Home Blog Page 2568

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला राज्य सरकारची परवानगी

  • महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश
  • ट्रस्ट स्थापन करण्यास राज्य शासनाची मान्यता
  • पुढील प्रक्रिया तातडीने करणार : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे (प्रतिनिधी)

पुणे महापालिकेच्या माध्यमातून साकारण्यात येत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ट्रस्ट स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ स्थायीचे समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी ही संकल्पना मांडत विविध पातळ्यांवर पाठपुरावा केला होता. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर वैद्यकीय महाविद्यालय साकारण्यास महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे.

महापौर मोहोळ यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना या महाविद्यालयाची संकल्पना मांडून निधीही उपलब्ध करुन दिला होता. हे महाविद्यालय डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय परिसरात साकारणार असून त्यासाठी १० एकर जागा राखीव करण्यात आली आहे. महापालिकेच्या मुख्यसभेत गेल्या वर्षी २८ ऑगस्टला मान्यता मिळाली होती. या संदर्भातील पुढील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करत महापौर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री-पालकमंत्री अजित पवार आणि नगरविकासचे मुख्य सचिव महेश पाठक यांच्याकडे व्यक्तिशः पाठपुरावा केला होता.

या संदर्भात माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘मुख्य सभेच्या मान्यतेनंतर पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत अहमदाबाद महापालिकेने साकारलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर या संदर्भातील तांत्रिक बाबींची पूर्तता करत वेगाने पाठपुरावा केला. आणखी काही तांत्रिक मान्यता घेऊन पुढील वर्षीच्या जूनमध्ये १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच ५०० खाटा असणारे सुसज्ज आणि अद्ययावत महाविद्यालय करण्याचा मानस आहे. या प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे पुणेकरांच्या वतीने मी मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो’.

५९५ पदांची निर्मिती आणि ६२२ कोटींची गरज

‘महाविद्यालयात प्रत्यक्ष साकारताना विविध प्रवर्गातील ५९५ पदांची निर्मिती करुन भरती प्रक्रिया पार पडणार असून येत्या सहा वर्षात यासाठी टप्प्याटप्प्यात ६२२ कोटी रुपयांची आवश्यकता असणार आहे’, अशीही माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.

कोरोनाच्या लढाईत आशीर्वादासाठी बागवे पिता -पुत्र गणराजाच्या द्वारी (व्हिडीओ)

पुणे- सारे जग कोरोनाच्या संक्रमणाने त्रस्त झाले असताना एकीकडे पुणे आणि आपल्या भवानीपेठ परिसरात जनजागृती आणि जनसेवा करता करता अखेर रमेश बागवे आणि अविनाश बागवे या पिता पुत्रांनी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणराजांच्या द्वारी माथा टेकून गणराजाला साकडे घातले . कोरोनाची लढाई लढतांना सैनिक हि कोरोनाच्या आक्रमणात वेढले जात आहेत . जगातील सर्व नागरिक ,कोरोना विरोधात लढा देणारे योद्धे यांना बळ दे म्हणून बागवे पिता पुत्रांनी येथे प्रार्थना केली . सर्व प्रयत्न झालेकी प्रार्थना हा एकमेव मार्ग उरतो आणि त्यातूनही यशप्राप्ती होते या भावनेने आज त्यांनी दगडूशेठ ला साकडे घातले .
रमेश बागवे हे राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत तर अविनाश बागवे हे कॉंग्रेसचे नगरसेवक आहेत .त्यांच्या समवेत यावेळी राजेंद्र शिरसाट, प्रवीण करपे, सुरेश कांबळे, आदित्य गायकवाड येथे उपस्थित होते

क्राइम पेट्रोल फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहता ची आत्महत्या

0

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिने गळफास लावून आत्महत्या केली आहे. तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलेल्या पोस्टवरून स्पष्ट होत आहे.

क्राइम पेट्रोल फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिने तिच्या इंदौरमधील घरी गळफास घेत आत्महत्या केली. कोरोना व्हायरच्या लॉकडाऊनमध्ये प्रेक्षा तिच्या घरी आली होती. प्रेक्षाच्या आत्महत्येमागचं नेमके कारण समजू शकलेले नाही मात्र डिप्रेशनमुळे तिने आत्महत्या केल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

प्रेक्षाला अभिनेत्री व्हायचे असल्यामुळे ती मुंबईत आली होती मात्र लॉकडाऊननंतर ती तिच्या घरी परतली. त्यानंतर लॉकडाऊन वाढत गेले आणि आता आपल्याला यापुढे काम मिळणार नाही या भावनेने ती डिप्रेशनमध्ये जात होती आणि डिप्रेशनमध्येच तिने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. दरम्यान पोलीस तपासात तिची कोणतीही सुसाइड नोट आढळून आली नाही.

प्रेक्षा आपल्या घरी परतल्यानंतर ती काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती. सोमवारी रात्री ती जेव्हा तिच्या रुममध्ये गेली तेव्हा काही वेळ ती तिचा फोन वापरत राहिली. त्यानंतर तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक निराशजनक स्टेटस अपलोड केले होते. ज्यात तिनं लिहिलं, ‘सर्वात वाईट असते ते म्हणजे तुमची स्वप्न मरूनजाणे’.

क्राईम पेट्रोल’, ‘मेरी दुर्गा’ आणि ‘लाल इश्क’ या मालिकांमध्ये काम करणाऱ्या प्रेक्षाला गेल्या काही दिवसांपासून काम मिळत नसल्याने ती तणावात असल्याचे बोलले जात होते. सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टवरून तिने आत्महत्येचे पाऊल हे नैराश्येतून उचलले आहे, असा दावा केला जात आहे. टीव्ही मालिका करणारी प्रेक्षा लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटूंबियांसोबत राहत होती. पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
अभिनेत्री ऋचा तिवारी हिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत तिला श्रद्धांजली अर्पण केली आहे. ती म्हणते, “हसऱ्या चेहऱ्यामागे बऱ्याच गोष्टी लपलेल्या असतात. त्याला कुणी समजून घेऊ शकत नाही. आपण जितकी काळजी शरीर स्वास्थाची घेतो तितकी मनाचीही घ्यायला हवी. आमच्या परिवारातील एक सदस्य आता राहिली नाही.

