Home Blog Page 2570

जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी धोरण निश्चित करणार – आ.चंद्रकांतदादा पाटील

भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्या पुढाकाराने मराठी बांधकाम व्यवसायिक संघटनेच्या कार्यकारिणीसह वेबीनार संपन्न

पुणे-रस्त्यांच्या रुंदीकरणा अभावी व ६ मीटर रस्त्यावर अतिरिक्त टीडीआर अनुज्ञेय नसल्याने कोथरूड सह संपूर्ण पुण्यातील गृहप्रकल्प पुनर्विकास रखडला आहे. बांधकाम व्यवसायायिकांना मंदी मुळे आणि आता कोरोनाच्या संकटामुळे भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे  आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज वेबीनार द्वारे मराठी बांधकाम व्यवसायिक संघटनेच्या कार्यकारिणी सदस्यांशी संवाद साधला.

भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी याबाबत चंद्रकांतदादा पाटील यांना विनंती केली होती. सदर वेबीनार मधे  जितेंद्र सावंत – अध्यक्ष, एस आर कुलकर्णी – संस्थापकीय अध्यक्ष,  ज्ञानेश्वर घाटे – कार्याध्यक्ष,  संदीप कोलटकर – सचीव, प्रमोद पाटील – खजिनदार,  नितीन देशपांडे, अंकुश असबे, विक्रम गायकवाड, मुकेश येवले, विशाल गोखले, अमोल रावेतकर, दिलीप कोटीभास्कर, प्रवीण बढेकर, आर्कि. मिलिंद चोधरी, आर्की. मिलींद जोशी व आर्की. सिद्धार्थ हरिश्चंद्रकर.

मिलिंद देशपांडे यांनी सूत्रसंचालन करत विविध प्रश्न उपस्थित करुन समन्वयक म्हणून काम केले.

यात सर्वप्रथम ६ मीटरचे रस्ते ९ मीटर करण्यात यावेत अशी भूमिका सर्वांनीच मांडली असता चंद्रकांतदादां नी सुरुवातीलाच मी याबाबत आमच्या मनपातील पदाधिकाऱ्यांशी बोललो असून याबाबतचे धोरण ठरवत आहे असे स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान बहुतांश सोसायटीतील बैठकीत पुनर्विकासाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला गेला होता व मी देखील माझ्या वचननाम्यात याचा अंतर्भाव केला आहे असे चंद्रकांतदादांनी आवर्जून सांगितले…. त्यालाच अनुसरून हे धोरण ठरवत आहे असेही ते म्हणाले.

यानंतर चंद्रकांतदादांनी विविध प्रश्नांची सकारात्मक उत्तर देत त्रिस्तरीय प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली.यात प्रामुख्याने …

१. पुणे मनपा ने संपूर्ण शहरातील ६ मिटर रूंदीचे रस्ते ९ मिटर करण्याची घोषणा करून, विहित नमुन्यात नागरीकांच्या कडून प्रस्ताव मागवावेत. सदर प्रस्ताव ऑनलाईन स्विकारण्याची तजवीज करावी.
२. टिडिआर सेलच्या धर्तीवर, पुनर्विकास मंजुऱ्यांकरिता पुणे मनपात एक स्वतंत्र विभाग उघडावा.
३. बऱ्याच ठिकाणी पूर्णत्वाचा दाखला देताना, कोणतीही कायदेशीर तरतूद नसताना वसूल करण्यात येणारे रस्ते विकास शुल्क बंद करावं.
४. पुनर्विकास प्रकल्प सुरू करण्यापूर्वी निबंधक, सहकार विभाग यांची घ्यावी लागणारी मान्यता अत्यंत वेळखाऊ असल्याने त्याने प्रकल्पाचा खर्च अकारण वाढतो. सदर परवानगी रद्द करावी.
५. पुणे मनपाला भरावयाचे प्रिमियम इत्यादी शुल्कामधे गेल्या काही वर्षांत भरमसाठ वाढ झाली असून, सदर पैसे भरण्यास मनपाने मुंबई महापालिकेच्या धर्तीवर हप्त्याने भरण्यास परवानगी द्यावी.
६. कमाल नागरी धारणा कायद्याच्या कलम २० अंतर्गत, सध्या जमीन मालकांच्या एकूण क्षेत्रावर शुल्क भरून घेतलं जात असून सदर आकारणी ही मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे. सदर आकारणी ची पद्धत त्वरीत बदलण्यात यावी.
७. जर एखाद्या सर्व्हे क्रमांकामधे संरक्षण विभागाचा ना हरकत दाखला विशिष्ट ईमारत उंचीकरिता मिळाला असेल, तर त्याच्या आसपास तेवढ्या उंची पर्यंत इतर ईमारतींना नव्याने परवानगी मागू नये.
८. बांधकाम व्यवसायिकांना प्राप्त झालेल्या बँक कर्जाच्या अटी व शर्ती, रिझर्व्ह बँकेच्या उत्पादन क्षेत्राबाबत असलेल्या प्रचलीत धोरणानुसार, पुनर्विचार करण्यात यावा.
९. २०१७ पूर्वी प्रमाणे बाल्कनी बंदिस्त करण्यास परवानगी मिळावी.

