत्यावश्य क सेवा वगळता अन्य घटकांना विशेषत: नागरिकांना रस्त्यांवर येण्यास बंदी आहे.

ज्या भागांतील सोसायट्या, व्यापारी संकुला कोरोनाचे रुग्ण आढळून येतील आणि ते प्रमाण वाढत गेल्या त्या जागा सील करून त्यांचा समावेश बाधित क्षेत्रात केला जाणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्याशिवाय, दुकाने सुरू करताना संबंधित मालकांना आपल्याकडच्या कामगारांसह ग्राहकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सोपविली. त्याकडे काणाडोळा करणाऱ्या व्यावसायिकांना कारवाईला तोंड द्यावे लागणार असल्याचेही बजाविण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वंभूमीवर चौथ्या टप्प्यातील म्हणजे येत्या 31 मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार बाधित क्षेत्र वगळता बहुतांशी परिसरातील व्यवहार सुरू करण्याचा आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी मंगळवारी रात्री दिले आणि नवे आदेश लगेचच म्हणजे रात्री बारानंतर अमलात येतील, अशी घोषणाही त्यांनी केली.

त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या बाजारपेठा पुन्हा सुरू होणार आहेत. तसेच, पथारी व्यावसायालाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, हडपसर-(सोलापूर रस्ता),पुणे-सातारा रस्ता, नगर रस्ता, सिंहगड रस्ता, वाघोली, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, गणेशखिंड रस्ता पथारी व्यावसायिकांना परवानगी नसेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नव्याने काही सवलती देताना जुन्या 69 बाधित क्षेत्रातील 24 भाग वगळण्यात आले आहेत. तर नवा भाग समाविष्ठ करण्यात आला आहे.

 

सुरक्षा नियमपालन अटीवर ठराविक भागात

पथारी व्यवसाय करण्यास परवानगी

पथारी व्यावसायिकांना सकाळी 7 ते सायंकाळी 7 या दरम्यान व्यवसाय करण्यास आयुक्तांनी परवानगी दिली आहे. शिवाजी रोड, बाजीराव रोड, शनिवारवाडा, हडपसर, सातारा रोड, नगररोड, सिंहगड रोड, धायरी फाटा, पौड रोड, जंगली महाराज रोड, एफसी रोड, गणेश खिंड रोड भागांत व्यवसाय करता येणार आहे.

सर्व पेठा सील-

सादडी सदन,रविवार पेठ,रांका ज्वेलर्स रविवार‌पेठ, बुरडी पूल,बालाजी फरसाण पालखी विठोबा,पांगूळ आळी,कसबा पेठ,सोमवार पेठ,मंगळवार पेठ,ढोर गल्ली, जवळ जवळ सर्व गल्लीबोळातून ‌एकमेकाशी संपर्क होऊ न देण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

कंटेन्मेंट झोन कुठले?

मध्यवर्ती पुण्यातल्या सर्व पेठा (नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ वगळून), पर्वती दर्शन नीलायम, दांडेकर पूल, तळजाई वस्ती, शिवदर्शन, दांडेकर पूल, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, काकडे वस्ती, मीठानगर, कोंढवा, कात्रज, सुखसागरनगर, बालाजीनगर, धनकवडी- गुलाबनगर, अप्पर इंदिरानगर, प्रेमनगर, कामगार पुतळा, पाटील इस्टेट, शिवाजीनगर -म. गांधी झोपडपट्टी, येरवडा ताडीगुत्ता, जयप्रकाशनगर, गांधीनग ,नागपूर चाळ, फुलेनगर- येरवडा, धानोरी-कळस, वैदूवाडी, गोसावीवस्ती, सय्यदनगर, गुलामअलीनगर, सातववाडी, माळवाडी, हांडेवाडी, वेताळनगर, हडपसर- आदर्श कॉलनी, मीनाताई ठाकरे नगर, कोथरूड – शिवतारा सोसायटी, चंद्रगुप्त सोसायटी, ताडीवाला रस्ता, वडगाव शेरी, गणेशनगर, गुलटेकडी, डायस प्लॉट

कोरोनाचे हे  कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहे. या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दूध आणि भाजीपाला तसेच इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा जसे स्वयंपाकाचा गॅस, पुणे महापालिका, पोलीस प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक परिस्थिती लक्षता घेऊन घरपोच देण्यात येणार आहे. किंवा मोकळ्या जागेवर सुरक्षित अंतराचे पालन करून देता येईल. या परिसरात जीवनावश्यक वस्तूंचा, औषध विक्रीची दुकाने, अत्यावश्यक सेवा पुरविणारे कार्यालये, व्यक्तींना आणि त्यांच्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील दुकानांना वार ठरवून देण्यात आले आहेत.

नॉन कंटेन्मेंट झोन मध्ये  

कोणत्या वारी  कोणते दुकानं सुरु राहणार

सोमवार – इलेक्ट्रॉनिक साधने, संगणकीय साहित्य, मोबाइल विक्री आणि दुरूस्ती, इलेक्ट्रिक वस्तू विक्री आणि दुरूस्ती, भांड्यांची विक्री दुकाने, ईस्त्री व लॉंड्री दुकान, स्टेशनरी दुकान, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचे पुरवठा करणारे व्यवसाय, कपडे शिलाई, फोटो स्टुडिओ, सोने-चांदी व इतर मौल्यवान धातू विक्रीची दुकाने, चष्मा विक्रीची दुकाने; शेतीविषयक सर्व बाबींची दुकाने, रेनकोट, छत्र्या, प्लॅस्टिक शिट विक्रीची दुकाने.

मंगळवार – सायकल विक्री/दुरुस्ती, सर्व प्रकारचे स्वयंचलित वाहन विक्री, वाहनांचे दुरूस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिग, बांधकाम साहित्य साधन सामग्री, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने वाहन दुरूस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी सामग्री, सोने चांदी व इतर मौल्यवान धातू विक्रीची दुकाने, पूजा साहित्य विक्री, तयार फर्निचरची विक्री; शेतीविषयक सर्व बाबींची दुकाने

बुधवार– इलेक्ट्रॉनिक साधने, संगणकीय साहित्य, मोबाइल विक्री आणि दुरूस्ती, इलेक्ट्रिक वस्तू विक्री आणि दुरूस्ती, भांड्यांची विक्री दुकाने, ईस्त्री व लॉंड्री दुकान, स्टेशनरी दुकान, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचे पुरवठा करणारे व्यवसाय, कपडे शिलाई, फोटो स्टुडिओ, सोने-चांदी व इतर मौल्यवान धातू विक्रीची दुकाने, चष्मा विक्रीची दुकाने.