रूग्ण दुपटीचा वेग (डबलींग रेट) १४ दिवसांवर आणण्यात यश – मुख्य सचिव अजोय मेहता

0

लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णसंख्येचा गुणाकार रोखण्यास मदत

कोरोना रुग्णांसाठीच्या उपचार सुविधेला गती

मुंबई, दि. २६ : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग (डबलींग रेट) 14 दिवसांवर आणण्यात यश आले आहे. मुंबईमध्ये 75 हजार खाटा तयार असून कॉन्टॅक्ट ट्रेसींगसाठी ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम राबविली जात आहे. राज्यात कोरोना चाचण्यांची संख्यादेखील दिवसागणिक वाढत असून राज्यात लवकरच 27 नवीन प्रयोगशाळा सुरु होतील. त्यामुळे राज्यातील प्रयोगशाळांची संख्या 100 होणार आहे, अशी माहिती मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज येथे दिली.

मंत्रालयातून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना मुख्य सचिव बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाचे डॉ.प्रदीप व्यास, मुंबई महानगरपालिका आयुक्त आय.एस.चहल उपस्थित होते.

यावेळी झालेल्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे असे :

मुख्य सचिव म्हणाले :

· राज्यात सध्या 35 हजार 178 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

· 9 मार्चपासून आतापर्यंत 52 हजार 667 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 15 हजार 768 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

· राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी तीन दिवसांवरुन 14 दिवसांवर आणण्यास यश मिळाले आहे. लोकांमधील जागरुकता आणि लॉकडाऊनमुळे रुग्ण दुपटीचा कालावधी वाढविणे शक्य झाले आहे.

· राज्यात टेस्टींग, ट्रेसींग आणि आयसोलेशन या बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला.

· 9 मार्चला राज्यात केवळ दोन प्रयोगशाळा होत्या आज 72 प्रयोगशाळा कार्यान्वित असून नव्याने 26 लॅब येत्या काही दिवसात कार्यान्वित होतील. त्यामध्ये रत्नागिरी येथे एक, आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 18 खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये या प्रयोगशाळा सुरु होतील.

· मार्चमध्ये दिवसाला 600 ते 700 चाचण्यांची असणारी क्षमता 13 हजारांहून अधिक झाली आहे.

· राज्यात सर्वेक्षण पथकांची संख्या दिवसांगणिक वाढत असून सध्या 16 हजार सर्वेक्षण पथक कार्यरत असून 66 लाख लोकांचे सर्वेक्षण आतापर्यंत झाले आहे.

· कॉन्टॅट ट्रेसींगवर भर दिल्याने कोरोनाची साखळी तोडण्यामध्ये यश मिळाले आहे.

· राज्याचा मृत्यूदर एप्रिलमध्ये 7.6 एवढा होता. तो आता 3.25 टक्के इतका खाली आला आहे.

· कोरोनावर उपचारासाठी 11 तज्ज्ञ डॉक्टरांचे कृतीदल नेमण्यात आले आहेत. त्यांनी उपचाराचा प्रोटोकॉल तयार केला. तो सर्व जिल्ह्यांना देखील पाठविण्यात आला. हे डॉक्टर्स 24 तास उपलब्ध असून कुठल्याही जिल्ह्याला उपचाराबाबत आवश्यकता असल्यास ते त्यांना संपर्क करु शकतात.

· राज्यभरात त्रिस्तरीय उपचारपद्धती करण्यात येत असून सुमारे 80 टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास :

· राज्यात सुमारे 1 हजार 114 लोकांना (3.6 टक्के) ऑक्सीजन, व्हेंटीलेटरची आवश्यकता आहे.

· कोविड केअर कॉर्नर 1600, कोविड हेल्थ सेंटर 432, कोविड हॉस्पिटल 277 एवढी संख्या असून त्यामध्ये 2 लाख 70 हजार आयसोलेशन बेड उपलब्ध आहेत.

· 24 हजार 345 बेड्सना ऑक्सीजनची सुविधा आहे.

· राज्यातील 20 टक्के रुग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता असून तर 10 टक्के रुग्णांना आयसीयूची गरज आहे.

· राज्यात तीन हजार व्हेंटीलेटर उपलब्ध असून अतिदक्षता विभागातील 8 हजार 400 बेड्स उपलब्ध आहेत.

· राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या एक हजार रुग्णालयातून मोफत उपचार मिळतील.

· राज्यातील 95 टक्के कोरोना रुग्ण महापालिका क्षेत्रातील असून त्यातील 70 टक्के रुग्ण मुंबई व परिसरातील आहेत.

मुंबई महानगरपालिका आयुक्त आय.एस.चहल :

· मुंबईत 31 हजार 789 पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यातील 8 हजार 400 रुग्णांना घरी सोडण्‍यात आले आहे. सध्या 22 हजार रुग्णांचर उपचार सुरु असून त्यातील 15 हजार 800 रुग्णांना लक्षणे नाहीत.

· मुंबई महापालिका परिसरातील मृत्यूदर हा सध्या 3.2 टक्के असून तो 3 वर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.

· मुंबईत कॉन्टक्ट ट्रेसींगवर भर देण्यात येत असून त्यासाठी ‘चेस द व्हायरस’ ही नवी मोहीम हाती घेण्यात येत आहे. याअंतर्गत एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकट सहवासातील 15 जणांना सक्तीने संस्थात्मक कॉरंटाईन केले जाणार आहे.

· कम्युनिटी लीडर नेमले असून त्यांना सहा प्रकारचे काम नेमून देण्यात आले आहे. त्यामध्ये कोमॉर्बीड रुग्णांची माहिती देणे. संस्थात्मक कॉरंटाईनमध्ये मिळणाऱ्या जेवणाची माहिती देणे, स्वच्छतागृहांची स्वच्छता, खासगी दवाखाने उघडले की नाही याची माहिती ते देतील. यासाठी प्रत्येक वार्डमध्ये वॉररुम उघडण्यात आली आहे.