हे सर्व विषय राज्य व केंद्र सरकारकडे आपण मांडू आणि पुणे मनपा शी संबंधित प्रश्नां बाबत कोरोना चा कहर कमी झाल्यावर विस्तृत बैठक घेउ असे ही चंद्रकांतदादां नी स्पष्ट केले.
दादांच्या अभ्यासू आणि सकारात्मक प्रतिसादाचे सर्वच व्यवसायिकांनी स्वागत केले.

जितेंद्र सावंत व नंदू घाटे यांनी समारोप करताना सर्व प्रश्न सुटतील आणि बांधकाम व्यवसायिक पुण्याच्या विकासाला हातभार लावतील अश्या भावना व्यक्त केल्या.

पुणे विभागातील मान्सूनपूर्व तयारीबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती

पुणे दि.26: – पुणे विभागातील मान्सूनपूर्व तयारीचे नियोजन, आपत्ती व्यवस्थापनाचा परिपूर्ण आराखडा, नाल्यांची सफाई, पावसाळयापूर्वीची कामे पूर्ण करण्याबाबतचे नियोजन ,तसेच गतवर्षी विभागात सांगली व कोल्हापूर जिल्हयात गंभीर पूरपरिस्थिती उद्भवली, त्यादृष्टीने खबरदारीचे नियोजन यासह पुणे विभागातील मान्सूनपूर्व तयारीबाबत विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज सविस्तर माहिती दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील विभागनिहाय मान्सूनपूर्व तयारीबाबतचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात सुरु असलेल्या उपाययोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, गतवर्षी पुण्याबरोबरच सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हयात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे येथील नागरिकांची गैरसोय झाली होती. या वर्षी पावसामुळे अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेत नियोजन करयात आले आहे. नद्यांच्या खोलीनुसार व नदीच्या प्रवाहाच्या वेगाचा अंदाज घेवून जास्त क्षमतेच्या बोटी खरेदी तसेच शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतांचा तुटवडा भासणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या संकटाचा सामना करताना मान्सूनपूर्व कामांकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत
आम्ही दक्षता घेतल्याचे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करताना गतवर्षातील त्रुटी राहणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे. पावसाळयापूर्वीची कामे वेळेत पूर्ण होतील, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. तसेच पुण्याच्या आंबील ओढयाबाबतची दक्षता तसेच गतवर्षी अलमट्टी धरणाचा विसर्ग न वाढल्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्हयात पूरस्थिती उद्भवली, यावर्षी याबाबतच्या दक्षतेबाबत डॉ. म्हैसेकर यांनी सविस्तर माहिती दिली.
पुणे विभागातील बहुतांश महानगरपालिका क्षेत्रातील शाळा कोवीड केअर सेंटरसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, त्यामुळे पावसाळयाच्या कालावधीतील संभाव्य अडचणीच्या कालावधीत निवा-याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
00000