गुरुवार – सायकल विक्री/दुरुस्ती, सर्व प्रकारचे स्वयंचलित वाहन विक्री, वाहनांचे दुरूस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिग, बांधकाम साहित्य साधन सामग्री, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने वाहन दुरूस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी सामग्री, सोने चांदी व इतर मौल्यवान धातू विक्रीची दुकाने, पूजा साहित्य विक्री, तयार फर्निचरची विक्री; शेतीविषयक सर्व बाबींची दुकाने, सोने-चांदी व इतर मौल्यवान धातू विक्रीची दुकाने, चष्मा विक्रीची दुकाने, रेनकोट, छत्र्या, प्लॅस्टिक शिट ई. विक्रीची दुकाने.

शुक्रवार – इलेक्ट्रॉनिक साधने, संगणकीय अनुषंगिक साहित्य साधने सामुग्री व मोबाइल विक्री व दुरूस्ती इलेक्ट्रिक वस्तू विक्री व दुरूस्ती, भांड्याची विक्री दुकाने, ईस्त्री व लॉंड्री दुकान, फूट वेअर, बांधकाम साहित्य विक्री, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचे पुरवठा करणारे व्यवसाय, कपडे शिलाईचे दुकान; शेतीविषयक सर्व बाबींची दुकाने, माल वाहतूक कंपन्यांची गोदामे.

शनिवार – सायकल विक्री/दुरुस्ती, सर्व प्रकारचे स्वयंचलित वाहन विक्री, वाहनांचे दुरूस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिग, बांधकाम साहित्य साधनसामग्री, कापड दुकाने, डेअरी उत्पादने वाहन दुरुस्ती साहित्य विक्री, गृह उपयोगी सामग्री, फोटोस्टुडिओ, फोटोफ्रेमची दुकाने, ईस्त्री व लॉंड्री दुकान, बांधकाम साहित्य विक्री, पूजा साहित्य विक्री, सोने चांदी व इतर मौल्यवान धातू विक्रीची दुकाने, तयार फर्निचरची विक्री; शेतीविषयक सर्व बाबींची दुकाने, माल वाहतूक कंपन्यांची गोदामे. रेनकोट,छत्र्या,प्लास्टिक शिट्,ई .विक्रीची दुकाने.

रविवार – सायकल विक्री/दुरुस्ती, सर्व प्रकारचे स्वयंचलित वाहन विक्री, वाहनांचे दुरूस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिग, बांधकाम साहित्यसाधन सामग्री, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने, वाहन दुरूस्तीचे साहित्य विक्री, गृहोपयोगी सामग्री, स्टेशनरी दुकान, फूटवेअर, बांधकाम साहित्य विक्री, कपडे शिलाईचे दुकान; शेतीविषयक सर्व बाबींची दुकाने, माल वाहतूक कंपन्यांची गोदामे. रेनकोट,छत्र्या,प्लॅस्टिक शिट,ई. विक्रीची दुकाने.

नव्याने जारी केलेले ६५ कंटेन्मेंट झोन हे पूर्णपणे सील केले जाणार असून, यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा व पुरवठा सुरूळीत ठेवण्यासाठी या सेवा देणाऱ्या व्यक्तीं व्यतिरिक्त अन्य नागरिकांना प्रवेश करण्यास व बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर या भागात रूग्णवाहिका व केवळ महापालिकेच्या सेवा देणाऱ्या वाहनांनाच (पाण्याचे टँकर, अग्निशामक दलाची वाहने, कचरा वाहतुक गाडी ) व अत्यावशक सेवा देणारे कर्मचारी व अधिकारी यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
कंटन्मेंट क्षेत्रा व्यतिरिक्त इतर भागात नव्याने काही सवलती देण्यात आल्या असल्या तरी, एखाद्या इमारतीत अथवा गृह निर्माण सोसायटी येथे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आढळून आल्यास तो भाग सील करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तर कंटन्मेंट झोन बाहेरील भागातील मॉल, रिक्षा / कॅब, वाहतुक करणाºया बसेस, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर,स्पा हेही पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत.

परवानगी देण्यात आलेले :
* उद्योग व व्यवसाय : सर्व प्रकारचे दवाखाने, इस्पितळे, औषध विक्रीची दुकाने, अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे व्यवसाय यात औषधी, वैद्यकीय उपकरणे व त्यांना लागणारा कच्चा माल इ. तसेच ज्या ठिकाणी वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी कामामध्ये सातत्य ठेवावे लागते अशा बाबी : माहिती व तंत्रज्ञान विषयक हार्डवेअरची निर्मिती तसेच पॅकेजिंग करिता लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती, अन्न प्रक्रिया उद्योग जसे ब्रेड उत्पादक कारखाना, दुध प्रक्रिया केंद्र, पिठाची गिरणी, दालमिल.

* घरकाम करणाऱ्या व्यक्ती : कंटन्मेंट क्षेत्राबाहेर राहणाºया कोणत्याही व्यक्तीच्या घरी त्या घरमालकाची इच्छा असल्यास स्वेच्छेने काम करता येईल. परंतू कंटन्मेंट भागातील व्यक्तीस हे काम करता येणार नाही.

* ज्येष्ठ नागरिक : ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मदतीसाठी लागणाऱ्या व्यक्ती, रूग्णसेवेसाठी मदतनीस व्यक्ती, हेल्पर, घरकाम करणारी व्यक्ती, वाहनचालक इ.

*शासकीय कार्यालये : सर्व केंद्रीय कार्यालयांमध्ये उपसचिव आणि समकक्ष व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे सर्व अधिकारी कार्यालयात उपस्थित राहू शकतात. तर त्यांच्या अन्य कर्मचाऱ्यांच्या एकूण संख्येच्या ३३ टक्के कर्मचारी वापरून सदर कार्यालय सुरू ठेवता येईल. राज्य शासनाची सर्व कार्यालये शासनाने विहित केलेल्या कर्मचारी मर्यादेत सुरू ठेवता येणार आहेत.

