Home Blog Page 2575

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोविड केयर सॉप्टवेअरचे प्रकाशन

पुणे,दि.22: पुणे विभागातील पुणे,सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्हयातील कोरोना उपचार करणा-या हॉस्पिटलचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका व्यवस्थापन तसेच इतर वैद्यकीय सुविधांचे व्यवस्थापन व इतर आवश्यक माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी तयार केलेल्या कोविड केयर सॉप्टवेअरचे प्रकाशन उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.
विधान भवनच्या ‘झुंबर हॉल’मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत या या सॉफ्टवेअरचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, पुणे पोलिस आयुक्त के.व्यंकटेशम, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त संदिप विष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हार्डिकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. शैलेंद्र पाठक यांनी हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने पुणे विभागातील कोरोना रुग्ण, उपचार, हॉस्पिटल व्यवस्था, रुग्णवाहिका व्यवस्था, रुग्ण असलेली क्षेत्रे याबाबत माहिती संकलन करणे सुलभ होणार आहे.
या सॉफ्टवेअरबाबत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व श्री.पाठक यांनी सविस्तर माहिती दिली. उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी या सॉफ्टवेअरच्या निर्मितीबाबत समाधान व्यक्त केले.

*****

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा

पुणे, दि.22 : कोरोना संकटासंदर्भातील सर्व शक्यतांचा अभ्यास करून भविष्यातील उपाययोजनांचे काटेकोर नियोजन करा. ‘कोरोना’शी लढण्यासाठी योग्य नियोजन करत सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

येथील विधान भवनच्या ‘झुंबर हॉल’मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ते  बोलत होते.

या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, पुणे पोलिस आयुक्त के.व्यंकटेशम, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त संदिप विष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हार्डिकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,  ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, आदींसह  विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक शिस्त लावावी लागणार आहे. वैयक्तिक मास्कचा वापर, योग्य आंतर ठेवण्याची दक्षता घ्यावी व कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी नागरिकांच्यात जनजागृती करावी लागणार आहे. सूक्ष्म नियोजनाद्वारे प्रभावीपणे उपाययोजनांची अंमलबजावणी करा, लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे आवश्यक आहे. जिल्ह्याच्या सीमेबाहेरून कुणी व्यक्ती येत असल्यास काटेकोरपणे तपासणी, संस्थात्मक विलगीकरण या गोष्टी पाळल्या गेल्याच पाहिजेत. बाहेरून येऊन कोणामार्फत संसर्ग पसरणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. बाहेरून येणाऱ्या बाधित व्यक्तींमध्ये अनेकदा ‘कोरोना’ची लक्षणे दिसत नाहीत. परंतु त्यांच्या मार्फत संसर्ग पसरण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांच्याबाबत काटेकोर कार्यवाही व्हावी. आवश्यक तिथे इतर यंत्रणांचे सहकार्य घ्यावे, अशा सूचनाही श्री.पवार यांनी केल्या.

सद्यस्थितीत आपण सर्वजण विविध अडचणींचा मुकाबला करत आहोत. मात्र, या काळात अधिक काटेकोरपणे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काम करावे. कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोनमध्ये कडक बंधने पाळली जातील, याकडे लक्ष द्यावे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे आज आपल्यापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. या काळात शासन, प्रशासन, विविध यंत्रणा अनेक आघाड्यांवर लढत आहेत. कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांचीच असून नागरिकांची त्याला साथ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक तथा साथरोग नियंत्रण चे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके म्हणाले, प्रयोगशाळा चाचणी आणि रुग्णालय भरतीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. विविध अंदाजानुसार येत्या काही आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते. स्थलांतरित मजूर किंवा हॉटस्पॉट क्षेत्रातून येणाऱ्या व्यक्तींबाबत निश्चित भूमिका घ्यावी लागणार आहे. लोक आपापल्या गावी जात आहेत. स्थलांतरित मजूर तसेच हॉटस्पॉटमध्ये येणाऱ्या व्यक्तींना त्या-त्या जिल्ह्यात 14 दिवसांकरता क्वारंटाईनमध्ये ठेवावे.  ज्यांच्या घरी क्वारंटाईन करणे शक्य आहे. त्यांना घरगुती क्वारंटाईनची अनुमती द्यावी. अशी सुविधा नसल्यास संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात यावे. क्वारंटाईन कालावधीमध्ये ज्यांना लक्षणे दिसतील त्यांचीच तपासणी करण्यात यावी. क्वारंटाईन नंतरचा 14 दिवसाचा कालावधी हा सेल्फ रिपोर्टिंग कालावधी आहे. या काळात या व्यक्तीला काही लक्षणे आढळल्यास त्याने आरोग्य व्यवस्थेस कळविणे आवश्यक असल्याचे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.

ससून रुग्णालयात कोरोना चाचण्या वाढविण्यासाठी शासनाकडून निधी ससून रुग्णालयात कोरोना चाचण्या वाढविण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडून आवश्यक निधी तातडीने देण्यात येईल असे श्री.पवार यांनी सांगितले. ससून रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या कोरोना चाचणी तपासणी केंद्राचा इतर साथीचा आजारासाठीही उपयोग होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोविड केयर सॉफ्टवेअरचे प्रकाशन

पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील कोरोना उपचार करणाऱ्या हॉस्पीटलचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका व्यवस्थापन तसे इतर वैद्यकीय सुविधांचे व्यवस्थापन व इतर आवश्यक माहिती अद्ययावत करता येण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शैलेंद्र पाठक यांनी तयार केलेल्या कोविड केयर सॉफ्टवेअरचे प्रकाशन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते झाले. या सॉफ्टवेअरबाबत श्री.पाठक यांनी सविस्तर माहिती दिली.