कोविड रुग्णांसाठी रुग्णवाहिका वाढवणार

.रुग्णवाहिका नियंत्रणासाठी डॅशबोर्ड प्रणाली विकसित
– विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे दि.२६: कोरोना साथीमुळे रुग्णांची वाढती संख्या व रुग्णवाहिकेंची मागणी लक्षात घेऊन रुग्णवाहिकेंची संख्या व उपलब्धता वाढवणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
पी एम पी एल व प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पी एम पी एल च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती नयना गुंडे,सह व्यवस्थापक अजय चारठणकर,सुनील बुरसे,अनंत वाघमारे,प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे उपस्थित होते.
पुणे व पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या नोंदणी झालेल्या शासकीय व खाजगी आशा एकूण २ हजार३४२ रुग्णवाहिका असून सध्या कोविड रुग्ण वाढत असून रुग्णवाहिकेची वाढती मागणी लक्षात घेऊन रुग्णवाहिका वाढवण्यात येणार आहेत. त्यासाठी पी एम पी एल कडे असणाऱ्या मिडी बस या रुग्ण वाहिकेत आवश्यकतेनुसार रूपांतरित करण्याच्या शक्यता पडताळून पहाव्यात अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.
या सर्व रुग्णवाहिकांना जी पी एस प्रणाली बसवण्यात येणार असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॅशबोर्ड प्रणाली विकसित केली आहे. महापालिकेच्या वार्ड निहाय या रुग्ण वाहिका थांबवण्यात येतील. रुग्णांना नेण्यासाठी जवळची रुग्णवाहिका व जवळच्या रुग्णालयातील खाटांची उपलब्धता डॅशबोर्ड मूळे त्वरित समजून येईल व रुग्णाला तातडीने ऍडमिट करणे सोयीचे होणार आहे. रुग्णवाहिकेच्या वाहनचालक व कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण दिले जाणार असून रुग्ण व मृतदेह हाताळताना पी पी इ किट,मास्क,ग्लोव्हज हे घालणे अनिवार्य राहील . कोविड व नॉन कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका असतीलअसे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
पी एम पी एल कडे असणाऱ्या मिडी बसमध्ये सुधारणा करून त्या रुग्णवाहिकेत रूपांतरित करण्याकरिता प्रादेशिक परिवहन विभागाबरोबर समन्वय ठेवला जाईल असे पी एम पी एल च्या श्रीमती गुंडे यांनी सांगितले.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्णसंख्या झाली 3 हजार 689

पुणे विभागातील 3 हजार 674 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 7 हजार 719 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 26 :- पुणे विभागातील 3 हजार 674 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 7 हजार 719 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार 689 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 356 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 215 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 6 हजार 303 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 3 हजार 195 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 819 आहे. कोरोनाबाधित एकूण 289 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 208 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 501 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 404, सातारा जिल्ह्यात 26, सोलापूर जिल्ह्यात 31, सांगली जिल्ह्यात 3, कोल्हापूर जिल्ह्यात 37 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 335 कोरोना बाधीत रुग्ण असून 126 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 201 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 621 कोरोना बाधीत रुग्ण असून 291 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 275 आहे. कोरोना बाधित एकूण 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 82 रुग्ण असून 47 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 33 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत 378 रुग्ण असून 15 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 361 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 74 हजार 968 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 67 हजार 517 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 7 हजार 451 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 59 हजार 688 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 7 हजार 719 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

(टिप : – दि.26 मे 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

पुणे विमानतळावर देशांतर्गत विमानसेवेतून नागरिकांचे आगमन- जिल्हाधिकारी राम

पुणे दि.26 : – 25 मे 2020 पासून देशांतर्गत विमानसेवा सुरु झालेली आहे. 25 मे 2020 रोजी 11 विमानाने 823 तर 26 मे 2020 रोजी 8 विमानाने 344 प्रवाशांचे असे एकूण 1,167 प्रवाशांचे पुणे विमानतळावर आगमन झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.
या येणा-या प्रवाशांबाबत पुणे महानगरपालिकेमार्फत थर्मल स्क्रिनिंग तसेच होम क्वारंटाईन सील ॲन्ड हेल्प डेस्कची सुविधा 24 X7 करण्यात आली आहे.
पुणे विमानतळ येथे उतरणा-या नागरिकांबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांची तर त्यांच्या सहाय्याकरीता प्र.सहाय्यक जनसंपर्क अधिकारी योगेश हेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी याकामी जिल्हाधिकारी कार्यालयाचे राजशिषटाचार अधिकारी अमृत नाटेकर यांच्या संपर्कात राहण्याचे तसेच वेळोवेळी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लॉकडाऊनच्या काळातही आंबा निर्यातीला मोठे यश; कोकणातील ८ हजार ६४० टन आंब्याची निर्यात