* वर्तमानपत्रे : वर्तमानपत्रे वितरण सकाळी ७ ते सकाळी १० पर्यंत वितरित करता येतील. यावेळी वितरण करणाऱ्या व्यक्तीने मास्कचा वापर आणि वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक राहिल. तसेच इलेक्ट्रॉनिक मिडिया,केबल सर्व्हिस सुरू राहतील.

* वित्तीय क्षेत्र : सर्व बँका, एटीएम, सहकारी पतसंस्था, विमा कंपन्या व आरबीआयने नियंत्रित केलेल्या आर्थिक संस्था कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील.

* ई-कॉमर्स : ई-कॉमर्सच्या माध्यमातून घरपोच अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करता येईल. तसेच कुरिअर सेवाही सुरू राहतील.

* वाहन वापर : केवळ अनुज्ञेय कामांसाठी वैयक्तिक वाहन वापरता येईल. तथापि चार चाकी वाहनामध्ये चालका व्यतिरिक्त दोन व्यक्तींना परवानगी असेल. तर दुचाकी वाहनात मागच्या सीटवर व्यक्तीला नेता येणार नाही.

* माहिती तंत्रज्ञान : माहिती तंत्रज्ञान विषयक काम करणारे व सेवा देणारे व्यवसाय त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्के कर्मचाऱ्यांवर सुरू ठेवता येतील. तसेच डाटा व कॉल सेंटरमधील कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या वापर करून सुरू ठेवता येईल.

* खाद्य पदार्थ सेवा : खाद्य पदार्थ सेवा देणारे म्हणजे हॉटेल व्यावसायिकांना केवळ पार्सल सेवा सुरू ठेवता येईल.

* बांधकाम विषयक : बाहेरील मजूर न आणता कामाच्या जागेवर मजुरांची राहण्याची व्यवस्था होत असेल तर अशी बांधकामे आणि अपांरपारिक उर्जा प्रकल्पांची कामे करता येतील. पुणे मनपाने ज्या पूर्व पावसाळी कामांना, मेट्रोच्या कामांना, धोकादायक इमारतीबाबत करावयाची कारवाई तसेच पूरपरिस्थिती होऊ नये म्हणून ज्या कामांना पूर्व परवानगी देण्यात आली आहे अशी कामे सुरू राहतील.

* पथारी व्यावसायिक : अधिकृत पथारी व्यावसायिकांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत २ पथारी व्यावसायिकांमध्ये १० मिटरचे अंतर ठेऊन व्यवसाय करता येईल.

* सुरक्षा व सेवा व्यवस्था : रहिवासी संकुल व कार्यालयांना लागणाºया सेवा व सुरक्षा पुरविणाºया खाजगी संस्था सुरू राहतील.

* दुकाने : कंटन्मेंट झोनच्या व्यतिरिक्त मनपा क्षेत्रामध्ये सर्व प्रकारचे मॉल बंद राहतील. मात्र, व्यापारी संकुलामधील केवळ अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील. तसेच रस्त्यांवरील स्वतंत्र दुकाने, रहिवाशी कॉलनीतील दुकाने व रहिवाशी संकुलातील दुकाने उघडी राहतील.

कोरोनाचे आज २१२७ नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण ३७ हजार १३६

0

मुंबई, दि.१९ : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार १३६ झाली आहे. आज २१२७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १२०२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ९६३९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २६ हजार १६४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ९३ हजार ९९८ नमुन्यांपैकी २ लाख ५६ हजार ८६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३७ हजार १३६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ८६ हजार १९२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २१ हजार १५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ७६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १३२५ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये ४३, ठाणे शहरात १५, पुण्यात ६, अकोल्यात ३, नवी मुंबईमध्ये २, बुलढाणा २, नागपूर शहरात २, औरंगाबाद शहरात १, धुळे शहरात १ तर नाशिक शहरात १  मृत्यू झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ५० पुरुष तर २६ महिला आहेत. आज झालेल्या ७६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३०  रुग्ण आहेत तर ३९  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ७६ रुग्णांपैकी ५८ जणांमध्ये (७६ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १३२५ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे मागील २४ तासातील आहेत तर उर्वरित मृत्यू हे ३० एप्रिल ते १६ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ४४ मृत्यूंपैकी २२ मुंबईचे, १५ ठाण्याचे, अकोला मनपाचे २ तर बुलढाणा १, धुळे १, नागपूर १ नाशिक १ आणि पुण्यातील १ आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १७६५ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १५ हजार १७८ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६३.२९  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: २२,७४६  (८००)

ठाणे: २५३ (४)

ठाणे मनपा: १९१६ (३)

नवी मुंबई मनपा: १५०४ (२४)

कल्याण डोंबिवली मनपा: ५५७ (६)

उल्हासनगर मनपा: १०३

भिवंडी निजामपूर मनपा: ५०  (३)

मीरा भाईंदर मनपा: ३३१ (४)

पालघर:६७  (३)

वसई विरार मनपा: ३९६ (११)

रायगड: २६४ (५)

पनवेल मनपा: २४४ (११)

ठाणे मंडळ एकूण:  २८,४३१  (९०४)

नाशिक: १०४

नाशिक मनपा: ८२ (२)

मालेगाव मनपा: ६५४ (३४)

अहमदनगर: ४२ (५)

अहमदनगर मनपा: १८

धुळे: १३ (३)

धुळे मनपा: ७१ (६)

जळगाव: २३३  (२९)

जळगाव मनपा: ७० (४)

नंदूरबार: २५ (२)

नाशिक मंडळ एकूण: १३१२ (८५)

पुणे: २१२ (५)

पुणे मनपा: ३८४६ (२०२)

पिंपरी चिंचवड मनपा: १८२ (४)

सोलापूर: ९ (१)

सोलापूर मनपा:४३०  (२४)

सातारा: १४२ (२)

पुणे मंडळ एकूण: ४८२१  (२३८)

कोल्हापूर:६२  (१)

कोल्हापूर मनपा: १९

सांगली: ४७

सांगली मिरज कुपवाड मनपा: ८ (१)

सिंधुदुर्ग: १०

रत्नागिरी:  १०२ (३)

कोल्हापूर मंडळ एकूण: २४८ (५)

औरंगाबाद:१६

औरंगाबाद मनपा: १०१२ (३४)