विभागीय आयुक्त  डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आयुक्त शेखर गायकवाड, आयुक्त श्रावण हर्डीकर, साखर आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्तण एस. चोक्कलिंगम यांनी कोरोनाबाबतच्या सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाचे आज २९४० नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण ४४ हजार ५८२ -आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि.२२ : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. आज २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ८५७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२ हजार ५८३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३० हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ३२ हजार ७७७ नमुन्यांपैकी २ लाख ८८ हजार १९५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ४४ हजार ५८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ६९ हजार २७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २८ हजार ४३० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ६३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १५१७ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमध्ये २७, पुण्यात ९, जळगावमध्ये ८, सोलापूरात ५, वसई विरारमध्ये ३, औरंगाबाद  शहरात ३, साताऱ्यात २, मालेगाव १, ठाणे १, कल्याण डोंबिवली १, उल्हासनगर १, पनवेल १ तर नागपूर शहरात १ मृत्यू झाले आहेत.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३७  पुरुष तर २६ महिला आहेत. आज झालेल्या ६३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २८  रुग्ण आहेत तर ३१  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६३ रुग्णांपैकी ४६ जणांमध्ये (७३ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: २७,२५१ (९०९)

ठाणे: ३६६ (४)

ठाणे मनपा: २२३४ (३३)

नवी मुंबई मनपा: १७७६ (२९)

कल्याण डोंबिवली मनपा: ७२७ (७)

उल्हासनगर मनपा: १४४ (३)

भिवंडी निजामपूर मनपा: ८२ (३)

मीरा भाईंदर मनपा: ३८८ (४)

पालघर:१०७  (३)

वसई विरार मनपा: ४५१ (१४)

रायगड: २९९ (५)

पनवेल मनपा: २८२ (१२)

ठाणे मंडळ एकूण: ३४,१०७ (१०२७)

नाशिक: ११५

नाशिक मनपा: ९३ (२)

मालेगाव मनपा: ७१० (४४)

अहमदनगर: ४९ (५)

अहमदनगर मनपा: २२

धुळे: १७ (३)

धुळे मनपा: ८० (६)

जळगाव: २८६ (३६)

जळगाव मनपा: १०९ (५)

नंदूरबार: ३२ (२)

नाशिक मंडळ एकूण: १५१३ (१०३)

पुणे: २८३ (५)

पुणे मनपा: ४४९९ (२३१)

पिंपरी चिंचवड मनपा: २११ (७)

सोलापूर: १० (१)

सोलापूर मनपा:५२२ (३२)

सातारा: २०४ (४)

पुणे मंडळ एकूण: ५७२९ (२८०)

कोल्हापूर:१७५ (१)

कोल्हापूर मनपा: २०

सांगली: ६२

सांगली मिरज कुपवाड मनपा: ९ (१)

सिंधुदुर्ग: १०

रत्नागिरी:  १३५ (३)

कोल्हापूर मंडळ एकूण: ४११ (५)

औरंगाबाद:२२

औरंगाबाद मनपा: ११६५ (४२)

जालना: ४६

हिंगोली: ११२

परभणी: १७ (१)

परभणी मनपा: ५

औरंगाबाद मंडळ एकूण: १३६७ (४३)

लातूर: ५८ (२)

लातूर मनपा: ३

उस्मानाबाद: २६

बीड: २६

नांदेड: १५

नांदेड मनपा: ८३ (४)

लातूर मंडळ एकूण: २११ (६)

अकोला: ३१ (२)

अकोला मनपा: ३३६ (१५)

अमरावती: ९ (२)

अमरावती मनपा:  १३६ (१२)

यवतमाळ: ११३

बुलढाणा:३९ (३)

वाशिम: ८

अकोला मंडळ एकूण:६७२ (३४)

नागपूर: ३

नागपूर मनपा: ४५७ (७)

वर्धा: ३ (१)

भंडारा: ९

गोंदिया: २८

चंद्रपूर:  ८

चंद्रपूर मनपा: ७

गडचिरोली: ९

नागपूर मंडळ एकूण:  ५२४ (८)

इतर राज्ये: ४८ (११)

एकूण:  ४४ हजार ५८२  (१५१७)

(टीप आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २५९ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १९४९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १६ हजार १५४ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६६.३२ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईसह राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव

0

शासनाच्या आदेशाचे पालन करणे खासगी रुग्णालयांना बंधनकारक – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. २२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या ८० टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मेस्मा, आपत्कालिन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा, बॉम्बे चॅरीटेबल ट्रस्ट आणि बॉम्बे नर्सींग होम कायद्यांमधील तरतुदींच्या अनुषगांने खासगी रुग्णालयांना राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. यामुळे कोरोनाच्या रुग्णांना खाटा उपलब्ध होण्याबरोबरच उपचाराच्या दरावर देखील नियंत्रण राहील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

राज्य शासनाच्या या आदेशानुसार ही खासगी रूग्णालये ताब्यात घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

खासगी रूग्णालये कोरोनाच्या रूग्णांकडून मनमानी करत बिल आकारणी करीत होते. आता शासन आदेशानुसार खासगी रुग्णालयांना या आदेशात जे दर निश्चित करून देण्यात आले आहेत त्याप्रमाणेच आकारणी करावी लागणार आहे.

मुंबईमधील शासकीय व महापालिकांच्या रूग्णालयांमधील खाटा काही प्रमाणात कोरोना रूग्णांसाठी उपलब्ध होत नसून आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णयाला मान्यता दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

या रुग्णालयात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी दर निश्चित केले आहेत. त्यात साधे बेड, फक्त ऑक्सिजनची सुविधा आणि अतिदक्षता विभागातील बेड यासाठी दर निश्चित केले आहेत.  त्यामुळे या आदेशानुसार खासगी रुग्णालयांनी आपल्या सेवा दिल्याच पाहिजे असे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई केला जाईल, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.

या आदेशानुसार कोरोनाच्या रुग्णांसाठी दर आकारणीचे तीन स्तर ठरविण्यात आले असून दर दिवसाला जास्तीत जास्त ४०००, ७५०० व  ९००० रुपये अशा पद्धतीने दर आकारणी करणारे स्तर बंधनकारक करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने काढलेला हा आदेश राज्यात ३१ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे.

रुग्णालयांकडून मनमानी पद्धतीने होणाऱ्या दर आकारणी बाबत तक्रार complaints.healthcharges@jeevandayee.gov.in  या ईमेलवर नागरिकांनी पाठवावी असे आवाहन करतानाच जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि राज्य  आरोग्य सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांना तक्रार निवारणीसाठी प्राधीकृत केल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

संकटकाळात मतभेद विसरून पुणेकरांवर मायेची फुंकर घाला- आबा बागुल

पुणे- मागील ३० वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना अनेक संकटे आली. परंतु, सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी एकजुटीने कोणतेही राजकारण न करता त्याला सामोरे जाऊन त्या संकटाना परतावून लावत होते. आता त्याच प्रकारे सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाला हद्दपार करू, असे आवाहन काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी केले आहे.

भाजपाच्यावतीने आज राज्यासह पुणे शहरात काळ्या फिती लावून राज्यसरकारचा निषेध केला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे कोरोनाचे संकट गंभीर बनल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर देताना बागुल यांनी मतभेद विसरू कोरोनवर मात करण्याचा सल्ला भाजप नेत्यांना दिला.