0

नवी मुंबई, दि. 26 :- लॉकडाऊनच्या काळात सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा मर्यादित असताना कोकणातील 8 हजार 640 मे.टन आंब्याची निर्यात कृषि विभागामार्फत करण्यात आली.  1 एप्रिल ते 19 मे 2020 या कालावधीत केळी, कांदा, द्राक्षे, डाळिंब, लिंबु, मिरची, आले व इतर भाजीपाला व फळे मिळून एकूण 2 लाख 99 हजार 950 मे. टन मालाची निर्यात करण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाविरुध्द लढाई सुरु असताना शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या.  यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीचे संकट दूर करण्यासाठी कृषि माल निर्यात सुरळीत ठेवण्यात यश आले. या परिस्थितीत कृषि विभागाने जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट आणि मुंबईचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यामार्फत भारतातील फळे व भाजीपाला समुद्र व हवाई मार्गाने जगभरात निर्यात केला. मागील दीड महिन्यात विविध देशांच्या मागणीनुसार फळे व भाजीपाल्यांची निर्यात करण्यात आली आहे. आंबा 8 हजार 640 मे.टन, केळी 33 हजार 948 मे. टन, द्राक्ष्‍ो 9 हजार 509 मे. टन, डाळिंब 1 हजार 773 मे. टन, कांदा 2 लाख 25 हजार 686 मे.टन,  लिंबु 653 मे.टन, मिरची 1 हजार 522 मे. टन, आले 1 हजार 168 मे. टन, इतर फळे व भाजीपाला 17 हजार 051 मे.टन  निर्यात करण्यात आले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत केळी, लिंबू, मिरची आणि आले याची निर्यात यावर्षी जास्त झालेली आहे. यामध्ये केळी गेल्या वर्षी 23 हजार 456 मे.टन तर यावर्षी 33 हजार 948 मे.टन निर्यात झाली आहे. म्हणजेच केळी निर्यात सुमारे दीडपट झालेली आहे. लिंबाची निर्यात गेल्या वर्षी 283 मे.टन होती. यावर्षी 653 मे.टन झाली आहे. मुंबईमधून गेल्यावर्षीच्या तुलनेत लिंबू निर्यात 230 टक्के झालेली आहे. हिरव्या मिरचीची निर्यात गेल्या वर्षी 1 हजार 409 मे.टन झाली होती. त्या तुलनेत यावर्षी 1 हजार 522 मे.टन म्हणजे सुमारे 113 मे.टन जास्त झाली आहे. तसेच आल्याच्या निर्यातीतही चांगली वाढ झालेली असून गेल्यावर्षी आले निर्यात  846 मे.टन होती. यावर्षी 1 हजार 168 मे.टन झालेली आहे.

मागील वर्षाच्या निर्यातीच्या तुलनेत यावर्षीची निर्यात कमी झालेली असली, तरी कोरोनाच्या संकटातील लॉकडाऊनच्या काळात जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट येथून कंटेनर आणि ट्रेलरसाठी वाहनचालकांची कमतरता असतानाही तसेच वाहतुकीच्या वेळी रस्त्यांवर कोणत्याही जेवणाच्या तसेच वाहन दुरुस्तीच्या सुविधा नसतानाही निर्यातीसाठी फळे व भाजीपाला उपलब्ध करुन देणे हे कौतुकास्पद आहे.  पुढील काळात या निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येईल. त्यासाठी योग्य उपाययोजना व नियोजन करण्यात आले आहे.

कोरोना वेगाने पसरतोय ,आतापर्यंतच्या बंदचा हेतू अपयशी,देश परिणाम भोगतोय (व्हिडीओ)

नवी दिल्ली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भारत जगातील एकमेव असा देश आहे जेथे कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर लॉकडाउन हटवले जात आहे. लॉकडाउनचा उद्देश अयशस्वी झाला आहे, त्याचा परिणाम देशाला भोगावा लागत आहे. चार टप्प्यांच्या लॉकडाउननंतरही पंतप्रधान आशा करत असलेले परिणाम मिळाले नाही.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/979762239108065/

केंद्र सरकारने प्रवासांच्या मदतीसाठीचे उपया सांगावे

राहुल म्हणाले की, पंतप्रधान सुरुवातील फ्रंट फुटवर खेळत होते, मात्र लॉकडाउन फेल झाल्यानंतर ते बॅकफूटला गेले. त्यांनी पुन्हा एकदा पुढे यावे. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्य सल्लागार म्हणाले होते की, मे अखेरपर्यंत कोरोनाचा परिणाम कमी होईल मात्र असे काहीच घडत नाही. आता सरकारने पुढील योजना सांगाव्यात. लॉकडाउन उघडण्याच्या धोरणात स्थलांतरितांना आणि राज्यांना मदत करण्यासाठी कोणती व्यवस्था केली? याबाबतही त्यांनी सांगावे.

गरिबांच्या हातात पैसा पोहचणे आवश्यक

सरकारने दिलेल्या आर्थिक पॅकेजमुळे काही काहीही होणार नाही. लोकांचा हातात पैसा पोहचायला हवा. सामान्य लोक आणि इंडस्ट्रींना आर्थिक मदत मिळाली नाही तर त्याचे भयंकर परिणाम होतील. केंद्राने राज्यांनाही मदत करावी. त्याशिवाय काँग्रेस शासित राज्यांना अडचणींचा सामना करावा लागले असे राहुल गांधी म्हणाले.