· मुंबई महापालिका प्रत्येक बेडला विशिष्ट ओळख क्रमांक देणार असून त्या माध्यमातून उपलब्ध बेडच्या संख्येबाबतची माहिती ऑनलाईन होणार असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील आठवड्यापासून ते कार्यान्वित होईल.

· मुंबई महापालिकेची हेल्पलाईन असलेल्या 1916 क्रमांकासाठी मार्गिका वाढविण्यात येत असून उद्यापासून त्यावर कार्यवाही सुरु होईल. यामुळे नागरिकांचा प्रतिक्षा कालावधी कमी होईल.

· रुग्णालयातील खाटांसाठी डॅशबोर्ड तयार करण्यात येत असून दर अर्धा तासात रिकाम्या झालेल्या खाटांची माहिती तेथे अपलोड होईल.

· मुंबईत सध्या 75 हजार खाटा तयार असून त्यामध्ये सीसीसी 1 आणि डीसीएच यांची संख्या 44 हजार आहे.

· ज्या कोरोना रुग्णांना डायलेसीसची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी coviddialysis.in  हे पोर्टल तयार करण्यात आले असून डायलेसीससाठी उपलब्ध असणाऱ्या मशीनची माहिती मिळणार आहे. या सुविधेमुळे डायलेसीस अभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी करण्यात यश मिळणार आहे.

· रुग्णवाहिकांची संख्या 456 करण्यात आली आहे. सर्व रुग्णवाहिकांच्या चालकांना पीपीइ किट्स उपलब्ध करुन देण्यात आले आहे. उबेर ॲपचे यासाठी सहकार्य घेण्यात येत असून या ॲपवर रुग्णवाहिकांचे लोकेशन दिसणार आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसात रुग्णवाहिकांची कार्यक्षमता अधिक वाढून रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होईल.

· मुंबईतील 33 खासगी रुग्णालयांमध्ये 3 हजार 600 बेडस्‍ नॉनकोविड रुग्णांसाठी तर 2 हजार 624 बेडस्‍ कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्याचबरोबर अतिदक्षता विभागातील 100 टक्के खाटा देखील उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सर्व खाटांच्या वितरणाबाबत नियंत्रण कक्षाबाबत देखरेख केली जात आहे.

· भारतीय प्रशासन सेवेतील सात अधिकाऱ्यांना शासकीय रुग्णालयांच्या नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तिथे वॉररुम करण्यात येणार असून कोविड वॉर्ड, आयसीयू वार्ड सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविकांची भरती

पदाचे नाव : आशा स्वंयसेविका – ३६० जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ८ वी उत्तीर्ण आणि अनुभव

वयोमर्यादा : वय वर्ष किमान २५ ते कमाल ४५ पेक्षा जास्त नसावे.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2ZzWClX

अर्ज करण्याची अंतिम तारीख, स्थळ आणि वेळ :

महापालिकेचे आकुर्डी रुग्णालय – २९ मे २०२० सकाळी १० ते दुपारी ३

महापालिकेचे यमुनानगर रुग्णालय – २९ मे २०२० सकाळी १० ते दुपारी ३

महापालिकेचे भोसरी रुग्णालय – २९, ३० मे, १, २ जून २०२० सकाळी १० ते दुपारी ३

महापालिकेचे वायसीएम रुग्णालय (कुटुंब कल्याण विभाग) – २९ मे २०२० सकाळी १० ते दुपारी ३

महापालिकेचे सांगवी रुग्णालय – २९, ३० मे २०२० सकाळी १० ते दुपारी ३

महापालिकेचे जिजामाता रुग्णालय – २९, ३० मे सकाळी १० ते दुपारी ३

महापालिकेचे तालेरा रुग्णालय – २९ मे २०२० सकाळी १० ते दुपारी ३

महापालिकेचे थेरगाव रुग्णालय – २९ मे २०२० सकाळी १० ते दुपारी ३

राज्यातील लघु उद्योगांना पॅकेजची तयारी अंतिम टप्प्यात – उद्योगमंत्री सुभाष देसाई

0

मुंबईदि. २६ : केंद्र शासनप्रमाणे राज्य शासन देखील लघु-मध्यम-सूक्ष्म उद्योगांना मदत करण्याचे नियोजन करत आहेत. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर याबाबतची घोषणा केली जाईल. याद्वारे लघु उद्योगांवरील व्याजाचे ओझे हलके करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली.

नवभारत टाइम्सच्यावतीने आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते. श्री. देसाई म्हणाले की, कोरोनामुळे ठप्प झालेले उद्योगचक्र हळुहळु गतिमान होत आहे. सध्या राज्यात पन्नास हजार उद्योग सुरू झाले असून त्यात १३ लाख कामगार रुजू झाले आहेत. ४३ हजार कारखान्यांनी  परवाने मागितले आहेत.

दरम्यान, रेड झोनमधील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यापार व दुकाने सुरू करण्याची मागणी होत आहे. याबाबत १ जूननंतर शासन निर्णय घेऊ शकते, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.

औद्योगिक कामगार ब्युरो सुरू केला जाणार आहे. त्यासाठी पोर्टल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. या पोर्टलद्वारे कुशल-अवकुश मनुष्यबळाची नोंदणी केली जाणार आहे. याद्वारे जेथे जेथे कामगारांची गरज भासेल त्याठिकाणी कामगारांचा पुरवठा केला जाणार आहे. दरम्यान, मागील दोन वर्षात राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावे घेतले. यामध्ये सहभागी झालेल्या तरुणांची उद्योग विभागाकडे नोंद आहेत. त्यातील तरुणांना देखील रोजगाराची संधी निर्माण करून दिली जाणार आहे.

विदेशी गुंतवणुकीसाठी एमआयडीकडे ४० हजार हेक्टर जमीन सर्व सुविधांसह सज्ज आहे. विदेशी कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. देश-विदेशातील लघु उद्योगांनी आपल्या प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्राची निवड करावी, असे आवाहन उद्योगमंत्र्यांनी केले.