बागुल म्हणाले, १९९२ ला खिलारीचा भूकंपावेळी पुण्यातून सर्व पक्षीय नेते मदतीला धावून गेले होते. पुणे शहरात डेंगू , चिकुन गुनिया, सार्स या सारख्या संकटाला एकत्र सामोरे गेले. मी विरोधी पक्षनेता असताना स्वाईन फ्लू सारख्या अतिशय घाबरून टाकणारा आजार आला होता. त्यावेळी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधीनी एकत्र काम करून स्वाईन फ्लूवर मात केली होती. स्वाईनफ्लू आला कधी गेला कधी पुणेकरांना त्याची चाहूलही लागू दिली नव्हती.

परंतु, कोरोना राजकारणात अडकला की काय असे वाटू लागले असून आपल्यातली माणुसकी लोप पावत आहे असे झाले आहे. एकमेकांवर टीका करण्यापेक्षा ‘एक मेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या ओवी प्रमाणे सर्वानी एकत्र येऊन यावर उपाय योजना शोधून कोरोनाला थोपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

कोरोनामुळे संपूर्ण जगावरच मोठे संकट आले असून केंद्र व राज्य सरकार योग्य त्या उपाय योजना करत आहेत. त्या मध्ये यशस्वीही होताना दिसत आहेत. इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये कोरोना आटोक्यात असून भारत लवकरच त्यावर मात करेल, असा विश्वास बागुल यांनी व्यक्त केला.

पुणेकर नागरिकांना कोरोनातून बाहेर काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेची सर्व यंत्रणा रात्रंदिवस हातावर प्राण घेऊन काम करत आहे. त्यांच्या कार्याला पुणेकरांच्या वतीने सलाम करतो. पुण्यावर आधीच संकटाचे काळे ढग आले असताना इतर काळ्या गोष्टी दाखवण्यापेक्षा सर्व पक्षीय लोक प्रतिनिधींनी एकत्र येऊन या संकटावर कशी मात करता येईल, हे पाहावे, असा टोलाही बागुल यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे.

पुणे शहरात उल्हास पवार, अंकुश काकडे, विजय काळे, शांतीलाल सुरतवाला, मोहन जोशी, श्रीकांत शिरोळे, अभय छाजेड, डॉ. सतीश देसाई व आबा बागुल यांसारखी अनुभवी मंडळी सर्वच पक्षात आहेत अशा वेळी त्यांच्या कडून सल्ला घेऊन प्रशासन सोबत चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही बागुल यांनी सांगितले.

कोरोनापुढे पुणेकर आता त्रासले, ग्रासले आहेत. अशा वेळी त्यांना मायेची गरज आहे त्यांना मायेची फुंकर घालणे गरजेचे आहे. राजकारण आपण नेहमीच करतो ते राजकारणी करतातच परंतु ज्यावेळी एखादे संकट आपल्या देशावर, राज्यावर किंवा शहरावर येते तेंव्हा सर्वानी मिळून काम करायचे असते. कोरोनावर मात करण्यासाठी सर्व राजकारण बाजूला ठेऊन प्रयत्न करू, असेही बागुल म्हणाले.

पीओपीच्या मूर्तींवरील बंदीच्या निर्णयाला एका वर्षासाठी स्थगिती

0

गणेश मूर्तीकरांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई दि. २२ मे-केंद्रिय मंत्री जावडेकर यांनी आज मह्त्वपूर्ण निर्णय घेतला व पीओपीच्या मूर्तींवरील बंदीच्या निर्णयाला एका वर्षासाठी स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती येथे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर  यांनी दिली .

दरेकर यांच्यासह भाजपाचे आमदार कोकणातील कोरोनाच्या परिस्थितीची आढावा घेण्यासाठी नुकतेच कोकण दौ-यावर असताना पेण येथील गणेश मूर्तिकांराच्या संघटनांनी पीओपी पासून बनविल्या जाणा-या गणेश मूर्तींवरील बंदी उठविण्याची विनंती दरेकर यांच्याकडे केली होती. पेणचे आमदार रवीशेठ पाटील यांनी या प्रश्नी पुढाकार घेतला होता. याप्रश्नी रवीशेठ पाटील यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र दिले होते. कोकणच्या दौ-यात प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत पेण येथील नगरपालिका सभागृहात यासंदर्भात बैठक झाली. विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी या मूर्तीकारांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर प्रविण दरेकर यांनी केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्याशी बोलणे केले व मूर्तीकारांचा गंभीर प्रश्नाकडे त्यांच्या निर्दशनास आणून दिले होते. यासंदर्भात केंद्रिय मंत्री जावडेकर यांनी आज मह्त्वपूर्ण निर्णय घेतला व पीओपीच्या मूर्तींवरील बंदीच्या निर्णयाला एका वर्षासाठी स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो मूर्तीकारांचा महत्त्वाचा विषय मार्गी लागला आहे. पेण यथील नगरपालिका सभागृहात झालेल्या बैठकीला विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्यासह माजी मंत्री आमदार रविंद्र चव्हाण, आमदार रविशेठ पाटील, आमदार भाई गिरकर, आमदार प्रशांत ठाकुर, आमदार महेश बालदी ,आमदार निरंजन डावखरे,आमदार रमेश पाटील, आमदार प्रसाद लाड, पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, ज़िल्हाध्यक्ष महेश मोहिते जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटिल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांना २५ पत्रे पाठवूनही राज्य सरकारकडून दखल नाही

राज्यपालांनी सरकारला योग्य निर्देश द्यावेत
-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची विनंती
मुंबई दि.२२ मे:- राज्यात कोरोनाचे संकट ओढवल्यापासून विरोधी पक्षाने नेहमीच सकारात्मक भूमिका बजावली आहे.या परिस्थितीत राज्य सरकाराला सहकार्य करण्याच्या उद्देश्याने ३० मार्च २०२० ते आज पर्यंत विविध विषयांवर लक्ष वेधण्यासाठी तब्बल २५ पत्रे मुख्यमंत्र्यांना लिहिली पण दुर्दैवाने त्यांनी राज्य सरकारच्या पातळी वर एकाही पत्राची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना संबंधित विविध समस्या निवारण्यासाठी आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य शासनास योग्य निर्देश द्यावेत अशी विनंती विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी राज्यपालांना पाठविले आहे.