जालना: ३८

हिंगोली: १०७

परभणी: ६ (१)

परभणी मनपा: २

औरंगाबाद मंडळ एकूण: ११८१ (३५)

लातूर: ४७ (२)

लातूर मनपा: ३

उस्मानाबाद: ११

बीड: ५

नांदेड: ९

नांदेड मनपा: ७० (४)

लातूर मंडळ एकूण: १४५ (६)

अकोला: २८ (२)

अकोला मनपा: २५९ (१५)

अमरावती: ७ (२)

अमरावती मनपा:  ११२ (१२)

यवतमाळ: १०१

बुलढाणा:३३ (३)

वाशिम: ३

अकोला मंडळ एकूण:५४३ (३४)

नागपूर: २

नागपूर मनपा: ३८६ (६)

वर्धा: ३ (१)

भंडारा: ७

गोंदिया: १

चंद्रपूर: १

चंद्रपूर मनपा: ४

गडचिरोली: ५

नागपूर मंडळ एकूण:  ४०९ (७)

इतर राज्ये: ४६ (११)

एकूण:  ३७ हजार १३६  (१३२५)

(टीप-आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २४२ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.  आय सी एम आर पोर्टलवरील माहितीचे डेटा क्लिनिंग सुरु असल्याने एकूण रुग्ण संख्येत बदल होऊ शकतो. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

आतापर्यंतचे सर्वाधिक १२०२ रुग्ण आज घरी सोडण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंबई महानगरपालिका- ६२२, ठाणे- १९४, पालघर- २७, रायगड- १०, नाशिक- ८८, अहमदनगर- ८, जळगाव-२८, पुणे-१३१, सोलापूर-११, सातारा-२, सांगली- १, औरंगाबाद- ३१, जालना-१, अकोला-४, अमरावती-३, यवतमाळ- १, नागपूर- ४० रुग्ण सोडण्यात आले आहेत.

राज्यात दिवसभरात १२०० रुग्ण घरी जाण्याचा उच्चांक – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

● खासगी डॉक्टर्स आणि शासन यांच्यात समन्वयासाठी समिती

● दोन महिन्यात १७ हजार रिक्त पदे भरणार

मुंबई, दि. १९ : राज्यात आज कोरोनाचे १२०२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या असून राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे २५ टक्के आहे. कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर नेण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात नॉन रेड झोन मध्ये बऱ्यापैकी शिथिलता देण्यात आली असून खासगी डॉक्टर्स आणि शासन यांच्यात समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी आज जनतेशी संवाद साधला. या संवादातील महत्वाचे मुद्दे असे:

• पावसाळा तोंडावर आला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाशिवाय अन्य आजारांच्या उपचारासाठी खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने सुरू करणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यात नॉन रेड झोनमध्ये बाजारपेठा, दुकानांना परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरू करावेत यासाठी शासन आणि त्यांच्यात समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावर तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समन्वय समिती नेमण्यात आली आहे.

• आरोग्य विभागातील डॉक्टर्स, विशेषज्ञ, नर्स, कर्मचारी यांची १७ हजार रिक्त पदे येत्या दोन महिन्याच्या आत भरण्यात येतील. त्यासाठी काल विभागाची सविस्तर बैठक घेतली आहे. लॉकडाऊनच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक असणाऱ्या मुलाखती देखील घेतल्या जातील आणि ही पदे भरले जातील.

• राज्यात रुग्ण हा केंद्रबिंदू मानून धोरण राबविले जात आहे. रुग्णांची खासगी रुग्णालयांकडून लूट थांबविण्यासाठी दरनियंत्रण कायदा केला असून त्याच्या सक्षम अंमलबजावणीसाठी प्राधिकारीही नेमले आहेत.

• राज्यात कोरोनाच्या प्रतिकारासाठी साधनांची अजिबात कमतरता नाही. मुंबईत सध्या खाटांची कमतरता जाणवत आहे. मात्र ही परिस्थिती कायम राहणार नाही. गेल्या काही दिवसांपासून बीकेसी, वरळी डोम, गोरेगाव येथे कोरोना केअर सेंटर उभारणी केली जात आहे. कोरोना केअर सेंटर या वर्गवारीमध्ये एक लाख खाटा उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोना हेल्थ सेंटर वर्गवारीमध्ये अतिरिक्त १५ हजार खाटा तर अतिदक्षता विभागाच्या २००० खाटा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

• खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा घेण्यात येणार असून शासन निश्चित दराने उपचार तेथे केले जातील.

• राज्यात दिवसाला सुमारे १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यासाठी ६७ प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत.

• राज्याचा मृत्यूदर हा ३.२ टक्के एवढा असून रुग्ण बरे होण्याचा दर २५ टक्के आहे.

• नागरिकांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांप्रति आपली वर्तणूक चांगली ठेवावी. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे ही आजची गरज असून कोरोना बाधितांना हीन वागणूक देऊ नका. मुंबई, पुण्याहून येणाऱ्या नागरिकांशी वागताना वर्तणुकीतली माणुसकी घालवू नका.

• मालेगावातील मृत्यूदर कमी होत आहे. तेथे खासगी दवाखाने बंद असल्याचा काळात मृत्यूचे प्रमाण वाढले होते. त्यानंतर तेथे जाऊन डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांना विश्वासात घेतले त्यानंतर खासगी दवाखाने सुरू झाले. आता त्याचे परिणाम दसू लागले असून मृत्यू दर खाली आली आले. राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या मालेगाव मध्ये टेली रेडीओलॉजी सुरू केली आहे. भयभीत झालेल्या लोकांना विश्वास दिला

राज्यात जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा भासणार नाही

0

मुंबई, दि. १९ : राज्यातील अन्न पदार्थ व इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत असून नागरिकांना अन्न पदार्थ, औषधे व जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा भासणार नाही, अशी ग्वाही अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आज येथे दिली.

अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयात अन्न पदार्थ तसेच औषध उत्पादक, वितरक व पुरवठादार यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन आयुक्त अरुण उन्हाळे, यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तुंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी त्यांनी अडचणी जाणून घेतल्या.