पावसाळ्यात आपत्तीच्या दृष्टीने यंत्रणांत समन्वय ठेवा; रोगराई वाढणार नाही याची काळजी घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. २६ : सध्या आपण कोविडचा मुकाबला करीत असतांनाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींना देखील आपल्याला समर्थपणे तोंड द्यायचे आहे, त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगला समन्वय ठेऊन काम करावे तसेच रोगराई पसरणार नाही यासाठी आधीपासून नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. ते आज आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व आढावा घेत होते.

या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव अजोय मेहता,  सर्व विभागीय आयुक्त, रेल्वे, नौदल, लष्कर, हवाई दल, तटरक्षक दल, हवामान विभागाचे  तसेच मुंबई पालिका आयुक्त व  इतर अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यावेळी म्हणाले की, हवामानाचा अंदाज सांगायला कुठल्याही भोलानाथाची गरज नाही इतके आता तंत्रज्ञान विकसित झाले आहे मात्र तरी देखील पाऊस आपले अंदाज चुकवतोच. अचानक कमी दाबाचा पट्टा तयार होणे, त्यामुळे वादळ, जोरदार पाऊस, ढग फुटी असे काहीही होऊ शकते, त्यामुळे सर्व विभागांनी हवामान विभागाच्या कायम संपर्कात राहावे व चांगला समन्वय ठेवावा.

ज्याप्रमाणे विमान वाहतुकीच्या वेळी हवामानाविषयी खात्री करून घेता येते त्याप्रमाणे रेल्वेने देखील पुढील मार्गातील हवामानाचा अंदाज पाहून  रेल्वे गाड्यांचे नियोजन करावे. गेल्या वर्षी महालक्ष्मी एक्स्प्रेस भर पावसात बदलापूरजवळ अडकली होती त्याचा संदर्भ त्यांनी दिला.

आपण आपत्तीत बचावकार्य करणार आहोत पण सध्या कोविड परिस्थितीमुळे सावधानता बाळगावी लागणार आहे. यादृष्टीने आवश्यक ती संरक्षण साधने व किट्स. मास्क उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

गेल्या वर्षीप्रमाणे सांगली – कोल्हापूरला पुराची पुनरावृत्ती नको

गेल्या वर्षीप्रमाणे सांगली-कोल्हापूरला यंदा पुराचा फटका बसू नये म्हणून धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे व अलमट्टी धरणातील पाण्याबाबत तेथील विभागाशी आत्तापासून समन्वय ठेवावा अशा सूचनाही त्यांनी केल्या

कोणत्याही परिस्थितीत खड्डे नकोत

मुंबईत २००५ च्या पुरानंतर आपण अधिक काळजीपूर्वक व सुविधांनिशी काम करू लागलो. नालेसफाई, त्यांचे  खोलीकरण, वेळीच पाणी निचरा होणे हे महत्त्वाचे आहे. पंपिंग स्टेशन व्यवस्थित चालली पाहिजेत. पाण्याचा निचरा करणारे  तेथील पाईप्स मोकळे आहेत का ते पहायला पाहिजे. शहरी असो किंवा ग्रामीण भाग पण कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर खड्डे पडू न देणे आणि पडले तर तात्काळ बुजविणे महत्त्वाचे आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. दुर्गम भागात पावसाळ्यात अन्नधान्य, औषधी पुरवठा व्यवस्थित झालेला आहे का हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

विभागवार, जिल्हावार बैठका घेऊन व त्यात सबंधित डॉक्टर्सना सहभागी करून घेऊन पावसाळ्यातील रोगांसाठी चांगले नियोजन करण्यास त्यांनी सांगितले. अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडा संकुलात कोविडसाठी विलगीकरण सुविधा केल्याने एनडीआरएफला पर्यायी जागा लगेच द्या, असे निर्देश त्यांनी दिले. स्थानिक पातळीवर माजी सैनिकांना सहभागी करून घेतल्यास भारतीय लष्कर आणि प्रशासनात चांगला समन्वय राहील असेही ते म्हणाले.

मेघदूत आणि उमंग मोबाईल एप

भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक के एल होसाळीकर यांनी यावेळी सादरीकरण करून सांगितले की, राज्यात पाऊस सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त असेल.  १ ते २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात कोसळण्याची शक्यता आहे. अल निनोचा प्रभाव पडणार नाही. ज्यामुळे गेल्या वर्षी उत्तरार्धात भरपूर पाऊस झाला तो इंडियन ओशन डायपोल देखील अनुकूल आहे. मराठवाड्यात सर्वसामान्य तर विदर्भात सामान्यापेक्षा कमी पाऊस होईल. सर्वसाधारणरित्या महाराष्ट्रात ११ जून रोजी पाऊस येईल आणि  नेहमीपेक्षा जास्त रेंगाळून ८ ऑक्टोबर रोजी त्याच्या परतीचा प्रवास सुरु होईल. गेल्यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ३२ टक्के पेक्षा जास्त पाऊस झाला होता असे ते म्हणाले.

मुंबईतील हवामान विभागाचे संपर्क

मुंबईतील हवामान विभाग मुंबई पालिकेच्या समन्वयाने काम करीत आहोत. मुंबई तुंबते त्यासाठी पूर इशारा यंत्रणा विकसित केली आहे. प्रभाग पातळीवर किती पाऊस पडून पाणी पातळी किती वाढू शकते याची वेळीच माहिती मिळते . १४० पर्जन्यमापन केंद्रे सध्या असून शेतकऱ्यांसाठी मेघदूत मोबाईल एप आहे तसेच उमंग मोबाईल एपवर देखील रिअल टाईम माहिती मिळू शकेल असे ते म्हणाले.

मुंबईतील हवामान विभागाचे संपर्क क्रमांक ०२२-२२१५०४३१/ ०२२- २२१७४७१९ आणि ईमेल acwc.mumbai@gmail.com असे आहेत.

पावसाळ्यात समस्या येऊ नये म्हणून मुंबई पालिका सज्ज

मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल म्हणाले की, मान्सूनपूर्व कामे करण्यासंदर्भात मुंबईत बांधकामे सुरु असणाऱ्या संस्थांकडून विनंती करण्यात आल्या होत्या. १ हजारपेक्षा जास्त परवानग्या प्रलंबित होत्या. त्यांच्याकडून ऑनलाईन अर्ज भरून घेऊन मुंबईत बांधकामांच्या ठिकाणी मान्सून पूर्व सुरक्षिततेसाठी, तसेच डेब्रिज काढणे वगैरेची कामे सुरु झाली आहे. मुंबईतील ४०० किमीचे नाले ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण केले असून तुंबणारे नाले स्वच्छ करण्यात येत आहेत.