राज्यपालांना दिलेल्या पत्रात श्री.दरेकर यांनी नमूद केले आहे की, कोरोना हे वैश्विक संकट आहे याची आम्हालाही कल्पना आहे. हे संकट सुरु झाल्यापासून राज्य सरकारला सहकार्य करण्याचे आदेश आमचे नेते श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले. या संकटाच्या पार्श्वभुमीवर अधिवेशन मध्येच संपविणेपासून सर्वच मुद्यांवर आम्ही माजी मुख्यमंत्र व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली राज्य शासनाला सहकार्य केले. याच सहकार्याच्या भावनेतून दि. ३० मार्च २०२० पासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राज्य सरकाराला आजपर्यंत २५ पत्रे दिली असताना या पात्रांची नोंद घेतली गेली नाही.

श्री.दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रामध्ये शेतकऱ्यांना मदत म्हणून पॅकेज जाहीर करण्याबाबत,शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविणेबाबत,मुंबईमधील सार्वजनिक रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स, परिचारीकांना PPE कीटस् / N-95 मास्क देणेबाबत, दैनंदीन मजुरीवर आयुष्य असलेल्या बलुतेदार बांधवांना पुढील ४ महिने आर्थिक मदत देणेबाबत,पोलीसांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकाविरुध्द देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याबाबत,रेशन व्यवस्थांमधील काळाबाजार थांबविणेबाबत,राज्याअंतर्गत प्रवशांना घरी जाण्यासाठी मोफत बस व्यवस्था करणेबाबत,खाजगी रुग्णालये बंद असल्याने, ती सुरु करणेबाबत,मुंबईमधील रुग्णालयांमध्ये ICU बेडस् ची संख्या वाढविणेबाबत,पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे अकस्मात मृत्यूची चौकशी करणेबाबत,वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन वेळेत मिळणेबाबत,शेतकरी / मजूर व शहरी भागातील दारीद्रय रेषेखालील कामकारांना सरसकट मोफत वीज देणेबाबत,बेस्ट कर्मचा-यांचा पगार वेळेवर होणेबाबत,मुंबई मनपा सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत, कोकणातील मच्छीमार / आंबा उत्पादक / काजु उत्पादकांनाही विशेष पॅकेज घोषीत करणेबाबत अशा अनेक विषयांवरील पत्रे देण्यात आल्याचे स्पष्ट केले.

राज्यपालांना दिलेल्या पत्रात श्री.दरेकर पुढे म्हणतात,राज्य शासनाला पत्राच्या माध्यमातून उपरोक्त विषयांचे गांभीर्य वेळोवेळी लक्षात आणून दिले तरी शासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.म्हणून राज्य शासनाला पाठविलेल्या पत्रांची प्रत सोबत पाठवित आहे. राज्य शासनाने वेळेत आम्ही केलेल्या सुचनांची दखल न घेतल्याने, आज महाराष्ट्रामध्ये ४० टक्के रुग्ण आहेत असेही दरेकर यांनी निर्दशनास आणून दिले.
संपुर्ण मुंबईकर आज भयभीत झाले आहेत. ही परिस्थिती आणखी चिघळू नये व जनतेचे जीवन सुरक्षित राहावे या करीता झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आज आम्ही सामाजिक अंतराचे पालन करुन आंदोलनही केले आहे. राज्य सरकारची निष्क्रीयता व त्यामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थिती लक्षात घेता, राज्य शासनास योग्य निर्देश द्यावेत अशी ही विनंती श्री.दरेकर यांनी पत्रात केली आहे.

झोपलेले महाविकास आघाडी सरकार आता तरी जागे व्हा -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

दहिसर येथे मेरा आंगण..मेरा रणांगण.. आंदोलन
मुंबई दि.२२ मे- गेले सुमारे तीन महिने राज्य सरकार कोरोना रोखण्यासस अपयशी ठरले आहे. दरदिवशी रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. आरोग्य व्यवस्थेत खाटा उपलब्ध नसल्याने तर कधी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे रुग्ण मोठ्या प्रमाणावर मृत्यमुखी पडत असल्याचे चिंताजनक चित्र निर्माण झाले आहे, आरोग्य खात्याच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप जनतेचे बळी जात आहेत. महाविकास आघाडीचे सरकार झोपले असून सरकारला जागे करण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच जनतेचा संताप, उद्रेक आणि वेदना लोकशाही मार्गातून व्यक्त करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यभर मेरा आंगण मेरा रणांगण, महाराष्ट्र बचाव असे आंदोलन केले. सरकारने जागे आतातरी जागे होऊन कोरोनो नियंत्रणात आणण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यासाठी हे आंदोलन असल्याची स्पष्ट भूमिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मांडली