कामगार स्थलांतरित झाल्याने निर्माण झालेली समस्या, त्याचप्रमाणे कच्चा माल  आणि  दळणवळण साधनांच्या अभावामुळे उद्योगांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे डॉ.शिंगारे यांनी आश्वासन दिले.

राज्य शासन आणि व्यवसायिकांच्या समन्वयासाठी पुढाकार घेणारे पहिले राज्य पुरवठादारांनी मानले विशेष आभार

राज्यात कोवीड- १९ या विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने टाळेबंदी वाढविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना अन्न व औषध यांचा पुरवठा होण्यास अडचण येऊ नये यासाठी डॉ. शिंगणे यांनी सातत्याने बैठका घेऊन अडचणी सोडविण्याची भूमिका घेतली आहे. या पूर्वी एप्रिल महिन्यात देखील या प्रकारची बैठक घेऊन समन्वय अधिकारी यांची नेमणूक करून समस्या सोडविण्यावर भर दिला होता. उत्पादक, वितरक व पुरवठादार यांना येणाऱ्या समस्या नियंत्रण कक्ष किंवा समन्वय अधिकारी यांना कळविण्यास सांगितले होते. त्यासाठी व्हॉट्‍सअप ग्रुप तयार करण्यात आला होता. या अंतर्गत कामगारांचा प्रश्न, ई पासेस, पोलीस, महानगर पालिका व इतर आस्थापना यांच्याशी संबंधित सर्व समस्यांचे तात्काळ निवारण होऊन व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत झाली आहे. अशा प्रकारे स्वतःहून पुढाकार घेऊन  उत्पादक, वितरक व पुरवठादार यांना येणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्यावर समाधान देणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे. अशा भावना व्यक्त करून उपस्थित व्यावसायिकांनी विभागाच्या सहकार्याबद्दल मंत्री महोदयांचे विशेष आभार मानले.

कम्युनिटी किचनची तपासणी

कोरोना बाधित नागरिकांना शासकीय रुग्णालये, व त्यांच्याशी संलग्नित रुग्णालयातून देण्यात येणारे अन्न निर्भेळ, सकस, आरोग्यदायी, व सुरक्षित मिळावे यासाठी रुग्णालयातील भोजन कक्षांची तपासणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जेवण पुरविण्यासाठी सुरू असलेल्या कम्युनिटी किचनसाठी विशेष तपासणी मोहिम हाती घेण्यात आली. या अंतर्गत ११८ कम्युनिटी किचन्सची तपासणी करून ४७ नमुने विश्लेषणास पाठविण्यात आले.

औषधांसाठी कच्चा माल पुरेसा

कोविड-१९ या रोगाच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांव्यतिरिक्त मधुमेह, उच्च रक्त दाब, क्षयरोग, कर्करोग, व इतर सामान्य आजारासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचे नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना यावेळी डॉ.शिंगारे यांनी केल्या. ज्या ठिकाणी काही औषधांचा तुटवडा आढळून आल्यास पुरवठादारांना तिथे तात्काळ पुरवठा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. औषध निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल पुरेसा असल्याने येत्या दोन तीन महिने औषधे कमी पडणार नाहीत.

व्यावसायिकांनी व्यक्त केल्या भावना

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याने उत्पादन सुरु करण्यास मदत झाली असल्याचे मेरिको कंपनीचे प्रतिनिधी डॉ.पी. हळदे यांनी सांगितले. पीठ, गहू, तांदुळ,  साखर आणि तेल यांचा पुरवठा व्यवस्थित सुरु असून कोणत्याही प्रकारची साठेबाजी, काळाबाजार न होता ग्राहकांना पुरवठा होऊ शकला आहे. नाश्त्याचे पदार्थ, तसेच प्रतिकार शक्ती वाढविणारे पारंपारिक अन्न पदार्थांची विक्रमी विक्री झाली असल्याची माहिती कंझ्युमर डिस्ट्रीब्युशनचे प्रतिनिधी विशाल ताम्हणे यांनी दिली. हळद, तिखट या सारख्या मसाल्यांना भारतातील मागणी पुर्ण करायची असल्याने सध्या परदेशातील पुरवठा थांबविण्यात आला असल्याची माहिती एव्हरेस्ट मसालेचे प्रतिनिधी शैलेश शाह यांनी दिली. राज्याने वितरणासंदर्भातील बेंचमार्क स्थापन केला असून त्यामुळे सर्वत्र सामान पोहचू शकले असे मत पारले फुड कंपनीचे मयंक शाह यांनी सांगितले.

राज्यातील केमिस्ट व फार्मसिस्ट यांना औषध प्रशासना मार्फत उत्तम सहकार्य मिळत असल्याची भावना यावेळी उपस्थित औषध कंपनीच्या प्रतिनिधींनी बोलून दाखविली. प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या औषधांची तसेच आयुर्वेदिक काढा व  इतर पारंपारिक औषधांच्या उत्पादनांना मागणी वाढली असल्याचे निरिक्षण त्यांनी नोंदविले. औषध निर्मिती  करणारे उद्योग सुरु झाले असून शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून  उत्पादन सुरु झाले आहे. या व्यवसायाला आवश्यक असणारे कर्मचारी यांची ने-आण करण्यासाठी राज्य परिवहनच्या बस मधून प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य अन्न अधिकारी  संघटनेमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस धनादेश

मागील तीन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवेचा भाग म्हणून कार्यरत असलेले महाराष्ट्र राज्य अन्न अधिकारी यांनी आपल्या दोन दिवसाच्या पगारासह ३ लाख २१ हजार १०० रुपये एवढा निधी एकत्रित करुन मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड १९ साठी दिला आहे. महाराष्ट्र राज्य अन्न अधिकारी कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष उल्हास इंगवले, सचिव डॉ.राम मुंडे आणि आयुक्त अरुण उन्हाळे यांनी हा धनादेश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.शिंगारे यांच्याकडे सुपूर्द केला.

अम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडीसा आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे २१ मे नंतर रद्द

0

मुंबई, दि १९ : सुपर सायक्लॉनच्या धोक्यामुळे ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर सुपर सायक्लॉन अम्फान या वादळाचा धोका लक्षात घेऊन दिनांक २१ मे नंतर ओडिसा आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी विविध ठिकाणाहून श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहेत. त्याद्वारे सुमारे चार लाख श्रमिकांना विविध राज्यात सुरक्षित पोहोचविण्यात आले आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये उद्भवलेल्या अम्फान या वादळामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.  ही बाब लक्षात घेऊन या राज्याकडे जाणाऱ्या मजुरांनी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्व उपाययोजना करून श्रमिक रेल्वेद्वारे आजतागायत उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, जम्मू काश्मिर, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू या राज्यात सुमारे चार लाख श्रमिकांना सुरक्षित पोहोचविण्यात आले आहेत.