सीमाप्रश्नावरही सरकार पारदर्शक नाही

चीनसोबत सुरू असलेल्या वादाबाबत राहुल म्हणाले की, याप्रकरणी सरकारने केव्हा आणि काय झाले हे स्पष्टपणे सांगावे? नेपाळमध्ये काय झाले आणि आता लडाखमध्ये काय घडत आहे? याबद्दल अद्याप पारदर्शकता नाही.

दोन महिन्यांत राहुल यांची चौथी पत्रकार परिषद

लॉकडाउनच्या मागील 60 दिवसांत राहुल गांधींची ही चौथी पत्रकार परिषद होती. यादरम्यान त्यांनी दोन वेळा राष्ट्रीय मीडिया आणि दोन वेळा स्थानिक मीडियाशी चर्चा केली.

केंद्र सरकारने राज्य सरकारला 28 हजार कोटी रुपये दिले; राज्याला काहीच मिळत नसल्याचा दावा खोटा(व्हिडीओ)

मुंबई. कोरोना विरोधात लढा देत असताना केंद्राकडून हजारो कोटी रुपयांची मदत मिळूनही राज्य सरकार काही करत नाही अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. कोरोना आणि लॉकडाउनमध्ये राज्य सरकारवर टीका करत असताना त्यांनी केंद्र सरकारचे तोंडभर कौतुक केले. केंद्र सरकार आणि आरोग्य विभागाकडून राज्य सरकारला तब्बल 28104 कोटी रुपयांची मदत करण्यात आली. ती कशी विभागली गेली आणि कुठे खर्च करण्यासाठी देण्यात आली त्याचा तपशील फडणवीस यांनी देण्याचा प्रयत्न आपल्या फेसबूक लाइव्हमध्ये केला आहे. महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारकडून काहीच मिळाले नाही असा आरोप केला जात असला तरी हा आरोप खोटा आहे असे फडणवीसांनी स्पष्ट केले.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/2389834931315454/

सरकार स्थापनेचा प्रयत्न करणार नाही -फडणवीस

राष्ट्रपती राजवटीची मागणी आम्ही करत नाही. भारतीय जनता पक्ष सरकार स्थापनेचा प्रयत्न करणार नाही. आमचे लक्ष केवळ कोरोनाविरोधी लढ्यावर आहे. आमचे प्रयत्न सरकारला लढवायचे नाही तर झोपेतून जागे करायचे आहेत असेही ते पुढे म्हणाले.

बोल्ड पावले उचला, जीएसटी नाही तर कर्ज घ्या -फडणवीस

केंद्राकडून राज्याला कशा स्वरुपाची आणि किती मदत करण्यात आली त्याचा मी अभ्यास केला असे माजी मुख्यमंत्री म्हणाले आहेत. फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे, अनेक नेते राज्य सरकारकडे पैसेच नाही मदत कशी करणार उपाययोजना कशी करणार असे बोलत आहेत. परंतु, यासाठी फडणवीसांनी दुसरे महायुद्ध आणि युरोपचे उदाहरण दिले. त्यांच्या मते, दुसऱ्या महायुद्धात उद्योग संपले होते. देशांमध्ये काहीच उरले नव्हते. अशात सर्व काही नव्याने उभे करण्यासाठी त्यांनी करांचा नव्हे, तर कर्जांची व्यवस्था करून युरोपला नव्याने उभे केले. राज्य सरकारला केंद्राकडे जमा झालेला जीएसटी मिळत नाही असेही म्हटले जात आहे. परंतु, जीएसटी कलेक्शन उद्योग बंद असल्यामुळे सध्या होतच नाही. अशात राज्य सरकारने सुद्धा जीएसटीवर विसंबून न राहता, ‘बोल्ड निर्णय’ घ्यायला हवा. केंद्र सरकारने त्यासाठी कर्जाची व्यवस्था केली आहे. इतर राज्य त्याचा लाभ घेत आहेत. महाराष्ट्र सरकारने सुद्धा कर्ज काढून अर्थव्यवस्था सुधारण्यात हातभार लावावा.

महाराष्ट्राला मिळू शकते 1 लाख 60 हजार कोटींचे कर्ज

केंद्र सरकारने जीएसटी मिळत नसल्याने राज्यांसाठी कर्जाची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने त्याला मान्यता दिली. या प्लॅननुसार, राज्य सरकारांना त्यांच्या जीडीपीच्या तुलनेत 5 टक्के कर्ज काढता येऊ शकतो. देशाच्या एकूणच जीडीपीचा 5 टक्के 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होतो. महाराष्ट्राचा यातील वाटा 15 टक्के आहे. त्यानुसार, महाराष्ट्र सरकारला तब्बल 1 लाख 60 हजार कोटी रुपये कर्ज घेऊ शकते. त्याची परतफेड कशी करावी यासाठी सरकारच्या योजना आणि फायनांस कमिशन आहेच. त्यामुळे, राज्य सरकारने बोल्ड निर्णय घ्यावेत असे फडणवीस म्हणाले आहेत.