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज दहिसर पूर्व येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर दरेकर यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर मेरा आंगण मेरा रणांगण हे आंदोलन करण्यात आले होते. या वेळी दरेकर यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी हाताला व तोंडाला काळे मास्क लावले होते व महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी काळे फलक, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करित हे आंदोलन केले.
आंदोलनानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलनाता दरेकर यांनी सांगितले की, कोरोनाचा मुकाबला करण्यासठी केंद्र सरकारने आवश्यक मदत राज्य सरकारला दिली असून भविष्यात आणखी मदत देण्यात येणार आहे, तसेच राज्य सरकारला केंद्राने विविध सवलती दिल्या आहेत. तरी केरळ आणि अन्य राज्यांमध्ये स्वतंत्र व्यवस्था म्हणून एक स्वतंत्र आर्थिक पॅकेज देण्यात आले. तरी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने अद्याप एकही रुपयाचे पॅकेज दिलेले नाही. आज राज्यातील शेतकरी, आंबा उत्पादक, मस्त्य व्यावसायिक सर्व उध्वस्त झाले आहेत. आज असंघटीत कामगारही उध्वस्त झाला आहे. नाभीक समाजातील सलून चालवणारा व बारा बलुतेदार यांना पोटाची विवंचना आहे. परंतु, सरकार यांच्यासाठी काहीही करत नाही.राज्य सरकारला विनंती आहे की यासाठी एक स्वतंत्र पॅकेज जाहीर करून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा.त्यांचा आत्मविश्वास वाढवावा अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
राज्यात हजार-शेकडोच्या संख्येने रोज लोक मरत आहेत. त्यामुळे आम्ही जनतेच्या वेदना संवेदना थांबवू शकत नाही. त्यांना न्याय देण्याचे काम भारतीय जनता पक्ष करेल असा विश्वास या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करताना दरेकर यांनी सांगितले की, ज्या वेळेला आपण लोकांमध्ये जातो त्यावेळेला त्यांच्यामध्ये एक धीर येतो. कारण आज लोक भयभीत अवस्थेत आहेत. ज्यावेळेला आपण यांची चौकशी करतो,डॉक्टरांना सूचना देतो, जे कोविड योद्धे आहेत त्यांच्या अडचणी समजून घेतो त्यामुळे विश्वासाचं वातावरण निर्माण होत आहे.त्यामुळे लोकांना दिलासा मिळतो. भाजपच्या तीन दिवसाच्या कोकण दौ-यामध्ये सरकार नावाची यंत्रणाच कार्यरत नसल्याचे विदारक चित्र आहे. परंतु, विरोधी पक्ष या नात्याने आम्ही जेव्हा तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. जनतेच्या अडचणी समजावून घेतल्या तेव्हा तेथील नागरिकामध्ये आत्मविश्वास आणि मनोबल वाढले आहे असेही त्यांनी सांगितले.
कोरोना परिस्थिती ओढावल्या पासून कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी एक नियोजनबध्द योजना, कालबद्ध कार्यक्रम,फोर्स तयार करण्याची मागणी भाजपने केली होती. परंतु सरकारमध्ये कोणाचा कोणाला ताळमेळ आणि समन्वय नसल्याने आज कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. याकडे सरकार एका हतबलतेच्या अवस्थेतमधून पाहतय.जनताही हताश झाली आहे. आता काय होणार, कसं होणार ,कधी हा कोरोना आम्हाला घेऊन जाईल या भयभीत वातावरणात लोक आहेत.ज्यावेळी सरकार नावाची यंत्रणा अपयशी होते त्यावेळेला लोकांना आत्मविश्वास दिलासा, आणि धीर देणे विरोधी पक्षाची जबाबदारी आहे. म्हणून यांच्या वेदना जनतेच्या दरबारात मांडणं हे आमचं काम आहे. या सर्व भावनेतून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत जनतेच्या भावना व्यक्त करण्यात येत असल्याचेही दरेकर यांनी नमूद केले.

विविध धर्मातील प्रभावशाली व्यक्ती, धर्मगुरुंसमवेत मंत्री राजेश टोपे, नवाब मलिक यांचा संवाद

0

कोरोना प्रतिबंध उपाययोजनांच्या अनुषंगाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद

मुंबई, दि. २२ : कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या व्यापक उपाययोजनांच्या अनुषंगाने आज सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अल्पसंख्याक विकास तथा कौशल्य विकास मंत्री  नवाब मलिक यांनी राज्यातील विविध धर्मातील प्रभावशाली व्यक्ती, धर्मगुरु, धार्मिक नेते आदींबरोबर युनिसेफच्या सहकार्याने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. कोरोनासंदर्भात लोकांमध्ये भीती आणि गैरसमजाचे वातावरण आहे. त्यामुळे लागण झालेले अनेक रुग्ण शेवटच्या क्षणाला उपचारासाठी दवाखान्यात येतात. लोकांच्या मनातील हे गैरसमज दूर करण्यासाठी धार्मिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी मंत्री श्री.टोपे आणि श्री.मलिक यांनी केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या सर्व प्रयत्नांमध्ये आम्ही सोबत राहू, अशी ग्वाही यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिली.

कोरोनासंदर्भातील गैरसमज दूर करण्यासाठी धार्मिक नेत्यांनी पुढे यावे – मंत्री राजेश टोपे

आरोग्यमंत्री  श्री.टोपे यावेळी म्हणाले की, लोकांच्या मनामध्ये कोरोनाविषयी भीती आणि गैरसमज आहेत. त्यामुळे अजूनही अनेक लोक उपचारासाठी पुढे येत नाहीत असे लक्षात आले आहे. अनेक जण लक्षणे दिसूनही ती लपवून ठेवत आहेत. अशा वेळी या व्यक्ती शेवटच्या क्षणाला दवाखान्यात दाखल झाल्यास त्यांच्यावर उपचार करणे कठीण जाते. त्यामुळे कोरोनासंदर्भातील मनातील भीती दूर करुन लोकांनी तपासणीसाठी पुढे आले पाहिजे. धार्मिक नेते, संस्थांनी याबाबत लोकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात १०० कोरोना रुग्णांपैकी ९७ रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. हेही लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

आता तरुणांना रोजगारासाठी प्रयत्न – मंत्री नवाब मलिक

अल्पसंख्याक आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी युनिसेफमार्फत आयोजित या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, कोरोनाविषयी लोकांच्या मनामध्ये आजही मोठी भीती आणि गैरसमज आहेत. अनेकजण लक्षणे दिसूनसुद्धा उपचारासाठी पुढे येत नाहीत. लोकांच्या मनातील ही भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी धार्मिक संस्था आणि धार्मिक नेत्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कौशल्य विकास विभागाने राज्यातील अनेक तरुणांना विविध प्रकारची कौशल्यविषयक प्रशिक्षणे दिली आहेत. आता राज्यात उद्योगांमध्ये या विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी हा विभाग यापुढील काळात मोठे कार्य करेल, असे त्यांनी सांगितले. सर्व धर्म समुहांनी मिळून कोरोनाचा मुकाबला करुन लवकरच आपण या संकटावर मात करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र शासनाच्या सोबत राहू – धर्मगुरुंनी दिला विश्वास

व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये राज्याच्या विविध धर्माचे मान्यवर सहभागी झाले होते. यात प्रमुख्याने श्री. नम्रमुनी महाराज, आचार्य श्री. देवानंद गुरुदेव, मौलाना मेहमूद दर्याबादी, मौलाना हाफीज सयिद अथर अली, आर्ट ऑफ लिव्हींगचे दर्शक हाथी, अंजुमने इस्लाम संस्थेचे डॉ.जहीर काझी, ब्रम्हकुमारी कमलेश, भंते शांतीरत्न, बिशप ऑल्वीन डिसिल्व्हा, इशा फाऊंडेशनच्या कल्पना मानियार, इस्कॉनचे गोकुळेश्वर दास, जमाते इस्लामी हिंदचे डॉ.सलीम खान, जमियते उलेमाचे महाराष्ट्र अध्यक्ष मौलाना हाफीज मोहम्मद नदीम सिद्दीकी, रामकृष्ण मिशनचे स्वामी देवकांत्यानंद, युनायटेड सिख सभा फाउंडेशनचे रामसिंग राठोड आदींनी सहभाग घेतला. या विविध संस्थांमार्फत कोरोना संकटग्रस्तांना मदत करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी माहिती दिली. तसेच यापुढील काळातही या संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सोबत राहू, असा विश्वास या सर्वांनी दिला.

कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील, युनिसेफच्या महाराष्ट्र राज्य प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर, डॉ.राहुल शिंपी यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभाग घेतला. युनिसेफच्या देविका देशमुख यांनी कॉन्फरन्सचे संचलन केले.

खाजगी हॉस्पिटलचे ८० टक्के बेड ताब्यात घ्या -उपमुख्यमंत्री अजित पवार

  • लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांनी काम करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार
  • पुण्याच्या खासदारांसह काही आमदारांची उपस्थिती 

पुणे, दि.२२: कोरोना विषाणूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी सर्वच आघाड्यांवर प्रयत्न केले जात असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहकार्याने काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत केल्या. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, तथापि, खासदार वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, गिरीश बापट यांनी केंद्राकडून अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.बैठकीला उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या सूचना ऐकून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, खाजगी हॉस्पिटलचे ८० टक्के बेड ताब्यात घेण्यात येणार आहेत. आपल्या सूचनांची प्रशासन निश्चित दखल घेईल. वेळोवेळी बैठका घेतल्या जातील. आपल्या सूचना वेळोवेळी पाठवा,असेही त्यांनी सांगितले.


यावेळी खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, सोशल मिडिया अधिक सक्रिय केला पाहिजे. कोरोनाच्या बाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजना व प्रशासनाच्यावतीने सामान्य नागरिकांसाठी देण्यात येणाऱ्या सूचनांची रोजच्या रोज माहिती दिली
जावी. जेणेकरुन लोकप्रतिनिधींना माहिती मिळेल.
खासदार सुप्रिया सुळे यांनी परराज्यात रेल्वेने लोकांना पाठविले, प्रशासनाने याबाबत उत्तम काम केले असल्याचे सांगितले.
खासदार श्रीरंग बारणे यांनी वेळोवेळी प्रशासनाने लोकप्रतिनिधींना अद्ययावत माहिती द्यावी,अशी अपेक्षा व्यक्त केली. ग्रामीण रुग्णालये अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे सांगितले.
खासदार गिरीश बापट म्हणाले, परराज्यातील मजूर त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी अधिकाधिक रेल्वेची व्यवस्था करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींना माहिती वेळोवेळी देण्यात यावी. पोलिस प्रशासनानेही समन्वय ठेवावा.पुणे कँटोन्मेंटला आणखी निधी द्यावा, असे ते म्हणाले.
आमदार शरद रणपिसे यांनी कोरोनाबरोबर राहण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची गरज आहे. प्रभागनिहाय समिती नेमा. त्यात स्थानिक लोकप्रतिनिधींना सामावून घ्या. नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पावासाळ्यापूर्वीची कामे त्वरित करून घ्या, असेही त्यांनी सांगितले.
आमदार सिध्दार्थ शिरोळे, लक्ष्मण जगताप, भीमराव तापकीर, चेतन तुपे, सुनील टिंगरे, सुनील कांबळे, सुनील शेळके, महेश लांडगे, आण्णा बनसोडे आदींनी चर्चेत भाग घेऊन उपयुक्त सूचना केल्या.
विभागीय आयुक्त डाॕ.दीपक म्हैसेकर यांनी कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी विविध आघाड्यांवर प्रयत्न करण्यात येत आहे. सनदी अधिकाऱ्यांवरही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.योग्य तो निधी जिल्ह्याला उपलब्ध करून दिला आहे.सर्व यंत्रणा समन्वयाने काम करीत आहे, असे सांगितले.
जमाबंदी आयुक्त एस.चोकलिंगम यांनी ससून हॉस्पिटलबाबत माहिती देताना सांगितले, मृत्यू दर आता कमी झाला आहे. ससूनची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, मृत्यू दर कमी होत आहे.२१८२ लोक बरे होऊन घरी गेले आहेत. १० कोटीपेक्षा अधिक निधी विविध संस्थांनी वैद्यकीय उपकरणासाठी उपलब्ध करुन दिला आहे. वैद्यकीय तपासणीसाठी मोबाईल व्हॅन सुरू केली आहे. खासदार व आमदारांनी त्यांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.सॅम्पलींग वाढविले आहे. १६०० बेड तयार आहेत. बालेवाडीत ५०० बेडचे सेंटर कार्यान्वित केले आहे. काही हाॕस्पिटलबरोबर करार केले आहेत.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, एप्रिल महिन्यात मृत्यू दर व रुग्णसंख्या अधिक होती.आता कमी होताना दिसत आहे.बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या जवळपास ५० टक्के आहे.भविष्यात परिस्थिती बिकट झाली तर त्यादृष्टीने उपाययोजना केल्या आहेत .पुण्याहून अन्य राज्यात व जिल्ह्यात कामगार, मजूर, विद्यार्थी , नागरिक यांना पाठविण्यात येत आहे. जनजागृतीचे उपक्रमही राबविण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवडचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले,अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे. होम क्वारंटाईनवर अधिक लक्ष देत आहे.मोठ्या प्रमाणात टेस्टींग केले आहे. वर्दळीच्या ठिकाणच्या वसाहतीत रुग्ण सापडत आहे. शहर सध्या रेड झोनमध्ये नाही.उद्योगांना परवानगी दिली आहे.मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहे.सोशल मिडियाचाही वापर करण्यात येत आहे. सध्या ४८ कंटेन्टमेंट झोन आहे.प्रत्येक वॉर्डासाठी पथक नियुक्त केले आहे.
यावेळी पोलिस आयुक्त के.व्यंकटेशम् व संदिप बिष्णोई, साखर आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त  आयुक्त रुबल अग्रवाल व शांतनू गोयल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील आदी उपस्थित होते.