प्रत्येक वॉर्ड अधिकाऱ्याने रेकी करून त्यांच्या भागात गटारे व चेंबर्स उघडी नाहीत ना याची खात्री करून घ्यायला सांगितले आहे. हिंदमाता, कलानगर, आणि इतर ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करणार असून उच्च क्षमतेचे पंप्स वापरून पाणी उपसणे शक्य केले आहे.  मुंबईत कुठेही अडचण येणार नाही असे आश्वस्त करून पालिका आयुक्त म्हणाले की, मुंबईत ३३६ पुराची ठिकाणे आहेत. मिठी नदीचे सफाईचे ७७% काम पूर्ण झाले आहे.

३२४ पाणी उपसणारे पंप कार्यान्वित आहेत. पुराचे पाणी उपसा करण्यासाठी ६००० लिटर्स प्रती सेकंद पाणी उपसणारी यंत्रणा देखील सुरु आहे असे ते म्हणाले. कुर्ला, सायन येथे पाणी साचू नये म्हणून मोठ्या शक्तिशाली क्षमतेचे पंप बसवले आहेत. रस्त्यांची ६०९ कामे १० जूनपर्यंत पूर्ण करणार असून ३२ पूल दुरुस्ती कामे सुरु आहेत.

५६१ मृत झाडे पूर्णपणे तोडायची असून १,१७,००० झाडांच्या फांद्या छाटण्यात येत आहेत असे सांगून ते म्हणाले की, २०१९ मध्ये पावसाळ्यातील विविध रोगांमुळे मुंबईत २० मृत्यू झाले होते. यात लेप्टो, डेंग्यू,स्वाईन फ्ल्यू  या रोगांचा समावेश होता. यंदा मे महिन्यापर्यंत गॅस्ट्रोमुळे १८०२, मलेरिया ५१९, हेपेटायसीस १८८, स्वाईन फ्ल्यू चे ४२ असे रुग्ण आढळले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.

मध्य रेल्वे, कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देखील मान्सूनपूर्व कामांची माहिती दिली.

गेल्या वर्षी कल्याण, सांगली, कोल्हापूर येथे नौदलाने अविरत काम करून अनेकांचा जीव वाचवला आमचे  दल मुंबई, पुणे, नागपूर याठिकाणी हेलीकॉप्टरने सज्ज आहे असे नौदल अधिकाऱ्यांनी सांगितले.

तटरक्षक  दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुठल्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी ९ जहाजे तयार असून ८ एअरक्राफ्ट देखील आहेत. याशिवाय, मेरीटाईम नियंत्रण कक्षाच्या मदतीने संकटाशी मुकाबला करण्यात येईल.

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल एनडीआरएफच्या  अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्याकडे १८ टीम्स असून  (एका टीम मध्ये ४७ जवान असतात) मुंबई, नागपूर व पुण्यात त्या तैनात आहेत. बोटींची मर्यादा लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्याकडे रबरी बोटींचा आगाऊ साठा ठेवावा असेही ते म्हणाले. भारतीय लष्कर अधिकाऱ्यांनी सांगितले की, ३९ कंपन्या या आम्ही तयार ठेवल्या आहेत. सेन्ट्रल कमांडिंग सेंटरमधून आपत्तीच्या वेळी सुचना मिळाव्यात म्हणजे प्रत्यक्ष नियोजन करता येणे शक्य होईल अशी सुचना त्यांनी केली. माजी सैनिक यांचा लष्कर आणि प्रशासनात चांगले समन्वयक म्हणून काम करतील अशी सूचनाही त्यांनी केली.

अभिनेता उपेंद्र लिमयेची पत्नी आहे डॉक्टर, कोरोनाच्या लढाईत दिलंय मोलाचं योगदान

0

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता उपेंद्र लिमयेची पत्नी स्वाती डॉक्टर असल्याचे फारच कमी लोकांना माहित आहे. इतकंच नाही तर कोरोना व्हायरसच्या संकटात त्यांनी मोलाचे योगदानही दिले आहे.

जोगवा, सूरसपाटा, यलो यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता उपेंद्र लिमये याची पत्नी डॉ. स्वाती लिमये होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने अर्सेनिक अल्बम 30 हे होमिओपॅथिक औषध कोरोना होण्यापासून रोखण्यासाठी प्रभावी ठरत असल्याचे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवत असल्याचे जाहीर करत या औषधाचे सेवन करण्याचा नागरिकांना सल्ला दिलात्याला अनुसरून गोरेगाव येथे राहत असलेल्या होमिओपॅथीमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर स्वाती उपेंद्र लिमये यांनी स्वतः अर्सेनिक अल्बम 30 हे औषध बनविले आहे आणि गोरेगाव व मालाड परिसरातील सुमारे 640 कुटुंबांना औषधाचे मोफत वाटप केले आहे. तसेच त्यांनी मालाड पोलीस स्टेशनमध्ये सुमारे 252 पोलीस कुटुंबासाठी औषध दिले.येत्या काळात कोरोनाचे संकट लक्षात घेऊन त्यांनी मोठ्या प्रमाणावर हे औषध तयार करून मोफत वाटप करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या मोलाच्या कार्यात त्यांचा पती म्हणजेच अभिनेता उपेंद्र लिमये, मुलगी भैरवी लिमये तसेच संदीप भोसले, अर्जुन दळवी, आमोद दोशी सहकार्य करत आहे.

जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी धोरण निश्चित करणार – आ.चंद्रकांतदादा पाटील

भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्या पुढाकाराने मराठी बांधकाम व्यवसायिक संघटनेच्या कार्यकारिणीसह वेबीनार संपन्न

पुणे-रस्त्यांच्या रुंदीकरणा अभावी व ६ मीटर रस्त्यावर अतिरिक्त टीडीआर अनुज्ञेय नसल्याने कोथरूड सह संपूर्ण पुण्यातील गृहप्रकल्प पुनर्विकास रखडला आहे. बांधकाम व्यवसायायिकांना मंदी मुळे आणि आता कोरोनाच्या संकटामुळे भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे  आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज वेबीनार द्वारे मराठी बांधकाम व्यवसायिक संघटनेच्या कार्यकारिणी सदस्यांशी संवाद साधला.

भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी याबाबत चंद्रकांतदादा पाटील यांना विनंती केली होती. सदर वेबीनार मधे  जितेंद्र सावंत – अध्यक्ष, एस आर कुलकर्णी – संस्थापकीय अध्यक्ष,  ज्ञानेश्वर घाटे – कार्याध्यक्ष,  संदीप कोलटकर – सचीव, प्रमोद पाटील – खजिनदार,  नितीन देशपांडे, अंकुश असबे, विक्रम गायकवाड, मुकेश येवले, विशाल गोखले, अमोल रावेतकर, दिलीप कोटीभास्कर, प्रवीण बढेकर, आर्कि. मिलिंद चोधरी, आर्की. मिलींद जोशी व आर्की. सिद्धार्थ हरिश्चंद्रकर.

मिलिंद देशपांडे यांनी सूत्रसंचालन करत विविध प्रश्न उपस्थित करुन समन्वयक म्हणून काम केले.

यात सर्वप्रथम ६ मीटरचे रस्ते ९ मीटर करण्यात यावेत अशी भूमिका सर्वांनीच मांडली असता चंद्रकांतदादां नी सुरुवातीलाच मी याबाबत आमच्या मनपातील पदाधिकाऱ्यांशी बोललो असून याबाबतचे धोरण ठरवत आहे असे स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान बहुतांश सोसायटीतील बैठकीत पुनर्विकासाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला गेला होता व मी देखील माझ्या वचननाम्यात याचा अंतर्भाव केला आहे असे चंद्रकांतदादांनी आवर्जून सांगितले…. त्यालाच अनुसरून हे धोरण ठरवत आहे असेही ते म्हणाले.

यानंतर चंद्रकांतदादांनी विविध प्रश्नांची सकारात्मक उत्तर देत त्रिस्तरीय प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली.यात प्रामुख्याने …

१. पुणे मनपा ने संपूर्ण शहरातील ६ मिटर रूंदीचे रस्ते ९ मिटर करण्याची घोषणा करून, विहित नमुन्यात नागरीकांच्या कडून प्रस्ताव मागवावेत. सदर प्रस्ताव ऑनलाईन स्विकारण्याची तजवीज करावी.
२. टिडिआर सेलच्या धर्तीवर, पुनर्विकास मंजुऱ्यांकरिता पुणे मनपात एक स्वतंत्र विभाग उघडावा.
३. बऱ्याच ठिकाणी पूर्णत्वाचा दाखला देताना, कोणतीही कायदेशीर तरतूद नसताना वसूल करण्यात येणारे रस्ते विकास शुल्क बंद करावं.
४. पुनर्विकास प्रकल्प सुरू करण्यापूर्वी निबंधक, सहकार विभाग यांची घ्यावी लागणारी मान्यता अत्यंत वेळखाऊ असल्याने त्याने प्रकल्पाचा खर्च अकारण वाढतो. सदर परवानगी रद्द करावी.
५. पुणे मनपाला भरावयाचे प्रिमियम इत्यादी शुल्कामधे गेल्या काही वर्षांत भरमसाठ वाढ झाली असून, सदर पैसे भरण्यास मनपाने मुंबई महापालिकेच्या धर्तीवर हप्त्याने भरण्यास परवानगी द्यावी.
६. कमाल नागरी धारणा कायद्याच्या कलम २० अंतर्गत, सध्या जमीन मालकांच्या एकूण क्षेत्रावर शुल्क भरून घेतलं जात असून सदर आकारणी ही मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे. सदर आकारणी ची पद्धत त्वरीत बदलण्यात यावी.
७. जर एखाद्या सर्व्हे क्रमांकामधे संरक्षण विभागाचा ना हरकत दाखला विशिष्ट ईमारत उंचीकरिता मिळाला असेल, तर त्याच्या आसपास तेवढ्या उंची पर्यंत इतर ईमारतींना नव्याने परवानगी मागू नये.
८. बांधकाम व्यवसायिकांना प्राप्त झालेल्या बँक कर्जाच्या अटी व शर्ती, रिझर्व्ह बँकेच्या उत्पादन क्षेत्राबाबत असलेल्या प्रचलीत धोरणानुसार, पुनर्विचार करण्यात यावा.
९. २०१७ पूर्वी प्रमाणे बाल्कनी बंदिस्त करण्यास परवानगी मिळावी.

हे सर्व विषय राज्य व केंद्र सरकारकडे आपण मांडू आणि पुणे मनपा शी संबंधित प्रश्नां बाबत कोरोना चा कहर कमी झाल्यावर विस्तृत बैठक घेउ असे ही चंद्रकांतदादां नी स्पष्ट केले.
दादांच्या अभ्यासू आणि सकारात्मक प्रतिसादाचे सर्वच व्यवसायिकांनी स्वागत केले.

जितेंद्र सावंत व नंदू घाटे यांनी समारोप करताना सर्व प्रश्न सुटतील आणि बांधकाम व्यवसायिक पुण्याच्या विकासाला हातभार लावतील अश्या भावना व्यक्त केल्या.