राहुल गांधी, काँग्रेसचाही घेतला खरपूस समाचार

देशभरातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मृत्यू 40 टक्के याच ठिकाणी झाले. एकूणच राज्यातील परिस्थिती अतिशय वाइट आहे. एकूणच सरासरी आपण पाहिल्यास मुंबईत 3500 टेस्ट करण्यात आल्या. 32 टक्के टेस्ट पॉझिटिव्ह येत आहेत. देशात 4.5 टक्के आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थितीत दिवसेंदिवस वाइट होत आहे. खासगी रुग्णालयांनी रेट वाढवले, सरकारी रुग्णालयात बेड नाहीत. प्रेत ठेवायला जागा नाहीत. त्यात राहुल गांधी सांगतात, आमचं सरकारकडून ऐकले जात नाही. हे स्टेटमेंट अतिशय आश्चर्यकारक आहे. कोरोना हाताबाहेर जात असल्याचे पाहता परिस्थितीचा ठीकरा शिवसेनेवर फोडून आपण वेगळे व्हायचे असा हा प्रयत्न दिसतंय. त्यामुळे, राहुल गांधींचे वक्तव्य जबाबदारी झटकण्यासारखे आहे. अशात राज्य सरकारचे सहकारी सुद्धा त्यांची साथ सोडत असताना दिसून येत आहेत. अशी टीका फडणवीस यांनी केली.

परदेशातील २५९४ नागरिक महाराष्ट्रात परत

0

आलेल्या प्रवाशांच्या क्वारंटाईनची काटेकोर अंमलबजावणी

मुंबई दि. २६ :  वंदे भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत २५९४ नागरिक आले असून या सर्वांच्या क्वारंटाईनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात  आहे. संपूर्ण शासकीय यंत्रणा कोरोना निर्मुलनासाठी निग्रहाने लढत असतांना माणुसकीच्या नात्याने परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांमधील नागरिकांना मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे.

वंदे भारत अभियानांतर्गत २० फ्लाईटसच्या माध्यमातून हे नागरिक महाराष्ट्रात आले असून त्यात ९५५ प्रवासी मुंबईचे आहेत. ११९८ प्रवासी उर्वरित महाराष्ट्रातील आहेत तर ४४१ प्रवासी इतर राज्यांमधील आहेत. आलेले नागरिक हे ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका आणि इंडोनेशिया मधून आले आहेत. अजून १० फ्लाईटसने परदेशात अडकलेले नागरिक महाराष्ट्रात येणे अपेक्षित आहे.

आलेल्या नागरिकांचे संस्थात्मक क्वारंटाईन

बृहन्मुंबईतील प्रवाशांची संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवासी यांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर  त्यांना त्यांचे जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त यांच्यामार्फत क्वारंटाईन केले जात आहे.

महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी दिनांक २४ मे २०२० रोजी  मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येत आहे.

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. त्यांचा वाहतूक पास संबंधित राज्यातून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवले जात आहे. हे वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीपणे राबवित आहे.

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये डेप्युटी मॅनेजर पदाच्या ४८ जागांची भरती

0

पदाचे नाव : डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) – ४८ जागा
शैक्षणिक पात्रता : सिविल इंजिनियरिंग मध्ये पदवी

वयोमर्यादा : १५ जून २०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा जास्त नसावे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १५ जून २०२० संध्याकाळी ६ वाजेपर्यंत

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2yujAjc

ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/3dd6DJX

ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती

0

१. पदाचे नाव : आरोग्य निरीक्षक – ५० जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण, आरोग्य निरीक्षक/ स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण आणि अनुभव

२. पदाचे नाव : सिस्टर इनचार्ज – १५० जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेतून १२ वी उत्तीर्ण, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ची नर्सिंग व मिडवाईफरी पदविका, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ची नोंदणी आणि अनुभव

३. पदाचे नाव : परिचारीका (जी.एन.एम) – १९५ जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेतून १२ वी उत्तीर्ण, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ची नर्सिंग व मिडवाईफरी पदविका, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ची नोंदणी

४. पदाचे नाव : प्रसाविका (ए.एन.एम) – ११० जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, ए.एन.एम अभ्यासक्रम पूर्ण, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ची नोंदणी

५. पदाचे नाव : औषध निर्माण अधिकारी – २९ जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेसह १० वी उत्तीर्ण, डी. फार्म आणि अनुभव

६. पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ६९ जागा
शैक्षणिक पात्रता : रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवी, डी.एम.एल.टी उत्तीर्ण आणि अनुभव

७. पदाचे नाव : सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ५० जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान विषयातील पदवी आणि डी.एम.एल.टी उत्तीर्ण

८. पदाचे नाव : ई.सी.जी. ऑपरेटर – ३० जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र विषयासह पदवी, हृदयस्पंदन आलेख तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण आणि अनुभव

९. पदाचे नाव : आया – १०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ७ वी पास

१०. पदाचे नाव : वॉर्डबॉय/परिचर – २०० जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी, १२ वी उत्तीर्ण

११. पदाचे नाव : डेटा एन्ट्री ऑपरेटर – ४६ जागा
शैक्षणिक पात्रता : वाणिज्य किंवा कला शाखेतील पदवी, संगणकाचे ज्ञान, इंग्रजी व मराठी टायपिंगचे ज्ञान

मुलाखतीचा दिनांक : पद क्रमांक ३ व ४ साठी २६ मे सकाळी १० वाजता
पद क्रमांक २, ५ व ६ साठी २७ मे सकाळी १० वाजता
पद क्रमांक १० साठी २८ मे सकाळी १० वाजता
पद क्रमांक १, ७ व ११ साठी २९ मे सकाळी १० वाजता
पद क्रमांक ८ व ९ साठी ३० मे सकाळी १० वाजता

वयोमर्यादा : जाहिरातीच्या दिनांकास वय वर्षे ३८ पेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय उमदेवारांना सवलत)

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2Xsue2h

प्रत्यक्ष मुलाखतीकरिता पत्ता : ठाणे महानगरपालिकेचे मुख्यालय, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पांचपाखाडी ठाणे, (प.) ४००६०२.

सरकार मजबूत, चिंता नसावी -संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सोमवारी संध्याकाळी मातोश्रीवर बैठक पार पडल्याची माहिती दिली आहे. सोबतच कुणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवत असेल तर ती निव्वळ पोटदुखी समजावी असा टोला लगावला आहे. सरकार मजबूत आहे, चिंता नसावी असंही ते म्हणाले आहेत.

 

महाविकास आघाडी सरकार करोनामुळे निर्माण झालेलं संकट हाताळण्यात अयशस्वी ठरलं असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात आहे. याचदरम्यान राज्यातील अनेक नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपा नेते नारायण राणेदेखील भेटीला पोहोचले होते.

संजय राऊत आणि शरद पवार यांनी ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलेलं असून नारायण राणे यांनी मात्र सरकार करोना संकट रोखण्यात अपयशी ठरलं असून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

राज्यपालांच्या भेटीसाठी नेत्यांची रांग लागल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. कोणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी”.संजय राऊत यांनी याआधी केंद्र सरकार आणि भाजपा राज्य सरकार बरखास्त करुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. पण त्यांना यश मिळणार नाही असंही ते म्हणाले आहेत. नारायण राणे यांच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, “राणे कोण आहेत ? असा निर्णय घेण्याची मागणी करण्याचा कोणता अधिकार त्यांच्याकडे आहे ? राजभवनातून निमंत्रण आल्याने मी राज्यपालांना भेटायला गेलो होतो. चर्चेदरम्यान राज्यपालांनी राज्य सरकारला करोनाची स्थिती हाताळणं कठीण जात असल्याचा उल्लेख केला. पण मी त्यांना परिस्थिती नियंत्रणात असून मुख्यमंत्री सर्वात पुढे राहून लढा देत आहेत. प्रत्येक दिवशी महत्त्वाच्या उपाययोजना केल्या जात आहेत असं सांगितलं”.

लागोपाठ वरिष्ठ नेते राज्यपालांना भेटतात तरी का ?

 

राजकिय घटनाक्रम

1) शनिवार दिनाक 23मे – सकाळी शिवसेना नेते संजय राऊत अचानक राजभवनवर राज्यपालांना भेटण्यासाठी दाखल.

2) शनिवार दिनांक 23 मे – दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्माराकात बैठक.

3) सोमवार 25 मे सकाळी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राजभवनवर राज्यपालांना भेटण्यासाठी दाखल.