पुण्यात महापौरांची कसरत -एकीकडे अजित पवारांसमवेत वॉर रूम ला भेट तर दुसरीकडे जनता मरणाच्या दारात -सरकार मात्र  घरात असा फलक घेऊन आंदोलन 

पुणे-महापालिका पदाधिकारी यांनी खासदार गिरीश बापट अथवा भाजप शहराध्यक्ष  यांच्या समवेत भाजप कार्यालयाच्या ठिकाणी होणार्या मुख्य आंदोलनात न येता आपापले   वेगवेगळे आंदोलन केले  .जे केवळ फोटो पुरते मर्यादित होते.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांची मोठी कसरत झाल्याचे स्पष्ट झाले . एकीकडे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत कार्यन्वित केलेल्या वॉर रुम (डॅश बोर्ड) प्रणालीची कार्यपद्धती पाहण्यासाठी आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी स्मार्ट सिटी सेंटरला भेट दिली.यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित राहिलेले महापौर ..दुसरीकडे तेच महापौर ‘जनता मरणाच्या दारात ,सरकार मात्र घरात असे चित्र दिसले .या राजकीय कैचीत अडकलेल्या  महापौरांनी आपली भूमिका मात्र उत्तमरीत्या साकारली

दुसरीकडे माजी महापौर असलेलेया आणि आता कसब्याच्या  आमदार असलेल्या मुक्ता टिळक आणि शैलेश टिळक या दाम्पत्यांचे दर्शन या आंदोलनानिमित काही काळ कार्यकर्त्यांना  झाले, नागरिक तर या वेळेत लॉक डाऊन मध्ये व्यस्त होते.एकीकडे महापौराची कसरत तर दुसरीकडे आमदार झालेल्या माजी महापौरांची तब्बेत बरी नसतांना आंदोलनास उपस्थित राहण्यास करावी लागलेली कसरत या दोन गोष्टी या आंदोलनाच्या वैशिष्ट्य ठरल्या.

निष्क्रीय राज्य सरकारला जागे करण्यासाठी भाजपाच्या अडीच लाख कार्यकर्त्यांचे राज्यभर आंदोलन

पुणे -मुंबई-कोरोनाचे देशात सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू, आरोग्य व्यवस्था पूर्ण कोलमडलेली आणि सामान्य माणूस हतबल. अशा स्थितीतही निष्क्रीय असलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या अडीच लाख कार्यकर्त्यांनी शुक्रवारी राज्यभर ठिकठिकाणी ‘माझे अंगण, रणांगण’, अशी घोषणा देत ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे हे अभिनव आंदोलन केले.

राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने धडाडीने पावले टाकून प्रभावी उपाययोजना करावी तसेच रोजंदारी कामगार, बारा बलुतेदार आणि शेतकरी यांच्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पन्नास हजार कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर करावे या दोन प्रमुख मागण्या भाजपाच्या वतीने करण्यात आल्या. कोरोनाच्या संदर्भात सर्व नियमांचे पालन आणि कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांचा सहभाग हे आंदोलनाचे वैशिष्ट्य होते.

राज्य सरकारने पन्नास हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करावे- फडणवीस

देवेंद्र फडणवीस मुंबई येथे म्हणाले की, राज्यात कोरोनाचे गंभीर संकट असताना राज्य सरकारची निष्क्रियता दिसत आहे. रुग्णांना उपचार मिळत नाहीत. रुग्णालये शोधत रस्त्यावर फिरावे लागत आहे. सरकारी रुग्णालयात जागा नाही आणि खासगी रुग्णालयातील उपचार परवडत नाहीत. सर्व महानगरांमध्ये कोरोनाचा कहर आणि राज्य सरकारकडून पुरेशी तयारी नाही. मुंबईतील आव्हान पेलण्यासाठी ठोस पावले नाहीत. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांनी जनतेसाठी पॅकेज दिले पण राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्वतःहून जनतेला एक पैसा दिलेला नाही. शेतकरी, बारा बलुतेदार, असंघटित कामगार, रिक्षाचालक, टॅक्सीचालक अशा सर्वांसाठी राज्य सरकारने पन्नास हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले पाहिजे.

मेरा आंगन, मेरा रणांगण

भाजपा प्रदेशाध्यक्ष  आ. चंद्रकांतदादा पाटील यांचे कोल्हापुरात आंदोलन

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, हे आंदोलन सरकार अस्थिर करण्यासाठी नाही. लोकांच्या वेदना मांडण्याला कोणी राजकारण म्हणत असले तरी आम्ही वेदना मांडणार. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन घराबाहेर पडले तर यंत्रणा हलेल आणि परिणामकारक काम होईल. कोरोनाचा राज्यातील पहिला रुग्ण सापडला त्याला साठ दिवस झाले पण राज्यातील सरकार प्रभावी काम करत नाही. भाजपा सहकार्य करतानाच या सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करत आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माजी मंत्री विनोद तावडे, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड, आ. राहुल नार्वेकर, माजी आ. राज पुरोहित मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालय येथील आंदोलनात सहभागी झाले होते. मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे कुटुंबियांसोबत आंदोलन केले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (दहिसर, मुंबई), माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व हंसराज अहीर (चंद्रपूर), एकनाथराव खडसे (मुक्ताईनगर, जळगाव ), पंकजाताई मुंडे (वरळी, मुंबई), गिरीश महाजन (जामनेर), राधाकृष्ण विखे पाटील (लोणी), विजया रहाटकर, हरिभाऊ बागडे व भागवत कराड (औरंगाबाद), रविंद्र चव्हाण (डोंबिवली ), आशिष शेलार (वांद्रे), गिरीश बापट (पुणे), सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख व जयसिद्धेश्वर स्वामी (सोलापूर), शिवेंद्रराजे भोसले (सातारा), राम शिंदे (चौंडी), जयकुमार रावल (धुळे), कपिल पाटील (भिवंडी), पूनम महाजन (विलेपार्ले), गोपाळ शेट्टी (बोरिवली) यांच्यासह भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, खासदार व आमदारांनी ठिकठिकाणी आंदोलन केले. राज्यातील सर्व जिल्हे व तालुक्यांमध्ये कार्यकर्त्यांनी घरोघरी हे आंदोलन केले.

पुणे स्मार्ट सिटी वाॕर रुमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

-डॕश बोर्ड प्रणालीची माहिती जाणून घेतली.
-कोराना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करा.
-निधी कमी पडू देणार नाही.