एका दिवसात ३२ हजार ७०० ग्राहकांना घरपोच मद्यसेवा

0

मुंबई, दि.19 : मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 5,569 अनुज्ञप्ती सुरू आहेत. आज एका दिवसात अंदाजे 32,700 ग्राहकांना घरपोच मद्यसेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

राज्यात 15 मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. मद्यसेवन परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तथापी IOS प्रणालीबाबत संकेतस्थळावर अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रणालीतील अडचणी दूर करण्यात येत आहेत. तोपर्यंत मद्यसेवन परवाना घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या निदर्शनास आणण्यात येते की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पद्धतीने देण्याची सोय करण्यात आली आहे. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरीता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात. तरी मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसमोर गर्दी न करता मद्यसेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घेता येणार आहे.

दि.19 मे, 2020 रोजी राज्य शासनाने नमुना FL-III (परवाना कक्ष) अनुज्ञप्तींकडील शिल्लक मद्यसाठा संपेपर्यंत अथवा लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत जे आधी होईल तोपर्यंत एम.आर.पी. दराने सीलबंद बाटलीत मद्यविक्री करण्यास परवानगी दिली आहे. सदर आदेश ज्या-ज्या जिल्ह्यात ज्या कार्यक्षेत्रात ज्या दिवशी ज्या वेळी मद्यविक्री सुरु आहे तेथे संबंधित प्राधिकृत अधिकारी यांच्या मान्यतेने लागू राहील.

शासनाने दि.03 मे,2020 पासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. सदर मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील 33 जिल्ह्यांतील (3 कोरडे जिल्हे गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर वगळता) काही जिल्ह्यांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरु आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये मद्यविक्री बंद आहे.

महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहेत. दि.18 मे, 2020 रोजी राज्यात 82 गुन्हे नोंदविण्यात आले असून 24 आरोपींना अटक करण्यात आली आहे. रु.20.97/- लाखकिंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि.24 मार्च, 2020 पासुन दि.18 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 5797 गुन्हे नोंदविण्यात आले असून 2601 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 582 वाहने जप्त करण्यात आली असून रु.15.56/- कोटी किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7 सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.  यासाठी टोल फ्री क्रमांक –  १८००८३३३३३३  व्हाट्सॲप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून  हा ई-मेल – commstateexcise@gmail.com आहे.

भाजपने आंदोलनाच्या शायनिंग ऐवजी प्रत्यक्ष जनसेवेला सुरुवात करावी  – अरविंद शिंदे (व्हिडीओ)

पुणे- पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा  शहर कॉंग्रेसच्या अध्यक्षांनंतर महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी हि समाचार घेतला आहे. प्रत्यक्षात अजित पवारांनी लोकप्रतिनिधींसमवेत व्पुंयाच्या विधान भवनात बैठक घेतली होती बापट या सभेला उपस्थित नव्हते मात्र त्यांच्या पक्षाचे महापालिकेतील सत्ताधारी  महापौर ,सभागृहनेते उपस्थित होते हे सांगताना त्यांनी या बैठकीचे मोबाईल वरील फोटो दाखविले ज्यात शिवसेना आणि मनसे चे गटनेते हि दिसत आहेत  आणि या बैठकीला आमदार चंद्रकांतदादा पाटील हि उपस्थित होते . असे असताना लोकप्रतिनिधींसमवेत अजित पवारांनी बैठकच घेतली नाही असे बापट यांनी केलेले विधान खोटे आहे असा दावा शिंदे यांनी केला .त्याच बरोबर भाजप शहराध्यक्ष यांनी घोषित केलेल्या आंदोलना बाबत हि शिंदे यांनी,’ आता यांनी टाळ्या वाजविणे ,थाळ्या वाजविणे, दिवे बंद करून पणत्या लावणे ,आंदोलने करणे अशा पद्धतीच्या शायनिंग बंद करून प्रत्यक्षात जनतेच्या सेवेला महत्व देऊन ते काम सुरु केले पाहिजे असे हि म्हटले आहे . नेमके शिंदे यांनी भाजपच्या या नेत्यांनी आज केलेल्या टीकेचा समाचार कोणत्या शब्दात घेतला तो ऐका त्यंच्याच शब्दात इथे …..

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना जारी-वाचा बंदी कशाला अन मुभा कशाला …

0

● राज्यात आता फक्त दोन झोन

● रेड झोन वगळता दुसऱ्या झोनमध्ये काही निर्बंध शिथील

मुंबई, दि. १९: कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना आज शासनाने जाहीर केल्या असून त्यामध्ये रेड झोन आणि नॉन रेड झोन असे दोन भाग केले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेसह मुंबई महानगर प्रदेश परिसरातील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती या महापालिकांचे क्षेत्र ‘रेड झोन’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत तर त्याव्यरिक्त उर्वरित भाग हा ‘नॉन रेड झोन’ म्हणून घोषित केला आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे, देखभाल, निगा आणि दुरुस्तीसाठी ‘रेड झोन’मध्ये दुकाने, मॉल, आस्थापना, उद्योग येथे सकाळी ९ ते सायंकाळी पाचपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून या ठिकाणी कुठलेही वाणिज्यिक व्यवहार केले जाणार नाहीत. मात्र ‘नॉन रेड झोन’मध्ये बाजारपेठा, दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी पाचपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.  जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.  या मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक कुठल्याही जिल्हा अथवा महापालिका प्रशासनाला मुख्य सचिवांच्या मान्यतेशिवाय स्वतंत्र आदेश काढता येणार नाहीत. आज जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना दि. २२ मे पासून राज्यात लागू होणार आहेत.