पुणे विभागातील मान्सूनपूर्व तयारीबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती

पुणे दि.26: – पुणे विभागातील मान्सूनपूर्व तयारीचे नियोजन, आपत्ती व्यवस्थापनाचा परिपूर्ण आराखडा, नाल्यांची सफाई, पावसाळयापूर्वीची कामे पूर्ण करण्याबाबतचे नियोजन ,तसेच गतवर्षी विभागात सांगली व कोल्हापूर जिल्हयात गंभीर पूरपरिस्थिती उद्भवली, त्यादृष्टीने खबरदारीचे नियोजन यासह पुणे विभागातील मान्सूनपूर्व तयारीबाबत विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज सविस्तर माहिती दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील विभागनिहाय मान्सूनपूर्व तयारीबाबतचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात सुरु असलेल्या उपाययोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, गतवर्षी पुण्याबरोबरच सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हयात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे येथील नागरिकांची गैरसोय झाली होती. या वर्षी पावसामुळे अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेत नियोजन करयात आले आहे. नद्यांच्या खोलीनुसार व नदीच्या प्रवाहाच्या वेगाचा अंदाज घेवून जास्त क्षमतेच्या बोटी खरेदी तसेच शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतांचा तुटवडा भासणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या संकटाचा सामना करताना मान्सूनपूर्व कामांकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत
आम्ही दक्षता घेतल्याचे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करताना गतवर्षातील त्रुटी राहणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे. पावसाळयापूर्वीची कामे वेळेत पूर्ण होतील, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. तसेच पुण्याच्या आंबील ओढयाबाबतची दक्षता तसेच गतवर्षी अलमट्टी धरणाचा विसर्ग न वाढल्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्हयात पूरस्थिती उद्भवली, यावर्षी याबाबतच्या दक्षतेबाबत डॉ. म्हैसेकर यांनी सविस्तर माहिती दिली.
पुणे विभागातील बहुतांश महानगरपालिका क्षेत्रातील शाळा कोवीड केअर सेंटरसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, त्यामुळे पावसाळयाच्या कालावधीतील संभाव्य अडचणीच्या कालावधीत निवा-याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
00000

कोविड रुग्णांसाठी रुग्णवाहिका वाढवणार

.रुग्णवाहिका नियंत्रणासाठी डॅशबोर्ड प्रणाली विकसित
– विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे दि.२६: कोरोना साथीमुळे रुग्णांची वाढती संख्या व रुग्णवाहिकेंची मागणी लक्षात घेऊन रुग्णवाहिकेंची संख्या व उपलब्धता वाढवणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
पी एम पी एल व प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पी एम पी एल च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती नयना गुंडे,सह व्यवस्थापक अजय चारठणकर,सुनील बुरसे,अनंत वाघमारे,प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे उपस्थित होते.
पुणे व पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या नोंदणी झालेल्या शासकीय व खाजगी आशा एकूण २ हजार३४२ रुग्णवाहिका असून सध्या कोविड रुग्ण वाढत असून रुग्णवाहिकेची वाढती मागणी लक्षात घेऊन रुग्णवाहिका वाढवण्यात येणार आहेत. त्यासाठी पी एम पी एल कडे असणाऱ्या मिडी बस या रुग्ण वाहिकेत आवश्यकतेनुसार रूपांतरित करण्याच्या शक्यता पडताळून पहाव्यात अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.
या सर्व रुग्णवाहिकांना जी पी एस प्रणाली बसवण्यात येणार असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॅशबोर्ड प्रणाली विकसित केली आहे. महापालिकेच्या वार्ड निहाय या रुग्ण वाहिका थांबवण्यात येतील. रुग्णांना नेण्यासाठी जवळची रुग्णवाहिका व जवळच्या रुग्णालयातील खाटांची उपलब्धता डॅशबोर्ड मूळे त्वरित समजून येईल व रुग्णाला तातडीने ऍडमिट करणे सोयीचे होणार आहे. रुग्णवाहिकेच्या वाहनचालक व कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण दिले जाणार असून रुग्ण व मृतदेह हाताळताना पी पी इ किट,मास्क,ग्लोव्हज हे घालणे अनिवार्य राहील . कोविड व नॉन कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका असतीलअसे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
पी एम पी एल कडे असणाऱ्या मिडी बसमध्ये सुधारणा करून त्या रुग्णवाहिकेत रूपांतरित करण्याकरिता प्रादेशिक परिवहन विभागाबरोबर समन्वय ठेवला जाईल असे पी एम पी एल च्या श्रीमती गुंडे यांनी सांगितले.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्णसंख्या झाली 3 हजार 689

पुणे विभागातील 3 हजार 674 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 7 हजार 719 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 26 :- पुणे विभागातील 3 हजार 674 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 7 हजार 719 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार 689 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 356 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 215 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 6 हजार 303 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 3 हजार 195 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 819 आहे. कोरोनाबाधित एकूण 289 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 208 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 501 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 404, सातारा जिल्ह्यात 26, सोलापूर जिल्ह्यात 31, सांगली जिल्ह्यात 3, कोल्हापूर जिल्ह्यात 37 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 335 कोरोना बाधीत रुग्ण असून 126 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 201 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 621 कोरोना बाधीत रुग्ण असून 291 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 275 आहे. कोरोना बाधित एकूण 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 82 रुग्ण असून 47 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 33 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत 378 रुग्ण असून 15 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 361 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 74 हजार 968 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 67 हजार 517 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 7 हजार 451 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 59 हजार 688 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 7 हजार 719 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

(टिप : – दि.26 मे 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

पुणे विमानतळावर देशांतर्गत विमानसेवेतून नागरिकांचे आगमन- जिल्हाधिकारी राम

पुणे दि.26 : – 25 मे 2020 पासून देशांतर्गत विमानसेवा सुरु झालेली आहे. 25 मे 2020 रोजी 11 विमानाने 823 तर 26 मे 2020 रोजी 8 विमानाने 344 प्रवाशांचे असे एकूण 1,167 प्रवाशांचे पुणे विमानतळावर आगमन झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.
या येणा-या प्रवाशांबाबत पुणे महानगरपालिकेमार्फत थर्मल स्क्रिनिंग तसेच होम क्वारंटाईन सील ॲन्ड हेल्प डेस्कची सुविधा 24 X7 करण्यात आली आहे.
पुणे विमानतळ येथे उतरणा-या नागरिकांबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांची तर त्यांच्या सहाय्याकरीता प्र.सहाय्यक जनसंपर्क अधिकारी योगेश हेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी याकामी जिल्हाधिकारी कार्यालयाचे राजशिषटाचार अधिकारी अमृत नाटेकर यांच्या संपर्कात राहण्याचे तसेच वेळोवेळी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लॉकडाऊनच्या काळातही आंबा निर्यातीला मोठे यश; कोकणातील ८ हजार ६४० टन आंब्याची निर्यात