पुणे,दि.२२-पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत कार्यन्वित केलेल्या वाॕर रुम ( डॕश बोर्ड) प्रणालीची कार्यपद्धती उप मुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार जाणून घेतली व उपयुक्त सूचना केल्या.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर पालिकेने ही प्रणाली विकसित केली आहे.याठिकाणी अत्याधुनिक संगणकीय प्रणाली आहे.कोरोनबाधित रुग्ण,शहरातील कोरोनाबाधित क्षेत्र,वाढत असलेला परिसर याबाबतची अद्यावत माहिती याठिकाणी मिळते.त्यामुळे उपाययोजना करणे सोपे जाते.अगदी सुरूवातीपासूनची माहिती याठिकाणी मिळू शकते,अशी माहिती मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी यावेळी दिली.
अपर आयुक्त रुबल अग्रवाल अधिक माहिती देताना म्हणाल्या,याठिकाणी निरंतर काम चालू असते.शिवाय बेडची उपलब्धता,भविष्यात लागणारे बेडस् ,डाॕक्टरांची संख्या या डॕश बोर्डवर पाहायले मिळते,त्यामुळे तात्काळ कार्यवाही करणे सोपे जाते.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ,जिल्हाधिकारी नवल किशोर राम ,अपर आयुक्त शांतानु गोयल,आरोग्य प्रमुख डाॕ.रामचंद्र हंकारे आदी उपस्थित होते.
उप मुख्यमंत्री अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले,ही प्रणाली उत्तम आहे.एखाद्या कोरोनाबाधित नागरिकांचा फोन आला तर तत्काळ रुग्णवाहिका पोहचली पाहिजे.भविष्याच्या दृष्टिकोनातून बालेवाडी प्रमाणे अन्य ठिकाणी कोव्हिड सेंटर कार्यान्वित केले पाहिजे.
यावेळी त्यांनी पहिला रुग्ण बरा झाल्यानंतर पुन्हा त्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना लागण झाली काय,यावर आयुक्तांनी तसे झाले नाही.आपण त्यांच्या सतत संपर्कात असतो.रोज चार ते साडेचार हजार लोकांना फोन केला जातो,असे सांगितले.
डाॕक्टर,रुग्ण वाहिकांची उपलब्धता याबाबतची माहिती घेताना निधी लागत असेल तर मागणी कारा,लगेच उपलब्ध करून देता येईल,असे उप मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 2 हजार 807 तर 2 हजार 927 रुग्ण बरे होऊन घरी- 295 रुग्णांचा मृत्यू

विभागात कोरोना बाधित आजवर  झाले एकूण  6 हजार 29 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 22 :- पुणे विभागातील 2 हजार 927 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 हजार 29 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2 हजार 807 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 295 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 197 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 5 हजार 14 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 552 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 212 आहे. कोरोनाबाधित एकूण 250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 190 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात297, सातारा जिल्ह्यात 20, सोलापूर जिल्ह्यात 46, सांगली जिल्ह्यात 3, कोल्हापूर जिल्ह्यात 49 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 201 कोरोना बाधीत रुग्ण असून 106 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 90 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 524 कोरोना बाधीत रुग्ण असून 218 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 269 आहे. कोरोना बाधित एकूण 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 62 कोरोना बाधीत रुग्ण असून 38 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 23 आहे. कोरोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 228 कोरोना बाधीत रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 213 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 65 हजार 551 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 56 हजार 445 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 9 हजार 149 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 50 हजार 314 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 6 हजार 29 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 1 कोटी 25 लाख 14 हजार 145 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 5 कोटी 38 लाख 59 हजार 124 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 3 हजार 584 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

महावितरणकडे रिडींग पाठविणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्ष वीजवापरानुसार अचूक बील देणे सुरु

पुणे, दि. 22 मे 2020 : महावितरणच्या वेबपोर्टल व मोबाईल अॅपद्वारे स्वतःहून मीटर रिडींग पाठविणाऱ्या वीजग्राहकांना त्यांनी प्रत्यक्षात केलेल्या वीजवापरानुसार अचूक वीजबिल देण्यात येत आहे. मे महिन्यात पहिल्यांदाच चालू रिडींग पाठविणाऱ्या ग्राहकांना एप्रिल महिन्याच्या बिलातील सरासरी युनिट व रक्कम भरली असल्यास त्याचेही समायोजन करण्यात येत आहे. यासंबंधीची माहिती ग्राहकांसाठी संबंधीत वीजबिलामध्ये नमूद करण्यात येत आहे.

महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे परिमंडलातील एकूण 69912 वीजग्राहकांनी एप्रिलमध्ये दिलेल्या मुदतीत स्वतःहून मीटरचे रिडींग पाठविले होते. या सर्वांना एप्रिल महिन्याचे प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिले देण्यात आली आहेत. मात्र ज्या वीजग्राहकांनी एप्रिलमध्ये रिंडीग न पाठवता मे महिन्यात चालू मीटर रिडींग पाठविले त्यांना एप्रिल व मे महिन्यांचे प्रत्यक्ष वीजवापरानुसार वीजबिल देण्यात येत आहे. या बिलामध्ये महावितरणकडून पाठविण्यात आलेले एप्रिल महिन्याचे सरासरी युनिट वगळण्यात येत आहे. ग्राहकांनी एप्रिलचे सरासरी वीजबिल भरले असल्यास त्यातील फिक्स चार्जेसची रक्कम वगळता उर्वरित रक्कम सुद्धा मे महिन्यांच्या बिलात समायोजित करण्यात येत आहे. तसेच स्लॅब बेनिफिट देखील देण्यात येत आहे. याबाबतची सर्व माहिती संबंधीत ग्राहकांना वीजबिलावर उपलब्ध आहे.

कोरोना विषाणूमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणने गेल्या 23 मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटर रिडींग घेण्याचे प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे. रिडींग उपलब्ध नसल्याने वीजग्राहकांना सरासरीनुसार वीजबिल पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, महावितरणची www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे वीजग्राहकांना मीटरच्या रिडींगचे फोटो पाठवून स्वतः रिडींग घेण्याची सोय उपलब्ध आहे. या रिडींगप्रमाणे वीजवापराचे अचूक बिल तयार करण्यासाठी जास्तीत जास्त वीजग्राहकांनी मीटरच्या रिडींगचे फोटो पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी वीजग्राहकांना नोंदणी केलेल्या मोबाईलवर महावितरणकडून ‘एसएमएस’ पाठविला जात असून त्यामध्ये मीटर रिडींग पाठविण्याची मुदत नमूद करण्यात येत आहे.

ज्या वीजग्राहकांनी मीटर रिडींग पाठविलेले नाही त्यांना सरासरी वीजवापरानुसार बिल देण्यात येत आहे. महावितरणकडून ग्राहकंकडे जाऊन मीटर रिडींग घेणे सुरु झाल्यानंतर या सर्व ग्राहकांना वीजवापरानुसार अचूक वीजबिल देण्यात येणार आहे.