लॉकडाऊन ४.० मध्ये खालील बाबींना कायमस्वरूपी बंदी असेल-

● आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विमानवाहतूक यांना बंदी. तथापि वैद्यकीय सेवा तसेच अपवादात्मक परिस्थितील हवाई ॲम्बुलन्स सेवा आणि इतर आवश्यकता वाटल्यास वैदयकीय सेवांना परवानगी असेल.

● मेट्रो सेवा पूर्णपणे बंद.

● शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था विविध वर्ग (क्लासेस) यांना बंदी. ऑनलाईन/ ई- लर्निंग शिक्षणाला उत्तेजन देण्यात येईल.

● ज्या हॉटेलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी/ पोलीस/ शासकीय अधिकारी/ आरोग्य कर्मचारी/ काही कारणास्तव अडकली आहेत अशांसाठी तसेच यात्रेकरू आणि अलगीकरण व्यवस्था यांच्यासाठी सुरू राहतील. त्याशिवाय ठराविक बस डेपो, रेल्वे स्थानके आणि  एअरपोर्ट येथील कॅन्टीन व्यवस्था सुरू राहील. याव्यतिरिक्त बाकी सर्व उपहारगृहे आणि हॉटेल्स बंद राहतील. मात्र उपाहारगृहातील घरपोच व्यवस्था सुरु राहील.

● सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, क्रीडा संकुल, तरणतलाव, करमणूक संकुले, नाट्यगृहे, बार आणि ऑडिटोरियम, हॉल यांना पूर्पपणे बंदी.

● सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक सण आणि कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी.

● सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे यांना बंदी. धार्मिक कारणासाठी एकत्र येण्यावर बंदी.

● कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी निर्धारित केलेल्या राष्ट्रीय मार्गदर्शक सूचना व तरतुदी राज्यभरात कायम राहतील.

रात्रीची संचारबंदी

● अत्यावश्यक सेवा वगळता रात्री 7 ते सकाळी 7 वाजता या दरम्यान संचारबंदी असेल. स्थानिक प्रशासन यासंदर्भात सीआरपीसीचे कलम 144  आणि इतर नियमांनुसार आदेश जारी करुन याची कडक अंमलबजावणी करेल.

ज्येष्ठ नागरिक, बालकांची सुरक्षा

● 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि 10  वर्षाखालील मुले यांनी अत्यावश्यक किंवा वैद्यकीय  कारण वगळता घरातच थांबणे आवश्यक आहे.

भारत सरकारचे निकष, उपलब्ध आरोग्य सुविधा आणि इतर आवश्यक घटक लक्षात घेऊन राज्यातील बाधित क्षेत्र पुढीलप्रमाणे सुनिश्चित करण्यात येत आहे-

● रेड झोन्स – मुंबई महापालिकेसह एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिका. पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती महापालिका.

● रेड झोन नसलेले क्षेत्र (ऑरेंज आणि ग्रीन झोन) – राज्यातील उर्वरित क्षेत्र

कंटेनमेंट झोन्स –

● केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन संबंधीत महापालिका किंवा जिल्हा प्रशासन हे त्यांच्या भागातील रेड झोन, नॉन रेड झोन तसेच कंटेनमेंट झोन निश्चित करतील. महापालिका क्षेत्रात आयुक्त आणि जिल्ह्याच्या उर्वरित भागात जिल्हाधिकारी यांना कंटेनमेंट झोन निश्चित करण्याचे अधिकार देण्यात येत आहेत. निवासी कॉलनी, मोहल्ला, झोपडपट्टी, इमारत, इमारतींचा समूह, गल्ली, वॉर्ड, पोलीस ठाण्याचे क्षेत्र, गाव किंवा गावांचा छोटा समूह असे कंटेनमेंट झोनचे क्षेत्र असू शकेल. यापेक्षा मोठे क्षेत्र (संपूर्ण तालुका किंवा संपूर्ण महापालिका क्षेत्र इत्यादी) कंटेनमेंट झोन म्हणून मुख्य सचिवांशी सल्लामसलत करुन जाहीर करता येऊ शकेल. कंटेनमेंट झोन क्षेत्रात फक्त अत्यावश्यक बाबींसंदर्भातील कार्याला परवानगी देण्यात येत आहे. वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी या क्षेत्रात लोकांना बाहेर जाण्या-येण्यास पूर्णत:  प्रतिबंध करण्यात येत आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शिकेतील सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

रेड झोनमध्ये पुढील कामे सुरु राहतील-

● या आधी  अत्यावश्यक सेवेची जी दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती, ती दुकाने पूर्ववत सुरु राहतील.

● या आदेशाच्या आधी दिलेले निर्देश आणि शिथिलतेचे निकष लक्षात घेऊन व महापालिकेच्या धोरणानुसार अत्यावश्यक सेवा नसणारी दुकाने पूर्ववत सुरु राहतील. परवानगी असल्यास मद्य विक्रीची दुकाने सुरु राहतील.

●      या आधी मॉल, उद्योग, दुकाने, प्रतिष्ठाने सुरु ठेवण्याची परवानगी नव्हती.ती आता देण्यात आली आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या कालावधीत यंत्रसामग्री, फर्निचरची दुरुस्ती, देखभाल, निगा राखणे, पावसाळ्यापूर्वीची कामे या सर्व ठिकाणी करता येतील. मात्र याशिवाय कोणतीही (वाणिज्यिक) कामे  करता येणार नाहीत. उत्पादन सुरु करता येणार नाही.

● अत्यावश्यक  आणि अत्यावश्यक नसलेल्या वस्तू आणि साहित्यासाठी ई-कॉमर्स प्रणालीचा वापर करता येईल.

● या  आधी ज्या औद्योगिक घटकांना  सुरु करण्याची परवानगी दिली होती, ते औद्योगिक घटक सुरु राहतील.

● ज्या खाजगी व शासकीय बांधकामांना सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती, ती सुरू राहतील. पावसाळ्यापूर्वीची सर्व शासकीय व खाजगी बांधकामे करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

●      टॅक्सी, कॅब  आणि समूहाची वाहतूक करणारी साधने (ॲग्रेगेटर), रिक्षा यांना परवानगी नाही. अत्यावश्यक कामासाठी एक आणि त्याशिवाय फक्त दोन अशा व्यक्तींच्या वाहतुकीसाठी चारचाकी वाहनास परवानगी असेल. फक्त एकट्यालाच अत्यावश्यक कामासाठी दुचाकी वापरता येईल.