0

नवी मुंबई, दि. 26 :- लॉकडाऊनच्या काळात सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा मर्यादित असताना कोकणातील 8 हजार 640 मे.टन आंब्याची निर्यात कृषि विभागामार्फत करण्यात आली.  1 एप्रिल ते 19 मे 2020 या कालावधीत केळी, कांदा, द्राक्षे, डाळिंब, लिंबु, मिरची, आले व इतर भाजीपाला व फळे मिळून एकूण 2 लाख 99 हजार 950 मे. टन मालाची निर्यात करण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाविरुध्द लढाई सुरु असताना शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या.  यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीचे संकट दूर करण्यासाठी कृषि माल निर्यात सुरळीत ठेवण्यात यश आले. या परिस्थितीत कृषि विभागाने जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट आणि मुंबईचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यामार्फत भारतातील फळे व भाजीपाला समुद्र व हवाई मार्गाने जगभरात निर्यात केला. मागील दीड महिन्यात विविध देशांच्या मागणीनुसार फळे व भाजीपाल्यांची निर्यात करण्यात आली आहे. आंबा 8 हजार 640 मे.टन, केळी 33 हजार 948 मे. टन, द्राक्ष्‍ो 9 हजार 509 मे. टन, डाळिंब 1 हजार 773 मे. टन, कांदा 2 लाख 25 हजार 686 मे.टन,  लिंबु 653 मे.टन, मिरची 1 हजार 522 मे. टन, आले 1 हजार 168 मे. टन, इतर फळे व भाजीपाला 17 हजार 051 मे.टन  निर्यात करण्यात आले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत केळी, लिंबू, मिरची आणि आले याची निर्यात यावर्षी जास्त झालेली आहे. यामध्ये केळी गेल्या वर्षी 23 हजार 456 मे.टन तर यावर्षी 33 हजार 948 मे.टन निर्यात झाली आहे. म्हणजेच केळी निर्यात सुमारे दीडपट झालेली आहे. लिंबाची निर्यात गेल्या वर्षी 283 मे.टन होती. यावर्षी 653 मे.टन झाली आहे. मुंबईमधून गेल्यावर्षीच्या तुलनेत लिंबू निर्यात 230 टक्के झालेली आहे. हिरव्या मिरचीची निर्यात गेल्या वर्षी 1 हजार 409 मे.टन झाली होती. त्या तुलनेत यावर्षी 1 हजार 522 मे.टन म्हणजे सुमारे 113 मे.टन जास्त झाली आहे. तसेच आल्याच्या निर्यातीतही चांगली वाढ झालेली असून गेल्यावर्षी आले निर्यात  846 मे.टन होती. यावर्षी 1 हजार 168 मे.टन झालेली आहे.

मागील वर्षाच्या निर्यातीच्या तुलनेत यावर्षीची निर्यात कमी झालेली असली, तरी कोरोनाच्या संकटातील लॉकडाऊनच्या काळात जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट येथून कंटेनर आणि ट्रेलरसाठी वाहनचालकांची कमतरता असतानाही तसेच वाहतुकीच्या वेळी रस्त्यांवर कोणत्याही जेवणाच्या तसेच वाहन दुरुस्तीच्या सुविधा नसतानाही निर्यातीसाठी फळे व भाजीपाला उपलब्ध करुन देणे हे कौतुकास्पद आहे.  पुढील काळात या निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येईल. त्यासाठी योग्य उपाययोजना व नियोजन करण्यात आले आहे.

कोरोना वेगाने पसरतोय ,आतापर्यंतच्या बंदचा हेतू अपयशी,देश परिणाम भोगतोय (व्हिडीओ)

नवी दिल्ली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भारत जगातील एकमेव असा देश आहे जेथे कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर लॉकडाउन हटवले जात आहे. लॉकडाउनचा उद्देश अयशस्वी झाला आहे, त्याचा परिणाम देशाला भोगावा लागत आहे. चार टप्प्यांच्या लॉकडाउननंतरही पंतप्रधान आशा करत असलेले परिणाम मिळाले नाही.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/979762239108065/

केंद्र सरकारने प्रवासांच्या मदतीसाठीचे उपया सांगावे

राहुल म्हणाले की, पंतप्रधान सुरुवातील फ्रंट फुटवर खेळत होते, मात्र लॉकडाउन फेल झाल्यानंतर ते बॅकफूटला गेले. त्यांनी पुन्हा एकदा पुढे यावे. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्य सल्लागार म्हणाले होते की, मे अखेरपर्यंत कोरोनाचा परिणाम कमी होईल मात्र असे काहीच घडत नाही. आता सरकारने पुढील योजना सांगाव्यात. लॉकडाउन उघडण्याच्या धोरणात स्थलांतरितांना आणि राज्यांना मदत करण्यासाठी कोणती व्यवस्था केली? याबाबतही त्यांनी सांगावे.

गरिबांच्या हातात पैसा पोहचणे आवश्यक

सरकारने दिलेल्या आर्थिक पॅकेजमुळे काही काहीही होणार नाही. लोकांचा हातात पैसा पोहचायला हवा. सामान्य लोक आणि इंडस्ट्रींना आर्थिक मदत मिळाली नाही तर त्याचे भयंकर परिणाम होतील. केंद्राने राज्यांनाही मदत करावी. त्याशिवाय काँग्रेस शासित राज्यांना अडचणींचा सामना करावा लागले असे राहुल गांधी म्हणाले.

सीमाप्रश्नावरही सरकार पारदर्शक नाही

चीनसोबत सुरू असलेल्या वादाबाबत राहुल म्हणाले की, याप्रकरणी सरकारने केव्हा आणि काय झाले हे स्पष्टपणे सांगावे? नेपाळमध्ये काय झाले आणि आता लडाखमध्ये काय घडत आहे? याबद्दल अद्याप पारदर्शकता नाही.

दोन महिन्यांत राहुल यांची चौथी पत्रकार परिषद

लॉकडाउनच्या मागील 60 दिवसांत राहुल गांधींची ही चौथी पत्रकार परिषद होती. यादरम्यान त्यांनी दोन वेळा राष्ट्रीय मीडिया आणि दोन वेळा स्थानिक मीडियाशी चर्चा केली.