4)सोमवार 25 मे सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटाला भाजपचे खासदार नारायण राणे यांनी राजभवनात घेतली राज्यपालांची भेट

5) सोमवार दिनांक 25 मे संध्याकाळी मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची गुप्त बैठक

देशात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढत चालले असताना राज्यात राजकीय वातावरण देखील तितकंच तापलं आहे. त्यामुळे राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याला कारणंही तसंच आहे. महाविकास आघाडीचे कर्तेधर्ते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि या तिन्ही पक्षांना एकत्र आणणारे संजय राऊत यांच्या मातोश्रीवर गुप्त बैठक पार पडली.

काल संध्याकाळी उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची महत्वाची बैठक झाली.

सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, बैठकीत फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत हेच उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील आणि केंद्रातील महत्वाच्या राजकिय घडामोडींवर चर्चा झाल्याचं समजतं आहे.

महाराष्ट्रातील सतत वाढती कोरोनाग्रस्तं रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार आपतकालिन परिस्थिती कायद्यांतर्गत ICMR म्हणजेच इंडियन काउन्सील आँफ मेडिकल रिसर्च संस्थेच्या हाती सर्व सूत्रं देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही दिल्लीत बरीच उठाठेव केल्याचीही माहीती हाती लागली आहे. कारण गेली 3 ते 4 दिवस लागोपाठ मोठे नेते राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांची सातत्याने भेट घेत आहेत. या भेटींमागे मोठं राजकारण होत असल्याचीही माहीती आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

माझ्या प्रभागात  महापालिकेचे एकही किट घेतले नाही – हेमंत रासने 

माझ्या प्रभागात पुणे महापालिकेचे एकही किट घेतले नाही.
पुणे- माझ्या प्रभागात पुणे महापालिकेचे एकही किट घेतले नाही. स्वतः खर्च करून अन्नधान्याचे किट वाटप करीत असल्याचे स्पष्टीकरण स्थायी समिती सभापती हेमंत रासने यांनी दिले आहे.

हेमंत रासने मित्र परिवारतर्फे बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर संस्थेच्या प्रांगणातून कोरोना लढाईत प्रत्यक्ष काम करणा-या भारतीय जनता पक्षाच्या व पुण्यातील १ हजार गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकत्यांसह ३ हजार जणांना टप्याटप्याने जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.

रासने पुढे म्हणाले, माझा शनिवार पेठ – सदाशिव पेठ 15 नंबर प्रभाग हा कंटेन्मेंट झोन नाही.

त्यामुळे मी महापालिकेची 1 ही किट घेतले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध करणे शक्य झाले. या काळात प्रत्येक कार्यकर्ता गरजूंसाठी कार्यरत आहे.

विद्यार्थी, प्रवासी, मजूर, हातावर पोट असलेल्यांची उपासमार होऊ नये, यासाठी भाजपाने व गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काम केले. त्यामुळे या कार्यकर्त्यांचा सन्मान २५ किलो किटमध्ये २५ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू देऊन करण्याचा आम्ही संकल्प केला.

पुणेविभागातून 128 रेल्वे मधून 1 लाख 69 हजार 824 प्रवासी रवाना

पुणे दि.25:- लॉक डाऊन कालावधीत पुणे विभागातून-25 मे पर्यत 128 रेल्वे परराज्यात सोडण्यात आल्या आहेत. यापैकी मध्यप्रदेशसाठी – 15, उत्तरप्रदेशसाठी – 56 उत्तराखंडसाठी – 2, तमिळनाडूसाठी -2, राजस्थानसाठी – 5, बिहारसाठी – 33, हिमाचल प्रदेशसाठी 1, झारखंडसाठी – 6, छत्तीसगडसाठी – 4, जम्मू-कश्मीरसाठी-1, मणीपूरसाठी- 1, आसामसाठी- 1 व ओरीसासाठी- 1 अशा एकूण 128 रेल्वे रवाना झाल्या असून, यामधून 1 लाख 69 हजार 824 प्रवासी रवाना करण्यात आलेले आहेत, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगीतले.

दिनांक 26 मे रोजी पुणे विभागातून 12 रेल्वे रवाना होणार असून यामधून 16 हजार 800 व्यक्ती त्यांच्या राज्यात पोहचतील. या व्यतिरिक्त 6 हजार 769 बसेसव्दारे 1 लाख 3 हजार 287 व्यक्तींना त्यांच्या राज्यांच्या सीमेवर व जिल्हयांमध्ये पोहचवण्यात आले आहे. वेगवेगळया भागातून पुणे विभागात एकंदर 339 बसेसव्दारे 7 हजार 80 व्यक्ती आल्या आहेत, अशी ‍ माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.
0000