● अत्यावश्यक सेवेच्या कामासाठी येणारे कर्मचारी (आरोग्य आणि वैद्यकीय, कोषागारे, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, अन्न व नागरी पुरवठा, महापालिका सेवा, एनआयसी, एफसीआय ), त्यांच्या आवश्यकतेनुसार कार्यरत राहतील. संचालनालये आणि आयुक्तालयांसह सर्व शासकीय कार्यालये (उपनिबंधक/ प्रादेशिक परिवहन कार्यालये, उप प्रादेशिक परिवहन कार्यालये सुरु राहतील. अशैक्षणिक कार्यासाठी उपयोगात येणारे विद्यापीठीय आणि महाविद्यालयांचे कर्मचारी, पेपर तपासणी, मूल्यमापन,निकाल आणि ई-कंटेट (आशय) ची निर्मिती करणारे कर्मचारी कार्यालयात येऊ शकतील. मात्र एकूण मनुष्यबळाच्या ५ टक्के किंवा किमान १० व्यक्ती (जी संख्या अधिक असेल ती.) या प्रमाणातच अशा कर्मचाऱ्यांची उपस्थिती कार्यालयात राहणे आवश्यक राहील.केंद्र सरकारची कार्यालये ठरवून दिलेल्या निकषानुसार सुरु राहतील.)

● होम डिलिव्हरी (घरपोच सेवा ) करणारी उपहारगृहे आणि स्वयंपाकगृहे सुरु राहतील.

● या आधी जी कामे सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती, ती सुरु राहतील. मात्र सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील.

आरोग्य सेतू ॲपचा वापर

● आरोग्य सेतू ॲप हे कोरोना संसर्गाच्या संभाव्य जोखमीची लवकर ओळख करण्यास मदत करते. हा ॲप  व्यक्ती आणि समुदायासाठी ढाल म्हणून कार्य करतो.

● कार्यालये आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता ठेवण्याच्या दृष्टीकोनातून  मोबाइल फोन असलेल्या सर्व कर्मचार्‍यांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड  केले आहे, याची कार्यालय प्रमुखांनी खात्री करावी.

● नागरिकांनी त्यांच्या मोबाइल फोनवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे व त्यांच्या आरोग्य स्थितीची माहिती त्यावर अद्यावत ठेवावी असा सल्ला जिल्हा प्रशासन देऊ शकते. आजाराचा धोका असलेल्या व्यक्तिला या ॲपमुळे वेळेवर वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होईल.

विशिष्ट प्रकरणांमध्ये व्यक्ती आणि वस्तू/ मालाची वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी निर्देश-

● सर्व यंत्रणांनी डॉक्टर्स, परिचारिका आणि  वैद्यकीय कर्मचारी,  स्वच्छता कर्मचारी आणि रुग्णवाहिकांना कोणत्याही प्रकारच्या निर्बंधाशिवाय राज्यातल्या राज्यात आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात  जाण्यासाठी परवानगी द्यावी.

● सर्व प्रकारच्या जीवनावश्यक  वस्तूंची वाहतूक व , मालवाहतूक करणाऱ्या  आणि रिकाम्या ट्रक यांना राज्यातल्या राज्यात  येण्या – जाण्यास सर्व यंत्रणांनी परवानगी द्यावी.

● शेजारील देशांसोबत जे करार करण्यात आले आहेत त्या अंतर्गत होणाऱ्या कोणत्याही वस्तू किंवा माल-वाहतुकीस आपल्या सीमेवर प्रतिबंध करण्याचा अधिकार  कोणत्याही यंत्रणेला नसेल.

रेड झोन व्यतिरिक्तचे क्षेत्र

● या आदेशाच्या अनुच्छेद ४ मध्ये समाविष्ट बाबी वगळता तसेच स्पष्टपणे प्रतिबंधित किंवा बंदी घातलेल्या बाबी वगळता अन्य सर्व बाबींना खालील अटींच्या अधीन राहून परवानगी असेल.

● परवानगी असलेल्या बाबी करण्यासाठी कोणत्याही शासकीय प्राधिकाऱ्याकडून अनुमती, मंजुरी घेण्याची आवश्यकता नाही.

● क्रीडा संकुल, खेळाचे मैदान आणि अन्य सार्वजनिक खुल्या जागा या व्यक्तिगत व्यायामासाठी खुल्या राहतील; तथापि, प्रेक्षक आणि समूह व्यायामप्रकार किंवा खेळ आदींना अनुमती नसेल. सर्व शारीरिक व्यायाम इत्यादी हे योग्य शारीरिक अंतराचे (सोशल/ फिजिकल डिस्टंसिंग) नियम पाळून करता येतील.

● सर्व सार्वजनिक आणि वैयक्तिक वाहतुकीचे व्यवस्थापन खालीलप्रमाणे करावे:

दुचाकी वाहने : १ चालक (रायडर)/ तीनचाकी वाहन : १ अधिक २/ चारचाकी वाहन : १ अधिक2

● जिल्ह्याअंतर्गत बस वाहतूक ही आसनक्षमतेच्या कमाल ५० टक्के क्षमतेनुसार चालविण्यास परवानगी राहील. तथापि, बसमध्ये योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन होण्यासह बसचे निर्जंतुकीकरण (सॅनिटायजेशन) करणे आवश्यक राहील.

● आंतरजिल्हा बस सेवेच्या अनुषंगाने वेगळे आदेश निर्गमित करण्यात येतील.

● सर्व दुकाने (मार्केट/शॉप्स) सकाळी ९ वा. ते सायं. ५ वा. या कालावधीत चालू ठेवता येतील. कुठेही गर्दी किंवा योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास अशी दुकाने तात्काळ बंद करण्याचे आदेश प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून देण्यात येतील.

● कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्य विषयक प्रोटोकॉल मागील आदेशाप्रमाणेच लागू राहील. या मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक अन्य कुठलीही सूचना, आदेश  जिल्हा, विभागीय, राज्य प्राधिकरणाला मुख्य सचिवांच्या मान्यतेशिवाय काढता येणार नाहीत. कुठल्याही व्यक्तींकडून या आदेशातील सूचनांचे उलल्ंघन झाल्यास त्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० नुार कारवाई केली जाईल. त्यासोबतच कलम भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल.